Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: निकाल

ग
गॅरी ट्रुमन
Sat, 11/07/2015 - 13:18
🗣 240 प्रतिसाद
बिहार विधानसभा निवडणुक-२०१५ ची मतमोजणी उद्या रविवार ८ नोव्हेंबर २०१५ रोजी होणार आहे.निवडणुकांचे निकाल आणि त्या अनुषंगाने चर्चा या धाग्यावर करावी ही विनंती. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. सव्वाआठपर्यंत पहिले कल हाती येतील अशी अपेक्षा आहे. गॅरी ट्रुमन

Book traversal links for बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: निकाल

  • ‹ बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: मतमोजणीपूर्व धागा
  • Up
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
52220 वाचन

💬 प्रतिसाद (240)
उ
उदय८२ Sun, 11/08/2015 - 13:21 नवीन
लालू भस्मासुर नसता तर २००५ पासून लागोपाठ ४ निवडणुकात बिहारी जनतेने त्याला का घरी पाठविले असते? >> याच धर्तीवर धर्मांध शक्तींना ६५ वर्ष घरी बसवले होते ते बरोबर म्हणा आणि २००४ नंतर सलग २ वेळॅस घरी बसवले हे देखील बरोबरच म्हणा. हा फक्त आणि फक्त निव्वळ "मोदीच्या अहंकाराचा पराभव आहे भाजपाला आलेल्या माजाचा पराभव आहे देशात दिवसेंदिवस वाढवणार्‍या देशविघातक धर्मांध प्रवृत्तींचा पराभव आहे."
आता काय सगळ्या बिहारी जनतेला पाकिस्तानाला पाठवणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
काकासाहेब केंजळे Sun, 11/08/2015 - 10:27 नवीन
दिल्ली , बिहार मधली जनता मूर्ख आहे. हळूहळू मूर्खांची संख्या वाढत चालली आहे.>>>>>>. आपण सोडून बाकीचे मुर्ख आहेत या समजातूनच आजपर्यंत भाजप सत्तेपासून दूर होते, आता परत तोच प्रकार चालू केला आहे,शुभेच्छा भक्तांना.
  • Log in or register to post comments
ल
लालगरूड Sun, 11/08/2015 - 10:51 नवीन
काय आला निकाल
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sun, 11/08/2015 - 10:55 नवीन
स्वस्त फटका दुकान, निम्म्या किमतीत फटाके मिळावा व 2015 ची दिवाळी साजरी करा. संपर्क: भा. ज. प. कार्यालय बिहार
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 11/08/2015 - 11:37 नवीन
'शहा'ण्यांच्या अनुसार आता पाकिस्तानात फटाके फुटायला हवे. तिकडेच दुकान लावलेले बरे पडेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
उ
उदय८२ Sun, 11/08/2015 - 11:45 नवीन
अत्यंत गलिच्छ प्रचार भाजतर्ड यांचा चालू होता. पाकिस्तानाला जावा काय, डिएनए फॉल्ट काय, पाकिस्तानात फटाके काय फुटणार जसे भारतात एकच देशभक्तीने ओतप्रोत भरलेली पार्टी आहे बाकीचे देशद्रोहीच आहे. पॅकेज असे वाटत होते जसे बिहारची निलामी चालू आहे. ५० हजार कोटींचे करू की ६० हजार कोटींचे करू इतक्या खालच्या पातळीला उतरून प्रचार चालू होता. त्यामानाने नितिशचा प्रचार संयत होता. भले मधे मधे लालू मोदींच्या पातळीवर जाऊन उत्तर देत असले तरी नितीशने मात्र मुख्यमंत्रीपदाची गरिमा राखून वक्तव्य केले. शेवटी शेवटी तर भाजपाने गायीला पण प्रचारात उतरवले. भाजतर्ड स्वतःच कन्फ्युज्ड होते की कुणाच्या नावावर मत मागावी. दिल्लीचे खापर फोडायला किरण बेदी होती. आता तर कोणीच नाही सगळ्या प्रचाराची धुरा मोदीच्या खांद्यावर टाकली होती. मग आता जवाबदारी मोदीवर टाकणार की अजुन कुणावर हे बघणे मनोरंजनात्मक ठरेल. जो देशाच्या घडामोडींची जवाबदारी घेऊ शकत नाही जाहीरपणे "इसमे केंद्र की क्या भुमिका" असे म्हणून कातडी बचाव करतो असा इसम इतर कसलीच जवाबदारी घेणार नाही. छटाकभर देखील विकास झालेला नाही पण आव मात्र डोंगराएवढा दाखवणे हे आता भाजतर्ड यांनी बंड करावे. जनता आता खोटे ओळखु लागली आहे. काय लायकीचे आश्वासन असतात याचा प्रत्यय आलेला आहे. आता मोदीच्या हातातून बिहार ही गेला आणि सव्वालाख करोडचे पॅकेज देखील गेले.. दिल्लीत जसे वागतोय तसे बिहारमधे वागू शकणार नाही. दिल्ली अर्धी हातात असल्यामुळे भाजपाचे फावले. पण बिहार हे दिल्ली नाही. नितीश आता निवडणुकीमधल्या अपमानाचा हिशोब पै न पै वसूल करणार. आणि तो करावाच व्याजासकट. त्याशिवाय भाजतर्ड यांना आलेला माज कमी होणार नाही.
  • Log in or register to post comments
उ
उदय८२ Sun, 11/08/2015 - 11:47 नवीन
बेईज्ज़ती की इंतेहा तो आज तब हो गयी जब 1 आदमी ने दुकानदार से 16 पैकेट बरनोल माँगा तो दुकानदार ने पूछ लिया "का भैया! भाजपा से हो क्या"
  • Log in or register to post comments
ज
जानु Sun, 11/08/2015 - 12:22 नवीन
सगळ्यात मोठा फटका अमित शहा यांना बसला आहे. याचा आनंद भाजपात अधिक असेल हे नक्की
  • Log in or register to post comments
म
मोगा Sun, 11/08/2015 - 13:29 नवीन
मोदीनी अता धडा शिकावा. निवडणुका नसल्या की ते परदेशात फिरत असतात आणि निवडणुका असल्या की ते संघ व भाजपा यांचे एजंट व प्रवक्ते होऊन फिरतात . त्यानी आता पूर्णवेळ पंतप्रधान म्हणून काम बघावे
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Sun, 11/08/2015 - 14:43 नवीन
बाकी त्या बिहारच्या निवडणुकीत काडीचा interest नाही पण पंतप्रधानानी परदेश दैरे करणे हे चुकिच कस काय ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
प
पगला गजोधर Sun, 11/08/2015 - 14:55 नवीन
लालूने बिहारमें कोई 'चारा' नही छोडा, इसीलिये अबके बीजेपीकी 'गाय' भुकी रही.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 11/08/2015 - 15:05 नवीन
भारी.. आवडेश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
अ
अर्धवटराव Sun, 11/08/2015 - 17:58 नवीन
लागला 'निकाल' एकदाचा :) महाआघाडीच्या विजयाचं कुणी कितीही कसंही श्रेय घ्यायला धावेल आवेल आता. पण या विजयाचा खरा शिल्पकार दिल्लीत बसला आहे. पी.एम. नाहि हो... सी.एम. केजरीसाहेबांनी आशीर्वाद+भविष्यवाणी केली होती नितीश विजयाची. त्याचाच परिणाम आहे हा. लालूजी अगदी जन्मजात राजकारणी. पी.एम. व्हायचं त्यांचं स्वप्न होतच. आपला मुलगा सी.एम. आणि आपण पी.एम. झाल्याचं बघणं त्यांचा ध्यास होता. नाहि म्हणायला त्यांच्या स्वप्नांना पालवी फुटली आता. बरं झालं. बिहारी राजकारणावर इतकी जबरदस्त पकड असवी ना नितीशकुमारची. मोदी लाटेला अंगावर घेऊन, लोकसभा निवडणुकीची मरगळ झटकुन, लालु+काँग्रेस अशी आघाडी करत आपल्या आणि परक्या लोकांशी एकावेळी फाईट देणं म्हणजे खेळ नाहि. हॅट्स ऑफ्फ. आणि सुषमाबाईंचे अभिनंदन :) जय हो.
  • Log in or register to post comments
म
मोगा Mon, 11/09/2015 - 04:11 नवीन
बिहारमध्ये भाजपचा पराभव ही माझ्या वडिलांना श्रद्धांजली... दादरी हत्याकांडातील बळी मोहम्मद इकलाक यांच्या मुलाची प्रतिक्रिया..
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Mon, 11/09/2015 - 08:17 नवीन
जनसामान्यांना राजकीय व्यवस्थेबद्दल इतकी घृणास्पद भावना होणं फार वाईट आहे. पण दुर्दैवाने तशी भावना आहे पब्लीकमधे... आणि त्याला राजकारणीच जबाबदार आहेत. (मोदी-शाह जोडी असल्या राजकारणात काहि फायदा शोधत असतील असं वाटत नाहि. त्यातली अव्यवहार्यता त्यांना नक्कीच कळत असणार. वैयक्तीक दृष्ट्या देखील असलं काहि करण्याचा त्यांचा पींड असावा असं वाटत नाहि. पण कुणाच राजकारण्याबद्दल कोणालाच अशी गलीच्छ भावना होऊ नये... एक आम आदमीच्या दृष्टीने फार क्लेशदायक आहे हे सगळं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
प
पगला गजोधर Mon, 11/09/2015 - 06:01 नवीन
आज सामनाची हेडलाईन मला जर्रा माईल्डच वाटली. मला वाटलेलं की, 'अगर खैरियत चाहते हो, तो हैसियत रखो' अशी ठळक मथळा वर, आणि खाली 'मला जरा तो आकाशकंदील दाखवा जरा' असं म्हणून आपण दुकानदाराला तर्जनीने, वरच्या रांगेतल्या कंदिलाकडे दर्शवितो, तश्या पोझ मधला ऐका माणसाचा भव्य उठा वदार फोटो. असं पहिल्या पानावर असेल, अशी अपेक्षा होती
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 11/09/2015 - 06:43 नवीन
ज्या पदध्तीने मोदी-शहा दुक्कल विषारी प्रचार करत फिरत होती ते पाहता भाजपाचा पराभव होणार असे वाटू लागले होते.कोण्ग्रेसवाले जसे फक्त 'गांधी घराणे एके गांधी घराणे' करायचे तसे मोदी-शहा ह्यांचे झाले होते.निवडणूक कुठलिही असो,स्थानिक नेतृत्वाला किंमत दिली नाही तर फार काळ निवडणूका जिंकता येत नाहीत.
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर Mon, 11/09/2015 - 06:45 नवीन
सेनेने एकूण 96805 मते खाल्ली म्हणे
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर Mon, 11/09/2015 - 06:45 नवीन
सेनेने एकूण 96805 मते खाल्ली म्हणे!
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 11/09/2015 - 07:46 नवीन
२ लाखाहून अधिक मते घेतली असे सामनामधे आला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
च
चौकटराजा Mon, 11/09/2015 - 08:07 नवीन
भाजपा बिहार मधे पराभूत झाले हे बरे झाले. आता फालतू साधु साध्वी अमुक तमुक आनंद याच्या तोण्डाला कूलुपे बसवावी लागतील याची जाणीव भाजपात वाढीस लागेल. लोकसभेला भाजपाला मिळालेली मते ही मनमोहन सोनिया याच्या बद्द्ल च्या नकारातून मिळालेली मते आहेत हे उघड आहे अशी मते इन्दिराजी , जनता पक्शाचे मोरारजी सरकार यानाही फटका देऊन गेलेली आहेत. मुळात भाजपा ला आधार देणारे हिदुत्व वादी, शिक्शित ,ब्राह्मण व तत्सम या.चे प्रमाण बिहारात किती ? तसेच नीतीश कुमार यान्च्या बद्द्लए नकारात्मक मतदान किती , जातीचा पगडा किती याचा विचार केला तर भाजपा हा खर्‍या अर्थाने पूर्ण राष्ट्रीय पक्ष होणे किती दुरापास्त आहे याचा बोध व्हावा. एक मात्र खरे की आता कोन्ग्रेस पक्षाला कितीही आनन्दाच्या उकळया फुटल्या असल्या तरी त्याची अवस्था महाराष्ट्रातील राज ठाकरे व पवार यांच्या सारखी होणार आहे. फक्त किम्ग मेकर होणेच या पक्षाच्या हातात रहाणार आहे.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 11/09/2015 - 08:35 नवीन
भ्रमनिरास झाला ते एका अर्थाने बरे झाले. लोकसभेपूर्वी किमान सुधारण्याची संधी म्हणून तरी बघावे. वाचाळवीरांना धडा शिकविण्यासाठी किमान एक दोघांची तरी उचलबांगडी करावी. शिवसेनेशी जास्ती खुस्पट पंगा करू नये (अगदी नमते घेऊ नये पण जादाचा माजही करू नये) आजकाल मिडिया हा दुधारी अस्त्रा सारखा झाला आहे नाही म्हटले तरी या गोष्टीची नकारात्मक दखल घेतली जातेच. लालुच्या प्रतापांचे कितपत परीणाम होतात ते पाहून पुढील वाटचाल (दोन्ही राज्यात बिहार्,उ.प्रदेश मध्ये करणे आवश्यक). दुसर्या फळीतील नेत्यांना पुरेसा वाव आणि अधिकार. अडवाणींच्या ऐन भरातही "महाजन-गडकरी-मुंडे" ना पुरेसा वाव-महत्व होते ते ते त्या राज्यात दिलेच पाहिजे. म्हणजे भाजपा काँन्ग्रेस होण्यापासून वाचेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
भ
भुमन्यु Mon, 11/09/2015 - 09:33 नवीन
शिवसेनेशी जास्ती खुस्पट पंगा करू नये (अगदी नमते घेऊ नये पण जादाचा माजही करू नये)
सर्वच मित्रपक्षांची चांगले संबंध ठेवणे आवश्यक आहे. कडोंमपा मध्ये दोन्ही पक्षांनी घेतलेली भुमिका अतिशय क्लेशदायक होती. एक मेकांवरील चिखलफेक मागच्या सरकारची आठवण करुन देत होतं. हे थांबवणं अत्यावश्यक आहे.
दुसर्या फळीतील नेत्यांना पुरेसा वाव आणि अधिकार. अडवाणींच्या ऐन भरातही "महाजन-गडकरी-मुंडे" ना पुरेसा वाव-महत्व होते ते ते त्या राज्यात दिलेच पाहिजे. म्हणजे भाजपा काँन्ग्रेस होण्यापासून वाचेल.
१००% सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
भ
भुमन्यु Mon, 11/09/2015 - 09:28 नवीन
सहमत. अगदी समर्पक प्रतिक्रिया. अगदी टोकाच्या प्रतिक्रियांच्या भाऊगर्दित एक संयत प्रतिक्रिया. अन-बायस्ड आत्मपरिक्षण करणे भा.ज.प. साठी अत्यावश्यक आहे, मोदी व शहा यासारख्या बड्या नेत्यांनी जबाब्दारी घेणे हे पक्षाच्या वेगेळेपणाचे द्योतक ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
क
कपिलमुनी Mon, 11/09/2015 - 10:18 नवीन
बिहारच्या निकालानंतर भाजपाने आत्मपरिक्षण केले पाहिजे. खालील कारणांवर विचार झाला पाहिजे १. वाचाळवीरांवर कडक कारवाई केली पाहिजे. नेते, साधू , साध्वी यांना लगाम घातला पाहिजे .कडक कारवाई केली पाहिजे. तर जनतेच्या मनात विश्वास निर्माण होईल. ही निवडणूक लालू आणी नितीश यांना धर्म/जातीच्या समीकरणांवर लढायची होती आणि भाजपाला विकासाच्या. परंतु या वाचाळ लोकांमुळे लालू अँड कंपनी यशस्वी झाले. विकास हा मुद्दा मागे पडला. २. बिहार विरूद्ध बाहरी : बिहार मध्ये भापजाने लोकल चेहरा पुढे केला नाही. वास्तविक पाहता एक वर्षापूर्वी शाह्नवाज हुसैन यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणायचा विचार झाला होता. हा मास्टर स्ट्रोक ठरला असता. पण अंर्तगत बंडखोरी टाळण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर झाला नाही. शत्रुघ्न सिन्हाना लांब ठेवले गेले .त्यामुळे बिहार विरूद्ध बाहरी हा मुद्दा बर्‍यापैकी यशस्वी ठरला. बिहारच्या डीएनए वरची टीका महागात पडली. बिमारू बिहार ईई टीकेमुळे हा मुद्दा असमितेचा झाला. ३. दुसर्‍या फळीचे , स्थानिक नेतृत्व : दुसर्‍या फळीचे , स्थानिक नेतृत्व पुढे आणले पाहीजे. पदासाठी प्रतिस्पर्धी निर्माण होउ नये म्हणून दुसर्‍या फळीचे नेतृत्वाला फारशी संधी न देण्यांचा मोदींचा धोरण राष्ट्ट्रीय पातळीवर यशस्वी होणे अवघड आहे. टीम वर्क करणे महत्वाचे वाटते जे बिहार मधे झाले नाही. नितीशकुमार - लालू विरूद्द कोण ? हा प्रश्न अनुत्तरीत राहीला. ४. मित्र पक्ष : चुकीच्या मित्रपक्षांमुळे वाजपेयींची सत्ता गेली होती भाजपाने मित्रपक्षांना योग्य तो आदर (पदे , वाटा) दिला पाहिजे अन्यथा एकटे पडण्याची शक्यता आहे. लोकसभेनंतर शत -प्रतिशत भाजपा हे मिशन ठेवले आहे , दुर्दैवाने प्रादेशिक पक्षांचा पगडा अजून असल्याने ते अवघड आहे. प. बंगाल , केरळ, तमिळनाडू , तेलंगणा, आंध्र , महाराष्ट्र या ठिकाणी प्रादेशिक पक्षांची कुबडी लागणारच आहे. त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्समधे जाउन मित्रांना दूर लोटू नये. ५. ग्राउंड लेव्हल : भाजपाकडे इव्हेंट मॅनेजर खूप आहेत. जे मिडीया उत्तम पद्धतीने मॅनेज करतात. पण तळागाळामधले कार्यकर्ते कमी आहेत ज्यांचा लोकांशी कनेक्ट जास्त आहे. दिल्लीमधे मिस्स कॉल देउन भाजपाचे सदस्यत्व मिळायचे पण जेवढे सदस्य झाले तेवढी मते मिळाली नाहीत. याचा अर्थ तंत्रज्ञानने लोकांपर्यंत पोचता येते पण जोडता येत नाही. भाजपाकडे अशा कार्यकर्त्यांची कमतरता नेहमीच जाणवते. ६.पंतप्रधान : २०१४ चा ईलेक्शन वन मॅन शो होता . काँग्रेसचा राग आणि राईज ऑफ हीरो अशी प्रतिमा यामुळे अभूतपूर्व यश मिळाले पण एकट्यानेच सर्वांना नेहमी अंगावर घेता येत नाही. अगदी कोल्हापूरच्या निवडणूकीत उमेदवार मोदीच्या नावाने मते मागात होते. दादरीसारख्या घटना दुर्दैवी असतात आणि आपल्या देशात घडतात पण यावर पंप्र यांनी भाष्य करणे त्याचा निषेध करणे राजकीय शहाणपण ठरला असता , त्यांच्या मौनामुळे त्यांची मूक संमती आहे का असा प्रश्न पडला आहे. त्याच सोबत गोमांस, गोहत्या , घरवापसी यांसारख्या मुद्द्यांवर विरोधी पक्षाने आणि भाजपामधले वाचाळांनी रान उठवले आणी त्यावर पंप्र यांनी भाष्य केले नाही. यामुळे वातावरण बिघडले त्याचा बिहार मधे फटका बसला. १०० दिवसात , १ वर्षात आश्वासना पलीकडे हातात काही पडले नाही त्यामुळे पंप्र यांच्या आश्वासनांचा करीश्मा चालला नाही. ७.महागाई : सर्वसामान्यांची आकलन शक्ती कमी असते आणि गर्दीचा आयक्यू .पंतप्रधानांचे परदेश दौरे, मोठ्या बिझनेसमन्स सोबत उठ्बस, सेल्फी प्रेम यामुळे जगात भारताची इमेज चांगली झाली असली तरी देशात अन्न, धान्य , रोजच्य वस्तूंचे भाव वाढले आहेत. त्यामुळे महागाईवर नियंत्रण राहिले नाही. दुष्काळाचे भीषण परीणाम जाणवत असताना पंप्र कार्यालयाकडून ठोस योजना सादर झाल्या नाहीत. त्यामुले लोकांच्या मनात असंतोष होता त्याचा परीणाम झालाय. ८. जात- धर्म - ध्रुवीकरण : बिहारमधे ज्या नेत्यांना (मांझी - पासवान) जवळ केले गेले त्यांच्या जातींनी सुद्धा भाजपाला वोट केल्याचे दिसून येत नाही. आणि हिंदुत्वाचा मुद्द्यावर ध्रुवीकरण झाले नाही. यादव , राजपूत आणी इतर उच्चवर्णीयाची मते भाजपाला खेचता आली नाहीत. महिलांच्या सबलीकरणासाठी नितिश कुमारांनी केलेले प्रयत्न कामी आले. आणि स्त्रीयाचे वोटींग जास्त झालेल्या जागांवर त्यांच्या सीट आल्या. बाकी मुद्दे प्रतिसाद आणि चर्चेत..
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 11/09/2015 - 17:02 नवीन
मुनिवर्य, वरीलपैकी कोणतेही कारण भाजपच्या पराभवासाठी सबळ कारण ठरल्याचे आकडेवारीवरून दिसत नाही. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप+ आघाडीला संजद+ आघाडीच्या मतांच्या बेरजेपेक्षा अंदाजे ७.३% कमी मते मिळाली होती. २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा फरक जवळपास तेवढाच म्हणजे ७.७% इतका आहे. म्हणजे वरील कारणांमुळे अंदाजे ०.४% इतकाच मतांचा फरक पडलेला आहे. जर वरील कारणांमुळे भाजप+ ने मते गमाविली असतील व ती मते संजद+ कडे गेली असतील तर त्या मतांचे प्रमाण फक्त ०.२% एवढेच आहे. म्हणजे थोडक्यात २०१४ मध्ये भाजप+ ने मिळविलेल्या प्रत्येक ५०० मतांपैकी फक्त १ मत वरील कारणांमुळे संजद+ कडे गेले आहे. वरील कारणांचा परीणाम झाला असता तर भाजपने मोठ्या प्रमाणात मते गमाविली असती. परंतु तसे दिसत नाही. तस्मात वरीलपैकी कोणत्याही कारणांमुळे भाजप+ ने मोठ्या प्रमाणात मते गमाविली असे आकडेवारीवरून तरी दिसत नाही. मग भाजप+ च्या पराभवाचे नक्की कारण कोणते? २०१४ मध्ये भाजप+ वि. राजद+काँग्रेस वि. संजद असा तिरंगी सामना होता. भाजप+ आघाडीला राजद+कॉंग्रेस आघाडीपेक्षा जवळपास ९-१०% मते जास्त होती. संजद स्वतंत्र लढल्याने त्यांची मते राजद+कॉन्ग्रेस आघाडीकडे गेली नाहीत. त्याचा फायदा मिळून भाजप+ ने ४० पैकी ३१ जागा मिळविल्या. २०१५ मध्ये राजद+काँग्रेस आघाडीत संजद सामील झाले व आपल्याबरोबर १६-१७% मते घेऊन आले. त्यामुळे २०१४ मध्ये ९-१०% मते जास्त मिळविलेली भाजप+ आघाडी ७-८% मतांनी मागे पडली. या ७-८% मतांच्या फरकामुळे इतका एकतर्फी निकाल लागला. राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार हा विजय म्हणजे तिरस्कारावर प्रेमाने मिळविलेला विजय, धर्मनिरपेक्षतेने जातीयवादावर मिळविलेला विजय आहे. ममता बॅनर्जींच्या म्हणण्यानुसार सहिष्णुतेने असहिष्णुतेवर मिळविलेला हा विजय आहे. अनेक लोकांनी असे फिलॉसॉफिकल निष्कर्ष काढलेले आहेत. परंतु ते खरे नाहीत. भाजप विरोधी मतांच्या एकत्रीकरणामुळे भाजप+ आघाडीचा पराभव झाला हीच वस्तुस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सुधीर Mon, 11/09/2015 - 17:34 नवीन
विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे भाजपाचा पराभव झाला हे उघड आहे. पण त्याला भाजपच जबाबदार आहे. भाजपाचे हित हे विरोधकांना वेगळं ठेवण्यात आहे. पण जर पोलराझेशन विचारसणीवर/सांप्रदायिकतेवर केलं गेलं तर विरोधकांना एकत्र येण्यास कारण मिळतं असं मत खालच्या लेखात वाचायला मिळाले. BJP’s success depends on floating voters and opposition division. The more you ideologically polarise, the more incentive you give the opposition to unite. http://indianexpress.com/article/opinion/columns/bihar-has-been-transformed-from-the-graveyard-of-revolutions-to-a-source-of-new-hope/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे Mon, 11/09/2015 - 18:06 नवीन
जाऊ द्या हो. वो नै मानेंगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर
श
श्रीगुरुजी Mon, 11/09/2015 - 18:32 नवीन
विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे भाजपाचा पराभव झाला हे उघड आहे. पण त्याला भाजपच जबाबदार आहे. भाजपाचे हित हे विरोधकांना वेगळं ठेवण्यात आहे. पण जर पोलराझेशन विचारसणीवर/सांप्रदायिकतेवर केलं गेलं तर विरोधकांना एकत्र येण्यास कारण मिळतं असं मत खालच्या लेखात वाचायला मिळाले.
ऑगस्ट २०१४ मध्ये बिहार विधानसभेच्या १० जागांसाठी पोटनिवडणुक झाली होती. त्यासाठी राजद, संजद व काँग्रेसने युती करून एकत्रित निवडणुक लढवून (राजद ४, संजद ४ व काँग्रेस २) १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. ऑगस्ट २०१४ मध्ये दादरी, मोहन भागवतांचे वक्तव्य, असहिष्णुतेचे वातावरण, पोलरायझेशन इ. आता सांगितली जाणारी कोणतीही कारणे नसताना सुद्धा ते तीन पक्ष एकत्र आले कारण मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीतील निकालाने त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. लोकसभेप्रमाणेच आपण वेगवेगळे लढलो तर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा पराभव होऊन भाजप विजयी होऊन आपले अस्तित्व धोक्यात येईल हे त्यांनी एक वर्षापूर्वीच ओळखून युती केली होती. आता २०१५ मध्ये दादरी, ध्रुवीकरण, आरक्षण, डीएनए, गोमांस असे कोणतेही मुद्दे अस्तित्वात आले नसते तरी या तीन पक्षांनी युती केलीच असती कारण हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. विरोधकांनी एकत्र येण्याची वरील कारणे नसून आपल्या अस्तित्वाचा प्रश्न हेच एकमेव कारण त्यामागे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर
स
सुधीर Tue, 11/10/2015 - 06:01 नवीन
फार फार तर काँगेससाठी अस्तित्वाची लढाई होती असे म्हणता येईल. लालूंचा यादवांचा आणि नितिशचा कुर्मींचा एक व्होटर बेस आहे. तो अगोदरही होता, आताही आहे आणि जोवर जातीवरून समाजात भेदभाव असतील तोवर राहीलच. (आजच्या इक्सप्रेस मधले लोकनीती CSDS चे सर्वे रिपोर्ट्स मला आवडले) तुम्ही मानणार नाही हे मला अपेक्षित आहे. :) मतभेद चालायचेच. दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 11/10/2015 - 07:00 नवीन
फार फार तर काँगेससाठी अस्तित्वाची लढाई होती असे म्हणता येईल. लालूंचा यादवांचा आणि नितिशचा कुर्मींचा एक व्होटर बेस आहे. तो अगोदरही होता, आताही आहे आणि जोवर जातीवरून समाजात भेदभाव असतील तोवर राहीलच.
ही फक्त काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई नव्हती, तर तीनही पक्षांच्या अस्तित्वाची लढाई होती. २०१० च्या विधानसभा निवडणुकीत काँगेस एकटे लढले. त्यात त्यांना अंदाजे ८-९% मते मिळून फक्त ४ जागा मिळाल्या. त्यापूर्वी फेब्रुवारी २००५ मध्ये पास्वानच्या लोजपबरोबर युती करून कॉंग्रेसने निवडणुक लढवून फक्त १० जागा मिळाल्या होत्या. डिसेंबर २००५ मध्ये काँग्रेसने राजदशी युती करून फक्त ९ जागा मिळाल्या. मे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने स्वतंत्र लढून ४० पैकी ३ जागा मिळविल्या होत्या तर मे २०१४ मध्ये पुन्हा एकदा राजदशी युती करून ४० पैकी २ जागा मिळाल्या. म्हणजे विधानसभेत काँग्रेस स्वतंत्र लढो वा एखाद्या स्थानिक पक्षाबरोबर, काँग्रेस चा आकडा १० च्या पुढे जात नाही. लोकसभेत सुद्धा स्वतंत्र किंवा एखाद्या पक्षाशी युती करूनसुद्धा काँग्रेसचे ३ पेक्षा जास्त खासदार निवडून येत नाहीत. त्यामुळे फक्त एका स्थानिक पक्षाशी केलेली युती पुरेशी नाही. फक्त एकाऐवजी जास्त स्थानिक पक्षांबरोबर युती करणे ही काँग्रेसची आत्यंतिक गरज होती. आता राजदची कामगिरी पाहू. २००४ लोकसभा - काँग्रेस व लोजपबरोबर युती. राजदला ४० पैकी २२ जागा. २००९ लोकसभा - लोजपबरोबर युती. राजदला ४० पैकी ४ जागा. लोजपला भोपळा. २०१४ लोकसभा - कॉन्ग्रेसबरोबर युती. राजदला ४० पैकी ४ जागा. कॉंग्रेसला २ जागा. फेब्रुवारी २००५ विधानसभा - स्वबळावर निवडणुक. राजदला २४३ पैकी ८० जागा. डिसेंबर २००५ विधानसभा - कॉन्ग्रेसबरोबर युती. राजदला २४३ पैकी ५४ जागा. डिसेंबर २०१० विधानसभा - लोजपबरोबर युती. राजदला २४३ पैकी २१ जागा. वरील आकड्यांवरून असे दिसते की राजदला मिळणार्‍या जागा प्रत्येक निवडणुकीत कमी होत आहेत. फक्त एका पक्षाबरोबर युती करूनसुद्धा राजदला फायदा मिळालेला नाही. २००४ मध्ये काँग्रेस व लोजप अशा दोन पक्षांबरोबर युती केल्यावर राजदला प्रचंड फायदा झाला होता. परंतु फक्त एका पक्षाबरोबर युती किंवा स्वबळावर लढणे हे राजदसाठी अत्यंत तोट्याचे होते. त्यामुळे फक्त काँग्रेसबरोबर युती न करता युतीत अजून एखादा पक्ष असणे ही राजदच्या अस्तित्वासाठी आत्यंतिक गरज होती. संजद स्वतःहूनच युतीसाठी पुढे आल्याने व काँग्रेस बरोबर असल्याने राजदला जशी किमान ३ पक्षांची युती अपेक्षित होती तशीच झाली. आता संजदची कामगिरी पाहू. २००४ लोकसभा - भाजपबरोबर युती. युतीला ४० पैकी फक्त १० जागा कारण त्यांच्याविरूद्ध ३ पक्षांची युती झाली होती. २००९ लोकसभा - भाजपबरोबर युती. संजदला २० व भाजपला १२ जागा. २०१४ लोकसभा - स्वबळावर निवडणुक. संजदला ४० पैकी फक्त २ जागा. फेब्रुवारी २००५ विधानसभा - भाजपबरोबर युती. संजद ५५, भाजप ३३ डिसेंबर २००५ विधानसभा - भाजपबरोबर युती. संजद ८८, भाजप ५५ डिसेंबर २०१० विधानसभा - भाजपबरोबर युती. संजद ११५, भाजप ९१ २०१४ चा अपवाद वगळता संजदने सर्व निवडणुका भाजपबरोबर युती करून लढविल्या व त्यात दोन्ही पक्षांचा प्रचंड फायदा झाला. २०१४ मध्ये संजदने स्वबळावर निवडणुक लढविल्याबरोबर त्यांना ४० पैकी फक्त २ जागा मिळाल्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप+ आघाडीला ३८% मते होती. राजद्+काँग्रेस आघाडीला २८% व संजदला १७% मते होती. नोव्हेंबर २०१५ मधील विधानसभा निवडणुकीत २०१४ प्रमाणेच तिरंगी लढत झाली असती तर भाजप+ आघाडीला सहज बहुमत मिळाले असते आणि राजद, काँग्रेस व संजद या तीनही पक्षांना पुढील ५ वर्षे विरोधात बसावे लागले असते. लोकसभा निवडणुकीत पूर्ण सुपडा साफ झालेल्या या तीनही पक्षांना विधानसभेत देखील विरोधात बसावे लागले असते. आपण एकत्र आलो तरच भाजपला हरविता येईल हे त्यांच्या ऑगस्ट २०१४ मध्येच लक्षात आले होते. एकत्र येणे हे तीनही पक्षांच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक होते. त्यामुळेच आपले अस्तित्व टिकविण्यासाठी जंगलराज वगैरे मुद्दे विसरून हे तीनही पक्ष एकत्र आले व त्यांच्या मतांच्या एकत्रीकरणामुळेच भाजपचा दारूण पराभव झाला. जरी राजद व संजद या पक्षांकडे स्वतःची प्रत्येकी १६-१८% मतांची स्वतंत्र व्होटबँक होती तरी स्वतंत्रपणे लढल्यास ती व्होटबँक जागा मिळवून देण्यास पुरेशी नव्हती. एकत्र येणे हाच जागा वाढविण्यावर एकमेव पर्याय होता.
तुम्ही मानणार नाही हे मला अपेक्षित आहे. :) मतभेद चालायचेच. दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा!
ही फक्त कॉंग्रेसच्याच अस्तित्वाची लढाई होती, राजद व संजदच्या अस्तित्वाची लढाई नव्हती हे तुम्ही आकडेवारी वगैरे देऊन वस्तुनिष्ठ पद्धतीने विश्लेषण करून हे पटवून दिले तर ते मी नक्की मानेन. असो. दिवाळीच्या तुम्हालाही शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर
स
सुधीर Wed, 11/11/2015 - 08:33 नवीन
जिंकलेल्या जागेऐवजी %व्होट शेअर हे एकक वापरून पहा. http://www.business-standard.com/article/elections/rjd-still-strong-in-bihar-despite-fall-in-vote-share-115091800054_1.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संपत Mon, 11/09/2015 - 18:07 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे भाजपचा मत हिस्सा लोकसभा २०१४ मध्ये 29.40 होता. तो ह्या निवडणुकीत 24.8 टक्क्यांवर आला आहे. जवळपास ५ % चा फरक हा नक्कीच मोठा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 11/09/2015 - 18:35 नवीन
भाजप+ व संजद+ या दोन्ही आघाड्यांनी २०१४ च्या तुलनेत अंदाजे ४% मते गमाविली आहेत. विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत सहभागी न झालेले अनेक लहान पक्ष भाग घेतात व ते उर्वरीत पक्षाच्या मतांचा थोडाथोडा वाटा खातात. शिवसेना लोकसभा निवडणुकीत नव्हती. परंतु या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार उभे करून २ लाखाहून अधिक मते (०.६% मते) घेतली, पप्पू यादवने व साधु यादवने आपापले वेगळे पक्ष स्थापन करून थोडी मते घेतली. अशा लहान पक्षांमुळे दोन्ही आघाड्यांची काही मते कमी झाली, परंतु दोन्ही आघाड्यातील मतांचा फरक मात्र जवळपास सारखाच राहिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत
स
संपत Mon, 11/09/2015 - 19:55 नवीन
मुद्दा एवढाच होता कि काही कारणांमुळे भाजपचा पाठींबा निश्चितच कमी झाला. भाजपने आपला मत हिस्सा राखला असता तर बिहार मधले चित्र वेगळे असते. दुसरी गोष्ट अशी कि भाजपच्या साथीदारांनी उलट लोकसभेच्या तुलनेने खूप चांगली कामगिरी केली असावी. त्यामुळेच भाजपची कामगिरी खराब होऊन देखील भाजप आघाडी आपली टक्केवारी कायम ठेवण्यात यशस्वी झाली आहे. हे बघता माझ्यामते भाजप आघाडी निवडणूक साथीदारांच्या नव्हे तर भाजपच्या खराब कामगिरीमुळे हरली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 11/10/2015 - 07:22 नवीन
मुद्दा एवढाच होता कि काही कारणांमुळे भाजपचा पाठींबा निश्चितच कमी झाला.
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत अनेक नवीन पक्षांनी विधानसभा निवडणुकीत सहभाग घेतल्याने दोन्ही आघाड्यांनी आपली थोडी मते गमाविली. भाजप+ आघाडीची काही मते संजद+ आघाडीकडे गेली किंवा संजद+ आघाडीची काही मते भाजप+ आघाडीकडे गेली असे दिसत नाही.
हे बघता माझ्यामते भाजप आघाडी निवडणूक साथीदारांच्या नव्हे तर भाजपच्या खराब कामगिरीमुळे हरली.
भाजप+ आघाडीविरूद्ध विरोधकांची मते एकत्रित झाल्याने भाजप+ आघाडीला संजद+ आघाडीपेक्षा ७-८% मते कमी मिळाली व त्यामुळेच भाजप+ आघाडी हरली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत
ग
गॅरी ट्रुमन Tue, 11/10/2015 - 06:08 नवीन
वरीलपैकी कोणत्याही कारणांमुळे भाजप+ ने मोठ्या प्रमाणात मते गमाविली असे आकडेवारीवरून तरी दिसत नाही
जी मते भाजप आघाडीकडे वळायला अनुकूल परिस्थिती होती ती मते भाजप आघाडीकडे वळली नाहीत ना. यादव आणि मुस्लिम मतदारांचे समजू शकतो. पण लालू-नितीश एकत्र आले तेव्हा इतर काही समाजघटकांमधील मते भाजपला आपल्याकडे का वळवता आली नाहीत? उदाहरणार्थ महादलित समाजातील आणि ओबीसी समाजातील काही मतदारांना लालूंच्या राज्यातील 'यादवीचा' त्रास होत होता. भाजपने त्यांना जंगलराजची भिती दाखवली देखील पण तरीही त्या मतदारांनी भाजपला मते का दिली नाहीत? मला वाटते की अशी काही मते आपल्याकडे खेचून आणायला भाजपला अगदी अनुकूल परिस्थिती होती.कारण संजद आणि राजदचे मतदार परस्परविरोधी होते.तरीही ही मते आपल्याकडे वळवणे का शक्य झाले नाही? मागील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे भागवतांच्या आरक्षणविरोधी विधानाचा लालू आणि नितीश या दोघांनीही पुरेपूर वापर करून घेतला.त्याचा काहीच परिणाम झाला नसेल असे मला तरी वाटत नाही. समजा कॉलराविरूध्द औषध नसते तर कोणकोण कॉलरामुळे गेले असते हे सांगता येणार नाही त्याप्रमाणेच "जी मते भाजपकडे अन्यथा वळली असती" अशी मते दिसत नाहीत. त्यामुळे माझे हे विधान circumstantial आणि anecdotal मुद्द्यांवर आधारित आहे असे समजा. काल हुकूमदेव नारायण यादव आणि जितनराम मांझींनीही भागवतांवर टिका केली ती कशामुळे? या सरसंघचालकांचे एक आश्चर्य वाटते. एकतर हेडगेवार किंवा गोळवलकर गुरूजींच्या एक शतांशही ऑरा यांना नाही. खुद्द नागपूरमधून यांनी लोकसभेची निवडणुक लढवली तरी निवडून येणे तर सोडाच डिपॉझिट वाचेल याचीही खात्री कोणी देऊ शकत नाही. तरीही ढुढ्ढाचार्यांसारखे सगळ्यांना तत्वज्ञान शिकवायला मात्र हे सगळ्यात पुढे असतात. या सरसंघचालकांपेक्षा मधुबनीतून पाच वेळा निवडून गेलेले हुकूमदेव नारायण यादव यांच्यासारखे लोक मतदारांशी अधिक संपर्क ठेऊन असल्यामुळे संघातील मंडळींपेक्षा यादवांचे मत मला अधिक ग्राह्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
घ
घाटावरचे भट Tue, 11/10/2015 - 06:45 नवीन
नाकापेक्षा मोती(दी?) जड होऊ नये म्हणून संघानेच पद्धतशीरपणे भाजपा/मोदी-शहा यांचा काटा काढलाय, बाकी काहीही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
श्रीगुरुजी Tue, 11/10/2015 - 07:16 नवीन
जी मते भाजप आघाडीकडे वळायला अनुकूल परिस्थिती होती ती मते भाजप आघाडीकडे वळली नाहीत ना. यादव आणि मुस्लिम मतदारांचे समजू शकतो. पण लालू-नितीश एकत्र आले तेव्हा इतर काही समाजघटकांमधील मते भाजपला आपल्याकडे का वळवता आली नाहीत? उदाहरणार्थ महादलित समाजातील आणि ओबीसी समाजातील काही मतदारांना लालूंच्या राज्यातील 'यादवीचा' त्रास होत होता. भाजपने त्यांना जंगलराजची भिती दाखवली देखील पण तरीही त्या मतदारांनी भाजपला मते का दिली नाहीत? मला वाटते की अशी काही मते आपल्याकडे खेचून आणायला भाजपला अगदी अनुकूल परिस्थिती होती.कारण संजद आणि राजदचे मतदार परस्परविरोधी होते.तरीही ही मते आपल्याकडे वळवणे का शक्य झाले नाही?
गेल्या २-३ महिन्यातील परिस्थिती पाहिली तर भाजप आघाडीकडे नवीन मते वळायला परिस्थिती प्रतिकूल होती. जूनपासून पावसाने ओढ दिल्यामुळे महागाई प्रचंड वाढली आहे. निवडणुक सुरू होता होता दादरी प्रकरण घडले (की घडविले गेले?). माध्यमातून त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली ती सर्व भाजपच्या विरोधात होती. दादरीचे निमित्त करून तथाकथित विचारवंतांनी पुरस्कार वापसी मोहीम सुरू केली. रोज २-३ लोकांनी पुरस्कार परत करणे सुरू ठेवल्यामुळे त्याची महिनाभर चर्चा होत राहिली. निवडणुकीच्या पहिल्या फेरीच्या काही दिवस आधी ही राजकीय मोहीम सुरू झाली. पुरस्कार परत करणारी शेवटची महिला होती सूझन अरूंधती रॉय. तिने ४/५ तारखेला पुरस्कार परत देण्याची घोषणा केली. ५ तारखेलाचा मतदानाचा शेवटचा दिवस होता. ५ तारखेनंतर कोणीही पुरस्कार परत केल्याचे ऐकले नाही. निवडणुक सुरू होताहोता दादरी प्रकरण घडणे, त्याचे निमित्त करून पुरस्कार वापसीची मोहीम महिनाभर चालणे व मतदान संपल्यासंपल्या ही मोहीम थांबणे हा योगायोग नाही. मध्येच मोहन भागवतांच्या वाक्यावर जोरदार चर्चा झाली जी भाजपसाठी नकारात्मक होती. आर के सिंह यांचे वाक्यही भाजपसाठी नकारात्मक होते. निवडणुकीच्या काळात भाजपसाठी अत्यंत नकारात्मक वातावरण असल्याने भाजपकडे नवीन मते यायला परिस्थिती अनुकूल नव्हती.
मागील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे भागवतांच्या आरक्षणविरोधी विधानाचा लालू आणि नितीश या दोघांनीही पुरेपूर वापर करून घेतला.त्याचा काहीच परिणाम झाला नसेल असे मला तरी वाटत नाही. समजा कॉलराविरूध्द औषध नसते तर कोणकोण कॉलरामुळे गेले असते हे सांगता येणार नाही त्याप्रमाणेच "जी मते भाजपकडे अन्यथा वळली असती" अशी मते दिसत नाहीत. त्यामुळे माझे हे विधान circumstantial आणि anecdotal मुद्द्यांवर आधारित आहे असे समजा. काल हुकूमदेव नारायण यादव आणि जितनराम मांझींनीही भागवतांवर टिका केली ती कशामुळे?
माझ्या दृष्टीने याचा परीणाम असा झाला असावा की भाजपविरूद्ध निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणामुळे भाजपकडे नवीन मते आली नसावीत. भाजपकडे आधी जी मते होती त्यात फारसा फरक पडलेला दिसत नाही, पण नवीन मते मात्र भाजपकडे फिरकलेली दिसत नाहीत. भाजप प्रमाणेच नवीन मते संजद्+ आघाडीकडेही गेलेली दिसत नाहीत. अन्यथा त्यांच्या मतांची टक्केवारी वाढलेली दिसली असती. लोकसभा निवडणुक न लढविलेले अनेक पक्ष विधानसभा निवडणुकीत उतरले होते (उदा. शिवसेना, भारतीय जनसंघ, सपा, हिंदू महासभा, एमआयएम, पप्पू यादवचा पक्ष, साधू यादवचा पक्ष इ.). या लहान पक्षांनी दोन्ही आघाड्यांची थोडीथोडी मते खाल्ली (उदा. शिवसेना ०.६%, सपा १.०%). त्यामुळे दोन्ही आघाड्यांना कोणतीही नवीन मते किंवा एकमेकांची मते मिळाल्याचे दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
प
प्रसाद१९७१ Tue, 11/10/2015 - 08:24 नवीन
१.
जूनपासून पावसाने ओढ दिल्यामुळे महागाई प्रचंड वाढली आहे.
गुरुजी, खनिज तेल स्वस्त झाल्या मुळे सरकार कडे कमीत कमी १ लाख कोटी जास्तीचे जमले आहेत ( २०१३-१४ च्या तुलनेत ). पावसानी ओढ दिली हे जून जुलै पासुनच माहिती होते. सरकारला पाऊले उचलणे शक्य होते आणि डाळी आणी खाद्य तेलाच्या किमती मर्यादेत ठेवणे सहज शक्य होते. पण मोदी सरकारनी ते का केले नाही ते कळले नाही. कदाचित साठाबाजांनी लोकसभा निवडणुकीत केलेली आर्थिक मदत मोदी सरकारला परत करायची होती. २. तुम्ही म्हणता तशी पक्षांची युती झाली तर त्यांच्या मताच्या टक्क्यांची बेरीज होत नाही. राजद ( १७%), जदयु ( १८% ) आणि कॉ ( ८% ) हे जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा त्यांना त्यांच्या बर्‍याच कार्यकर्त्यांना नाराज करावे लागते. एखादी राजद वर्षानुवर्ष लढवत असलेली जागा जदयु कडे गेली तर तिथले राजद कार्यकर्ते जदयु ला मदत करत नाहीत मनापासुन. उदा : कोथरुड मधे युतीची जागा शिवसेना लढवत होती तेंव्हा मिळणार्‍या मतांपेक्षा प्रचंड जास्त मते शिवसेना आणि भाजपला वेगवेगळे लढुन यावर्षी मिळाली. पुन्हा जर शिवसेना आणि भाजपनी एकत्र निवडणुक लढवली तर तितकी मते मिळणार नाहीत. भाजपनी कीतीही कारणे द्यायचा प्रयत्न केला तरी वस्तूस्थोती ही आहे की लोक मोदी सरकारकडुन निराश झाले आहेत.. दिड वर्षात लोकांना थोडातरी फरक दिसायला हवा होता जमिनीवर. उदाहरणार्थ महाराष्ट्रात एखादा माणुस जर सप्टेंबर २०१४ मधे कोमात गेला असता आणि १५ दिवसाप्पुर्वी शुद्धीत आला तर त्याला सरकार बदल झालाय असे जाणवणार पण नाही.. लोकांना जीएसटी, जीडीपी , परकी गुंतवणुक या गप्पा नको आहेत. त्यांना गुंडांपासुन संरक्षण हवे आहे. रस्त्यावर पोलिस गस्त घालताना बघायचे आहेत. न्यायालयात एक खटला निकाली निघायला हवा आहे.सरकारी ऑफिस मधे वेळेवर काम होयला हवे आहे. मुख्य म्हणजे राजकारणी चोरांना तुरुंगात बघायचे आहे. लालू जर इतका मोठा खलपुरुष आहे तर मोदी सरकारनी त्याच्या वर खटले भरुन फास्ट् ट्रॅक चालवून का नाही लालू ला तुरुंगात पाठवला? बारामतीत मिठ्या मारुन पण जनतेनी पुन्हा आपल्याला मते द्यावीत अशी जर मोदींची अपेक्षा .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 11/10/2015 - 08:36 नवीन
मुद्दा क्र. (१) चे सविस्तर उत्तर अन्यत्र दिले आहे. त्याची पुनरावृत्ती करीत नाही. मुद्दा क्र. (२) चे सविस्तर उत्तर याच धाग्यात दिले आहे. लालूपुरतं बोलायचं तर लालूला ३ ऑक्टोबर २०१३ रोजी ५ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झालेली आहे. त्या शिक्षेविरूद्ध लालूने उच्च न्यायालयात आव्हान दिल्यामुळे तो खटला न्यायालयात असून लालू जामिनावर मुक्त आहे. सुरू असलेल्या खटल्यात कोणतेही सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. तुम्हाला लालूसारख्या भ्रष्ट व गुन्हेगार माणसाला नितीशने मारलेल्या मिठ्या चालतात. भाजपचा बिहारमध्ये पराभव झाल्याचा म्हणजेच पर्यायाने लालूचा विजय झाल्याचा आनंद होतो. पण बारामतीतल्या मिठ्यांना आक्षेप आहे. बारामतीत मारलेल्या मिठ्यांमुळे राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांविरूद्ध सुरू असलेल्या कारवाईला कोठेही खीळ पडलेली नाही किंवा पवार व भाजप यांच्यात दिलजमाई झालेली नाही ही वस्तुस्थिती असताना पुन्हापुन्हा तोच मुद्दा उगाळण्यात अर्थ नाही. जशी मोदींनी बारामतीत पवारांबरोबर व्यासपीठ शेअर केले होते तसेच त्यांनी २ महिन्यांपूर्वी नितीशबरोबर सुद्धा पाटण्यात व्यासपीठ शेअर केले होते. मोदी पंतप्रधान असल्याने ते ज्या ज्या राज्यात जातात त्या त्या राज्यातील पंतप्रधानाबरोबर ते व्यासपीठावर एकत्र असतात. याचा अर्थ त्यांच्यात साटंलोटं आहे असा होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Tue, 11/10/2015 - 08:55 नवीन
लालूपुरतं बोलायचं तर लालूला ३ ऑक्टोबर २०१३ रोजी ५ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झालेली आहे. त्या शिक्षेविरूद्ध लालूने उच्च न्यायालयात आव्हान दिल्यामुळे तो खटला न्यायालयात असून लालू जामिनावर मुक्त आहे. सुरू असलेल्या खटल्यात कोणतेही सरकार हस्तक्षेप करू शकत नाही.
ठरवले तर लालू विरुद्ध १०० गुन्हे दाखल करता येतील. आणि सर्व सिद्ध ही करता येतील. एकाच खटल्यावर का अवलंबून रहायचे. आणि जो खटला तुम्ही म्हणता आहात तो फास्ट ट्रॅक नाही का करता येत?
तुम्हाला लालूसारख्या भ्रष्ट व गुन्हेगार माणसाला नितीशने मारलेल्या मिठ्या चालतात.
हे मला चालते असे कोणी सांगितले. मोदींनी आशा दाखवली होती, केजरीवाल नी पण दाखवली होती. दोघांनी निराशा केली त्यामुळे मतदान न करणेच हा एकमेव पर्याय. मोदींकडुन तर चुत्या बनवलो गेलो असे फीलींग आले आहे.
बारामतीत मारलेल्या मिठ्यांमुळे राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांविरूद्ध सुरू असलेल्या कारवाईला कोठेही खीळ पडलेली नाही
खिक्क... एक वर्षात सर्व खटल्यांचे पहिल्या कोर्टात निकाल लागुन हे नेते आत असते तर म्हणले असते की कारवायीत खीळ पडली नाही. सरकारनी ठरवले तर एक वर्षात हे सहज शक्य आहे.
मोदींनी बारामतीत पवारांबरोबर व्यासपीठ शेअर केले होते तसेच त्यांनी २ महिन्यांपूर्वी नितीशबरोबर सुद्धा पाटण्यात व्यासपीठ शेअर केले होते.
काय गुरुजी, बारामती महाराष्ट्रा ची राजधानी कधी झाली? आणि आमचे काका मुख्यमंत्री होते? मोदी स्वताहुन बारामतीला गेले होते, तो काही सरकारी प्रोटोकॉल नव्हता. आता तर जेटली पण जावून लांगुन लांचन करुन आले. जनतेने निराशा झाली हे मतदानातुन दाखवुन दिले आहे, ते समजुन घेउन सुधारणा करायला अजुन साडेतीन वर्ष आहेत. नसेल समजुन् घ्यायचे तर काय करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 11/10/2015 - 16:20 नवीन
ठरवले तर लालू विरुद्ध १०० गुन्हे दाखल करता येतील. आणि सर्व सिद्ध ही करता येतील. एकाच खटल्यावर का अवलंबून रहायचे. आणि जो खटला तुम्ही म्हणता आहात तो फास्ट ट्रॅक नाही का करता येत?
हे कोणी ठरविले तर? हे फक्त आता खटल्याचे न्यायाधीश ठरवू शकतात. खटला सुरू होण्याआधी फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला दाखल करता येतो. एकदा खटला सुरू झाल्यावर तो निर्णय पूर्णपणे न्यायाधीशांच्या हातात जातो. लालू हा सुरवातीपासूनच भाजपचा कट्टर विरोधक आहे. अशा माणसाला लवकरात लवकर शिक्षा व्हावी असे भाजपला का वाटणार नाही? त्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालय हा उपाय असता तर तो भाजप सरकारने केव्हाच अंमलात आणला असता.
खिक्क... एक वर्षात सर्व खटल्यांचे पहिल्या कोर्टात निकाल लागुन हे नेते आत असते तर म्हणले असते की कारवायीत खीळ पडली नाही. सरकारनी ठरवले तर एक वर्षात हे सहज शक्य आहे.
चौकशीची एक प्रोसिजर असते. कोणाच्या तरी मनात आले म्हणून लगेच एखाद्यावर तातडीने खटला भरून त्याला लगेच तुरूंगात टाकणे हे कितीही गोडगोड वाटले तरी शक्य नसते. चौकशीत अनेक विभाग गुंतलेले असतात. स्थानिक पोलिस, सीआयडी, सीबीआय, ईडी, आयकर विभाग अशा अनेक विभागांकडून आपापल्या पद्धतीने चौकशी होत असते. यातील काही विभाग केंद्राचे असतात तर काही राज्यांचे. पुढार्‍यांच्या चौकशीला अनेकवेळा राज्यपालांची अधिकृत परवानगी लागते. चौकशी सुरू झाल्यावर पुढारी लगेच न्यायालयात अर्ज करून अमुकतमुक विभागाला चौकशीचा अधिकारच नाही व त्यामुळे चौकशी थांबवा असा अर्ज करून चौकशी लांबवितात. चौकशीत पूर्ण असहकार्य करतात. समन्स पाठविलेल्या तारखेला वेगवेगळी अधिकृत कारणे देऊन गैरहजर राहून चौकशी लांबवितात. कागदपत्रे नष्ट किंवा गहाळ केली असल्यास चौकशी खूप लांबते. २-३ वर्षांपूर्वी मंत्रालयाला लावलेल्या आगीत जलसंधारण विभागाशी संबंधित अनेक फाईल्स नष्ट झाल्याचे वाचले होते. एकंदरीत भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी ही खूप वेळकाढू गोष्ट आहे. लालूवर चारा प्रकरणात १९९७ साली खटला दाखल झाला होता. त्याचा निकाल तब्बल १६ वर्षांनी लागला हे लक्षात घेतले तर हे काम किती वेळखाऊ आहे हे लक्षात येईल.
काय गुरुजी, बारामती महाराष्ट्रा ची राजधानी कधी झाली? आणि आमचे काका मुख्यमंत्री होते? मोदी स्वताहुन बारामतीला गेले होते, तो काही सरकारी प्रोटोकॉल नव्हता. आता तर जेटली पण जावून लांगुन लांचन करुन आले.
पंतप्रधान फक्त राज्यांच्या राजधानीलाच भेट देतात का? बारामतीला वेगवेगळ्या राष्ट्रीय नेत्यांना आमंत्रित करणे हे पवारांचे खूप जुने धोरण आहे. पूर्वी चंद्रशेखर आणि इतर अनेक नेते बारामतीला येऊन भेट देऊन गेले होते. मनमोहन सिंग व लालूने सुद्धा बारामतीला पवारांसहीत भेट दिलेली आहे. बारामतीला भेट दिल्याने भाजप व पवारांचे साटंलोटं आहे हा समज अयोग्य आहे. साटंलोटं करण्यासाठी या नेत्यांना डोळ्यावर येतील अशा जाहीर भेटी द्यायची गरज नाही. ते गुपचुप दिल्लीत किंवा अन्यत्र भेटू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ग
गॅरी ट्रुमन Tue, 11/10/2015 - 09:43 नवीन
भाजपविरूद्ध निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणामुळे भाजपकडे नवीन मते आली नसावीत. भाजपकडे आधी जी मते होती त्यात फारसा फरक पडलेला दिसत नाही, पण नवीन मते मात्र भाजपकडे फिरकलेली दिसत नाहीत.
तोच मुद्दा आहे. खरं तर लालूंचा विजय झाला तर परत जंगलराज येईल ही भिती महादलित आणि यादव सोडून इतर ओबीसी मतदारांपैकी अनेकांना वाटणे आणि बाय डिफॉल्ट भाजपला मते जाणे हे व्हायला हवे होते. पण तसे न होता या मतदारांनी परत लालूंनाच मते दिली. मतदारांची मेमरी कमी कालावधीची असते वगैरे सगळे ठिक आहे.पण मागे एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे लालूंचे जंगलराज आले तरी त्याचा कुणाही एका माणसाला त्रास व्हायची शक्यता तशी बरीच कमी असणार पण भाजपने आरक्षण काढले तर त्याचा महादलित आणि ओबीसी समाजातील अगदी प्रत्येकालाच त्रास होणार. त्यामुळे लालूंच्या जंगलराजपेक्षाही आरक्षण काढले जाईल ही भिती मतदारांना जास्त वाटली. नुसत्या गणिताच्या आधारे महागठबंधनला आपल्यापेक्षा ७% अधिक मते होती हे भाजप नेत्यांच्या लक्षात आले नव्हते का? अशावेळी महागठबंधनकडून किमान ४-५% मते आपल्याकडे खेचून आणणे गरजेचे होते. नेमक्या अशाच वेळी भागवतांचे ते वाक्य आले. ठिक आहे भाजपची स्वतःची मते त्यामुळे कमी झाली नसली तरी जी मते अन्यथा भाजपकडे येऊ शकली असती ती मात्र परत लालूंकडेच गेली. डाळींचे भाव वाढले ते काही एका रात्रीत वाढलेले नाहीत.मग अशावेळी सरकारने डाळींची आयात करून किंवा साठेबाजांवर वेळेत कारवाई करून भाव इतके वाढू द्यायला नको होते. त्यात काही कारणाने अपयश आले तरी जनमत अशावेळी कारणे ऐकायला जात नाही.त्यातून 'अच्छे दिन' येणार हे आश्वासन देऊन भाजपवाल्यांनी स्वतःच लोकांच्या अपेक्षा आभाळाला पोहोचवल्या. निवडणुकांसंदर्भात माझा एक हायपोथिसिस आहे. तो बरोबर आहे की नाही हे मला माहित नाही. पण मला असे वाटते की सत्ताधारी पक्षाविरोधात लोकांचा राग हा त्या पक्षापासूनच्या अपेक्षा आणि त्या पक्षाने प्रत्यक्ष केलेले काम यामधील फरकावर अवलंबून असतो. इथे अच्छे दिनच्या आश्वासनामुळे लोकांच्या अपेक्षा आभाळाला टेकवायचे काम भाजपनेच केले.त्यामुळे नंतरच्या काळात अपेक्षा आणि प्रत्यक्ष काम यामधील फरक बराच मोठा असेल याची बेगमीही २०१४ मध्येच त्या अच्छ्या दिनांच्या आश्वासनाने करून ठेवली. अशावेळी सरकारला कितीही जेन्युईन कारणामुळे डाळींचे भाव कमी करायला अपयश आले असले तरी मतदार ते ऐकून घ्यायच्या मनस्थितीत असतील असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे Tue, 11/10/2015 - 10:14 नवीन
निवडणुकांसंदर्भात माझा एक हायपोथिसिस आहे. तो बरोबर आहे की नाही हे मला माहित नाही. पण मला असे वाटते की सत्ताधारी पक्षाविरोधात लोकांचा राग हा त्या पक्षापासूनच्या अपेक्षा आणि त्या पक्षाने प्रत्यक्ष केलेले काम यामधील फरकावर अवलंबून असतो. इथे अच्छे दिनच्या आश्वासनामुळे लोकांच्या अपेक्षा आभाळाला टेकवायचे काम भाजपनेच केले.त्यामुळे नंतरच्या काळात अपेक्षा आणि प्रत्यक्ष काम यामधील फरक बराच मोठा असेल याची बेगमीही २०१४ मध्येच त्या अच्छ्या दिनांच्या आश्वासनाने करून ठेवली. अशावेळी सरकारला कितीही जेन्युईन कारणामुळे डाळींचे भाव कमी करायला अपयश आले असले तरी मतदार ते ऐकून घ्यायच्या मनस्थितीत असतील असे वाटत नाही.
जुने क्लिंटन परत आल्यासारखे वाटले.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
प
प्रसाद१९७१ Tue, 11/10/2015 - 11:14 नवीन
निवडणुकांसंदर्भात माझा एक हायपोथिसिस आहे. तो बरोबर आहे की नाही हे मला माहित नाही. पण मला असे वाटते की सत्ताधारी पक्षाविरोधात लोकांचा राग हा त्या पक्षापासूनच्या अपेक्षा आणि त्या पक्षाने प्रत्यक्ष केलेले काम यामधील फरकावर अवलंबून असतो.
हे बरोबरच आहे हो. म्हणुनच मी वर लिहीले होते मोदींनी आपल्याला पार फसवले असे फीलींग आले आहे. साधं डाळींचे भाव आटोक्यात ठेवता येत नाहीत आयात करुन ( वेळेत ) हे फार मोठे अ‍ॅडमेनिस्ट्रेटिव्ह फेल्युअर आहे, किंवा काहीतरी स्वार्थ आहे. बाकी काही नाही तर माओ वाद्यांवर तरी काही मोठी कारवाई करुन तो भाग पुन्हा सरकारी नियंत्रणात आणला पाहिजे होता. स्वच्छते साठी टॅक्स हा तर महान जोक आहे. आधीच मोदी खनिज तेला मुळे वाचलेल्या पैश्यांचे काय झाले? किंवा त्याचा काय विधायक कामात उपयोग झाला ते सांगत नाहीत आणि वर नविन टॅक्स.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
च
चैतन्य ईन्या Tue, 11/10/2015 - 12:59 नवीन
दोघांशी पूर्णपणे सहमत. खरे म्हणजे गुरुजीनी आवरते घेतले तर बरे होईल. म्हणजे आह्मी भाजपा समर्थकच आहोत पण प्रत्येक गोष्टीला इतके फाटे फोडून आणि आकडेवारी देवून काहीही पटवता येत नाही. उलट सरळ पराभव मान्य करावा ते जास्त चांगले आहे. इथे गुरुजी ह्या व्यक्तीला मी बोल लावत नाहीये तर अश्या प्रवृत्तीला. काय आहे आपल्याला नाही जमले म्हणणे अवघड असते. पण सोनिया आणि राहुल तेच करतायत. कसली डोंबलाची कालेक्टीव्ह रीसपोनसीबीलीटी. हे खान्ग्रेस सारखे झाले की. मोदी बाहेर जाण्यापेक्षा घरात जास्त राहिले तर नक्की बरे होईल. बाहेर जाणे आवश्यकच आहे पण मुळात तुम्हाला सगळी स्ट्रेंग्थ घरातून मिळणार आहे. तोच पाया डळमळीत होतेय आणि तोच बळकट केला पाहिजेल हे सरळ दिसत कसे नाहीये. दुसरा मुद्दा दुय्यम दर्जाची लोक जवळ बाळगण्याचा आहे. फटीटीआय वर चांगलाच माणूस नेमला असता तर प्रश्नच आला नसता. अनेक लोक तिथेच वैतागले आहेत. सतत मागे ह्यांनी असे केले म्हणून मी आत्ता असे केल्याने काय होतंय असे विचारून काहीही उपयोग नाही. मग तुम्हाला कशाला निवडून दिले? त्यापेक्षा मग आहे तेच काय वाईट आहे? हा खरा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
स
संदीप डांगे Tue, 11/10/2015 - 13:46 नवीन
सतत मागे ह्यांनी असे केले म्हणून मी आत्ता असे केल्याने काय होतंय असे विचारून काहीही उपयोग नाही. मग तुम्हाला कशाला निवडून दिले? त्यापेक्षा मग आहे तेच काय वाईट आहे? हा खरा प्रश्न आहे.
अगदी सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या
च
चैतन्य ईन्या Tue, 11/10/2015 - 15:13 नवीन
http://jagatapahara.blogspot.co.uk/2015/11/blog-post_10.html खरोखर इथे तोर्सेकारानी योग्य ते विश्लेषण केलय. उगाचच टक्केवारी घटली नाही वगैरे काहीही कामाचे नाही. आहे ह्या परिस्थितीत उलट हे मान्य करून विरोधक एकत्र येणार नाही ह्याची काळजी घेणेच योग्य आहे. नाहीतर २०१९ मध्ये खान्ग्रेस इतक्या पण जागा येणार नाहीत. शिवाय कारभार सुधारला नाहीतर खान्ग्रेस काय वाईट होते? ह्या पवारांना कंटाळून लोकांनी तुम्हाला मत दिले त्यांचाच उदोउदो करायला लागलात तर कट्टर समर्थक पण विरोधात जातील. पण तेवढी अक्कल आहे असे वाटत नाही. खरे म्हणजे खूप वर्षांपूर्वी कलमाडी ह्या माणसाला पाठिंबा देवून एकदा अवलक्षण करून झाले होते पण अजून अक्कल आलेली नाहीये असे दिसते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Tue, 11/10/2015 - 16:46 नवीन
आहे ह्या परिस्थितीत उलट हे मान्य करून विरोधक एकत्र येणार नाही ह्याची काळजी घेणेच योग्य आहे.
बिहार निवडणुकीत विरोधकांना एकत्र येण्यापासून रोखणे भाजपच्या हातात नव्हते. राजद व काँग्रेस हे दोन्ही भाजपचे कट्टर विरोधक असून ते लोकसभेपासूनच एकत्र आहेत. त्यांना वेगवेगळे लढायला लावणे शक्य नव्हते. आपल्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिल्यामुळे हे तीनही पक्ष कमालीची लवचिकता दाखवून एकत्र आले. यांच्यातल्या कोणालाही बाहेर काढणे भाजपला शक्य नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा