Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सरसंघचालकांचे आवाहन - अवैज्ञानिक रूढी आणि परंपरांचा त्याग

स
संदीप ताम्हनकर
Fri, 09/25/2015 - 09:29
🗣 182 प्रतिसाद
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी 13 सप्टेंबर 2015 ला जयपुर येथील एका परिसंवादामध्ये अतिशय महत्वाचे विधान केले. ते म्हणाले की 'हिंदुनी शास्त्रीय पाया नसलेल्या संकल्पना सोडून दिल्या पाहिजेत'. 'हिंदूंनी इतिहासातही जुनाट, अशास्त्रीय आचरणांचा त्याग केला असून जगाकडून नव्या गोष्टी शिकल्या आणि स्वीकारल्या आहेत' असे ही ते म्हणाले. सरसंघचालक हे संघ परिवाराचे प्रमुख असल्यामुळे या विधानाला अनुसरून आणि हे भाषण हा आदेश मानून जर संपूर्ण संघ परिवाराने आणि पर्यायाने भाजप सरकारने काम केले तर या राष्ट्रासाठी ती एक अतिशय महत्वाची सामाजिक सुधारणा असेल. हिंदूंनी अवैज्ञानिक रूढी आणि परंपरा पाळणे बंद केले पाहिजे हे विधान सरसंघचालकांनी करणे हीच एक महत्वाची सकारात्मक घटना आहे. त्यांचे हे विचार, केवळ भाषणाच्या ओघात केलेले मनोरथ (Wishful Thinking) नसून प्रामाणिकपणे आणि विचारपूर्वक केलेले विधान आहे असेच मानले पाहिजे. एवढ्या महत्वाच्या आणि संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य बदलून टाकण्याचे सामर्थ्य असणाऱ्या, या विचाराच्या बाजूने, आधीचे सर्व भेदाभेद बाजूला ठेऊन, सर्वांनी आपली शक्ती एकवटली पाहिजे. सदर परिसंवादामध्ये, अश्या कोणत्या अवैज्ञानिक गोष्टींचा त्याग करायचा याचे सखोल मार्गदर्शन संघ (RSS) प्रमुखांनी केले नसले तरी या संबंधी काय करता येईल याचे टिपण नक्कीच तयार करता येईल. धर्म हीच एक अशास्त्रीय संकल्पना आहे असे काही लोकांचे मत आहे. असे असले तरी देव आणि धर्म हा माणसाच्या बालपणापासूनच्या संस्कारांचा भाग असून त्यासंबंधीचे बदल लगेचच स्वीकारले जात नाहीत, कारण स्वतःच्या अस्तित्वाला आणि श्रद्धेला (Belief System) धोका आहे असे वाटून व्यक्ती प्रतिकारात्मक प्रतिक्रिया देते आणि नवीन विचार स्वीकारत नाही असा शास्त्रीय अनुभव आहे. त्यामुळे धर्म आणि देव या संकल्पनांच्या गाभ्याला कोणताही धक्का न लावता इतर अशास्त्रीय रूढी नक्कीच तत्काळ बंद करता येऊ शकतील. १. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा (ज्याचा सुस्पष्ट असा जादूटोणा विरोधी कायदा आज उपलब्ध आहे) ह्या नक्कीच अशास्त्रीय आहेत. - भूत, चमत्कार, अलौकिक शक्ती, गुप्त धन, अतींद्रिय शक्ती, कारणी, जादूटोणा, जारणमारण, चेटूक, मंत्राने विष उतरवणे, बोटाने शस्त्रक्रीया इत्यादी. २. पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या सर्व चालीरीती, रूढी, परंपरा - जलप्रदूषण - नदी अथवा तलावात, समुद्रात निर्माल्य, अस्थि आणि राख विसर्जन, गणेश मूर्ती, दुर्गा मूर्तींचे विसर्जन, ध्वनी प्रदूषण - करणाऱ्या मिरवणुका, गुलाल, फटाके, हवेचे प्रदूषण - होळीसाठी वृक्ष तोड आणि जाळणे, चितेवर मृतदेहाचे दहन, यज्ञ-याग, अन्नाची नासाडी. ३. जात - शास्त्रीय कसोटीवर सर्वांच्याच गुणसूत्रात सरमिसळ आहे हे सिद्ध झालेले आहे, त्यामुळे जात ही सर्वात मोठी अशास्त्रीय परंपरा आहे. ४. शब्द प्रामाण्याचा त्याग - पर्यायाने बुद्धिप्रामाण्याचा स्वीकार. ५. नवस सायास, बळी देणे, दक्षिणा, चमत्कारांचे समर्थन करणाऱ्या पोथ्या आणि पुराणे इत्यादी. (सर्वानुमते सदर यादी सुधारता अथवा वाढवता येईल) संघ परिवाराच्या दृष्टीने पाहता भारतात राजकीय सत्ता मिळाली आहे त्यामुळे आता सर्व शक्तीने आणि सर्वांनी मिळून या सामाजिक सुधारणांसाठी झटले पाहिजे. संघ परिवार या विचारावर प्रत्यक्ष कृतीला जेव्हा सुरुवात करेल तेव्हा करेल पण सध्या किमान असे काम करणाऱ्या सामाजिक संघटना आणि व्यक्तींच्या कामामध्ये अडथळा आणण्याचे काम बृहद संघ परिवारातर्फे केले जाऊ नये असे स्पष्ट आदेश सारासंघाचालाकानी दिल्यास मोठेच राष्ट्र उत्थानाचे काम होईल. संघाची ताकद मोठी आहे, संघाने मनात आणले तर काळाच्या ओघात रूढी - परंपरांच्या शुद्धीकरणाचे काम नक्कीच होईल आणि त्या कामामध्ये सर्व पुरोगामी, बुद्धिप्रामाण्यवादी चळवळीतले कार्यकर्तेही जोमाने सहभागी होतील हे नक्की.
वर्गीकरण
संघ
सरसंघचालक
अवैज्ञानिक
रूढी
परंपरा

प्रतिक्रिया द्या
30478 वाचन

💬 प्रतिसाद (182)
स
संजय पाटिल Fri, 09/25/2015 - 09:56 नवीन
सर्व प्रथम हे सरसंघचालक यांचे वैयक्तिक मत आहे का संघाची भुमिका म्हणून मांडलिये, हे बघावे लागेल. अर्थात अत्ता पर्यंतचा ईतिहास बघता संघचालक यांचे मत हेच संघाची भुमिका समजले गेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याला विरोधासाठी विरोध करणारे पण हळूच पुढे येतील. प्रत्येक वेळी हिंदुनांच का सुधारणांचा सल्ला दिला जातो?( आता हे विचार्णारे कोण असतील हे वेगळे सांगायला नको) काहिही असो, तुम्ही म्हणताय तसे जर खरेच असेल तर संघ सुधार्तोय असेच म्हणावे असे वटते.
ब
बाळ सप्रे Fri, 09/25/2015 - 15:10 नवीन
संघ सुधार्तोय असेच म्हणावे असे वाटते
परफेक्शन को इंप्रूव्ह करना ना मुमकीन होता है.. हे माहीत नाही ??
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
व
विजुभाऊ Tue, 09/29/2015 - 06:26 नवीन
सर्व प्रथम हे सरसंघचालक यांचे वैयक्तिक मत आहे का संघाची भुमिका म्हणून मांडलिये, हे बघावे लागेल
सांघाच्या बाबतीत हे सर्वात सोपे समीकरण आहे. जोपर्यन्त वादविवाद होत नाहीत तोपर्यन्त ते संघाची भुमीका असते. वाद उफाळली तर सोयीनुसार ते वैयक्तीक मत होते.
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
प
प्रसाद गोडबोले Fri, 09/25/2015 - 10:21 नवीन
सरसंघचालकांचे आवाहन - अवैज्ञानिक रूढी आणि परंपरांचा त्याग
सत्यनारायण ही हिंदु उपासनेतील सर्वात जास्त अवैज्ञानिक प्रथा आहे , तिला कोणत्याही वेदांचा उपनिषदांचा गीता ब्रह्मसुत्रांचा आधार नाही , एव्हन , कसलाही पौराणिकही आधार नाही ! वैज्ञानिक आधार तर नाहीच नाही अन ऐतिहासिक आधारही नाही .....आणि कथेतील कित्येक भाग तर सरळ सरळ अध्यात्मिक दहशतवाद आहे ! आता पाहुया, सरसंघचालकांचे आवाहन ऐकुन पुरोहितवर्ग आणि सश्रध्द हिंदु समाज ह्या परंपरेचा त्याग करतो की स्वमतांध दांभिकता चालु ठेवुन स्वतःची तुंबडी भरत ह्या परंपरा चालु ठेवतो आणि वर परत संघावरच टीका करत रहातो ते !! =))
स
सुनील Fri, 09/25/2015 - 11:08 नवीन
पण सगळ्याच रुढी-परंपरांमध्ये विज्ञान आहे ना?
ब
बॅटमॅन Fri, 09/25/2015 - 11:25 नवीन
असेच म्हणतो. ध्यान केल्यावर शरीरात न्यूट्रिनो नामक कण येतात अशी मोलाची माहिती आम्हांस अलीकडेच मिळालेली आहे. (ते कण आल्याने काय फायदा होतो हे सांगितले नाही हा भाग वेगळा)
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Fri, 09/25/2015 - 11:36 नवीन
ध्यान वैग्रे तर सोडाच. ती तर लैच अ‍ॅडवान्स्ड गोष्ट. पण कानावर जानवे अडकवल्याने मुत्राशयाकडे जाणारी नस उत्तेजीत होते, असेही आयकले हाये!!
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 09/25/2015 - 11:47 नवीन
शिवाय मराठी व्हेज जेवणच सर्वांत सात्त्विक असे मराठी माणसाचे लेख आणि केरळी जेवण व पर्यायाने नारळाचे तेलच आयुर्वेदिकली सर्वांत बेस्ट असे केरळी माणसाचे लेखनही वाचनात आलेय. झालंच तर शिवलिंग म्हणजे न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर हे राहिले का? ;) आणि संध्याकाळपेक्षा सकाळी देवळात गेल्यावर १०.२३४५८७६% जास्त पुण्य मिळते हेही विसरलोच होतो.
↩ प्रतिसाद: सुनील
ब
बबन ताम्बे Fri, 09/25/2015 - 11:53 नवीन
अणुबॉम्बलाही निष्प्रभ करतं गायीचं शेण!: RSS
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 09/25/2015 - 12:00 नवीन
ऐकावे ते नवलच. जर असे असेल तर मग गोमांसाबद्दलचे विचार पाहता प्राचीन भारतातील ऋषींची बौद्धिक पातळी एकदम खालच्या पातळीवर होती असेच म्हटले पाहिजे. अन किरणोत्साराचे माहिती नाही, पण अशा माहितीच्या उत्सर्गाने एखाद्याचा मेंदू भरून गेला तर नंतर कितीही प्रबोधन केले तरी उपयोग होत नाही हे खरेच आहे.
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ब
बबन ताम्बे Fri, 09/25/2015 - 12:09 नवीन
हो पण त्यांच्याकडे पण गायी असतीलच की! ठीक आहे, हे फक्त भारतातच सिक्रेट ठेऊ या. :-)
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 09/25/2015 - 12:29 नवीन
हो पण ते गायी मारून खातात, सबब त्यांच्याकडे या शेणाचा साठा कमी असणार, टुकटुक!
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ब
बबन ताम्बे Fri, 09/25/2015 - 12:36 नवीन
.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
D
dadadarekar Fri, 09/25/2015 - 17:19 नवीन
गाय खाणार्‍याच्या मैल्यातही ते गुण उतरत असतील की.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बबन ताम्बे Wed, 09/30/2015 - 10:59 नवीन
ठिक आहे! कमतरता असेल तर कुणी काय साठवावं ही ज्याची त्याची इच्छा.
↩ प्रतिसाद: dadadarekar
न
नाव आडनाव Fri, 09/25/2015 - 12:14 नवीन
च्यायला, ते पाकडे धमकी देतात अणुयुद्धाची. आता टाका म्हणावं अणुबाँब. तो फुसका करण्याची टॅक्ट आली आहे आमच्याकडं. स्मार्ट सिटीतल्या सगळ्या ईमारतींवर बाहेरून शेण लावलं तर त्या अजून स्मार्ट होतील. स्मार्ट सिटीत आतून सुद्धा फरश्या बसवण्यापेक्षा सारवून घेणं कंपल्सरी केलं पाहिजे. मग तर आपली अणुबाँब पासून कायमची सुटका झाली असं म्हणायचं. आता गोहत्या बंदी आहे त्यामुळे पाहिजे तितकं शेण (जसं पाहिजे तसं - गावरान किंवा जर्सि) मिळायला प्रॉब्लेम नाही.
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
प
पिवळा डांबिस Fri, 09/25/2015 - 18:30 नवीन
पण सगळ्या इमारती आतून-बाहेरून सारवून घ्यायच्या म्हणजे खर्च खूप येईल हो! त्यापेक्षा समस्त नागरिकांनी आपल्या सर्व शरीरावर शेण थापून घेणं कंपल्सरी केलं तर? अणुसर्गापासून सुरक्षा तर मिळेलच शिवाय काळे-गोरे, सुरूप-कुरूप हा भेद नष्ट होऊन समाज एकसंध व्हायला किती मदत होईल!!! :)
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
द
द-बाहुबली Sat, 09/26/2015 - 10:34 नवीन
स्मार्ट सिटीतल्या सगळ्या ईमारतींवर बाहेरून शेण लावलं तर त्या अजून स्मार्ट होतील........ ....तर आपली अणुबाँब पासून कायमची सुटका झाली असं म्हणायचं.
मायला अधिकृतपणे स्मार्ट ठरुनही सिटीच्या नशीबी... हे ऐकणं आहेच :D :D :D :=))
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
व
विकास Fri, 09/25/2015 - 13:46 नवीन
ही बातमी एकदम रोचक वाटली म्हणून खणायला गेलो... Journal of Radioanalytical and Nuclear Chemistry मध्ये Biosorption of radiotoxic 90Sr by green adsorbent: dry cow dung powder हा एक पेपर दिसला... कदाचीत Journal of Radioanalytical and Nuclear Chemistry ऑरगनायजरच्याच छापखान्यात छापले जात असावे झालं...
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
म
माहितगार Fri, 09/25/2015 - 14:13 नवीन
ताम्बे साहेब आणि ब्याटमनराव तुम्ही कै म्हणा, त्या न्युक्लीयरच्या सुडोवैज्ञानिक गप्पा सोडल्यातर Zelia Nuttall या बाईंच्या The Fundamental Principles of Old and New World Civilizations यांच्या पुस्तकातील गोमाते विषयीचे संदर्भ गैर हिंदूंना आणि अरबस्थानात मूळ शोधणार्‍यांना कदाचित उपयूक्त असावेत.
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
श
श्रीगुरुजी Sat, 09/26/2015 - 09:33 नवीन
>>> अणुबॉम्बलाही निष्प्रभ करतं गायीचं शेण!: RSS हा दावा "राष्ट्रीय मुस्लिम मंच" या संघटनेने केला आहे असे या लेखात लिहिले आहे.
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 09/27/2015 - 04:15 नवीन
https://en.m.wikipedia.org/wiki/Muslim_Rashtriya_Manch लाभ घ्या!!! ह्याच मुस्लिम राष्ट्रिय मंच (पेरेंट आर्गेनाइजेशन आरएसएस) ने पार्लियामेंट एनेक्स ला इफ्तार पार्टी दिली होती !! दादुमियां न हे गुर्जी दोघे बसवायला हवे होते तिथे सोबत!
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 09/27/2015 - 11:37 नवीन
हे मला आधीपासूनच माहिती आहे म्हणून मुद्दामच मुस्लिम राष्ट्रीय मंचचा उल्लेख केला.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कपिलमुनी Tue, 09/29/2015 - 12:21 नवीन
The Muslim Rashtriya Manch (MRM) (translation: Muslim National Forum) is a Muslim organisation in India, affiliated to the Hindu nationalist Rashtriya Swayamsevak Sangh (RSS). बाकी चालू द्या
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विकास Fri, 09/25/2015 - 14:13 नवीन
ध्यान केल्यावर शरीरात न्यूट्रिनो नामक कण येतात अशी मोलाची माहिती आम्हांस अलीकडेच मिळालेली आहे. मला असे कोणी म्हणलं असल्यास आश्चर्याचा धक्का बसणार नाही! (पक्षी: तुमच्याशी सहमती). पण नक्की असेच म्हणलेले आहे का? कारण मला वाटते हे सगळे महर्षी महेश योगींच्या transcendental meditation च्या संदर्भातील असावे असे वाटते. आपण उल्लेखलेल्याचा जर नक्की संदर्भ माहीत असला तर सांगावा.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 09/25/2015 - 16:08 नवीन
नक्की काय लिहिलेले आहे ते माहिती नाही. मला एकाने एकदम सिरियसली सांगितले, अगदी कालचीच गोष्ट आहे म्हणून लक्षात राहिले इतकेच. बाकी त्या पेपरमध्ये नक्की काय म्हटले आहे ते सांगाल का? बायोसॉर्प्शन म्हणजे काय? कसले प्रयोग केले? इ.इ. म्हणजे नक्की कळेल तरी की आरेसेसच्या न्यूजमागचा क्लेम खर्‍या माहितीच्या आधारावर बेतलेला आहे की असंच काहीतरी ठोकून दिलंय ते.
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Sat, 09/26/2015 - 21:45 नवीन
नक्की काय लिहिलेले आहे ते माहिती नाही. मला एकाने एकदम सिरियसली सांगितले हे बरे आहे. कोणी तरी नाकावरची माशी न उडवता सांगितले आणि तुम्ही ते गांभिर्याने घेतले. विश्वास ठेवला आणि त्याचा उपयोग माहिती न शोधता कुणाला तरी ठोकायला केला. प्रश्न विचारून खात्री कराविशी वाटली नाही का? बघा तुमच्यावर विश्वास असल्याने मी पण आधीच सहमती दर्शवली होती... ;) असो. बाकी त्या पेपरमध्ये नक्की काय म्हटले आहे ते सांगाल का? बायोसॉर्प्शन म्हणजे काय? कसले प्रयोग केले? इ.इ. आत्ता लक्षात आले की त्या पेप्राचा दुवा का माहीत नाही, आधी चिकटला गेला नव्हता... हा घ्या येथे... तुम्ही वाचून त्यात काय म्हणले आहे ते लक्षात घेऊ शकता. तुमच्या सारख्याला माझ्यासारख्याने सांगणे योग्य वाटत नाही... मी पडलो फंडू - आय मीन फंडामेंटल हिंदू ;) मी बोलून कसे चालणार?
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 09/30/2015 - 08:35 नवीन
हे बरे आहे. कोणी तरी नाकावरची माशी न उडवता सांगितले आणि तुम्ही ते गांभिर्याने घेतले. विश्वास ठेवला आणि त्याचा उपयोग माहिती न शोधता कुणाला तरी ठोकायला केला. प्रश्न विचारून खात्री कराविशी वाटली नाही का? बघा तुमच्यावर विश्वास असल्याने मी पण आधीच सहमती दर्शवली होती... ;) असो.
उगा काहीतरीच?
आत्ता लक्षात आले की त्या पेप्राचा दुवा का माहीत नाही, आधी चिकटला गेला नव्हता... हा घ्या येथे... तुम्ही वाचून त्यात काय म्हणले आहे ते लक्षात घेऊ शकता. तुमच्या सारख्याला माझ्यासारख्याने सांगणे योग्य वाटत नाही... मी पडलो फंडू - आय मीन फंडामेंटल हिंदू ;) मी बोलून कसे चालणार?
हेही आपले उगीच आहे. बाकी पुस्तीची गरज नव्हती.
↩ प्रतिसाद: विकास
ए
एस Fri, 09/25/2015 - 11:08 नवीन
यातूनही स्वतःला सोयीस्कर असा आणि तेवढाच अर्थ घेऊन हिंदू धर्म कसा पुरोगामी, विज्ञानवादी, सर्वश्रेष्ठ आहे असाच प्रचार केला जाईल. प्रत्यक्षात हिंदू धर्मातील साचलेपणा आणि इतर जे काही दोष असतील ते जिथल्या तिथेच राहतील. बाकी लेख रा. स्व. संघाला छान चिमटे काढणारा आणि उपरोधिक झाला आहे.
फ
फुलथ्रॉटल जिनियस Fri, 09/25/2015 - 12:19 नवीन
छ्या! हिंदू धर्मातल्या वैदिक विज्ञानाची खिल्ली उडवायचे काम नाही सांगतो, भारतीय ईतिहासातील घोडचुका आणि जागतिक इतिहासातील खिंडारे ही पु ना ओक यांची पुस्तके राष्ट्रीय ग्रंथ म्हणुन मोदी काकांनी घोषित करावीत
प
प्रसाद गोडबोले Fri, 09/25/2015 - 12:30 नवीन
वेदांचा काय संबंध आहे इथे ?
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
फ
फुलथ्रॉटल जिनियस Fri, 09/25/2015 - 13:04 नवीन
प्रगो,वेदांमध्ये प्रचंड विज्ञान आहे त्यामुळे त्यावर पुरोगामी लोक टिका करुन वेदांना बदनाम करत असतात.आजकालचे हे क्वांटम मॅकॅनिक्स,जेनेटिक इंजिनिअरींग,सबॲटोमीक फिजिक्स,थिअरॉटीकल फिजिक्स,बायोमेकॅट्रोनिक्स,कॉस्मॉलॉजी, इव्हॉल्युशनरी बायॉलॉजी हे सगळे ज्ञान आमच्या वेंदांमध्ये होते , पाश्च्यात्य ख्रिस्ती लोकांनी जुने ग्रंथ व वेद इथुन तिकडे नेले व आज ते आम्हालाच विज्ञान शिकवत आहेत.आ हा त कु ठे ??????
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Fri, 09/25/2015 - 14:37 नवीन
आजकालचे हे क्वांटम मॅकॅनिक्स,जेनेटिक इंजिनिअरींग,सबॲटोमीक फिजिक्स,थिअरॉटीकल फिजिक्स,बायोमेकॅट्रोनिक्स,कॉस्मॉलॉजी, इव्हॉल्युशनरी बायॉलॉजी हे सगळे ज्ञान आमच्या वेंदांमध्ये होते , पाश्च्यात्य ख्रिस्ती लोकांनी जुने ग्रंथ व वेद इथुन तिकडे नेले व आज ते आम्हालाच विज्ञान शिकवत आहेत.आ हा त कु ठे ??????
तुम्हाला कोणी सांगितलय हो हे ? उगाचच कोणाच्या काहीतरी बोलण्यावरुन काहीतरी मते बनवायची अन मग विरोध करत बसायचे ... Image removed. बाकी , गणितामध्ये भारतीयांनी प्रचंड प्रगती केली होती ह्यात शंका नाही पण तुम्ही मात्र नेमका तोच उल्लेख टाळलेला आहे !
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
म
मुक्त विहारि Fri, 09/25/2015 - 15:18 नवीन
प्रचंड प्रगती केली होती ह्यात शंका नाही पण तुम्ही मात्र नेमका तोच उल्लेख टाळलेला आहे !" अहो, कदाचित ते विसरले असतील. किंवा कदाचित त्यांना असलेले ज्ञान त्यांना इथे मिपाकरांना द्यायचे पण नसेल. आता हेच बघाना, गेले कित्येक दिवस, ते "http://misalpav.com/comment/reply/31763/712577" ह्या बाबत काहीच ज्ञान देत नाही आहेत. आता बोला. (फुजि ह्यांच्या ज्ञानकणांचा फॅन) मुवि
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
फ
फुलथ्रॉटल जिनियस Fri, 09/25/2015 - 17:24 नवीन
@प्रगो,बंधो ,वेदांमध्ये अफाट विज्ञान आहे हे कुणि सांगायला का हवे, जसा सुर्याच्या प्रकाशाने सर्वांचेच डोळे दिपतात तसेच वेदातल्या ज्ञानाचं आहे, जे ज्ञानसाधनेच्या मार्गावरील पांथस्थाला वाट दाखवन्याचे अविरत कार्य करत आहेत. पण या अफाट विज्ञानाचा गैर वापर होऊ शकतो हे आपल्या प्राचीन ऋषिमुनींना ठाऊक होते त्यामुळे त्यांनी संस्कृतसारख्या देवभाषेत हे ज्ञान लिहून ठेवले. नुकतेच max plank institute of planetary sciences चे संशोधक फ्रेडरीक वॅन गॉफ यांनी ऋग्वेदातल्या फक्त काही ऋचांचा अभ्यास करुन ion engine चा शोध लावला आहे, आता मनुष्य सलग अनेक वर्श अंतराळात प्रवास करु शकतो.आह्हात्त क्कुठ्ठे!!!!!!!!!!
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 09/28/2015 - 13:11 नवीन
थोडक्यात आपण कोणताच रेफरन्स द्यायला तयार नाही आहात तर ! तुमचे म्हणणे म्हण्जे नुसती हवा आहे तर !
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
ज
जडभरत Wed, 09/30/2015 - 17:40 नवीन
त्यांना गॅसेस झालेत जोरात! पळ इथून प्रगो! त्या मूर्खाचा गलिच्छ वास नको!!!
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
मुक्त विहारि Fri, 09/25/2015 - 15:13 नवीन
"वेदांमध्ये प्रचंड विज्ञान आहे त्यामुळे त्यावर पुरोगामी लोक टिका करुन वेदांना बदनाम करत असतात.आजकालचे हे क्वांटम मॅकॅनिक्स,जेनेटिक इंजिनिअरींग,सबॲटोमीक फिजिक्स,थिअरॉटीकल फिजिक्स,बायोमेकॅट्रोनिक्स,कॉस्मॉलॉजी, इव्हॉल्युशनरी बायॉलॉजी हे सगळे ज्ञान आमच्या वेंदांमध्ये होते , पाश्च्यात्य ख्रिस्ती लोकांनी जुने ग्रंथ व वेद इथुन तिकडे नेले व आज ते आम्हालाच विज्ञान शिकवत आहेत.आ हा त कु ठे ??????" वरील माहितीबद्दल धन्यवाद..... पण काय हो, तुम्ही पण, काही गोष्टी इथे मिपावर सांगणार होतात ना? त्याचे काय झाले? लिंक देत आहे. "http://misalpav.com/comment/reply/31763/712577"
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
फ
फुलथ्रॉटल जिनियस Fri, 09/25/2015 - 17:38 नवीन
@मुवि , तुमच्या खरडवहीत लिहिले आहे की, लाभ घ्या पुस्तकाचा
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Fri, 09/25/2015 - 20:55 नवीन
तुम्ही तो विषय इथेच काढला आहे. तो इथेच व्यक्त करा. तुमच्या ज्ञानकणांचा फायदा सगळ्यांनाच होवू दे.
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
म
मांत्रिक Sat, 09/26/2015 - 12:34 नवीन
@ फु.जी.. वैदिक ऋचांमध्ये सूर्याच्या रथाला ७ घोडे असल्याचा उल्लेख आहे. सूर्यप्रकाश ७ रंगांत विभाजीत होतो हे वैज्ञानिक सत्य तुम्हाला माहीत असेलच.. या साम्यस्थळाचे स्पष्टीकरण काय? वेदांतील १००% गोष्टींत वैज्ञानिक सत्य नसेल पण काही काही सत्ये तर नक्कीच दडलेली आहेत.
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
फ
फुलथ्रॉटल जिनियस Sat, 09/26/2015 - 15:44 नवीन
खरय हो! फक्त वेदातले हे ज्ञान सरळ सांगितले असते तर् लोकांनी त्याचा गैरवापर केला असता म्हणून रथाची चाके , घोडे अशा सांकेतीक भाषेत ते सांगिअतले . एवढेच प्रसिद्ध फ्रेंच वैज्ञानिक लई झूटोस्की यांचेही असेच म्हणने आहे,2000 साली याविषयीचा त्यांचा लेख national institute of advancement of science च्या proceeding's मध्ये आला आहे. लिंक मिळाल्यास देईनच...
↩ प्रतिसाद: मांत्रिक
D
dadadarekar Sat, 09/26/2015 - 16:58 नवीन
रंग अनेक असतात. त्यातले सात दिसतात. इन्फ्रारेड , अल्ट्रावायोलेट दिसत नाहीत... ज्ञान नेमक्या भाषेत सांगावे लागते.. आजकालच्या जमान्यात तरच त्याला मान्यता मिळते.
↩ प्रतिसाद: मांत्रिक
स
सुबोध खरे Sat, 09/26/2015 - 17:08 नवीन
हितेस भाऊ जे दिसतात त्यांना रंग म्हणतात. इन्फ्रा रेड किंवा अल्ट्रा व्हायोलेट हे रंग नव्हे तर तरंग आहेत. ज्ञान नेमक्या भाषेत सांगावे लागते असे म्हणालात म्हणून लिहिले अन्यथा पास दिला असता.
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Sat, 09/26/2015 - 17:10 नवीन
ते मानवी डोळ्याला दिसत नाहीत.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 09/26/2015 - 17:16 नवीन
परत तेच जे दिसतात त्यांनाच रंग म्हणतात जे दिसतात आणी दिसत नाहीत(अदृश्य आहेत) अशा सगळ्याना तरंग म्हणतात. सगळे रंग हे तरंग आहेत पण सगळेच तरंग हे रंग नव्हेत.
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Sat, 09/26/2015 - 19:02 नवीन
त्यामुळे उगाच रंगा तरंगावर वाद नकोत.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 09/28/2015 - 06:21 नवीन
तां पण खरांच. आमची पट्टी काळी दोन आपली पांढरी पाच.
↩ प्रतिसाद: dadadarekar
म
मांत्रिक Mon, 09/28/2015 - 07:20 नवीन
अगागा, उठवला बाजार दादुमियाॅचा!!!
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 09/28/2015 - 19:38 नवीन
आधी फुटपट्टीमधला आणि ह्या पट्टीतला फरक सांगा =))
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा