Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हेल्मेटसक्ती

प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 11/13/2014 - 05:01
🗣 360 प्रतिसाद
अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.

प्रतिक्रिया द्या
136542 वाचन

💬 प्रतिसाद (360)
व
वेल्लाभट गुरुवार, 11/13/2014 - 09:52 नवीन
सहज कुतुहल. माझ्या फुटकळ माहितीनुसार तिथे जे बाईकर्स सगळे गियर वगैरे आवडीने (नियम आहेत का नाही मला ज्ञात नाही) घालतात. हे गार्ड ते गार्ड इत्यादी. आणि आपले तरुणेश त्याकडे स्टाईल म्हणून बघतात. काय व्वाटतं यार ते सगळं अस घालून.... इत्यादी संवाद ऐकलेले आहेत.
  • Log in or register to post comments
व
वाचक गुरुवार, 11/13/2014 - 16:28 नवीन
इथे अमेरिकेत (आणि कॅनडात) स्वयंचलित दुचाकी तर सोडाच पण साधी सायकल (ती सुद्धा अंगणात) चालवताना पण हेल्मेटची सक्ती आहे. त्याच बरोबर, 'ब्लेड स्कूटर, स्केट्बोर्ड' वगैरे वापरताना सुद्धा हेल्मेटची सक्ती आहे. दुचाकीवर मागे बसणार्‍याला सुद्ध्दा हेल्मेट घालावेच लागते आणि दुचाकिस्वार पोलिसही हेल्मेट घालूनच असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/13/2014 - 09:56 नवीन
भारतात सर्वाधिक अपघात रस्त्यावर पायी चालणार्‍या लोकांचे होतात. खरं तर पायी चालणार्‍यांना हेल्मेट सक्ती केली पाहिजे. ते सोडून बिचार्‍या दुचाकीचालकांना का सक्ती? रस्त्यांवरील असंख्य खड्डे, वरखाली असणारी गटारांची झाकणे, अशास्त्रीय गतिरोधक, वाहतुकीचे नियम तोडणारी मंडळी इ. अपघातांची मुख्य व मूळ कारणे आहेत. मूळ कारणांवर अजिबात उपाय न करता थेट हेल्मेट सक्ती करणे अत्यंत अयोग्य आहे. उद्या हेल्मेटसक्ती केली तरी वरील कारणांवर उपाय न केल्याने एकही अपघात कमी होणार नाही. हेल्मेटमुळे कदाचित काही जणांच्या डोक्याला इजा होणार नाही, परंतु शरीराच्या इतर अवयवांना इजा होणारच. अपघातांचे प्रमाण कमी करणे याला प्राधान्य असावयास हवे. हेल्मेटसक्ती सारखे जुजबी उपाय नंतर येतात. एखादा मुलगा सारखे बाहेरचे खाऊन आजारी पडत असेल तर त्याच्या बाहेर खाण्यावर प्रतिबंध आणण्याला प्राधान्य हवे. हेल्मेटसक्ती म्हणजे अशा मुलाच्या बाहेर खाण्यावर बंदी न आणता त्याला रोज पोटदुखीचे औषध सक्तीचे करण्यासारखे आहे. हेल्मेट वापरण्याचे तोटे अनेक आहेत. विशेषतः मानदुखी/पाठदुखी असणार्‍यांसाठी हेल्मेट हे अत्यंत त्रासदायक आहे. त्याव्यतिरिक्त केसात कोंडा होणे, मागच्या वाहनांचे हॉर्न ऐकू न येणे हे तोटे आहेतच. हेल्मेट सांभाळणे हे अत्यंत त्रासदायक आहे. बहुसंख्य पुणेकर फार थोड्या अंतरासाठी दुचाकी वापरतात. इतक्या थोड्या अंतरासाठी हेल्मेट वापरणे हा एक न्यूसन्स आहे. सरकारला जर जनतेची इतकी काळजी असेल तर हेल्मेटसक्तीपेक्षा अपघातांची मूळ कारणे नष्ट करण्यावर भर द्यायला हवा. आपल्याला हेल्मेट वापरायचे का नाही ते जनतेलाच ठरवू द्यात. विनाकारण सक्ती करू नका.
  • Log in or register to post comments
थ
थॉर माणूस गुरुवार, 11/13/2014 - 10:19 नवीन
>>>इतक्या थोड्या अंतरासाठी हेल्मेट वापरणे हा एक न्यूसन्स आहे. इतक्या थोड्या अंतरासाठी दुचाकी वापरणे हा मुर्खपणा आहे. >>>मूळ कारणांवर अजिबात उपाय न करता थेट हेल्मेट सक्ती करणे अत्यंत अयोग्य आहे. बोला रेटून... तुमचं काय म्हणणं आहे? खड्यांची दुरूस्ती करणे, रस्त्यांची निगा राखणे वगैरे होतच नाही? ते जर नीट होत नसेल तर तुमच्या भागातल्या नगरसेवकांचे गळे धरा ना जाऊन. तिथे त्यांना बरे पैसे खाऊ देता? >>>अपघातांचे प्रमाण कमी करणे याला प्राधान्य असावयास हवे. त्यासाठी गाडी चालवणार्‍यांना मेंदू बरोबर घेऊन गाडी चालवण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळत गाडी चालवण्याची सक्ती करायला हवी. आता काय पुणेकरांबरोबर गाडीत वेगळा पोलिस बसवायचा का त्यांनी नियम पाळावेत म्हणून. तिथेही तुम्ही सिग्नल तोडल्यावर पोलिस काही बोलला की सुरू होणार... रस्त्यांची अवस्था, पार्कींग वगैरे वगैरे... >>>एखादा मुलगा सारखे बाहेरचे खाऊन आजारी पडत असेल तर त्याच्या बाहेर खाण्यावर प्रतिबंध आणण्याला प्राधान्य हवे. १००% सहमत. सरकारला विनंती करूयात की पुण्यात दुचाक्यांवर प्रतिबंध आणा. >>> विशेषतः मानदुखी/पाठदुखी असणार्‍यांसाठी हेल्मेट हे अत्यंत त्रासदायक आहे. गैरसमज. मार्केटमधे शेकड्याने प्रकार उपलब्ध आहेत, कित्येक नवी हेल्मेट कमी वजनाची असतात. माझ्या वडीलांना पाठदुखी आहे, पण हेल्मेट घातल्यामुळे जास्त त्रास होतो वगैरे पांचट कारणे त्यांनी कधी दिल्याचं आठवत नाही. >>>त्याव्यतिरिक्त केसात कोंडा होणे :D अवघड आहे... डोके फुटण्यापेक्षा कोंडा परवडला. तरीही कोंड्याचा इतका विचार करत असाल तर वेगा पासून ते रीबॉक पर्यंत अनेक कंपन्या हेल्मेटच्या आतून घालण्यासारखे बंडानाज विकतात. ४० रुपड्यांपासून पुढे मिळतात. पण काये ना, कारणं द्यायचीच म्हटलं की वाट्टेल ते स्पष्टीकरण चालते. >>>मागच्या वाहनांचे हॉर्न ऐकू न येणे कानात ते हेडफोनचे बोळे घालून येतात वाटतं हॉर्न ऐकू? शेकड्यानी गाडीस्वार बघतो असले रोज. म्हणे हॉर्न ऐकू येत नाहीत. गेल्या १०-१५ वर्षाच्या हेल्मेट वापरात आजवर एकदाही मागच्या गाडीचा हॉर्न ऐकू आला नाही असं झालेलं नाही माझ्याबाबतीत. आणि खरंच एखाद्याला नसतील ऐकू येत तर त्याला आधी श्रवणयंत्राची गरज आहे आणि मग हेल्मेटची. सक्ती आहे आणि रहाणार... तुम्ही नियम पाळत असाल तर तुम्ही आधीपासूनच हेल्मेट वापरताय. तुम्हाला सक्तीचा फारसा त्रास होणार नाही तुम्ही नियम पाळत नसाल तर तुम्हाला काय फरक पडतो सक्ती असली तरी आणि नसली तरी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मदनबाण गुरुवार, 11/13/2014 - 10:55 नवीन
@थॉर माणूस क-ड-क प्रतिसाद ! ;) @श्रीगुरुजी काय हे हे गुरुजी ! अहो गुरुजी ना तुम्ही ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/13/2014 - 16:50 नवीन
तुम्हाला हेल्मेट कितीही सोयीचं आणि गरजेचं वाटत असलं तरी प्रत्येकाला ते वाटेलच असे नाही. ज्याला वापरायचे त्याने ते वापरावे. त्याची सक्ती नको. हेल्मेटसक्ती पेक्षा अपघात होण्यामागे जी प्रमुख कारणे आहेत त्यावर उपाय काढण्याला प्राधान्य हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
म
मराठे Fri, 11/21/2014 - 17:10 नवीन
(गंभीर) अपघात होण्याचं मुख्य कारण हेल्मेट न वापरणं हे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 11/14/2014 - 03:57 नवीन
अगदी बरोबर. कारणं द्यायचीच असं ठरवलं की काय कुठलीही देता येतात. हेल्मेट वापरा रे बाबा सगळ्यांनी. माझ्या माहीतीत एक जण असा आहे की ९-१० वर्षांपुर्वी स्कुटर स्वत:च्या अंगणात वळवत असताना गाडी स्किड होऊन पडला. पडताना डाव्या बाजुच्या भिंतीवर डो़कं आपटलं. गाडी आणि भिंतीच्या मधे विचित्र अडकला होता. ५-१० किमी प्रतीतास वेगात त्याला ब्रेन हॅमरेज झाला. त्याची डावी बाजु पार्शली पॅरालाईझ झालीये. चालता वगैरे येतं पण व्यंग आलचं ना शेवटी? घरातल्या घरात एवढं झालं तर वेगात असणार्‍या गाडीवर काय होईल ह्याचा विचार करा. एक वेळ माणुस मेलेलं परवडतं पण एकदा अपंगत्व आलं ना तर ते अतिशय कठीण होऊन बसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
ज
ज्ञानव Sat, 11/22/2014 - 09:51 नवीन
ते बरोबरच आहे कारण बाइकस्वार आणि पिलियन रायडर हे दोघेही आणि किंबहुना पिलियन रायडर हे हेल्मेट न वापरून जास्तच धोका स्वीकारतात. माझी वाहिनी (पेठकरांनी उल्लेख केला आहेच) हि पिलियन रायडरच होती. माझा एक मित्र गेली ३ वर्ष कोमात आहे वडलांनी लाखो खर्च केले आहेत पण काही फरक नाही तोही पिलियन रायडरच होता. गोरेगाव हायवेवर आमच्या एका चुलत मित्राची मुलगी आणि तिचा मित्र (मुंबईच्या अतिशय व्यवस्थित, शिस्तबद्ध आणि खड्डे विरहित रस्त्यावर) ट्रकने मागून धडक दिल्याने जागच्या जागी गेले केवळ डोके फुटून. त्या मुलीचे आई वडील आणि त्यांची मानसिक स्थिती ह्याचे वर्णन करावे का? मग पुणेकरांना हेल्मेटची सक्ती का नको ? अपघातांना अनेक गोष्टी, घटना कारणीभूत असतात त्यापैकी हेल्मेट हे एक आहे. ज्यांना सक्ती नको त्यांच्या घरात कदाचित गंभीर अपघात झाले नसावेत किंवा आजूबाजूला होणार्या अपघातांबद्दल फारसे सोयरसुतक नसावे. आणि चांगल्या अर्थाने सक्ती नकोच कारण ती जबाबदारी आहे प्रत्येकाची. मग पुणेकरांना जबाबदारीचे वावडे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 11/13/2014 - 16:44 नवीन
अशा उथळ प्रतिसादाची श्रीगुरुजींकडून अपेक्षा नव्हती. असो. एकेकाचे मत असे म्हणून सोडून देतो. मी मात्र माझ्या आणि मुलाच्या सुरक्षिततेला अधिक महत्व देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोहनराव गुरुवार, 11/13/2014 - 10:00 नवीन
हेल्मेट सक्ती योग्य आहे असे मला वाटते. मी कॉलेजला असताना माझ्या समोर माझ्या मित्राचा अपघात पहिला आहे. केवळ हेल्मेट असल्यामुळे किरकोळ जखम होऊन तो वाचू शकला. पाषात्य देशांमध्ये मोठ्या पॉवरच्या बाईक्स चालवताना हेल्मेत्बरोबर safety gear सुध्दा घालण्याची सक्ती असते. चारचाकी गाडी चालवताना बेल्टची सक्ती असते. आपल्याकडे केवळ दंड होतो. तिकडे परवाना रद्द पण होऊ शकतो. कायद्याचा वचक असल्याशिवाय काही लोकांना समजत नाही मग सक्ती ही करावीच लागणार. भले मग विक्रेत्याचा फायदा का होईना. स्वताची सुरक्षितता महत्वाची.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/13/2014 - 10:41 नवीन
स्वताची सुरक्षितता महत्वाची.
मान्य आहे ना! पण स्वत:च्या सुरक्षिततेची सक्ती कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव
थ
थॉर माणूस गुरुवार, 11/13/2014 - 10:56 नवीन
या हिशोबाने "आत्महत्या हा गुन्हा आहे" या नियमाविरुद्ध सुद्धा लढावे लागेल. म्हणजे असं बघा, माझा मी शहाणा आहे. आणि आत्महत्या करेनच किंवा नाही असेही काही ठरलेले नाही. बरं मी इतर कुण्णाला इजा वगैरे करत नाही फक्त माझा मीच मरतो. मग माझ्या सुरक्षीततेची सक्ती करणारे सरकार कोण? आत्महत्या न करण्याची शिफारस करा म्हणावं हवं तर... सक्ती कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
व
वेल्लाभट गुरुवार, 11/13/2014 - 11:36 नवीन
ROFL
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/13/2014 - 12:11 नवीन
आत्महत्या यशस्वी झाली तर तो गुन्हा नाही व अयशस्वी झाली तर तो गुन्हा आहे. जगण्याची तरी सक्ती का? हा एक वेगळा प्रश्न आहेच. त्याला अनेक पैलू आहे. इच्छामरण दयामरण ही त्याची काही उपांगे. पण तो वेगळा विषय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
व
विजुभाऊ गुरुवार, 11/13/2014 - 12:20 नवीन
"आत्महत्या हा गुन्हा आहे" या नियमाविरुद्ध सुद्धा लढावे लागेल थॉर माणूस काका. जरा अपडेट रहा. आता हा गुन्हा मानला जाणार नाहिय्ये.सरकार आय पी सी ३०९ मधे बदल करणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
थ
थॉर माणूस गुरुवार, 11/13/2014 - 12:27 नवीन
आत्ता गुन्हा आहे ना? त्यात भविष्यकाळात कधी बदल झाला की आपण सांगू सरकारला हेल्मेट सक्ती काढायला. हाकानाका ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/13/2014 - 16:53 नवीन
आत्महत्येला गुन्हा ठरविणे हे चूक आहे. जैन धर्मात प्रायोपवेशन करून प्राणत्याग करतात. ती आत्महत्याच आहे. त्यावर मात्र गुन्हा दाखल होत नाही. विनोबा, स्वातंत्र्यवीर सावरकर इ. नी अन्नत्याग करून प्राणत्याग केला. कायद्यानुसार ही देखील आत्महत्याच ठरते. अनेक देशात स्वेच्छामरणाची चळवळ सुरू आहे. स्वेच्छामरण ही एक प्रकारची आत्महत्याच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
R
Rajesh188 Sat, 01/19/2019 - 05:24 नवीन
आत्महत्या हा गुन्हा ठरवण्या मागे वेगळा विचार आसवा . आस मला वाटतं आत्महत्या हा गुन्हा ठरवला त्या मुळे पोलिस complaint होवून मृत्यू ची चोकशी करावीच लागते . नाही तर खून करून आत्महत्या आहे आस दाखवलं आणि तो गुन्हा नसेल तर पोलिस चोकशी पण नाही सर्व कास आलबेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
म
मराठी_माणूस गुरुवार, 11/13/2014 - 12:48 नवीन
पण स्वत:च्या सुरक्षिततेची सक्ती कशाला?
आत्मह्त्या हा सुध्दा गुन्हा आहे. तिथे असे म्हणणार का , "आमच्या जीवाची तुम्हाला का काळजी ?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
म
मराठी_माणूस गुरुवार, 11/13/2014 - 12:50 नवीन
हाच मुद्दा वरील चर्चेत आधीच उपस्थित केला गेला आहे हे नंतर लक्षात आले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
अ
असंका Sat, 11/22/2014 - 12:36 नवीन
पुन्हा पुन्हा हाच मुद्दा याच शब्दात मांडला जातोय म्हणून एक तांत्रिक मुद्दा स्पष्ट करू इच्छितो: आत्महत्या हा गुन्हा नाही. आत्महत्येचा प्रयत्न करणे हा गुन्हा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
ट
टवाळ कार्टा Sat, 11/22/2014 - 14:30 नवीन
म्हणजे मेला नाही तर पोलिसांची पायरी चढायची तयारी ठेवायची...म्हणजे प्रयत्न फसला तर कधीकधी भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थीती व्हायची...याऐवजी त्या व्यक्तीला मानसोपचार तज्ञांकडे नेउ शकत नाही का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/13/2014 - 13:20 नवीन
स्वत:च्या सुरक्षिततेची सक्ती कशाला? कारण : दूरदर्शीपणा हा सर्वसाधारण माणसाचा गुणधर्म नाही. माणूस सर्वसाधारणपणे "सारासारविवेकबुद्धी" पेक्षा जास्त "तात्कालीक सोय आणि फायदा" यांना जास्त महत्व देतो. जनतेत तात्कालीक अप्रिय होऊ शकणारे पण दीर्घकालीक फायद्याचे कायदे जाणीवपूर्वक करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे ही सरकारची जबाबदारी असते (केवळ जनतेला खूष करणारे आणि / किंवा राजकारण्यांचे काम साधून घेणारे कायदे करणे नाही), हे भारतिय जनता जवळजवळ पूर्णपणे विसरली आहे असेच वारंवार दिसते. कायद्याने जनतेला सुजाण नागरीक बनवून जनतेचाच फायदा कसा होतो याचे उदाहरण म्हणून सिंगापूर आणि इतर अनेक कायद्याचे राज्य असलेल्या देशांतील यासंबंधाच्या परिस्थितीचा अभ्यास उपयोगी पडेल. आवांतर : "आमचा ९ वर्षाचा पोरगा वडापावच्या टपरीवर भांडी घासतो यात तुमच्या तिर्थरुपांचे काय जाते ?" असे विचारणार्‍यांनी बालकामगार प्रतिबंधक कायदा रद्द करावा यासाठी आंदोलन सुरू करायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ह
हाडक्या गुरुवार, 11/13/2014 - 15:19 नवीन
तुमचे आवांतर भलतेच आवडल्या गेले आहे असे नमूद करतो. यापरता प्रतिवाद नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
काळा पहाड Fri, 11/21/2014 - 18:53 नवीन
अहो तुम्हाला मरायचंय तर मरा ना. पण तुमच्या सारखे लोक तिकडे हॉस्पिटलं वगैरे महाग करतात त्याचं काय? शिवाय अ‍ॅक्सिडेंट झाला कि ट्रॅफिक जॅम होतो ना? मरायचंय तर तिकडे मुठेत जा, फास लावून घ्या, विष प्या. उगीच दुसर्‍याची खोटी करायची तत्वाचा प्रश्न वगैरे घेवून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
म
मोहनराव गुरुवार, 11/13/2014 - 10:51 नवीन
कायद्याचा वचक असल्याशिवाय काही लोकांना समजत नाही मग सक्ती ही करावीच लागणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव
H
hitesh गुरुवार, 11/13/2014 - 10:00 नवीन
पोलिओचा डोस सर्वानी नाही घेतला तरी शंभरातल्या वीसच मुलाना पोलिओ होईल. मग पोलिओचे डोसही औस्शध कंपन्यांच्या हितासाठी सरकार देते असे ओरडुन तेही बंद करणार का ? ..... हेल्मेटमुळे प्राण नक्कीच वाचतात.. अपघातात हेड इन्जुरी ही सर्वात अधिक आढळणारी गंभीर इन्जुरी आहे.
  • Log in or register to post comments
य
यसवायजी गुरुवार, 11/13/2014 - 10:04 नवीन
पोलिओचा डोस १८ वर्षावरच्या मुलांना देतात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
ज
जेपी गुरुवार, 11/13/2014 - 10:06 नवीन
हितेस भाई, हेल्मेट वापरणे चांगले आहे.आमचा नाना हेल्मेट वापरायचा नाय.गेला बिचारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
क
काळा पहाड Fri, 11/21/2014 - 18:56 नवीन
नाना मेला काय? अरेरे! धोपटायला बरा होता हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 11/13/2014 - 12:10 नवीन
मग पोलिओचे डोसही औस्शध कंपन्यांच्या हितासाठी सरकार देते असे ओरडुन तेही बंद करणार का ?
जर कोणी पोलिओ चा डोस घेतला नाही तर पोलिओ पुन्हा पसरण्याची शक्यता आहे, ज्या मुळे दुसर्‍यांना इजा होउ शकते. त्यामुळे ती सक्ती समजु शकतो पण मी हेल्मेट घातले नाही तर दुसर्‍या कोणाला काय त्रास होणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 11/13/2014 - 10:07 नवीन
हेल्मेट वापरण्याचे तोटे अनेक आहेत. विशेषतः मानदुखी/पाठदुखी असणार्‍यांसाठी हेल्मेट हे अत्यंत त्रासदायक आहे.
अशा लोकांनी दुचाकी तरी का चालवावी? चालत जावे वा रि़क्षा करावी असे आमचे मत.
कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत?
हात टेकले ह्या संशयित पुणेकरांपुढे.हेल्मेट सक्तीला विरोध करणार्यामागे खाजगी,महागड्या हॉस्पिटलांची लॉबी तर नाही ना?
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 11/13/2014 - 10:16 नवीन
च्यायला या पुणेकरांचा वेळ जात नाही म्हणून असल्या कुरापती काढत बसतात. फटके मारून हाकलून द्यायला पाहिजे, हेल्मेट वापरा नाहीतर दंड भरा, सोप्प आहे, उगाच काहीतरी. चांगली काहीतरी सुधारणा आणायचा प्रयत्न करतय कोणी तर कशाला काड्या घालतात हो?
  • Log in or register to post comments
म
मोग्याम्बो गुरुवार, 11/13/2014 - 10:33 नवीन
हेल्मेट सक्ती योग्यच आहे. जरा विचार करून पहा. ट्रीपल सीट जाणे सुद्धा धोक्याचे आहे. त्यावेळी धोका हा स्वतः वाहन चालक आणि त्यावर स्वार असलेले लोक यांना असतो. जर ट्रिपल सीट ला बंदी हा कायदा नसता तर रोज आपल्याला बरेच जण ट्रिपल सीट वर दिसले असते. तसेच हेल्मेट सक्तीचे पण होईल. एखादी सक्ती असल्याशिवाय भारतीय माणूस सुधारत नाही
  • Log in or register to post comments
र
रायनची आई गुरुवार, 11/13/2014 - 10:35 नवीन
एकच प्रश्न..पुण्यात समस्त महिलावर्ग स्कूटी चालवताना डोक्यावरून स्कार्फ गुंडाळतात त्याचा सुरक्षेच्या दृष्टीने काही उपयोग आहे का? म्हणजे स्कार्फ असल्यास चालत्या स्कूटी वरुन पडूनही डोक शाबूत राहत का? :-)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/13/2014 - 10:40 नवीन
म्हणजे स्कार्फ असल्यास चालत्या स्कूटी वरुन पडूनही डोक शाबूत राहत का?
हो तर! फक्त तो स्कार्फ लोखंडी किंवा मजबूत प्लास्टिकचा असला म्हणजे झालं. नायतर भारतात राहूनही सौदीराज्याचे नियम पाळण्यापलीकडे स्कार्फचा उपयोग शून्य. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रायनची आई
ह
हाडक्या गुरुवार, 11/13/2014 - 11:11 नवीन
नायतर भारतात राहूनही सौदीराज्याचे नियम पाळण्यापलीकडे स्कार्फचा उपयोग शून्य.
*lol* . *lol* . *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
विजुभाऊ गुरुवार, 11/13/2014 - 10:41 नवीन
पुण्यात हेल्मेटसक्ती हवीच त्या शिवाय डावीकडून ओव्हर टेक करणे , वाहन रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवणे , सिग्नलवर डावीकडचा रस्ता पूर्ण ब्लॉक करणे. इत्यादी स्पेश्यल पुणेरी प्रकाराना सुद्धा चाप लावायला हवा. हेल्मेटचा एक मोठ्ठा फायदा हा आहे की हेल्मेट वापरण्याने हवेत थुंकणारांचे प्रमान आटोक्यात रहाते. पुण्यात हा दुहेरी फायदा होतो.
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 11/13/2014 - 11:39 नवीन
या प्रतिसादात उल्लेखलेल्या प्रत्येक गोष्टीवर कायद्याने बंदी आहेच. तिची सक्तीने फक्त अंमलबजावणी झाली पाहिजे. पण कृपया अशा बाबींना पुणेरी स्पेशलपणाचे लेबल लावण्याचा आततायीपणा करू नये असे सुचवतो. या प्रकारचा माज इतरत्रही पाहिला आहे. आणि त्याचे कुठल्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 11/13/2014 - 13:10 नवीन
हेल्मेट वापरण्याने हवेत थुंकणारांचे प्रमान आटोक्यात रहाते. पुण्यात हा दुहेरी फायदा होतो.
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
V
vikramaditya गुरुवार, 11/13/2014 - 11:12 नवीन
हेल्मेटलाच नसुन प्रत्येक गोष्टीला असतो. कुठलाही कायदा पाळायचा तर भारतीयांच्या जीवावर येते. पण भारतात बरं का. बाहेरच्या देशात आवाज बंद... तिथे गेल्यावर शिस्तीचे वारेमाप कौतुक.
  • Log in or register to post comments
श
शिद गुरुवार, 11/13/2014 - 12:12 नवीन
सहमत...वरील हेल्मेट सक्तीबद्दलच्या सर्वच प्रतिसादांना +१. धोके व जोखीम माहीत असूनसुद्धा हेल्मेट सक्तीला विरोध करण्यार्‍यांबद्दल नवल वाटतंय. माझे भावजी रात्रीच्या वेळी बाईक वरून येत होते. काळोखात रस्त्यावरील असलेल्या रेतीचा अंदाज आला नाही व बाईक १०-१५ फुट घसरली. शरीराची डावी बाजू पुर्ण खरचटून निघाली पण हेल्मेट असल्या कारणानं तेवढ्यावरच निभावलं. त्यामूळे जीव वाचवायचा असेल तर हेल्मेट घालणं जरुरी आहे पण लोकांना चांगलं सांगून कळत नसल्यामूळे सरकारला सक्ती करावी लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vikramaditya
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 11/13/2014 - 12:04 नवीन
दुसरीकडे ह्याच लेखावर टाकलेला प्रतिसाद इथे चिकटवतोय -- हेल्मेट चा उपयोग आहे की नाही हा खरा मुद्दा नाहीये. खरा मुद्दा हा आहे की ह्या भारत सरकारला हेल्मेट सक्ती करायचा अधिकार आहे का? त्याची कारण म्हणजे - कोणालाही दुचाकीवरुन जाताना अपघात झाला तर सरकार उपचाराची फुकट व्यवस्था करत नाही. कोणी मेले तर भरपाई देत नाही. मग सरकारला काय अधिकार आहे हेल्मेट सक्ती करायला? ज्या देशात कल्याणकारी योजना आहेत आणि वैद्यकीय उपचार सरकारची जबाबदारी आहे तिथे अशी सक्ती समजु शकतो, भारत सरकार कुठल्या अधिकारात हे सांगते आहे? - हेल्मेट न घालता एखाद्याने दुसर्‍याला इजा केली ( अपघात करुन ) तरी सरकार काही वेगळी जबाबदारी घेत नाही. - हेल्मेट न घातल्या मुळे कोणी कायमचा अपंग झाला, तर सरकार पेन्शन वगैरे देत नाही. हेल्मेट घातले असले तरी देत नाही. - हेल्मेट घातले कींवा नाही ह्याने सरकार वर कुठलाही वेगळा बोजा पडत नाही. - विमा कंपनी हेल्मेट घालत नसाल तर जास्त प्रिमियम मागू शकते, पण भारत सरकार कुठलाही नैतिक अधिकार नाही सक्ती करायचा.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 11/13/2014 - 12:18 नवीन
साध्या जगभर समजणार्या तर्काचे तर्कट बनवून कसा प्रतिवाद करायचा हे पुणेकरांकडुन शिकावे.असो. काहीतरी फुकट मिळालेच पाहिजे हे अगदी पुणेरी धर्माला जागून हो. प्रसाद, अधिकार आहेच सरकारला असे नियम करण्याचा. अनैतिक असेल तर पुणेकरांनी कोर्टात सरकारला खेचावे असे हे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 11/13/2014 - 12:35 नवीन
अधिकार आहे ( माहीती नाही ), पण नैतिक अधिकार नक्की नाही. दुर्दैवाने कोर्टात लोक हेल्मेट्च्या उपयुकतेबद्दल च युक्तीवाद करतात. त्यामुळे सरकार जिंकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
क
कपिलमुनी गुरुवार, 11/13/2014 - 13:15 नवीन
तुम्ही पण कोर्टात जावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 11/13/2014 - 13:22 नवीन
त्या पेक्षा गांधींनी कायदे मोडायला शिकवलेच आहे भारतीयांना आहे तेच करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/13/2014 - 13:30 नवीन
गांधींनी कायदे मोडले पण त्यासंबंद्धीच्या दंडाबद्दल कूरकूर केली नाही. गांधीजींचा दुसरा गुणही अंगी बाणवावा, मग काहीच समस्या नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
क
कपिलमुनी Tue, 11/25/2014 - 12:29 नवीन
बरोबर बोललात एक्का काका ! लोक सोयीचे गांधी तेवढे उचलतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा