Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल

स
संदीप डांगे
Sat, 01/10/2015 - 23:32
🗣 358 प्रतिसाद
फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल सगळीकडे गदारोळ सुरु आहे. हजारो लोक रस्त्यांवर आले आहेत "अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला", "आम्ही सगळे चार्ल्स हेब्डो", वैगेरे वैगेरे. आणि त्यातल्याच काही अतिउत्साही महाभागांनी परिसरातल्या मस्जीदी उध्वस्त करून आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावला. मृतांबद्दल सहानुभूती असणे योग्यच आहे पण ती किती योग्य ते जरा तपासून बघायला हवी. मी स्वतः एक कलाकार असून कट्टरवाद्यांच्या भूमिकेतून मी ह्या हल्ल्याचे समर्थन केले कारण कुणीतरी हा वेगळा दृष्टीकोन मांडणे आवश्यक आहे, जो काही धाडसी वार्तापत्रे मांडत आहेतच. जेणे करून ह्या हत्याकांडाच्या इतर बाबींवर प्रकाश पडावा व मुस्लिमांची जी एकच एक प्रतिमा रंगवली जात आहे तो प्रयत्न हाणून पाडवा. पण काही मित्रांना माझा हा पवित्रा खटकला आणि त्याचे चेपू वर पडसाद उमटले. तिथे उदधृत काही विचार माझ्यापेक्षा जास्त चांगला,व्यवस्थित आणि माहितीपूर्ण विचार करणाऱ्या जाणकार मिपाकारांसमोर ठेवत आहे. चर्चा अपेक्षित आहे. "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने केलेल्या खोडसाळपणाबद्दल आज कुणीही बोलत नाही कारण कुणाची हत्या होणे म्हणजेच फार भयंकर एवढेच सामान्यपणे लोक समजतात. ज्याची हत्या झाली तो भारी निष्पाप आणि मारणारा क्रूर अविचारी नराधम. त्याच वेळेस गोडसेच कसे बरोबर, गांधी कसे मारण्याच्याच लायकीचे होते हे गेली साठ वर्षे आपण चघळत आहोत. म्हणजेच काय तर मारणारा आणि मरणारा ह्यापैकी जो आपला त्याचीच बाजू बरोबर. ह्यासंदर्भात आपण दोन अतिशय वेगळ्या गोष्टी लक्ष्यात घेतल्या पाहिजेत, एक म्हणजे, "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने फार खवचट आणि असंस्कृत अश्या व्यंगचित्रातून पैगंबरांचा अपमान केला. त्या साप्ताहिकाचा असे करण्यामागचा हेतू जाणून बुजून भावना दुखावून उचकवणे (provocative) असाच होता. माझा आक्षेप हा हत्याकांडाच्या पूर्वी झालेल्या बेजबाबदारपणाबद्दल आहे. लोक आज म्हणत आहेत कि "साधे एक चित्र काढले तर थेट गोळ्या घालायची काय गरज होती?" ते चित्र इतरांसाठी साधे असेल मुस्लिमांसाठी नाही हा एक मुद्दा, त्यातल्या एका व्यंगचित्रकाराचे मत असे होते "माझ्यासाठी पैगंबर पवित्र वैगेरे काही नाही, मी काही कुराणाचा कायदा मानत नाही, मी फ्रेंच कायदा मानतो." म्हणजेच इतरांच्या श्रद्धास्थानाला घाणेरड्या पद्धतीने चितारणार, त्यांचा अपमान करणार, वरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गळे काढणार. म्हणजे त्याला ज्या पद्दतीने इतरांच्या आत्मसन्मानाची हिंसा करता येणार ते तो करणार, त्याच्यावर इतरांनी त्यांच्या पद्दतीने प्रतिकार केला तर चूक. हा काय तर्क आहे? शब्द आणि चित्रांचे वार जास्त घातक असतात. बंदुकीपेक्षा लेखणी ताकतवान ते उगाच नाही म्हणत. एक गोळी एका वेळेस एकाला मारते. एकच चित्र लाखोंना लाखो वेळा आणि आयुष्यभर मारते. त्यामुळे लेखणी चालवताना हजारदा विचार करावा लागतो. दुसरी गोष्ट अशी कि जाणून बुजून केल्या जाणाऱ्या अपमानाचा बदला घेण्याची त्यांची ती रीत असेल, चांगली आहे कि वाईट आहे ह्यावर "आपण" कितीही काथ्याकुट केला तरी ते लोक बदलणार नाही. "हम करे सो कायदा" असाच सगळा प्रकार आहे तिकडे. जे काही बदलायचे आहे ते हेच बदलायचे आहे. जगातल्या सर्व मुस्लिमांना हे जाणवून देणे आवश्यक आहे कि "हम करे सो कायदा" हा प्रकार त्यांच्या जीवावर इतर मुठभर लोक करत आहेत. आणि आज तो शांतीप्रिय मुस्लिमांना व जगाला त्रासदायक ठरत आहे. ते करायचे सोडून तुम्ही जर पैगंबर आक्षेपार्ह स्थितीत दाखवले तर शांतीप्रिय मुस्लिम सुद्धा भडकून उठतील आणि जो उद्देश आहे तो उरणारच नाही. माझा मुद्दा फार साधा आहे. दहशतवाद (कोणताही, कारण जगात मुस्लिम दहशतवाद सोडून इतर अनेक धर्माचे, देशाचे, समाजाचे दहशतवादी आहेत. मिडिया त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो हा भाग वेगळा) व त्याबद्दल लिहिताना किंवा चित्र काढताना किमान एक लक्ष्यात घेतले पाहिजे कि कुठल्याही दहशतवादाला केवळ एकच एक बाजू नसते. हजारो कारणे आहेत. एक कलाकार म्हणून तुम्हाला सर्वांगीण विचार किंवा समजूतदारपणा दाखवता येत नसेल तर तुम्ही मरण्याच्या लायकीचेच असाल. हुसैनला आपण हिंदुनी का भारताबाहेर घालवले मग? पिके विरुद्ध का आंदोलन चालू आहे? जे चूक आहे त्याबद्दल जरूर लिहावे. लिहायला, छापायला मिळते म्हणून मर्यादा ओलांडू नये. साधीशी गोष्ट आहे. माझ्या-तुमच्या हातून काही गुन्हा घडला तर मला -तुम्हाला शिक्षा व्हावी किंवा ज्याने कुणी पाणउतारा करायचा त्याने माझा-तुमचा करावा. पण कुणी चारचौघात त्या गुन्ह्याला धरून आपल्या आई-बापावर अतिशय वाह्यात टीका केली तर ते तुम्ही किंवा मी सहन करू शकू काय? मुस्काट नाही का फोडणार त्याचे? बाकी राज्यघटना आणि कोर्टस याबद्दल, तर खूप दिवसांपासून चारली हेब्दो ला त्याचे धंधे बंद करण्यास सांगितले होते, त्याने ऐकले नाही. त्याच्याविरुद्ध केस म्हणजे "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी" म्हणून केस होत नव्हती. त्याचवेळेस स्वेच्छेने बुरखा घालणाऱ्या स्त्रियांवर बुरखा न घालण्याची सक्ती करून फ्रेंच सरकार एक वेगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत होते. (बहुतेक मुस्लिम स्त्रियांना बुरखा घालणे आवडते असे साधारणपणे वाचनात आले आहे, किंवा त्यांना ते त्यांचे दमन वैगेरे वाटतच नसेल कदाचित.) आंतरराष्ट्रीय स्तरावर मुस्लिम समाजाबद्दल फार दुटप्पी कारभार आहे. प्रत्येक कट्टरवादी आपलेच तेच खरे म्हणत असतो. तो धार्मिक असो वा कुठलाही. दोन घटना सांगतो. माझ्या ओळखीतले एक वयस्कर दलित पोलिस इन्स्पेक्टर होते, ते मला म्हणाले तू एक चित्र प्रदर्शन भरव, तुला काय पैसा लागेल तो मी पुरवतो. पण चित्रे माझ्या संकल्पनेनुसार असली पाहिजेत. श्रीराम आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया याबद्दल अतिशय गलिच्छ प्रकारे त्यांनी वर्णन केले व म्हणाले हाच खरा इतिहास आहे. शबरी काही म्हातारी नव्हती तर ती एक तरणीताठी युवती होती, त्यांच्यात प्रेमालाप दाखव इत्यादी इत्यादी. त्यावेळेस मीसुद्धा देव वैगेरे मानणारा नव्हतो आणि रामायणातल्या असंख्य विसंगती मलाही दिसत होत्या. पण त्यांचे उद्दिष्ट वेगळे होते, त्यांना रामाचे जनमानसात असलेले पूज्यस्वरूप मलिन करायचे होते. कारण काय तर हिंदू धर्म कसा फालतू आहे हे सिद्ध करायचे. आणि "त्यांनी" स्वीकारलेला बौद्ध धर्म कसा श्रेष्ठ असे मिरवायचे. मी त्यांना सरळ नकार दिला कारण हे सगळेच बेसलेस आहे. मुद्दलातच चुकीचे आहे. एखाद्या धर्मात काही चुकीचे चाललेले असेल तर ते बदलण्याऐवजी त्यांच्या पुज्यस्थानावर हल्ला करा ते डळमळीत करा, हेच केले जाते. म्हणजे जे चुकीचे आहे ते तर चालू राहते, लोक मूर्ख राहतात आणि फ्रेममधला राम जाऊन बुद्ध किंवा जीजस येतो. कारण लोक शहाणे झाले तर सगळ्याच फ्रेम्स फेकून देतील, मग ह्या तमाम धर्मगुरुंचे कसे चालणार? पु ल देशपांडे यांचा एक अतिशय सुंदर वैचारिक लेख आहे यावर. त्यात त्यांनी धर्मश्रद्धांवरील आक्रमण आणि त्याचे माणसाच्या मनावर होणारे परिणाम याबद्दल लिहिले आहे. दुसरी घटना. एकदा एका मित्राशी वाद झाला होता "भारतीय मुस्लिम शाळांमधून वन्दे मातरम म्हणत नाहीत" यावरून. त्यावेळी तो जो पेटला होता आणि त्याच्या डोळ्यांतून अक्षरश आग बरसत होती. मी म्हणालो कि त्यांना म्हणायचे कि नाही त्यांचे त्यांना ठरवू दे आपण त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत. त्यावर तू फारच चिडला होता. तेव्हा ते त्याचे वन्दे मातरम "लादणे" असेच होते. स्वतंत्र भारतात प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. कुणी एक त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत, हिंदू संघटना मुस्लिम शाळेतल्या वन्दे मातरम बद्दल फार संवेदनशील आहेत. जणू काही त्यांनी वन्दे मातरम नाही म्हटले म्हणजे ते देशद्रोही. मग आपले हिंदू धड राष्ट्रगीत ना म्हणू दे ना, तिकडे लक्ष नाही देणार. हा एक प्रकारचा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन आहे. मोठ्या संख्येने मुस्लिम सैन्यात आहेत, शहीद होतात, देशात इतरही क्षेत्रात देशाचे नाव मोठे करतात, तरी त्यांच्यावर संशय घेतोच. दोन धर्मात कुणीतरी दंगली घडवून आणतो, आपण एकमेकांची डोकी फोडतो. आणि दोघेही आयुष्यभर त्यांनी असे केले म्हणून आम्ही तसे केले म्हणत असतो. फायदा घेणारा फायदा घेऊन मोकळा. आपले बरेच मुस्लिम मित्र असतील. कधी त्यांना फेस टू फेस विचारून बघा. त्यांना काय वाटते ते. ते काहीही बोलले तरी "ते आपल्याशी कधीच खरे बोलणार नाहीत" हाच गंड सर्वसामान्य हिंदू बाळगून असतो. दुर्दैवाने तो खरा कि खोटा हे कुणीच कधी सांगू शकणार नाही. समाजसुधारणेचा आव आणणाऱ्या सर्वाना परिस्थितीचे पूर्ण भान आवश्यक आहे. समाजात सुधारणा करण्याची खरीच अपेक्षा व तळमळ असणारे कुणाची खिल्ली उडवत नाहीत. नाहीतर प्रकाश आमटे आदिवासींना नुसते "तुम्ही किती बावळट आणि मागासलेले आहात" असेच म्हणत राहिले असते कि झाली असती त्यांच्यात सुधारणा. आणि राजा राम मोहन राय यांनी घाणेरडी व्यंगचित्रे काढली असती तर सतीप्रथा बंद झाली असती. महात्मा फुले लोक मुलीना शिकवत नाहीत म्हणून लोकांना वाकुल्या दाखवत राहिले असते. इतरही अनेक उदाहरणे आहेत. याउपरही हाच आणि असाच मार्ग असेल तर शेवटही असाच होईल. मुस्लिमांच्या शरिया ची भीती घातली जाते. इतर लोक छुप्या मार्गाने तेच करतात ते मात्र नामानिराळे. दुतोंडी जे म्हणतो मी ते हेच. सगळीकडेच हे होत आहे. आपणच काहीतरी करायला पाहिजे दरी मिटवायला. नाही का? जाता जाता: ज्या जगात अमेरिका सारखा देश आहे, त्याने कधीही शांततेने जगता येईल असा विचार करू नये. अमेरिका फार कुटीलतेने दोन राष्ट्र, दोन समूह, दोन समाजामध्ये तेढ व अविश्वास निर्माण करण्यासाठी व त्यातून आपला फायदा आणि वर्चस्व मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या दोन महिन्यात तेल-जगतात काय चालले आहे ते बघावे आणि आस्ट्रेलिया व फ्रांस मध्ये झालेल्या हल्ल्यांचा संबंध जोडता येतो का ते पाहावे. घटना फार सरळ आणि उघड जरी असल्या तरी त्या तितक्या सरळ कधीच नसतात. माझे मत तर असे आहे कि नेहमीप्रमाणे मुस्लिम जगताविरुध्द जनमत तापवण्याचा हा प्रकार अमेरिका करत आहे. सदर दोन्ही हल्ले अमेरिका पुरुस्कृत आहेत. कारण दोन्ही हल्ल्यांच्या कार्यपद्धतीत फारच विसंगती आहेत. ज्या साधारणपणे आढळत नाहीत.

प्रतिक्रिया द्या
123231 वाचन

💬 प्रतिसाद (358)
श
श्रीगुरुजी Fri, 01/16/2015 - 16:51 नवीन
>>> माझ्या मते तरी जगात चूक-बरोबर, चांगले-वाईट हे सगळे सापेक्ष असते. ही सापेक्षता आपल्या अनुभव आणि विचारांवर अवलंबून असते. प्रत्येकवेळी सापेक्ष असतेच असे नाही. उदा. तान्हे मूल हे निरागस आहे ही भावना सापेक्ष नाही. ती व्यक्तीनुसार, अनुभवानुसार किंवा विचारानुसार वेगळी असूच शकत नाही. किंवा पेशावरमधील १३२ शाळकरी मुलांना मारण्याचे कृत्य हे अत्यंत क्रूर असून ते करणारे नराधम आहेत हा विचार सापेक्ष असूच शकत नाही किंवा ही भावना व्यक्तीनुसार, अनुभवानुसार किंवा विचारानुसार वेगळी असूच शकत नाही. >>> तर मग आपण एक हिंदू म्हणून म्हणा किंवा एक सज्जन, पापभिरू, न्यायप्रिय, कायदेप्रिय, घटनाप्रिय सुजाण नागरिक म्हणून एकूण मुस्लिम लोकांशी कसे वागावे? कसे वागावे म्हणजे एक तर रोजच्या जीवनात आणि विशिष्ट परिस्थितीत. विशिष्ट परिस्थिती जसे कि दंगल, मारहाण, बाचाबाची यात आपण स्वाभाविक प्रतिक्रिया देतो. पण रोजच्या जीवनात कसे वागावे? देशाचा एक सज्जन, पापभिरू, न्यायप्रिय, कायदेप्रिय, घटनाप्रिय सुजाण नागरिक देशाच्या दुसर्‍या सज्जन, पापभिरू, न्यायप्रिय, कायदेप्रिय, घटनाप्रिय सुजाण नागरिकाशी जसे वागणे अपेक्षित आहे तसेच वागावे. >>> म्हणजे अब्दुल कलाम यांनी भारताच्या संरक्षण सज्जतेत आणि अंतराळ विज्ञानात जी बहुमोल कामगिरी केली आहे त्यांच्याशी मी कसे वागावे? एखाद्या देशप्रेमी शास्त्रज्ञाबरोबर जसे वागणे अपेक्षित आहे तसेच वागावे. >>> झाकीर हुसैन यांचा तबला ऐकू कि नये? नक्कीच ऐकावा व आनंद घ्यावा. >>> झहीर खान याने एखाद्या पाकिस्तान्याचा त्रिफळा उडवला तर आनंदाने उडी मारावी कि नको? एक कशाला, अनेक उड्या माराव्यात. >>> उत्तम काम करणाऱ्या एखाद्यास आपल्या संस्थेत कामाला ठेवावे कि नको? एखाद्या मुस्लिम व्यापाऱ्याकडून अतिशय स्वस्तात आणि आदराने वस्तू अथवा सेवा मिळत असेल तर ती घ्यावी कि नको? अझीम प्रेमजी यांच्या विप्रो मध्ये काम करावे कि नको? त्यांच्या कंपनीच्या सेवा किंवा वस्तू घ्याव्यात कि नको? रेहमान चे संगीत ऐकावे कि नको? जोपर्यंत मुस्लिम किंवा हिंदू किंवा इतर कोणीही देशाशी द्रोह करत नाहीत तोपर्यंत ते आदरणीयच आहेत. >>> कारण ते सर्व मुस्लिम आहेत आणि सर्व मुस्लिम हे दहशतवादी आहेत. (दहशतवाद्यांना समाजातूनच प्रोत्साहन आणि पैसा मिळतो म्हणून.) असं कोण म्हणालं? >>> म्हणजे कसे आहे, वर वर जरी ती व्यक्ती व्यवस्थित वागत असली तरी आतल्या आत दहशतवादी असू शकते, त्यांना पैसा पुरवू शकते, माहिती पुरवू शकते. तेंव्हा नेमके वागायचे कसे? जेव्हा त्या व्यक्तीचे खरे स्वरूप उघड होईल तेव्हा एखाद्या देशद्रोह्याशी वागावे तशी वर्तणूक असावी. मी पूर्वी अझरूद्दीनचा जबरदस्त फॅन होतो. मनोज प्रभाकरची आक्रमकता मला आवडायची. हसतमुख अजय जडेजा आवडायचा. जेव्हा त्यांचा मॅचफिक्सिंगमधील सहभाग सिद्ध झाला व त्यांच्यावर बंदी झाली तेव्हापासून ते टीव्हीवर दिसले तरी संताप येतो. >>> एक माणूस म्हणून मी दुसऱ्या माणसाशी कसे वागावे? त्याचा जात-धर्म ध्यानात ठेवून वागलो तर ते आपल्या मूळ संस्काराशी जुळत नाही. (मूळ संस्कार "सगळ्यांशी माणुसकीने वागावे"). दुसरा माणूस असेल तर माणसासारखेच वागावे. दुसरा जनावरासारखा वागत असेल तर वागणूक वेगळी द्यावीच लागेल. >>> माझ्या समोर असलेला, बसलेला, राहत असलेला व्यक्ती (तो हिंदू, मुस्लिम, गुजराती, मद्रासी, पुरुष, स्त्री , काहीही ) प्रत्यक्ष माझ्यासमोर काहीही वाईट कृत्य करत असेल तर मी त्यावर तिथेच आणि त्यालाच प्रतिक्रिया देऊ शकतो किंवा परिस्थितीनुसार नाही देऊ शकत. पण फक्त त्याच माणसाबद्दल मी माझ्या मनात एक प्रतिमा बनवेल आणि आयुष्यभर त्याच्याशी तसाच वागेन. पण तो ज्या धर्माचा आहे त्या सगळ्या धर्माच्या लोकांशी तसेच वागावे का? याची आवश्यकता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 01/16/2015 - 19:09 नवीन
पेशावरमधील १३२ शाळकरी मुलांना मारण्याचे कृत्य हे अत्यंत क्रूर असून ते करणारे नराधम आहेत हा विचार सापेक्ष असूच शकत नाही
"We selected the army's school for the attack because the government is targeting our families and females," said Taliban spokesman Muhammad Umar Khorasani. "We want them to feel the pain." हे पठाणी लोक म्हणजे डोळ्यास डोळा न्याय प्रकारातले आहेत. ती त्यांची जीवनशैली आहे. एखाद्यास मित्र मानले तर त्याच्यासाठी जीव द्यायची त्यांची तयारी असते, आणि शत्रू मानले तर मात्र खैर नाही. पण मी मुलांच्या हत्याकांडाचा निषेध करतोच कारण त्या मुलांनी असा काय गुन्हा केला होता कि त्यांचा विनाकारण अशा क्रूर पद्धतीने जीव जावा.
असं कोण म्हणालं?
तुमचे प्रतिसाद तर धर्मालाच टार्गेट करत आहेत, नाही का? दहशतवादी ज्या धर्मातून येतात, ज्या धर्मासाठी स्वत:चे आणि इतरांचे रक्त सांडतात, ज्यांच्या धर्मातच काफरांना जीवे मारण्याच्याबद्दल लिहिलंय, तो धर्मच चुकीचा नाही का झाला मग?
जोपर्यंत मुस्लिम किंवा हिंदू किंवा इतर कोणीही देशाशी द्रोह करत नाहीत तोपर्यंत ते आदरणीयच आहेत.
करत नाही असे म्हणण्यापेक्षा उघडकीस येत नाही तोपर्यंत असे म्हणा. बऱ्याचदा आपल्या हातून कळत नकळत देशद्रोह होऊन जातो, त्याचे काय?
जेव्हा त्या व्यक्तीचे खरे स्वरूप उघड होईल तेव्हा एखाद्या देशद्रोह्याशी वागावे तशी वर्तणूक असावी. मी पूर्वी अझरूद्दीनचा जबरदस्त फॅन होतो. मनोज प्रभाकरची आक्रमकता मला आवडायची. हसतमुख अजय जडेजा आवडायचा. जेव्हा त्यांचा मॅचफिक्सिंगमधील सहभाग सिद्ध झाला व त्यांच्यावर बंदी झाली तेव्हापासून ते टीव्हीवर दिसले तरी संताप येतो.
क्रिकेटचा आणि देशद्रोहाचा काय संबंध? तुमच्यासाठी क्रिकेट हा धर्म असेल पण माझ्यासाठी एक फालतू खेळ असू शकतो. त्यांच्या फिक्सिंग ने कुणाचा जीव नाही गेला मग तुम्हाला एवढा संताप का येतो?
दुसरा माणूस असेल तर माणसासारखेच वागावे. दुसरा जनावरासारखा वागत असेल तर वागणूक वेगळी द्यावीच लागेल.
कोण जनावरासारखे वागवते आणि कोण जनावरासारखे वागते याचे प्रत्येक समुदायात नियम वेगवेगळे आहेत. एकाच पातळीवर कसे मोजणार? बरेच सुशिक्षित हुच्चभ्रु नवरे आपल्या बायकांना जनावरांसारखे वागवतात, मुलीना मारून टाकतात तेंव्हा हा सुशिक्षित हुच्चभ्रु समाज त्यांच्याशी कसा वागतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 01/17/2015 - 09:43 नवीन
>>> हे पठाणी लोक म्हणजे डोळ्यास डोळा न्याय प्रकारातले आहेत. ती त्यांची जीवनशैली आहे. नरमांस खाणे ही एखाद्या गटाची जीवनशैली असली तर ती मान्य करायची का? तद्वत पठाणांची जीवनशैली काहीही असली तरी मुलांची हत्या समर्थनीय नाही. या हत्येसंदर्भात सापेक्ष मत असूच शकत नाही. >>> एखाद्यास मित्र मानले तर त्याच्यासाठी जीव द्यायची त्यांची तयारी असते, आणि शत्रू मानले तर मात्र खैर नाही. बादवे, हा पठाणांबद्दल गैरसमज पसरविलेला आहे. विशेषतः काबुलीवाला, जंजीर इ. हिंदी चित्रपटातून पठाण हा अत्यंत दिलदार, विश्वासू, जीवाला जीव देणारा वगैरे दाखविलेला आहे. अफगाणिस्तानवरील अनेक पुस्तकातून पठाणांचे खरे चित्र रंगविले आहे. पठाण हे अत्यंत विश्वासघातकी असून अगदी थोड्या पैशाकरता विश्वासघात करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. >>> तुमचे प्रतिसाद तर धर्मालाच टार्गेट करत आहेत, नाही का? दहशतवादी ज्या धर्मातून येतात, ज्या धर्मासाठी स्वत:चे आणि इतरांचे रक्त सांडतात, ज्यांच्या धर्मातच काफरांना जीवे मारण्याच्याबद्दल लिहिलंय, तो धर्मच चुकीचा नाही का झाला मग? धर्माचे तत्वज्ञान चुकीचे आहेच. परंतु तुम्ही आधी जी उदाहरणे दिली (डॉ. अब्दुल कलाम, झाकीर हुसेन इ.) सन्माननीय अपवाद आहेत. यांच्याव्यतिरिक्त सुद्धा गायक महंमद रफी, डॉ. यू.म. पठाण असे आदरणीय अपवाद आहेत. >>> क्रिकेटचा आणि देशद्रोहाचा काय संबंध? तुमच्यासाठी क्रिकेट हा धर्म असेल पण माझ्यासाठी एक फालतू खेळ असू शकतो. त्यांच्या फिक्सिंग ने कुणाचा जीव नाही गेला मग तुम्हाला एवढा संताप का येतो? तुमच्यासाठी तो फालतू खेळ असला (हाय कंबख्त, तूने पीही नही!), तरी माझ्यासाठी तो धर्म आहे. हजारो प्रेक्षक पदरचे पैसे खर्च करून तिकीट काढून सामने बघतात. कोट्यावधी प्रेक्षक तो सामना दूरदर्शनवर बघतात. असा सामन्यात फसवणूक करणे हे देशद्रोहाचेच उदाहरण आहे. >>> कोण जनावरासारखे वागवते आणि कोण जनावरासारखे वागते याचे प्रत्येक समुदायात नियम वेगवेगळे आहेत. एकाच पातळीवर कसे मोजणार? बरेच सुशिक्षित हुच्चभ्रु नवरे आपल्या बायकांना जनावरांसारखे वागवतात, मुलीना मारून टाकतात तेंव्हा हा सुशिक्षित हुच्चभ्रु समाज त्यांच्याशी कसा वागतो? प्रत्येकजण स्वतःच्या मनाने वागू नये यासाठीच कायदे, नियम वगैरे असतात. दुर्दैवाने भारतात धर्मावर आधारीत वेगळे कायदे केले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 01/17/2015 - 12:56 नवीन
तुमच्यासाठी तो फालतू खेळ असला (हाय कंबख्त, तूने पीही नही!), तरी माझ्यासाठी तो धर्म आहे. हजारो प्रेक्षक पदरचे पैसे खर्च करून तिकीट काढून सामने बघतात. कोट्यावधी प्रेक्षक तो सामना दूरदर्शनवर बघतात. असा सामन्यात फसवणूक करणे हे देशद्रोहाचेच उदाहरण आहे.
क्रिकेटच्या सामन्यात फसवणूक करणे हा देशद्रोह कसा होऊ शकतो, काय तर तुम्हाला तो धर्म वाटतो म्हणून… ? जिथे चार टाळकी वर बसून निव्वळ पैसा बघतात, त्यासाठी वाटेल त्या गोष्टी करतात, तो धर्म नाही हो, व्यवसाय आहे शुद्ध. त्यांच्या फायद्यासाठी ते जनतेला सरळ सरळ *** बनवतात, आणि पब्लिक आपली येड्यासारखी क्रिकेट हा आमचा धर्म आहे वैगेरे करत धुंदीत जगत असते. (हाय कंबख्त, तूने पीही नही!) असे म्हणाल तर काय आहे ना की ही तुमची दारू जिथे बनते ना तिथे प्रत्यक्ष सर्वात वरच्या वर्तुळात मी काम केले आहे. कोण किती पाण्यात आहे, कोण किती धुतल्या तांदळाचा आहे ते पण बघितले. त्यामुळे आत काय आहे आणि बाहेर काय आहे याचा पुरेपूर अनुभव आहे (हाय कंबख्त, तूझे पताही नही!) . त्यामुळे त्या दारूपासून आंम्ही चारशे हात लांबच बरे! (माझ्या टिप्सवर एका सट्टेबाज मित्राने आयपीएल मध्ये १करोड कमावले, यावरून काय तो अंदाज घ्या, प्यायची कि नाही ते)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नगरीनिरंजन Sat, 01/17/2015 - 13:01 नवीन
जिथे चार टाळकी वर बसून निव्वळ पैसा बघतात, त्यासाठी वाटेल त्या गोष्टी करतात, तो धर्म नाही हो, व्यवसाय आहे शुद्ध. त्यांच्या फायद्यासाठी ते जनतेला सरळ सरळ *** बनवतात
अत्यंत सहमत! छान लिहीलंत. विशेष म्हणजे हे वाक्य प्रत्येक धर्मालाही लागू होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 01/17/2015 - 13:11 नवीन
हो, अगदी खरे आहे. हे प्रत्येक धर्माला लागू होते. पैसा आणि अनिर्बंध सत्ता जगात सर्व धर्मप्रसाराच्या मुळाशी असते. इतर कुठल्याही सत्तेला लोक सहजासहजी उलथून टाकतात पण धर्मसत्ता महाकठीण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
आ
आजानुकर्ण Sat, 01/17/2015 - 13:59 नवीन
जिथे चार टाळकी वर बसून निव्वळ पैसा बघतात, त्यासाठी वाटेल त्या गोष्टी करतात, तो धर्म नाही हो, व्यवसाय आहे शुद्ध. त्यांच्या फायद्यासाठी ते जनतेला सरळ सरळ *** बनवतात अत्यंत सहमत! छान लिहीलंत. विशेष म्हणजे हे वाक्य प्रत्येक धर्मालाही लागू होते.
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
प
पिंपातला उंदीर Sat, 01/17/2015 - 14:52 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
सुबोध खरे Sat, 01/17/2015 - 14:59 नवीन
साहेब थोडी गल्लत होते आहे. आय पी एल मध्ये फिक्सिंग झाले तर गोष्ट वेगळी. पण जेथे भारत विरुद्ध दुसरा देश यात असे करणे हा देशद्रोह आहे कारण तुमच्या देशाची प्रतिष्ठा पणास लागलेली आहे/असते. आपण आपल्या देशासाठी खेळतो आहे एवढे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा मराठवाडा सिंह विरुद्ध पुणेरी वाघ किंवा विदर्भ घोडे विरुद्ध कोकणी कोल्हा याला कोण विचारतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
आ
आजानुकर्ण Sat, 01/17/2015 - 15:53 नवीन
बीसीसीआय ही प्रायव्हेट कंपनी आहे. ते खेळतात ते सामने हे भारत वि. दुसरा देश असे असतात ही आपण करुन घेतलेली सोयीस्कर गैरसमजूत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संदीप डांगे Sat, 01/17/2015 - 17:18 नवीन
भारत सरकारविरुद्ध विविध न्यायालयीन खटल्यांमध्ये बी सी सी आय ने आपण स्वायत्त संस्था असून देशाचा व त्यांचा काहीही संबंध नाही असे शपथेवर सांगितले आहे. बी सी सी आय ला लागणारा पैसा ते स्वत: उभे करतात. भारत सरकारचे त्यांच्यावर कसलेही नियंत्रण नाही. खेळाडू त्यांच्यातर्फे खेळतात, देशातर्फे नव्हे. क्रिकेटचा राष्ट्रीय संघ हा खरेतर बी सी सी आय चा राष्ट्रीय संघ असतो. इतर खेळांप्रमाणे क्रिकेटमध्ये देशप्रेम वैगेरे असे काही नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
श
श्रीगुरुजी Sat, 01/17/2015 - 18:21 नवीन
>>> भारत सरकारविरुद्ध विविध न्यायालयीन खटल्यांमध्ये बी सी सी आय ने आपण स्वायत्त संस्था असून देशाचा व त्यांचा काहीही संबंध नाही असे शपथेवर सांगितले आहे. बी सी सी आय ला लागणारा पैसा ते स्वत: उभे करतात. भारत सरकारचे त्यांच्यावर कसलेही नियंत्रण नाही. खेळाडू त्यांच्यातर्फे खेळतात, देशातर्फे नव्हे. क्रिकेटचा राष्ट्रीय संघ हा खरेतर बी सी सी आय चा राष्ट्रीय संघ असतो. इतर खेळांप्रमाणे क्रिकेटमध्ये देशप्रेम वैगेरे असे काही नसते. कर वाचविण्यासाठी व माहिती अधिकाराच्या जाळ्यात न येण्यासाठी बीसीसीआय वाटेल ते सांगू शकते. पण त्यात सत्यांश किती? २०११ मध्ये भारतात झालेली विश्वचषक स्पर्धा कोणी जिंकली होती? भारताने की बीसीसीआय ने? जगभरातील वृतपत्रात क्रिकेट संघाचा भारतीय संघ असा उल्लेख असतो का बीसीसीआयचा संघ? क्रिकइन्फो सारख्या क्रिकेटला वाहलेल्या संकेतस्थळावर सामन्यांच्या व संघाच्या उल्लेखात भारत वि. ऑस्ट्रेलिया असा सामना दाखवितात का बीसीसीआय वि. ऑस्ट्रेलिया? डेव्हिस चषक स्पर्धेत भारताचा संघ असतो का आयटीएचा? हॉकीच्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा संघ असतो की आयएचएचा? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भारतातील कोणत्याही नागरिकाला हे प्रश्न विचारा ते काय उत्तर देताहेत ते बघा. त्यांच्या उत्तरावरून कळेल की या सामन्यात फसवणूक करणे हे देशद्रोह करण्यासारखेच का आहे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
आ
आजानुकर्ण Sat, 01/17/2015 - 19:21 नवीन
अहो गुरुजी जगभरातील वृत्तपत्रांमध्ये मोदींनी मुसलमानांचे शिरकाण केले असेही छापून आले होते. अगदी अमेरिकेने विसाही नाकारला. खरे होते का ते? असं पेपरातल्या गोष्टीवर विश्वास ठेवून चालत नाही. न्यायालयात काय सिद्ध झाले ते पाहा. बीसीसीआयवर भारत सरकारचे आणि पर्यायाने भारतीय जनतेचे काहीही नियंत्रण नाही. पैशासाठी हपापलेली श्रीनिवासन-शरदपवार अशी चार टाळकी ती संघटना चालवतात. त्याला भारतीय संघ म्हणायचं असेल आणि त्यावर तुमची देशभक्तीची व्याख्या अवलंबून असेल तर आनंद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 01/18/2015 - 08:37 नवीन
>>> बीसीसीआयवर भारत सरकारचे आणि पर्यायाने भारतीय जनतेचे काहीही नियंत्रण नाही. निव्वळ बीसीसीआय वर नव्हे तर भारत सरकारचे भारतीय ऑलिंपिक संघटना, भारतीय हॉकी संघटना, भारतीय बॅडमिंटन संघटना अशा कोणत्याही क्रीडा संघटनेवर नियंत्रण नाही. याचा अर्थ असा नाही की भारताचे संघ हे भारत देशाचे नसून या खाजगी संघटनांचे संघ आहेत. ऑलिंपिकमध्ये, आशियायी स्पर्धेत, जागतिक स्पर्धेत भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या माध्यमातून भारत देशाचा संघ सहभाग घेतो. उद्घाटनाच्या सोहळ्यात खेळाडू भारत देशाचा राष्ट्रध्वज घेऊन संचलनात सामील होतात, भारतीय ऑलिंपिक संघटनेचा नव्हे. जेव्हा एखादा भारतीय खेळाडू सुवर्णपदक जिंकतो तेव्हा भारताचे राष्ट्रगीत वाजविले जाते, भारतीय ऑलिंपिक संघटनेचे नव्हे. कारण हा भारत देशाचा संघ असतो. तसेच हॉकी, क्रिकेट अशा कोणत्याही खेळाच्या स्पर्धेत त्या खेळांच्या संघटनेचा ध्वज किंवा गीत नसून भारत या देशाचे राष्ट्रगीत व भारत या देशाचा राष्ट्रध्वज असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
सुबोध खरे Tue, 01/20/2015 - 05:44 नवीन
श्री गुरुजी मुद्देसूद प्रतिवाद करण्याची आपली हातोटी आणि धीर वाखाणण्याजोगा आहे. परंतु डोळ्यावर झापडे बांधलेल्या लोकांना शब्दाचा कीस काढण्यात जर आनंद वाटतो तर तसे असो. त्यांना जागे करण्यात किंवा त्यांची झापडे उघडण्यात काय हशील आहे. असे झापडबंद कम्युनिस्ट आणि समाजवादी लोक आपल्याला सर्वत्र दिसतात. सर्व सामान्य माणूस कोणताही संघ भारतीय संघ म्हणूनच ओळखतो. बी सी सी आय चा नाही मग असे चार लोक काहीका म्हणेनात त्याने काय फरक पडतो. आय पी एल चे तसे आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 01/20/2015 - 07:50 नवीन
धन्यवाद! तांत्रिक मुद्द्यावर कीस काढण्यात अर्थ नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आजानुकर्ण Tue, 01/20/2015 - 13:15 नवीन
ही चर्चा वाचून आता माझ्या डोळ्यावरची झापडे निघाली आहेत. बीसीसीआयने केवळ पैशासाठी आम्ही भारताचे अधिकृत प्रतिनिधी नाही असे सुप्रीम कोर्टात खोटे सांगितले होते. सुप्रीम कोर्टाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. बीसीसीआय (स्वतः म्हणत नसले तरी) भारत देशाचा अधिकृत संघ आहे. बीसीसीआयचा विजय हा भारताचा विजय आहे. बीसीसीआय जे काही करते ते सर्व भारत देशासाठी करते. बीसीसीआयचे खेळाडू हे देशावर लढणाऱ्या सैनिकांप्रमाणे देशभक्त आहेत. बीसीसीआय अध्यक्ष आणि राष्ट्रपती यांच्याप्रती मी माझी निष्ठा कायम ठेवीन जय जवान, जय किसान, जय बीसीसीआय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Tue, 01/20/2015 - 18:11 नवीन
>>> बीसीसीआयने केवळ पैशासाठी आम्ही भारताचे अधिकृत प्रतिनिधी नाही असे सुप्रीम कोर्टात खोटे सांगितले होते. बरोबर >>> सुप्रीम कोर्टाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. दुर्लक्ष केले का नाही ते अजून स्पष्ट नाही. मुद्गल समितीच्या व आयपीएल मधील फिक्सिंगच्या खटल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेला आहे. तो ५ जानेवारीला लागेल असे वाटले होते. परंतु सर्वोच्च न्यायालय अजूनही निकाल राखून आहे. नजीकच्या भविष्यकाळात हा निकाल लागेल. त्यावेळी बर्‍याच गोष्टी स्पष्ट होतील असं वाटतंय. >>> बीसीसीआय (स्वतः म्हणत नसले तरी) भारत देशाचा अधिकृत संघ आहे. चूक. बीसीसीआय ही फक्त संघटना आहे. बीसीसीआयचा स्वतःचा कोणताही संघ नाही. जो संघ आहे तो भारत या देशाचा संघ आहे. >>> बीसीसीआयचा विजय हा भारताचा विजय आहे. चूक. विजय किंवा पराभव हा भारत या देशाच्या संघाचा होतो. बीसीसीआयचा नव्हे. ऑलिंपिकमध्ये पदक मिळते ते भारतीय खेळाडूला मिळते, भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या खेळाडू किंवा संघाला नव्हे. >>> बीसीसीआय जे काही करते ते सर्व भारत देशासाठी करते. बीसीसीआयचे खेळाडू हे देशावर लढणाऱ्या सैनिकांप्रमाणे देशभक्त आहेत. बीसीसीआय अध्यक्ष आणि राष्ट्रपती यांच्याप्रती मी माझी निष्ठा कायम ठेवीन जय जवान, जय किसान, जय बीसीसीआय. इतका त्रागा करू नका हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
अ
अनुप ढेरे Wed, 01/21/2015 - 05:35 नवीन
गुरुजी, या टोपीवर कोणाचं नाव लिहिलय बघा पाहू... Image removed. किंवा या जर्सीवर Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कपिलमुनी Wed, 01/21/2015 - 11:17 नवीन
ते केवळ सोयीस्कर प्रश्नांना उत्तरे देतात . आता फक्त दुसर्‍या फोटो कडे बघून सांगतील तिथे india पण लिहिला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ब
बाळ सप्रे Wed, 01/21/2015 - 11:46 नवीन
भारतातील क्रिकेटच्या नियमनासाठी असलेली BCCI ही एकमेव संघटना आहे. ( इतर सर्व क्रिकेट खेळणार्‍या देशांप्रमाणेच ) त्यामुळे BCCI चा लोगो असल्याने तो भारतीय संघ नाही युक्तिवाद कल्पनेपलिकडला आहे .. बाकी सर्व आंतरराष्ट्रीय संघदेखिल कपड्यांवर राष्ट्रध्वज वगैरे न लावता त्यांच्या संघटनेचे चिन्हच लावतात. BCCI एखाद्या तांत्रिक मुद्द्यासाठी सरकारी हस्तक्षेप टाळण्यासाठी मूर्खासारखे एखादे वक्तव्य करते आणि BCCI चा द्वेष करणारे क्रिकेटशी जास्त आपुलकी नसणारे त्याची री ओढुन त्याचा असा विपर्यास करतात !! एनि वे ज्यांना क्रिकेटशी जर देणे घेणे नसेल तर BCCI काय आणि भारत काय सगळं सारखच.. जर उद्या BCCI म्हणालं की ते वक्तव्य चुकीचं होतं तो भारतीय संघच आहे तर काय हे लोकं क्रिकेटमध्ये जास्त रस घेणार आहे का? मग उगीच कशाला BCCI आणि भारत हा वाद ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Wed, 01/21/2015 - 12:11 नवीन
BCCI ही ICC शी संलग्न अशी एकमेव संस्था आहे असे म्हणा ! कारण ICL चालू झाली होती तेव्हा तिला ICC मान्यता दिली नव्हती .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
स
संदीप डांगे Wed, 01/21/2015 - 12:13 नवीन
सप्रेजी, मुद्दा चुकलाय. क्रिकेटमधली फसवणूक म्हणजे देशद्रोह आहे का? हा मुद्दा आहे. माझ्यामते देशद्रोह हा सर्वव्यापी असतो. त्यात नागरिकास कुठे मुभा नसते. आर्मीतल्या जवानाने फितुरी केली तर तो देशद्रोह कारण त्याचा प्रभाव सगळ्या नागरिकांवर पडतो, त्यात सिलेक्टिव किंवा मी मानतो तुम्ही नाही, तुम्हाला संताप येतो मला नाही असे काही नाही. बाय डिफाल्ट, सगळ्यांनाच ते मान्य असले पाहिजे. क्रिकेटचे तसे नाही. ते एक मनोरंजन आहे फक्त. भारतीय क्रिकेट संघ हा भारतीय लोकांचा बनलेला असला तरी तो भारतीय जनतेला कुठल्याही कायदेशीर पद्दतीने उत्तरदायी नाही. सैनिकाने फितुरी केली किंवा कर्तव्यात कसूर केली तर त्यावर फक्त देशद्रोहाचाच खटला चालतो. क्रिकेटर्स च्या बाबतीत नाही. क्रिकेटप्रेमी जनतेने क्रिकेटद्वेषी जनतेवर क्रिकेटप्रेमातून देशप्रेमाची सक्ती करावी हे अतार्किक आहे. मनोरंजन आणि देशभक्ती ह्या स्पष्ट दोन वेगळ्या संकल्पना आहेत. त्याची सरमिसळ होऊ शकत नाही. बाकी पुढे काही दिवसात याच विषयावर येणाऱ्या नवीन धाग्यावर चर्चा होईलच. मला आता एक वेगळाच प्रश्न पडला आहे, दाउदच्या पैश्यातून बनलेला देशभक्तीपर चित्रपट आपण पाहायला जाऊ का? त्या चित्रपटातून त्याने कमावलेला पैसा हा देशद्रोही कारवायांसाठीच वापरला जाणार तेंव्हा आपली भूमिका काय असावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Wed, 01/21/2015 - 12:35 नवीन
भारतीय क्रिकेट संघ हा भारतीय लोकांचा बनलेला असला तरी तो भारतीय जनतेला कुठल्याही कायदेशीर पद्दतीने उत्तरदायी नाही.
हे मान्य.. खेळाडूने केलेल्या फसवणूकीला देशद्रोह वगैरे ठरवणे एक टोक तर संघ भारताचाच नाही म्हणणे हे दुसरे टोक.. खेळात राष्ट्रीय संघात सामने असले तरी nationalism should not take precedence over sport खेळाचे नियम पाळणे प्रथम असले पाहीजे .. spirit of cricket खाली खेळाडू दोषी ठरु शकेल देशद्रोहाखाली नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 01/21/2015 - 12:41 नवीन
धन्यवाद! अगदी हेच माझेही मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
आ
आजानुकर्ण Wed, 01/21/2015 - 14:45 नवीन
मी क्रिकेटचा तिरस्कार वगैरे करत नाही. उलट आधी आवडीने पाहायचो. मुद्दा देशद्रोहासंबंधीचा आहे. जर एखादा खेळाडू (आणि प्रेक्षक) देशद्रोही असल्याचा दावा असेल तर मुळात ह्या खेळाचे प्रतिनिधित्व ज्या संघटनेकडून केले जाते त्यांची स्वतःची मते काय आहेत हे तपासणे आवश्यक आहे. त्यासाठीच हा सगळा उपद्व्याप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुबोध खरे Wed, 01/21/2015 - 14:54 नवीन
कर्ण साहेब जर एखाद्या भारतीय -(चुकलो बी सी सी आय च्या) टीममधील खेळाडूने (समजा शिखर धवन ने) पाकिस्तानच्या विरुद्धच्या सामन्यात पैसे खाऊन (फिक्सिंग) विश्वचषकातील सामना हरला तर आपण त्याला भ्रष्टाचार म्हणाल कि देशद्रोह ? नाहीतरी बी सी सी आयचाच संघ हरला आहे आपल्याला काय घेणे देणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Wed, 01/21/2015 - 14:59 नवीन
त्याला मी भ्रष्टाचारच म्हणणार. कायदेशीर व्याख्याही तशी सुसंगतच आहे. Whoever by words, either spoken or written, or by signs, or by visible representation, or otherwise, brings or attempts to bring into hatred or contempt, or excites or attempts to excite disaffection towards, the Government established by law in India, a shall be punished with imprisonment for life, to which fine may be added, or with imprisonment which may extend to three years, to which fine may be added, or with fine. Read more: http://devgan.in/ipc/section/124A/#ixzz3PSqPoBGT
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सौंदाळा Wed, 01/21/2015 - 15:00 नवीन
+१ देशाला रेप्रेझेंट करत असताना (क्रिकेट / खेळ, राजकारण, सैन्य, वित्त किंवा अजुन काहीही) देशाची नाचक्की होईल असे काम करणे म्हणजे माझ्या दृष्टीने देशद्रोह.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सौंदाळा Wed, 01/21/2015 - 15:04 नवीन
देशाची नाचक्की होईल असे काम जाणुनबुजुन करणे म्हणजे माझ्या दृष्टीने देशद्रोह.
असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
श
श्रीगुरुजी Wed, 01/21/2015 - 18:07 नवीन
>>> देशाची नाचक्की होईल असे काम जाणुनबुजुन करणे म्हणजे माझ्या दृष्टीने देशद्रोह. +१ हेच म्हणायचं होतं मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
आ
आजानुकर्ण Wed, 01/21/2015 - 18:09 नवीन
तुमच्या दृष्टीने असला तरी इंडियन पीनल कोडच्या दृष्टीने तो नाही. आणि तेवढंच महत्त्वाचं आहे. असा खटला भरला तर श्रीगुरुजींना काय वाटतं असं विचारायला कुणी येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 01/21/2015 - 18:02 नवीन
अहो तिथे बरंच काही लिहिलंय. सदर्‍याच्या मागच्या बाजूवर आणि दोन्ही बाह्यांवर सुद्धा अजून बरंच काही लिहिलेलं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Wed, 01/21/2015 - 18:00 नवीन
ही टोपी परीधान केलेले खेळाडू मैदानात क्वचितच दिसतात. बहुतेक क्षेत्ररक्षक बोडक्या डोक्यानेच क्षेत्ररक्षण करतात. पुर्वी सचिन, हरभजन वगैरे खेळाडू हॅट परीधान केलेले दिसायचे. पण त्यांच्या श्वेतरंगी हॅटवर कोणतेच चिन्ह नव्हते. यष्टीरक्षक, फलंदाज व फॉरवर्ड शॉर्टलेगचा क्षेत्ररक्षक जे हेल्मेट वापरतो त्यावर सगळ्यात वर भारताचा राष्ट्रध्वज कोरलेला असतो. दुसर्‍या चित्रात जो सदरा दाखविला आहे, त्याची फक्त पुढची बाजू दाखविली आहे. त्यावर इंडीया असे लिहिलेले आहे व त्याबरोबरीने स्टार, नाइके, बीसीसीआय असे अनेक लोगो आहेत. सदर्‍याच्या मागील बाजूवर व दोन्ही बाह्यावर सुद्धा अनेक कंपन्यांचे लोगो असतात. म्हणजे हा संघ निव्वळ बीसीसीयचा संघ नसून स्टार, सहारा, नाईके, भारत या व अशा अनेक मालकांचा संघ दिसतो. सदर्‍याच्या मागच्या बाजूचा व दोन्ही बाह्यांचा फोटो टाकलात तर उरलेले मालकही कळतील. म्हणजे प्रत्यक्षात अनेक मालक असलेला हा संघ हा आमचा खाजगी संघ आहे हा दावा इथेही खोटा ठरतो तर. *LOL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
आ
आजानुकर्ण Wed, 01/21/2015 - 18:02 नवीन
मालक आणि प्रायोजकमध्ये फरक आहे असे वाटते. आता ज्ञानेश्वर आणि तुकाराम मिपाचे मालक आणि प्रायोजक दोन्हीही नाहीत. तरीही त्यांचा फोटो मिपाच्या प्रत्येक पानावर दिसतो. त्यामुळं काय दिसतं याच्यावर अवलंबून राहण्यात काही पॉईंट नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 01/21/2015 - 18:03 नवीन
बरोबर. म्हणून तर टोपीवर कोणाचा लोगो आहे यावर अवलंबून राहण्यात काही पॉईंट नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Wed, 01/21/2015 - 18:05 नवीन
बरं बीसीसीआय आणि 'भारताच्या टीम'चा नक्की काय संबंध आहे ते तरी सांगा एकदा. शिंची बीसीसीआय नक्की करते तरी काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 01/21/2015 - 18:09 नवीन
जो संबंध भारताच्या ऑलिंपिक संघाचा व भारतीय ऑलिंपिक संघटनेचा आहे किंवा जो संबंध भारताच्या टेनिस संघाचा व भारतीय टेनिस संघटनेचा आहे तोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Wed, 01/21/2015 - 18:13 नवीन
थोडक्यात कुठल्याच खेळाचा देशप्रेमाशी आणि देशद्रोहाशी संबंध नाही. यू गॉट यॉर आन्सर देअर इटसेल्फ. देशद्रोहाच्या कुठल्याच व्याख्येत खेळाचा संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 01/21/2015 - 18:20 नवीन
देशाच्या उन्नतीसाठी, देशाच्या मानसन्मानासाठी केलेले कोणतेही कृत्य हे देशप्रेमच असते व देशाच्या विरूद्ध, देशाची मानहानी होईल असे केलेले कोणतेही कृत्य हे देशद्रोहच असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Wed, 01/21/2015 - 18:25 नवीन
हो पण ही तुमची व्याख्या झाली. पुस्तकी व्याख्या वेगळी आहे ना. तुम्ही वर्गात शिकवताना पुस्तकातलं शिकवता की मनातलं? (ह घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 01/21/2015 - 18:25 नवीन
>>> तुम्ही वर्गात शिकवताना पुस्तकातलं शिकवता की मनातलं? (ह घ्या.) दोन्ही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Wed, 01/21/2015 - 18:27 नवीन
ओके मग ठीक आहे. तुम्हाला सवयच आहे. लवकर जात नाही म्हणतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 01/21/2015 - 18:30 नवीन
चालायचंच. कोणाला काय काय सवयी असतात हे सांगता नाही येणार. आता तुमचंच बघा ना. *LOL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Wed, 01/21/2015 - 18:34 नवीन
आता तुमचंच बघा ना.
बघायची हौस असेल तर बघा. आम्हाला दाखवायला काही लाज वाटत नाही. (निर्ल्लजम् सदासुखी!) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अर्धवटराव Wed, 01/21/2015 - 18:28 नवीन
माझी पण तशीच व्याख्या आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
अ
अनुप ढेरे गुरुवार, 01/22/2015 - 05:25 नवीन
ही टोपी परीधान केलेले खेळाडू मैदानात क्वचितच दिसतात.
Image removed.
पुर्वी सचिन, हरभजन वगैरे खेळाडू हॅट परीधान केलेले दिसायचे. पण त्यांच्या श्वेतरंगी हॅटवर कोणतेच चिन्ह नव्हते.
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/22/2015 - 08:00 नवीन
बरं मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/22/2015 - 15:50 नवीन
हे वाचा आणि बीसीसीआय ही प्रायव्हेट कंपनी आहे का सार्वजनिक याविषयी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पहा. http://indianexpress.com/article/sports/cricket/gurunath-meiyappan-was-involved-in-betting-bcci-functions-are-public-supreme-court/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
श
श्रीगुरुजी Sat, 01/17/2015 - 18:12 नवीन
>>> पण जेथे भारत विरुद्ध दुसरा देश यात असे करणे हा देशद्रोह आहे कारण तुमच्या देशाची प्रतिष्ठा पणास लागलेली आहे/असते. सहमत. हे लोक आयपीएल आणि भारतीय संघ खेळत असलेले क्रिकेट हे एकाच तराजूत तोलत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा