Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पॅरिस हल्ला

D
DEADPOOL
Sun, 11/15/2015 - 05:28
🗣 171 प्रतिसाद
चार्ली हेब्दो हल्ला ही फक्त सूचना होती! १३ तारीख ही फ्रांस च्या इतिहासातील सर्वात काळी तारीख म्हणून मानली जाईल. २००च्या वर म्रुत्यू आणि अनेक जखमी. 'धिस टाइम इट्स वार!' भारतावर सुद्धा असा हल्ला होऊ शकतो. क्रुपया आपले मत मांडा.

प्रतिक्रिया द्या
33594 वाचन

💬 प्रतिसाद (171)
D
DEADPOOL Sun, 11/15/2015 - 05:32 नवीन
युद्ध सुरू झाले आहे
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 11/15/2015 - 05:34 नवीन
वाक्ये मोजली. एकूण सहा आहेत. बादवे मुंबई कुठे भारताबाहेर येते का? भारतात असा हल्ला झालाय, वास्तविक पाहता असे बरेच दहशतवादी आत्मघातकी हल्ले भारतात झाले आहेत. असो.
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Sun, 11/15/2015 - 07:33 नवीन
बादवे मुंबई कुठे भारताबाहेर येते का? भारतात असा हल्ला झालाय, वास्तविक पाहता असे बरेच दहशतवादी आत्मघातकी हल्ले भारतात झाले आहेत. असो:>>>>>>>> भारतात मुम्बईचा हल्ला हा पाकिस्तानी अतिरेक्यांनी केला होता. भारतात आइसिस कडून हल्ला होऊ शकतो. आपल्या अवांतर माहितीसाठी मुम्बई भारतात येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
म
मारवा Sun, 11/15/2015 - 12:54 नवीन
एस लेखाच्या शब्दसंख्ये कडे नका बघु क्वांटीटी कडे नका बहु क्वालिटी कडे बघा. लेख अर्क स्वरुपात सुत्रबद्ध आहे. एक आपली प्राचीन रीत आहे जसे पतंजली योगसुत्र केवळ मुद्देसुदच फाफटपसारा टाळुन टु द पॉइंट अस लिहीण्यासाठी प्रतिभा लागते. ती वरील लेखकाकडे आहे. सहा वाक्ये बघा एकेक वाक्य महावाक्य आहे. महाकाव्या चा दर्जा लाभलेलं हे शब्दलेणं आहे. शेवटच वाक्य फार च विलक्षण आहे. एस तुमचा टीकात्मक प्रतिसाद वाचुन खेद वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
D
DEADPOOL Sun, 11/15/2015 - 13:20 नवीन
थँक्स. पण आम्ही शालजोडितले घेत नाही. परत पाठवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मुक्त विहारि Sun, 11/15/2015 - 05:40 नवीन
माझे मत.... माझा स्वतःचा ब्लॉग परत एकदा अपडेट करावा, असे वाटत आहे.
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Sun, 11/15/2015 - 07:34 नवीन
करा मग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Sun, 11/15/2015 - 13:09 नवीन
म्हणून एक मिपाकर म्हणून माझे मत दिले..... पण...पण...पण... मी मात्र तुम्हाला मत विचारले न्हवते.... असो, आपल्यासारख्या सुज्ञांना अधिक सांगणे न लगे.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL
य
याॅर्कर Sun, 11/15/2015 - 05:48 नवीन
का कुणास ठाऊस पश्चिम रांष्ट्रांविषयी कधी सहानुभूती वाटलीच नाही,अमेरिकेबद्दल तर अजिबात नाही. . . . सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन इसिसला संपवणे काही कठिण नाही,थोडं खर्चिक असेलही आणि काही काळाकरिता अस्थिरता पसरेल एवढचं. काय झोल आहे ते नक्की कळत नाही. . . . . हल्ल्याचा निषेध
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 11/15/2015 - 11:16 नवीन
यॉर्कर, >> का कुणास ठाऊस पश्चिम रांष्ट्रांविषयी कधी सहानुभूती वाटलीच नाही,अमेरिकेबद्दल तर अजिबात नाही. पश्चिमी राष्ट्रे म्हणजे पश्चिम युरोप आणि अमेरिका असं तुम्हाला अभिप्रेत असावं. त्याचं काय आहे की या राष्ट्रांतल्या सामान्य जनतेने नेहमीच युद्धांना विरोध केला होता. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांत शांतताप्रेमी गटांची चळवळ बरीच जोरात होती. पण सत्ताधारी वर्गातल्या काही लोकांना युद्ध हवं होतं. हाच प्रकार युद्ध संपल्यावरही चालू राहिला. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात जी युद्ध पश्चिमी राष्ट्रांनी लढली आहेत ती सगळी नागरिकांच्या इच्छेविरुद्ध आहेत. उदा. : व्हियेतनाम, इराक, गांधार, यादी अपूर्ण. सत्ताधारी कंपू म्हणजे उर्वरित राष्ट्र नव्हे. अगदी भारतातले सत्ताधारीही काश्मिरी हिंदू नागरिकांचं शिरकाण उघड्या डोळ्यांनी बघत बसलेच ना? न्यूयॉर्कच्या असो वा माद्रिदच्या वा लंडनच्या वा पॅरिसच्या वा मुंबईच्या, भ्याड हल्ल्यांत मेलेले निरपराधच होते. आणि सर्बिया, इराक, युक्रेन व गांधारात मेलेलेही निरपराधच होते. जगात सर्वत्र शांतताप्रेमी नागरिक सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकण्यात अपयशी ठरलेत. म्हणून जगातले बहुतांश नागरिक सहानुभूतीस पात्र नाहीत असं समजावं का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
D
DEADPOOL Sun, 11/15/2015 - 15:09 नवीन
का कुणास ठाऊस पश्चिम रांष्ट्रांविषयी कधी सहानुभूती वाटलीच नाही,अमेरिकेबद्दल तर अजिबात नाही. .>>>>>>>>>> संहारक शस्त्रास्त्रे ही यांचीच निर्मिती. अणुबाँबचा शोध यांचाच. मिसाईल यांनीच बनवले. दोन महायुद्ध यांच्या हव्यासापोटी झालीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
भ
भाऊंचे भाऊ Sun, 11/15/2015 - 19:54 नवीन
सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन इसिसला संपवणे काही कठिण नाही,थोडं खर्चिक असेलही आणि काही काळाकरिता अस्थिरता पसरेल एवढचं.
इस्त्राएल ने अमेरीकेवर हल्ल्या नंतर स्पश्ट ऑफर दिली होती, अख्ख्या जगातला दहशत्वाद आमी मोडुन काढतो. तेसुधा आमचेच रिसोर्स वापरुन. तुम्ही कोणीही कसलीही साथ देउ नका अन महत्वाचे म्हणजे हे करताना कुठे मधे येउ नका. बोला आहे तयारी ? यावर अमेरिकेने काय उत्तर दिले असेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
क
काळा पहाड Sun, 11/15/2015 - 20:14 नवीन
बहुधा खरं नसावं. पण अशी ऑफर इस्त्रायलनं भारताला दिली होती असं ऐकलंय (काहुटा अणुभट्टी उडवण्याबद्दल). मी आणखी सुद्धा एक ऐकलं आहे. अमेरिकेनं म्हणे मुस्लिम जगताला सांगितलं होतं की अमेरिकेवर पुन्हा हल्ला झाला तर एक अणुबाँब मक्केवर आणि एक मदिनेवर टाकू म्हणून. खरं खोटं अल्ला जाणे. पण बुश बाबाकडं बघता खरं सुद्धा असू शकतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
भ
भंकस बाबा Mon, 11/16/2015 - 05:24 नवीन
इझराइल हा देश प्रखर धर्माभिमानी आहे. ते खुलेआम पलेस्टिनिना धमकावतात. ते बोलतात जर तुम्ही एक ज्यू मारलात तर आम्ही चार मारू, आणि चाळीस मारून दाखवतात. तसेपण ज्यूचि लोकसंख्या घटत आहे. त्याला कारण दहशतवाद नाही तर त्यांचा धर्मच आहे कारण ज्यू धर्मान्तरावर विश्वास ठेवत नाही. कोणीही ज्यू धर्मात प्रवेश करु शकत नाही त्यासाठी जन्माने ज्यू असणे आवश्यक आहे. यानी हम तो डूबेंगे पर साथमें आपको भी ले डूबेंगे। तसेपण ज्यू धर्माला खिंडार पाडणाऱ्या ख्रिचन् व् मुस्लिम धर्माविषयी ज्यू ना आकस आहेच. हिंदुस्तान वगळता जगात सर्वत्र ज्यू वर अत्याचार झाले त्यामुळे ज्यूचि सहानभूति नेहमीच भारताच्या बाजूला असते. २६/११ देखील नरीमन हाऊस वरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी इझराइलने भारताला खुली ऑफर दिली होती. पण अल्पसंख्यकाना वाइट वाटेल म्हणून ही ऑफर नाकारण्यात आली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
ए
एक सामान्य मानव Mon, 11/16/2015 - 10:10 नवीन
खूप दिवसांनी गावातल्या कट्ट्यावर बसल्यासारखं वाटलं. हे इस्त्राएल वगैरे लोक "स्पश्ट ऑफर"ची एक प्रत भाऊंना पाठवत असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
भ
भंकस बाबा Mon, 11/16/2015 - 14:03 नवीन
नरीमन हाउस हे मुंबईतील ज्यू लोकांचे उतरण्याचे एक केंद्र आहे. जेव्हा हल्ला झाला तेव्हा तेथील सात ज्यूना बंधक बनवण्यात आले होते. हे बंधक नाटक तीन दिवस चालले. इझराइल जगातील प्रत्येक ज्यूचि नोंद ठेवत असतो. याच अनुषंगाने इस्राएलने भारताकडे कमांडो कारवाईचा प्रस्ताव ठेवला होता. पण भारताने तो नाकारला कारण एकतर आपल्या देशात कमांडो असताना दुसऱ्या देशाकडून मदत घेणे नामुष्कीचे होते, शिवाय आपल्याकडिल अल्पसंख्यकाना इस्राईलची उपस्थिति नेहमीच खटकते. आता राव तुम्ही गावच्या पिंपळाच्या पारावरून उतरून घरी गेल्यावर सांस-बहुच्या मालिका बघण्यापेक्षा जरा न्यूज़ चॅनेल बघत जाकी. इस्राईलच्या ताकदिला कमी लेखु नका. ऑपरेशन थंडरबोल्ट बद्दल वाचा. चांगली माहिती आहे. अमेरिका नेहमी दुसऱ्या देशावर दादागिरी करत असते पण इस्राईलच्या पुढे ते थंड बसतात कारण अमेरिकन बैंकिंग व्यवस्थेवर ज्यूचें वर्चस्व आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक सामान्य मानव
स
सुबोध खरे Tue, 11/17/2015 - 05:41 नवीन
इस्रायल ने काहूटा वर हल्ला करून नष्ट करण्याचा प्रस्ताव भारताला दिला होता हे सत्य आहे. (यात भारताला त्यांच्या लष्करी विमानांना जाताना आणि येताना इंधन आणि इतर सुविधा देण्याची मागणी केली होती.) कारण दोन दिवसातच पाकिस्तानच्या अणुबॉम्बचे जनक अब्दुल कादिर खान यांनी आमची सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवलेली नाहीत असे प्रकटीकरण केले होते. अर्थात हि त्यावेळेस दर्पोक्ती होती पण त्यानंतर मात्र पाकिस्तानने ती प्रक्रिया युद्ध पातळीवर हाती घेतली आणि आपल्या अणुबॉम्बची संख्या झपाट्याने वाढवण्यास सुरुवात केली. भारतीय नेत्यांनी त्यावेळेस कबुतरे उडवण्याचा नाद लागल्यामुळे आणि कदाचित अणुयुद्धाला आणि अंतर्गत बंडाळीला तोंड फुटेल या भीतीने तो प्रस्ताव नाकारला होता. इस्रायलच्या क्षमतेबद्दल आपल्याला शंका असण्याचे कारण नाही. ओसिराक येथील इराकची अणुभट्टी त्यांनी आतुन आणि बाहेरून स्फोट करून उडवून लावली होती. https://en.wikipedia.org/wiki/Operation_Opera अशाच तर्हेने सिमेंन्स कंपनीची इराणमधील अणुभट्टी अमेरिकेने आणि इस्रायलने त्यांच्या संगणक प्रणालीत विषाणू घुसवून निकामी केली म्हणून इराण अणुकेंद्र्कीय समन्वयासाठी तयार झाला. https://en.wikipedia.org/wiki/Stuxnet
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
श
शलभ Tue, 11/17/2015 - 08:29 नवीन
छान माहिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 11/19/2015 - 10:35 नवीन
मी बहुधा इथेच वाचले की तुर्भे आण्विक केंद्र उडवून टाकायची धमकी दिली होती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मदनबाण गुरुवार, 11/19/2015 - 11:25 नवीन
या विषयीच एक बातमी हल्लीच आली होती :- In fact: Did India plan a covert military attack on a Pakistani nuclear reactor? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Tail wags the dog
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
भ
भंकस बाबा Sun, 11/15/2015 - 05:53 नवीन
यूरोपीय देशांना मुस्लिम आंतकवादाचि मोठी किमंत चूकवावी लागणार आहे. त्याला कारण आहे त्यांनी शर्णार्थिना दिलेला आसरा. हेच शरणार्थी पुढे जाऊन आंतकवादी बनणार आहेत. मला माझ्या बाजूला रहात असलेल्या अब्दुलचि वा रहिमचाचाची भीति वाटत नाही. पण त्यांचा धर्म जेव्हा बोलतो की सर्व जग इस्लाममय होणार आहे तेव्हा धर्मवेडापायी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 11/15/2015 - 06:04 नवीन
लोकांना युद्धाचे काय आकर्षण आहे माहिती नाही बुआ कालपासून सत्राशे साठ लोक दिसले तेच बोलताना "युद्ध सुरु झाले आहे" मुळात इंसर्जंसी प्रॉब्लम जेव्हा पासुन सुरु झाला तेव्हापासुन शहरी युद्ध सुरूच आहे एखादा ठळक हल्ला झाला की ते दिसुन पड़ते इतकेच अन खरोखरचं युद्ध सुरु होऊन दारापर्यंत पोचलं की घाबरगुंडी उड़ेल ती वेगळी पॅरिस हल्ल्याबद्दल :- पॅरिस च्या जनते बद्दल सहानुभूति अन दुःख पण हे विसरता कामा नये की ही फळे फ्रांस च्या जुन्या वसाहतवादी कर्माची आहेत बऱ्याचप्रमाणात!
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Sun, 11/15/2015 - 07:37 नवीन
खरोखरचं युद्ध सुरु होऊन दारापर्यंत पोचलं की घाबरगुंडी उड़ेल ती वेगळी
मला वाटतं तुम्ही अजुन सुद्धा विसाव्व्या शतकातल्या मिलिटरी प्रमाणे विचार करता. सध्या युद्ध दारापर्यंत पोहचूच द्यायचं नसतं. आणि ते करणारे सगळेच म्हणजे न्युक्लीयर सायंटीस्ट्स, सॉफ्टवेअर प्रोग्रामर्स, ड्रोन डिझायनर्स, अ‍ॅन्टी मिसाईल सिस्टीम डिझायनर्स हे सगळे अ-पारंपारिक सैनिकच आहेत. आणि हे जरी हातघाईची लढाई करू शकणार नसते तरी त्यामुळे त्यांचं महत्व कमी होत नाही. उलट येत्या काही दशकात रोबोट्स सैनिकांची जागा घेतील आणि पारंपारिक मिलिटरी फक्त रिझर्व कारणांसाठी वापरली जाईल. जो देश हे करत नाही (उदाहरणार्थ इराक) तो नष्ट होतो. जो हे करतो (उदाहरणार्थ अमेरिका) तो जगावर राज्य करतो. तेव्हा तुमच्या पेशाबद्दल (आणि तुमच्याबद्दल) आदर ठेवून असं म्हणावंसं वाटतं की लोकांना पारंपारिक युद्धाचं आकर्षण नाही पण शत्रूला रिमोट कंट्रोलनं नष्ट करण्याचं आकर्षण आहे आणि ते वाढत जाणार आहे. शिवाय शत्रू ला कसं नामोहरम करायचं याचा विचार प्रत्येक नागरिकानं करायला हवा. ते फक्त मिलिटरीचं काम असण्याचे दिवस गेले. जसं तुम्ही राजकारणाबद्दल, साहित्याबद्दल, शहरांबद्दल, विकासाबद्दल आणि बाकीच्या गोष्टींबद्दल बोलता तसं बाकीचे नागरिक युद्धाबद्दल बोलत असतील तर तुम्हाला वैषम्य का वाटावं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 11/15/2015 - 08:03 नवीन
वैषम्य वगैरे जाणवले का? :O असल्यास दोष माझ्या अभिव्यक्ति चा समजा, तुमच्यामाहिती करता म्हणून सांगतो मला त्यागोष्टीचे अजिबात वैषम्य नाही उलटे सैनिकी कार्यकलापासंबंधी नागरिकांचे वाढते ज्ञान हे एकार्थी उत्तमच लक्षण वाटते मला , आता थोड़े नागरिक सैन्य अन नागरिक आयुष्यातली सैनिकी वृत्ती ह्याच्या बद्दल, मुळात तुम्ही सांगितले ते बहुतांशी बरोबरच आहे, तरीही ड्रोन डिज़ाइनर, प्रोग्रामर वगैरे किमान ट्रेनिंग घेतलेले असले तर त्यांचे सल्ले ऐकायला ही उत्तम वाटतात, मला कोणी ही युद्धावर शास्त्रोक्त बोलले तर आवडते ९०% वेळा त्यातुन काहीतरी मला ही शिकता येते, पण दुर्दैवाने कित्येक म्हणजे बहुसंख्य वेळी हे फ़क्त भावनिक पातळी वर असते अन त्या बहुसंख्य भावनिक नागरिक सैनिकांच्या तोंडून "टाका एकदाचा अणुबॉम्ब अन करा खेळ खलास" वगैरे आंदोलने ऐकू येतात, म्हणून मी माझे वेगळे मत नोंदवले, बाकी ड्रोन डिज़ाइनर, प्रोग्रामर प्रभुति मंडळी उत्तम कार्य करतातच हे वेगळे सांगणे न लगे तरीही त्यांच्या ज्ञानातून तयार झालेली ही अव्वल कलाकारी वापरून मिशन एक्सीक्यूट करायला मात्र आजही विसव्या शतकाच्या लाइन अन फ़ाइल सिस्टम मधे ट्रेंड डिफेन्स फोर्सेजच लागतात इतके मात्र मी नक्की म्हणेन, बाकी येत्या काही दशकांत रोबोट्स वगैरे वगैरे मला आज तरी अशक्य वाटते नपेक्षा ड्रोन मागे ही(उत्तम डिज़ाइन असणारे) विसव्या शतकातल्या कालबाह्य सैनिकांच्या जागी कुशाग्र बुद्धिमान तांत्रिक हैंडलर असताना सुद्धा हॉस्पिटल्स अन लग्नाच्या वराती वर त्यांनी बॉम्ब पाडणे बंद केले तरी मिळवले येत्या काही दशकांत म्हणे मी. ता.क. :- आपण माझ्या विषयी माझ्या पेशाविषयी जो आदर दाखवत होता/आहात त्याबद्दल मी सदैव आपला ऋणी होतो/राहेन ह्याबद्दल शंका न बाळगणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
D
DEADPOOL Sun, 11/15/2015 - 15:14 नवीन
बापू ही रोबाटिक् आर्मी आई रोबोट, आपला रजनीकांत रोबोट आणि आइरन मॅन मुळे लोकप्रिय झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
काळा पहाड Sun, 11/15/2015 - 16:58 नवीन
http://www.globalresearch.ca/us-army-to-replace-human-soldiers-with-humanoid-robots/5371657
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Sun, 11/15/2015 - 17:26 नवीन
घ्या ते आर्मी रोबोट्चे चित्र देखील आई रोबोट मधलेच !!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
D
DEADPOOL Sun, 11/15/2015 - 07:41 नवीन
बापू याचे एकच उत्तर "सत्ता "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ब
बाबा पाटील Sun, 11/15/2015 - 08:22 नवीन
हे मात्र अंतिम सत्य आहे.आजही शिवाजी घडावा दुसर्‍याच्या घरात सैन्यात मुलगा असावा पण शेजार्‍याचा ही मानसिकता मात्र तशीच्या तशी आहे. नाहीतर जे ओंबाळेंना जमल ते मुंबई हल्ल्यात सापडलेल्या अथवा घटना स्थळी असणार्‍या हजारो मुंबईकरांना नक्की शक्य होत पण सामान्य माणुस प्रतिकाराकरीता उतरलाच नाही तो फक्त सरकारला शिव्या घालत होता आणी सशस्त्र सेनादलाची वाट पहात होता अन्यथा ११ विरोधात काही लाख प्रमाण जरा जास्तच व्यस्त होत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
अ
अनिरुद्ध.वैद्य Sun, 11/15/2015 - 19:37 नवीन
पॅरिस च्या जनते बद्दल सहानुभूति अन दुःख पण हे विसरता कामा नये की ही फळे फ्रांस च्या जुन्या वसाहतवादी कर्माची आहेत बऱ्याचप्रमाणात! >> भरपूर जनता असेच म्हणतेय ... पण का कुणास ठाऊक, फ्रांसच्या वसाहती मला अरेबीयात सापडल्याच नाहीत. कुठे होत्या ते सांगितल्यास आभारी राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 11/16/2015 - 05:20 नवीन
फ्रांस च्या इजिप्त ला चिकटुन असलेल्या मैंडेट (वसाहती) Image removed. फ्रांस च्या लिवांट व अनातोलिया प्रदेशातील वसाहती Image removed. आता मुद्दा उरतो फ्रांस ची वसाहतवादी कर्मे तर, पहिले एक अगदी प्रार्थमिक निरिक्षण ते म्हणजे असे की आजही जगात जिथे जिथे अशांतता पसरलेली आहे तिथे कुठल्या न कुठल्या यूरोपियन वसाहतवादी देशाने घाण करून ठेवलेली आहेच तुम्ही उदाहरण दखल वर उल्लेख केलेला लिवांट प्रदेश पहा (इस्राएल पलेस्टाइन किंवा पर्यायाने इस्राएल अरब जगत,इजिप्त प्रॉब्लम) किंवा अगदी भारत पाकिस्तान प्रॉब्लम बलूचिस्तान कश्मीर प्रश्न (ब्रिटिश देणगी). आपला मुख्य मुद्दा आहे मध्यपूर्वेतली फ्रेंच पापे, वर पाहिल्याप्रमाणे लिवांट चा भूमध्य समुद्री किनारा (आजचा लेबनॉन अन इस्राएल) हे पूर्णपणे फ्रेंच ताब्यात होते अन मधला इजिप्त सोडता पार लीबिया अल्जीरिया अन मोरक्को म्हणजे पश्चिम अफ्रीकन किनार्यापर्यंत फ्रेंच वर्चस्व होते, तरीही इजिप्त मधे ब्रिटिश अन फ्रेंच ह्यांचा ख़ासा रस त्याचे कारण म्हणजे सुएज कालवा, तो कालवा बांधताना ब्रिटिश लोकांनी तांत्रिक मदत इजिप्त ला केली करार बहुतेक हा की बांधकाम वसूली होइस्तोवर कालवा अन तिथून कोणाला जावु द्यायचे हे ठरवण्याचा हक्क ब्रिटिश लोकांना असणार होता, कावा हा की काहीही करता फ्रेंच लोकांस कालवा वापरता येऊ नये जेणे करून त्यांना पार केप ऑफ़ गुड होप (दक्षिण अफ्रीका) ला वळसा घालुन यायला भाग पडावे ज्यामुळे पूर्वेकडील फ्रेंच वसाहती (इंडोचायना म्हणजे वियतनाम थाईलैंड लाओस कंबोडिया सुमात्रा) मधुन येणारा मसाला त्यांना हाय ऑपरेटिंग कॉस्ट्स मुळे महाग विकावा लागावा म्हणजे थोडक्यात मसाला व्यापारात ब्रिटिश एकाधिकार अबाधित राहावा. ही झाली पूर्वपीठिका, आता आपण वळु आजच्या पॅरिस हल्ल्या कड़े किंवा लंडन सबवे बॉम्बिंग कड़े तर वरती बोलल्या प्रमाणे सुएज ताब्यात हवा होता दोघांनाही मग त्यासाठी साम दाम दंड भेद ओघाने आले ह्या निती मधे एक निती होती इजिप्त अस्थिर ठेवणे जेणे करून तुला न मला घाल कुत्र्याला होईल अन ह्यातुन दोन्ही यूरोपियन पावर्स ने मुस्लिम ब्रदरहुड कड़े साफ़ दुर्लक्ष केले कारण पाहुण्याच्या काठीने साप मेला तर उत्तमच न? ही मुस्लिम ब्रदरहुड म्हणजे आजच्या सगळ्या दहशतवादी संघटनांची आजी बरंका ! बिन लादेन चा आज्या हिच्या आद्य कार्यकर्त्यातला एक होता ह्यावरुन अन जैस्मिन क्रांति मधली आजही त्यांनी मारलेली मुसंडी ह्यावरुन घ्या समजून काय ते परिणाम आज यूरोप हल्ले ते निर्वासित प्रोब्लेम्स मधुन भोगतो आहे अन त्यांच्या कर्माची फळे ते भोगत आहेत म्हणून मला विशेष कणव येत नाही त्यांची फ्रांस ने तर पुढे जावुन स्वतःचीच वसाहत असलेल्या एलजीरियान नागरिकांस दिलेली द गॉल ह्यांच्या काळातील सपत्न वागणूक सुद्धा आहेच पण त्या मुद्द्यावर मला विशेष माहिती नाही म्हणून नो कॉमेंट्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
D
DEADPOOL Mon, 11/16/2015 - 06:18 नवीन
बापू हा प्रतिसादाच् वरीजीनल लेख म्हणून टाका. अप्रतिम मांडणी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 11/16/2015 - 06:36 नवीन
अहो डेडपूल साहेब माझा इतका अभ्यास नाही अजुन झालेला अजुन थोड़े डिटेल्स अन अभ्यास जमा झाला की मग पाहु स्वतंत्र लेखाचे, तोवर तुमच्याच धाग्यावर धिंगाणा करतो (तुमची परमिशन गृहीत धरुन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Mon, 11/16/2015 - 07:24 नवीन
फुल्ल अथोरिटी !!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ब
बोका-ए-आझम Tue, 11/17/2015 - 05:46 नवीन
अल्जीरियामध्ये अनेक फ्रेंच नागरिक राहात होते. त्यांची तिथे मालमत्ताही होती. दुस-या महायुद्धानंतर फ्रान्समध्ये अमेरिकन पाठिंब्यावर जे चौथं प्रजासत्ताक स्थापन झालं त्याला अल्जीरियन प्रश्न हाताळता आला नाही. नंतर चार्ल्स डी गाॅल यांच्या नेतृत्वाखाली पाचवं प्रजासत्ताक स्थापन झालं. ही राजवट अल्जीरियावरचा फ्रेंच हक्क अबाधित ठेवेल अशी अल्जीरियन फ्रेंच जनतेची आणि तिथल्या फ्रेंच सैन्याची अपेक्षा आणि खात्री होती. पण फ्रान्सला भेडसावणाऱ्या आर्थिक प्रश्नांमुळे डी गाॅलनी अल्जीरियाला स्वातंत्र्य दिलं. तिथल्या फ्रेंच नागरिकांना आणि काही सेनाधिका-यांना हे सहन झालं नाही आणि त्यांनी फ्रान्सविरुद्ध बंड पुकारलं. OAS ही संघटना त्यातून निर्माण झाली. डी गाॅल अाणि त्यांच्याशी एकनिष्ठ फ्रेंच लष्कर आणि पोलिस यांनी ही बंडाळी निष्ठुरपणाने मोडून काढली. त्यात सर्व पश्चिमी युरोपियन देशांनी फ्रान्सला सहकार्य केलं. आणि त्यामुळे OAS च्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी इतरत्र हातपाय पसरले. काही जण आफ्रिकेतील यादवी युद्धांमध्ये लढायला गेले उदाहरणार्थ बाआफ्रा, सिंबा, झैरे,इत्यादी. काही जणांनी मध्यपूर्वेतील देशांचा रस्ता पकडला. अशा लोकांना पेरोलवर ठेवणारा पहिला हुकूमशहा म्हणजे लिबियाचा मुअम्मर गद्दाफी आणि दुसरा म्हणजे सीरियाचा हफीझ अल असद. सध्या तिथे असलेल्या बाशर अल असदचा बाप. सुन्नी अरबांमध्ये दक्षिणी अरब उदाहरणार्थ सौदी, येमेन, सुदान इथले लोक आणि उत्तरी अरब उदाहरणार्थ लिबियन, लेबानीज, सीरियन, जाॅर्डेनियन असा फरक नेहमीच राहिला आहे. वहाबीझम हा दक्षिण अरबांमधून उदयास आला. अल कायदा, अल शबाब (सोमालिया), बोको हराम (नायजेरिया) हे दक्षिणी अरब. आयसिस हे उत्तरेकडील अरब. यांना एकेकाळी लिबियाचा पाठिंबा होता. लिबियाच्या Mukhabarat या गुप्तचर संघटनेने पाश्चिमात्य देशातल्या अनेक गुन्हेगारी आणि दहशतवादी संघटनांना मदत केली होती, उदाहरणार्थ बाडर-माइनहाॅफ गँग, आय.आर.ए., रेड ब्रिगेड. इत्यादी. आणि Mukhabarat चे प्रशिक्षणकर्ते म्हणजे सोविएत रशियाची K.G.B. त्यामुळे आयसिस हे फक्त फ्रेंचांचं पाप आहे असं म्हणणं थोडं एकांगी आहे. त्याला शीतयुद्धाचाही संदर्भ आहे. In fact, स्वतः केजीबी एजंट राहिलेल्या पुतिन यांचा रशिया आयसिसविरुद्ध यशस्वी होण्याचं एक कारण तेही आहे. गुरु को पता है कि चेला क्या करेगा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 11/17/2015 - 06:15 नवीन
सुभान अल्ला बोका भाऊ _/\_ दंडवत घ्या आमचा अल्जीरियन लोकांबद्दल मी उड़ता रेफेरेंस दिला होता अन त्यातले मला जास्त माहिती नाही हे ही बोललो होतो तस्मात् अल्जीरिया प्रॉब्लेम बद्दल इतके साद्यांत सांगुन माझी ज्ञानवृद्धी केल्याबद्दल खुप आभार हे वे सां न ल तुम्ही जी "नेक्स्ट स्टेप इन जेनेसिस ऑफ़ आयसिस एंड ओवरऑल इस्लामिक टेररिज्म" सांगितली ती सुद्धा अतिशय माहितीपूर्ण आहे अन वसाहतवादी यूरोपियन लोकांनी पेटवलेली ही मशाल पुढे त्यांच्यातलाच असंतुष्ट गट (पक्षी OSA) अन दक्षिणेकड़ील समुद्रांत शिरकाव नसलेल्या रशिया सारख्या अस्वस्थ अस्वलानी कशी अजुन धुप घातली हे सुद्धा रोचक आहे अन jigsaw मधे एक एक तुकडा जोडल्या जावा तशी आहे! Thanks once again
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 11/19/2015 - 10:44 नवीन
दंडवत! __/|\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 11/19/2015 - 10:41 नवीन
ही भानगड माहितीच नव्हती :) मी आपल इंडोनेशियात फ्रेंच वसाहती होत्या समजून चाललोय. धन्यवाद! सारे ब्रिटीश उचापती ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 11/19/2015 - 11:12 नवीन
इंडोचायनामध्ये. म्हणजे आजचा लाओस, कंबोडिया आणि व्हिएटनाम. १९५४ मध्ये हा भाग स्वतंत्र झाला. डाॅ.हो चि मिन्ह यांच्या नेतृत्वाखालील व्हिएटनामी सैन्याने फ्रेंचांचा दिएन बिएन फू या ठिकाणी निर्णायक पराभव करुन हा भाग स्वतंत्र केला. इंडोनेशियावर डचांचं राज्य होतं. त्याला डच ईस्ट इंडीज असं नाव होतं. मला वाटतं १९६० च्या आसपास इंडोनेशियाला स्वातंत्र्य मिळालं. चूभूद्याघ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
ब
बांवरे Mon, 11/16/2015 - 05:49 नवीन
फळे फ्रांस च्या जुन्या वसाहतवादी कर्माची आहेत बऱ्याचप्रमाणात!
असे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 11/16/2015 - 06:06 नवीन
वरील प्रतिसाद वाचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बांवरे
D
DEADPOOL Sun, 11/15/2015 - 07:45 नवीन
सध्या युद्ध दारापर्यंत पोहचूच द्यायचं नसतं. आणि ते करणारे सगळेच म्हणजे न्युक्लीयर सायंटीस्ट्स, सॉफ्टवेअर प्रोग्रामर्स, ड्रोन डिझायनर्स, अॅन्टी मिसाईल सिस्टीम डिझायनर्स हे सगळे अ-पारंपारिक सैनिकच आहेत.+१
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sun, 11/15/2015 - 08:41 नवीन
कालच आंतरजालावर पॅरिस बाबत माहिती पहिली. गेल्या जानेवारी महिन्यापासून ज्यू लोकांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढू लागले होते. ज्यूंचे पलायन हि सुरु झाले होते. फ्रांस सरकार या कडे कानाडोळा करीत होती. ज्यू लोकांना फ्रांस असुरक्षित वाटतो आहे, २०१४ मध्ये ७००० आणि २०१५ मध्ये आत्ता पर्यंत १०००० (अंदाज) ज्यूंचे फ्रांस मधून पलायन झाले. According to the JTA, 2014 saw 105 violent attacks and 423 anti-Semitic incidents. So far in 2015, the French Jewish community has suffered 241 violent attacks against Jews, within the overall 851 anti-Semitic incidents, more than double last year's figures. Other European countries reported similar increases including the Netherlands, UK, and Belgium. http://forward.com/news/breaking-news/213546/anti-semitic-incidents-double-in-france/ फ्रांस मध्ये ९% मुस्लीम जनसंख्या आहे, निवडणुकीच्या वेळी त्यांचे महत्व आहे, ज्यू फ्रांस सोडून गेले तर बरंच होईल असे अनेकांना वाटत असेल. ज्यू गेले तर जेहादी लोक शांत राहतील. सरकारने सख्त कार्रवाई केली नाही. सरकारचा हलगर्जीपणा भोवला. आपल्या देशात हि हाच प्रकार सुरु आहे, परिणाम आपल्यालाही भोगावे लागणार आहे.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 11/15/2015 - 08:44 नवीन
इजराइल ने फ्रांस सोडुन मातृभूमी उर्फ़ इजराइल ला परतु इछिणाऱ्या फ्रेंच ज्यु लोकांस उघड आमंत्रण दिल्याचे ऐकिवात होते त्यांना इसरायली नागरिकता वगैरे देण्यात येणार होती असे ऐकिवात आहे डिटेल लिंक वगैरे कोणाला मिळाल्यास जरूर पोस्टावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
प
पुष्करिणी Sun, 11/15/2015 - 23:14 नवीन
़जगाच्या पाठीवर कुठेही असणारा ज्यू हा इस्राइल चा बाय डिफॉल्ट नागरिक असतो आणि कधीही तिकडे जाउ शकतो. इट इज अ‍ॅन ओपन इन्व्हाइट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 11/15/2015 - 08:45 नवीन
आपल्या देशात हि हाच प्रकार सुरु आहे, परिणाम आपल्यालाही भोगावे लागणार आहे. मोदी आलेत न आता...
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Sun, 11/15/2015 - 09:41 नवीन
विप यांच्यासारखा सदस्य असं लिहीतो म्हणजे आश्चर्य आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
न
नांदेडीअन Sun, 11/15/2015 - 09:42 नवीन
Image removed. हे ट्विटर हॅंडल फक्त एक ‘बॉट’ आहे, पण याचा मोघम अंदाज बघा किती खरा ठरलाय. A spooky coincidence indeed !
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Sun, 11/15/2015 - 14:14 नवीन
माझ्या मते हे morphed आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
ग
गामा पैलवान Mon, 11/16/2015 - 08:29 नवीन
नांदेडीअन, रोचक ट्विटचित्रं आहे. आज दोन दिवस होऊन गेलेत पण माध्यमांत एकही प्रेत दिसलं नाही. हा योगायोग समजावा का? शार्ली एब्दोच्या वेळेसही एकही प्रेत दिसलं नव्हतं. हा काय प्रकार चाललाय? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा