पाककृती

फुलगोबीची सुकी भाजी

Primary tabs

या क्षेत्राचा तसा बिल्कुलच अनुभव नसल्याने इतके दिवस ज्या धाग्यांना फाट्यावर मारत असु, तिथे येउन पाकृ द्यावी लागणे म्हणजे अजबच आहे. पण भाजी करण्याचा पैला-वैला प्रयत्न अन तो ही सफल... म्हणुन म्हटले "लोहा गरम है मार दो हथोडा"...
================================================================

तर फुलगोबी म्हंजे फ्लॉवरची सुकी भाजी कशी बनवायची?

सामग्री :: (२ जणांसाठी)
मोठ्या फ्लॉवरच्या फुलातील २ लहान फुलं, मोहरी, जिरे, हळद, तिखट, काळा मसाला, अर्धे गाजर, लसुन-आलं पेस्ट, मीठ अन तेल.

कृती :: सर्वप्रथम फ्लॉवरचे हातानीच लहान-लहान तुकडे करुन घ्या. मग ती फ्लॉवर धुवुन घ्या. धुतलेल्या फ्लॉवरवर अर्धा चमचा हळद घाला.

गाजर धुवुन, बारीक चिरुन घ्या. मग कढइ शेगडीवर मंद आचेवर ठेवा. कढइ गरम झाल्यावर त्यात अंदाजे २ चमचे तेल घाला. तेलात थोडीशी मोहरी अन जिरे घाला.

फोडणी बसेपर्यंत एका थाळीत चिरलेला गाजर, १/२ चमचा काळा मसाला, २ चमचे तिखट, १ चमचा लसुन-आलं पेस्ट मिसळुन घ्या.

नंतर हे सर्व त्या कढइत परतुन घ्या.

आता त्यात हळदयुक्त फ्लॉवर घालुन चमचाने हलवा. त्यात चवीनुसार थोडेसे मीठ घाला.

हे सर्व मिश्रण १० मिनिटे शेगडीवर (मंद आचेवर) ठेवा. फ्लॉवर ओली असल्याने लवकर शिजते. हे मिश्रण जास्त वेळ शेगडीवर ठेउ नये, त्याने फ्लॉवरचा "शिरा" होउ शकतो. (जसा पोहे जास्त भिजवल्याने होतो तसा).

ही झाली फुलगोबीची सुकी भाजी तयार. कोथिंबीर असल्यास वरुन घालता येते.

मित्रांनो, फ्लॉवर ही सगळीकडे सहज उपलब्ध होत असल्याने एकदा ही भाजी करुन बघायला काहीच हरकत नाही. करा, चाखुन पहा अन मला सांगा.
(कुणीतरी सांगितलेच आहे पाण्यात उडी मारली की पोहता येतेच, हेही तसेच आहे)

जाणकार/सुगरण मिपाकर गृहिणींच्या सल्ल्यांच्या अपेक्षेत/प्रतिक्षेत.

- आपला वपाडाव

५० फक्त

अरे मोहनरावांना नानवेज म्हणजे नान आणि वेज असं म्हणायचं आहे, आयला अशुद्धलेखनाचा काय कॉपिराईट आहे का काय विशिष्ट आयडिंकडे.

आणि मोहनराव असेल असेल ओ नॉनव्हेज पण असेल, पक्के गुजराथी अंबानी जर मटण मच्छी विकायला बसतात तर आपल्याला काय जातंय करुन विकायला.

@ सुड- मिलियन डॉलर प्रश्न आहे हा ?

या हॉटेलात भारतीय चलन चालेल का मिपाचे वेगळे चलन सुरु करावे. तसेच, हॉटेल बरोबर बसल्याबसल्या प्रोग्रॅम पक्षी कोड आणि कोडं बनवुन मिळणे, गविकाकांचे एक सल्ला टेबल अशा सोयी द्याव्यात ही विनंती.

तसेच, मिपावरच्या भटकंतीमधले फोटो हॉटेलात सजावटीसाठी लावावीत. तसेच, एक विडंबन भाग देखिल असावा, ज्यात पावभाजी म्हणजे फोडणी घातलेले पाव आणि उकडलेल्या बटाट्याचा गोळा अशा विडंबित पाकृ ठेवता येतील.

अवांतर - असो, हे हॉटेल ****नगर रस्त्यावर होणार आहे अशी जाहिरात मी परवा एस्टीमध्ये पाहिलि होती, यावर कोणी काही बोलेल का ? हल्ली काही मिपाकर एस्टीने फाआआआर प्रवास करतात असं ऐकुन आहे.

मोहनराव

अहो नॉनव्हेज असंच म्हणायचं होतं, अंमळ मजा चालली आहे या धाग्यावर म्हणुन त्या शैलीत लिहीले आहे. असो.

या हॉटेलात भारतीय चलन चालेल का मिपाचे वेगळे चलन सुरु करावे.

जरा उलगडुन सांगा की मिपाचे वेगळे चलन कसे ते?

५० फक्त

मिपाचं चलन म्हणजे

१ रु = बरा प्रतिसाद
१० रु = चांगला प्रतिसाद
१०० रु = उत्तम प्रतिसाद
बाकी +१, ब्वॉर्र, चालु द्या , असेच म्हणतो , मेलो, खपलो, वारलो, हे सगळे चवली पावली झाले असं समजा.

पियुशा

@ ५० फक्त
अवांतर - असो, हे हॉटेल ****नगर रस्त्यावर होणार आहे अशी जाहिरात मी परवा एस्टीमध्ये पाहिलि होती, यावर कोणी काही बोलेल का ? हल्ली काही मिपाकर एस्टीने फाआआआर प्रवास करतात असं ऐकुन आहे.
ऑ ! नक्की कोण्त्या रस्त्यावर ? कोण्त्या एस्टीमध्ये ? मला कस माहीत नै त्ये ;)
क्रुपया टॉर्च मारावा ;)

५० फक्त

जे मिपाकर एस्टीनं फाआआआअर प्रवास करतात ना त्यांना माहीत आहे, रणगाडयांत बसुन फिरणा-या तुम्हाला कसं कळणार ते.

क्रुपया टॉर्च मारावा - आणि लागल्लं म्हणजे तुम्ही तिकडुन याल रणगाडा घेउन.

मनराव

^^^
:D :D :D :D

@५०फक्त: या प्रतिसादा नंतर रणगाडा तुमच्या दिशेने निघाला आहे.........

पियुशा

@ ५० फक्त
गुमान सान्गताय की तोफेच्या तोण्डी देउ तुम्हाला ;)

स्मिता.

वप्याच्या उमेदवारीच्या जाहिरातीत काय दंगा चालवलाय??

५० फक्त

चला निदान त्या निमित्तानं तरी कट्टा करता येईल - तोतों कट्टा @ नगर चालेल का ?

****नगरच्या दिशेनं नजर लावुन बसणारे मिपाकर वाकडी वाट करुन सुद्धा काही बोलत नाहीत,

वपाडाव

असो, हे हॉटेल ****नगर रस्त्यावर होणार आहे अशी जाहिरात मी परवा एस्टीमध्ये पाहिलि होती, यावर कोणी काही बोलेल का ? हल्ली काही मिपाकर एस्टीने फाआआआर प्रवास करतात असं ऐकुन आहे.

अहो, ५०राव... आपलं न्यान तो़कडं पडतय की... हल्ली नव्हे त्यास एक काळ झाला... आता प्रवास होत नाही म्हणे त्यांजकडुन... वय होत आलंय न आता...

बाकी, हॉटेलचं सुत्रसंचालन आपण करावं असं म्हणतो/सुचवितो....

इरसाल

चिक्न्न तिका, मतन तिक्का , मतन कअस,

असले काही नाही लिहिले म्हन्जे मिलवलि

@मी कॅश काउंटर सांभाळीन म्हणतो

तुंम्ही सगळ्यांनी सगळं सांभाळा,फक्त नव्या वास्तूची-शांत अमच्या कडून आणी दरवर्षीचा वार्षिक सत्यनारायण खातं अमच्याकडे उघडा,,मंजे झालं... :-)

५० फक्त

भट्जी बुवा आणि फुलांच्या रांगोळ्या, हाटेलात अडकवायला स्माईली , गिरा इका च्या हाताला लावाला इत्तरं, केशर चुना वैग्रे वैग्रे काय चकटफु देणार का काय ?

केशर चुना वैग्रे वैग्रे काय चकटफु देणार का काय ? देऊ हो...आधी आंम्हाला बी हाटिलच्या भागिदारीत येऊ द्या...मंग केशरचुनाच काय... पेशल स्किम काढून पेशल गिर्‍हाइकांना सुपर पेशल भेटी बी दिऊ ...हा.का.ना.का.

स्पा

सदर हाटेलात. .एक छोटेसे सायबर क्याफे आणि वाचनालय.. इत्यादी आधुनिक सोयी सुविधाही सुरु करण्यात येणार आहेत :)

५० फक्त

तुम्हाला काय हाटेलाचं ३ डि करायला मिळालं का काय ? लई खुश दिसताय ?

मोहनराव

नको हॉटेलचं ३ डि त्यांना करायला मिळालं तर त्यांच्या डिझाइनचा एकतर खर्च परवडणार नाही व महागडं हॉटेल दिसतय म्हणुन कोणी आतच येणार नाही! :)

वपाडाव

एक छोटेसे सायबर क्याफे आणि वाचनालय.. इत्यादी आधुनिक सोयी सुविधा असणार आहेत

बरं झालं रे स्पावड्या, इथपर्यंतच बोललास...
एखादं थाइ मेन्युप्रमाणे थाइ मसाज सेंटर ठेउ नाही म्हणालास ते...

मनराव

मसाज शेंटर पण ठेवा मग.......... हाकानाका.....

प्रचेतस

स्पा प्रवर्तकांपैकी एक असल्याने स्पा सेंटर पण ठेवा रे.

मनराव

अता त्या स्पा सेंटरच ३डी डिझाईनच काम दुसर्‍या कोणाला तरी द्या........ ;)

मी-सौरभ

मसाज शेंटर पण ठेवा मग.

अधिक माहीती साठि स. परा. मदत करु शकतील असं वाटतयं.
त्यांनी मधे बरीच माहिती जमवली होती असे स्मरतेंय...

प्रचेतस

हे धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड
शतकपूर्ती झाली रे.

मोहनराव

वपाडावकडुन पार्टी झालीच पाहिजे आता!!

तर्री

२ फूल एक भाजी (वो भी फूलवर की )और १०० से जादा देखने वाले. कमाल का जमाना आय है !
लगे रहो ........

वपाडाव

बल्लवाचार्य, सुगरण मिपाकर गृहिणी यांच्या सल्ल्यांबद्दल...

माझा हुरुप वाढविणार्‍या प्रतिक्रिया देणार्‍या सदस्यांच्या प्रतिसादांबद्दल...

आणि ज्यांनी ह्या धाग्याचा ट्यार्पी वाढवण्यास मदत केली त्यांच्या कमेंटांबद्दल...

कोटी कोटी आभार....

तळटीप :: धागा शतकी झाल्याबद्दल हीच भाजी सर्व प्रतिसादकांना त्यांच्या पत्त्यावर पार्सल केली जाइल.
जशी असेल तशी, आजुबाजुला वास्तव्य असलेल्या मिपाकरांसमवेत, (१ तिळ = ७ जण ह्याप्रमाणे ) ;) यथेच्छ झोडावी...

प्रचेतस

तुमचा हुरूप आता चांगलाच वाढल्यामुळे पुढची पाकृ लवकरच येऊ द्या.