Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ललित मोदी आणि सुषमा स्वराज

प
पैसा
Wed, 06/17/2015 - 07:07
🗣 289 प्रतिसाद
राम्राम मंडळी! तीन दिवस झाले. अर्णव गोस्वामीचा धुमाकूळ सुरू आहे. याबद्दलच्या बातम्या पेपरात दुसर्‍या तिसर्‍या पानावर येऊन गेल्या. पण मिपावर काही गडबड झाली नाही म्हणून काथ्याकुटाच्या प्रांतात घुसखोरी करत आहे. ललित मोदीवर गंभीर आरोप असताना सुषमा स्वराज यांनी त्याला पोर्तुगालला जायला मदत केल्याचा आरोप आहे. स्वराज यांनी तसे कबूल केले. कालपासून वसुंधरा राजे यांचेही नाव येत आहे. भाजप सत्तेत आल्यावर ललित मोदी खूप खुश झाल्याची बातमी वाचली. ते एक असो. मात्र मूळ आरोप सुषमा स्वराज यंना काही खाजगी बाबीत मदत ललित मोदी याने केली आणि त्याबदल्यात स्वराज यांनी ही मदत केली असे सकृद्दर्शनी दिसते. सुषमा यांची कन्या ललित मोदीची वकील असल्याचेही समजते. या सगळ्या प्रकरणात आयपी एल आणि गुंडगिरी, बेकायदेशीर व्यवहार यांचा परस्पर संबंध, पैशासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला चुना लावणे हे स्पष्ट दिसत आहे. आमचे श्रीपादभाऊ नाईक कधीच असल्या प्रकरणात दिसणार नाहीत पण ते काम करत नाहीत म्हणून पंप्र त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. नक्की कोणावर विश्वास ठेवावा? की थोडेफार काम करणार्‍या एफिशियंट लोकांना असे काही प्रकार कम्पल्सरी करावेच लागतात? (डिस्क्लेमरः मला फक्त शतकी प्रतिसादांचा धागा काढायचा आहे. तेव्हा या चर्चेत माझा सहभाग नसला तरी धागाकर्ते गायब झाले वगैरे टिप्पण्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. =)) )
वर्गीकरण
राजकीय चर्चा

प्रतिक्रिया द्या
47965 वाचन

💬 प्रतिसाद (289)
क
कपिलमुनी Fri, 07/03/2015 - 12:07 नवीन
ही शुद्ध पळवाट आहे. मंत्रीपद ही सार्वजनिक जबाबदारीचे काम आहे. भाजपा नैतिकतेच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतात . आता सोयीस्कररीत्या मौन का ? आणि नियमावर बोट का ? "त्यांनी तसे कळविले असेल सुद्धा" कळविले असते तर आतापर्यंत त्यांनी स्वतःच्या डीफेन्समध्ये ही गोष्ट सांगितली असती. बाकी माझा प्रश्न साधा आणि अगदी सरळ होता .
एखाद्या गुन्हेगाराने एका मंत्र्याशी संपर्क साधला असेल तर त्याची माहिती संबंधित खात्यांना कळवावी का ?? हो की नाही??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अस्वस्थामा Fri, 07/03/2015 - 12:57 नवीन
+१ आक्षेप पटला. उगी तार्किक तसेच तांत्रिक कीस पाडण्यापेक्षा आणि इतर सबबी शोधण्यदेण्यापेक्षा या अगदी फंडामेंटल प्रश्नाचे उत्तर स्वतःच स्वतःस द्यावे हे महत्त्वाचे. इतरांनी काय केले (काय करतायत), इतर काय म्हणतायत, मोट्ठा/छोटा गुन्हेगार यापेक्षा, एक भारतीय नागरीक की ज्यास गेल्या सरकारच्या पद्धतीचा वीट आलेला होता या दृष्टीने पहावे. बाकी नैतिकता सापेक्ष हे मान्यच.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Fri, 07/03/2015 - 17:33 नवीन
>>> ही शुद्ध पळवाट आहे. कशी काय? >>> मंत्रीपद ही सार्वजनिक जबाबदारीचे काम आहे. बरोबर >>> भाजपा नैतिकतेच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतात . आता सोयीस्कररीत्या मौन का ? आणि नियमावर बोट का ? कारण प्रशासन हे नियम व कायद्यानुसार चालते. नियम डावलून किंवा कायदा मोडून काम केले तर ठपका येऊ शकतो. >>> "त्यांनी तसे कळविले असेल सुद्धा" कळविले असते तर आतापर्यंत त्यांनी स्वतःच्या डीफेन्समध्ये ही गोष्ट सांगितली असती. प्रत्येक गोष्ट जाहीररित्या सांगितली जाते का? >>> बाकी माझा प्रश्न साधा आणि अगदी सरळ होता . एखाद्या गुन्हेगाराने एका मंत्र्याशी संपर्क साधला असेल तर त्याची माहिती संबंधित खात्यांना कळवावी का ?? हो की नाही?? १) ललित मोदी हा अजूनपर्यंत संशयित आहे. तो गुन्हेगार आहे हे अजून सिद्ध झालेले नाही. २) गुन्हेगाराने/संशयिताने मंत्र्याशी नक्की कशासाठी संपर्क साधला आहे व अशा बाबतीत जे नियम/कायदे/प्रोसिजर्स आहेत त्यानुसार ही माहिती संबंधित खात्याला कळवावी का नाही हा निर्णय मंत्र्याने घ्यावा. संबंधित खात्यांना कळविले असले किंवा नसले तरी ती माहिती सार्वजनिक करायची का नाही हे देखील अशा बाबतीत जे नियम/कायदे/प्रोसिजर्स आहेत त्यानुसार ठरवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कोंकणी माणूस Fri, 07/03/2015 - 11:50 नवीन
ज्या वेळी हा ललित मोदी म्हणेल कि , मी शरद पवारांना सूधा अमुक तमुक कारणासाठी भेटलो किवा यांनी मला मदत केली वैगरे . तेव्हाच हा खेळ बंद होयील , कारण एकदा का शरद पवार हे नाव आल कि सगळच (चौकशी, पत्रकारिता ,पुरावे आणि इतर ) संपत.
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 07/03/2015 - 14:11 नवीन
येकदम बराबर! १००००% सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोंकणी माणूस
स
संदीप डांगे Fri, 07/03/2015 - 16:34 नवीन
@कपिलमुनि, तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे: हो. पण ललित मोदी गुन्हेगार आहेत हे कुठे सिद्ध झालंय याचं उत्तर देऊ शकाल काय? मुळात सरकारतर्फे त्यांच्यावर काय आरोप आहेत याच्यातच एकवाक्यता नाही. कारण हितशत्रूंनी सरकारी नियम वापरून मोदीला अडकवायचा प्लान बनवला होता. त्यात बरेच लूपहोल्स आहेत. जिथे आरोपच निश्चित नाहीत तिथे थेट गुन्हेगार ठरवण्याची गरज काय? कोर्टाने आरोपी हजर नाही म्हणून कार्यवाही केली आहे. ते कोर्टाचे नियमानुसार होणारे काम आहे. समन्स बजावणे म्हणजे आरोप सिद्ध होऊन शिक्षा ठोठावणे होत नाही. एखाद्या केसमधे आरोपीवरचे आरोप सिद्ध झालेत म्हणून आरोपीला समन्स धाडले जात नाहित तर आपली बाजू मांडायला आरोपीने कोर्टात हजर राहावे, कामकाज न्याय्य पद्धतीने व्हावे म्हणून हे सगळे सोपस्कार असतात. आरोपी हजर राहिला नाही तर त्याला फरार घोषित करून पोलिसांना त्याला पकडून कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश देते. तेव्हाही तो गुन्हेगार आहे असे मानुन कोर्ट असे आदेश देत नाही. खटल्याच्या अंतिम निर्णयाच्या वेळीच आरोपी दोषी आहे की नाही हे कोर्ट सांगतं. मोदीप्रकरणात असे काही झालंय का? सामान्य माणसाच्या दारावर समन्स घेऊन बेलिफ्/पोलिस उभे राहिले की जसे शेजारी त्याच्याकडे बघतात तसे आपण ललित मोदीकडे बघू नये असे वाटते. सगळा गोंधळ तांत्रिक मुद्द्यांमुळेच आहे. तिथे तांत्रिक मुद्देच उत्तरादाखल प्रतिसादात मांडले तर तुम्ही 'ते सोडा' असे का म्हणताय? एक उदाहरण घेऊया: दाऊद छोटा राजनच्या जीवावर उठलाय. त्याच्या जीवाला धोका आहे म्हणून त्याने पोलिसांकडे संरक्षण मागितले तर ते दिले जावे काय? कारण राजन हा एक दाऊदसारखाच गुन्हेगार आहे. त्याच्या नावावर मोठे खटले आहेत. त्याने कित्येकांचे खून पाडले आहेत. हे सगळे सत्य आहे असे जनतेला माहित आहे पण न्यायालयात सिद्ध झाले असेलही किंवा नाही. असं असतांना पोलिसांनी राजनला 'तुझं तू बघ' असं म्हणून संरक्षण नाकारावे का? ललित मोदी प्रकरणात सगळेच गुंतलेले आहेत. शिवाय ते प्रकरण मीडीयाने केले तेवढे मोठे नक्कीच नाही. जर तांत्रिक मुद्द्यावरून स्वराज यांच्यावर आरोप केले जात असतील तर तांत्रिक मुद्द्यांनीच बचाव केला तर समस्या कुठे आहे? नैतिक अनैतिक चे चोचले पुरवायला देशात इतक्या समस्या आहेत. नैतिकतेच्या बाबतीत म्हणाल तर ललित मोदी प्रकरण त्यांच्यापुढे फारच पुचाट आहे. जर ते कायदेशीर प्रकरण आहे तर कायदेशीर पद्धतीनेच बघितले जावे. उठसूठ ज्यात त्यात सिद्ध न होणारी नैतिकता-अनैतिकता आणणे माझ्यामते योग्य नव्हे.
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Fri, 07/03/2015 - 17:11 नवीन
पण ललित मोदी गुन्हेगार आहेत हे कुठे सिद्ध झालंय याचं उत्तर देऊ शकाल काय?
मी पण वरती हाच प्रश्न विचारला आहे. मला तर कोर्टाने समन्स बजावले आहेत असेही वाटत नाही. एडीने प्रत्यक्ष येउन प्रश्नांना उत्तरे द्यावीत यासाठी बोलावले होते. त्याला ते हजार राहिले नाहीत. मग एडीने पासपोर्ट रद्द करण्यासाठी सांगितल्याचे कळते. त्यामुळे पासपोर्ट रद्द झाला. पुढे कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने पासपोर्ट रद्द करणे चुकीचे आहे असे सांगत पासपोर्ट परत दिला. यामध्ये अशी काही गोष्ट आहे का ज्यात कोर्टाने त्यांना फरारी घोषित केले आहे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 07/03/2015 - 17:45 नवीन
ललित मोदीविरूद्धच्या 'कोर्ट केसेस' बद्दल खात्रीलायक जालावर कुठेच मिळत नाहीये. ऑनलाईन वृत्तपत्रांमधे फारच गोंधळून टाकणारी भाषा वापरली जात असून नुसता धूर निर्माण करून खरी आग काय आहे, आहे की नाही हेच कळत नाही आहे. त्यामुळे खरंच ललित मोदी काय स्वरूपाचा खटला आहे याचे चित्रच उभे राहत नाही. कोणते आरोप आहेत ते या लिंकवर सांगितलंयः http://indiatoday.intoday.in/story/lalit-modi-court-cases-charges-against-india/1/444979.html ही एक लिंक आहे ज्यात कोर्टाने काय म्हटलंय ते दिलंय.: http://www.ndtv.com/india-news/why-court-said-lalit-modis-passport-had-been-wrongly-revoked-772937 हा एक अजून लेख : http://articles.economictimes.indiatimes.com/2015-06-27/news/63886107_1_lalit-modi-uk-court-home-department परत तोच प्रश्न आहे: ललित मोदीवर कोणते आरोप आहेत आणि कोर्टाची काय कारवाई झाली आहे त्याच्याबाबतीत? पासपोर्ट रद्द केला, केस आहे, फरार आहे, भगोडा आहे, खूप पैसेवाला आहे, मोठ्यामोठ्या लोकांशी संबंध आहेत वैगेरे शब्द वापरून जनतेला गुंडाळणे सुरु आहे असं वाटतं. प्रत्यक्षात अंदरकी बात भन्नाट वेगळीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
स
सव्यसाची Sat, 07/04/2015 - 05:29 नवीन
संदीपजी, मी तो प्रश्न कपिलमुनींना विचारला होता कारण ते म्हणताहेत कि कोर्टाने त्यांना फरारी घोषित केले आहे आणि समन्स पण जारी केले आहेत. या दोन्हींमध्येही मला तथ्य वाटत नाही. माध्यमांचे म्हणाल तर 'फरारी', 'मोस्ट वाँटेड' हा शब्द सर्रास वापरला आहे. बर्याचजणांनी ती काळजी घेतली नाही. बाकी कोर्टात या केसेस गेल्याच नाहीत असे मला वाटते. एडी ही क़्वासि ज्युडीशियाल बॉडी आहे. तीच सध्या नोटीस पाठवते आहे असे दिसते. कदाचित पुढे जाउन केस दाखल होईलही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कपिलमुनी Wed, 07/08/2015 - 08:50 नवीन
http://www.timesnow.tv/articleshow/4361457.cms या प्रतिसादामध्ये लिहिल्याप्रमाणे ललित मोदी गुन्हेगार आहेत हे एखाद्यातरी कोर्टात सिद्ध झाले आहे का ? नाही त्याम्च्यावर आरोप आहेत आणि त्यांना समन्स काढले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
स
सव्यसाची Wed, 07/08/2015 - 09:24 नवीन
कपिलजी, तुम्ही जी लिंक दिली आहे त्यात असे म्हटले आहे कि सवाल-जबाबासाठी त्यांना बोलावले आहे. जर ते आले नाहीत तर मात्र आम्हाला अरेस्ट वॉरंट 'काढावे लागेल'. ते काढले आहे कि नाही याबद्दलची माहिती मला जालावर नाही मिळाली.
Suspended Indian Premier League chief Lalit Modi and six others have been asked to appear before the Chennai Crime Branch following complaint by BCCI Secretary N Srinivisan. Chennai Police Commissioner T Rajendran has said that if Modi refuses to comply to the summons they would resort to issuing a warrant against the tainted former IPL Chairman.
Asked whether Modi would be summoned, Rajendran said, "He (Modi) is out of the country. Let's go through the documents first. Because the entire complaint is in three parts and various people are involved in it. We will prioritise and see who can be summoned first."
ही मुलाखत वाचा. इंटरपोल च्या सचिवाची आहे जो २०१४ पर्यंत तिथे होता. http://indianexpress.com/article/india/india-others/ed-will-need-to-prove-lalit-modi-wanted-for-arrest-former-interpol-sec-general-ronald-noble/ त्यामधील या अरेस्ट वॉरंट संबंधीचा भाग.
The Indian media consistently states that he is “wanted by the Enforcement Directorate”. Is this the same Enforcement Directorate that falsely claims there is something called an Interpol light blue notice? There is no such thing as a light blue notice. The Enforcement Directorate never gave Interpol any information about Lalit Modi. Therefore why does the Indian media, including yourself, constantly mistake that Lalit Modi is wanted for arrest when you know that to be false? If he is wanted then publish the arrest warrant they claim was issued in 2010. It is undisputed that Lalit Modi’s passport was taken from him in 2010/2011. It is also undisputed that he was in Lodon the entire time. So why didn’t the Enforcement Directorate seek his arrest if he was wanted by them?
The fact is that during my tenure as Interpol secretary general, Lalit Modi was never wanted by Interpol and Indian authorities never entered information about him in the Interpol databases. Therefore there is no basis to falsely accuse Lalit Modi of having asked for a nonexistent Interpol notice to be removed. It is my understanding that he is not wanted for arrest even though Indian government officials state to the contrary. Sooner or later the Enforcement Directorate will need to prove that Lalit Modi has been wanted for arrest since 2010.
कदाचित अरेस्ट वॉरंट असेलही.जर तसे असेल तर इडी ने पब्लिश करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Fri, 07/03/2015 - 17:26 नवीन
सहमत योग्य उत्तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कपिलमुनी Wed, 07/08/2015 - 08:57 नवीन
तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे: हो. प्रथम माझ्या एखाद्या गुन्हेगाराने एका मंत्र्याशी संपर्क साधला असेल तर त्याची माहिती संबंधित खात्यांना कळवावी का ?? या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर तुम्ही दिलाबद्दल धन्यवाद ! हो की नाही?? वर लिहिल्याप्रमाणे अजून ते गुन्हेगार नाहीत आरोपी आहेत. पण ज्या प्रकारचे गंभीर आरोप आहेत ते पहाता स्वराज यांनी संबंधित खात्याना कळावायला हवे होते.
सगळा गोंधळ तांत्रिक मुद्द्यांमुळेच आहे. तिथे तांत्रिक मुद्देच उत्तरादाखल प्रतिसादात मांडले तर तुम्ही 'ते सोडा' असे का म्हणताय?
माझ्या दृष्तीने मुद्दा तांत्रिक नसून तत्वाचा किंवा शुचितेचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
D
dadadarekar Wed, 07/08/2015 - 08:30 नवीन
http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=47984060&section=top-stories ललित मोदीना पद्म देण्याची भाजपाची शिफारस होती.
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 07/08/2015 - 17:57 नवीन
कुठल्या साली ललित मोदीना पद्म देण्याची भाजपाची शिफारस होती? २००७. त्यावेळेस ललित मोदींच्या विरोधात काय गुन्हा होता? काहीच नाही... ललित मोदींना आयपिएल मधून कधी काढले? २०१० ला त्याच्या आधी नक्की काय झाले होते? २०१० सालीच त्या आधी त्यांनी शशी थरूर यांचे नाव गोत्यात आणले होते. वगैरे वगैरे... यात ललित मोदी अथवा वसुंधरा राजे यांची बाजू घेण्याचा प्रश्न नाही. जे काही आणि जो कोणी चूक असेल त्यांना शिक्षा करा. तो मुद्दा वेगळा आहे. पण असंदर्भ बातम्या देऊन काहीतरी निगेटीव्ह एक्साईटमेंट तयार करणे हे देखील गुन्हा करण्यासारखेच आहे असे वाटत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
स
सव्यसाची Wed, 07/08/2015 - 21:57 नवीन
२००७ साली शिफारस केली.मग पुढे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 07/09/2015 - 08:58 नवीन
वाचतेय. ललितला मिळालेले काही पुरस्कार(संदर्भ विकिपिडिया). In October 2011, Lalit Modi was bestowed the 'Outstanding Contribution Award' at the 2011 International Sports Event Management (ISEM) Awards[59] In February 2010, Sports Illustrated named Lalit Modi as the 2nd Most Powerful Person in Indian Sports[60] On 28 December 2009, Business Standard named Lalit Modi as one of the ‘Game Changers of the Decade’[61] On 26 September 2009, Lalit Modi was presented with the ‘Brand of the Year’ award by India Leadership Conclave[62] In August 2009, Forbes magazine described the IPL as ‘the world's hottest sports league’ – a remarkable accolade from a US magazine less than a year after the IPL’s launch[63] On 22 January 2009, Lalit Modi was given the ‘Sport Business Leader’ award by CBNC-TV18[64] On 30 December 2008, SportzPower ranked Lalit Modi No. 1 in their annual Top 20 In July 2008, Time magazine ranked Lalit Modi 16th in a list of the world’s best sports executives आणखीही काही आहेत. वसुंधरेची चौकशी झालीच पाहिजे पण त्याबरोबर बिझिनेस स्टॅन्डर्ड,टाईम साप्ताहिक्,सी.एन.बी.सी.ह्यांचीही चौकशी करावी असे ह्यांचे मत.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 07/09/2015 - 16:35 नवीन
वसुंधरेची चौकशी झालीच पाहिजे पण त्याबरोबर बिझिनेस स्टॅन्डर्ड,टाईम साप्ताहिक्,सी.एन.बी.सी.ह्यांचीही चौकशी करावी असे ह्यांचे मत. "ह्यांच्या"शी सहमत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
D
dadadarekar गुरुवार, 07/09/2015 - 18:59 नवीन
खाजगी पेपरवाल्यानी एक तांब्यापितळेचा पुतळा किंवा स्टीलचा गणपती देऊन पुरस्कृत करणं आणि सरकारने पद्म देणं दोन्ही सारखेच काय गं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
व
विकास गुरुवार, 07/09/2015 - 20:44 नवीन
सरकारने पद्म देणं कधी दिला? ते देखील २००७ साली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
स
सव्यसाची गुरुवार, 07/09/2015 - 20:55 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ई
ईश्वरसर्वसाक्षी गुरुवार, 07/09/2015 - 09:07 नवीन
:)
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 07/09/2015 - 20:25 नवीन
माईचा टोन आजकाल बदलला आहे
  • Log in or register to post comments
D
dadadarekar गुरुवार, 07/09/2015 - 20:35 नवीन
माई कमळीच्या प्रेमात पडली वाटतं . माई जरा जपून ( कमळाचा ) दांडा धर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
व
विकास गुरुवार, 07/09/2015 - 23:08 नवीन
तसे देखील पद्म म्हणजे कमळ. थोडक्यात हे काँग्रेसवाले भाजपाच्या जन्माच्या आधीपासूनच त्यांना (भाजपाला) मिळालेले होते हे यातून सिद्ध होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
अ
अस्वस्थामा Tue, 07/14/2015 - 12:48 नवीन
माई लॉजिकल बोलते हो कधी कधी.. लोकंच उगी त्यांना नानावळीत घालतेत असं वाटतं. (पण टोन बदललाय हे पण जाणवलंय. कदाचित बोलविते "हे" बदलले असतील, नै तर नानांचे जे झाले त्याचा विचार करुन जपून, तोलून मापून बोलत असतील आता.. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 08/13/2015 - 10:22 नवीन
शेवटी काल लोकसभेत ललित मोदी या नॉनइश्यूवर अनेक तास घणाघाती चर्चा होऊन पडदा पडला. एका फुसक्या विषयावर कॉंग्रेसने तब्बल एक संपूर्ण अधिवेशन वाया घालविले. अत्यंत अपरिपक्व आणि पोरकट विधाने करणार्‍या पप्पूच्या बालहट्टामुळे सगळी संसद वेठीला धरली गेली. सुषमा स्वराज, शिवराजसिंग चौहान व वसुंधराराजे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय संसद चालून देणारच नाही, निलंबित केलेल्या २५ काँग्रेस खासदारांचे निलंबन रद्द व्हायलाच पाहिजे व त्याशिवाय कोणतीही चर्चा करणार नाही, No discussion without resignations असे कॅमेर्‍यांसमोर संतप्त मुद्रेने तावातावाने सांगणार्‍या पप्पूला शेवटी वरील नेत्यांच्या राजीनाम्याशिवायच चर्चेत सामील व्हावे लागले. पंतप्रधान मोदींनी या विषयावर स्वतःच उत्तर दिले पाहिजे असा आग्रह धरणार्‍या काँग्रेसला सुषमा स्वराज आणि अरूण जेटलींच्या चौफेर टोलेबाजीने इतके गलितगात्र केले की पंतप्रधान संसदेत येतात की नाही याची वाट न बघताच लोकसभेतून काँग्रेसवाले निघून गेले. चर्चोत्तर मतदानाची तरतूद असलेल्या स्थगन प्रस्तावाखालीच चर्चा करण्याचा आग्रह धरणार्‍या काँग्रेसने मतदानापूर्वीच चर्चेतून व लोकसभेतून काढता पाय घेतला. सुषमा स्वराजांनी अत्यंत आक्रमक स्वरूपात घणाघाती भाषण करून काँग्रेसचा सर्व काळा इतिहास खणून काढून काँग्रेसचे पुरते वस्त्रहरण केले. ललित मोदी देशाबाहेर पळून जाण्यास व त्याच्यावर कोणतीही कारवाई न होण्यास तत्कालीन संपुआ ची राजवटच कशी पूर्ण जबाबदार होती हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. त्यांनी बोलू नये यासाठी काँग्रेसने अत्यंत खालची पातळी गाठली. सुषमा स्वराजांपूर्वी काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेंनी जवळपास ६५ मिनिटे अत्यंत नीरस भाषण करून स्वराजांवर बेलगाम आरोप केले. त्यांचे भाषण सुरळीत पार पडले. त्यांचे भाषण सुरू असताना बहुतांश वेळ भाजप सदस्यांनी ते शांतपणे ऐकून घेतले. परंतु सुषमा स्वराज उत्तर देण्यासाठी उठताच काँग्रेसी खासदारांनी वेलमध्ये जाऊन जोरजोरात घोषणा देण्यास सुरूवात केली व स्वराजांचे भाषण संपेपर्यंत घोषणा सुरू होत्या. त्यांच्यावर वाटेल ते निराधार आरोप करायचे आणि त्यांनी उत्तर देऊ नये यासाठी मोठमोठ्याने घोषणा देऊन त्यांचा आवाज दाबून टाकायचा ही अत्यंत चुकीची कृती काँग्रेसवाल्यांनी केली. परंतु खमक्या असलेल्या स्वराजांनी त्या परिस्थितीत सुद्धा अत्यंत आक्रमक भाषण करून काँग्रेसींचा डाव हाणून पाडला. नंतर पप्पूने आपल्या भाषणात काहीही नवे न सांगता अनेक दिवसांपासून कॅमेर्‍यासमोर तो जी मुक्ताफळे उधळत होता तेच पालुपद लावले. कोणतेही पुरावे नाहीत, वस्तुस्थिती माहित नाही, आपल्या पक्षाच्या राजवटीत केलेल्या चुकांची खंत नाही आणि तरीसुद्धा बेलगाम आरोप करणे हेच त्याचे धोरण होते. आपल्याला काल संसदेच्या लॉबीत सुषमा स्वराज कशा भेटल्या, त्यांनी आपला हात कसा धरला, "बेटा, मैने तुम्हारा क्या बिगाडा है" असे त्यांनी कसे विचारले, हे विचारल्यावर "मी सत्य बोलत आहे" असे मी ताठ मानेने त्यांच्या डोळ्यात डोळे घालून कसे सांगितले आणि हे सांगितल्यावर त्यांची नजर कशी जमिनीकडे झुकली कारण त्यांची बाजू असत्य होती ... हे साभिनय पप्पूने सांगितल्यावर त्याच्या बालबुद्धीची आणि पोरकटपणाची कीव आली. "मी सत्य बोलत आहे" या पप्पूच्या दाव्यावर तर अखिल ब्रह्मांड खदखदून हसले असेल. पोरकटपणे बोलण्याची ही पप्पूची पहिली वेळ नाही. २ महिन्यांपूर्वी मोदी व मनमोहन सिंग यांची भेट झाल्यावर "मनमोहन सिंगांनी मोदींची अर्थशास्त्र या विषयावर शिकवणी घेतली" असे अत्यंत अज्ञानी आणि बालिश विधान पप्पूने २ महिन्यांपूर्वीच केले होते. नंतर जेटलींनी सरळ बॅटने फलंदाजी करताना अत्यंत प्रभावी शब्दात संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितली. ललित मोदी लंडनला गेल्यावर संपुआच्या काळात त्याच्यावर फेमांतर्गत दावा दाखल केल्याने त्याला फक्त आर्थिक दंड होऊ शकतो, परंतु त्याला तुरूंगवास होऊ शकत नाही किंवा त्याच्याविरूद्ध वॉरंट सुद्धा निघू शकत नाही. गुन्हेगार हस्तांतरण कायद्याखाली त्याची मागणी करण्याऐवजी चिदंबरम यांनी त्याला इंग्लंडहून डीपोर्ट करावे अशी मागणी केली आणि अर्थातच इंग्लंडने ती धुडकावली. अंमलबजावणी संचलनालयाने तब्बल २०१०-२०१४ या तब्बल ४ वर्षात कोणतीही कारवाई केली नाही. त्याच्याविरूद्ध रेड कॉर्नर नोटीस (ज्यामुळे जगातील कोणत्याही विमानतळावर त्याला अडकवून ठेवता येते) जारी करण्याऐवजी लाईट ब्ल्यू कॉर्नर नोटीस (ज्यामुळे फक्त भारतातील कोणत्याही विमानतळावर त्याला अडकवून ठेवता येते) जारी केल्यामुळे तो सापडणे अशक्य होते. त्यामुळेच त्याला परत आणणे अवघड झाले आहे. परंतु आता नवीन कलमाखाली त्याच्यावर दावा दाखल केल्याने त्याच्याविरूद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट ५ ऑगस्ट २०१५ ला निघाले आहे. जेटलींनी ही सर्व माहिती देताना काँग्रेसचे जोरदार वाभाडे काढले. पप्पू हा कोणतेही ज्ञान नसलेला विद्वान आहे, असे उपरोधिक उद्गारही जेटलींनी काढले. शेवटी स्थगन प्रस्तावावर मतदान होताना काँगेसने आधीच सभात्याग केलेला होता. पप्पूच्या बालहट्टामुळे संसदेचे एक संपूर्ण अधिवेशन एका नॉनइश्यूपायी काँग्रेसने वाया घालविले. यातून काँग्रेसची वैचारिक व बौद्धिक दिवाळखोरी समोर आली. तसेच पप्पूची अपरिपक्वता आणि पोरकटपणा पुन्हा एकदा दृग्गोचर झाला. लोकसभा सभापती सौ. सुमित्रा महाजन यांच्या घरासमोर ढेरपोट्या, थुलथुलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी उघडेबंब अशा असभ्य अवस्थेत निदर्शने करून अजून खालची पातळी गाठली. काँग्रेस हा देशाच्या प्रगतीत मोठा अडथळा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. भाजपने अत्यंत योजनाबद्द पावले आखून संसद न चालण्याचा सर्व दोष काँग्रेसवरच जाईल अशी रणनीती आखून पार पाडली. संसदेत येऊन उत्तर देण्याच्या काँग्रेसच्या मागणीला मोदींनी धुडकावून लावले. सेहवाग आणि द्रविड गोलंदाजांची पिसे काढत असताना सचिनची गरज नसते. तसेच सुषमा स्वराजांनी आणि जेटलींनी काँग्रेसला इतके धुवुन काढले की मोदींना यायची गरजच पडली नाही.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 08/13/2015 - 15:02 नवीन
अत्यंत अपरिपक्व आणि पोरकट विधाने करणार्‍या पप्पूच्या बालहट्टामुळे सगळी संसद वेठीला धरली गेली. .... तुम्ही ते काही म्हणा... आमचा पप्पू हा women empowerment चा खंदा समर्थक आहे. म्हणून त्याने सुषमाजींना बोलण्याची संधी दिली आणि स्वतःकडे कमीपणा घेतला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 08/13/2015 - 10:39 नवीन
काल पप्पूने आपल्या हिंदी भाषणातील आपले मुद्दे रोमन लिपीत लिहून आणले होते. ते मधूनमधून बघून तो बोलत होता. त्याची आंतरजालावर फिरत असलेली प्रत - Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 08/13/2015 - 10:43 नवीन
हस्ताक्षर कुणाचं आहे? चांगलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ख
खटपट्या गुरुवार, 08/13/2015 - 12:57 नवीन
हावर्ड विद्यापिठात असताना हींदीत नापास झाला होता अशी माहीती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ह
होबासराव गुरुवार, 08/13/2015 - 13:53 नवीन
बकरुद्दीन द रेकर (बांग्लादेश रीटर्न) बरोबर आहेत करा ह्या नॉन-मॅट्रिक पास पप्पु ला पंतप्रधान :) हा मागे एकदा नेपाळ दुतावासात जाउन सुध्दा कॉपी करुन आला होता..आता तर संसदेत सुध्द्दा !! काय लायकी चे लोक भारतीय राजकारणात आहेत अरा रा रा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कोमल Fri, 08/14/2015 - 17:44 नवीन
:)) यावरच आज ब्रिटिश नंदीने सॉलिड ढिंग टांग लिहिलं आहे. http://www.esakal.com/Tiny.aspx?K=JKSXi हे सुषमा स्वराजचे संपूर्ण भाषण.. मुख्य म्हणजे काँग्रेस अध्यक्ष महोदयांनी या विडिओ मधे २१:३० ला, जेव्हा स्वराज राजीव गांधी बद्दल बोलत असतांना "और करो" म्हणून गोंधळ वाढवायलाही सांगीतला आहे. उत्तम विरोधीपक्ष नेते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अजया गुरुवार, 08/13/2015 - 12:50 नवीन
यावरून पप्पुला वाचता येतं हे तरी सिध्द झालं!
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 08/13/2015 - 14:59 नवीन
यावरून पप्पुला वाचता येतं हे तरी सिध्द झालं! :) सहमत! तरी देखील तो सुषमा स्वराज यांच्या समोर "वाचला" नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
र
राघवेंद्र गुरुवार, 08/13/2015 - 15:23 नवीन
:) प्रचंड सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
क
कपिलमुनी Fri, 08/14/2015 - 12:24 नवीन
PM Modi reads M-R-S Sirisena
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 08/17/2015 - 10:17 नवीन
ललित मोदी प्रकरणात पावले पडायला सुरूवात झाली आहे. ललित मोदीची सिंगापूरमधील बँक खाती गोठविण्यात आली आहेत. http://www.loksatta.com/desh-videsh-news/red-corner-notice-likely-to-be-issued-against-lalit-modi-1132576/ यपीएल माजी प्रमुख ललित मोदी यांच्या अडचणीत वाढ झाली असून अंमलबजावणी संचलनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाच्या(सीबीआय) मागणीची दखल घेत सिंगापूर सरकारने ललित मोदी यांची दोन बँक खाती गोठविण्यात आली आहेत. तसेच तेथील सरकारने ललित मोदींविरोधात आणखी माहितीची मागणी भारताकडे केली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ललित मोदी प्रकरणावरून सिंगापूर सरकारच्या अधिकाऱयांमध्ये गेले काही दिवस चर्चा सुरू होती. या चर्चेनंतर मोदींची दोन बँक खाती गोठवण्यात आली. दरम्यान, सीबीआयने इंटरपोलला पत्रव्यवहारकरून ललित मोदी यांच्याविरोधात रेट कॉर्नर नोटीस जारी करण्याची मागणी केली आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता असून ही नोटीस जारी करण्यात आल्यास ललित मोदींना अटक होऊ शकते. याआधी केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही ललित मोदी यांचे प्रत्यार्पण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असून त्यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली जाऊ शकते, असे विधान केले होते. यूपीएच्या कार्यकाळात मोदी यांच्याविरुद्ध फक्त 'फेमा' चे प्रकरण दाखल करण्यात आले, ज्यात अटकेची तरतूद नसून जास्तीत जास्त शिक्षा फक्त दंडाची आहे. त्यांच्याविरुद्ध जी 'लाइट ब्ल्यू कॉर्नर नोटीस' जारी करण्यात आली, ती केवळ क्षेत्रीय विमानतळांसाठी लागू आहे. असे असताना लंडनमध्ये बसलेल्या कुणा व्यक्तीला परत कसे आणता येईल, असा प्रश्न देखील राठोड यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे रेड कॉर्नर नोटीस बजावून ललित मोदींना भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याचे समजते.
  • Log in or register to post comments
अ
अमित मुंबईचा Tue, 08/18/2015 - 11:22 नवीन
https://www.youtube.com/watch?v=1m-4J-61Qxg
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा