तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध आहात?
एका बाजूला आपल्याला धर्माचा वरचष्मा सामाजिक जीवनात वाढताना जाणवतो. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यात धर्माचं स्थान कमी होताना दिसतं. त्यातलं समाजात दिसणारं चित्र आपल्याला देवळांच्या रांगा, गणेशोत्सवातली गर्दी, बातम्या यांमधून दिसत असतं. वैयक्तिक बाबतीत मिपाकरांमध्ये काय चित्र आहे हे जाणून घेण्यासाठी हा कौल घेण्याचा प्रयत्न. या कौलातून निघणारे निष्कर्ष हे अर्थातच मर्यादित सॅंपलमुळे सर्व समाजाला लागू होणार नाही, पण तरीही एका छोट्या समाजगटाचं का होईना, पण प्राथमिक चित्र निर्माण होईल अशी आशा आहे.
धार्मिकता, आस्तिकता, श्रद्धा या गोष्टी मोजायला सोप्या नाहीत. सर्वांना लागू पडेल असा मानदंड तयार करणं फार कठीण आहे. घराघरातलं चित्र वेगळं असतं. त्यामुळे मी प्रत्येकाला आपल्या घरच्या अनुभवाबद्दल विचारतो आहे. आईवडिलांच्या तुलनेने तुम्ही कितपत कमी वा अधिक धार्मिक आहात असा प्रश्न विचारणं हा प्रत्येकाला बऱ्यापैकी खात्रीलायकरीत्या उत्तर देता येण्याजोगा प्रश्न वाटतो. त्यात आईचा स्वभाव एक टोक आणि वडिलांचं दुसरं टोक अशीही शक्यता असेल. अशा वेळी शक्य तितकी सरासरी काढून उत्तर द्यावं ही विनंती.
धार्मिकता मोजण्यासाठी काय काय निकष वापरावेत हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. तरीही काही गोष्टी मी विचार करण्यासाठी नमूद करतो आहे.
- दररोज पूजा करणं
- मंदिरात नियमितपणे जाणं
- देवाला नवस बोलणं
- तीर्थयात्रा करण्यासाठी जाणं
- विवाह, मुंज, वास्तुशांत, सत्यनारायण विधियुक्त करणं
- पाप पुण्याच्या बाबतीत जागरुक असणं
- शिवाशीव, विटाळ पाळणं
- मुलांना 'देवबाप्पा पाप देईल' अशी भीती घालणं.
- घरात शुभं करोति, रामरक्षा, वगैरे सारख्या प्रार्थना नियमितपणे म्हणणं.
- घरात देवघरासाठी प्रशस्त जागा असणं
या व अशासारख्या अनेक निकषांवरून तुमचे आईवडील तुमच्यापेक्षा अधिक धार्मिक होते की कमी धार्मिक होते? हे उत्तर देण्यासाठी मी तीन विभाग करणार आहे, आणि त्यापैकी तुमचे पालक कुठे बसतात व तुम्ही कुठे बसता हे सांगा.
१. बरेच धार्मिक. (देवावर बऱ्यापैकी दृढ विश्वास; पूजा करणं, मंदिरात जाणं बऱ्यापैकी नियमित, मुलांवर धार्मिक संस्कार करण्याचा प्रयत्न इ.)
२. मध्यम धार्मिक (विश्वास असला तरी पूजा करणं आणि मंदिरात जाणं तसं अनियमित, मुलांवर धार्मिक संस्कार व्हावे याचा काहीसा प्रयत्न - पण खूप नाही इ.)
३. कमी धार्मिक (देवावर विश्वास थोडा किंवा जवळपास नाही, पूजा किंवा मंदिरात जाणं जवळपास नाही, विधी नावापुरतेच/प्रथा म्हणून, धार्मिकऐवजी सेक्युलर संस्कार इ.)
उत्तर देताना 'आईवडील २ मी ३' या स्वरूपात प्रतिसादाच्या सुरूवातीला द्यावं ही विनंती. म्हणजे मला संकलन करायला सोपं जाईल. शिवाय तुम्हाला तुमच्या मुलांविषयी किंवा त्यांच्या धार्मिक वातावरणाविषयी काही टिप्पणी करायची असेल; किंवा तुमच्यात आणि तुमच्या पालकांत नक्की काय फरक आहे याविषयी लिहायचं असेल तर प्रतिसादांत जरूर लिहा.
💬 प्रतिसाद
(205)
भ
भृशुंडी
Wed, 09/16/2015 - 23:54
नवीन
आईशप्पत धाग्याचा विषय जरा वेगळा असला तरी प्रतिक्रिया नेहेमीच्याच.
पुरणपोळीत हगून ठेवायची सवय काही जात नाही पब्लिकची- चालू द्या!
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 09/17/2015 - 08:46
नवीन
कसं लागतं ओ कॉम्बिनेशन???
- Log in or register to post comments
म
मारवा
गुरुवार, 09/17/2015 - 12:42
नवीन
घासकडवी जो सर्व्हे घेत आहेत तो विशेष आहे.
नेहमीच्या मतेमतांतरे पेक्षा वेगळा आहे.
ते एक ठोस निष्कर्षांच्या दिशेने अतिशय तार्कीक रीतीने जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अशा रीतीने समाजमनाचा कल जोखण्याचा प्रयत्न करणे अतिशय आवश्यक बाब आहे
सॅम्पल सर्व्हे छोटा असला तरी, त्याला मर्यादा असल्या तरी तो पुर्ण अचुक नसला तरी
अचुकतेच्या दिशेने जाणारा एकमात्र प्रयोग आहे.
याशिवाय दुसरा मार्ग तरी काय आहे ?
म्हणुन या वैज्ञानिक गणीतीय रीतीने चालवलेल्या उपक्रमाचा भाग होऊन
आपण आपले मत या सर्व्हे त नोंदवायला हवे असे विनम्र आवाहन मी करतो.
आपली वेगवेगळी मते चर्चा एकीकडे चालु ठेउयात
मात्र प्रत्येकाने आपली व्होटींग करुन सर्व्हेला मदत करावी
त्यात काही अडचण नाही.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Sat, 09/19/2015 - 09:04
नवीन
सर्व्हे सुरू करून सुमारे एक आठवडा झाला, तेव्हा मी आतापर्यंत आलेल्या मतांचं विश्लेषण करून ते लवकरच सादर करेन.
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
गुरुवार, 09/24/2015 - 09:21
नवीन
पेठकर साहेब , तुम्ही म्हणताय
म्हणजे त्यांच्यासोबात नक्की काय झालं हे माहित नाही . सणवार, रोजची पुजाअर्चा, कुळधर्म-कुळाचार, उपासतापास ह्यांमुळे खरच ईश्वरभक्ती होत नाही त्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागतं हे त्यांना समजलं ? कि हे सगळं करताना कर्मांकडे दुर्लक्ष झालं ? कि देवाला ह्याची अपेक्षाच नसते . त्याला दुसर्याच कशाची तरी अपेक्षा असते हे त्यांना कळलं ? काही समजायला मार्ग नाहीये .
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे ह्या केवळ बाह्यखुणा आहेत .खिचडी , रातले , वेफर्स सगळं काही खावूनपिवून उपास धरणारे महाभाग असतात . किवा दिवसभर अगदी निर्जळी उपवास जरी केला तरी केवळ उपाशी राहण्याचा आणि ईश्वरभक्तीचा काय संबंध ? मग कसा प्रत्यय येणार ?
आता सणवार घ्या . किती सणवार हे अध्यात्मिक दृष्टीकोनातून अर्थपूर्ण रीतीने साजरे केले जातात ? केवळ छान खायला मिळतंय , नवीन कपडे घालायला मिळतात , मिरवायला मिळतंय म्हणून हे सणवार . बायका सावाष्ण्यांना बोलवून हळदी कुंकू काय साजरी करतात , वत्पोर्णिमा काय करतात . गौरी काय बसवतात , हर्ताल्कीचे व्रत ,आणि कसली कसली अर्थहीन व्रतं (काही खरोखरची व्रतं सोडून ) कशा कशाला धार्मिकतेचा गंधसुधा नाही . तीच गोष्ट कुळधर्म-कुळाचाराची . हरीहरांना , आदिशक्तीला सोडून काहीतरी काल्पनिक , क्षुद्र देवता (म्हसोबा , खंडोबा , येडोबा ,जनाई , येणाई , बनाई , हि आई ती बाई , हा बाबा आणि तो राजा ) निर्माण करून अर्थहीन कर्मकांड म्हणजेच कुलाचार . काय उपयोग हो ह्या सगळ्याचा ?
exactly . तसंच नामस्मरण , ईश्वरभक्ती श्रद्धेने , मनापासून केली कि त्याचा प्रत्ययहि सगळ्यांना सारखाच येतो . एखाद्याला आयुष्यभर प्रत्यय येत नसेल तर ती केवळ दिखावू भक्ती नाही हे कशावरून ?
देवबाप्पा विनाकारण कुणालाही शिक्षाही देत नाही अन बक्षीस ही देत नाही. कर्मांप्रमाणे जे काही वाट्याला यील ते देतो .
@वामनपंडित . जावूद्याहो .योग्य वेळ आली कि नास्तिकतेचा माज बरोबर उतरतो . तोपर्यंत काय उड्या मारून घायच्या असतील त्या घेवू द्या .
अगदी बरोबर . पण हे पुस्तकी वाक्य नुसतं घोळवून काय उपयोग ? देव आपल्यात नक्की कुठे आणि कसा आहे ह्याचा शोध तर घ्यायलाच हवा ना . आणि तो घेणं ह्यालाच आस्तिकता म्हणतात .
कशावरून ? आता हा नियम कुणी केला ? इश्वर न मानणारा , देवावर विश्वास न ठेवणारा असा साधा सोपा त्याचा अर्थ असून शब्दांचं जंजाळ कशाला ?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5