हेल्मेटसक्ती
अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mounting concerns over return to Cold War-style troop build up in Europe S-500 Missile System Offers ‘World-Beating’ Features to Guard Russia Skiesमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mounting concerns over return to Cold War-style troop build up in Europe
S-500 Missile System Offers ‘World-Beating’ Features to Guard Russia Skies
२०km च्या स्पीडने असिसिडेन्ट झाल्यास किती नुकसान होऊ शकते?-- फार काही नाही, मात्र रस्त्यावर एकाद्या २०km च्या स्पीडने चालणार्या वाहनाचा तुम्हाला धक्का लागला किंवा एकाद्या खड्यामुळे तुम्ही दुचाकीसहीत रस्त्यावर पडलात व त्याचवेळी मागून २०km च्या स्पीडने एकादा ट्रक येत असेल तर तो ट्रक तुमच्या डोक्यावरुन जाऊन तुमचा जीव जाऊ शकतो इतकेच नुकसान होऊ शकते. --सामान्य दुचाकीस्वारांच्या दु:खाची आणि दैनंदिन हलाखीची कल्पना त्यांना नसते.-- दुचाकी चालवताना लोकांना स्वत:च्या सुरक्षेपेक्षा, होणार्या दु:खाची आणि दैनंदिन हलाची चिंता अधिक आहे, हे पाहून आश्चर्य वाटले.