कॉपीराईट नाही हो काका. वॉटरमार्क म्हणतात त्याला. एखादी अभिजात कलाकृती असेल तर ती कलाकृती आंतरजालावर शेअर झाल्यावर त्या कलाकाराचे नाव कळण्यासाठी वॉटरमार्क टाकला जातो.
चहा ओतलेलाच नाही , फक्त दूधच गळून घेतले आहे. बाकी माझ्या फोटोचे असे हि पैलू निघतील याची कल्पना नव्हति. काचेच्या , मातीच्या भांड्याचे आमच्याकडे वावडे आहे त्यांच्या नाजूक पणा मुळे त्यामुळे स्टील जिंदाबाद.
१. चहा ओतलेला
२. दुधच गाळून घेतले आहे.
३. स्टीलचे भांडे वापरले आहे. असे तुम्ही म्हणता, पण भांडे स्टीलचे नसून अॅल्युमिनियमचे किंवा गेला बाजार हिंडालियमचे असावे, असे फोटो दाखवतो. (मातीचे नाही, हे फोटोत पण दिसते आहेच.)
मुवि, पोट दुखी झाली आहे. हसून तर झालीच , पण वरील सर्व "अभ्यासकांचे" अभ्यागतांचे व प्रतिभावंताचे शब्द सामर्थ्य पाहून मत्सरानेही पोटदुखी झाली आहे. ......काही तरी औषध पाठवा नं ....( त्यात मात्र अभ्यास करण्यात फार वेळ नका घालवू )
आजसकाळी मी चहा करत असताना योगायोगाने चहा गाळणी मध्ये मोनालिसाचे चित्र उमटले ...पण धुवुन टाकल्यावर लक्षात आले की मी फोटो घ्यायला विसरलोय :( अशा रीतीने जग आज एका महान योगायोग कलाकृतीला मुकले आहे .
लिओनार्दो दा विंचीने एका नवीन चित्रकाराला गलिच्छ भिंतीकडे पहाण्याचा सल्ला दिला होता
"If you look upon an old wall covered with dirt, or the odd appearance of some streaked stones, you may discover several things like landscapes, battles, clouds, uncommon attitudes, humorous faces, draperies, etc. Out of this confused mass of objects, the mind will be furnished with an abundance of designs and subjects perfectly new."
धाकाकर्त्याला कुठुन चहा गाळला आणि हृदय सदृश्य आकाराचा फोटो मिपावर शेअर केला असं झालं असेल! आता ह्यापुढे काहिहि गाळताना (चहा/कॉफि बरं!) तो फोटो म्हणुन काय घेणार नाहि :D
आता ह्यापुढे काहिहि गाळताना (चहा/कॉफि बरं!) तो फोटो म्हणुन काय घेणार नाहि
एवढंच नाही तर चहा गाळताना लेखकाला नेहमी त्यांत मुवि, वल्ली, धन्या, बॅटमन, अआ, गिरीजा इ चे व्हर्चुअल आकार दिसू लागतील... मोंगलांना पाण्यात धनाजीसंताजी दिसत असत तसे... काय्हा छ्ळ्वाद न्विन मेंब्राचा ! टीव्र णीषेढ !
शतकी करायची हौस मला अजिबात नहि. लोकांनी प्रतिक्रियाच अशा दिल्या आहेत कि त्याला प्रतिक्रिया द्याविशीच वाटते . मी प्रत्येकाला नाही तर ठराविक प्रतिक्रियांनाच उतारे दिली आहेत आपण जर लक्ष पूर्वक बघितले तर.
मुख्य धागा बाजूला ठेवून माझ्या प्रतिक्रिया वर तुमच लक्ष केंद्रित झाल याच मात्र हसू येत.
मस्तच.
आता उद्या पासुन चा गाळला की आधी गाळणी बघत जाईन....
खतरा ४४० व्होल्टस ची खूण आली तर चहात साखर जास्त पडली आहे व उद्या शुगर २२० फास्टिंगयेणार आहे असे समजायचे का ?
अतिशय सुरेख.
आता पर्यंत कलादालनात असंख्य कलाकृती बघितल्यात. पण यासम हीच.
याची सर इतर कुठल्याही कलाकृतीला येणे शक्य नाही.
वल्ली यासम हीच.
-दिलीप बिरुटे
अगदी अगदी .... !!!!
इतकी सुंदर कलाकृती चहा गाळताना योगायोगाने गाळणीत तयार व्हावी हा एक उत्तम योगायोगच आहे.
देवाची करणी आणि गाळणीत बदामाची निशाणी.
आणि त्या गाळणीचा रंगही लाल आहे हा अजून एक योगायोग.
@आणि त्या गाळणीचा रंगही लाल आहे
हा अजून एक योगायोग.>>> =)) __/\__ =))
आत्मू'ज साक्षात्कार- गाळणिच्या धाग्याची चाळणि होणार! =))
इतकंच नव्हे तर एखादा प्रत्ययदर्शी कवी "चहाला जाऊन गाळणी का लपविता?" असं एखादं सुंदर काव्यही लिहिल.
आयला नेमकं हेच म्हण्णार होतो, प्रतिसाद टायपू असा विच्यार करेपर्यंत हा प्रतिसाद पाहिला =)) =)) =))
(चहाला जाऊन) गाळणी का लपविता?
नकळत उतू गेला
चहा पातेल्यावरुन सांडला
तू चहा गाळायची गाळणी झालिस
हा कावा मलाच कसा नाही कळला???
गाळणीमध्ये घट्ट गाळ ,खरडा खरडीनेच निघत आहे..
चमच्याने कमी हलवुन जमते,हीच तर खरी गंम्मत आहे.
चहाचा पूर्वार्ध वाटेल,साईत पहा जमलम..
पावडर उत्तरार्धात बसेल, वरती साय तरंगम...
यदाकदाचित माझ्या चहाला ,प्रथम तु म्हणशील गाळ की, साय किती रे ही...
पण मी तुला चहा पाजून,असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''
नकळत चहा उतू गेला ग बयें
चहा पातेल्यावरूनी सांडितसे ग मायें
होवोनिया गाळणी तू भांडीयाची
कैसे मज उमगेल हा कावाची
खरडा खरडोनीची निघतसे गाळ गाळणीयातूनी
पळी वापरोनी सत्वरी निघतसे पहा कसे मौजेनी
पहिल्यासी जमतसे ही सायची परी
समापणी बसोनी पत्ती ही साय तरंगे वरी
ढोसूनिया हे पेय जरी गाळूनीया साय जरी ही
पाजूनिया तुज हे अमृततुल्य हसोनी मी ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
निव्वळ _/\_
एक गाळणी द्या मज आणुनि
गाळीन मी जीत स्वप्राणाने
भेदुनि टाकिन भांडी सगळी
मोठ्या चहाच्या उष्णतेने
अकस्माच्चायपेयं तद् पात्रात् वै बहिरागतम् |
अभवत्कथमेतत्तु नावगच्छमहं खलु ||
अदृष्टपूर्वमेतच्च दृष्ट्वा हि मुदितोऽस्म्यहम् |
कथं शोधयसि चायं दर्शनीयं नु तत् खलु ||
शोधन्यौ वै कणा: सर्वे दृढत्वेन ह्यवस्थिता:
दर्व्या लघुप्रयत्नेन निष्कासिता तु सत्वरम् ||
दृश्यं तच्छोभनीयं हि अनंगस्मरणप्रदम् |
यथा दर्वी प्रयतते, स्मरकेलीव दृश्यते ||
चायपेये पयसारं तुभ्यं यद्यपि बाधते |
तथापि प्राशयित्वा त्वां "हिह्ही हिह्ही" हसाम्यहम् ||
=)) _/\_ =))
मारशील बे आता हसवून हसवून.
___/\___
एक गाळणी द्या मज आणुनि
गाळीन मी जीत स्वप्राणाने
भेदुनि टाकिन भांडी सगळी
मोठ्या चहाच्या उष्णतेने
=))
-दिलीप बिरुटे
आय आय गो.... लोळतोय =)) =)) =))
"च्या"आईला . . .
वल्ली आणि ब्याट्या .
पोट फाडशिला हसवून हसवून =)) =)) =)) =))
त्या फोटोचा त्यांनी कॉपी राईट पण घेवून ठेवलाय.
कॉपीराईट नाही हो काका. वॉटरमार्क म्हणतात त्याला. एखादी अभिजात कलाकृती असेल तर ती कलाकृती आंतरजालावर शेअर झाल्यावर त्या कलाकाराचे नाव कळण्यासाठी वॉटरमार्क टाकला जातो.
मग तो "गोलातला सी" म्हणजे कॉपी राईटच ना?
असो एकूण काय, तर हा असा एक्मेकाद्वितीय फोटोची कॉपी कुण्णी क्ण्णी करु नये म्हणून घेतलेली काळजी आहे ती असे वाटत आहे.
गोलातल्या सी कडे माझं लक्षच गेलं नाही.
फार अभ्यास करतोय मी ह्या फोटोचा....
आत्ता आत्ता कुठे एक एक पैलू उलगडायला लागले आहेत.
मला तर आता गाळणीचा नायलॉनचा एक एक धागा उसवणार असेच दिसत आहे.
धन्य यास,
हा हा हा
मुक्त विहारि यांस ,
माझा फोटो चा तुम्हाला अभ्यास करावासा वाटतो हे वाचून चांगल वाटलं .
त्याचे तुम्हाला उलगडणारे पैलू मला पण वाचायला आवडतिल.
कायदेशीर रित्या कुठे अर्ज केला नाही साठी अजून , पण नाव देण्याची पद्धत म्हणून नाव दिले आहे. आणि आपल्या फोटो वर copyright घेण तस चुकीच नाही , नाही का?
मूविंचं तेच म्हणणं आहे धन्याशेठ.
वाटरमार्क टाकून त्यांनी त्यांच्या गाळणीचा कापीराईट सुरक्षित करून घेतलाय.
ह्या वॉटर मार्क ने नक्की गाळणी कॉपीराईट झाली की हा फोटो की दुध सदृश चहा की बदामाचा आकार ?
सगळंच. :)
गिरीजा यास,
मी पण आता पुरती गोंधळून गेले आहे. त्या फोटो पेक्षा पण त्या गोलातल्या c नेच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे
१. गाळणीचा लाल रंग (हा कामगार वर्गा बाबत काही तरी सांगत आहे.)
२. खालील अॅल्युमिनियमचे भांडे (हा गरीबीबाबत काही तरी सांगत आहे.)
३. चहा थोडा दिसत आहे.कारण भांड्यात ओतलेला चहा गाळणीला चिकटलेला नाही.
४. चा पत्ती दिसत नाही.
मुक्त विहारी यास,
चहा ओतलेलाच नाही , फक्त दूधच गळून घेतले आहे. बाकी माझ्या फोटोचे असे हि पैलू निघतील याची कल्पना नव्हति. काचेच्या , मातीच्या भांड्याचे आमच्याकडे वावडे आहे त्यांच्या नाजूक पणा मुळे त्यामुळे स्टील जिंदाबाद.
खालील पाँटस नोटेड
१. चहा ओतलेला
२. दुधच गाळून घेतले आहे.
३. स्टीलचे भांडे वापरले आहे. असे तुम्ही म्हणता, पण भांडे स्टीलचे नसून अॅल्युमिनियमचे किंवा गेला बाजार हिंडालियमचे असावे, असे फोटो दाखवतो. (मातीचे नाही, हे फोटोत पण दिसते आहेच.)
ते भांडे स्टीलचेच असण्याची शक्यता असून नीट घासलेले नसल्याने चमकत नसावे.
पण दुध का गाळुन घेतलं हे कळलं नाही
तुम्ही फक्त चित्रंच पाहता असं दिसतंय.
त्यांनी स्पष्ट लिहिलंय की:
आणि तुम्ही विचारताय दुध का गाळून घेतलं.
कारण मध्येच थोडेसे काहीतरी धुरकट-पांढरट काहीतरी दिसत आहे.
एकतर चहा कमी पडलाय किंव्वा दुध् जास्त झालय
अहो चित्रच इतक्या अत्त्युच्च दर्जाचे आहे म्हट ल्यावर शब्दांकडे लक्ष तरी कसे जाईल?
धन्या यास,
चुकी निदर्शनास आणून दिल्या बद्दल धन्यवाद,
चूक
मी ह्या द्रुष्टीने विचार नाही केला.
मी आपला चहाच गाळला असेल, असे समजत होतो.
दूध जर गाळून घेतले असेल तर....
मिल्क पावडर पासून दूध बनवले असेल का?
आणि मिल्क पावडर अस्लीच तर कुठली?
नेस्ले की एव्हरेडी की अमुल? का परदेशातील कुठली तरी?
गिरीजा यास,
मला साय आवडत नाही चहात म्हणून दुध गळून घेते पहिले.
कायतर चहापूडीची भुकटी बघून भविष्य सांगतात त्याची आठवण झाली.
रच्याकने जुन्या रुमालाचा धुण्याआधी एक्स रे काढावा म्हणतोय, काय दिसते पाहू.
भिंतीवर फिरताना भिंतीवर(च) मिळालेला आखरि आकार! :P
भिंतीला गाळणीची काय सर........
कुठे ती गाळणीवरची निशाणी आणि कुठे तुमची भिंतीवरची पिपाणी.
रिकामा अतृप्त आत्मा भींतीवर मच्छर मारी.
साला एक मच्छर आदमी को अतृप्त आत्मा बना देता है
साली एक प्रतिक्रिया, इन्सान को गिरी जा बना देती है। :P
हल कट धन्या प्रतिक्रियेला शब्द चारी! :-\
काय ती डोळे मिचकवणी
नमक नसलेली यमकं पिचकवणी! :P
तुम्ही भींत रंगवली नाही का?
साडेचार कोटी वर्षांपूर्वीचा डास सापडला.
http://www.livescience.com/40402-fossil-mosquito-blood-meal.html
गाळणी खाली चहाच आहे कशावरुन ??
ही गाळणी वापरत नाही.
तुम्हीच नाहीच वापरु शकणार. कॉपीराईट आहे ती.
चहाच्या वरची तरी गाळणी च आहे,कश्यावरुन? ;-)
गाळणी नाही तर काय चाळणी आहे?
अहो तुंम्हास कळत नाही काय? जे नसत,तेच अधिक स्पष्ट दिसल पाहीजे! :P
म्हणजे एखादयाला एखादी वेगळ्या विषयावरची कथा एकदम भंकस आणि भंगार कथाविषय असलेली कथा वाटावी तशी?
त्याचा मला काही अंदाज नाही ब्वा !
काय दंगा सुरु आहे. :)
मी तर अज्जून फोटोचाच अभ्यास करत आहे..
मुवि, पोट दुखी झाली आहे. हसून तर झालीच , पण वरील सर्व "अभ्यासकांचे" अभ्यागतांचे व प्रतिभावंताचे शब्द सामर्थ्य पाहून मत्सरानेही पोटदुखी झाली आहे. ......काही तरी औषध पाठवा नं ....( त्यात मात्र अभ्यास करण्यात फार वेळ नका घालवू )
घंटीचंद आणि उदारमतवादी बाबुराव या दोन पदव्यांचा उल्लेख राहीला.
ओ मुवि, प्रबंध लिहून टाका एक या गाळणीवर, गाळणीतल्या ह्रदयसदृश आकारावर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कॉपीराइटवाल्या फोटोवर.!
आजसकाळी मी चहा करत असताना योगायोगाने चहा गाळणी मध्ये मोनालिसाचे चित्र उमटले ...पण धुवुन टाकल्यावर लक्षात आले की मी फोटो घ्यायला विसरलोय :( अशा रीतीने जग आज एका महान योगायोग कलाकृतीला मुकले आहे .
ए काय थट्टा लावलीये रे या धाग्याची?
लिओनार्दो दा विंचीने एका नवीन चित्रकाराला गलिच्छ भिंतीकडे पहाण्याचा सल्ला दिला होता
http://www.tate.org.uk/context-comment/articles/deliberate-accident-art
नवीन लेखिका आपणहून गाळण्याकडे पहातीय आणि तुम्ही राव थट्टा लावलीय...
गाळीव रत्नांच्या गाळीव प्रतिक्रिया वाचून एक मिपाकर म्हणून शरम वाटली वगैरे वगैरे. नवीन लेखकांना असे रॅगिंग करता काय कंपूबाजांनो?
संजिवनी के हां तुमचा डु आयडी आहे काय?
आताच प्रशांतला सांगतो आयपी चेक करायला. ;)
प्रशांत माझ्या कंपूत आहे. संजीवनीके१ हा वल्लीचा डुप्लिकेट आयडी आहे असं नक्की सांगेल तो.
दु...दु... आय.डि. ,असं म्हणायच आहे का तुंम्हाला? ;-)
ज्योतायचं कंपूचं स्वप्न साकारलं तर.... आता मी सुखानं डोळे मिटायला मोकळा! ;)
बाकी नवलेखकांच्या निमित्तानं संपादकांमधली ही लुटुपुटूची लढाई पाहून ड्वाळे पाणावले...
ड्वाळ्यावरुन आठवलं अरे तो स्पावड्या कुठंय ? :)
धाकाकर्त्याला कुठुन चहा गाळला आणि हृदय सदृश्य आकाराचा फोटो मिपावर शेअर केला असं झालं असेल! आता ह्यापुढे काहिहि गाळताना (चहा/कॉफि बरं!) तो फोटो म्हणुन काय घेणार नाहि :D
आता ह्यापुढे काहिहि गाळताना (चहा/कॉफि बरं!) तो फोटो म्हणुन काय घेणार नाहिएवढंच नाही तर चहा गाळताना लेखकाला नेहमी त्यांत मुवि, वल्ली, धन्या, बॅटमन, अआ, गिरीजा इ चे व्हर्चुअल आकार दिसू लागतील... मोंगलांना पाण्यात धनाजीसंताजी दिसत असत तसे... काय्हा छ्ळ्वाद न्विन मेंब्राचा ! टीव्र णीषेढ !
(मनोगत: पुढचा धागा: "मिपाकरांचे डोके ठिकाणावर आहे काय?" :) ;) )
(मनोगत: पुढचा "लोकमान्य" धागा: "मिपाकरांचे डोके ठिकाणावर आहे काय?" ) असे वाचावे :)
पहिल्यांदा वाचताना चुकून हा धागा मनोगतावर येईल असं वाचलं आणि फुटलो =))
दीपक यास,
फोटो नक्की घेईन, पण मिपावर टाकताना मनाची तयारी ठेवूनच टाकेन.
sanjivanik१ यास,
तुम्ही प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देवून स्वत:चा धागा 'शतकी' करायच चंग बांधला आहे का? ;)
(कृ.ह.घे) :)
किसन यास,
शतकी करायची हौस मला अजिबात नहि. लोकांनी प्रतिक्रियाच अशा दिल्या आहेत कि त्याला प्रतिक्रिया द्याविशीच वाटते . मी प्रत्येकाला नाही तर ठराविक प्रतिक्रियांनाच उतारे दिली आहेत आपण जर लक्ष पूर्वक बघितले तर.
मुख्य धागा बाजूला ठेवून माझ्या प्रतिक्रिया वर तुमच लक्ष केंद्रित झाल याच मात्र हसू येत.
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. सभ्यपणाचा बुरखा पांघरुन अशा गोष्टी करायची त्यांना सवय आहे.
कधी कधी मिपावर पोस्ट केल्याचे वाईट वाटते काही काही प्रतिक्रिया वाचुन.
कसचं कसं. जसा धागा तशा प्रतिक्रिया.
मग तुम्ही हे मुक्तपीठवर टाकुन पहा ना जरा =))
तंतोतंत =)) =)) =)) तिकडे तर बिनपाण्याने करतील.
एका पेल्यात होते, गाळणे सुबक सुरेख ,
होती विरत थोडी , मलई तयात एक .
मलईस दुख: भारी , भोळी वीरे कपाशी ,
पिण्यास चहा जाता, तीच येते मिशाशी .
सारून दूर तिजला , म्हणती चिडून लोक
होती विरत थोडी , मलई तयात एक .
एके दिनी परंतु ,सायीस त्या कळाले,
भय दुख पार तिचे, गाळणीतुनी गळाले ,
भिंगातूनी पाहता , संजीवनी क्षणैक ,
तिजला कसे कळाले, शतकीच धागा एक.
खिक्क....
लय भारी....
लवकरच आम्ही एक धागा काढायचा विचार करत आहोत.
"मिपाची तर्री"
त्यात ह्या कवितचा नक्की समावेश करु.
अतिशय उच्च!! मान गये.
भिंगातूनी पाहता , संजीवनी क्षणैक ,
तिजला कसे कळाले, शतकीच धागा एक . >>> मान गए उस्ताद! :) मस्स्स्स्स्स्तं!!! :)
लैच भारी ! टाळ्या !!
मिपावर शिघ्रकवींची इतकी मांदियाळी आहे की गेलाबाजार एक शिघ्रकवीसंमेलन होऊ शकते :)