तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध आहात?
एका बाजूला आपल्याला धर्माचा वरचष्मा सामाजिक जीवनात वाढताना जाणवतो. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यात धर्माचं स्थान कमी होताना दिसतं. त्यातलं समाजात दिसणारं चित्र आपल्याला देवळांच्या रांगा, गणेशोत्सवातली गर्दी, बातम्या यांमधून दिसत असतं. वैयक्तिक बाबतीत मिपाकरांमध्ये काय चित्र आहे हे जाणून घेण्यासाठी हा कौल घेण्याचा प्रयत्न. या कौलातून निघणारे निष्कर्ष हे अर्थातच मर्यादित सॅंपलमुळे सर्व समाजाला लागू होणार नाही, पण तरीही एका छोट्या समाजगटाचं का होईना, पण प्राथमिक चित्र निर्माण होईल अशी आशा आहे.
धार्मिकता, आस्तिकता, श्रद्धा या गोष्टी मोजायला सोप्या नाहीत. सर्वांना लागू पडेल असा मानदंड तयार करणं फार कठीण आहे. घराघरातलं चित्र वेगळं असतं. त्यामुळे मी प्रत्येकाला आपल्या घरच्या अनुभवाबद्दल विचारतो आहे. आईवडिलांच्या तुलनेने तुम्ही कितपत कमी वा अधिक धार्मिक आहात असा प्रश्न विचारणं हा प्रत्येकाला बऱ्यापैकी खात्रीलायकरीत्या उत्तर देता येण्याजोगा प्रश्न वाटतो. त्यात आईचा स्वभाव एक टोक आणि वडिलांचं दुसरं टोक अशीही शक्यता असेल. अशा वेळी शक्य तितकी सरासरी काढून उत्तर द्यावं ही विनंती.
धार्मिकता मोजण्यासाठी काय काय निकष वापरावेत हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. तरीही काही गोष्टी मी विचार करण्यासाठी नमूद करतो आहे.
- दररोज पूजा करणं
- मंदिरात नियमितपणे जाणं
- देवाला नवस बोलणं
- तीर्थयात्रा करण्यासाठी जाणं
- विवाह, मुंज, वास्तुशांत, सत्यनारायण विधियुक्त करणं
- पाप पुण्याच्या बाबतीत जागरुक असणं
- शिवाशीव, विटाळ पाळणं
- मुलांना 'देवबाप्पा पाप देईल' अशी भीती घालणं.
- घरात शुभं करोति, रामरक्षा, वगैरे सारख्या प्रार्थना नियमितपणे म्हणणं.
- घरात देवघरासाठी प्रशस्त जागा असणं
या व अशासारख्या अनेक निकषांवरून तुमचे आईवडील तुमच्यापेक्षा अधिक धार्मिक होते की कमी धार्मिक होते? हे उत्तर देण्यासाठी मी तीन विभाग करणार आहे, आणि त्यापैकी तुमचे पालक कुठे बसतात व तुम्ही कुठे बसता हे सांगा.
१. बरेच धार्मिक. (देवावर बऱ्यापैकी दृढ विश्वास; पूजा करणं, मंदिरात जाणं बऱ्यापैकी नियमित, मुलांवर धार्मिक संस्कार करण्याचा प्रयत्न इ.)
२. मध्यम धार्मिक (विश्वास असला तरी पूजा करणं आणि मंदिरात जाणं तसं अनियमित, मुलांवर धार्मिक संस्कार व्हावे याचा काहीसा प्रयत्न - पण खूप नाही इ.)
३. कमी धार्मिक (देवावर विश्वास थोडा किंवा जवळपास नाही, पूजा किंवा मंदिरात जाणं जवळपास नाही, विधी नावापुरतेच/प्रथा म्हणून, धार्मिकऐवजी सेक्युलर संस्कार इ.)
उत्तर देताना 'आईवडील २ मी ३' या स्वरूपात प्रतिसादाच्या सुरूवातीला द्यावं ही विनंती. म्हणजे मला संकलन करायला सोपं जाईल. शिवाय तुम्हाला तुमच्या मुलांविषयी किंवा त्यांच्या धार्मिक वातावरणाविषयी काही टिप्पणी करायची असेल; किंवा तुमच्यात आणि तुमच्या पालकांत नक्की काय फरक आहे याविषयी लिहायचं असेल तर प्रतिसादांत जरूर लिहा.
देवकडे डिमांडनोट सरकवणाऱ्या पब्लिक चे विधीयासाठी खास टाळ्या !त्यापैकी तुमचे पालक कुठे बसतात व तुम्ही कुठे बसता हे सांगा.१. तुमच्या यादीत वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे नास्तिक आणि अज्ञेयवादी यांचा समावेश हवा. २. अजून एक, यादीत "काय म्हाय्त नाय बुवा" यांनाही स्थान दिले पाहिजे. वास्तवात माणूस या यादीतल्या कोणत्या एका जागेवर बसलेला असण्यापेक्षा परिस्थिती ढकलून नेईल तिकडे, परिस्थिती नेईल तसा इकडून तिकडे भटकत असतो... कधी मनापासून, कधी दुसरे काही सुचले नाही म्हणून तर कधी तिथे बसलेले "दिसणे" सोईस्कर आहे म्हणून :) ;)एकदा निवांत दिवशी पंढरपूरला जाऊन डोळे भरून विठोबाला पाहायचे आहे. :)निवांत ???!!! डोळे भरून ???!!! गर्दी नसतानाही भाविकांना पुढे सरकवण्यासाठी धक्काबुक्की करणार्या (माझ्या मते केवळ सवयीने गुंडगिरी करणार्या... हे मी त्यांना तोंडावर सांगितले आहे) मंदिरातील तथाकथित सिक्युरिटि/सेवकांशी भांडण करण्याच्या तयारीने जा ! ;) :)त्याची मतं त्यानं बनवली पाहिजेत.जर कोणी स्वतःच्या प्रयोगशीलतेतुन चिंतनातुन अनुभवातुन प्रगल्भ होत उत्क्रांत न होता ती अप्प दिपो भवीय प्रोसेस टाळुन रेडीमेड संस्कारबध्द्दतेच्या बाबागाडीत बसुन आस्तिक बनला असेल तर ती आस्तिकता कणा नसलेली आस्तिकता तकलादु आणि व्यर्थ असते. तशीच आणि तितकीच जर कोणी स्वतःच्या प्रयोगशीलतेतुन चिंतनातुन अनुभवातुन प्रगल्भ होत उत्क्रांत न होता ती अप्प दिपो भवीय प्रोसेस टाळुन रेडीमेड संस्कारबध्द्दतेच्या बाबागाडीत बसुन नास्तिक बनला असेल तर ती नास्तिकता देखील कणा नसलेली नास्तिकता तकलादु आणि व्यर्थ असते हेच म्हणायच होत एका विवेकी पालकाने मुलांना दोन्ही बाजु तिसरी बाजु अधिकाधिक बाजु केवळ परीचीत करुन दिल्या पाहीजेत. डेटा देऊन मागे व्हायला हवं अस माझ व्यक्तीगत मत आहे इतकचं बाकी तुम्ही जे नास्तिंकावर आक्षेप घेतले आहेत ते प्राचीन च आहेत आशा आहे तुम्हाला त्याचा प्रतिवाद माहीत असेल