Skip to main content

विडंबन

आयडीचे डू-आयडीस पत्र

लेखक नीलमोहर यांनी बुधवार, 10/02/2016 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
तू उडालास... बरं झालं. आणि लवकर उडालास ते आणखीन बरं झालं. नाही तरी जिलब्या टाकत सुटायचास.... काय उपयोग होता तुझा? समज दिल्यानंतर तुझं जिलब्या टाकणं कमी होईल या आशेनं संमंनी तुला डोसही दिला. पण आधी बरा लिहीणारा तू, सुमार जिलब्या प्रतिसादांचा रतीब लावायला लागलास, का तर म्हणे डोक्याला त्रास कमी होतो. मिपाकर तुझी खेचायचे, वारंवार तुझी संपादकांकडे तक्रार करुन, मालकांना पाचारण करायचे. त्यांनी तुला असा काही झोडला आणि म्हणाले, ' ....

नवर्‍याचे नवविधवेस पत्र

लेखक तर्राट जोकर यांनी बुधवार, 10/02/2016 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
तुझं पत्र मिळालं, कसं कुठे ते विचारु नको... सांगतो सावकाश. मी गेलो आणि त्याचा तुला आनंद झाला हे ऐकून माझ्या काळजाला चिरा पडतील असं का वाटलं तुला? त्या आधीच पाडल्यात, माझ्या लाडक्या दारूने. रात्री माझा काही उपयोग नव्हता म्हणालीस का..? आता सर्व स्पष्टच करतो. तुझ्याजवळ आलं की तू सतराशेसाठ कारणं द्यायचीस, आज काय तर एकादशी, मग काय चतुर्थी, कधी अंगारकी, मंगळवार, शिवरात्र, अगदी काहीच कारण सापडलं नाही तर तुझं डोकं तरी दुखायचं. आता मी दारू नाय पिणार तर काय करणार. दारू मला नशा देतांना असली कुठली कारणं देत नव्हती गं. पोटात गेली की सरळ ढगात.

काटा हालेना, काटा चालेना

लेखक बाजीप्रभू यांनी बुधवार, 10/02/2016 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो!! तुमच्या सगळ्या शिव्या-शाप मंजुर पण माझ्या ह्या पापात जरा सहकार्य करा. लवकरच आमच्या माजी विद्यार्थ्यांचा योगा कॅम्प होऊ घातलाय. कॅम्प उत्तर काही मनोरंजन कार्यक्रम आहेत त्यात मला 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे विडंबन सादर करायचं आहे.… काही यमक चालीत बसत नाहीयेत… वेळ कमी आहे म्हणून मिपादारी गाऱ्हाणं घालायला आलोय. कृपया मदत करावी.
काव्यरस

मिपात जरा ऊदासच वाटलं...

लेखक अभिदेश यांनी मंगळवार, 09/02/2016 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मिपात जरा ऊदासच वाटलं लाटकरांची लाटी आणि जिलेबी नाही डांगे ह्यांचा स्कॉर्पियो चा प्रवास संपत नाही गुरुजींचा एक वर्ष पूर्तीचा धागा संपत नाही ट. का. चं लग्न जमल्याची बातमी नाही बरेच दिवसांत आस्तिक नास्तिक वाद नाही कोणाची छायाचित्र स्पर्धेतला पुरस्कार वापसी नाही दीपक कुवेतची पनीर रेसिपी नाही छ्या … पूर्वीचं मि .पा. आता राहिलं नाही मिपात आल्यावर जरा ऊदासच वाटलं

अस्तित्वाची बोंब

लेखक संदीप डांगे यांनी सोमवार, 08/02/2016 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
स्फुर्तीदाते: मितभाषी आणि त्यांचे लाघवी मूल. प्रश्न पहिला माझा, रे गड्या मितभाष्या, काय पिवुनि तुवा वाजवला हा ढोल-ताश्या! मूळ बघता सर्व वादांचे असे बस फक्त पिण्याचे अध्यात्म नाहीरे षंढाचे हे तुज नाही कळायाचे. भेद भावा तु बघ जरा अज्ञानास फाडती टरा टरा डोळे फिरवती गरा गरा दंभ नाहीच इथे खरा तुम्हा नसे त्याची प्रचिती म्हणुनि त्या खोटा म्हणती मनापासुनि ते ओरडती अंधारासी मी एकच पणती. हिशोब सरला रे जन्माचा बाकी थोडा असे मिपाचा मिंधा नसे कुणाच्या बा'चा पण मानासाठी घासतो टाचा करु लढाया थुंकायाच्या जोर लावुनि भुंकायाच्या दोन शिव्या

जर्जरी वार्धक्य माझे

लेखक तिमा यांनी रविवार, 07/02/2016 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
जर्जरी वार्धक्य माझे तू पहाटे गोंजरावे जीर्ण काया, क्षीण माया, तू जरासे थोपटावे लागुनी थंडी कहारी, खोकल्याची उबळ यावी हे प्रिये तू मज जरासे मधुविलेपन चाटवावे श्वास माझा लागलेला म्रुत्युची चाहूल भिववे आर्जवी स्पर्शात तूही मज जरासे सावरावे दे मला आधार मांडी, जीव माझा कोंडताहे मी तुला जागे करावे परि स्वत: निसटून जावे.

घरात जरा उदासच वाटलं

लेखक अन्नू यांनी रविवार, 07/02/2016 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
जव्हेरजींच्या उदासीकडे बघून आमचेही दु:ख खदाखदा करत वर आले...

..

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 04/02/2016 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
..मोकलाया दिशा दाही मठाधीपती.... तांब्या s मठ्ठा .... sपकॉर्न...पकॉर्न ... पाsपकॉर्न...पापकॉर्न....पॉपकॉर्न झाडाची फांदी ....संस्कृती ...विडंबन अमेरीकन स्त्रीवाद.... ... जिलेबी... जिलेबी...जिलेबी... नेलपॉलीश..टिंगलटवाळी ....व्यव व्यव व्यवच्छेद लक्षण...आरक्षण .. स्त्री पुरुष.. लाळ... गळत्येय... 'आनंदाचा प्रसंग आहे, दोन थेंब घे.... किलर खंडया.... अं हं खंडया किलर... रोहिथ वेमुला.... जात.... लदाख सायकलने बापरे!