Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न झाले होते काय ?

ब
बबन ताम्बे
Mon, 09/22/2014 - 16:31
🗣 160 प्रतिसाद
नुकताच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या तुळापुरला भेट देवून आलो. तसेच "छावा" कादंबरी आणि अजून एक चरित्र पण वाचून काढले. एका प्रश्नाचे अजून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी काही प्रयत्न केले होते की नाही या प्रश्नाचे. संभाजी महाराजांना कोकणात संगमेश्वरला मुघलांनी पकडले आणि तिथून तुळापुरला आणले. संगमेश्वर ते तुळापुर अंतर जवळ्जवळ ३०० कि.मी. आहे. त्यावेळची वहातुकीची साधने लक्षात घेता आणि बंदोबस्तात आणण्यासाठीचा खटाटोप बघता तुळापुरला महाराजांना आणण्यास बरेच दिवस लागले असतील. तर या दरम्यान संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी प्रयत्न केल्याचे उल्लेख असलेले कुठले पुस्तक/कागदपत्रे आहेत काय? संभाजी महाराजांना नेत असताना मराठ्यांनी मुघलांच्या सैन्यावर हल्ला करुन राजांची सुटका करायचा प्रयत्न केला होता काय? काय झाले त्या प्रयत्नांचे?

प्रतिक्रिया द्या
99132 वाचन

💬 प्रतिसाद (160)
क
काळा पहाड Tue, 09/23/2014 - 20:04 नवीन
असं खोटंनाटं सर्वधर्मसमभावाविरूद्द लिहिल्याबद्दल निषेध!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
न
नानासाहेब नेफळे Tue, 09/23/2014 - 20:11 नवीन
इतिहास या विषयावर कथाकादंबरीकार त्यांच्या साहीत्यात कल्पनाविलास करत असतात, त्याला खरा इतिहास समजणे हे बालिशपणाचे लक्षण आहे. राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या राजसंन्यास या नाटकात वाघ्या कुत्र्याचं काल्पनिक पात्र घुसडले, पूढे तोच इतिहास लोक खरे मानायला लागले. शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत एका प्रसिद्ध नाटकात अनेक कल्पनाविलास केले गेले आहेत ,परंतु बरेच लोक त्याला खरा इतिहास मानतात हे दुर्दैव आहे आणि या असल्या मुर्खपणावर आक्षेप घेणार्यांना मुर्खात काढण्याचा महामुर्खपणाही सुप्त धार्मिक अस्मितेच्या नावाखाली चालू असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
प
प्रचेतस Tue, 09/23/2014 - 20:18 नवीन
नेफ़ळ्यांशी अशतः सहमत. गडकर्‍यांनी राजसंन्यासमध्ये वाघ्या घुसडलं का नाही ते माहीत नाही पण इंदूरच्या होळकरांनी शिवाजी राजेंच्या समाधीचा जीर्णोद्धार करायला मदत केली तेव्हा त्यांच्या वाघ्या कुत्र्याचे स्मारक पण उभारले गेले असे काहीसे गोनीदांनी दुर्गभ्रमणगाथेत लिहिल्याचे आठवते. बाकी विश्वास पाटलांनी 'संभाजी' कादंबरीत बरेच लेखनस्वातंत्र्य घेतले आहे. मात्र औरंगजेबाने तेव्हा भौतेक किल्ल्यांना मोर्चे लावले होते हे नक्कीच खरे आहे. मात्र लोकांना हग्या दम दिला हे कल्पित असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
प
पैसा Tue, 09/23/2014 - 20:33 नवीन
http://www.misalpav.com/node/22418 या धाग्यावर वाघ्याबद्दल भरपूर चर्चा झाली आहे आणि त्यात नाना आणि जागोमोहनप्यारे यांचा भरपूर सहभाग होता. आता या धाग्यावर वाघ्याबद्दल लिहू नये. एकतर तो धागा वर काढा नायतर दुसरा धागा लिहा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मृत्युन्जय Wed, 09/24/2014 - 07:26 नवीन
त्या लेखातील खालील वाक्य वाचुन खुप मौज वाटली: य द वे, राष्ट्रवादीचे दोन पराक्रमी पुरुष -आदरणीय भुजबळसाहेब व तटकरेसाहेब यांच्याभोवती तूर्तास त्यांनी केलेल्या काही घोटाळ्याचा फास अडकू पहात आहे. त्यामुळे साहजिकच
जेव्हा जेव्हा राष्ट्रवादीवाले बर्‍यापैकी अडचणीत येऊ पहात असतात तेव्हा तेव्हा ते संभाजी ब्रिगेडला 'छ्छू.........' केले जाते आणि ती मंडळी जोमाने एक नवा पुरुषार्थ करायला सज्ज होतात..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ए
एस Wed, 09/24/2014 - 09:41 नवीन
एकतर तो धागा वर काढा नायतर दुसरा धागा लिहा!
वाचनमात्र झालेला धागा 'वर' कसा हो काढायचा पैअक्का? आम्ही काय सम्पाद्क हाय व्हयं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्यारे१ Wed, 09/24/2014 - 09:43 नवीन
संपादकीय मनमानीचा जाहीर निषेध ;) (माझा रात्रीचा प्रतिसाद पण उडालाय बहुतेक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
प
पैसा Wed, 09/24/2014 - 11:49 नवीन
मग दुसरा धागा काढा! हाकानाका! आणि प्यारेकाकांसारख्या जुन्या जाणत्या मिपाकराने इतके अवांतर केलेले पाहून एक मिपाकर म्हणून शरम वगैरे वगैरे.. ओ प्यारेकाका अवांतर करण्यासाठी दुसरे पेश्शल धागे आहेत की हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
अ
अतुल झोड Wed, 09/24/2014 - 12:13 नवीन
४० दिवस आता आपल्याला खूप वाटतात. पण त्या काळाचा विचार करता बातमी सगळ्या लोकांपर्यंत पोचेपर्यंतच संभाजीराजांना औरंगजेबाच्या ताब्यात दिले गेले. त्यामुळे इतर कोणालाही काही हालचाल करायला उसंत मिळाली नसावी. शिवाय औरंगझेबाचे सरदार महत्त्वाच्या किल्ल्यांना वेढे घालून बसले होतेच. त्यामुळे हल्ले करण्यासाठी जास्तीचे खडे सैन्यही उपलब्ध नसावे अशी शक्यता दिसते. हे उत्तर संयुक्तिक वाटते........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
न
नानासाहेब नेफळे Tue, 09/23/2014 - 14:07 नवीन
शिवाय ४० दिवस आता आपल्याला खूप वाटतात. पण त्या काळाचा विचार करता बातमी सगळ्या लोकांपर्यंत पोचेपर्यंतच संभाजीराजांना औरंगजेबाच्या ताब्यात दिले गेले. >> संयुक्तीक वाटते.
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Wed, 09/24/2014 - 08:02 नवीन
माझे मत असे आहे. कदाचित त्यावेळी निर्नायकी अवस्थेमुळे मराठे काही काळ भांबावले असतील. संभाजी राजे पकडले गेल्यानंतर शिवाजी राजांच्या तोडीचा कुणीही धुरंधर, मुत्सद्दी मराठमंडळात नव्हता. शिवाजी राजांचा इतिहास बघितला तर अशा संकट काळी त्यांनी शांत चित्ताने, मुत्सद्दीपणे आणि विचार् पुर्वक पावले उचलून शत्रूचा मुकाबला केला आणि राज्य राखले. अफजलखानासारख्या ताकदवार शत्रूचा खात्मा, पन्हाळ्यावरून सिद्धी जौहरच्या वेढ्यातून यशस्वी पलायन, आग्र्याहून औरंगजेबाच्या मगर मिठीतून सुटका या घटना शिवाजी राजांच्या अंगी असलेले अलौकीक गुण दर्शवितात. औरंगजेबाच्या अफाट फौजेची भिती मराठ्यांना नव्ह्ती. गनिमी काव्याने त्यांनी सतत मोगली फौजेला हैराण केले होते. त्यामुळे असे वाटते की शिवाजीराजां सारखा विचार करणारा एखादा धोरणी, मुत्सद्दी त्यावेळी कुणी असता, तर संभाजी राजांची कदाचित सुटका होऊ शकली असती. कदाचित प्रयत्न झालेही असतील. पण इतिहासाला ते अज्ञात आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अतुल झोड Wed, 09/24/2014 - 12:16 नवीन
शिवाजी राजांचा इतिहास बघितला तर अशा संकट काळी त्यांनी शांत चित्ताने, मुत्सद्दीपणे आणि विचार् पुर्वक पावले उचलून शत्रूचा मुकाबला केला आणि राज्य राखले. अफजलखानासारख्या ताकदवार शत्रूचा खात्मा, पन्हाळ्यावरून सिद्धी जौहरच्या वेढ्यातून यशस्वी पलायन, आग्र्याहून औरंगजेबाच्या मगर मिठीतून सुटका या घटना शिवाजी राजांच्या अंगी असलेले अलौकीक गुण दर्शवितात. तसेच पुष्कळ ठिकाणी मासाहेब जिजाऊ यांचे नेत्रुत्व (राजे नसतांना) पण होतेच ना.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ब
बबन ताम्बे Wed, 09/24/2014 - 12:26 नवीन
तसेच पुष्कळ ठिकाणी मासाहेब जिजाऊ यांचे नेत्रुत्व (राजे नसतांना) पण होतेच ना ! आपल्या या मताशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अतुल झोड
म
मना सज्जना गुरुवार, 09/25/2014 - 07:52 नवीन
नविन महिती मीलाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अतुल झोड
म
मनीषा गुरुवार, 09/25/2014 - 13:53 नवीन
असा धोरणी, मुत्सुदी असता तरी सुटका होऊ शकली नस्तीच बहुदा औरंगजेब चांगलाच धूर्तं होता . आग्र्याला गमावलेली संधी त्याने कदापीही हातची जाऊ दिली नसती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ब
बबन ताम्बे गुरुवार, 09/25/2014 - 14:03 नवीन
ना. स. ईनामदारांच्या कादंबरीत, (शहेनशहा) त्यांनी असे दाखवीलेय की शिवाजी महाराजांची सुटका पडद्यामागे राहून औरंगजेबानेच केली. त्यात त्याचे राजकारण होते. शिवाजी राजां सारख्या शूर योद्ध्याचा वापर (त्यांना मुघलांची सरदारकी देऊन) त्याला दक्षिणेत अदीलशाही, कुतुबशाही नष्ट करण्यासाठी करायचा होता. अर्थात कादंबरी प्रकाशित झाल्या नंतर ना. स. इनामदारांवर (या मताबाबत) टीका पण खूप झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
म
मनीषा गुरुवार, 09/25/2014 - 14:21 नवीन
हे नाविनच आहे . पण कादंबरी म्हणजे इतिहास नव्हे. आणि इनामदार इतिहास संशोधक नव्हतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ब
बबन ताम्बे गुरुवार, 09/25/2014 - 14:34 नवीन
ना.स.ईनामदारांनी महामहोपाध्याय द.वा.पोतदारांचा दाखला दिला होता असे वृत्तपत्रात वाचल्याचे आठवतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
प
प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 14:20 नवीन
माझ्या मते शिवाजी महाराजांनंतर (कदाचित आधी सुद्धा) आपल्याला त्यांच्या तोडीचा धूर्त नेता मिळालेला नाही. त्यांच्या बरोबर काम करणारांमध्ये सुद्धा असं कुणी पासंगाला पुरणारं देखील नव्हतं. अन्यथा एक सेनापती महाराज रागावल्यानंतर एक सेनापती अवघ्या सहा शिलेदारांबरोबर शत्रूवर तुटून पडला नसता. दुसरा सेनापती महाराज रागावले म्हणून सोडून गेला नसता. संभाजी राजांनी महाराजांकडून नुसता रागच घेतला होता का काय असं वाटतं. (वैयक्तिक मत आहे. कुणाच्याही कसल्याही भावना दुखावण्याचा कुठलाही हेतू नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 14:57 नवीन
औरंगजेबाचा हा इतका धुर्त पणा आणि संभाजीला पकडल्यावर लगेच मारुन टाकण्याची राजकीय समज्/स्वार्थ, आग्र्यात शिवाजी महाराज पकडले गेले तेंव्हा कुठे गेला होता हा प्रश्न मला नेहमीच पडत आलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
श
शिद गुरुवार, 09/25/2014 - 15:24 नवीन
मागच्या अनुभवांवरुन औंरगजेबानं धडा घेतला असेल व त्याची पुनरावॄत्ती टाळण्यासाठी लगेच शिक्षा केली असेल असं मला वाटतं. जाणकार काय तो प्रकाश टाकतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
थ
थॉर माणूस Fri, 09/26/2014 - 07:19 नवीन
सहमत... तोवर औरंगजेबाला मांडलिक करून किंवा इतर मार्गाने येऊन मिळालेल्या राजांकडून असे अनुभव नव्हते. ते आपले येउन मिळाले की उगाच प्राण जाय पर वचन ना जाय वगैरे मुर्खपणा उगाळत बसायचे. त्यामुळे आता शिवाजी आपल्या हाताखाली आलाय तर त्याला दक्षिणेत पाय रोवायला वापरून घेऊ असा विचार त्याच्या डोक्यात आला असावा. पण ऐन दरबारात शिवाजी महाराजांनी घातलेल्या गोंधळामुळे त्यांना नजरकैदेत टाकण्यात आले असावे (तेव्हाही महाराजांच्या कर्तुत्वावर त्याचा विश्वास असावा आणि आपण यांना आपल्या बाजूने वळवू अशी आशाही; नाहीतर राजांना तिथल्या तिथे शिक्षा होऊ शकली असती.) तसेच निव्वळ जयसिंगाने दिलेले वचन पाळण्यासाठी राजेंना मारण्यात आले नाही असेही म्हटले जाते. (स्थानबद्ध करून बरेच दिवस झाल्यावरही राजे बधत नाहीत म्हटल्यावर त्यांना ठार करण्यासाठी मारेकरी धाडण्याची योजना रचली जात आहे ही बातमी राजांना कळली आणि मग त्यांनी पळून जाण्याचे ठरवले असे कुठेतरी वाचले आहे.) अर्थात याविषयीचे संदर्भ माझ्यकडे नाहीत त्यामुळे जाणकारांनी खरे खोटे सांगेपर्यंत हे कयास आहेत असेच म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
च
चौथा कोनाडा Wed, 09/24/2014 - 08:05 नवीन
माहितीपुर्ण धागा ! आमच्या सारख्या साधारण माणसाना विचारात येणार नाही असा मुद्दा बबन ताम्बे यानी मांडला आहे. प्रतिसाद ही माहितीपुर्ण आहेत. या विषयावर अजून चर्चा वाचायला आवडेल.तुळापुर बद्दल अजून काही माहिती उपलब्ध आहे ?
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Wed, 09/24/2014 - 09:28 नवीन
चौथा कोनाडा साहेब, तुळापूर अतिशय रम्य ठिकाण आहे. संभाजी महाराजांची समाधी, तसेच तीन नद्यांचा संगम, अदिलशहाचा सरदार मुरार जगदेवने बांधलेले शिवमंदिर प्रेक्षणीय आहेत. पुणे-नगर हाय वे पासून अगदी जवळ आहे. जाऊन या एकदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
प
प्रचेतस Wed, 09/24/2014 - 16:45 नवीन
तुळापूरला समाधी नसून स्मारक आहे. समाधी वढू बुद्रूक येथे आहे. हे वढू बुद्रूक नदीचा पलीकडे. होडीने गेल्यास झटकन जाता येते मात्र गाडीरस्त्याने १५/२० किमी अंतर आहे. राजाचे डोळे मात्र पेडगावच्या बहादूरगडावर काढले. मात्र तेथून त्यांना कोरेगावी नेण्यत आले. राजांना तुळापूरलाच ठार मारले याचा पक्का पुरावा मिळत नाही. कदाचित तुळापूर अथवा वढू बुद्रूक ह्यापैकी कुठल्याही ठिकाणी ठार मारीले असावे मात्र वढू बुद्रूक येथे समाधी असल्याचे पुरावे आहेत. धनकवडीच्या कुळकर्णीच्या १७१९ सालच्या कागदपत्रांत पुढीलप्रमाणे उल्लेख आहे. पातशहा वढू कोरेगावी येथे येऊन मुक्काम केला. तेथून लष्कर पाठवून सिवाजी राजे पहिलेच गेले होते, त्याचा लेक संभाजी राजे आणिला आणि वढू कोरेगावात मारिला. मग त्याचा लेक शाहू राजा आणि बाईका आपल्या जालीत ठेविली. औरंगजेबाच्या मृत्युनंतर त्याचा वारसदार मुअज्जम अर्थात आझमशहाने शाहू राजांची कैदेतून सुटका केली. सुटून आल्यावर वढू बुद्रूक येथे त्यांनी संभाजी राजांचे वृंदावन बांधले. या संदर्भात पेशवे दफ्तरात पुढीलप्रमाणे मजकूर आहे. राजमंडळ वृंदावने: महाराज राजश्री कैलासवासी संभाजी राजे स्वामी. दर जागा मौजे वढू ता| पाबळ प्र| जुन्नर भिकाराम गोसावी व वासुदेवभट बिन शामभट धर्माधिकाररीणो वृंदावनाचे शुषृषेबद्दल देविले आहेत. नैवेद्य व नंदादीप व धूप बाग करावयास व तुलसी लावावयास व अन्नछत्राबद्दल इनाम जमीन छ २२ मोहरम सन समस अशर मौजे मजकूरपैकी इनाम कमीन नूतन ५ बागाईत जमीन १० बहीत जमीन सेत चौसुक वृंदावनानजिक आहे. त्यापैकी .|||. पड जमीन - तीन प्रतीची १| असामी इनाम जमिनी घातली आहे. या वृंदावनासमीप गोविंद मंगोजी हा झाडलोट करून निगा राखत असे म्हणून त्यासही राजश्री शाहूंनी जमीन दान दिली होती. गोविंद गोपाळ ढगोजी मंगोजी हे तीर्थरूप राजश्री कैलासवासींचे वृंदावन मौजे वढू तर्फ पाबळ राणांत आहे तेथे हे राहून वृंदावनाची सेवा करिताती.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ह
हाडक्या Wed, 09/24/2014 - 17:07 नवीन
गोविंद गोपाळ ढगोजी मंगोजी
या नावावरून एक शंका, आपल्याकडे पूर्वीच्याकाळी naming system कशी असावी असा प्रश्न पडतो. इथे नाव हे दक्षिण भारतीय (तामिळी?) लोकांसारखे वाटतेय.. म्हणजे 'तुमचे नाव, वडिलांचे नाव, आजोबांचे नाव, पणजोबांचे नाव' हे असेच होते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 09/24/2014 - 17:20 नवीन
नक्की माहीत नाही ब्वा. पण बहुधा शिवकाळात तरी नाव आडनाव अशीच होती. येथे दोन तीन पिढ्यांची नावे देण्यामागचे कारण बहुधा नामसाधर्म्यामुळे इनाम जमिनीत पुढे मागे वारसदारांची अडचण होऊ नये हाच असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
हाडक्या Wed, 09/24/2014 - 18:08 नवीन
वोक्के.. नहि म्हणजे.. भोसले, जाधव, हे लोक मात्र आडनाव लावतायत. तर काही लोक जसे की 'अनाजी दत्तो' असे दोनच शब्द असेलेली नावे वापरतायत तर काही आपण वर उल्लेखल्याप्रमाणे लांब्लचक अगदी पणजोबांपर्यंत नावे लावतायत.. हे पाहून थोडी उत्सुकता वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पैसा Wed, 09/24/2014 - 19:04 नवीन
साधारण महानुभावी लोकांसारखा ढगो मेघो संप्रदाय अस्तित्त्वात होता. हे त्या संप्रदायावरून दिलेले नाव असू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
आ
आदूबाळ गुरुवार, 09/25/2014 - 08:05 नवीन
ढगो मेघो संप्रदाय म्हणजे तांत्रिक ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 09/25/2014 - 08:38 नवीन
रा चिं ढेरे यांनी सविस्तर लिहिलंय. हा निसर्गातल्या शक्तींना देव मानणारा संप्रदाय. धरणी आणि पाणदेव. आता 'लज्जागौरी' हे पुस्तक काढून पाहिले तर वर वल्लीने दिलेला उतारा त्यात समाविष्ट आहे. द.वा. पोतदारांनीही ते "ढगो मेघो" असल्याची पुष्टी केली आहे. ढगो मेघो हे त्या संप्रदायाचे गुरूचे पद आहे. हे "ढगो मेघो" पौरोहित्य, लग्ने लावणे इ. कामे करत असत. सध्याची स्थिती माहित नाही. पण मराठेशाही आणि पेशवाईत हा संप्रदाय मुख्यतः महार आणि मांग यांच्यात चालत आलेला होता. हे मातंगी देवीचे उपासक. तांत्रिक संप्रदायात गेल्यामुळे ब्राह्मणातून बहिष्कृत झालेला कृष्णंभट आणि त्याच्या ५ मुलांनी ढगो मेघो संप्रदायाचा स्वीकार केला असा उल्लेख आहे. त्यामुळे तंत्रपूजा काही प्रमाणात या संप्रदायात आली असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ब
बबन ताम्बे गुरुवार, 09/25/2014 - 09:13 नवीन
लहाणपणी (७०- ७१ साली) आम्ही पोरेटोरे पाऊस लांबणी वर पडला की लाकडी पाटावर चिखलाचा गोळा थापायचो आणि त्यावर हळद कूंकू टाकून , उदबत्त्या खोचून तो पाट डोक्यावर घेऊन गावात "ढेगुजी मेघूजी पाऊस पडू द्या, आमच्या गावाला पीक येऊ दया" अश्या घोषणा देत फिरत असू त्याची आठवण झाली. ढगो मेघोचा इथे काही संबंध आहे की नाही माहीत नाही. जाणकार प्रकाश पाडू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
च
चौथा कोनाडा Fri, 09/26/2014 - 09:27 नवीन
ऐकीव माहिती नुसार, तुळापुरच्या ग्रामस्थांनी शंभुराजेंच्या विटंबित मृतदेह शिवून, त्यावर वढू येथे शास्त्रोक्त अंत्यसंस्कार केले होते, त्या मुळे एका समुहाचे आडनांव "शिवले" असे लावतात. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा. (चुक-भूल देणे घेणे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ब
बबन ताम्बे Fri, 09/26/2014 - 09:33 नवीन
आमच्या ऑफीसमधे एक "शिवले" आडनावाचा गृहस्थ आहे. त्याला विचारुन बघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
क
काळा पहाड Fri, 09/26/2014 - 10:04 नवीन
मराठ्यांच्या राजाला अशा प्रकारे मरण यावं हे महाराष्ट्राचं दुर्दैव. आपल्या राजावर या प्रकारे अंत्यसंस्कार कराव्या लागणार्‍या समाजाच्या दु:ख्खी मनःस्थितीची कल्पनाच करवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
प
प्रचेतस Fri, 09/26/2014 - 16:52 नवीन
'शिवले' आडनाव त्या घटनेनंतर पडले ही एक दंतकथा आहे. शिवपूर्वकाळापासून सिवले पाटील आडनावाचे संदर्भ सापडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
व
विलासराव Wed, 09/24/2014 - 08:12 नवीन
हायला!!!! मी त्या तुळापुरला जाउन साष्टांग नमस्कार करुन आलो होतो. एवधा मोठा इतिहासप्रपंच आहे होय त्या तुळापुरच्या घटनेमागे? ईतिहासाची आवड नसलेला आनी ईतिहासातुन काहीच धडा न घेतलेला विलासराव....
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 09/24/2014 - 09:47 नवीन
मला वाटते भोसले घराण्याचा प्रमुख विरोधकांच्या हाती लागण्याचा संभाजी राजांच्या बाबतीतला प्रसंग तसा तीसरा प्रसंग. छ. (शिवाजी महाराजांचे थोरले बंधूही रणांगणावर धारातीर्थी पडले ते मोजले तर चौथा) पहिला प्रसंग शहाजी महाराजांना आदिलशाहीतील अटक मला वाटते हा प्रसंग मुत्सद्देगिरीने सुटला, दुसरा खुद्द छ. शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडलेला आग्र्याचा प्रसंग चातुर्याने सुटला. पण या दोन्ही प्रसंगी हाती पुरेसा कालावधी होता. संभाजी महाराजांच्या बाबतीत आधीच्या प्रसंगांएवढा कालावधी आणि मोकळीक मिळाली नसावी. दुसरे तर मराठ्यांच्या चातुर्य आणि गनिमी काव्यांशी तो पर्यंत औरंगजेब आणि त्याचे सरदार अगदीच परिचीत असल्यामुळे गाफील न राहण्याबद्दल मोगल अधिक दक्ष राहीले असतील शिवाय संभाजी महाराजांच्या रुपाने मराठ्यांना पुन्हा संधी देण्यास औरंगजेब तयार राहीला नसेल असे होऊ शकते. मोगलांनी असलच कौर्य शीख धर्मांच्या काही प्रमुखांबद्दल दाखवल. शीख धर्मीयांवरच्या प्रसंगांचा पुर्ण इतिहास माहित नाही पण एका प्रसंगात बादशाही करता रस्सी खेच चालू असताना एका मोगल भावाला सुटून जाण्यात शीख समुदायाने मदत केल्याचा मोगल सम्राटास संशय आला असावा. गुरू गोबींद सिंगांची हत्या औरंगजेबाच्या मृत्यू नंतर झाली तरी त्यांचा पाठलाग औरंगजेब असतानाच चालू झालेला असावा. गुरू गोबींद सिंगांच्या बाबतीत त्यांनी स्वतः औरंगजेबास पत्र पाठवले होते आणि औरंगजेबाशी मुत्सद्देगिरीची अथवा तडजोडीची बोलणी करण्यासाठी म्हणून महाराष्ट्राकडे निघाले होते. पण पंजाबातील मोगल सुभेदाराने गुरू गोबिंदसिंगांच्या मागावर तेथूनच मारेकरी पाठवले होते. एकुण औरंगजेब किंवा त्या पेक्षा त्याच्या सुभेदार आणि सरदारांच्या भूमिका स्वार्थ अथवा वतनांच्या लालसेपोटी अधिक ताठ झाल्या असतील का हे अभ्यासकांनी अभ्यासावयास हवे असे वाटते. मागील आंतरजालीय वाचनाच्या आठवणीवरून संदर्भ न देता लिहितोय या बद्दल क्षमस्व आणि चु.भू. दे.घे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 09/24/2014 - 10:04 नवीन
बेरार आणि मराठवाड्यातील काही गावांची ब्रिटीशकालीन गॅझेटीयर्स मध्ये त्या त्या परिसराचा इतिहासकारांनी इतिहास लिहिताना औरंगजेब महाराष्ट्रात असताना मराठा सरदारांनी मराठवाडा आणि बेरार प्रांतास काही स्वार्‍या केल्याची वर्णने आहेत अर्थात त्या स्वार्‍यांचे कालावधींची मला कल्पना नाही. परंतु पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुर आणि रायगडावर दबाव वाढलेला असताना काही मराठा सरदार औरंगजेबाच्या ताब्यातील कमी लक्ष असलेल्या प्रदेशात स्वार्‍या करून औरंगजेबाचे लक्ष दुसरी कडे वळवणे वगैरे अशी काही शक्कल लढवली असण्याची आणि संभाजीराजांवर प्रसंग गुदरला तेव्हा पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर असतील असे काही झाले असू शकते का ? हि केवळ एक सहज सुचलेली पृच्छा/ शंका आहे कोणताही निष्कर्ष नव्हे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
प्रचेतस Wed, 09/24/2014 - 16:50 नवीन
बेरार प्रांती मराठ्यांनी धुमाकूळ घातला होता. खुद्द औरंगजेबाचे अत्यंत महत्वाचे व्यापारी केंद्र असलेल्या बर्‍हाणपूरावर स्वतः संभाजीराजांनी धाड घालून भलीमोठी लूट गोळा केली होती. अर्थत हे प्रकार राजांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत घडले. मात्र १६८६ साली विजापूरची आदिलशाही आणि १६८७ साली गोळकोंड्याची कुतुबशाही ह्या संपवयावर औंरंगजेब पूर्णांशाने महाराष्ट्रात वळला व राजांचे मराठवाड्यावरील हल्ले आक्रसत गेले. अर्थात लहानसहान चकमकी चालूच होत्या. पण मोठे युद्ध असे कधीच झाले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
मनो गुरुवार, 09/25/2014 - 00:53 नवीन
या प्रसंगाविषयीच्या मराठ्यांकडील अस्सल आणि विश्वसनीय नोंदी खालीलप्रमाणे आहेत. जेधे शकावली (निवडक नोंदी) शके १६१० विभव सवछरे कार्तिक मासी कवी कलश याजवरी सिरके पारखे जाले कलश पळोन खिलणियावर गेला तेच मासी संभाजी राजे रायेगडाहून कलशाचे मदतीस आले समगे स्वारी सिरकियांसी युध्य करून त्यास पलउन खलणियास आले मार्गासीर्ष मासी संभाजी राजे याणी कलशाच्या बोले प्रह्लादपंत व सर कारकून व कितेक लोकास धरिले तेच मासी औरंगजेब विजापुरीहून तुलापुर नजीक भीमातीर येथे आले माघ वद्य ७ शुक्रवासरी संभाजी राजे व काविकलश रायेगडास जावयास संगमेस्वरास अले असता सेक निजाम दौड करून येउन उभायेतास जीवतच धरून नेले वरकड लोक रायेगडास गेले फालगुण शुध ३ राजारामास रायेगडचा किलेदार चांगोजी काटकर व येसजी कंक याणी माघ वद्य ३० अदबखानाहून काडून बाहेर आणून मंचकी बैसावले मानाजी मोरे व वरकड सरकारकून धरिले होते ते सोडिले ज्याचे कायेभाग त्यासी देऊन राजाराम राज्य करू लागले येसजी व सिदोजी फर्जद यास कडेलोट केले फालगुण वद्य १३ त्रायोदसी हारजी माहडिक याणी केसो त्रीमाल यांस संभाजी राजे याचे विपरीत वर्तमान यैकोन त्रिणामली धरिले फालगुण वद्य ३० अवरंगजेब तुलापुरी संभाजी राजे व कविकलश यास जीवे मारून सिरछेद केले बाकीच्या गोष्टीबद्दल मराठ्यांकडील अस्सल माहिती उपलग्ध नाही कारण १) या प्रसंगात प्रत्यक्ष हजर असणारी सर्व महत्वाची माणसे (स्वतः राजे, मुख्य कारभारी कवी कलश, सेनापती म्हलोजी घोरपडे) एक तर कैद झाली किंवा मारली गेली २) वरकड माणसे ( यात म्हलोजीचा मुलगा संताजी घोरपडे हाही होता कि नाही याची कल्पना नाही) रायगडाकडे गेली आणि त्यांनी ही बातमी येसूबाईस दिली. पण यानंतर रायगडच शत्रूच्या ताब्यात गेला आणि मूळ सरकारी दफ्तरखाना नष्ट झाला. ३) फारसी साधने औरंगझेबाच्या दरबारात म्हणजे ३०० किलोमीटर दूर अर्थातच ऐकीव माहितीवर आधारित लिहिली गेली आणि शत्रुपक्षाकडील असल्यामुळे मोगलांना कमीपणा आणणारी माहिती अर्थातच त्यात नसणार त्यामुळे कादंबरीकारांनी जे तपशील भरले आहेत ते तर्क आणि कल्पना वापरूनच ठरवले आहेत. आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी माझे काही तर्क. (यांना कोणताही आधार नाही) १) तो काळच अराजकाचा आणि अनिश्चिततेने भरलेला होता. विजापूर आणि गोलकोंड्याची राज्ये दोन वर्षापूर्वीच नष्ट झाली होती. त्यांचे सरदार मोगलांना जाऊन मिळाले होते. मुकर्रबखान शेख निजाम पूर्वी विजापुरी मनसबदार होता आणि त्याला शिर्के अथवा विजापुरी मुलुखाची चांगली माहिती असणे अशक्य नव्हते. तसेच त्याला संभाजी राजांची बातमी मिळणेहि अवघड नव्हते कारण संभाजीराजे पूर्वी विजापूरच्या मदतीनेच मोगलांशी लढत होते. मुकर्रबखानच्या दृष्टीने त्याची स्वतःची उपयुक्तता मोगलांना सिद्ध करण्यासाठी हि उत्तम संधी होती. संभाजी राजांनी कित्येक लोक कैदेत ठेवले होते वातावरण एकंदरीत भीतीदायक आणि गोंधळाचे असले पाहिजे. २) नुसते सैन्य असून अशा गोष्टी करणे शक्य नसते, त्याला नेतृत्व लागते. संभाजी राजांना सोडवू शकणारी आणि त्यांच्या पाठीशी उभी राहणारी माणसे खालीलप्रमाणे होती. हंबीरराव मोहिते १६८७ साली साली वाईच्या लढाईत मारले गेले. कवी कलश मुख्य कारभारी (पकडले गेले) सेनापती म्हलोजी घोरपडे (मारले गेले) येसाजी कंक (रायगडावर होते म्हणून त्यांच्यावर शाहू, राजाराम आणि येसूबाई यांच्या रक्षणाची जबादारी होती) येसूबाई (बखरीत रायगडचा खजिना रिकामा आहे, पुरेसे सैन्यही जवळ नाही अशी वाक्ये आहेत.) त्यामुळे त्यांना फार काही करणे शक्य नव्हते असे वाटते राजाराम नजरकैदेत असल्याकारणाने त्याच्याकडे सैन्य नव्हते, त्याचे समर्थकही अटकेत होते. ३) इतिहासात जसे शत्रूच्या मुलुखातून औरंगझेबाच्या कैदेतून सुटून जाणे जमते तसेच अचानक छाप्यात पकडले जाणेही होते. शिवाजीराजांच्या काळी त्यांच्याकडे मोगल विरुद्ध विजापूर असे राजकारण करण्याची संधी होती आणि त्यांनी त्याचा फायदा घेतला (जसे मिर्झा राजा जयसिंगाच्या वेळी). पण एकदा विजापूरचे राज्य नष्ट झाल्यावर आणि पकडले गेल्यावर संभाजी राजांकडे असा काही पर्यायच उरला नाही. ४) जेधे शकावलीनुसार राजारामाचे मंचकारोहण संभाजी राजांच्या वधापुर्वी झाले. त्यावरून असे वाटते की मराठ्यांनी संभाजी राजे जिवंत परत येण्याची आशा आधीच सोडली होती. ५) संभाजी राजांचे सैन्य शिर्क्यांच्या मोहिमेसाठी पुरेसे असावे पण खानाच्या सैन्याचा पराभव करण्याइतपत जास्त नसावे. त्यामुळे लगेच सुटकेचे काही प्रयत्न शक्य झाले नसावे.
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 09/25/2014 - 04:19 नवीन
तत्कालीन परिस्थितीत आहे ती दौलत समूळ नष्ट होण्यापासून वाचवणे जास्त महत्त्वाचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
ब
बबन ताम्बे गुरुवार, 09/25/2014 - 07:47 नवीन
तसेच वल्ली यांनाही धन्यवाद. त्यांनी पण बरीच माहीती दिली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
स
सौंदाळा Fri, 09/26/2014 - 07:43 नवीन
शहेनशहा मधे एक वाक्य आहे, औरंगजेब दानिष्मंद्खान (का शहजादी झेबुन्निसाला) म्हणतो. माझ्या हातात मराठ्यांच्या तिन्ही पिढ्या लागल्या पण मी प्रत्येकाबरोबर वेगळा व्यवहार केला. १. शिवाजीला मी जाऊ दिले शिवाजी मुघलांच्या बाजुने वळेल किंवा जयसिंगाला दिलेले वचन मोडेल हे कारण असावे.असे माझे मत) २. संभाजीला मी ठार केले (आदिलशाह, कुतुबशाह ताब्यात होतेच मात्र संभाजीने प्रखर विरोध केल्यामुळे दृष्टीपथात आलेला आणि आयुष्यभर उराशी बाळगलेला दक्षिण विजयाचा क्षण निसटेल की काय असे त्याला वाटत असावे.असे माझे मत) ३. शाहुला मी आश्रय दिला पण मोकळे सोडले नाही. (म्हातारपणाची चाहुल, अंतर्गत फौजेचा दिल्लीला परत जाण्याचा धोशा आणि गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा आणि त्यातुन औरंगजेबाला आलेली उद्विग्नता आणि कदाचित भविष्यकाळात शहजाद्याची सोय/तरतुद करण्यासाठी लहानग्या शाहुला आपल्या ताटाखालचे मांजर बनवले तर दक्षिण मुघलांच्या ताब्यात असल्यासारखीच राहील असा त्याचा विचार असावा.असे माझे मत)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 09/26/2014 - 10:00 नवीन
८९ वर्षे जगलेल्या कोणत्याही व्यक्तीला साधारणतः तीन पिढ्यांच दर्शन सहाजिकच घडत औरंगजेबाने तीन पिढ्या पाहिल्या हे नोंदवण्यासाठी कपोलकल्पित कादंबरीच्या आधाराची गरज रिव्हिजिट करून पहाण्याची गरज वाटते.
१. शिवाजीला मी जाऊ दिले
यात कादंबरीकाराच्या कपोल कल्पनेपलिकडे हाती काय लागते ? मिर्झाराजे जयसिंगा मार्फत दबाव देऊन शिवाजीराजे मांडलीक होतात का ते पहाणे हा सामान्य मुत्सद्देगिरीचा भाग समजा की औरंगजेबाने केला, औरंगजेबाच्या जागी कोणताही बादशहा असता तरीही त्यानेही ते केलेच असते या मुत्सद्देगिरीला जाऊदिले असे स्वतः औरंगजेबसुद्धा म्हणेल की नाही हा प्रश्नच वाटतो. आग्र्यातून सुटकेच्या वेळी शिवाजी महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली याला जाऊ दिले म्हणणार का ? म्हणजे की आग्र्यातील कैदेतून पळून जाणार आहे हे औरंगजेबाला बादशहा माहित होते पण औरंगजेबाने मनोरंजन म्हणून शिवाजी महाराजांना जाऊ दिले ? औरंगजेबाने शिवाजीला जाऊ दिले म्हणजे नेमके काय ? :)
२. संभाजीला मी ठार केले
सत्तेच्या संघर्षात जो स्वतःच्या वडील आणि भावंडाशी क्रौर्य दाखवताना मागे पुढे पहाणार नाही. तसेही भारतातील तो काळ मानवाधिकारांचा विचार करणार्‍यांचा नव्हता, जनता आणि शत्रुच्या अनुयायांवर जरब बसवण्यासाठी हाती आलेल्या शत्रु प्रमुखाला मारणे हि काही अपवाद वगळता त्या काळी सर्वसामान्य बाब नसेल काय ? समजा औरंगजेबाला दक्षिण विजयाच स्वप्न नसतं तरी सुद्धा त्याने संभाजी महाराज म्हणून नव्हे इतरही त्याच तोला मोलाच्या शत्रूशी काही वेगळा व्यवहार केला असता का ? समजा शाहीस्तेखान स्टाईल मध्ये औरंगजेब शिवाजी महाराजांच्या हाती आला असता तर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सोडला असता काय ? या बाबीचे शिवाजी महाराजांच्या उत्तर अथवा दक्षिण विजयाच्या स्वप्नाशी एकुण किती नाते राहिले असते. भारताचे पहाडी उत्तरांचल आणि आसाम हे प्रांत मोगलांना कधीच घेता अथवा टिकवता आले नाहीत म्हणून त्यांचा बाकीचा दक्षिण विजय थांबला का ? संभाजी महाराजांच्या काळात निश्चितपणे मराठवाडा आणि बेरार भागात जाऊनही औरंगजेबास नाकी नऊ आणले तरी सुद्धा दिल्लीचा बादशहा दक्षिणेत अधिक खोलवर संभाजी महाराजांच्या नंतर पोहोचला आधी नाही असे असेल तर त्याचे ललितेतर इतिहास संशोधनाच्या साधनातून संदर्भ देऊन लेखन करावयास हवे त्यास कादंबरीचे आधार देऊन तर्क साधणे कितपत योग्य आहे या बद्दल मी साशंक आहे.
३. शाहुला मी आश्रय दिला पण मोकळे सोडले नाही. .......लहानग्या शाहुला आपल्या ताटाखालचे मांजर बनवले तर दक्षिण मुघलांच्या ताब्यात असल्यासारखीच राहील असा त्याचा विचार असावा.असे माझे मत)
ज्या औरंगजेब स्वतःच्या बापाच्या ताटाखाली श्वास घेऊ शकला नाही तो शाहू महाराज हत्या केलेल्या शत्रूचा मुलगा ताटाखालचे मांजर बनतील असा खरेच विचार करेल का या बद्दल साशंकता वाटते, नेमकंकारण औरंगजेबच सांगू शकेल तरीही काही कारणच असेल तर १) पडद्यामागून मराठा सरदारांनी अथवा शाहू महाराजांच्या आजोळून रदबदली २) औरंगजेबाच्याच कुटूंबातन झालेली भावनीक रदबदली ३) औरंगजेब म्हातारपणामुळे दयाळू झाला होता (तसे असते तर संभाजी महाराजांवरही गंभीर प्रसंग गुदरला नसता) ४) कोवळ्या वयातील भोसले घराण्याच्या वंशाच्या दिव्यास हात न लावणे म्हणजे संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी अधिक हल्ले होणार नाहीत ५) किंवा महाराष्ट्रातील जनतेची आणि भोसले घराण्याच्या स्वामी भक्तांची अधिक नाराजी न घेणे ६) मराठा सरदारांशी भविष्यकाळात तडजोडीचा प्रसंग आलाच तर मुत्साद्दी वाटाघाटीं साठी ओलीस ठेवणे यापैकी सुद्धा एखादे कारण असू शकेल किंवा एकही नसेल. तरीही >>म्हातारपणाची चाहुल, अंतर्गत फौजेचा दिल्लीला परत जाण्याचा धोशा आणि गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा आणि त्यातुन औरंगजेबाला आलेली उद्विग्नता आणि कदाचित भविष्यकाळात शहजाद्याची सोय/तरतुद करण्यासाठी<< हा तर्कही पुरेसा पटत नाही. ज्या स्थितीत संभाजी महाराज आणि कुटूंबीय मोगलांच्या हाती लागले तेव्हा >>गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा <<खरेच चालू होता का ? माझ्या हाती संदर्भ साधने नाहीत पण याच धाग्यावर झालेली आधीची चर्चा पाहता औरंगजेबाचा दबाव ढिला पडत नव्हता वाढलेला होता असे प्रथम दर्शनी वाटते त्यामुळे आपल्या या तर्का बाबत साशंकता वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
म
माहितगार Fri, 09/26/2014 - 10:13 नवीन
म्हातारपणाची चाहुल, अंतर्गत फौजेचा दिल्लीला परत जाण्याचा धोशा आणि गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा आणि त्यातुन औरंगजेबाला आलेली उद्विग्नता आणि कदाचित भविष्यकाळात शहजाद्याची सोय/तरतुद करण्यासाठी>गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा
माझ्याकडे इतिहासाची संदर्भ साधने उपलब्ध नाहीत पण संभाजी महाराज आणि त्यांच्या कुटूबींयांना अटक करण्याच्या नेमक्या वेळी औरंगजेबाचे सैन्य स्ट्रॅटेजीकली यशस्वी होताना दिसते असे या धाग्यावरील आधीच्या प्रतिसादातील चर्चांवरून वाटते. संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर काही वर्षे लोटूनही मराठे पूर्ण नियंत्रणात राहीले नाहीत तर नंतर औरंगजेब उद्वीगन झाला असेल नाही असे नाही परंतु ज्या काळात संभाजी महाराज आणि त्यांचे कुटूंबीय हाती पडले तेव्हा औरंगजेब अथवा त्याचे सरदार उन्मादात असण्याची शक्यता अधिक उद्वीग्नतेची नव्हे. संभाजी महाराजांची हत्या करातानाच्या क्रौर्यात जेवढा जनतेवर जरब बसवणे हा हेतु असू शकेल तेवढाच शत्रूच्या प्रमुखास जेरबंद करण्याचा उन्माद हेही कारण असू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
स
सौंदाळा Fri, 09/26/2014 - 10:28 नवीन
हे माझे मत आहे. मी इतिहास अभ्यासक / संशोधक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 09/26/2014 - 10:56 नवीन
हे माझे मत आहे. मी इतिहास अभ्यासक / संशोधक नाही.
मनातले विचार मनात ठेवण्यापेक्षा चर्चा करून कसोटीवर लावून पाहिलेले बरे, मीही आपल्या प्रमाणेच इतिहात रुची तेवढीच ठेवतो, अभ्यासक / संशोधक वगैरे नाही. २१व्या शतकात सर्व दस्तएवज केवळ अभ्यासक अथवा संशोधकांची मक्तेदारी होऊन काही मोजक्याच जणांना उपलब्ध होतात ते ऑनलाईन याची डोळा पाहण्या साठी आणि युनिकोडात सहज शोधणेबल याची हाते शोधण्यासाठी उपलब्ध व्हावयास हवेत. अभ्यासकांची मत विचारात घेतली पाहिजेत पण तर्क हि कुणाची मक्तेदारी नाहीत तुम्ही तुमच तर्क आणि मत बनवू आणि मांडू शकता त्या बद्दल आदरच आहे. अर्थात मला जिथे साशंकता वाटली ती नोंदवली एवढेच. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
स
सौंदाळा Fri, 09/26/2014 - 11:01 नवीन
मनातले विचार मनात ठेवण्यापेक्षा चर्चा करून कसोटीवर लावून पाहिलेले
पटले म्हणुन तर मिपावर येत असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ह
हेमंत लाटकर Wed, 12/09/2015 - 14:53 नवीन
सोयराबाई व अष्टप्रधान मंडळाच्या मनात राजारामाला गादीवर आणायचे होते. हंबीरराव मोहित्यांनी संभाजीराजांना साथ दिल्यामुळे कोणाचे चालले नाही व संभाजीराजे सत्तेवर आले. संभाजीराजांनी सोयराबाईंना कैदेत टाकले. जेव्हा संभाजीराजांना अटक झाली तेव्हा विरोधकांना राजारामाला सत्तेवर आणण्याची संधी मिळाली. म्हणून सरदार व पंतप्रतिनिधीनी संभाजीराजांच्या सुटकेसाठी प्रयत्न केला नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा