Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध आहात?

र
राजेश घासकडवी
Sat, 09/12/2015 - 22:21
🗣 205 प्रतिसाद
एका बाजूला आपल्याला धर्माचा वरचष्मा सामाजिक जीवनात वाढताना जाणवतो. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यात धर्माचं स्थान कमी होताना दिसतं. त्यातलं समाजात दिसणारं चित्र आपल्याला देवळांच्या रांगा, गणेशोत्सवातली गर्दी, बातम्या यांमधून दिसत असतं. वैयक्तिक बाबतीत मिपाकरांमध्ये काय चित्र आहे हे जाणून घेण्यासाठी हा कौल घेण्याचा प्रयत्न. या कौलातून निघणारे निष्कर्ष हे अर्थातच मर्यादित सॅंपलमुळे सर्व समाजाला लागू होणार नाही, पण तरीही एका छोट्या समाजगटाचं का होईना, पण प्राथमिक चित्र निर्माण होईल अशी आशा आहे. धार्मिकता, आस्तिकता, श्रद्धा या गोष्टी मोजायला सोप्या नाहीत. सर्वांना लागू पडेल असा मानदंड तयार करणं फार कठीण आहे. घराघरातलं चित्र वेगळं असतं. त्यामुळे मी प्रत्येकाला आपल्या घरच्या अनुभवाबद्दल विचारतो आहे. आईवडिलांच्या तुलनेने तुम्ही कितपत कमी वा अधिक धार्मिक आहात असा प्रश्न विचारणं हा प्रत्येकाला बऱ्यापैकी खात्रीलायकरीत्या उत्तर देता येण्याजोगा प्रश्न वाटतो. त्यात आईचा स्वभाव एक टोक आणि वडिलांचं दुसरं टोक अशीही शक्यता असेल. अशा वेळी शक्य तितकी सरासरी काढून उत्तर द्यावं ही विनंती. धार्मिकता मोजण्यासाठी काय काय निकष वापरावेत हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. तरीही काही गोष्टी मी विचार करण्यासाठी नमूद करतो आहे. - दररोज पूजा करणं - मंदिरात नियमितपणे जाणं - देवाला नवस बोलणं - तीर्थयात्रा करण्यासाठी जाणं - विवाह, मुंज, वास्तुशांत, सत्यनारायण विधियुक्त करणं - पाप पुण्याच्या बाबतीत जागरुक असणं - शिवाशीव, विटाळ पाळणं - मुलांना 'देवबाप्पा पाप देईल' अशी भीती घालणं. - घरात शुभं करोति, रामरक्षा, वगैरे सारख्या प्रार्थना नियमितपणे म्हणणं. - घरात देवघरासाठी प्रशस्त जागा असणं या व अशासारख्या अनेक निकषांवरून तुमचे आईवडील तुमच्यापेक्षा अधिक धार्मिक होते की कमी धार्मिक होते? हे उत्तर देण्यासाठी मी तीन विभाग करणार आहे, आणि त्यापैकी तुमचे पालक कुठे बसतात व तुम्ही कुठे बसता हे सांगा. १. बरेच धार्मिक. (देवावर बऱ्यापैकी दृढ विश्वास; पूजा करणं, मंदिरात जाणं बऱ्यापैकी नियमित, मुलांवर धार्मिक संस्कार करण्याचा प्रयत्न इ.) २. मध्यम धार्मिक (विश्वास असला तरी पूजा करणं आणि मंदिरात जाणं तसं अनियमित, मुलांवर धार्मिक संस्कार व्हावे याचा काहीसा प्रयत्न - पण खूप नाही इ.) ३. कमी धार्मिक (देवावर विश्वास थोडा किंवा जवळपास नाही, पूजा किंवा मंदिरात जाणं जवळपास नाही, विधी नावापुरतेच/प्रथा म्हणून, धार्मिकऐवजी सेक्युलर संस्कार इ.) उत्तर देताना 'आईवडील २ मी ३' या स्वरूपात प्रतिसादाच्या सुरूवातीला द्यावं ही विनंती. म्हणजे मला संकलन करायला सोपं जाईल. शिवाय तुम्हाला तुमच्या मुलांविषयी किंवा त्यांच्या धार्मिक वातावरणाविषयी काही टिप्पणी करायची असेल; किंवा तुमच्यात आणि तुमच्या पालकांत नक्की काय फरक आहे याविषयी लिहायचं असेल तर प्रतिसादांत जरूर लिहा.
वर्गीकरण
धर्म
श्रद्धा
आस्तिक
कौल

प्रतिक्रिया द्या
50718 वाचन

💬 प्रतिसाद (205)
प
प्रभाकर पेठकर Mon, 09/14/2015 - 12:00 नवीन
जेव्हढा 'माजुरडे' हा शब्द खटकला, तितकीच 'औरंगजेबाशी' केलेली तुलना खटकली. बाकी प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आहे आणि मतप्रदर्शनाचा अधिकार आहे ह्याचा स्विकार करून हा वाद माझ्याकडून इथेच संपवितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
क
काळा पहाड Mon, 09/14/2015 - 15:28 नवीन
पेठकरकाका " माजोरडेपणा " हा शब्द मलाही खटकतो. आस्तिकतेला किंवा त्यांच्या आग्रहाला माजोरडेपणा हा शब्द अयोग्य आहे. मात्र माझा आक्षेप होता तो श्री/श्रीमती काळापहाड महोदया यांच्या http://misalpav.com/comment/741834#comment-741834 या विधाना संदर्भात.
माझ्या मते बहुतांश तथाकथित आस्तिकांना उगीचच 'देव दाखव नाहीतर नास्तिक हो' प्रकारचे खेळ खेळायची आवड नसते. ते त्यांच्या देवकार्यात मग्न वगैरे असतात. बहुतांश तथाकथित नास्तिकांना ती आवड, वेळ वगैरे सगळं असतं. (मुख्य म्हणजे जर आस्तिक हिंदू असेल तर मुसलमान, ख्रिश्चन, दलित, बौद्ध, ब्रिगेडी आणि तत्सम लोक जरी ते त्यांच्या तथाकथित देवाला मानत असतील तरी केवळ हिंदूंशी वाद करण्याकरिता त्यात उडी घेतात, ते वेगळंच). मुख्य म्हणजे देव कसा नाही हा वादविवाद आस्तिक कधीच जिंकू शकत नाहीत कारण एकतर त्यांना पुरावा देता येत नाही, आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे प्रतिगामी म्हणून बघितलं जातं. तथाकथित नास्तिक लोकांच्यात तथाकथित पुरोगामी, समाजवादी, साम्यवादी आणि वर उल्लेख केलेल्या सगळ्यांचा भरणा असल्यानं आस्तिकांशी वाद करताना तो माजोरडेपणा जाणवतोच. आणि इथे माजोरडे पणा ला दुसरा शब्दच नाही. खास करून हिंदूंच्या श्रद्धांवर हल्ला करण्यासाठी लॉजिकचा आसरा घेणार्‍यांना दुसरं काय म्हणायचं ते सांगा मग. बाकी दाभोळकरांचं उदाहरण घेवू. आस्तिक लोक दाभोळकरांना तुम्ही आस्तिक व्हा म्हणून मागे लागले होते का हो? अनंतमूर्तींनी मूर्तीवर मूत्र विसर्जन करायला काही हरकत नाही असं म्हणताना आस्तिक लोकांवर जो मानसिक हल्ला केला त्या मध्ये माजोरडं कोण होतं?
ज्याप्रमाणे इतराना अमुक एक ठिकाणी गेल्याने सर्व कामे पूर्ण होणार आहेत असा आग्रह धरताना लोक पहातो तद्वत बुद्धीप्रामाण्यवादी उगाच स्वतः होऊन मूर्ती तोडत बसणार नाही. किंबहुना तो त्या मूर्तीतील सौंदर्य शोधेल.
उगीच कुणाला आस्तिक करण्यात कुणालाही इंटरेस्ट असेल असं मला वाटत नाही. ती मनाची अवस्था आहे. ती जबरदस्तीनं बदलता येत नाही. जसं देव नाही हे जबरदस्तीनं पटवता येत नाही तसंच.
घरात ठरावीक देवाचीच पूजा व्हावी असा दुराग्रह धरणारे लोक इतर देवतंचा प्रसादही घेत नाहीत.एका धर्मात बाळ कृष्णाची पूजा केली जाते तेथे कृष्ण हा मोठा झाल्यावरचे कार्यच अमान्य करन्यात येते हा किती विरोधाभास म्हणायचा. तेच लोक गणपतीच्या आरतीला अमान्य ठरवतात, सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद नाकारताना पाहिले आहेत.
तुम्ही नक्की कुणाबद्दल बोलताय माहिती नाही पण एखाद्या घरात फक्त शिवाला मानणारे किंवा विष्णूला मानणारे असू शकतात. बहुतांश आस्तिक लोक असं करतील असं वाटत नाही पण तसं न करणं ही चुकीचं नाही. श्रद्धा ही गोष्ट विज्ञानाच्या आणि लॉजिकच्या चौकटीत बसवता येत नाही. त्यांना वाटतं, ते करतात. तुम्ही का त्यांना जबरदस्तीनं प्रसाद देताय?
अशा लोकाना अडमुठे म्हणायचे नाही तर दुसरे काय म्हणायचे. स्वतःचे म्हणणे तेच बरोबर दुसर्‍यानी सुद्धा तेच अंगीकारावे असे म्हणणारात आणि औरंगजेबात फरक तो काय. त्याने तलवारीच्या बळावर केले हे लोक इतराना भावनीक ब्लॅकमेल करत करतात इतकाच.
पुन्हा एकदा. डॉक्टर लागू म्हणतायत की देवाला रिटायर करा. आस्तिक लोक त्यांना पूजा करायला सांगतायत का? नक्की कोण कुणाच्या श्रद्धांवर हल्ला करतोय एकदा तपासून पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्रभाकर पेठकर Fri, 09/18/2015 - 09:36 नवीन
डॉक्टर लागू म्हणतायत की देवाला रिटायर करा. आस्तिक लोक त्यांना पूजा करायला सांगतायत का? नक्की कोण कुणाच्या श्रद्धांवर हल्ला करतोय एकदा तपासून पहा. काळापहाडसाहेब, डॉक्टर लागूंचे ते विधान तपशिलात मला माहित नाही. त्या विषयावरील त्यांचे पुस्तक मी कधी वाचलेले नाही. त्यामुळे त्यावर कांही भाष्य करणार नाही. पण मला आजवरच्या माझ्या अनुभवातून जाणवलं आहे की हा विषय २ +२ = ४ इतका गणिती नसल्याने वादाला अनेक फाटे असे फुटतात की ज्याला कुठलेही अंतिम ठिकाण नसते. आस्तिकाला चर्चा भरकटविण्याचे सहज सुलभ मार्ग त्यातून सापडतात. त्यातून 'श्रद्धा' नांवाचं संरक्षक कवच आणि 'माझी श्रद्धा' हे नास्तिकाला बाहेरच ठेवण्यासाठी 'मेन गेट' असतं. ते एकदा बंद करून घेतलं की नास्तिक त्याच्या जगात आणि आस्तिक आपल्या जगात अशी स्वच्छ विभागणी होते. पण ते गेट बंद करून न घेता चर्चा चालू राहीली तर आस्तिकाला अनेक प्रश्नांची उत्तरे देणे अवघड होते. उत्तरे माहित नसतात किंवा अस्तित्वातच नसतात. त्याने तो निरुत्तर होतो आणि आपली 'हार' होते आहे असे मानून श्रद्धेची कवचकुंडले परिधान करतो. नास्तिकाचे तसे नसते एखाद दुसर्‍या प्रश्नाने तो निरुत्तर होऊ शकतो पण ९८ टक्के चर्चा तो व्यवस्थितपणे हाताळू शकतो. आपण निरुत्तर होऊ अशी भिती नसल्याने तो चर्चेला तयार असतो पण तशी खात्री नसल्याने आस्तिक असतो तो 'श्रद्धेवर हल्ला होतो आहे, श्रद्धेवर हल्ला होतो आहे' असा आरडाओरडा करून चर्चा टाळतो. कुणीही तथाकथित नास्तिक, आस्तिकाच्या श्रद्धेवर हल्ला करून ती बदलू शकत नाही. कोणी तसा प्रयत्न जरी करीत असेल तरी तो दखलपात्र गुन्हा ठरावा. आस्तिकाला तर्कशुद्ध विचारांसाठी प्रवृत्त करावा, जेणे करून तो स्वतःच स्वतःशी वाद घालून आपल्या धारणा तपासू शकेल आणि कांही प्रमाणात त्यांत बदल (त्याला तसे वाटले तर) करू शकेल, असा प्रयत्न नास्तिक करू शकेल. श्रद्धेवर हल्ला करणं काय पण, श्रद्धा अजिबात नसावी असेही मी कधी म्हणत नाही. जसे शरिकाला पोषक अन्नाची गरज असते आणि अती तेलकट, तुपकट, तिखट, मसालेदार आणि आरोग्यासाठी अहितकारी मानले गेलेले अन्न वर्ज्य असते पण तरीही जिभेचे चोचले म्हणून आपण थोड्याबहुत प्रमाणात वडापाव, बर्गर, पिझ्झा खातच असतो. तशीच श्रद्धा मनाच्या पोषणासाठी पोषक असते. मग ती देवावर असू दे, साधू संतांवर असू दे, समाजातील थोर व्यक्तीमत्वांवर असू दे किंवा अगदी आपल्या माता-पित्यांवर असू दे. ती जरूरी असते. सतत आजूबाजूला वावरणार्‍या गैर प्रलोभनांपासून स्वतःला वाचविण्यासाठी जे मनोबळ लागते ते मिळवून देण्याचे काम श्रद्धा करते. दोलायमान मनाला स्थिर करण्यासाठी श्रद्धा उपयोगी पडते. श्रद्धा मनाचे आरोग्य जपते. पण श्रद्धा व्यक्त करण्याचे साधन म्हणून जो कर्मकांडाचा आधार असतो/घेतला जातो त्याचा अतिरेक मनाचे आरोग्य बिघडविणारा असतो. ते करू नका असे माझे म्हणणे असते. ही अतिश्रद्धा, अंधश्रद्धा एखाद्याच्या जिवावरही उठू शकते. माझ्या शेजारी एक मुलगा राहात होता. असेल तेंव्हा २०-२२ वर्षाचा त्याला रात्री घरातच साप चावला. कुणाच्या तरी सांगण्यावरून घरच्यांनी त्याला मांत्रिकाच्या घरी (१०-१२ किलोमिटर लांब, डोंगरात) नेला त्या मांत्रिकाने २-३ तास मंत्रोपचार केला पण मुलाची तब्येत ढासळत गेली शेवटी घरच्यांनी त्याला केईएम इस्पितळात नेला तो पर्यंत ८-१० तास उलटून गेले होते. केईएमच्या डॉक्टरांच्या हाताबाहेर केस गेली होती. तरणाताठा, कमवता, शांत, सुस्वभावी मुलगा हातचा गेला. मांत्रिकाकडे न जाता लगेच केईएम ला गेले असते तर डॉक्टर त्या मुलाला वाचू शकले असते. माझा एक कर्मचारी आहे. त्याच्या बायकोला ब्रेस्ट कॅन्सर झाला. कोणाच्या तरी सांगण्यावरून (आणि त्याचाही त्यावर विश्वास आहे) नाशिकला कोणा 'वीट बाबा' कडे बायकोला न्यायचा विचार करत होता. तो बाबा त्याच्या हातातली मंतरलेली वीट रुग्णाच्या डोक्याला लावतो आणि रुग्ण खडखडीत बरा होतो अशी त्याची प्रसिद्धी आहे. मी माझ्या कर्मचार्‍याला झापला आणि डॉक्टरी उपाय करायला सांगीतले. नंतर ऑपरेशनवगैरे करून आता ती बरी आहे. आपल्या आजूबाजूला अशा देव, तांत्रिक-मांत्रिक, बाबा, माँ, साधू वगैरे अनेकांच्या यशस्वी कथा पसरविणारे अनेक जण असतात. त्याला कोणी बळी पडता कामा नये. तुकाराम महाराज म्हणतात - नवसे कन्या पुत्र होती, मग का कारणे लागे पती? देवावर विश्वास ठेवा पण त्याचा अतिरेक करून हातावर हात ठेवून विसंबून कृतीहीन होऊ नका. अशा प्रकारच्या 'श्रद्धेच्या' आहारी जाऊ नका. देव चराचरात भरलेला आहे ही आपल्या धर्माची शिकवण असताना, मुंबईहून शिर्डी पदयात्रा करण्याची आवश्यकता नसते. तो श्रद्धेचा अतिरेक आहे. दोन हात आणि मस्तक एव्हढीच सामग्री पुरते श्रद्धा व्यक्त करायला. आस्तिकांच्या अशा प्रकारच्या श्रद्धेच्या अतिरेकाला माझा विरोध आहे. ह्या अतिरेकातील फोलपणा मी समजाविण्याचा प्रयत्न करतो पण जर त्या आस्तिकाला(?) पटत नसेल तर त्याचे मन/विचार बदलण्याचा प्रयत्न सोडून देतो. पण हा अतिरेक टाळण्याचा प्रयत्न करावयास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे एखाद्याच्या श्रद्धेवर 'हल्ला' आहे का? श्रद्धा नक्कीच, असावी, मुर्तीपुजाही करावी पण अतिरेक करू नये. बोलण्यात, आचरणात शुद्धता बाळगा त्याहून मोठी इश्वर आराधना कुठली नाही. हा प्रतिसाद वैयक्तिक तुम्हाला उद्देशून नसून एकूण अतिरेकी सश्रद्ध लोकांना उद्देशून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
र
राजेश घासकडवी Fri, 09/18/2015 - 14:26 नवीन
उत्तम प्रतिसाद. निव्वळ प्रश्न उपस्थित केल्यामुळे 'श्रद्धेवर हल्ला' होत नाही. त्यावर शांत, संयत उत्तर देता येतं की 'बाबारे, मला या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत. पण या या गोष्टींवर माझा ठाम विश्वास आहे. तुझ्या युक्तिवादाने दोलायमान होईल इतकी ती कमकुवत निश्चित नाही.' पण श्रद्धेपोटी कोणी तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे आपल्या आप्तांचे जीव धोक्यात घालत असेल तर मात्र काहीतरी कृती करावी लागते. आपल्या आसपास दिसणाऱ्या, मिपावर वावरणाऱ्या, सुशिक्षित मंडळींचा - कधी श्रद्धेवर अवलंबून राहाण्याऐवजी वैद्यकीय मदत घ्यायची, तसंच वैद्यकीय उपाय खुंटले की कधी श्रद्धेचा आधार घ्यायचा - याचा समतोल चांगला साधलेला दिसतो. त्यामुळे एकमेकांना न ओरबाडता शांत चर्चा होऊ शकेल अशी आशा वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
द
द-बाहुबली गुरुवार, 09/24/2015 - 10:34 नवीन
एकमेकांना न ओरबाडता शांत चर्चा होऊ शकेल अशी आशा वाटते.
म्हणजे चर्चा करायची तयारी आहे तर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ग
गॅरी ट्रुमन Mon, 09/14/2015 - 09:35 नवीन
मी स्वतः अस्तिक आहे. पण कुठल्याही व्रतवैकल्यांना, पूजाबिजांना न मानणारा आहे. स्वतःहून देवळात कधीच जात नाही पण इतर कोणी बरोबर असेल आणि बरोबरच्या व्यक्तींना देवळात जायचे असेल तर माझीही जायला काही ना नसते. मुंज झाल्यानंतर पूजा घरच्यांच्या सक्तीमुळे २-३ वर्षे केली. त्यानंतर एकदाही घरातल्या देवांची पूजा केलेली नाही.मी कॉलेजात असताना माझी आई माझ्या बहिणीकडे मस्कतला २-२.५ महिने गेली होती आणि मी घरी एकटाच होतो.त्यावेळी मी माझ्या आईला निक्षून सांगितले होते की मी पूजाबिजा काही करणार नाही.तुला हव्या असतील तर मूर्ती बरोबर घेऊन जा आणि तिथेच पूजा कर. तरीही देवावर माझा नक्कीच विश्वास आहे (आणि तो का, कशाबद्दल वगैरे गोष्टींविषयी कोणतीही चर्चा करण्यात मला स्वारस्य नाही). आता मग मी या तीनपैकी नक्की कुठच्या कॅटेगिरीमध्ये आहे? म्हणजे या तीन कॅटेगिरी अत्यंत चुकीच्या गृहितकावर आधारून केलेल्या आहेत. म्हणजे अस्तिक माणूस आणि पूजापाठ करणारा, स्तोत्रे म्हणणारा या दोन गोष्टी इंटरचेन्जेबली वापरलेल्या आहेत.तशा त्या असतातच याला आधार काय? गणपती उत्सवात लाऊडस्पीकरवर कोकलणारी माणसे, अमक्यातमक्या देवाच्या जयंतीच्या दिवशी धांगडधिंगा घालणार्‍या माणसांना ते लोक सगळ्या गोष्टी 'देवासाठी' करतात म्हणून तुम्ही अस्तिक जरूर म्हणाल.पण अनेकदा सगळ्यात चोर माणसे असे देवदेव करतात आणि आपल्या मनातील अपराधीपणाची भावना कुठेतरी कमी करायचा प्रयत्न म्हणून या सगळ्या सो कॉल्ड धार्मिक गोष्टी करतात. अशा लोकांना तुम्ही जरूर अस्तिक म्हणाल पण मी अशा चोरांना देवाचा स्वत:च्या स्वार्थासाठी वापर करणारे ढोंगी माणसे म्हणेन. आणि लोक गैरवापर करतात म्हणून 'देव' हा प्रकारच रद्दड आहे असे नास्तिक लोक नक्कीच म्हणतात पण कुठल्याही चांगल्या गोष्टीचा चुथडा करणे हा मनुष्यस्वभाव झाला.त्यामुळे चुथडा झाला म्हणजे मुळातली गोष्टच बेकार आहे असे अजिबात म्हणता येणार नाही. एकूणच माझ्यासारख्यांची नेहमी पंचाईत होते.याचे कारण म्हणजे मी अस्तिक आहे असे म्हटले तर कर्मकांडवाले मला त्यांच्यातलाच एक समजतात आणि मी कर्मकांडांच्या विरोधी आहे असे म्हटले की स्वयंघोषित बुध्दीप्रामाण्यवादी मला त्यांच्यातलाच एक समजतात. एकूणच या नास्तिक लोकांविषयीचे एक निरिक्षण लिहितो. आपली अस्तिकता घराच्या चार भिंतींआड ठेवावी असे ते इतरांना म्हणतात तेव्हा मुळात ते अस्तिकतेची व्याख्या रस्त्यावर चाललेल्या धांगडधिंगा खरोखरच 'देवासाठी' चाललेला असतो हे गृहित धरून इतरांना उपदेश करतात हे वर लिहिलेच आहे. पण त्याहूनही थोडे अधिक म्हणजे इतरांनी आपली अस्तिकता घराच्या चार भिंतींआड ठेवावी असे म्हणताना आपली नास्तिकता पण तशीच चार भिंतीआड ठेवावी हे का विसरतात? आपण नास्तिक असल्याचा काय अभिमान असतो अशांना. आपण जन्माला हिंदू आलो म्हणून त्याचा अभिमान, अमुक एका जातीत जन्माला आलो म्हणून त्याचा अभिमान वगैरे अभिमान धरणार्‍यांचे अभिमान त्यापुढे बरेच फिके पडतील.समजा तुमचा देवात विश्वास नाही असे असेल तर ते तुमच्यापाशी ठेवा ना. जगभर त्याचे डिंडोरे पिटत फिरायची काय गरज आहे?
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 09/14/2015 - 10:36 नवीन
निव्वळ पंखा लिखाण : डायरेक धोतराला हात घातलात तुम्ही !!!!(स्वगत इतके मुद्देसूद कधी लिहिता येईल मज-पामराला)
म्हणजे या तीन कॅटेगिरी अत्यंत चुकीच्या गृहितकावर आधारून केलेल्या आहेत. म्हणजे अस्तिक माणूस आणि पूजापाठ करणारा, स्तोत्रे म्हणणारा या दोन गोष्टी इंटरचेन्जेबली वापरलेल्या आहेत.तशा त्या असतातच याला आधार काय? गणपती उत्सवात लाऊडस्पीकरवर कोकलणारी माणसे, अमक्यातमक्या देवाच्या जयंतीच्या दिवशी धांगडधिंगा घालणार्‍या माणसांना ते लोक सगळ्या गोष्टी 'देवासाठी' करतात म्हणून तुम्ही अस्तिक जरूर म्हणाल.पण अनेकदा सगळ्यात चोर माणसे असे देवदेव करतात आणि आपल्या मनातील अपराधीपणाची भावना कुठेतरी कमी करायचा प्रयत्न म्हणून या सगळ्या सो कॉल्ड धार्मिक गोष्टी करतात. अशा लोकांना तुम्ही जरूर अस्तिक म्हणाल पण मी अशा चोरांना देवाचा स्वत:च्या स्वार्थासाठी वापर करणारे ढोंगी माणसे म्हणेन. आणि लोक गैरवापर करतात म्हणून 'देव' हा प्रकारच रद्दड आहे असे नास्तिक लोक नक्कीच म्हणतात पण कुठल्याही चांगल्या गोष्टीचा चुथडा करणे हा मनुष्यस्वभाव झाला.त्यामुळे चुथडा झाला म्हणजे मुळातली गोष्टच बेकार आहे असे अजिबात म्हणता येणार नाही. एकूणच माझ्यासारख्यांची नेहमी पंचाईत होते.याचे कारण म्हणजे मी अस्तिक आहे असे म्हटले तर कर्मकांडवाले मला त्यांच्यातलाच एक समजतात आणि मी कर्मकांडांच्या विरोधी आहे असे म्हटले की स्वयंघोषित बुध्दीप्रामाण्यवादी मला त्यांच्यातलाच एक समजतात.
अहो असं नाही काय, एखादा डॉ.चुकला निदानात/उपचारात आणि त्याचा गंभीर परिणाम झाला तर वैद्यकशात्रच फालतू/फडतूस आहे असे म्हणने म्हणजे पुरोगामीत्व धरले जात नाही पण रस्त्यावरच्या धांगडदिग्याला, घरात शांतपणे कुणालाही त्रास न होता (आणि आप्ल्या जबाबदार्या-कर्तव्ये पार पाडून) केलेल्या जपालाही एकाच तागडीत टाकून मिपावर हेटाळणी प्रतीसाद दिला की तुम्ही पुरोगामी झालाच म्हणून समजा.
मी करतो तीच श्रद्धा, बाकीच्यांची ती अंधश्रद्धा इतकीच पोथी उराशी कवटाळली म्हणजे झाले.
मुकाट नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
प
प्रसाद गोडबोले Mon, 09/14/2015 - 10:48 नवीन
मी करतो तीच श्रद्धा, बाकीच्यांची ती अंधश्रद्धा इतकीच पोथी उराशी कवटाळली म्हणजे झाले.
मुकाट का झालात नाखु ? अपल्या मित्राची आठवण आली का हो टुम्हाला ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु Mon, 09/14/2015 - 10:52 नवीन
तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते पहात जावे चित्ती असू द्यावे समाधान ! "मुका" ट नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ग
गॅरी ट्रुमन Mon, 09/14/2015 - 10:52 नवीन
मी करतो तीच श्रद्धा, बाकीच्यांची ती अंधश्रद्धा इतकीच पोथी उराशी कवटाळली म्हणजे झाले.
यासंदर्भात "आमचा तो शास्त्रीय दृष्टीकोन आणि इतरांची ती अंधश्रद्धा" असे कुठेतरी वाचले होते. मला तरी ते वाक्य भलतेच आवडले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ब
बॅटमॅन Mon, 09/14/2015 - 10:45 नवीन
अत्यंत बाळबोध गृहीतकांवर आधारलेले लेखन. नास्तिक असणं ही अभिमान बाळगण्याची गोष्ट आहे वगैरे मुक्ताफळे उधळणार्‍यांकडून अजून कसली अपेक्षा ठेवायची म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
विजुभाऊ Mon, 09/14/2015 - 13:40 नवीन
नास्तिक असणं ही अभिमान बाळगण्याची गोष्ट आहे
हा हा हा. गर्व से कहो सारखे हेही असते हे माहीत नव्हते ब्याट्या.... पण असायला प्रत्यवाय नसावा. नाही का! एकुणातच चर्चा गंडत चाललीय्ये. आस्तिक असण्याचा कर्मकांडाशी संबन्ध का जोडला जातो? बहुतेक कर्मकांडाच्या शोऑफ शिवाय आस्तिकतेचा ट्यार्पी कमी पडत असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 09/14/2015 - 14:08 नवीन
स्वतःला अमुक एका विचारसरणीच्या नावे आपण लै भारी आहोत असे प्रदर्शन करायचे असले की "मी भारी तर बाकीचे आपोआपच येडे" ठरतात, सबब आस्तिकता = कर्मकांड अशी अडाणी समीकरणे जोडली जातात. ते चालायचेच, असते एकेकाची गरज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
वामन देशमुख Mon, 09/14/2015 - 11:17 नवीन
समजा तुमचा देवात विश्वास नाही असे असेल तर ते तुमच्यापाशी ठेवा ना. जगभर त्याचे डिंडोरे पिटत फिरायची काय गरज आहे? +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ऋ
ऋतुराज चित्रे Mon, 09/14/2015 - 12:53 नवीन
समजा तुमचा देवात विश्वास नाही असे असेल तर ते तुमच्यापाशी ठेवा ना. जगभर त्याचे डिंडोरे पिटत फिरायची काय गरज आहे? अगदी बरोबर बोललात. आस्तिकांनी आपला देव रस्त्यावर आणुन रहदारीला अडथळा आणायचा, ट्रेनमध्ये मोठ्याने देवाच्या आरत्या म्हणायच्या, रस्त्यावर लाउड्स्पिकर लावून ध्वनीप्रदुषण करायचे, कोणी विरोध केला की त्याला नास्तिक ठरवायाचे, नास्तिकता 'शो ऑफ' करतो म्हणायचे. आस्तिकांनी सार्वजनीक ठिकानी आपल्या आस्तिकतेचा 'शो ऑफ' बंद केल्यावरही एखाद्या नास्तिकाने रस्त्यावर 'शो ऑफ केल्यास त्याला जोड्याने मारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
न
नाखु Mon, 09/14/2015 - 14:10 नवीन
ऋतुप्रमाणे न वाचता नीट वाचा
म्हणजे या तीन कॅटेगिरी अत्यंत चुकीच्या गृहितकावर आधारून केलेल्या आहेत. म्हणजे अस्तिक माणूस आणि पूजापाठ करणारा, स्तोत्रे म्हणणारा या दोन गोष्टी इंटरचेन्जेबली वापरलेल्या आहेत.तशा त्या असतातच याला आधार काय? गणपती उत्सवात लाऊडस्पीकरवर कोकलणारी माणसे, अमक्यातमक्या देवाच्या जयंतीच्या दिवशी धांगडधिंगा घालणार्‍या माणसांना ते लोक सगळ्या गोष्टी 'देवासाठी' करतात म्हणून तुम्ही अस्तिक जरूर म्हणाल.पण अनेकदा सगळ्यात चोर माणसे असे देवदेव करतात आणि आपल्या मनातील अपराधीपणाची भावना कुठेतरी कमी करायचा प्रयत्न म्हणून या सगळ्या सो कॉल्ड धार्मिक गोष्टी करतात. अशा लोकांना तुम्ही जरूर अस्तिक म्हणाल पण मी अशा चोरांना देवाचा स्वत:च्या स्वार्थासाठी वापर करणारे ढोंगी माणसे म्हणेन
आपण सगळ्यांना एकाच प्रवर्गात टाकल्याबद्दल आपले जाहीर अभिनंदन. आता पुढील ग्रुहितिइके लिहून आम्हाला कृतकृत्य करा ही विनंती. घरात गुमान जप करणार्या-पूजा करणार्या आस्तीकास (देव भोळ्या नाही):
  • रस्त्यातला मंडपाचा त्रास होत नाही.
  • तो वर्गणी-झुंडशाहीला घाबरत नाही.
  • त्याला धार्मीक स्थ्ळांची ठिकाणची अनागोंदी आणी अस्वच्छता आवडते
तसेच जे या धाग्यात इतरांना आस्तीक्=देव आराधना करणारा=कट्टर दुराग्रही धार्मीक=वरील चोर मंडळी= चंगळी बुवां-बाबांचे खंदे समर्थक यांना एकाच प्रवर्गात कोंबण्याचा अट्टाहास्+आटापिटा करतात ते कधीही कंपनीत्,सोसायटीत कुठलीही धार्मीक वर्गणी देत नाहीत.त्याच्या वैयक्तीक आयुष्यात कुठलीही पूजा करीत नाहीत. किंवा पूजेस जात नाहीत. त्यांचे परिसरात कुठलीही सार्वजनीक प्रार्थनास्थळे नाहीतच.(असूच शकत नाहीत) ६ मंगल कार्यालयाचे परिसरात रहात ,दांडीया आणि मंगल कार्यालयाच्या* उपद्रवाची संबधीतांकडे तक्रार करणारा, तरीही घरी नित्यपूजा करणारा जुनाट नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
ब
बॅटमॅन Mon, 09/14/2015 - 14:10 नवीन
योग्य प्रतिसाद, पण फोकस वेगळ्या गोष्टींवर आहे. आस्तिकांनाही धड अक्कल नाही आणि नास्तिकांनाही नाही. वैचारिक माज असा फिजिकली दिसत नाही म्हणून तो निरुपद्रवी वाटतो इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
न
नाखु Mon, 09/14/2015 - 14:17 नवीन
कसे विशुद्ध पुरोगामी आहेत हे दाखविण्याच्या अट्टाहासापायी इतर सगळ्यांकडेच पूर्वग्रह दूषीत नजरेने बघणे आणि प्रतिसादात त्याची मौक्तीके उधळणे डोक्यात जातात हे खरे. आमटेंच्या सिनेमात यावर व्यवस्थीत भाष्य आहे. अति अवांतर : सध्या काय वाचन चालू आहे. उत्सुक नाखु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 09/14/2015 - 14:19 नवीन
सध्या मेहेंदळ्यांचे शिवचरित्र वाचतो आहे, पचवायला वेळ लागतोय बर्राच. लयच डीटेल्ड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
व
वॉल्टर व्हाईट Mon, 09/14/2015 - 21:53 नवीन
वैचारिक माज असा फिजिकली दिसत नाही म्हणून तो निरुपद्रवी वाटतो इतकेच.
नेमके आणि मार्मिक, आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रसाद गोडबोले Mon, 09/14/2015 - 10:42 नवीन
माझा गोंधळ ह्या इथे धार्मिक ( रीलीजीयस ) आणि अध्यात्मिक ( स्पिरितुअल) ह्या दोन मधे माझा घोळ होत आहे. एखादा अजिबात धार्मिक नसणारा ( सत्यनारायणादिक कर्मकांडे न करणारा ) माणुस प्रचंड अध्यात्मिक असु शकतो , अन सतत कर्मकांडे करणारा धार्मिक मनुष्य प्रचंड आधिभौतिक असु शकतो . देव मानण्याचा अन धर्म मानण्याचा एकामेकाशी काही संबंध नाही . माझे बाबा एका मंदीरात पुजारी आहेत , पण त्यांनी एकदा मला स्पष्ट पणे सांगितले होते की देव अशा काही त्रयस्त सुपरनॅचरल पावर च्या अस्तित्वा बाबत ते साशंक आहेत , स्केप्टीकल आहेत पण जोवर देव नाहीच असा खात्रीशीर पुरावा मिळत नाही तोवर जर तो आहे असे मानुन मनाला शांती लाभत असेल , आनंद लाभत असेल तर त्याचे अस्तित्व मानायला काय हरकत आहे ? बाबा सारी कर्मकांडे करतात पण आजही देवाच्या नसण्याच्या सबळ पुराव्या अभावी असणे त्यांनी मान्य केले आहे ! आई देवापुढे रांगोळी काढणे , फुले आणणे निर्माल्य टाकणे वगैरे अगदी भक्ती भावाने आनंदाने आनंदासाठी करते पण देव आहे की नाही ह्याने तिला फरक पडत नाही ( आणि उद्या देव नाही ह्याचा खात्रीशीर पुरावा मिळाला तरीही ती हे सारे करत राहीलच अशी मला खात्री आहे ! ) आणि माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर ' न हि मनुष्यात श्रेष्ठतरम विद्यते किंचित । ' असा माझा ठाम विश्वास आहे . देव असं काही नसतं ! ज्याला लोकं देव देव म्हणतात तो तुच आहेस " तत्वमसि " !! एकदा हे कळाले की कसलेच कर्मकांड करायचा प्रश्नच येत नाही आणि मी करतही नाही ! आचार्यांनी म्हणल्या प्रमाणे " योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः । यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दति एव || " आणि ह्यामुळे माझ्या लेखी देवापेक्षा कर्मसिध्दांत जास्त महत्वाचा आहे ! मार्कस ऑरेलियस च्या शब्दात सांगायचे झाले तर : 5. Every moment think steadily as a Roman and a man to do what thou hast in hand with perfect and simple dignity, and feeling of affection, and freedom, and justice, and to give thyself relief from all other thoughts. And thou wilt give thyself relief if thou doest every act of thy life as if it were the last, laying aside all carelessness and passionate aversion from the commands of reason, and all hypocrisy, and self-love, and discontent with the portion which has been given to thee. Thou seest how few the things are, the which if a man lays hold of, he is able to live a life which flows in quiet, and is like the existence of the gods; for the gods on their part will require nothing more from him who observes these things प्रतेक क्षणी विचार कर , एक रोमन म्हणुन , एक माणुस म्हणुन - जे कर्म तुमच्या हातात आहे ते अत्यंत पर्फेक्शनने , आदराने स्वतंत्रपणे , प्रेमाने न्यायाने आणि सर्वात महत्वाचे की संपुर्ण एकाग्रतेने कोणत्याही दिस्ट्रॅक्ट्शन शिवाय , पार पाडले पाहिजे . आयुश्यातील प्रत्येक क्षण असा जग की जणु काही तो आयुष्याचा अंतिम क्षण आहे निष्काळजी पणा दुर सारुन , अहंकार स्वार्थ विरोधाभास दुर सारुन , केवळ तर्काला धरुन आणि सर्वात महत्वाचे की जे कर्म हाती आले आहे त्याविषयीची अतॄप्तीची भावना दुर सारुन ! आणि मग लक्षात येईल की साधे सोपे आयुष्य जगण्या साठी किती कमी गोष्टींची गरज असते ते ! अशा प्रकारे आयुष्य जगणार्‍या माणसांकडुन प्रत्यक्ष देवांनाही अजुन कसलीच अपेक्षा रहात नाही !! असो .
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी Mon, 09/14/2015 - 11:33 नवीन
मी धार्मिक नाही पण अध्यात्मिक आहे . त्यामुळे वरचे प्रश्न मला गैरलागू वाटतात . मुळात ह्या लेखाचं प्रयोजन काय आहे ? धार्मिकता आणि देव , पाप , पुण्य ह्यांचा संबंध नाही .तुम्ही कुठल्याही धर्माचे असा . तुमची कर्म महत्वाची . म्हणजे आता जैनांमध्ये अहिंसेला फार महत्व आहे . इतर लोक मारे nonveg चा पुरस्कार करतात . पण हिंसा ती हिंसाच . जैनांनी केली म्हणून त्यांना जास्त पाप आणि हिंदू किवा मुसलमानाने केली म्हणून कमी पाप असं थोडंच असतं . वैश्विक नियम सगळ्यांसाठी सारखेच आहे .
'देवबाप्पा पाप देईल'
देवबाप्पा पाप देतो ? अहो पाप पुण्य आपण करतो . देवबाप्पा शिक्षा किवा बक्षीस देतो .
माझ्या आईने सर्व सणवार, रोजची पुजाअर्चा, कुळधर्म-कुळाचार, उपासतापास केले. म्हातारपणी (का कोण जाणे पण..) ते सर्व व्यर्थ होते अशी तीची भावना होत गेली आणि सर्व उपास तिने सोडून दिले.
हे सर्व करून देव अप्रसन्न होत नसेल पण प्रसन्न होतो का ?लोक वरच्या सगळ्या गोष्टी करतात पण कर्मांचं काय ? कितीही पुजाअर्चा, कुळधर्म-कुळाचार, उपासतापास केले तरी त्याची फलं चांगल्या वाईट कार्मान्नुसारच मिळणार आहेत . आयुष्याच्या शेवटी मरणापूर्वी संपूर्ण आयुष्याचा पट एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यांपुढे उघडून दाखवला जातो .पाप पुण्याची यादी दाखवली जाते . आणि मग आयुष्यभर जे केलं ते चांगलं होतं कि वाईट , पाप होतं कि पुण्य , अर्थपूर्ण होतं कि निरर्थक ह्याचा उलगडा होतो . पण सावरण्याची वेळ निघून गेलेली असते
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 09/14/2015 - 12:55 नवीन
आई .. बाबा .. पोर =एष .. धर्म: .. टन्ना टन: झाले १०० ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
प
प्रसाद गोडबोले Mon, 09/14/2015 - 13:08 नवीन
एष .. धर्म: .. टन्ना टन:
मस्त प्रतिसाद ! अवांतर : बाकी परवा हॉटेल समाधानला मटन भाकरी आवडली की नाही ते सांगितलेच नाही तुम्ही . ह्या धाग्यावर लिहायचे होते ना काहीतरी ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 09/14/2015 - 14:04 नवीन
मी कस सांगणार? तुम्ही खाल्लेल असल्यावर? काहीही ह़ टन्नाटन्नः टुमचं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 09/14/2015 - 13:05 नवीन
देवबाप्पा शिक्षा किवा बक्षीस देतो .
देवबाप्पा शिक्षाही देत नाही अन बक्षीस ही देत नाही .... नमस्यामो देवान्ननु हतविधेस्तेऽपि वशगा विधिर्वन्द्यः सोऽपि प्रतिनियतकर्मैकफलदः । फलं कर्मायत्तं यदि किं अमरैः किं च विधिना नमस्तत्कर्मभ्यो विधिरपि न येभ्यः प्रभवति । । ९४ । । भर्तृहरिनीतिशतकम्
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
प
प्रभाकर पेठकर Tue, 09/15/2015 - 08:41 नवीन
तुडतुडी, माझ्या प्रतिसादातील माझ्या आई विषयी मी जी वस्तुस्थिती सांगितली आहे त्याचा आधार घेऊन तुम्ही केलेले भाष्य मला कळलेच नाही. कितीही पुजाअर्चा, कुळधर्म-कुळाचार, उपासतापास केले तरी त्याची फलं चांगल्या वाईट कार्मान्नुसारच मिळणार आहेत. ह्याचा अर्थ माझ्या आईच्या बाबतीत मी काय घ्यावा? कृपया सांगाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
म
मारवा Mon, 09/14/2015 - 12:42 नवीन
आयुष्याच्या शेवटी मरणापूर्वी संपूर्ण आयुष्याचा पट एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यांपुढे उघडून दाखवला जातो तुडतुडी जी हा चित्रपट कोण दाखवतो ?
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 09/14/2015 - 13:39 नवीन
रामसे बंधु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 09/14/2015 - 14:17 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
न
नाखु Tue, 09/15/2015 - 10:45 नवीन
मोहन भाकडी ची कल्लाकारी. आप्ल्यासाठी कला १ आप्ल्यासाठी कला २
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
द
द-बाहुबली Tue, 09/15/2015 - 10:47 नवीन
ठ्ठो..! =)) XD xD xD xD
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
म
मराठे Mon, 09/14/2015 - 16:46 नवीन
आई-वडील २, मी ३.५ अगदी काही वर्षांपूर्वीपर्यन्त मी देवळात कधी कधी जात होतो; पण आताशा ते-ही बंद झालेय. थोडं इथल्या चर्चेविषयी, (विशेषतः प्रतिसादांविषयी); बर्‍याच लोकांची धार्मिकता, आध्यात्मिकता, अस्तिकता यांमधे गल्लत होते. त्याच्या ऐवजी, साधारण तुमच्या आईवडिलांपेक्षा तुम्ही देवाचं करता का? असा प्रश्न सुद्धा चालेल असं वाटतं. साधारण पणे आजूबाजूला पाहिलं तर असं दिसतं की आजी-आजोंबाच्या काळात (६०-७० वर्षांपूर्वी) ब्रतवैकल्य/पूजाअर्चा/विटाळ वगैरे प्रकार बर्‍यापैकी प्रचलित होते, त्या-मानाने आईवडिलांच्या काळात (३०-४० वर्षांपूर्वी) व्रतवैकल्य/विटाळ बरेच कमी झाले (शहरीकरणामुळे ?) आणी आताच्या काळात वाढत्या जागतिकीकरणामुळे असेल कदाचित पण विटाळ बहुतेकांच्या आयुष्यातून हद्दपार झाला आहे, पूजा-अर्चा नित्यांतून नैमित्तिकांत आल्या आहेत, आणि व्रतवैकल्या।ची जबाबदारी "फक्त आईवडील सांगतात म्ह्णून" करण्यापुरती उरली आहे. थोडक्यात खाजगी जीवनात कर्मकांडांचं महत्व कमी होत जाताना दिसतं (सार्वजनिक जिवनात मात्र उलटं होत आहे असं वाटतं)
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Mon, 09/14/2015 - 18:05 नवीन
बरोब्बर, मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला नेमकं समजलेलं आहे.
थोडक्यात खाजगी जीवनात कर्मकांडांचं महत्व कमी होत जाताना दिसतं (सार्वजनिक जिवनात मात्र उलटं होत आहे असं वाटतं)
असं दिसतंय खरं. कदाचित वेगळ्या डेमोग्राफिक्समध्ये हा प्रवास वेगळा असेल. इथे जे चित्र दिसतंय ते सुशिक्षित मध्यम किंवा उच्चमध्यमवर्गीय, कॉंप्युटर/इंटरनेट सॅव्ही, बहुतांश शहरी अशा लोकांचं आहे. मात्र हे डेमोग्राफिक जर आज दहा टक्क्यांचं असेल तर दहापंधरा वर्षांनी वीस टक्क्यांचं होऊ शकेल. आकडे निश्चित नाही, पण वाढणार हे मात्र खरं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे
प
प्रभाकर पेठकर Tue, 09/15/2015 - 08:47 नवीन
मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला नेमकं समजलेलं आहे. अरेरे! आम्हाला समजलेच नाही. असो. मराठे साहेबांनी दिलेले त्यांचे निरिक्षण हे सर्वांनाच जाणवणारे आहे. मग ह्या सर्वेचा उपयोग आणि उद्देश काय? जे निरिक्षण मराठेसाहेबांनी नोंदविले आहे तेच घासकडवी साहेबांनाही आपल्या आजूबाजूला दिसत असेलच. आणि आईवडिलांबद्दल म्हणाल तर दर पिढ्यांमध्ये वैचारिक उत्क्रांती की काय म्हणतात ती होतच असते. त्यासाठी कौलाची गरज काय? असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
म
मराठे गुरुवार, 09/17/2015 - 15:05 नवीन
पेठकरकाका, मला मराठे-साहेब बिहेब म्हणू नका हो, फारच वय झाल्या सारखं वाटतं. अजून पंत्/साहेब वगैरे म्हणण्याएवढा मोठा झालो नाहिये. (मला वाटतं काही काही आडनावं अशी असतात की त्यांना संबोधनं आपोआप चिकटतात.. ) सदस्यनाम बदलून घ्यायला पाहिजे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
र
रामपुरी Mon, 09/14/2015 - 18:22 नवीन
पण जाता जाता अवांतर: तुम्हाला "जी उत्तरे अपेक्षित आहेत" ती उत्तरे ऐसीअक्षरे (ऐसीलक्तरे???) वर मिळतील. मिपाकर असल्या धाग्याचा काथ्या करून कुटणार. तेव्हा हा धागा तिथे काढावा हा आगाऊ सल्ला :)
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Mon, 09/14/2015 - 20:43 नवीन
@ घासकवडी.....
तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध आहात ?
याचे उत्तर तुम्ही पहिल्यांदा द्यायला हवे, ते तुमचे उत्तर काय ?? तुमच्याघरची याबाबतची परिस्थीती काय आहे ?? कारण धागा तुम्ही टाकलाय, लोकांकडून असली माहिती घेण्याअगोदर आपल्याला त्याबद्दल काय वाटते हे प्रथम आपण लोकांना सांगितले पाहिजे.
एका बाजूला आपल्याला धर्माचा वरचष्मा सामाजिक जीवनात वाढताना जाणवतो. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यात धर्माचं स्थान कमी होताना दिसतं.
म्हणजे नेमक काय हे जरा अधिक विस्ताराने सांगाल का ?? बरे, तुमची धर्माची व्याख्या काय ?? धर्म म्हणजे तुम्ही नेमके काय समजता ?? या विषयावर धागा काढण्याचा व काथ्याकूट घडवून आणण्यामागचा तुमचा मुख्य हेतु काय ?? हे मला पडलेले प्रश्ण.....!!!
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Mon, 09/14/2015 - 21:03 नवीन
याचे उत्तर तुम्ही पहिल्यांदा द्यायला हवे, ते तुमचे उत्तर काय ?? तुमच्याघरची याबाबतची परिस्थीती काय आहे ?? कारण धागा तुम्ही टाकलाय, लोकांकडून असली माहिती घेण्याअगोदर आपल्याला त्याबद्दल काय वाटते हे प्रथम आपण लोकांना सांगितले पाहिजे.
उत्तर दिलेलं आहे हो. या प्रतिसादात.
बरे, तुमची धर्माची व्याख्या काय ?? धर्म म्हणजे तुम्ही नेमके काय समजता ?? या विषयावर धागा काढण्याचा व काथ्याकूट घडवून आणण्यामागचा तुमचा मुख्य हेतु काय ?? हे मला पडलेले प्रश्ण.....!!!
आता मला तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच तेच सांगायला नको वाटतं, पण प्लीज, जरा प्रतिसाद वाचा हो. मूळ लेखात जे स्पष्ट झालेलं नाही, त्याचं स्पष्टीकरण मी वेगवेगळ्या पद्धतींनी दिलेलं आहे. असं करा, कंट्रोल एफ दाबून त्यात या धाग्यातच 'राजेश' असं सर्च करा, म्हणजे माझे प्रतिसाद एकामागून एक दिसतील. त्यात दिलेली आहेत हो उत्तरं. प्लीज, जरा वाचा एकदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 09/15/2015 - 05:01 नवीन
चला, आता घासू गुर्जींचं टायटलच क्लिअर करून टाकतो! ;)
तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध आहात?
यातल्या "आहात?" चं उत्तर मिळत आहे/मिळेल. मी "असतात का?" ,याचं उत्तर सांगून टाकतो. मी गेली १७वर्ष पौरोहित्य करताना जे जवळून पाहिलेलं आहे,त्या आधारावर हे उत्तर आहे. किशोर वयापासून ते विवाहपूर्व वयापर्यंत बहुसंख्य मुलं पालकांच्या दबावा खाली पूजेला बसत असतात. स्वत: हौसेनी पूजेला बसणाय्रा मुलांचं प्रमाण २० टक्क्या पेक्षा जास्त नाही. पण हे सर्व पालकांच्या क्रुपा छत्राखाली जगत असतानाचं वर्तन आहे..जेंव्हा मुलं कॉलेज संपवून नोकरी शोधणे,लागणे.. या स्वत:च्या स्व'तंत्र आणि हरेक प्रकारची जबाबदारी अंगावर-पडणाय्रा विश्वात शिरतात तेंव्हा ही नास्तिकांची आस्तिक बनलेली दिसली आहेत , आणि वीस टक्के हौशींपैकी बरीच जणं नास्तिकतेकडे वळलेली पहायला मिळालेली आहेत. आता हे सगळं स्टेडी केंव्हा होतं? तर ते होतं विवाहानंतर. मग मात्र मजा मजा पहायला मिळालेली आहे.. त्याला मी तरी कुठल्याही प्रकारचं "लेबल" लावायचं धाडस करणार नाही. कारण हीच ती मुलं असतात जी विवाहपूर्व आयुष्याच्या दोन टप्प्यात दोन बदल घेउन जगलेली असतात. ती एकाच वेळी नास्तिकंही असतात आणि आस्तिकंही! हे अनिर्णित अवस्थेतलं प्रमाण ८० टक्के आहे. उरलेल्या २० टक्क्यांमधे डायरेक दोन टोकं आहेत. १) कट्टर सनातनी (म्हणजे आंम्ही ज्यांना टनाटनी म्हंन्तो,त्ये एष धर्म: टन्नाटन्न: वादी.. जे धर्माचा स्वयंलिप्त अर्थ-काढून त्यातून आपलं टन्नाटन्नी जीवण जगतात. ) २) पुरोगामी सेक्युलर ( म्हणजे व्यवहारात - फुर्रोगामी फेक्युलर..ह्यांचं प्रमुख लक्षण म्हणजे हे स्वत:चा वैयक्तिक {शिल्लक असलेला} धर्म सोडून बाकिच्यांच्या धर्मांबाबत अगदी भयंकर निरपेक्ष असतात. एष धर्म: टन्ना टन्न: वाद्यांचे हे सावत्र भाऊच जनू!!! ) ===================== आता यातूून तुम्माला काय घ्यायचा त्यो शोधबोध घ्या हो... घासूकाका! ;)
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 09/15/2015 - 05:28 नवीन
मस्त "उत्तर पूजा" बांधली. अभामिपासदाहारीत्जुनीवारूणीनवीबाटलीशिळीकढीउत्मातुच्छ्भ्रूजळमट्निवारक्मिपास्वच्छता अभियानाकडून बुवांना गणपती शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 09/15/2015 - 08:54 नवीन
किशोर वयापासून ते विवाहपूर्व वयापर्यंत बहुसंख्य मुलं पालकांच्या दबावा खाली पूजेला बसत असतात.................... आता हे सगळं स्टेडी केंव्हा होतं? तर ते होतं विवाहानंतर. ते स्टेडी होणं असतं की पालकांच्या दबावाखालून निघून बायकोच्या दबावाखाली गेल्यामुळे बदललेलं मत असतं ??? बुवा, करा पुढचा स्टडी याच्यावर ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 09/15/2015 - 10:44 नवीन
@ते स्टेडी होणं असतं की पालकांच्या दबावाखालून निघून बायकोच्या दबावाखाली गेल्यामुळे बदललेलं मत असतं ??? ह्या ह्या ह्या.. ,असेल..असेल हो! :D पण तरिही तो दबाव पालकांच्या इअतका चौफेर नसतो. हे ही पाहिलेलं आहे. अगदी अपवादात्मक केसेस सोडल्या तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्रसाद गोडबोले Tue, 09/15/2015 - 09:09 नवीन
हे अनिर्णित अवस्थेतलं प्रमाण ८० टक्के आहे. उरलेल्या २० टक्क्यांमधे डायरेक दोन टोकं आहेत.
आणि तिसरं एक टोकं आम्हाला माहीत आहे ३) स्वमतांध दांभिक म्हणजे स्वतःच्या फायद्या करिता जे लोकं कर्मकांडं करतात अन नंतर अगदी त्याच्या विरुध्द मत मांडुन आपणच कसे शहाणे ह्याचा प्रचार करतात ... हे म्हणजे अगदी स्वतः नळ्या ओढत , तांबडा पांढरा रसा ओरपायचा अन नंतर अहिंसा परमो धर्मः , भूतदया वर प्रवचन देत मीच कसा शहाणा म्हणत डिंडोरा पिटत फिरतात !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 09/15/2015 - 10:39 नवीन
@३) स्वमतांध दांभिक म्हणजे स्वतःच्या फायद्या करिता जे लोकं कर्मकांडं करतात अन नंतर अगदी त्याच्या विरुध्द मत मांडुन आपणच कसे शहाणे ह्याचा प्रचार करतात ... हे म्हणजे अगदी स्वतः नळ्या ओढत , तांबडा पांढरा रसा ओरपायचा अन नंतर अहिंसा परमो धर्मः , भूतदया वर प्रवचन देत मीच कसा शहाणा म्हणत डिंडोरा पिटत फिरतात !! >> एखाद्या गोष्टीचं महामूर्ख अतिरेकानी कसं एनॅलिसिस करावं,याचं हे उत्तम उदाहरण आहे. यजमान त्याचा काहितरी (धर्मशास्त्रानी सांगितलेला,आणि स्वतः गृहीत धरलेला)फायदा व्हावा ,म्हणून कर्मकांड करत असतो. त्यात पुरोहित हा ते फक्त करवून देणारा(म्हणून) ..तेव्हढाच इन्व्हॉल असतो. त्याला त्याचा कोणताही फायदा अपेक्षित नसतो..तो धर्मानीपण गृहीत धरलेला नाही..(ह्या अचरट टनाटन्यांनी तो स्वमतांध दांभिकतेनी तो गृहीत का धरा ना! ;) )दक्षिणेचे म्हणाल..तर ही जी काहि वेळाची शरीर आणि मेंदूची हमाली यजमानास्तव पुरोहिताकडून केली जाते..त्याचं ते मोल असतं..जे कुणिही घेइल.. हे सर्व कळत असूनही स्वतःवरच्या लागलेल्या दगडाचं निरसन करता नै आलं..की ही अशी चिडचिड होते. या साठी पुरोहिताला जबाबदार धरता येत नाही..(स्वतःच्या अंधमत दांभिकतेनी धरलत तरी..) ते निश्चितच निरर्थक आत्मरंजन आहे.. हे म्हणजे हलवायाला खादाड..खादाड अशी नावं ठेवण्या इतकं महामूर्ख हलकट्पणाचं टनाटनी लक्षण आहे. (ल्लुल्लुल्लुल्लु ! :p )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्यारे१ Tue, 09/15/2015 - 10:54 नवीन
अररर लैच स्वार्थी हाय की हा हलवाई. फॅमिली डॉक्टर म्हणून एखाद्यावर विश्वास ठेवून औषध घ्यायला जावं तर डॉक्टर म्हणतो तू सांग तुला जे औषध हवं ते मी गप्प बसून देतो. अवघड च आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 09/15/2015 - 11:05 नवीन
अजून एक स्वमतांध प्रतिवाद. बघा हं.. मी काय म्हणलो ते .. यजमान त्याला हवं असलेलं कर्मकांड सांगून करवून घेतो.. पुरोहित नाही त्याच्या घरात घुसून बोकांडी बसत.. हे हे कर,आणि मला पैसे दे म्हणून.. तद्वतच.. डॉक्टरकडे रुग्ण जातो..आणी त्याला सांगतो, मला हा हा आजार होतोय.. मग डॉक्टरचं काम तपासण्याचं कर्मकांड करून त्याला औषध देणं,आणि त्या मेहनीतीचे पैसे घेणं हेच. @फॅमिली डॉक्टर म्हणून एखाद्यावर विश्वास ठेवून औषध घ्यायला जावं तर >> हे बघा फिरवलं स्वतःला हवं तसं..कोणिही रुग्ण डॉक्टरकडून औषध घ्यायला जात नाही..आजार दाखवायला जातो.. त्द्वतच आमच्याकडे कोणीही कर्मकांड मागायला येत नाहीत... हे हे करायचं आहे,आपण करवून देणार का? एव्हढच विचारतात.. @डॉक्टर म्हणतो तू सांग तुला जे औषध हवं ते मी गप्प बसून देतो. अवघड च आहे. >> जाणिव पूर्वक निरर्थक फिरवाफिरवी केलेली आहे.. हे कळत असल्यामुळे.. ह्या निरर्थक स्वात्मरंजनाची आंम्ही उपेक्षा करत आहोत.. ल्लुल्लुल्लुल्लु :p :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Tue, 09/15/2015 - 11:17 नवीन
>>> यजमान त्याला हवं असलेलं कर्मकांड सांगून करवून घेतो.. त्याला हवं असलेलं जरी असलं तरी तुम्ही धर्मामध्ये सुधारणा करणारे पुरोहित असल्यानं सांगायला हवं ना? अमुक एक पूजा करुन काहीही होणार नाही किंवा ही पूजा करु नका ती करा. साध्या भोळ्या यजमानांचा हा फायदा उचलताय कि तुम्ही. ही फसवणूक आहे कि. यजमानांना काय माहिति असते का अमुक एक पूजा करायची आहे . कुणीतरी सांगतं म्हणुन ते तुमच्याकडं येतात. बुवा पूजा करायची आहे. तेव्हा तुम्ही काही सांगता का? अमुक एक कारण असलं तर हे करा अन्यथा नका करु. त्यानंतर समोरच्याची मर्जी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्यारे१ Tue, 09/15/2015 - 11:21 नवीन
आणि औषध घ्यायला जात नाही तर काय जेवणाचं निमंत्रण द्यायला जातात काय? काय बुवा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 09/15/2015 - 11:33 नवीन
, औषध घ्यायला जाणं हा नंतरचा अनुषंगिक भाग आहे. रुग्ण डॉक्टरला आधी आजारच दाखवायला गेलेला असतो.. पण हे सत्य मान्य केलं , तर तुमची आरोप करायची गैर सोय होणार.. त्यामुळे , आता "चालू द्या!"| आणी "असोच्च!"| :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा