Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग ३)

म
मन यांनी
Tue, 03/22/2011 - 09:58  ·  लेख
लेख
नमस्कार. हा भाग तिसरा. तिसऱ्यावरून आठवलं इब्राहिमी धर्मही महत्त्वाचे तीन आणि सर्वात महत्त्वाचे त्यांचे प्रेषित ती यहुदी/ज्यू (प्रेषित मोझेस), ख्रिश्चन ( प्रकटनकर्ता जीझस ) आणि इस्लाम ( अंतिम प्रेषित मुहम्मद पैगंबर). येशू क्रुसावर मारल्यावरही पुनर्जीवित ते तीन दिवसांनंतरच. सर्व प्रथम श्री प्रसन्न केसकर ह्यांचे आभार. ह्या आणि पुढच्या काही भागात जे मला मांडायचं होतं, त्यातला बराचसा भाग त्यांच्याकडे आधीच उपलब्ध होता, प्रचलित ज्यू- ख्रिश्चन मान्यतांशी अगदी जुळणारा असा तो आहे. मी तो पुन्हा एकदा इथे मांडतोय. त्यांच्याकडून घेतलेलं लिखाण हे इटॅलिक्स मध्य असेल. मला त्यात काही भर घालावीशी वाटली तर ती मी घालेन. मागील काही प्रश्न पुन्हा लिहितोय. ४. ह्यांचा (इब्राहिमी) धर्मग्रंथ कुठला? ह्यात अजून थोडं लिहायला हवं होतं. बायबलचे भाग दोनः- ओल्ड टेस्टामेंट आणि न्यू टेस्टामेंट( जुना व नवा करार (देवाने मानव प्रतिनिधींसोबत केलेला)). ज्यू ओल्ड बायबलला प्रमाण मानत असले तरी त्यातील लिखाणाचे ३ विभाग त्यांनी केलेतः- तौरात (दैवी सूचना व आदेश), नेविम (प्रेषित व भविष्यवेत्ते/मार्गदर्शक/sooth sayers) केतुविम (संकीर्ण लिखाण, घटना कथा ह्यांचा संग्रह)मात्र ख्रिश्चन हे वेगळे विभाग न मानता एकाच "जुन्या करार" ह्या विभागात त्याचा उल्लेख करतात. ५. यांच्या देव-देवता, जीवन-मरण आणि नैतिकता ह्याबद्दल संकल्पना कुठल्या? हा प्रश्न असा मांडुयातः- आपल्या/सृष्टीच्या निर्मितीबद्दल ह्यांच्या काय कल्पना आहेत? तर कल्पना अशी आहे की पूर्वी/सुरुवातीस सृष्टीनिर्माण होण्यापूर्वी दिवसही नव्हता. रात्रही नव्हती. प्रकाशही नव्हता. अंधारही नव्हता. आकाशही नव्हतं! जल, भूमी हे ही बनायचे होते. अगदी काहीच म्हणजे काहीच नव्हते. It was absolute NULL. फक्त अनादी अनंत ईश्वर तेव्हढा होता. तर सृष्टीनिर्मितीबद्दल ही एक(तुरात मधील, जेनेसिस ह्या भागातील) कथा :- प्रारंभी देवाने पृथ्वी निर्माण केली तेव्हा वायुरुप पृथ्वी अंधाराने वेढलेली होती आणि देवाचा आत्मा जलाशयांवर पाखर घालत होता. देवाने शब्द उच्चारले, `प्रकाश होवो' आणि प्रकाश अस्तित्वात आला. देवाने पाहिले की प्रकाश चांगला आहे आणि त्याने अंधारापासुन प्रकाश वेगळा केला. देवाने प्रकाशाला दिनसमय आणि अंधाराला रात्रसमय म्हणले. हे सर्व पहिल्या दिवशी घडले. नंतर देवाने शब्द उच्चारले, 'जलाशयाच्या मध्यभागी अंतराळ होवो आणि अंतराळामुळे वरचे वायुरुप जलाशय आणि खालचे जलाशय अशी विभागणी होवो.' त्यानुसार घडवुन आणल्यावर देवाने अंतराळास आकाश असे नाव दिले आणि हे सर्व दुसर्‍या दिवशी घडले. पुन्हा देवाने शब्द उच्चारले, `अंतराळाखालील जले एकत्र येऊन त्यांचे महासागर निर्माण होवोत आणि कोरडी जमीन दृष्टीस पडो' तसेच घडल्यावर देवाने कोरड्या जमिनीस भूमी आणि जलाशयांस सागर अशी नावे दिली. मग देवाने शब्द उच्चारले, 'गवत, बीज देणार्‍या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळझाडे भूमी उपजावो' आणि तसेच घडुन आले. हे सर्व तिसर्‍या दिवशी घडले. त्यानंतर देवाने शब्द उच्चारले, 'दिवस आणि रात्र भिन्न करण्यास आकाशात ज्योती होवोत व त्या चिन्हे, ऋतु, दिवस आणि वर्षे दाखवणार्‍या होवोत' आणी तसे घडुन आहे. देवाने सुर्य व चंद्र या मोठ्या ज्योती आणि तारेही प्रकाश व अंधार वेगळे करण्यासाठी निर्माण केले. हे चौथ्या दिवशी घडले. पुढे देवाने शब्द उच्चारले `जलांमधे जीवजंतुंचे थवेच्या थवे उत्त्पन्न होवोत आणि पक्षी पृथ्वीच्या वर आकाशात विहार करोत.' त्यानुसार सागरातील प्राणी, जलचर, पक्षी निर्माण झाले. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, `फलदृप व्हा. वृद्धी पावा.' हे पाचव्या दिवशी घडले. मग देवाने शब्द उच्चारले, `गुरेढोरे, सरपटणारे प्राणी, जमिनीवरील प्राणी, वन्यपशू जे अस्तित्वात येवोत' आणि तसेव घडले. मग देवाने जमीनीवरील माती घेऊन त्याचेच प्रतिरुप असा मानव निर्माण केला आणि जलचर, पक्षी, पशू व सरपटणार्‍या प्राण्यांचे अधिपत्य त्याला दिले. मानवाच्या नाकपुड्यातुन त्याच्यात आत्मा "किंवा प्राण" फुंकला आणि आशीर्वाद दिला, `फलदृप व्हा, बहुगुणीत व्हा आणि पृथ्वी व्यापुन टाका. जलचर, पक्षी, पशू यांच्यावर अधिकार गाजवा. प्रत्येक वनस्पती, प्रत्येक फळझाड तुमचे अन्न होईल. प्रत्येक पशु, प्रत्येक पक्षी तसेच सरपटत जाणारे प्राणी यांना अन्न म्हणुन मी हिरवी वनस्पती देत आहे.' हे सर्व सहाव्या दिवशी घडले. निर्मितीचे कार्य पुर्ण करुन सातव्या दिवशी देवाने विश्रांती घेतली. (हाच दिवस म्हणजे सब्बाथ/ शब्बाथ. या दिवशी काम करणे "ज्यू " धर्माला अमान्य आहे.) नंतर देवाने पुर्वेकडे एदनमधे बाग केली व त्यात मानवाला ठेवले. जीवनवृक्ष व बर्‍यावाईटाचे ज्ञान देणारे वृक्ष बागेच्या मध्यभागी लावले. बागेला पाणि देण्यासाठी नदी केली व मनुष्याला बागेची मशागत व राखण करण्यास ठेवले. त्यावेळी त्याने मनुष्याला आज्ञा केली की बर्‍यावाईटाचे ज्ञान देणार्‍या वृक्षाचे फळ तु खाऊ नकोस. मनुष्याची मदतनीस म्हणुन त्याने स्त्री निर्माण करण्याचे ठरवले. त्याने मानव झोपेत असताना त्याच्या छातीची फासळी काढुन स्त्री बनवली. तेव्हा मानव म्हणाला, "ही माझ्या हाडांचे हाड, मांसाचे मांस आहे. ती नरापासुन बनवलेली आहे म्हणुन तिला नारी म्हणतील. याकारणे पुरुष आपल्या आईवडीलांना सोडुन पत्नीशी जडुन राहील आणि ती दोघे एकदेह होतील." बायबलच्या मते पृथ्वीतलावरील मानवांची पैदास याच पुरुष (आदम/ आदाम/ अ‍ॅडम) व स्त्री (हव्वा/ इव्ह/ इव्हा) यांच्यापासुन झाली. बहुतांश अशीच काहीशी कल्पना इस्लाम मध्येही आहे. पण प्रमुख फरक हा की सृष्टी निर्माण सहा "दिवसात" झाली की नाही ह्याबद्दल फरक आहे. अरेबीमधील सहा "यौम" मध्ये सृष्टी बनली. "यौम" चा अर्थ केवळ दिवस असाही होतो, तसाच तो ठराविक पिरियड/कालावधी असाही होतो. म्हणजे सहा "भागात/कालावधीत" निर्माण झालेलं आहे असं ते म्हणू शकतात. हा एक कालावधी "एक दिवसच" आहे असं कुठेही नाही. तो इश्वरी कालावधी आहे, त्यावर मानवी बंधनं आणि अपेक्षा नाहीत. सब्बाथ/शब्बाथ म्हणजे शुक्रवारची रात्र आणि शनिवारचा दिवस ज्यूंमध्ये पवित्र समजतात. ईश्वराने विश्रांती घेतली तशीच आपण ह्या दिवशी घ्यावी आणि ईश्वराचं चिंतन/प्रार्थना करावी असा दैवी आदेश आहे. मात्र इस्लाम मध्ये सर्वाधिक पवित्र मानला गेलेला आठवड्यातील काळ म्हणजे शुक्रवारचा पूर्ण दिवस. ह्या दिवशी परमेश्वर अधिक मेहेरबान असेल, जुम्माच्या दिवशी प्रार्थनेला/नमाजला विशेष महत्व असेल अशी ईश्वराची आज्ञा आहे. ह्या दिवशी तुम्ही नमाज पढताय की नाही हे बघण्यासाठी साक्षात देवदूत मशिदीच्या दारात उभे असतात. येणाऱ्यांची ते नोंद ठेवतात. अशी श्रद्धा आहे. आमच्या इथल्या एका बुजुर्ग इस्लामिक श्रद्धावंताला विचारल्यावर त्यानं हे ही सांगितलं- "देवानं मानव/आदम निर्माण केला तो दिवस जुम्माह. आदम जेव्हा जन्नत मध्ये गेला तो ही शुक्रवार, म्हणजे जुम्माच. ज्या दिवशी जगाचा अंत आणि अंतिम निर्णय होईल तो ही जुम्माच असेल. (अंतिम निर्णयः- कयामत, जेव्हा सर्व पाप्यांना पापांची शिक्षा व श्रद्धावंतांना सत्कर्माची फळे मिळतील)" ख्रिश्चनांसाठी सर्वात पवित्र दिवस रविवार आहे(catholic church). पण तो कशासाठी हे अजून शोधतोय. अवांतर सृष्टीनिर्मितीची इब्राहिमी कल्पना वाचली आणि सहज नासदीय सूक्त आठवलं. (ऋग्वेद, मंडल १० वे. ) सगळं वाचलं नाही तरी चालेल पण त्यातल्या १ ते ४, ६, १३, १४ (इथे चटकन कळावं म्हणून हिंदीमध्ये देतोय. ) ह्या ओळींकडे जरा लक्ष देऊन बघा बरं. सृष्टी से पहले सत नहीं था, असत भी नहीं १ अंतरिक्ष भी नहीं, आकाश भी नहीं था। २ छिपा था क्या कहाँ, किसने ढका था ३ उस पल तो अगम, अटल, जल भी कहाँ था ४ सृष्टी का कौन है कर्ता कर्ता है वा अकर्ता ५ ऊंचे आकाश में रहता सदा अध्यक्ष बना रहता ६ वही सचमुच में जानता, या नहीं भी जानता ७ है किसी को नहीं पता नहीं पता नहीं है पता नहीं है पता ८ वह था हिरण्यगर्भ सृष्टी से पहले विद्यमान ९ वही तो सारे भूतजात का स्वामी महान १० जो है अस्तित्वमान धरती आसमान धारण कर ११ ऐसे किस देवता की उपासना करें हम हवी देकर १२ जिस के बल पर तेजोमय है अंबर १३ पृथ्वी हरी भरी स्थापित स्थिर १४ स्वर्ग और सूरज भी स्थिर १५ ऐसे किस देवता की उपासना करें हम हवी देकर १६ गर्भ में अपने अग्नी धारण कर पैदा कर १७ व्यापा था जल इधर उधर नीचे ऊपर १८ जगा चुके वो ऐकमेव प्राण बनकर १९ ऐसे किस देवता की उपासना करें हम हवी देकर २० ॐ! सृष्टी निर्माता स्वर्ग रचियता पूर्वज रक्षा कर २१ सत्य धर्म पालक अतुल जल नियामक रक्षा कर २२ फैली हैं दिशाएँ बाहू जैसी उसकी सब में सब पर २३ ऐसे ही देवता की उपासना करें हम हवी देकर २४ ऐसे ही देवता की उपासना करें हम हवी देकर २५
  • इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग २)
  • मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग
  • इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग ४)

Book traversal links for इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग ३)

  • इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग २) ›

प्रतिक्रिया द्या
33364 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

प
प्रसन्न केसकर गुरुवार, 03/24/2011 - 14:03 नवीन
असाच विचार करतात. पण काही थोडे माथेफिरु असतात प्रत्येक धर्मात अन अगदी काही धर्म न मानणारे पण. दहा वर्षांपुर्वीचा माझा एक अनुभव इथे अगदीच अप्रस्तुत ठरु नये. पुण्यात दोन तीन दिवस सुरु असलेली धार्मिक दंगल चांगलीच भरात होती अन शिवजयंती आली. त्या दिवशी तरी काही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन आदल्या दिवशी पोलिसांनी पीस मार्च ठेवला होता. सगळ्या जाती-धर्माचे अन निधर्मी, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे अन संघटनांचे नेते आले अन पोलिस आणि सीआयएसएफच्या कडेकोट बंदोबस्तात शांतता फेरी सुरु झाली. चार दोन गल्ल्या फिरुन मार्च संमिश्र वस्ती असलेल्या सर्वात संवेदनाक्षम गल्लीत पोहोचला अन अचानक एका इमारतीतुन तुफान दगडफेक सुरु झाली. बघता बघता सगळ्या बाजुंनी दगडांचा वर्षाव व्हायला लागला. सगळ्यात जास्त दगड फेकले जात होते ते निधर्मी म्हणवुन घेणार्‍या नेत्यांवर. सगळी पळापळ अन पीसमार्च कव्हर करणारा मी मात्र अडकलो होतो रस्त्याच्या मधोमध एकटा. अन अचानक दगडफेक थांबली. गल्लीतली सगळी राडेबाज पोरं गोळा झाली माझ्याभोवती लागलं नाही ना विचारायला. मी घाबरलेलो, थरथरत उभा होतो काही न बोलता. कुणीतरी पाणी पाजलं अन म्हणालं, "भाई डरना नही. लीडरोंने बच्चोंको भडकाया था इसलिये फसाद हो रहा था. लेकीन चार दिनसे बच्चेभी परेशानीयां झेल रहे है. अभी लीडरोंके खिलाफ भडास निकाल ली उन्होने तो दंगे भी बंद हो जाएंगे." अन खरच त्या क्षणानंतर तासाभरात सगळं वातावरण बदललं. दोन्ही बाजुचे लोक परत रस्त्यावर एकत्र गप्पा मारताना दिसले. हे आहे आपलं अवाम! उगीचच बर्‍याचदा आपण पुर्वग्रह मनात ठेऊन असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१
अ
अप्पा जोगळेकर Sun, 03/27/2011 - 11:41 नवीन
असाच विचार करतात. पण काही थोडे माथेफिरु असतात प्रत्येक धर्मात हो. पण कित्येकदा धर्मच माथेफिरु असतो तेंव्हा काय करणार ? सगळे धर्म मुळातून चांगलेच आहेत, सहिष्णूच आहेत असे गॄहीत धरण्यात काही अर्थ आहे असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
प
प्रसन्न केसकर Sun, 03/27/2011 - 15:15 नवीन
विचारसरणी माथेपुरु आहे म्हणण्यासाठी त्याचा संपुर्ण अभ्यास करुन तो धर्म किंवा विचारसरणी संपुर्ण समजावुन घ्यावी लागते. तेव्हढा अभ्यास किंवा समज नसल्यामुळे आम्ही व्यक्तींनाच माथेफिरु म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अप्पा जोगळेकर Mon, 03/28/2011 - 16:04 नवीन
विचारसरणी माथेपुरु आहे म्हणण्यासाठी त्याचा संपुर्ण अभ्यास करुन तो धर्म किंवा विचारसरणी संपुर्ण समजावुन घ्यावी लागते. मूळामध्ये जे निर्माण झाले ते तत्वज्ञान आणि ती विचारसरणी हे नीटनेटके आणि सुबकच होते असे गॄहीत करणे अतार्किक वाटते. शिवाय विचारसरणीचा किती अभ्यास केला म्हणजे संपूर्ण अभ्यास झाला असे ठरवण्यास काही क्रायटेरिया आहे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
प
प्रसन्न केसकर Tue, 03/29/2011 - 10:42 नवीन
याच्याबाबत मी कोणतेच मतप्रदर्शन केलेले नाही. तश्या निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी त्या विषयाचा जेव्हढा अभ्यास मला आवश्यक वाटतो तेव्हढा मी केलेला नाही हे मी आधीच स्पष्ट केले आहे. संपुर्ण विषय समजल्याखेरीज सार्वत्रिक मत बनवु नये असे माझे व्यक्तीगत मत आहे. अर्थात हे माझे व्यक्तीगत मत मी नोंदवले. इतर कुणी काय करायचं हा निर्णय ज्याची त्याची समज, ज्याची त्याची बुद्धी, ज्याचे त्याचे मत अश्या अनेक निकषांवर आधारित आहे असेही माझे मत आहे. त्यामुळे ज्याचे त्याचे मत आणि ज्याचे त्याचे अभिव्यक्तीस्वातंत्र या विचारधारेस अनुसरुन आणि मन यांच्या लेखमालेला उगीच माझ्यामुळे गालबोट लागु नये या प्रामाणिक इच्छेमुळे मी अन्य कुणाच्या मतांना समर्थन देत नाही किंवा त्यांचा प्रतिवाद देखील करत नाही. अवांतरः याचा अर्थ कुणाला मी अश्या मतांना आणि ती मांडणार्‍यांना फाट्यावर मारतो असा काढायचा असेल तर तसा जरुर काढावा. मी आधीच वर म्हणल्याप्रमाणे ज्याची त्याची समज, ज्याची त्याची बुद्धी, ज्याचे त्याचे मत इ.इ. येथेही लागु होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
५
५० फक्त Wed, 03/23/2011 - 03:14 नवीन
माझ्या सारख्या अगाढ अज्ञानी माणसासाठी अतिशय सुंदर आणि अभ्यासपुर्ण मालिका सुरु करुन अतिशय व्यवस्थित पदधतीने चालु ठेवल्याबद्दल मन यांचे आभार. वाचनखुणं साठवली आहे.
  • Log in or register to post comments
S
sneharani Wed, 03/23/2011 - 06:50 नवीन
नवीन माहिती मिळती आहे प्रत्येक भागात..येऊ दे आणखीन!
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Wed, 03/23/2011 - 07:44 नवीन
मग देवाने जमीनीवरील माती घेऊन त्याचेच प्रतिरुप असा मानव निर्माण केला सहमत ! इन्सान मिट्टी से पैदा हुवा है, मिट्टी में ही मिलेगा ! औरत, मर्द के फ़सली से बनी हुई है |
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 03/23/2011 - 17:11 नवीन
इन्सान मिट्टी से पैदा हुवा है, मिट्टी में ही मिलेगा ! औरत, मर्द के फ़सली से बनी हुई है | दोन्ही वाक्यांचा मिळून असा अन्वयार्थ आहे का की "औरत इन्सान नही है"? का माझ्या समजण्यात काही गडबड होत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
N
Nile गुरुवार, 03/24/2011 - 01:57 नवीन
=)) =)) हाण्ण... मेलो हसुन हसुन! =)) बाकी पाशवी बायकांनी पुरुषांच्या जातीला पार मातीमोल केलेला पाहुन डोळे पाणावले! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
वाहीदा गुरुवार, 03/24/2011 - 07:41 नवीन
वाक्याच्या अर्थाचा अनर्थ लावणे अन त्यावर हसणे हे तुमच्यासारख्यांचे पूर्वापार आलेले कामच आहे. जनाब, दिमाग के बारेमें आप इतने तो गये गुजरे नहीं है , या अपना जहेन गलत तरिके से चला रहे हो :-? इस्लाम में औरतोंको भी मरनेके बाद दफ़नाया जाता है, इसका मतलब वो भी इन्सान ही है, :-) हां तुम अगर हम औरतोंके अंदरकी हैवानीयत को ललकार रहे हो, तो जरा युयुत्सुसे पुछना अगर औरत अड गई तो मर्द की जिंदगी जहान्नुम जरुर बना सकती है, किस कदर.. वो वोही बेहतर तरिकेसे समझाऎंगे आपको जिस दिन हम औरतोंकी बर्दाश करनेकी हदें खतम हो जाएगी ना, तुम मर्द मुंह के बल गिरोगे.. तबाह, बारबाद हो जाओगे हमारी हैवानियत आजमाना मत , महेंगा पडेगा :-) यह जो कायनात में रंग झलक रहें हैं ना सब फिके पड जाऎंगे .. संभल जाईंऎंगा जनाब | बाय द वे हसते वक्त, आपने दात सफा करने के लिए बंदर छाप काला दंतमंजन इस्तेमाल किया था इसका सबुत मिल गया ;-) ( Just kidding ..No hard feeling Please :-) ) अवांतर : हि मस्करी आहे त्याची कुक्सरी होऊ देऊ नये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
व
वाहीदा गुरुवार, 03/24/2011 - 07:46 नवीन
इन्सान मध्ये औरत, मर्द दोन्ही येतात :-) अन इस्लाम / यहूदी ( ज्यू) / ईसाई मध्ये दोघांचेही मेल्यानंतर दफनविधीच होतात त्यांच्या साठी वेगवेगळे कब्रस्थान नाही कब्रस्थानात स्त्री अन पुरुष दोघांच्याही कबरीही असतात अन त्या जवळ जवळ पण असू शकतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Fri, 03/25/2011 - 12:01 नवीन
धन्यवाद वाहीदाजी, मी प्रश्न खरच विचारला होता, थट्टा नव्हती. फक्त ती वाक्ये एकत्र दिसल्याने माझे confusion झाले हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
व
वाहीदा Fri, 03/25/2011 - 15:05 नवीन
Qur'an 49:13 Surah Al-Hujurat (The Inner Apartments) O mankind! We created you from a single (pair) of a male and a female and made you into nations and tribes that ye may recognise each other (not that ye may despise each other). Verily the most honored of you in the sight of Allah is (he who is) the most righteous of you. And Allah has full knowledge and is well acquainted (with all things). "God made woman from man's rib- not from his head to top him, nor from his feet to be walked upon;but from his side to be his partner in life, from under his arm to be protected by him,and from near his heart to be loved by him." -- Dream Mate By Dr AR Bernard
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
म
मन१ Sat, 03/26/2011 - 13:36 नवीन
सुमारे महिना भरापूर्वी पुण्यातल्या टिळक रस्त्यावरील बाबा लॅपटॉप वाल्याकडुन H P चा ल्यापट्वाप घेतला. त्यासोबत windows7 home basic मिळालं. मात्र त्यावेळेस त्याची दुकान बंद करायची वेळ असल्यामुळं आणि नंतर मीही व्यस्त असल्यामुळं, काही दुय्यम(ज्यांच्या विना काम चालु शकतं अशा) गोष्टी नंतर करायच्या ठरल्या. काल बाबावाल्याकडे गेलो. आणि windows ची recovery disc (installable) जी बनवायची राहिली होती, ती करुन दे म्हणलं. नेमकं ते करताना प्रॉब्लेम आला. "रिकव्हरी डिस्क आधीच बनलेली आहे" असा काहिसा तो संदेश होता. वस्तुस्थिती तशी नव्हती. मी कधीही अशी बन्वलेली नाही. बाबा वाला म्हटला की HP चं मुख्य सेवा केंद्र पौड रस्त्याला सुझुकी शोरूमच्यावर आहे. तिथं संपर्क करुन त्यांना हा प्रॉब्लेम सांगितल्यास ते नवीन डिस्क उपलब्ध करुन देतील. ताबडतोब तिथे गेलो. त्यांनी नम्रपणे सांगितलं की ग्राहकांच्या "सोयीसाठी" ह्या सर्व सेवा त्यांच्या कॉल सेंटर वरील ग्राहक सेवा केंद्राला(टेलेफोनिक कस्टमर केअर) ला सांगितल्यास, घरपोच डिस्क पोचती केल्या जाइल. काल सतत घंटाभर प्रयत्न करत होतो. पण बोंब. "सर्व प्रतिनिधी व्यस्त आहेत" ह्या आशराष्ट्रभाषाआंग्लभाषेतुन येत होता. आज पुन्हा ग्राहक सेवा केंद्राला कॉल लावला तेव्हा मात्र चक्क "आम्ही केवळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ ह्या वेळेतच सेवा देतो" असा संदेश आंग्ल भाषेत येउन चक्क फोन कट होउ लागला. मला कळेना कुठल्या देशातले ६ ते. घड्याळ पाहिलं तर चक्क दुपारचे ३ वाजलेले. ६ वाजायला भरपुर अवकाश. पुन्हा पौड रस्त्यावर जाउन हुज्जत घातली. त्यांचं म्हणणं एकचः- "आम्ही काहीही करण्यास असमर्थ आहोत. तुमच्या तक्रारे फोन करुन कॉल सेंटर लाच कळवा." डोकं तापलं. त्याला म्हणलं की बाबा रे, तुझी ती फोन वाली मंडळी ६ वाजुन गेलेत असं म्हणताहेत. तर त्याचं उत्तर तयार. "शिश्टिम बिघडली असेल. मी काहिही करु शकत नाही. पुन्हा सोमवारी संपर्क करुन बघा." दळभद्री तिच्याय्ला. तर माझ्या आंतरजालिय बंधु भगिनींनो कृपया तुम्ही ह्या नाडाल्या गेलेल्या , दीनवाण्या, केविलवाण्या ग्राहकाची काही मदत करु शकता काय? १. ग्राहक तक्रार मंचात कसे जाउ?(consumer forum) 2.तक्रारीपूर्वी कुठल्या फॉर्मॅलिटीज् आहेत? ३. लेखी अर्ज मी HP सर्विस सेंटरला देउ केला, त्यांनी तोही घेण्यास नकार दिलाय. सध्या माझ्या कडे भरभक्कम पावती आहे, मशिन घेउन नुकताच महिना झालाय. मी काय काय करु शकतो किंवा करायला हवं , उपलब्ध पर्याय कुठले ते कृपया सांगा. आपलाच वैतागलेला मनोबा. --सध्या मिपा वरही काथ्याकूट बन्वायल घेतल तर बनत नाहिये. म्हणुन प्रतिसादातच ही बोंब मारुन घेतोय. वाचवा हो वाचवा.
  • Log in or register to post comments
म
मन१ Sat, 03/26/2011 - 13:37 नवीन
एच पी पासुन वाचवा. सुमारे महिना भरापूर्वी पुण्यातल्या टिळक रस्त्यावरील बाबा लॅपटॉप वाल्याकडुन H P चा ल्यापट्वाप घेतला. त्यासोबत windows7 home basic मिळालं. मात्र त्यावेळेस त्याची दुकान बंद करायची वेळ असल्यामुळं आणि नंतर मीही व्यस्त असल्यामुळं, काही दुय्यम(ज्यांच्या विना काम चालु शकतं अशा) गोष्टी नंतर करायच्या ठरल्या. काल बाबावाल्याकडे गेलो. आणि windows ची recovery disc (installable) जी बनवायची राहिली होती, ती करुन दे म्हणलं. नेमकं ते करताना प्रॉब्लेम आला. "रिकव्हरी डिस्क आधीच बनलेली आहे" असा काहिसा तो संदेश होता. वस्तुस्थिती तशी नव्हती. मी कधीही अशी बन्वलेली नाही. बाबा वाला म्हटला की HP चं मुख्य सेवा केंद्र पौड रस्त्याला सुझुकी शोरूमच्यावर आहे. तिथं संपर्क करुन त्यांना हा प्रॉब्लेम सांगितल्यास ते नवीन डिस्क उपलब्ध करुन देतील. ताबडतोब तिथे गेलो. त्यांनी नम्रपणे सांगितलं की ग्राहकांच्या "सोयीसाठी" ह्या सर्व सेवा त्यांच्या कॉल सेंटर वरील ग्राहक सेवा केंद्राला(टेलेफोनिक कस्टमर केअर) ला सांगितल्यास, घरपोच डिस्क पोचती केल्या जाइल. काल सतत घंटाभर प्रयत्न करत होतो. पण बोंब. "सर्व प्रतिनिधी व्यस्त आहेत" ह्या आशराष्ट्रभाषाआंग्लभाषेतुन येत होता. आज पुन्हा ग्राहक सेवा केंद्राला कॉल लावला तेव्हा मात्र चक्क "आम्ही केवळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ ह्या वेळेतच सेवा देतो" असा संदेश आंग्ल भाषेत येउन चक्क फोन कट होउ लागला. मला कळेना कुठल्या देशातले ६ ते. घड्याळ पाहिलं तर चक्क दुपारचे ३ वाजलेले. ६ वाजायला भरपुर अवकाश. पुन्हा पौड रस्त्यावर जाउन हुज्जत घातली. त्यांचं म्हणणं एकचः- "आम्ही काहीही करण्यास असमर्थ आहोत. तुमच्या तक्रारे फोन करुन कॉल सेंटर लाच कळवा." डोकं तापलं. त्याला म्हणलं की बाबा रे, तुझी ती फोन वाली मंडळी ६ वाजुन गेलेत असं म्हणताहेत. तर त्याचं उत्तर तयार. "शिश्टिम बिघडली असेल. मी काहिही करु शकत नाही. पुन्हा सोमवारी संपर्क करुन बघा." दळभद्री तिच्याय्ला. तर माझ्या आंतरजालिय बंधु भगिनींनो कृपया तुम्ही ह्या नाडाल्या गेलेल्या , दीनवाण्या, केविलवाण्या ग्राहकाची काही मदत करु शकता काय? १. ग्राहक तक्रार मंचात कसे जाउ?(consumer forum) 2.तक्रारीपूर्वी कुठल्या फॉर्मॅलिटीज् आहेत? ३. लेखी अर्ज मी HP सर्विस सेंटरला देउ केला, त्यांनी तोही घेण्यास नकार दिलाय. सध्या माझ्या कडे भरभक्कम पावती आहे, मशिन घेउन नुकताच महिना झालाय. मी काय काय करु शकतो किंवा करायला हवं , उपलब्ध पर्याय कुठले ते कृपया सांगा. आपलाच वैतागलेला मनोबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१
व
वाहीदा Mon, 03/28/2011 - 10:50 नवीन
http://www.consumercourtforum.in/f43/hcl-laptop-15348/ http://www.indiaconsumerforum.org/ PUNE DISTRICT District Consumer Disputes Redressal Forum 692, Pushpa Heights Bibewadi Pune 411037 Telephone No.: 4210364 (Registrar), 4217489 (Office)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१
अ
अप्पा जोगळेकर Sat, 03/26/2011 - 14:23 नवीन
१. It was absolute NULL. फक्त अनादी अनंत ईश्वर तेव्हढा होता. २. सृष्टी से पहले सत नहीं था, असत भी नहीं १ अंतरिक्ष भी नहीं, आकाश भी नहीं था। २ छिपा था क्या कहाँ, किसने ढका था ३ उस पल तो अगम, अटल, जल भी कहाँ था ४ क्लास , अप्रतिम लिहित आहात. वेगवेगळ्या आणि स्वतंत्र संकल्पनांच्यामधले नाते दर्शवण्याचा प्रयत्न तर खासच.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Sat, 03/26/2011 - 15:06 नवीन
वाचतोय... चालु द्या
  • Log in or register to post comments
म
मुस्तफा Tue, 03/29/2011 - 12:22 नवीन
जनाब आप बहुत अच्छा लिहित आहात.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा