Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डॉ. कलबुर्गी..यांची हत्या..

स
संजय पाटिल
Sun, 08/30/2015 - 11:37
🗣 227 प्रतिसाद
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&uact=8&ved=0CB4QqQIwAGoVChMIiPfbxL_QxwIVjG2OCh3btQKk&url=http%3A%2F%2Fwww.ibtimes.co.in%2Fkannada-scholar-dr-mm-kalburgi-shot-dead-644723&ei=Q83iVcjJLYzbuQTb64qgCg&usg=AFQjCNE_rncuIRsWQGjkLVr9yMCMN4tB8w डॉ. नरेन्द्र दाभोळ्कर, कॉ. गोविन्द पानसरे आणि आता डॉ. कलबुर्गी यांना गोळ्या झाडुन ठार मारण्यात आले. नेमके काय चाललय?

प्रतिक्रिया द्या
41776 वाचन

💬 प्रतिसाद (227)
प
प्यारे१ Mon, 08/31/2015 - 17:05 नवीन
पद्मभुषण असेल बहुतेक. यब याददाश्त कमजोर हो गयी है
↩ प्रतिसाद: प्यारे१
श
श्रीगुरुजी Mon, 08/31/2015 - 17:08 नवीन
आई सेन्सॉर बोर्डाची अध्यक्ष असली की मुलाला आपोआप पद्मश्री मिळते. आणि मुलीला नृत्य शिकविलं की सेन्सॉर बोर्डाचं अध्यक्षपदही मिळतं.
↩ प्रतिसाद: प्यारे१
च
चित्रगुप्त Mon, 08/31/2015 - 16:50 नवीन
माझ्या माहितीत आहे असा एक दलाल. तो तसा स्वतः लेखक वगैरे आहे. त्याने ज्ञानपीठात केलेला जुगाड मला ठाऊक आहे. त्याचा फोन नं. हवा तर मिळवून देऊ शकतो. तो मात्र सणसणीत पैसे घेऊनच जुगाड करणारांपैकी आहे.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/31/2015 - 16:56 नवीन
मिपावर असले लक्षाधिश आणि कोट्याधीश पण वावरतात हे पाहून अभिमानाने उर भरून वैग्रे आला आहे ! ;) :) (यापूर्वी येथे फक्त लक्षात ठेवून कोट्या करणारे दिसत आले आहेत)
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ए
एस Mon, 08/31/2015 - 18:55 नवीन
बाय द वे, 'कोट्यधीश' आणि 'कोट्याधीश' यांच्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. एखादा उद्योगपती कोट्यधीश असू शकतो, तर कोट्याधीश व्यक्तीचे उदाहरण म्हणजे 'पु.ल.'.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ब
बॅटमॅन Mon, 08/31/2015 - 16:31 नवीन
यग्जाक्टली. अन पैशांचेच जुगाड दरवेळेस असेल असे नाही, कैकदा विचारसरणी सारखी असेल तर त्याचेही जुगाड चालून जाते असे ऐकलेले आहे.
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
म
मदनबाण Mon, 08/31/2015 - 16:34 नवीन
हॅहॅहॅ... ओबामा मामांना नोबल मिळाले आहे, शातंतेसाठी ! ;) मदनबाण.....
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मदनबाण Mon, 08/31/2015 - 16:35 नवीन
नोबेल. मदनबाण.....
↩ प्रतिसाद: मदनबाण
ब
बोका-ए-आझम Mon, 08/31/2015 - 16:34 नवीन
नक्षलवादी आणि सीपीआय-सीपीएम यांची विचारसरणी ही एकच आहे. पण जेव्हा नक्षलवादी एखाद्याची हत्या करतात, तेव्हा सीपीआय - सीपीएमवर टीका होत नाही. पण जेव्हा एखाद्या हिंदुत्ववादी संघटनेवर बालंट घ्यायची वेळ येते तेव्हा सगळेजण त्याचा संबंध डायरेक्ट संघपरिवार आणि भाजपशी नेऊन जोडतात.
क
कवितानागेश Mon, 08/31/2015 - 18:35 नवीन
चांगली जोरदार चर्चा रंगत असताना असे बरोबर मुद्दे मांडायचे नसतात हो!
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
स
संजय पाटिल Mon, 08/31/2015 - 17:07 नवीन
ईसीस ने कुठलि मुर्ती भंग केली? तालिबान्यानी केलेली आठवते ...
प
प्यारे१ Mon, 08/31/2015 - 17:19 नवीन
संजय काका आता २०० च्या मागं लागलेले दिसतात. ;)
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
प
प्रसाद गोडबोले Mon, 08/31/2015 - 17:22 नवीन
ईसीस ने कुठलि मुर्ती भंग केली?
https://en.wikipedia.org/wiki/Baalshamin
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
म
माहितगार Mon, 08/31/2015 - 17:31 नवीन
मिपावर मागे मयूरपंथाच्या पुर्नजन्मापर्यंत हा लेख लिहिला होता तो खूप सौम्य शब्दात हे नंतर ल़क्षात आले. तालीबान ने मुर्तीभंजन केले इस्लामीकायदा जिझीया लावला शीखादी मायनॉरीटींना परागंदा व्हावे लागले. पण इसिसने याझीदींसोबत जे केले ते अलिकडच्या काळात मानवतेस लागलेला खूप मोठा दुर्दैवी डाग आहे. तालीबानींची त्यांच्याशी तुलना होत नाही.
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
म
माहितगार Mon, 08/31/2015 - 17:32 नवीन
अर्थात केरळच्या भारतीय नर्सेस बद्दल त्यांनी दया दाखविली हाही आश्चर्याचाच भाग म्हणावयाचा
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
ब
बोका-ए-आझम Mon, 08/31/2015 - 19:49 नवीन
सीरियामधील पालमिरा हे प्राचीन शहर होतं. युनेस्कोच्या जागतिक ठेव्यांच्या यादीवर होतं. आयसिसने त्याची देखभाल करणा-या क्युरेटरचा शिरच्छेद करुन शहर उध्वस्त केलं. त्याचा व्हिडिओ त्यांनी प्रसृत केलेला आहे.
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
क
काळा पहाड Mon, 08/31/2015 - 20:00 नवीन
त्या सगळ्या भागावर एखादा अणुबाँब टाकून या आयसिस ला एका झटक्यात संपवता येईल ना.. अमेरिकेनं विचार करायला हवा.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ह
होबासराव Mon, 08/31/2015 - 18:00 नवीन
माझ्या माहिति प्रमाणे त्या नर्सेस सुखरुप मायदेशि परत येण्यात अजित डोवाल ह्यांचि भुमिका फार महत्वाची होति..इथे आय.एस.आय ने सुद्धा मदत केल्याचे ऐकलेय.
D
dadadarekar Mon, 08/31/2015 - 19:23 नवीन
एक पान भरले... अभिनंदन
D
dadadarekar Tue, 09/01/2015 - 06:49 नवीन
शेट्टी नावाच्या बजरंगी भाइजानला अटक
स
सुधीर Tue, 09/01/2015 - 08:21 नवीन
यानिमित्ताने चार्ली हेब्दोच्या वेळी झालेले वाद आठवतात. जीव घेणे अक्षम्य तर आहेच. पण "भावना दुखावतील अशी मतं मांडणंही चुकीचं आहे" हा मुद्दा मला पटत नाही. आजच्या टिओआय च्या अग्रलेखात वाचलेलं वाक्य. "People have the right to air their views in a democracy, no matter how offensive they may be to some.". खून कुणी केला याची अटकळं बांधण्यात अर्थ नाही. निदान या तरी खूनाचा तपास यशस्वी व्हावा ही इच्छा.
स
सुबोध खरे Tue, 09/01/2015 - 08:35 नवीन
सुधीर साहेब People have the right to air their views in a democracy, no matter how offensive they may be to some." हे बोलणारे लोक महम्मद पैगंबराचे किंवा अल्लाहचे साधे चित्र छापण्याचे धारिष्ट्य दाखवतील का? एम एफ हुसेन यांनी देवी सरस्वतीची विवस्त्र चित्रे काढली ती चालली. महात्मा गांधींबद्दल वाटेल ते बोलले तर चालते कारण ते स्वतः अहिंसेचे पुजारी होते आणि त्यांचे अनुयायी पण. हेच महम्मद पैगंबरांच्या बाबतीत किंवा डॉ. आंबेडकरांच्या बाबतीत बोलले/ लिहिले तर दंगली का होतात याचे सार्थ स्पष्टीकरण द्याल का? असे करणार्यावर ताबडतोब सांप्रदायिक हिंसा भडकावण्याच्या आरोपाखाली प्रतिबंधात्मक कार्यवाही होते. हिंदू देवतेवर मुत्र विसर्जन केलेले चालते इतकेच नव्हे तर त्याचे समर्थन केलेले चालते. तेंव्हा अशी प्रतिबंधात्मक कार्यवाही होत नाही. आपण पुरोगामिपणाच्या नावावर दाम्भिकच नव्हे तर दुटप्पीपण आहोत. मला याची जास्त चीड आहे. जो न्याय एकाला आहे तोच सर्वाना असलाच पाहिजे.
↩ प्रतिसाद: सुधीर
म
मांत्रिक Tue, 09/01/2015 - 08:38 नवीन
People have the right to air their views in a democracy, no matter how offensive they may be to some." एकदम बथ्थड, भडकावू, भावनाशून्य विधान. धन्यवाद डॉक्टर साहेब, वेळीच आवर घातलात.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
त
तात्या Tue, 09/01/2015 - 08:43 नवीन
इथे पुरोगामीत्वाला विरोध नाही पण केवळ सहिष्णू म्हणून हिंदूंची गळचेपी होत आहे. हिंदू धर्मात मागच्या १०० वर्षात झालेल्या सुधारणा पहा आणि त्याच्या १० % सुधारणा इतर धर्मात सुचवून पहा.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुधीर Tue, 09/01/2015 - 08:43 नवीन
तुमच्या मताचा मला आदरच आहे. मी फक्त दुसरं मत मांडलं. मी चुकीचाही असेन.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 09/01/2015 - 13:03 नवीन
>>>> हिंदू देवतेवर मुत्र विसर्जन केलेले चालते इतकेच नव्हे तर त्याचे समर्थन केलेले चालते. डॉक्टर साहेब, वरील ओळीतील विषयाबद्दल कोणी समर्थन केलंय. प्रतिसादाच्या लिंका द्या बरं. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ऋ
ऋतुराज चित्रे Tue, 09/01/2015 - 08:28 नवीन
कुलबर्गींच्या हत्येचा निषेध. दाभोलकर्,पानसरे आणि आता कलबुर्गी यांच्या हत्येचे मारेकरी जोपर्यंत सापडत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या हत्येचे खरे कारण कळणे कठिण आहे. अंधश्रद्धेला केलेला विरोध हे ही कारण असु शकेल. हिदुत्ववादी संघटना व त्या विचारसणीच्या राजकीय पक्षांना बदनाम करण्याच्या हेतुने हत्या केली असेल तर कोणत्या राजकीय पक्षाला दाभोलकर किंवा पानसरे यांच्या हत्येमुळे निवडणुकीत फायदा झाला ज्यामुळे प्रेरीत होउन कलबुर्गींची हत्या करुन निवडणुकीत यश मिळेल अशी त्यांना खात्री वाटली. दाभोलकरांना अनिसचे कार्य करत असताना नेहमीच एक प्रश्न केला जायचा फक्त हिन्दु धर्मातील अंधश्रद्धा का दाखवता? दुसर्‍या धर्मातील अंधश्रद्धांना विरोध का करत नाही? कुलबुर्गींच्या हत्येनंतरही असे प्रश्न विचारले जात आहेत. खालील विडिओत त्याचे दाभोलकर यानी उत्तर दिले आहे.
म
माझीही शॅम्पेन Tue, 09/01/2015 - 13:45 नवीन
जबरदस्त वीडियो .. अगोदरही पहिला होता
दाभोलकर्,पानसरे आणि आता कलबुर्गी
कुलबर्गींच्या हत्येचा निषेध इथ पर्यंत ठीक पण त्याना थेट दाभोळेकारांनच्या पंक्तीत बसवण्याचे कारण काय ? खून झाला म्हणून असे सरसकाटीकरण योग्य नाही.. दाभोळकर ह्यांचे कार्य खरोखर ग्रेट होते
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
त
तात्या Tue, 09/01/2015 - 08:52 नवीन
हत्येचा विरोध आणि विचारांना विरोध यात इथे गल्लत होताना दिसत आहे. १. हत्येचा विरोध आहेच . तिचे समर्थन नाही. २. हत्या केवळ त्यांच्या पुरोगामित्वामधून झाली असा निष्कर्ष काढला जात आहे. तो चुकीचा आहे. ३. धर्म ,देव, श्रद्धा या प्रत्येकाच्या खासगी गोष्टी आहेत.त्यांचे पालन दुसर्‍याला त्रास न होता करायला संविधानाची मान्यता आहे. ४. धर्मसुधारणेच्या , पुरोगामित्वाच्या नावाखाली ज्या गोष्टी केल्या जातात त्यामुळे दुसर्‍यांच्या भावना दुखावतात याचा विचार पुरोगामित्वांनी केला पाहिजे. ५. वैचारीक , अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच. पण त्याचा वापर दुसर्‍याला , समाजाला दुखवायला केला गेलाय. त्यांच्याविचारांना विरोध केलाय पण स्वातंत्र्य आणि वैचारीक स्वैराचार यामधली रेषा पुरोगाम्यांनी ओलांडली आहे ६. अशा वक्तव्याविषयी , लेखांविषयी कडक कायदे बनविले पाहिजेत ७. दाभोलकर,पानसरे , कलबुर्गी यांच्या हत्येचे कारण माहीत नसताना कंठशोष करणे व्यर्थ आहे.
ऋ
ऋतुराज चित्रे Tue, 09/01/2015 - 09:10 नवीन
३. धर्म ,देव, श्रद्धा या प्रत्येकाच्या खासगी गोष्टी आहेत.त्यांचे पालन दुसर्‍याला त्रास न होता करायला संविधानाची मान्यता आहे.. प्रत्यक्षात ते पाळले जाते का ?
च
चिगो Tue, 09/01/2015 - 09:25 नवीन
मला पडलेले प्रश्नः १. कट्टर हिंदुत्ववादी संघटना, ज्या हिंदु धर्मातील प्रथा/चालीरितींचा विरोध केल्यास हत्यापण करु शकतात, त्या कुठल्या आहेत? २. अश्या संघटना ह्या म्हणजे दाभोलकर, पानसरे किंवा कलबुर्गी ह्यांच्या हत्येमागे आहेत हे सिद्ध झाले आहे का? कि ती फक्त मिडीयाबाजी आणि त्यायोगे मतनिर्माण आहे? ३. प्रत्येक खुनामागे "Cause-Motive-Action" हा कार्यकारण-संबंध असतो, असे मानल्या जाते. अतिक्रोधाच्या झतक्यात झालेल्या गुन्ह्यांमागेपण "कॉज-अ‍ॅक्शन" एवढं तरी असतं. ह्या खुनांमध्ये हा संबंध सिद्ध झालाय का? दाभोलकर म्हणा, वा पानसरे/कलबुर्गी म्हणा, त्यांची सो कॉल्ड 'हिंदुविरोधी' भुमिका आजची नाहीये, तर मागील कित्येक दशकांपासूनची आहे.. मग आताच ह्या हत्या का झाल्यात? उगाच तपासकार्यावर चष्मा तर चढवल्या जात नाहीये? ४. वरील प्रश्नास आता 'हिंदुत्ववादी ताकदी' सक्रीय होताहेत, हे उत्तर देणार असाल तर दाभोलकरांच्या हत्येच्या वेळी आणि त्यानंतरही ९ महीने केद्रांत आणि जवळपास १५ महीने राज्यात काँग्रेस सरकार होतं. 'पोलिस/ कायदा व सुव्यवस्था' हे विषय राज्यसरकारच्या अखत्यारीत येतात. कर्नाटकात काँग्रेस सरकार आहे. मग उगाच बोंबाबोंब करत बसण्यापेक्षा ह्या दोन खुनांचा (दाभोलकरांच्या खुनाचा तेव्हा आणि कलबुर्गींच्या खुनाचा आता) तातडीने तपास व निवाडा लावून ह्या संघटनांना नागडं का करत नाही? उगाच 'पर्सेप्शन क्रीएशन' कशाला? ('पर्सेप्शन मॅटर्स मोर दॅन रिअ‍ॅलिटी' हे पटलेला) चिगो
ब
बोका-ए-आझम Tue, 09/01/2015 - 09:39 नवीन
Perception is the only reality. आपल्याला जे वाटतं तेच वास्तव - असंच लोक मानतात. Al Ries या Marketing गुरूचं Immutable Laws of Marketing वाचलं नसेल तर जरुर वाचा. हे अगदी उदाहरणांसहित स्पष्ट करून सांगितलेलं आहे.
↩ प्रतिसाद: चिगो
ऋ
ऋतुराज चित्रे Tue, 09/01/2015 - 10:19 नवीन
दाभोलकरांच्या हत्येच्या वेळी आणि त्यानंतरही ९ महीने केद्रांत आणि जवळपास १५ महीने राज्यात काँग्रेस सरकार होतं. 'पोलिस/ कायदा व सुव्यवस्था' हे विषय राज्यसरकारच्या अखत्यारीत येतात. कर्नाटकात काँग्रेस सरकार आहे. मग उगाच बोंबाबोंब करत बसण्यापेक्षा ह्या दोन खुनांचा (दाभोलकरांच्या खुनाचा तेव्हा आणि कलबुर्गींच्या खुनाचा आता) तातडीने तपास व निवाडा लावून ह्या संघटनांना नागडं का करत नाही? पानसरे हत्येच्या वेळी केन्द्रात व राज्यात कोणाचे सरकार होते? करा की नागडे पानसरेंच्या हत्येकरांना, की हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही?
↩ प्रतिसाद: चिगो
च
चिगो Tue, 09/01/2015 - 12:58 नवीन
पानसरे हत्येच्या वेळी केन्द्रात व राज्यात कोणाचे सरकार होते? करा की नागडे पानसरेंच्या हत्येकरांना, की हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही?
करायलाच पाहीजे.. १००% मान्य. मी कुठ्लेच बुरखे पांघरत नाही. पानसरेंच्या हत्येच्यावेळी महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपचे सरकार होते, जे हिंदुत्ववादी आहे असे मानले जाते, आणि म्हणून त्यांनी त्या हत्येमागे असल्याच्या संशय असणार्‍या 'कट्टर हिंदुत्ववादी' संघटनांना संरक्षण देण्यासाठी तपासकामात ढीलाई करण्यास पोलिसांना भाग पाडलंय, असं समजू.. (समजूच. कारण की पोलिस इतके मुर्ख असतील, असं मला वाटत नाही.) एवढ्याच साठी त्यांच्या हत्येचा त्या प्रश्नात उल्लेख केला नव्हता, हे 'हा साला हिंदुत्ववादी' असा (पुर्णतः चुकीचा) चष्मा न चढवता वाचलं असतंत, तर कळालं असतं.. पण बाकी दोघांच्या बाबतीत कुणी अडवले होते/ आहे, हे सांगण्याची कृपा कराल का?
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
व
विनोद१८ Tue, 09/01/2015 - 14:09 नवीन
१] काय राज्य सरकारने पानसरेंच्या हत्येचा तपास थांबविला आहे ??? याबाबतीतली तुमची खात्रीलायक माहीती काय आहे ?? तुम्ही मूळ मुद्द्याला बगल देउ नका, याअगोदरच्या राज्य सरकारने काय दिवे लावलेत त्या वर जरा प्रकाश पाडा. २] पानसरेंचे हत्येकरी सापडले तर ते जगापासुन लपविले जाउ शकणार नाही, ते नागडे केलेच जातील.
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
त
तुडतुडी Tue, 09/01/2015 - 09:40 नवीन
इथे काही लोक हत्या झाली हत्या झाली म्हणून गले काढतायेत . त्यामागचं कारण समजून घेण्यात मात्र त्यांना विंटरेष्ट दिसत नाहीये . उद्या कौरवांची , रावणाची हत्या झाली म्हणून गले काढतील . खिक
प
प्यारे१ Tue, 09/01/2015 - 09:44 नवीन
तुडतुडी यांचाही निषेध. रावणाचा वध केल्यानंतर रामानं च 'मरणान्तानि वैराणि' म्हटलेलं नि कौरवांच्या आईवडलांना पांडवांनी सांभाळलेलं तुला माहिती नाही का काकू? आणि हत्येचं कारण तुला तरी नक्की समजलेलं आहे का ?
↩ प्रतिसाद: तुडतुडी
ख
खटपट्या Tue, 09/01/2015 - 10:20 नवीन
आता लढ बाप्पू...
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
पैसा Tue, 09/01/2015 - 10:27 नवीन
तुडतुडी तै/भौ हिन्दुत्ववाद्यांच्या विरोधक असाव्यात/असावेत. म्हणून दादूस दरेकर यांच्याप्रमाणेच ही हत्या हिन्दुत्ववाद्यानी केल्याचे सुचवीत आहेत. हे सगळे लोक त्यांच्याकडची माहिती पोलिसांना का सांगत नाहीत कोडं आहे.
↩ प्रतिसाद: खटपट्या
म
माहितगार Tue, 09/01/2015 - 11:19 नवीन
एक आवांतर किस्सा : रविकरण कविमंडळाचे सदस्य माधव ज्युलीयन फर्ग्युसन कॉलेजात प्रोफेसर होते. एका विद्यार्थीनीशी ते केवळ बोलले एवढ्यावरून एज्युकेशन सोसायटीने त्यांना काही अटी घालून जसे की त्या मुलीशी संपर्क करू नये किंवा काय दोन वर्षांसाठी माधव ज्युलीयनांना सस्पेंड केले. माधव ज्युलीयनांना त्या विद्यार्थ्यांना इतर काही देणे घेणे नसल्यामुळे त्यांनी अटी मान्य केल्या कारण त्यांना फर्ग्यूसन मध्ये पुन्हा काम करण्याची इच्छा होती. माधव ज्युलीयन दुसर्‍या गावी जाऊन राहीले. इकडे माधव ज्युलीयनांच्या रविकिरण मंडळातील मित्रांनी माधव ज्युलीयन यांना मदत करावी या सद हेतूने पण माधव ज्युलीयनांना काहीच पुर्वकल्पना न देता त्या विद्यार्थीनीस आणि तीच्या पालकांना विश्वासात घेऊन माधव ज्युलीयनांशी विवाह करण्याची गळ घातली. आणि माधव ज्युलीयनांना मुंबईस बोलवून घेऊन पुर्वकल्पना न देता त्या विद्यार्थीनीची भेट घडवली. ती वार्ता फर्ग्यूसन च्या मंडळींपर्यंत पोहोचली आणि माधव ज्युलीयन यांना फर्ग्यूसन पासून कायमचे दूर ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. माधव ज्युलीयन आणि त्यांचे रविकिरण मंडळातील मित्र एकमेकांवर भडकले. माधव ज्युलीयन यांचे म्हणणे होते की मित्र आहात पण तुम्हाला नसता उपदव्याप सांगीतलाच कुणी करावयास. मी ज्या विद्यार्थीनीस नैतीक दृष्ट्या काहीही चुकीचे केले नाही तिच्याशी विवाह तेही इच्छा नसताना करून लोकापवाद खरा होता असे खोटेपणाने का स्विकारावे ? असाच त्रास बिचार्‍या मोदींना त्यांच्याच समर्थकांच्या वाचाळ विरतेचा आणि नसत्या कृतींचा होत रहाणार आहे. काँग्रेसबरीच वर्षे सत्तेत होती त्यांना वाचाळ विरतेचा त्रास त्या मानाने बराच कमी होता असे वाटते. आय फिल सॉरी फॉर मोदीजी ! हिज फ्रेंड्स डू नॉट नो हाऊ टू डान्स (सॉरी रिड हाऊ टू बी पॉलीटीकली करेक्ट) :)
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 09/01/2015 - 13:07 नवीन
माधव ज्युलीयन यांचा किस्सा माहिती नव्हता. धन्स. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: माहितगार
प
पैसा Tue, 09/01/2015 - 13:28 नवीन
लै भारी किस्सा! नुसतं बोललं म्हणून २ वर्षे निलंबित? काय कल्पना होत्या तेव्हाच्या!! मोदींना जास्त त्रास त्यांच्या अतिउत्साही भक्तांचा आहे यात काही वादच नाही. ते त्यांना सुखाने काम करू देणार नाहीत.
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Tue, 09/01/2015 - 13:44 नवीन
लै भारी किस्सा! नुसतं बोललं म्हणून २ वर्षे निलंबित? काय कल्पना होत्या तेव्हाच्य
माधव ज्युलीयन यांच्या पत्नींनी माधव ज्युलीयनांचे रोचक चरीत्र लिहिले त्यात हि गंमतीशीर माहिती आहे. तत्कालीन पुण्यात माधव ज्युलियनांशी विवाह केल्या नंतर लोक बहिष्कारा/निंदेचा सामना त्यांच्या पत्नींना त्यांचा स्वत;चा दोष नसतानाही करावा लागला. फर्ग्युसनच्या एज्युकेशन सोसायटीतल्या तत्कालीन लोकांची नावांचे उल्लेख त्या चरित्रात टाळलेले दिसतात पण ती बहुधा तत्कालीन पुरोगामी मंडळी होती. आणि माधव ज्युलीयन पुरोगामी विचाराम्चे होते म्हणूनच त्यांना दोन वर्षांचे निलंबन सहन करूनही तिथे वापस जाण्याची इच्छा होती. माधव ज्युलीयनांचा अजून एक रोचक किस्सा असा कि लोकमान्यांना मानपत्र दिले जाताना हातवर करून ठरावास स्वतःचा विधीवत विरोध नोंदवून घेणारे उपस्थीतातील हे एकमेव पुरोगामी होते.
↩ प्रतिसाद: पैसा
D
dadadarekar Tue, 09/01/2015 - 11:49 नवीन
हिंदुत्ववाद्यानी हत्या केली असे मी म्हटलेले नाही. पेप्रात आलेल्या बातम्या कॉपी पेस्ट केल्या आहेत.
↩ प्रतिसाद: पैसा
म
मंदार दिलीप जोशी Tue, 09/01/2015 - 12:24 नवीन
चंमतग म्हणून का?
↩ प्रतिसाद: dadadarekar
क
काळा पहाड Tue, 09/01/2015 - 11:00 नवीन
थोडंसं विषयांतर. रावण आणि कौरव माणसात येतात. पण उद्या आयसिस च्या अतिरेक्यांना मारल्यावर 'मरणान्तानि वैराणि' संपणार नाही. डुकराचं मांस तोंडात कोंबून, अंगावर डुकराचं रक्त ओतून मग सर्वात अमुस्लीम पद्धतीनं त्यांची विल्हेवाट लावणे हाच राहिलेल्यांना सगळ्यात मोठा धडा असेल.
↩ प्रतिसाद: प्यारे१
फ
फुलथ्रॉटल जिनियस Tue, 09/01/2015 - 11:26 नवीन
अच्चं अच्चं , बॉर बॉर !
↩ प्रतिसाद: काळा पहाड
व
विनोद१८ Tue, 09/01/2015 - 14:20 नवीन
तुझा काय संबंध त्या 'आय.एस.आय.एस' शी ?? तुला बराच झोंबलेला दिसतोय काळ्या पहाडाचा प्रतिसाद, म्हणुन विचारले.
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
क
काळा पहाड Tue, 09/01/2015 - 14:52 नवीन
हा प्रकार जिहादींबद्दल साऊथ ईस्ट एशियात पूर्वी वापरण्यात आलेला आहे आणि भारतीय सैन्याच्या काही सैन्याधिकार्‍यांनी या प्रकार वापरण्याबद्दल लेख सुद्धा लिहिलेले आहेत. No Islamic burial for Mumbai terrorists शिवाय हा उपाय पूर्वी पण वापरण्यात आलेला आहे.
[Drogin, 2001] Senate Intelligence Committee Chairman Bob Graham (D-Fla.) cited as an example a dinner he attended last week with people who work on intelligence issues and have connections to the intelligence community. The dinner conversation ranged in part on how U.S. military commander "Black Jack" Pershing used Islam's prohibition on pork to help crush an insurgency on the southern Philippine island of Mindanao after the Spanish-American War at the turn of the last century. In one instance, Graham explained in an interview, U.S. soldiers captured 12 Muslims. They killed six of them with "bullets dipped into the fat of pigs." After that, Graham said, the U.S. soldiers wrapped the Muslim rebels in funeral shrouds made of pigskin and "buried them face down so they could not see Mecca. Then they poured the entrails of the pigs over them. The other six were forced to watch. And that was the end of the insurrection on Mindanao," Graham noted.
http://www.freerepublic.com/focus/bloggers/2817135/posts http://www.telegraph.co.uk/news/worldnews/northamerica/usa/1494110/Anger-over-pigs-blood-bullets-poster.html तेव्हा तुमचा राग समजू शकतो, पण आता तुमचा जिनियस पणा घेवून दुसरीकडे फुटा.
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
प
प्यारे१ Tue, 09/01/2015 - 14:57 नवीन
विनोद१८ आणि काळा पहाड़, तुम्ही दोघे एकाच माऊलीचे करण अर्जुन आहात काय? की कुम्भ के मेले में बिछड़े दो जुडवा भाई?????
↩ प्रतिसाद: काळा पहाड
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा