Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सरसंघचालकांचे आवाहन - अवैज्ञानिक रूढी आणि परंपरांचा त्याग

स
संदीप ताम्हनकर
Fri, 09/25/2015 - 09:29
🗣 182 प्रतिसाद
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी 13 सप्टेंबर 2015 ला जयपुर येथील एका परिसंवादामध्ये अतिशय महत्वाचे विधान केले. ते म्हणाले की 'हिंदुनी शास्त्रीय पाया नसलेल्या संकल्पना सोडून दिल्या पाहिजेत'. 'हिंदूंनी इतिहासातही जुनाट, अशास्त्रीय आचरणांचा त्याग केला असून जगाकडून नव्या गोष्टी शिकल्या आणि स्वीकारल्या आहेत' असे ही ते म्हणाले. सरसंघचालक हे संघ परिवाराचे प्रमुख असल्यामुळे या विधानाला अनुसरून आणि हे भाषण हा आदेश मानून जर संपूर्ण संघ परिवाराने आणि पर्यायाने भाजप सरकारने काम केले तर या राष्ट्रासाठी ती एक अतिशय महत्वाची सामाजिक सुधारणा असेल. हिंदूंनी अवैज्ञानिक रूढी आणि परंपरा पाळणे बंद केले पाहिजे हे विधान सरसंघचालकांनी करणे हीच एक महत्वाची सकारात्मक घटना आहे. त्यांचे हे विचार, केवळ भाषणाच्या ओघात केलेले मनोरथ (Wishful Thinking) नसून प्रामाणिकपणे आणि विचारपूर्वक केलेले विधान आहे असेच मानले पाहिजे. एवढ्या महत्वाच्या आणि संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य बदलून टाकण्याचे सामर्थ्य असणाऱ्या, या विचाराच्या बाजूने, आधीचे सर्व भेदाभेद बाजूला ठेऊन, सर्वांनी आपली शक्ती एकवटली पाहिजे. सदर परिसंवादामध्ये, अश्या कोणत्या अवैज्ञानिक गोष्टींचा त्याग करायचा याचे सखोल मार्गदर्शन संघ (RSS) प्रमुखांनी केले नसले तरी या संबंधी काय करता येईल याचे टिपण नक्कीच तयार करता येईल. धर्म हीच एक अशास्त्रीय संकल्पना आहे असे काही लोकांचे मत आहे. असे असले तरी देव आणि धर्म हा माणसाच्या बालपणापासूनच्या संस्कारांचा भाग असून त्यासंबंधीचे बदल लगेचच स्वीकारले जात नाहीत, कारण स्वतःच्या अस्तित्वाला आणि श्रद्धेला (Belief System) धोका आहे असे वाटून व्यक्ती प्रतिकारात्मक प्रतिक्रिया देते आणि नवीन विचार स्वीकारत नाही असा शास्त्रीय अनुभव आहे. त्यामुळे धर्म आणि देव या संकल्पनांच्या गाभ्याला कोणताही धक्का न लावता इतर अशास्त्रीय रूढी नक्कीच तत्काळ बंद करता येऊ शकतील. १. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा (ज्याचा सुस्पष्ट असा जादूटोणा विरोधी कायदा आज उपलब्ध आहे) ह्या नक्कीच अशास्त्रीय आहेत. - भूत, चमत्कार, अलौकिक शक्ती, गुप्त धन, अतींद्रिय शक्ती, कारणी, जादूटोणा, जारणमारण, चेटूक, मंत्राने विष उतरवणे, बोटाने शस्त्रक्रीया इत्यादी. २. पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या सर्व चालीरीती, रूढी, परंपरा - जलप्रदूषण - नदी अथवा तलावात, समुद्रात निर्माल्य, अस्थि आणि राख विसर्जन, गणेश मूर्ती, दुर्गा मूर्तींचे विसर्जन, ध्वनी प्रदूषण - करणाऱ्या मिरवणुका, गुलाल, फटाके, हवेचे प्रदूषण - होळीसाठी वृक्ष तोड आणि जाळणे, चितेवर मृतदेहाचे दहन, यज्ञ-याग, अन्नाची नासाडी. ३. जात - शास्त्रीय कसोटीवर सर्वांच्याच गुणसूत्रात सरमिसळ आहे हे सिद्ध झालेले आहे, त्यामुळे जात ही सर्वात मोठी अशास्त्रीय परंपरा आहे. ४. शब्द प्रामाण्याचा त्याग - पर्यायाने बुद्धिप्रामाण्याचा स्वीकार. ५. नवस सायास, बळी देणे, दक्षिणा, चमत्कारांचे समर्थन करणाऱ्या पोथ्या आणि पुराणे इत्यादी. (सर्वानुमते सदर यादी सुधारता अथवा वाढवता येईल) संघ परिवाराच्या दृष्टीने पाहता भारतात राजकीय सत्ता मिळाली आहे त्यामुळे आता सर्व शक्तीने आणि सर्वांनी मिळून या सामाजिक सुधारणांसाठी झटले पाहिजे. संघ परिवार या विचारावर प्रत्यक्ष कृतीला जेव्हा सुरुवात करेल तेव्हा करेल पण सध्या किमान असे काम करणाऱ्या सामाजिक संघटना आणि व्यक्तींच्या कामामध्ये अडथळा आणण्याचे काम बृहद संघ परिवारातर्फे केले जाऊ नये असे स्पष्ट आदेश सारासंघाचालाकानी दिल्यास मोठेच राष्ट्र उत्थानाचे काम होईल. संघाची ताकद मोठी आहे, संघाने मनात आणले तर काळाच्या ओघात रूढी - परंपरांच्या शुद्धीकरणाचे काम नक्कीच होईल आणि त्या कामामध्ये सर्व पुरोगामी, बुद्धिप्रामाण्यवादी चळवळीतले कार्यकर्तेही जोमाने सहभागी होतील हे नक्की.
वर्गीकरण
संघ
सरसंघचालक
अवैज्ञानिक
रूढी
परंपरा

प्रतिक्रिया द्या
30478 वाचन

💬 प्रतिसाद (182)
श
श्रीगुरुजी Sun, 09/27/2015 - 09:51 नवीन
>>> आणि गम्मत म्हणजे एकही पुरोगामी आला नाही हे सांगायला, की दीड हजार वर्षांपूर्वी काहीतरी घटना घडली म्हणून आज निष्पाप जीवांची निर्घृण कत्तल करणं हे किती 'मागासलेपणाचं' आहे. व्याख्या - ज्याला/जिला अगदी दूरच्या अंतरावरून हिंदूंच्या डोळ्यातील कुसळ दिसते आणि अगदी जवळून सुद्धा इतर धर्मियांच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही त्यालाच/तिलाच "निधर्मी आणि पुरोगामी विचारवंत" असे म्हणतात.
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी
त
तर्राट जोकर Sun, 09/27/2015 - 10:06 नवीन
आप्ले ते कुसळ दुसर्‍याचे ते मुसळ असे समजणार्‍यांना धर्मांध म्हणतात हे विसरलात काय भाऊ?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गुलाम Wed, 09/30/2015 - 11:19 नवीन
दुर्दैवाने हा धागा उशिरा उघडला त्यामुळे खुपच उशिरा प्रतिसाद देतोय. अंनिस ने इतर धर्मातल्या अंधश्रद्धांबद्दलची आपली भुमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे. ज्या त्या धर्मातल्या प्रागतिक विचारांच्या लोकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अंनिस त्याला सक्रिय पाठिंबा देईल अशी ती भुमिका होय. परंतु तरीही काही सनातनी लोक मुद्दाम असा प्रचार करुन बुद्धीभेद करतात आणि काही फेक्युलर लोकही हिंदूंवर टोकाची टिका करुन सर्वसामान्य हिंदूधर्माभिमानी लोकांच्या मनात किंतु निर्माण करतात. आपण अशा दोन्ही प्रवृत्तींपासून दूर राहिले पाहिजे. या वर्षी बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम सत्यशोधक समाजाने बकरी कापण्याऐवजी रक्तदान करा (त्यागाचे प्रतिक म्हणून) असा उपक्रम राबवला होता. अंनिसने त्याला सक्रिय पाठिंबा दिला. अनेक कार्यकर्त्यांनी त्यात रक्तदान केले. आपण अशा उपक्रमांना उत्तेजन दिले पाहिजे. अवांतरः मी अंनिसचा प्रवक्ता किंवा गेलाबाजार पदाधिकारीही नाहिये. वरील प्रतिसाद केवळ अनिसचा हितचिंतक या नात्याने दिलेला आहे.
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी
त
तर्राट जोकर Wed, 09/30/2015 - 11:27 नवीन
या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! काही स्वयंघोषीत हिंदूधर्मरक्षक ह्या धाग्यावर असाच उच्छाद मांडत आहेत. त्यांना सणसणीत चपराक आहे हा प्रतिसाद.
↩ प्रतिसाद: गुलाम
स
सूड Wed, 09/30/2015 - 11:33 नवीन
ज्या त्या धर्मातल्या प्रागतिक विचारांच्या लोकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अंनिस त्याला सक्रिय पाठिंबा देईल अशी ती भुमिका होय.
याचा अर्थ हिंदू शिवाय इतर धर्मात पुढाकार घेऊन काम करण्याइतके गट्स नाहीत असाच होतो. म्हणजे असंतोषाची लाट फुटली तर ती आमच्यावर नको, दुसर्‍यांनी पुढाकार घ्या आम्ही पाठिंबा देतो.
↩ प्रतिसाद: गुलाम
त
तर्राट जोकर Wed, 09/30/2015 - 12:49 नवीन
याचे उत्तर यॉर्कर यांनी खाली दिले आहे. प्रश्न गट्सचा नाही, औचित्याचा आहे. उद्या क्रिश्चनांनी हिंदूंमधल्या अंधश्रद्धांबद्दल अंनिससारखे काम हाती घेतले तर हिंदूंची काय प्रतिक्रिया असेल याचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का? इतर धर्मिय कट्टर आहे म्हणून अंनिसची फाटते असा गोड गैरसमज असणार्‍यांनी अंनिस एखाद्याची खरोखर फाटेल अशा वातावरणात काम करत आहे हे माहित नसते. पूर्ण माहिती व ज्ञानाशिवाय अंनिसला तुच्छ टोमणे मारणे हे अंनिससारखे काम स्वत: करून पाहण्यापेक्षा लाख पटीने सोपे आहे. संबंध नसलेले निरर्थक प्रश्न विचारण्यासही खास बुद्धीमत्ता लागत नाही.
↩ प्रतिसाद: सूड
ग
गुलाम Wed, 09/30/2015 - 13:00 नवीन
याचा अर्थ हिंदू शिवाय इतर धर्मात पुढाकार घेऊन काम करण्याइतके गट्स नाहीत असाच होतो.
तुम्हाला पाहिजे तो अर्थ काढायला तुम्ही मोकळे आहात. परंतु हिंदू धर्मामध्ये चार्वाकापासून ते तुकारामांपर्यंत धर्मचिकित्सेची परंपरा आहे. तशी ती मुस्लिम धर्मामध्ये दुर्दैवाने नाही. हिंदूंना या परंपरेचा अभिमान वाटायला हवा. पण आजकालचे काही कट्टर हिंदू उलट चिकित्सा करणार्‍यावरच तुटून पडतात. ते असो.
म्हणजे असंतोषाची लाट फुटली तर ती आमच्यावर नको, दुसर्‍यांनी पुढाकार घ्या आम्ही पाठिंबा देतो.
पीके चित्रपटाच्यावेळी झालेला गदारोळ आठवत असता तर तुम्ही असं म्हणलं नसतं. त्यावेळी पीकेला विरोध करणार्‍या लोकांचा (अगदी मिपावरदेखील) मुख्य आक्षेप होता की अमीर खान मुस्लिम आहे. म्हणजे कसंय बघा हं, जे लोक अमीर खानला आमच्या धर्मात हस्तक्षेप करायचा अधिकार नाही असं तावातावाने म्हणत होते. तेच लोक चिकित्सक हिंदूंना मात्र मुस्लिम धर्माबद्द्ल का बोलत नाही असंही विचारतात.
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 09/30/2015 - 13:26 नवीन
@ट्ज काका आणि गुलामभाऊ एखादी गोष्ट केवळ आपल्याला पटतेय म्हणून तिच्यातील त्रुटींवर पांघरुण तुम्हा दोघांची घालायची कला शिकण्यासारखी आहे. बाकी चालू द्या!!
↩ प्रतिसाद: गुलाम
त
तर्राट जोकर Wed, 09/30/2015 - 13:40 नवीन
एखादी गोष्ट आपल्याला पटत नाही म्हणून तिच्यात नसलेल्या त्रुटी दाखवण्याची तुमचीही कला उत्तमच आहे. तरी वर उल्लेखलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले असते तर जास्त बरे वाटले असते. असो. मुद्देसूद वाद प्रत्येकाला झेपत नाहीत हेच खरे.
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 09/30/2015 - 17:34 नवीन
एखादी गोष्ट आपल्याला पटत नाही म्हणून तिच्यात नसलेल्या त्रुटी दाखवण्याची तुमचीही कला उत्तमच आहे.
अरे वाह!! तुम्हालाही पटलं तर!!
तरी वर उल्लेखलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले असते तर जास्त बरे वाटले असते. असो. मुद्देसूद वाद प्रत्येकाला झेपत नाहीत हेच खरे
तुमच्या वरील वाक्यातच उत्तर आहे. वाद घालण्यात आम्हाला शष्प रस नाही. आणि अचानक एखाद्या धाग्यावर कुत्र्याच्या छत्रीसारखे उगवून ऊर बडवत बसणार्‍या आयडींना आम्ही फाट्यावर मारण्यायोग्यही समजत नाही. तुमचे रणकंदन असेच उत्तरोत्तर बहरत जाऊन धाग्याला ५०० प्रतिसाद मिळवून द्याल ही शुभेच्छा!! तुम्हाला गळे काढायला मिळतील असे आणखी धागे मिपावर येवोत ही त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना करतो. इति लेखनसीमा!!
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ब
बॅटमॅन Wed, 09/30/2015 - 13:36 नवीन
म्हणजे कसंय बघा हं, जे लोक अमीर खानला आमच्या धर्मात हस्तक्षेप करायचा अधिकार नाही असं तावातावाने म्हणत होते. तेच लोक चिकित्सक हिंदूंना मात्र मुस्लिम धर्माबद्द्ल का बोलत नाही असंही विचारतात.
हा हा हा, हा बाकी एकदमच बिनतोड मुद्दा आहे. मान गये.
↩ प्रतिसाद: गुलाम
D
dadadarekar Wed, 09/30/2015 - 14:23 नवीन
हिंदू धर्मामध्ये चार्वाकापासून ते तुकारामांपर्यंत धर्मचिकित्सेची परंपरा आहे. ......... हो . आणि असे अनेक चार्वाक व अनेक तुकाराम लबाड धर्मवाद्यानी सदेह स्वर्गालाही धाडले आहेत. आमचेही कितीतरी आयडी धर्मयुद्धातच नष्ट केले गेलेले आहेत.
↩ प्रतिसाद: गुलाम
प
पैसा Wed, 09/30/2015 - 14:28 नवीन
यादी द्या की. मिपा हे तुमचे धर्मयुद्ध आहे का? ब्वार्र.
↩ प्रतिसाद: dadadarekar
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 09/30/2015 - 14:40 नवीन
हा हा ! म्हणजे, आपल्या अनेक डूआयड्या असल्याची कबुली दिलीच शेवटी ! चोर स्वतःला कितीही हुशार समजत असला तरी कोणते तरी धागेदोरे मागे सोडतो ते असे =)) =)) =))
↩ प्रतिसाद: dadadarekar
क
कपिलमुनी Wed, 09/30/2015 - 12:42 नवीन
ज्या त्या धर्मातल्या प्रागतिक विचारांच्या लोकांनी
अंनिस वाले "धर्म" मानतात हे वाचून डोळे पाणावले. हमीद आठवला :) अवांतरः मी अंनिसचा प्रवक्ता किंवा गेलाबाजार पदाधिकारीही नाहिये आणि विरोधक नाही सनातनी नाही ! माताय्य , मी कुणीच नाही :(
↩ प्रतिसाद: गुलाम
ग
गुलाम Wed, 09/30/2015 - 13:23 नवीन
अंनिस वाले "धर्म" मानतात हे वाचून डोळे पाणावले.
हा विरोधकांचा आणखी एक आवडता शब्दच्छ्ल. अंनिस धर्म मानत नाहिच. पण समाजात त्याचा प्रभाव आहे हे तर मान्य करावेच लागेल. तो न मानण्याची शहामृगी भुमिका सामाजिक संघटनेला घेऊन चालत नाही. हिंदू सुधारकांनी मुस्लिम धर्मासाठी पण काम करावं ही आदर्शवत परिस्थिती झाली. पण सध्या तरी ते प्रॅक्टीकली शक्य नाही.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सूड Wed, 09/30/2015 - 13:28 नवीन
तुमचाच प्रतिसाद परत वाचा. पहिल्या वाक्यात लिहिलंत त्याच्या नेमकं उलट शेवटच्या वाक्यात लिहीलंय. अता मात्र हद्द झाली. =))
↩ प्रतिसाद: गुलाम
द
दत्ता जोशी Sun, 09/27/2015 - 09:38 नवीन
पण त्यासाठी अश्या रूढी कोणत्या याची सूची तयार झाली तर आपल्याला ठरवता येईल ना! किमान कोणत्या रूढी कशा समाजात आल्या आणि त्या का टाकावू आणि निरर्थक आहेत याचा विचार तरी होईल. बाय द वे, तुमच्या प्रमाणेच मी हि बळी प्रथा, बुवाबाजी इत्यादीच्या विरूद्धच आहे.
द
दत्ता जोशी Sun, 09/27/2015 - 09:48 नवीन
विनोद म्हणून ठीक आहे पण तर्क किंवा निष्कर्ष असेल तर परत एकदा साफ चुकीचा. कारण मी बाय चोइस शुद्ध शाकाहारी आहे शिवाय मला स्वतःला अनेक मुसलमान मित्र आहेत. त्यांच्या घरी मी शिरकुर्मा खायला जातो कि. इतका काही ओर्थोडोक्स नाहीये हो मी. गेली १३ वर्षे मध्यापूर्व, आफ्रिका आणि युरोपात काम करतोय तेव्हा अनेक राष्ट्रीयत्वाचे आणि धर्माचे ( तसेच जातीचे) मित्र आहेत. त्यांच्या घरी जेव्हा जेवायला बोलावतात तर माझ्यासाठी खास शाक बनवले जाते. :-)
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 09/27/2015 - 09:54 नवीन
पहिला ते कुठले देऊळ आहे तिथे नवस पूरा करायला म्हणून पोरे मंदिराच्या छतावरुन खाली ताणलल्या चादरीत सोडतात तो मूर्खपणा बंद करायला हवा राव!
श
श्रीगुरुजी Sun, 09/27/2015 - 10:01 नवीन
ती प्रथा एका देवळात होती. तिथे मुलांना छतावरून सोडत नाहीत, पहिला मजल्यावरून खाली उभे असलेल्यांच्या चादरीत टाकतात. अर्थात छतावरून किंवा पहिल्या मजल्यावरून टाकणे हा पराकोटीचा मूर्खपणा असून अत्यंत क्रूरपणाचे लक्षण आहे. आता बहुतेक ती प्रथा बंद झाली असावी कारण मागील २-३ वर्षांपासून त्याबद्दल ऐकलेले/पाहिलेले नाही. बादवे, एका मशिदीतही तीच प्रथा होती. वृत्तवाहिन्यांवर देऊळ व मशीद अशा दोन्ही ठिकाणी हे पाहिलेले आहे.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
द
दत्ता जोशी Sun, 09/27/2015 - 10:01 नवीन
पण दोन्ही बाजू समजून घ्यायला आवडतील. म्हणजे हि प्रथा का बंद व्हावी आजपर्यंत किती अपघात घडले इ. इ. तसेच असे नवस का बोलले जातात, ते पूर्ण होतात का , लोकांचे अनुभव का आहेत, अशा नवसांनी झालेल्या तान्हुल्यांना असे निर्दयीपणे का फेकले जाते इ.
य
याॅर्कर Sun, 09/27/2015 - 12:33 नवीन
त्यामुळे काय होईल, की सगळ्या ज्या रूढी,परंपरा आहेत त्या बंद होण्यास मदत होईल.'निराकार'(निर्गुण), 'एकेश्वरवाद' याबद्दल वेंदांमध्येही उल्लेख आहे.कारण 'साकार'(सगुण), परमेश्वराचे रूप आले कि विधी-विधान,अनुष्ठान,व्रत-वैकल्य हे सारे येणारच म्हणून हिंदूनी आता एकेश्वरवादाकडे वळले पाहिजे,त्यामुळे बर्यापैकी प्रश्न सुटतील जसे कि धर्मकार्यांमुळे होणारे प्रदूषण वगैरे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव,दुर्गा उत्सव,दहीहंडी,नवस करणे,आणि इतर बरेच या गोष्टींची आताच्या अधुनिक काळामध्ये काही गरज नाही असे वाटते. ---(मी हिंदूच आहे गैरसमज नसावा)
श
श्रीगुरुजी Sun, 09/27/2015 - 15:48 नवीन
देवाला निराकार, निर्गुण असे समजल्याने रूढी, परंपरा बंद होणार नाहीत. उलट नवीन रुढी, परंपरा निर्माण होतील. मुस्लिमांमध्ये देवाला निर्गुण, निराकार समजले गेले आहे. त्यामुळे त्यांच्यात मूर्तीपूजा नाही व देवाचे चित्र काढण्यास परवानगी नाही. मशिदीत कोठेही मूर्ती, तस्बीर, चित्र इ. नसते. तिथे सर्वजण मक्केच्या दिशेने तोंड करून प्रार्थना म्हणतात. तरीसुद्धा त्यांच्यात अनेक रूढी, परंपरा, उपासतापास, विधी इ. निर्माण झालेले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, दहीहंडी इ. धार्मिक कमी आणि सामाजिक व सांस्कृतिक जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे ते सुरू राहणारच. फक्त त्यात शिरलेल्या उपद्रवी गोष्टी कमी करण्याची आवश्यकता आहे. नवस वगैरे आता फारसे कोणी करीत असेल असे वाटत नाही. जरी वैयक्तिक पातळीवर कोणी नवस केला तरी जोपर्यंत त्याचा समाजाला उपद्रव नाही तोपर्यंत त्याला आक्षेप घेता येणार नाही.
↩ प्रतिसाद: याॅर्कर
र
राजेश घासकडवी Sun, 09/27/2015 - 15:50 नवीन
मोहन भागवतांच्या या विधानाचं मनापासून स्वागत. जर संघाने आपली शक्ती विघातक रूढी नष्ट करण्यासाठी पणाला लावली तर खरोखरच अनेक लोकांचं भलं होऊ शकेल. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करणं ही सरकारची जबाबदारी आहे. कायद्याने उघड होणाऱ्या अशा काही प्रकारांना थोडाफार आळा बसेल, पण समाजात जो बदल व्हायला हवा तो कायद्याने होत नाही. त्यासाठी संघासारखी ग्रासरूट्स पातळीवर काम करणारी संघटना प्रचंड प्रभावी ठरते. त्यांचं हे विधान संघाची भूमिका ठरो, आणि त्यातून काही सकारात्मक बदल दिसून येवो ही सदीच्छा.
प
प्रकाश घाटपांडे Sun, 09/27/2015 - 16:45 नवीन
अगदी अस्सेच म्हणतो
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
य
याॅर्कर Mon, 09/28/2015 - 05:41 नवीन
चीनमध्ये कोणताही धर्म न मानणारे सुमारे 52.2% लोक आहेत,म्हणजे बहुमतच झालं की? आणि अमेरिकेमध्ये 22.8% लोक कोणताही धर्म मानत नाहीत.म्हणूनच कि काय? हे दोन देश आज प्रगतीच्या शिखरावर आहेत.
अ
अर्धवटराव Mon, 09/28/2015 - 22:05 नवीन
वाईड बॉलवर यॉर्कर पडला :) चीन आणि अमेरीकेची प्रगती तिथल्या धर्म न मानणार्‍या लोकांच्या संख्येमुळे झाली हे नवीनच लॉजीक कळलं =))
↩ प्रतिसाद: याॅर्कर
य
याॅर्कर Tue, 09/29/2015 - 07:02 नवीन
धर्म न माननार्यांचे तर योगदान आहेच त्यांच्या प्रगतीमध्ये. शिवाय, धर्म माननारे देखील काम सोडून 'भिक्षाम देही' करत फिरत नाहीत. --(क्लीन Bowled मिडल stump)
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Tue, 09/29/2015 - 22:00 नवीन
एका हाती स्टंप, एका हाती बॉल. बॉलवर स्टंप आदळायचा आणि क्लीन बोल्ड ओरडायचं. छान चाललाय वर्ल्डकप.
↩ प्रतिसाद: याॅर्कर
य
याॅर्कर Wed, 09/30/2015 - 04:02 नवीन
नाही हं आता, review संपलेत सगळे
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
द
दत्ता जोशी Mon, 09/28/2015 - 06:12 नवीन
या निष्कर्षाचा पाया काय? प्रगतीचा मापदंड काय? पर कैपिटा/ दर डोई उत्पन्न का? चीन मध्ये गरिबी नाही म्हणून कोणी सांगितलं? मग युरोप,जपान विषयी काय म्हणावे बुवा? यु ए इ , सौदी, कुवेत, कतार या इस्लामिक स्टेट्स मध्ये पण प्रचंड सुबत्ता आहे. पर कैपिटा उत्पन्नाचा विचार केला तर आफ़्रिकेतिऎल बोट्स्वाना या छोटेखानी देशाचे पर डोई उत्पन्न चीनच्या बरोबरीचे आहे कि. याची सांगड धर्माशी काही काय घालता येईल बरं? आधार : http://data.worldbank.org/indicator/NY.GDP.PCAP.CD
व
विटेकर Mon, 09/28/2015 - 07:50 नवीन
मिपावर अनेक दिवसांनी प्रतिक्रिया देत आहे, अगदी राहवत नाही म्हणून ! संघाचे नाव आले की मिपावरचे काही आय डी चवताळून उठतात हा आता नेहमीचा अनुभव झाला आहे, संघावर टिका करणार्‍या कोणीही संघ ना जवळून पाहिला ना स्वतः कधी अनुभव घेतला. कुणीतरी सांगितले म्हणून यांचा संघद्वेष! बरे, संघाचे काम पटत नाही म्हणून काही अन्य विधायक करतात का? ते ही नाही , तिथेही बोंबच , मिपासारखे व्यासपीथ उपलब्ध आहे म्हणून सतत विखारी ओकत राहायचे, मराथीत अशा वागण्याला क्रियानश्ट्पणा म्हणतात ! संघात कधीकाळी गेला आहे आणि त्याला त्यात प्रामाणिक सुधारणा व्हावी असे वाटते, त्याला हे पक्के माहीत आहे की तक्रार करण्याची ही जागाच नव्हे ! अशा न पटलेल्या मुद्द्यांसाठी संघात योग्य ते च्यानेल उपलब्ध आहे , तेव्हढा मोकळा संवाद तिथे करता येतो हा माझा गेल्या ३८ वर्षांचा अनुभव आहे. याचा दुसरा अर्थ असा की - ज्यांना टिका करायची आहे त्यांना फक्त टिका करायची आहे आणि त्यातून राळ उडवायची आहे , चालू द्या ! सरसंघचालकांचे हे विधान हीच संघाची भूमिका १९२५ पासून आहे , संघाच्या कोणत्याही कार्यक्रमात कसल्याही कर्मकांडाचे अवडंबर नसते, त्यामुळे कोणत्याही स्वंयसेवकाला त्यांच्या या विधानाचे अप्रूप वाटणारच नाही , हा संघाचा सहज भाव आहे , त्याचा अभिनिवेश देखील नाही ! १९२५ पासून संघ केवळ हिन्दूसमाज सुधारणेचेच काम करतो, यांत विशेष काहिही नाही. आणि संघ , संघ आणि समाज हे द्वैत मानतच नाही, संघ समाजापेक्शा वेगळा नाही , समाज संघापेक्षा वेगेळा नाही, त्यामुळे सरसंघचालक बोलताना समाजाचाच व्यापक संदर्भ घेतात. १९६५ साली विश्व हिन्दू परिषदेची स्थापना करताना द्वितीय सरसंघचालकांनी सर्व शंकराचार्य आणि धर्माचार्याच्या उपस्थितीत न हिन्दू पतितो भवेत | अशी घोषणा केली होती आणि संघाने तत्पूर्वीच ते आचरणातही आणले होते ! आज दुर्दैवाने मिडियाचे वलय संघाला प्राप्त झाले आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीची घटना होते, विरोधक चवताळतात , आणि मदार्‍याचा खेळ होतो. आपल्याकडेही ( मला अजूनही मिपा आपले वाटते , असेच चालू राहीले तर मी किती दिवस येत राहीन हाही प्रश्नच आहे , आणि अर्थात माझ्या जाण्याने इथे शष्प देखील फरक पडणार नाही हे ही मला माहीत आहे !) संघ / हिन्दु धर्म हा विषय निघाला की ब्याटमन, जिनियस मंडळीना चेव चढतो, दुर्दैवाने हे सारे हिन्दु=भारतीय आहेत, त्यांना परके तरी कसे म्हणू ? सावरकरांचा " सदगुण विकृती " हा शब्द इथे चपखल बसतो ! आमच्याच बाजूल गोल मारण्याची आमची जयचंदी अवसानघातकी वृत्ती आम्हाला आणखी किती वेळा रसातळाला नेणार आहे , हे तो सृष्टीकर्ताच जाणो ! हिन्दूंचा हिन्दूंचा जितका घात केला तितका आक्रमकांनी देखील केला नाही. यांना आपल्याच डोळ्यातील कुसळ मुसळाएवढे दिसते...! र्खरेच अशा ठिकाणी का यावे आणि वृथा व्यतित व्हावे ?
न
नाखु Mon, 09/28/2015 - 08:08 नवीन
लेखातील बहुअंशी बाबींशी सहमत पणः ब्याटमन ला विचारजंताचे यादीत बसविल्याबद्दल तीव्र निशेध आणि जोरदार आक्षेप. स्वगतः तुमको बॅट्या सम्झ्याच नही (जितके त्याच्याशी संवाद साधाल तितके तुम्हाला तो सम्जत जाईल) बॅट्या १/२५ सम्जला आहे तरीही अश्या समजुतीतही आनंद मिळविणारा नाखु.
↩ प्रतिसाद: विटेकर
प
प्रसाद गोडबोले Mon, 09/28/2015 - 13:14 नवीन
अहाहा काय हा बंधुभाव ! स्वमतांध दांभिकतेच्या युगात असले निर्व्याज्य प्रेम पाहुन डोळे पाणावले की आमचे =)) ऐसी जिव्हाळ्याची जाती | करी लाभेविण प्रीती || अहाहा , सलाम नाखु सलाम ! __________________________________/\______________________________________
↩ प्रतिसाद: नाखु
ब
बॅटमॅन Wed, 09/30/2015 - 08:46 नवीन
नाखुकाका....._/\_
↩ प्रतिसाद: नाखु
प
पैसा Mon, 09/28/2015 - 12:43 नवीन
( मला अजूनही मिपा आपले वाटते , असेच चालू राहीले तर मी किती दिवस येत राहीन हाही प्रश्नच आहे , आणि अर्थात माझ्या जाण्याने इथे शष्प देखील फरक पडणार नाही हे ही मला माहीत आहे !)र्खरेच अशा ठिकाणी का यावे आणि वृथा व्यतित व्हावे ?
एवढ्यापुरतेच बोलते. तसे काही लोक बोलतात, ती मिपाची अधिकृत भूमिका आहे का? नाही. कोणाला काय वाटते ते बोलतात. त्यात आक्षेपार्ह म्हणजे बदनामीकारक, असभ्य काही असेल तर त्यावर कारवाई केली जाते. जर संपादकांनी पाहिले नाही तर कोणीही सदस्य लक्षात आणून देऊ शकतो. पण मिपा या अशा बोलण्याहून खूप काही आहे. केवळ तेवढ्यासाठी, २/४ लोकांच्या बोलण्यावरून इथून निघून जाणे हे काही मला पटत नाही. तुम्ही असे निघून गेलात की मग इथे फक्त एका बाजूने लिहिणारे शिल्लक राहतील. ते तुम्हाला आवडेल का? बरे दुसर्‍या बाजूने बोलणारे तुम्ही चूक होतात म्हणून पळून गेलात असे ओरडतील, तेही तुम्हाला आवडेल का? त्यापेक्षा श्रीगुरुजी असे काही असेल तर ती लिहायला चांगली संधी आहे असे समजून लिहितात. ते मला आवडते. वाद प्रतिवाद तर होणारच!
↩ प्रतिसाद: विटेकर
प
प्रसाद गोडबोले Mon, 09/28/2015 - 14:10 नवीन
वाद प्रतिवाद तर होणारच!
एवढ्यापुरतेच विचारतो काही व्यक्ती जाणीवपुर्वक दुसर्‍यांच्या धार्मिक भावना दुखावणारे लेखन करीत असतात आणि सतत त्या धर्माचा चेष्टेत उलेख करीत असतात (ह्या धाग्यावरही केलेला आहेच पहा ), आणि अशा व्यक्तींचा प्रतिवाद कसा करायचा ? ह्यावर मार्गदर्शन अपेक्षित आहे . कारण सदर व्यक्ती ज्या गटातील आहेत त्या गटातील अतिअत्यल्प लोकंच असे विचित्र वागतात म्हणुन त्या गटावर टीका टिप्पण्णी करणे योग्य नाही आणि जर समजा त्या व्यक्तीवर टिप्पण्णी केली तर सदर व्यक्ती " व्यक्तिगत आरोप केले " असे रडगाणे गात संपादक मंडळामागे लपते आणी धागे / प्रतिक्रिया संपादित करुन घेते असा अनुभव आहे . प्रश्न असा की अशा व्यक्तींचा प्रतिवाद कसा करायचा ?
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 09/28/2015 - 15:23 नवीन
सगळे मिपाकर तेवढे हुशार आहेतच! काहीही लिहिताना ते मिपाच्या धोरणाच्या चौकटीत असले की झाले. कोणी कोणाच्या मागे लपण्याचा प्रश्नच नाही. वैयक्तिक शेरे कोणत्याही परिस्थितीत मुख्य बोर्डावर राहणार नाहीत. एखादा चुकून राहिला तर जरूर सं मं ला कळवा.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 09/28/2015 - 17:20 नवीन
वैयक्तिक शेरे कोणत्याही परिस्थितीत मुख्य बोर्डावर राहणार नाहीत. एखादा चुकून राहिला तर जरूर सं मं ला कळवा.
असे असेल तर मग सदर व्यक्तीने सनातन धर्माची सतत उडवलेली टर मुख्यबोर्डावर का रहाते ? "धार्मिक शेरेबाजी चालेल पण वैयक्तिक शेरेबाजी चालणार नाही" असे काही धोरण आहे का ? असे असल्यास सदर व्यक्तीचा प्रतिवाद करावा तरी कसा ??? - ( अत्यंत विनम्रपणे आणि तितक्याच गांभीर्याने प्रश्न विचारत आहे )
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 09/28/2015 - 18:52 नवीन
दुसऱ्याची भाषा पटली नाही तर सं.मं. कडे तक्रार करा. तुम्ही कधी कोणाविरुद्ध अशी असभ्य भाषेबद्दल तक्रार केली होती का?
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 09/28/2015 - 20:59 नवीन
ओके। सनातन वैदिक धर्माचा उल्लेख सतत टनाटन ऐसा करणे ( तेहि उपनिषदोक्त धर्माचा काडी मात्र अभ्यास नसताना ) हे आक्षेपार्ह आहे । आता संपादक मंडलाकडे तकरार करुन पहातो काही कार्रवाई होते का ते । धन्यवाद
↩ प्रतिसाद: पैसा
ब
बाळ सप्रे Tue, 09/29/2015 - 07:27 नवीन
प्रगो, एखाद्या विचारसरणीवर टीका ही इथे होणारच.. काही लोकांना असे शब्दप्रयोग करुन लिहीण्याची सवय असते. टनातन या शब्दाप्रमाणे सिक्युलर, निधर्मांध, विचारजंत, आपटार्ड, प्रेस्टीटयुट, मोदीभक्त, संघिष्ट, खांग्रेसी असे अनेक शब्द अनेकांच्या विचारसरणीवर टीका करण्यास वापरले जातात. यापुढे जाउन अनेक लोक इतरांच्या आयडींवर देखिल असे विकृत संस्कार करतात (जे एकवेळ वैयक्तिक टीकेत येउ शकेल) आपल्याला पटणार्‍या विचारसरणीवर होणार्‍या टीकेमुळे जर भावना दुखावु लागल्या तर इथे काहीच वादविवाद होउ शकणार नाहीत. कारण गवि, विकास वगैरेंसारखे संतुलित लि़खाण सगळ्यांना जमेलच असे नाही. किंबहुना जमणारच नाही कारण ते फार मोठे कौशल्य आहे. पण हे कौशल्य नसूनही एखाद्याकडे काही चांगले मुद्दे असू शकतात. त्यामुळे लिखाण अथवा प्रतिसादातील आपल्याला जे चांगले वाटते ते घेणे व इतर गोष्टींकडे कानाडोळा करणे हेच इष्ट.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Tue, 09/29/2015 - 08:43 नवीन
टनातन या शब्दाप्रमाणे सिक्युलर, निधर्मांध, विचारजंत, आपटार्ड, प्रेस्टीटयुट, मोदीभक्त, संघिष्ट, खांग्रेसी असे अनेक शब्द अनेकांच्या विचारसरणीवर टीका करण्यास वापरले जातात.
सारे शब्द नीट वाचले मात्र ह्यातील अन्य कोणता शब्द धार्मिक भावना दुखावणारा आहे हे कळाले नाही . केवळ सनातन धर्माची टिंगल उडवली जाते अन्य धर्माविषयी असे काही बोलण्याचा , धर्माची नामविकृती करण्याचा कोणा धर्मसुधारकाच्या त दम नाही ...
त्यामुळे लिखाण अथवा प्रतिसादातील आपल्याला जे चांगले वाटते ते घेणे व इतर गोष्टींकडे कानाडोळा करणे हेच इष्ट.
हा मुद्दा पटलेला आहे :)
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Tue, 09/29/2015 - 12:16 नवीन
भावनेला केवळ धार्मिकता ही एकच मिती असते का? (खास करुन दुखावणार्‍या) इतर शब्दात अन्य विचारसरणींबद्दल निंद्य्/तुच्छ/हीन भाव आहेत असे वाटत नाही का?
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Tue, 09/29/2015 - 13:20 नवीन
भावनेला केवळ धार्मिकता ही एकच मिती असते का?
नाही... तसे नाही . पण धार्मिकतेची मिती ही व्यक्तिमत्वाच्या मीती इतकीच श्ट्राँग असते . जर व्यक्तिगत टिप्पण्णी खपवुन घेतली जात नसेल तर धार्मिक टिप्पण्णी तरी का बरे खपवुन घेतली जावी ? इतकाच माक्झा प्रश्न होता . आणि मुळ प्रश्न रहातोच की समजा एक व्यक्ती समस्त धर्मावर टीका करत असेल तर त्याचा प्रतिवाद कसा करायचा ? म्हणजे कोणी सतत हिंदु धर्माची हेटाळणी करत असेल तर त्याला उत्तर कसे द्यायचे ? कारण सदर व्यक्तीला उत्तर दिले की ती व्यक्तिगत टिप्पण्णी ठरणार अन सदर व्यक्ती संपादकंकडे जाऊन मुळूमुळू रडणार अन प्रतिक्रिया संपादित करुन घेणार ! मग उत्तर द्यायचे तरी कसे ???
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Wed, 09/30/2015 - 06:57 नवीन
पण धार्मिकतेची मिती ही व्यक्तिमत्वाच्या मीती इतकीच श्ट्राँग असते
ते तुमच्या बाबतीत.. अथवा बहुसंख्यांच्या बाबतीतही असेल. पण सरसकट सगळ्यांना लागू करणे शक्य नाही. काहींच्या दृष्टीने धर्म, काहींच्या दृष्टीने जात, काहींच्या दृष्टीने देश, काहींच्या दृष्टीने भाषा, काहींच्या दृष्टीने राज्य, काहींच्या दृष्टीने शहर, काहींच्या दृष्टीने व्यवसाय, काहींच्या दृष्टीने कला हीच आपली ओळख इतकी घट्ट बांधिलकी असते. कशाकशावरची टीका व्यक्तिगत मानणार?? त्यामुळे इतक्या diverse लोकसमूहात या सगळ्या अट्रीब्युट्सना वैयक्तिक ठरवणे कठीण आहे.बाकी काय वैयक्तिक नि काय नाही यबद्दल मिपाचे धोरण आहेच. आणि सं मं त्या धोरणानुसार निर्णय घ्यायला सक्षम आहेच.. एखादी व्यक्ती सतत समस्त धर्मावर टीका करत असेल आणि तुम्ही त्यातील मुद्द्याचा प्रतिवाद केल्यास मला नाही वाटत संपादक त्यांच्या मुळूमूळू रडण्याला भीक घालून तुमची प्रतिक्रीया संपादीत करेल. मात्र आपण मुद्द्याचाच प्रतिवाद करण्याकडे लक्ष देणे महत्वाचे.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
पैसा Wed, 09/30/2015 - 09:47 नवीन
प्रतिसाद आवडले.
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
य
याॅर्कर Mon, 09/28/2015 - 08:03 नवीन
धर्माच्या ,संस्कृतीच्या, रूढी पंरंपरेच्या नावाखाली आपणच स्वतःला त्रास करून घेतोय आणि दुसर्यांनाही त्रास देतोय.आपल्याला न पटणार्या आपल्याच धर्मातील चालिरीती,परंपरा बंद झाल्या पाहिजेत,नुसता टाईमपास आहे सगळा,बाकी काय? - वटसावित्री(तथ्य काय ?) -सत्यनारायण(नाही केला तर?) -वारी(एकाच दिवशी लाखो लोकांनी जमून तिथे सगळी अस्वच्छता का करायची?) -दहीहंडी(ट्रॅफिकची कोंडी आणि स्तःची हाडे मोडून घेणे दुसरं काय?) -सार्वजनिक गणेशोत्सव(ध्वनी प्रदूषण करून आणि दारू पिऊन धिंगाणा घालणे,तसेच दोन मंडळातील खुन्नस ही आलीच.काही चांगली मंडळे अपवाद असू शकतात.) -जत्रा/यात्रा(काही देवतांना म्हणे मांसाहाराच्या नैवेद्याचा मान लागतो) -शिमगा(उगाचच बोंब मारायची?) आणि इतर बरेच काही. हे सगळ नाही केलं तर काय होणार आहे? मोगलांनी,पोर्तुगीजांनी,इंग्रजांनी,डच,फ्रेंच यांनी आपल्याला इकडे येऊन बदडले, तरी आणि तेच सगळं.अजून शहाणपण आलेले नाही? मुलांच्या भविष्याचा विचार न करता मुलं जन्मास घालणारे हे आपले लोक काय झेंडा लावणार आहेत?(काही अपवाद) म्हणून धर्मातून चांगली शिकवण घेतली पाहिजे,चांगल्याही बर्याच गोष्टी आहेत धर्मात. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद !जय महाराष्ट्र!!
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 09/28/2015 - 09:16 नवीन
यॉर्करा, धर्म ही अफुची गोळी आहे असे तो कार्ल मार्क्स म्हणायचा ते उगीच नाही.वटसावित्री,सत्यनारायण न करून काही होणार नाही पण मग काही लोक करत असतील तर काय बिघडणार आहे?दही हंडी,सार्वजनिक गणेशोत्सव ह्या उत्सवांचे प्रमाण महाराष्ट्रातच जास्त आहे.तेव्हा त्यावर मर्यादा हवी. दुसर्यास अपद्रव होणार नसेल तर उत्सव्,व्रतवैकल्ये जरूर करावीत.
↩ प्रतिसाद: याॅर्कर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा