बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: निकाल
बिहार विधानसभा निवडणुक-२०१५ ची मतमोजणी उद्या रविवार ८ नोव्हेंबर २०१५ रोजी होणार आहे.निवडणुकांचे निकाल आणि त्या अनुषंगाने चर्चा या धाग्यावर करावी ही विनंती. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. सव्वाआठपर्यंत पहिले कल हाती येतील अशी अपेक्षा आहे.
गॅरी ट्रुमन
Book traversal links for बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: निकाल
💬 प्रतिसाद
(240)
म
मालोजीराव
Sun, 11/08/2015 - 09:20
नवीन
गौमातेचा आशीर्वाद लालूंनाच आहे हे सिद्ध झाले म्हणायचे
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sun, 11/08/2015 - 09:26
नवीन
आपल्या संस्कृतीत दोन फार मोठी असत्यं प्रस्थापित झालेली आहेत
१) आपले ज्यांच्याशी पटत नाही किंव मतभेद आहेत त्यांचा द्वेष केला पाहिजे किंवा त्यांचा बागुलबुवा उभा केला पाहीजे
२) आपल्याला जो आवडतो त्याच्याशी संपूर्ण सहमत झाले पाहिजे किंवा त्यांच्या प्रत्येक कृत्याचे समर्थन केले पाहिजे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 11/08/2015 - 09:31
नवीन
ही असत्य नसून मान्यता आहेत. हेही खरं की ह्या मान्यता आता फार घट्ट रूतून बसल्यात.
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Sun, 11/08/2015 - 14:03
नवीन
अगदी!!
आणि जो या दोन प्रकारात येत नाही त्याला दोन्हीकडचे लोक 'दुसर्या पार्टीचा' घोषित करून शिव्या घालतात!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 11/08/2015 - 09:34
नवीन
भाजपाला दिलासा देणारी बातमी:
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/ldf-takes-lead-big-gains-for-bjp-in-kerala/articleshow/49704833.cms
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 11/08/2015 - 09:47
नवीन
राळहोतित
भाजपचा सत्ता मिळविण्यात दारूण अपयश आलेले आहे. आता पुढील बरेच दिवस भाजपचे नक्की काय चुकले याच्यावर काथ्याकूट होत राहील. बिहारमधील जनतेने जातीयवादाला नाकारले, धर्मनिरपेक्षतेला मत दिले, मग्रूरीला नाकारले इ. निष्कर्ष काढले जातील. मोहन भागवतांचे वक्तव्य, इतर वाचाळवीरांची वक्तव्ये, दादरी प्रकरण, महागाई इ. कारणांमुळे भाजपचा पराभव झाला असे ठासून सांगितले जाईल.
परंतु मी वरील कारणांशी सहमत नाही. वरील कारणांचा मतदानावर व निकालावर फारसा फरक पडलेला नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील मतांचे प्रमाण पाहिले तर असे दिसते की त्यावेळी भाजप+ आघाडीला ३५% च्या आसपास मते होती व ४० पैकी ३१ जागा मिळालेल्या होत्या. राजद (१८%) व काँग्रेस (८%) यांना एकत्रित अंदाजे २६% मते होती व ६ जागा मिळाल्या होत्या आणि संजदला अंदाजे १६% मते होती व २ जागा मिळाल्या होत्या. ३५% वि. २६% वि. १६% या तिरंगी लढतील सर्वाधिक ३१ जागा ३५% मते मिळविणार्या आघाडीला होत्या.
आजच्या निकालात आतापर्यंत आलेल्या टक्केवारीनुसार भाजप+ आघाडीला जवळपास तेवढीच म्हणजे ३५% मते मिळाल्याचे दिसत आहे तर राजद, संजद व काँग्रेस एकत्रित असलेल्या आघाडीला एकमेकांची मते मिळून ४२-४३% मते मिळाल्याचे दिसत आहे. लोकसभेला वेगवेगळे लढणारे हे तीन पक्ष एकत्र आल्याने विरोधी मतांची एकजूट होऊन ३५% वि. ४२% या सरळ लढतीत ४२% ला ७०% जागा मिळताना दिसत आहेत.
गेले दिड-दोन महिने दादरी, पुरस्कार परत करणारे साहित्यिक, महागाई, वाचाळवीरांची वक्तव्ये इ. अनेक मुद्दे विरोधात असूनसुद्धा भाजप+ आघाडीला आपली २०१४ मधील मते टिकविण्यात यश आलेले आहे. इतर विरोधी पक्षांची मते देखील टिकली आहेत. परंतु त्यांची मते एकत्रित झाल्याने व दुरंगी लढत झाल्याने त्यांना जागांचा प्रचंड फायदा झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
त्यामुळे मोहन भागवत, दादरी, पुरस्कार वापसी, महागाई, वाचाळवीर इ. मुळे व नागरिकांनी जातीयवादाविरूद्ध मत दिल्याने भाजपला खूप कमी जागा मिळाल्या असे नसून विरोधी मते एकवटल्यामुळेच भाजपला खूप कमी जागा मिळत आहेत.
विरोधी पक्षांची मते एकवटल्याने सत्ताधारी पक्षाचा पराभव झाल्याची भूतकाळात अनेक उदाहरणे आहेत. १९६७-६८ मध्ये लोहियांनी बडी आघाडी स्थापन करून त्यात समाजवादी, जनसंघ, लोकदल इ. पक्षांनी युती करून निवडणुक लढविल्यावर त्यांना ८ राज्यात सत्ता मिळाली होती. नंतर वर्षभरात त्यांच्यात फाटाफूट झाल्यावर १९७१ मध्ये काँग्रेसला लोकसभेत ३५३ जागा मिळाल्या होत्या. १९७७ ला ५ विरोधी पक्ष एकत्र येऊन जनता पक्ष स्थापन केल्यावर सत्ताधारी पक्षाचा पराभव झाला होता. याचीच पुनरावृत्ती १९८९ मध्ये झाली होती. नंतर आघाड्यांचे राजकारण सुरू होऊन ज्या आघाडीत सर्वाधिक व प्रबळ पक्ष ती आघाडी जिंकण्याची परंपरा १९९८ पासून सुरू झाली ती आजतगायत.
तस्मात भाजपच्या पराभवामागे मोहन भागवत, दादरी, पुरस्कार वापसी, महागाई, वाचाळवीर, नितीशकुमारांचे विकास मॉडेल इ. कारणे नसून विरोधी मते एकवटल्यामुळेच भाजपला खूप कमी जागा मिळत आहेत.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Sun, 11/08/2015 - 09:56
नवीन
भाजपा हारला नाहीये ! फक्त जागा कमी निवडून आल्यात .
- Log in or register to post comments
य
याॅर्कर
Sun, 11/08/2015 - 10:29
नवीन
.
- Log in or register to post comments
ज
जातवेद
Sun, 11/08/2015 - 10:56
नवीन
=)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sun, 11/08/2015 - 11:28
नवीन
"तो पडला" हे "हिज़ व्हर्टिकॅलिटी टर्न्ड इण्टु हिज़ होरिझाँटलिटी" अशा भाषेत सांगणार्या इंग्रजी वाक्याची, झालेच तर
औरंगजेब लंगडू लागला हे "खाविंदांच्या पूज्य पूर्वजांप्रमाणे (तैमूरलंग) होण्याचे भाग्य खाविंदांना लाभले" असे लिहिणार्या मुघल बखरकारांची आठवण झाली. =)) =))
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 11/09/2015 - 17:10
नवीन
फार चुकीचा अर्थ काढता राव तुम्ही. 'इतरांना जास्त जागा मिळाल्यात...' बाकी काही नाही.
- Log in or register to post comments
उ
उदय८२
Sun, 11/08/2015 - 11:52
नवीन
याला म्हणतात निर्लज्जपणाचा कळस. तोंड फुटले तरी माझ्या तोंडात दातच नव्हते म्हणत हसायचे.
धर्मांध प्रवृत्तींना बिहारमधे गाडले हेच सर्वकालिन सत्य आहे.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Sun, 11/08/2015 - 13:46
नवीन
अरे तुम्ही पण आलात? स्वागत आहे.
- Log in or register to post comments
स
संपत
Sun, 11/08/2015 - 12:14
नवीन
एकूण काय तर भाजप योग्य मार्गावर आहे आणि त्यात बदल करण्याची काही एक गरज नाही.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Sun, 11/08/2015 - 14:05
नवीन
याइतका हास्यास्पद प्रतिसाद बघितला नव्हता.
भाजपाला एकुण सर्व जागांची मते मिळून ३१% मते मिळाली आहेत. इतर पक्षांनी मुळात तेवढ्या जागाच लढवल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या मतांची आणि भाजपाला मिळालेल्या मतांशी थेट तुलनाच शक्य /,ही.
(अधिकस्पष्ट करण्यासाठी काल्पनिक आकडे घेतो. विदा आता हाताशी नाही. म्हणजे भाजपाला ५० मतदारसंघात १०० पैकी २६ मतदारांनी मतदान केले आहे. राजद व जदयुने केवळ प्रत्येकी २५ मतदारसंघच लढवले असले तर त्यांना मिळालेली मते भाजपापेक्षा कमीच असणार.)
तेव्हा भाजपा आघाडी विरूद्ध महाआघाडी अशीच टक्केवारी बघावी लागेल. नी त्यात लालुअत्तसतो तसा भाजपाचा 'सुपडा साफ'आहे.
बाकी, भाजपेयंंनी वाळूतच तोंड खुपसायचं ठरवलं असेल तर नाईलाज आहे! कमॉन, बी अ स्पोर्ट!
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Sun, 11/08/2015 - 14:30
नवीन
तुमचा काहीतरी घोळ झालेला दिसतोय. जे मी उत्तरप्रदेश/दिल्लीत पाहिले तेच इथे पण पाहतोय - दुरंगी लढतीत भाजपा विरोधकांची सारी मते एकवटात. किंबहुना कोणत्याही ठिकाणी एक प्रबळ पक्ष विरुद्ध इतर सगळे असा मामला असतो तेव्हा तो कितीही प्रबळ असला तरी त्याने हरणे क्रमप्राप्तच असते. बिहारमध्ये देखील हेच झाले. पूर्वी लालू विरूद्ध सगळे असा सामना असायचा, आता भाजपा विरुद्ध सगळे असा सामना होतोय.
परंतु याव्यतिरिक्त, अजून एक गोष्ट मला दिसत आहे ती अशी - भाजपा हळूहळू काँग्रेसची जागा घेताना दिसतोय, बिहारच्या निकालांनी देखील हेच अधोरेखित केले.
आता याबद्दल -
इतर पक्षांनी जरी तेव्हढ्या जागा लढवल्या नसल्या तरी त्यांनी आपली मते आपल्या सहयोगी पार्टीच्या पारड्यात टाकेली होतीच की.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Sun, 11/08/2015 - 14:45
नवीन
अर्थातसमहहमत आहे. मात्र यात नवे अथवा धक्कादायक काही नाही.
किंबहुना लोकसभा निवडणुकीच्या आधीच नेमका हाच आक्षेप मी मोदींबद्दल व्यक्त केला होता. ते आले की भाजपाचे व्यक्तीकेंद्रीत काँग्रेस होणार
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 11/08/2015 - 15:18
नवीन
निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरून खालील आकडे घेतलेले आहेत (Last Updated at 19:22 On 08/11/2015).
भाजप २४.५% + लोजप ४.८% + हम २.२% + बीएलएसपी २.६% = एकूण ३४.१%
राजद १८.४% + संजद १६.७% + काँग्रेस ६.७% = एकूण ४१.८%
एकूण फरक - ७.७%
मे २०१४ मध्ये वरील दोन आघाड्यातील एकूण मतांचा फरक ७.३% इतका होता. दीड वर्षानंतर दोन्ही आघाड्यातील मतांचा फरक जवळपास तेवढाच राहिला आहे.
त्यामुळे संजद+ आघाडीने भाजप+ आघाडीची मते खेचून घेतली, दादरी/मोहन भागवत/महागाई इ. मुद्द्यांमुळे भाजपने मते गमाविली व ती मते संजद+ कडे गेली यात तथ्य नाही हे वरील आकडेवारीवरून दिसून येते.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sun, 11/08/2015 - 15:55
नवीन
आकडेवारी वगैरे सर्व ठिक आहे.पण तुम्ही एक महत्वाचा मुद्दा विसरत आहात का? नितीशकुमारांनी २००५ आणि २०१० मध्ये सत्ता लालूंच्या जंगलराजविरूध्द रान उठवून मिळवली होती. इतकेच नव्हे तर अगदी अलीकडल्या काळापर्यंत लालू आणि नितीश यांच्यातून विस्तवही जात नव्हता.मी हलाहल प्यायला तयार होईन, चंदनाच्या झाडाला सापाने विळखा घातला तरी झाडात विष पसरत नाही वगैरे वक्तव्ये नितीशकुमारांनी कोणाला उद्देशून दिली होती हे उघड होते.अगदी २०१४ मध्येही लालूंनी नितीशकुमारांवर टिका केलीच होती. तेव्हा लालू आणि नितीश यांचे मतदार परस्परविरोधी होते. उद्या आदित्यनाथ किंवा साक्षी महाराज आणि ओवेसी यांच्यात युती झाली आणि तरीही दोघांना स्वतंत्रपणे मिळत असलेल्या मतांइतकीच मते या युतीने मिळवली तर त्या मतदारांच्या अपरिपक्वपणाबरोबरच या युतीपासून मते खेचून आणण्यात विरोधकांचे अपयश नाही का?
माझी अशी अपेक्षा होती की नितीशकुमार परत मुख्यमंत्री व्हावेत असे वाटणारे पण लालू अजिबात न आवडणारे मतदार भाजप आपल्याकडे खेचून आणू शकेल.आणि तसे होण्यासाठी परिस्थिती अनुकूलही होती.तरीही तसे करण्यात भाजपला यश का आले नाही? हे भाजपचे अपयश नाही का?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 11/09/2015 - 16:38
नवीन
भाजप त्याबाबतीत अपयशी ठरला त्याचे मुख्य कारण म्हणजे लालूने निवडणुकीआधीच नितीशकुमारांना भावी मुख्यमंत्री म्हणून दिलेली जाहीर मान्यता. निवडणुकीपूर्वीच लालूने जाहीररित्या सांगितले की मतमोजणीनंतर नितीशकुमारच मुख्यमंत्री होणार. जरी राजदला जास्त जागा मिळाल्या तरी राजद मुख्यमंत्रीपदावर दावा न करता नितीशकुमारांनाच मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देणार.
कोणत्याही परिस्थितीत नितीशकुमारच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्याने संजदचे मतदार निश्चिंत झाले व त्यामुळे लालू आवडत नसणार्या संजदच्या मतदारांनी सुद्धा राजद उमेदवारांना मते दिली. सर्वाधिक जागा मिळविणार्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे जर ठरले असते, तर दोन्ही पक्षांनी एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे प्रयत्न केले असते. परंतु मुख्यमंत्री कोण हे सर्वांनी आधीच मान्य केल्याने पाडापाडी टळली.
असे जरी असले तरी लालूसारखा अत्यंत महत्त्वाकांक्षी व कारस्थानी माणूस अजिबात गप्प राहणार नाही. आपण सर्वाधिक मोठा पक्ष आहोत हे सिद्ध झाल्याने तो फोडाफोडी करून बहुमत जमविण्याचा प्रयत्न भविष्यात नक्की करणार. सध्या लालू + कॉंग्रेस यांचे एकूण १०७ आमदार आहेत. बहुमतासाठी त्यांना फक्त १५ आमदारांची गरज आहे. भाजप व संजद वगळता उर्वरीत आमदारांची संख्या १२ आहे. म्हणजे लालूला उर्वरीत आमदार आपल्या बाजूला वळविल्यावर फक्त ३ आमदारांची गरज भासेल. सध्याच्या पक्षांतरबंदी कायद्यामुळे भाजप फोडायला किमान ३६ आमदार फोडावे लागतील व संजद फोडायला किमान ४८ आमदार फोडावे लागतील. परंतु पक्षांतरबंदी कायद्याला टांग मारण्यासाठी लालूच्या पक्षाकडे सभापतीपद असले तरी पुरेसे आहे. आमदारांची फूट (आमदारांची संख्या कितीही असली तरी) ही कायदेशीर आहे का नाही हा निर्णय सभापतीचा असतो व सभापती आपल्या पक्षाबाबतीत नेहमीच पक्षपातीपणा करून कमी आमदारांची फूट सुद्धा कायदेशीर ठरवितो हा इतिहास आहे (उदा. १९९७ मध्ये उ.प्र. मध्ये सप, बसप आणि काँग्रेस मध्ये पडलेली फूट कमी आमदार असूनसुद्धा भाजपचे सभापती केदारनाथ त्रिपाठी यांनी आपल्या अधिकारात कायदेशीर ठरवून कल्याणसिंग सरकारला जीवदान देऊन ५ वर्षे निर्वेध कारभार करून दिला होता.). त्यामुळे सभापतीपदासाठी लालू आग्रह धरणार हे नक्की. तसेच आपल्या दोन मुलांना मंत्रीपदी बसवून पर्यायी नेतेपदाची सोय करून ठेवणार. नितीशकुमार नक्कीच हे ओळखून असणार व ते सभापतीपद लालूकडे न जाण्यासाठी प्रयत्न करणार. कदाचित तडजोड म्हणून काँग्रेसचा सभापती असेल. परंतु जर लालूच्या पक्षाचा सभापती झाला तर मात्र नितीशकुमारांसाठी अवघड परिस्थिती निर्माण होणार आहे.
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Sun, 11/08/2015 - 14:21
नवीन
भाजप महाराष्ट्रातही युती करूनच निवडून आले. NDA चे १३ राज्यामध्ये सरकार आहे त्यात माझ्यामते पाचच राज्यात भाजप कोणाशी युती न करता निवडून आला आहे.(चूक असेल तर दुरुस्ती सांगावी)
मग इथे पण असेच म्हणावे का कि भाजप एकट्याने निवडून येउच शकत नाही?
युतीचे राजकारण हे आता सामान्यपणे सगळीकडेच झाले आहे बिहार मध्येही काही अपवाद नव्हता. मग जर भाजपला हे आधीपासूनच माहित होते तर कि विरोधक एकवटले आहेत तर मग निवडणुका लढवायच्या कशाला ना?
मतदारांनी भाजपला नाकारले आहे हि वस्तुस्थिती आहे ती मान्य करून उपाय शोधायचे कि, आमच काहीच चुकल नाही असे म्हणून खापर जनतेच्याच माथी फोडायचे हे त्यांनीच ठरवावे...
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 11/08/2015 - 15:23
नवीन
भाजप अनेक राज्यात सध्या व यापूर्वी सुद्धा स्वबळावर निवडून आलेला आहे. काही राज्यात भाजपचे बळ कमी असल्याने भाजप काही पक्षांशी युती करतो. मी वरील एका प्रतिसादात आकडेवारी दिली आहे. जितक्या मतदारांनी मे २०१४ मध्ये भाजप+ आघाडीला मते दिली होती, जवळपास तितक्याच मतदारांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये भाजप+ आघाडीला पुन्हा एकदा मते दिली आहेत. परंतु यावेळी राजद्+काँग्रेस या आघाडीत संजद सामील होऊन त्यात त्यांनी आपल्या १६-१७% मतांची भर घातल्याने इतका एकतर्फी निकाल लागलेला आहे.
- Log in or register to post comments
ध
धनावडे
Tue, 11/10/2015 - 09:59
नवीन
ओ गुर्जी हारलो तर हरलो म्हणा कि कशाला एवढी लांबड
तुम्हाला क्रिकेट आवडत ना मॅच १ run ने हारली काय आणि १०० runs ने हारली काय पराभव हा पराभव आहे मान्य करा आणि लागा कामाला
भाजप जिंकायला हव अस वाटणारा
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 11/10/2015 - 15:48
नवीन
भाजप हरलेला आहेच ना. ते कोण नाकारतंय. परंतु मोहन भागवतांचे विधान, भाजप नेत्यांचा तथाकथित उर्मटपणा, दादरी, तथाकथित असहिष्णुता इ. मुळे भाजप हरला ही कारणे खरी नसल्याने प्रतिसाद दिला.
- Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे
Tue, 11/10/2015 - 16:49
नवीन
काल एबीपी माझावर भाजपचा अतुल भातखळकर आला होता,इतका उर्मट बोलत होता ,शेवटी ॲँकरने त्याला चूप केला ,हुसैन दलवाई,समीर खडस सर्वांनाच उर्मट उत्तरे देत होता.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 11/10/2015 - 16:57
नवीन
हुसेन दलवाई, समर खडस अशांसारख्या निष्पक्षपाती, मुद्देसूद बोलणार्या व नम्र व्यक्तींना उर्मटपणे बोलणे हे चूकच आहे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sun, 11/08/2015 - 09:57
नवीन
आजच्या निकालात आतापर्यंत आलेल्या टक्केवारीनुसार भाजप+ आघाडीला जवळपास तेवढीच म्हणजे ३५% मते मिळाल्याचे दिसत आहे तर राजद, संजद व काँग्रेस एकत्रित असलेल्या आघाडीला एकमेकांची मते मिळून ४२-४३% मते मिळाल्याचे दिसत आहे. लोकसभेला वेगवेगळे लढणारे हे तीन पक्ष एकत्र आल्याने विरोधी मतांची एकजूट होऊन ३५% वि. ४२% या सरळ लढतीत ४२% ला ७०% जागा मिळताना दिसत आहेत.
मतांची अधिकृत टक्केवारी अजून कळलेली नाही. तरीही हे आकडे खरे आहेत हे गृहित धरले तरी काही मुद्दे आहेत:
१. नितीश आणि लालूंची आघाडी परस्परविरोधी मतदारांची होती. मुळात नितीशकुमार जनता दलातून बाहेर पडले त्यामागे १९९४ मध्ये त्यांनी आयोजित केलेली कुर्मी रॅली आणि लालूंच्या राज्यात सगळा फायदा यादवांचा होत होता आणि कुर्मी-कोयरींना काहीच मिळत नव्हते हे कारण होते. गेल्या २० वर्षांमध्ये ही दरी अजून वाढली होती.या निवडणुकांमध्ये यादवांनी मते महागठबंधनला दिली हे समजू शकते. पण कुर्मी-कोयरी मतदारांनी मात्र आपल्या नेत्याने त्याच यादवांशी हातमिळवणी केली याचा बॅकलॅश मात्र दिसून कसा आला नाही?
२. जितनराम मांझींना बरोबर घेतल्यामुळे महादलित समाजातील मते भाजपकडे यायला हवी होती.ते होताना का दिसले नाही? मान्य आहे की मांझी हे पूर्वी मोठे नेते नव्हते.पण मुख्यमंत्रीपदावरून हटविले गेल्यानंतर मात्र आपल्याला हटविणे म्हणजे महादलित समाजाचा अपमान हे चित्र उभे करण्यात यशस्वी झालेच होते.त्यामुळे ती मते भाजप आघाडीला मिळायला हवी होती.ते का झाले नाही?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 11/08/2015 - 10:07
नवीन
(१) लालूने निवडणुकीआधीच नितीशकुमार मुख्यमंत्री होणार हे मान्य केले होते. त्यामुळे आपला मुख्यमंत्री होणार या भावनेने लालूबरोबर युती असूनसुद्धा आपली मते युतीच्याच पारड्यात टाकली.
(२) जीतनराम मांझी हे बिहारमधील फारसे प्रबळ पुढारी नाहीत. त्यांच्यामागे फारशी मते नाहीत. त्यांचे हे दुर्बलस्थान ओळखूनच नितीशकुमारांनी त्यांना आपल्या जागी बसविले होते. परंतु नंतर ते नख्या बाहेर काढायला लागल्यावर नितीशकुमारांनी त्यांना हाकलले. भाजपने त्यांच्या पक्षाला अंदाजे २० जागा दिल्या परंतु त्यातील निम्म्या जागांवर त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर उभे करायला भाजपनेच आपले उमेदवार दिले होते. त्यांच्या पक्षाचा मतांची टक्केवारी वाढायला भाजपला फारच किरकोळ फायदा झाला असावा कारण ते स्वतः महादलितातील एका जातीतील असले तरी त्यांच्यामागे फारशी मते नाहीत.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 11/08/2015 - 09:59
नवीन
एकंदरीत फक्त अॅक्सिसचा एक्झिट पोल (अॅक्सिस : भाजप+ ६४, संजद+ १७६) निकालांच्या अगदी जवळ आहे.
राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रवक्ते वाहिन्यांवर आनंद व्यक्त करीत होते. त्यांना नक्की कशाचा आनंद झालाय तेच समजत नाही कारण बिहारमध्ये दोघांनाही भोपळा मिळालेला आहे.
राजदला संजदपेक्षा जास्त जागा मिळाल्यामुळे नितीशकुमारांची झोप उडणार आहे. फक्त काँग्रेसला बरोबर घेऊनसुद्धा संजदचा आकडा ९० च्या पुढे जात नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत संजदला राजदची मदत लागणारच आहे. लालू आपल्या पाठिंब्याची व सर्वाधिक मोठा पक्ष असल्याची जबरदस्त किंमत वसूल करणार. आधीच्या विधानसभेत संजदकडे स्वबळावर बहुमत असल्याने नितीशकुमारांना मुक्तहस्त होता, आता मात्र त्यांची लालूबरोबर तीन पायांची शर्यत होणार आहे.
मोदी सत्तेवर आल्याने हिंदुत्ववादी संघटनांना जोर चढला आहे असे बोलले जाते. त्याच न्यायाने आता लालू सत्तेत आल्याने बिहारमधील गुन्हेगार, अपहरणकर्ते, भ्रष्टाचारी यांना जोर चढणार हे नक्की. बहुमत नसल्याने व मुख्यमंत्रीपद पूर्णपणे लालूवर अवलंबून असल्याने नितीशकुमारांना ही कृत्ये निव्वळ हताश होऊन सहन करावी लागणार.
राजदसारख्या पूर्ण गाळात गेलेल्या पक्षाला नवसंजीवनी देण्याची व लालूसारख्या क्षीण झालेल्या भस्मासुराला पुन्हा एकदा सामर्थ्यवान बनविण्याच्या चुकीची पूर्ण किंमत नितीशकुमारांना द्यावी लागणार आहे.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Sun, 11/08/2015 - 10:08
नवीन
भविष्यात नितीश पुन्हा रालोआ मध्ये आले तरी देखील मला आश्चर्य वाटणार नाही, एव्हढा दणका नितीशना या निवडणूकीने दिला आहे.
- Log in or register to post comments
य
याॅर्कर
Sun, 11/08/2015 - 10:42
नवीन
→→खी खी खी खी...
.
.
.
जय पराजय तर होणारच,दुखी होऊ नका
- Log in or register to post comments
उ
उदय८२
Sun, 11/08/2015 - 11:58
नवीन
सगळे शिवसेना -- आणि भाजपा यांच्या युतीसारखेच असतात असे दिवास्वप्न पाहणे बंद कर रे.
महाराष्ट्रात तर हे एकमेकांची इतकी लायकी काढतात कि विरोधीपक्षांची गरजच भासत नाही. तुम्ही आधी महाराष्ट्राकडे लक्ष द्या मग बिहारकडे बघा तिथे नितिश समर्थ आहे. जो भाजपासारख्या ध्रर्माचे राजकारण करंणार्यांना देखील टाचेखाली चेचून ठेवतो तो लालू सारख्याला देखील सांभाळेल.
- Log in or register to post comments
स
संपत
Sun, 11/08/2015 - 12:21
नवीन
तुम्ही आणि गैरी ह्यांनी नितीशनी लालुशी युती करायला नको होती असे वारंवार म्हटले आहे. त्यातल्या काही मुद्द्यात तथ्य असले तरी आता नितीशकडे दुसरा राजकीय पर्याय काय होता ह्याबद्दल विवेचन आवडेल.
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Sun, 11/08/2015 - 13:02
नवीन
यांच्या फालतू अॅनॅलिसिसला आता विचरतोयं कोण?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 11/08/2015 - 13:19
नवीन
नितीशकुमारांकडे दुसरा पर्याय 'संजद + काँग्रेस + राष्ट्रवादी + सपा + डावे पक्ष' असा असू शकला असता. संजदने स्वतःकडे सर्वाधिक म्हणजे किमान १६०-१७० जागा ठेवून इतरांना उर्वरीत जागा दिल्या असत्या तर कदाचित या पर्यायाला १८० इतके मोठे नसले तरी किमान साधे बहुमत मिळून त्यात संजदचा सिंहाचा वाटा राहिला असता. अर्थात या जर-तर ला आता शून्य महत्त्व आहे. आता लालूबरोबर संसार करताना बिहारमध्ये विकास करताकरता लालूच्या पक्षाला वेसण घालण्याची दुहेरी कसरत नितीशकुमारांना करावी लागणार आहे. या सरकारचे स्थैर्य संपूर्णपणे लालूवरच अवलंबून असल्याने ही कसरत खूपच अवघड असणार आहे. १९९९ मध्ये लालूच्या मिसा या मुलीच्या लग्नाच्या वेळी राजद कार्यकर्त्यांनी टाटा मोटर्स व अनेक फर्निचर च्या शोरूम्स फोडून आतील महागड्या गाड्या व फर्निचर लग्नासाठी पळविले होते. माध्यमातून त्यावर खूप आरडाओरडा झाल्यावर लग्नानंतर काही दिवसांनी फर्निचर व गाड्या गुपचुप फुटपाथवर सोडून देण्यात आल्या. या गुन्ह्याची कोठेही नोंद केली गेली नाही. आता पुन्हा असाच प्रकार झाला तर नितीशकुमारांना गप्प बसून रहावे लागेल.
- Log in or register to post comments
स
संपत
Sun, 11/08/2015 - 17:37
नवीन
बरोबर, पण राजद हा आता बिहारमधील पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे हे बघता वरील समीकरण यशस्वी झाले असते असे वाटत नाही. कदाचित चाणाक्ष नितीशकुमारांनी राजदचा वाढलेला पाठींबा ओळखूनच कॉंग्रेसच्या गठबंधनसंबंधी प्रयत्नाला साथ द्यायचे ठरवले असावे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sun, 11/08/2015 - 10:11
नवीन
या क्षणी महागठबंधनला १७१ जागांवर आघाडी आहे. राजद ७८,संजद ७० तर काँग्रेस २३ जागांवर आघाडीवर आहे. म्हणजे काँग्रेसला बिहारमध्ये सुगीचे दिवस आले म्हणायचे तर. भाजप आघाडीला या क्षणी ६५ जागांवर आघाडी आहे. भाजप ५७, लोजप ३, रालोसपला ३ आणि जितनराम मांझींच्या हामला २ जागा आहेत. रामविलास पासवानांच्या लोजपला २०१० मध्ये लालूंबरोबर ४ जागा मिळाल्या होत्या.यावेळी मात्र तीनच जागा मिळताना दिसत आहेत. एकूणच सगळे ठोकताळे उलटेपालटे झालेले दिसत आहेत.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 11/08/2015 - 10:13
नवीन
संजदचे अजून एक वैशिष्ट्य पुन्हा एकदा सिद्ध झाले. हा पक्ष एकट्याच्या बळावर काहीही करू शकत नाही हे या पक्षाच्या जन्मापासून दिसून आले आहे.
या पक्षाचा आधीचा अवतार म्हणजे समता पक्ष. हा पक्ष जोपर्यंत एकटा लढत होता तोपर्यंत त्याला अजिबात यश मिळाले नव्हते. भाजपबरोबर युती केल्यावर त्यांचा प्रचंड फायदा झाला. २०१४ मध्ये एकट्याने लढल्यावर फक्त २ जागा मिळाल्या. तर आता काँग्रेस व राजदबरोबर युती केल्याचा फायदा झाला. म्हणजे या पक्षाला कायम कोणतातरी दुसरा पक्ष बरोबर लागतो.
- Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे
Sun, 11/08/2015 - 10:13
नवीन
राजदसारख्या पूर्ण गाळात गेलेल्या पक्षाला नवसंजीवनी
देण्याची व लालूसारख्या क्षीण झालेल्या भस्मासुराला
पुन्हा एकदा सामर्थ्यवान बनविण्याच्या चुकीची पूर्ण किंमत
नितीशकुमारांना द्यावी लागणार आहे.>>>>>>>>>>>लालू भस्मासूर असता तर बिहारच्या जनतेने त्याला निवडून दिले असते का? याचा अर्थ श्रीगुरुजी बिहरच्या जनतेला मुर्ख समजत आहेत....
जंगलराज आले तरी चालेल पण मोदी नको ,असे जनतेला जेव्हा वाटते तेव्हा मोदींची नीती जंगलराजपेक्षा वाईट आहे असाच त्याचा अर्थ होतो.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Sun, 11/08/2015 - 10:18
नवीन
असे काहीही नाही. हा सरळसरळ नंबर गेम आहे. आणि यामध्ये पूर्वी कोंग्रेसला असलेले स्थान मिळवायला भाजपाला अजून बरेच कष्ट घ्यावे लागणार आहेत. बाकी लालू नितीशचे पुढे काय हे बघणे अधिक रोचक ठरेल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 11/08/2015 - 13:00
नवीन
बरोबर. दुरंगी लढतीत एका बाजूला एकमेकांच्या मतांची बेरीज होऊन दुसर्या बाजूपेक्षा ८-९% मते जास्त मिळाल्याने हा निकाल लागलेला आहे.
सध्या अशी परिस्थिती आहे.
राजद - ८०, संजद - ७३, काँग्रेस - २६, भाजप - ५२
बहुमताचा १२२ हा आकडा गाठण्यासाठी राजद्,संजद व भाजप या ३ पक्षांपैकी कोणत्या तरी २ पक्षांना एकत्र यावे लागणार. काँग्रेस व इतर कोणत्याही पक्षाची बहुमतासाठी गरज नाही. सध्या राजद व संजद एकत्र आहेत. बहुमतासाठी संजदला संपूर्णपणे राजदवरच अवलंबून रहावे लागणार आहे व त्यामुळे संजदची बाजू लंगडी झालेली आहे. मावळत्या विधानसभेत संजदकडे स्वतःचे १२८ आमदार असल्याने त्यांना बहुमतासाठी कोणाचीही गरज नव्हती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. संजदला मागे सारून राजद प्रथम क्रमांकाचा सर्वाधिक मोठा पक्ष बनलेला आहे.
काही वेळापूर्वी लालू व नितीशकुमारांची संयुक्त पत्रकार परीषद सुरू होती. नितीशकुमार फारसे उत्साही वाटत नव्हते. लालूबरोबर पुढील ५ वर्षे संसार करायला लागणार आहे याची काळजी वाटत असावी. संजदचे भाजपबरोबर सुरळीत सुरू होते, परंतु नितीशकुमारांनी मोदींवर खार खाऊन युती तोडली. लालूबरोबरचे हे लग्न ५ वर्षे टिकेल असे वाटत नाही.
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Sun, 11/08/2015 - 13:06
नवीन
नितीशकुमार फारसे उत्साही वाटत नव्हते. लालूबरोबर पुढील ५ वर्षे संसार करायला लागणार आहे याची काळजी वाटत असावी.
काय इमले बांधतायंत मनातल्या मनात. इथे लिहायला स्वतःचा उत्साह कसा टिकवायचा हे बघा आता !
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Sun, 11/08/2015 - 13:48
नवीन
याक्षणी मला तरी तसे वाटत नाही.. हे ५ वर्षे संसार करणाअर.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Sun, 11/08/2015 - 10:23
नवीन
दिल्ली , बिहार मधली जनता मूर्ख आहे.
हळूहळू मूर्खांची संख्या वाढत चालली आहे.
- Log in or register to post comments
ज
जातवेद
Sun, 11/08/2015 - 11:07
नवीन
मुनीवर, जनता कधिच मुर्ख नसते. जनतेला स्वतःचे मत मांडण्याचे निवडणूक हे प्रभावी माध्यम आहे व प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळे देण्याची कामगिरी जनता चोख पार पाडत असते. भाजपा कुठेतरी कमी पडले हेच खरे; आधि दिल्ली आणि आता बिहार.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Sun, 11/08/2015 - 12:25
नवीन
तो प्रतिसाद उपहासात्मक आहे
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 11/08/2015 - 13:07
नवीन
लालू भस्मासुर नसता तर २००५ पासून लागोपाठ ४ निवडणुकात बिहारी जनतेने त्याला का घरी पाठविले असते? मोदींची नक्की कोणती नीति जंगलराजपेक्षाही वाईट आहे? भाजपला दीड वर्षांपूर्वी जेवढी मते मिळाली होती ती मते भाजपने टिकविली आहेत. दीड वर्षांपूर्वी जितक्या मतदारांना मोदी हवे होते, तितक्या मतदारांना दिड वर्षानंतर सुद्धा मोदी हवे आहेत. इतर पक्षांनी देखील आपापली मते टिकविली आहेत. परंतु निकाल एकतर्फी लागला याचे एकमेव कारण म्हणजे भाजपविरोधात विरोधी मते एकवटली गेली.
- Log in or register to post comments
य
याॅर्कर
Sun, 11/08/2015 - 13:16
नवीन
हेच भाजपला पण लागू होते.
2005-2014 = केंद्रात
2000-2015 = महाराष्ट्रात
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 11/08/2015 - 13:32
नवीन
फरक आहे. लालूचा पक्ष १९९० पासून ३ वेळा स्वबळावर निवडून आला होता. १९९५ नंतर भाजप व संजद युती असूनसुद्धा राजदने स्वबळावर सरकार स्थापन केले होते. १९९६ पासून २०१३ पर्यंत संजद व भाजप एकत्रित राजदशी लढले परंतु २००५ पर्यंत जनतेने राजदलाच कौल दिला होता. परंतु लालूच्या १५ वर्षांच्या कारकीर्दीत बिहारमध्ये अराजकाची परिस्थिती येत गेल्याने अखेर बिहारी जनतेने लालूला लागोपाठ ४ निवडणुकात घरी बसविले.
२००४ व २००९ मध्ये लोकसभेत भाजपचा पराभव होण्यामागे भाजप हा भस्मासुर असण्याची थिअरी नसून काँग्रेसने योजनाबद्ध पद्धतीने अनेक पक्षांशी आघाडी करून भाजपविरोधातील मतविभाजन टाळले हे मुख्य कारण होते. भाजपविरोधातील मते एकवटल्याने भाजपचा पराभव झाला होता.
महाराष्ट्रात अशीच परिस्थिती होती. १९९९ व २००४ च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभा भाजप-सेना युतीला जास्त जागा होत्या, परंतु विधानसभेला कमी जागा मिळाल्या कारण आपल्यापेक्षा दुसर्याला कमी जागा मिळाव्यात (व जेणेकरून आपल्या पक्षाला मुक्यमंत्रीपद मिळावे) यासाठी दोघांनीही काही ठिकाणी एकमेकांचे उमेदवार पाडले. २००९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीचा पराभव होण्याचे एकमेव कारण म्हणजे मनसे. भाजप-सेना युती भस्मासुर असल्याने जनतेने त्यांचा पराभव केला हे त्यामागे कारण नसून मनसेने अनेक जागांवर (लोकसभेत किमान ८ जागांवर व विधानसभेत किमान ३८ जागांवर) भाजप-सेना युतीचा पराभव घडवून आणला हे ते कारण होते.
- Log in or register to post comments
उ
उदय८२
Sun, 11/08/2015 - 13:37
नवीन
मिपावरचा
संबित पात्रा
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »