सरसंघचालकांचे आवाहन - अवैज्ञानिक रूढी आणि परंपरांचा त्याग
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी 13 सप्टेंबर 2015 ला जयपुर येथील एका परिसंवादामध्ये अतिशय महत्वाचे विधान केले. ते म्हणाले की 'हिंदुनी शास्त्रीय पाया नसलेल्या संकल्पना सोडून दिल्या पाहिजेत'. 'हिंदूंनी इतिहासातही जुनाट, अशास्त्रीय आचरणांचा त्याग केला असून जगाकडून नव्या गोष्टी शिकल्या आणि स्वीकारल्या आहेत' असे ही ते म्हणाले.
सरसंघचालक हे संघ परिवाराचे प्रमुख असल्यामुळे या विधानाला अनुसरून आणि हे भाषण हा आदेश मानून जर संपूर्ण संघ परिवाराने आणि पर्यायाने भाजप सरकारने काम केले तर या राष्ट्रासाठी ती एक अतिशय महत्वाची सामाजिक सुधारणा असेल.
हिंदूंनी अवैज्ञानिक रूढी आणि परंपरा पाळणे बंद केले पाहिजे हे विधान सरसंघचालकांनी करणे हीच एक महत्वाची सकारात्मक घटना आहे. त्यांचे हे विचार, केवळ भाषणाच्या ओघात केलेले मनोरथ (Wishful Thinking) नसून प्रामाणिकपणे आणि विचारपूर्वक केलेले विधान आहे असेच मानले पाहिजे. एवढ्या महत्वाच्या आणि संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य बदलून टाकण्याचे सामर्थ्य असणाऱ्या, या विचाराच्या बाजूने, आधीचे सर्व भेदाभेद बाजूला ठेऊन, सर्वांनी आपली शक्ती एकवटली पाहिजे. सदर परिसंवादामध्ये, अश्या कोणत्या अवैज्ञानिक गोष्टींचा त्याग करायचा याचे सखोल मार्गदर्शन संघ (RSS) प्रमुखांनी केले नसले तरी या संबंधी काय करता येईल याचे टिपण नक्कीच तयार करता येईल.
धर्म हीच एक अशास्त्रीय संकल्पना आहे असे काही लोकांचे मत आहे. असे असले तरी देव आणि धर्म हा माणसाच्या बालपणापासूनच्या संस्कारांचा भाग असून त्यासंबंधीचे बदल लगेचच स्वीकारले जात नाहीत, कारण स्वतःच्या अस्तित्वाला आणि श्रद्धेला (Belief System) धोका आहे असे वाटून व्यक्ती प्रतिकारात्मक प्रतिक्रिया देते आणि नवीन विचार स्वीकारत नाही असा शास्त्रीय अनुभव आहे. त्यामुळे धर्म आणि देव या संकल्पनांच्या गाभ्याला कोणताही धक्का न लावता इतर अशास्त्रीय रूढी नक्कीच तत्काळ बंद करता येऊ शकतील.
१. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा (ज्याचा सुस्पष्ट असा जादूटोणा विरोधी कायदा आज उपलब्ध आहे) ह्या नक्कीच अशास्त्रीय आहेत. - भूत, चमत्कार, अलौकिक शक्ती, गुप्त धन, अतींद्रिय शक्ती, कारणी, जादूटोणा, जारणमारण, चेटूक, मंत्राने विष उतरवणे, बोटाने शस्त्रक्रीया इत्यादी.
२. पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या सर्व चालीरीती, रूढी, परंपरा -
जलप्रदूषण - नदी अथवा तलावात, समुद्रात निर्माल्य, अस्थि आणि राख विसर्जन, गणेश मूर्ती, दुर्गा मूर्तींचे विसर्जन,
ध्वनी प्रदूषण - करणाऱ्या मिरवणुका, गुलाल, फटाके,
हवेचे प्रदूषण - होळीसाठी वृक्ष तोड आणि जाळणे, चितेवर मृतदेहाचे दहन, यज्ञ-याग, अन्नाची नासाडी.
३. जात - शास्त्रीय कसोटीवर सर्वांच्याच गुणसूत्रात सरमिसळ आहे हे सिद्ध झालेले आहे, त्यामुळे जात ही सर्वात मोठी अशास्त्रीय परंपरा आहे.
४. शब्द प्रामाण्याचा त्याग - पर्यायाने बुद्धिप्रामाण्याचा स्वीकार.
५. नवस सायास, बळी देणे, दक्षिणा, चमत्कारांचे समर्थन करणाऱ्या पोथ्या आणि पुराणे इत्यादी.
(सर्वानुमते सदर यादी सुधारता अथवा वाढवता येईल)
संघ परिवाराच्या दृष्टीने पाहता भारतात राजकीय सत्ता मिळाली आहे त्यामुळे आता सर्व शक्तीने आणि सर्वांनी मिळून या सामाजिक सुधारणांसाठी झटले पाहिजे. संघ परिवार या विचारावर प्रत्यक्ष कृतीला जेव्हा सुरुवात करेल तेव्हा करेल पण सध्या किमान असे काम करणाऱ्या सामाजिक संघटना आणि व्यक्तींच्या कामामध्ये अडथळा आणण्याचे काम बृहद संघ परिवारातर्फे केले जाऊ नये असे स्पष्ट आदेश सारासंघाचालाकानी दिल्यास मोठेच राष्ट्र उत्थानाचे काम होईल. संघाची ताकद मोठी आहे, संघाने मनात आणले तर काळाच्या ओघात रूढी - परंपरांच्या शुद्धीकरणाचे काम नक्कीच होईल आणि त्या कामामध्ये सर्व पुरोगामी, बुद्धिप्रामाण्यवादी चळवळीतले कार्यकर्तेही जोमाने सहभागी होतील हे नक्की.
💬 प्रतिसाद
(182)
D
dadadarekar
Tue, 09/29/2015 - 05:23
नवीन
आपापल्या पट्टीत गावे.. काळी दोन काय नी पांढरी पाच काय ! आपली पट्टी सोडू नये.
.... पं. विष्णू दिगंबर पलुस्करांचा गाववाला ... ( उस्ताद दादाखान कुरुंदवाडकर )
प
पैसा
Tue, 09/29/2015 - 05:58
नवीन
सगळ्यांनी सगळीकडे गायलाच पाहिजे का?
ड
डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/28/2015 - 14:18
नवीन
दादूस, तुमी नुसता अवैचारीक वितंडवाद घाला हो, त्यात तुमचा हातखंडा आहे.
उगा शास्त्रिय कारण्परंपरेत घुसू नका... कारण तिथे तुम्ची पय्ल्याच बॉल्ला विकेट पड्तिया =)) =))
व
वगिश
Tue, 09/29/2015 - 12:55
नवीन
इथे थोडी चुक झाली आहे. " सर्व रंग हे तरंग असतात." जे तरंग मानवी डोळे बघु शकतात त्यांना आपण रंग म्हणून ओळखतो. इतर प्राणी वेगळे तरंग बघु शकतात.
श
श्रीगुरुजी
Fri, 09/25/2015 - 19:45
नवीन
>>> भारतीय ईतिहासातील घोडचुका आणि जागतिक इतिहासातील खिंडारे ही पु ना ओक यांची पुस्तके राष्ट्रीय ग्रंथ म्हणुन मोदी काकांनी घोषित करावीत
चुकलात नाना! त्याऐवजी तुमच्या लाडक्या खेडेकर आणि कोकाटेची महान पुस्तके राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जाहीर व्हायला हवीत.
त
तुडतुडी
Fri, 09/25/2015 - 13:29
नवीन
ह्या अंधश्रधा आहेत म्हणणार्यांना त्या करायला जमत नाहीत . ह्या गोष्टी खरोखर अस्तित्वात आहेत . अंधश्रद्धा नाहीत . पण त्या करण जमत नसताना आपल्याला जमतात असं खोटंच सांगणं ,त्यासाठी पैसे उकळणं , अत्याचार करणं , फ़सवणं हे मात्र गुन्हे आहेत . एखाद्याकडे अतींद्रिय शक्ती खरोखर असेल पण त्याचा दुसर्याला काहीच त्रास होत नसेल तर अशी शक्ती असणं हा गुन्हा ठरत नाही .
हे हवेच्या प्रदूषणात येतात ?
थोडक्यात हिंदू धर्म लोकांनी सोडूनच द्यावा असं म्हणायचय तुम्हाला .
आधार ?मुल्ला मौलवींची बौद्धिक पातळी काय आहे ह्याच्यावर हि बोला
अतिशय गैरसोयीचा असलेला काळा रंगाचा बुरखा वापरायची सक्ती ,शिक्षण घेण्याला बंदी , पहटे ५ लाच मशिदीतून ओरडून लोकांची झोपमोड करणं (ध्वनिप्रदूषण),४ बायका करून व्यभिचार करणं, शेखसल्ल्याच्या उर्सामध्ये मोठमोठ्या दाभणी टोचणं (ह्या दाभणी फक्त सध्या पाण्यात धुतल्या जातात . त्याच पुढच्या वर्षी दुसर्यांसाठी वापरतात . ) , ताबूत च्या वेळी अनैसर्गिक त्रास करून घेणं आणि इतरांवर तशी सक्ती करणं ,बकरी ईद च्या नावाखाली हजारो मुक्या जीवांची कत्तल करणं, माझाच धर्म मोठा बाकी सगळे काफर म्हणून त्यांना हिणवण ,सतत त्यांच्यावर टीका करणं, दंगली करणं , अजिबात स्वच्छता न पाळणं ह्या सुधा सगळ्या अवैज्ञानिक रूढी आणि परंपरा पाळणे बंद करायला हवे .
D
dadadarekar
Fri, 09/25/2015 - 17:22
नवीन
बक्री ईद मुबारक.
कुछ खाया की नही?
म
मांत्रिक
Sat, 09/26/2015 - 12:41
नवीन
ते जौ दे दादुमियां! तुम्ही कशी ईद साजरी केलीत?
D
dadadarekar
Sat, 09/26/2015 - 17:00
नवीन
आम्ही पुर्वाश्रमीचे ब्राह्मण. त्यामुळे आम्ही स्टाफला मिसळ देऊन इद साजरी केली.
अ
अनिरुद्ध.वैद्य
Wed, 09/30/2015 - 10:52
नवीन
धर्म सोडून झाल संस्कार गेले नाहीत … काय पावर नाई
ल
लालगरूड
Fri, 09/25/2015 - 18:03
नवीन
सहमत
त
तर्राट जोकर
Sat, 09/26/2015 - 21:18
नवीन
थोड्याफार फरकाने कित्येक हिंदूंतही ह्याच चालिरीती आढळतात तसेच सरसकट सगळ्या मुसलमानांंमधे आढळत नाहीत.
तुमची 'हिंदू' या शब्दाची काय व्याख्या आहे? त्यात भारतातल्या सगळ्या जाती-प्रदेश-पंथ येतात ना? (अर्थात मुस्लिम सोडून) मग 'अभ्यासोनि प्रगटावे | अन्यथा झाकोनि असावे | प्रकटोनि नासणे । बरे नव्हे|'
१. पहाटे चारपासूनच कित्येक मंदीरांचे भोंगे काकडारत्या उगाळत अस्तात. त्या आपल्या म्हणून त्रास होत नाही.
२ एकापेक्षा अधिक बायका करण्याचा रिवाज हिंदूंमधेही आहे. आत्ता आत्ता कायद्याने बंदी आली म्हणून बंद झाले (तेही वर वर). नाही तर 'पूर्वजांची सांगे किर्ती' वाल्यांनी जरा वंशावळ्या धुंडाळाव्या. व्यभिचार करायला लग्न करावंच लागतं असं नाही. दर्शनी एक बायको ठेवायची मग वेश्यालयात मुशाफिरी करायची हा काही एका विशिष्ट धर्माचा प्रांत नाही.
३. कित्येक हिंदू जत्रांमधे उरुसांपेक्षाही अनेक हिंसक, विभत्स, मूर्ख प्रकार बघायला मिळतात. दरवर्षी ह्या देवीच्या, त्या देवाच्या नावाने लाखो प्राणी तर हिंदूही मारतातच. फक्त मुसलमानांनी मारलेले बकरेच बरे डोळ्यात खुपतात...
४. माझीच जात मोठी, माझाच धर्म मोठा असं हिंदू करत नाहीत? अहो इकडून तिकडे लग्न केले तर लोक कापून काढतात हिंदूंमधे. धर्म एकच असला तरीही माज आहे मी अमुक तमुक असण्याचा असे मिरवतात हिंदू लोक. ते कोण मग?
५. स्वच्छता पाळणे ह्याचा धर्माशी काय संबंध? तिकडे गंगा बघा, अगदी आरशासारखे स्वच्छ पाणी आहे की नाही? अर्धवट जळलेले मृतदेह सरळ पिण्याच्या पाण्यात, जिला पवित्र माता म्हणतात त्या गंगा नदीत सोडून देतात. ही हिंदूंची स्वच्छता काय?
दंगली करणं हा मुद्दा तर सोडूनच द्या. सगळ्या दंगली राजकीय हेतूनी राजकीय लोकांकडून केल्या जातात. दोन्ही धर्मातले लोक दुसर्या धर्मातल्या लोकांनी कसे आपल्यावर अत्याचार केले याच्या कहान्या पुढच्या पिढ्यांना सांगत भविष्यातल्या दंगलींची बीजे पेरत राहतात.
आता हा किल्मिषांचा बाजार थांबवुया. येणार्या पिढ्यांना सिरीया, अफगाणिस्तान सारखा सतत धुमसत राहणारा देश द्यायचा आहे का आपल्याला? त्याचीच बीजे असल्या नकारात्मक, खोट्या, एकांगी प्रतिसादांतून सतत सांडत असतात.
सगळ्या मुसलमानांना कायम अतिरेकी ठरवणारे स्वतः आरशात कधी बघणार आहेत? आपणही अतिरेक करून देशाचे वातावरण दूषित करत आहोत हे कळत नाही का? उगा फालतू गोष्टींच्या चर्चा करायच्या.
इतकीच जळजळ होती, हिंमत होती, धमक होती तर कश्मिरात पंडीतांना वाचवायला एकही मायचा लाल हिंदूराष्ट्रवादी का नाही गेला? इथे मारतायत नि:शस्त्र, थकलेल्या, बेसावध म्हातार्यांना. आले मोठे आम्ही हिंदू हिंदू करणारे.
जरा कुणी धर्मसुधारणेच्या चार गोष्टी केल्या की "त्यांना आधी सांगा" असा घोषा का लावता तुम्ही लोक? त्यांचे ते बघून घेतील. तुमची खरकटी तुम्ही साफ करा. तुमच्या तोंडाला खरकटं लागलंय असं कुणी सांगतंय तर लगेच त्याला 'अरे त्या मुसलमानाने तर आठ दिवस आंघोळच नाही केली, त्याला आधी सांग' चा मूर्ख पवित्रा घेता. शतकानुशतके मुक्तधर्माचा पुरस्कार करणार्या, सतत उत्क्रांत होत राहिलेल्या हिंदूधर्माच्या सुधारणांचे बेंचमार्क मुसलमान धर्म ठरवून आपण आपल्याच धर्माला कमीपणा आणतो आहोत हे कळत कसं नाही दिडशाहाण्यांना?
D
dadadarekar
Sun, 09/27/2015 - 01:49
नवीन
सहमत
व
वगिश
Sun, 09/27/2015 - 02:47
नवीन
सहमत.
स
सुबोध खरे
Mon, 09/28/2015 - 06:29
नवीन
शतकानुशतके मुक्तधर्माचा पुरस्कार करणार्या, सतत उत्क्रांत होत राहिलेल्या हिंदूधर्माच्या सुधारणांचे बेंचमार्क मुसलमान धर्म ठरवून आपण आपल्याच धर्माला कमीपणा आणतो
याच्याशी सहमत.
हिंदू धर्मातील भंपक रूढी आणि परंपरा न पूर्ण फाटा दिला पाहिजे हि वस्तुस्थिती असली तरी शेजार्याने वाटेल तिथे गाडी पार्क करायची आणि तुम्हाला त्रास द्यायचा पण तुम्ही मात्र शिस्तीत गाडी लावायची हे सर्वसामान्य माणसाच्या मनाला पटत नाही. नो एन्ट्री मध्ये घुसल्याबद्दल तुम्हाला पकडले आणि तुम्ही दंड भरत असताना त्याच वेळेस एखादा गणवेशातील पोलिस त्याच नो एन्ट्री मध्ये घुसताना आढळला आणि तोच पोलिस तिकडे काना डोळा करताना आढळला तर तुमची जी स्थिती असते तीच आज सर्व सामान्य हिंदू माणसाची आहे.
एकदा सर्व जण एक समान आहेत असे म्हटल्यावर सर्व धर्म जाती आणि वर्गाला समान न्याय लावला पाहिजे. तुम्ही तुमचे पहा असे म्हणणे कितपत संयुक्तिक आहे?
त
तर्राट जोकर
Mon, 09/28/2015 - 15:00
नवीन
नो एंट्रीवाले उदाहरण सपाट चुकले आहे. कायदा-सिविक सेन्स आणि धार्मिक चालिरीती दोन्ही मधे मूलभूत फरक आहे.
मुसलमानांनी दाढ्या राखल्याने, सुंता केल्याने, बुरखा घातल्याने, चार बायका केल्याने, बकरे कापल्याने, आठ दिवस आंघोळ न केल्याने, रोजा धरल्याने, पाच वेळा नमाज पढल्याने हिंदूंच्या जगण्याच्या/स्वतंत्रतेच्या कोणत्या मूलभूत हक्कांवर गदा येते हे अजून कळलेले नाही.
तुमच्या पार्किंगवाल्या उदाहरणास इथे बसवले तर ते सपशेल चुकतंय. तुमच्या उदाहरणानुसार हिंदूस वरील गोष्टी करायची सवलत मिळत नाही आणि मुसलमानास बिनबोभाट मिळते आहे असे तुम्ही मांडत आहात. नेमका कोण तो पोलिस आहे जो हिंदूंना वरील गोष्टी करण्यास (ज्या त्यांना जणू खरंच करायच्या आहेत) नाकारत आहे? हिंदूंचे कायदे हिंदूंनीच बनवले की आणखी कोणी?
स
सुबोध खरे
Mon, 09/28/2015 - 16:07
नवीन
@TJ
साहेब तुमचे म्हणणे सकृतदर्शनी बरोबर वाटत असेल तरीही जर दुसरी माणसे नो एन्ट्री मध्ये घुसतात तर मीच काय पाप केलं आहे अशा विचाराने आपणही घुसतात आणी वाहतुकीचा खोळंबा होतो.
मुसलमानांना चार मुलं असायला धर्माने परवानगी दिली तर हिंदू धर्मातील धर्म मार्तंड हिंदुनी सुद्धा पाच मुले वाढवायला हवी असा आग्रह धरतात आणी त्यामुळे कोणत्याही राष्ट्रीय धोरणाला हरताळ फसला जातो. एकीकडे आपण म्हणायचे समज सुधारणा झाली पाहिजे आणी चार बायका केल्याने कोणते नुकसान झाले ते विचारता? दुसरी बायको केल्याने पहिल्या बायकोच्या हक्कावर गदा येते त्याचे काय?
आता तुम्हाला असे म्हणायचे असेल कि मला काय त्याचे तर मग एखाद्याने आत्महत्या केली तरी मला काय फरक पडतो? किंवा लोकांना पिण्याचे पाणी नसले तर मला काय फरक पडतो माझ्या तरणतलावात पाणी असले कि झाले हे म्हणण्य़ासारखे आहे.
मतांच्या राजकारणासाठी मुसलमानांना आरक्षण देण्याचे सुद्धा घाट घातले जातात. एकदा एकच न्याय सर्वाना लावला जाईल हा घटनेतील मूळ मुद्दा ( कलम १४) लाच हरताळ फासला गेला कि घटनेची पायमल्ली करायला किती वेळ लागतो?
म्हणूनच अबू आझमी सारखे नालायक लोक भर सभेत असे म्हणून शकतात कि "देश के कितने भी तुकडे होने दो!
हम किसीको अपने मजहब के साथ खिलवाड नही करने देंगे!
माझे म्हणणे एकच आहे सर्वाना समान न्याय मिळेल हे जर घटनेतील मुलभूत कलम आहे तर त्यावर अंमल बजावणी करताना कोणत्याही धर्माचा बागुलबुवा येत कामा नये आणी धर्म हा घरातच राहिला पाहिजे रस्त्यावर येण्यास मनाई च ठेवली पाहिजे
या उप्पर आपल्याला वितंडवाद घालायचा असेल तर माझा पास
त
तर्राट जोकर
Mon, 09/28/2015 - 16:32
नवीन
परत परत तेच. तुमची पोस्ट परत एकदा वाचा आणि तुम्हाला वितंडवाद म्हणजे काय हे लक्षात येइल.
धर्म घरात ठेवा म्हणायचं आणि लोकांच्या बेडरूममधे डोकावून बघायचं ह्याला काय अर्थ.
एकीकडे आपण म्हणायचे समज सुधारणा झाली पाहिजे आणी चार बायका केल्याने कोणते नुकसान झाले ते विचारता? दुसरी बायको केल्याने पहिल्या बायकोच्या हक्कावर गदा येते त्याचे काय? समाजसुधारणेची चरचा इथे हिंदूंची चालली आहे. एका मुस्लिमाच्या कितव्या बायकोच्या कोणत्या हक्कांवर गदा येते हे बघणे हे हिंदूंचे काम आहे की मुस्लिम सुधारकांचे? हिंदूंची बहुपत्नित्व प्रथा हिंदूंनी बंद केली की इतरांनी?
आता तुम्हाला असे म्हणायचे असेल कि मला काय त्याचे तर मग षःएट्खाऋय़ाणीओ आत्महत्या केली तरी मला काय फरक पडतो? किंवा लोकांना पिण्याचे पाणी नसले तर मला काय फरक पडतो माझ्या तर्न्तालावत पाणी असले कि झाले हे म्हणण्य़ासारखे आहे.
- हा वितंडवाद. नागरी, शासकिय, राजकिय धोरणांचा आणि धार्मिक चालीरीतिंचा बादरायण संबंध दाखवून बुद्धीभ्रम करायचा.
अबू आझमीसारख्यांचे वक्तव्य फार मनाला लावून घेताय. तोगडीया प्रभृती काही वेगळ्या नाहीत. त्याबद्दल काय मत?
समान नागरी कायदा व धर्म रस्त्यावर येऊ नये ही सूचना हिंदूच स्वतः किती पाळतात ते बघायला उत्सूक आहोत.
स
सुबोध खरे
Mon, 09/28/2015 - 16:55
नवीन
अबू आझमीसारख्यांचे वक्तव्य फार मनाला लावून घेताय.
हा माणूस आपला लोकनियुक्त प्रतिनिधी( आमदार) आहे आणि तो देशाचे तुकडे करण्याची भाषा बोलतो आहे आणि तुमचे म्हणणे ते मनाला लावून घ्यायचे नाही? बाकी आपली विचार सरणी पाहून आमचा पास
तोगडिया आणि अबू आझमी यांना एकाच न्याय लावला पाहिजे याबद्दल दुमत नाहीच.
जाता जाता -- आपण सरकारी नोकर आहात काय?
त
तर्राट जोकर
Wed, 09/30/2015 - 09:50
नवीन
मतपेटीकडे डोळे ठेवून लोकनियुक्त प्रतिनिधींनी आतापर्यंत किती आणि काय काय वादग्रस्त बोलले आहे याचा आपला किती अभ्यास आहे हे माहित नाही. पण अबू आझमींसारख्यांच्या निवडक वक्तव्यांना सिंगल-आउट करून "हे असलेच" असा छापा तमाम मुस्लिमांवर मारण्याचे काय प्रयोजन? तसेच या वक्तव्यांना मनाला लावून घेणार्या राष्ट्रप्रेमी-देशप्रेमी लोकांनी उत्तरादाखल काय केले हेही सांगितले तर बरे होईल.
तुमच्या पासचे विशेष कौतुक नाही. आमच्या एकाक्ष विचारसरणीसमोर रंगीत चष्मे घालणार्यांची डाळ शिजत नाही हा नेहमीचा अनुभव आहे.
तोगडीया-अबूआझमी ला एकच न्याय लावत आहात याबद्दल धन्यवाद!
जाता जाता: सरकारी नोकरीत तेही लष्करात आपण होता असे कळते. इतकी वर्षे तिथे काढूनही असले रंगीत विचार बघून मौज वाटली.
स
सुबोध खरे
Wed, 09/30/2015 - 15:07
नवीन
TJ साहेब
लष्करात सर्वांचा रंगीतच चष्मा असतो आणि ते रंग फक्त तिरंग्याचे असतात आणि मध्ये अशोक चक्र हि असते. फक्त भगवा किंवा हिरवा नसतो. तेथे सर्वाना एकच न्याय असतो. तो काय असतो हे मी मिपावर बर्याच ठिकाणी लिहिले आहे. आपणाला शोधायची तसदी घ्यायची असेल तर शोधा.
तुम्हाला कशात मौज वाटते ते तुम्ही पहा. एकाक्ष झाल्याने फक्त कोणत्याही विषयाची खोली लक्षात येत नाही किंवा त्रिमिती समजत नाही. बाकी आमचा पास आहेच त्याचे कौतुक कुणीहि का करावे?
मज पामरासी काय थोरपण
पायीची वहाण पायी बरी.
स
सुबोध खरे
Wed, 09/30/2015 - 15:41
नवीन
लष्कराची "आठवण" करून द्यायची आपल्याला गरज नाही. आयुष्याची २३ सोनेरी वर्षे मी लष्करात काढलेली आहेत. तेथे एकच न्याय सर्वाना आहे. मुसलमान असलात तरी आपल्याला चारच काय दोन लग्ने करायची परवानगी नाही. आपल्याला दाढी वाढवायची परवानगी नाही. नौदलात दाढी वाढवण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते( कारण आज वाटले दाढी ठेवली आणी उद्या काढली असे चालत नाही. ओळख पत्रावरील फोटो बदलावा लागतो).
तेथे मशिदिवरच काय पण मंदिरावरही बोम्बल्या( लाउड स्पीकर लावण्याची परवानगी नाही). आपला धर्म आपल्या घरातच ठेवावा लागतो.शाकाहारी हिंदू किंवा जैन असेल तरीही तुम्हाला कर्तव्याचा भाग म्हणून मांस हाताळावे लागेल असे लिहून द्यावे लागते. तेथे कधीही अशी धार्मिक भांडणे होत नाहीत. अकारविल्हे असल्याने माझा सहभागी साडे पाच वर्षे (माजीद) खान होता.
असो. लष्करात धर्मांधाना किंवा निधर्मांधाना थारा नाही. आणी असेच सिव्हील आयुष्यात असावे असे मला ठामपणे वाटते. मग आपण त्याला रंगीत म्हणा किंवा रंगान्ध्ता म्हणा
इति लेखनसीमा.
स
सौंदाळा
Wed, 09/30/2015 - 15:50
नवीन
बापरे
या गोष्टी माहीतच नव्हत्या.
+१००
त
तर्राट जोकर
Wed, 09/30/2015 - 16:27
नवीन
चला तर तुम्ही आता सिविल आयुष्यात आहात याची तरी आठवण करून द्यावी. तर लष्करी कायदे व त्याचे उपयोग, औचित्य लष्कराच्या अखत्यारीत. तिथल्या प्रत्येक अटी-शर्ती-कायद्याला योग्य असे उपयुक्त कारण आहे. कुणाला सहज वाटले म्हणून तिथले नियम बनत नसतील. पण कुणाची कितीही वैयक्तिक हुकुमशाहीची इच्छा असली तरी सर्व देश लष्करी कायद्याप्रमाणे चालणार नाही कारण इथे लोकशाही आहे. इथे आपआपले रंग उधळायला सर्वांना सूट आहे जोवर हे रंग आपल्यालाच त्रासदायक ठरत नाहीत. कोल्हापूरच्या गणेशमंडळांनी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने डीजेबंदी केली. कारण स्वतःलाच त्रास होतो हे लक्षात आले म्हणून. असो. निवृत्त लष्करी अधिकार्यांनी जनतेत परत आल्यावर 'प्रहार'च्या नानाच्या भूमिकेत राहून उपयोग नाही.
तरी माझ्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही सातत्याने टाळत आहात ते का समजले नाही. भारतातल्या तेरा टक्के मुस्लिमांनी बकरे कापले, गायी खाल्या, चार बायका ठेवल्या (प्रत्यक्षात किती टक्के मुस्लिम करतात हाही संशोधनाचा विषय आहे म्हणा) दाढ्या वाढवल्या, नमाज पढली, उरुस काढले, सुंता केली, बुरखा घातला तर ऐंशी टक्के हिंदूंच्या नेमक्या कुठल्या संवैधानिक हक्कांवर गदा येते? हा माझा मूळ प्रश्न तुमच्या नो-एन्ट्रीच्या उदाहरणासाठी.
स
सुबोध खरे
Wed, 09/30/2015 - 17:19
नवीन
मी माझ्याच अगोदर दिलेल्या प्रतिसादातील वाक्ये आपल्या निरीक्षणासाठी परत आपल्यापुढे ठेवत आहे. पटत असेल तर घ्या नाही तर सोडून द्या.
जर दुसरी माणसे नो एन्ट्री मध्ये घुसतात तर मीच काय पाप केलं आहे अशा विचाराने लोक आपणही घुसतात आणी वाहतुकीचा खोळंबा होतो.
दुसरी बायको केल्याने पहिल्या बायकोच्या हक्कावर गदा येते त्याचे काय?
त्याच वेळेस एखादा गणवेशातील पोलिस त्याच नो एन्ट्री मध्ये घुसताना आढळला आणि तोच पोलिस तिकडे काना डोळा करताना आढळला तर तुमची जी स्थिती असते तीच.
तुम्ही तुमचे पहा असे म्हणणे कितपत संयुक्तिक आहे?
आपले म्हणणे--- बकरे कापले, गायी खाल्या, चार बायका ठेवल्या (प्रत्यक्षात किती टक्के मुस्लिम करतात हाही संशोधनाचा विषय आहे म्हणा) दाढ्या वाढवल्या, नमाज पढली, उरुस काढले, सुंता केली, बुरखा घातला. याने काहीच फरक पडत नाही कारण हा त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे आणि त्यात कोणीही दखल देऊ नये याबद्दल दुमत नाही.
पण "चार बायका ठेवल्या"--- बायकाना आपण गायी आणि बकरे यांच्या पातळीवर आणत आहात याची खंत वाटते.
मुस्लिम वैयक्तिक कायद्यात स्त्रियांची काय परिस्थिती आहे हे आपण जाणता. एकदा धार्मिक बाबतीत "कोणालाच"(यात न्यायालये सुद्धा आली) दखल देता येणार नाही असे म्हटले कि त्यात सुधारणा करण्याचा मार्गच खुंटला.
५० टक्के लोकसंख्येला श्रुन्खलात बंदिस्त करून एखाद्या समाजाची प्रगती कशी साधता येणार? आणि समाजाच्या एका घटकाची प्रगती खुंटली असेल तर राष्ट्राची पण प्रगती खुंटते. हे विचार उदात्त आणि अव्यावहारिक आहेत असे आपले म्हणणे असेल तर काय बोलावे?
शिवाय तुम्हाला असे म्हणायचे असेल कि मला काय त्याचे? त्यांचे त्यांनी बघून घ्यावे.
असे असेल तर मग --एखाद्या शेतकर्याने आत्महत्या केली तरी मला काय फरक पडतो?
किंवा लोकांना पिण्याचे पाणी नसले तर मला काय फरक पडतो माझ्या तरणतलावात पाणी असले कि झाले हे म्हणण्य़ासारखे आहे.
आपण मी काय म्हणतो यावर विचार करून पहा.
राहिली गोष्ट प्रहार मधील नाना पाटेकर ची उपमा देण्याची. आपल्याला माझ्याबद्दल किती माहिती आहे? तशी नसताना आपण या पातळीवर उतरला याबद्दल काय म्हणणे? संवाद व्यक्तिगत पातळीवर आला नसता तर बरे झाले असते असे वाटते. असो आपली मते आपल्यापाशी.
न
नया है वह
Mon, 09/28/2015 - 15:01
नवीन
सहमत
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 09/25/2015 - 21:43
नवीन
बाबा रे संदीपा, समजा तू सुचवलेले बदल भागवतांनी,संघाने स्वीकारले व देशातल्या नागरिकांना आवाहन केले तर लोक ऐकतील का? की वागळे,सरदेसाई पुन्हा 'व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी' म्हणणार? म्हणजे गंगेत निर्माल्य टाकू नये असे संघाने सुचवले तर किती पत्रकार व लोक ते ऐकतील?
सरकार असो वा संघटना , धार्मिक चालीरिती ह्या हळूहळू मर्यादित स्वरूपातच बदलाव्या लागतात असे ह्यांचे मत.
व
विवेकपटाईत
Sat, 09/26/2015 - 06:04
नवीन
अधिकांश लोकांना संघ आणि त्याच्या कामांबाबत माहित नाही. संघाचे स्वयंसेवक सुरवातीपासूनच अंधविश्वास इत्यादींवर विश्वास ठेवीत नाही. सकारात्मक रीतीने अंधविश्वास निर्मूलाचे जेवढे कार्य संघाने केले आहे तेवढे कार्य इतरांनी कधीच केले नाही. बाकी केवळ चर्चा, सेमिनार इत्यादी करतात.
न
नितिन थत्ते
Sat, 09/26/2015 - 10:13
नवीन
>>हिंदुनी शास्त्रीय पाया नसलेल्या संकल्पना सोडून दिल्या पाहिजेत
हिंदू धर्मातली कुठली रूढी/प्रथा/संकल्पना शास्त्रीय पाया नसलेली असू शकते हेच आम्हाला मान्य नाही. तशी शंका कोणाला असेल तर इथे जाऊन त्या रूढीमागची वैज्ञानिक संकल्पना जाणून घ्यावी. =))
व
विकास
Sat, 09/26/2015 - 21:40
नवीन
हिंदू धर्मातली कुठली रूढी/प्रथा/संकल्पना शास्त्रीय पाया नसलेली असू शकते हेच आम्हाला मान्य नाही. तशी शंका कोणाला असेल तर इथे जाऊन त्या रूढीमागची वैज्ञानिक संकल्पना जाणून घ्यावी. =))
हे लिहीणारा आणि सनातन प्रभातचे दुवे देणारा (पक्षी: जाहीराती करणारा) आयडी, हा परात्पर गुरू डॉ. आठवले यांचा ड्युप्लिकेट आयडी तर नसावा ना असे सनातन प्रभातची आर एस एस बद्दलची मते माहीत असल्याने वाटू लागले आहे.... =))
न
निनाद मुक्काम …
Sat, 09/26/2015 - 11:27
नवीन
मोहन भागवत ह्यांनी आव्हान केले आहे आदेश दिलेला नाही
आता ब्रह्मवृदांची दावे उजवे सगळे मिळून काय शास्त्रीय व काय असाष्ट्रीय त्याची एक यादी बनवला
माझ्यापुरते हे तत्व मी कधीच अंमलात आणले आहे ,
तातायारावंचे विचार काही अंशी तरी आता जनमानसात रुजतील अशी एक आशा करतो ,
डोंबिवली मधील स्मशानात विद्युत वाहिनी आहे तिच्याबद्दल बोंबाबोंब झालेली ऐकवत नाही मात्र असे काशी वाराणसी येथे सक्तीने लागू केल्यास गहजब होईल तेव्हा अनेक रूढी व परंपरा ह्यांच्यातील अश्या अनके अनावश्यक रूढी लोकजागृती करून समाजातून हद्द पदर कराव्यात काही ठिकाणी सरकारने कायद्याने हस्तषेप करावा , जशी सतीची चाल साहेबाने बंद केली .
स
सुबोध खरे
Sat, 09/26/2015 - 15:55
नवीन
निनाद शेट
विद्यूत दाहिनी न येऊ देण्याची कारणे "वेगळी"असतात.
आमचे सासरे CSIR मध्ये शास्त्रज्ञ होते. ते एल पी जी वर चालणारी विद्युतदाहिनी विना नफा तत्वावर बसवून देतात.लातूर महापालिकेच्या क्षेत्रात अशी वाहिनी बसविण्यासाठी त्यांना पाचारण केले. परंतु प्रत्यक्षात तेथे गेल्यावर आमच्या धर्मावर गदा येते असे राजकारण केले. तेथे कांग्रेस आणि राष्ट्रवादीचे बहुमत आहे. पण अंदरकी बात तेथे स्मशानात लाकडे पुरवणारा कान्ग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्याच्या धन्द्यावर टाच येते. "अडचणीत सापडले कि धर्म आठवतो" या उक्ती प्रमाणे आमच्या सासर्यांना ते काम करू दिले नाही. शेवटी धर्म हा निधर्माचे गोडवे गाणारे लोकांच्याही कामाला येतोच कि.
त्यांनी लातुरलाच ग्यासची शवदाहिनी बसवली पण ती मारवाडी समाजाची खाजगी आहे. आणि तेथे जास्त लोक जातात असे ऐकून आहे. हीच कहाणी इतर बर्याच ठिकाणी आहे.
त्यांनी पनवेल महापलिकेच्या शवदाहीनीत अशी दोन उपकरणे बसविली आहेत. त्यामध्ये एका माणसाचे शव जाळण्यासाठी एका सिलिंडरचा खर्च येतो.
या सिलिंडरला सरकारी सबसिडी मिळावी असे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. याठिकाणी गरीब माणसाला ८०० रुपयात अंत्यसंस्कार करता येतात.ते ४५० रुपयात काम होईल. तेवढेही पैसे नसतील तर पनवेलचा रोटरी क्लब तेही पैसे पुरवतो. शिवाय धूर नाही घाण नाही आणि पर्यावरणाची हानी हि नाही.
तेंव्हा मुद्दा लक्षात घ्या.
द
दत्ता जोशी
Sat, 09/26/2015 - 11:55
नवीन
"प्रगो,वेदांमध्ये प्रचंड विज्ञान आहे त्यामुळे त्यावर पुरोगामी लोक टिका करुन वेदांना बदनाम करत असतात.आजकालचे हे क्वांटम मॅकॅनिक्स,जेनेटिक इंजिनिअरींग,सबॲटोमीक फिजिक्स,थिअरॉटीकल फिजिक्स,बायोमेकॅट्रोनिक्स,कॉस्मॉलॉजी, इव्हॉल्युशनरी बायॉलॉजी हे सगळे ज्ञान आमच्या वेंदांमध्ये होते ",
अहो, इलेक्ट्रोनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, स्पेस रिसर्च इ. विसरलात की!.
तसंच modern apllied enginnering आणि टेक्नोलॉजी शी संबंधित पाण्याखालील जोडकाम ( वेल्डिंग ), पाण्याखालील रासायनिक रंगकाम इ. गोशी पण आहेत. अजून सांगू का?
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Sat, 09/26/2015 - 12:37
नवीन
तर तर! होतेच, नकारुच कसे शकतात ते बघतोच मी .
द
दत्ता जोशी
Sat, 09/26/2015 - 18:20
नवीन
तर काय ....मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या म्हणजे काय त्यासाठी अभ्यास थोडाच करावा लागतो? अजून काही concept फेकायच्या असल्या तर सांगा. टाकू आपण.
श
श्रीगुरुजी
Sat, 09/26/2015 - 14:48
नवीन
मोहन भागवतांचं सोडा हो. ते संघाचे म्हणजेच पुराणमतवादी, खोटारडे, दांभिक, प्रतिगामी, संकुचित विचारांचे, जातीयवादी इ. इ.
पण पद्मभूषण पुरस्कार मिळालेले इस्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर काय म्हणतात ते पहा.
http://www.firstpost.com/living/aryabhatta-discovered-gravity-newton-says-former-isro-chief-g-madhavan-nair-2118331.html
One of the country's leading scientists and former ISRO chairman G Madhavan Nair today propounded the theory that some shlokas in the Vedas mentioned about presence of water on the moon and astronomy experts like Aryabhatta knew about gravitational force much before Issac Newton.
The 71-year-old Padma Vibhushan awardee said the Indian vedas and ancient scriptures also had information on metallurgy, algebra, astronomy, maths, architecture and astrology way before the western world knew about them.
peaking at an international conference on Vedas, he however, added that the information in vedas was in a "condensed format" which made it difficult for the modern science to accept it.
"Some sholkas in one of the Vedas say that there is water on the moon but no one believed it. Through our Chandrayaan mission, we could establish that and we were the first ones to find that out," Nair said, adding that everything in Vedas could not be understood as they were in chaste Sanskrit.
He also talked very highly about fifth century astronomer- mathematician Aryabhatta saying, "We are really proud that Aryabhatta and Bhaskara have done extensive work on planetary work and exploration of outer planets. It was one of the challenging fields.
"Even for Chandrayaan, the equation of Aryabhatta was used. Even the (knowledge of) gravitational field... Newton found it some 1500 years later... the knowledge existing (in our scriptures)," he said.
Nair, who was ISRO chairman from 2003 09, also claimed geometry was used to make calculations for building cities during the Harappan civilisation and the Pythagorean theorem also existed since the vedic period.
D
dadadarekar
Sat, 09/26/2015 - 17:08
नवीन
आर्यभट्टाचे कोणते इक्वेशन?
अ
अमृतेश सराफ
Sat, 09/26/2015 - 17:58
नवीन
वेदांबाबत केलेल्या दाव्याकरीता काही निश्चित (reliable and verifiable) संदर्भ आहे का ?
द
दत्ता जोशी
Sat, 09/26/2015 - 19:11
नवीन
पण डोळ्यावर आणि बुद्धीवर पिवळे पण चढलेल्या काही लोकांना ते दिसत नाहीत ना! ते संदर्भ वाचायला लागतात. विकी आणि आंजावर अनेक paper आहेत, संदर्भ आहेत. जे verified आहेत. ४थ्या शतकापासून भारतात बनत असलेले wootz स्टील बनवण्याचे प्रयत्न आजही जगभरात सुरु आहेत. याची माहिती सहज उपलब्ध आहे. दिल्लीचा न गन्ज्णारा खांब अजूनही न गंजता सुमारे १६०० वर्षांपासून उभा आहे. गणितातील भारतीय गणितज्ञांच्या कार्य बद्दल माहिती https://en.wikipedia.org/wiki/Indian_mathematics वरपाहायला मिळेल. आपल्याच गणितज्ञांनी या गोष्टी जगासमोर आणली आहेत. अधिकाधिक संशोधन होणे गरजेचे आहे आणि ते भारतीयांनीच करायचे आहे. सुरवात तर काही दशकांपासून झाली आहे अजून बर्याच गोष्टी हळूहळू समोर येतील अर्थात त्याला वेळ लागेल. काही लोक आपल्या डोळ्यावरचा चष्मा ना काढता वाद करत राहणारच पण निंदकाचे घर असावे शेजारी या उक्ती प्रमाणे त्यांचे स्वागतच आहे.
गाईच्या शेणाविषयी: १९८६ साली चेर्नोबिल येथे झालेल्या जगातल्या सर्वात मोठ्या अणु अपघातानंतर एक धक्कादायक बाब समोर आली होती - पूर्व युरोपात सगळी जमीन अन्नधान्य, चार, गुरे, दुध दुभते radioactive झाले असताना एका सक्तीच्या सरकारी तपासणीत ऑस्ट्रिया येथील एक फार्म वरील दुध आणि चार्यात धोकादायक पातळीपेक्षा कमी radioactivity सापडली होती . Karin Heschl नावाच्या बाईंचे ते फार्म होते. सरकारी अधिकाऱ्यांनी यामागील रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या फार्म वर केरिन बाई सूर्योदय आणि सूर्यास्ताला न चुकता अग्निहोत्र करीत होत्या इतकाच त्यांच्या आणि इतर फार्म ( जिथे दुध आणि चाऱ्याची radioactivity धोकादायक पातळीवर होती ) मध्ये फरक होता हे समोर आले. पण अर्थात मेडीयात त्याची जास्ती वाच्यता झाली नाही. पण अग्निहोत्र आणि गोमया विषयी त्या भागात बरीच चर्चा झाली. चेर्नोबिलच्या बाजूच्या सोविएट रशियाच्या सर्व लोकांनी आपापल्या घरांच्या भिंती गोमयाने सारवल्या होत्या अशी नोंद आहे. केरिन बाई अजूनही जगभर अग्निहोत्राच प्रचार आणि प्रसार करत आहेत. अर्थात याविषयी जास्ती बोलायला कोणी तयार नाही. आन्जावर याविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. आता हे जर खरे असेल तर यावर अधिक संशोधन व्हावे लागेल आणि ते संशोधन आपणच करणे आणि छातीठोकपणे जगासमोर आणणे क्रमप्राप्त आहे.
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Sat, 09/26/2015 - 18:23
नवीन
त्येच तर मी म्हणतोय श्रीगुरुजी , आमच्याकडे वेदातल्या ज्ञानाची फारच उपेक्षा झाली आहे.त्यात हे पुरोगामी लोक वेदांवर टिका करायला आघाडीवर.
calculous, discrete mathematics, statistics, ह्यांची ईत्यंभूत माहीती वेदांम्ध्ये आहे, फक्त ती सांकेतीक स्वरुपात आहे, म्हणजे बघा हा कसे, एका झाडावर दहा पक्षी बसले आहेत, तिथे एक पारधी आला, त्याने तिथे फटाका फोडला ,तर झाडावर कीती पक्षी शिल्लक राहतील?????? आता हे उदाहरण जरी बाळबोध वाटले तरी या उदाहरणात मागाल ते शास्त्र आहे , काय समजलात?
D
dadadarekar
Sat, 09/26/2015 - 18:59
नवीन
झाड म्हणजे मिसळपाव.
पक्षी म्हणजे आयडी.
पारधी म्हणजे अॅडमिन.
... उडतो आता.
द
दत्ता जोशी
Sat, 09/26/2015 - 19:18
नवीन
"calculous, discrete mathematics, statistics, ह्यांची ईत्यंभूत माहीती वेदांम्ध्ये आहे"
आहेच. आणि गुप्त सांकेतिक वगैरे काही नाही. फक्त आपल्याला माहिती नाही म्हणजे तसे नाहीच हि वृत्ती सोडून स्वयंघोषित विद्वानांनी डोळे उघडून पाहणे गरजेचे आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Indian_mathematics
श
श्रीगुरुजी
Sat, 09/26/2015 - 19:24
नवीन
फुलबॉटल डबियस,
तुझ्यासारख्या पारध्याने तुझ्यासारखेच कितीही सादळलेले आणि फुसके फटाके फोडले तरी नुसती वात जळून जाईल. पण आवाज होणार नाही, प्रकाश दिसणार नाही आणि धूरही येणार नाही. त्यामुळे झाडावरचे सगळे पक्षी शिल्लक राहतील.
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 09/27/2015 - 01:44
नवीन
एष ढर्म: टन्नाटन:
टनाटन फ्राय डर्म की ज्जय! ;)
स
सूड
Mon, 09/28/2015 - 14:01
नवीन
हे इतकं दिव्य संस्कृत वाचून डोळे पाणावले.
हे बळंच की धर्मसुधारणेचाच एक भाग?
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 09/27/2015 - 03:47
नवीन
मोहन भागवतांना अधुन मधून पुडी सोडायचा नाद लागलेला आहे, पण जे काही मत मांडलं आहे त्याचं ब्वा मी स्वागत करतो. बोलणे आणि वर्तन यात सारखेपणा यावा व संघाचा आधुनिक विचाराकडे पावलं पडावीत यासाठी संघाला मी शुभेच्छा देतो.
-दिलीप बिरुटे
द
दत्ता जोशी
Sun, 09/27/2015 - 07:54
नवीन
मुख्य विषय बाजूलाच राहिला. हिंदू धर्मातील वाईट प्रथा आणि रूढी या पुर्ण सोडल्याच पाहिजेत. हे त्यांचे म्हणणे आहे पण उगीच विषयांतर केले गेले आहे.
आज चेपू वर एक इंटरेस्टिंग पोस्त वाचली सहज डकवतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
काय गम्मत आहे बघा -
आज एकही सेलेब्रिटी आला नाही ईद कशी साजरी करावी हे सांगायला.
आज एकही पर्यावरणवादी आला नाही रक्तविरहित ईद साजरी करा असं सांगायला.
एकही प्राणी प्रेमी आला नाही कापल्या जाणाऱ्या करोडो बकऱ्यांविषयी कणव व्यक्त करायला.
ईद चा 'खरा अर्थ' काय आहे हे सांगायला एकही बुद्धिवादी आला नाही.
आणि गम्मत म्हणजे एकही पुरोगामी आला नाही हे सांगायला, की दीड हजार वर्षांपूर्वी काहीतरी घटना घडली म्हणून आज निष्पाप जीवांची निर्घृण कत्तल करणं हे किती 'मागासलेपणाचं' आहे.
पण कसे येणार म्हणा, आपण तर भारतात राहतो ना. त्यामुळे फक्त रक्षाबंधन, वटपौर्णिमा, दिवाळी, गणपती, मकर संक्रांत, पाडवा हे उत्सव कसे साजरे करावेत हेच आपल्याला शिकवलं जाणार.
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 09/27/2015 - 08:44
नवीन
स्टार्ट हमसे करेंगे ?
-दिलीप बिरुटे
श
श्रीगुरुजी
Sun, 09/27/2015 - 09:26
नवीन
>>> आज चेपू वर एक इंटरेस्टिंग पोस्त वाचली सहज डकवतो.
जबरी पोस्ट!
>>> आणि गम्मत म्हणजे एकही पुरोगामी आला नाही हे सांगायला, की दीड हजार वर्षांपूर्वी काहीतरी घटना घडली म्हणून आज निष्पाप जीवांची निर्घृण कत्तल करणं हे किती 'मागासलेपणाचं' आहे.
बादवे, बकरी ईदसाठी ज्या घटनेचा संदर्भ दिला जातो ती घटना महंमदाच्या काळात १४०० वर्षांपूर्वी घडलेली नसून त्यापूर्वी अनेक शतके घडलेली आहे असे मुस्लिम सांगतात. ज्या काळात फक्त हिब्रू (ज्यू) धर्म होता व ख्रिश्चन व मुस्लिम धर्म जन्माला आले नव्हते त्या काळातील ही घटना आहे असे सांगितले जाते.
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Sun, 09/27/2015 - 09:39
नवीन
दत्ता जोशी, तुम्हाला बकरी ईद दिवशी दालच्याची दावत मिळाली नाही म्हणुन मुसलमानांना काहून हो टार्गेट करता.????
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »