Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डॉ. कलबुर्गी..यांची हत्या..

स
संजय पाटिल
Sun, 08/30/2015 - 11:37
🗣 227 प्रतिसाद
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&uact=8&ved=0CB4QqQIwAGoVChMIiPfbxL_QxwIVjG2OCh3btQKk&url=http%3A%2F%2Fwww.ibtimes.co.in%2Fkannada-scholar-dr-mm-kalburgi-shot-dead-644723&ei=Q83iVcjJLYzbuQTb64qgCg&usg=AFQjCNE_rncuIRsWQGjkLVr9yMCMN4tB8w डॉ. नरेन्द्र दाभोळ्कर, कॉ. गोविन्द पानसरे आणि आता डॉ. कलबुर्गी यांना गोळ्या झाडुन ठार मारण्यात आले. नेमके काय चाललय?

प्रतिक्रिया द्या
41776 वाचन

💬 प्रतिसाद (227)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 08/31/2015 - 07:30 नवीन
डॉक्टर साहेब, वर उल्लेख आला आहे तसा की बालवयात त्यांनी काय कृत्य केलं त्याचं आता समर्थन होऊ शकत नाही, मुर्ती पूजेत कुठलंही शास्त्र नाही किंवा त्यात विज्ञानही नाही म्हणुन त्यावर मुत्र विसर्जन करा असा अर्थ त्यात असेल तर ते चुकच आहे. माणसाच्या रक्तात श्रद्धा इतक्या प्रचंड खोलवर रुजुन बसलेल्या असतात की त्या एका क्षणात बाहेर काढुन फेकता येत नाही. आणि असं काही टोकाचं विधान करुन, किंवा श्रद्धा तोडून कोणत्याही परंपरा विचार बदलत नसतो आधुनिक विचार जनमानसात रुजवावा लागतो. आणि हळुहळु तो विचार समाजात रुजत असतो. >>>> अर्थात म्हणून त्यांची हत्या करणे हे कुठल्याहि अर्थाने समर्थनीय नाही आणि तो गुन्हाच आहे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे. सहमत. विषय संपला. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बोका-ए-आझम Mon, 08/31/2015 - 07:37 नवीन
बिरुटे सर. पण काहीही पुरावा नसताना त्यांची हत्या हिंदुत्ववाद्यांनी केली असा अपप्रचार करणा-यांचं काय? त्यांच्या हत्येला हत्या हा गुन्हा म्हणून न पाहाता जे हिंदुत्ववादी कारस्थान म्हणून पाहात आहेत आणि तेही पुरावा नसताना - त्यांनी आपल्या मताच्या शिंका टाकताना विचार करायला हवा की नको? याबद्दल तुमचं काय मत आहे? की तिथेही विषय संपला असं म्हणून तुम्ही स्टाफरुमच्या दिशेने निघून जाणार आहात?
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 08/31/2015 - 07:46 नवीन
हिंदुत्ववाद्यानीच हे कृत्य केलं असा कोणत्याही पुराव्या शिवाय मी तरी विधान करणार नाही. हिंदुत्ववाद्याचं कारस्थान असंही म्हनणार नाही, पण या पूर्वी असा काही कोणी प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावर शंका तर येणारच ना ? मी चर्चेत जे पटतं आणि जो विचार आधुनिक जगाशी सुसंगत आहे त्याच्याशी बांधिलकी ठेवून मी स्टाफरुम मधे बसलेलो असलो तरी वाचत लिहित राहीन. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Mon, 08/31/2015 - 08:14 नवीन
हा किती घातक असू शकतो याबद्दल मी सांगायला नकोच. त्यामुळे एखादा निरपराध माणूस आयुष्यातून उठू शकतो. यापूर्वी असा प्रयत्न केला असेल तर त्याचाही पुरावा नाहीये. हे म्हणजे पूर्वी ब्रिटिशांनी काही जमातींना सरसकट गुन्हेगार ठरवून त्यांचं आयुष्य बरबाद केलं, तशातलाच आधुनिक धर्तीवरचा प्रकार आहे.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 08/31/2015 - 09:41 नवीन
पंधरा दिवसापूर्वीच त्यांनी त्यांची सुरक्षा काढून घ्यायची विनंती केली होती. सुरक्षा द्यावी लागली याचा अर्थ कोणी तरी धमकी दिली असावी ! अशी धमकी देणारे जे कोणी असतील त्यांच्यावर संशय येणारच यात पूर्वग्रहाचा काय सबंध ? -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Mon, 08/31/2015 - 10:19 नवीन
सुरक्षा काढून घेताच त्यांची हत्या झाली. हा योगायोग जरा अविश्वसनीय नाही वाटत? ज्या माणसाने हिंदू धर्माबाबत वादग्रस्त विधाने केलेली आहेत त्याची हत्या होताक्षणी संशय हिंदुत्ववादी संघटनांवर येणार हे उघड आहे आणि पोलिस त्यामागे लागणार आणि भाजपसारखे हिंदुत्ववादी पक्ष बदनाम होणार - असं कारस्थान असू शकतं. ती शक्यता विचारात न घेता धमकी देणा-यांवर, जे हिंदुत्ववादी संघटनांचे सदस्य होते याचाही पुरावा नाही, संशय येणारच हे जे आपण म्हणताय तोच पूर्वग्रह. माझा मुद्दा सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद!
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
काळा पहाड Mon, 08/31/2015 - 10:39 नवीन
हाच विचार माझ्या मनात आला होता. पांढरी पाल सुद्धा त्यामागे असू शकेल.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
श
श्रीगुरुजी Mon, 08/31/2015 - 10:39 नवीन
सुरक्षा काढून घेताच त्यांची हत्या झाली. हा योगायोग जरा अविश्वसनीय नाही वाटत? ज्या माणसाने हिंदू धर्माबाबत वादग्रस्त विधाने केलेली आहेत त्याची हत्या होताक्षणी संशय हिंदुत्ववादी संघटनांवर येणार हे उघड आहे आणि पोलिस त्यामागे लागणार आणि भाजपसारखे हिंदुत्ववादी पक्ष बदनाम होणार - असं कारस्थान असू शकतं.
+१ अगदी बरोबर. दाभोळकर आणि पानसरे यांच्या खुनाच्या मागे हाच हेतू असावा असा माझा अंदाज आहे. २००९ मध्ये देशात व महाराष्ट्रात निवडणुक होणार होती. त्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांना व भाजपला बॅकफूटवर नेण्यासाठी मालेगाव प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल प्रसाद पुरोहीत इ. ना पुरेसे पुरावे नसताना अडकविण्यात आले आणि २००९ मधील निवडणुकीतील प्रचारात याचा भरपूर वापर केला गेला. २०१४ मध्ये देशात व महाराष्ट्रात निवडणुक होणार होती. दरम्यानच्या काळात २०१३ पर्यंत महाराष्ट्रातील आघाडी सरकारने सनातन प्रभात संस्थेवर बंदी आणण्याचे प्रयत्न २ वेळा केला. कोणताही सबळ पुरावा नसल्याने दोन्ही वेळा ही बंदी आणण्याचे प्रयत्न फसले. त्यामुळे या संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न तिसर्‍यांदा सुरू झाला होता. दाभोळकरांचा खून २० ऑगस्ट २०१३ या दिवशी झाला. खून झाल्यावर काही मिनिटातच पृथ्वीराज चव्हाणांनी असे जाहीर वक्तव्य केले की या खुनामागे हिंतुत्ववादी संघटना आहेत. असे जाहीर विधान करून तातडीने तपासाची दिशा फक्त सनातनवर केंद्रीत करण्यात आली. खुनानंतर पुढील २ आठवडे सनातनच्या अनेक कार्यकर्त्यांची कसून तपासणी झाली. त्यातून काहीही सापडले नाही. दरम्यान खुन्यांना पुरावे नष्ट करण्यास आणि निसटून जाण्यास भरपूर वेळ मिळाला. सनातन विरूद्धच्या तपासात एखादा किरकोळ धागादोरा मिळाला असता तरी त्याचे निमित्त करून सनातनवर पुन्हा बंदी आणण्याचा प्रयत्न झाला असता आणि त्याचा उपयोग २०१४ च्या निवडणुकीत करून घेता आला असता. या खुनामागे तत्कालीन सत्ताधारी पक्षातील कोणतरी कट्टर सनातनविरोधी प्रबळ नेता असावा असा माझा अंदाज आहे. आधी दाभोळकर, नंतर पानसरे आणि आता कलबुर्गी. भाजप व मोदी यांच्याशी विकासाच्या मुद्द्द्यावर झुंज देणे अशक्य असल्याचे लक्षात आल्याने आता अशा हत्या करून हिंदुत्ववादी संघटनांची म्हणजेच पर्यायाने भाजप व मोदींची प्रतिमा कलंकित करण्याचा हा प्रयत्न असावा असा माझा अंदाज आहे.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
भ
भुमन्यु Mon, 08/31/2015 - 20:50 नवीन
हीच भावना दाभोळकर, पानसरे ह्यांच्या हत्येवेळीही आली होती. बंगळूर महानगर पालिकेचे निकाल नुकतेच लागलेत, त्यातही स्युडो सेक्युलर पक्ष पडले आहेत. ह्या सर्व घटना अगदीच योगा-योगाच्या असु शकत नाहीप. अवांतरः जर काँग्रेसचा इतिहास विचारात घेतला तर, बरेच गैर गांधी घराण्यातले पंतप्रधान पदाचे दावेदार अकस्मिक मृत्युनेच वारलेत.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
D
dadadarekar Mon, 08/31/2015 - 07:46 नवीन
कर्नाटकातील ज्येष्ठ विचारवंत व कन्नड विद्यापीठाचे माजी कुलगुरू एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसंदर्भात बजरंग दलाशी संबंधित एका पदाधिकाऱ्याच्या ट्विटने खळबळ उडाली आहे. हे ट्विट व्हाॅट्सअॅपवर व्हायरल झाले आहे. बजरंग दलाचा सहसमन्वयक भूविध शेट्टी याच्या नावे हे ट्विट आहे. यात कलबुर्गी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारण्यात आली. 'आधी यू. आर. अनंतमूर्ती लक्ष्य होते, आता एम.एम. कलबुर्गी. हिंदुत्वाची टर उडवा आणि मरण पत्करा, यापुढे के. एस. भगवान तुमचा नंबर आहे,' असे हे ट्विट नंतर रात्री काढून टाकण्यात आलेे. या ट्विटरवरून कर्नाटक पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शेट्टीच्या नावे गरुड पुराण ट्विटर अकाउंट असल्याचे समजते. यावर आधी बरेच वादग्रस्त ट्विट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, असे कुणी आहे अथवा नाही याबाबत विश्व हिंदू परिषद वा बजरंग दलाच्या नेत्यांनी अनुमोदन दिले नाही.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
D
dadadarekar Mon, 08/31/2015 - 07:48 नवीन
http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=48736834&section=top-stories
↩ प्रतिसाद: dadadarekar
ब
बोका-ए-आझम Mon, 08/31/2015 - 08:05 नवीन
असं ट्वीट हा पुरावा होऊ शकत नाही. कोर्टात सिद्ध झालंय का? Indian Evidence Act नुसार (जो भाजप सरकारने बनवलेला नाही) हा बजरंग दल किंवा विश्व हिंदू परिषद त्यात सहभागी होते याचा पुरावा म्हणता येणार नाही. शिवाय कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे. ते खरं काय ते शोधून काढतील अशी अपेक्षा आहे.
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Mon, 08/31/2015 - 09:22 नवीन
त्यांचा खून बजरंगदलाने केलाय असे मी म्हटलेले नाही. पेप्रात आलेलं तुम्हाला व इतराना दाखवणं. इतकेच मीकेले
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
भ
भृशुंडी Mon, 08/31/2015 - 06:12 नवीन
बोका-ए-आझमजी, तसं नसतं हो. दांभिकतेचा तुमचा युक्तीवाद तर्कविसंगत आहे. त्याच न्यायाने मी असंही म्हणू शकतो, की तुम्ही फक्त कलबर्गी/अनंतमूर्तींनाच विरोध करताय, बाकीच्यांचं काय? त्यांनाही (शोधा) आणि विरोध करा नाहितर तुम्ही दांभिक आहात. तेव्हा असं काही नसतं. ज्या विषयाबद्दल आत्मीयता आहे त्यातल्या त्रुटी समोर आणणं हे सर्वथैव अभ्यासकाच्या विषयक्षेत्रावर अवलंबून आहे. मग तो हिंदू धर्म असेल किंवा आणखी काही.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Mon, 08/31/2015 - 07:04 नवीन
बाहेर आणल्या जातात त्याच्यावरही ब-याच गोष्टी अवलंबून आहेत. स्वामी विवेकानंद किंवा बाबासाहेब अांबेडकरांनीही हिंदू धर्मातल्या त्रुटी दाखवल्या आहेत पण त्यामागचा त्यांचा हेतू हा कुचेष्टेचा नव्हता तर सुधारणेचा होता. कलबर्गींची हत्या होणं हे वाईटच आहे - ती त्यांनी हिंदू धर्मावर टीका केल्यामुळे झाली आणि हिंदुत्ववाद्यांनी केली याचा काहीही पुरावा अजून समोर आलेला नसताना - आणि Nothing is selective over here असं तुम्ही म्हणताय आणि ज्या विषयाबद्दल आत्मीयता असते त्या विषयातल्या त्रुटी दाखवणं हे सर्वथैव अभ्यासकाच्या अभ्यासक्षेत्रावर अवलंबून आहे असंही म्हणताय त्यालाच selective म्हणतात ना? तुम्हाला तुमच्याच प्रतिसादातली ही तर्कविसंगती दिसत नाही का?
↩ प्रतिसाद: भृशुंडी
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 08/31/2015 - 10:11 नवीन
>>>>>>>>>कलबर्गींची हत्या होणं हे वाईटच आहे - ती त्यांनी हिंदू धर्मावर टीका केल्यामुळे झाली हिंदुत्ववाद्यांनी केली याचा काहीही पुरावा......... डॉक्टर कलबर्गी यांनी हिन्दुधार्मावर टिका केली म्हणून त्या गोष्टीचा प्रचंड राग येऊन मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध या धर्मातील किंवा अन्य पन्थातील कोणी परंपरावादी माथेफिरू असे कृत्य करू शकतो हा संशय घेता येऊ शकतो ! :) -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
प
प्यारे१ Mon, 08/31/2015 - 10:16 नवीन
हिंदुत्ववादी आणि हिंदूधर्मीय मध्ये गल्लत होतेय सर. बा द वे हिंदूंमध्ये संधीसाधू राजकारणी, नेते, बिल्डर लोक इ.इ. कमी नाहीत.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब
बोका-ए-आझम Mon, 08/31/2015 - 11:13 नवीन
प्रतिसाद नीट वाचा. कलबर्गींची हत्या हिंदू धर्मावर टीका केल्यामुळे झाली आणि हिंदुत्ववाद्यांनी केली याचा पुरावा - असं म्हटलंय. म्हणजे हत्या हिंदू धर्मावर टीका केल्यामुळे झाली याचाही पुरावा नाहीये आणि हिंदुत्ववाद्यांनी केली याचाही पुरावा नाहीये.तुमचा विद्यार्थी नसलो तरी बरं आहे हो मराठी माझं ;)
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 08/31/2015 - 04:06 नवीन
कवी, नाटककार, समीक्षक आणि साक्षेपी इतिहासकार ज्यांनी आयुष्यभर विवेकाचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि मानवतेचा आग्रह धरला अशा डॉ.एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्येचा मी निषेध करतो. -दिलीप बिरुटे
च
चौकटराजा Mon, 08/31/2015 - 05:41 नवीन
मी स्वतः मूर्तिपूजा करतो. पण एक सांस्कृतिक करमणूक म्हणून. मूर्तित देव पहाणार्यांची मला कीव येते पण मी ती त्याना बोलून दाखवून दुखविण्याचे पातक कशाला करू ? हं असा आपला फंडा आहे. गणपतीची मूर्त ही मूर्तच आहे तो प्रत्यक्ष गणपति नवे हे खरेच तरीही त्या मूर्तीला पाण्यात विसर्जन करताना दगड फेकल्याची वागणूक मिळता कामा नये इतके तारतम्य गरजेचे आहे.
च
चलत मुसाफिर Mon, 08/31/2015 - 06:27 नवीन
माझा एक प्रतिसाद संपूर्ण उडवण्यात आला असून दुसरा संपादित केला गेला (केवळ शीर्षक बाकी) आहे. मी या दोन्ही प्रतिसादांमध्ये, एक प्रयोग म्हणून, जाणूनबुजूनच प्रक्षोभक आणि आव्हानात्मक (पण असभ्य वा अश्लील नव्हे) भाषेचा उपयोग केला होता. प्रतिसाद संपादित केला जाईल याची मला पूर्ण कल्पना होती. यावरून मला हे दिसून आले, की अन्य कुठेही, कुणीही, काहीही बोलो अथवा लिहो, मिपा व्यासपीठाची सोज्वळता आणि निरागसपणा शाबूत राहणे महत्वाचे! यातून उपस्थित होणारा पुढचा प्रश्न: अशा विषयांची मिपावर चर्चाच का होऊ द्यावी? हा प्रतिसाद उडवला जाणार नाही अशी अपेक्षा :-)
अ
अर्धवटराव Mon, 08/31/2015 - 06:33 नवीन
सगळी करमणुक. पुरोगामी, प्रतिगामी, अजुन कुठले कुठले गामी, मग गांधीहत्या वगैरे. फक्त आम्हाला का आरसा दाखवताय, 'त्यांना' का नाहि असे प्रश्न. विचारांची लढाई, पत्रकारांच्या बाता, मोर्चे, सर्व कसं एकदम हातात मशाल घेऊन अंधार जाळायची फॅशन आल्यागत चार दिवसांचा दशावतार. कुणा अडगळीत पडलेल्या विचारवंताची लेखणी पारजणार. कुणी तर एकदम बंदुकींनी प्रतिवाद करायल सरसावणार. तरी बरं... अजुन 'पटेल' असं कारण पुढे आणलं नाहि कुणी. सर्वात मजेदार म्हणजे निषेध व्यक्त करणे. हवेत तीर मारायचं समाधान तरी का घालवायचं. सत्य फक्त दोनच. एक निश्प्राण कलेवर. दुसरा तो पाताळयंत्री मेंदु.
प
प्यारे१ Mon, 08/31/2015 - 21:34 नवीन
या प्रतिसादामधून नेमकं काय म्हणायचंय मालक??? भाकडचर्चा नकोच असं म्हणणं मान्य. पण मग ती कुठेच् नाही व्हायची. मिपा चालायचं कसं अशानं? आमच्यासारख्या मिपानिष्ठ लोकांचं फावायचं आपलं चालायचं कसं?
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Mon, 08/31/2015 - 22:38 नवीन
विनोदी प्रतिसाद द्यायची तीव्र हुक्की आली होती... पण विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन टंकन आवरतं घेतो.
↩ प्रतिसाद: प्यारे१
य
यशोधरा Mon, 08/31/2015 - 07:05 नवीन
हा ब्लॉग वाचनात आला. दाभोळकरांबद्दल काही थोड्या फार प्रमाणात समतोल लिहिले आहे असे वाटले. नुसताच उदो उदो न करता लिहिलेले आहे, असे वाटले. http://harinarke.blogspot.in/2013/08/blog-post_20.html
म
मृत्युन्जय Mon, 08/31/2015 - 07:41 नवीन
कुलबुर्गींच्या हत्येचा निषेध. या हत्येने नक्की काय साधले हे खूनीच सांगु शकेल पण कुठल्याही व्यक्तीचा जीवनाचा हक्क हिरावुन घेणे हा सर्वोच्च पातळीवरचा गुन्हा आहे हे देखील मारेकर्‍यांना समजु नये काय? अश्या निर्घृण कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच. हे डॉ कुलबुर्गी कोण ते काही माहिती नाही. या आधी त्यांचे नावही कधी ऐकले नव्हते. गोविंद पानसर्‍यांबाबतही तेच. नरेंद्र दाभोळकर नक्कीच माहिती होते त्यांच्या अंनिसच्या कार्यावोषयी मात्र इतर दोन नावे ऐकण्यात नव्हती. त्यांचे कार्यही काही खूप व्यापक प्रमाणावर नव्हते. या हत्यांमागे त्यांच्या सार्वजनिक कार्याचीचा पार्श्वभूमी आहे काय? कारण लोक नुसतेच आरडाओरडा करताहेत की या मागे सनातनी संस्था आणि व्यक्ती आहेत. पण म्हणजे नक्की कोण कुणीच बोलत नाही. नक्की काय प्रकार आहे?
प
प्रचेतस Mon, 08/31/2015 - 07:52 नवीन
कलबुर्गी प्रसिद्ध विचारवंत, संशोधक आणि शिलालेखांत रुची असणारे होते. त्यांचे 'महाराष्ट्रातील कन्नड कोरीव लेख' हे पुस्तक मजकडे आहे. रा. चिं. ढेरे ह्यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. उपरोक्त पुस्तकातील ऋणनिर्देशांत ढेऱ्यांचे नाव त्यांनी आदराने घेतले आहे. त्यांच्या इतर कार्याविषयी किंवा वादग्रस्त उल्लेखांविषयी मला कसलीही माहिती नाही.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 08/31/2015 - 08:02 नवीन
पुस्तकाची ओळख करून द्या. डॉक्टर कलबुर्गी यांचं लेखन कसं होतं वाचुन कळेल तरी. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 08/31/2015 - 08:22 नवीन
पुस्तक अजून वाचायचे आहे. सध्या नुसतेच संग्रही आहे. पण अधिक माहिती (अनुक्रमणिका, ऋणनिर्देश, प्रस्तावना ) इकडे वाचायला मिळू शकेल.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 08/31/2015 - 08:16 नवीन
हत्येचा निषेध.आता काही विशिष्ट विचारसरणीचे लोक कलबुर्गी ह्यांचा सगळा पूर्वेतिहास खणून काढतील. ३०-४० वर्षापूर्वी त्यांचे एखादे वादग्रस्त विधान तुमच्या त्या फेसबूक वा अशा साईटींवर सारखे अधोरेखीत करतील व मग 'बघा आम्ही म्हणतच होतो.. उगीच हत्या होत नाही...." हे बिंबवायचा प्रयत्न करतील.
श
श्रीगुरुजी Mon, 08/31/2015 - 10:42 नवीन
'बघा आम्ही म्हणतच होतो.. उगीच हत्या होत नाही...." हे बिंबवायचा प्रयत्न करतील.
माईसाहेब, या वाक्यातले "हे" म्हणजे तुमचे "हे" का? तुमचे "हे" असे का बिंबवायचा प्रयत्न करतील?
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
त
तुडतुडी Mon, 08/31/2015 - 09:27 नवीन
मुरतीपुजेचा विरोध हा गुन्हा आहे ?
मूर्तीपूजा करणं आहे ? तुम्हाला मूर्तीपूजा करायची नसेल तर नका करू . पण इतरांनी करू नये म्हणून सक्ती का ? मग इस्लामी मुलतत्ववाद्यांत आणि तुमच्यात फरक काय ? हिंदू धर्मामध्ये सगुण आणि निर्गुण अश्या दोन्ही उपासना आहेत . सगुण उपासना करता करता निर्गुण उपासना करायची ताकद येते . हल्ली हिंदू धर्मातल्या प्रत्येक गोष्टीवर टीका करण्याची , हिंदू धर्माच्या नावाने बोटे मोडण्याची फ्याशनच आलीये . आणि हिंदूच जर विनाकारण आपल्याच धर्माला बदनाम करत असतील , नको त्या गोष्टी हिंदू धर्मात घुसडत असतील तर माझा त्याला विरोध आहे . दाभोलकरांनी सुधा अंधश्रद्धे करताना भान सोडलं. मी तरी ह्या हत्येचा निषेध करणार नाही .पुरोगामी म्हणजे धर्मावर वाटेल ते आरोप करणे, निंदा नालस्ती करणे किवा पूजा , उपासना करण्याला विरोध करणे असा अर्थ होतो का ? इतर धर्मांमध्ये खंडीभर अंधश्रधा भरल्यात . त्यांवर कोणी भाष्य करत नाही ?
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 08/31/2015 - 10:33 नवीन
>>>>> मी तरी ह्या हत्येचा निषेध करणार नाही. ठीक आहे. >>>>पुरोगामी म्हणजे धर्मावर वाटेल ते आरोप करणे, निंदा नालस्ती करणे किवा पूजा , उपासना करण्याला विरोध करणे असा अर्थ होतो का ? पुरोगामी म्हणजे सुधारणावादी, परिवर्तन वादी, आधुनिक विचार करणारे असे >>>>इतर धर्मांमध्ये खंडीभर अंधश्रधा भरल्यात . त्यांवर कोणी भाष्य करत नाही ? त्यावर कोणी भाष्य करत नसेल तर आपण बोला की ? -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: तुडतुडी
आ
आबा Mon, 08/31/2015 - 15:19 नवीन
"सक्ती"?! कलबुर्गींना गोळ्या घातल्या आहेत, कलबुर्गींनी देव मूर्तीपूजकांना गोळ्या घातलेल्या नाहीत
↩ प्रतिसाद: तुडतुडी
द
द-बाहुबली Mon, 08/31/2015 - 09:28 नवीन
कलबुर्गी ह्यांचा आत्म्याला शांतता लाभो. चुकिची घटना. हत्येचे समर्थन नकोच. परमेश्वरा सर्वाना सद्बुध्दी दे. :(
न
नाव आडनाव Mon, 08/31/2015 - 09:36 नवीन
+१
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
त
तुडतुडी Mon, 08/31/2015 - 09:31 नवीन
वरच्या प्रतिसादातील 'मूर्तीपूजा करणं आहे ?' हे वाक्य 'मूर्तीपूजा करणं गुन्हा आहे ?' असं वाचावं . टाईप करताना गडबड झाली
क
काळा पहाड Mon, 08/31/2015 - 10:35 नवीन
हत्येचं समर्थन नाहीच. ते कुणी करूही नये. त्याचा जितका निषेध करावा तितका कमीच. पण "जर" या हत्या तथाकथितरित्या हिंदुत्व वाद्यांनी केल्या असतील तर ही दुर्दैवी आणि त्यापेक्षा जास्त करूण घटना आहे. जर ती मूर्तीवर लघुशंका करण्याबद्दल गोष्ट खरी असेल तर या लोकांनी (म्हणजे तथाकथितरित्या हिंदुत्व विरोधी लेखक/कार्यकर्त्यांनी) अशा भडकावू गोष्टी का केल्या/बोलल्या असाव्यात याबद्दल माझं पृथक्करण असं: त्यांचा अंदाज चुकला. जगातलया सगळ्यात सहिष्णू धर्मावर टीका करून मोठं होता आलं पण जसे माथेफिरू इतर धर्मात असतात तसेच ते हिंदू धर्मात सुद्धा असतील/पुढे असू शकतील असं त्यांना वाटलंच नाही. मुस्लीम धर्मातल्या प्रथांवर टीका करून हुतात्मा होण्याची शक्यता बरीच जास्त. मग अशा धर्मावर टीका करा ज्याच्यामध्ये अशा प्रवृत्ती नसतील किंवा फारच कमी प्रमाणात असतील, फार फार तर हे लोक निषेध करतील आणि गप्प बसतील; तेव्हा करा टीका आणि नाव कमवा असा सरळ हिशेब असावा. तो गेली बरीच वर्षं खराही असावा. ही बहुधा एक कॅलक्युलेटेड रिस्क असावी जी जिवावर बेतली असावी.
अ
अजया Mon, 08/31/2015 - 10:38 नवीन
कलबुर्गी यांच्या हत्त्येचा निषेध.केवळ विचारसरणी विरोधातून खून होणे हे समाजाच्या अवनितीचं लक्षण नाही का? कोणीही आपल्या धारणा ठेवु शकत नाही का?
म
माहितगार Mon, 08/31/2015 - 11:02 नवीन
मुरतीपुजेचा विरोध हा गुन्हा आहे ? ~ इति दा. द. चा प्रतिसाद
मूर्तीपूजा करणं गुन्हा आहे ? ~ इति तुडतुडी यांचे प्रतिसाद
एकमेकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणे हे किमान नैतीक दृष्ट्या निंदनीय आहेच आहे. एकमेकांकडे, इकडे तिकडे बोटे दाखवून कुणाच्याही कोणत्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपीचे कोणत्याही बाजूच्या निगेटीव्ह अ‍ॅटीट्यूडचे समर्थन होत नाही. दुसर्‍याने ताळतंत्र सोडले म्हणुन राग येऊ शकतो हे खरे तरीपण एकाने ताळतंत्र सोडले म्हणून मी ताळतंत्र सोडतो हे फलदायी उत्तर नव्हे. रामकृष्ण परमहंसांनी मुर्तीपुजेच्या विरोधक विवेकानंदांवर गोळी घातली असती तर मुर्तीपुजेचे हिंदू धर्माचे समर्थक विवेकानंदांचा हिंदू धर्मीयांना लाभ झाला असता का ? विचारांचा लढा विचारांनीच लढला जाऊ शकतो लघुशंका करून अथवा लघुशंका करणार्‍यास गोळी घालून नव्हे. मुर्तीपुजा करणार्‍या अथवा मुर्तीवर लघुशंका करणे आणि मुलतत्ववाद्यांनी मुर्तीभंजन करणे यात खरेच फरक नाही, तसेच आपल्या अबकड प्रतिमांचा अपमान झाला म्हणून हिंसक कृत्ये करणार्‍या मुलतत्ववाद्यात मग ते या समुहाचे असोत का त्या समुहाचे असोत त्यात फरक नाही. त्याने केले म्हणून माझे बरोबर हे सुयोग्य उत्तर नव्हे. हिंदूधर्मातील वैचारीक परंपरांचे वैविध्य विचारांचा विचारांनी सामना करणार्‍यामुंळे तग धरून असावे आदि शंकराचार्य विवेकानंद हि त्याची उदाहरणे आहेत, इतरांच्या संकुचीतततेमुळे अपरिपक्वपणामुळे मी मला संकुचीत करून घेणे मी मला स्वतःला अपरिपक्व ठेवणे यामुळे शत्रुपक्षाचे काय होईल माहित नाही तुमच्या स्वतःच्या वैविध्यास तडे जाणार नाहीत, तुमच्या स्वतःच्या वैचारीक स्वातंत्र्याला, तुमच्या स्वतंच्या आदर्शाला तडे जाणार नाहीत याची काळजी घेतली जाणेही तेवढेच महत्वाचे असावे. दुसर्‍याने कोळसा हातात घेऊन उगाळला म्हणून तोच आपणही आपल्या हातात घेऊन उगाळला तर दुसर्‍याचा चेहरा काळा करायच्या नादात आपले हातही काळे होण्याचा धोका असतो. असो.
द
द-बाहुबली Mon, 08/31/2015 - 12:21 नवीन
टिका/स्तुती करायचा मुलभुत अधिकार घटनेने दिला आहेच परंतु श्रध्देवर टिका करणे व त्याची विटंबना करणे यातिल फरक समजु नये ही नक्किच कोणत्याही विचारवंतासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. तरीही ते घडले असेल वा समर्थन दिले जात असेल तर... :(
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Mon, 08/31/2015 - 12:38 नवीन
परंतु श्रध्देवर टिका करणे व त्याची विटंबना करणे यातिल फरक समजु नये ही नक्किच कोणत्याही विचारवंतासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. तरीही ते घडले असेल वा समर्थन दिले जात असेल तर... :(
तथाकथीत विचारवंताने विवेक सोडावा हे त्याच्या स्वतःसाठी लाजीरवाणे आहेच यात संशय नाही. पण विचारवंताच्या विचाराचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य दुसर्‍या विचारवंतातच असते. विचारांचा मुकाबला शस्त्राने होऊ शकत नाही. नि:शस्त्र विचारवंत मारलातर विचार शिल्लक राहतोच त्या शिवाय त्याचा हुतात्मा होऊन त्याच्या विचारांना शब्द प्रामाण्य मिळण्याची शक्यता नंतरच्या असंख्य पिढ्यांना भोगावी लागू शकते हा धोका अजून मोठा असतो.
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
द
द-बाहुबली Mon, 08/31/2015 - 12:50 नवीन
विचारांचा विचारांनीच प्रतिवाद केला जातोय म्हणता भिड चेपुन चुकुन एखादा चुकीच्या कृतीच्या रिंगणात उतरला जात असेल तर त्याचा क्लेश होतोच ना... आपल्या मताशी सहमत आहेच पण कृतीचा विचार करता उदाहरण म्हणून शिवपिंडावर दुध, मध, उसाचा रस, पाणि वगैरे वगैरेनी अभिषेक केला तर अनुभव चांगलेच येतात ही श्रध्दा आहे. याची एखाद्याने खिल्ली उडवणे वेगळे अन विटंबना करणे हे वेगळे नाही का ? मग याचा प्रतिवाद आपण वैचारीक पातळीवर प्रत्यक्ष जिवनात कसा करणार ?
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Mon, 08/31/2015 - 13:57 नवीन
भिड चेपुन चुकुन एखादा चुकीच्या कृतीच्या रिंगणात उतरला जात असेल तर त्याचा क्लेश होतोच ना...
इथे खरे काम चुकीची कृती होताना थांबवणे शक्य असेल तर थांबवावे. घडून गेलेल्या कोणत्याही प्रसंगाबद्दल केवळ क्लेश करून घेत राहणे एक अनुत्पादक आणि फार काही झालेच तर स्वनुकसान घडवणारी कृती ठरू शकते. होऊन गेलल्या गोष्टीवरून द्वेष आणि शत्रुबुद्धी टाळाव्यात हे सांगणे सोपे प्रत्यक्षात कठीण आहे पण तो सर्वात उत्तम मार्ग असतो. (खर म्हणजे हे सांगतोय पण प्रामाणिकपणे मलाही जमत अस नाही पण कालच महाभारतात वसिष्ठांबद्दलच अत्यंत क्लेशदायी परिस्थितीतील उदाहरण वाचत होतो त्यावरून आठवलं आणि लिहिलं)
याची एखाद्याने खिल्ली उडवणे वेगळे अन विटंबना करणे हे वेगळे नाही का ? मग याचा प्रतिवाद आपण वैचारीक पातळीवर प्रत्यक्ष जिवनात कसा करणार ?
१) इतरांशी प्रतिवाद करण्यापुर्वी पहिल युद्ध स्वत:च्या मनाशी जिंकाव लागत ते हे की जी गोष्ट माझ्यासाठी पवित्र आहे ती पवित्र आहे त्याची विटंबना केल्यासारखे कुणास वाटत असेल तरी माझ्या मनातली पावित्र्याची भावना अक्षुण्ण आहे माझ्या मनातल्या प्रतिक पावित्र्याची विटंबना होऊच शकत नाही. २) तुमच्या विटंबना प्रयत्नांनी आमच्या मनातील भावनेस ठेच पोहोचवण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. न ही माझे विचार बदलले आहे. काही झालेच असेल तर त्यामुळे इतर सश्रद्ध लोकांची मने दुखावली आहेत. आणि मने दुखावून विचार परिवर्तन होत नाही ह्या कडे निर्देश करणे. आणि निषेध व्यक्त करणे या सर्वसामान्य व्यक्तीसाठी साध्या सोप्या गोष्टी आहेत. ३) विचारांचा प्रतिवाद करणार्‍या दुसर्‍या बाजुच्या खर्‍या विचारवंतांना वैचारीक जुळवाजुळव करण्यासाठी वेळ लागतच असतो. दुसरे तर त्यांच्या प्रतिक्रीया संयत असण्याचिच शक्यता अधिक असते. संयत प्रतिक्रीया वस्तुतः अधीक प्रभावी असू शकतात हे भावनीक उद्रेकाच्या प्रभावा खालील लोकांना बर्‍याचदा लक्षात येत नाही, त्यामुळे भावनांच्या उद्रेकात समतोल संयत पण प्रभावी प्रतिक्रीया मागे पडण्याचा संभव असतो. ज्यांचा भावनिक उद्रेक झाला आहे त्यांचा भावनांचा उद्रेक प्रतिपक्षास फारतर जबरदस्तीने शांत राहण्यास लावू शकतो प्रतिपक्षाचे विचार मूळातून बदलू शकत नाही. प्रतिपक्षाच्या विचारांना मुळातून आव्हान देण्याचे सामर्थ्य संयत प्रतिवादातच असते. ४) खरेतर कर्मठ लोक आपल्यापेक्षा वेगळ्या विचाराच्या व्यक्तीला आपल्या बाजूचे समर्थन करण्यास मन वळवू शकत नाहीत असे नाही. दोन मोठी उदाहरणे म्हणजे जीना आणि सावरकर दोघेही मूलतः कर्मठ नव्हते पण कर्मठ पक्षांची बाजू दोघांनीही त्यांच्या त्यांच्या पक्षाकडून मूळ कर्मठ लोकांपेक्षा अधिक सशक्तपणे उचलून दाखवली. (ते बरोबर होते का चूक हा येथे मुद्दा नाही) मुद्दा हा आहे की जी डिप्लोमसी एकटे विवेकानंद करू शकतात तेवढा प्रभाव तुम्ही हजार अण्वस्त्रांनीही तयार करू शकाल का नाही हे माहित नसते. तुम्ही तुमच्या पक्षा बद्दल कितीही कर्मठ असा तेवढे सर्व करावे ज्यामुळे तुमचे जेवढे विरोधक तुमच्याकडे वळवता येतील तेवढे वळवावेत व किमान पक्षी असे काहीही करू नये की ज्याने निष्पक्ष लोकांनी बाजू घेतली नाही तरी आपल्यापासून दूर जातील असेही वर्तन होऊ नये. कुठल्यातरी बालमित्राच्या वडलांनी एक एपीजे अब्दुल कलाम घडवला. अशी माणसे घडवण्या आणि जोडण्यासाठी आपला एक किमान स्तर जपावा लागतो. तो कोणत्याही परिस्थितीत जपला गेला पाहीजे. ५) भावनेच्या उद्रेकातून प्रत्येकाला जबरदस्तीने चूप करण्यातला अजून एक मोठा धोका, संयत संभाषण करणारा कदाचित तुमची बाजू घेणारा असला तरी विरोधक वाटेल आणि तुम्ही एका समर्थ समर्थकाला पाहता पाहता गमवून बसाल. ६) ब्राह्मण हत्याकरू नये याचा अर्थ जातीयवादी घेतला नाही विचारवंताची हत्या करू नये असा घेतला तर त्यात तथ्य आहे. विटंबना केलीतर हत्येच समर्थन करणार्‍यातले काही खिल्ली उडवणार्‍याच्या हत्येच समर्थन करतात त्यातीलच काही साध्या सुध्या टिकेलाही दडपण्याच समर्थन करतात. विटंबना, खिल्ली, साधी टिका, उपरोध या गोष्टी खूपशा प्रासंगिक आणि सब्जेक्टीव्ह असू शकतात. आपण गंगेच्या पाण्याने अभिषेकाचे म्हणालात तेव्हा तुमची भावना गंगेच्या पाण्याबाबत वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत असू शकते. लघूशंकेचेच उदाहरण घ्यायचे झालेतर गाईची लघूशंका पवित्र मानतात बर्‍याच गोष्टी आपल्या मानण्यावर असतात त्याबद्दल लोक काहीही म्हणाले आणि तुमची भावना गंगोदकाबद्दल आणि पंचगव्यांबद्दल पावित्र्याची असेल तर लोकांच्या टिका, खिल्ली, विटंबना कशानेही डगमगण्यासारखे काय आहे. उलट तुम्ही डगमगला की समोरच्याचा उद्देश साध्य झाल्यासारखे होते. सेंसॉरींग स्लीपरी स्लोप आहे. आणि म्हणून कुणी कितीही कर्णकटू बोलले तरीही सेंसॉरींगचा मोह होता होईतो टाळला पाहीजे. असे वाटते असो.
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
ब
बहिरुपी Mon, 08/31/2015 - 15:46 नवीन
असेच म्हणतो. शब्दा-शब्दाशी सहमत.
↩ प्रतिसाद: माहितगार
प
पैसा Mon, 08/31/2015 - 11:14 नवीन
हत्येचा तीव्र निषेध. एखाद्याच्या चितेवर पोळी भाजणे म्हणजे काय हे बघायला मिळते आहे. मात्र निव्वळ विचाराला विरोध म्हणून हत्या आताच्या काळात भारतात होईल हे खरे वाटत नाही. सुदैवाने आपल्याकडे इसीस किंवा तसले कोणी नाही. या अशा हत्यांच्या मागे दुसरीच काही कारणे असावीत जी कधीच आपल्यासमोर येणार नाहीत. ईश्वर मृतात्म्यास शांति देवो.
म
माहितगार Mon, 08/31/2015 - 11:28 नवीन
सुदैवाने आपल्याकडे इसीस किंवा तसले कोणी नाही. या अशा हत्यांच्या मागे दुसरीच काही कारणे असावीत जी कधीच आपल्यासमोर येणार नाहीत.
गेल्या तीनचार वर्षातील विचारवंतांच्या हत्यांचा अभ्यास केला तर वयाने साधारणतः सत्तरी किंवा अगदी ऐंशीच्या पलिकडची मंडळी आहेत. मिडीयाने किती आवाज केला तरीही चार सहा लोकांच्या पलिकडे त्यांना समर्थन प्राप्त नसावे. अगदी महात्मा गांधीसारखी आहेत की त्यांच्या शब्दावर भारत हलावा, असेही नाही. गाडगे बाबा आहेत म्हणून शेगावला जाणारे नाहीत असे नाही, वस्तुतः बहुसंख्य समाज दोन्हीकडे डोके टेकतो :) सॉफ्ट टार्गॅट्स हेरून उडवायची आणि भारतीयात आपापसातील कलह माजवायचा शत्रुदेशांचा उद्देश असेल तर तो आपण आपली डोकी गरम करुन घेतल्याने शत्रुदेशांचा उद्देश सफल व्हावा असे देव करो होऊ नये.
↩ प्रतिसाद: पैसा
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 08/31/2015 - 12:39 नवीन
या अशा हत्यांच्या मागे दुसरीच काही कारणे असावीत जी कधीच आपल्यासमोर येणार नाहीत.
कशावरून काढलेला निष्कर्ष ? की प्रकरण अंगावर शेकणार असे दिसले की मुद्दा भलतीकडेच वळवायचा? कलबुर्गी कुणी गुप्तहेर नव्हते की आंतराष्ट्रीय गुन्हेगारही नव्हते.
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Mon, 08/31/2015 - 12:47 नवीन
पै तैंच्या वाक्याचा मतितार्थ त्याच नेमक्या सांगू शकतील. या ८० वर्षाच्या म्हातार्‍यांना मारून कोणत्याही सुज्ञास काही मिळावयाचे नाही. (आपल्याकडे काय कुठेही) राजकारण कोणत्याही स्तरास जाऊ शकते त्यामुळे शंकांना नेहमी वाव असतोच, जो पर्यंत पुरावे नाही तो पर्यंत एकमेकांच्या वैचारीक विरोधकांकडे खवचट अंगूली निर्देशांचे अधिकतम मुल्य केवळ खवचट अंगूली निर्देश एवढेच शिल्लक राहते, व्यक्तीशः मी तरी तसे करणे टाळतो.
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
प
पैसा Mon, 08/31/2015 - 14:40 नवीन
माई, तोंड सांभाळा. मी खून केलाय असा तुमच्या प्रतिक्रियेचा अर्थ होतोय. तुम्हाला खुन्याची नीट ओळख आहे वाटते. कृपया पोलिसांशी सहकार्य करा.
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा