बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: निकाल
बिहार विधानसभा निवडणुक-२०१५ ची मतमोजणी उद्या रविवार ८ नोव्हेंबर २०१५ रोजी होणार आहे.निवडणुकांचे निकाल आणि त्या अनुषंगाने चर्चा या धाग्यावर करावी ही विनंती. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. सव्वाआठपर्यंत पहिले कल हाती येतील अशी अपेक्षा आहे.
गॅरी ट्रुमन
Book traversal links for बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: निकाल
💬 प्रतिसाद
(240)
श
श्रीगुरुजी
Tue, 11/10/2015 - 16:29
नवीन
आज एका वाहिनीवर बिहारमधील एका पत्रकाराचे उत्तर ऐकत होतो. मोहन भागवतांच्या विधानामुळे बिहारमधील मतदारांवर किती परीणाम झाला असे त्याला विचारले होते. त्याच्या म्हणण्यानुसार तो बिहारमधील अनेक गावात गेला होता. तो ज्या ज्या मतदारांना भेटला त्यापैकी ९०% हून अधिक मतदारांना या विधानाची माहितीच नव्हती. मोहन भागवत कोण हेही बर्याच जणांना माहित नव्हते. त्याच्या सांगण्यानुसार आरक्षण हा आपला हक्क आहे व तो कोणीही हिरावू शकत नाही हे त्या सर्वांना माहित आहे. भागवतांच्या विधानाचा मतदारांवर अजिबात परीणाम झाला नव्हता हे त्याचे निरीक्षण होते. लालूने जरी प्रत्येक प्रचारसभेत हा मुद्दा आणला तरी एकंदरीत मतदारांमध्ये त्याबद्दल फारशी माहिती नव्हती. परंतु भाजप उगाचच घाबरून सारवासारवीच्या मोडमध्ये गेला असे त्याचे मत होते.
एकदा भाव वाढले की त्यामागची कोणतीही कारणमीमांसा जनतेला पटत नाही हे मान्य आहे. पाऊस कमी पडला, उत्पादन कमी झाले, आयात करूनसुद्धा भाव कमी होणार नाहीत कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव व भारतातील भाव यांच्यात फारसा फरक नाही इ. कारणे मतदार मान्य करणार नाहीत. भाववाढ आटोक्यात आणण्याची जबाबदारी केंद्राची की राज्याची याचा विचार केला जातच नाही. जसे अपघात झाल्यावर चूक ही फक्त मोठ्या गाडीचीच असते ही मानसिकता आहे, तसेच वाढलेल्या भावांना फक्त पंतप्रधान जबाबदार आहेत असेच समजले जाते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 11/10/2015 - 16:43
नवीन
हे नक्कीच लक्षात आले असणार. परंतु भाजपला बिहारमध्ये आपली मते वाढविण्यास अजून कोणता पर्याय शिल्लक होता? कुशवाह व पास्वान आधीपासूनच बरोबर होते. मांझीला बरोबर घेऊन काही महादलित मते मिळविण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, महाराष्ट्रात आठवलेकडे जेवढी मते आहेत तेवढी सुद्धा मांझीकडे नव्हती, त्यामुळे मांझीचा अत्यल्प फायदा झाला. याव्यतिरिक्त ज्याच्याकडे किमान ३-४% मते आहेत व जो भा़जपकडे येऊ शकेल असा इतर कोणताही पक्ष बिहारमध्ये नाही. त्यामुळे भाजपला आपली मते वाढविण्याची संधीच नव्हती. संजद आघाडीत लालू व नितीशकुमारांनी परिस्थिती ओळखून अत्यंत लवचिक भूमिका घेऊन मतविभाजन टाळले, त्याचाही भाजपला तोटा झाला. त्यात भर म्हणून दादरी, भागवत, पुरस्कार वापसी असे नसलेले प्रश्न निर्माण करून वातावरण प्रतिकूल केले गेले. सद्यपरिस्थितीत आता आहे त्यापेक्षा जास्त काही करणे व मते वाढविणे भाजपला शक्यच नव्हते असे माझे मत आहे. काँग्रेस, राजद व संजद यांची व्होटबँक भक्कम होती. त्याला खिंडार पाडणे शक्य नव्हते. गेल्या अनेक निवडणुकात त्यांनी आपली व्होटबँक शाबूत ठेवली आहे. भाजपने नक्की काय केले असते की ज्यामुळे महागठबंधनकडून किमान ४-५% मते आपल्याकडे खेचून आणता आली असती?
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Wed, 11/11/2015 - 21:37
नवीन
सहमत अजून एक महत्वाचा मुद्दा
लोकसभेत आप पार्टीने अनेक सेक्युलर मते दुभागली गेली, हजारे ह्यांच्या चेला केजू अनेकंना प्रेरणास्थान वाटत होता.
ह्यावेळी त्याने आपले उमेदवार उभे केले असते किंवा स्वराज पार्टी का आंदोलन जे काही आहे ते योगेंद्र ने आपले उमेदवार उतरले असते तर वेगेळे चित्र दिसले असते. भाजपने हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यापेक्ष्य अण्णा हजारे ह्यांची किंवा त्याच धर्तीवर अजून एक मोहरा उत्तर भारतीय राजकारणात उतरवला असता व भ्रष्टाचार व जंगलराज च्या विरोधात चळवळ उभारली असती तरी अनेक मते दुभागली गेल्या असती
अण्णा ह्यांची चळवळ त्यात केजू सारखे धूर्त चाणाक्ष लोक ह्यांना परदेशी मदत निधी व मार्गदर्शन मिळत होते ह्यात वाद नाही पण म्हणून भाजपने अश्या चळवळी भारतात का चालवू नये
जातीच्या राजकारणात अडकलेल्या बिहारी जनतेला त्यांच्या आयक्यू प्रमाणे हाताळावे , जंगलराज व भ्रष्टाचार चालेले पण त्यावर सेक्युलर झूल पांघरली पाहिजे असा संदेश बिहार ने उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीयांना दिला आहे
आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Mon, 11/09/2015 - 10:37
नवीन
.
- Log in or register to post comments
आ
आरोह
Mon, 11/09/2015 - 18:45
नवीन
आता कदाचित उत्तरप्रदेशात मुलायम आणि मायावती एकत्र लढतील.
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Mon, 11/09/2015 - 18:57
नवीन
मोदींनी २६ ते ३० सभा घेतल्या. प्रत्येक सभेस प्रचंड गर्दी होती आणि गर्दीत तरुण व उत्साही वाटणारी लोक पुढे होती. तरी सुद्धा त्याचा भाजपाच्या मत संख्येवर परिणाम झालेला दिसत नाही. हे कोड उलगडायला गॅरी व गुरुजी मदत करतील का ?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Tue, 11/10/2015 - 06:29
नवीन
मला वाटते की याचे कारण लोक मोदींची भाषणे ऐकायला आले होते पण तरीही त्यांनी मते ज्यांना द्यायची त्यालाच दिली. मोदींनी २०१४ मध्ये नवे मुद्दे (विकास, अच्छे दिन इत्यादी) प्रचारात आणले आणि ती २०१४ मध्ये नवलाई होती. पण शेवटी मते देताना डाळींचे भाव, टोमॅटोचे भाव लोकांनी लक्षात घेतले असे दिसते. कालच आंतरजालावर बघितले की थ्री इडियट्समधल्या "कहा गया उसे ढुंढो" या गाण्याच्या धर्तीवर एक गाणे व्हॉट्सअॅपवर बिहारमध्ये फिरत होते.त्यात मांडलेले मुद्दे सामान्य मतदारांना भावतील असे होते. मोदी परदेश दौर्यांवर जातात ते फिरायला जात नाहीत आणि त्या सगळ्या प्रयत्नांचे लॉन्ग टर्ममध्ये परिणाम चांगले होतील हे नक्कीच.पण शॉर्ट टर्ममध्ये मात्र "मोदी परदेश दौर्यांवर जातात आणि सामान्य शेतकरी वगैरे लोकांची त्यांना पर्वा नाही" अशा प्रकारचे चित्र उभे करण्यात विरोधक यशस्वी झाले आणि त्याला प्रभावी उत्तर भाजपकडे नव्हते.
भाषणांमध्ये मोदी भविष्याचे चित्र उभे करतात. ऐकायला ते छान वाटते. मोदींचे वक्तृत्वही वादातीत आहे. ते पण ऐकायला छान वाटते. तरीही चांगले भविष्य म्हणजे "पी हळद आणि हो गोरी" असे होणार नाही हे बहुसंख्य लोकांच्या आकलनापलीकडचे असते. आणि अच्छे दिन येतील हे आश्वासन देऊन लोकांना "पी हळद आणि हो गोरी" असे वाटायला लावण्यात मोदींचाही हातभार आहेच म्हणा.मग दोष लोकांना तरी का द्या?
१९९७ मध्ये पाकिस्तानमधील निवडणुकांमध्ये इमरान खानच्या सभांना प्रचंड गर्दी जमायची.तरीही ९ पैकी एकाही मतदारसंघातून इमरान खान विजयी होऊ शकला नव्हता. १९९८ मध्ये सोनिया गांधींच्याही सभांना अशीच गर्दी जमत असे. पण काँग्रेसचा पराभव व्हायचा तो झालाच.
- Log in or register to post comments
म
मोग्याम्बो
Tue, 11/10/2015 - 07:19
नवीन
म्हणजे मोदींचा "राज ठाकरे" झाला म्हणा की...
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Wed, 11/11/2015 - 21:44
नवीन
इंडिया व भारत ह्यांच्यातील दुही दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्याचा फटका मोदींना बसला
मोदींना अनिवासी भारतीयांचा पंतप्रधान किंवा शहरी व भांडवलधारी लोकांचा पंतप्रधान म्हणून जनमानसात विरोधकांनी रुजवले तेही एकेकाळच्या मोदींच्या चाणक्याच्या मदतीने
त्याला मोदींचे निवडणूक बेत योजना पुरेपूर माहिती होत्या.
आपले पंचतारांकित नगरीत स्वागत असो
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Tue, 11/10/2015 - 08:21
नवीन
मोदींची कारकिर्द !
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 11/10/2015 - 13:57
नवीन
ठाकूर साहेब
मते कितीही पटत नसली किंवा आत्यंतिक द्वेष असला तरीहि मोदी साहेबाना भारतीय जनतेने बहुमताने निवडून दिले आहे.
पंतप्रधान हे घटनात्मक पद आहे त्या पदाचा मान म्हणून तरी सार्वजनिक न्यासावर फेकू किंवा अशी विशेषणे वापरणे टाळा अशी आपल्याला विनंती आहे.न्यायालयात सुद्धा विरुद्ध वकिलाची खिल्ली उडवण्यासाठी आमचे विद्वान सहयोगी(LEARNED FRIEND) असेच संबोधित केले जाते.
बाकी आपली मर्जी.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 11/10/2015 - 14:22
नवीन
डॉक्टरसाहेब, आपले मत अतिशय योग्य आहे.
पण समस्या अशी आहे की खुद्द माननीय मोदीजी पंतप्रधानपदाची योग्य प्रतिष्ठा न सांभाळता ज्याला जे विशेषण देता येईल ते देत सार्वजनिक व्यासपिठांवर विरोधकांची खिल्ली उडवत असतात. त्याचे काय करावे ब्रे?
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Tue, 11/10/2015 - 21:37
नवीन
सध्या सोयीस्कर आहे म्हणून मोदींवर हिरीरीने तोंडसुख घेणाऱ्या सर्वांनी त्यांना स्क्याम फेम सोनिआ आणि लालू यांनी परत दिल्लीत सत्तेवर यावे असे वाटते आहे का याचाही विचार केला पाहिजे.
- Log in or register to post comments
आ
आरोह
Tue, 11/10/2015 - 14:47
नवीन
उदाहरणार्थ?
- Log in or register to post comments
आ
आरोह
Tue, 11/10/2015 - 14:53
नवीन
उदाहरणार्थ??
- Log in or register to post comments
म
माणुस१
Wed, 11/11/2015 - 06:37
नवीन
हा फक्त आणि फक्त निव्वळ "मोदीच्या अहंकाराचा पराभव आहे भाजपाला आलेल्या माजाचा पराभव आहे देशात दिवसेंदिवस वाढवणार्या देशविघातक धर्मांध प्रवृत्तींचा पराभव आहे." + ११११
- Log in or register to post comments
म
माणुस१
Wed, 11/11/2015 - 08:28
नवीन
सध्या सोयीस्कर आहे म्हणून मोदींवर हिरीरीने तोंडसुख घेणाऱ्या सर्वांनी त्यांना स्क्याम फेम सोनिआ आणि लालू यांनी परत दिल्लीत सत्तेवर यावे असे वाटते आहे का याचाही विचार केला पाहिजे. >>>>>>>> मोदींवर हिरीरीने तोंडसुख घेणारे सर्वांना सोनिया आणी लालु यांनी सत्तेवर यावे असे वाटते हे ज्यांना वाटते त्यांच्या या वाटण्याबद्दलच प्रश्न आहे. जे लोक सोनिया आणी राहुलवर तोंडसुख घेत होते ते मोदिवरहि घेत असतील असे नसु शकते असे ज्यांना वाटते त्यांनाच अंधभक्त म्हणतात.
- Log in or register to post comments
च
चैतन्य ईन्या
Wed, 11/11/2015 - 10:26
नवीन
http://jagatapahara.blogspot.co.uk/2015/11/blog-post_52.html
खरे आहे. उगाचच बाकीच्या पक्षातले दाणगट लोक घेवून किती काल निवडणूक जिंकणार? एकदा कलमाडीला असाच पाठींबा देवून पुण्यात जोरदार पडले होते पण तोच कित्ता सगळीकडे चालत नाही हे अजूनही कळलेले दिसत नाही. उगाचच टक्केवारीचे नाटक करण्यात काहीही हशील नाही. त्याने काही होणार नाही. पण तितका विचार करण्याची इच्छाच ना भाजप मध्ये आहे ना त्याच्या पाठीराख्यात. असो हे असेच पुन्हा उत्तर प्रदेश होणार आहे. कारण लोकल लीडरच नाहीये. आणि संघटना पण फारशी नाहीये. हे असेच पानिपत होणार असे दिसते. थोडक्यात पुन्हा १५-२० वर्ष हे सत्तेबाहेरच राहणार कारण सत्ता मिळाली कि माज चढतो आणि सत्ता का मिळाली ह्याचे आकलन होत नाही. खान्ग्रेसला कितीही शिव्या दिल्या तरी फार काही होणार नाही आता हे कळू देत.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Wed, 11/11/2015 - 21:49
नवीन
विधानसभेत बिहार व उत्तर प्रदेश मध्ये राज्यात सत्ता नसतांना लोकसभेत मोदींना यश मिळवले येत्या लोकसभेत
बिहारमध्ये परत महाघाडी होणार तेव्हा योगेद्र सारख्या लोकनेत्याला येत्या४ वर्षात चळवळीच्या माध्यमांतून बिहार मध्ये आपले उपद्रवमूल्य वाढवू दिले पाहिजे व लोकसभेत त्याने उमेदवार उभे केले तर महाघाडीची मते विभागू शकतात
आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 11/11/2015 - 10:55
नवीन
इथे एकंदरीत दोन मतप्रवाह दिसत आहेत.
बर्याच जणांचे असे मत आहे की दादरी, बीफ, भागवत, असहिष्णुता, माज इ. कारणांमुळे भाजपचा पराभव होऊन संजद आघाडीचा दणदणीत विजय झाला.
मी याच्याशी सहमत नाही कारण आकडेवारीतून हे सिद्ध होत नाही.
दुसरा मतप्रवाह असा आहे की भाजपला नवीन मते मिळविण्यास अपयश आले व त्यामुळे ते हरले.
माझा एक सरळ प्रश्न आहे. भाजपने नक्की काय करावयास हवे होते की ज्यामुळे त्यांना आता मिळविलेल्या ३४.१% मतांपेक्षा अजून जास्त मते मिळाली असती. कोणीतरी यावर समर्पक उत्तर द्यावे अशी विनंती आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 11/11/2015 - 11:13
नवीन
गेल्या दिड वर्षात नीट काम करायला पाहिजे होते. केलेले वादे पुरे करायला पाहिजे होते. बिहारमधे गाजलेले एक गाणे (जे एका मिपाकराने लिहिले आहे) त्यातल्या भावना लक्षात घेतल्या तर काय करायला पाहिजे होते ते आत्ममग्न भाजपाने एकवार मोकळ्यामनाने स्विकार करायला हवे होते.
...पण हे होणार नाही हेही माहित आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 11/11/2015 - 16:55
नवीन
त्या गाण्यावरून जर तुम्ही मोदींचे मूल्यमापन करणार असाल तर मला काही म्हणायचे नाही. त्या गाण्यात मोदी संपूर्ण काळ्याकुट्ट रंगात रंगविले आहेत. त्यात अनेक दिशाभूल करणार्या गोष्टी आहेत. मोदींच्या परदेश दौर्यावर टीका करताना मोदी विमानाच्या पायर्या चढण्याचे दृश्य गोबेल्स नीतीप्रमाणे तब्बल ४ वेळा वेगवेगळ्या ठिकाणी दाखविले आहे. पंतप्रधान वर्षातला बहुतेक काळ परदेशात राहून मौजमजा करतात असे सूचित करण्यात आले आहे जे अत्यंत खोटे आहे. मोदी १५ लाख रू. देणार असे कधीही म्हटले नव्हते. त्यांच्या त्या भाषणाची चित्रफीत तूनळीवर उपलब्ध आहे. परंतु त्या चित्रफीतीतील पुढील मागील कोणतीही वाक्ये न दाखविता फक्त एकच वाक्य अस्पष्ट ऐकविले आहे व त्यापाठोपाठ १५ लाखांच्या चेक्सची चित्रे आहेत. गोबेल्स नीती असते ती हीच. एकच खोटी गोष्ट वारंवार पुन्हा पुन्हा लोकांना सांगणे हीच गोबेल्स नीती आहे. मोदींनी दीड वर्षात ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्यातील एकही गोष्ट न दाखविता संपूर्ण चित्रफीतीत मोदींबद्दल अत्यंत खोट्या गोष्टी वारंवार दाखविल्या आहेत.
असल्या प्रचारकी व पूर्ण असत्य असलेल्या चित्रफीतीतील भावना भाजपने लक्षात घ्याव्यात आणि सर्व खोट्या गोष्टी भाजपने मान्य कराव्यात अशी तुमची अपेक्षा दिसते.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 11/11/2015 - 17:08
नवीन
तुमचा मुद्दा पूर्णपणे मान्य आहे. मोदी सरकार अनेक आघाड्यांवर चांगले काम करत आहे. वीज क्षेत्रात पियूष गोयल आणि हायवे क्षेत्रात गडकरी चांगले काम करत आहेत. पर्रिकर आणि अजित डोवल यांच्याविषयी तर अजिबात प्रश्न नाही.एखाद्या आयुर्वेदिक औषधाने रोग बरा व्हायला वेळ लागला तरी तो मुळापासून बरा होतो त्याप्रमाणे आणि त्या दृष्टीने मोदी सरकारची वाटचाल आहे हे नक्कीच. पण जनतेला क्विक फिक्स पाहिजे असतो. पियूष गोयल वीज वितरण कंपन्यांना कसे सरळ करत आहेत आणि त्याचे फायदे कसे आणि किती यापेक्षा लोकांना डाळी आणि टोमॅटोचे भाव अधिक महत्वाचे असतात. त्यामुळे मग मोदींचे परदेश दौरे आणि मोदी सामान्य लोकांसाठी काहीही करत नाहीत इत्यादी गोष्टी त्यांना खऱ्या वाटू लागतात.हा व्हिडिओ खोडसाळ उद्देशाने बनवला आहे हे उघड आहे. पण तो प्रभावी आहे हे नक्कीच.
तेव्हा मोदी सरकार स्ट्रक्चरल बदल करत आहे हे चांगलेच आहे.पण त्याबरोबरच लोकांवर अगदी दररोज परिणाम घडवतात अशा गोष्टींवरही मोदी सरकारने प्राधान्याने काम करावे असे फार वाटते. शेवटी लोकांना बहुसंख्य गोष्टी अनेक वर्षांनंतर कळणार आहेत.पण तोपर्यंत डाळी आणि टोमॅटोच्या भावांशी अगदी दररोज सामना करावा लागणार आहे.
- Log in or register to post comments
म
माणुस१
Wed, 11/11/2015 - 11:27
नवीन
२०११ चे जनलोकपाल आंदोलनाने एकुणच राजकारणाकडे बघायचा द्रुष्टिकोण बदलला असावा. (electronic आणी सोशल माध्यमांनीहि रोज घडणार्या घटना लगेच पोहोचतात त्यांचाहि परिणाम असावा) याचाच परिणाम म्हणुन २०१४ मध्ये कांग्रेस पडले. त्याचाच परिणाम म्हणुन दिल्लित आप आले आणी आता नितिशकुमार.
महागठबंधनला मिळालेली मते हि नितिशला मिळालेली आहेत. काम नाहि केले की लाथा मिळणार हे भारतीय जनता (फार उशीराने का होइना ) दाखवायला लागली असावी. कोणत्याहि आकडेवारितुन हे सिद्ध होणे शक्य नाहि कारण आ़कडेवारी फक्त जातीनिहाय, धर्मनिहाय, स्त्री/पुरुष, तरुण्/वयस्कर असे गट पाडु शकते. maturityत आलेला बदल हे आकडेवारीत येण्याच्या पलिकडचे आहे.
- Log in or register to post comments
च
चैतन्य ईन्या
Wed, 11/11/2015 - 11:46
नवीन
भाजपने फक्त निवडणूक जिंकण्यासाठी जॉ जिंकेल इतकाच क्रायटेरीया ठेवला आहे. दोन्ही ठिकाणी दिल्ली आणि बिहार मध्ये मुख्यमंत्री कोण हा प्रश्न गुलदस्त्यात होता. ऐनवेळी कोणालातरी पुढे करायचे. बाहेरून आलेले लोक आणि त्यातून गुंड, बिहार मध्ये सगळ्यात जास्त गुंड भाजपचे आहेत. अरे मग तुमच्यात आणि बाकीच्यांमध्ये काय फरक राहिला? १५ महिने होते. तितक्या काळात सगळे शक्य नाही तरी सुशील मोदींना वेळ देता आला असता. शिवाय सतत बाहेरून आलेल्या लोकांना पुढे करून आत पक्षामध्येच दुफळी माजवली आहे. आता युपी मध्ये हेच होणार आहे. आताही स्पष्ट जबाबदारी न स्वीकारता उगाचच कलेकटीव्ही रीसपोन्ससीबीलीटीच्या वगैरे चालू आहे. हे म्हणजे जिंकले तर सोनिया आणि राहुल मुले हरले तर बाकीच्यांमुळे ह्यातलाच प्रकार झाला. मग फरक काय राहिला?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 11/11/2015 - 16:52
नवीन
माझा एक सरळ प्रश्न आहे. भाजपने नक्की काय करावयास हवे होते की ज्यामुळे त्यांना आता मिळविलेल्या ३४.१% मतांपेक्षा अजून जास्त मते मिळाली असती.
एकदा निकाल लागल्यानंतर काय काय चुका झाल्या याचे पोस्टमार्टेम करणे सोपेच असते. तरीही मला वाटते की पुढील गोष्टी चुकल्या:
१. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नसणे चांगलेच नडले. नितीशकुमारांची लोकप्रियता अगदीच निर्विवाद होती.तेव्हा मे २०१४ पासूनच बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नाही तरी तो हेरून ठेवणे आणि त्या दिशेने प्रचाराची दिशा ठरविणे गरजेचे होते. लोकांनी लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान निवडायच्या उद्देशाने मोदींच्या नावावर मते दिली.पण दरवेळी लोक त्याच नावावर मते देतील यावर भाजपवाले विसंबून राहिले.मोदी कितीही लोकप्रिय असले तरी ते मुख्यमंत्री व्हायला जाणार नाहीत एवढे भान बिहारच्या मतदारांना होते.
२. काहीकाही मुद्दे अगदी आपसूकपणे विरोधकांच्या हातात कोलीत म्हणून दिले गेले. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नव्हता हे वर म्हटलेच आहे.त्याउपर भाजपच्या पोस्टरवर मोदी आणि अमित शहांचे फोटो होते.त्यातून बिहारी विरूध्द बाहरी हा मुद्दा कोलित म्हणून नितीशकुमारांच्या हातात गेला. दुसरे म्हणजे नितीशकुमारांच्या डी.एन.ए वर मोदींनी भाष्य केल्यावर बिहारच्या लोकांचे डी.एन.ए सॅम्पल लाखांनी पाठवून त्या पण मुद्द्याचा नितीशकुमारांनी फायदा मिळवला.
३. निवडणुक जड जाणार हे लक्षात घेऊन विरोधी मतांमध्ये जितकी फूट पडेल तितके बघायला हवे होते. मुलायमसिंग फुटले, राष्ट्रवादी महागठबंधन बाहेर गेला, पप्पू यादवने नवा पक्ष स्थापन केला, झंझारपूरचे देवेन्द्रप्रसाद यादव यांचा पक्षही तिसऱ्या आघाडीत सामील झाला, ओवेसीनेही सहा का होईना जागांवर उमेदवार उभे केले इथपर्यंत सर्व ठिक चालू होते. २०१० मध्ये समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला २.४% मते होती.पण यावेळी १.५% मते मिळाली.पप्पू यादवचा पक्षही प्रभाव दाखवू शकला नाही. असे का झाले असावे? भाजपमधील वाचाळवीरांनी फालतूची बडबड केली त्यामुळे जे समाजघटक काही प्रमाणात या अन्य पक्षांना मते देऊ शकले असते ते परत लालू-नितीशमागेच गेले. या इतर पक्षांनी अजून २-३% मते जरी घेतली असती आणि महादलितांची आणि यादवेतर ओबीसींची आणखी २-३% मते भाजपने आपल्याकडे वळविण्यात यश मिळवले असते तर निवडणुक कदाचित इतकी एकतर्फी झाली नसती. ही महादलित आणि यादवेतर ओबीसींची मते (जी जंगलराजच्या भितीमुळे भाजपकडे यायला हवी होती) भागवतांमुळे गेली आणि दादरी प्रकरण, बीफवरील मनोहरलाल खट्टर यांच्यासारख्यांची वक्तव्ये इत्यादीमुळे मुसलमानांची मते (जी तशीही भाजप आघाडीला मिळालीच नसती) मुलायम, पप्पू यादव इत्यादींनी थोड्याफार अधिक प्रमाणात न फोडता परत लालू-नितीशलाच गेली.
४. नितीशकुमारांनी निवडणुकांची सुरवात फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्रीपदी पुनरागमन झाल्यानंतर लगेचच सुरू केली होती. त्यावेळी भाजपच्या आघाडीवर नक्की काय चालू होते? लोक कायम एकाच नावावर (आणि ते ही विधानसभा निवडणुकांमध्येही) आपल्यालाच मते देत राहतील हा अतीआत्मविश्वास नक्कीच नडला.
अजूनही मोदी आणि शहा पराभवाची जबाबदारी घ्यायला तयार दिसत नाहीत. म्हणजे जिंकले असते तर यांच्यामुळे आणि हरले तर ती सामुहिक जबाबदारी अशी कॉंग्रेस संस्कृती आणली जात आहे का? दुसरे म्हणजे २०१४ मध्ये लाट होती त्यामुळे स्वबळावर बहुमत मिळवता आले. पण २०१९ मध्ये अशी लाट आणता आली नाही आणि स्वबळावर बहुमत मिळाले नाही तर मित्रपक्ष बरोबर लागणार आहेत. सध्या मित्रपक्षांबरोबर जे काही चालू आहे त्यावरून २०१९ मध्ये यांना कोण मदत करायला जाणार हा प्रश्न आहेच. नेमली हीच कारणे २०१९ मध्ये भाजपला जोरदार नडतील अशी भिती वाटते. आजही पंतप्रधान होऊ शकतील अशा इतरांपेक्षा मोदी हेच कितीतरी पटींनी अधिक चांगले आहेत असेच मला वाटते आणि २०१९ नव्हे तर २०२४ मध्येही मोदीच जिंकावेत असेही वाटते.पण ते होईल का ही शंका मात्र नक्कीच येऊ लागली आहे.
बरं बिहारमध्ये जे काही झाले ते झाले. त्यापेक्षा दुप्पट महत्वाच्या निवडणुका १५ महिन्यांनी उत्तर प्रदेशात आहेत. आणि अखिलेश यादव यांची लोकप्रियता नितीशकुमारांच्या लोकप्रियतेच्या जवळपासही नाही. बिहारमध्ये झालेल्या चुका परत उत्तर प्रदेशात होणार नाहीत अशी अपेक्षा करू या. सर्वात महत्वाचा प्रश्न-- उत्तर प्रदेशात यांचा मुख्यमंत्री कोण बनणार याचे उत्तर लवकरच दिले जाईल अशीही अपेक्षा करू या.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 11/11/2015 - 17:22
नवीन
२०१४ मधील एकाही निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नव्हता. तेव्हा निवडणुक जिंकली होती. दिल्लीत किरण बेदींना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केल्यावर तिथे मात्र दारूण पराभव झाला. त्यामुळे बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आधी जाहीर न करण्याचा निर्णय योग्यच होता.
पोस्टर्सवर कोणाचे फोटो आहेत याने काही फरक पडतो असे मला वाटत नाही. बिहारी वि. बाहरी हा मुद्दा निवडणुकीचा प्रचार सुरू होण्याआधीपासूनच सुरू झाला होता. महाराष्ट्रात, झारखंडमध्ये, हरयानात हाच मुद्दा प्रचारात आणला गेला होता. त्याने फरक पडला नाही. पंतप्रधान हे मुख्यमंत्री होणार नाहीत व स्थानिक नेताच मुख्यमंत्री असणार हे न समजण्याइतका कोणताही मतदार अज्ञानी नसतो. डीएनए मुद्द्याने सुद्धा काही फरक पडला असे मला वाटत नाही. महाराष्ट्रातील प्रचारात भाजपने शिवसेनेवर केलेली प्रत्येक टीका हा महाराष्ट्राचा व मर्द मराठी मावळ्यांचा अपमान आहे असे सातत्याने शिवसेना प्रचार करीत होती. त्याचा किती परीणाम झाला ते दिसलेच आहे.
मागे एका प्रतिसादात लिहिले आहे. बिहारमध्ये निवडणुकीच्या काळात अनेक गावातून फिरलेल्या वंदिता मिश्रा या पत्रकाराचे अनुभव सांगितले आहेत. भागवत काय म्हणाले हे ९० टक्क्यांहून अधिकांना माहितच नव्हते. कमी जागा मिळाल्या तरी नितीशकुमारच मुख्यमंत्री होणार हे नक्की असल्याने महाआघाडीची मते जंगलराज वा इतर कोणत्याही कारणाने फुटलीच नाहीत. कुर्मी, कोईरी व यादव ही ओबीसींची भक्कम व्होटबँक बांधली गेल्याने त्याला खिडार पडलेच नाही. फुटकळ पक्ष तसेही थोडीशी मते खातातच. महाराष्ट्रात शेकापला फारसा जनाधार नसला तरी रायगड जिल्ह्यात त्यांची ठरलेली व्होटबँक आहे. तसेच बिहारमध्येही अनेक फुटकळ पक्ष आहेत ज्यांची ठरलेली मते आहेत. ही मते जशी भाजपला मिळाली नाहीत तशी ती महाआघाडीलाही मिळाली नाहीत.
मला वाटते की अंतिमतः राजद व संजद यांची युती होणार नाही, जागावाटपावरून ही युती तुटेल असा भाजपला विश्वास वाटत असावा. त्यामुळेच ते गाफील राहिले. नितीशकुमार अत्यंत लवचिक भूमिका घेईल व लालू मुख्यमंत्रीपदावर दावा करणार नाही असे त्यांना स्वप्नात सुद्धा वाटले नसावे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 11/11/2015 - 17:30
नवीन
२०१४ मध्ये जिंकलेल्या राज्यांमध्ये कुठेही मुळात तगड्या आणि लोकप्रिय मुख्यमंत्र्याबरोबर सामना नव्हता. पृथ्वीराज चव्हाण, भूपिंदरसिंग हुडा, हेमंत सोरेन हे नितीशकुमारांइतके नक्कीच लोकप्रिय नव्हते. बिहारमध्ये हा फरक नक्कीच होता. त्यामुळेच पुढचे मुद्देही त्याभोवतीच घोटाळतात. म्हणजे महाराष्ट्रात उध्दव ठाकरे मोदींच्या मंत्रीमंडळाला अफझलखानाचे सैन्य वगैरे म्हणाले तरी त्याचा परिणाम झाला नाही पण नितीशकुमारांनी डी.एन.ए सॅम्पल पाठवली त्याचा परिणाम झाला याचे कारण नितीशकुमार लोकप्रिय होते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 11/12/2015 - 11:00
नवीन
चव्हाण व सोरेन हे फारसे लोकप्रिय नसले तरी हूडा सलग १० वर्षे मुख्यमंत्री असल्याने त्यांची चांगलीच इमेज होती.
बिहारमध्ये भाजपने एखाद्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केले असते (उदा. सुशीलकुमार मोदी, शहनवाझ हुसेन, चौबे इ.) तर लगेच त्या चेहर्याची व नितीशकुमारांची तुलना सुरू होऊन ती निवडणुक या चेहर्यांमधील लढाई ठरली असती व त्यात नक्कीच नितीशकुमार उजवे ठरले असते. तसेच भाजपच्या उमेदवाराची जात हा मुद्दा प्रचारात येऊन त्यामुळे लगेच जातीय ध्रुवीकरण झाले असते जे भाजपसाठी अजून तोट्याचे ठरले असते. त्यामुळे यादव व कुर्मींची मते अजून एकवटली असती.
या कारणांमुळे भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नाही हे योग्यच केले.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 11/12/2015 - 19:26
नवीन
गुर्जी नहीं मानेंगे !
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 11/12/2015 - 19:26
नवीन
गुर्जी नहीं मानेंगे !
प्रयत्न करून बघा
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 11/12/2015 - 11:08
नवीन
२०१९ चे भाकीत आता करता येणे अवघड आहे. परंतु २०१९ मध्ये काँग्रेस युपीए३ तयार करून त्यात अजून जास्त पक्ष आणेल असे सध्या वाटत आहे.
उ.प्र. निवडणुकीसाठी मायावती हा कळीचा मुद्दा ठरेल. मायावतीपुढे ४ पर्याय आहेत.
(१) स्वतंत्र लढणे
(२) निवडणुकीत सहभाग न घेणे
(३) काँग्रेसबरोबर युती
(४) सपाबरोबर युती
वरील पर्याय भाजपसाठी चढत्या क्रमाने त्रासदायक आहेत. पर्याय २ व ४ फारसे शक्य वाटत नाहीत. भाजपसाठी पर्याय १ फायद्याचा ठरेल.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
गुरुवार, 11/12/2015 - 19:14
नवीन
मायावती व भाजप हे समीकरण का होऊ शकत नाही
मायावती मांझी व पासवान ह्यांच्यात डावे उजवे करण्यासारखे विशेष काय आहे
किंबहुना समाजवादी व भाजप ह्यांच्यात युती का होऊ नये
मायावती व मुलायम ह्याच्यासोबत कोन्ग्रेज ने महा आघाडी केली तर परत भाजपचे पानिपत होईल केंद्रात उरलेली दोन तीन वर्ष व पुढील लोकसभा निवडणूक बिहार व युपी मध्ये जड जाईल
भाजपने ममता मुलायम जया ह्यांच्याशी जरूर युती करावी असे माझे मत आहे
कोंग्रेज व कम्युनिस्ट ह्यांचा सफाया सोबत सत्तेत सहभाग ही भाजपची प्राथमिकता आहे सत्तेत राहून धोरणे राबविता येतात
महाराष्ट्रात एवढे राडे होऊन युती होतेच ना सत्तेसाठी
तेव्हा हिंदुत्वाला विकासाचा मुलामा द्या
विकसित भारतासाठी प्रादेशिक पक्षांना एन डी ए मध्ये आणलेच पाहिजे
कोंग्रेज युपिए ३ करण्याची शक्यता कमी व मोदीग्रस्त अवस्थेत तिसर्या आघाडीला पाठिंबा देण्याची शक्यता जास्त वाटत आहे नितीश च्या नेतुत्वाखाली मात्र जर राहुल च्या चमच्यानी कुत्रा गाडीत बसल्याने त्याला गाडी तो स्वताच ... ह्या कथेनुसार तुम्हीच पंतप्रधान होण्यास लायक असे झाडावर चढवले तर तो वेगळी चूल मांडेल
ती शक्यता गृहीत धरून जास्तीस्जास्त प्रादेशिक पक्ष एन डी ए मध्ये आणले पाहिजे
पराभव नाकारण्याची कोन्ग्रेजी संस्कृती ह्या मतावर इथेच लिहितो. माझ्यामते लोकसभेच्या विजयानंतर मोदिनी स्वतः विजाचे श्रेय घेतले नाही जे सत्य असले तरी अनेक इतर घटक कार्यरत होते लोकपाल चळवळ सहित म्हणूनच अडवाणी ह्यांच्या तुमच्यामुळे ह्या वक्तव्यावर मोदिनी हा विजय पक्षाचा असे सांगितले , मध्यल्या एक वर्षात मोदी महिमा सलग चार राज्यात विजय व विदेशात आजवर सगळ्यात जास्त लोकप्रियता व वचक निर्माण केलेला भारतीय पंतप्रधान म्हणून मोदींचे नाव झाले.
ह्या भीतीनेच लालू व नितीश एकत्र आले नाही म्हणजे ते वेगळे लढले असते तर भाजपच्या ५० वरून जरी ८० ते ९० जागा झाल्या असत्या तरी पुढे लालुशी युती त्याने केली असती भाजपला एकहाती सत्ता बिहार मध्ये कठीण होती तेथे नितीश ची स्थानिक विकासपुरुष ही प्रतिमा होती तरीही भाजपला निवडणूक लढणे भाग होते लोकसभा व विधान सभेच्या निवडणुकीत विषय वेगळे असतात तरीही एकहाती सत्तेसाठी मोदींनी बाजी लावली ,
आता पराभव झाला
पराभवाची जबाबदारी केव्हा घेतली जाते
जेव्हा पराभव तुमच्यामुळे किंवा तुमच्या धोरणामुळे होते
आता पर्यंत गुरुजी व तुमच्या व माझ्या प्रतिसादातून हेच लिहिल्या गेले कि परव्भ हा संख्येच्या गोळा बेरेजेवर विरोधकांच्या एकजूटी मुळे झाला मोदींच्या जागी अडवाणी असते तर ५० सुध्धा मुश्किल होते
कोंग्रेज चा लोकसभा पराभव हा राहुलच्या धोरणाने व त्यांच्या कचखाऊ व्यक्तीमात्वामुळे झाला त्यांच्या जागी पायलट किंवा इतर नेते असते तर तो एवढा दारूण नसता
मग मोदिनी बिहार मध्ये माफी काय म्हणून मागयाची
लोकसभेत वेगवेगळे लढलेले लालू व नितीश ह्यावेळी एकत्र येणार हे २०१४ मध्ये कोणालाच वाटले नव्हते.
आणि पक्षाच्या चिंतन शिबिरात पराभवावर चर्चा झाली असेल ती जनता व दुतोंडी प्रचार माध्यमांच्या समोर आणलीच पाहिजे असा कायदा नाही आणि मोदी हे परंपरा पाळत नाही परंपरा निर्माण करतात. अजून एक महत्वाचे कारण म्हणजे पराभव झाला आहे त्यावर भाष्य खुद्द मोदिनी केले आणि समाजां दोष स्वतावर घेण्याचे नुसते विधान केले तर मोदी युग संपले मोदी संपले भाजप संपली अशी भाषा असे वातावरण प्रसारमाध्यमे करतील किंबहुना मोदी ह्य्णाई काहीही न बोलतां तसे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु देखील झाला
एका राज्याच्या निकालाचा देशाच्या जनतेचा मोडीवर विश्वास नाही इतपत भाषा तर मित्रपक्ष सत्तापरिवर्तन तर विरोधक तिसर्या आघाडीचे इमले रचू लागले . पाकिस्तानात टोक शो उतू जाऊ लागले. चुकून मोदी ह्यांनी आता माझी जबाबदारी आहे असे म्हटले तरी विचारजंत अवोर्डी टोळी आता मोदिनी सध्याचा सो कोल्ड असहिष्णू वातावरणाबद्दल
माफी मागावी अशी आचरट मागणी करतील राजकारण्यांना अजून चेव येईल ,
माझ्यामते मोदी ह्यांनी ह्या विषयावर भाष्य न करता सचिन सारखे आपल्या कामगिरीने सगळ्याचे तोंड बंद करावे हेच उचित आहे तेच मोदी करत आहेत आर्थिक सुधारणाच्या माध्यमातून
आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे
- Log in or register to post comments
श
शलभ
गुरुवार, 11/12/2015 - 20:59
नवीन
+1
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Wed, 11/11/2015 - 22:02
नवीन
इंडिया व भारत ह्यांच्यातील दुही दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्याचा फटका मोदींना बसला
मोदींना अनिवासी भारतीयांचा पंतप्रधान किंवा शहरी व भांडवलधारी लोकांचा पंतप्रधान म्हणून जनमानसात विरोधकांनी रुजवले तेही एकेकाळच्या मोदींच्या चाणक्याच्या मदतीने
त्याला मोदींचे निवडणूक बेत योजना पुरेपूर माहिती होत्या.
गुरुजी
निकाल पाहता असे खेदाने म्हणावे लागते
नितीश च्या आधी शहा लालूच्या संपर्कात आले असते तर आज नितीश ५० च्या आसपास जागा मिळवून आपल्या कारकिर्दीची अखेरची निवडणूक नेता म्हणून लढला असता ,शरद बाबुनी नवीन प्यादे आपल्या पक्षात आणले असते
कसे आहे एन डी ए मधून युपिए किंवा तिसर्या आघाडीत जाणे अतिशय सोपे आहे जया ममता अशी उदाहरणे समोर आहेत, मात्र युपिए मधून एन डी ए मध्ये नवीन साथीदार आणणे महाकठीण
सुरक्षित सेक्युलर कवचातून जे भाष्टचार्री नेत्यांचे अक्षय कवच आहे त्यांना हिंदुत्वाच्या खडतर वाटेवर जाणे म्हणजे राजकीय आत्महत्या वाटते
तेव्हा हिंदुत्व ला विकासाच्या मुद्याने झाकले तर कार्पोरेट शेत्राच्या मदतीने यु पी ए मधील धेंडे एन डी ए मध्ये आणणे शक्य होईल
लोकशाहीत निवडणुका व सत्ता स्थापन ही तत्वांच्या वर नाही तर राजकीय गोळाबेरीज वर अवलंबून असते
तेव्हा सम दम दंड भेद वापरून ममता जया व इतर अनेकांना एन डी ए मध्ये आणणे हेच २०१९ साठी आवश्यक आहे आगामी निवडणुकात भाजपने उत्तर प्रदेश व बंगाल मध्ये छोटा भाऊ बनून सत्तेत यावे त्यासाठी जमेल त्याच्याशी युती करावी
सगळेच काही नितीश बनत नाहीत.
आसाम मध्ये महाराष्ट्रासारखे कोन्ग्रेज चे हुकमी नेते पक्षात आणले पाहिजे.
आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 11/11/2015 - 16:58
नवीन
जंगलराजची सुरूवात झाली आहे का?
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/rape-molestation-bid-sends-shock-waves-in-patna/articleshow/49744452.cms
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 11/11/2015 - 17:10
नवीन
ती सुरवात कधीना कधी होणारच होती. या निवडणुकांमध्ये नितीशच्या मागे लपून लालू जिंकले याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणारे विचारवंत त्यावर काहीही बोलणार नाहीत हे पण तितकेच खरे.
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
गुरुवार, 11/12/2015 - 01:16
नवीन
मोदींनी प्रचंड मेहनत घेतली. खूप सभा घेतल्या. त्यानंतर बिहारमधील जनतेने दिलेल्या कौलावरून मुकेश ने गायलेल्या ---मुझे तुमसे कुछ भी न चाहिये मुझे मेरी हालत पे छोड दो ---या गाण्याची आठवण झाली.
https://www.youtube.com/watch?v=fZREk3N6DpE
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
Wed, 07/26/2017 - 19:58
नवीन
आज नितिश कुमारांनी दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर हा धागा पुन्हा वर काढत आहे.
गेल्या ६ महिन्यांपासून मी जे वाचन केलं, त्यावरुन असं लक्षात येतंय की विरोधकांना काँग्रेसपासून वेगळं करण्यातली ही एक खेळी होती. शिवाय मोदींशिवाय पंतप्रधानपदी दावा ठोकू शकणार्या कुणाचीही लायकी दाखवून देण्यासाठी बिहारमध्ये सापळा रचला गेला.
राजद वाढलेल्या ताकदीवर नितीशना नमते घ्यायला लावणार याची जवळपास सर्वांना खात्रीच होती. पण तरीही सेक्युलरिजमच्या नावाखाली ही मंडळी एकत्र आली. नितीशच्या आधीच्या कारकिर्दीतली उजळ प्रतिमा डागाळली जाणार हे ओघाने आलेच. यातूनच असा संदेश जाणार की भाजपाची सोबत असल्याशिवाय कितीही उजळ प्रतिमेचा मुख्यमंत्री चांगला कारभार करु शकत नाही.
पुन्हा सत्तेत येण्यासाठी संजदला किती जागा मिळतील याचा अंदाज घेऊन भाजपाने किती जागा कमीत कमी मिळवाव्यात याचा अंदाज बांधला गेला. त्याप्रमाणे जागावाटप करण्यात आले आणि आज संजद काँग्रेसपासून वेगळा होऊन भाजपाची साथ द्यायला निघाला आहे. एनडीएचा दुरावलेला साथी तर मोदींनी परत मिळवलाच, शिवाय काँग्रेसमुक्त भारताकडे नेताना एक राज्यही खिशात टाकले आहे.
- Log in or register to post comments
थ
थॉर माणूस
Wed, 07/26/2017 - 20:38
नवीन
>>> संजद काँग्रेसपासून वेगळा होऊन भाजपाची साथ द्यायला निघाला आहे.
आँ? संजद ने भाजपाला पाठींबा द्यायची उघड मागणी केल्याची बातमी कुठे दिसली नाही! हे कधी झालं? मला वाटलं होतं भाजपाने स्वतः मदतीचा हात पुढे केला आहे.
नितिशकुमार स्वतः अशी मागणी करण्याची शक्यता कमी आहे, कारण त्यामुळे ते या युतीला अकाऊंटेबल होतात आणि भाजपाकडे कमांडींग पोजिशन जाते.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5