Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल

स
संदीप डांगे
Sat, 01/10/2015 - 23:32
🗣 358 प्रतिसाद
फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल सगळीकडे गदारोळ सुरु आहे. हजारो लोक रस्त्यांवर आले आहेत "अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला", "आम्ही सगळे चार्ल्स हेब्डो", वैगेरे वैगेरे. आणि त्यातल्याच काही अतिउत्साही महाभागांनी परिसरातल्या मस्जीदी उध्वस्त करून आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावला. मृतांबद्दल सहानुभूती असणे योग्यच आहे पण ती किती योग्य ते जरा तपासून बघायला हवी. मी स्वतः एक कलाकार असून कट्टरवाद्यांच्या भूमिकेतून मी ह्या हल्ल्याचे समर्थन केले कारण कुणीतरी हा वेगळा दृष्टीकोन मांडणे आवश्यक आहे, जो काही धाडसी वार्तापत्रे मांडत आहेतच. जेणे करून ह्या हत्याकांडाच्या इतर बाबींवर प्रकाश पडावा व मुस्लिमांची जी एकच एक प्रतिमा रंगवली जात आहे तो प्रयत्न हाणून पाडवा. पण काही मित्रांना माझा हा पवित्रा खटकला आणि त्याचे चेपू वर पडसाद उमटले. तिथे उदधृत काही विचार माझ्यापेक्षा जास्त चांगला,व्यवस्थित आणि माहितीपूर्ण विचार करणाऱ्या जाणकार मिपाकारांसमोर ठेवत आहे. चर्चा अपेक्षित आहे. "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने केलेल्या खोडसाळपणाबद्दल आज कुणीही बोलत नाही कारण कुणाची हत्या होणे म्हणजेच फार भयंकर एवढेच सामान्यपणे लोक समजतात. ज्याची हत्या झाली तो भारी निष्पाप आणि मारणारा क्रूर अविचारी नराधम. त्याच वेळेस गोडसेच कसे बरोबर, गांधी कसे मारण्याच्याच लायकीचे होते हे गेली साठ वर्षे आपण चघळत आहोत. म्हणजेच काय तर मारणारा आणि मरणारा ह्यापैकी जो आपला त्याचीच बाजू बरोबर. ह्यासंदर्भात आपण दोन अतिशय वेगळ्या गोष्टी लक्ष्यात घेतल्या पाहिजेत, एक म्हणजे, "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने फार खवचट आणि असंस्कृत अश्या व्यंगचित्रातून पैगंबरांचा अपमान केला. त्या साप्ताहिकाचा असे करण्यामागचा हेतू जाणून बुजून भावना दुखावून उचकवणे (provocative) असाच होता. माझा आक्षेप हा हत्याकांडाच्या पूर्वी झालेल्या बेजबाबदारपणाबद्दल आहे. लोक आज म्हणत आहेत कि "साधे एक चित्र काढले तर थेट गोळ्या घालायची काय गरज होती?" ते चित्र इतरांसाठी साधे असेल मुस्लिमांसाठी नाही हा एक मुद्दा, त्यातल्या एका व्यंगचित्रकाराचे मत असे होते "माझ्यासाठी पैगंबर पवित्र वैगेरे काही नाही, मी काही कुराणाचा कायदा मानत नाही, मी फ्रेंच कायदा मानतो." म्हणजेच इतरांच्या श्रद्धास्थानाला घाणेरड्या पद्धतीने चितारणार, त्यांचा अपमान करणार, वरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गळे काढणार. म्हणजे त्याला ज्या पद्दतीने इतरांच्या आत्मसन्मानाची हिंसा करता येणार ते तो करणार, त्याच्यावर इतरांनी त्यांच्या पद्दतीने प्रतिकार केला तर चूक. हा काय तर्क आहे? शब्द आणि चित्रांचे वार जास्त घातक असतात. बंदुकीपेक्षा लेखणी ताकतवान ते उगाच नाही म्हणत. एक गोळी एका वेळेस एकाला मारते. एकच चित्र लाखोंना लाखो वेळा आणि आयुष्यभर मारते. त्यामुळे लेखणी चालवताना हजारदा विचार करावा लागतो. दुसरी गोष्ट अशी कि जाणून बुजून केल्या जाणाऱ्या अपमानाचा बदला घेण्याची त्यांची ती रीत असेल, चांगली आहे कि वाईट आहे ह्यावर "आपण" कितीही काथ्याकुट केला तरी ते लोक बदलणार नाही. "हम करे सो कायदा" असाच सगळा प्रकार आहे तिकडे. जे काही बदलायचे आहे ते हेच बदलायचे आहे. जगातल्या सर्व मुस्लिमांना हे जाणवून देणे आवश्यक आहे कि "हम करे सो कायदा" हा प्रकार त्यांच्या जीवावर इतर मुठभर लोक करत आहेत. आणि आज तो शांतीप्रिय मुस्लिमांना व जगाला त्रासदायक ठरत आहे. ते करायचे सोडून तुम्ही जर पैगंबर आक्षेपार्ह स्थितीत दाखवले तर शांतीप्रिय मुस्लिम सुद्धा भडकून उठतील आणि जो उद्देश आहे तो उरणारच नाही. माझा मुद्दा फार साधा आहे. दहशतवाद (कोणताही, कारण जगात मुस्लिम दहशतवाद सोडून इतर अनेक धर्माचे, देशाचे, समाजाचे दहशतवादी आहेत. मिडिया त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो हा भाग वेगळा) व त्याबद्दल लिहिताना किंवा चित्र काढताना किमान एक लक्ष्यात घेतले पाहिजे कि कुठल्याही दहशतवादाला केवळ एकच एक बाजू नसते. हजारो कारणे आहेत. एक कलाकार म्हणून तुम्हाला सर्वांगीण विचार किंवा समजूतदारपणा दाखवता येत नसेल तर तुम्ही मरण्याच्या लायकीचेच असाल. हुसैनला आपण हिंदुनी का भारताबाहेर घालवले मग? पिके विरुद्ध का आंदोलन चालू आहे? जे चूक आहे त्याबद्दल जरूर लिहावे. लिहायला, छापायला मिळते म्हणून मर्यादा ओलांडू नये. साधीशी गोष्ट आहे. माझ्या-तुमच्या हातून काही गुन्हा घडला तर मला -तुम्हाला शिक्षा व्हावी किंवा ज्याने कुणी पाणउतारा करायचा त्याने माझा-तुमचा करावा. पण कुणी चारचौघात त्या गुन्ह्याला धरून आपल्या आई-बापावर अतिशय वाह्यात टीका केली तर ते तुम्ही किंवा मी सहन करू शकू काय? मुस्काट नाही का फोडणार त्याचे? बाकी राज्यघटना आणि कोर्टस याबद्दल, तर खूप दिवसांपासून चारली हेब्दो ला त्याचे धंधे बंद करण्यास सांगितले होते, त्याने ऐकले नाही. त्याच्याविरुद्ध केस म्हणजे "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी" म्हणून केस होत नव्हती. त्याचवेळेस स्वेच्छेने बुरखा घालणाऱ्या स्त्रियांवर बुरखा न घालण्याची सक्ती करून फ्रेंच सरकार एक वेगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत होते. (बहुतेक मुस्लिम स्त्रियांना बुरखा घालणे आवडते असे साधारणपणे वाचनात आले आहे, किंवा त्यांना ते त्यांचे दमन वैगेरे वाटतच नसेल कदाचित.) आंतरराष्ट्रीय स्तरावर मुस्लिम समाजाबद्दल फार दुटप्पी कारभार आहे. प्रत्येक कट्टरवादी आपलेच तेच खरे म्हणत असतो. तो धार्मिक असो वा कुठलाही. दोन घटना सांगतो. माझ्या ओळखीतले एक वयस्कर दलित पोलिस इन्स्पेक्टर होते, ते मला म्हणाले तू एक चित्र प्रदर्शन भरव, तुला काय पैसा लागेल तो मी पुरवतो. पण चित्रे माझ्या संकल्पनेनुसार असली पाहिजेत. श्रीराम आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया याबद्दल अतिशय गलिच्छ प्रकारे त्यांनी वर्णन केले व म्हणाले हाच खरा इतिहास आहे. शबरी काही म्हातारी नव्हती तर ती एक तरणीताठी युवती होती, त्यांच्यात प्रेमालाप दाखव इत्यादी इत्यादी. त्यावेळेस मीसुद्धा देव वैगेरे मानणारा नव्हतो आणि रामायणातल्या असंख्य विसंगती मलाही दिसत होत्या. पण त्यांचे उद्दिष्ट वेगळे होते, त्यांना रामाचे जनमानसात असलेले पूज्यस्वरूप मलिन करायचे होते. कारण काय तर हिंदू धर्म कसा फालतू आहे हे सिद्ध करायचे. आणि "त्यांनी" स्वीकारलेला बौद्ध धर्म कसा श्रेष्ठ असे मिरवायचे. मी त्यांना सरळ नकार दिला कारण हे सगळेच बेसलेस आहे. मुद्दलातच चुकीचे आहे. एखाद्या धर्मात काही चुकीचे चाललेले असेल तर ते बदलण्याऐवजी त्यांच्या पुज्यस्थानावर हल्ला करा ते डळमळीत करा, हेच केले जाते. म्हणजे जे चुकीचे आहे ते तर चालू राहते, लोक मूर्ख राहतात आणि फ्रेममधला राम जाऊन बुद्ध किंवा जीजस येतो. कारण लोक शहाणे झाले तर सगळ्याच फ्रेम्स फेकून देतील, मग ह्या तमाम धर्मगुरुंचे कसे चालणार? पु ल देशपांडे यांचा एक अतिशय सुंदर वैचारिक लेख आहे यावर. त्यात त्यांनी धर्मश्रद्धांवरील आक्रमण आणि त्याचे माणसाच्या मनावर होणारे परिणाम याबद्दल लिहिले आहे. दुसरी घटना. एकदा एका मित्राशी वाद झाला होता "भारतीय मुस्लिम शाळांमधून वन्दे मातरम म्हणत नाहीत" यावरून. त्यावेळी तो जो पेटला होता आणि त्याच्या डोळ्यांतून अक्षरश आग बरसत होती. मी म्हणालो कि त्यांना म्हणायचे कि नाही त्यांचे त्यांना ठरवू दे आपण त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत. त्यावर तू फारच चिडला होता. तेव्हा ते त्याचे वन्दे मातरम "लादणे" असेच होते. स्वतंत्र भारतात प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. कुणी एक त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत, हिंदू संघटना मुस्लिम शाळेतल्या वन्दे मातरम बद्दल फार संवेदनशील आहेत. जणू काही त्यांनी वन्दे मातरम नाही म्हटले म्हणजे ते देशद्रोही. मग आपले हिंदू धड राष्ट्रगीत ना म्हणू दे ना, तिकडे लक्ष नाही देणार. हा एक प्रकारचा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन आहे. मोठ्या संख्येने मुस्लिम सैन्यात आहेत, शहीद होतात, देशात इतरही क्षेत्रात देशाचे नाव मोठे करतात, तरी त्यांच्यावर संशय घेतोच. दोन धर्मात कुणीतरी दंगली घडवून आणतो, आपण एकमेकांची डोकी फोडतो. आणि दोघेही आयुष्यभर त्यांनी असे केले म्हणून आम्ही तसे केले म्हणत असतो. फायदा घेणारा फायदा घेऊन मोकळा. आपले बरेच मुस्लिम मित्र असतील. कधी त्यांना फेस टू फेस विचारून बघा. त्यांना काय वाटते ते. ते काहीही बोलले तरी "ते आपल्याशी कधीच खरे बोलणार नाहीत" हाच गंड सर्वसामान्य हिंदू बाळगून असतो. दुर्दैवाने तो खरा कि खोटा हे कुणीच कधी सांगू शकणार नाही. समाजसुधारणेचा आव आणणाऱ्या सर्वाना परिस्थितीचे पूर्ण भान आवश्यक आहे. समाजात सुधारणा करण्याची खरीच अपेक्षा व तळमळ असणारे कुणाची खिल्ली उडवत नाहीत. नाहीतर प्रकाश आमटे आदिवासींना नुसते "तुम्ही किती बावळट आणि मागासलेले आहात" असेच म्हणत राहिले असते कि झाली असती त्यांच्यात सुधारणा. आणि राजा राम मोहन राय यांनी घाणेरडी व्यंगचित्रे काढली असती तर सतीप्रथा बंद झाली असती. महात्मा फुले लोक मुलीना शिकवत नाहीत म्हणून लोकांना वाकुल्या दाखवत राहिले असते. इतरही अनेक उदाहरणे आहेत. याउपरही हाच आणि असाच मार्ग असेल तर शेवटही असाच होईल. मुस्लिमांच्या शरिया ची भीती घातली जाते. इतर लोक छुप्या मार्गाने तेच करतात ते मात्र नामानिराळे. दुतोंडी जे म्हणतो मी ते हेच. सगळीकडेच हे होत आहे. आपणच काहीतरी करायला पाहिजे दरी मिटवायला. नाही का? जाता जाता: ज्या जगात अमेरिका सारखा देश आहे, त्याने कधीही शांततेने जगता येईल असा विचार करू नये. अमेरिका फार कुटीलतेने दोन राष्ट्र, दोन समूह, दोन समाजामध्ये तेढ व अविश्वास निर्माण करण्यासाठी व त्यातून आपला फायदा आणि वर्चस्व मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या दोन महिन्यात तेल-जगतात काय चालले आहे ते बघावे आणि आस्ट्रेलिया व फ्रांस मध्ये झालेल्या हल्ल्यांचा संबंध जोडता येतो का ते पाहावे. घटना फार सरळ आणि उघड जरी असल्या तरी त्या तितक्या सरळ कधीच नसतात. माझे मत तर असे आहे कि नेहमीप्रमाणे मुस्लिम जगताविरुध्द जनमत तापवण्याचा हा प्रकार अमेरिका करत आहे. सदर दोन्ही हल्ले अमेरिका पुरुस्कृत आहेत. कारण दोन्ही हल्ल्यांच्या कार्यपद्धतीत फारच विसंगती आहेत. ज्या साधारणपणे आढळत नाहीत.

प्रतिक्रिया द्या
123231 वाचन

💬 प्रतिसाद (358)
आ
आजानुकर्ण Sat, 01/17/2015 - 19:28 नवीन
आयपीएल आणि बीसीसीआय हा एकच तराजू आहे. हे वाचा स्वतः बीसीसीआयने कोर्टात दिलेले निवेदन. हे वाचूनही तुम्हाला बीसीसीआयचे समर्थन म्हणजे देशभक्ती म्हणायचे असेल तर खुशाल म्हणा. http://www.thehindu.com/2004/10/01/stories/2004100104821200.htm NEW DELHI, SEPT. 30 . Sachin Tendulkar, Sourav Ganguly, Rahul Dravid and ... play for the official team of the Board of Control for Cricket in India (BCCI) and not the official team of India. "If India plays England, it is a match played by the official team of BCCI and not the official team of India," BCCI counsel and senior advocate, K. K. Venugopal, said in the Supreme Court today. This was stated before a five-judge Bench, headed by Justice N. Santosh Hegde, by Mr. Venugopal in support of the BCCI stand that its activities, including the selection of the Indian team, had nothing to do with the Government of India. "We do not even fly the national flag nor use any national emblem in the activities of the Board," he said. When the popular film ``Devdas'' was selected as an Indian entry into an international film festival, its selection had no official stamp of the Government of India. Mr. Venugopal said India as a country was not represented at the International Cricket Council and that the Board uses its own flag. — PTI
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 01/18/2015 - 08:49 नवीन
>>> आयपीएल आणि बीसीसीआय हा एकच तराजू आहे. आयपीएल ही बीसीसीआयने आयोजित केलेली खाजगी संघांची स्पर्धा आहे. यात भारत देशाचा काहीही संबंध नाही. >>> हे वाचा स्वतः बीसीसीआयने कोर्टात दिलेले निवेदन. हे वाचूनही तुम्हाला बीसीसीआयचे समर्थन म्हणजे देशभक्ती म्हणायचे असेल तर खुशाल म्हणा. बीसीसीआय स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही निवेदन देतील. पण त्यात सत्यांश किती? >>> "We do not even fly the national flag nor use any national emblem in the activities of the Board," he said. विश्वचषक, चॅम्पियन्स अशा स्पर्धेतील कोणत्याही सामन्यापूर्वी सामन्यात खेळणार्‍या दोन्ही देशांचा राष्ट्रध्वज फडकाविला जातो व त्यानंतर दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाजविले जाते. नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू होण्याआधी दोन्ही देशाचा राष्ट्रध्वज फडकाविला गेला व त्यानंतर दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाजविले गेले. भारतीय संघातील खेळाडूंच्या हेल्मेटवर भारतीय राष्ट्रध्वज कोरलेला आहे. भारताने १९८३ व नंतर २०११ मध्ये विश्वचषक जिंकला तेव्हा विश्वचषकावर विजेता म्हणून भारत देशाचे नाव कोरले होते, बीसीसीआयचे नव्हे. जेव्हा संघ एखाद्या देशाचे अधिकृत प्रतिनिधित्व करतो तेव्हाच असे केले जाते. त्यामुळे बीसीसीआय खोटं बोलत आहे हे अगदी उघड दिसत आहे. पण असे बीसीसीआय का करत आहे? त्याचे कारण म्हणजे बीसीसीआय वर धनदांडगे उद्योगपती व राजकारण्यांचे वर्चस्व आहे आणि आयकर, सेवाकर, माहिती अधिकारांची कक्षा इ. पासून लांब राहण्यासाठी बीसीसीआयने आपण खाजगी संस्था असल्याचा आव आणला आहे. >>> Mr. Venugopal said India as a country was not represented at the International Cricket Council and that the Board uses its own flag. — PTI हे पण खोटं आहे. क्रिकेटच्या कोणत्याही स्पर्धेत भारताचा राष्ट्र्ध्वज असतो, बीसीसीआय चा नव्हे. बीसीसीआय खोटे बोलत आहे हे उघडच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ख
खटपट्या Sun, 01/18/2015 - 09:06 नवीन
विश्वचषक, चॅम्पियन्स अशा स्पर्धेतील कोणत्याही सामन्यापूर्वी सामन्यात खेळणार्‍या दोन्ही देशांचा राष्ट्रध्वज फडकाविला जातो व त्यानंतर दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाजविले जाते.
खरं तर "वेस्ट ईंडीज" हा मुळात एक देश नाहीये. अनेक देशांच्या क्रिकेट समीत्यांचा मिळून बनलेला एक संघ आहे. वेस्ट ईंडीज समूहामधे जे देश सामील आहेत त्यांची करंसीदेखील वेगवेगळी आहे. एक राष्ट्रगीत आहे का माहीत नाही. पण जो ध्वज फडकावला जातो तो वेस्टईंडीज क्रिकेट समीतीचा ध्वज आहे बहूतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 01/18/2015 - 13:57 नवीन
बरोबर. वेस्ट इंडिजचा संघ म्हणजे कॅरेबिअन समूहातील पोर्ट ऑफ स्पेन, जमैका, त्रिनिदाद, बार्बेडोस अशा अनेक छोट्या देशातील खेळाडूंचा एकत्रित संघ आहे. त्यामुळे तो संघ कोणत्याही विशिष्ट देशाचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत न वापरता त्या संघाच्या संघटनेचा ध्वज व गीत वापरतो. परंतु इतर देशांचे स्वतःचे संघ असल्यामुळे ते आपापल्या देशांचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत वापरतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
आ
आजानुकर्ण Sun, 01/18/2015 - 12:21 नवीन
स्वतः बीसीसीआय (पैशासाठी की आणखी कशासाठीही) आम्ही भारत देशाचे प्रतिनिधी नाही. भारत सरकारचा आणि आमचा काहीही संबंध नाही. खेळाडू आमच्यासाठी खेळतात देशासाठी नाही असे निवेदन सुप्रीम कोर्टात देते. कोर्ट ते मान्य करते. तरीही तुम्हाला - तुमच्या मते खोटारड्या - अशा प्रायवेट कंपनीसाठी खेळणे हे देशासाठी खेळणे आहे असे वाटते. आणि अशी प्रायवेट कंपनीचे समर्थन करणे ही देशभक्ती वाटते. शिवाय अशा मतलबापुरत्या भारतीय कंपनीच्या खेळाडूंचे समर्थन न करणे देशद्रोह वाटतो. धन्य आहात. आमचा तुमच्या देशभक्तीला शिरसाष्टांग नमस्कार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 01/18/2015 - 13:14 नवीन
>>> स्वतः बीसीसीआय (पैशासाठी की आणखी कशासाठीही) आम्ही भारत देशाचे प्रतिनिधी नाही. भारत सरकारचा आणि आमचा काहीही संबंध नाही. खेळाडू आमच्यासाठी खेळतात देशासाठी नाही असे निवेदन सुप्रीम कोर्टात देते. कोर्ट ते मान्य करते. तरीही तुम्हाला - तुमच्या मते खोटारड्या - अशा प्रायवेट कंपनीसाठी खेळणे हे देशासाठी खेळणे आहे असे वाटते. आणि अशी प्रायवेट कंपनीचे समर्थन करणे ही देशभक्ती वाटते. शिवाय अशा मतलबापुरत्या भारतीय कंपनीच्या खेळाडूंचे समर्थन न करणे देशद्रोह वाटतो. धन्य आहात. मी बीसीसीआयचे समर्थन करतच नाहीय्ये. भारतीय संघ हा बीसीसीआय या खाजगी संस्थेचा संघ आहे असे तुम्ही मानताय. भारतीय नागरिक तसे मानतच नाहीत. ते या संघाला 'भारताचा' संघ मानतात. हा संघ भारत या देशाचा संघ आहे हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे मी दिलीत (भारताच्या ध्वजाचा वापर, भारताचे राष्ट्रगीत). तरीसुद्धा हा संघ भारत या देशाचा संघ नसून बीसीसीआय या खाजगी संघटनेचा संघ आहे असे तुमचे मत आहे. आपल्याला माहिती अधिकाराच्या कक्षेतून वगळण्यासाठी बीसीसीआय ने न्यायालयात खोटे शपथपत्र दिले आहे. बीसीसीआय प्रमाणेच इतर खेळांच्या संघटनांमध्ये भारत सरकार हसक्षेप करीत नाही किंवा त्या नियंत्रित करीत नाही. परंतु या खेळांचे संघ हे त्या खाजगी संघटनांचे संघ नसून ते रत या देशाचे संघ असतात व ते या खाजगी संघटनांचे प्रतिनिधित्व करत नसून भारत या देशाचे प्रतिनिधित्व करत असतात. जे खेळाडू भारत या देशाचे प्रतिनिधित्व करत असताना गद्दारी करतात तो देशद्रोहच असतो. >>> आमचा तुमच्या देशभक्तीला शिरसाष्टांग नमस्कार. धन्यवाद! तुम्हाला अनेक उत्तम आशीर्वाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Sun, 01/18/2015 - 13:29 नवीन
एकंदर ध्वजसंहितेनुसार नागरिकांवर बंधने होती तेव्हा बीसीसीआय संघाला भारताचा ध्वज वापरायचीही परवानगी नव्हती. त्यासंदर्भातले अनेक खटले कोर्टातही झाले आहेत. आता इतर सर्व नागरिकांनाही भारताचा ध्वज वापरायची परवानगी आहे. त्याचप्रमाणे बीसीसीआयलाही परवानगी मिळाली आहे. भारताच्या अधिकृत प्रतिनिधीत्वाचा जसा इथे संबंध नाही. तसा भारतीय नागरिक काय मानतात आणि काय मानत नाहीत याचाही इथे संबंध नाही. सुनीता विल्यम किंवा कल्पना चावलाचे यश हे आपलेच आहे असेही भारतीय नागरिक मानतात.
जे खेळाडू भारत या देशाचे प्रतिनिधित्व करत असताना गद्दारी करतात
मुळात हे खेळाडू भारत देशाचे प्रतिनिधित्व करतात हा हायपॉथिसिचच चुकीचा आहे. त्या खेळाडूंच्या मालकांनी स्पष्ट सांगितलंय की आम्ही भारत देशाचे प्रतिनिधित्व करत नाही. त्याच्या विरोधात एखाद्या खेळाडूने अवाक्षर उच्चारलेले मी वाचलेले नाही. त्यामुळे त्या खेळाडूंनाही आपण कोणाची चाकरी करतोय याची पूर्ण कल्पना आहे. तरीही 'मान ना मान मै तेरा मेहमान' असे म्हणत तुम्हाला त्यांना भारत देशाचे प्रतिनिधी मानायचे असेल तर खुशाल माना. तुम्हाला सत्य समजून घ्यायची इच्छा नाही हेच यातून दिसते. मला तर वाटते एखादी संघटना आम्ही भारताचे प्रतिनिधीत्व करत नाही असे म्हणते तोच देशद्रोह मानायला हवा. मात्र त्या संघटनेचे समर्थन न करणे हा देशद्रोह असल्याचा तर्क अत्यंत अजब आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 01/18/2015 - 13:50 नवीन
तुम्ही मला फक्त एवढंच सांगा की, (१) ऑलिंपिक मध्ये जे भारतीय खेळाडू भाग घेतात ते भारतीय ऑलिंपिक संघटना या क्रीडा संघटनाचे प्रतिनिधित्व करतात का भारत या देशाचे? (२) हे खेळाडू जर या संघटनेचे प्रतिनिधित्व करत असतील तर ऑलिंपिकमध्ये ते भारतीय ऑलिंपिक संघटनेऐवजी भारत या देशाचा राष्ट्रध्वज कसा व का वापरतात? ऑलिंपिक स्पर्धास्थानी या संघटनेच्या ध्वजाऐवजी भारत या देशाचा राष्ट्रध्वज का फडकत असतो? एखाद्या भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकल्यास या संघटनेच्या ध्वजाऐवजी भारत या देशाचा राष्ट्रध्वज का फडकावला जातो आणि या संघटनेच्या गीताऐवजी भारत या देशाचे राष्ट्रगीत का वाजविले जाते? कोणत्याही खाजगी संघटनेला भारताचा राष्ट्रध्वज हा स्वतःचा ध्वज म्हणून वापरायची कायदेशीर परवानगी आहे का? कोणत्याही खाजगी संघटनेचे प्रतिनिधित्व करणार्‍या खेळाडूंना स्वतःच्या बनियन/टीशर्ट/हेल्मेट वर भारत या देशाच्या राष्ट्रध्वजाचे चित्र वापरण्याची कायदेशीर परवानगी आहे का? कोणत्याही खाजगी संघटनेला स्वतःचे गीत म्हणून राष्ट्रगीत वापरता येते का? (३) भारतीय ऑलिंपिक संघटनेवर भारत सरकारचे नियंत्रण आहे का आणि या संघटनेत भारत सरकार हस्तक्षेप करते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Sun, 01/18/2015 - 14:01 नवीन
ऑलिंपिक व्यवस्थेचा माझा फारसा अभ्यास नाही. मात्र भारतीय ऑलिंपिक संघटनेने 'आम्ही भारताचे प्रतिनिधित्व करत नाही' असं कुठं सांगितलंय का? बीसीसीआयने ते अगदी स्पष्ट शब्दात भारताच्या सुप्रीम कोर्टात सांगितलंय. निदान भारतीय ऑलिंपिक संघटनेला संशयाचा फायदा देता येईल. तसं बीसीसीआयबाबत शक्य आहे का? अझरुद्दीन प्रकरणाला फार तर 'कर चुकवण्यासाठी भारताचे प्रतिनिधित्व करत नाही असे सांगणाऱ्या भ्रष्ट कंपनीला एका भ्रष्ट कर्मचाऱ्याने फसवले' असे म्हणता येईल. तिथे देशप्रेम आणि देशद्रोहाचा काय संबंध आला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 01/19/2015 - 09:56 नवीन
>>> मात्र भारतीय ऑलिंपिक संघटनेने 'आम्ही भारताचे प्रतिनिधित्व करत नाही' असं कुठं सांगितलंय का? बीसीसीआयने ते अगदी स्पष्ट शब्दात भारताच्या सुप्रीम कोर्टात सांगितलंय. बीसीसीआयने असं सांगितलं कारण त्यांना माहिती अधिकाराच्या कक्षेत यायचं नव्हतं. ऑलिंपिकच्या तुलनेत क्रिकेट भारतात प्रचंड लोकप्रिय आहे, बीसीसीआय कडे प्रंचंड पैसा आहे, त्यावर सरकारचे थेट नियंत्रण नाही व त्यामुळेच त्या पैशावर नजर ठेवून भ्रष्ट राजकारणी व लबाड उद्योगपती बीसीसीआय वर नागोबासारखे वेटोळे घालून बसले आहेत. आपले उद्योग चव्हाट्यावर येऊन न्यायालयाच्या कक्षेत येऊ नयेत व त्याचबरोबर माहिती अधिकाराच्या कक्षेत येऊ नयेत यासाठी बीसीसीआय जीवाचा आटापिटा करीत आहे व त्यामुळेच आमचा भारत सरकारचा संबंध नाही, आम्ही भारतीय मानांकने (राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत इ.) वापरत नाही इ. तद्दन खोटे दावे बीसीसीआयने केले आहेत. खरं तर राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत इ. राष्ट्रीय मानांकने कोणत्याही खाजगी संस्थेला वापरायची कायदेशीर परवानगी नाही. फक्त सरकारी संस्थांनाच ही मानांकने वापरायची कायदेशीर परवानगी आहे. बीसीसीआय उघडउघड ही सर्व मानांकने वापरते. ऑलिंपिक संघटनेला तेवढे ग्लॅमर नाही. त्यामुळे तिथे जाण्यात फारशी चुरस नाही. बीसीसीआय प्रमाणे भारतीय ऑलिंपिक संघटना देखील भारत सरकार नियंत्रित करीत नाही. तथापि ज्याप्रमाणे ऑलिंपिक संघटना ऑलिंपिक, एशियाड, राष्ट्रकुल स्पर्धा इ. स्पर्धांसाठी जो संघ पाठविते तो भारतीय ऑलिंपिक संघटनेचा खाजगी संघ नसून तो भारत या देशाचा संघ असतो, तद्वत क्रिकेटचा संघ हा बीसीसीआय चा खाजगी संघ नसून भारत या देशाचा हा संघ असतो. मला वाटतं मी पुन्हा एकदा पुरेशा स्पष्टीकरणासहीत हा मुद्दा स्पष्ट केलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Mon, 01/19/2015 - 13:11 नवीन
काहीही फेकू नका. मी वर दुवा दिलेले बीसीसीआयचे निवेदन २००४ चे आहे. भारताचा माहिती अधिकार कायदा २००५ चा आहे. तरीही तुम्हाला तो भारत देशाचा संघ आहे असे मानायचे असेल तर खुशाल माना. एवढा क्रिकेटसंबंधातील देशप्रेमाचा पुळका असेल तर आधी बीसीसीआयवर देशद्रोहाचा खटला दाखल करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 01/19/2015 - 14:23 नवीन
>>> काहीही फेकू नका. मी वर दुवा दिलेले बीसीसीआयचे निवेदन २००४ चे आहे. भारताचा माहिती अधिकार कायदा २००५ चा आहे. तरीही तुम्हाला तो भारत देशाचा संघ आहे असे मानायचे असेल तर खुशाल माना. एवढा क्रिकेटसंबंधातील देशप्रेमाचा पुळका असेल तर आधी बीसीसीआयवर देशद्रोहाचा खटला दाखल करा. मी कधीही फेकत नाही. क्रिकेट स्पर्धांमध्ये भारताचा सामना असताना भारताचा संघ भारताचा राष्ट्रध्वज फडकावताना व राष्ट्रगीत गाताना प्रत्येक सामन्यात दिसते. प्रत्यक्ष बीसीसीआय आपल्या संकेतस्थळावर क्रिकेट संघ हा भारताचा संघ आहे असा उल्लेख करते (स्वतःचा खासगी संघ आहे हा उल्लेख कोठेही नसतो). जगात सर्वत्र, क्रिकेटच्या अधिकृत संकेतस्थळावर, रेकॉर्ड बुक्समध्ये, जागतिक स्पर्धांमध्ये हा संघ बीसीसीआयचा संघ आहे असा कोठेही उल्लेख नसतो. हा संघ भारताचा संघ आहे हाच सर्वत्र उल्लेख आहे. भारतीय संघातल्या खेळाडूंच्या हेल्मेटवर भारतीय राष्ट्रध्वज कोरलेला आहे. फक्त देशाशी संबंधित संस्थांनाच या मानांकनांचा वापर करता येतो. इतरांना नाही. तरीही तो संघ बीसीसीआय चा खाजगी संघ आहे व भारत या देशाचा या संघाशी कोणताही संबंध नाही असा तुमचा अट्टाहास असेल तर तसे खुशाल माना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Mon, 01/19/2015 - 14:45 नवीन
तरीही तो संघ बीसीसीआय चा खाजगी संघ आहे व भारत या देशाचा या संघाशी कोणताही संबंध नाही असा तुमचा अट्टाहास असेल तर तसे खुशाल माना.
तो माझा अट्टाहास नसून त्या संघाचे मालक असलेल्या बीसीसीआयचाच अट्टाहास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
आ
आजानुकर्ण Sun, 01/18/2015 - 14:07 नवीन
भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या घटनेत हे कलम आहे. थोडक्यात भारत सरकार व इतर प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय संघटना यांच्यातील दुवा म्हणून ऑलिंपिक संघटना काम करते. त्यामुळे निदान अप्रत्यक्षरीत्या भारताचे प्रतिनिधी निवडण्याचा हक्क भारतीय ऑलिंपिक संघटनेला आहे. Maintaining liaison between the Government of India and member federations or associations
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 01/19/2015 - 10:57 नवीन
बीसीसीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरील एका अधिकृत पानात खालील वाक्य आहे. "India first won a Test series abroad in 1967-68, when the New Zealanders were beaten 3-1 on their own pitches. Three seasons later, the Indian team went several steps further, winning back-to-back series in the West Indies and England." इथे क्रिकेट संघाचा उल्लेख "Indian team" असा स्वतः बीसीसीआयनेच केलेला आहे. तसेच न्यूझीलँडविरूद्धची मालिका बीसीसीआयच्या संघाने जिंकली असे न म्हणता "India first won a Test series abroad " असे म्हटलेले आहे. मला वाटतं ही वाक्ये पुरेशी बोलकी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
अ
अनुप ढेरे Mon, 01/19/2015 - 11:19 नवीन
ठीकाय गुरुजी, तुम्ही जिंकलात! अभिनंदन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पिंपातला उंदीर Mon, 01/19/2015 - 11:59 नवीन
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
श
श्रीगुरुजी Mon, 01/19/2015 - 14:17 नवीन
:YAHOO:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
आ
आजानुकर्ण Mon, 01/19/2015 - 14:46 नवीन
पुरावे दिले तरीही मुद्दे रेटून नेण्याचे गुरुजींचे कसब वाखाणण्यासारखे आहे. आता मी शरणागती पत्करत आहे. श्रीगुरुजींचा विजय असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
स
सुबोध खरे Tue, 01/20/2015 - 05:52 नवीन
कर्ण साहेब बी सी सी आय ने सर्वोच्च न्यायालयात काय निवेदन दिले त्याला काहीही अर्थ नाही.( या न्यायाने कसाब्ने सुद्धा निवेदन दिले होते कि त्याला उगाचच पकडले आहे) न्यायालयाने ते मान्य केले का? जाऊ द्या आपल्याला वितंडवाद घालायची सवय आहे त्याल कोण काय करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Tue, 01/20/2015 - 13:12 नवीन
कसाबने कोर्टात दिलेले निवेदन सुप्रीम कोर्टाने मान्य केले का? बीसीसीआयने कोर्टात दिलेले निवेदन सुप्रीम कोर्टाने मान्य केले का? काय आहेत या दोन प्रश्नांची उत्तरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Tue, 01/20/2015 - 18:13 नवीन
आयपीएल मधील फिक्सिंग, श्रीनिवासन इ. विरूद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बर्‍याच गोष्टी स्पष्ट होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
म
मृत्युन्जय Mon, 01/19/2015 - 09:27 नवीन
बीसीसीआय ही एक स्वायत्त संस्था आहे आणि भारतीय सरकारच्या नियंत्रणाखाली येते की नाही हे ठरवण्यासाठी जो खटला चालु होता त्यातील हे निवेदन आहे जे कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे. पण तो जो संघ खेळतो तो भारताचा संघ म्हणुन खेळतो. जरी त्यावर भारतीय सरकारचे नियंत्रण नसेल तरीही तो भारताचा संघच आहे. भारत सरकारचा संघ नसेलही कदाचित. भारतातील प्रत्येक संस्था भारतीय सरकारच्या नियंत्रणाखाली येतेच असे नाही तरीही ती भारतीय संस्था असु शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
श
श्रीगुरुजी Mon, 01/19/2015 - 09:58 नवीन
बरोबर. मी हेच वारंवार सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ब
बाळ सप्रे Mon, 01/19/2015 - 12:19 नवीन
क्रिकेट संघ भारताचा नसून BCCI चा आहे हा एक तद्दन फालतु प्रतिवाद आहे. प्रत्येक देशाचे प्रतिनिधित्व करायला नागरीकत्वाची अट असते. जी भारतीय संघालाही लागू आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कपिलमुनी Mon, 01/19/2015 - 12:37 नवीन
हा फालतू प्रतिवाद BCCI स्वतःच करते आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
थ
थॉर माणूस Mon, 01/19/2015 - 13:13 नवीन
रत्येक देशाचे प्रतिनिधित्व करायला नागरीकत्वाची अट असते.
क्रिकेटमध्ये असं नसावं बहुतेक. कारण... Luke Ronchi : न्युझीलंडमधे जन्मलेला क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियामधे स्थायिक झाला. तरी दोन्ही देशांकडून खेळला. Geraint Jones : जन्म पापुआ न्यु गिनिआ मधला, आई वडील स्थायिक झाले ऑस्ट्रेलियामधे पण पालक वेल्श वंशाचे असल्याने खेळला इंग्लंडकडून. सध्या इंग्लंडच्या संघात चान्स मिळत नाही म्हणून पापुआ न्यु गिनिआ कडून खेळतो. Dirk Nannes : जन्म ऑस्ट्रेलियाचा, वाढला पण तिकडेच पण वंशाने डच म्हणून खेळला नेदरलँडस कडून, नंतर परत ऑस्ट्रेलियाकडून. अशी काही उदाहरणे आढळतात. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Mon, 01/19/2015 - 13:16 नवीन
नियमाप्रमाणे हे खेळाडू त्या देशातील अपेक्षित वास्तव्यानंतरच संघात निवडले जातात.. उठ्सूट कोणालाही निवडले जात नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
थ
थॉर माणूस Mon, 01/19/2015 - 13:31 नवीन
इंटरेस्टींग... हा नियम कुठे वाचायाला मिळेल? नेट वर कुठेच सापडत नाहीये... आणि आयसीसीची साईट म्हणजे दिव्य आहे, तिथं शोधणं जाम अवघड जातंय मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
थ
थॉर माणूस Tue, 01/20/2015 - 04:32 नवीन
हुश्श्य... सापडले बरं का नियम. नै तुम्ही गेलात कायतरी बोलून, लिंक वगैरे न देता. पण हा नियम आहे की नाही हे पिल्लू राहीलं ना राव आमच्या डोक्यात. तर, एखादा खेळाडू त्या देशाचे नेतृत्व करू शकतो... १. ज्या देशाचा पासपोर्ट(नागरीकत्व) त्याच्याकडे आहे. किंवा २. ज्या देशातला त्याचा जन्म आहे (वास्तव्य नव्हे, जन्म) किंवा ३. गेली सलग चार वर्षे त्याने त्या देशात किमान सहा महिने वास्तव्य केल्याचा दाखला दिला आहे. उदाहरणार्थ Geraint Jones जन्मला पापुआ न्यु गिनिआ मधे म्हणून तिथे राहिलेला नसला तरी तो तिकडून खेळतो. नागरीकत्व ऑस्ट्रेलियाचे म्हणून तिथल्या स्पर्धांमधे खेळू शकला. आणि अर्थातच इंग्लंडमधे रहाण्याचा दाखला मिळवून तिथल्या स्पर्धांमधेही खेळला आणि नंतर तिथूनच आंतरराष्ट्रीय कारकिर्द सुरू केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
श
श्रीगुरुजी Tue, 01/20/2015 - 07:48 नवीन
बरोबर आहे. अनेक खेळाडू स्वतःचे नागरिकत्व असलेल्या देशाव्यतिरिक्त इतर देशांकडून खेळलेले आहेत ते याच नियमांच्या आधारे. पूर्वी ग्रॅहम हिक हा झिंबाब्वेचा नागरिक होता, पण काही वर्षे इंग्लंडमध्ये वास्तव्य करून नंतर इंग्लंडकडून खेळला. केपलर वेसेल्स तर ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिका या दोन्ही देशांकडून खेळला. पुण्यातला रियाझ पूनावाला महाराष्ट्राच्या रणजी संघात होता. भारतीय संघात त्याची कधी निवड झाली नाही. परंतु तो नंतर यूएई कडून खेळला. सध्याच्या काळात केव्हीन पीटरसन, मॉर्गन ही उदाहरणे आहेत. पूर्वी रॉबिनसिंग त्रिनिदादचा नागरिक असूनही भारताकडून खेळला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
आ
आजानुकर्ण Mon, 01/19/2015 - 13:13 नवीन
मूळ मुद्दा भारताचा संघ आहे की नाही असा नसून बीसीसीआयसाठी खेळताना पैशाची अफरातफर व फिक्सिंगसारखे प्रकार केले तर ते देशद्रोहाइतके गंभीर होतात का हा आहे. यासाठी हा संघ व भारत देश यांमधला संबंध समजून घेणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
क
कपिलमुनी Mon, 01/19/2015 - 13:21 नवीन
मूळ मुद्दा फ्रेंच कार्टूनिस्ट बद्दल आहे हो *dash1*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
थ
थॉर माणूस Mon, 01/19/2015 - 13:35 नवीन
*ROFL* *lol* येवढं तिरकं घुसल्यावर मुळ मुद्दा कुठला आठवायला... अजून मुळ मुद्दा पुण्यातली हेल्मेटसक्ती आहे असं कुणी कसं म्हटलं नाही कुणास ठाऊक. *biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
संदीप डांगे Mon, 01/19/2015 - 13:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
म
मृत्युन्जय Mon, 01/19/2015 - 14:15 नवीन
पैशाची अफरातफर व फिक्सिंगसारखे प्रकार केले तर ते देशद्रोहाइतके गंभीर होतात का हा आहे अर्थातच तो देशद्रोह नाही धरला जाणार. समजा आयकर खात्यातल्या एका अधिकार्‍याने अफरातफर केली तर त्याच्यावर देशद्रोहाचे कलम नाही लावले जात. किंबहुना एखाद्या मंत्र्याने जरी अफरातफर केली तरी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Mon, 01/19/2015 - 14:49 नवीन
आयकर खाते आणि मंत्री हे जनतेला थेट जबाबदार आहेत. बीसीसीआयचे तसे नाही. मला वाटते समर्पक उदाहरण म्हणजे रिलायन्स कंपनीच्या एखाद्या मॅनेजरने अफरातफर केली तर ज्या स्वरुपाची शिक्षा होऊ शकते त्या स्वरुपाची शिक्षा बीसीसीआयच्या खेळाडूंना व्हावी. देशप्रेमाच्या उकळ्या फुटण्याचा तिथे संबंध नाही. देशप्रेम ही इतकी सस्ती गोष्ट नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
श
श्रीगुरुजी Sat, 01/17/2015 - 17:56 नवीन
>>> क्रिकेटच्या सामन्यात फसवणूक करणे हा देशद्रोह कसा होऊ शकतो, काय तर तुम्हाला तो धर्म वाटतो म्हणून… ? देशाचे प्रतिनिधित्व करताना देशाची व देशातील नागरिकांची फसवणूक करणे हा देशद्रोहच आहे. >>> जिथे चार टाळकी वर बसून निव्वळ पैसा बघतात, त्यासाठी वाटेल त्या गोष्टी करतात, वाटेल ते म्हणजे? >>> तो धर्म नाही हो, व्यवसाय आहे शुद्ध. त्यांच्या फायद्यासाठी ते जनतेला सरळ सरळ *** बनवतात, आणि पब्लिक आपली येड्यासारखी क्रिकेट हा आमचा धर्म आहे वैगेरे करत धुंदीत जगत असते. तो व्यवसायच आहे. मी ज्या अर्थाने 'धर्म' हा शब्द वापरला तो तुम्हाला समजलाच नाही. अज्ञानातून होतं असं. चालायचंच. >>> (हाय कंबख्त, तूने पीही नही!) असे म्हणाल तर काय आहे ना की ही तुमची दारू जिथे बनते ना तिथे प्रत्यक्ष सर्वात वरच्या वर्तुळात मी काम केले आहे. कोण किती पाण्यात आहे, कोण किती धुतल्या तांदळाचा आहे ते पण बघितले. त्यामुळे आत काय आहे आणि बाहेर काय आहे याचा पुरेपूर अनुभव आहे (हाय कंबख्त, तूझे पताही नही!) . त्यामुळे त्या दारूपासून आंम्ही चारशे हात लांबच बरे! पुन्हा तेच. "तूने पीही नही" हे संबोधन ज्या अर्थाने वापरले ते तुम्हाला समजलेच नाही. असो. >>> (माझ्या टिप्सवर एका सट्टेबाज मित्राने आयपीएल मध्ये १करोड कमावले, यावरून काय तो अंदाज घ्या, प्यायची कि नाही ते) मग तुम्ही का नाही कमावले? काही महिन्यांपूर्वी पैशाच्या तंगीमुळे तुम्ही आत्महत्या करायला निघाला होता. स्वतःची टीप वापरून तुम्हाला भरपूर कमावता आले असते. बेसिकली आयपीएल हा एक व्यवसायाचा इव्हेंट आहे. त्यात देशाचा संबंध नाही. आणि कोणत्याही धंद्यात थोडीफार लबाडी ही असणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
न
निनाद मुक्काम … Sat, 01/17/2015 - 20:29 नवीन
श्रीगृरुजी व व संदीपजी माझ्यामते ह्या विषयावर आपण सर्वांनी आपापली मते व्यक्त केली आहेत त्यापुढे जाऊन आता क्रिकेट व देशद्रोह ही सुद्धा उपचर्चा झाली , आता आपण सर्वांनी ह्या चर्चेला पूर्णविराम देणे योग्य ठरेल. एवढे म्हणून मी ह्या धाग्यावरून रजा घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे Sat, 01/17/2015 - 20:46 नवीन
धन्यवाद निनादजी, आपण प्रस्तुत लेखाशी सुसंगत मुद्दे मांडून आणि माहिती देऊन चर्चा भरकटू दिली नाही. तुमच्यामुळे मला अजून चार नवीन गोष्टी कळल्या, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
श
श्रीगुरुजी Sun, 01/18/2015 - 08:22 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
स
संदीप डांगे Sat, 01/17/2015 - 20:31 नवीन
प्रतिवाद करायला सत्यावर आधारित मुद्दे तुमच्याकडे नाहीत म्हणून तुम्ही वैयक्तिक व नाजुक विषयांकडे घसरत आहात. यावरूनच तुमची दुसऱ्याना माणूस म्हणून वागवणारी माणुसकी दिसून आली. मला सट्टा खेळायला आवडत नाही म्हणून आपल्या घामाचे पैसे जुगारावर लावत नाही. मेहनतीच्या चार पैश्यात समाधानी आहे. आणि मी काय प्यायलोय आणि नाही याचा इतिहास उगाळून तुम्हाला काय उपयोग? तुम्ही क्रिकेट आणि देशप्रेम याचा स्वत:चा स्वत: जो संबंध लावलाय किंवा मार्केटिंगच्या तंत्राने तुमचा जो काय ब्रेनवाश केलाय (किंवा लाखो लोक तसाच विचार करतात म्हणून ते बरोबर) त्यामुळे तुम्हाला क्रिकेटमधून देशप्रेमाच्या उकळ्या फुटतात. हे अत्यंत बेसलेस आहे. त्यामुळे दुसऱ्यांचे अज्ञान काढण्याआधी स्वत:चेच ज्ञान वाढवा आणि काही चुकीच्या कल्पना उराशी बाळगून राहू नका. कधी सत्य समजले ना तर फार मोठा धक्का बसेल. आपल्याला आवडतं तेच श्रेष्ठ आणि सत्य असाच कट्टरवाद्यांचा दावा असतो, तुम्ही पण त्यातलेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 01/18/2015 - 08:57 नवीन
>>> प्रतिवाद करायला सत्यावर आधारित मुद्दे तुमच्याकडे नाहीत म्हणून तुम्ही वैयक्तिक व नाजुक विषयांकडे घसरत आहात. यावरूनच तुमची दुसऱ्याना माणूस म्हणून वागवणारी माणुसकी दिसून आली. तुम्ही तर निष्पापांना अतिरेक्यांनी मारण्याचे समर्थन करून अतिरेक्यांना पाठिंबा देत आहात, यातच तुमचीही माणूसकी दिसून आली. >>> मला सट्टा खेळायला आवडत नाही म्हणून आपल्या घामाचे पैसे जुगारावर लावत नाही. मेहनतीच्या चार पैश्यात समाधानी आहे. तुम्ही आपले प्रतिसाद नीट वाचा. क्रिकेट तुम्हाला आवडत नाही आणि तुम्ही क्रिकेटचा तिरस्कार करता. तरीसुद्धा तुम्हाला क्रिकेटमधल्या अगदी बिनचूक टिप्स माहिती आहेत आणि त्यावरून तुमच्या एका मित्राने म्हणे एक कोटी मिळविले. या हास्यास्पद दाव्यावर मी किंवा इतर कोणी काय प्रतिसाद द्यावा अशी तुमची अपेक्षा आहे. जाता जाता, एप्रिलमध्ये आयपीएल सुरू होतंय. आम्हालाही २-४ टिप्स द्या ना. थोडे पैसे कमावीन म्हणतो. >>> आणि मी काय प्यायलोय आणि नाही याचा इतिहास उगाळून तुम्हाला काय उपयोग? तुम्ही क्रिकेट आणि देशप्रेम याचा स्वत:चा स्वत: जो संबंध लावलाय किंवा मार्केटिंगच्या तंत्राने तुमचा जो काय ब्रेनवाश केलाय (किंवा लाखो लोक तसाच विचार करतात म्हणून ते बरोबर) त्यामुळे तुम्हाला क्रिकेटमधून देशप्रेमाच्या उकळ्या फुटतात. ब्रेनवॉश तुमचाच झालाय आणि तो अतिरेक्यांच्या आंधळ्या प्रेमाने झालाय. तुम्ही चक्क माणसे मारायचे समर्थन करताय. देशाचे प्रतिनिधित्व करताना फसवणूक करणे हा देशद्रोह आहेच. >>> हे अत्यंत बेसलेस आहे. त्यामुळे दुसऱ्यांचे अज्ञान काढण्याआधी स्वत:चेच ज्ञान वाढवा आणि काही चुकीच्या कल्पना उराशी बाळगून राहू नका. कधी सत्य समजले ना तर फार मोठा धक्का बसेल. तुम्हाला सत्याचा आविष्कार झालेला दिसतोय. जरा इतरांनाही सांगा ना सत्य काय आहे ते. >>> आपल्याला आवडतं तेच श्रेष्ठ आणि सत्य असाच कट्टरवाद्यांचा दावा असतो, तुम्ही पण त्यातलेच. तुम्ही पण त्यातलेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 01/18/2015 - 13:30 नवीन
तुम्ही आपले प्रतिसाद नीट वाचा. क्रिकेट तुम्हाला आवडत नाही आणि तुम्ही क्रिकेटचा तिरस्कार करता. तरीसुद्धा तुम्हाला क्रिकेटमधल्या अगदी बिनचूक टिप्स माहिती आहेत आणि त्यावरून तुमच्या एका मित्राने म्हणे एक कोटी मिळविले. या हास्यास्पद दाव्यावर मी किंवा इतर कोणी काय प्रतिसाद द्यावा अशी तुमची अपेक्षा आहे.
तिथे प्रत्यक्ष सर्वात वरच्या वर्तुळात मी काम केले आहे. कोण किती पाण्यात आहे, कोण किती धुतल्या तांदळाचा आहे ते पण बघितले. त्यामुळे आत काय आहे आणि बाहेर काय आहे याचा पुरेपूर अनुभव आहे हे तुम्ही वाचले नाही बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 01/18/2015 - 13:53 नवीन
>>> हे तुम्ही वाचले नाही बहुतेक. मी तुमचं बरंच काही वाचलंय हो. तुम्ही कुठल्या वर्तुळात आणि किती खोलवर गेलात तेही वाचलंय. पण त्यात सत्यांश किती, पूर्वग्रह किती आणि कल्पनेच्या भरार्‍या किती हे सांगता का जरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 01/18/2015 - 15:09 नवीन
यात सत्यांश किती, पूर्वग्रह किती आणि कल्पनेच्या भरार्‍या किती हे सांगता का जरा.
आता खरंच वाटतंय, तुम्हाला वादासाठी वाद घालत आहात. तुम्हाला सत्य सांगीतले तरी तुम्ही म्हणाल आम्हाला हे मान्यच नाही तर काय करणार? तुमच्यासाठी सत्य हे तुम्ही काय मानता यावरच अवलंबून आहे. तुमच्या मताविरुद्ध मत मांडतोय म्हणून तुम्ही तर संदीप डांगे नावाचा व्यक्ती अस्तित्वातच नाही असेही म्हणाल. किंवा माझ्या डोक्यावरच परिणाम झालाय त्यामुळे मी काहीही बरळतो असे तुम्ही म्हणाल. मी जे बीसीसीआय मध्ये सुमारे वर्षभर काम केले तो माझा भास आहे, भ्रम आहे असेही तुम्ही म्हणाल. तुम्हीच वकील, तुम्हीच जज, तुम्हीच जल्लाद अशा वातावरणात तुम्हाला काही सांगायची मला काहीच गरज नाही. तुम्ही काही अर्जुन नाही कि मी काही कृष्ण नाही तुम्हाला सत्याचे याचिदेही याचिडोळा अनुभव द्यायला. तुमचे सत्य, कल्पनेच्या भराऱ्या तुमच्यापाशी. माझ्या माझ्यापाशी. तुमच्या आंधळ्या क्रिकेटप्रेमाची खिल्ली उडवली तर तुम्ही माझ्यावर चक्क खोटारडेपणाचे आरोप करत आहात. म्हणजेच तुम्ही चिडला असून आपण मानत असलेल्या धर्मावर कुणी चिखल उडवला म्हणून तुम्ही फार व्यथित झाला आहात. हेच होत असते गुरुजी. आपण मूर्ख ठरवलो जातोय असे वाटले कि माणसे चिडतात. नाहीतर क्रिकेट हे देशप्रेम कसे हे तुम्ही सांगत बसला नसता. आज मी क्रिकेटचा तिरस्कार करतो म्हणजे जन्माला आल्यापासून करत होतो असा त्याचा अर्थ होत नाही, तुम्ही आज जेवढे आहात त्याच्या कैकपटीने मी क्रिकेटवेडा होतो. प्रेमामध्ये लोक आंधळे असतात. ठेच लागली कि सत्य कळते. तुम्ही क्रिकेटचा आनंद घ्या, बाकीचा विचार करू नका. फक्त एकच - क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते. पण ते तसे प्रत्येक वेळी असतेच असे नाही. क्रिकेट व देशप्रेम किंवा देशद्रोह यांचा काही संबंध नाही. तुम्ही मानत असाल पण देशाचे कायदे असे मानत नाहीत. तसे असते तर फिक्सिंग करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून संजय दत्तसारखे जेलमध्ये टाकले असते. क्रिकेट या विषयावर मला पुढे बोलायची गरज वाटत नाही त्यामुळे इथेच थांबतो. तुमचं चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
आ
आजानुकर्ण Sun, 01/18/2015 - 15:19 नवीन
क्रिकेट व देशप्रेम किंवा देशद्रोह यांचा काही संबंध नाही. तुम्ही मानत असाल पण देशाचे कायदे असे मानत नाहीत. तसे असते तर फिक्सिंग करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून संजय दत्तसारखे जेलमध्ये टाकले असते.
सहमत. स्वतः बीसीसीआय अगदी निःसंग्दिग्ध शब्दात सांगते आहे की आमचे खेळाडू हे भारताचे अधिकृत खेळाडू नाहीत. आम्ही भारताचा झेंडा वापरत नाही. भारत सरकारचा आणि आमचा काहीही संबंध नाही तर गुरुजींचा दावा आहे की बीसीसीआयच खोटे बोलत आहे. इतका हास्यास्पद दावा याआधी वाचला नव्हता. भारताचे नागरिक काहीही म्हणतील. उदा. मी भारताचा नागरिक आहे आणि मी म्हणतोय बीसीसीआय द. आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करते. या माझ्या म्हणण्याला कुठल्याच कोर्टात काडीचीही किंमत नाही. स्वतः बीसीसीआय (आणि भारत सरकार) त्या संघटनेबाबत काय म्हणते आहे हेच अधिकृत मत आहे. त्याचप्रमाणे अझरुद्दीन किंवा जडेजा काय करतात त्याला देशद्रोहाऐवजी बलात्कार म्हणण्याची मागणी 'भारताचे नागरिक' करतील. त्यालाही कोर्ट काडीचीही किंमत देणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Tue, 01/20/2015 - 08:16 नवीन
>>> स्वतः बीसीसीआय अगदी निःसंग्दिग्ध शब्दात सांगते आहे की आमचे खेळाडू हे भारताचे अधिकृत खेळाडू नाहीत. आम्ही भारताचा झेंडा वापरत नाही. भारत सरकारचा आणि आमचा काहीही संबंध नाही तर गुरुजींचा दावा आहे की बीसीसीआयच खोटे बोलत आहे. इतका हास्यास्पद दावा याआधी वाचला नव्हता. अहो, कसाबने सुद्धा निसंदिग्ध शब्दात सांगितले होते की त्याने नागरिक मारले नाहीत म्हणून. पण वस्तुस्थिती काय होती? प्रत्येक सामन्यात भारताचा ध्वज, भारताचे राष्ट्रगीत वापरून सुद्धा जर बीसीसीआय सांगत असेल की आमचे खेळाडू हे भारताचे अधिकृत खेळाडू नाहीत, आम्ही भारताचा झेंडा वापरत नाही तर हा दावा खोटा आणि हास्यास्पद नाही का? स्वतःच्या अधिकृत संकेतस्थळावर बीसीसीआय लिहिते क्रिकेट संघाचा उल्लेख हा स्वतःचा संघ असा एकदाही न करता भारतीय संघाने अमुकतमुक मालिका जिंकली किंवा भारतीय संघ अमुकतमुक मालिकेत चांगला खेळला असा उल्लेख करते आणि त्याचवेळी 'आमचे खेळाडू हे भारताचे अधिकृत खेळाडू नाहीत' असा दावा करते, त्यावेळी या दोन गोष्टींमधील विरोधाभास व खोटारडेपणा कोणाच्याही सहज लक्षात येईल. तुमच्यासारख्या काही जणांच्या तो लक्षात येत नाही हे दुदैव आहे किंवा तुम्ही जाणूनबुजून असे करत आहात. _____________________________________________________________________________ बीसीसीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरील या पानातील http://www.bcci.tv/about/2015/history ही खालील वाक्ये वाचा. he Provisional Board met in Mumbai in December 1928 during the Quadrangular tournament, to discuss the next course of action. It was at this meeting that Govan and De Mello prevailed upon the others to reconsider the decision taken at the previous year's meeting. They did not want India to miss out on the opportunity to host South Africa in 1929 and tour England in 1931! Their persistence paid off. The Provisional Board was deemed to have finished its work, and the Board of Control for Cricket in India established. Govan was the first President, and De Mello the first Secretary. Five months later, the ICC admitted India as a Full Member. १९२८ मध्ये "भारताला" (बीसीसीआय ला नाही) आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा पूर्ण वेळ सदस्य करून घेण्यात आले. Govan and De Mello tried their best to convince Kumar Shri Duleepsinhji, nephew of 'Ranji,' to lead the Indian team to England in 1932. इथेही "भारतीय संघ" असा उल्लेख आहे (बीसीसीआय चा संघ असा उल्लेख नाही) हे लक्षात घ्या. क्रिकेट संघाचे "भारताचा संघ" असा उल्लेख केलेली अजून काही वाक्ये (संपूर्ण संकेतस्थळावर कोठेही हा संघ बीसीसीआय चा संघ आहे असा उल्लेख नाही). On the eve of the inaugural Test, which was played at Lord's in 1932, both Porbandar and Limbdi pulled out, and Col. C.K. Nayudu, the premier cricketer in the squad, was awarded the honour of becoming India's first Test captain. India first won a Test series abroad in 1967-68, when the New Zealanders were beaten 3-1 on their own pitches. Three seasons later, the Indian team went several steps further, winning back-to-back series in the West Indies and England. हा क्रिकेटचा संघ भारताचा संघ नसून आमचा म्हणजे बीसीसीआयचा संघ आहे व आम्ही भारताचा ध्वज वापरत नाही हे बीसीसीआय चे दावे तद्दन खोटे आणि हास्यास्पद आहेत हे आता तुमच्या लक्षात आलं असावं अशी इच्छा आणि अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Tue, 01/20/2015 - 15:27 नवीन
बीसीसीआय चे दावे तद्दन खोटे आणि हास्यास्पद आहेत हे आता तुमच्या लक्षात आलं असावं अशी इच्छा आणि अपेक्षा आहे.
होय गुरुदेव. बीसीसीआयचे सर्वच दावे तद्दन खोटे व हास्यास्पद आहेत. तुमचे दावे अत्यंत खरे आहेत. (खरे या शब्दाचा डॉ. साहेबांशी काहीही संबंध नाही. नाहीतर त्यांना वाटेल मी वितंडवाद घालतोय.) दुर्दैवाने देशभक्त खेळाडूंना बीसीसीआयसारख्या खोटारड्या व हास्यास्पद दावे करणाऱ्या कंपनीची चाकरी करावी लागत असल्याने तत्काळ या संघाचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे व क्रिकेटप्रेमाला देशप्रेम न समजणाऱ्यांस देशद्रोही समजण्याचा अध्यादेश मोदीमजकुरांनी काढावा अशी मागणी मी या माध्यमातून याठिकाणी करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे Tue, 01/20/2015 - 16:42 नवीन
आमचे या मागणीस बेशर्त अनुमोदन आहे बाद्वे, क्रिकेट, देशप्रेम, देशद्रोह, बेटिंग आणि फिक्सिंग असा वेगळा धागा काढावा का? ("मेलो… नक्क…………ओ " इति समस्त मिपाकर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा