Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सरसंघचालकांचे आवाहन - अवैज्ञानिक रूढी आणि परंपरांचा त्याग

स
संदीप ताम्हनकर
Fri, 09/25/2015 - 09:29
🗣 182 प्रतिसाद
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी 13 सप्टेंबर 2015 ला जयपुर येथील एका परिसंवादामध्ये अतिशय महत्वाचे विधान केले. ते म्हणाले की 'हिंदुनी शास्त्रीय पाया नसलेल्या संकल्पना सोडून दिल्या पाहिजेत'. 'हिंदूंनी इतिहासातही जुनाट, अशास्त्रीय आचरणांचा त्याग केला असून जगाकडून नव्या गोष्टी शिकल्या आणि स्वीकारल्या आहेत' असे ही ते म्हणाले. सरसंघचालक हे संघ परिवाराचे प्रमुख असल्यामुळे या विधानाला अनुसरून आणि हे भाषण हा आदेश मानून जर संपूर्ण संघ परिवाराने आणि पर्यायाने भाजप सरकारने काम केले तर या राष्ट्रासाठी ती एक अतिशय महत्वाची सामाजिक सुधारणा असेल. हिंदूंनी अवैज्ञानिक रूढी आणि परंपरा पाळणे बंद केले पाहिजे हे विधान सरसंघचालकांनी करणे हीच एक महत्वाची सकारात्मक घटना आहे. त्यांचे हे विचार, केवळ भाषणाच्या ओघात केलेले मनोरथ (Wishful Thinking) नसून प्रामाणिकपणे आणि विचारपूर्वक केलेले विधान आहे असेच मानले पाहिजे. एवढ्या महत्वाच्या आणि संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य बदलून टाकण्याचे सामर्थ्य असणाऱ्या, या विचाराच्या बाजूने, आधीचे सर्व भेदाभेद बाजूला ठेऊन, सर्वांनी आपली शक्ती एकवटली पाहिजे. सदर परिसंवादामध्ये, अश्या कोणत्या अवैज्ञानिक गोष्टींचा त्याग करायचा याचे सखोल मार्गदर्शन संघ (RSS) प्रमुखांनी केले नसले तरी या संबंधी काय करता येईल याचे टिपण नक्कीच तयार करता येईल. धर्म हीच एक अशास्त्रीय संकल्पना आहे असे काही लोकांचे मत आहे. असे असले तरी देव आणि धर्म हा माणसाच्या बालपणापासूनच्या संस्कारांचा भाग असून त्यासंबंधीचे बदल लगेचच स्वीकारले जात नाहीत, कारण स्वतःच्या अस्तित्वाला आणि श्रद्धेला (Belief System) धोका आहे असे वाटून व्यक्ती प्रतिकारात्मक प्रतिक्रिया देते आणि नवीन विचार स्वीकारत नाही असा शास्त्रीय अनुभव आहे. त्यामुळे धर्म आणि देव या संकल्पनांच्या गाभ्याला कोणताही धक्का न लावता इतर अशास्त्रीय रूढी नक्कीच तत्काळ बंद करता येऊ शकतील. १. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा (ज्याचा सुस्पष्ट असा जादूटोणा विरोधी कायदा आज उपलब्ध आहे) ह्या नक्कीच अशास्त्रीय आहेत. - भूत, चमत्कार, अलौकिक शक्ती, गुप्त धन, अतींद्रिय शक्ती, कारणी, जादूटोणा, जारणमारण, चेटूक, मंत्राने विष उतरवणे, बोटाने शस्त्रक्रीया इत्यादी. २. पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या सर्व चालीरीती, रूढी, परंपरा - जलप्रदूषण - नदी अथवा तलावात, समुद्रात निर्माल्य, अस्थि आणि राख विसर्जन, गणेश मूर्ती, दुर्गा मूर्तींचे विसर्जन, ध्वनी प्रदूषण - करणाऱ्या मिरवणुका, गुलाल, फटाके, हवेचे प्रदूषण - होळीसाठी वृक्ष तोड आणि जाळणे, चितेवर मृतदेहाचे दहन, यज्ञ-याग, अन्नाची नासाडी. ३. जात - शास्त्रीय कसोटीवर सर्वांच्याच गुणसूत्रात सरमिसळ आहे हे सिद्ध झालेले आहे, त्यामुळे जात ही सर्वात मोठी अशास्त्रीय परंपरा आहे. ४. शब्द प्रामाण्याचा त्याग - पर्यायाने बुद्धिप्रामाण्याचा स्वीकार. ५. नवस सायास, बळी देणे, दक्षिणा, चमत्कारांचे समर्थन करणाऱ्या पोथ्या आणि पुराणे इत्यादी. (सर्वानुमते सदर यादी सुधारता अथवा वाढवता येईल) संघ परिवाराच्या दृष्टीने पाहता भारतात राजकीय सत्ता मिळाली आहे त्यामुळे आता सर्व शक्तीने आणि सर्वांनी मिळून या सामाजिक सुधारणांसाठी झटले पाहिजे. संघ परिवार या विचारावर प्रत्यक्ष कृतीला जेव्हा सुरुवात करेल तेव्हा करेल पण सध्या किमान असे काम करणाऱ्या सामाजिक संघटना आणि व्यक्तींच्या कामामध्ये अडथळा आणण्याचे काम बृहद संघ परिवारातर्फे केले जाऊ नये असे स्पष्ट आदेश सारासंघाचालाकानी दिल्यास मोठेच राष्ट्र उत्थानाचे काम होईल. संघाची ताकद मोठी आहे, संघाने मनात आणले तर काळाच्या ओघात रूढी - परंपरांच्या शुद्धीकरणाचे काम नक्कीच होईल आणि त्या कामामध्ये सर्व पुरोगामी, बुद्धिप्रामाण्यवादी चळवळीतले कार्यकर्तेही जोमाने सहभागी होतील हे नक्की.
वर्गीकरण
संघ
सरसंघचालक
अवैज्ञानिक
रूढी
परंपरा

प्रतिक्रिया द्या
30478 वाचन

💬 प्रतिसाद (182)
य
याॅर्कर Mon, 09/28/2015 - 10:11 नवीन
अपद्रव होतोच इनडायरेक्टली! दुसर्यांना नाही झाला तरी देशाला त्याचा अपद्रव होतोच. "अनावश्यक" उत्सवांना किती पैसे खर्च करता? देशाची लोकसंख्या किती? आणि देशाचे बजेट किती? याचा थोडा तरी ताळमेळ बसतो का? ते नाही म्हणून कि काय वरून सरकारी सवलती मिळवण्यासाठी पहिला नंबर आमचाच, नाही का? यामुळे काय होतयं माहित आहे का? उघड्यावर शौचास बसणारेसुद्धा देश महासत्ता होण्याची स्वप्ने पाहू लागतात.
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 09/29/2015 - 10:08 नवीन
"अनावश्यक" उत्सवांना किती पैसे खर्च करता? देशाची लोकसंख्या किती? आणि देशाचे बजेट किती? याचा थोडा तरी ताळमेळ बसतो का? >> अर्रर्र सर्कारणी दिवाळी गणपती वगैरे सरकारी खर्चातून साजरे केले म्हणताय व्हय म्हाराजा? अवांतर … अशा प्रकारच्या उत्सवांमुळे (भारतीय, पाश्चात्य गणपती, दिवाळी, ख्रिस्मस, न्यू इयर आदी ) बाजारपेठांमध्ये पैसा मोठ्या प्रमाणात येतो आणि मार्केट किंवा बिजनेसची उलाढाल वाढते :D मार्केट चंगा तो सब चंगा! डिमांड रहेंगी तो Production, Transport, Retail सब बढेगा तो ओब्वियासली जॉब बढेंगे ना यार्करभाई!
↩ प्रतिसाद: याॅर्कर
य
याॅर्कर Tue, 09/29/2015 - 10:38 नवीन
दिवाळी,ख्रिसमस का मैने उल्लेखच नही किया,क्योंकी यह 'आवश्यक' उत्सव मे आते है,बोले तो बाजारपेठ,और बिझनेस(production,transport,retail) के मामले मे, अब 'अनावश्यक' उत्सव मे कौन कौनसे उत्सव आते यह जरा विचार करने कि बात है, वो क्या है ना वैद्यभाऊ,बडे बडे अमिर लोग, दोन नंबर धंदावाले, टॅक्स को फाट्यावर मारके वो पैसे देणगी रूप देते है, और मंदीर ट्रस्टवाले उसका क्या करते है किसीको पताहीच नै.
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
द
दत्ता जोशी Mon, 09/28/2015 - 10:00 नवीन
कसलं दबदबा? चीन खालोखाल उदयाला येणारी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा दबदबा आहेच कि. तसेच आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा भारतीयांनी सर्व क्षेत्रात जगभर उमटवला आहेच कि. आता अमेरिका आणि चीन प्रगतीची शिखरे असल्याचे विधान तुम्हीच केले. तेव्हा प्रगत म्हणजे काय हा प्रश्न स्वाभाविक आहे नाही का? अमेरिकेत २३ टक्के लोक ethiest आहेत असं गृहीत धरला म्हणजे ७७ टक्के लोक कोणता न कोणता धर्म मानतात. ( पैकी ७३% लोक अभिमानाने क्रिश्चन असल्याचे नमूद करतात. ) अमेरिकेत आणि युरोपात ( यांचा दाखवायचा चेहरा भले कितीही मानवतावादी असुदे) कट्टर क्रीस्चन आणि फक्त क्रिश्चन पुरस्कार करणारे अजूनही बहुसंख्य आहेत याची आपल्याला कल्पना नसावी. धर्म आणि प्रगती मध्ये भलताच गोंधळ दिसतोय तुमचा. प्रगती विषयी बोलायचे तर जपान चीन पेक्षा जास्ती प्रगत आहे, आणि जपानी नागरिक अतिशय रूढी प्रिय आहेत्य हे तर मान्य असायला हरकत नाही. युरोप आणि मध्य पूर्व चीन पेक्षा कितीतरी अधिक समृद्ध आहे हे वेगळे पटवून देण्याची गरज नाही. जगात अमेरिकेखालोखाल युरोपचाच दबदबा आहे. इथे हे समजून घेणे महत्वाचे आहे कि या प्रगत देशातले बहुतांश लोक आपले काम प्रामाणिकपणे आणि सचोटीने करतात. तुम्ही जेव्हा कामाला, समाजात जाता तेव्हा तुमची जात आणि धर्म विसरून जावून आपापले काम प्रामाणिकपणे आणि चांगल्या प्रकारे करणे हे एक राष्ट्रीय कर्तव्याच आहे असे मला बापड्याला वाटते. आपल्याकडे हे होतंय का? आपल्या मागासलेपणाची कारणे प्रामाणिकपणे तपासली तर आपल्या मागासलेपणाचे मुळ या बिन कामाच्या राजकारण आणि भ्रष्टाचारात आहे हे दिसेल पण उगीचच मागासले पण = पूजा अर्चा असे समीकरण पसरविण्यात काही लोकांचा विशेष रस दिसतो. धर्म आणि अध्यात्म यातही तफावत आहे आणि बहुतांश लोक इथेही गल्लत्त करतात. मी कुठेच कर्म कांडाचे समर्थन केलेले नाही. तुम्ही कोणती पूजा करता, करावी, करू नये किंवा करत नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. कोणावरच कोणीच जबरदस्ती केलेली नाही. (पण याच बरोबर बकरी ईद, मोहरम, क्रिसमस, निरुपयोगी राजकीय प्रतिष्ठेची स्मारके, मोर्चे, बंद, अति क्रिकेट ( आय पी एल/ एम पी एल), पौगंडावस्थेतिल अडनिड्या मनावर चुकीचे संस्कार करणारे सिनेमे, सिरियल, मद्य, सिगरेट, ड्रग्ज, रेव्ह पार्ट्या, स्त्री शोषण हे पण तुमच्या "चुकीच्या गोष्टी" या यादीत आणायला विसरू नका म्हणजे झालं.) काही परंपरा तात्कालिक कारणाने ( जसे सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती) आल्या त्यात योग्य ते बदल करणे गरजेचे आहे यात कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. ज्या रूढी / परंपरा समाज विघातक आहेत त्या त्यागल्या पाहिजेतच आणि सुरवात स्वतःपासून केली पाह्जीजे. सुदैवाने भारत हा आज जगातला सर्वात तरुण देश आहे. तेव्हा हि युवा उर्जा योग्य तर्हेने वापरली तर किती विधायक कार्य होऊ शकेल. ( पण दुर्दैवाने युवकांना भटकवण्याचे कार्यच सुरु आहे) हळू हळू सार्वजनिक गणेशोत्सव समाजाभिमुख करणे आणि विधायक कामे करून घेणे या साठी प्रबोधन नक्कीच गरजेचे आहे. ( आणि हे हळूहळू होऊ लागले आहे असे मला वाटते) जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे (कोणत्याही कारणांनी होणारे) , वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी स्वयंशिस्त आणणे, सार्वजनिक ठिकाणी दुसर्याला त्रास होईल असे वर्तन न करणे, सार्वजनिक शिस्त आणि स्वच्छतेचे पालन करणे यासाठी शिक्षण आणि प्रबोधन होणे गरजेचे आहे पण जो पर्यंत अण्णा दादा आणि बाबा यांचे राज्य सुरु राहील ( पक्ष कोणताही असो), सत्तेसाठी ( power ) money आणि muscle यांची चालती राहील तोवर हे राजकारणी, पुढारी, गुंड ,चमचे आणि चेले यांची झुंडशाही आणि अनुषंगाने येणारा भ्रष्टाचार बंद होणे शक्य नाही. आणि जो पर्यंत हे बंद होत नाही तोवर कसली प्रगती आणि कसलं काय? याचा धर्माशी काडीचा तरी संबंध आहे का? हे सगळे लोक खर्या अर्थाने धार्मिक/ अध्यात्मिक आणि रुढीप्रिय आहेत काय? चला, लई बिल झालं. आता कल्टी. बाकी चालुद्या. मिपा वर असलं काही लिहून समाज प्रबोधन होईल यावर माझा विश्वास नाही किंवा मी काहीतरी जगावेगळे सांगतोय असंही नाही. इथे सगळे जण सुजाण आणि सुशिक्षित आहेत तेव्हा म्या उगी राहिलेलाच बरं.
य
याॅर्कर Mon, 09/28/2015 - 12:05 नवीन
छे हो मला फक्त ऊसाचा रसच आवडतो. बाकी अतिक्रिकेट(IPL/MPL),रेव्ह पार्ट्या,सिगारेट,ड्रग्ज,अश्लिल सिनेमे,राजकिय प्रतिष्ठेची स्मारके,इतर धर्मीयांचे सुद्धा काही ठरावीक उत्सव या अनावश्यक गोष्टींचाही उल्लेख याठिकाणी व्हायला हवा हे खरं आहे.
म
मंदार दिलीप जोशी Mon, 09/28/2015 - 12:27 नवीन
पकाव लेख
त
तुडतुडी Mon, 09/28/2015 - 14:30 नवीन
पहाटे चारपासूनच कित्येक मंदीरांचे भोंगे काकडारत्या उगाळत अस्तात. त्या आपल्या म्हणून त्रास होत नाही.
आजपर्यंत तुम्हाला अशी कुठली काकड आरती ऐकू आली ?काकडारती होते पण ती भोंगे लावून जगजाहीर केली जात नाही. मोठमोठ्या देवळांमध्ये, तीर्थस्थानांच्या जागी भोंडे लावलेही जात असतील .पण प्रत्येक देवळात नसतात कै .
एकापेक्षा अधिक बायका करण्याचा रिवाज हिंदूंमधेही आहे. आत्ता आत्ता कायद्याने बंदी आली म्हणून बंद झाले
खिक . अभ्यास वाढवा जरा . आत्ता आत्ता म्हणजे काल परवा घडलेली गोष्ट नाहीये . आणि कायद्याने बंदी हि सुधा हिंदू लोकांच्या क्रांती मुळेच झाली . आणि आता बंद झालंय ना . वेशालयात जाणं हा वेगळा मुद्दा आहे . दर्शनी का होईना पण एकच बायको असते ना .घटस्फोटा नंतरही आणि मालमत्तेत तिचा मोठा अधिकार असतो . तुमच्यासारखा फक्त एक अष्टमांश नसतो . मुलं कोणाकडे राहतील ह्याचा सुधा निर्णय विचार करून घेतला जातो . नवर्याकडेच राहणार हि सक्ती होत नाही
कित्येक हिंदू जत्रांमधे उरुसांपेक्षाही अनेक हिंसक, विभत्स, मूर्ख प्रकार बघायला मिळतात
अशी एखादी जत्रा किवा उरूस सांगा . आधी असे प्रकार होत होते . पण आता मोठ्या प्रमाणावर बंद झालेत . मुस्लिमांमध्ये अजून चालूच आहेत .
माझीच जात मोठी, माझाच धर्म मोठा असं हिंदू करत नाहीत?
माझाच धर्म मोठा, इतरांचा छोटा असं हिंदू कधीही करत नाहीत. माझा धर्म तुमच्यापेक्षा छोटा नाही हे मात्र ठणकावून सांगतात . जाती पाती आधी होत्या पण आज त्यांचं प्रमाण किती राहिलंय ?मुस्लिम मात्र इस्लाम हाच जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि अल्ला हा एकमेव देव आहे आणि लोकांनी फक्त ह्याच देवाला आणि धर्माला मानावं म्हणून हिंसाचार करतात . त्यांच्यातही ७३ पंथ आहेत कि . एक पंथ दुसर्याचा विरोधी . सुन्नी आणि शियांमध्ये किती हिंसाचार चालतो . लहान लहान शाळेत जाणार्या मुलांना पण सोडलं जात नाही . ५ -५ वर्षांच्या मुलांच्या हातात बंदुका दिल्या जातात .जर कुठं बदल केला कि कुरणात असं सांगितलंय . तुम्ही अल्लाचा शब्द पळत नाही म्हणून मुल्ला मौलवी फितवतात आणि हजारो लोकं खुशाल त्यांचं ऐकतात .
सगळ्या मुसलमानांना कायम अतिरेकी ठरवणारे स्वतः आरशात कधी बघणार आहेत? आपणही अतिरेक करून देशाचे वातावरण दूषित करत आहोत हे कळत नाही का?
आम्ही कसलाही अतिरेक तर करतच नाही पण कोणावरही सक्ती हि करत नाही . इतर धर्मियांनी असंच केलं पाहिजे हा मूर्खपणा तर आम्ही कधीच करत नाही . सगळ्या मुस्लिम राष्ट्रांचा अतिरेक बघितला तर हिंदू अतिरेक करण्यात कोसो दूर आहेत हे समजून येईल . तुम्ही म्हणता ते बरोबर आहे . खरं तर एकमेकांवर चिखलफेक करण्यात अर्थ नाही . पण फक्त हिंदू धर्माला टार्गेट केलं जातं म्हणून चीड येते .ठरवायचंय काय त्यात ? सगळे अतिरेकी मुस्लिम असतात हे आम्ही बघतोय , ऐकतोय , वाचतोय कि आम्ही रोज. त्यांना मदत करणारे स्थानिक मुसलमानच असतात हे प्रत्येक वेळी सिद्ध होतं . कृपया पर्सनली घेवू नका पण हे सत्य आहे त्याला काय करणार ?
त
तर्राट जोकर Mon, 09/28/2015 - 15:42 नवीन
तुमचं म्हणजे ना गिरे तो भी टांग उप्पर. ष्टाइल आवडली. अडचणीचा मुद्दा असेल तर तो कसा अडचणीचा नाहीच्च मुळी हे पटवून देण्यात जबरी हात आहे तुमचा. १. मुद्दा असा आहे की सरसंघचालक म्हणतायत वैज्ञानिक आधार नसलेल्या रूढी हिंदूंनी सोडून दिल्या पाहिजेत. आता तुम्ही म्हणताय की हिंदूंना टार्गेट केले जाते. म्हणजे सरसंघचालक हिंदूंना टार्गेट करत आहेत असा तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे का? २. ह्या हिंदू-रूढी-सुधारणा चर्चेत मुसलमानांना आणण्याचे काय प्रयोजन? फक्त मुस्लिम धर्माच्याच रूढी मागसलेल्या आहेत का? जैनांमधे आठ वर्षाच्या मुलामुलींना आई-वडील जबरदस्ती प्रतिष्ठेसाठी साधु-साध्वी व्हायला लावून सन्यास घ्यायला लावतात. अजूनही बर्‍याच धर्मात बरंच काही मागासलेलं आहे. कारण माणसं इथून तिथून सारखीच. पण कारण नसतांना प्रत्येकदा मुस्लिमच का टार्गेट करता? ३.अशी एखादी जत्रा किवा उरूस सांगा . आधी असे प्रकार होत होते . पण आता मोठ्या प्रमाणावर बंद झालेत . >> तुम्ही डोळे बंद करून जमिनीत डोके खुपसले म्हणजे सत्य लपत नाही. आता तुम्हीच अभ्यास वाढवा. ४. जाती पाती आधी होत्या पण आज त्यांचं प्रमाण किती राहिलंय ? >> शहराच्या सुरक्षित-उच्च्भ्रू कोषातून बाहेर या जरा. जातीपातीच्या वादातून किती हिंदू एकमेकांना दरवर्षी कापतात जरा पोलिस रेकॉर्ड तपासून घ्या. खैरलांजी, नगरचा नितीन, सवर्णांसोबत पहिल्या पंगतीत जेवला म्हणून जीवघेणी मारहाण ही प्रकरणे आताचीच व फार प्रातिनिधीक आहेत. जेवढी वर्तमानपत्रात पोचतात तेवढी कळतात. कित्येक तर गावपातळीवरच मॅनेज होऊन जातात. पेपरमधे येतं तेवढंच जगात घडतं अशी विचारसरणी असणार्‍यांनी सगळ्या मुस्लिमांना अतिरेकी ठरवावं यात काही ही नवल नाही. ५. आम्ही कसलाही अतिरेक तर करतच नाही पण कोणावरही सक्ती हि करत नाही . इतर धर्मियांनी असंच केलं पाहिजे हा मूर्खपणा तर आम्ही कधीच करत नाही . आम्ही बर्‍याच मुस्लिमांना ओळखतो, कुणीही आमच्यावर असंच करा अशी सक्ती केलेली आठवत नाही. पण अशा बर्‍याच हिंदूंना ओळखतो जे सक्ती करण्यात पटाईत आहेत. स्त्रीयांनी कमी कपडे घालू नये, पब मधे जाऊ नये, मुलामुलींनी प्रेम करू नये, वेलेंटाइन साजरा करू नये, इत्यादी इत्यादी. ६. सगळे अतिरेकी मुस्लिम असतात हे आम्ही बघतोय, ऐकतोय, वाचतोय कि आम्ही रोज. त्यांना मदत करणारे स्थानिक मुसलमानच असतात हे प्रत्येक वेळी सिद्ध होतं हे जे तुम्ही बघताय, ऐकताय, वाचताय त्याही पलिकडे एक जग आहे. तुमच्यापर्यंत ह्याच बातम्या पोचवल्या जाव्या याची सूत्रबद्ध व्यवस्था आहे. जेवढे बळी अतिरेकी दरवर्षी घेतात त्यापेक्षा हजारो पटीने हिंदूच वेगवेगळ्या कारणापायी हिंदूंचेच घेत आहेत. भेसळ करणारे, भ्रष्टाचार करणारे, शिस्त न पाळणारे. त्या सगळ्यांकडे काणाडोळा करून तुमच्या सर्व समस्यांचे एकमेव कारण जणू मुस्लिमच आहेत अशी हिटलरी मांडणी कशासाठी?

तात्पर्यः डीनायल मोड उपयोगाचा नाही.

↩ प्रतिसाद: तुडतुडी
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 09/28/2015 - 21:10 नवीन
बाकि सगळ्या पोस्टशी सहमत आहे.. फक्त हे - . जेवढे बळी अतिरेकी दरवर्षी घेतात त्यापेक्षा हजारो पटीने हिंदूच वेगवेगळ्या कारणापायी हिंदूंचेच घेत आहेत. भेसळ करणारे, भ्रष्टाचार करणारे, शिस्त न पाळणारे. त्या सगळ्यांकडे काणाडोळा करून तुमच्या सर्व समस्यांचे एकमेव कारण जणू मुस्लिमच आहेत अशी हिटलरी मांडणी कशासाठी? एकत्र जोडू नका.. एक हिन्दूची गोष्ट परस्पर सामाजिक अत्याचाराची आहे...मुसलमानी गोष्टीला इस्लामी धर्माच अधिष्ठान आहे.. हा फरक अत्यंत मूलभूत आहे. @आम्ही बर्‍याच मुस्लिमांना ओळखतो, कुणीही आमच्यावर असंच करा अशी सक्ती केलेली आठवत नाही.>> ते तुम्ही कोणत्या प्रांतात रहाता तिथे इस्लाम किती प्रमाणात राबवावा या धोरणाच्या इस्लामधर्मी प्रमाणाचं फळ आहे..तो काहि सज्जन्पणा नव्हे.. मुस्लिमबहुल ठिकाणी (काश्मिरेत्यादी..) मुस्लिमेतरांनी देवळात घंटेचा एकच टोल द्यावा..स्त्रियांनी कुंकू मंगळसूत्र इत्यादी धर्मवाचक दागिने घालू नये.. असे जुलूम करत आहेतच की.. @पण अशा बर्‍याच हिंदूंना ओळखतो जे सक्ती करण्यात पटाईत आहेत. स्त्रीयांनी कमी कपडे घालू नये, पब मधे जाऊ नये, मुलामुलींनी प्रेम करू नये, वेलेंटाइन साजरा करू नये, इत्यादी इत्यादी.>>> +++++१११११ या असल्या सगळ्यात आम्ही जिची कायम रेवडी उडवतो..ती विषमतावादी वैदिक धर्माची समर्थक टनाटन संघटना प्रचंड आघाडीवर आहे/असते. काहि वर्षांपूर्वी जेंव्हा याच गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्ती हौदात विसर्जनाचे परिवर्तन सुरु झाले..तेंव्हा हेच टनाटनी तिथे हौद चूक आणि गटार झालेली(ही) नदी मात्र बरोब्बर ..म्हणून लोकांना मूर्ती नदीत विसर्जन करायला पाठी पडत होते..आमच्या अभिनव'च्या कार्यकर्त्यांनी पोलिसी सहकार्य घेऊन या टनाटन्यांना कुत्री हकलतात तसे हकलले होते...
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 09/29/2015 - 06:44 नवीन
मुस्लिमबहुल ठिकाणी (काश्मिरेत्यादी..) मुस्लिमेतरांनी देवळात घंटेचा एकच टोल द्यावा..स्त्रियांनी कुंकू मंगळसूत्र इत्यादी धर्मवाचक दागिने घालू नये.. असे जुलूम करत आहेतच की.. भारतात कुठे अशी परिस्थिती खरंच जर आहे तर हे तथाकथित प्रखर हिंदूराष्ट्रवादी कुठे असतात अशावेळी? कि फक्त बाष्कळ चर्चामध्येच यांचे स्नायू (तेही फक्त तोंडाचे) स्फुरतात का असा प्रश्न पडतो. वरील एका प्रतिसादात कश्मिरी पंडीतांबद्दल आधीही हाच प्रश्न मांडला आहे. जिथे खरोखर हिंदूंच्या रक्षणाची प्रचंड गरज आहे तिथे काही न करता, बकरे, बायका, नमाज, भोंगे असल्या पाचकळ गोष्टींमधे आपआपसात कुत्सित व नपुंसक चर्चा करून तथाकथित हिंदूराष्ट्रवादींना काय बरे समाधान मिळत असावे?
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
व
विजुभाऊ Tue, 09/29/2015 - 06:23 नवीन
पण फक्त हिंदू धर्माला टार्गेट केलं जातं म्हणून चीड येते
तुडतुडी ताई भाऊ आत्या काका जे कोणी असाल ते. या लेखात हिंदू धर्मातील चालीरीतींवर चर्चा व्हावी अशी अपेक्षा होती त्यात तुम्ही मुद्दामहून इतर धर्मीयांबद्दल बोलायचे काहीच कारण नव्हते. एखादा ऋग्ण मनुश्य आजारी आहे हे मान्य करण्या ऐवजी / त्याच्यावर उपचार करण्या ऐवजी ऋग्णालयात इतर लोक ही रोगीच आहेत यावर कशाला लक्ष्य केंद्रीक करायचे? त्यांचे जे व्हायचे ते होईल. तुम्ही तुमच्या ऋग्णाकडे लक्ष द्या. इतर विद्यार्थ्यांबद्दल गरळ ओकून स्वतःचे शहाणपण सिद्ध होत नसते. फार तर तुम्ही सुद्धा त्यांपैकीच आहात हेच सिद्ध होते. सनातनप्रभात ज्या प्रकारे मूर्खपणाचे विचार छापते/पसरवते : उदा: पिशाच्चानी कुत्री होउन साधकांच्या साधनेत अडथळा आणला वगैरे. ते बघता त्यांची योग्यता/बुद्धीची पातळी समजते.
सगळे अतिरेकी मुस्लिम असतात हे आम्ही बघतोय
हे म्हणजे अतीच झाले. एखाद्या वेड्याच्या इस्पितळातील बहुसंख्य वेडे जर हिंदू असतील तर सगळे वेडे हिंदु असतात असे म्हंटल्यासारखे झाले. बाकी इतर गोष्टींचा उदा :चार बायका हे सरसकट उदाहरण नाहिय्ये. अर्थात चर्चा जिथे या प्रश्ना बद्दल नाहीच तिथे या गोष्टी आणल्याने चर्चेत काय व्हॅल्यू अ‍ॅडिशन होते कोण जाणे. बाकी सूज्ञांस अजून काय सांगावे?
↩ प्रतिसाद: तुडतुडी
र
राजाभाउ Wed, 09/30/2015 - 14:31 नवीन
सहमत
एखादा ऋग्ण मनुश्य आजारी आहे हे मान्य करण्या ऐवजी / त्याच्यावर उपचार करण्या ऐवजी ऋग्णालयात इतर लोक ही रोगीच आहेत यावर कशाला लक्ष्य केंद्रीक करायचे? त्यांचे जे व्हायचे ते होईल. तुम्ही तुमच्या ऋग्णाकडे लक्ष द्या. इतर विद्यार्थ्यांबद्दल गरळ ओकून स्वतःचे शहाणपण सिद्ध होत नसते. फार तर तुम्ही सुद्धा त्यांपैकीच आहात हेच सिद्ध होते.
याच्याशी प्रचंड सहमत !! हिंदू धर्मीय आपल्या धर्मातील चुकीच्या (अर्थात त्यांना वाटणार्या) गोष्टींबद्दल बोलू शकतात कारण बहुसंख्य हिंदू धर्मीय सहिष्णू आहेत आणि अशा चुकांवर बोट ठेवल्या बद्दल आपल्या कुणी जीवावर उठणार नाही याची त्यांना खात्री आहे. माझ्या मते ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, करण त्यामुळेच हिंदू धर्मात सुधारणा झाल्या आहेत.आपल्या सर्वांनाच ह्याची उदाहरणे माहित आहेत. वर गुरुजींनी उल्लेख केल्याप्रमाणे गणपती हौदात विसर्जन करणे हे काही वर्ष्यांपूर्वी धाडसाचे होते तर आता किमान शहरात तरी (गावाकडील परिस्थिती मला माहीत नाही) बहुसंख्य लोक हे करतात. हे स्थित्यंतर अगदी आपल्या डोळ्यासमोर धडले आहे. त्यामुळे "ते" विरुद्ध "आम्ही" अशी मांडणी करण्यात काहीच अर्थ नाही. याचा अर्थ आपल्याला न पटणारया विधानाचा विरोध करू नये असा मुळीच नाही पण पण फक्त हिंदू धर्माला टार्गेट केलं जातं असा गळा काढण्यात काहीच अर्थ नाही
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 09/29/2015 - 06:37 नवीन
संघाचं धोरण समजलं सैनिकांना पटलं का ? -दिलीप बिरुटे
य
याॅर्कर Tue, 09/29/2015 - 07:17 नवीन
त्याचं असं आहे कि,संघाने कितीही व्यापक स्वरूपात सर्वसमावेशक अशी हिंदुत्वाची व्याख्या जरी सांगितली तरी 'हिंदू' नावाची अॅलर्जी असणारे बरेच लोक या देशात आहेत. त्यामध्ये हिंदूसुद्धा आहेतच.म्हणून 'हिंदूत्व ' हा शब्द सोडून त्यांनी 'बंधूत्व' हा शब्द घ्यावा.बाकी व्याख्या तीच राहू द्या,मग कुठे थोडे थोडे संघाचे विचार रूचतील काहींना.
त
तुडतुडी Wed, 09/30/2015 - 09:57 नवीन
ह्या हिंदू-रूढी-सुधारणा चर्चेत मुसलमानांना आणण्याचे काय प्रयोजन?
ह्याचं उत्तर याॅर्कर , dadadarekar , TJ सारख्या मुस्लिम लोकांच्या हिंदुविरोधी टुकार प्रतिसादांवरून मिळेलच . तेव्हा हा प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार नाही . मुळात मुद्दा असा आहे . कोणीतरी हिंदूंबद्दल काही बोललं कि लगेच त्याच्यावर हिंदू विरोधी आयडीचा लेखांचा रतीब का पडतो ? आता किती मुल्ला मौलवी फतवे काढत असतात . किती वेळा मुस्लिम जुन्या रूढी परंपरांवर मिडीयावर चर्चा होते . मग असा कुठलाही धागा का काढला जात नाही ? ए आर रेहमान वर बहिष्कार घालण्याची गोष्ट चालली होती . तेव्हा का ह्या आईडींना एखादा धागा काढावासा वाटला नाही ? कसं आहे न काही लोकांना इतर धर्मियाबद्दल गैरसमज पसरवनं , लोकांची दिशाभूल करणं हा आपला जन्मसिद्ध हक्क वाटतो त्यामुळे मग असे रतीब घातले जातात .
तुम्ही डोळे बंद करून जमिनीत डोके खुपसले म्हणजे सत्य लपत नाही. आता तुम्हीच अभ्यास वाढवा.
माझा अभ्यास आहे म्हणूनच मी बोलतेय . प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी विषयांतर फार करता बुवा तुम्ही . आता मी नै का शेख्साल्ल्याचा उरूस सांगितला , मुहर्रम सांगितला . तसं तुम्ही सांगा कि कैतरी जातीपाती हिंदूंमध्ये आहेत तश्या मुस्लीमान्मधेही आहेत . तेव्हा त्यांनी फक्त हिंदू जातींबद्दल बोलू नये .
पेपरमधे येतं तेवढंच जगात घडतं अशी विचारसरणी असणार्‍यांनी
खिक .म्हणजे पेपरमधे येतं ते सगळं खोटं असतं असं म्हणायचं का ?. आंतरराष्ट्रीय दर्जाची पुस्तकं पण वाचतो आम्ही . माझ्या वाचनात नॉट without my daughter ,the veiled kingdom , इस्फ्हान , गाथा इराणी , the princess अशी काही पुस्तकं आली . गेल्याच आठवड्यात लोकमतच्या मंथन पुरवणीत 'सुन्न वास्तव ' म्हणून एक लेख आलाय . त्यातल्या २ हि गोष्टी सत्यकथा आहेत . वाचतानाही सुन्न होतं मग प्रत्यक्षात काय होत असेल ?
आम्ही बर्‍याच मुस्लिमांना ओळखतो, कुणीही आमच्यावर असंच करा अशी सक्ती केलेली आठवत नाही.
शाब्बास . केवळ तुमच्यावर सक्ती केली नाही म्हणून सगळ्या जगातही तेच घडतं ह्या गैरसमजातून बाहेर या.तुम्ही भारतासारख्या राष्ट्रात आहात म्हणूनच तेवढं सुख मिळालंय तुम्हाला . तुम्ही बर्‍याच मुस्लिमांना ओळखता मग औरंझेब, नादीरशहा , अल्लाउद्दिन खिल्जी , तैमूरलंग ,चंगेज खान, इसीस , तालिबान , बोकोहराम, अल कायदा ह्यांना सुधा ओळखत असलाच . रोज पेपर मध्ये येणाऱ्या आणि टी वी वर दाखवणाऱ्या बातम्या ऐकल्या असतीलच . इस्लाम चा इतिहास , वर्तमान माहित असेलच अशी अशा आहे . देशच्या देश उध्वस्त करून गलिछ रीतीने स्वतचा धर्म स्वीकारायला लावणाऱ्या या लोकांच्या कहाण्या माहित असतीलच तुम्हाला . आपण फक्त भारताबद्दल बोलत आहोत . मुस्लिम राष्ट्रांविषयी काय बोलणार ? . हंगेरीनं 'we dont want muslims' म्हणून स्थलांतरितांना स्वीकारायला नकार का दिला ? म्यानमार ने रोहिंग्या मुस्लिमांना का हाकलून दिलं ?त्या सगळ्यांचा मृत्यू झाला . कुठल्याही देशाने त्यांना का आसरा दिला नाही ?२ महिन्यांपूर्वी एका बौद्ध देशात (बहुदा तिबेट असावा ) बौद्ध भिक्षुंनी 'हे जग फक्त मुस्लिमांसाठी नाही' म्हणून आंदोलन का केलं गेलं . आज इराण मध्ये मुस्लीमान्च्यातच इस्लाम विरोधात धुसफूस का वाढत आहे ?आमचं एक राहू द्या . पण आज सगळेच देश इस्लाम विरोधात का जात आहेत ? ह्या प्रश्नांची उत्तरं आपण देवू शकता का ? ध्यानात घ्यावं इथे भांडण चालू नसून चर्चा चालू आहे . आपल्या ठराविक कोशातून बाहेर येवून जरा जगाकडे बघायचा प्रयत्न केलात तर बरं होईल .
वर्षाच्या मुलामुलींना आई-वडील जबरदस्ती प्रतिष्ठेसाठी साधु-साध्वी व्हायला लावून सन्यास घ्यायला लावतात.
खिक . जैनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दीक्षा असतात . ७-८ व्या वर्षी दिली जाणारी दीक्षा हि संन्यासाची नसून वेगळ्या प्रकारची असते . इथे कोणी जैन असेल तर जास्त प्रकाश टाकू शकतात . माझा काही जैन धर्माचा जास्त अभ्यास नाही . पण मुस्लिम धर्माचा अभ्यास मी जाणून बुजून करत आहे .
स्त्रीयांनी कमी कपडे घालू नये, पब मधे जाऊ नये, मुलामुलींनी प्रेम करू नये, वेलेंटाइन साजरा करू नये, इत्यादी इत्यादी.
स्त्रीचं नख सुधा दिसणार नाही अश्या रीतीने तिला काळ्या कपड्यात गुंडाळायची सक्ती करणार्यांनी असल्या गोष्टींबद्दल बोलू नये . त्यांच्यापेक्षा हजार पटीने चांगली परिस्थिती आहे . मला वेगळा धागा काढण्याचा फार कंटाळा येतो हो .कोणी काढेल का वेगळा धागा ? मग हे सगळे प्रतिसाद तिथे देईल . बापरे . दम लागला टाईपता टाईपता
त
तर्राट जोकर Wed, 09/30/2015 - 11:08 नवीन
तुडतुडीताई, मुस्लिमांचा इथे प्रचंड गैरलागू मुद्दा ह्या हिंदू-रुढी-सुधारणा चर्चेत सर्वप्रथम तुम्हीच उपस्थित केला. त्याचे उत्तर विचारण्याचा अधिकार कुठल्याही मिपा सदस्याला आहे. मिसळपाव हे संस्थळ तुमच्या व्यक्तिगत मालकीचे, तुम्ही विकत घेतले असेल तर तसे जाहिर करावे. ह्याचं उत्तर याॅर्कर , dadadarekar , TJ सारख्या मुस्लिम लोकांच्या हिंदुविरोधी टुकार प्रतिसादांवरून मिळेलच . तेव्हा हा प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार नाही . मुळात मुद्दा असा आहे. कोणीतरी हिंदूंबद्दल काही बोललं कि लगेच त्याच्यावर हिंदू विरोधी आयडीचा लेखांचा रतीब का पडतो ? हे काय आहे? अहो स्वतःच्या भ्रमिष्ट दुनियेतून बाहेर या. यातल्या कोणाचे प्रतिसाद टुकार व हिंदूविरोधी आहेत? ह्या आयडींवर व्यक्तिगत हल्ले करायचा अधिकार तुमच्या साठी खास राखून दिलेला आहे काय? हिंदूविरोधी आयडींच्या लेखांचा रतीब दाखवा आधी. उगाच अर्धवट डोक्याने बेताल बडबड करणे थांबवले तर प्रकृतीस आराम पडेल. हिंदूंना आरसा दाखवणार्‍या चालीरीतींबद्दल कुणी ब्र ही काढू नये ही तालिबानी वृत्ती आहे. मग तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक? हीच ती थोर हिंदू संस्कृती तुम्हाला अपेक्षित आहे काय? मग चार्वाक, तुकाराम आणि असे अनेक दिग्ग्ज प्रभृती ह्या हिंदूविरोधी व त्याच न्यायाने मुस्लिम होत्या असे म्हणायचे का? इथे आखातात काम करणारे बरेच आयडी आहेत. त्यांच्या कडून माहिती काढून घ्या मुस्लिम देशांमधल्या इतर धर्मियांच्या ख्यालीखुशालीची. कित्येक हिंदू मुस्लिम देशांत यशस्वीपणे व्यवसाय करत आहेत तेही बघा. मुस्लिम स्त्रिया म्हणजे फक्त बुर्खासक्ती एवढेच दिसते का तुम्हाला? छातीपर्यंत घुंघट ओढून घेणार्‍या स्त्रिया हिंदूसमाजातही आहेत पण तुम्हाला माहित नसेल. इथेच काही आयडी मुस्लिम बुर्का पद्धतीला विरोध करतात आणि मंदीरात मात्र 'योग्य' कपड्यातच गेले पाहिजे यावर ठाम असतात. आपल्या संस्कारानुसार प्रत्येकाला दुसर्‍यांचे चूक व आपले बरोबर वाटत असते, शितावरून भाताची परिक्षा करायची मात्रा लावली तर उद्या खाप-पंचायत, श्रीरामसेना, सनातन संस्था म्हणजेच हिंदू व त्यांची विचारसरणी अशी ओळख करून दिली तर चालेल का तुम्हाला? मलाही कंटाळा आला आहे. कारण तुम्हाला अडचणीच्या ठरणार्‍या माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले नाही. ज्यांची उत्तरे दिली ती फारच हास्यास्पद व बुद्धीभ्रमाची निदर्शक आहेत. तुम्ही मुस्लिम देशात जन्माला आला असतात तर एव्हाना आयसिसमधे भरती होऊन कुणाचे तरी गळे कापत फिरला असता असे तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवरून वाटते, कारण सर्व धर्माचे कट्टरवादी एकजात असतात, म्हणजे मनोरुग्ण. तुमच्या मनातली नपुंसक भडास काढायला हे एक संस्थळ तुम्हाला आंदण दिले आहे या भ्रमात तरी राहू नका. या चर्चेत फक्त हिंदूंच्या रुढी-परंपरांबद्दल बोलले जावे असे अपेक्षित होते, मुस्लिमांचा द्वेष करायचा असेल तर वेगळा धागा काढा. मग पाहू. हिंदूंच्या चुकीच्या चालीरीतींविरूद्ध आम्ही बोलणार, कायम बोलणार. कारण हा सतत उत्क्रांत होत जाणारा धर्म आहे. वेळोवेळी तुमच्यासारखे खडे बाजूला करूनच हिंदूधर्म येथवर पोचला आहे. हिंदू असणे व कट्टर असणे ह्या दोन विरूद्ध परिस्थिती आहेत. एवढे जरी जाणले तरी हिंदू म्हणजे काय हे आपणांस कळेल अशी आशा आहे. तसे नसेल तर आपल्या कट्टर विचारांची खाज भागवायला इतर धर्म तुम्हाला पर्याय म्हणून खुले आहेतच. खुशाल नांदा तिकडे जाऊन. धन्यवाद!
↩ प्रतिसाद: तुडतुडी
न
नया है वह Wed, 09/30/2015 - 12:00 नवीन
प्रतिसाद आवडला
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
य
याॅर्कर Wed, 09/30/2015 - 12:12 नवीन
तुडतुडींचा वरील प्रतिसाद म्हणजे "आंधळी धर्मांधता" कि याॅर्कर,dadadarekar,TJ हे मुस्लिम आयडी आहेत म्हणे? कशावरून केलात तुम्ही हा तर्क? मी काही अंनिस चा कार्यकर्ता वगैरे नाहीये.पण परत देतो असेच वाचलेले काही उदाहरण, असेच लोक अंनिसबद्दल विचारतात कि तुम्ही हिंदूच्याच अंद्धश्रद्धाबद्दल का बोलता? त्यावर त्यांचे उत्तर 1)अंनिस हिंदूंचेच अंधश्रद्धा निर्मूलन का करते? या प्रश्नाचे उत्तर खरे तर एकाच ओळीत देता येईल आणि हा प्रश्न वारंवार विचारणाऱ्यांचे तोंड बंद करता येईल. ते म्हणजे ‘आमचे हिंदू धर्मीय लोकांवर प्रेम आहे म्हणून आम्ही त्यांच्याच अंधश्रद्धांचे निर्मूलन करतो.’ (परंतु या प्रश्नाआडून अंनिस बद्दल गैरसमज पसरवण्याचा उद्योग काही लोक करत आहेत म्हणून सविस्तर उत्तर देत आहे.) 2) अंनिसचे बहुतांश कार्यकर्ते हिंदू कुटुंबातून आलेले आहेत. मी स्वतः हिंदू कुटुंबात जन्माला आलेलो आहे. माझे शेजारी हिंदू धर्मीय आहेत. माझे नातेवाईक हिंदू धर्मीय आहेत. माझे मित्रमंडळी हिंदू धर्मीय आहेत. माझ्या गावातील बहुतांश लोक हिंदू धर्मीय आहेत. असे असताना मी त्यांना मुस्लीम किंवा ख्रिश्चन धर्मांतील अंधश्रद्धांचा फोलपणा सांगत बसावा काय? माझ्या जवळचे लोक अंधश्रद्धेचे बळी ठरत असताना मी माझ्यापासून कोसो अंतर दूर असणाऱ्या लोकांचे प्रबोधन करावे काय? माझे आणि माझ्या शेजाऱ्याचे घर जळत असताना मी माझ्या गावाबाहेरील कुणाचे घर जळत आहे याचा शोध घेत फिरावे काय? 3) ज्या अंधश्रद्धांचा मला पावलोपावली त्रास होतो, ज्या अंधश्रद्धा माझ्या नित्य परिचयाच्या आहेत त्या अंधश्रद्धा सोडून ज्या धर्मांचा आणि माझा काहीच संबंध नाही, ज्या धर्मातील रूढी-परंपरांचा माझा काहीच अभ्यास नाही त्या धर्मांतील अंधश्रद्धांच्या पाठीमागे मी हात धुऊन लागावे यासारखा दुसरा मूर्खपणा असेल काय? घरातील व्यक्ती आजारी असताना तुम्ही लांबच्या नातेवाईकाच्या आजारपणासाठी धावपळ करता का? 4)भारतात सुमारे ८२% लोकसंख्या हिंदूंची आहे. सुमारे १२-१३% लोकसंख्या मुस्लिमांची आणि उरलेले लोक अन्य धर्मीय आहेत. असे क्षणभर मानू की आपला देश हे १० खोल्यांचे घर आहे. साहजिकच त्यातील ८ खोल्या हिंदूंच्याकडे असणार. १ खोली मुस्लीम आणि १ खोली इतर धर्मीयांकडे असणार. आता या १० खोल्यांच्या वाड्यातील ८ खोल्या जर अंनिस स्वतःला तोशीस लावून स्वच्छ करत असेल, तर त्यामुळे बहुसंख्य खोल्या स्वच्छ होतील. म्हणजे जवळ जवळ सर्व वाडाच स्वच्छ होईल. अशा वेळी आधी ९वी खोली स्वच्छ करा आणि मगच पहिल्या ८ खोल्या स्वच्छ करा, अशी दमबाजी कुणी करत असेल तर त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ इतकाच होतो की लोकांनी घाणीतच राहिले पाहिजे अशी त्या माणसाची इच्छा आहे. (अशी इच्छा धरणाऱ्या माणसाचा हेतू तपासून बघायला नको का?)
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 09/30/2015 - 12:39 नवीन
त्रीवार सहमत. मला दोन प्रश्न पडले आहेत. मिपावरील जाणत्या-जुन्या सदस्यांनी जमलं तर उत्तरं द्यावी. १. मिसळपाववर कुणीही मुस्लिम धर्माच्या प्रसार करण्याहेतू लेख/प्रतिक्रिया कधीतरी दिल्या आहेत का? २. कुण्या मुस्लिम आयडीने हिंदू धर्म कसा वाईटच असे धागे काढले आहेत का? असे जर नसेल तर ह्या बाई शष्प माहित नसतांना इतर सदस्यांवर चिखलफेक का करतात? यांच्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर, तुकाराम, रविदास, आणि असे हजारो धर्मसुधारक सगळे मुस्लिमच असावे बहुधा.
↩ प्रतिसाद: याॅर्कर
फ
फुलथ्रॉटल जिनियस Wed, 09/30/2015 - 15:48 नवीन
मुस्लिम फक्त चार टक्के आहेत, पण सध्याचं भाजप सरकार ही आकडे वारी वाढवून सांगत आहे. fear mongering चा प्रकार चालू आहे, या देशात मुस्लिमांचे भविष्यात काय वाढवून ठेवले आहे देव जाणे.मला खरा मुस्लिमांची काळजी वाटते.
↩ प्रतिसाद: याॅर्कर
स
सुबोध खरे Wed, 09/30/2015 - 15:51 नवीन
कुठे नेपाळ मध्ये कि काय?
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
स
सतीश कुडतरकर Wed, 09/30/2015 - 12:35 नवीन
हिंदूंच्या चुकीच्या चालीरीतींविरूद्ध आम्ही बोलणार, कायम बोलणार. कारण हा सतत उत्क्रांत होत जाणारा धर्म आहे. वेळोवेळी तुमच्यासारखे खडे बाजूला करूनच हिंदूधर्म येथवर पोचला आहे. हिंदू असणे व कट्टर असणे ह्या दोन विरूद्ध परिस्थिती आहेत. एवढे जरी जाणले तरी हिंदू म्हणजे काय हे आपणांस कळेल अशी आशा आहे. तसे नसेल तर आपल्या कट्टर विचारांची खाज भागवायला इतर धर्म तुम्हाला पर्याय म्हणून खुले आहेतच. खुशाल नांदा तिकडे जाऊन.>>>>>> सहमत! धार्मिक/ सामाजिक परिवर्तन घडवण्यास नेहमीच तयार असल्याने मला माझा हिंदू धर्म नेहमीच प्रिय आहे.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
क
कपिलमुनी Wed, 09/30/2015 - 12:45 नवीन
हिंदू धर्म म्हणजे नक्की काय भौ ?
व
विकास Wed, 09/30/2015 - 13:15 नवीन
शोधा म्हणजे सापडेल
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Wed, 09/30/2015 - 14:36 नवीन
मग नेमाडे होतो
↩ प्रतिसाद: विकास
त
तुडतुडी Wed, 09/30/2015 - 14:33 नवीन
TJ खिक माझ्या वरच्या प्रतिसादाचा प्रतिवाद करण्याऐवजी माझ्यावर टीका करण सोपं आहे . त्यांच्या वाईट चालीरीतींवर बोलायची कोणाची हिमत नाही कि इछाच नाही .आपल्या परंपरांबद्दल बोलता तस त्यांच्या परंपरांविषयी का बोलू नये ? हिंदूंमध्ये प्रत्येक परंपरा हि कशी वाईटच आहे हे ठरवण्याची जणू चढाओढच लागलीये दिसतीये
मिसळपाववर कुणीही मुस्लिम धर्माच्या प्रसार करण्याहेतू लेख/प्रतिक्रिया कधीतरी दिल्या आहेत का?
मिसळपाववर कुणीही हिंदू धर्मच प्रसार करण्याहेतू लेख/प्रतिक्रिया दिल्या जात नाहीत . मुस्लिम आयडी हिंदू धर्माच्या विरोधात लेख आणि प्रतिसाद देतात . आणि हल्ली अश्या लेखांची संख्या फार वाढलीये . कधी ज्ञानेश्वरी , कधी गीता , कधी विवेकानंद , आता तर कोणी म्हणालय आता आदी शंकराचार्यांना घ्या . मी सं . मं ला व्य नि केला होता . हिंदूंमध्ये काय सगळं वाईटच असतं का ? जर चांगले लेख पण येवू द्यात कि .
कुण्या मुस्लिम आयडीने हिंदू धर्म कसा वाईटच असे धागे काढले आहेत का?
कुण्या हिंदू आयडीने मुस्लिम धर्म कसा वाईटच असे धागे काढले आहेत का?
हिंदूंच्या चुकीच्या चालीरीतींविरूद्ध आम्ही बोलणार, कायम बोलणार
बोला. मुस्लिमांच्या चुकीच्या चालीरीतींविरूद्ध आम्ही बोलणार, कायम बोलणार. कारण हा धर्म माझ्या देशात आहे . आणि त्यांचा परिणाम माझ्या देशावर , समाजावर होत असतो . माझे बाकीच्या लेखांवरच्या प्रतिक्रिया बघितल्या तर हिंदूंच्या वाईट चालीरीतींवर हल्ला करण्यात सुधा मी पुढे असते . सगळ्या महाराष्ट्राने कुलदैवत म्हणून स्वीकारलेल्या , घरोघरी ज्याचे कुलाचार चालतात त्या खंडोबाच्या लेखावरचा माझा प्रतिसाद वाचला का ? जे चूक आहे ते चूक . जे बरोबर आहे ते बरोबर
क
कपिलमुनी Wed, 09/30/2015 - 14:38 नवीन
आंजावर मला वाटते जे चूक आहे ते चूक . मला वाटते जे बरोबर आहे ते बरोबर बाकी मज्जानी लाईफ !
↩ प्रतिसाद: तुडतुडी
त
तर्राट जोकर Wed, 09/30/2015 - 15:09 नवीन
आपल्या परंपरांबद्दल बोलता तस त्यांच्या परंपरांविषयी का बोलू नये ? आपल्या परंपरांबद्दल बोलण्याच्या वेळी उगाच ''त्यांच्या परंपरांवरही जरा बोला" असे म्हणण्यामागे काय प्रयोजन हाच प्रश्न अगदी सुरवातीपासून उपस्थित केला आहे. त्यावर तुमचे उत्तर अजूनही स्पष्ट नसून झुडूपं झोडपत फिरताय. मुस्लिम आयडी हिंदू धर्माच्या विरोधात लेख आणि प्रतिसाद देतात . कूठून शोध लावलात हा. . कधी ज्ञानेश्वरी , कधी गीता , कधी विवेकानंद , आता तर कोणी म्हणालय आता आदी शंकराचार्यांना घ्या गीता, ज्ञानेश्वरीतले ज्ञान हे अव्याहत चिकित्सेतूनच उगम पावले आहे. पण तुम्हाला धर्मचिकित्सेचे वावडं आहे का? तसे असेल तर तुम्हीच हिंदू नाही असे लक्षात येते. तुम्ही स्वघोषित सेंसारशिप आणु पाहताय का मिसळपाववर? जर चांगले लेख पण येवू द्यात कि तुम्हाला कोणी अडवलंय का? तुम्ही लिहा की. तुम्हाला आवडेल तसंच व्हायला हे तुमचं घर नाही. कुण्या हिंदू आयडीने मुस्लिम धर्म कसा वाईटच असे धागे काढले आहेत का? ढिगाने प्रतिसाद आहेत मिसळपाववर. वाचता वाचता आयुष्य संपूल जाईल इतके इस्लाम कसा वाईट ह्या विषयावर लिहिले गेले आहे. लिहिणारे अर्थातच तुमच्या सारखे. मुस्लिमांच्या चुकीच्या चालीरीतींविरूद्ध आम्ही बोलणार, कायम बोलणार. कारण हा धर्म माझ्या देशात आहे . आणि त्यांचा परिणाम माझ्या देशावर , समाजावर होत असतो . जरा विस्ताराने लिहून धागा काढा की मुस्लिमांच्या चुकीच्या चालिरीतींमुळे भारतातल्या हिंदूंचे काय नुकसान झाले ते. उगा गफ्फा हाणणे बंद करा. जो काही मुस्लिम धर्माचा अभ्यास करत आहात तो जरा मुस्लिम वस्त्यांमधे जाऊन खर्‍या मुसलमानांसोबत राहून करा. काल्पनिक चित्र रंगवलेल्या बाजारू पुस्तकांतून नव्हे. कारण खपते तेच छापायचं असं प्रकाशनांचं गणित असतं. पाश्चात्त्य देश जसे अजूनही भारत म्हणजे गारूड्यांचा, हत्तीवरून प्रवास करणार्‍यांचा देश असे समजतात तसा मुस्लिमांबाबत तुम्ही गैरसमज करू नये, तुमच्यासारख्या ब्रेनवॉश झालेल्यांच्या वृत्ती बदलणं कदापि शक्य नाही. तरीही ह्या धाग्यावर मुस्लिमांचा विषय आणण्याचं काहीच कारण नव्हतं हे तुम्ही मान्य करायलाच हवं. नविन धागा काढा. मग बघू किती लढू शकता ते.
↩ प्रतिसाद: तुडतुडी
त
तुडतुडी Wed, 09/30/2015 - 14:42 नवीन
माझ्या एकही मुद्द्याला योग्य प्रतिवाद न करता, फक्त स्वताला हिंदू म्हणवून घेणाऱ्याना मुस्लिमांबद्दल एक ब्र काढला तर एवढी जळते त्यावरून अश्या हिंदू नपुंसाकांनी खुशाल त्या धर्मात जावून नांदावं .
त
तर्राट जोकर Wed, 09/30/2015 - 15:24 नवीन
तुडतुडी ताई, (नपुंसकची व्याख्या जरा बघून घ्या डिक्शनरीत. अर्थ उमजून वापरावे. आम्ही वापरला त्यामागचा संदर्भही लक्षात घ्या, हिंदू कश्मिरी पंडींतांना वाचवायला काय केले तुमच्या सारख्या हिंदूंनी हे अजून तुम्ही सांगितले नाही. म्हणे प्रतिवाद करा.)
क
कपिलमुनी Wed, 09/30/2015 - 16:10 नवीन
यावरून "मराठी आंजावरील बिगर हिंदू धर्मीयांचा वावर आणि योगदान " यावर चर्चा व्हावी
स
संपादक मंडळ Wed, 09/30/2015 - 18:54 नवीन
सदर धाग्यावरील चर्चा संपून फक्त आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. धागालेखकांनाही चर्चेचा समारोप करण्यात स्वारस्य दिसत नाही. त्यामुळे सदस्र धागा वाचनमात्र करत आहोत.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा