Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल

स
संदीप डांगे
Sat, 01/10/2015 - 23:32
🗣 358 प्रतिसाद
फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल सगळीकडे गदारोळ सुरु आहे. हजारो लोक रस्त्यांवर आले आहेत "अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला", "आम्ही सगळे चार्ल्स हेब्डो", वैगेरे वैगेरे. आणि त्यातल्याच काही अतिउत्साही महाभागांनी परिसरातल्या मस्जीदी उध्वस्त करून आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावला. मृतांबद्दल सहानुभूती असणे योग्यच आहे पण ती किती योग्य ते जरा तपासून बघायला हवी. मी स्वतः एक कलाकार असून कट्टरवाद्यांच्या भूमिकेतून मी ह्या हल्ल्याचे समर्थन केले कारण कुणीतरी हा वेगळा दृष्टीकोन मांडणे आवश्यक आहे, जो काही धाडसी वार्तापत्रे मांडत आहेतच. जेणे करून ह्या हत्याकांडाच्या इतर बाबींवर प्रकाश पडावा व मुस्लिमांची जी एकच एक प्रतिमा रंगवली जात आहे तो प्रयत्न हाणून पाडवा. पण काही मित्रांना माझा हा पवित्रा खटकला आणि त्याचे चेपू वर पडसाद उमटले. तिथे उदधृत काही विचार माझ्यापेक्षा जास्त चांगला,व्यवस्थित आणि माहितीपूर्ण विचार करणाऱ्या जाणकार मिपाकारांसमोर ठेवत आहे. चर्चा अपेक्षित आहे. "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने केलेल्या खोडसाळपणाबद्दल आज कुणीही बोलत नाही कारण कुणाची हत्या होणे म्हणजेच फार भयंकर एवढेच सामान्यपणे लोक समजतात. ज्याची हत्या झाली तो भारी निष्पाप आणि मारणारा क्रूर अविचारी नराधम. त्याच वेळेस गोडसेच कसे बरोबर, गांधी कसे मारण्याच्याच लायकीचे होते हे गेली साठ वर्षे आपण चघळत आहोत. म्हणजेच काय तर मारणारा आणि मरणारा ह्यापैकी जो आपला त्याचीच बाजू बरोबर. ह्यासंदर्भात आपण दोन अतिशय वेगळ्या गोष्टी लक्ष्यात घेतल्या पाहिजेत, एक म्हणजे, "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने फार खवचट आणि असंस्कृत अश्या व्यंगचित्रातून पैगंबरांचा अपमान केला. त्या साप्ताहिकाचा असे करण्यामागचा हेतू जाणून बुजून भावना दुखावून उचकवणे (provocative) असाच होता. माझा आक्षेप हा हत्याकांडाच्या पूर्वी झालेल्या बेजबाबदारपणाबद्दल आहे. लोक आज म्हणत आहेत कि "साधे एक चित्र काढले तर थेट गोळ्या घालायची काय गरज होती?" ते चित्र इतरांसाठी साधे असेल मुस्लिमांसाठी नाही हा एक मुद्दा, त्यातल्या एका व्यंगचित्रकाराचे मत असे होते "माझ्यासाठी पैगंबर पवित्र वैगेरे काही नाही, मी काही कुराणाचा कायदा मानत नाही, मी फ्रेंच कायदा मानतो." म्हणजेच इतरांच्या श्रद्धास्थानाला घाणेरड्या पद्धतीने चितारणार, त्यांचा अपमान करणार, वरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गळे काढणार. म्हणजे त्याला ज्या पद्दतीने इतरांच्या आत्मसन्मानाची हिंसा करता येणार ते तो करणार, त्याच्यावर इतरांनी त्यांच्या पद्दतीने प्रतिकार केला तर चूक. हा काय तर्क आहे? शब्द आणि चित्रांचे वार जास्त घातक असतात. बंदुकीपेक्षा लेखणी ताकतवान ते उगाच नाही म्हणत. एक गोळी एका वेळेस एकाला मारते. एकच चित्र लाखोंना लाखो वेळा आणि आयुष्यभर मारते. त्यामुळे लेखणी चालवताना हजारदा विचार करावा लागतो. दुसरी गोष्ट अशी कि जाणून बुजून केल्या जाणाऱ्या अपमानाचा बदला घेण्याची त्यांची ती रीत असेल, चांगली आहे कि वाईट आहे ह्यावर "आपण" कितीही काथ्याकुट केला तरी ते लोक बदलणार नाही. "हम करे सो कायदा" असाच सगळा प्रकार आहे तिकडे. जे काही बदलायचे आहे ते हेच बदलायचे आहे. जगातल्या सर्व मुस्लिमांना हे जाणवून देणे आवश्यक आहे कि "हम करे सो कायदा" हा प्रकार त्यांच्या जीवावर इतर मुठभर लोक करत आहेत. आणि आज तो शांतीप्रिय मुस्लिमांना व जगाला त्रासदायक ठरत आहे. ते करायचे सोडून तुम्ही जर पैगंबर आक्षेपार्ह स्थितीत दाखवले तर शांतीप्रिय मुस्लिम सुद्धा भडकून उठतील आणि जो उद्देश आहे तो उरणारच नाही. माझा मुद्दा फार साधा आहे. दहशतवाद (कोणताही, कारण जगात मुस्लिम दहशतवाद सोडून इतर अनेक धर्माचे, देशाचे, समाजाचे दहशतवादी आहेत. मिडिया त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो हा भाग वेगळा) व त्याबद्दल लिहिताना किंवा चित्र काढताना किमान एक लक्ष्यात घेतले पाहिजे कि कुठल्याही दहशतवादाला केवळ एकच एक बाजू नसते. हजारो कारणे आहेत. एक कलाकार म्हणून तुम्हाला सर्वांगीण विचार किंवा समजूतदारपणा दाखवता येत नसेल तर तुम्ही मरण्याच्या लायकीचेच असाल. हुसैनला आपण हिंदुनी का भारताबाहेर घालवले मग? पिके विरुद्ध का आंदोलन चालू आहे? जे चूक आहे त्याबद्दल जरूर लिहावे. लिहायला, छापायला मिळते म्हणून मर्यादा ओलांडू नये. साधीशी गोष्ट आहे. माझ्या-तुमच्या हातून काही गुन्हा घडला तर मला -तुम्हाला शिक्षा व्हावी किंवा ज्याने कुणी पाणउतारा करायचा त्याने माझा-तुमचा करावा. पण कुणी चारचौघात त्या गुन्ह्याला धरून आपल्या आई-बापावर अतिशय वाह्यात टीका केली तर ते तुम्ही किंवा मी सहन करू शकू काय? मुस्काट नाही का फोडणार त्याचे? बाकी राज्यघटना आणि कोर्टस याबद्दल, तर खूप दिवसांपासून चारली हेब्दो ला त्याचे धंधे बंद करण्यास सांगितले होते, त्याने ऐकले नाही. त्याच्याविरुद्ध केस म्हणजे "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी" म्हणून केस होत नव्हती. त्याचवेळेस स्वेच्छेने बुरखा घालणाऱ्या स्त्रियांवर बुरखा न घालण्याची सक्ती करून फ्रेंच सरकार एक वेगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत होते. (बहुतेक मुस्लिम स्त्रियांना बुरखा घालणे आवडते असे साधारणपणे वाचनात आले आहे, किंवा त्यांना ते त्यांचे दमन वैगेरे वाटतच नसेल कदाचित.) आंतरराष्ट्रीय स्तरावर मुस्लिम समाजाबद्दल फार दुटप्पी कारभार आहे. प्रत्येक कट्टरवादी आपलेच तेच खरे म्हणत असतो. तो धार्मिक असो वा कुठलाही. दोन घटना सांगतो. माझ्या ओळखीतले एक वयस्कर दलित पोलिस इन्स्पेक्टर होते, ते मला म्हणाले तू एक चित्र प्रदर्शन भरव, तुला काय पैसा लागेल तो मी पुरवतो. पण चित्रे माझ्या संकल्पनेनुसार असली पाहिजेत. श्रीराम आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया याबद्दल अतिशय गलिच्छ प्रकारे त्यांनी वर्णन केले व म्हणाले हाच खरा इतिहास आहे. शबरी काही म्हातारी नव्हती तर ती एक तरणीताठी युवती होती, त्यांच्यात प्रेमालाप दाखव इत्यादी इत्यादी. त्यावेळेस मीसुद्धा देव वैगेरे मानणारा नव्हतो आणि रामायणातल्या असंख्य विसंगती मलाही दिसत होत्या. पण त्यांचे उद्दिष्ट वेगळे होते, त्यांना रामाचे जनमानसात असलेले पूज्यस्वरूप मलिन करायचे होते. कारण काय तर हिंदू धर्म कसा फालतू आहे हे सिद्ध करायचे. आणि "त्यांनी" स्वीकारलेला बौद्ध धर्म कसा श्रेष्ठ असे मिरवायचे. मी त्यांना सरळ नकार दिला कारण हे सगळेच बेसलेस आहे. मुद्दलातच चुकीचे आहे. एखाद्या धर्मात काही चुकीचे चाललेले असेल तर ते बदलण्याऐवजी त्यांच्या पुज्यस्थानावर हल्ला करा ते डळमळीत करा, हेच केले जाते. म्हणजे जे चुकीचे आहे ते तर चालू राहते, लोक मूर्ख राहतात आणि फ्रेममधला राम जाऊन बुद्ध किंवा जीजस येतो. कारण लोक शहाणे झाले तर सगळ्याच फ्रेम्स फेकून देतील, मग ह्या तमाम धर्मगुरुंचे कसे चालणार? पु ल देशपांडे यांचा एक अतिशय सुंदर वैचारिक लेख आहे यावर. त्यात त्यांनी धर्मश्रद्धांवरील आक्रमण आणि त्याचे माणसाच्या मनावर होणारे परिणाम याबद्दल लिहिले आहे. दुसरी घटना. एकदा एका मित्राशी वाद झाला होता "भारतीय मुस्लिम शाळांमधून वन्दे मातरम म्हणत नाहीत" यावरून. त्यावेळी तो जो पेटला होता आणि त्याच्या डोळ्यांतून अक्षरश आग बरसत होती. मी म्हणालो कि त्यांना म्हणायचे कि नाही त्यांचे त्यांना ठरवू दे आपण त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत. त्यावर तू फारच चिडला होता. तेव्हा ते त्याचे वन्दे मातरम "लादणे" असेच होते. स्वतंत्र भारतात प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. कुणी एक त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत, हिंदू संघटना मुस्लिम शाळेतल्या वन्दे मातरम बद्दल फार संवेदनशील आहेत. जणू काही त्यांनी वन्दे मातरम नाही म्हटले म्हणजे ते देशद्रोही. मग आपले हिंदू धड राष्ट्रगीत ना म्हणू दे ना, तिकडे लक्ष नाही देणार. हा एक प्रकारचा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन आहे. मोठ्या संख्येने मुस्लिम सैन्यात आहेत, शहीद होतात, देशात इतरही क्षेत्रात देशाचे नाव मोठे करतात, तरी त्यांच्यावर संशय घेतोच. दोन धर्मात कुणीतरी दंगली घडवून आणतो, आपण एकमेकांची डोकी फोडतो. आणि दोघेही आयुष्यभर त्यांनी असे केले म्हणून आम्ही तसे केले म्हणत असतो. फायदा घेणारा फायदा घेऊन मोकळा. आपले बरेच मुस्लिम मित्र असतील. कधी त्यांना फेस टू फेस विचारून बघा. त्यांना काय वाटते ते. ते काहीही बोलले तरी "ते आपल्याशी कधीच खरे बोलणार नाहीत" हाच गंड सर्वसामान्य हिंदू बाळगून असतो. दुर्दैवाने तो खरा कि खोटा हे कुणीच कधी सांगू शकणार नाही. समाजसुधारणेचा आव आणणाऱ्या सर्वाना परिस्थितीचे पूर्ण भान आवश्यक आहे. समाजात सुधारणा करण्याची खरीच अपेक्षा व तळमळ असणारे कुणाची खिल्ली उडवत नाहीत. नाहीतर प्रकाश आमटे आदिवासींना नुसते "तुम्ही किती बावळट आणि मागासलेले आहात" असेच म्हणत राहिले असते कि झाली असती त्यांच्यात सुधारणा. आणि राजा राम मोहन राय यांनी घाणेरडी व्यंगचित्रे काढली असती तर सतीप्रथा बंद झाली असती. महात्मा फुले लोक मुलीना शिकवत नाहीत म्हणून लोकांना वाकुल्या दाखवत राहिले असते. इतरही अनेक उदाहरणे आहेत. याउपरही हाच आणि असाच मार्ग असेल तर शेवटही असाच होईल. मुस्लिमांच्या शरिया ची भीती घातली जाते. इतर लोक छुप्या मार्गाने तेच करतात ते मात्र नामानिराळे. दुतोंडी जे म्हणतो मी ते हेच. सगळीकडेच हे होत आहे. आपणच काहीतरी करायला पाहिजे दरी मिटवायला. नाही का? जाता जाता: ज्या जगात अमेरिका सारखा देश आहे, त्याने कधीही शांततेने जगता येईल असा विचार करू नये. अमेरिका फार कुटीलतेने दोन राष्ट्र, दोन समूह, दोन समाजामध्ये तेढ व अविश्वास निर्माण करण्यासाठी व त्यातून आपला फायदा आणि वर्चस्व मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या दोन महिन्यात तेल-जगतात काय चालले आहे ते बघावे आणि आस्ट्रेलिया व फ्रांस मध्ये झालेल्या हल्ल्यांचा संबंध जोडता येतो का ते पाहावे. घटना फार सरळ आणि उघड जरी असल्या तरी त्या तितक्या सरळ कधीच नसतात. माझे मत तर असे आहे कि नेहमीप्रमाणे मुस्लिम जगताविरुध्द जनमत तापवण्याचा हा प्रकार अमेरिका करत आहे. सदर दोन्ही हल्ले अमेरिका पुरुस्कृत आहेत. कारण दोन्ही हल्ल्यांच्या कार्यपद्धतीत फारच विसंगती आहेत. ज्या साधारणपणे आढळत नाहीत.

प्रतिक्रिया द्या
123231 वाचन

💬 प्रतिसाद (358)
क
काळा पहाड Tue, 01/13/2015 - 06:12 नवीन
येथे एक लक्षात ठेवावे की त्यांनी ज्यूंच्या किराणा मालाच्या दुकानावर पण हल्ला केला आणि चार ज्यूंना मारले. आता देखील ज्यूंच्या शाळांना धमकी दिली गेली आहे. ज्यूंचे धर्मस्थळ त्यांना दुसर्‍या महायुद्धानंतर प्रथमच बंद ठेवावे लागले होते. आता त्यांचा काय दोष होता?
दोष एवढाच की या अतिरेकी धर्माविरुद्ध ते पुरून उरले आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अनिदेश Tue, 01/13/2015 - 06:38 नवीन
मग 'je suis BaBaRamRahim' पण :)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/13/2015 - 08:23 नवीन
उद्याच्या अंकात पुन्हा एकदा व्यंगचित्रे येणार. अतिरेक्यांच्या धमक्यांना व रक्तपाताला आपण अजिबात घाबरत नाही हेच चार्ली हेब्दोला दाखवून द्यायचे आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/international/charlie-hebdo-returns-muhammad-on-new-cover/articleshow/45866021.cms
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 01/13/2015 - 20:41 नवीन
बाप्रे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कंस Wed, 01/14/2015 - 01:07 नवीन
तूम्ही हत्याकांडाचे समर्थन करण्यापेक्षा चित्रांचा धिक्कार केला असता तर ते जास्त माणूसकीला धरून वागलात असे वाटले असते.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 01/14/2015 - 05:28 नवीन
हत्याकांडाचे समर्थन केल्याशिवाय चित्रांमधली दाहकता लोक समजून घेत नाहीत. इथे बरेच प्रतिसाद अजूनही त्याच धाटणीचे आहेत कि काढले एखादे चित्र तर त्यात काय एवढे मनावर घ्यायचे. मूळ पार्श्वभूमी कुणाला समजूनच घ्यायची नसेल तर नाइलाज आहे. निनाद ह्यांनी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे पैगंबर यांच्यासारखेच शिवाजी महाराजांचे चित्र संभाजी ब्रिगेडला चिडवून दाखवण्यासाठी काढले तर काय गहजब होईल. प्रत्येक समाजाची, व्यक्तीची सहनशीलता व विचारक्षमता आपल्यासारखी असावी हा हट्ट अनाठायी आहे. बऱ्याच लोकांनी असे म्हटले कि चारली हेब्डो ने इतर धर्मियांना पण लक्ष्य केले पण इतर धर्मीय हे मुसलमानाइतके कट्टर नाहीत हेहि सत्य आहे. विशिष्ट समाजाचा अपमान आपल्याच पद्दतीने करावा आणि त्याचा निषेधही आपल्याच पद्दतीने व्हावा हा दुटप्पीपणा आहे. पैगंबराचे ते चित्र किंवा उल्लेख हे आपण मुस्लिम नसल्याने आपणास त्यात काही आक्षेपार्ह न वाटणे साहजिक आहे. हुसैन ने काढलेली चित्रे आणि चारली ची चित्रे यात तुलना होऊ शकत नाही असेही येथे कुणीतरी म्हटले आहे, हाच तो दांभिक दुटप्पीपणा आहे. कोण कोणास मारतंय यावर आपली भूमिका लगोलग बदलवणारे ढोंगी जगात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंस
श
श्रीगुरुजी Wed, 01/14/2015 - 08:34 नवीन
>>> हत्याकांडाचे समर्थन केल्याशिवाय चित्रांमधली दाहकता लोक समजून घेत नाहीत. या व्यंगचित्रात नक्की काय दाहक व अपमानास्पद होते ते सांगता का जरा. दरवर्षी अनंतचतुर्दशीच्या मिरवणुकीनंतर अनेक वर्तमानपत्रात गणपतीवर व्यंगचित्रे येतात. त्यात गणपती गोंगाटामुळे, मिरवणुकीतील हिडीस प्रकारामुळे, गणेशोत्सवातील व्यापारीकरणामुळे वैतागलेला दाखविलेला असतो. अशा व्यंगचित्रात गणपतीचा अपमान होतो का? किंबहुना अशा व्यंगचित्राबद्दल हिंदू समाजातून कोणतीही प्रतिक्रिया येत नाही. जर अशा व्यंगचित्रात गणपती स्वतः काहीतरी घाणेरडे कृत्य करताना दाखविला असता तर ते नक्कीच आक्षेपार्ह आहे. परंतु तसे नसेल तर त्याविरूद्ध इतका गहजब करण्याचे कारण नाही. तरीसुद्धा एखाद्याला आक्षेप असेल तर कायदेशीर मार्गाने कारवाईचा आग्रह धरता येतो. इथे सर्व मार्ग टाळून थेट १६ लोकांना मारून टाकण्यात आले आहे. चार्ली हेब्दोच्या व्यंगचित्रात नक्की काय अपमानास्पद होते की ज्यामुळे थेट १५-१६ निरपराध लोकांना गोळ्या घातल्या गेल्या? बादवे, व्यंगचित्र कितीही दाहक असले तरी दिसेल त्याला थेट मारुन टाकणे हे रानटीपणाचे व असंस्कृतपणाचे लक्षण आहे व अशा गोष्टींचे समर्थन करणारे तितकेच रानटी आणि असंस्कृत आहेत. >>> इथे बरेच प्रतिसाद अजूनही त्याच धाटणीचे आहेत कि काढले एखादे चित्र तर त्यात काय एवढे मनावर घ्यायचे. बरोबर आहे. अनेक धर्मातील अनेकांची व्यंगचित्रे काढली जातात. जोपर्यंत व्यंगचित्रातून सामाजिक परिस्थितीवर उपहासात्म्क भाष्य केलेले असते तोपर्यंत त्यात काहीही आक्षेपार्ह नाही. >>> मूळ पार्श्वभूमी कुणाला समजूनच घ्यायची नसेल तर नाइलाज आहे. सांगा ना मूळ पार्श्वभूमी. >>> निनाद ह्यांनी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे पैगंबर यांच्यासारखेच शिवाजी महाराजांचे चित्र संभाजी ब्रिगेडला चिडवून दाखवण्यासाठी काढले तर काय गहजब होईल. पूर्वी शिवाजी महाराज सुद्धा अनेक व्यंगचित्रातून सामाजिक परिस्थितीबद्दल भाष्य व चिंता करताना दाखविले आहेत. त्याबद्दल कोणीही गहजब केलेला नाही. जेम्स लेनने केला तसा अत्यंत निराधार व घाणेरडा आरोप जर कोणी केला किंवा व्यंगचित्रातून दाखविला तर ते नक्कीच आक्षेपार्ह आहे. मागील आठवड्यातील चार्ली हेब्दोच्या व्यंगचित्रात काहीही आक्षेपार्ह नव्हते. परंतु आपल्या धर्मातील कोणाचेही व कोणत्याही स्वरूपातील चित्र चितारायचे नाही या शरीयतसारख्या कर्मठ मानसिकतेतून मुस्लीम समाज टोकाला जातो. मी पूर्वी ८ वी च्या इतिहासाच्या पुस्तकाचे उदाहरण दिले आहे. त्यात गुरू नानक, गौतम बुद्ध, महंमद पैगंबर इ. धर्मसंस्थापक हे कोणत्याही आक्षेपार्ह स्थितीत दाखविले नसताना सुद्धा मुस्लिमांनी प्रचंड मोर्चे काढून शेवटी ते पुस्तक रद्द करायला लावले होते. >>> प्रत्येक समाजाची, व्यक्तीची सहनशीलता व विचारक्षमता आपल्यासारखी असावी हा हट्ट अनाठायी आहे. तशी ती नसतेच आणि म्हणूनच दोन समाजात, संस्कृतीत, धर्मात, विचारसरणीत थेट संघर्ष होऊन नये यासाठी राज्यघटना, कायदे व न्यायालय असते. >>> बऱ्याच लोकांनी असे म्हटले कि चारली हेब्डो ने इतर धर्मियांना पण लक्ष्य केले पण इतर धर्मीय हे मुसलमानाइतके कट्टर नाहीत हेहि सत्य आहे. विशिष्ट समाजाचा अपमान आपल्याच पद्दतीने करावा आणि त्याचा निषेधही आपल्याच पद्दतीने व्हावा हा दुटप्पीपणा आहे. ज्या क्रूर पद्धतीने मुस्लिम समाजाने निषेध केला आहे ती पद्धत कायदेशीर नाही आणि म्हणूनच अशा हत्याकांडाचा निषेध करणे यात कोणताही दुटप्पीपणा नाही. >>> पैगंबराचे ते चित्र किंवा उल्लेख हे आपण मुस्लिम नसल्याने आपणास त्यात काही आक्षेपार्ह न वाटणे साहजिक आहे. हुसैन ने काढलेली चित्रे आणि चारली ची चित्रे यात तुलना होऊ शकत नाही असेही येथे कुणीतरी म्हटले आहे, हाच तो दांभिक दुटप्पीपणा आहे. हुसेनची चित्रे आणि चार्लीची चित्रे यात तुलना होऊ शकत नाही हे बरोबर आहे. चार्लीने व्यंगचित्रे छापली होती. त्यात आक्षेपार्ह काहीही नव्हते. हुसेनने फक्त हिंदू देवदेवतांची नग्न चित्रे व ते अत्यंत आक्षेपार्ह अवस्थेत बसलेल्या स्थितीत काढली होती. ती चित्रे अत्यंत बीभत्स असून त्यात अगदी उघडउघड हिंदू देवदेवतांचा अपमान केला होता. त्या चित्रात कलाकाराचे अभिव्यती स्वातंत्र्य, अमूर्ततेचा कल्पक आविष्कार असे काहीही नव्हते. जगातले इतर सर्व धर्म सोडून फक्त हिंदू धर्मावरच त्याने आघात केला होता. परंतु तरीसुद्धा त्या चित्रांविरूद्ध त्याला गोळ्या न घालता निषेधकर्त्यांनी कायद्याचा मार्ग चोखाळला होता. आपल्याला शिक्षा होणार या भीतिने दाऊद इब्राहिमसारखा हुसेनदेखील भारतातून फरारी झाला होता. >>> कोण कोणास मारतंय यावर आपली भूमिका लगोलग बदलवणारे ढोंगी जगात आहेत. त्याला कोण काय करणार? भारतात सुद्धा काही जण मरणार्‍याचा धर्म बघतात तर काही जण मारणार्‍याचा. जग हे असेच असणार. आपल्या धर्मावर टीका होऊ नये असे वाटत असेल तर मुस्लिमांनी इतर धर्मांचा आदर केला पाहिजे. मुस्लिम कलाकारांना इतर कोणत्याही धर्माच्या देवदेवतांची चित्रे काढण्याचे स्वातंत्र्य पाहिजे पण आपल्या धर्मातील कोणाचेही चित्र काढायचे नाही. मुस्लिम जगातल्या कोणत्याही देशात जाऊन तिथल्या स्थानिक मशिदीत जाऊन नमाज पढू शकतात, आपले सण साजरे करू शकतात, पण सौदी अरेबिया/मालदीव व इतर काही देशात कोणत्याही इतर धर्मियांना त्यांच्या धर्माचे पालन करण्यावर बंदी. मुस्लिम जगाच्या पाठीवर कोठेही स्वतःच्या पद्धतीने उपासना करणार पण इतर धर्मियांच्या उपासना पद्धतीला विरोध करून त्यांची देवळे तोडणे, मूर्ती नष्ट करणे असे संतापजनक प्रकार करणार. मुस्लीम स्वत:च्या देशात सर्व धर्माच्या नागरिकांवर स्वतःचे कायदे लागू करणार, पण भारतासारख्या देशात यांना स्वतःचे वेगळे कायदे हवेत. मुस्लिमांचे अशा तर्‍हेचे दुटप्पी वर्तन जोपर्यंत सुरू राहील तोपर्यंत इतर धर्मीय या धर्माला झोडपत राहतील. बादवे, काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियातील एका ब्लॉगरला इस्लामची नालस्ती केल्याबद्दल १५ वर्षे तुरूंगवास व १००० चाबकांच्या फटक्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. २-३ दिवसांपूर्वीच त्यातले पहिले ५० फटके त्याला मारण्यात आले. तुमच्या दृष्टीने ही शिक्षा सुद्धा समर्थनीय असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कपिलमुनी Wed, 01/14/2015 - 10:53 नवीन
मागील आठवड्यातील चार्ली हेब्दोच्या व्यंगचित्रात काहीही आक्षेपार्ह नव्हते.
ह्याबदल त्यांचा द्रूष्टीकोन वेगळा होता . एकाद्या धर्मामध्ये इश्वराला अमूर्त मानायची प्रथा असेल आणि काही लोकांनी त्याच मूर्ती किंवा चित्र काढले तर त्यांच्या दृष्टीने ते महापाप आहे. भले तुमच्या दृष्टीने नसेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
काळा पहाड Wed, 01/14/2015 - 11:36 नवीन
त्यांच्या धर्माच्या दृष्टीने तुम्ही इतर धर्माचं असणे हेच मुळी महापाप आहे. त्याचं काय? ====संपादित)======
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
संदीप डांगे Wed, 01/14/2015 - 12:07 नवीन
पण तुमच्या म्हणण्यात थोडे तथ्य आहे.
त्यांच्या धर्माच्या दृष्टीने तुम्ही इतर धर्माचं असणे हेच मुळी महापाप आहे. त्याचं काय?
इतर धर्म महापाप असण्याबद्दल त्यांचे पैगंबर सांगून गेले तो काळ अतिशय वेगळा होता, त्या काळात प्रचंड रानटी आणि क्रूर असा अरब समुदाय होता. त्यांच्या चालीरीती, संकल्पना न मानता अल्लाह ने सांगितलेल्या म्हणजेच पैगंबराने सांगितलेल्या मार्गावरून चालणे अपेक्षित होते. काफिर म्हणजे त्या काळात पैगंबरांचा आदेश न मानणारे अरब. पण हे सर्व "त्या विशिष्ट" काळात. त्या काळात जगात इतर काही धर्म अस्तित्वात आहेत किंवा काही याची काही एक अडाण्या अरबांना कल्पना नव्हती. तेंव्हा १५०० वर्षा आधीचे संदर्भ उकरून काढून मुलतत्ववाद्यांनी आधीच कर्मठ असेलेल्या मुस्लिमांना अजून भडकावले आहे. जगात इतर अनेक मुस्लिम धर्मगुरू आणि प्रसारकर्ते इस्लामच्या योग्य आणि काळानुरूप धर्मपालनाचे तत्व प्रसारित करत आहेत. पण त्यांच्या ढीगभर प्रयत्नांपुढे हे अतिरेकी हल्ले अधिक उठून दिसत आहेत. मला बरेच मुस्लिम मित्र होते आणि अजूनही आहेत, त्यात शिया सुन्नी दोन्ही आहेत, बऱ्याच मुस्लिमांसोबत व्यवसाय पण केला आहे. माझे नाशिकचे ऑफिस खुद्द गाढ मुस्लिम वस्ती असलेल्या भागात होते. ठाण्यात असताना सुद्धा काही काळ मुस्लिम वस्तीमध्ये रहिवास होता. या सर्व अनुभवामध्ये कुणी मला काफिर म्हणून वागणूक दिली नाही कि माझा धर्म बदलण्याचा सूचक प्रयत्नही केला नाही किंवा कुठल्याही प्रकारे आपल्या धर्माचा कट्टरपणा, रानटीपणा दाखवला नाही. माझे मूळ शहर अकोला येथे हिंदू मुस्लिम ऐक्य हे १९९२-९३ पर्यंत अबाधित होते. त्यानंतर सगळे बदलत गेले. आधी हिंदू मुस्लिम नंतर बौद्ध मुस्लिम अशा दंगली होऊन शहराचे अक्षरश: दोन तुकडे पडले. १९९२ आधी ज्या गल्ली बोळातून फिरताना अजिबात भीती वाटत नव्हती तिकडे फिरकण्याच्या विचाराने सुद्धा भीती वाटते. काही अघटीत होईल असे नाही पण एक मनावर भीती बसली आहे सगळ्यांच्या. आजचा मुस्लिम आतंकवाद उफाळण्यामागे फक्त मुस्लिमांचा कट्टरपण कारणीभूत आहे असा विचार करणाऱ्यांनी अमेरिका-रशिया शीतयुद्ध व त्याभोवतीचा इतिहास तपासून पाहावा. मला कायम एक आश्चर्य वाटत आले आहे कि सातशे वर्षे भारतावर अनिर्बंध सत्ता गाजवून सुद्धा इतक्या कट्टर मुस्लिमांना भारताचे संपूर्ण इस्लामीकरण का जमले नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
श
श्रीगुरुजी Wed, 01/14/2015 - 18:01 नवीन
>>> मला कायम एक आश्चर्य वाटत आले आहे कि सातशे वर्षे भारतावर अनिर्बंध सत्ता गाजवून सुद्धा इतक्या कट्टर मुस्लिमांना भारताचे संपूर्ण इस्लामीकरण का जमले नाही? मुस्लिमांनी सातशे वर्षे भारतावर अनिर्बंध सत्ता गाजविलेली नाही. तसे असते तर भारताचे केव्हाच इस्लामीकरण झाले असते. सातशे वर्षात अनेक हिंदू राजांनी व नंतर शिखांनी मुस्लिमांचा प्रतिकार केलेला आहे. काही काळ विजयनगरचे साम्राज्य, राणा प्रताप, राणा संग, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, गुरू गोविंदसिंग, पेशवे, काश्मिरातील राजा हरिसिंगाचे पूर्वज, पंजाबचा राजा रणजितसिंह ... या व अशा अनेक हिंदू/शीख राजांनी आपापल्या शक्तीनुसार मुस्लिमांचा प्रतिकार करून हिंदू धर्म जिवंत ठेवलेला होता. मिर्झाराजे जयसिंग जरी औरंगजेबाचे सरदार असले तरी ते अत्यंत पराक्रमी होते व त्यांच्याकडे स्वतःचे ५० हजाराहून अधिक सैन्य होते. त्यामुळे औरंगजेबाची त्यांना बाटवायची कधीही हिंमत झाली नव्हती. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे "सहा सोनेरी पाने" हे पुस्तक वाचा. त्यात आपल्याला अज्ञात असलेल्या अनेक हिंदू राजांच्या संघर्षाचा इतिहास दिलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Wed, 01/14/2015 - 18:06 नवीन
>>> आजचा मुस्लिम आतंकवाद उफाळण्यामागे फक्त मुस्लिमांचा कट्टरपण कारणीभूत आहे असा विचार करणाऱ्यांनी अमेरिका-रशिया शीतयुद्ध व त्याभोवतीचा इतिहास तपासून पाहावा. भारताचा अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धाशी काडीमात्रही संबंध नाही. तरीसुद्धा मुस्लिम आतंकवाद का उसळला आहे? चीनचा अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा काडीमात्रही संबंध नाही. तरीसुद्धा तिथे मुस्लिम आतंकवाद का उसळलायला लागला आहे? इंडोनेशियाचा अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा काडीमात्रही संबंध नाही. तरीसुद्धा तिथे मुस्लिम आतंकवादी का कार्यरत आहेत? फिलिपाईन्सचा अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा काडीमात्रही संबंध नाही. तरीसुद्धा तिथे मुस्लिम आतंकवादी का कार्यरत आहेत? चेचन्याशा फक्त रशियाशी संबंध आहे. तिथे अमेरिकेचा संबंध नाही. तरीसुद्धा तिथे मुस्लिम आतंकवादी का कार्यरत आहेत? मुस्लिम आतकंवाद अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धामुळे उसळला का तो यांच्या रक्तातच आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
न
निनाद मुक्काम … Fri, 01/16/2015 - 21:51 नवीन
भारताचा अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धाशी काडीमात्रही संबंध नाही. तरीसुद्धा मुस्लिम आतंकवाद का उसळला आहे? शीतयुद्धाचा शेवटचा टप्पा अफगाण मध्ये रशिया घुसणे त्यांना घालविण्यासाठी आय एस आय व सी आय ए ह्यांच्या अभद्र संगमातून अलकायदा व तालिबान अशी जुळी मुले जन्मणे व अमेरिकन पैसा व शास्त्र १९८४ मध्ये खलिस्तान व काश्मिरात आतंकवाद सुरु करणे व त्याकडे वेस्टन वल्ड ला कानाडोळा करण्यास प्रवृत्त करण्यास पाकडे यशस्वी झाले. हे खुद्द पाकिस्तानी पत्रकार टीव्ही माध्यमात काबुल करतात आणि हो अणूबोंब बनवतांना सुद्धा पाकवर वेस्टन वल्ड ने कानाडोळा केला , शीतयुद्ध नसते तर पाकिस्तान च्या आहारी जाण्याच्या इतके अमेरिका खुळे नाही इंदिरा ने रशियाशी सैख्य केले तेव्हा पाकिस्तान ने स्वताला अमेरिकेच्या हवाली केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे Fri, 01/16/2015 - 23:40 नवीन
भारताचा अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धाशी काडीमात्रही संबंध नाही. तरीसुद्धा मुस्लिम आतंकवाद का उसळला आहे?
भारतात जो घडत आहे तो इस्लामी दहशतवाद नसून पाकिस्तानने पुकारलेले अघोषित युद्ध आहे. पाकिस्तान अतिरेक्यांना पैसा, शस्त्रे आणि काहीतरी थातुरमातुर उद्देश देऊन भारताविरुद्ध चीथावते, किंवा अतिरेक्यांच्या नावाखाली स्वत:च घातपात घडवून आणते. सरळ युद्धात निभाव लागू शकत नसल्याने छुपे मार्गांचा वापर केला जात आहे. सगळ्या जगात फक्त भारताविरुद्ध इस्लामी दहशतवादाला कुठलेही कारण देत येत नाही. नेहमी कुणीतरी हल्ल्याची जबाबदारी घेतो पण त्याचे कारण काहीच नसते. याविरुद्ध अमेरिका जसे घरात घुसून मारते तसे भारत करू शकत नाही कारण त्यालाही हजार कारणे आहेत. सबळ कारणे असलेले इतर अनेक प्रकारचे दहशतवादी भारतात होते, आहेत आणि होत राहतील.
चीनचा अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा काडीमात्रही संबंध नाही. तरीसुद्धा तिथे मुस्लिम आतंकवाद का उसळलायला लागला आहे?
संबंध आहे, विकिपीडिया वर संबंधीत पूर्ण माहिती उपलब्ध आहे. The Soviet Union was involved in funding and support to the East Turkestan People's Revolutionary Party (ETPRP), the largest militant Uyghur separatist organization in its time, to start a violent uprising against China in 1968. In the 1970s, the Soviets also supported the United Revolutionary Front of East Turkestan (URFET) to fight against the Chinese. तर चीनमधील दहशतवादाच्या मुळाशी फार जुनी वांशिक आणि राजकीय स्वातंत्र्य चळवळ आहे. तशीच ती तिबेटीय दहशतवादाच्या मुळाशी सुद्धा आहे. आपल्या मुद्द्याला पोषक एवढाच भाग उचलला तुम्ही चीनमधून. चीन सरकारचे प्रताप पण तसेच कारणीभूत आहे ह्या सगळ्यांना.
इंडोनेशियाचा अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा काडीमात्रही संबंध नाही. तरीसुद्धा तिथे मुस्लिम आतंकवादी का कार्यरत आहेत?
इथेही आहेच. इंडोनेशियात दहशतवाद्यांचे टार्गेट हे अमेरिकी पर्यटक व नागरिक आहेत. ज्यू लोकांच्या संशयित न्यू वर्ल्ड ऑर्डर च्या भीतीमुळे इथले इस्लामी एकवटत आहेत. त्यातून हे हल्ले होत आहेत.
फिलिपाईन्सचा अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा काडीमात्रही संबंध नाही.
खरंच, मग हे काय? The Philippines values its relations with the United States. It supported the United States during the Cold War and the War on Terror and is a major non-NATO ally. इथेतर नुसता एखाद्या काडीचा नाही तर ट्रकभर काड्यांचा आहे हो
चेचन्याशा फक्त रशियाशी संबंध आहे. तिथे अमेरिकेचा संबंध नाही. तरीसुद्धा तिथे मुस्लिम आतंकवादी का कार्यरत आहेत?
चेचन्यात अल-कायदा चे आतंकवादी आहेत. अल-कायदा हे अमेरिका-रशिया शीतयुद्धाचे जाणून बुजून जन्माला घातलेले अपत्य आहे. चेच्न्यातला अल-कायदाचा संघर्ष हा सीआयए प्रणीत आहे. इथे वाचा
मुस्लिम आतकंवाद अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धामुळे उसळला का तो यांच्या रक्तातच आहे?
पहा आता इथे तुम्हीच थेट रक्तावर शंका घेतली आहे, मग म्हणू नका "असं कोण म्हणालं?" एकीकडे विचारता यांच्या रक्तातच आहे का म्हणून आणि दुसरीकडे म्हणता असे कोण म्हणालं. याला विरोधाभासच म्हणतात न गुरुजी? सीआयएने अल कायदा जन्माला घातली हे जर आपणास मान्य नसेल तर मग वाद घालू नये. बाबरी मस्जिद तोडण्याच्या वेळेस कारसेवकांना कसे ब्रेनवॉश केले गेले ते मला स्वतः माहिती आहे. त्यामुळे धर्माच्या नावावर माथेफिरू इतका बेमालूम तयार केला जाऊ शकतो कि ज्याचं नाव ते. तुम्ही खरंच मागच्या १०० वर्षाचा जागतिक इतिहासाचा अभ्यास करा मग जर्रा कुठे वादा-वादीला मजा येईल. नाहीतर काय उगाच तुम्ही ह्याच्या रक्तात काय आहे आणि त्याच्या रक्तात काय आहे हे शोधत राहाल. बाद्वे आमचे पूज्य हभप श्री श्री श्री नानासाहेब एक प्रश्न विचारून गेले… त्याचे उत्तर तुम्हाला सापडले बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 01/17/2015 - 18:52 नवीन
>>> भारतात जो घडत आहे तो इस्लामी दहशतवाद नसून पाकिस्तानने पुकारलेले अघोषित युद्ध आहे. पाकिस्तान अतिरेक्यांना पैसा, शस्त्रे आणि काहीतरी थातुरमातुर उद्देश देऊन भारताविरुद्ध चीथावते, किंवा अतिरेक्यांच्या नावाखाली स्वत:च घातपात घडवून आणते. सरळ युद्धात निभाव लागू शकत नसल्याने छुपे मार्गांचा वापर केला जात आहे. तो इस्लामी दहशतवादच आहे हो. भारतातील दहशतवादात फक्त पाकिस्तानी सामील असते तर छुपे युद्ध समजता आले असते. दुर्दैवाने इस्लामी दहशतवाद्यात पाकिस्तान्यांबरोबर, बांगलादेशातील आणि स्थानिक दहशतवादीही सामील आहेत. २००३ मध्ये गेटवे ऑफ इंडीया समोर दोन बॉम्बस्फोटात ५५ जणांना मारणारे स्थानिकच होते. त्यांना पाकिस्तानातील कोणीही मदत केली नव्हती. इतर अनेक बॉम्बस्फोटातील अतिरेकी हे पाकिस्तानी किंवा पाकिस्तानची मदत घेतलेले नसून भारतातीलच आहेत. ते पाकिस्तानी नसल्यामुळे त्यांच्यासाठी हे अघोषित युद्ध वगैरे नसून सरळसरळ दहशतवाद आहे. >>> सगळ्या जगात फक्त भारताविरुद्ध इस्लामी दहशतवादाला कुठलेही कारण देत येत नाही. नेहमी कुणीतरी हल्ल्याची जबाबदारी घेतो पण त्याचे कारण काहीच नसते. याविरुद्ध अमेरिका जसे घरात घुसून मारते तसे भारत करू शकत नाही कारण त्यालाही हजार कारणे आहेत. सबळ कारणे असलेले इतर अनेक प्रकारचे दहशतवादी भारतात होते, आहेत आणि होत राहतील. कोणत्याही दहशतवादाला कधीही सबळ कारण नसते. >>> संबंध आहे, विकिपीडिया वर संबंधीत पूर्ण माहिती उपलब्ध आहे. विकीपीडीया हा विश्वासार्ह स्त्रोत नाही. >>> तर चीनमधील दहशतवादाच्या मुळाशी फार जुनी वांशिक आणि राजकीय स्वातंत्र्य चळवळ आहे. मी तेच म्हणत होतो. अमेरिका-रशियाच्या शीतयुद्धाचा चीनमधील दहशतवादाशी अजिबात संबंध नाही. बेसिकली जिथेजिथे मुस्लिमांची संख्या वाढते, तिथे तिथे ते स्वतःला वेगळा देश मागायला लागतात व त्यासाठी दहशतवाद सुरू करतात. हे काश्मिर, चेचन्या, चीन, फिलिपाईन्स अशा अनेक देशात दिसून आले आहे. हा दहशतवाद मुस्लिम मानसिकतेशी संबंधित आहे. अमेरिका-रशियाच्या शीतयुद्धाचा या दहशतवादाशी अजिबात संबंध नाही. >>> इथेही आहेच. इंडोनेशियात दहशतवाद्यांचे टार्गेट हे अमेरिकी पर्यटक व नागरिक आहेत. ज्यू लोकांच्या संशयित न्यू वर्ल्ड ऑर्डर च्या भीतीमुळे इथले इस्लामी एकवटत आहेत. त्यातून हे हल्ले होत आहेत. बरोबर ना. इथेही अमेरिका-रशियाच्या शीतयुद्धाचा या दहशतवादाशी अजिबात संबंध नाही. इंडोनेशियात पुराणमतवाद वाढू लागला आहे व त्याचाच परीणाम म्हणून दहशतवाद सुद्धा वाढतो आहे. >>> खरंच, मग हे काय? The Philippines values its relations with the United States. It supported the United States during the Cold War and the War on Terror and is a major non-NATO ally. इथेतर नुसता एखाद्या काडीचा नाही तर ट्रकभर काड्यांचा आहे हो फिलिपाईन्समध्ये अनेक इस्लामी दहशतवादी संघटना आहेत. फिलिपाईन्सच्या दक्षिण भागात इतर भागांपेक्षा मुस्लिम थोड्या जास्त प्रमाणात आहेत. तिथे त्यांना मुस्लिमांचे वेगळे राज्य हवे आहे व त्यासाठी आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी दहशतवादाचा मार्ग स्वीकारला आहे. इथेही अमेरिका-रशियाच्या शीतयुद्धाचा या दहशतवादाशी अजिबात संबंध नाही. स्वतःची संख्या जिथे वाढते तिथे मुस्लिम वेगळे व्हायची भाषा बोलायला लागतात व त्यासाठी दहशतवादाचा आसरा घेतात. >>> चेचन्यात अल-कायदा चे आतंकवादी आहेत. अल-कायदा हे अमेरिका-रशिया शीतयुद्धाचे जाणून बुजून जन्माला घातलेले अपत्य आहे. चेच्न्यातला अल-कायदाचा संघर्ष हा सीआयए प्रणीत आहे. चेचन्यात मुस्लिम बर्‍याच प्रमाणात आहेत. त्यांना चेचन्या हा वेगळा देश हवा आहे व हेच दहशतवादाचे मूळ कारण आहे. >>> सीआयएने अल कायदा जन्माला घातली हे जर आपणास मान्य नसेल तर मग वाद घालू नये. बाबरी मस्जिद तोडण्याच्या वेळेस कारसेवकांना कसे ब्रेनवॉश केले गेले ते मला स्वतः माहिती आहे. कारसेवकांचा माहित नाही, पण ज्या तावातावाने तुम्ही दहशतवाद्यांचं समर्थन करत आहात त्यावरून तुमचं मात्र नक्कीच ब्रेनवॉशिंग झालेलं दिसतंय. >>> त्यामुळे धर्माच्या नावावर माथेफिरू इतका बेमालूम तयार केला जाऊ शकतो कि ज्याचं नाव ते. तुम्ही खरंच मागच्या १०० वर्षाचा जागतिक इतिहासाचा अभ्यास करा मग जर्रा कुठे वादा-वादीला मजा येईल. नाहीतर काय उगाच तुम्ही ह्याच्या रक्तात काय आहे आणि त्याच्या रक्तात काय आहे हे शोधत राहाल. १०० कशाला मागील १००० वर्षांचा इतिहास पाहिला तरी पॅरिस किंवा पेशावर किंवा इतरत्र दहशतवाद्यांनी केलेल्या हत्यांचे समर्थन करता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ख
खटपट्या Wed, 01/14/2015 - 23:09 नवीन
इतर धर्म महापाप असण्याबद्दल त्यांचे पैगंबर सांगून गेले तो काळ अतिशय वेगळा होता, त्या काळात प्रचंड रानटी आणि क्रूर असा अरब समुदाय होता. त्यांच्या चालीरीती, संकल्पना न मानता अल्लाह ने सांगितलेल्या म्हणजेच पैगंबराने सांगितलेल्या मार्गावरून चालणे अपेक्षित होते. काफिर म्हणजे त्या काळात पैगंबरांचा आदेश न मानणारे अरब. पण हे सर्व "त्या विशिष्ट" काळात. त्या काळात जगात इतर काही धर्म अस्तित्वात आहेत किंवा काही याची काही एक अडाण्या अरबांना कल्पना नव्हती.
बरोबर !! जर ईतर धर्म आपल्यातल्या जुन्या टाकाउ परंपरांबद्द्ल विचार करु शकत असतील तर मुस्लीम धर्मच एवढा जुन्या गोष्टींना का चिकटून रहातोय. कुराण हे पुस्तक आता आउटडेटेड झालंय हे मानायला ते का तयार नाहीत. कुराणात लिहिलंय म्हणून आपलं डोकं बाजूला ठेवून काफरांना मारायलाच पाहिजे का ?
मला बरेच मुस्लिम मित्र होते आणि अजूनही आहेत, त्यात शिया सुन्नी दोन्ही आहेत, बऱ्याच मुस्लिमांसोबत व्यवसाय पण केला आहे. माझे नाशिकचे ऑफिस खुद्द गाढ मुस्लिम वस्ती असलेल्या भागात होते. ठाण्यात असताना सुद्धा काही काळ मुस्लिम वस्तीमध्ये रहिवास होता. या सर्व अनुभवामध्ये कुणी मला काफिर म्हणून वागणूक दिली नाही कि माझा धर्म बदलण्याचा सूचक प्रयत्नही केला नाही किंवा कुठल्याही प्रकारे आपल्या धर्माचा कट्टरपणा, रानटीपणा दाखवला नाही.
थोडी ट्क्केवारी वाढली की कट्टरपणा, रानटीपणा दिसु लागतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 01/15/2015 - 08:26 नवीन
जर ईतर धर्म आपल्यातल्या जुन्या टाकाउ परंपरांबद्द्ल विचार करु शकत असतील तर मुस्लीम धर्मच एवढा जुन्या गोष्टींना का चिकटून रहातोय. कुराण हे पुस्तक आता आउटडेटेड झालंय हे मानायला ते का तयार नाहीत. कुराणात लिहिलंय म्हणून आपलं डोकं बाजूला ठेवून काफरांना मारायलाच पाहिजे का ?
मागचा २ हजार वर्षांचा कालखंड पाहिला तर इस्लामी टोळ्या ह्या अजून ६-७ शतके मागेच आहेत असे म्हणून शकतो. त्यांचा धार्मिक नितीमुल्ये तपासून पाहण्याचा काळ (The Renaissance )अजून आलेला नाही. इतर धर्मांमध्ये तो फार आधीच येउन गेला आहे. हिंदू धर्म किंवा संस्कृतीने तो काल केंव्हा पार केला त्याचा माग तर आजही आपण काढू शकणार नाही, ख्रिस्चन धर्माने किंवा युरोपियन जगताने तो काळ १४ ते १७ व्या शतकादरम्यान पहिला. त्याआधी ख्रिश्चनही बरेचसे आजच्या कट्टर मुस्लिम टोळ्यांची हुबेहूब प्रतिमा होते. धर्माधारित गुन्ह्यांना प्रचंड भयंकर शिक्षा होत्या, लाखो माणसे त्यात मारली गेली. आज मुस्लिम सोडून सर्वच पुढारलेले झाल्याने हे मुस्लिम आपल्याला वेगळेच भासतात जणू काही त्यांच्या डीएनएमध्ये काही लोच्या आहे. आता इतर जग व स्वतः मुस्लिम ह्याला कसे सामोरे जातात त्यावर भविष्य अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ब
बॅटमॅन Mon, 01/19/2015 - 08:19 नवीन
इस्लामिक इतिहासाचे शून्य आकलन असल्याचा धडधडीत पुरावा आहे हा. इस्लाममध्ये सुधारणा आणण्याचे प्रयत्न झाले, पण दर वेळेस ते हाणून पाडल्या गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रसाद१९७१ Fri, 01/16/2015 - 09:07 नवीन
थोडी ट्क्केवारी वाढली की कट्टरपणा, रानटीपणा दिसु लागतो...
+१११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
न
निनाद मुक्काम … Wed, 01/14/2015 - 01:55 नवीन
गुरुजी हे पहा त्यांनी पुढील अंकात परत व्यंग चित्र काढले. झाल्या प्रकारावर माझे मत भांडवलशाही अर्थव्यवस्थेत लोकशाहीचा बुरखा घालून व्यापारी राज्यकर्ते होतात. त्यांचे दबाव गट हे राजकारणी व समाजातील इतर प्रभावी सत्ता केंद्रांना आपल्या नुसार वागण्यास मजबूर करतात. जगात कोणत्या धर्माच्या किंवा राष्ट्रांचा आणि त्यांच्या अनुयायांचा दबावगट कार्यरत आहे ह्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. मी येथे काही उदाहरणे देतो. मुंबईत एका उपहार गृहाचे नाव काहीतरी वेगळे असावे ह्या उद्देशाने हिटलर चे नाव दिले , भारतात हे नाव अनेकदा बोलीभाषेत वापरले जाते उद्द एखादी व्यक्ती स्वभावाने एकदम हिटलर आहे ,ह्या नावाने टीव्ही वर एक सिरियल पण आली होती .पण मुंबई मधील अल्प संख्यांचा ज्यू समुदायाच्या ह्यामुळे भावना दुखावल्या गेल्या त्यांनी विरोध केला व आपल्या सरकारने मध्यस्थी करून त्या उपहार गृहाचे नाव बदलायला लावले , यहुदी राष्ट्राशी आपले संबंध हे त्यामागील महत्त्वाचे कारण व ह्या विषयावर समस्त यहुदी लॉबी वेळ पडल्यास कार्यरत झाली असती , दुसरे प्रकरण अमेरिकेत नुकतेच घडले अमेरिकन बियर कंपनी ने बाटलीवर गांधीजी ह्यांचे चित्र छापले. भारत सरकारने निषेध केला आपला दबावगट अमेरिकेत सक्रिय झाला लगेच कंपनीने माफी मागितली . पैगंबर वर व्यंग चित्रे लढून मग हल्ले ओढवून घेणे हे युरोपला नवीन नाही ,मात्र पैशाने व संख्येने जगभरातील मुस्लिम नेते एकत्र येउन दबाव गट निर्माण करू शकले नाही , वेस्टन वल्ड वर त्यांनी दबाव आणण्यासाठी आर्थिक बहिष्कार व चीन व रशियाच्या आहारी जाण्याची धमकी किंवा अजून बरेच काही करू शकत होते , जर्मनी मध्ये हिटलर च्या विचार धारेचा प्रचार होऊ नये म्हणून एवढे कडक कायदे आहेत की सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या संबंधित काही गोष्टी केल्या तर चक्क कायद्याने गुन्हा ठरतो तुरुंगवास होऊ शकतो. सांगण्याचा मुद्दा एवढाच कि ह्या जगात सन्मानाने जगायचे असेल तर हिंदुनी ह्या प्रकरणातून बोध घेऊन एकत्र आले पाहिजे आपला दबाव गट जगभरात बनवला पाहिजे , भारतात पंजाबी व मराठी माणूस अनुक्रमे नानक सिंग व शिवाजी महाराज ह्यांची व्यंग चित्र एखाद्यानं वृत्त पत्राने काढली तर हिंसक मार्गाने व्यक्त होणार नाही. ह्याची खात्री देऊ शकणार नाही , सुवर्ण मंदिरांचे पावित्र्य मलिन केले म्हणून राग ठेवून इंदिरा ह्यांची हत्या झाली आजही पंजाबात त्यांचे मारेकरी व भिन्द्रवाले ह्यांच्या प्रती सहानुभूती असणारे अनेक आहेत , प्रभाकरन ची निष्ठा व सहानुभूती असणारे अनेक आहेत.थोडक्यात भारतात हिंसेचेच समर्थन करणारे अनेक आहेत , जे गांधी हत्या की वध झाला ते योग्य झाले असे मानतात अश्या काही व्यक्ती फ्रेंच मेले तर जाहीर दुख व्यक्त करतात जगाची ,हिंसेला नाही तर कोण मेले ह्यावरून निषेध व्यक्त करावा की नाही हे ठरवायची जगरहाटी आहे. फ्रेंच लिबिया मध्ये अमेरिकेच्या साथीने विमानाने गडाफी वर हल्ले करते आता ह्या बॉंब हल्ल्यात निरपराध मेले तर ओल्या बरोबर सुके ही म्हण वापरता येते , आफ्रिकेत कोणा अनामिक देशात अलका यदा विरुद्ध फ्रेंच सरकार सैन्य पाठवते संयुक्त राष्ट्राला धाब्यावर बसवून आपली मनमानी करते , हिंसा करते त्या बद्दल निषेध व्यक्त होत नाहीत. युरोपात अनेक देश आहेत जे इतरांच्या देशात ढवळाढवळ करत नाहीत , त्यांना कधीही इस्लामी निर्वासित आपल्या देशात आणावे लागत नाहीत. ह्या देशांना इस्लामी दहशतवाद सतावत नाही , तेलासाठी व शस्त्रे विकण्यासाठी फ्रेंच सरकार मुस्लिम जगतात जी ढवळाढवळ करते त्यांचे परिणाम ह्या ना त्या मार्गाने दिसतात. सध्या फ्रेंच तुरुंगात मुस्लिम क्रिमिनल जिहादी शिकवणी घेत आहेत. अशी शिकवणी घेऊन बाहेर पडलेल्या मारेकर्याने हे कृत्य केले ,
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 01/14/2015 - 03:18 नवीन
लॉट ऑफ लर्नींग्स बिट्वीन द लाइन्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
स
संदीप डांगे Wed, 01/14/2015 - 04:47 नवीन
मला बेअक्कल, अडाणचोट वैगेरे म्हणणाऱ्या सर्वसाक्षी, सर्वज्ञानी, सर्वव्यापी सर्वगुणसंपन्न लोकांनी जरा ह्या प्रतिसादावर टिप्पणी करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
थ
थॉर माणूस Wed, 01/14/2015 - 05:44 नवीन
*clapping* *clapping* *clapping* योग्य ते रेफरन्सेस लावलेत तुम्ही.
हिंसेला नाही तर कोण मेले ह्यावरून निषेध व्यक्त करावा की नाही हे ठरवायची जगरहाटी आहे.
एकच नंबर... फक्त हे असं उघड बोलायचं नसतं हो. कुठल्याही लोकांना त्यांचे मुखवट्यामागचे चेहरे उघड केलेले आवडत नाहीत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
ह
हुप्प्या Wed, 01/14/2015 - 06:48 नवीन
१. जर्मनीत हिटलरवर बंदी असणे हे त्या देशाच्या इतिहासातील एका वाईट पर्वाशी निगडित आहे. नाझी आणि हिटलर हे जर्मनीवर पडलेले काळे डाग आहेत ह्याबाबत सर्व सुसंस्कृत जगात एकमत आहे. पण म्हणून बाकी देशांनी उठताबसता बंदी घालावी ही अपेक्षा आहे का? २. हिटलर नावाच्या रेस्टरॉवर बंदी घातली ही माहिती नवी आहे. मात्र हिटलर नामक चित्रपट आला होता ज्याचा हिटलरशी थेट संबंध नव्हता. त्यावर बंदी घातली नव्हती. अर्थात बीयर, चपला, हॉटेल वगैरे ठिकाणी जिथे कुठलातरी माल वा सेवा विकायची असते तिथे उत्पादनावरील चित्रा वा नावाबद्दल असंतोष होणे कंपनीला परवडत नाही. व्यंगचित्राच्या बाबत असे काही नसते. ते व्यंगचित्र हेच उत्पादन असते आणि त्यावर दबाव आणणे अवघड झाले असणार. पण त्यावरून गांधींच्या बियरवरील चित्राविरुद्धचा निषेध जास्त तीव्र होता असे म्हणणे धाडसाचे आहे. फारतर बियर उत्पादकाचा निर्धार तितकासा प्रबळ नव्हता असे म्हणू. २. सनदशीर मार्गाने निषेध करुन उत्पादन बाजारातून हटवणे आणि गोळीबार करून डझनभर लोक मारणे ह्यात फरक आहे की नाही? ३. युद्धातील कोलॅटरल डॅमेज. अमेरिकेने अनेकदा चुकीच्या कारणाने युद्ध पुकारले आहे. पण कधीही डूख धरून केवळ निरपराध लोक पोरेबाळे मारू या या उद्देशाने बाँब टाकले आहेत असे मला वाटत नाही. चुकीची माहिती मिळाल्यामुळे वा अन्य फसवणुक झाल्यामुळे निरपराध लोक मरत असणार. अर्थात त्यामुळे हे मृत्यू समर्थनीय होत नाहीत. पण थंडपणे कारस्थान आखून, केवळ बदला म्हणून एखाद्या प्रकाशनाच्या ऑफिसवर हल्ला करून तिथे असणार्‍या तमाम लोकांना मारणे हे तसे नाही. लिबियावरील हल्ल्यात कदाचित गदाफी मरण्याची शक्यता आहे. बगदादच्या हल्ल्यात कदाचित सद्दाम मारला गेला असता. पण ह्या पॅरिसच्या हल्ल्यात कुणी दोषी मारला जाण्याची सुतराम शक्यता नव्हती. चित्र काढणार्‍यांची चूक असलीच तर मृत्यूदंडाच्या लायकीची नक्कीच नव्हती. ४. तुमचा हा दावा साफ खोटा आहे की जे लोक अन्य देशात ढवळाढवळ करत नाहीत त्यांना इस्लामी अतिरेक्यांचा त्रास होत नाही. उदा. हॉलंड. इथे मुस्लिम देशातील लोकांना आश्रय द्यायच्या अट्टाहासापोटी काही अतिरेकी तिथे स्थायिक झालेले आहेत. अशाच एका मोरक्कन अतिरेक्याने थिओ व्हॅन गॉग नामक सिनेमा दिग्दर्शकाला दिवसाढवळ्या भोसकून ठार केले. कारण त्याने काढलेला सिनेमा ज्यात मुस्लिम स्त्रियांचे गार्‍हाणे मांडले होते. आता हा अतिरेकी मोरक्कोचा होता. हॉलंडने मोरक्कोशी कधी युद्ध केले? युरोपातील अतिरेकी उदारमतवादापायी कुठल्याही प्रकारे सांस्कृतिक प्रशिक्षण न देता अत्यंत मागास, रानटी वातावरणात वाढलेले नग नागरिकत्व मिळवतात. संस्कृतीतला हा प्रचंड बदल हा अशा लोकांकरता कॅलेंडर २००-३०० वर्षांनी पुढे नेण्याप्रमाणे मोठा असतो. त्यांना युरोपातील विचारांशी काहीही देणेघेणे नसते आणि त्यातून हे अतिरेकी प्रकार होतात असे मला वाटते. काही मुस्लिम लोक निष्कारण लादलेल्या युद्धाचे बळी असतीलही पण सरसकट सगळ्यांना हा न्याय लागू होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
स
संदीप डांगे Wed, 01/14/2015 - 07:43 नवीन
युरोपातील अतिरेकी उदारमतवादापायी कुठल्याही प्रकारे सांस्कृतिक प्रशिक्षण न देता अत्यंत मागास, रानटी वातावरणात वाढलेले नग नागरिकत्व मिळवतात. संस्कृतीतला हा प्रचंड बदल हा अशा लोकांकरता कॅलेंडर २००-३०० वर्षांनी पुढे नेण्याप्रमाणे मोठा असतो. त्यांना युरोपातील विचारांशी काहीही देणेघेणे नसते आणि त्यातून हे अतिरेकी प्रकार होतात असे मला वाटते.
हाच मुद्दा आहे. त्यामुळेच आपण कुणाविरुद्ध कोणत्या पातळीवरचे विनोद करतो याची सारासार विवेकबुद्धी स्वत:ला सुसंस्कृत आणि पुढारलेल्या समजणाऱ्या समाजाने ठेवली पाहिजे अशी किमान अपेक्षा आहे. बहुतेक पाश्चात्त्यांना असे वाटते कि इतर जगात माणसे राहत नाहीत, राहतात ती फक्त डुकरे आणि कुत्री. त्यांना मेंदू नसतो आणि त्यांची माणूस म्हणून जगण्याची लायकी नाही. अमेरिकेचे ड्रोन हल्ले व इतर कुरापातींमध्ये मारले जाणारे निष्पाप हे नेहमीच "चुकून" मरतात. मारणारे आपले, मिडिया आपली, युनो, नाटो सगळे आपल्या खिशात असताना सत्य नेहमीच आपल्याला पाहिजे तसे वाकवता येते. ह्याची जाण फार कमी लोकांना आहे असे इथे दिसते. फ्यानड्री चित्रपटातील शेवटचा प्रसंग आठवा. शेवटी जब्या चिडून दगड उचलतोच. त्याचे दगड उचलणे सुसंस्कृत समाजाला नसेल पटत पण त्याआधी तो दगड उचलण्यास भाग पडणारी निंदानालस्ती याचा प्रथम सुसंस्कृत जगाने निषेध केला पाहिजे. शेवटी जब्या दगडच उचलणार, मोर्चे आंदोलने करून कुणी भिक घालत नाही हे त्याला माहित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ह
हुप्प्या Wed, 01/14/2015 - 17:08 नवीन
जर इतका हीन दृष्टीकोन असता तर युरोपने इतक्या अफ्रिकन वा अन्य देशातील रहिवाशांना आसरा दिला असता का? आता भूतदया केलीत ना मग आपल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यालाही तिलांजली द्या असे म्हणणे म्हणजे भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी असला प्रकार आहे. मग असेहि म्हणता येईल की शिस्तीत लाईन धरून बसमधे चढणे वा पोस्ट ऑफिसातले व्यवहार करणे हे ह्या मागास देशातील लोकांना जमत नाही. म्हणून युरोपाने लाईन धरणे बंद करुन बेबंद घुसाघुशी करायला सुरवात करावी! खालील विरोधाभास लक्षात घ्या १. अत्यंत श्रीमंत अरबी देश अन्य देशातील कुणालाही नागरिक बनू देत नाहीत. मग तो अस्सल सुन्नी मुस्लिम का असेना. याउलट युरोपातील अनेक देश आश्रय देतात. उद्योगधंदा करायचे प्रशिक्षण देतात. भत्ताही देतात. २. आपला धर्म अनुकरणे, प्रार्थनास्थळे उघडणे हे युरोपात नित्य घडते आहे. मुस्लिमांना ती मुभा आहे. अरबी देश परधर्मीयांना अशी मुभा देत नाहीत. बाकी अनेक रानटी रुढीही बिनबोभाट चालू असतात. जोवर अन्य नागरिकांच्या हक्कावर गदा येत नाहीत असे सगळे कार्यक्रम करायला पूर्ण परवानगी असते. असे वागवणे हे डुक्कर वा अन्य प्राण्यांना वागवण्याप्रमाणे आपल्याला वाटत असेल तर असे म्हणावे लागेल की झोपलेल्याला उठवणे शक्य आहे पण झोपेचे सोंग घेतले असेल तर उठवणे अशक्य. ड्रोन हल्ल्यांचा काहीही संबंध नसताना तो इथे जोडणे चूक आहे. इस्लामी मारेकर्यांनी ते चित्र काढल्याबद्दल त्या हत्य केल्या. ड्रोन हल्ल्यामुळे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 01/14/2015 - 17:42 नवीन
मध्य-पूर्वेत प्रत्यक्ष राहणाऱ्या हिंदू भारतीयांकडून त्यांचे अनुभव ऐकायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ट
टवाळ कार्टा Wed, 01/14/2015 - 07:58 नवीन
१. जर्मनीत हिटलरवर बंदी असणे हे त्या देशाच्या इतिहासातील एका वाईट पर्वाशी निगडित आहे. नाझी आणि हिटलर हे जर्मनीवर पडलेले काळे डाग आहेत ह्याबाबत सर्व सुसंस्कृत जगात एकमत आहे. पण म्हणून बाकी देशांनी उठताबसता बंदी घालावी ही अपेक्षा आहे का?
पाकिस्तान लश्करे तोयबाबद्दल तुमचेच ऐकते वाटते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
न
निनाद मुक्काम … Fri, 01/16/2015 - 01:31 नवीन
तुमच्या माहितीसाठी सांगतो स्विस किंवा इयु मध्ये नसलेले अनेक श्रीमंत देश जसे मोनेको ह्यांनी इस्लामी देशात हस्तशेप करत नाहीत पण त्याच्यावर सिनेमे काढून त्यांना प्रबोधन देण्याचे धंदे सुद्धा करत नाहीत कारण त्याचा परिणाम गाढवापुढे वाचली गीता असा होणार हे त्यांना माहिती असते , ह्या देशाला स्वतःच्या रक्षणासाठी अण्वस्त्र मोठी फौज लागत नाही , महाराष्ट्रातले एक उदहरण पहा नुकतेच दलित हत्याकांड झाले त्याचे फोटो आपण नेट वर पहिले अंगावर शहरा आला , पण हे काही आपण पहिल्यांदा पाहत किंवा ऐकत नाही आहोत ह्याआधी खैरलांजी झाले ,भारतात खेड्यांमध्येअश्या घटना नित्य नियमाने घडतात. आपण आपल्या मनाची समजूत काढतो हे झाले खेड्यात तेथे जाती व्यवस्था प्रबळ आहे , अशिक्षित मध्ययुगीन काळात जगणारे तोच कायदा मानणारे लोक आहेत , आपण शहरात राहतो आपली संस्कृती मुल्ये वेगळी आहेत , थोडक्यात काय आपण आता भारतीय लोक एकाच वेळी वेगवेगळ्या शतकात जगात आहेत हे वास्तव स्वीकारून जगत आहोत , मुंबई मधील माणसाला न्यूयार्क मध्ये पहिल्यांदा आल्यावर जो सांस्कृतिक धक्का बसतो तोच आजमगढ मधून पहिल्यांदा मुंबई मध्ये आपल्यावर लोकांना बसतो , गावातील लोकांचे सामाजिक सांस्कृतिक आर्थिक सबलीकरण झाले पाहिजे असे आपल्याला वाटते पण त्यासाठी कोणीच काहीही करत नाही , तेव्हा निदान आपण तरी ह्या जगत अफगाण किंवा आफ्रिकन देश अजून मध्य युगात राहतात , त्यांना शिक्षण देऊन आर्थिक सबलीकरण करायचे सोडून वेस्टन वल्ड स्वतःच्या स्वार्थासाठी ह्या लोकांना साक्षर करत नाही , प्रगत होऊ देत नाहीत ह्यांच्या हातात शस्त्रे देतात आणि शस्त्र हाती आलेल्या समूहाची मानसिकता अधिक कडवी होते तिची बाधा होऊन मग प्रगत देशात एखादी घटना घडली कि त्यांच्या जनता बोंब मारते. आपल्या भारतात मुसलमान समाजात बोहरी मुसलमान हे सधन सुशिक्षित आहेत त्यांची हिंदू समाजाला व त्यांना हिंदू समाजाची भीती वाटत नाही हेच जैन पारशी सारख्या अल्प संख्यांक लोकांच्या विषयी लागू पडते ज्या दिवसही भारतीय व जगातील मुसलमान शिक्षित व सधन होईल तेव्हा त्यांची जगाला व जगाची त्यांना भीती उरणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
न
निनाद मुक्काम … Wed, 01/21/2015 - 22:35 नवीन
ह्या धाग्यावरून मी रजा घेतली होती पण मी माझ्या मूळ प्रतिसादात जर्मनी व हिटलर संबंधी कायदे ह्याबाबत माहिती दिली होती. जर्मनी मध्ये ह्याच घटनेसंबधी नुकतीच घटना घडली. मुसलमानधार्जिणे युरोप होऊ नये म्हणून जर्मनीत कार्यरत संघटना पेगीदा च्या प्रमुखाने गंमतीत हिटलर च्या पोशाखात फोटो काढले होते हे जर्मन वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले त्यामुळे आता त्याला संघटनेच्या प्रमुख पदावरून पायउतार व्हाव्हे लागले .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
म
मृत्युन्जय Wed, 01/14/2015 - 07:24 नवीन
१. ज्यु लोकांनी त्या उपहारगृहाच्या मालकाला गोळ्या घातल्या की सनदशीर मार्गाने निषेध केला? २. भारताने बियर कंपनीच्या मालकाला रॉ एजंट मार्फत गोळ्या घातल्या की त्याचा शांततामय मार्गाने निषेध व्यक्त केला? ३. तुषार गांधींनी बियर कंपनीच्या मालकाला मारण्यासाठी मारेकरी पाठवले की आपली नापसंती शांततामय मार्गाने व्यक्त केली? ४. हिटलरची स्तुती केल्यावर जर्मनीतले ज्यु लगेच त्या माणसाला जाळतात की त्याच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करतात? युरोपात अनेक देश आहेत जे इतरांच्या देशात ढवळाढवळ करत नाहीत , त्यांना कधीही इस्लामी निर्वासित आपल्या देशात आणावे लागत नाहीत. ह्या देशांना इस्लामी दहशतवाद सतावत नाही , काय बोलता? दहशतवादी इतके तत्ववादी आहेत हे माहित नव्हते? १. भारताने कुठल्या देशात ढवळाढवळ केली म्हणुन त्यांचे निर्वासित इकडे येउन भारतावर दहशतवादी हल्ले होतात? (बांग्लादेश स्वातंत्र्याबद्दल नक्का बोलु. ती गोष्ट वेगळी आहे) २. ऑस्ट्रेलियाचा दोष नक्की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
न
निनाद मुक्काम … Wed, 01/14/2015 - 11:30 नवीन
माझा प्रतिसाद नीट वाचला आहे का भांडवलशाहीत सनदशीर काहीहि नसते मात्र सनदशीर मार्गाने आम्ही अमुक अमुक केले असे म्हणण्याची पद्धत असते. ज्यू लोकांनी निरपराध लहान मुले व महिला पेलेस्तैन येथे हल्ले करून त्यांच्या राज्य कर्त्यांनी मारल्या म्हणून वाईट वाटू घेतले नाही , आमचा १ नागरिक मारला तर तुमचा १० मारू असा हिशोब असतो, भारतात दहशतवादी हे पाकिस्तान काश्मीर व इतर मुद्द्यांच्या मुळे पारंपारिक युद्धात निभाव लागत नाहीत म्हणून छुपे युद्ध जिहादचा भाग म्हणून पाठवतात , बोको हराम , हमास किंवा मुल्ला ओमर ची तालिबान भारतात अतिरेकी पाठवत नाही . इतर देशांच्या भानगडीत भारत पडत नाही म्हणूनच पाकिस्तान वगळता बहुतेक सर्व मुस्लिम देशात भारताबाबत चांगले मत आहे. शीत युद्धाच्या काळात दोन्ही बाजूने अनेक पत्रकार विचारवंत राजकीय नेते ह्यांच्या हत्या झाल्या , हे दोघांना माहिती आहे , पैगंबर चे चित्र काढणे कायद्याने गुन्हा म्हणून सिद्ध केले तर असे प्रकार होणार नाहीत , तुम्हाला उपहास करायचा असेल तर अनेक मुस्लिम राज्यकर्ते आहेत त्यांचा करा ,अनेक हॉलीवूड सिनेमातून तो होतो , आमच्या कार्यालयात सलग ३ दिवस भीतीचे वेदनेचे वातावरण होते कारण जे पेरिस येथे घडले ते म्युनिक मध्ये घडू शकते ह्याची त्यांना जाणीव होती. मात्र भारतात असा हल्ला झाला तर निषेध सोडा पण आपल्याला काय पडले आहे त्याचे असा त्यांचा अभिर्भाव असतो , माफ करा माझ्या माणसांच्या मरणाचे तुम्हाला मोल नाही आणि तुमच्या दुक्खात आमचे काही भारतीय मात्र आगंतुक रुदाल्या बनून सोशल मिडीयावर मातम करतात. शस्त्र न विकता मानवी समाजाला उपयोगी गोष्टींची निर्यात करून प्रगत देशांनी आपली प्रगती राखण्याची सवय अंगिकारली तर जगातून दहशतवाद संपेल , जगाला विंडोज देणारा गेट्स व जगावर अणु युद्धाची टांगती तलवार ठेवणारा नित्य नियमाने नवीन हुकुमशहा जगाला सप्रेम भेट देणारी अमेरिका आहे. थोडक्यात ह्या प्रकाराकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन नुकतेच आपल्या सीमेवर दोन्ही बाजूने तुफान गोळीबार झाला ह्यात दोन्ही बाजूचे निरपराध नागरिक व काही सैनिक मारल्या गेले , आता पाकिस्तानी काश्मीर मधील काही नागरिक मेले म्हणून भारतात कोणत्याही राजकीय पक्षाने विरोध दर्शविला नाही , आमची माणसे सैनिक मारलीत तर आम्ही तुमची माणसे मारू सैनिक मारू थोडक्यात काय जश्यात तसे मग फ्रेंच लोकांनी लिबियात एक गडाफी मारण्यासाठी तुफानी हल्ला केला जेणेकरून भारताला त्यांचे रफाल विमान किती उपयोगी व बहुगुणी आहे हे दाखवून हवाई इतिहासातील सर्वात मोठा सौदा करायचा होता , तो त्यांनी केला पण त्यांच्या दुर्देवाने तो पूर्णत्वास गेला नाही. रशिया विरुद्ध लढणारा लादेन धर्म योद्धा व अमेरिका विरुद्ध लढणारा लादेन दहशतवादी कृपा करून वेस्टन चष्म्यातून जगाकडे पाहू नका पाकिस्तानला लाख शिव्या देऊन त्याहून जास्त लाखो रुपयाचे नुकतेच अनुदान देणारी अमेरिका भारताने रशियाची ह्या वेळेस शस्त्र करार का केले म्हणून मोदी सरकारला जाब विचारते. हीच युरोपियन राष्ट्रे मुसलमानाचा पुळका येउन मोदींना विसा व गुजरातची व्यापार नाकारतात व ते प्रधान मंत्री झाले की त्यांची भाट गिरी सुरु करतात , ह्या लोकांची नैतिकता हि पैशांची स्वार्थाची मिंधी आहे व त्याहून मिंधे आहेत ह्याची जनता जी वाल्या कोळ्याच्या मुलांची बायकोची भूमिका पार पाडते, अमेरिका व युरोपियन राष्ट्रे हे वाल्या कोळी आहेत , त्यांना नारदाची गाठ अजून पडायची आहे ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
संदीप डांगे Wed, 01/14/2015 - 11:36 नवीन
कृपा करून वेस्टन चष्म्यातून जगाकडे पाहू नका
अगदी हेच म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
श
श्रीगुरुजी Wed, 01/14/2015 - 08:48 नवीन
>>> मुंबईत एका उपहार गृहाचे नाव काहीतरी वेगळे असावे ह्या उद्देशाने हिटलर चे नाव दिले , भारतात हे नाव अनेकदा बोलीभाषेत वापरले जाते उद्द एखादी व्यक्ती स्वभावाने एकदम हिटलर आहे ,ह्या नावाने टीव्ही वर एक सिरियल पण आली होती .पण मुंबई मधील अल्प संख्यांचा ज्यू समुदायाच्या ह्यामुळे भावना दुखावल्या गेल्या त्यांनी विरोध केला व आपल्या सरकारने मध्यस्थी करून त्या उपहार गृहाचे नाव बदलायला लावले , या नवी मुंबईतील उपाहारगृहाचे नाव 'हिटलर्स क्रॉस' असे होते. दबावामुळे मालकाला ते बदलावे लागले. भारतात दिल्लीत औरंगजेब रस्ता, महाराष्ट्रात औरंगाबाद ही शहरे आहेत. औरंगजेब या क्रूर नराधमाचे नाव दिलेले आहे. ते बदलायची अनेकवेळा मागणी झाली. ही मागणी करणार्‍यांची जातीयवादी अशी संभावना करण्यात येते. परंतु हिटलरचे नाव बदलणारे मात्र मानवतावादी असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
न
निनाद मुक्काम … Wed, 01/14/2015 - 11:43 नवीन
अगदी बरोबर गुरुजी हिटलर चे नाव सुध्धा जगात कोणताही प्रकारे पुढे येउन नये हे पाहणारी हि लोक ह्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असतात मात्र संवेदनशील असण्याचा नैतिक हक्क गोरे व प्रगत लोकांना असतो अमेरिका लांदेन ला सनदशीर मार्गाने कोर्टात नेत नाही त्यांची मर्जी जर्मनी व फ्रांस इराक व सिरियात कुर्दिश लोकांना शस्त्रे देतात ,कुर्दिश मुलांचे बालपण ह्यांची शस्त्रे चालविण्यात वय जाणार उद्या ते तरुण झाले व त्यांचा बुद्धीभ्रंश करून त्यांना युरोपात जिहाद साठी कोणी पाठवले तर त्यांना नावे ठेवण्यात हीच लोक पुढे असतात .महाराष्ट्रात अहमदाबाद चे अहिल्याबाई नगर होणार आहे तसे एकदिवस औरंग्या चे सुद्धा नाव रस्त्यावरील धुळीत जाईल आमेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चिऊकाऊ Wed, 01/14/2015 - 05:54 नवीन
The usual argument by the "GOOD" islam followers is "All Islam followers are NOT the terrorist". Agreed. But what those GOOD islamic doing against these BAD except such condemning to terrorist attacks? What do they say about the Sharia, Kuran and Jihad? Do they justify or oppose? I see many gals even some young girls with covered head who appear to be family and peace loving. Do they at least dare to say that we need freedom from these bindings? Many men keep on drinking alcohol against islamic laws and I am dam sure many of the women must be longing to throw away her hijab, niqab and burka. Of course nobody from all those GOOD islamics dares to ask for change in the Sharia law. So what these good people worth for? They just want the good lifestyle, leisure and comforts, scientific equipment and gadgets and even weapons from our modern countries and wish to protect their islamic laws and impose all such 1400 years old bindings and thoughts on their kids who go to the same school where our kids go. Modern world is really looking for the voice from peaceful GOOD islamic to CHANGE as per the time, as per the 21st century. Every religion has extremist and the bad customs and traditions. While whole world is altering the lifestyle, religious behavior, islamic yet ask to follow 1500 years old sharia in our advanced countries, ask to allow mask at public places and organizations which I see a serous threat for security. We see the islamic women downtrodden and that disturbs us as a human. We wish the islam women MUST have all the rights that today we have. We wish the Imams to explain how they teach the koran TODAY. How do they and parents define and explain the concepts of jihad against the non-islamic to kids who were born as the citizens of the developed nations where most of the people have almost no dominance of religion on their daily life. And if they don't wish to CHANGE they have no moral right to exploit the modern science and technological advances and they deserve life in dessert with camels to travel and birds for exchanging messages, and that 1500 years old health facilities.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Wed, 01/14/2015 - 11:56 नवीन
@BAD except such condemning to terrorist attacks? किती अमेरिकन व वेस्टन वल्ड मधील सामान्य सुजाण सुसंस्कृत जनता हिरोशिमा ,अफगानिस्तान इराक मधील नर नरसंहाराचा निषेध करत्तात. किती इंग्रजी जनतेने जालियानवाला बाग हत्या कांडाचा निषेध केला जनरल डायर सुटला म्हणून किती जण इंग्लड अधे रस्त्यावर उतरले आपले टेबल मेनर हे जगात सर्वोत्तम असून ते जगात सर्वांनी पाळले पाहिजे , ते न पाळता जपानी चीनी व भारतीय तोंड उघडे ठेवून अन्नाचे तोंडात चर्वण करतात , ढेकर मोठ्याने देतात म्हणून त्यांना असंस्कृत ठरवून त्यांची खिल्ली उडवणारे व आपलाच धर्म आपलीच संस्कृती श्रेष्ठ म्हणणारे धर्मांध उन्नीस बीस फरकाने सारखेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिऊकाऊ
स
संदीप डांगे Wed, 01/14/2015 - 12:20 नवीन
आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे असाच न्याय तमाम अमेरिका व मित्रमंडळींचा असतो नेहमी. आताही अतिरेक्यांना मारण्याच्या नावाखाली अमेरिकेचा ड्रोन नावाचा जो मनमानेल तसा विडिओ गेम सुरु आहे त्याबद्दल सर्वज्ञानी लोकांना काय म्हणायचे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
क
काळा पहाड Wed, 01/14/2015 - 13:30 नवीन
आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे असाच न्याय तमाम अमेरिका व मित्रमंडळींचा असतो नेहमी. आताही अतिरेक्यांना मारण्याच्या नावाखाली अमेरिकेचा ड्रोन नावाचा जो मनमानेल तसा विडिओ गेम सुरु आहे त्याबद्दल सर्वज्ञानी लोकांना काय म्हणायचे आहे?
आता हसू यायला लागलंय. अहो, जो तो देश आपला फायदा पहाणारच ना? किंबहुना भारताकडेही ड्रोन्स आहेत. ते वापरून अत्यंत अचूक निशाणा साधता येतो आणि आपल्या सैनिकांना धोका नसतो. यात वाईट काय आहे? जग कायम आपल्या फायद्याचंच बघत असतं. अमेरिकेने त्यांच्या राष्ट्राच्या संरक्षणासाठी अणुअस्त्रे वापरतील. जर पाकिस्तानशी युद्ध झाले तर भारतालाही शेवटचा पर्याय म्हणून का होईना ती वापरावीच लागतील. जसे ते इराक मध्ये लोक मारतात तसेच लोक आपल्यालाही काश्मीर मध्ये मारावेच लागतील. यात नैतिकतेचा प्रश्न येत नाही कारण हा संरक्षणाशी संबंधित विषय आहे. एक लक्षात ठेवा. काश्मीर मधला शेवटचा माणूस मारावा लागला तरीही चालेल पण भारत काश्मीर कधीही सोडणार नाही कारण तो स्ट्रॅटेजिकली महत्वाचा भाग आहे. अगदी इंच आणि इंच बाँब्सचा भडिमार करून स्वतंत्रता मागणारा प्रत्येक जीव नष्ट केला जाईल पण काश्मीर मिळणार नाही. मी याचं समर्थन करतो आणि तिथे बटण दाबणारा मी असतो तरी मी हे एक कर्तव्य समजून केलं असतं. हे गरजेचं आहे आणि हे असंच करायचं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 01/14/2015 - 14:39 नवीन
तुम्ही ड्रोन हल्ल्यांबाबत फारच अज्ञानी दिसताय. निष्पाप (अतिरेकी नाही, सामान्य लोक नाहीतर परत शब्दात पकडलं मला) लोकांना टिपून टिपून मारण्याच्या अमेरिकेच्या उद्योगाबद्दल बोलत होतो. आला संशय, हाण मिसाईल असा प्रकार आहे. कोण कुठले कायदे, राज्यघटना वैगेरे गेले तेल लावत. आता तुम्हाला जगातला प्रत्येक मुसलमान हा आतंकवादीच वाटत असेल तर बरंय बाबा हे वाचा आणि अजून हसा. On 3 June 2009, the United Nations Human Rights Council (UNHRC) delivered a report sharply critical of US tactics. The report asserted that the US government has failed to keep track of civilian casualties of its military operations, including the drone attacks, and to provide means for citizens of affected nations to obtain information about the casualties and any legal inquests regarding them.[146] Any such information held by the U.S. military is allegedly inaccessible to the public due to the high level of secrecy surrounding the drone attacks program.[147] The US representative at UNHRC has argued that the UN investigator for extrajudicial, summary or arbitrary executions does not have jurisdiction over US military actions,[146] while another US diplomat claimed that the US military is investigating any wrongdoing and doing all it can to furnish information about the deaths. म्हणजे कसे आम्हीच अन्वेषण करणार आमच्यावरच्या आरोपांचे पण जरा कुठे जगात कुणी खुट्ट केले कि संशयास्पद ठरवून बेधडक बॉम्बिंग करणार. पूर्ण इथे वाचा http://en.wikipedia.org/wiki/Drone_strikes_in_Pakistan खुलासा: मी अमेरिकेच्या दुटप्पी परराष्ट्रनीती विरोधात आहे. म्हणजे पाकिस्तानप्रेमी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. जगात जिथे कुठे विनाकारण निष्पाप लोक मारली जातात त्याच्याविरोधात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Wed, 01/14/2015 - 14:50 नवीन
हो हे असंच असतं. पटलं तर व्हय म्हणा नै तर सोडून द्या. असंच बेधडक बॉंबिंग केलं जातं आणि पुढंही केलं जाईल. त्याला नाईलाज आहे. मुसलमानांनी त्यांच्यातल्या अतिरेक्यांना टिपून मारावं. त्यांना शोधून टिपणं ही जगाची जबाबदारी नाही. उदाहरणार्थ, जर पाकिस्तानातल्या अतिरेक्यांनी भारतावर हल्ला केला तर त्यांना पाकिस्तानात शोधणं ही भारताची जबाबदारी नाही. त्यांना पाकिस्ताननं शोधून मारावं नाहीतर भारतानं पाकिस्तानवर बाँबिंग करावं. अमेरिका असंच करत असते आणि हाच जगाचा नियम आहे. तुम्हाला त्यात मरणारे काही निरपराध सापडत असतील तर ते दुर्दैवी कोलॅटरल डॅमेज आहेत. आणि त्यांबद्दल फार तर दु:ख वगैरे व्यक्त करू शकतो पण चौकशी वगैरे काही ते करू देणार नाहीत. सर्वधर्मसमभावी वगैरे मूर्खपणा येत नाही ना त्यांना, त्यामुळं. भारताची पॉलिसीही आता याच मार्गानं जाईल. तुम्ही मेणबत्या लावून निषेध करायला मोकळे आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 01/14/2015 - 15:13 नवीन
मेणबत्त्याच तर नाही पटत बा आपल्याला, फक्त अमेरिका व मित्रराष्ट्रांच्या कुणी कानाखाली वाजवली कि त्यांनी आम्हाला मारणारे आतंकवादी आहे म्हणून बोंबलू नये. सनदशीर मार्गाने विरोध करा वैगेरे म्हणू नये. आपणच खतपाणी घालून वाढवलेले भूत आपल्यालाच झोम्बतंय म्हणून गावभर फिरू नये "मी आहे चार्ली" चे टी-शर्ट घालून…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Wed, 01/14/2015 - 19:49 नवीन
तुम्ही जे तथाकथितरित्या कानाखाली वाजवणं वगैरे जे बोलताय, त्याला राज्यबाह्य कर्त्यां (नॉनस्टेट अ‍ॅक्टर्स) नी केलेला टेररिझम असं म्हटलं जातं. एक पाकिस्तान सोडला तर अशा कर्त्यांना सध्या वाईट दिवस आहेत हे मान्य करण्यात काहीच प्रत्यवाय नसावा. सुरक्षा यंत्रणा या यडपटांची ज्या प्रकारे सालटी सोलतात ते जर तुम्हाला माहीत असतं तर हा अतिरेक्यांबद्दल दाखवत असलेला उसना हीरोइझम लगेच गळून पडेल. एखाद्या राष्ट्राला त्यांना त्रास देणार्‍या बाजारबुणग्यांना कोणत्याही प्रकारे व कोणत्याही ताकतीने उत्तर देण्याचा हक्क असतोच. हा अधिकार त्यांना जनतेनं दिलेला असतो. केन्या दुतावासावरच्या हल्यानंतर अमेरिकेनं काबूलबर बाँबफेक केली होती. इथं त्यांनी निरपराध मरतील, मानवाधिकाराचं काय वगैरे विचार करत बसले असते तर अवघड होतं. तेव्हा तुम्ही सांगताय ते कट्ट्यावर बोलायला ठीक आहे पण त्याला फारसं महत्व नाही. असा प्रयत्न अल कायदाने ९/११ ला केला होता, तर अमेरिकेनं दोन मुस्लीम राष्ट्रं बेचिराख केली आणि बाकीची अपंग केली. ती अमेरिकेच्या कानाखाली वाजवायची धमक दाखवताय तर अमेरिका जेव्हा ते हात उखडेल आणि आणखी दोन मुस्लीम राष्ट्रं भिकेला लागतील तेव्हा सहानुभूतीची अपेक्षा करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 01/15/2015 - 07:59 नवीन
चला, एक मस्त पैकी चहा मारूया, नाहीतर तुम्ही मला पुढच्या २-४ प्रतिक्रियांमध्ये थेट अल-कायदा चा हस्तक म्हणून मोकळे व्हाल. बाद्वे, ही तुमची लाडकी अम्रीक्का जिथे आपला काही संबंध नाही तिथेही जाउन नासधूस करत असते, त्याबद्दल आपले मौल्यवान मत जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
श
श्रीगुरुजी Wed, 01/14/2015 - 17:53 नवीन
>>> खुलासा: मी अमेरिकेच्या दुटप्पी परराष्ट्रनीती विरोधात आहे. म्हणजे पाकिस्तानप्रेमी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. जगात जिथे कुठे विनाकारण निष्पाप लोक मारली जातात त्याच्याविरोधात आहे. पण तुम्ही तर तुमच्या मूळ लेखात इस्लामी अतिरेक्यांनी पॅरिसमध्ये मारलेल्या १६ जणांच्या हत्येचे समर्थन केले आहे. काय हा विरोधाभास! कदाचित तुम्हाला असे म्हणायचे असावे - "जगात जिथे कुठे विनाकारण अमुस्लिमांकडून निष्पाप लोक मारली जातात त्याच्याविरोधात आहे."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 01/14/2015 - 20:18 नवीन
तुम्ही पत्रकार आहात का हो? नै म्हणजे बोलणाऱ्याच्या तोंडी नसलेले शब्द कोंबून आपल्याला पाहिजे तशी सनसनाटी बातमी तयार करतात ते. मंग आजकाल कुठल्या च्यानल वर असता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/15/2015 - 08:24 नवीन
"खुलासा: मी अमेरिकेच्या दुटप्पी परराष्ट्रनीती विरोधात आहे. म्हणजे पाकिस्तानप्रेमी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. जगात जिथे कुठे विनाकारण निष्पाप लोक मारली जातात त्याच्याविरोधात आहे." हे तुमचेच वाक्य आहे. थोडं वर स्क्रोल करा. तुम्हाला आपलीच प्रतिक्रिया दिसेल. त्यात तळाला हे वाक्य आहे. तुमची याच्या बरोबर विरूद्ध भूमिका तुमच्या मूळ लेखात आहे ज्यात तुम्ही अतिरेक्यांनी पॅरिसमध्ये मारलेल्या निष्पाप नागरिकांच्या हत्येचं समर्थन आहे. एकाचवेळी तुमचा निष्पाप लोकांच्या हत्येला विरोध आहे आणि त्याचवेळी मुस्लिम अतिरेक्यांनी पॅरिसमध्ये मारलेल्या निष्पाप नागरिकांच्या हत्येला तुमचा पाठिंबा आहे. या दोन्ही परस्परविरोधी भूमिका एकत्र केल्या तर एकच निष्कर्ष निघतो तो म्हणजे, "तुम्ही जगात जिथे कुठे विनाकारण अमुस्लिमांकडून निष्पाप लोक मारली जातात त्याच्या विरोधात आहे आणि जर मुस्लिमांनी निष्पाप लोक मारले तर त्याला तुमचा पाठिंबा आहे.". थोङक्यात म्हणजे तुमचा विरोध किंवा पाठिंबा मारणार्‍याच्या धर्मावर अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 01/16/2015 - 19:47 नवीन
माझा मूळ लेख जरा व्यवस्थित चष्मारहित अवस्थेत वाचा. निष्पाप याचा अर्थ ज्यांच्यावर कुठलाही आरोप नाही, ज्यांनी कुठलीही आगळीक केली नाही. "विनाकारण" ज्यांचा जीव घेतला जातो ते निष्पाप. जसे सीएसटीवर मारले ते, ताज मध्ये मारले ते, ट्रेनमध्ये थकून भागून घरी जात होते ते, ते खरे निष्पाप. आपल्या व्यंगचित्रातून कुठलाही सृजनात्मक विचार न देता विखारी प्रचार करणारे कसे काय निष्पाप? समजून उमजून खोड्या केल्या तर कसे काय निष्पाप? कुणीतरी फ्रान्समध्ये चित्र काढून अपमान करतो म्हणून इथल्या भारतातल्या चित्रकाराला नाही ना मारले? किंवा हे सारे व्यंगचित्रकार सारखेच म्हणून तर कुणी दिसेल त्या व्यंगचित्रकाराला नाही ना मारले? मग तेवढे शर्ली एब्दोचेच कसे मारले? तुमची निष्पाप ची व्याख्या म्हणजे जे अमुस्लिम ते सारे निष्पाप अशीच आहे असे वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 01/17/2015 - 18:57 नवीन
>>> माझा मूळ लेख जरा व्यवस्थित चष्मारहित अवस्थेत वाचा. निष्पाप याचा अर्थ ज्यांच्यावर कुठलाही आरोप नाही, ज्यांनी कुठलीही आगळीक केली नाही. "विनाकारण" ज्यांचा जीव घेतला जातो ते निष्पाप. जसे सीएसटीवर मारले ते, ताज मध्ये मारले ते, ट्रेनमध्ये थकून भागून घरी जात होते ते, ते खरे निष्पाप. एखाद्यावर आरोप झाले म्हणजे लगेच तो पापी ठरून हत्येस पात्र होतो हे तुमचं अजब तर्कट आहे. >>> आपल्या व्यंगचित्रातून कुठलाही सृजनात्मक विचार न देता विखारी प्रचार करणारे कसे काय निष्पाप? समजून उमजून खोड्या केल्या तर कसे काय निष्पाप? कोणत्या कायद्यानुसार ते निष्पाप नसून पापी आहेत हे सिद्ध झालंय? फ्रान्सच्या का शरियतच्या का अल-कायदाच्या का अजून दुसर्‍या कोणत्यातरी न्यायासनाच्या? >>> कुणीतरी फ्रान्समध्ये चित्र काढून अपमान करतो म्हणून इथल्या भारतातल्या चित्रकाराला नाही ना मारले? किंवा हे सारे व्यंगचित्रकार सारखेच म्हणून तर कुणी दिसेल त्या व्यंगचित्रकाराला नाही ना मारले? मग तेवढे शर्ली एब्दोचेच कसे मारले? जे १७ जण मारले गेले त्यातला व्यंगचित्रकार एकच होता व उरलेले व्यंगचित्रकार नव्हते. तरीसुद्धा त्यांना मारून टाकण्यात आले आणि त्याचं तुम्ही समर्थन करताय. धन्य आहे. >>> तुमची निष्पाप ची व्याख्या म्हणजे जे अमुस्लिम ते सारे निष्पाप अशीच आहे असे वाटते पण दहशतवाद व हत्या हे तुम्हाला पुण्यकर्म वाटतंय त्याचं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Sun, 01/18/2015 - 09:06 नवीन
>>> >>> आपल्या व्यंगचित्रातून कुठलाही सृजनात्मक विचार न देता विखारी प्रचार करणारे कसे काय निष्पाप? समजून उमजून खोड्या केल्या तर कसे काय निष्पाप? >>> कोणत्या कायद्यानुसार ते निष्पाप नसून पापी आहेत हे सिद्ध झालंय? फ्रान्सच्या का शरियतच्या का अल-कायदाच्या का अजून दुसर्‍या कोणत्यातरी न्यायासनाच्या? नक्की कोणत्या कायद्यानुसार ते व्यंगचित्रकार निष्पाप नव्हते हे सिद्ध झालंय ते नाही सांगितलंत अजून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा