ललित मोदी आणि सुषमा स्वराज
राम्राम मंडळी! तीन दिवस झाले. अर्णव गोस्वामीचा धुमाकूळ सुरू आहे. याबद्दलच्या बातम्या पेपरात दुसर्या तिसर्या पानावर येऊन गेल्या. पण मिपावर काही गडबड झाली नाही म्हणून काथ्याकुटाच्या प्रांतात घुसखोरी करत आहे.
ललित मोदीवर गंभीर आरोप असताना सुषमा स्वराज यांनी त्याला पोर्तुगालला जायला मदत केल्याचा आरोप आहे. स्वराज यांनी तसे कबूल केले. कालपासून वसुंधरा राजे यांचेही नाव येत आहे. भाजप सत्तेत आल्यावर ललित मोदी खूप खुश झाल्याची बातमी वाचली. ते एक असो.
मात्र मूळ आरोप सुषमा स्वराज यंना काही खाजगी बाबीत मदत ललित मोदी याने केली आणि त्याबदल्यात स्वराज यांनी ही मदत केली असे सकृद्दर्शनी दिसते. सुषमा यांची कन्या ललित मोदीची वकील असल्याचेही समजते.
या सगळ्या प्रकरणात आयपी एल आणि गुंडगिरी, बेकायदेशीर व्यवहार यांचा परस्पर संबंध, पैशासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला चुना लावणे हे स्पष्ट दिसत आहे. आमचे श्रीपादभाऊ नाईक कधीच असल्या प्रकरणात दिसणार नाहीत पण ते काम करत नाहीत म्हणून पंप्र त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. नक्की कोणावर विश्वास ठेवावा? की थोडेफार काम करणार्या एफिशियंट लोकांना असे काही प्रकार कम्पल्सरी करावेच लागतात?
(डिस्क्लेमरः मला फक्त शतकी प्रतिसादांचा धागा काढायचा आहे. तेव्हा या चर्चेत माझा सहभाग नसला तरी धागाकर्ते गायब झाले वगैरे टिप्पण्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. =)) )
💬 प्रतिसाद
(289)
आ
आनन्दा
गुरुवार, 06/18/2015 - 09:48
नवीन
तुमच्या त्यांच्याशी असलेल्या "सम्बंधांवर" अवलंबून आहे
- Log in or register to post comments
अ
अवतार
Wed, 06/17/2015 - 19:56
नवीन
आजकाल बऱ्याच क्षेत्रात विशेषत: राजकारण ह्या क्षेत्रात होतांना दिसतात. ह्याचे मुख्य कारण म्हणजे उपयुक्ततावादी विचारसरणीचा अतिरेक.तू माझी पाठ खाजव मी तुझी खाजवतो. स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारणी देखील परस्परांवर अनेक आरोप करत होते. पण उठसूट भ्रष्टाचाराचे आरोप लावणे हे शक्य होत नसे. कारण अक्षरश: हिमालयाएवढ्या उत्तुंग चारित्र्याची व्यक्तिमत्वे. माणूस हिंदुत्ववादी असो की कॉंग्रेसचा किंवा आंबेडकरी चळवळीचा; विरोध व्हायचा तो वैचारिक भूमिकांना.
पण गेल्या दोन दशकांमधील परिस्थिती पाहिली तर माणूस हिंदुत्ववादी असो की कॉंग्रेसचा किंवा आंबेडकरी चळवळीचा; भ्रष्टाचाराच्या आरोपांतून कोणतीही संघटना सुटलेली नाही. हा प्रश्न केवळ राजकारण्यांच्या डोक्यावर खापर फोडून सुटणारा नाही. पक्षीय अभिनिवेशातून बाहेर पडून तटस्थ दृष्टीकोनातून वास्तव अनुभवणे हे अत्यावश्यक आहे. ह्या सततच्या आरोप-प्रत्यारोप ह्या दुष्टचक्राला कंटाळलेल्या देशाची वाटचाल नकळत अराजकाच्या दिशेने चालू असते.
चारित्र्य घडवण्यासाठी तेवढीच उत्तुंग प्रेरणा असावी लागते. ही प्रेरणा मिळण्याचे स्त्रोतच समाजातून नष्ट होऊ लागले आहेत. रेताड जमिनीत पीक येत नाही. आधी पिकाऊ जमीन तयार करावी लागते. तेव्हा मिळतील फळे रसाळ गोमटी.
If you don't stand for something you will fall for anything
- Log in or register to post comments
च
चिगो
गुरुवार, 06/18/2015 - 20:57
नवीन
अत्यंत समर्पक, उत्तम प्रतिसाद..
हे कुणालाच मान्य नाहीय आजकाल असं वाटतं.. Objectivity नावाची चीजच जणू संपायला लागलीय.. म्हणून मग सेक्युलॅरीझ्म बद्दल बोललं, की लगेच काँग्रेसी-बगलबच्चा पासून आयसीस-समर्थक पर्यंत ताणतात लोक.. मोदींच्या एखाद्यापण गोष्टीची स्तुती केली, की लगेच तो संघिष्ठ.. केजरीवालच्या आक्रस्तळेपणाबद्दल बोललं, की तुम्ही भ्रष्टाचारीच..
खुप कलकलाट, कल्ला सुरु आहे सगळीकडे.. I am craving to hear a voice of reason. म्हणूनच मिपावर तुमच्यासारखे काही प्रतिसाद वाचले की बरं वाटतं..
- Log in or register to post comments
अ
अवतार
Fri, 06/19/2015 - 08:19
नवीन
मलाही असे सहप्रवासी भेटले की बरे वाटते.
The voice of reason is not always reasonable for the rich and the powerful
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Fri, 06/19/2015 - 10:56
नवीन
अवतार साहेब, मस्त प्रतिसाद.. :)
हे कधी नव्हे ते अति-आवश्यक बनलेय असे वाटतेय.
- Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी
Fri, 06/19/2015 - 11:03
नवीन
सॉरी, पण हे नेमकं भाजप सत्तेत आल्यावरच आवश्यक का बनलं असावं?
- Log in or register to post comments
ब
बबिता बा
Sat, 06/20/2015 - 08:47
नवीन
आपण पार्टी विथ डिफ्रन्स आहोत असे भाजपावाले सांगत होते म्हणुन
- Log in or register to post comments
स
सुधीर
Sat, 06/20/2015 - 08:41
नवीन
आपल्यापैकी बहुतेक जण पॉलिटिकल पार्टी सेंट्रीक असतात. त्यामुळे आपल्या पार्टीचे सगळेच निर्णय एकतर सपोर्ट करणं वा विरुद्ध पार्टीचे सगळेच निर्णय चुकीचे ठरवणे हा भाग बनून जातो. तसही स्वत:ला या सगळ्यांपासून तोडून, स्वतंत्र विचार करण्याची कला कठीणच आहे. कारण कुठल्यातरी एका विचारसरणीचा प्रभाव आपल्यावर नाही म्हाणायला असतोच. त्यामुळे जरी आपण आपल्या परीन तटस्थ विचार केला तरी लोकं पार्टीचं लेबल लावायला तयार असतात. पॉलिटीक्स मधला माझा इंटरेस्ट अलिकडचाच. बघू मीही शिकतोय तटस्थ होणं.
- Log in or register to post comments
अ
अवतार
Sat, 06/20/2015 - 15:05
नवीन
बांधिलकी विचारांशी आहे की व्यक्तींशी हे एकदा ठरवून घेतले की मग तटस्थ राहावे की नाही हे निर्णयस्वातंत्र्य मिळू शकते. विचारसरणी ही क्यालीडोस्कोपसारखी असते. प्रत्येकाच्या नजरेला दिसणारे आकृतिबंध हे वेगवेगळे असू शकतात. अशा वेळी स्वत:च्या नजरेतून बघायचे की इतरांच्या हा निर्णय महत्वाचा ठरतो.
तसेही पक्षीय राजकारण ही राजकारणाची पहिली पायरी आहे. अंतिम नव्हे.
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Wed, 06/17/2015 - 21:05
नवीन
या चर्चेत भाग घेणार्या सर्वांनी ऐकावी आणि पहावी अशी जवळ जवळ ४४ मिनिटे चालणारी ललित मोदी यांची राजदीप सरदेसाई यांनी घेतलेली मुलाखत---
http://indiatoday.intoday.in/story/lalit-modi-exclusive-interview-sushma-swaraj-india-today-tv/1/444947.html
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 06/17/2015 - 22:55
नवीन
एकदम इंटरेस्टींग आहे! किती भांडतोय हा! त्याला इथे पण चर्चेत भाग घेयला बोलवायला हवे! एकदम रंगत येईल! ;)
- Log in or register to post comments
च
चिनार
गुरुवार, 06/18/2015 - 09:25
नवीन
संधी मिळालीच आहे तर माझ्या एका धाग्याची जाहिरात Karun टाकतो .
ललित मोडी या महापुरुषावर मागे मी एक धागा लिहिला होता .
http://www.misalpav.com/node/३०९४१
(आतातरी शतकी प्रतिसादाची अपेक्षा !!)
- Log in or register to post comments
च
चिनार
गुरुवार, 06/18/2015 - 09:27
नवीन
http://www.misalpav.com/node/30941
- Log in or register to post comments
ब
बबिता बा
गुरुवार, 06/18/2015 - 10:36
नवीन
मटा ऑनलाइन वृत्त । जयपूर
ललित मोदी आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे अगदी मैत्रीचे संबंध होते. वसुंधरा राजे यांच्या पहिल्या कार्यकाळात (२००३-२००८) प्रशासकीय अधिकारी असलेल्या ललित मोदी यांची 'वठ' होती. राजे यांच्यासमोर ललित मोदी चक्क टेबलवर पाय ठेवून बसायचे, अशी माहिती एका प्रशासकीय अधिकाऱ्याने दिली.
मात्र २०१३ मध्ये राजस्थान विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध बिघडले आणि ललित मोदी हे राजेंपासून दुरावले. ललित यांच्या समर्थकांना याचा प्रचंड धक्का बसला. ललित मोदी यांनी राजस्थान क्रिकेट असोसिएशनची निवडणूक जिंकून देखील जिल्हा असोसिएशनने त्यांच्या जागी भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे नेते अमीन पठाण यांना बॉस केले. आरसीएचे अधिकारी देखील या बदलामुळे आश्चर्यचकित झाले. राजे यांच्या हस्तक्षेपाशिवाय हे शक्य नाही असेच त्यांना वाटत होते. सध्या मात्र हाय कोर्टाच्या स्थगितीमुळे आरसीए निष्क्रिय आहे.
जयपूर येथे नवे क्रिकेट स्टेडिअम बनवण्याची कल्पना ललित मोदी यांची होती. आरसीएकडून त्यासाठी चोप गावातील १८ हेक्टर जमीन आरक्षित करण्यात आली होती. मात्र याला देखील वसुंधरा राजे यांनी थारा दिला नाही. हा प्रोजेक्ट राजे यांनी रद्द केला. त्यानंतर नाराज मोदी यांनी अरुण जेटली यांचे अत्यंत निकटचे नेते भूपेंद्र यादव यांच्यावर निवडणुकांच्या आधी तिकीट विकण्याचे आरोप लावले. मात्र असे असताना देखील भाजपने २०० पैकी १६३ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे मोदी यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निकटचे असलेले भूपेंद्र यादव यांना राजस्थानातील भाजपचे अंतर्गत वाद मिटवण्यासाठी बोलवण्यात आले होते. त्या काळातच राजे-ललित मोदी यांच्या मैत्री संबंधातील शेवटच्या आशाही मावळल्या.
या साऱ्याचा बदला घेण्यासाठी म्हणून ललित मोदींनी आता राजेंविरोधात मोर्चा उघडला आहे, असे एका भाजपच्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केली असल्याने मोदी त्यांना नाराज करू इच्छित नाही. मात्र वसुंधरा राजे यांच्यासह काही काँग्रेस नेत्यांनाही ललित मोदी या प्रकरणात अडवून बदला घेऊ पाहात असल्याचे या नेत्याने सांगितले.
'मी वसुंधरा राजे सिविल लाइन्स १३ जयपूर, राजस्थान, भारत येथील नागरिक. ललित मोदी यांच्या इमिग्रेशन अर्जाला पाठिंबा देते. मात्र यासाठी एक अट आहे की, ही माहिती भारतीय अधिकाऱ्यांपासून गुप्त ठेवण्यात यावी',
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 06/18/2015 - 10:44
नवीन
सुषमा स्वराजान्चे स्पष्टीकरण -
'Some time on July 14, Lalit Modi spoke to me that his wife was suffering from cancer and surgery was fixed on August 4 in Portugal. He told me that he had to be present in the hospital to sign the consent papers. He informed me that he had applied for travel documents in London and the UK government was prepared to give him the travel documents. However, they were restrained by the United Progressive Alliance government communication that this would spoil Indo-UK relations. Taking a humanitarian view, I conveyed to British high commissioner that British government should examine the request of Lalit Modi as per British rules and regulations and that if the British government chooses to give travel documents to Lalit Modi, that will not spoil our bilateral relations.'
I genuinely believe that in a situation such as this, giving emergency travel documents to an Indian citizen cannot and should not spoil relations between two countries.
सुषमा स्वराजान्नी ललित मोदीला प्रवासाची कागदपत्रे मिळण्यास मदत केली असे दिसत नाही. ब्रिटिश सरकारने त्याला कागदपत्रे द्यावीत का नाही यावर आपले कायदे व नियमानुसार निर्णय घ्यावा असेच त्यान्नी सान्गितले आहे. त्याला कागदपत्रे द्या असे सान्गितलेले दिसत नाही.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Fri, 06/19/2015 - 00:59
नवीन
हे ऐकणार कोण?मुद्दा न ऐकता नुसते ढोल बडवत फिरणे आणि त्या आवाजात सत्य दडपुन टाकणे एव्हढी एकच कर्तबगारी आहे आजच्या मिडियाची.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 06/19/2015 - 11:02
नवीन
खरे आहे.
त्यामुळेच सोशल मीडीयाचे महत्त्व पटतं, असत्य फार काळ लादल्या जाऊ शकत नाही आजकाल..
- Log in or register to post comments
P
prasadnene
Fri, 06/19/2015 - 20:05
नवीन
Nice
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Sat, 06/20/2015 - 11:25
नवीन
काय ठरले शेवटी?
सुषमा स्वराज चूक की बरोबर?
थोडक्यात सांगा रे कुणीतरी.
- Log in or register to post comments
स
सव्यसाची
Sat, 06/20/2015 - 19:03
नवीन
ताई,
एवढ्या प्रतिसादानंतरही कोणत्याही एका निर्णयाला नाही पोहोचता येणार. कायदेशीर दृष्ट्या, वरकरणी काही गडबड दिसत नाहीये.
बाकी राजीनाम्याचे म्हणाल तर राजीनामा घेतील असे अजिबात वाटत नाही. कालच भारतातर्फे संयुक्त राष्ट्रसंघामध्ये योग दिवसासाठी सुषमा स्वराज गेल्या आहेत. शिवाय आताच टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष आले होते त्यांच्या सोबतच्या मीटिंग मध्ये पण सुषमा स्वराज यांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान जरी अजून काही बोलले नसले तरी त्यांचा सुषमा स्वराज यांच्यावर विश्वास आहे असे म्हणण्याजोग्या घटना घडल्या आहेत आणि याचमुळे राजीनामा येईल असे दिसत नाही. वसुंधरा राजे यांच्या केस मध्ये भाजपा ने वेळ घेतला त्यांना साथ द्यायला पण शेवटी सपोर्ट दिलाच. त्यामुळे तिकडून पण राजीनामा येईल असे वाटत नाही.
अजून मान्सून सत्र लांब आहे. या महिन्या-दीडमहिन्यामध्ये काही दाखवण्याजोगी कारवाई ललित मोदी यांच्याविरुद्ध होइल असे दिसते.
- Log in or register to post comments
प
पुतळाचैतन्याचा
Sat, 06/20/2015 - 17:59
नवीन
भोपाल गैस दुर्घटनेच्या दिवशी युनियन कर्बयिड च्या भारतातील अध्यक्षाला पळून जायला कोणी मदत केली होती ते जर आथवले तर बरे होइल
- Log in or register to post comments
स
सचिन
Sat, 06/20/2015 - 18:09
नवीन
त्यांनी चूक केली म्हणून यांच्या चुका माफ होत नाहीत. त्यामुळे अशी तुलना करण्यात अर्थ नाही.
़खरं तर सुषमाताईंचं नाव आल्यामुळे वाईट वाटले.
वरकरणी काही दोष दिसत नाही त्यांचा .... परंतु त्यांनी जरा विचारपूर्वक हाताळायला हवे होते असे वाटते..
- Log in or register to post comments
भ
भक्त प्रल्हाद
Sun, 06/21/2015 - 11:51
नवीन
आपल्या ओळ्खीच्या लोकांचं सुद्धा काम करता येत नसेल तर त्या सत्तेचा काय उपयोग ? शेवटी माणुसकी नावाची पण काही गोष्ट असते.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 06/21/2015 - 12:44
नवीन
२०० :)
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 06/22/2015 - 15:55
नवीन
यशस्वी धागा काढण्यासाठी श्रेय कुणाला द्यावे? - पैसा ताईंना का सुषमा ताईंना? ;)
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 06/22/2015 - 16:08
नवीन
कुठच्या तरी ताईंना द्या म्हणजे झाले. तरी अजून तिसर्या ताईंचा उल्लेख इथे फारसा आला नाही. अजून कोणाला पाहिजे तर ऑप्शन खुला आहे! =))
सीरियसली, शिवीगाळ, वैयक्तिक आरोप न झालेली, एकही प्रतिसाद अप्रकाशित न झालेली ही पहिलीच राजकीय चर्चा असावी. सर्व मिपाकरांना धन्यवाद!
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 06/23/2015 - 11:03
नवीन
२०० पार केल्याबद्दलचा सत्कार जेपीआल्यावर केला जाईल (सत्कार सामानाची खोली-किल्ली त्याने टक्याला दिली का हे माहीत नाही)
पै ताईंचा सत्कार एक दिवसाचा पीएम्पीलचा पुणे दर्शन बस पास्,दोन मोठ्या ताडपत्री पिशव्या## (पुढच्या वेळी पुण्याला मानाकुराद आंबे आणायला उपयोगी पडाव्यात म्हून),आणि पुष्करणी भेळ देऊन करण्यात येईल.
अभामिपामांकामिमसंचालीत
सत्कार वस्तू पोच व्यवस्थेबाब्त सूड यांची सूचना आम्हाला कायम शिरोधार्थ आहे.
वस्तू मिळताच तपासून घेणे (नंतर बदलून मिळणार नाही)
ताडपत्री पिशव्या## भगदे आणि कंपनीच्या असतील त्याची जिम्मेदारी बुवांकडे आहे.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 07/01/2015 - 14:05
नवीन
हे बेण तिथे बसुन रोज नव्या नेत्याला भेटल्याचा गौप्यस्फोट करतेय... आज वरुण गांधि आणि त्याचि काकु (राजमाता) ह्यांचा उल्लेख केलाय.. ललित मोदि एक fugitive आहे आणि इथले राजकारण त्याला चांगले माहित आहे त्याशिवाय का इतक्या कमि अवधीत तो एवढया उंच पोहोचला होता.
हम तेरे दर पे सनम रोज आयेंगे
हम तेरे दर पे सनम रोज आयेंगे
घंटि बजायेंगे और भाग जायेंगे
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Wed, 07/01/2015 - 14:25
नवीन
वरुण्गांधी ललित मोदीला मद्त करणार होता म्हणे.
किती स्वच्छ सरकार हे !
आणि मद्त क्णाकडुन घेणार होता म्हणे ? सोनियाकाकूंकडुन !
माय मरो पण काकू जगो !
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 07/01/2015 - 14:52
नवीन
ज्या प्रकारे ललित मोदी एकेक नावे उघड करतोय ते पाहता ललित मोदी सुनंदा पुष्कर ह्यांच्या वाटेने जाणार असे दिस्तेय. 'अपघाती मृत्यु' व्हायची शक्यता नाकारता येत नाही असे ह्यांचे मत.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 07/01/2015 - 14:58
नवीन
कुठं गेला होता माई !
लेकरांनी रडू रडू वात आणला होता.
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Wed, 07/01/2015 - 15:05
नवीन
माई ! आल्या !
- Log in or register to post comments
र
राघवेंद्र
Wed, 07/01/2015 - 16:06
नवीन
:)
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 07/01/2015 - 16:28
नवीन
लेकरांनी रडू रडू वात आणला होता.
चुकलिया माये ।
बाळ हुरुहुरु पाहे
जीवनावेगळी मासोळी ।
तैसा मिपा(कर) तळमळी
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 07/01/2015 - 19:31
नवीन
माई नी माई
मुंडेर पे तेरे,
रो रहा है नाना!
पहला आयडी,
डीलीट हो गया,
नवीन आयडीसे,
फिरसे जागा!
टूड्डूsss टुडुडुडु डुडुडुडु डु,
टूड्डूsss टुडुडुडु डुडुडुडु डू
(चित्रपट - नाना माईके है कोन)
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Wed, 07/01/2015 - 19:51
नवीन
भुताचा आयडी ...
की
आयडीचे भूत ?
- Log in or register to post comments
G
gogglya
Wed, 07/01/2015 - 16:26
नवीन
गोंधळात भुजबळ प्रकरण मागे पडले आहे, आणी त्यामागे घड्याळ कांकाचा 'हात' आहे अशीही एक वन्दता आहे.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
गुरुवार, 07/02/2015 - 11:17
नवीन
खुपच जोरदार चर्चा.. पै तै चे अभिनंदन!
मला समजलेली गोष्ट अशी की ललिअ मोदींच्या बायकोच्या ऑपरेशनसाठी त्यांना ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स हवे होते. भारताकडुन त्यास आक्षेप नाही एवढेच स्वराज ह्यांनी कळवले.
तरीही लोक मोदींना (पक्षी - गुन्हेगाराला ) मदत केली असं म्हणत आहेत.
एखाद्या व्यक्तिने अगदी फासावर चढवण्यालायक गुन्हा जरी केलेला असला तरी नवर / बाप म्हणुन त्याची सही / कायदेशीर परवानगी / त्याची उपस्थिती अत्यावश्यक असेल तर दुसर्या निरपराध माणासाच्या जीवासाठी तशी परवानगी देणे हे चुक कसे काय ठरु शकते?
खरं तर ही मदत मोदींच्या बायकोला केली गेली आहे, ललित मोदींना नाही.
- Log in or register to post comments
D
dadadarekar
गुरुवार, 07/02/2015 - 11:29
नवीन
किती माणुसकी ती !
ललोत मोदीच्या तंबाखू कंपनीला फायदा व्हावा म्हणुन ट्याक्सेस कमी केले गेले.
http://www.thenewsminute.com/article/swamped-too-many-developments-heres-one-stop-understanding-latest-lalitgate-31751
The tobacco connection: Congress leader Jairam Ramesh has reportedly said that he wondered whether the Vasundhara Raje government slashed the taxes on tobacco products in Rajasthan to help the Modi owned tobacco manufacturing company.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
गुरुवार, 07/02/2015 - 11:38
नवीन
ओ.. मुद्द्यावर बोलुया का?
तुम्चं म्हणणं हो किंवा नाही मध्ये मांडा
ललित मोदींच्या बायकोला नीवन मरणाच्या स्थितीमध्ये ऑपरेशनसाठी नवर्याची गरज असेल तर तशी परवानगी द्यावी की नाही?
हे जमत नसेल तर सोडा..
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 07/03/2015 - 07:43
नवीन
हे पाँईटाच ! पण इथे तसा कुणीच बोलत नाही.
१. ललित मोदींच्या बायकोला नीवन मरणाच्या स्थितीमध्ये ऑपरेशनसाठी नवर्याची गरज असेल तर तशी परवानगी द्यावी की नाही? : द्यावी
२. एखाद्या गुन्हेगाराने एका मंत्र्याशी संपर्क साधला असेल तर त्याची माहिती संबंधित खात्यांना कळवावी का ??
हो की नाही??
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Fri, 07/03/2015 - 07:57
नवीन
पासपोर्ट रद्द झालेल्याला कशी परवानगी देणार बुवा ?
हे म्हणजे शाळेतुन काढुन टाकलेल्या पोराने मला सहलीला जाऊ द्या अशी परवानगी मागायला हेडमास्तरला फोन केल्यागत नाही का ?
आमचा पासपोर्ट नाही . म्हणजे त्यावर विसाही नाही.
आता त्याने कसेही व कुठेही फिरावे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 07/03/2015 - 09:30
नवीन
>>> ललिअ मोदींच्या बायकोच्या ऑपरेशनसाठी त्यांना ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स हवे होते. भारताकडुन त्यास आक्षेप नाही एवढेच स्वराज ह्यांनी कळवले.
एक दुरूस्ती.
ललित मोदींना ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स द्यावेत की नाही हा निर्णय ब्रिटिश सरकारने स्वतःचे कायदे, नियम व प्रोसिजर्स यानुसार घ्यावा. कोणताही निर्णय घेतला तरी त्यामुळे द्विपक्षीय संबंधांवर परीणाम होणार नाही. असे सुषमा स्वराज यांनी कळविले होते. त्यांना ते पेपर्स द्या अशी कोणतीही विनंती/सूचना स्वराज यांनी केलेली नव्हती.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 07/03/2015 - 09:42
नवीन
एखाद्या गुन्हेगाराने एका मंत्र्याशी संपर्क साधला असेल तर त्याची माहिती संबंधित खात्यांना कळवावी का ??
हो की नाही??
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 07/03/2015 - 10:54
नवीन
संबंधित खात्यांना म्हणजे नक्की कोणाकोणाला?
- Log in or register to post comments
स
सव्यसाची
Fri, 07/03/2015 - 11:08
नवीन
अजून एक प्रश्न मला पडलाय.
ललित मोदी गुन्हेगार आहेत हे एखाद्यातरी कोर्टात सिद्ध झाले आहे का? आणि कोर्टाने त्यांना फरारी घोषित केले आहे का?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 07/03/2015 - 11:38
नवीन
ललित मोदी गुन्हेगार आहेत हे एखाद्यातरी कोर्टात सिद्ध झाले आहे का ? नाही
त्याम्च्यावर आरोप आहेत आणि त्यांना समन्स काढले आहे.
कोर्टाने त्यांना फरारी घोषित केले आहे का? : हो.
- Log in or register to post comments
स
सव्यसाची
Fri, 07/03/2015 - 12:10
नवीन
समन्स कोणत्या कोर्टाचे आहेत?
कोणत्या?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 07/03/2015 - 11:37
नवीन
ईडी , अर्थ खाते , गृह खाते आणि परराष्ट्र खात्यामध्ये याची नोंद हवी होती.
हे नैतिकतेला धरून झाले असते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 07/03/2015 - 11:50
नवीन
नैतिकता वगैरे सापेक्ष गोष्टी आहेत.
या खात्यांना कळविणे हे कायदयाने किंवा नियमानुसार बंधनकारक आहे का?
या खात्यांना कोणीकोणी कायकाय कळविले किंवा कायकाय कळविले नाही जनतेला उघडपणे सांगितले जाते का?
त्यांनी तसे कळविले असेल सुद्धा, इतरांना या सर्व गोष्टी जाहीर केल्या जातात का?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »