Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न झाले होते काय ?

ब
बबन ताम्बे
Mon, 09/22/2014 - 16:31
🗣 160 प्रतिसाद
नुकताच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या तुळापुरला भेट देवून आलो. तसेच "छावा" कादंबरी आणि अजून एक चरित्र पण वाचून काढले. एका प्रश्नाचे अजून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी काही प्रयत्न केले होते की नाही या प्रश्नाचे. संभाजी महाराजांना कोकणात संगमेश्वरला मुघलांनी पकडले आणि तिथून तुळापुरला आणले. संगमेश्वर ते तुळापुर अंतर जवळ्जवळ ३०० कि.मी. आहे. त्यावेळची वहातुकीची साधने लक्षात घेता आणि बंदोबस्तात आणण्यासाठीचा खटाटोप बघता तुळापुरला महाराजांना आणण्यास बरेच दिवस लागले असतील. तर या दरम्यान संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी प्रयत्न केल्याचे उल्लेख असलेले कुठले पुस्तक/कागदपत्रे आहेत काय? संभाजी महाराजांना नेत असताना मराठ्यांनी मुघलांच्या सैन्यावर हल्ला करुन राजांची सुटका करायचा प्रयत्न केला होता काय? काय झाले त्या प्रयत्नांचे?

प्रतिक्रिया द्या
99132 वाचन

💬 प्रतिसाद (160)
प
प्रचेतस Mon, 09/22/2014 - 18:56 नवीन
संभाजी महाराजांना नेत असताना मराठ्यांनी मुघलांच्या सैन्यावर हल्ला करुन राजांची सुटका करायचा प्रयत्न केला होता काय?
ऐतिहासिक साधनांत त्याचे उल्लेख नाहीत. संभाजीराजांना पकडून आणल्याचे उल्लेख समकालीन पुराव्यांत बहुत करून फारसी साधनांतले आहेत. मराठी साधनांतील उल्लेख हे तदनंतरच्या राजाराम महाराजांच्या कालखंडांतील बखरींमध्ये आले आहेत. उल्लेख जास्ती नसल्याचे प्रमुख कारण म्हणजे मुघलांची तेव्हा कोल्हापूरपर्यंत फौज असून तिथे छावणीच केली होती शिवाय पन्हाळा आणि खेळण्याला मोर्चे लावले होते. अडचणीची बाब होती ती कोल्हापूरपासून संगमेश्वरपर्यंत जाण्याची. ह्या वाटेत निबीड अरण्ये, दुर्गम घाटवाटा, खोल दर्‍या असे अडथळे होते. हा प्रदेश शिर्क्यांचा. इथेच गणोजी शिर्क्याने मुकर्रबखानास वाट दाखवली. खानाने राजांवर अचानक झडप घातली. यावेळी राजांजवळ फारसे सैन्य नव्हते. तशाही स्थितीत राजे संगमेश्वराजवळच्या नावडी गावात मुंडण करून व वेष पालटून लपून बसले. तिथेही लढाई होऊन राजांचे सेनापती म्हाळोजीराजे घोरपडे कामी आले. खानाने राजांच्या पायांतील सोन्याच्या तोड्यांवरून राजांस ओळखले व तसेच मळेघाट चढून कोल्हापूर गाठले. हा वघड टप्पा खानाने केवळ २/३ दिवसांत पार केला. पुढे कोल्हापूरला मुघलांची मोठी फौज असल्याने मराठा सैन्याला राजांना सोडवण्याचा प्रयत्न करता आला नाही. ह्याच वेळी खुद्द रायगडालाही झुल्फिकारखानाने मोर्चे लावले होते. कोल्हापूरला पोचल्यानंतरही खानाने फौजेला लगेच पुढची चाल देत बहादुरगड गाठला व पुढचा दुर्दैवी प्रकार घडला.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 09/23/2014 - 05:31 नवीन
खूप छान माहीती वल्लीशेठ. अजुन वाचायला आवडेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 09/23/2014 - 06:10 नवीन
घरच्याच भेद्यांचा मराठी माणसाला शाप आहे. अजिबात खोटे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मोगा Wed, 12/09/2015 - 11:06 नवीन
आणि महाराजांच्या मृत्युबद्दल बोंब मात्र औरंगजेबाच्या नावाने मारतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 12/09/2015 - 17:47 नवीन
तेच ना औरंगजेबाने प्रेमळ पित्याप्रमाणे संभाजीराजांचा सांभाळ केला. त्यांच्या दासीपुत्रांना मोठ्या मानाने इस्लाम मधे स्थान दिले. राजांच्या दासींपासून झालेल्या कन्यांचे निकाह मुसलमान मुलांबरोबर मोठ्या सन्मानाने आणि आजाच्या मायेने लावले. हो ना! मोगली मोगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
म
मोगा गुरुवार, 12/10/2015 - 01:59 नवीन
नायतर ते पुण्याचे भंपक पेशवे ! इस्टेटीत वाटणी टाळायला मस्तानीच्या मुलाला हिंदू ब्राह्मण्मानले नाही... अगदी म्हाभारताचाच कित्ता गिरवला. हिडिंबापुत्राला क्षत्रिय राजकुमाराचा दर्जा दिला नाही. पण लढाईच्यावेळेला मात्र पानपतावर समशेरबहाद्दूर आणि कुरुक्षेत्रावर घटोत्कच लढायला आणि मरायला पुढे ! ... पेशव्याचा ब्राह्मण वंश खुंटला व फक्त मस्तानीचा मुसुलमान वंश आजही सुरु आहे , असे ऐकले , खरे आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
अ
अर्धवटराव गुरुवार, 12/10/2015 - 03:00 नवीन
स्वतः औरंगजेब आणि त्याची मुलं आपापल्या भावंडांना इस्टेटीचा न्याय्य वाटा मिळावा म्हणुन उपोषणाला बसली होती हा इतीहास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
म
मोगा गुरुवार, 12/10/2015 - 04:46 नवीन
इस्टेटीसाठी खुले आम द्वंद्व खेळ्णं हे तर सर्वच राजा / पुत्राना अलाउड होतं - सर्वच धर्माच्या ! पण कर्तव्य / धर्म असली भुतं उभी करून कुणाला बिनल्ग्नाचा ठे, कुणाला जंगलात पाठव , कुणाची मुंजच नाकार ... असे करणारे दांभिक तत्वद्नान आम्हाला तरी आवडत नाही. .... ते काही का असेना , मस्तानी मुसलमान होती म्हणून आज बाजीरावाचा मूळ अंश शिल्लक आहे , हे वास्तव आहे. ती किंवा तिचा अंश हिंदू झाला असता तर कदाचित गृहकलहात त्याचाही नारायणराव झाला असता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
P
pacificready गुरुवार, 12/10/2015 - 05:33 नवीन
खुले आम द्वंद्व मध्ये विषप्रयोग,अटक 'अल्लोवेद' आहे हे ठाऊक नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
म
मोगा गुरुवार, 12/10/2015 - 05:49 नवीन
चाणक्यनीती , कणिकनीती , लाक्षागृह , वालीवध वगैरे वाचून मग सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready
P
pacificready गुरुवार, 12/10/2015 - 06:48 नवीन
हे सगळे आता नाकारायचे असं ठरलंय ना तुमचं? तुम्ही तिकडे जाणार असं गेली साडेतीन युगं ऐकतोय. तिकडे काय better package आहे ते सांगा की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
अ
अर्धवटराव गुरुवार, 12/10/2015 - 06:36 नवीन
सर्व जग एकाच रंगात रंगवावे, आणि कोणि ऐकत नसल्यास सरळ रक्ताचा लाल रंग फासावा... हे कर्तव्य कित्ती उदात्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/10/2015 - 07:45 नवीन
@तिचा अंश हिंदू झाला असता तर कदाचित गृहकलहात त्याचाही नारायणराव झाला असता !>> आणि आता कशावरूण अली...हस्सन्/हुस्सेन होणार नाही म्हणे!? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 12/10/2015 - 13:17 नवीन
हो का मोगा! मग सगळ्यांना इस्टेटीत वाटा मिळाला का त्या मुसलमान सरदारांच्या घरात का बेदखल केले गेले? तुमच्याकडे प्रेमळ औरंगजेबाने रेकॉर्ड दिले असेलच ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
ह
हेमंत लाटकर गुरुवार, 12/10/2015 - 14:23 नवीन
नायतर ते पुण्याचे भंपक पेशवे
मोगॅम्बो, पेशवे भंपक. बाळाजी विश्वनाथांनी व पहिल्या बाजीरावांनी आपल्या पराक्रम व बुद्धिने शिवाजीराजांचे साम्राज्य दिल्लीपर्यंत वाढविले. मस्तानीला बाजीरावांच्या आई गोपिकाबाईचा जास्त विरोध होता. बाजीरावांनंतर नानासाहेबांनाच पेशवेपद मिळाले असते. समशेरबहाद्दरला पेशवेपद कसे काय मिळेल. जेष्ठ पुत्र नानासाहेब असतांना. पानिपतमध्ये झालेले मराठ्यांचे नुकसान माधवराव पेशवेंनी आपल्या 10 वर्षाच्या कारर्कीदित भरून काढले. माधवरावानंतर पेशव्यांमध्ये पराक्रमी व बुद्धिवान पेशवा नसल्यामुळे तसेच सरदारांच्या वतनाच्या हव्यासापायी मराठ्यांच्या साम्राज्याची अधोगती सुरू झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
स
सर्वसाक्षी Tue, 09/23/2014 - 06:31 नवीन
नवीन माहिती मिळाली. हे गणोजी शिर्के म्हणजे महाराणी येसुबाईंचे बंधु का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 09/23/2014 - 06:34 नवीन
हो. तेच ते. शिवाजी राजांना यांना तुमच्या पुत्रास वतन देऊ असे म्हणून वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. शिवाजी राजेंच्या मृत्युनंतर ह्यांची वतनाची लालसा परत जागृत झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
ब
बबन ताम्बे Tue, 09/23/2014 - 07:49 नवीन
छान माहीती. एक मात्र खरे की अनेक गोष्टी इतिहासाला अजून अज्ञात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पिंपातला उंदीर Tue, 09/23/2014 - 05:47 नवीन
या विषयावर संजय सोनवणी यांची त्यांच्या फेबु खात्यावर एक मोठी अभ्यासपूर्ण पोस्ट आहे . त्याचा सार असा की महाराजांच्या सुटकेचे पुरेसे प्रयत्न झाले नाहीत आणि मंत्री मंडळाकडे तेवढी इच्छाशक्ती पण नवती . इच्छुकांनी ती पोस्ट शोधावी
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 06:42 नवीन
अमोलजी, तुम्हाला या विषयात इंटरेस्ट दिसतोय. आगे बढो... तेंव्हा खूप वाचा, खूप विचार करा... इतिहासाचे अभ्यासक कुरंदकर, शेजवलकर आणि इत्यादिंचे विचार वाचा... केवळ इंटरनेटवर ब्लॉग उपलब्ध आहे म्हणुन सोनवणींसारख्यांचे लिखाण वाचून आपले मत बनवू नका हो! हे कळकळीने सांगतोय!! याउप्पर तुमची मर्जी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पिंपातला उंदीर Tue, 09/23/2014 - 06:44 नवीन
नक्कि साहेब .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
क
कवितानागेश Tue, 09/23/2014 - 06:19 नवीन
आपले मालोजीराजे कुठे गेले? त्यांचापण आभ्यास आहे ना?
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Wed, 12/09/2015 - 16:53 नवीन
थोर इतिहासकार सोनवणी म्हणतात "युद्ध झाले नाही. किरकोळ चकमक झाली. ती देखाव्यापुरती असु शकेल"...अर्थात हि त्यांच्या अकलेची दिवाळखोरी आहे. मोगलाकडील साकी मुस्तैद,खाफीखान,मनुची व शहाजीराजे कैफियत मात्र संगमेश्वरी लढाई झाली,ति देखिल संभाजीराजे याना खानाची बातमी कळताच पुढे येऊन खानास संभाजीराजे,कवी कलश,सरनौबत मालोजी घोरपडे,संताजी घोरपडे आदिनी चढाई केली व धुमश्चक्री सुरु झाली,,परंतु या धुमश्चक्रीत सरनौबत पडले,कवी कलश जखमी झाले व मोगल सैन्य संख्येने जास्त होते,आणी संभाजीराजे यानाच पकडण्याचे आदेश होते,त्यामुळे मोगल सैन्यानी महाराज व कलश हे हाती लागताच तेथुन निसटले,यातुन संताजी व इतर सैन्य माघे राहिले ते वरकड रायगडी गेले,परंतु पळुन गेले असा अस्सल साधनात कुठेच उल्लेख नाही, तसेच संभाजी महाराजासमवेत सरनौबत मालोजी,कवी कलश,संताजी,आदी सह फक्त थोडकेच सैन्यच होते,व मोगल मात्र संख्येने जास्त होते.त्यामुळे बळ कमी पडले,परंतु लढाई झाली असे समकालीन सर्व इतिहासकारानी नोंद करुन ठेवलेले आहे संभाजीराजे अप्रिय असते तर त्यांची फौज औरंगजेबाला एवढी जड गेली असती का? त्रयस्थ व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया पहा १३ नोहेंबर १६८८ ला इंग्रज अधिकार्याने इंग्लंड ला हिंदुस्तान च्या अस्थिर स्थितीबद्दल कळवले तो म्हणतो "दक्खनेतील स्थिती अस्थिर झाली आहे सर्व मोगली ठाणी,किल्ले यांची व्यवस्था बिघडली आहे. मराठ्यांनी किल्ले मजबूत ठेवून परतीचे हल्ले केले आहेत. अनेक ठिकाणी आपल्या प्रदेशात त्यांनी मोगलांचा पराभव केला आहे. जंजिरा ते पोर्ट नोव्हा चा प्रदेश अजूनही संभाजीच्या सैन्याकडे आहे" संभाजीराजे अप्रिय झाले होते म्हणून त्यांना मोगलाकडून सोडण्यास कोणी गेले नाही हे तुणतुणे पुनःपुन्हा वाजवणाय्रांनी शंभूराजे सतत नऊ वर्षे अहोरात्र औरंगजेबाच्या अफाट फौजेविरूढ लढले ते जनमानसाच्या आणि सैन्याच्या पाठिंब्याशिवाय काय ? संभाजीराजांच्या हत्येनंतर चवताळून उठलेल्या मराठ्यांनी ठिकठिकाणी मोगली छाव्णायांवर हल्ले केले, रायगड पायथा,कराड, फलटण येथे मोगलांना पराभूत केले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
ध
धन्या Tue, 09/23/2014 - 06:52 नवीन
डॉ. कमल गोखले यांनीं शंभूराजांवर "शिवपुत्र संभाजी" नावाचा अप्रतिम ग्रंथ लिहीला आहे.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Tue, 09/23/2014 - 07:41 नवीन
पुढच्या महिन्यात ५ तारखेला मुंबईत असला तर पार्ल्याला एक पूर्ण दिवसाचा अभ्यासवर्ग आहे.... सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील :) Image removed.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Tue, 09/23/2014 - 07:43 नवीन
सभागृहातील आसन संख्या (केवळ १५०) मर्यादित असल्याने या परीपत्रकाद्वारे आपणास सुचित करण्यात येत आहे की आपण खालील व्यक्तींशी लवकरात लवकर संपर्क साधून आपली नावनोंदणी आणि जागा निश्चित करावी हे विनंती. वि.सु. : कार्यक्रमाचे वेळापत्रक आणि विषय सोबत जोडले आहेत. पराग लिमये ...(अंधेरी/ विलेपारले) ९९८७५६५७३८ अमोल मांडके ...(कांजुरमार्ग आणि दादर) ९००४६५७६६३ संजय तळेकर ...(चारकोप आणि बोरीवली) ९८२०२३८१७७
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले
ख
खटपट्या Tue, 09/23/2014 - 07:51 नवीन
अरेरे !! एवढ्या सुन्दर कार्यक्रमाला मुकणार !! तुनळीवर चित्रिकरण पाह्ता येइल अशी आशा करतो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले
स
सुहास झेले Tue, 09/23/2014 - 07:59 नवीन
तिथे ते अपलोड होत नाही, पण काही आठवड्यात कार्यक्रमाची डीव्हीडी विक्रीसाठी उपलब्ध होते (रुपये १५०)...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Tue, 09/23/2014 - 08:04 नवीन
ओके. पण आता ही डीवीडी मिळवायची कशी ?? आमी हाव देशाबाहेर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले
क
काळा पहाड Tue, 09/23/2014 - 10:26 नवीन
आमाला पण डिवीडी विकत घेता येईल का? कुठे मिळेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
स
सुहास झेले Tue, 09/23/2014 - 11:06 नवीन
जनसेवा समितीचुया कार्यक्रम असेल तेव्हा त्या विक्रीला ठेवल्या जातात... मी सांगेन उपलब्ध झाल्यावर. हव्या असतील तर एक कॉपी पाठवून पण देईन... काळजी नसावी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ब
बबन ताम्बे Tue, 09/23/2014 - 07:52 नवीन
छान उपक्रम आहे. पुण्याला असा कार्यक्रम झाला तर जरूर हजेरी लावू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 09/23/2014 - 11:17 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
द
दिपक.कुवेत Tue, 09/23/2014 - 13:41 नवीन
उपक्रमाला का कार्यक्रम पुण्याला झाला तर?? पळा आता....एक्का साहेब आले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
द
दुश्यन्त Tue, 09/23/2014 - 12:24 नवीन
श्री संजय सोणवणी यांनी याआधीच ही शंका आणि त्याला पूरक असे लेखन करून ठेवले आहे. नेटवर शोधल्यास मिळू शकेल. सोयराबाई यांची महत्वाकांक्षा (आपला मुलगा राजाराम छत्रपती व्हावा) आणि त्याना इतर दरबारी /सरदार यांची साथ होती. अंतर्गत राजकारणामुळे संभाजी महाराजांची सुटका होऊ शकली नाही. संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न जाणेवपूर्वक झाले नाहीत यासाठी सोयराबाई-राजाराम यांच्या बाजूच्या सर्व सरदार/ दरबारी यांची मान्यता होती असे मानायला वाव आहे.
  • Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे Tue, 09/23/2014 - 12:31 नवीन
सहमत,इतिहास अभ्यासक संजय सोनवणींचा हा तर्क योग्य वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
प
प्रचेतस Tue, 09/23/2014 - 13:04 नवीन
खिक्क्क... विषप्रयोगानंतरच्या दुसऱ्या कटानंतर राजांनी सोयराबाईंना नजरकैदेत ठेवले होते. त्यातच त्यांच्या मृत्यु झाला. (१६८३/८४) मग सोयराबाईसाहेबांनी राजांना कैदेतून सोडवायला जाण्याचा प्रश्नच कुठे येतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
म
मृत्युन्जय Tue, 09/23/2014 - 13:23 नवीन
:). असले इतिहास अभ्यासक असले की प्रश्नच मिटला. एकुणात गण्याने फसवले, भावाने वार्‍यावर सोडले पण तरीही दोष मात्र इतरांचा असा काहिसा काही थोर इतिहास तोडफोड्यांचा दावा आहे आणि जो पुर्णपणे मुर्खपणाचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
न
नानासाहेब नेफळे Tue, 09/23/2014 - 13:33 नवीन
कुणीतरी स्वतःला शाहीर म्हणवायचे, भाटगिरी करणारे त्यांना इतिहासकार म्हणणार. त्यापेक्षा इतिहास अभ्यासक म्हणवुन घेणारे निदान तत्वाशी तरी प्रामाणिक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रचेतस Tue, 09/23/2014 - 13:40 नवीन
बाकी तुम्ही मुद्द्यांचा प्रतिवाद न करता इतरांवर लांच्छन लावण्यात पटाईत आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
अ
अर्धवटराव Tue, 09/23/2014 - 14:04 नवीन
तसंही महाराष्ट्रात निवडणुक तारीख जाहीर झाली आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
म
मृत्युन्जय Wed, 09/24/2014 - 07:22 नवीन
आमच्या गल्लीतला दुसरीतला शेंबडीचा पोरगा सुद्धा इतिहासाचे पुस्तक वाचताना स्वत:ला इतिहास अभ्यासक म्हणवुन घेतो. हे नव इतिहासवादी आणि तो पोरगा यांमध्ये फारसा फरक नाही हे नम्रपणे नमूद करु इच्छितो. बाकी सध्या भाटांची संख्या वाढली आहे हे मात्र खरे. अवांतरः तत्वाशी प्रामाणिक तर हिटलर सुद्धा होताच की. तत्व चुकीचे होते ही गोष्ट वेगळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Wed, 09/24/2014 - 08:18 नवीन
शिवचरीत्र हा ज्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे अशा लोकांनी केलेल्या कल्पनाविलासाला खरा इतिहास माणणारे गणंग मागच्या शंभर वर्षात जन्मले हे महाराष्ट्राचे दुर्देव. अशा लोकांपेक्षा नवइतिहासवादी परवडले, ते निदान जाहिर चर्चेची तयारी दाखवतात व ज्यांनी सो कॉल्ड इतिहासासाठी आयुष्य वेचलेले आहे ते जाहिर चर्चा आणि शासनाच्या समितीतूनही कसा पळ काढतात हे लोकांनी पाहीले आहे. (आजकाल या दांभिक लोकांना त्यांचेच अनुयायी क्रिटीकली घ्यायला लागलेत हेहीनसेथोडके)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Wed, 09/24/2014 - 08:51 नवीन
शिवचरित्राशी ज्यांचा काहिच संबंध नाही असे जातीय विद्वेष पसरवणारे लोक स्वतःला इतिहास अभ्यासक म्हणवुन घ्यायला लागले तेव्हापासुन महाराष्ट्राचा सांस्कृतिक दर्जा इतका घसरला आहे की त्यानंतर इतिहास संशोधन आणि अभ्यासाची व्याख्याच बदलली. सरस्वतीची मुर्ती फोडणारे, त्यांना ७२ बहाद्दर म्हणुन संबोधणारे आणि दंग्याधोप्यांना स्वतःची ओळख बनवणारे नतद्रष्ट लोक आणि त्यांनी पोसलेले सो कॉल्ड अभ्यासक आणि या सर्वांना पाठीशी घालणारे राजकारणी असल्यावर शासकीत समित्यांमध्ये राहुन माती खाण्यापेक्षा त्यापासुन ४ हात दूर राहिलेलेच बरे. अवांतरः आईन्स्टाइन म्हणे सगळ्या जर्मन शासन पुरस्कृत शासकीय समित्यांपासुन नेहमीचे दूर राहिला. अण्वस्त्रे निर्बुद्ध लोकांच्या हाती लागण्याला त्याचा असलेला कडाडुन विरोध त्याने शासनाला सहकार्य न करुन जाहिर केला. थोडे वेगळे उदाहरण आहे. पण बघा त्यातुन काही बोध घेता आला तर,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
क
काळा पहाड Wed, 09/24/2014 - 09:03 नवीन
अशा लोकांमुळं फारसं नुकसान होणार नाही असं बर्‍याच जणांना वाटतं. पण पहा नायजेरिया, सोमालिया इत्यादी देशांकडे. देश किती खाली जाऊ शकतो याची हे देश उदाहरणे आहेत. या लोकांचं असंच चालू दिलं तर हा देश सुद्धा तिथेच पोचेल. आणि त्याची या लोकांना ना खंत असेल ना खेद. वर आणि समतेसाठी सर्व समाजाला या पातळीवर आणणं गरजेचं होतं वगैरे जातीयवादी पोपटपंची पण बोबड्याकडून ऐकावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ब
बबन ताम्बे Wed, 09/24/2014 - 09:05 नवीन
क्रुपया धाग्याचा विषय कोण इतिहास संशोधक आहे अथवा नाही हा नाहीय. आम्हा पामरांच्या ज्ञानात काही भर पडेल या हेतूने हा धागा लिहीला आहे. आपल्या जवळ धाग्यातील विषयाला धरून काही माहीती असेल तर क्रुपया आमच्या ज्ञानात भर घालणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ट
टवाळ कार्टा Wed, 09/24/2014 - 09:12 नवीन
पण बघा त्यातुन काही बोध घेता आला तर
फारच अपेक्षा तुम्हाला :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/25/2014 - 08:34 नवीन
>>> शिवचरित्राशी ज्यांचा काहिच संबंध नाही असे जातीय विद्वेष पसरवणारे लोक स्वतःला इतिहास अभ्यासक म्हणवुन घ्यायला लागले तेव्हापासुन महाराष्ट्राचा सांस्कृतिक दर्जा इतका घसरला आहे की त्यानंतर इतिहास संशोधन आणि अभ्यासाची व्याख्याच बदलली. सरस्वतीची मुर्ती फोडणारे, त्यांना ७२ बहाद्दर म्हणुन संबोधणारे आणि दंग्याधोप्यांना स्वतःची ओळख बनवणारे नतद्रष्ट लोक आणि त्यांनी पोसलेले सो कॉल्ड अभ्यासक आणि या सर्वांना पाठीशी घालणारे राजकारणी असल्यावर शासकीत समित्यांमध्ये राहुन माती खाण्यापेक्षा त्यापासुन ४ हात दूर राहिलेलेच बरे. + १ नानांनी पुन्हा एकदा माती खाल्ली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/25/2014 - 08:32 नवीन
>>> शिवचरीत्र हा ज्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे अशा लोकांनी केलेल्या कल्पनाविलासाला खरा इतिहास माणणारे गणंग मागच्या शंभर वर्षात जन्मले हे महाराष्ट्राचे दुर्देव. अशा लोकांपेक्षा नवइतिहासवादी परवडले, ते निदान जाहिर चर्चेची तयारी दाखवतात व ज्यांनी सो कॉल्ड इतिहासासाठी आयुष्य वेचलेले आहे ते जाहिर चर्चा आणि शासनाच्या समितीतूनही कसा पळ काढतात हे लोकांनी पाहीले आहे. खंडणी, दांडगाई, दंगेधोपे, जातीय विद्वेष पसरवून समाजात दुफळी माजविणे हा ज्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे अशा लोकांनी केलेल्या किळसवाण्या कल्पनाविलासाला खरा इतिहास माणणारे गणंग २०-२५ वर्षात जन्मले हे निव्वळ महाराष्ट्राचेच नव्हे तर सर्व महान ऐतिहासिक व्यक्तींचे दुर्देव. आपल्याच पक्षाचे सत्ताधारी असल्याने व सर्व सत्तास्थानावर आपलेच जातभाई असल्याने हे नवइतिहासकार शासकीय मान्यताप्राप्त कसे होतात व त्यांच्या गलिच्छ व असत्य बरळण्याला शासन कशी मान्यता देते हे लोकांनी पाहीले आहे. बादवे, खंडणी, भ्रष्टाचार, दांडगाई इ. व्यवसायांवर आपले पोट भरण्यापेक्षा जनतेला शिवचरीत्र सांगून पोट भरणे कितीतरी चांगले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 08:58 नवीन
शिवरायांच्या नावे पक्ष चालवणारे दांडगाई दंगेधोपे खंडण्या उकळत नाहीत असा समज झाला आहे काय? शिवचरित्र सांगुन पोट भरणे गैर नसावे, पण खोटे शिवचरित्र सांगून फसवणे गैर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा