Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: निकाल

ग
गॅरी ट्रुमन
Sat, 11/07/2015 - 13:18
🗣 240 प्रतिसाद
बिहार विधानसभा निवडणुक-२०१५ ची मतमोजणी उद्या रविवार ८ नोव्हेंबर २०१५ रोजी होणार आहे.निवडणुकांचे निकाल आणि त्या अनुषंगाने चर्चा या धाग्यावर करावी ही विनंती. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. सव्वाआठपर्यंत पहिले कल हाती येतील अशी अपेक्षा आहे. गॅरी ट्रुमन

Book traversal links for बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: निकाल

  • ‹ बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: मतमोजणीपूर्व धागा
  • Up
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
52220 वाचन

💬 प्रतिसाद (240)
ग
गॅरी ट्रुमन Sun, 11/08/2015 - 05:54 नवीन
कल उपलब्ध: २३१ भाजप आघाडी: १०१ (+१०) संजद आघाडी: १२४ (-११) इतर: ८ (१) कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक नितीशकुमार आणि लालूंच्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत हे बघायला हवे. नितीशकुमार मुख्यमंत्री होणार असे दिसते. मी १९८९ पासून प्रत्येक महत्वाची निवडणुक अगदी भक्तीभावाने फॉलो केली आहे. सुरवातीला आघाडीवर असलेला पक्ष इतका मागे जाणे असे आतापर्यंत झालेले नाही. हा प्रकार अगदीच धक्कादायक दिसतो. बहुदा एन.डी.टी.व्ही आणि इतरांनी आकड्यांची खात्री न करताच उत्साहात आकडे रिपोर्ट केलेले दिसतात.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 11/08/2015 - 06:18 नवीन
आर जे डी पुढे आहे असे म्हणतात, जे डी यू पेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Sun, 11/08/2015 - 06:24 नवीन
आर जे डी पुढे आहे असे म्हणतात, जे डी यू पेक्षा.
उत्तम. मला भाजप जिंकायलाच हवा होता. तो माझा नक्कीच पहिला चॉईस होता. त्यानंतर दुसरा चॉईस होता नितीशकुमारांपेक्षा लालूला जास्त जागा मिळणे आणि लालूने नितीशपुढे नंतर अडचणी निर्माण करणे. पहिला चॉईस नाही तरी दुसरा चॉईस पूर्ण होत असेल तर पहिला चॉईस पूर्ण झाला नाही याचे दु:ख थोडेतरी कमी होईल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
ब
बोका-ए-आझम Sun, 11/08/2015 - 06:35 नवीन
तर नितीशकुमारांपुढच्या अडचणी वाढणारच आहेत आणि आता जर भाजपचं सरकार येत नसेल आणि राजदच्या भ्रष्ट लोकांना केवळ जातीच्या आधारावर बिहारची जनता मतं देणार असेल, तर बिहार परत जंगलराजच्या दिशेने जाणार हे अटळ आहे. लालूंचं पुनरूज्जीवन करण्याची मोठी किंमत नितीशकुमारना चुकवावी लागेल आणि दुर्दैवाने प्रादेशिक पक्ष परत राजकारणात शिरजोर होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 11/08/2015 - 06:00 नवीन
अहो हे फर्स्ट राउंड चे ट्रेंड आहेत मोजणीच्या अजुन होऊ दे पिक्चर क्लियर दीड दोन पर्यंत क्लियर होईल चित्र
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sun, 11/08/2015 - 06:02 नवीन
अरे बापरे. म्हणजे छत्तिसगडच्या निवडणुकांची आठवण करून देणार का या निवडणुका? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ख
खटपट्या Sun, 11/08/2015 - 06:07 नवीन
मराठी वाहीन्यांवर विश्वास ठेउ नका. कल्याण डोबीवलीमधे खूप गोंधळ घातला होता. त्यांना जो पक्ष जिंकावासा वाटतोय त्यांना ते पुढे दाखवतात, आणि फुकाच्या चर्चा करतात.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sun, 11/08/2015 - 06:10 नवीन
आय.बी.एन वर संजदला १५५ तर भाजपला ७९ जागांवर आघाडी दाखवत आहेत.
  • Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे Sun, 11/08/2015 - 06:17 नवीन
भाजप हरलेला आहे, ९० जागा येतील.वाचाळविरांना न आवरण्याची किंमत मोदिंना मोजावी लागली.अमित शाह काहीही चमत्कार करु शकतो हा भक्तांचा फाजिल विश्वास दिल्ली व आता बिहारमध्ये लागलेल्या निकालाने गळून पडायला हरकत नाही.दिल्ली व बिहारचे निकाल भाजपला वेसन घालायचे काम करतील यात शंका नाही.एकंदर देशातली जनता हुशार आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sun, 11/08/2015 - 06:28 नवीन
या पराभवामुळे मोदींची पकड ढिली झाली आहे असे चित्र नक्कीच उभे राहिल. यानंतर मे २०१६ मध्ये तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये आसामात भाजपला थोडीफार कामगिरी करता येईल.पण तरीही आसामात भाजपला बहुमत मिळेल असे वाटत नाही.इतर राज्यांमध्ये भाजपला विशेष स्थान नाही.त्यानंतर महत्वाच्या निवडणुका आहेत मार्च २०१७ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये. उत्तर प्रदेशात साक्षी महाराज, संगीत सोम, योगी आदित्यनाथ यांच्यासारख्यांनी बेताल बडबड करून पक्षापुढे अडचणी निर्माण करून केल्या आहेत. उत्तर प्रदेश जिंकणे भाजपला नक्कीच कठिण आहे.उत्तर प्रदेश हरल्यास उत्तराखंड, गोवा जिंकल्यास त्याचा फार उपयोग होणार नाही. एकूणच मोदींनी कोर्स करेक्शन केले नाही तर २०१९ मध्ये मोदी परत निवडून येणे फारच कठिण आहे. सगळ्यात पहिले मोदींनी या वाचाळवीरांना वेसण घालायला हवी. काही लोकांना हाकलून द्यायचे धैर्य मोदींनी दाखवले पाहिजे. आणि ज्या लोकांना मोदींनी हाकलून द्यावे असे मला फार फार वाटते त्यात मोहन भागवतांचा नंबर सगळ्यात पहिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत अडाण्यासारखे विधान करणे अगदीच अक्षम्य आहे.आम्ही तेवढे नितीमान आणि बाकी सगळ्यांचे पाय मातीचे हा होलिअर दॅन दाऊ ऍटिट्यूड असतो ते सगळेच लोक प्रचंड डोक्यात जातात. मग ते केजरीवाल असोत की मोहन भागवत असोत.
  • Log in or register to post comments
ट
टीपीके Sun, 11/08/2015 - 06:43 नवीन
२०१९ ला अजून भरपूर वेळ आहे, तो पर्यंत लोक अनेक गोष्टी विसरतील. मे बी this exercise is just to test the waters? It is less risky to try out things now than in 2019, isn't it? जस्ट एक शक्यता. मे बी तोच खरा अजेंडा असेल बीजेपीचा? त्या मुळे हे वाचाळवीर सध्यातरी शांत होतील असे वाटत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Sun, 11/08/2015 - 06:48 नवीन
त्या मुळे हे वाचाळवीर सध्यातरी शांत होतील असे वाटत नाही
शक्यता आहे. आणि त्याचे परिणाम भोगायची तयारीही भाजपने ठेवली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके
भ
भास्कर केन्डे Fri, 03/10/2017 - 19:02 नवीन
"आणि ज्या लोकांना मोदींनी हाकलून द्यावे असे मला फार फार वाटते त्यात मोहन भागवतांचा नंबर सगळ्यात पहिला आहे. " -- उद्या म्हणाल मोदींनी कराताला डाव्या अघाडीतून हकलून द्यावे. पण त्या संस्थेवर ना भाजपाचे शासन ना ती सरकारी संस्था... तेव्हा ते कसे शक्य आहे? तसेच मोदी यांना संघाचा प्रमुख बदलाता येणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Sun, 11/08/2015 - 06:31 नवीन
दुसरे म्हणजे पराभवाची जबाबदारी मोदी आणि शहांनी स्वत: घ्यायला हवी. कॉंग्रेसमध्ये विजय झाल्यास त्याचे श्रेय गांधी घराण्यातील मंडळींचे आणि पराभव झाल्यास त्याचा दोष इतरांचा असे चित्र असते तसे व्हायला नको. दिल्ली निवडणुकांमध्ये प्रचंड मोठा पराभव होऊनही मोदी आणि शहांनी पराभवाची जबाबदारी आपली हे जाहिरपणे म्हटले नव्हते.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 11/08/2015 - 06:58 नवीन
This makes you different from Bhakt
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
संपत Sun, 11/08/2015 - 06:31 नवीन
भाजपने वृत्त वाहिन्याकडे फटाक्यांचे पैसे परत मागावेत. - ओमार अब्दुल्लाह
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Sun, 11/08/2015 - 06:32 नवीन
नितिश जिंकुन सुद्दा हरलेत आणि भाजप हरून हरलाच...सगळ्यात फायदा म्हणजे लालूसारख्या माकडाचा जो जिंकून जि़ंकलाच. मोदींना पुढील दिवस खडतर आहेत.
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर Sun, 11/08/2015 - 06:38 नवीन
सकाळी 9.30 चे ट्रेंड बघता भाजप+ वाढून येईल असे वाटले होते. पण आता शक्यता वाटत नाही भाजपची. जरासंध(मगध)आणि कर्णाने(अंग) जातीयवाद्यांचा पराभव केला. . . . .म्हणजे मगध आणि अंग या भागातून संजदला मोठे बळ मिळाले. (बिहार मे बहार हो, नितेशे कुमार हो)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 11/08/2015 - 06:53 नवीन
हम तो कबइ से कह रहा हूँ नितिसै ही जीतेगा. ससुरा लल्लन पूरा का पूरा राबडी निगल लिया क मीना
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 11/08/2015 - 06:57 नवीन
आता कोलांट्या उड्या , शब्दांचा भुलभलैया , आकड्यांची फिरवाफिरवी , पूर्वीपेक्षा कामगिरी सुधारली हे सांगायचा आटापिटा बघायला मजा येईल
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 11/08/2015 - 07:00 नवीन
त्यांना मिपावर घ्या. राममाधव, शाहनवाझ हुसैन वगैरे कोण कोण आहेत ते. संजय राऊत 'ये मोदी की हार है' म्हणून कांडका पाडलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Sun, 11/08/2015 - 07:04 नवीन
राममाधव, शाहनवाझ हुसैन वगैरे कोण कोण आहेत ते.
मिपावर त्यांच्यापेक्षा कडवे आहेत . फक्त मज्जा बघा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
त
तिमा Sun, 11/08/2015 - 07:17 नवीन
भाजपाचे बिहारमधे वस्त्रहरण झाले आहे. सत्ता हातात आल्यावर माणसांनी माकडांच्या बाबतीत केलेल्या सर्व म्हणी यांनी खर्‍या करुन दाखवल्या. आचरट विधाने करणार्‍यांना न रोखणे आणि प्रत्येक अप्रिय घटनेवर मोदींनी मौन बाळगणे, चांगलेच अंगाशी आले आहे. यातून धडा घेतील तर ते भाजपा कसले? भाजपाने सुवर्णसंंधी गमावली आहे.
  • Log in or register to post comments
ज
जानु Sun, 11/08/2015 - 07:20 नवीन
एकंदरीत भाजपाने ही निवडणुक गमावली आणि बिहार पुन्हा पाच वर्षासाठी नितीशकुमार यांच्या हातात गेला. त्यातही नवीन बदल म्हणजे लालु यादवांच्या जागा नितीश पेक्षा जास्त दिसतात. अंतिम निकालानंतर हे नक्की होईल. पण आता पुन्हा निधर्मी, डावे आणि संघ, हिंदुत्ववादी यांच्यात टक्करी वाढतील. कारण हा बिहारचा विजय नितीश, लालु, काँग्रेस यांच्यासाठी सलाईनचे (मराठी शब्द ?) काम करणार. भावी काळ धामधुमीचा ठरणार.
  • Log in or register to post comments
ल
लाल टोपी Sun, 11/08/2015 - 07:26 नवीन
लालूंची पार्टी ७२ जागी आघाडीवर एक क्रमा़काचा पक्ष नितीश यांच्या पार्टीच्या पुढे..
  • Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे Sun, 11/08/2015 - 07:27 नवीन
आमचे श्रीगुरुजी काय फिरकले णॉय बॉ परत इकडे!!!!
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 11/08/2015 - 07:33 नवीन
नितिश २०१९ पी एम उमिदवार
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 11/08/2015 - 07:50 नवीन
२०१९ पर्यंत सीएम राहीले तरी खूप आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
म
मोगा Sun, 11/08/2015 - 07:47 नवीन
..
  • Log in or register to post comments
म
मोगा Sun, 11/08/2015 - 08:01 नवीन
एका बलीप्रतिपदेला एका लबाड वामनाने सज्जन बळीराजाला जमिनीत गाडले होते. या बलीप्रतिपदेला लोक शहाणे झाले म्हणायचे. ...... गुर्जी लाडू खायला गेले वाटतं. .... भाजपच्या कार्यकर्त्यांचे चेहरे उतरले आणि सगळे कार्यकर्ते गुलाल झटकून आपापल्या घरी परतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या राज्यातील नेत्यांनी आता १०० किलोची ऑर्डर रद्द करण्याचा विचार सुरू केला आहे. आजचा मटा...
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sun, 11/08/2015 - 08:27 नवीन
या बलीप्रतिपदेला लोक शहाणे झाले म्हणायचे.
लोक शहाणे होणे म्हणजे काय हो मोगा?हे लिहिताक्षणी महागठबंधन १५७ जागांवर आघाडीवर आहे त्यात राजद ७४ जागी आणि नितीश ६७ जागांवर आघाडीवर आहे. लालूसारख्या हलकटाला निवडून देणे म्हणजे लोक शहाणे झाल्याचे लक्षण वाटत असेल तर ते सरळ लिहा की. उगीच नितीशमागे लपू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
स
संदीप डांगे Sun, 11/08/2015 - 08:35 नवीन
लालूसारख्या हलकटाला निवडून देणे
नशेंमें कौन नही है मुझे बताओ जरा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
क
काकासाहेब केंजळे Sun, 11/08/2015 - 08:38 नवीन
लालूसारख्या हलकटाला निवडून देणे म्हणजे लोक शहाणे झाल्याचे लक्षण वाटत असेल तर ते सरळ लिहा की. उगीच नितीशमागे लपू नका.>>>>>>>>>>>>>>>>> >>>> लालू हलकट ,मग येडुयुरप्पा कोन, पक्षातून हाकलून दिलेला भ्रष्टाचारी परत भाजपात येतो ,पक्षाचा सरचिटणीस होतो, तेव्हा कुठे जाते चाल चरित्र???? लालूचे चाराघोटाळा प्रकरण आणि येडुयुरप्पाचे प्रकरण ,यात येडुयुरप्पाने कीतीतरी अधिक मोठा घोटाळा केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
श्रीगुरुजी Sun, 11/08/2015 - 15:31 नवीन
लालूवर भ्रष्टाचाराचा गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊन त्याला ५ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. येडीयुरप्पाची भ्रष्टाचार प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
ब
बोका-ए-आझम Sun, 11/08/2015 - 08:15 नवीन
आता अपहरण वगैरे कुटिरोद्योग परत सुरु होतील. एक बरं होईल. आता बिहारमध्ये दिवसाढवळ्या खून पडले तर भाजपवर खापर फुटणार नाही.
  • Log in or register to post comments
म
मोदक Sun, 11/08/2015 - 08:23 नवीन
>>>आता बिहारमध्ये दिवसाढवळ्या खून पडले तर भाजपवर खापर फुटणार नाही. लै आशावादी राव तुमी..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
स
संदीप डांगे Sun, 11/08/2015 - 08:32 नवीन
चष्मा काडा ओ साहेब. 'गिरे तो बी टांग उपर' चा काय उपयोग नाही आता! नितिशकुमारांच्या कार्यकाळात बिहार खूपच सुधारला आहे. त्यामुळे "अपहरण वगैरे कुटिरोद्योग परत सूरु होतील व खून पडतील" ही विधानं जरा तपासून पाहावीत असे सुचवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ल
लाल टोपी Sun, 11/08/2015 - 08:43 नवीन
त्यावेळी लालू नितिशकुमारांबरोबर नव्हते हे विसरता तुम्ही आणि गेली दोन वर्षे सोडली तर त्या आघाडीचा भाजपही घटक होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 11/08/2015 - 09:07 नवीन
काळच ठरवेल बिहारचं भविष्य... बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लाल टोपी
ब
बोका-ए-आझम Sun, 11/08/2015 - 09:04 नवीन
यांच्यासाठी लालू आणि राजद हे विरोधक होते साहेब. आता तर सत्तेत सहभागी असणार आहेत. तेही सर्वात मोठा पक्ष म्हणून. बिघडलेली गोष्ट सुधरायला वेळ लागतो. सुधारलेली बिघडायला वेळ लागत नाही. आणि रच्याकने २०१३, म्हणजे नितीशकुमारांनी भाजपची साथ सोडल्यानंतर बिहारमधले गुन्हेगारीचे आकडे बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
काकासाहेब केंजळे Sun, 11/08/2015 - 08:43 नवीन
कसे हो कसे ? काल पर्यंत नितिशकुमार बरोबर भाजप सत्तेत होता तेव्हा नितिश्कुमार ' विकासपुरुष होते, आज पुन्हा तेच नितिशकुमार सत्तेत बसणार आहेत, तर लगेच बिहारमध्ये गुंडाराज आले का? लालुला ज्या जागा आल्या आहेत त्या नितिश्कुमारच्या स्वच्छ प्रतिमेमुळे मिळाल्या अहेत, आणि लालूला वेसन घालणे नितिशला सहजशक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ग
गॅरी ट्रुमन Sun, 11/08/2015 - 08:52 नवीन
लालूला वेसन घालणे नितिशला सहजशक्य आहे.
चला या निमित्ताने लालू हा वेसण घालण्याजोगा माणूस आहे हे तुम्ही मान्य केलेत हे पण काही कमी नाही. खरं तर लालू हा मोदीविरोधी म्हणजे सद्गुणांचा पुतळा असायला हवा तुमच्यासारख्यांच्या मते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
ब
बोका-ए-आझम Sun, 11/08/2015 - 08:59 नवीन
जर इतकी स्वच्छ होती तर लालूंबरोबर युती केलीच का? एकट्याच्या बळावर विजय मिळवणं शक्य नाही हे समजल्यामुळेच ना? बरं, केली तर कुणाबरोबर? ज्याला संपविण्यासाठी गेली २० वर्षे प्रयत्न केले त्यांच्याचबरोबर. लालूला वेसण घालणे नितीशकुमारांसाठी कठीण नाही, तर अशक्य आहे. इथे मिपावर डू आयडींना संपादक वेसण नाही घालू शकले अजून. तुम्ही तर बिहारबद्दल बोलताय. शिवाय भाजपची साथ नितीशकुमारनी सोडली. ज्याचा त्यांना तात्पुरता फायदा झालेला दिसतो आहे पण आपल्या शत्रूला मोठं करण्याची किंमत त्यांना या ना त्या प्रकारे चुकवावीच लागेल. बिहारमध्ये राजदला जास्त जागा मिळणं याचा तोच अर्थ आहे. उलट नितीशकुमारांच्या जागा कमी आहेत याचा अर्थ त्यांचं विकासाचं माॅडेलही लोकांना पसंत पडलेलं नाही आणि ती एकदम छान गोष्ट झालेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
ग
गॅरी ट्रुमन Sun, 11/08/2015 - 09:01 नवीन
इथे मिपावर डू आयडींना संपादक वेसण नाही घालू शकले अजून. तुम्ही तर बिहारबद्दल बोलताय.
पोट धरधरून गडाबडा लोळत हसायची स्मायली आहे का कोणाकडे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
स
सतिश गावडे Sun, 11/08/2015 - 13:01 नवीन
इथे मिपावर डू आयडींना संपादक वेसण नाही घालू शकले अजून.
बोकाजी, हे उदाहरण चुकीचे वाटते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ल
लाल टोपी Sun, 11/08/2015 - 08:52 नवीन
नितिश्कुमारांच्या प्रतिमेमु़ळे? मग लालुंच्या जागा जास्त आणि नितिशकुमारांच्या कमी हे कसे?
  • Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे Sun, 11/08/2015 - 09:47 नवीन
लालू भ्रष्टाचारी आहे ,पण मिडीयाने त्याला अति बदनाम केले आहे .लालूने जंगलराज आणले तो काळ वेगळा होता ,आज त्यातले पप्पू यादव वगैरे कुणीच लालू बरोबर नाही,केंद्रातही लालूला पाठीशी घालणारे नाहीत.त्यामुळे लालू परत चुगली करायची शक्यता नाही ,तसे त्याने केले तर त्याच्याशी नितिशकुमार संबंध तोडायला पुढे मागे बघणार नाहीत. आज बिहार इलेक्शान एमाआयमला आणि पप्पू यादवला रसद पुरवनारे भाजपचेच लोक आहेत हे उघड सत्य आहे.सेक्युलर वोट खातात तर ओवैसीला आणि पप्पू यादवकडे दुर्लक्ष करा ही भाजपची नीती लपून राहीलेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लाल टोपी
य
याॅर्कर Sun, 11/08/2015 - 09:01 नवीन
लालूसारख्या हलकटाला निवडून देणे
त्यांनी काही घोटाळे असतील तसेच त्यांच्या बोलण्यातून मस्तीची कैफ दिसत असली तरी त्यांना का निवडून दिले ते प्रत्येक्षात बिहारमध्ये जाऊन दलित,महादलित,यादव यांना विचारा म्हणजे कळेल.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sun, 11/08/2015 - 09:09 नवीन
त्यांना का निवडून दिले ते प्रत्येक्षात बिहारमध्ये जाऊन दलित,महादलित,यादव यांना विचारा म्हणजे कळेल.
हे १९९० च्या दशकाविषयी बोलत असाल तर मुद्दा पूर्ण मान्य. पण त्याच लालूंना त्याच मतदारांनी गेली १० वर्षे घरी बसवलेच होते की. २००९ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये दोनपैकी एका मतदारसंघात खुद्द लालूंचाही पराभव झाला होता. मग मधल्या काळात दलित, महादलित लोक लालूंनी त्यांच्यासाठी केलेले विसरले म्हणायचे का? जितनराम मांझींना बरोबर घेऊन महादलित व्होटबँक आपल्याकडे खेचायचे भाजपचे डावपेच चांगलेच होते.पण मोहन भागवतांनी गाढवासारखे आरक्षणविरोधी वक्तव्य केले त्यामुळे हे मतदार परत लालूंकडे वळले असे दिसते. एकंदरीत संघाला कोणी डोईजड झालेला चालत नाहीसे दिसते. मोदी बरेच मोठे झाले आहेत आणि ते असेच मोठे राहिले तर नंतर आपल्याला जुमानणार नाहीत म्हणून अपशकुन करण्यासाठी भागवतांनी ते वक्तव्य केले असायची शक्यता आहेच. एकूणच भारतीयांची खेकड्यांची मनोवृत्ती आहेच. मग भारतीय जनता पक्षात खेकडे नाहीत असे कसे होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
व
विवेक ठाकूर Sun, 11/08/2015 - 12:45 नवीन
पण मोहन भागवतांनी गाढवासारखे आरक्षणविरोधी वक्तव्य केले त्यामुळे हे मतदार परत लालूंकडे वळले असे दिसते. एकंदरीत संघाला कोणी डोईजड झालेला चालत नाहीसे दिसते. मोदी बरेच मोठे झाले आहेत आणि ते असेच मोठे राहिले तर नंतर आपल्याला जुमानणार नाहीत म्हणून अपशकुन करण्यासाठी भागवतांनी ते वक्तव्य केले असायची शक्यता आहेच. एकूणच भारतीयांची खेकड्यांची मनोवृत्ती आहेच. मग भारतीय जनता पक्षात खेकडे नाहीत असे कसे होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा