Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पॅरिस हल्ला

D
DEADPOOL
Sun, 11/15/2015 - 05:28
🗣 171 प्रतिसाद
चार्ली हेब्दो हल्ला ही फक्त सूचना होती! १३ तारीख ही फ्रांस च्या इतिहासातील सर्वात काळी तारीख म्हणून मानली जाईल. २००च्या वर म्रुत्यू आणि अनेक जखमी. 'धिस टाइम इट्स वार!' भारतावर सुद्धा असा हल्ला होऊ शकतो. क्रुपया आपले मत मांडा.

प्रतिक्रिया द्या
33594 वाचन

💬 प्रतिसाद (171)
स
संदीप डांगे Tue, 11/17/2015 - 18:43 नवीन
मोदकजी, तुमचा रोख मोगा उर्फ दरेकर यांचे कडे असेल तर माझे मत एवढेच की तो आयडी मुस्लिम नाही. काड्या टाकून मजा घेणे आणि सिरिअसली एखादी वेगळी, दुसरी बाजू मांडणे यात फरक आहे. तरीही या मुद्द्यावर आतापर्यंत आपण सर्व सदस्यांनी केलेल्या चर्चेबद्दल धन्यवाद. मुद्दा उपस्थित केल्याशिवाय चर्चा कशी होणार? त्याबद्दल इतरांना एक वेगळा पैलूही असू शकतो व त्यावर मंथन घडू शकते हे कळून येते. मी इथे जी कन्स्पिरसी थेरी मांडतोय ती माझी स्वतःची वैयक्तिक मते नसून जगात काही लोक खरोखर असे विचार मांडतात. आजवर मी जे बघितले की लोक कंपु बनवून राहतात. मुस्लिमहेटर्स व मुस्लिमजगत यांचे स्वतःचे वेगवेगळे फोरम्स आहेत व ते कधीही एकमेकांच्या फोरम्सवर आपल्या बाजू मांडून चर्चा करत नाहीत. समविचारींमधे वैचारिक मैथुनाचा आनंद घेणे एवढेच त्यांचे कर्तव्य. घट्ट बसलेले समज सहजासहजी कोणीच सोडू शकत नाही. त्यामुळे कोणीच दुसर्‍या विचाराच्या संस्थळावर जाऊन असले काथ्याकूट करत नाहीत. मिसळपाववर हे सगळे मांडण्याचा माझा कायम एकच हेतू आहे की काही वेगळे विचार, भले ते असत्य, मिथ्या, कपोलकल्पित कथा, दंतकथा, मान्यता असू देत पण मांडायचे. लोकांना काय चिरफाड करायची ती करू देत. पण मी, संदीप डांगे, म्हणून इथे टंकतोय म्हणजे तेच माझे विचार आहेत असे प्रत्येक बाबतीत नसते. ना मी अमेरिकाद्वेषी आहे ना मुस्लिमप्रेमी. किंवा उलटही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 11/17/2015 - 18:54 नवीन
तुमचा रोख मोगा उर्फ दरेकर यांचे कडे असेल तर त्या आयडीकडे रोख नाही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/17/2015 - 18:28 नवीन
मिपावर कुणी मुस्लिम आयडी का नाहित व असलेले इथे का लिहित नाहीत ह्या प्रश्नाचं आज उत्तर मिळाले.
आम्हाला पण सांगा की. काये ना, आम्ही कधी आयडीच्या मागची जात शोधायचा प्रयत्नच केला नाही बघा! बाकी, डांगे म्हणजे बामण काय हो? एक अण्णा डांगे आहेत, तुमचे कोण ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 11/17/2015 - 18:53 नवीन
काये ना, आम्ही कधी आयडीच्या मागची जात शोधायचा प्रयत्नच केला नाही बघा!
अच्चं जालं का.. बलं बलं, आपण त्या ताईंना, दादांना शांगू हां, त्यांना सगळ्यांचे जातीधर्म पक्के माहित आहेत हां... दोन्त वली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/17/2015 - 18:56 नवीन
अच्चं जालं का.. बलं बलं, आपण त्या ताईंना, दादांना शांगू हां, त्यांना सगळ्यांचे जातीधर्म पक्के माहित आहेत हां... दोन्त वली...
मग ताई दादांनाच येउ देत की इकडे. तुमच्या लडीवाळ थेअरी लेखनापेक्षा काहीतरी वेगळे तरी वाचायला मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 11/17/2015 - 19:23 नवीन
अच्छा तर आपणांस मुस्लिम-बॅशिंगच वाचायचे आणि चर्चायचे आहे तर...? तेच वर म्हणत होतो. सिद्ध करण्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Wed, 11/18/2015 - 05:42 नवीन
खीक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
वेल्लाभट Wed, 11/18/2015 - 06:56 नवीन
हाहाहाहाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पुण्याचे वटवाघूळ गुरुवार, 11/19/2015 - 06:35 नवीन
फेसबुक हे अमेरिकन हेरगिरीसाठीचे एक उत्तम आधुनिक आयुध असून याद्वारे जगभरच्या नागरिकांच्या मनात काय चालले आहे याचा धांडोळा घेत आपल्याला हवे तेच विचार जगभर पसरवायचे हे फेसबुकचे उद्दिष्ट आहे.
' मला वाटते की मिसळपावसुध्दा अमेरिकन सरकारचेच हेरगिरीचे अत्याधुनिक साधन आहे. मिपावर सगळे सदस्य काय लिहित असतात त्याकडे अमेरिकेचे बारीक लक्ष असते. बुश प्रशासनाच्या शेवटच्या दिवसात बुशबाबाला फारसे काम नव्हते तेव्हा २००८ मध्ये विसोबा खेचरना बुशने व्हाईट हाऊसमध्ये बोलावून घेतले होते हे माहित नाही का? मिसळपावमध्ये अमेरिकन इन्व्हॉल्व्हमेन्ट इतकी जुनी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ह
होबासराव Mon, 11/16/2015 - 09:04 नवीन
सर्व दहशतवादी संघटनांना मिळणारी शस्त्रास्त्रे कुठून येतात ? खरच प्रत्येक हल्ल्याच्या नंतर हाच प्रश्ण पडतो.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 11/16/2015 - 09:33 नवीन
दोन रस्ते रायतेत गाववाले १ अमेरिकन असल्याचे (असला म्हणजे गोळा बारूद) चे ब्लॅक मार्केटिंग ह्याचा रस्ता सेंट्रल अन साउथ अमेरिकन ड्रग कार्टेल्स थ्रू किंवा अलास्का थ्रू असतो २ सोवियत रशिया फुटल्या नंतरच्या गोंधळात गायब झालेली हत्यारे ज्यांचे कुठलेच ऑडिट नाही किंवा खानेसुमारी झालेली नाही ३ तीसरा मार्ग राजमार्ग म्हणजे एकमेकांच्या प्रभावक्षेत्रातल्या बंडखोरांस विरुद्ध सरकारांनी लाडाकोडाने हत्यारे पुरवणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
क
कपिलमुनी Tue, 11/17/2015 - 07:26 नवीन
Lord Of War हा चित्रपट बघा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
स
सुबोध खरे Tue, 11/17/2015 - 07:35 नवीन
Around 100 million Ak-47s are circulating around the world, with 47 national armies utilizing the weapon. Russia has stated that it only accounts for 10 to 12 percent of the sales of the weapon, with the rest being unlicensed and counterfeit copies. counterfeit production of AK-47s stems from the fact that the inventor of the AK-47 Mikhail Kalashnikov “never patented the rifle’s design – the thought had never occurred to him or anyone else under the Soviet regime. http://www.havocscope.com/tag/counterfeit-weapons/ http://www.havocscope.com/black-market-prices/ak-47/ http://www.havocscope.com/tag/arms-trafficking/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
D
DEADPOOL Mon, 11/16/2015 - 09:55 नवीन
बापू या विषयावर बोलण्याचा अधिकार तुमचाच!!!!!!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 11/16/2015 - 11:17 नवीन
जी२० बैठक चालू असलेल्या तुर्कस्तानातही आत्मघातकी हल्ला झालाय म्हणे आज http://www.usnews.com/news/world/articles/2015/11/15/turkey-suicide-bomber-wounds-5-turkish-police-during-raid
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Mon, 11/16/2015 - 11:27 नवीन
फ्रान्सने म्हणे हवाई हल्ले चालू केलेत.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Mon, 11/16/2015 - 11:52 नवीन
भारत आंतरजालावरच्या आयसिस समर्थकांवर कारवाई सुरू करणार असल्याच्या बातम्या आहेत. मोगा उर्फ हितेशचं नाव मिपातर्फे नॉमिनेट करा.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 11/16/2015 - 12:00 नवीन
'मिलिटरी प्रीसीजन'ने केल्या जाणार्‍या हल्ल्याच्या ठिकाणी प्रत्येकवेळी 'पासपोर्ट' सापडणे... मजेशीर आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Mon, 11/16/2015 - 20:04 नवीन
हा मुद्दा मलाही खटकला होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
D
DEADPOOL Tue, 11/17/2015 - 03:12 नवीन
'मिलिटरी प्रीसीजन'ने केल्या जाणार्या हल्ल्याच्या ठिकाणी प्रत्येकवेळी 'पासपोर्ट' सापडणे... मजेशीर आहे.>>>>>>१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
विकास Tue, 11/17/2015 - 03:46 नवीन
यात मजेशीर असे काहीच नाही. दोन शक्यता असतात. पहीली सरळसोट धरली जाणारी म्हणजे ती दहशतवादी व्यक्ती त्या पासपोर्ट असलेल्या देशातून आलेली आहे अशी. मात्र ही शक्यता सरकारी यंत्रणा गृहीत धरत नाहीत. या संदर्भात देखील धरली गेली नाही असेच येथे माध्यमात वाचले/ऐकले. त्यामुळे ते सतत "कथीत" असेच म्हणताना ऐकले. ते पासपोर्ट आणि डिएनए वगैरे प्रकाराने (फोरेन्सिक) चाचणी करून झाल्यावर मगच ते जे काही असेल ते ठरवतात. तरी देखील अशा बातम्यांचे परीणाम घडायचे ते घडतातच. उदा. मॅसेच्युसेट्स आणि जॉर्जिया या (किमान) दोन राज्यांच्या गवर्नर्सनी सिरीयन निर्वासितांना घेणार नाही असे सांगितले. (मॅस गर्वर्नरने ओबामा सरकारने निर्वासितांना देशात घेताना कुठली तपासणी - प्रीस्क्रिनिंग करणार आहेत ते सांगावे असे सांगितले आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL
स
संदीप डांगे Tue, 11/17/2015 - 07:24 नवीन
विकासजी, हे सगळे 'सायकॉलॉजिकल वॉर' आहे. तुम्ही देत असलेले विश्लेषण हे बुद्धिमंत, विचारी, प्रत्येक गोष्टीचा शेवटपर्यंत माग ठेवून निष्कर्ष काढणार्‍या लोकांसाठी ठिक आहे. पण सामान्य लोक फक्त बातम्यांमधे पासपोर्टचा उल्लेख वाचतात. जुजबी संबंध लावून मेमरी फिक्स करतात. अशाच छोट्या छोट्या बिनमहत्त्वाच्या वाटणार्‍या बातम्यांनी एक मोठी अदृश्य पण मजबूत प्रतिमा शत्रूपक्षाबद्दल तयार केली जाते. पासपोर्टचा उल्लेख करून बातमीदार गोत्यात येत नाही. कारण त्यावर कोणी प्रश्न विचारले तर 'कथित' हे बिरुद लावलेलेच असते. पण बातम्या आपले काम अचूक करून जातात. जेव्हा माध्यमांचं सर्व जग काही मूठभर लोकांच्या हाती आहे तेव्हा समोर येणार्‍या बातम्यांवरच पूर्ण विश्वास मी तरी ठेवत नाही. बातम्यांशिवाय आपल्याकडे घडलेल्या घटनेबद्दल काहीही पुरावा नसतो. जंगलामधे विरप्पन मारला ही बातमी आली म्हणून तो मेला असे मानायचे. खरोखर विरप्पन जीवंत आहे, की आधीच मेला, की त्यात अजून काही गौडबंगाल आहे, याचे सत्य आपणा पर्यंत पोचूच शकत नाही. माझे आयसिसबद्दलचे मत वरच मांडले आहे. आयसिसने इजरायलवर एकदाही हल्ला केला नाही. सर्व मुस्लिम जगताची सहानुभूती पॅलेस्टाइनकडे असतांना त्याबद्दल आयसिसची भूमिका अजून समजली नाही. आयसिस इज अ क्राफ्टेड टेररीजम. आयसिसचा फुलफॉर्म माहित आहे का असे विचारणारे अमेरिकाप्रेमातून बाहेर येतील तेव्हा स्वच्छ डोळ्यांनी बघणे शक्य होईल. आयसिस नेहमी इजरायलच्या शत्रूंवरच का हल्ले करते याचे उत्तर कुणी जाणकार देत असेल स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
भ
भंकस बाबा Tue, 11/17/2015 - 20:22 नवीन
इस्राएल वर कशा प्रकारे हल्ला करावा इसिसने? इस्राएलच्या आसपास असलेल्या एका इस्राएलच्या दोस्त राष्ट्रचे नाव सांगावे आपण. आपल्या भारतात असलेला दहशतवाद कोणी क्राफ्ट केला आहे? संदीपजी आतातरी माना की हे धर्मवेड आहे. मी स्वतः एका मुस्लिम वस्तीत राहतो. माझ्या शेजारील मुस्लिम जीवाला जीव देणारे आहेत. पण धर्माची गोष्ट निघते तेव्हा ते काय बोलतात हेच त्यांना कळत नाही.जगातील घडणारी प्रत्येक घटना ही कुराण वा हदीस मधे आधीच नोंद झालेली असते हयावर प्रत्येक मुस्लमानाची श्रद्धा असते. त्यामुळे कयामतची वेळ आली आहे सांगून ह्यांना आरामात भड़कवु जाऊ शकते. गोवंशहत्याबन्दीला माझा विरोध आहे. पण गाई बैल मारून त्यांची मुंडकि दर्शनी भागात मांडणार्याच्या मानसिकतेला तुम्ही काय म्हणाल . एक उदाहरण देतो काही दिवसांपूर्वी आमच्या भागात असलेल्या एका मंदिरात एकाने भरधाव गाडी घुसवली. गाडी चालवणारा मुस्लिम होता.धड़क इतकी जबरदस्त होती की मंदिराची लोखंडी जाळी तोडून गाडी आत घुसलि आतील चार माणसे जबर घायाळ झाली. उपस्थित असलेल्या इतर माणसानी त्या चालकाला चोप दिला पोलिस केस झाली. प्रकरण संपले. आता हीच स्थिति तुम्ही उलटी करुन बघा . म्हणजे मशिद आणि हिन्दू वाहनचालक . तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 11/17/2015 - 20:44 नवीन
माझ्या शेजारील मुस्लिम जीवाला जीव देणारे आहेत. पण धर्माची गोष्ट निघते तेव्हा ते काय बोलतात हेच त्यांना कळत नाही.जगातील घडणारी प्रत्येक घटना ही कुराण वा हदीस मधे आधीच नोंद झालेली असते हयावर प्रत्येक मुस्लमानाची श्रद्धा असते. त्यामुळे कयामतची वेळ आली आहे सांगून ह्यांना आरामात भड़कवु जाऊ शकते.
यासाठी धन्यवाद! मुस्लिमवस्तीत फक्त तुम्हीच राहता असा काहीसा आपला गैरसमज आहे. असो. कळव्यात मी अगदी मशिदीसमोरच्या बिल्डिंगीत राह्यलोय एक वर्ष. नाशिकमधे एक वर्ष मुस्लिम वस्तीत ऑफिस होते, तेही एका मुसलमानाचे. तुम्हाला होत असलेला त्रास मला कधीच झाला नाही. याला काय म्हणावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
ट
टवाळ कार्टा Tue, 11/17/2015 - 20:55 नवीन
पण सगळीकडेच अशी चांगली माणसे भेटतील असेही नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 11/17/2015 - 21:44 नवीन
टका, मला अगदी हेच म्हणायचे आहे आणि असते. पण सरसकटीकरणाने, ब्रेनवॉशिंगने आपण एखाद्या समूहाबद्दल एक प्रतिमा बनवुन घेतो आणि त्याच प्रतिमा आपल्या मनातून बाहेर प्रक्षेपित होतात. मग आपल्याला सर्व जग तसेच भासू लागते. एक उदा. नाशिकमधे दुधबाजार नावाचा खास मुस्लिम एरिया आहे. माझ्या मेव्हण्याने त्या एरिआबद्दल भयंकर काय काय सांगितले, की तिकडून जातांना कुणाशी काही वादावादी झाली तर ते लोक सरळ कापुन टाकतात वैगेरे... आता असे काय काय भयंकर ऐकले की कोण कसला जातो तिकडून. बरे कधी जाण्याची वेळ आलीच तर जीव मुठीत धरुन जायचे, कुठे काय खुट्ट होऊ नये ही दक्षता. हीच ती 'दहशत'. जी मेव्हण्याच्या 'रीपोर्टींग'ने माझ्या मनात झालेली. पण नेहमीच तिकडून येणेजाणे सुरु झाल्यावर नेहमीसारखाच बाजार असलेला तो रस्ता जाणवला. त्यात कधीही वावगे आढळले नाही की घडले नाही. पण मला एकही अनुभव नसतांना उगाच मनात भीती राहतेच. मग कधीकाही चिमूटभर झाले तरी पराचा कावळा व्हायला वेळ लागत नाही. दुसरं असं की मुस्लिम भागात ऑफिस असतांना काही तिथली रहिवासी मुलं बारा-चौदा वयोगटाची खेळता खेळता माझ्या पार्क केलेल्या कारवर अंग टाकुन द्यायचे, खेटून उभी राहायची. त्यांना ओरडून हाकालायची हिंमत होत नव्हती. न जाणो आपण ओरडलो आन कुठून हे यांचे माय-बाप तलवारी घेऊन येऊन आपली खांडोळी करायचे. ही 'दहशत'. पण एकदा हिंमत करून ओरडलो तर ती मुले नंतर कधीच कारच्या वाटेला गेली नाहीत. असले प्रकार इतर वस्तीतल्या मुलांकडूनही होतात, त्यांनाही ओरडलो आहे. तिथे ही भीती नसते. पण त्यांचे पालक अंगावर येण्याचे चान्सेस भरपूर असतात. (मुंबईत एवढ्यातच कुणा ड्रायवरने मुलास ओरडले म्हणून त्याच्या पालकांनी ड्रायवरला बेदम चोपला अशी बातमी बघितली.) आतिवासताई, बिका, पेठकरकाका व इतर अनेक सन्माननीय मिपासदस्य मुस्लिमदेशांमधे राहून, जवळून अनुभव घेऊन आहेत. त्यांचे अनुभव माझ्यापेक्षा लक्षपटीने मोठे आणि प्रभावी आहेत. त्यांच्या लिखाणातूनही आपल्याला ही चांगली माणसे, देश दिसतातच. पण इकडे काही आयडींना 'मुस्लिमांमधे चांगले काही असू शकते' हे म्हटले की मिर्च्या झोंबतात. त्यांच्यासाठी मुस्लिम हे कायम रानटी, तलवार बाहेर काढून अ-मुस्लिमांच्या गळ्याचा घोट घ्यायला टपलेले, चार बायका करणारे असलेच काही असतात. आता असतात तर असू देत बापडे. मी तरी यापुढे याविषयावर एक शब्दही लिहणार नाही असे ठरवले आहे. ज्यांना जे विचार घट्ट धरून बसायचे आहे ते असू देत. त्यांच्यातल्या विसंगती दाखवण्याचा प्रयत्न केला की मिर्च्या झोंबतात हे कळले आहे. तस्मात्... या विषयाला यापुढे .... राम राम. जगात बर्‍याच प्रकारचे लोक असतात. सरसकटीकरण टाळावे याच मताचा मी आहे. बाकी जैसी जिसकी सोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
ट्रेड मार्क Tue, 11/17/2015 - 22:36 नवीन
त्यांच्या धर्माविरुद्ध काही बोलून बघा काय होतं ते. आणि तोच मुख्य फरक आहे. एरवी अतिशय चांगले वागणारे हे लोक मात्र धर्मासंबंधी काही असलं की एकदम कट्टर होतात. अर्थात सगळेच लोक असे आहेत असं नाही पण प्रमाण मात्र इतर धर्मियांपेक्षा नक्कीच बऱ्यापैकी जास्त आहे. हिंदू देवतांची नग्न चित्रे काढली गेली, चित्रपटांमध्ये चेष्टा केली गेली पण हिंदूंनी एवढा कडवा प्रतिकार केला नाही, उलट PK सारखे चित्रपट तर शेकडो कोटींचा धंदा करून गेले. पण तेच ए आर रेहमाननी नुसतं एका चित्रपटाचं संगीत दिलं तर मात्र फतवा निघाला. हेच सरसकटीकरण हिंदूंबद्दल पण नको हेच म्हणणं आहे. एका दादरी घटनेनी समस्त हिंदू, रा. स्व. संघ आणि भाजप कम्युनल झाले. पण मुंबई दंगल, २६/११, संसदेवरील हल्ला, मुंबई लोकल मधील स्फोट, ९/११, शर्ली हेब्डो मधील हत्याकांड, आत्ताचे हत्याकांड आणि इतर बरीच हत्याकांडे, सामुहिक बलात्कार हे होऊन सुद्धा मुसलमान मात्र शांतताप्रिय. जरी अगदी त्या त्या घटनांच्या वेळी एखाद्या दहशतवादी संघटनेनी जबाबदारी घेतली असेल की ज्या संघटनेत फक्त एकाच धर्माचे लोक आहेत, तरी पण तो धर्म आणि ते लोक मात्र शांततेचे दूत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ट
टवाळ कार्टा Tue, 11/17/2015 - 22:49 नवीन
सहमतीबद्दल धन्यवाद पण सगळेच एरीआ असे नसतात याबद्दल तुम्हीसुध्धा सहमत व्हाल वर जे लिहिलेत त्याप्रमाणे चांगला अरीआ एरीआ कोणता आणि दुसरी काळी बाजू असणारा एरीआ कोणता हे कशावर पारखून घेणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ट
टवाळ कार्टा Wed, 11/18/2015 - 10:52 नवीन
यावर प्रतिसाद नाही??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 11/18/2015 - 00:51 नवीन
एक उदा. नाशिकमधे दुधबाजार नावाचा खास मुस्लिम एरिया आहे. काय आठवण दिली राव! कोकणी दरबार नामे खाद्य तीर्थक्षेत्र इकडेच आहे न हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ब
बोका-ए-आझम Wed, 11/18/2015 - 06:01 नवीन
विंग्रजीत आहे. भाषांतर करायला वेळ मिळाला नाही. तरी आपल्या या धाग्याशी सुसंगत आहे म्हणून इथे टाकतोय. *from facebook* A German's View on Islam - worth reading because this is by far the best explanation of the Muslim terrorist situation I have ever read. His references to past history are accurate and clear. The author of this email is Dr. Emanuel Tanya, a well-known and well-respected psychiatrist--a man, whose family was German aristocracy prior to World War II, and owned a number of large industries and estates. When asked how many German people were true Nazis, the answer he gave can guide our attitude toward fanaticism. 'Very few people were true Nazis,' he said, 'but many enjoyed the return of German pride, and many more were too busy to care. I was one of those who just thought the Nazis were a bunch of fools. So, the majority just sat back and let it all happen. Then, before we knew it, they owned us, and we had lost control, and the end of our world had come. My family lost everything. I ended up in a concentration camp and the Allies destroyed my factories.' We are told again and again by 'experts' and 'talking heads' that Islam is the religion of peace and that the vast majority of Muslims just want to live in peace. Although this unqualified assertion may be true, it is entirely irrelevant. It is meaningless fluff, meant to make us feel better, and meant to somehow diminish the specter of fanatics rampaging across the globe in the name of Islam. The fact is that the fanatics rule Islam at this moment in history. It is the fanatics who march. It is the fanatics who wage any one of 50 shooting wars worldwide. It is the fanatics who systematically slaughter Christian or tribal groups throughout Africa and are gradually taking over the entire continent in an Islamic wave. It is the fanatics who bomb, behead, murder, or honor-kill. It is the fanatics who take over mosque after mosque. It is the fanatics who zealously spread the stoning and hanging of rape victims and homosexuals. It is the fanatics who teach their young to kill and to become suicide bombers. The hard, quantifiable fact is that the peaceful majority, the 'silent majority,' is cowed and extraneous. Communist Russia was comprised of Russians who just wanted to live in peace, yet the Russian Communists were responsible for the murder of about 20 million people. The peaceful majority were irrelevant. China's huge population was peaceful as well, but Chinese Communists managed to kill a staggering 70 million people. The average Japanese individual, prior to World War II, was not a warmongering sadist. Yet, Japan murdered and slaughtered its way across South East Asia in an orgy of killing that included the systematic murder of 12 million Chinese civilians, most killed by sword, shovel, and bayonet. And who can forget Rwanda, which collapsed into butchery. Could it not be said that the majority of Rwandans were 'peace loving'? History lessons are often incredibly simple and blunt. Yet for all our powers of reason, we often miss the most basic and uncomplicated of points: peace-loving Muslims have been made irrelevant by their silence. Peace-loving Muslims will become our enemy if they don't speak up, because like my friend from Germany, they will awaken one day and find that the fanatics own them, and the end of their world will have begun. Peace-loving Germans, Japanese, Chinese, Russians, Rwandans, Serbs, Afghans, Iraqis, Palestinians, Somalis, Nigerians, Algerians, and many others have died because the peaceful majority did not speak up until it was too late. Islamic prayers have now been introduced into Toronto and other public schools in Ontario, and, yes, in Ottawa too while the Lord's Prayer was removed (due to being so offensive?! To whom? Not to the vast majority of Canadians!). The Islamic way is only peaceful until the fanatics move in. In Australia, and indeed in many countries around the world, many of the most commonly consumed food items have the halal emblem on them. Just look at the back of some of the most popular chocolate bars, and at other food products in your local supermarket. Foods on aircraft have the halal emblem, just to appease the privileged minority who are now rapidly expanding throughout the world. In the U.K, the Muslim communities refuse to integrate and there are now dozens of ?no-go? zones within major cities across the country that the police force dare not intrude upon. Sharia law prevails there, because the Muslim community in those areas refuses to acknowledge British law. As for we who watch it all unfold, we must pay attention to the only group that counts -- the fanatics who threaten our way of life. Anyone who doubts the seriousness of this issue and just deletes this email without sending it on, is contributing to the passiveness that allows the problems to expand. So, I beg you, extend yourself a bit and send this on and on and on in the hope that thousands, world-wide, read this, think about it, and send it on - before it's too late . . .. because we remained silent.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
भ
भंकस बाबा Wed, 11/18/2015 - 04:18 नवीन
अशा अनेक घटना आहेत ज्या मी इथे देण्याचे टाळत आहे. शाब्दो अर्ली च्या घटनेनंतर मला एकहि मुसलमान या घटनेचा विरोध करताना दिसला नाही. जो विरोध होता तो मगरीचे अश्रू होते. अगदी कालची बातमी घेतली तरी आझम खान चे बोलणे हे मुस्लिम मनाचे प्रतिनिधित्व करते. ओवेसिने देखील वेगळ्या भाषेत पेरिस वरील हल्ल्याचे समर्थन केले आहे. हिंदू नेत्यांनी कितीही आरङाओरडा केला तरी हिन्दू टोकाची भूमिका घेत नाही. गुजरातचे उदाहरण देऊ नका. गुजरातमधील जनतेला विचारा. क्रिकेटमधे पाकिस्तान जिंकले की अहमदाबाद मधे दीवाळी साजरी होत होती. गुजराती तसे प्रतिकार करण्यात नेहमी मागेच् असतात. पण गोधराच्या घटनेने इतक्या वर्षाचा संताप उफाळून आला. मुस्लिमाचा कैवारि म्हणवण्यार्या आजम ख़ानने मुज्झफरनगर दंगलीच्या वेळी सोईस्कर मौन बाळगले होते. का? कारण तेथील बहुसंख्य मुस्लिम शिया होते. आजही भारतात शिया मुस्लिमाना राजकारणात मानाचे स्थान नाही. हिन्दू धर्मातील अनुसूचित जातिना आरक्षण असते. तुम्ही हां शियाचा चेंडू आरक्षण मुद्द्यात् टाकून बघा. सुन्नी मुस्लिम देश पेटवण्याची भाषा करतील. सर्वाना समान मानणार्या मुस्लिम धर्मात ९२ (चु.भू.दया.घ्या.)अलग अलग जाती आहेत. हे मुस्लिम आपल्याच जमातीने बांधलेल्या मशीदित जातात. आपल्याला कोणत्याही देवतेचे देऊळच काय चर्च वा दर्गा पण पाया पडायला चालतो. अगदी आत्ता पण सीरियन निर्वासिताना यूरोपियन राष्ट्र आसरा देत आहेत. गड़गंज श्रीमंत असलेली मुस्लिम राष्ट्र यांना लांबच ठेवत आहेत कारण ते त्यांच्या जमातीचे नाही आहेत ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पुण्याचे वटवाघूळ गुरुवार, 11/19/2015 - 06:49 नवीन
'मिलिटरी प्रीसीजन'ने केल्या जाणार्‍या हल्ल्याच्या ठिकाणी प्रत्येकवेळी 'पासपोर्ट' सापडणे... मजेशीर आहे.
संदीपराव, तुम्ही कधी परदेशात गेला आहात की नाही हे माहित नाही. पण असा मुद्दा तुम्ही काढत आहात त्याचाच अर्थ तुम्ही बाहेर गेला नसावात असे वाटते. अमेरिकेत ड्रायव्हिंग लायसेन्स तर सर्वत्र आपल्याजवळ असतेच. ते फोटो आय.डी म्हणून चालते. अशी फोटो आय.डी कधी लागेल हे काहीच सांगता येत नाही. बडवायझर विकत घ्यायची असेल किंवा पबमध्ये जायचे असेल तर ती आय.डी दाखवावी लागेते (वय १८ पेक्षा जास्त आहे हे प्रूव्ह करायला). अशी आय.डी कधी दाखवायला लागू शकते. युरोपात इतक्या प्रमाणात रेफ्युजी आले आहेत तेव्हा पासपोर्ट दाखवून आपले रेफ्युजी स्टेटस सिध्द करायला अडचण पडणार नाही. रेफ्युजींच्या नावावर भलतेच कोणी घुसले आहेत का हे तिथले पोलिस चेक कशावरून करत नसतील? अशावेळी पोलिसांना दाखवायला पासपोर्ट गरजेचा आहेच.आणि वेळेआधी जर पोलिसाने पकडले तर हल्ला करता येणार नाही हे गणित कशावरून नसेल? म्हणून कशावरून त्याने पासपोर्ट बरोबर ठेवला नसेल? संदीपराव, जरा नाशिकच्या बाहेर पडून बघा. जग बरेच मोठे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 11/19/2015 - 17:48 नवीन
वटवाघुळजी, माझ्या ज्ञानावर/फिरण्यावर पराकोटीचा विश्वास दाखवल्याबद्दल शतशः धन्यवाद! काही बातम्या देतो: गार्डीयन One of the most chilling details from the Paris attacks is that the passport of a Syrian refugee was found on or near the body of a dead suicide bomber. The Greek government has subsequently said that someone using the passport was among the refugees who landed in the Greek islands in early October, and the Serbian government says the passport was again used to cross its southern border a few days later. This development has increased fears of Isis infiltrators among the thousands of desperate refugees arriving in Europe. Allies of the German chancellor, Angela Merkel, have voiced security concerns over her open-door policy and one, the Bavarian finance minister Markus Söder, told a German newspaper: “The days of uncontrolled immigration and illegal entry can’t continue just like that. Paris changes everything.” The new government in Poland is using the news as a reason to back out of an agreement to take in several thousand Syrians. And the front page of the British newspaper the Mail on Sunday stated definitively that the attackers “sneaked into Europe as fake Syrian refugees”. अलजझिरा अमेरिका : दिनांकः १७ नोव्हेंबर २०१५ Confusion over a Syrian passport found near the body of one of the six suicide bombers who blew themselves up in Paris last week mounted after investigators on Tuesday said there are indications the travel document actually belongs to a Syrian regime soldier. Far-right political groups across Europe and the governors of several U.S. states have presented the discovery of the passport as an argument against resettling more of the refugees currently streaming out of conflict zones in Syria, as well as other parts of the Middle East and Africa. News agency Agence France-Presse quoted a source close to the French investigation as saying the passport — in the name of Ahmad al-Mohammad, born in the Syrian city of Idlib on Sept. 10, 1990 — may have belonged to a soldier loyal to Syrian President Bashar al-Assad, whose forces are battling the Islamic State in Iraq and the Levant (ISIL) and several other armed groups. द गार्डीयन : दिनांक १७ नोव्हेंबर २०१५ Serbian police have arrested a man carrying a Syrian passport with the same details as one found near the body of one of the Paris suicide bombers, police sources told the Guardian. The passport bears the same name and details – but a different photograph – as the document found near one of the men who attacked the Stade de France. Serbian officials said that they believe both passports are fake, but added that they are working with French investigators to establish the origin of the documents. French police found a passport in the name of Ahmad Almohammad, 25, near the body of one of the men who attacked France’s national football stadium on Friday. http://www.theguardian.com/world/2015/nov/17/serbian-police-arrest-man-with-syrian-passport-matching-paris-attackers http://www.bbc.com/news/blogs-trending-34835005 "Let me underline, the profile of the terrorists so far identified tells us this is an internal threat," Federica Mogherini, the High Representative for Foreign Affairs and Security Policy/Vice-President of the European Commission, said after a meeting with EU foreign ministers. "It is all EU citizens so far. This can change with the hours, but so far it is quite clear it is an issue of internal domestic security." All Paris Attackers Identified So Far Are European Nationals आता तुमच्याच प्रतिसादानुसार आता माझे गुडघ्यात असलेल्या डोक्यात खालील प्रश्न उपस्थित झाले आहेत. १. मी वापरलेला 'मिलिटरी प्रीसीजन' हा शब्द आपण वाचलाच नाही का? मिलिटरी प्रीसीजननुसार असे हल्ले करायचे असतील तर त्याची पुर्वतयारी कैक महिने आधी झालेली असते. त्याबद्दल लागणार्‍या बारिक सारिक गोष्टींची तपशीलात पुर्तता केली जाते. अशी पुर्तता हल्ला शंभरटक्के (काहीही म्हणजे काहीही झाले तरी) यशस्वी होण्यासाठी असते. तेव्हा पासपोर्ट बाळगणे हा हल्लेखोरांना आवश्यक अशी गोष्ट असेल तर ते कुठल्या देशाचा पासपोर्ट वापरतील व का? २. पोलिस कधीही चेक करू शकतात म्हणून सर्व फ्रेंच नागरिक (यात सर्व वंशाचे, रंगाचे, वर्णाचे, वर्णनाचे आले) आपले पास्पोर्ट घेऊन आपल्याच देशात फिरतात का? ३. 'परदेशस्थ वा एलियन' दिसणारे मनुष्यबळ अशा हल्ल्यांसाठी वापरले जाते का? वापरले जात असेल तर कुठेही चेकिंग होऊ शकते म्हणून त्यास चुकवण्यासाठी तेवढे ट्रेनिंग आणि सक्षम कागदपत्रे संबंधितांजवळ असतात. ह्या हल्ल्याच्या वेळी ती नसतील हे का नाकारावे? त्यासाठी त्यांना सीरीयन पासपोर्टच वापरायची काय गरज पडावी? ४. हल्लेखोर वा हल्ल्याचे सूत्रधार स्वतःचेच लोक धोक्यात येतील असे कागदपत्र जवळ बाळगून हल्ले करायला जाण्याइतकी बाळबोध असतील असे वाटते का? ५. सुसाईड बॉम्बरच्या जवळ दुसराच कोणी जेन्युइन रेफ्युजी नसेल हे कशावरुन? ६. जो पासपोर्ट सापडला आहे त्याचा खरा मालक दुसरीकडेच प्रवास करतांना आढळला आहे, त्याबद्दल माहिती आहे काय? ७. हल्ल्यासंबंधीच्या बातम्या आणि त्यातली विसंगती घरबसल्या मला जालावरून कळत असेल तर देशोदेशी फिरण्याचे काय प्रयोजन असावे बरे? तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हमखास देऊ शकत असाल याचा मला दुर्दम्य विश्वास आहे कारण आपण सारे जग फिरला आहात, सर्वज्ञ आहात. मज पामरास असे सर्वज्ञ होण्यासाठी जगभ्रमंती करावी लागेल त्यासाठी द्रव्यस्वरुप मदत आपण जरूर कराल अशी अपेक्षा आहे. माझ्याकडे पासपोर्ट नाही त्यामुळे आता आधी त्याची तयारी करतो. तुम्ही मदतनिधी उभार्‍याच्या तयारीला लागा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 11/19/2015 - 20:26 नवीन
'इस'चे किंवा कुठल्याही दहशतवादी संघटनेचे बहुतेक सगळे लोक्स अश्या हल्ल्यांसाठी ट्रेन केलेले असतात. त्यात सगळ्या रेफ्युजींमुळे गोंधळ असणारच. त्याचा फायदा जास्त झाला असावा. फ्रेंच नागरिकांकडे कुठल्या न कुठल्या स्वरुपात फोटो आयडी असणारच ड्रायविंग लायसेंस, स्टेट आयडी ई ई. पोलिस तुम्हाला कधी पण तुमची ओळख सिद्ध करा म्हणून सांगू शकतात. तुम्हाला वरील दोन पैकी एक किंवा ते नसल्यास तुमचे पारपत्र दाखवणे आवश्यक असते. युरोपमध्ये सर्वात जास्त मुस्लिम फ्रान्स मध्ये आहेत, त्यामुळे ते अगदीच एलियन आहेत असे फ्रेंच लोकांना वाटत नसेल. मुळात 'इस'ने जबाबदारी स्वीकारल्यावर तुम्ही कशासाठी एवढे समर्थन करताय? 'इस'नी आधी पण जाहीररीत्या सांगितलंय की रेफ्युजींच्याबरोबर ते 'इस'च्या लोकांना (मुद्दाम अतिरेकी म्हणत नाही, उगाच भावना दुखवायच्या कोणाच्यातरी) पण घुसवणार आहेत. आणि त्यांनी ते केलं पण! एखाद्या विचारधारेचा अथवा समुहाचा विरोध करताना आपण समर्थन कोणाचं करतोय याचं भान ठेवणं आवश्यक आहे असं मला वाटतं. उर्वरीत मुद्द्यांचे पुण्याचे वटवाघूळ उत्तर देतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 11/19/2015 - 22:38 नवीन
मुळात 'इस'ने जबाबदारी स्वीकारल्यावर तुम्ही कशासाठी एवढे समर्थन करताय?
मी नक्की कशाचं समर्थन केलंय हे तुम्ही माझ्या पोस्टमधे दाखवू शकाल काय? आयसिसने जबाबदारी स्विकारली यात दुमत कुठे आहे? पण आयसिस जे दिसते ते नाही असा माझं म्हणणं आहे. यामागे अजून काही वेगळं असू शकतं. "विकिलिक्स व अन्य काहींच्या दाव्यानुसार आयसिस हे अमेरिकेने बनवलेलं, त्यांच्या तालावर नाचणारं भूत आहे, ज्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिकेस इराक, इराण, सिरिया आदी प्रांतांमधे कायम युद्धजन्य वातावरण ठेवायचं आहे. त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ते आवश्यक आहे." यात 'दहशतवादाचं समर्थन' मी करतोय असं काही लोकांना दिसलं. तो त्यांचा प्रश्न.
'इस'नी आधी पण जाहीररीत्या सांगितलंय की रेफ्युजींच्याबरोबर ते 'इस'च्या लोकांना (मुद्दाम अतिरेकी म्हणत नाही, उगाच भावना दुखवायच्या कोणाच्यातरी) पण घुसवणार आहेत. आणि त्यांनी ते केलं पण!
'सिरीयन पासपोर्ट हल्लेखोराजवळ सापडले' ह्या बातमीचा संदर्भ वरिल वाक्याशी जरूर आहे. पण माझ्या ह्या प्रश्नाशी नाही. 'मिलिटरी प्रीसिजनने केल्या जाणार्‍या हल्ल्यांमधे हल्लेखोराचा 'पासपोर्ट' कसा सापडतो?'
एखाद्या विचारधारेचा अथवा समुहाचा विरोध करताना आपण समर्थन कोणाचं करतोय याचं भान ठेवणं आवश्यक आहे असं मला वाटतं.
मी इथे कुणाचाही विरोध वा समर्थन करत नाही हे वरच्या प्रतिसादांमधेच लिहलंय. मला जाणवलेल्या विसंगतींवर भाष्य करतो. तसेही विरुद्ध बाजू/पैलू/माहिती मांडणे म्हणजे ती मान्यच असणे असे नसते. ज्यात विसंगती जाणवते त्याच्या विरूद्ध पार्टीतच असले पाहिजे असे काही आहे का? तुम्हाला मी कुठल्या विचारधारेचा वा समुहाचा विरोध वा समर्थन करत आहे असे वाटले व का? बुश साहेबांनी म्हटल्याप्रमाणे 'जे आमच्यासोबत नाहीत ते सर्व दहशतवादी', किंवा केजरीवालप्रमाणे, 'जे आपवाले नाहीत ते सर्व भ्रष्टाचारी' असे काही? अवांतरः १. नासाने मंगळावर पाणी शोधल्याची घोषणा नेमकी त्याच दरम्यान केली जेव्हा इस्रोच्या मंगळयानाने मंगळकक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला आणि इस्रोने यानाकरवी मिळालेल्या माहितीचे वितरण सुरू केले. २. काही निष्पाप भारतीयांना अमेरिकन औषध कंपन्यांनी गिनिपिग (प्रयोगाचे उंदिर) म्हणून वापरले. या दोन घटनांमागे काहीच कन्स्पिरसी नाही असे बाळबोध लोक समजण्यास मोकळे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 11/19/2015 - 23:36 नवीन
एकूण सूर मला 'इस'ने केलेल्या हल्ल्यात त्यांची चूक नाही असा वाटला. अमेरीकेनी उभं केलेलं भूत वगैरे जरी असलं, जरी त्यांच्या (अतिरेक्यांच्या/ संघटनांच्या) खांद्यावरून अमेरिका बंदूक चालवत असली तरी ते अतिरेकी/ संघटना पण तेवढेच दोषी आहेत. कोणी एवढे दुधखुळे आहे का की अमेरीकेनी खेळणी सांगून खरी शस्त्रास्त्र दिली आणि हे फक्त खेळत होते ती खरी आहेत हे मात्र लोक मेल्यावर कळलं? कोणी एखादा गुन्हा करायला उद्युक्त केलं म्हणून प्रत्यक्ष गुन्हा करणाऱ्याचा गुन्हा माफ नाही होऊ शकत. हा हल्ला मिलिटरी प्रीसिजनने केला असं खरं तर वाटत नाही. प्लानिंग तर नक्कीच असणार पण अगदी ६ महिने प्लान करून आणि सराव करून आले नसावेत. विसंगती तर जगात सगळीकडे भरून राहिलीये. त्यामुळे नुसता पासपोर्ट कसा काय सापडला ही विसंगती फारच किरकोळ आहे. एवढे महिने कुर्दीश लोकांवरील अत्याचाराच्या चित्रफिती, ज्यात कित्येक लहान मुलींवरील बलात्काराच्या कहाण्या, लहान मुलांचे मृतदेह, बघून कोणाची मने द्रवली नाहीत. पण एका आयलान च्या फोटोमुळे मात्र सगळं बदललं. सिरीया मधील मुस्लिम लोकांना सामावून घ्यायला बाकी एकाही मुस्लिम देशानी दार पण नाही उघडलं पण पूर्ण वेगळी संस्कृती असणाऱ्या लोकांनी मात्र त्यांना सामावून घ्यावं ही अपेक्षा ह्या खऱ्या विसंगती आहेत. या आणी इतर या विषयाशी संबंधीत धाग्यांवर तुम्ही जर जास्त प्रतिवाद करताना दिसता म्हणून आपलं वाटलं की समर्थन तर करत नाही? म्हणून जरा समजून घ्यावं म्हणलं. समर्थन करत नाही हे समजल्यावर आनंद झाला. अवांतर मात्र अती अवांतर वाटलं, त्यामुळे तो पूर्णतः वेगळा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
भ
भंकस बाबा Fri, 11/20/2015 - 00:37 नवीन
डांगेजि तुम्हाला काय म्हणायचे आहे हे आत्ता कुठे आम्हाला कळू लागले आहे. मान्य इसीस अमेरिकेने पैदा केलेले भुत आहे. मान्य मुस्लमानाची छवि बिघडवण्यासाठी यूरोपियन देश पासपोर्ट नीती वापरत आहेत. पण त्याने मुळ प्रश्न कुठे बाजूला होतो? इसिसच्या कारवायामुळे अमेरिकेचे देखील नुकसान होत आहे पण त्याहून जास्त नुकसान अरबांचे होत आहे. पडलेल्या तेलाच्या किमतिनि अरबांचे देखील कंबरडे मोडले आहे. मग का नाही अरब एकजुट होऊन इसीस चा प्रतिकार करत नाहीत? कारण त्यांच्या जनतेचा इसिसला छुपा पाठिंबा आहे. परम्परागत वैरी असणारे सौदी अरेबिया व् इस्राईल इराणच्या अणुकार्यक्रमाविषयी चर्चेला तयार होतात यातच सर्व आले. अमेरिका जर मुस्लिमाना संपवण्यासाठी इसिस चा वापर करत असेल तर आगीत तेल मुस्लिमच टाकत आहेत. सौदी, पाकिस्तान, अमीरात हे देश खुल्या मनाने कधीच बोलत नाहीत की आम्ही शियाना आमच्यात् सामावून घेऊ. मरताहेत तर मरुदेत हीच भावना या देशाची आहे. जर आपल्या धर्माच्या एका पंथाबाबत अशी विचारसरणी असेल तर बाकी दुनिएबाबत काय असेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 11/20/2015 - 15:01 नवीन
मुस्लिम संघटना आयसिसचा विरोध करत आहेत. ओवेसीचेही वक्तव्य बघावे. पण होतंय काय, ह्या बातम्यांना प्रसिद्धी मिळत नाही. मिळाली तरी हे त्यांचे 'मगरीचे अश्रू आहेत' असे म्हटले जाते. मग नेमकी काय अपेक्षा असावी मुस्लिमांकडून? आयसिस मुस्लिमांनाच मारत असतांना आयसिसचे समर्थन सर्वच मुस्लिम करत आहेत हे विधान पटत नाही. डॉ. झाकिर नाईकची सुद्धा खिल्ली मुल्लामौलवी उडवतात. इस्लाममधे बराच सावळा गोंधळ आहे. मुख्य म्हणजे हे सगळे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रबिंदूत आले आहे. त्यामुळे ह्या चर्चा घडतात, लोक पुर्वग्रह, बायस्ड दृष्टिकोनातून चर्चा करतात. याउप्पर मी असे म्हणेन की जौदे न आपल्याला काय करायचे. माझे मत/समर्थन/दृष्टिकोन काहीही असेल तरी रॉ/आयबी/तत्सम काही मला अ‍ॅक्शनप्लान बनवायला सांगणार नाहीत. दहशतवादी संकटाचा सामना करण्यास आपल्यापेक्षा ते जास्त समर्थ आहेत. त्यांना खरे काय ते माहित असेल, आपला देश वाचवायला ते योग्य त्या अ‍ॅक्शन घ्यायला तयार आहेत. आपण इथे चिखलफेक, द्वेषाचे राजकारण खेळून नक्की काय होणार? काही लोक म्हणतात कन्स्पिरसी थेरीला कवटाळून बसू नका. आता देशोदेशीचे गुप्तचर विभाग आपण काय करत आहोत आणि काय करणार आहोत याची जाहिरात तर करत नाहीत. मग देशप्रमुखांकडून/अधिकृत व्यक्तिंकडून जे 'अधिकृत' वक्तव्य दिले जाते तेच अंतिम सत्य आहे असे कसे मानायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
प
प्रदीप Fri, 11/20/2015 - 13:53 नवीन
२. पोलिस कधीही चेक करू शकतात म्हणून सर्व फ्रेंच नागरिक (यात सर्व वंशाचे, रंगाचे, वर्णाचे, वर्णनाचे आले) आपले पास्पोर्ट घेऊन आपल्याच देशात फिरतात का? कुठल्याही विकसित देशात तेथील स्थायिकांना (residents) देशाने दिलेले आय. डी. कार्ड सदैव बरोबर बाळगावे लागते. त्याचप्रमाणे बाहेरून काही दिवसांसाठी आलेल्या इतर सर्वांना (म्हणजे जे रेसिडंट्स नहीत त्यांना) त्यांचा पासपोर्ट सदैव जवळ बाळगणे जरूरी असते. हे कधीही, कुठेही पोलिस अथवा तत्सम सरकारी यंत्रणेचा अधिकारी मागू शकतो. Schengen चे नागरीक असलेल्यांना व तेथे बाहेरून आलेल्यांना हे लागू होते. सदर घटनेच्य संदर्भात ज्या बातम्या येत आहेत, त्यात असे वाचनात आले की तो जो पासपोर्ट तेथे सापडला, त्याच व्यक्तिच्या नावाने एकंदरीत ६ रजिस्ट्रेशन्स युरोपांत अलिकडे आलेल्या स्थलांतरीतांनी केलेली आहेत. कोण जणे, अशा अजूनही केसेस असण्याची शक्यता आहे. ती व्यक्ति तो पासपोर्ट मुद्द्दाम तिथे जवळ बाळगून होती, ज्यायोगे तपास भरकटला जावा अशी शक्यता येथे असावी. ह्यात तुमच्या १,३,४ व ६ ह्या प्रश्नांची उत्तरे यावीत. ५-- ह्या सर्व सध्य शक्यताच आहेत, त्याबद्दल सध्या ठामपणे काहीच सांगता येत नाही, तेव्हा तुम्ही म्हणता ती शक्यताही असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 11/20/2015 - 14:28 नवीन
प्रदिपजी, चर्चेबद्दल धन्यवाद! तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत आहे. तुम्ही आता जे म्हटलंय की "जशा बातम्या येत आहेत त्यावरून पासपोर्टबद्दल ठामपणे काही म्हणता येत नाही" ते आता हळू हळू बातम्या दुसर्‍या-तिसर्‍या पानावर गेल्यानंतर येतात. पण हल्ल्याच्या दिवशी ठळक अक्षरात जिकडे तिकडे पहिल्या पानावर सिरिअन पास्पोर्ट सापडल्याची बातमी मोठ्या जनसमुदायावर मोठा मानसशास्त्रिय परिणाम करणारी असते. आता तो पासपोर्ट आणी त्याची खरी कथा हळू हळु मागे पडून जाईल. पण हा परिणाम पुसल्याजात नाही. वर्तमानपत्रे 'मालकांच्या आदेशानुसार' बरंच काही छापतात. त्याबद्दल हा मुद्दा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
प
प्रदीप Fri, 11/20/2015 - 14:33 नवीन
वर्तमानपत्रे 'मालकांच्या आदेशानुसार' बरंच काही छापतात. त्याबद्दल हा मुद्दा होता. अगदी डाव्या विचारसरणीच्या, आणि ज्यांना माझ्यासारखे काहीजण 'ब्लीडींग हार्ट्स' म्हणतात, अशा वर्तमानपत्रांनीही तो उल्लेख तसाच केला होता. मला वाटते (नक्की ठाऊक नाही, पाहिलेले नाही, एक शक्यता केवळ) त्या सर्वांनी तो उल्लेख एकाद्या न्यूज एजन्सीने प्रसृत केलेल्या बातमीवरून केलेला असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
विकास Tue, 11/17/2015 - 04:47 नवीन
असे मी म्हणत नाही... :)

Saudi Arabia declares all atheists are terrorists in new law to crack down on political dissidents

  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Tue, 11/17/2015 - 14:35 नवीन
Tuesday 1 April 2014
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
D
DEADPOOL Tue, 11/17/2015 - 06:21 नवीन
जेव्हा मुम्बई वर हल्ला झाला होता, तेव्हा एकही पश्चिमी देशाने पाकिस्तानवर कड़क कारवाईची मागणी केली नव्हती. यांचा दुटप्पीपणाच आज यांना घातक ठरतोय
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Tue, 11/17/2015 - 07:01 नवीन
जेव्हा मुम्बई वर हल्ला झाला होता, तेव्हा एकही पश्चिमी देशाने पाकिस्तानवर कड़क कारवाईची मागणी केली नव्हती. यांचा दुटप्पीपणाच आज यांना घातक ठरतोय
हल्ला भारतावर झाला ना, मग भारतानी काय ती कारवाई करायला हवी होती. पश्चिमी देश कशाला काही करतील. उलट ते म्हणत असतील की भारताला च काही करायचे नाही तर आम्ही तरी कशाला काही करु?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL
त
तुडतुडी Tue, 11/17/2015 - 06:48 नवीन
इथे आपण अमेरिका , युरोप , इस्रैल ची राजकीय धोरणं ह्यांची फ्रांस च्या हल्ल्याच्या अनुषंगाने चर्चा करतोय पण खुद्द इसीस ने ह्या हल्ल्याचं जे कारण सांगितलं त्यावर कोणीच बोलत नाहीये . "व्याभिचार्यांचा खात्मा " हे कारण त्यांनी दिलेलं आहे . कुरण , हदीस , शरियत चे नियम न पाळणार्यांना इस्लाम विरोधी समजलं जातं. व्यभिचारी समजलं जातं .त्याप्रमाणे न वागणार्यांना शिरच्छेद , हातपाय तोडणे , बलात्कार अश्या शिक्षा दिल्या जातात . म्हणून तर थोडी चूक झाली तर आपल्याच मुस्लिम बांधवांना हे लोक संपवत आहेत . आणि मुक्त जीवन जगणार्यांना नास्तिक , व्यभिचारी समजून त्यांच्यावर हल्ले होतायेत .
अल्पसंख्यकाना वाइट वाटेल म्हणून ही ऑफर नाकारण्यात आली.
हेच तर दुर्दैव आहे ह्या देशाचं. अल्पसंख्यकाना काय आवडत काय नाही ह्याची किती काळजी घेतली जाते . तरी असहिष्णुता म्हणून बोंबा चालूच आहेत . आता बहुसंख्यांकांनी ह्यांच्या घरचं धुनी भांडी करावं अशी अपेक्षा असावी . मला तरी वाटतं भारताला इसीस चा धोका एवढ्या लवकर नाहीये . पण तरीही जम्मू काश्मीर मध्ये मधून मधून फडकणारे इसीस चे झेंडे बघता धोक्याची शक्यता नाकारता येत नाह. इस्राइल बद्दल बोलायचं झाल्यास इस्रैल आणि प्यालेस्टीन ची निर्मिती एकाच वेळी झाली आहे . पण आज इस्राइल कुठल्या कुठे गेलं आहे आणि प्यालेस्टीन कुठ आहे . भारत पाक ची निर्मिती सुधा एकाच वेळी झाली . पण आज भारताने पाक च्या तुलनेत कितीतरी अधिक प्रगती केली आहे . आणि पाक भारताचा शेजारी नसता तर आपण सुधा बरेच पुढे गेलो असतो . असो . ज्यूंवर ख्रिश्चन , मुस्लिम आणि रोमनांनी खूप अत्याचार केलेत . पण मुस्लिम सोडून इतरांनी इतिहासाला मागे टाकून स्वताही प्रगती केली आणि दुसर्यालाही करू दिली . ज्यू असो किवा पारशी किवा शीख ,भारतीयांनी कधीही इतर धर्मियांवर अन्याय केला नाही. ज्यांनी ज्यांनी वाईट काळामध्ये आश्रय मागितला अश्यांना सामावून घेतलंय.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 11/17/2015 - 07:42 नवीन
पण आज भारताने पाक च्या तुलनेत कितीतरी अधिक प्रगती केली आहे असा म्हणू नका ! पिछले ६० साल मे क्या किया ? असा विचारत जगभर हिंडणारे तोंडघशी पडतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 11/17/2015 - 08:24 नवीन
मुनिवरांचा सात्विक चिमटा =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कालिंदी Tue, 11/17/2015 - 08:43 नवीन
<<<<अमेरिकन असल्याचे (असला म्हणजे गोळा बारूद) चे ब्लॅक मार्केटिंग ह्याचा रस्ता सेंट्रल अन साउथ अमेरिकन ड्रग कार्टेल्स थ्रू किंवा अलास्का थ्रू असतो >>> हे नीटसे कळले नाहि. अमेरिकन अस्त्रे काळ्या बाजारात कशी पोहचतात? कुठल्याही सस्त्रात्रे बनवणार्याला त्यान्चे ऑडिट देणे बन्धन कारक असेल ना. म्हणजे अमेरिकन कम्पनीने बनवले तर त्या कम्पनीला अमेरिकन सरकारला सान्गावे लागत असेल ना अमुक इतके बनवलेत, इतके विकलेत इतके स्टॉक मध्ये आहेत वगैरे. मग काळ्या बाजारात कशी पोहचतात ही शस्त्रे? सरकारच्या छुप्या पाठिम्ब्याने का? जेन्युइन ली प्रश्न पडलाय. प्लीज जरा विस्ताराने सांगणार का सोन्याबापु?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा