Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

केजरीवालांचे वाराणशीतील भाषण

श
श्रीगुरुजी
Tue, 03/25/2014 - 16:19
🗣 228 प्रतिसाद
केजरीवालांचे आजचे काशीतले भाषण १५-२० मिनिटे पाहत होतो. केजरीवालांनी अत्यंत नकारात्मक भाषण केले. संपूर्ण वेळ फक्त मोदींवर टीका करत होते. निवडून आलो तर आपण स्वतः किंवा आपला पक्ष नक्की काय करणार आहे याविषयी भाषणात चकार शब्द नव्हता. मोदी निवडून आले तर तुमचे कसे वाटोळे होईल हाच भाषणातला मुख्य मुद्दा होता. बाकी काहीच नव्हते. मोदी कसे वाईट आहेत, मोदी आणि राहुल अंबानी-अदानींच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देशातील लघूउद्योग संपुष्टात येतील आणि शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील, मोदी निवडून आल्यास वाराणशीतले सर्व लघुउद्योग बंद पडतील व आजूबाजूच्या शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतील, नरेंद्र मोदींनी केवळ बड्या उद्योगपतींचा विकास केला आहे. मोदींच्या गुजरातमध्ये आतापर्यंत तब्बल ६०,००० लघुउद्योग बंद झाले, मोदींनी शेतक-यांच्या जमिनी हिसकावून अदानी आणि अंबानी यांना दिल्या, मोदी प्रत्येकवेळी मतदारांना धमक्या देऊन निवडून येतात ... मोदीनिंदा, मोदीनिंदा आणि मोदीनिंदा ... या व्यतिरिक्त त्यांच्या भाषणात काहीच नव्हते. आपला पक्ष महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी इ. कशी कमी करणार आहे, देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपल्याकडे काय योजना आहेत, देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा आपण कशी करणार आहोत, आपल्या पक्षाचे परराष्ट्र धोरण काय आहे, शेतकर्‍यांसाठी आपण काय करणार आहोत, आपल्याकडे विकासाच्या कोणत्या कल्पना आहेत या व अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी चकार शब्दही काढला नाही. नेहमीच्या पद्धतीनुसार नाटकीपणा केलाच. सकाळी माध्यमांना सोबत घेऊन गंगेत डुबक्या मारल्या. नंतर भाषण सुरू असताना मध्येच ३-४ मिनिटे थांबले. कारण हे होते की कुठूनतरी मशिदीतली बांग ऐकू येत होती. बांग संपेपर्यंत थांबून आणि सकाळी गंगेत डुबक्या मारून आपली दिखाऊ धर्मनिरपेक्षता व लांगूलचालन दाखवून दिले. आजूबाजूला बरीच मुस्लिम वस्ती असलेले मैदान निवडण्यातही काँग्रेससारखीच चतुराई दिसली. १९८७-८९ या काळात वि.प्र.सिंग जशी नाटके करत असत तसेच केजरीवालांनीही आज केले. त्यांनी अंबानी बंधूंचे स्विस बँकेत खाते असून यामध्ये कोटीच्या-कोटी काळा पैसा असल्याचा आरोप केला व अंबानी बंधूंच्या स्विस बँकेतील खाते क्रमांकही जाहीर केले- खाते क्रमांक- ५०९०१६०९८३ आणि ५०९०१६०९८४. वि.प्र.सिंग यांनीही बोफोर्स प्रकरण जोरात असताना राजीव गांधींच्या स्विस बॅंक खात्याचे क्रमांक असेच जाहीर केले होते. त्याच धर्तीवर केजरीवालांनी तोच नाटकीपणा केला. परंतु २०१४ मधील मतदार १९८८ च्या तुलनेत जास्त शिक्षित आहे याची त्यांना कल्पना नसावी. एकंदरीत एक अत्यंत नकारात्मक भाषण व कमालीचा नाटकीपणा केजरीवालांनी आज वाराणशीत केला. --------------------------------------------------------------------------- केजरीवाल व इतरांवर आज वाराणशीत शाई फेकल्याचे दाखवत होते. यापूर्वी योगेंद्र यादवांना शाई फासणारा 'आप'चाच कार्यकर्ता होता. 'आप'ने त्याच्याविरूद्ध काहीच कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी हरयानामध्ये केजरीवालांना काळे झेंडे दाखविणारे 'आप'चेच कार्यकर्ते होते. मनीष सिसोदियांना पाटण्यामध्ये काळे झेंडे दाखविणारे देखील 'आप'चेच कार्यकर्ते होते. स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यासारखी खोडसाळ कृत्ये करून सहानूभूती मिळविणे आणि इतर पक्षांवर दोष ढकलणे ही 'आप'ची नवीन स्ट्रॅटेजी दिसतेय.

प्रतिक्रिया द्या
65242 वाचन

💬 प्रतिसाद (228)
इ
इष्टुर फाकडा Tue, 03/25/2014 - 16:28 नवीन
काँग्रेस ने मोदींचा रस्ता काटायला सोडलेली मांजर असावी असंच केजरीवाल चं सगळं चाललेलं आहे सध्या :)
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 03/25/2014 - 16:32 नवीन
केजरीवाल व इतरांवर आज वाराणशीत शाई फेकल्याचे दाखवत होते. तरी या वेळेस गाडीची काच कशी फुटली नाही? सकाळी माध्यमांना सोबत घेऊन गंगेत डुबक्या मारल्या. *clapping* तुम्हाला माहीत नसेल कदाचीत पण *secret* गंगेत डुबकी मारली की आपली सगळी पापे धुतली जातात आणि आपण परत धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होतो. (पण मग मोदी उडी का मारत नाहीत? *scratch_one-s_head* ) यासंदर्भात अनरीअल टाईम्स मधे आलेला विनोद बघण्यासारखा आहे. Image removed. Ganga purifies herself after washing over Kejriwal’s holy body in Varanasi Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 03/26/2014 - 14:54 नवीन
>>>सकाळी माध्यमांना सोबत घेऊन गंगेत डुबक्या मारल्या. प्रसारमाध्यमांच्या पापांचं क्षालन झालं असावं असं मानायला जागा आहे तर... (मुळात प्रसारमाध्यमं पाप करतात का?) बा द वे (तुमचा तो) तरुण तेजपाल कुठंय हो सध्या? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
आ
आयुर्हित Tue, 03/25/2014 - 17:05 नवीन
Modi for vision. Rahul for division...!..!..!...! Kejriwal for Televisions ...!!!!!! प्रसार माध्यमांचे शेअर्स नक्कीच वधारतील!
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 03/25/2014 - 17:09 नवीन
आणि मिपावरील सध्याचे धागे revision! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
र
रमेश आठवले Tue, 03/25/2014 - 18:30 नवीन
मी राहुल फॉर illusion असे ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
द
दिव्यश्री Tue, 03/25/2014 - 19:15 नवीन
मस्तच ... *lol* काय पण हाणलाय... :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
प
प्रचेतस Tue, 03/25/2014 - 17:10 नवीन
कंटाळा आला आता अश्या धाग्यांचा
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 03/26/2014 - 05:56 नवीन
+१०० या रवंथापेक्षा आता पहा, नीट विचार करा आणि योग्य वाटेल त्याला मत द्या... पण मत जरूर द्या... असेच वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
व
विश्वनाथ मेहेंदळे Wed, 03/26/2014 - 09:36 नवीन
तरी धागा उघडून आवर्जुन वाचलात ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ज
जानु Tue, 03/25/2014 - 18:03 नवीन
निवडून आलो तर आपण स्वतः किंवा आपला पक्ष नक्की काय करणार आहे याविषयी भाषणात चकार शब्द नव्हता. मोदी निवडून आले तर तुमचे कसे वाटोळे होईल हाच भाषणातला मुख्य मुद्दा होता. वरील वाक्याशी पुर्ण सहमत. केजरीवाल याचे परीक्षण करताना हा विचार महत्वाचा आहे. महत्वाचे म्हणजे केजरीवाल याना हे माहीत आहे की आपण सरकार बनवत नाही. त्यामुळे बोलायला काय जाते? मला व्यक्तीशा हा मुद्दा पटतो की राहुल आणि मोदी हे उद्योगपतीचा वापर करतात व त्याना त्याचा मोबदला ही देतात. हे सर्वमान्य गुपित आहे. पण शासनकर्ता म्हणुन मी मोदीना जास्त योग्य मानतो. कारण शासनात भावनेपेक्षा व्यवहाराला महत्व असावे. (अनुस्वार सापडत नाही. मदत करा.)
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 03/27/2014 - 12:07 नवीन
तंत्र (taMtra) , मंत्र (maMtra), संत्र (saMtra)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जानु
म
मारकुटे Wed, 03/26/2014 - 02:54 नवीन
केजरीवाल व इतरांवर आज वाराणशीत शाई फेकल्याचे दाखवत होते. यापूर्वी योगेंद्र यादवांना शाई फासणारा 'आप'चाच कार्यकर्ता होता. 'आप'ने त्याच्याविरूद्ध काहीच कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी हरयानामध्ये केजरीवालांना काळे झेंडे दाखविणारे 'आप'चेच कार्यकर्ते होते. मनीष सिसोदियांना पाटण्यामध्ये काळे झेंडे दाखविणारे देखील 'आप'चेच कार्यकर्ते होते. स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यासारखी खोडसाळ कृत्ये करून सहानूभूती मिळविणे आणि इतर पक्षांवर दोष ढकलणे ही 'आप'ची नवीन स्ट्रॅटेजी दिसतेय.
हे सगळं संघाच्याच चालीवर चालू आहे म्हणायचं !
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 03/26/2014 - 05:21 नवीन
भाजपा = मोदी हे समीकरण आणि आअप=केजरीवाल हे समीकरण दोन्हीचा अतिशय वीट येऊ लागला आहे. दोन्ही पक्षांच्या समर्थकांनी यापलिकडे जाऊन बोलावे. माझे मतः केजरीवाल मोदींना हरवण्याची शक्यता बरीच कमी आहे, मोदी व केजरीवाल यांच्याहून कितीतरी चांगले उमेदवार कित्येक भागांतून उभे आहेत. तेव्हा ही व्यक्तीकेंद्रीत लढाई कंटाळवाणी आहे!
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Wed, 03/26/2014 - 05:43 नवीन
जास्तीत जास्त बालीशपणा आणि तमाशा करण्याचा या माणसाने चंगच बांधला आहे. वैताग आलाय अशा बातम्यांचा आता. निदान या वैतागासाठी तरी वाटते मधी एकदा सोळा मे ही तारीख उजाडते आहे.
  • Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे Wed, 03/26/2014 - 06:08 नवीन
गुजरातच्या विकासाच्या पोकळ गप्पा ऐकून आम्हालाही कंटाळा आला आहे पृथ्वीराज चव्हाणांनी मोदींना डीबेटसाठी आमंत्रण दिले आहे केजरीवालांनीही नरेंद्रभाईंना डीबेटचे आव्हान केले आहे परंतु नेहमीप्रमाणे मोदींनी आपला उद्धट स्वभाव कायम ठेऊन खुल्या चर्चेतुन पळ काढला आहे.लोक मुर्ख असतात परंतु इतकेही मुर्ख नसतात हे अजून भाजपाला लक्षात आलेले नाही.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 03/26/2014 - 06:15 नवीन
खुल्या डिबेटचे आमंत्रण देण्यारा बाबांनी (पृथ्वीराजबाबा) स्वतः मुख्यमंत्री झाल्यापासून किती फायली सह्या करून पास केल्या ते सांगा. अभ्यास करून शेरे देणे, सुधारणा करून मग सही करणे ही प्रक्रीया तर दूरच राहीली. बाबा नुसता फायलींवर बसून राहतो असे फाईलसही सम्राट घड्याळवाले काकाजी म्हणतात. हल्ली कोणीही कोणाला आव्हान देतो. मुंगीने हत्तीला आव्हान द्यावे, आणि मुंगी मारणे हा कायद्याने गुन्हा असल्याने हत्तीने दुर्लक्ष करावे तर मुंगी लगेच टेरी (!) बडवून घेणार की 'हत्ती मला घाबरला, हत्ती मला घाबरला'. असो चालायचेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
म
मूकवाचक Wed, 03/26/2014 - 07:20 नवीन
मिपावरच्या निष्णात डिबेटपटूंचे कौशल्य आणि चिकाटी पाहता डिबेटसाठी दिलेली आव्हाने हा डिबेटची प्रक्रिया सुरू राहिल्याने निवडणुका अनिश्चित कालावधीकरता स्थगित करण्यासाठी रचलेला डाव असू शकतो अशी साधार भीती वाटते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मंदार दिलीप जोशी Wed, 03/26/2014 - 06:27 नवीन
लोक मुर्ख असतात परंतु इतकेही मुर्ख नसतात हे अजून भाजपाला लक्षात आलेले नाही. तुम्ही नानासाहेब नेफळे, ग्रेटथिन्कर, टॉपगिअर्ड फिलोसॉफर असे कितीही डुआयडी काढलेत तरी ते आम्ही ओळखू शकतो हे तुमच्या लक्षात आलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
म
मृत्युन्जय Wed, 03/26/2014 - 07:19 नवीन
राखी सावंतनेही केजरीवालाना आव्हान दिले आहे. अजुन केजरीवालांनी उत्तरच दिलेले नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
श
श्रीगुरुजी Wed, 03/26/2014 - 08:20 नवीन
>>> परंतु नेहमीप्रमाणे मोदींनी आपला उद्धट स्वभाव कायम ठेऊन खुल्या चर्चेतुन पळ काढला आहे. चर्चा बरोबरीच्या लोकांमध्ये होउ शकते. कुठे १२ वर्षांहून अधिक काळ गुजरातसारख्या मोठ्या रा़ज्याचे मुख्यमंत्रीपद यशस्वीपणे सांभाळणारे मोदी आणि कुठे दिल्लीसारख्या छोट्या राज्याचे मुख्यमंत्रीपद ४९ दिवसात सोडून देऊन पळ काढणारे केजरीवाल! केजरीवालांप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाणसुद्धा मोदींबरोबर चर्चा करण्यासाठी पात्र नाहीत. त्यांना केवळ दिल्लीश्वरांच्या कृपेने मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. ते स्वतः निवडून सुद्धा आलेले नाहीत. त्यांनी आधी निवडून येऊन दाखवावे आणि नंतर चर्चेचे आव्हान द्यावे. केजरीवाल आणि चव्हाण यांनी आधी स्वतःला सिद्ध करावे, आपली कार्यक्षमता दाखवून द्यावी आणि नंतर शड्डू ठोकावा. >>> लोक मुर्ख असतात परंतु इतकेही मुर्ख नसतात हे अजून भाजपाला लक्षात आलेले नाही. तुम्ही आजवर 'ग्रेटथिंकर', 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर', 'नानासाहेब नेफळे' अशा अनेक नावांनी वावरलात. एका नावाने 'आप' आणि 'केजरीवालांना' शिव्या द्यायच्या आणि दुसर्‍या नावाने त्यांचे कौतुक करायचे अशी तुमची स्ट्रॅटेजी. इथले सभासद तुम्ही समजता तितके मूर्ख नसतात हे अजून तुमच्या लक्षात आलेले दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Wed, 03/26/2014 - 09:10 नवीन
त्येच की !नरेंद्र मोदींनीही गुजरातचे मुख्यमंत्री व्हायच्या आधी साधी ग्रामपंचायतीचीही निवडणुक कधी लढवली नव्हती, मग थेट त्यांना कोणताहि अनुभव नसताना मुख्यमंत्रीपदी कसे बसवले गेले? एक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जे की अमेरिकेतुन संगणकशास्रात M.S झालेले, दुसरे केजरीवाल IIT तुन M tech झालेले, यांच्यापूढे आपला काही टिकाव लागणार नाही.. आपण आपल्या 'बरोबरीच्याच' लोकांबरोबरच योग्य आहोत याचा साक्षात्कार नरेंद्र मोदींना झाला ,हे ही नसे थोडके.. केजरीवाल जर बरोबरीचे नाहीत तर त्यांच्या १६ प्रश्नांची थातुरमातुर उत्तर द्यायची गरज काय होती आणि जर उत्तरंच द्यायचीत तर खुली चर्चा पृथ्विराज चव्हाण व केजरीवालांसोबत करुन दाखवा.. शौर्याचे, विजिगिषु वृत्तीचे डोस उठसुठ जगाला पाजणार्या संघाच्या एका स्वयंसेवकाने अशा क्लैब्याचे दर्शन घडवावे हे काही बरे नव्हे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
निनाद मुक्काम … Wed, 03/26/2014 - 10:09 नवीन
पृथ्वीराज ह्यांनी आधी काका पुतण्याची डिबेट करावे मूळ मुद्दा फायली का हलत नाहीत. पृथ्वी व केजू ह्यांच्या सारख्या सहकारी पक्षाच्या कुबड्या घेऊन मोदी ह्यांनी सरकार स्थापन नाही केले. त्यांच्यात कशी तुलना होऊ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
श
श्रीगुरुजी Wed, 03/26/2014 - 12:49 नवीन
>>> पृथ्वीराज ह्यांनी आधी काका पुतण्याची डिबेट करावे आपल्याला 'लकवा' झालेला आहे का नाही याविषयी त्यांनी काकांशी सखोल व गंभीर चर्चा करावी आणि मग मोदींना आव्हान द्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
श
श्रीगुरुजी Wed, 03/26/2014 - 12:47 नवीन
>>> त्येच की !नरेंद्र मोदींनीही गुजरातचे मुख्यमंत्री व्हायच्या आधी साधी ग्रामपंचायतीचीही निवडणुक कधी लढवली नव्हती, मग थेट त्यांना कोणताहि अनुभव नसताना मुख्यमंत्रीपदी कसे बसवले गेले? कारण त्यांच्यात पात्रता होती आणि गेल्या १२+ वर्षात त्यांनी आपली पात्रता सिद्ध केली आहे. दुसरीकडे आयआयटीतून एम टेक झालेले जबाबदारी झटकून केवळ ४९ दिवसात धूम पळून का गेले हे सांगा ना. >>> एक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जे की अमेरिकेतुन संगणकशास्रात M.S झालेले, दुसरे केजरीवाल IIT तुन M tech झालेले, लालू सुद्धा डॉक्टरेट आहे, राहुल सुद्धा एम फिल आहे (म्हणे)! >>> यांच्यापूढे आपला काही टिकाव लागणार नाही.. आपण आपल्या 'बरोबरीच्याच' लोकांबरोबरच योग्य आहोत याचा साक्षात्कार नरेंद्र मोदींना झाला ,हे ही नसे थोडके.. तुम्ही वाट्टेल ते गोड गैरसमज करून घ्या! >>> केजरीवाल जर बरोबरीचे नाहीत तर त्यांच्या १६ प्रश्नांची थातुरमातुर उत्तर द्यायची गरज काय होती आणि जर उत्तरंच द्यायचीत तर खुली चर्चा पृथ्विराज चव्हाण व केजरीवालांसोबत करुन दाखवा.. अजाण व्यक्तीला थातुरमातुर दिलासा देऊनच वाटेला लावायचे असते. ज्ञानी व्यक्ती अज्ञानी व्यक्तिंबरोबर वादविवादात व्यर्थ वेळ घालवत नाहीत. >>> शौर्याचे, विजिगिषु वृत्तीचे डोस उठसुठ जगाला पाजणार्या संघाच्या एका स्वयंसेवकाने अशा क्लैब्याचे दर्शन घडवावे हे काही बरे नव्हे... बरं मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Wed, 03/26/2014 - 13:12 नवीन
पृथ्विराज असतील वा केजरीवाल, जाहिर चर्चेला ते तयार आहेत यातच त्यांचे मेरीट्स आहेत.. नरेंद्र मोदी पळ काढण्यात तरबेज आहेत .. करन थापरच्या इंटरव्हुमधुन पळ काढणे जाहीर चर्चेच्या आव्हाणातुन पळ काढणे महाराष्ट्राला दुष्काळनिवारणासाठी दिलेल्या मोफत मदतीच्या वचनातुन पळ काढणे व मदतीचे पैसे मागणे .हे बघा इथे http://www.esakal.com/esakal/20140326/4634611105938493251.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 03/26/2014 - 15:58 नवीन
उद्या कोणीही सोम्यागोम्या मोदींना चर्चेसाठी आव्हान देईल. दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडून पळून आल्यामुळे केजरीवालांकडे असल्या फालतू प्रश्नांसाठी व आव्हानासाठी भरपूर रिकामा वेळ आहे. मोदी व्यस्त आहेत. असल्या फालतू चर्चांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. मोदींचं नंतर बघू. प्रथम केजरीवालांनी माझ्या खालील प्रश्नांची उत्तरे द्यावीत व माझ्याशी जाहीर चर्चा करावी. (१) सभेत भाषण सुरू असताना कोठून तरी लांबून बांग ऐकू आल्यावर ४-५ मिनिटे भाषण थांबवून स्वस्थ उभे का होते? असे करायला बांग म्हणजे काय राष्ट्रगीत वाटले का त्यांना? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिल्यावर पुढील प्रश्न विचारीन. चव्हांणांनी माझ्या खालील प्रश्नाचे उत्तर द्यावे. (१) अशोक चव्हाणांवर आदर्श प्रकरणी आजतगायत कारवाई का केली नाही? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिल्यावर पुढील प्रश्न विचारीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
श
श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 03/27/2014 - 03:59 नवीन
मास्तर नाना वात्र्य विद्यार्थी आहे,त्याच्या नादाला नका लागु,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नानासाहेब नेफळे गुरुवार, 03/27/2014 - 08:20 नवीन
उद्या कोणीही सोम्यागोम्या मोदींना चर्चेसाठी आव्हान देईल. दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडून पळून आल्यामुळे केजरीवालांकडे असल्या फालतू प्रश्नांसाठी व आव्हानासाठी भरपूर रिकामा वेळ आहे. मोदी व्यस्त आहेत. असल्या फालतू चर्चांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. मोदींचं नंतर बघू.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचा चारवर्षे मुख्यमंत्री ,त्याअधी पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री ,सत्तरच्या दशकात अमेरीकेतुन संगणकशास्त्रातील पदवी घेतलेला..." सोम्या ", मॅगसेसे पुरस्कार मिळालेला ,आयआयटी इंजिनिअर,रेवेन्यु खात्याचा कमिशनर, दिल्लीत वचनांची पुर्ती करणारा मुख्यमंत्री ,दहा वर्षं समाजसेवेत घालवलेला.. "गोम्या " जर हे' सोमेगोमे' आहेत तर यांच्यापासुन पळ काढणायची मोदींना गरजच काय???? एकदाच ,फक्त थोडे तास द्यावेत चर्चेसाठी नरेंद्रभाईंनी व या दोघा सोम्यागोम्यांना निष्प्रभ करुन दाखवावे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/27/2014 - 08:29 नवीन
>>> महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचा चारवर्षे मुख्यमंत्री ,त्याअधी पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री ,सत्तरच्या दशकात अमेरीकेतुन संगणकशास्त्रातील पदवी घेतलेला..." सोम्या ", इतक्या पदव्या असून उपयोग काय? शेवटी काँग्रेसमध्येच कुजले ना? आणि ४ वर्षे मुख्यमंत्री असून नक्की काय कामगिरी केली? मंत्रालयाच्या आगीत सिंचन घोटाळ्याचा फाईल्स नष्ट होणे आणि अशोक चव्हाण, सुशीलकुमार, निलंगेकर इ. आदर्श घोटाळ्यातून अलगद सोडविणे ही महान कामगिरी समजली तर प्रश्नच मिटला. त्यांना वादविवादाची एवढी हौस असेल तर विनोद तावडे, गिरीश बापट इ. ना आव्हान देऊन चर्चा करावी. मोदींबरोबर चर्चा करण्याकरता आधी त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल. >>> मॅगसेसे पुरस्कार मिळालेला ,आयआयटी इंजिनिअर,रेवेन्यु खात्याचा कमिशनर, दिल्लीत वचनांची पुर्ती करणारा मुख्यमंत्री ,दहा वर्षं समाजसेवेत घालवलेला.. "गोम्या " जिथे जाईल तिथून पळून जाणे एवढंच यांनी आतापर्यंत केलंय. यांच्याशी कसली डोंबलाची चर्चा करायची? >>> जर हे' सोमेगोमे' आहेत तर यांच्यापासुन पळ काढणायची मोदींना गरजच काय???? एकदाच ,फक्त थोडे तास द्यावेत चर्चेसाठी नरेंद्रभाईंनी व या दोघा सोम्यागोम्यांना निष्प्रभ करुन दाखवावे.. नरेंद्र मोदींसमोर हे आधीच निष्प्रभ आहेत. अगदीच चर्चेसाठी उतावीळ असतील तर गुजरातमधील भाजपच्या एखाद्या आमदाराशी चर्चा करून हौस भागवून घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे गुरुवार, 03/27/2014 - 09:17 नवीन
सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स नष्ट होणे, सुशीलकुमार शिँदे निलंगेकर यांना आदर्शतून अलगद सोडवणे ..
याची उत्तरे चव्हाणांना विचारता येतील, जर मोदी जाहीर चर्चेला तयार असतील तर..अशा चर्चेत तावडे बापट व राणाभिमदेवी थाटात 'पुराव्यानिशी' अगडबंब आरोप करणारे व नंतर गायब होणारे किरीट सोमय्या वगैरेंची टीमच घेऊन येता येईल. चव्हाण व केजरीवाल दोघेही एक्स्पोझ होतील...हिच वेळ आहे काँग्रेसला जनतेसमोर एक्स्पोझ करायची.. पण.... नरेंद्र मोदी असे करणार नाही याचे कारण आहे त्यांच्या मंत्रीमंडळातील अत्यंत 'स्वच्छ ''कार्यक्षम' मंत्री बाबू बोखिरीया,व पुरषोत्तम सोलंकी ,त्याच बरोबर दहा वर्षे गुजरातमध्ये लोकायुक्त का नेमला नाही याचाही जाब त्यांना द्यायला लागेल. बोखिरियाना तीन वर्षांची शिक्षा झाली आहे. http://m.timesofindia.com/india/Babu-Bokhariya-Gujarat-minister-sentenced-to-3-year-imprisonment-in-illegal-mining-case/articleshow/20602967.cms पुरषोत्तम सोलंकी http://www.dnaindia.com/india/report-hc-found-him-guilty-in-rs400-cr-scam-but-govt-shields-purushottam-solanki-1589846 यावर आपले काय म्हणणे आहे श्रीगुरुजी? की आता कोर्टही खोटारडे झाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नानासाहेब नेफळे Sat, 03/29/2014 - 15:48 नवीन
या इथे वरती जो प्रतिसाद आहे. त्याचा प्रतिवाद कुणीही केलेला नाही ,कृपया या प्रतिसादाचा प्रतिवाद कुणीतरी करावा अशी मी मित्रत्वाची विनंती करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
म
मंदार दिलीप जोशी Tue, 04/01/2014 - 08:58 नवीन
तो प्रतिसाद प्रतिवाद करायच्या लायकीचा नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Tue, 04/01/2014 - 09:37 नवीन
का नाही? काय चूकीचे आहे त्या प्रतिसादात! आपल्याकडे उत्तर नसेल तर तसे स्पष्ट सांगा, या धाग्यावरचे प्रत्येक माझे प्रतिसाद श्रीगुरुजींना आणि तूम्ही प्रतिवादीत केले आहेत. परंतु हा प्रतिसाद रिक्त सोडला कारण इतक्या उघड मुद्द्याचे उत्तर तूमच्याकडे नाही... परत एकदा मित्र्त्वाची विनंती करतो, आपण त्या प्रतिसादाचा प्रतिवाद करावा. http://www.misalpav.com/comment/566824#comment-566824
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी
ग
गब्रिएल Tue, 04/01/2014 - 09:44 नवीन
काय चूकीचे आहे त्या प्रतिसादात! सग्ळच चुकलं की वो तुम्चं. त्याचं आसम हाय नेभळे साय्ब. तुम्च्या गुर्जींच म्हन्न हाय की 'तुमि पुरावे माग्ता. म्हंजे तुम्च्याशी चर्चा श्यक्य नाय.' आता गुर्जी बद्ला नायतर माग्णि बद्ला. काय म्हंता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
म
मंदार दिलीप जोशी Tue, 04/01/2014 - 10:02 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल
श
श्रीगुरुजी Tue, 04/01/2014 - 10:42 नवीन
>>> तो प्रतिसाद प्रतिवाद करायच्या लायकीचा नाही +१ सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी
न
नानासाहेब नेफळे गुरुवार, 03/27/2014 - 08:32 नवीन
बांग हे काय राष्ट्रगीत आहे का
त्यांच्या सभेत अनेक मुस्लिम आले असतील, त्यांच्यासाठीतरी नमाज पठण पवित्र आहे, त्या अनुषंगाने ,त्यांच्या भावनेचा आदर राखण्यासाठी केजरीवाल थांबले असतील.
अशोक चव्हाणांना तिकिट
मुद्दा मान्य आहे..तिकीट द्यायला नको होते.परंतु येदुरप्पांना टिकीट देणार्या भाजपसारख्या पक्षाने व अशा पक्षाचे व त्याच्या विचारधारेच जाहिर समर्थन करणार्यांनी असे प्रश्न विचारायचा नैतिक अधिकार गमावला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/27/2014 - 08:40 नवीन
>>> मुद्दा मान्य आहे..तिकीट द्यायला नको होते.परंतु येदुरप्पांना टिकीट देणार्या भाजपसारख्या पक्षाने व अशा पक्षाचे व त्याच्या विचारधारेच जाहिर समर्थन करणार्यांनी असे प्रश्न विचारायचा नैतिक अधिकार गमावला आहे. बरं मग निदान तुमच्या 'आप'समर्थकांनी किंवा गंगेहून निर्मळ असणार्‍या केजरीवालांनी तरी हा प्रश्न विचारला का? हा प्रश्न विचारण्याचे नैतिक, अनैतिक, राजकीय, सामाजिक, भावनिक, धार्मिक, निधर्मी इ. सर्व हक्क निदान केजरीवालांना आणि 'आप'ला तरी नक्कीच आहेत. मग ते अजून गप्प का? ('आप' काँग्रेसची 'बी' टीम तर नाही ना?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
व
विनोद१८ गुरुवार, 03/27/2014 - 19:50 नवीन
अरे पावट्या तुझ्या डोक्यातला अंधार अजुन गेलेला दिसत नाही म्हणुन थोडेसे असे, तुझे 'सोम्या आणि गोम्या' दोघेही परावलंबी, पराधीन म्हणजेच दुसर्‍याचा आधार असल्याशिवाय त्यांना धड उभेही राहता येत नाही कींवा दोन पावलेही टाकता येत नाहीत आणि म्हणे आमच्याबरोबर चर्चा करा. मोदी स्वबळावर तिन वेळा निवडुन आलाय कोणाच्याही कुबड्या घेतल्याशिवाय आणि स्वताच्या कर्तबगारीवर पंतप्रधानपदाच्या उमेद्वारीपर्यन्त पोहोचलाय. अशा माणसाने काय म्हणुन या असल्या सोम्या आणि गोम्याना प्रतिसाद द्यावा ?? त्या सोम्या आणि गोम्यानी पाडलेला प्रकाश दाखव आणि नंतर चर्चेचे आव्हान कर. अरे तुझा तो साळ्सूदपणाचा आव आणणारा भम्पक गोम्या धड दोन महीने दिल्लीचे राज्य चालवु शकला नाही आणि म्हणे मी देश चालवणार, लोकांच्या डोक्यावर टोपी घालणे आणि रस्त्यावर घोळ्क्याने किंचाळण्याइतके सोपे आहे का ते ??? त्याची दहा वर्षाची तथाकथीत समाजसेवा इथे ठळकपणे व विस्ताराने समोर मांडता येइल का तुला ??? आणि तो दुसरा तुझा सोम्या कधी आणि कोणती निवड्णुक लढवुन मुख्यमंत्री झाला सांगशिल का ??? आता पडला का प्रकाश..!!!! ग्रेट........नान्या ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 03/27/2014 - 12:31 नवीन
महाराष्ट्राला दुष्काळनिवारणासाठी दिलेल्या मोफत मदतीच्या वचनातुन पळ काढणे व मदतीचे पैसे मागणे
हे उत्तम करते आहे गुजरात सरकार. सगळे २२ कोटी महराश्ट्राच्या सत्ताधीशांचा कार्यकर्त्यांनी लुटुन खाल्ले. परत द्या ते पैसे गुजराथ ला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
ब
बॅटमॅन Wed, 03/26/2014 - 13:21 नवीन
लालू सुद्धा डॉक्टरेट आहे, राहुल सुद्धा एम फिल आहे (म्हणे)!
बाकी काही असो पण राहुल अन लालूची तुलना केजरीवाल अन पृथ्वीराज चव्हाणांबरोबर करणे काही पटले नाही. हा फक्त वादासाठी वाद झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सव्यसाची Wed, 03/26/2014 - 14:23 नवीन
पृथ्वीराज चव्हाण आणि अरविंद केजरीवाल यांच्या शिक्षणाचा मुद्दा गुरुजीनी काढला नव्हता. मला वाटते अश्या अतार्किक मुद्द्यावर असेच अतार्किक उत्तर बरे असते. :-) बाकी शिक्षण लई झाले म्हणून तो चांगला मुख्यमंत्री हे काही पटले नाही बुवा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 03/26/2014 - 15:39 नवीन
हम्म तेही आहेच म्हणा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
प
प्रदीप Wed, 03/26/2014 - 14:44 नवीन
राहुल सुद्धा एम फिल आहे
छे! छे! एजन्सी फ्रान्स प्रेस (AFP) ची बातमी, ५ मार्चच्या अंकात आमच्या येथील इंग्रजी दैनिकाने छापली होती. त्यातून उर्ध्रुत करतो. बातमी मोदी व राहूल ह्यांच्याविषयी आहे. "One is a former tea boy, the other a Harvard and Cambridge-educated scion of India's biggest political dynasty" पुढे... "Often portrayed as a reluctant leader, he [राहूल गांधी] gave up a business career to enter politics".... आहात कुठे!! राहूल गांधी चुकून सत्तेवर आलाच तर तो थेट चंद्रावरून शिक्षण घेऊन आला आहे, आणि शुक्रावर अथव थेट सूर्यावरच त्याचा बिझीनेस होता तो सोड्न भारतातील गरीब बिचार्‍या जनतेचा उद्धार करण्यासाठी तो आता पृथ्वीतलावर अवतरला आहे, असे वाचावयास मिळेल ह्याची खात्री बाळगावी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 03/30/2014 - 05:42 नवीन
अजाण व्यक्तीला थातुरमातुर दिलासा देऊनच वाटेला लावायचे असते. ज्ञानी व्यक्ती अज्ञानी व्यक्तिंबरोबर वादविवादात व्यर्थ वेळ घालवत नाहीत.
+१०० मुर्खांशी वाद घालण्यात अर्थ नसतो, ते तुम्हाला त्यांच्या पातळीवर आणुन ठेवतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विकास Wed, 03/26/2014 - 14:54 नवीन
केवळ फॉर दी रेकॉर्ड दुरुस्ती: दुसरे केजरीवाल IIT तुन M tech झालेले, यांच्यापूढे आपला काही टिकाव लागणार नाही. केजरीवाल हे B.Tech. आहेत, M.Tech. नाहीत. मोदी पॉलीटीकल सायन्स मध्ये MA - Gujarat University, Ahmedabad आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
ब
बंडा मामा Wed, 03/26/2014 - 19:21 नवीन
तिथेच तर फरक आहे. MA - Gujarat University आणि B.Tech from IIT पण ते जाऊ दे.. केजरीवाल हुशार आहेत हे त्यांचे कट्टर विरोधकही मान्य करतात. आणि मोदी तितके तल्लख नाहीत हे त्यांचे समर्थकही मान्य करतात. त्यांचे इंग्रजी भाषण ऐकले नाहीत का कधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Wed, 03/26/2014 - 19:34 नवीन
तिथेच तर फरक आहे. MA - Gujarat University आणि B.Tech from IIT हा एक नवजातीयवाद आहे असे म्हणायचे का? बाय द वे, मोदींनी पॉलीटिकल सायन्स मधे मास्टर्स केले आणि त्यातच ते पुढे आहेत. मात्र दिल्लीहून पळायची सुरवात केजरीवाल यांनी आय आय टी नंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंट मधे जाऊन केली. कदाचीत तिथे पण जमले नसावे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा
ब
बंडा मामा Wed, 03/26/2014 - 21:51 नवीन
नव/जुना जातियवाद इथे कुठुन आला? IIT मधून बी टेक करायला आणि गुजरात युनिवर्सिटी मधुन आर्ट्सची डिग्री घ्यायला एकच कॅलीबर लागते असे तुमचे मत आहे का? तरीही मी जाऊ दे म्हणालो होतो. शिक्षण कुठून का घेतले असेना हुशारी कुणाकडेही असू शकते. त्यासाठीच मी केजरीवालचे उदाहरण दिले होते. उदा, हा विडीयो बघा: मोदींनी पळ काढला वगैरे तर सोडून द्या, किती बत्थड सारखी मक्ख चेहर्याने उत्तरे देत होते मोदी ते पाहा. हा माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान व्हावा असे कसलेही तेज/बुद्धीमत्ता मोदींच्यात दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा