Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ललित मोदी आणि सुषमा स्वराज

प
पैसा
Wed, 06/17/2015 - 07:07
🗣 289 प्रतिसाद
राम्राम मंडळी! तीन दिवस झाले. अर्णव गोस्वामीचा धुमाकूळ सुरू आहे. याबद्दलच्या बातम्या पेपरात दुसर्‍या तिसर्‍या पानावर येऊन गेल्या. पण मिपावर काही गडबड झाली नाही म्हणून काथ्याकुटाच्या प्रांतात घुसखोरी करत आहे. ललित मोदीवर गंभीर आरोप असताना सुषमा स्वराज यांनी त्याला पोर्तुगालला जायला मदत केल्याचा आरोप आहे. स्वराज यांनी तसे कबूल केले. कालपासून वसुंधरा राजे यांचेही नाव येत आहे. भाजप सत्तेत आल्यावर ललित मोदी खूप खुश झाल्याची बातमी वाचली. ते एक असो. मात्र मूळ आरोप सुषमा स्वराज यंना काही खाजगी बाबीत मदत ललित मोदी याने केली आणि त्याबदल्यात स्वराज यांनी ही मदत केली असे सकृद्दर्शनी दिसते. सुषमा यांची कन्या ललित मोदीची वकील असल्याचेही समजते. या सगळ्या प्रकरणात आयपी एल आणि गुंडगिरी, बेकायदेशीर व्यवहार यांचा परस्पर संबंध, पैशासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला चुना लावणे हे स्पष्ट दिसत आहे. आमचे श्रीपादभाऊ नाईक कधीच असल्या प्रकरणात दिसणार नाहीत पण ते काम करत नाहीत म्हणून पंप्र त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. नक्की कोणावर विश्वास ठेवावा? की थोडेफार काम करणार्‍या एफिशियंट लोकांना असे काही प्रकार कम्पल्सरी करावेच लागतात? (डिस्क्लेमरः मला फक्त शतकी प्रतिसादांचा धागा काढायचा आहे. तेव्हा या चर्चेत माझा सहभाग नसला तरी धागाकर्ते गायब झाले वगैरे टिप्पण्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. =)) )
वर्गीकरण
राजकीय चर्चा

प्रतिक्रिया द्या
47965 वाचन

💬 प्रतिसाद (289)
ब
बबिता बा Fri, 06/19/2015 - 13:09 नवीन
दाउद गुन्हेगार आहे म्हणुन त्याच्या व्हाह्याला विसा नाकारायचा का ? उद्या तुमच्या व्याह्याचा मिपा आयडी ब्लॉक झाला तर तुमचाही घालवायचा का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मंदार दिलीप जोशी Fri, 06/19/2015 - 13:12 नवीन
तुमचे प्रश्न महत्वाचे आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबिता बा
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 07/02/2015 - 11:02 नवीन
दाउद हा मियाँदादचा व्याही होण्याआधीपासून भारताचा मोस्ट वाँटेड आहे. तो अंडरवर्ल्ड डॉन आहे या गोष्टींबाबत मियाँदाद अनभिज्ञ नव्हते हे महत्वाचे आहे. किंवा ते अपघाताने दाऊदचे व्याही झाले नव्हते. बाकी जालावर प्रतिसाद देणे आणि मुंबईमधे सुपारी घेऊन मर्डर करणे सारखे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबिता बा
ट
टवाळ कार्टा Wed, 06/17/2015 - 12:29 नवीन
दुसरी जास्त वायझेड आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पैसा Wed, 06/17/2015 - 12:08 नवीन
सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद! बरीच माहिती दोन्ही बाजूंनी मिळाली. मिपावर ट्रोलिंग किंवा शिवीगाळ न होता राजकीय चर्चा होऊ शकते हे या धाग्यावर आतापर्यंत दाखवून दिल्याबद्दल सर्वांनाच मनापासून धन्यवाद! राजकीय चर्चा असूनही अजूनपर्यंत एकही प्रतिक्रिया अप्रकाशित करावी लागलेली नाही. अशाच खेळीमेळीच्या वातावरणात आणि वैयक्तिक न होता चर्चा चालू ठेवा! धन्यवाद! सुषमा स्वराज कार्यक्षम आहेत, भारतातल्या रात्री एक वाजता कोणी परदेशात अडकलेल्याने मदत मागितली तरी ती लगेच मिळते, पंतप्रधानांनी सुषमा स्वराज यांचे खुल्या दिलाने कौतुक केले आहे इ. बातम्या वाचायला मिळत होत्या त्यातच हे प्रकरण उभे झाल्यामुळे वाईट वाटले. भले स्वराज किंवा वसुंधरा राजे यांचे ललित मोदीशी वैयक्तिक संबंध जुने असतील, पण त्यांनी अशा परिस्थितीत पंतप्रधानांकडे निर्णय सोपवायला हवा होता हे नक्कीच वाटले. कारण सत्तेवर असलेल्यांनी आपल्या गोतावळ्याच्या बाबत जरा जास्त कडक असले पाहिजे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 06/17/2015 - 18:02 नवीन
पैताय, मी पण प्रतिसाद दिलेत हं. मलाही पार्टी हवी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
न
नाखु Wed, 06/17/2015 - 12:12 नवीन
दिवसात शतकी धाग्याबद्दल पुणेरी कट्टा आयोजन समीती पिंचीसहीत पैसा ताईंचा सत्कार पुणेरी मस्तानी (फक्त प्यायची),५०० फुल्वातीं वळण्यासाठी कापूसगड्डा व गहुंजे येथे होणार्या सामन्याची २ तिकिटे देऊन करण्यात येत आहे. अभामिपामांकामिमसंचालीत सत्कार वस्तू पोच व्यवस्थेबाब्त सूड यांची सूचना आम्हाला कायम शिरोधार्थ आहे. वस्तू मिळताच तपासून घेणे (नंतर बदलून मिळणार नाही)
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 06/17/2015 - 12:29 नवीन
गहुंजे कुठेशीक आले ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
क
काळा पहाड Wed, 06/17/2015 - 12:34 नवीन
कात्रज-आंबेगाव-नर्‍हे-वारजे-चांदणी चौक-बावधन-पाषाण-सुसरोड-बाणेर-बालेवाडी-वाकड-ताथवडे-पुनावळे-रावेत-गहुंजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Wed, 06/17/2015 - 12:39 नवीन
वोके, मध्यवर्ती ठीकाण नाहीये थोडक्यात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ट
टवाळ कार्टा Wed, 06/17/2015 - 12:38 नवीन
पुणेरी मस्तानी (फक्त प्यायची)
आणखी कोणती मस्तानी मिळते पुण्यात???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु Wed, 06/17/2015 - 12:44 नवीन
चवक्शीची अपेक्षा असल्याने पूर्वानुलक्षी खुलासा करणेत आला आहे. तस्मात आपली आप्ली मस्तानी त्या त्या बाजीरावाने शोधावी. खुलासादार मिपा पुणे महानगर कट्टा मित्रमंडळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
काळा पहाड Wed, 06/17/2015 - 12:48 नवीन
कोल्हापूर पासून धुळ्यापर्यंत आणि मालवणपासून चंद्रपूर पर्यंत बहुतांश मस्तान्या सध्या पुण्यातच पडिक असतात. वेगवेगळ्या एम एच नंबरच्या अ‍ॅक्टीव्या, स्कूट्या, अ‍ॅक्सेश्या घेवून हिंजवडी (प्रतिकात्मक) किंवा सिंबायोसिस (पुन्हा प्रतिकात्मक) ला बाजीराव्यांना भेटणं हे मुख्य काम आणि नोकरी किंवा शिकणं हे उपकाम असे दुहेरी श्रमही करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 06/17/2015 - 13:09 नवीन
पायजे का? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 06/17/2015 - 13:28 नवीन
पैला मस्तानीचा टैप सांगा...इंट्रेस्टिंग वाट्ली तर पुढे बघू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 06/17/2015 - 14:32 नवीन
@पैला मस्तानीचा टैप सांगा...इंट्रेस्टिंग वाट्ली तर पुढे बघू>> Image removed. अस्सं काय रे टवाळा!? तू ये..तुला फुकट देइन. Image removed. ..................... बघू येतो का आता हां! ;) एक यांच्याच शेजारचा अज्जिबात येत नै,याच मस्तानीसाठी नंबर लावलेला. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 06/17/2015 - 14:58 नवीन
इतक्या लौकर तयार झालात म्हणजे नक्कीच कैतरी घोळ अस्णार llllluuuuuulllllluuuuu बाकी ते माझे शेजारीपण तुम्चेच शीष्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 06/17/2015 - 17:15 नवीन
नाही मू बोली पुत्र तिष्य तो कुणाचाच नाही(होऊ शकत नाही! ;-) ) शिष्य! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 06/17/2015 - 13:06 नवीन
@ पुणेरी मस्तानी (फक्त प्यायची),५०० फुल्वातीं वळण्यासाठी कापूसगड्डा>> :-D बरोबर तुळशि बागेतून ते वळण्यासाठि 1 पाट.. आणि थोड़ी रांगोळि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
क
काळा पहाड Wed, 06/17/2015 - 13:11 नवीन
त्यो सवताचा सवता आणायचा. मंडळ त्यासाटी जबाब्दार नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
D
dadadarekar Wed, 07/01/2015 - 19:40 नवीन
वाती वळायला दूधही लागते ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
न
निनाद मुक्काम … Wed, 06/17/2015 - 12:32 नवीन
अनेक खतरनाक क्रिमिनल भारताला युके मधून हवे आहेत हे वरच्या एका प्रतिसादात नमूद केले आहे. त्यात मयत इक्बाल मिर्ची चे नाव सुद्धा होते अश्यावेळी फक्त ललित मोदी वर एवढा रोष का ललित मोदीचे सुनंदा ठरूर च्या आय पी ल प्रवेशाला नकारघंटा देणे मग त्या वरून उठलेल्या वादंगावरून शशी शरूर चे मंत्रिपद जाणे व त्यानंतर ललित मोदी ची गच्छति त्यावेळी ललित मोदी ला भाजपने एक पक्ष म्हणून काँग्रेस वर विशेतः थरूर वर निशाणा साधला का आय पिल ल हे मोदी च्य जाण्याने साफ झाले का त्यांनतर आय पिल ल चे श्रीशांत ते श्रीनावसन प्रकरण घडले दुसरे महत्त्वाचे सामान्य माणसांच्या दृष्टीने ललित मोदी चे काय मत आहे कारण नैतिक मुद्द्यावरून राजीनामा लोकांच्या भावना लक्षात घेऊन दिला जातो ह्या देशात दालमिया डॉलर मिया झाले पुढे ते भ्रष्टाचाराच्या आरोपाने बी सी सी आय मधून गेले आज ते परत आले त्यांच्या जाण्याने येण्याने क्रिकेट रसिकांना शष्प फरक पडला नाही नैतिकतेचा मुद्दा विरोधी पक्षांनी उचलावा हाच मोठा विनोद आहे ह्याचे भारतीय जनतेला भान आहे. कायद्याच्या दृष्टीने हा गुन्हा नसेल तर मु ऑन एवढेच विरोधी पक्षांना मला सांगावेसे वाटेल. गेल्या चार वर्षात आघाडी सरकार कडून ललित मोदिवर फक्त चिदंबरम अर्थ मंत्री युकेत कडक भाषा वापरतो हा प्रश्न सलमान खुर्शीद च्या परराष्ट्र खाते काय निकामी झाले होते का
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 06/17/2015 - 14:02 नवीन
एकतरी प्रतिसाद दिलाच पाहिजे म्हणुन हा प्रतिसाद. तरीही हे प्रकरण पेपरात सुरु झाल्यापासून उलट्सुलट बातम्या वाचून जीव कळवळतो आहे. निदान आत्तातरी अशी एखादी सत्ता येउदे भारतात जी फक्त देशाचा विचार करेल. स्वतःसाठी थोडफार खातील तर काही हरकत नाही, पण परकियांच्या घशात देश घालू नये, निदान थोडीतरी भारत म्हणुन काही किंमत यावी देशाला अस वाटत्य. असो. चर्चा वाचून बरीच माहीती समजली. पत्नी, तिचा कॅन्सर, राजकिय ओळखी आणी परदेशस्थ गुन्हेगारी!! झोपायला हरकत नाही आता. लय शिक्षान झालं.
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 06/17/2015 - 14:33 नवीन
(आम्ही खर्‍या अर्थाने झोपलेलो असताना हा धागा निघाल्याने) जरा उशीराच बघत आहे. :) मी कुठल्याही राजकारण्याला तांदूळ धुतल्यानंतर जे पाणी उरते, त्या पाण्याइतका स्वच्छ मानतो. ;) फरक इतकाच की नक्की ओव्हरऑल काम कसे करत आहेत आणि देशाबद्दलची (त्यात नागरीक देखील आले) हेतू कसे आहेत हे पहातो. त्यामुळे स्वराज बाईंच्या बाजूने अथवा विरोधात असा मुद्दा नाही... मात्र त्या आल्यापासून पासपोर्ट आणि इतर कटकटी बर्‍याच कमी झाल्या आहेत हे स्पष्टपणे जाणवत आहे. तसेच पंप्र मोदींच्या संपूर्ण परराष्ट्रनितीच्या यशापयशामाग स्वराज बाई आहेत. त्या मुकाट्याने काम करून बर्‍याच गोष्टी करत आहेत. म्हणूनच त्यांच्या मोदींहून अधिक परदेशवार्‍या ही सार्वजनिक माहिती असली तरी माध्यमात बातमी होत नाही. यावर अधिक नंतर लिहीता येईल. पण थोडक्यात त्यांना धक्का लावण्यामधे अनेकांना फायदा असू शकतो असे वाटते. - त्यात अंतर्गत आणि बाह्य (इतर पक्षिय आणि इतर देशीय सुध्दा) आले. पण जो प्रमुख मुद्दा डोक्यात आला होता तो श्रीगुरूजींनी वर मांडलेला आहे. मला ललीत मोदी हे नाव मधल्या घोटाळ्याच्या वेळेस एखादी उडत उडत बातमी वाचावी त्याहून अधिक माहीत नव्हते. तरी देखील एक प्रश्न पडला ब्रिटन मधे काश्मिरी अतिरेकी (नुसतेच तत्वतः अलगतावादी नाही) आधी जाहीर रहायचे, अमेरीकेने मुंबई हल्ल्यासंदर्भातला (पाकीस्तानी) डेव्हीड हॅडली ह्याला आपल्या ताब्यात दिले नाही, असे अजून बरेच काही जगभर असेल... तरी देखील कधी या देशांना कधी संबंध दुरावतील म्हणून दम भरला नव्हता. मग असे या ललीत मोदींमधे काय आहे की जेणे करून असला अल्टीमेटम द्यावा लागला? एक तर खरेच काहीतरी गंभीर असावे अथवा त्यांच्यामुळे आधीच्या युपिए सरकार मधील स्वार्थांना धक्का बसला असेल. शक्यता दुसर्‍या गोष्टीचीच अधिक आहे. कारण जर काही गंभीर असते तर कोर्टाने पासपोर्ट द्यायला लावला नसता. ललित मोदींचा वकील म्हणतो की त्यांच्या विरोधात इंटरपोल कडून ब्ल्यू कॉर्नर नोटीस नाही. जर ते खोटे असेल तर ते खोटे आहे असे म्हणायच्या ऐवजी, राजकारणी जाउंदेत, पण पत्रकार पण कसे काय अजून त्या नोटीसच्या नावाने स्वराज च्या नावानी ओरडत बसले आहेत? ज्या पद्धतीने सामान्य एन आर आयंना मदत केली आहे, त्यावरून स्वराज यांनी नैतिक / राजकीय (राजनैतिक नाही) चूक केली असेल पण गुन्हा केला आहे असे वाटत नाही...
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Wed, 06/17/2015 - 16:18 नवीन
ज्या पद्धतीने सामान्य एन आर आयंना मदत केली आहे, त्यावरून स्वराज यांनी नैतिक / राजकीय (राजनैतिक नाही) चूक केली असेल पण गुन्हा केला आहे असे वाटत नाही...
मलाही गुन्हा केला आहे असे वाटत नाही. म्हणजे कायदेशीर रित्या काय चूक आहे ते कळले नाही. तिकडे कॉंग्रेस वाले म्हणताहेत कि CrPC च्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. पण तेही सांगेना झालेत कोणता गुन्हा ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
त
तिमा Wed, 06/17/2015 - 14:54 नवीन
कुठल्याही राजकीय पक्षाचे सरकार प्रामाणिक असेल आणि ते आपल्या सगळ्यांना अच्छे दिन आणेल, या भाबड्या समजुतीतून आता भारतीयांनी बाहेर यावे व वास्तव स्वीकारावे. त्यांतल्या त्यांत जो कमी घोटाळे करेल त्यास पुढच्या निवडणुकीत निवडावे. अन्याथा कायम शंख करत बसावे.
  • Log in or register to post comments
ब
बबिता बा Wed, 06/17/2015 - 16:06 नवीन
मोदी सर्कारने बिडी सिग्रेट तंबाखू दारु यावरचे ट्याक्सेस कमी करायचा निर्णय घेतलाय म्हणे. आता त्यावर धागा काढा.
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Wed, 06/17/2015 - 16:16 नवीन
कधी? संदर्भ देउ शकाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबिता बा
ब
बबिता बा Wed, 06/17/2015 - 19:24 नवीन
http://www.ichowk.in/humour/rajasthan-government-slashes-tax-on-cigarettes-and-gutka/story/1/777.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
स
सव्यसाची Wed, 06/17/2015 - 19:45 नवीन
हा निर्णय राजस्थान सरकारचा आहे. यात केंद्र सरकारचा काही संबंध नाही. तसेच VAT हा राज्याचा कर आहे. केंद्राचा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबिता बा
ब
बबिता बा गुरुवार, 06/18/2015 - 02:20 नवीन
It is difficult to prove, whether it (smoking) causes cancer or not. Whether smoking, tobacco is cancerous or not or whether it contains any herbal medicine also, it has to be found out. !! http://www.dnaindia.com/india/report-now-another-bjp-mp-says-no-link-between-smoking-and-cancer-2074344
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
प
पुण्याचे वटवाघूळ गुरुवार, 06/18/2015 - 09:34 नवीन
अहो बबिता बा, तुम्ही दिलेली साइट अनरिअल्टाईम्स किंवा फेकिंगन्यूज सारखी हिंदी साईट आहे. असल्या ठिकाणी आलेल्या बातम्युआ पुरावे म्हणून ग्राह्य धरता का तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबिता बा
ब
बबिता बा गुरुवार, 06/18/2015 - 10:39 नवीन
http://indianexpress.com/article/india/india-others/in-public-interest-rajasthan-slashes-tax-on-cigarettes-gutka/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
व
विकास गुरुवार, 06/18/2015 - 23:49 नवीन
यासंदर्भात बोलता आहात का? Maharashtra govt's new anti-spitting law: Offenders to sweep govt offices, pay upto Rs 5,000 fine अवांतरः किमान जालीय संदर्भात पुर्नजन्म, नवीन अवतार धारण करणे (reincarnation) वगैरे शब्द नक्की खरे आहेत असे वाटते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबिता बा
र
रमेश आठवले Wed, 06/17/2015 - 18:35 नवीन
स्वराज यांच्या विषयीची बातमी येण्या आधी प्रणव मुखर्जी यांनी वरिष्ठ मंत्री असताना आणि राष्ट्रपति असताना आपल्या पदाचा उपयोग आपला नातेवाईकाला इंग्लंड मध्ये आणि ओळखीच्या व्यक्तीला कोलकत्त्यात एस्सार कंपनीत नोकरी मिळवून देण्या साठी केला होता- अशा माहितीच्या एस्सार कंपनीच्या अंतर्गत इ मेल बाहेर आल्या आहेत. हे प्रकरण स्वराज यांच्या केस पेक्षा जास्त गंभीर मानावे लागेल. कॉंग्रेस प्रणव मुखर्जींचा राजीनामा मागून राष्ट्रपति भवनावर मोर्चा का बरे नेत नाहीये ?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 06/17/2015 - 18:45 नवीन
पैतैंनी आयोजित केलेला कार्यक्रम कुठलाही गालबोट न लागता व्यवस्थित सुरू आहे. आनंद वाटला. रच्याकने, ते ललित मोदींवर नेमके काय गुन्हे आहेत आणि त्याची तीव्रता मुंबै बॉम्बस्फोटवैगेरे इतकी कशी याचं काय कोडं उलगडलं नाय. काय की पैसाताई फार रागावल्या आहेत आमच्या लाडक्या मोदीवर (ललित हो) पण त्यांच्या रागाचं नेमकं कारण काय केल्या सापडंना बगा... कुणी नीट सांगेल काय..?
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 06/17/2015 - 18:53 नवीन
ललित मोदी कुठे का जाईना, सुषमा स्वराज यांचं नाव आलं म्हणून वाईट वाटलं जरा. बाकी माहितीसाठी सगळे प्रतिसाद वाचले असतीलच! :) चांगल्या चर्चेसाठी मिपाकरांचं कौतुक आहेच. लौ यू ऑल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 06/17/2015 - 19:45 नवीन
हो. माहिती वाचली आणि इतर ठिकाणीही खोदकाम केलं. ललित मोदींवर कुठलेही गंभीर्/देशद्रोही स्वरुपाचे गुन्हे नाहीत. जे आहेत ते आरोप आहेत, पैशाच्या अफरातफरीचे आहेत. त्या सगळ्या प्रकरणांमधे प्रचंड गुंतागुंत आहे. मोदी भारतातून पळून जायचे कारण त्याचे इतरांशी (राजकारणी व उद्योजक) बिघडलेले संबंध. ह्या बिघडलेल्या संबंधांमुळे एका उद्योजकाला देश सोडावा लागला. पण ही त्याची आणि इतरांची अंतर्गत बाब आहे. देशाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मोदींचे इतरांशी वाजण्याचे कारण फार वैयक्तिक आहे. बीसीसीआयशी संबंधीत लोकांचा इगो प्रॉब्लेम व प्रॉफिट शेअरिंग हा त्या सगळ्या आरोप--तमाशा-गुन्ह्यांचे मूळ आहे. फेमा अंतर्गत नोटीसा म्हणजे फार कावेबाज योजना आहे. मोदीला पद्धतशीर अडकवण्यात आले आहे. म्हणजे मोदी फार धुतल्या तांदळाचा, गरिब गाय आहे असे नाही. पण दाऊदवैगेरेंशी तुलना म्हणजे कैच्या कैच. नेमक्या त्याच काळात मी तिथे होतो त्यामुळे नक्की काय झाले ते कधी सवड मिळाली तर (कदाचित) सविस्तर लिहिन. पण जेवढ्या मोठ्या कॅनव्हासवर हे (सुषमा-मोदी) चित्र रंगवायचा प्रयत्न लोक करतायत त्यांच्याकडे तेवढे मोठे ब्रश आणि तितकेसे रंगही नाहीत हे ते साफ लपवतायत. जनतेने शहाणे व्हावे हेच उत्तम. काँग्रेसः ज्या आविर्भावात आणि उच्चरवात ही मंडळी ओरडत आहेत ते बघून स्वराज (पर्यायाने नमों) यांना कोंडीत पकडण्याची संधी मिळाली तर घ्या धोपाटून याच विचारात आहेत असं दिसतंय. पण खरं तर ज्याला साप समजून ते धोपटतायत तो साधा रीळाचा दोराही नाही. पण वातावरण तर असं तापवलंय की जणू हाफिज सईदला सुषमाजींनी घरी बोलावून न्हाऊ-माखू घातलंय. पत्रकार : (विकेसिंगांच्या भाषेत 'ते') नुसते नेहमीप्रमाणे आग सोडा, धूरही जिथे अतिविरळ आहे त्यावरच असं रान माजवतायत की जणून सारं जंगल वणव्याने पेटलंय. जनता: नेहमीप्रमाणे दोन बाजूंनी फाडल्या जाऊन आपल्याला छटाक माहिती नसलेल्या गोष्टींवर 'बघा, बघा ते कसे एकमेकांना मदत करतात, सारेच नालायक आहेत मेले, राजकारणी आणि उद्योजक यांची अभद्र युती यांच्या सरकारातही कायमच आहे' 'मग त्यांनी तेव्हा नाही का असे केले, याला सोडले त्याला सोडले'. अशा भयाण डोळे फिरवणार्‍या चर्चा करता आहेत (मिपा नाही, इतर ठिकाणी) भाजपविरोधक आणि समर्थक दोन्ही या इवल्याशा बीजाचे वटवृक्ष करण्याच्या मागे आहेत. भाजप-समर्थकांनी हा मुद्दा अनुल्लेखाने मारायची गरज होती. पण नेहमीच्या चवताळून जायच्या सवयीने यावेळेस नेमके तोंडघशी पडल्यासारखे वाटत आहेत. (ढीस्क्लेमरः माझ्या या प्रतिसादात मिपावरच्या चर्चेचा, चर्चेत भाग घेतलेल्या सदस्यांचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष कुठलाही उल्लेख नाही. तसेच मिपासदस्यांच्या पक्षीय आवडी-नावडीची कुठेही खिल्ली उडवलेली नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ब
बबिता बा गुरुवार, 06/18/2015 - 02:27 नवीन
..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ट
टवाळ कार्टा Fri, 06/19/2015 - 06:00 नवीन
सदस्यकाळ 3 days 21 hours
आणि लगेच "डोळे पाणावणे" याचा मिपार्थ समजला???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबिता बा
ह
हाडक्या Fri, 06/19/2015 - 10:33 नवीन
तुमचे ड्वाळे पाणावायला किती वेळ जावा लागला हो टकाशेठ.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 06/21/2015 - 08:16 नवीन
आम्ही वेळ घेतलेला पेहले बात...फिर मुलाकात...फिर हळूच लात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ब
बबिता बा Fri, 06/19/2015 - 05:24 नवीन
भारताला भारतातच राहुन लुबाडणारे राजकारणी धोकादायक आहेत. कारण असे राजकारणी असतात त्यांच्या जिवावरच दाउद जगत असतो. जर स्वार्थी राजकारणी नसते तर कदाचित दाउद निर्माण व्हायला चान्स मिळालाच नसता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 06/19/2015 - 09:01 नवीन
जर स्वार्थी राजकारणी नसते तर कदाचित दाउद निर्माण व्हायला चान्स मिळालाच नसता.
चालु द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबिता बा
स
सव्यसाची Wed, 06/17/2015 - 19:24 नवीन
नेमके आठवत नाही पण सौथ आफ्रिकेमधील आयपीएल संदर्भात जे काही violations झाले त्याबद्दल केस आहे. FEMA अंतर्गत केस सुरु आहे. २०१० मध्ये नोटीस बजावण्यात आल्या होत्या पण ते उपस्थित राहिले नाहीत म्हणून तत्कालीन सरकारने पासपोर्ट काढला. दिल्ली उच्च न्यायालयाने यावर आक्षेप घेत पासपोर्ट परत दिला. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयातील काही परिच्छेद नक्कीच महत्वाचे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
स्पंदना गुरुवार, 06/18/2015 - 02:51 नवीन
पैसाताई फार रागावल्या आहेत आमच्या लाडक्या मोदीवर (ललित हो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 06/17/2015 - 19:30 नवीन
'ललित मोदी-सुषमा स्वराज प्रकरणी विनाकारण वाद रंगवला जातेय. यानिमित्ताने काँग्रेसला आयतं कोलीत मिळालं आहे. त्यामुळे काँग्रेस त्याचं राजकारण करते आहे' ... पवारसाहेब योग्यच सांगत आहेत. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/met-lalit-modi-in-may-told-him-to-return-to-india-and-face-law-sharad-pawar/articleshow/47709782.cms
  • Log in or register to post comments
ब
बबिता बा Wed, 06/17/2015 - 19:36 नवीन
म्हणुन सु**बाई ( सुसरबाई ) तुझी पाठ म उ असेच ते बोलणार .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
प
पैसा Fri, 06/19/2015 - 15:54 नवीन
तुम्ही जामोप्या ऊर्फ हितेश असलात तर धन्यवाद! तुमच्या अशा प्रतिसादांमुळे माझा धागा ३०० काय ४०० पर्यंत जाऊ शकेल. मात्र आमचे लक्ष आहे. आतापर्यंत उत्तम झालेली चर्चा तशीच राहू दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबिता बा
ख
खटासि खट Wed, 06/17/2015 - 19:46 नवीन
तुम्हाला म्हणून सांगतो (कुठं बोलू नका ) आमच्या गणपती मंडळानं दिवसरात्र अर्धखेळपट्टी चेंडूफळी सामने ठेवले होते. त्याचं आयोजन मी केल होतं. आता मंडळाच्या अध्यक्षाला सोंशय आहे की मी गफला केला. त्यानं कोतवालचावडीत तक्रार गुदरल्याने मला प्रभाग सोडून जाता येणार नाही असा हुकूम कोतवाल साहेबाने काढला आहे. माझी पत्नी संशयकल्लोळाने आजारी असून तिला बायजाबाचा माळ (चौफुल्यानजीक) उपचारार्थ घेऊन जाणे गरजेचे आहे. तरी माझ्या घरी येऊन गेलेले नगरसेवक, गटनेते, सभागृहनेते, स्थायीसमिती अध्यक्ष, महापौर, उपमहापौर, पीम्टीचे वेवस्थापक, महाराष्ट्र वादी पक्शाचे ध. न. दांडगेसाहेब, कमळाबाईंच्या माहेरची थोर मंडळी यांच्यापैकी कोन मानुसकी दाखवुण मदत करील का ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा