लेखकचांदणे संदीपयांनी सोमवार, 04/01/2016 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : "कुठ कुठ जायाच हनिमूनला" ही प्रसिद्ध ठसकेबाज लावणी!
कुठं कुठं जाऊ मी सांगायला?
अहो भरल्या जवानीत 'सर' तुम्ही मला हेरलं
हेरलं ते हेरलं अन् जॉबच् माझ्या ठरलं
ख्रिसमस झाला, "न्यू" इयर झालं
आता फक्त ऑफिस की हो उरलं!
मार्केटींग, मॅनेजमेंट, निवांत एच.आर.
कोण नाही पर्वा करायला
कुठं कुठं जाऊ मी सांगायला?
थोडं तरी इन्क्रिमेण्ट करायला!
रात्रभर एकटा बसू कसा?
क्लायंटला अडचण सांगू कसा?
बाकीचे सारे, प्रोफेशनल खरे
जातात टायमात ते घरला!
कुठं कुठं जाऊ मी सांगायला?
जमेल तेवढं खेचून मी काम
नाही केला आजिबात आराम
सकाळ
लेखकविवेकपटाईतयांनी रविवार, 03/01/2016 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
(कथेतील सर्व पात्र काल्पनिक आहेत).
सातव्या वेतन आयोगाची रिपोर्ट आली. वेतन आयोगाने सरकारी कर्मचार्यांना निराशच केले. घरभाडे न घेणाऱ्या लाला दुखी चंद (LDC)च्या पगारात तर चक्क बामुश्कील १ टक्का वाढ झाली आहे. विम्याची रकम वजा केल्यास फक्त ५ रुपये. इतरांच्या बाबतीत जास्तीस्जास्त ४ टक्का. [(http://www.
लेखकDEADPOOLयांनी शनिवार, 02/01/2016 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
क्रेकन
द मॉन्स्तर!
क्रेकनने त्याला गिळले.
आणि तो एका अंधार पोकळीत घुसला!
अंधार आणि फक्त अंधार!
डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही.
"आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला.
"हो" अरब म्हणाला.
"शैतानाची कलमे लक्षात आहेत?"
"हो"
"वागशील त्यानुसार?"
"हो"
"चांगलं की वाईट?"
"वाईट"
"नाग की गरुड़?"
"नाग"
"बकरा की गाय?"
"बकरा"
"स्वर्ग की नरक?"
"नरक"
"प्रेम की द्वेष?"
"द्वेष"
तो हसला!
"शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?"
"जमीन!"
"नाग आणि बकरे तुला मदत करतील."
तो अंधार पोकळीतून बाहेर आला.
समोर पूर्ण वाळवंट!
वाळवंटात एक जहाज बाहेर येत होती.
त्याच्या कानात आवाज घुमला
'तू जमीन निवडलीस'
पायरेट ऑफ़ डेज़र्ट!
पायरेट
लेखकज्ञानोबाचे पैजारयांनी बुधवार, 23/12/2015 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणेमधल्या हळूवार भावना या कवितेतही जपायचा प्रयत्न केला गेल्या आहे. तरी सुध्दा अतिसंवेदनाशील वाचकांनी कृपया खालील काव्य वाचू नये. होणार्या परीणामास मंडळ जबाबदार रहाणार नाही.
लेखकमाहितगारयांनी बुधवार, 23/12/2015 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
स्वप्नात झाले होते
पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!)
पंतप्रधान मोदींचे सचीव !! :)
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
त्यांनी विचारले गेले
वर्ष भर काय केले ?
ओबामां फोनु आला
डू यु नो अँड व्हॉट दे सेड ?
हॅप्पी न्यू यीअर !!
ओह मिपाकरांना आमचा
निरोप द्या
ओह मिपाकर
हॅप्पी न्यू यीअर !!
लेखकतिमायांनी शनिवार, 19/12/2015 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
घेई छंद हे लोकप्रिय गाणे, हीच प्रेरणा. आस्तिक-नास्तिक या खेळांत, बघा, खेळकरपणे घेता येत असेल तर!
मतिमंद, भक्तिधुंद
प्रिय ज्या,वृथानंद
प्रभूपूजना दंग
कर्मठांध, हा संग
मिटता मनचक्षुबल
होई बंदी हा मृदुंग
परि सोडिना फांस
भजनांत हा गुंग
लेखकशिव कन्यायांनी शुक्रवार, 11/12/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
घरात माणसे कमी
अन लोक वाढतात
तेव्हा गॅलरीची 'एक्स्ट्रा रूम' होते!
घरात नव्याला सूज येते
अन जुन्याचे कुपोषण होते
तेव्हा गॅलरीचा वृद्धाश्रम होतो!
घरात वाचणारे कमी
अन वाचाळ जास्त होतात
तेव्हा गॅलरीचा रद्दीखाना होतो!
घरात आवाज कमी
अन गोंगाट जास्त होतो
तेव्हा गॅलरीत 'सायलेंट झोन' येतो!
घरात हवे ते कमी
अन नको ते जास्त येते
तेव्हा गॅलरी 'अडगळीची खोली' होते!
घरात दिवस कमी
अन रात्री जास्त होतात
तेव्हा गॅलरीत बोन्साय वाढतात (?)
घरात, घर कमी
अन भिंती वाढतात
तेव्हा गॅलरीला काचा बसतात,
फक्त स्वतः चीच प्रतिमा दाखवणाऱ्या !
.