Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डॉ. कलबुर्गी..यांची हत्या..

स
संजय पाटिल
Sun, 08/30/2015 - 11:37
🗣 227 प्रतिसाद
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&uact=8&ved=0CB4QqQIwAGoVChMIiPfbxL_QxwIVjG2OCh3btQKk&url=http%3A%2F%2Fwww.ibtimes.co.in%2Fkannada-scholar-dr-mm-kalburgi-shot-dead-644723&ei=Q83iVcjJLYzbuQTb64qgCg&usg=AFQjCNE_rncuIRsWQGjkLVr9yMCMN4tB8w डॉ. नरेन्द्र दाभोळ्कर, कॉ. गोविन्द पानसरे आणि आता डॉ. कलबुर्गी यांना गोळ्या झाडुन ठार मारण्यात आले. नेमके काय चाललय?

प्रतिक्रिया द्या
41776 वाचन

💬 प्रतिसाद (227)
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 08/31/2015 - 16:19 नवीन
बाई ग पैसे, 'विशिष्ट विचारसरंणीच्या लोकांबद्दल तसे म्हंटले आहे'. वेड पांघरायचा स्वभाव कमी करावास.
या ८० वर्षाच्या म्हातार्‍यांना मारून कोणत्याही सुज्ञास काही मिळावयाचे नाही.
बरोब्बर बोललास रे माहितगारा.एम.एफ.हुसेन ह्यांना धमक्या देणारे बजरंगी दलवाले सुज्ञ नव्हतेच.
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 08/31/2015 - 16:57 नवीन
ज्याना सांगायचय त्यांना थेट सांगा. डॉ नरेंद्र दाभोलकर, सुनंदा पुष्कर, सरबजीत सिंग, कॅ सौरभ कालिया अशा अनेकांच्या खुन्याना फाशीवर लटकलेले बघायची तीव्र इच्छा आहे. ते कधीच होणार नाही कारण त्या हत्यांचा तपास पुरा होणार नाही. तुमच्यासारखे चष्मे घातलेले सगळेच लोक, मग तो चष्मा कोणत्याही रंगाचा असो, एकसारखेच. तुम्हाला कोणालाच हत्यारे समोर यायला नको आहेत. मग तुमची दुकाने बंद होतील ना सगळी!
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ब
बोका-ए-आझम Tue, 09/01/2015 - 05:21 नवीन
नसावेत असं म्हणालात तर बरोबर आहे. डायरेक्ट 'नव्हते?' काल अजितभाऊ डोवल अाले होते वाटतं ' ह्यांना ' भेटायला ?
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
प
प्रसाद गोडबोले Mon, 08/31/2015 - 12:07 नवीन
|| क्षात्रधर्म || जयास जीवाचे वाटे भये | तेणे क्षात्रधर्म करूं नये | कांहितरी करोनि उपाये | पोट भरावे || मारितां मारितां मरावें | तेणे गतीस पावावें | फिरोनि येता भोगावें | महद्भाग्य || जैसा भांड्याचा गलोला | निर्भय भारामध्ये पडिला | तैसा क्षत्री रिचवीला | परसैन्यामध्ये || नि:शंकपणें भारफुटती | परवीरांचे तकवे तुटती | जैसा बळिया घालून घेती | भैरी उठता || ऐसे अवघेच उठतां | परदळाची कोणी चिंता | हरणे लोळवी चित्ता | देखत जैसा || मर्दे तकवा सोंडूं नये | म्हणजे प्राप्त होतो जये | कार्य प्रसंग समये | वोळखावा || देवद्रोही तितुके कुत्ते | मारूनी घालावे परते | देवदास पावती फत्ते | यदर्थी संशयो नाही || देव मस्तकी धरावा | अवघा हलकल्लोळ करावा | मुलुख बडवावा का बुडवावा | धर्मसंस्थापनेसाठी || - समर्थ रामदास
म
माहितगार Mon, 08/31/2015 - 15:48 नवीन
समर्थ साहित्य अभ्यासकांपैकी कुणी याचा अर्थ सांगून, समर्थ साहित्याच्या दृष्टीकोणातून प्रासंगिकता स्पष्ट करू शकेल का ?
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
माहितगार Mon, 08/31/2015 - 15:56 नवीन
ट्रंसलीटरल डॉट ऑर्गवर तपासल्यावर वर उधृत केलेले काव्य पूर्ण आहे का याची सांशकता वाटते.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 08/31/2015 - 16:07 नवीन
बरे झाले आपण पुर्ण संदर्भ दिलात , त्या साईट वरुन काही उधृतच करता येत नाही राव ... असो , आता तुम्ही च सांगा की अर्धवट उधृत केल्याने काव्यातील अर्थ बदलत आहे का ?
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Mon, 08/31/2015 - 17:04 नवीन
समर्थ साहित्य अभ्यासकांपैकी कुणी याचा अर्थ सांगून, समर्थ साहित्याच्या दृष्टीकोणातून प्रासंगिकता स्पष्ट करू शकेल का ?
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
व
विकास Mon, 08/31/2015 - 18:37 नवीन
कुठल्याही खुनाचे समर्थन होऊ शकत नाही. आणि म्हणूनच डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येचे, त्यांच्या विचारधारेमुळे समर्थन करणे योग्य ठरणार नाही. हत्येकर्‍यास पकडून फासावर चढवले पाहीजे. (अगदी तथाकथीत लिबरलांना फाशी ही मानवतेमुळे मान्य नसली तरी) समर्थ साहित्याच्या दृष्टीकोणातून प्रासंगिकता स्पष्ट करू शकेल का ? मी काही समर्थक अभ्यासक नाही. पण समर्थांनी ज्या काळात आणि ज्या परीस्थितीला अनुसरून लिहीले आहे त्याचा विचार करता ते त्या काळासाठी योग्यच होते. त्या वेळेस देखील प्रत्येकाने त्याचा शब्दार्थ घेतला असावा असे वाटत नाही. नाहीतर शिवाजीला तीन तपे लढावे लागले नसते, असे मला वाटते. असो. नाहीतर समर्थांनी, "स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे, पिटावे रिपूला, रणी वा मरावे..." असे देखील म्हणले आहे. मग आपल्यातले कितीजण मिपावरचे टंकणे सोडून सीमेवर सैनिकांना (साधी) मदत करायला जाणार आहेत? तेंव्हा याचा संदर्भच घेयचा असेल तर आत्ताच्या काळाला अनुसरून बुद्धीवादाने घ्यावा. समोरच्याचे पटत नसेल तर त्याला बुद्धीवादाने सामोरे जावे. नाहीतर आत्ताचा कायदा न मानता (परदेशातील गतकाळातील) माओचा कायदा प्रमाण मानत हिंसाचार करणार्‍या कम्युनिस्टांमधे, त्यांना पाठींबा देणार्‍या डाव्या (अ)विचारवंतांमधे आणि इतरांमधे काय फरक राहीला?
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Mon, 08/31/2015 - 19:35 नवीन
सहमत विकास, समर्थ आणि तुकाराम यांनी एकमेकांना देवद्रोही जाहीर करून फतवे काढले असते तर काय झाले असते ? किंवा सावरकरांची विज्ञाननिष्ठा आणि त्यांनी अस्पृश्यांचा करवलेला मंदिर प्रवेश (त्या काळातल्या सनातन्यांच्या दृष्टीकोणातून विटंबना होती- अर्थात त्या विवाद्य कन्नड व्यक्तींच्या विटंबनेशी तुलना करण्याचा हेतु नाही- विटंबना हा शब्द सब्जेक्टीव्ह ठरू शकतो हे लक्षात आणून द्यावयाचे आहे) न स्विकारता विटंबना म्हणून त्यांना देवद्रोही जाहीर केले असते तर काय झाले असते ? शत्रुची नव्हे तर स्वतःचेच विचारवंत शत्रु ठरून एकमेकांच्या जीवावर उठले नसते का ?
↩ प्रतिसाद: विकास
अ
अजया Tue, 09/01/2015 - 04:14 नवीन
विकास यांचा प्रतिसाद आवडला. सहमत आहे. एका जिवंत व्यक्तीला तिचा विचार तुम्हाला आवडत नाही म्हणून मारण्याचे समर्थन कोणत्याही प्रकारे करणे हीच एक विकृती वाटते. कलबुर्गी कोणी अतिरेकी दहशतवादी नव्हते.विचारांशी लढाई विचारानी व्हावी.कोणाची हत्या करुन विचार मरणार आहे का?
↩ प्रतिसाद: विकास
अ
अजया Mon, 08/31/2015 - 13:14 नवीन
काळ कोणता संदर्भ कोणता.एखाद्याच्या विचारसरणीमुळे झालेल्या हत्येचं समर्थन कसे होऊ शकते? ही विचारांची दडपशाही नाही का?
म
माहितगार Mon, 08/31/2015 - 14:04 नवीन
देव कशाचा भूकेला असतो भावांचा कि आततायी भावनीक उद्रेकाचा ते केवळ भक्तांना ठाऊक आणि देवाला ठाऊक :)
↩ प्रतिसाद: अजया
प
प्यारे१ Mon, 08/31/2015 - 22:50 नवीन
देव कशाला कशाचा भुकेला असतोय साहेब? तो नित्यतृप्त असतो. आपणच आपलं ध्येय साध्य करून घेण्यासाठी त्याला भावाचा भुकेला ठरवून टाकतो. यात मुख्य मुद्दे नेहमीच स्किप केले जातात. आपल्या सोयीच्या गोष्टी करून केल्याचं समाधान हे कर्मफल तिथल्या तिथं मिळाल्यावर नंतर पुन्हा देवाला वाहन्यासाठी आपल्याकडं काही शिल्लक नसतं. मग देव म्हणतो बाबा रे तुला जसं हवं तसं तू केलंस मला हवं ते नाही. माझा तुझा संबंध काय? कुठला भक्त प्रिय आहे हे माहीत करून घेण्यासाठी भगवद् गीता हे अत्यंत उत्तम मार्गदर्शक पुस्तक आहे. यादी आहे. विशेषत: १२ वा अध्याय मुळापासून वाचावा.
↩ प्रतिसाद: माहितगार
प
प्रसाद गोडबोले Mon, 08/31/2015 - 15:37 नवीन
ही विचारांची दडपशाही नाही का?
हा हा हा ... हे पहा असे आहे की "त्यांन्नी" जगाची विभागणी दोनच गटात केलेली आहे .... बुतशिकन आणि बुतपरस्त ! मुर्तीपुजक आणि मुर्तीभंजक ! आता तुम्हीच सांगा : हे कुलबर्गी का कोण ते कोणत्या गृप मधले होते ? ह्या दोन गटातील खरे दडपशहा कोण ? खरे स्वमतांध कोण ? मग पुढील काथ्या कुटु . _____
↩ प्रतिसाद: अजया
प
प्रसाद गोडबोले Mon, 08/31/2015 - 15:59 नवीन
आणि हो , महत्वाचा डिस्क्लेमर राहिलाच - आमच्या धर्मातही मुर्तीपुजा मानत नाहीत , रादर , देव बिव असली काही सुपर नॅचरल पावर शक्ती बिक्तीही मानत नाही ... मी फक्त तर्काच्या मुद्द्यावर विचारत आहे की: एखाद्याला सतत हिडीस फिडीस करत रहायची , सतत तु कसा वाईट , तु कसा हीन , तु कसा फडतुस असे दाखवत रहायचं , सतत त्याची टिंगल करत रहायची , अन एके दिवशी त्यानी उद्वेगाने एखादा सणसणीत दगड भिरकावला तर त्याचाच निषेध करायचा ह्या मागचे अजब लॉजिक काय ते जाणुन घ्यायचा प्रयत्न करत आहे ... ही घटना म्हणजे सतत हिणावले गेलेल्या कोण्यातरी 'फ्यॅन्ड्री' ने " त्या सिस्टीमवर " भिरकावलेला एक दगड आहे असा विचार का बरे करुन पहात नाही कोणी ???????
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ब
बॅटमॅन Mon, 08/31/2015 - 16:29 नवीन
मुळात तो जो कै दगड भिरकावलाय तो त्या तथाकथित चिडलेल्यांपैकीच मारलाय कशावरून? पुरेसा विदा नसतानाही कानफाट्या म्हणून बदनाम झालेल्यांना झोडले की झाले. बाकी आर्य सनातन वैदिक धर्मात वेदप्रामाण्य असेल तर देवाचे अस्तित्व न मानणे ही तर्कविसंगती नाही काय? की तेवढ्यापुरती अ‍ॅक्झिअम्स ट्वीक केलेली आहेत? ;)
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 08/31/2015 - 16:50 नवीन
मुळात तो जो कै दगड भिरकावलाय तो त्या तथाकथित चिडलेल्यांपैकीच मारलाय कशावरून? पुरेसा विदा नसतानाही कानफाट्या म्हणून बदनाम झालेल्यांना झोडले की झाले.
ओ ब्यॅटु अण्णा तुम्हाला निवडणुकीत उभे रहायचे नसेल तर नका राहु पण इतरांच्या हातातुन मुद्दे तरी हिरावुन घेवु नका =))
बाकी आर्य सनातन वैदिक धर्मात वेदप्रामाण्य असेल तर देवाचे अस्तित्व न मानणे ही तर्कविसंगती नाही काय? की तेवढ्यापुरती अ‍ॅक्झिअम्स ट्वीक केलेली आहेत? ;)
अ‍ॅक्झिअम्स असं काही नसतं , अ‍ॅक्झिअम्स हा भास आहे !
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 08/31/2015 - 16:51 नवीन
खी खी खी ;)
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
न
नाखु Tue, 09/01/2015 - 05:16 नवीन
खटला उभा राहच्या आधीच तपासातल्या विसंगती दाखवायची फार जुनी आणी वाईट खोड आहे. त्यामुळे खटल्याचा इस्कोट होऊन (मुद्याच भुस्काट झाल्याने) तो कुणीच चाल्वायला घेत नाही! पब्लीकचा हिरमोड होतो तो वेगळा आणि चिनार्याचे पॉप्कॉर्न खपेनात आताशा !!! व्हरांड्यातला बघ्या नाखुस.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्यारे१ Mon, 08/31/2015 - 16:31 नवीन
>>>>> एखाद्याला सतत हिडीस फिडीस करत रहायची , सतत तु कसा वाईट , तु कसा हीन , तु कसा फडतुस असे दाखवत रहायचं , सतत त्याची टिंगल करत रहायची , अन एके दिवशी त्यानी उद्वेगाने एखादा सणसणीत दगड भिरकावला तर त्याचाच निषेध करायचा ह्या मागचे अजब लॉजिक काय ते जाणुन घ्यायचा प्रयत्न करत आहे ... पेन त्याचं, कागद त्याचा, विचार त्याचे असं सगळं 'त्या' चं असल्यावर त्याला जे काही म्हणायचं ते म्हणू दे की. आपण वाईट, हीन, फडतूस नाही तर आपल्याला शष्प फरक पडू नये. स्वतःचा काही विचार नसला की दुसर्‍याची टिंगल केली जाते. बाकी सणसणीत दगड वगैरे शक्यता फार फार कमी वाटतात. जरी तसं होण्याची अथवा करण्याची इच्छा आपल्याला असली तरी कट्टरपणं नि आंधळेपणानं एखाद्या व्यक्तीला मारण्याचा आततायीपणा केला जाणं अवघड आहे. पैसानं म्हटल्याप्रमाणं खुनामागचे हेतू उघड होणं अवघड वाटत आहे. विचारांमधली विविधता आणि विचारधारांमधले मतभेद सामावून घेत भारतीय/वैदिक/हिन्दू जीवनपद्धती आजतागायत वर्धिष्णू (सकसतेनं, संख्येनं नव्हे) आलेली आहे. त्यामध्ये मूर्तीपूजा असली नसली तरी फरक पडत नाही. हिंदुत्ववादी लोकांनी हा खून केला असण्याची शक्यता कमी वाटते आहे. केला असल्यास हिन्दू धर्माला बट्टा नाही लागत अथवा नसल्यास सुद्धा छाती फुलण्याची गरज नाही.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 08/31/2015 - 16:48 नवीन
बाकी संपुर्ण प्रतिसादाला संपुर्ण अनुमोदन फक्त एक शंका :
विचारांमधली विविधता आणि विचारधारांमधले मतभेद सामावून घेत भारतीय/वैदिक/हिन्दू जीवनपद्धती आजतागायत वर्धिष्णू (सकसतेनं, संख्येनं नव्हे) आलेली आहे.
मुर्तीभंजक आयसिसला( आणि तसेच विचार बाळगणार्‍या ह्या कुलबुर्गींन्ना ) आणि त्यांच्यातील मतभेदांना आपण कसे समजावुन घेणार आहोत ह्याची मला फारच क्युरोसिटी लागुन राहिलिये भाऊ !
↩ प्रतिसाद: प्यारे१
ब
बॅटमॅन Mon, 08/31/2015 - 16:51 नवीन
अगदी अगदी!!!!! आयसिस हे हिमनगाचे टोक आहे बायदवे.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 08/31/2015 - 17:29 नवीन
आयसिस हे हिमनगाचे टोक आहे
आयसिस डेंजरस आहे की दुसर्‍याचे उपासना स्वातंत्र्यच नाकारण्याची आणि स्वतःचेच घोडे दामटण्याची (पक्षी: स्वमतांध दांभिकता) मनोवृत्ती जास्त डेंजरस आहे ?
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्यारे१ Mon, 08/31/2015 - 17:01 नवीन
मतभेद माणसांमाणसांमध्ये होतात रे! एका बाजूला माणूस आणि दुसर्‍या बाजूला पशू / हैवान यांच्यामध्ये कसले मतभेद? येनकेनप्रकारेण ठोकणे हेच उत्तर. ते समजावण्याच्या पलिकडे असतात. आततायी असतात. साम दाम दंड भेद सुद्धा याच जीवनपद्धतीचा भाग आहे. फक्त आपण कायदा हातात घेऊ नये. भारतीय दंडविधानावर विश्वास ठेवणं हे प्राथमिक कर्तव्य आहे. आपण केजरी/पटेल/दाऊद वगैरे नाही. बनू नये असं वैयक्तिकरित्या वाटतं. अन्यथा आधी व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न करायला हवेत.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 08/31/2015 - 17:20 नवीन
अगदी अनुमोदन प्यारे ... तुका म्हणे विंचु सर्प नारायण, वंदावे दुरोन शिवो नये - संत तुकाराम. !! पण हेही लक्षात ठेवले पाहिजे की विंचु सतत डंख मारत असेल तर त्याला वारंवार जीवनदान द्यायला आपण काही नाथ नाही , आपल्याला विंचु डंख मारत असेल तर त्याला वहाणेचा प्रसाद दिलाच पाहिजे !! मी फक्त विंचवाला मारले तर दंगा करणार्‍या पीटा ( प्रीव्हेन्शन ऑफ इथिकल टीटमेन्ट ऑफ अ‍ॅनिम्ल्स) वाल्या लोकांच्या थयथयाटा मागील विचार जाणुन घेवु इच्छित आहे !
साम दाम दंड भेद सुद्धा याच जीवनपद्धतीचा भाग आहे.
ह्म्म .... भेद म्हणजे काय ?
फक्त आपण कायदा हातात घेऊ नये. भारतीय दंडविधानावर विश्वास ठेवणं हे प्राथमिक कर्तव्य आहे.
ह्म्म , मी इतरत्र म्हणल्या प्रमाणे एक सर्व सामान्य पापभीरु अर्थात क्युतिया माणुस ह्या पेक्षा दुसरे काय करु शकतो ?!
अन्यथा आधी व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न करायला हवेत.
अन्य देशाचा पी . आर . मिळवण्याचे आमचे जोरदार प्रयत्न चालु आहेत हे ह्या निमित्ताने नम्य्द करु इच्छितो =))
↩ प्रतिसाद: प्यारे१
स
संजय पाटिल Mon, 08/31/2015 - 17:05 नवीन
ईसीस ने कुठलि मुर्ती भंग केली? तालिबान्यानी केलेली आठवते ...
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
सुबोध खरे Mon, 08/31/2015 - 18:07 नवीन
isis destroying artifacts हे गुगलून पहा. शेकडो विदा मिळतील.
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
स
संजय पाटिल Tue, 09/01/2015 - 06:57 नवीन
बघितलं. समजलं, धन्यवाद!!
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बोका-ए-आझम Tue, 09/01/2015 - 05:36 नवीन
नाझी प्रचारयंत्रणा प्रमुख जोसेफ गोबेल्सची Big Lie या नावाने प्रसिद्ध असलेली एक थिअरी आहे. कुठलीही १००% खोटी गोष्ट सतत लोकांच्या कानांवर पडेल अशी व्यवस्था केली, सतत ती हॅमर केली की लोकांचा त्यावर विश्वास बसतो.आपण धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी आहोत हे जे लोक छाती पिटून सांगतात, मग ते दिल्लीत असो,महाराष्ट्रात असो किंवा मिपासारख्या संस्थळावर असो - लोकांचा त्यावर विश्वास बसतो. त्याचा अर्थ ते ख-या अर्थाने पुरोगामी असतात असं मुळीच नाही पण ते ज्या कृती करतात त्यांना लोक पुरोगामीपणा समजतात.उदाहरणार्थ अल्पसंख्यांकांचा अनुनय. याचा व्यत्यासही खरा आहे. एकदा कानफाट्या नाव पडलं की ते सगळीकडे पसरतं.हिंदुत्ववादी संघटना आणि पक्षांचं तेच झालेलं आहे.
↩ प्रतिसाद: प्यारे१
ब
बोका-ए-आझम Tue, 09/01/2015 - 05:36 नवीन
नाझी प्रचारयंत्रणा प्रमुख जोसेफ गोबेल्सची Big Lie या नावाने प्रसिद्ध असलेली एक थिअरी आहे. कुठलीही १००% खोटी गोष्ट सतत लोकांच्या कानांवर पडेल अशी व्यवस्था केली, सतत ती हॅमर केली की लोकांचा त्यावर विश्वास बसतो.आपण धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी आहोत हे जे लोक छाती पिटून सांगतात, मग ते दिल्लीत असो,महाराष्ट्रात असो किंवा मिपासारख्या संस्थळावर असो - लोकांचा त्यावर विश्वास बसतो. त्याचा अर्थ ते ख-या अर्थाने पुरोगामी असतात असं मुळीच नाही पण ते ज्या कृती करतात त्यांना लोक पुरोगामीपणा समजतात.उदाहरणार्थ अल्पसंख्यांकांचा अनुनय. याचा व्यत्यासही खरा आहे. एकदा कानफाट्या नाव पडलं की ते सगळीकडे पसरतं.हिंदुत्ववादी संघटना आणि पक्षांचं तेच झालेलं आहे.
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Mon, 08/31/2015 - 14:54 नवीन
अंपायरनं डेड बॉल दिला वाटतं. दोन तीन रन कमी झाल्यात.
स
संजय पाटिल Mon, 08/31/2015 - 14:58 नवीन
हा हा हा ....एक दोन बाय लेग बाय काढा..
↩ प्रतिसाद: प्यारे१
स
सुबोध खरे Mon, 08/31/2015 - 15:00 नवीन
१०० +
म
मदनबाण Mon, 08/31/2015 - 15:00 नवीन
+१०१
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आबा Mon, 08/31/2015 - 15:17 नवीन
देव अस्तित्वात असता, तर "या निर्बुद्धांना बुद्धी दे" अशी प्रार्थना करता आली असती
प
प्यारे१ Mon, 08/31/2015 - 15:18 नवीन
एक लिखित ओळीच्या, दोन वाक्यं आणि एका लिंकच्या पिल्लू आकाराच्या पालीच्या शतकी डायनोसॉरी रुपांतराबद्दल संजयकाका पाटलांचा एक चायनिज प्लास्टीकचा डायनोसॉर, श्रीगुरुजी आणि तुडतुडी यांना एक नटराजाची मूर्ती, माईसाहेब यांना तोंडावर बांधण्याचा मास्क आणि डॉ. खरे, मदनबाण आणि समस्त जनतेला एक एक इक्लेअर्स देऊन सत्कार करण्यात येत आहे. धागा वाईट घटनेबद्दल असल्या ची पूर्ण कल्पना आणि जाणीव आहे. सत्कार फक्त धाग्याबाबत आहे. वसकरुन अंगावर येऊ नये. - मानाजेपीअध्यक्षतेखालीमिपासत्कारसमितीउपसचिव
म
माहितगार Mon, 08/31/2015 - 15:24 नवीन
इक्लेअर्स साठी आभार. :)
↩ प्रतिसाद: प्यारे१
D
dadadarekar Mon, 08/31/2015 - 15:54 नवीन
चार्ली हाब्डो.प्रकरणावर तोंडसुख घेणारे मिसळपावीय लोक आज या हत्येचे मात्र अप्रत्यक्षरीत्या समर्थन करत आहेत हे वाचोन माझा माजी हिंदु व आजी अ-हिंदु आत्मा गलबलला.
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 08/31/2015 - 16:25 नवीन
हॅ हॅ हॅ. "कल्बुर्गी,दाभोळ्कर ह्यांच्या हत्येचा मी निषेधच करतो पण..." छाप प्रतिसाद सगळीकडे वाचायला मिळत आहेत असे ह्यांचे मत.
↩ प्रतिसाद: dadadarekar
प
प्रसाद गोडबोले Mon, 08/31/2015 - 16:28 नवीन
प्रिय माई , काय कशा आहात ? नाना काय म्हणताहेत , सध्या बरेच दिवस दिसले नाहीत ! सचिनला अनेकानेक आशीर्वाद ...हितेशला गोडगोड पापा :) कळावे --तुमचाच फ्यॅन
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
D
dadadarekar Mon, 08/31/2015 - 16:48 नवीन
हितेशला पापा दिल्याबद्दल आभार.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
क
काळा पहाड Mon, 08/31/2015 - 18:21 नवीन
नानांना 'तसले' आजार झालेत.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ब
बोका-ए-आझम Mon, 08/31/2015 - 16:28 नवीन
तुमचा आताचा आत्मा हा अ-हिंदू आहे म्हणजे नक्की काय आहे? आत्मा आणि डुप्लिकेट आयडी यांच्यात बहुतेक गोंधळ झालेला दिसतोय. का तुमच्यात डुप्लिकेट आयडीला आत्मा म्हणतात?
↩ प्रतिसाद: dadadarekar
न
नीलमोहर Mon, 08/31/2015 - 16:39 नवीन
आज ज्ञानात पडलेली भर: १.आत्मा आजी-माजी अशा विविध स्वरूपात असतो. २.आत्म्यालाही धर्म असतो. ( हिंदू, अ-हिंदू, न-हिंदू ??) अखिलमिपाआजीमाजीआत्ममुक्तिशोधसंवर्धकसंघ
↩ प्रतिसाद: dadadarekar
व
विनोद१८ Mon, 08/31/2015 - 21:05 नवीन
तरीच म्हटले ह्या 'चांदमियॉने' अजुन ह्या धाग्यावर 'मातम' कसा मनवला नाही. लगे रहो 'मो. नानेखान कुरसुंदीकर'.
↩ प्रतिसाद: dadadarekar
च
चित्रगुप्त Mon, 08/31/2015 - 16:26 नवीन
'ज्ञानपीठ' आणि 'साहित्य अकादमी' या दिल्लीतून दिल्या जाणार्‍या सन्मानांचा इथे उल्लेख आलेला आहे, त्यावरून सांगू इच्छितो, की हे आणि असले अनेक पुरस्कार मिळवून देण्याचा 'जुगाड' करणारे एजंट लोक दिल्लीत सक्रीय आहेत. काही लाख (किंवा आता कोटीही असेल) रुपयात ते हा जुगाड करवून देतात. दिल्ली मे सब बिकता है भाई.
प
प्रसाद गोडबोले Mon, 08/31/2015 - 16:30 नवीन
चिगु काका , मेन्युकार्ड मिळाले तर देता का जरा ? किमान पद्मश्री तरी घ्यायचीच आहे मला ... =))
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
D
dadadarekar Mon, 08/31/2015 - 16:41 नवीन
बाजपेयींच्या कविता गायल्यावर पद्मजा फेणाणीना पद्मश्री मिळाली होती. मोदींच्या कविता वाचायची प्रॅक्टिस सुरु करा.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्यारे१ Mon, 08/31/2015 - 17:03 नवीन
ऑपरेशन केलं की पद्मविभुषण मिळतं.
↩ प्रतिसाद: dadadarekar
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा