चार्ली हेब्दो हल्ला ही फक्त सूचना होती!
१३ तारीख ही फ्रांस च्या इतिहासातील सर्वात काळी तारीख म्हणून मानली जाईल.
२००च्या वर म्रुत्यू आणि अनेक जखमी.
'धिस टाइम इट्स वार!'
भारतावर सुद्धा असा हल्ला होऊ शकतो.
क्रुपया आपले मत मांडा.
अशा किती हल्ल्यांचे निषेध करणार..
आयएस पाश्चिमात्य राष्ट्रांविरोधात न्युक्लियर त्सुनामी प्लॅन करत आहे अशी बातमी कालच वाचली.
असं काही खरंच घडलं तर त्याचे परिणाम किती महाभयंकर होतील कल्पना करवत नाही.
आयएसचा चेहरा असलेला जिहादी जॉन मारला गेला म्हणतात ही त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट.
निरापराध लोकांबरोबरच प्राचीन संस्कृतीचे प्रतीक असणार्या कलाकृतींचाही विनाश करत सुटलेल्या
या विध्वंसक प्रवृत्तीचा शेवट लवकर व्हावा हीच इच्छा.
व्हेनिस ऑफ द सँड्स म्हणुन ओळखल्या जाणार्या Palmyra या सीरियन शहरामधील प्राचीन अवशेषांचा
आयएसने केलेला विध्वंस:
१. http://www.theguardian.com/science/ng-interactive/2015/oct/05/palmyra-what-the-world-has-lost
२.http://www.theatlantic.com/international/archive/2015/09/rubble-palmyra-syria-isis/403921/
हा कुठल्याही देशाच्या पायाच असतो, जे युरोपियन राष्ट्रांनी केले ते जगभरातील सगळीच राष्ट्रे करतात्,काही महिन्यांपुर्वी मा.संरक्षणमंत्र्यांनी डिप असेट विषयी एक वक्तव्य केले होते ते एकदा आठवावे,जर शेजारचे राष्ट्र अस्थिर नाही केले तर ते तुम्हाला आज ना उद्या नष्ट करेल. पाकिस्थान काय अथवा भारत काय अथवा अमेरिकेसह युरोपियन राष्ट्र काय प्रत्येक जण स्वतःच वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतो, फक्त स्वतःच्या भुमीवर हे युद्ध येवु न द्यायचा प्रयत्न कधी कधी फसतो हे मुंबई आणी पॅरिसच्या हल्ल्याने स्प्ष्ट झाले कारण एक यशस्वी हल्ला होण्यापुर्वी १०० हल्ले रोखले गेले असतात फक्त ते आपल्या सारख्या सामान्यांना कधीच माहिती होत नाही. बाकी शुन्य
सोन्याबापूंशी बाय डीफाल्ट सहमत....
आयसिस ला पुढे करून अमेरिकन शस्त्रौत्पादक मंडळींचे हे कृत्य आहे. आयसिस ने जे 'कारण' पुढे करुन हल्ल्याची जबाबदारी घेतली त्याच्यावरूनच हे किती पुचाट 'अलिबाय' आहे हे लक्षात येतं. अमेरिकन शस्त्रौत्पादकांना काहीही करुन जग पेटत ठेवायचं आहेच. सर्व दहशतवादी संघटनांना मिळणारी शस्त्रास्त्रे कुठून येतात हे कळले तरी खरा बोलविता धनी कोण हे समजुन येईल. आयसिस इज जस्ट अमेरिका इन डिस्गाइज.
सहमत! आयसिस चे काही फोटो म्हणजे मूर्खपणाची कमाल वाटली मला
वास्तविक पाहता प्रत्येक मुस्लिम हा नमाज अदा करताना काब्याच्या दिशेने तोंड करतो अरबी मधे चार दिशा म्हणजे
१ मशरिक़ (पुर्व)
२ मग़रिब (पश्चिम)
३ शुमल (उत्तर)
४ जुनुब (दक्षिण)
अर्थात काब्याच्या पूर्वेकडे असलेल्या सगळ्या देशांतले लोक मग़रिब म्हणजे पश्चिमेकडे तोंड करून नमाज अदा करतात तसेच पश्चिमेकडले पूर्वेकडे उत्तरे कडले दक्षिणे कड़े अन दक्षिणेकडले उत्तरेकड़े तोंड करतात, म्हणजेच एखाद्या विशिष्ट देशातले मुस्लिम एखाद विशेष दिशेला तोंड करुनच नमाज अदा करतात
मी पाहिलेला एक फोटो म्हणून मला विचित्र वाटला कारण त्यात हे "आयसिस चे धर्मयोद्धे" चक्क एकमेकांना काटकोनात सल्लाह अंथरुन नमाज ला उभे होते, हे अशक्य आहे नॉर्मल इस्लामिक संकेतानुसार
अर्थात हे बेसिक निरिक्षण आहे माझे अजुन काही प्रकार असल्यास मला माहिती नाही
आयसिसचे सगळेच सुरुवातीपासून संशयास्पद आहे. ज्या पद्धतीने त्यांच्या बातम्या येतात, कृत्ये होतात (की फक्त दाखवल्या जातात), त्यांची कारणे, त्यांचा प्रभाव वाढत असल्याची एक अनामिक दहशत पसरवली जाते ते बघता हा एक उत्तम मार्केटींग प्रोजेक्ट आहे. अगदी असेच काही वर्षांपुर्वी तालिबान बद्दल पसरवले जात होते. तेव्हाही तालिबान भारतात कधीही येऊन धडकेल अशी सार्वर्त्रिक दहशत भारतीयांमधे होती. ह्या दहशतीचा फायदा घेऊन अमेरिकन कंपन्या त्यांच्या उत्पादनांचे उत्तम पुल मार्केटींग करू शकतात. एक असाही कयास आहे की हे सगळे आयसिसचे सैनिक इसलामचे उत्तम ट्रेनिंग दिलेले, अफगाणिस्तानमध्ये डीप्लॉय केलेले नंतर काढून घेतलेले वा कृत्रिमरित्या शहिद झालेले अमेरिकन सैनिक आहेत. आयसिसचे उद्देश व जन्मकथाही बर्याच गोलमटोल आहेत.
माझ्यामते तरी अमेरिकेने आयसिसचा नुसता बागुलबुवा उभा करून जगाचा मनोभंग चालवला आहे. त्याबद्दलच्याच बातम्या सतत पेपरात येत असतात. गेल्या काही महिन्यात आयसिसबद्दल जागतिक चर्चा(!) थंडावल्या आहेत हे लक्षात येताच पॅरिस हल्ला झाला. यात संशयास्पद काही दिसू नये म्हणून लेबनॉनवरही हल्ला झाला.
(!) थोडे अवांतरः फेसबुक हे अमेरिकन हेरगिरीसाठीचे एक उत्तम आधुनिक आयुध असून याद्वारे जगभरच्या नागरिकांच्या मनात काय चालले आहे याचा धांडोळा घेत आपल्याला हवे तेच विचार जगभर पसरवायचे हे फेसबुकचे उद्दिष्ट आहे. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग हा एक ज्यू असणे हा निव्वळ योगायोग नाही. फेसबुकसारखे हजारो अप्लिकेशन्स असतांना केवळ फेसबुक इतके पुढे जाणे नॅचरल सिलेक्शन नसून क्राफ्टेड अटेम्प्ट आहे. फेसबुकचा उदय आणी न्यु वर्ल्ड ऑर्डर याबद्दल कधी सविस्तर लिहिन. (काहींच्या मते 'न्यू वर्ल्ड ऑर्डर' हा मानसिक रुग्ण असलेल्यांचा कपोलकल्पित विचार - कन्सपिरसी थेरी - आहे. असो.)
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग हा एक ज्यू असणे हा निव्वळ योगायोग नाही
म्हणजे हे सगळे त्याने विद्यार्थी दशेत ठरवले होते? पचवायला अवघड वाटते.गूगलचे संस्थापकही ज्यू आहेत. मायकेल डेल(डेल लॅपटॉपवाले) पण ज्यु आहेत.
ऑरॅकल ह्या मोठ्या डेटाबेस कंपनीचे संस्थापकही ज्यू आहेत.
(ओपन सोर्स चळवळीचे प्रणेते रिचर्ड स्टॉलमॅन पण ज्यू आहेत).
अहो ज्यु लोक हुशार आणि कर्तृत्ववान असतात हे मान्य करा. कम्युनिझम चे जनक पण ज्युच आणि भांडवलदार पण ज्युच. आइनस्टाईन ज्युच आणि फ्रॉईड पण ज्यु. पुण्यातल्या ससुन हॉस्पीटल चा डेव्हिड ससुन सुद्धा ज्युच. पैसे मिळवतात आणि प्रचंड दान पण करतात.
नोबेल मिळवणार्या लोकांच्यात ज्युंचे प्रमाण लक्षणीय रीत्या जास्त आहे ( फक्त गोर्या युरोपीय आणि अमेरिकन लोकसंख्या तुलना करुन बघितली तरी ).
लोकमत दिवाळी अंकातला मधला तेल-अवीव बद्दल चा लेख वाचा.
तरी काहींना रानटी लोकांबद्दल फारच प्रेम असते, हे दुर्दैव..
अगदी असेच काही वर्षांपुर्वी तालिबान बद्दल पसरवले जात होते. तेव्हाही तालिबान भारतात कधीही येऊन धडकेल अशी सार्वर्त्रिक दहशत भारतीयांमधे होती.
च्यायला इथे आपल्या संसदभवनावर हल्ला झाला, छत्रपती शिवाजी टर्मिनस, आय.आय.एस.सी बंगलोर इत्यादी अनेक ठिकाणे टारगेट झाली तरी आपले लोक असेच म्हणणार. सांगून टाका की डांगे साहेब की संसदभवनावरील हल्ला हा पण एक पूल मार्केटिंग होता म्हणून.
एक असाही कयास आहे की हे सगळे आयसिसचे सैनिक इसलामचे उत्तम ट्रेनिंग दिलेले, अफगाणिस्तानमध्ये डीप्लॉय केलेले नंतर काढून घेतलेले वा कृत्रिमरित्या शहिद झालेले अमेरिकन सैनिक आहेत.
हो तसाच असाही कयास आहे की लष्करे तोयबा मध्येपण हिंदू राष्ट्रवादीच भरले आहेत. हाफिज सईद हा पण रेशीमबागेत संघाच्या शाखेत जायचा. काश्मीर खोर्यातून तीनेक लाख हिंदूंना नेसत्या वस्त्रानिशी हिंदू राष्ट्रवाद्यांनीच हाकलून लावले कारण त्याचे निमित्त करून नंतर मुस्लिमांविषयी कटूता वाढवता येईल.
माझ्यामते तरी अमेरिकेने आयसिसचा नुसता बागुलबुवा उभा करून जगाचा मनोभंग चालवला आहे.
आणि अमेरिकेचा बागुलबुवा उभा करून इस्लामी दहशतवादाकडे जाणूनबुजून डोळेझाक करून तुम्ही नक्की कोणाचा मनोभंग चालवला आहेत?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग हा एक ज्यू असणे हा निव्वळ योगायोग नाही. फेसबुकसारखे हजारो अप्लिकेशन्स असतांना केवळ फेसबुक इतके पुढे जाणे नॅचरल सिलेक्शन नसून क्राफ्टेड अटेम्प्ट आहे.
कैच्याकै. असे प्रतिसाद लिहून ज्यू लोकांची कल्पनाशक्ती आणि डोकी कशी चालतात हे तुम्हाला माहित नाही हे तुम्ही जगजाहिर केले आहेत. इन्व्हेस्टमेन्ट बँकींगमध्ये गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅन्ले इत्यादी अनेक बँका आहेत त्या सगळ्या बँकांचे संस्थापक अगदी झाडून ज्यू होते. क्वांटम मेकॅनिक्स हे क्षेत्र उभे करण्यामध्ये बहुसंख्य ज्यू लोक होते. मग ते आईन्स्टाईन असतील की हायसेनबर्ग. हे सगळे पुढे आले ते पण क्राफ्टेड अॅटेम्टमुळेच का? असले काहीतरी लिहिण्यापूर्वी जरा माहित करून घ्या हो.
स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर असला गुडघ्यातला प्रतिसाद मिपावर येईल असे खरोखरच वाटले नव्हते.
आपल्या लोकांचा असाच अॅटिट्यूड राहिला तर बहुदा १००-२०० वर्षांनी मार्टिन निमोलरच्या धर्तीवर कोणीतरी पुढील गोष्ट लिहिणारा मिळेल (की तो पण मिळायचा नाही कुणास ठाऊक)
First they came for Punjabi Hindus and Sikhs, and I did not speak out---
Because I was not a Punjabi Hindu or a Sikh
Then they came for Kashmiri Hindus, and I did not speak out---
Because I was not a Kashmiri Hindu
Then they came for Assamese Hindus, and I did not speak out---
Because I was not an Assamese Hindu.
Then they came for me-- and there was no one left to speak for me.
धन्यवाद! आपल्या विचारांपेक्षा विरुद्ध विचार हे नेहमी गुडग्यातूनच येतात ह्या तुमच्या दर्पोक्तीबद्दल तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. अशा वातावरणात मी अजून काही लिहिणे म्हणजे स्वतःचा अजून जास्त अपमान करुन घेणे आहे. त्यामुळे असो. मिपावर कुणी मुस्लिम आयडी का नाहित व असलेले इथे का लिहित नाहीत ह्या प्रश्नाचं आज उत्तर मिळाले. त्याबद्दलही धन्यवाद!
बॅटमॅन,
संदीप डांग्यांचा प्रतिसाद कपटसंशयी (=कन्स्पिरसी थियरी) म्हणून झटकून टाकण्यापूर्वी थोडा वेळ द्यावा म्हणून सुचवेन. आधुनीय युरोपात यहुद्यांचे योगदान वादातीत आहे. पण म्हणून त्यामुळे इतर युरोपीय लोकांचं मत बदलत नाही. डांग्यांनी दिलेला प्रतिसाद केवळ त्यांचा स्वत:चा नसून त्यामागे युरोपातले वेगवेगळ्या देशांतले वेगवेगळ्या कालखंडातले बरेच लोक आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घ्यावी म्हणून सुचवेन.
आ.न.,
-गा.पै.
अख्ख्या जगात जे चाल्लंय त्यामागे ज्यू लोकांचे कपटकारस्थान आहे ही लै जुनी थेरी आहे ओ. त्यामागे ज्यूफोबिया आणि दुस्वास आहे. संदीप डांग्यांवर हे आरोप नाहीत, युरोपियन्सवर आहेत. तीच थेरी ते मांडताहेत म्हणून तसे म्हणालो इतकेच.
गॉथम नरेश,
ज्यु किंवा फॉर दैट मॅटर कोणाचाही दुस्वास करणे वाईटच हे तुमचे मत "सर मथ्थे दे" सरकार फ़क्त कोणाचा ही अतिरेकी कैवार घेणे ही वाईट (तुम्ही ज्यूंचा किंवा संदीपभाऊ मुस्लिमांचा घेताय असा माझा आरोप वैग्रे अजिबात नाही!) फ़क्त आता विषय आहे म्हणून मते मांडतो आहे इतकेच, ज्यु किती बिच्चारे हे काहीसे पटत नाही ठीक आहे त्यांची प्रॉमिस्ड लँड त्यांनी मिळवली वगैरे सगळे ठीक पण मुळात हे लोक विचाराने अन कर्माने आत्यंतिक असतात हुशारी अतिरेकी, कर्तृत्व सुद्धा तितकेच उत्तुंग, धर्म पाळायचा हे ठीक मान्य आहे पण आज त्याच धर्मपालनाच्या हेतुने भारतीय किंवा फॉर दैट मॅटर जगातले सगळे मुस्लिम जसे सेल्फ inflicted अन सेल्फ created ghetto मधे आत्ममग्न राहतात अन त्यासाठी जगाला दूषण देतात भूतकालात ज्यु सुद्धा तसेच वागले आहेत, माझे वाचन अतिशय अल्प आहे बॅटमॅन भाई पण जितके वाचले (ते चुक असल्यास सुधार करा) त्यानुसार माझे आकलन हे की ज्यूंवर खरोखर अन एकमेव अत्याचार म्हणजे पहिले एक्सोडस अन मोसेस ने लाल समुद्रावर दांडके आपटुन पुर्ण गुलाम परत कनान प्रदेशाकडे नेले ते फ़क्त, त्या नंतर ज्यु जेव्हा जिथे जिथे हाणल्या गेले ती अन आज मुस्लिम जिथे जिथे मार खातात ती सगळी कारणे synonymous वाटतात, एखाद्या देशात (रशिया ते प्रशिया) राहताना लोकल संस्कृती पेक्षा आपल्या प्रॉमिस्ड लँड अन कॉमण्डमेंट्स ना अतिरेकी महत्व किंवा पेहराव अन खाणेपिणे संबंधी अट्टाहासपुर्ण वर्तन (स्वतःचे वेगळे एरिया ठेवणे, अन अलाइड एक्टिविटी) इत्यादी, शिवाय त्यांना प्रॉमिस्ड लँड मिळाली अन त्यांनी ती मिळवायला काही दहशतवादी सहारा घेतला नाही हे कौतुकास्पद आहे (घेतला असल्यास तसे संदर्भ सांगणे) त्यांचा असलेला मुस्लिम किंवा इतर (कॅथॉलिक) धर्मियांचा असलेला बखेड़ा अन हिंदुंनी त्यांच्यावर अत्याचार न केल्यामुळे त्यांना नैसर्गिक मित्र मानणे म्हणा किंवा त्यांच्या मुस्लिमविरोधात आपल्या सुप्त किंवा उघड मुस्लिम विरोधी किंवा इस्लामोफोबिक भावाचे शमन पाहणे हे मला तितकेसे रुचत नाही असे नमूद करतो
काही चुक बोलून गेलो असलो तर माफ़ी मागतो
काही माहिती नसल्यास ती ससंदर्भ पुरवाल अशी अपेक्षा
(जिज्ञासु अन समतोल रहायच्या यत्नातला) बाप्या
बापू.. तुमचे प्रतिसाद खरोखरी माहितीपूर्ण आहेत. धन्यवाद.
एकच सुचवतो आहे* - इतके पण "ओव्हरपोलाईट" होवू नका. तुमच्याकडे माहिती आहे, येथे देत आहात. चुक असेल तर लोकं सांगतीलच. मग सुरूवातीलाच माफी वगैरे कशाला?
* हे माझे वैयक्तीक मत आहे.
मोदक भाई,
प्रथम आभार, माहिती खुप आधी वाचली आहे ती रिट्राइव करताना फ्रैगमेंट्स मधे येऊ शकते म्हणून कंसातील डिस्क्लेमर टाकले, बाकी ओवर पोलाइट म्हणाल तर असे आहे की तुमच्या सारखे किंवा बॅटमॅन अन संदीप डांगे सुद्धा म्हणा आपले लोक जोडणे कठीण असते अन तोडणे/तुटणे सोपे म्हणून आगाऊ काळजी :)
वर्षाचा दीड ते सहा महीने १९००० फुटांवर एकही मानवी शब्द थेट न ऐकता राहिले की होते असे माणसे अन त्यांच्यातला चांगुलपणा सतत दिसू लागतो इतकेच! :D :D
ज्यू धर्मीय लोकांवर झालेल्या अत्याचारांमध्ये हॉलोकॉस्टचा उल्लेख पण केलेला नाहीये तुम्ही. जवळजवळ ७० टक्के ज्यू - युरोपमधले - नाझींनी मृत्यूछावण्यांमध्ये मारले. त्याच्या आधी जेव्हा रशियावर आक्रमण केलं तेव्हा लिथुआनिया, लाटव्हिया आणि एस्टोनिया या बाल्टिक देशांमधल्या ज्यूंना नाझींनी खास तयार केलेल्या भरारी पथकांनी ( जर्मन भाषेमध्ये EINSATZGRUPPEN ) ठार मारलं. युक्रेन देशाची राजधानी कीव्हपासून जवळ असलेल्या बाबी यार या ठिकाणी एका दिवसात ३२००० ज्यूंना पॉल ब्लोबेल या नाझी अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. लहान मुलं - अगदी तान्ही मुलंसुद्धा नाझींनी सोडली नाहीत. मुस्लिमांवर किंवा दुसऱ्या कुठल्याही धर्मीय लोकांवर असले अत्याचार कधीही झाले नव्हते. मृत्यूछावणीत पाठवण्यापूर्वी ज्यूंना घेट्टोमध्ये ठेवलं जायचं. ती एक प्रकारची कैदच होती. आणि आपण म्हणतो की ज्यू हे आर्थिकदृष्ट्या नेहमीच इतर जमातींना (इथे जमात हा शब्द TRIBE या अर्थी नसून मानवी समूह या अर्थी वापरलेला आहे) वरचढ होते. पण हॉलोकॉस्टमध्ये मारले गेलेले ज्यू हे सर्वसामान्य किंवा गरीब होते. श्रीमंत ज्यूंकडून नाझींनी भरभक्कम खंडणी उकळून त्यांना जर्मनीतून बाहेर जायची परवानगी दिली होती. जे मागे राहिले ते सर्वसामान्य किंवा गरीब ज्यू. रशियामध्ये झारशाही असताना ज्यूंविरुद्ध सामुहिक हत्याकांडं, ज्यांना pogrom असं म्हणतात, ती झालेली आहेत. आणि हे सगळं चालू असताना जगाने बघ्याचीच भूमिका घेतली होती. असे अत्याचार दुसऱ्या कुठल्या मानवी समूहावर झाले असतील असं वाटत नाही. आणि जर जगाने ज्यूंना दिलेली ही शिक्षा आहे असं म्हटलं तर मग ती ज्यूंच्या गुन्ह्यांच्या मानाने फार जास्त आणि भयंकर आहे.
बोका भाऊ,
होलोकॉस्ट च्या उल्लेख न करण्या बद्दलच एकार्थाने पुर्ण सकॉमेंट होती बघा, कारण ज्यु म्हणले की होलोकॉस्ट हे इतके एग्रेसिवली मार्केटेड स्टेटमेंट झाले आहे की बस! बरं त्याची संहारकता (जी तुम्ही सार्थ आकड्यांत मांडली आहे) कमी आहे किंवा सरसकट ज्यु कत्तली जस्टिफाई करणे हा माझा उद्देश तेव्हा ही नव्हता अन आता ही नाही हे मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो. मुद्दा खुप साधा आहे इतक्या क्रूर कत्तली का झाल्या? ह्या प्रश्नाची एकदा अन फ़क्त एकदा "हिटलर हा एल सिफलिस रोगी ज्यु द्वेष्टा होता" ह्याच्या पालिकडली कारणमीमांसा शोधणे होय, आता ह्याच चेन मधे आलेला गामापैलवान ह्यांचाच प्रतिसाद पहा, प्रॉमिस्ड लँड मिळवायला ज्यूंनी केलेली हत्याकांड जी मला माहिती नव्हती ती ह्या योगे चर्चेच्या लूप मधे आली न? मला असे काहीतरी अपेक्षित आहे अर्थात त्या न्यायाने तुमचा होलोकॉस्ट चा उल्लेख सुद्धा एक पैलू आहेच पण तो खुप वोसिफेरॉसली पुश केलेला आहे असे वाटते. अन करोत काही हरकत घेणारा मी कोण होतो त्यावर? मी काही अश्राप ज्यूंचे जीवन जगलो नाहीये मी फ़क्त त्याच्या एक अब्जांश पाहिले आहे ते ही श्चिण्डलर्स लिस्ट किंवा डायरी ऑफ़ एन फ्रैंक च्या माध्यमातून , मला व्यक्तिशः जे काही म्हणायचे आहे ते म्हणजे इतकेच की ज्यु अतिशय हुशार जमात आहे त्यांनी पराकोटी चे अत्याचार सहन केले आहेत अगदी मान्य, पण ते अगदी बिच्चारे वगैरे नाहियेत तर जागतिक दर्जावर एक अतिशय हिशेबी अन कैल्कुलैटिव जमात म्हणून प्रसिद्ध आहेत, पण आज त्यांचे ग्लोरिफिकेशन करणाऱ्या भारतीय लोकांत बेसिक ज्ञान सुद्धा नाही होलोकॉस्ट चे, बहुसंख्यांच्या मते अन ज्ञानात असलेला इजराइल म्हणजे निर्मिती पश्चात इजराइल योम किप्पुर वाला इजराइल शत्रुंनी वेढलेला इजराइल धर्माभिमानी इजराइल "बघा बघा इतका चिमुकला देश पण मियाँ लोकांस आवरत नाही" हे जहरी कौतुकच जास्त असते मला असे अर्धज्ञान आधारित अंध कौतुक धोकादायक वाटते , ते मुस्लिम द्वेष करतात म्हणून ते आपले नैसर्गिक मित्र किंवा भारताचा भाऊ इजराइल वगैरे घोषणा मला निरर्थक वाटतात कारण त्यायोगे आपण बुद्धिमान ज्यु लोकांचा फायदा काहीच घेत नाही आहोत फ़क्त मी माझ्या पहिल्या कॉमेंट मधे म्हणल्या प्रमाणे आपला इस्लामोफोबिया शमनार्थ त्यांच्या कारवायांकडे पाहत आहोत, जे माझ्यामते प्रचंड धोकादायक आहे अन समतोल नाही काही काही कॉमेंट्स मधे मुस्लिम एरवी खुप खेळीमेळी ने राहतात अन धर्माचे नाव काढले की बिथरतात असे उल्लेख आहेत जे १००% सत्य आहेत , असे अनुभव ज्यूंमधे नसतील अशी आपल्या धर्माभिमानी भोळ्या लोकांची अपेक्षा असते पण मुळात तसे असते का? अजिबात नाही गंमत म्हणून पुण्यात राहणाऱ्या कोणीही एक प्रयोग करून पहा जमेल तसे कॅम्प मधे ओहेल डेविड सिनेगॉग उर्फ़ लाल देवळात जावुन या आत घेतात का ते सांगा! आपल्या ह्या मुस्लिम विरोधी नैसर्गिक मित्राचे सोवळे ओवळे हे वहाबी इस्लाम इतकेच कड़क असते असे आढळून येईल.
होलोकाॅस्ट हे निर्विवाद सत्य आहे हेही खरं आहे आणि इझराईलच्या निर्मितीनंतर लगेचच त्याच्या गळ्याला नख लावण्याचे प्रयत्न केले गेले हेही तितकंच खरं आहे. इझराईलच्या खेळाडूंना, ज्यांचा दहशतवादाशी आणि अतिरेक्यांशी काहीही संबंध नव्हता, त्यांना म्युनिकमध्ये मारलं गेलं. अरब राष्ट्रांची बाजू आपण घेतली पण त्यांनी काश्मीरसंदर्भात नेहमीच पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आपण आता इझराईलला पाठिंबा दिला तर त्यात काही गैर आहे असं अजिबात नाही. तशीही अरबांची बहुतेक सगळी संपत्ती (काही दुबई, ओमानसारखे अपवाद वगळता) ही तेलामुळे आहे. ते संपल्यावर त्यांचं परत त्यांच्या आधीच्या रानटी अवस्थेकडे जाणं अगदीच अशक्य नाही. आणि मलाही तेलाच्या जोरावर जगाला वेठीला धरणाऱ्या (उदाहरणार्थ १९७३ चा आॅईल शाॅक) अरबांविषयी सहानुभूती अजिबात नाही.
अरे बापरे माझा प्रतिसाद अरबांना सहानुभूति द्या पद्धतीचा झाला की काय! मला तसे म्हणायचे नाहीये उलट मी म्हणतोय सहानुभूति कोणालाच नको फ़क्त थंड व्यव्हार हवा rubbing the backs as per time demands! असे काहीसे कोणासाठीच भावनाशील होऊन हशील नाही (स्वहित सोडुन) :)
जर्मन बेकरीच्या आधी मी स्वतः लालदेवळात जाऊन आलेलो आहे. तेथे ज्या बाई होत्या त्यांनी मला सर्व सिनेगॉग फिरवून दाखविले. नंतर गेलो असता ते बघण्यासाठी आधी परवानगी काधावी लागते असे कळले.
फक्त माहितीसाठी.
बापूसाहेब
तसे पाहिले तर आज तुम्हाला पारश्यांच्या अग्यारीत प्रवेश नाहीच. माझ्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट हि आहे कि ज्यू लोक बाटवाबाटवी करीत नाहीत कि आपला धर्म दुसर्यावर लादत नाहीत. त्यांचा धर्म त्यांच्या पुरताच मर्यादित आहे. कुठेही ज्यू लोकांनी त्यांच्या साठी खास अधिकार मागितल्याचे माझ्या वाचनात नाही. जर ते अतिशय हिशेबी अन कैल्कुलैटिव जमात म्हणून आहेत तर आपल्याकडे मारवाडी बनिया किंवा सिंधी लोक त्यांच्या दोन पावले पुढे आहेत म्हणून आपल्याकडे या लोकांचे शिरकाण झालेले नाही.भारत सोडला तर पश्चिमेकडे अख्ख्या मध्यपूर्वेत इस्रायलपर्यंत लोकशाही असलेला किंवा आधुनिक मुल्ये मानणारा देश नाही. आणी भारताच्या पूर्वेला सुद्धा मुस्लीम बहुल देशांची परिस्थिती फारशी चांगली नाही.
राहिली त्यांचे सोवळे ओवळे त्यांच्या घरापुरते मर्यादित असते. त्यात ईश्वर निंदा केली तर फाशी किंवा तत्सम अशा गोष्टी नाहीत.
मुद्दा खुप साधा आहे इतक्या क्रूर कत्तली का झाल्या?
युरोपात ज्यू द्वेष (अॅन्टी सेमेटिझम) ही बरीच जुनी गोष्ट आहे. ज्यू लोकांचे घेटो विविध युरोपिअन शहरांमध्ये अनेक शतके होते.ज्यू घेटो ही काही हिटलरने आणलेली संकल्पना नाही. युरोपात ज्यू लोकांविरूध्द दुस्वास का होता? तर येशू ख्रिस्ताला पकडून नंतर क्रूसिफिकेशन झाले त्यासाठी तत्कालीन काही ज्यू लोक जबाबदार होते!! या प्रकाराला Jewish deicide म्हणतात. ही अगदी अलीकडच्या काळापर्यंत कल्पना प्रचलित होती. १९६५ मध्ये व्हॅटिकनमध्ये झालेल्या बिशपांच्या संमेलनात तत्कालीन पोपने Jewish deicide चुकीचे आहे हे जाहिर केले. The Christian Response to the Holocaust या पेपरमध्ये अमेरिकन काँग्रेसमन रॉबर्ट ड्रिनानने म्हटले आहे---
"While modern antisemitism was born from the racist and nationalistic theories of the last century,it cannot be wholly divorced from the context of Christian-Jewish relations in European history, particularly in what Jules Isaac has called "the teaching of contempt" in Christian circles and the popular emphasis on Jewish culpability for the death of Christ."
माझ्याकडे जे.एस.टी.ओ.आर चे सब्स्क्रिप्शन असल्यामुळे हा पेपर मला डाऊनलोड करता आला.
तेव्हा ज्यूंवर अन्याय झालाच नव्हता असे म्हणणे अयोग्य आहे असे मला वाटते.
ज्यू लोकांनी संकटाचे रूपांतर संधीत कसे केले हे बघणे रोचक ठरेल. बँकिंग आणि फायनान्समध्ये ज्यू लोक मोठ्या प्रमाणावर आहेत त्याचेही ऐतिहासिक कारण आहे. बायबलमध्ये म्हटल्याप्रमाणे आपल्याच भावंडांना (पक्षी इतर ख्रिस्ती लोकांना) व्याजावर पैसे कर्जाऊ देण्यावर (usury) बंदी आहे आणि अर्थातच कुणालाही पैसे कर्जाऊ देताना व्याज घेता येत नसेल तर ते बिझनेस मॉडेल चालायचे नाही.त्यामुळे सुरवातीला ख्रिस्ती लोक या बिझनेसमध्ये उतरू शकत नव्हते. पण ज्यू हे ख्रिस्तींचे "भावंड" नसल्यामुळे ज्यू लोकांना मात्र ख्रिस्ती लोकांना पैसे व्याजावर कर्जाऊ देण्यास काहीच अडचण नव्हती. व्हेनिसमध्ये जगातील पहिली बँक ७००-८०० वर्षांपूर्वी चालू झाली. ती बँक म्हणजे ज्यू घेटोतून एक ज्यू मनुष्य (नाव विसरलो-- अॅसेन्ट ऑफ मनी या पुस्तकात त्याचे नाव दिले आहे. ते तपासायला हवे) व्हेनिसमध्ये एका कालव्याच्या काठी टेबल टाकून पैसे कर्जाऊ देत असे. त्यातूनच ज्यूंमध्ये ही परंपरा सुरू झाली. अशाप्रकारे संकटाचे संधीत रूपांतर ज्यूंनी केले होते.
ज्यू लोक बिच्चारे वगैरे नाहीत असे म्हटले जाते. इथेही म्हटले गेले आहेच. शतकानुशतके घेटोमध्ये राहायला लागूनही, होलोकॉस्टसारख्या भयंकर घटनेत इतकी प्रचंड हानी होऊनही, दोनेक हजार वर्षे युरोपातील विविध देशांमध्ये भटकायला लागूनही "My next Saturday's prayer will be in Jerusalem" असे प्रत्येक शनीवारच्या प्रार्थनेच्या शेवटी म्हणायची विजिगीषू वृत्ती ज्यू समाजाकडे आहे. त्याबद्दल त्यांना मानलेच पाहिजे. आपल्याकडे मात्र दादरी, गेलाबाजार गुजरात अशा घटना झाल्यानंतर मात्र अल्पसंख्यांक कित्ती कित्ती बिच्चारे असे म्हणायची चढाओढच लागते. असो.
दुसरे म्हणजे ज्यू लोक त्यांची दाढी, वेशभूषा इत्यादींविषयी अगदी पराकोटीचे काटेकोर असतात असेही म्हटले गेले आहे. पण केवळ ज्यू म्हणून जन्माला आल्यामुळे शतकानुशतके ज्या समाजावर अन्याय होत आला आहे ते अधिक कॉन्झर्व्हेटिव्ह बनले तर त्यात आश्चर्य कसले?
बापूसाहेब,
>> त्यांना प्रॉमिस्ड लँड मिळाली अन त्यांनी ती मिळवायला काही दहशतवादी सहारा घेतला नाही हे कौतुकास्पद आहे
>> (घेतला असल्यास तसे संदर्भ सांगणे)
१९४८ साली इझरायल उत्पन्न करतांना फिलीस्तिनी अरबांवर भयानक दहशतवादी आक्रमणे आणि कत्तली केल्या गेला. यांतलं दीर-यासीन चं हत्याकांड अतिशय बदनाम आहे.
शिवाय आज इझरायलच्या नावाखाली जे ज्यू फिलीस्तिनी जमीन बळकावून बसले आहेत त्यांचे पूर्वज मध्य आशियाई होते. ते पारंपरिक यहुदी नव्हेत. प्राध्यापक अल्फ्रेड लिलीयेन्थाल नामे ज्यू तत्ज्ञानेच हे सिद्ध केले आहे.
जे जुन्या ज्युदियामधून हाकलले गेले ते सेफार्दी होते. याउलट आज फिलीस्तिनी जमीन बळकावणारे अश्केनाझी खज्जर आहेत. खज्जर ही एक भटकी जमात होती. तिचा राजा सहाव्या/सातव्या शतकात यहुदी झाला. म्हणून ती पूर्ण जमात स्वत:ला यहुदी मानत असते. तिचा अब्राहम, मोशे, जेकब, सॉलोमन, इत्यादिंशी कसलाही भावनिक संबंध नाही.
आ.न.,
-गा.पै.
येस- काही अंशी ती कारणे सिनॉनिमस म्हणता येतील खरी, पण एक महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे गेली शेकडो-हजारो वर्षे अनेक देशांत सेकंड क्लास सिटिझन्स म्हणून ज्यू राहत आलेले आहेत. ख्रिश्चन युरोपात त्यांच्यावर हिटलरच्या शेकडो वर्षे अगोदरपासून खूप अत्याचार झाले. त्याच्या मुळाशी वेगळे राहणे हेच कारण आहे असे वाटत नाही. स्वतःची वैशिष्ट्ये वेगळी राखणे हे अत्याचाराचे कारण होऊ शकत नाही. भारतात वाढल्यामुळे उपासनापद्धतींमधले वैविध्य राखून मिक्स होणे हे आपणा सर्वांना ऑब्व्हियस वाटते. युरोपात तसे नव्हते. ते लोक आत्ता आत्ता सुधारलेत, नायतर इस्लामिक अत्याचारांची वर्णने सुसह्य वाटावीत असे अत्याचार त्यांनी केलेले आहेत. दोन अब्राहमिक धर्म जेव्हा टक्करतात तेव्हा बर्याचदा तो संघर्ष रक्तरंजित होतो. सांस्कृतिक वेगळेपण राखणे म्हणजे 'अँटी-नॅशनल' (ही संज्ञाही या संदर्भात कालविसंगत आहे कारण तेव्हा नेशन स्टेट या संकल्पनेचा उदय झालेला नव्हता) राहणे नव्हे हे युरोपच्या पचनी पडणे अवघडच होते असे वाटते. विशेषतः धार्मिक संदर्भात, कारण धर्म आणि पॉलिटिक्स हे मध्ययुगीन युरोपात इस्लामच्या हजारपटीने एकमेकांशी निगडित होते. त्यामुळे यात ज्यूंचा दोष नाही असे माझे मत आहे.
मुसलमानांची गोष्ट तशी नाही. सेकंड क्लास सिटिझन म्हणून राहण्याची त्यांना सवय नाही. शिवाय धार्मिक पगडा गेला तरी सपाटीकरणाचा युरोपियन हव्यासही गेलेला नाही. अगोदर ख्रिश्चन करू पाहत, आता सेकुलर लिबरल वगैरे करू पाहतायत. पण हव्यास सारखाच आहे.
बाकी इस्राएल मुसलमान देशांशी लढते म्हणूनच त्यांना साथीदार मानणे हे अर्थातच चूक आहे. कुठल्याही देशाचा जिथवर होईल तिथवर फायदा करून घ्यावा. सांस्कृतिक एकात्मता, साम्य, प्राचीन संबंध, इ. गोष्टींचे मस्कापॉलिश पाहिजे तेव्हा अन पाहिजे तसे वापरता येते. लागेल तसे ते वापरावे अशा मताचा मी आहे.
बापू - आदरपूर्वक असहमती तुमच्या ज्युंना आणि मुसलमानांना एकाच तराजुनी तोलण्याच्या प्रयत्नांना. ज्यु लोक इतर समाजात मिसळत नाहीत ( मुख्य म्हणजे "बेटी" व्यवहार करत नाहीत ), पण हा काही अपराध नाही.
उलट ज्यु कधीच मुसलमानांसारखे दुसर्यांना बाटवत नाहीत. तसेच ज्यु इतर समाजापासुन वेगळे राहिले का इतर समाजाने त्यांना वेगळे ठेवले कायम हे ही बघा. ज्युंचे घेट्टो हे मध्ययुगीन काळापासुन अस्तीत्वात आहेत.
युरोप मधल्या सर्व देशांमधे, त्या त्या देशाची भरभराट ( आर्थिक, वैज्ञानिक आणि अगदी सांस्कृतिक सुद्धा ) करण्यात ज्युच आघाडीवर राहीले आहेत. ज्यु हे त्यांच्या स्वताच्या आणि बाकी सर्व समाजाला कायम वैचारिक प्रगतीकडे घेउन जात आले आहेत. त्यांची तुलना सर्व समाजाला सातव्या शतकात नेणार्यांशी करु शकत नाही .
ज्युं बद्दल चा युरोपियन लोकांना असलेला राग हा मत्सरातुन आला असावा.
गापै,
चर्चा ज्यूंवर भरकटली असल्यामुळे मी पण एक प्रतिसाद ज्यूंवर आताच लिहिला आहे. पण माझा मुळातला मुद्दा कॉन्स्पिरसी थिअरीशी तितकासा निगडीत नाही. ज्यूंचा सगळे काही वाईट होते त्यात हात आहे असे म्ह्टले किंवा अगदी समजा ज्यूंऐवजी अॅन्डिज पर्वतातील कुठल्या भटक्या जमातीचा जगात जे काही चालते त्यात हात आहे असे म्ह्टले असते तरी त्यात डोक्याला शॉट लागावा असे काहीच नाही. लोकशाही आहे. प्रत्येक माणूस आपल्याला पाहिजे त्या कल्पना लढवू शकतो. मुद्दा असा आहे की भारतात तालिबानी फोफावतील ही कपोलकल्पित कल्पना बाहेरच्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी पसरवून दिली आहे असे इथे म्हटले गेले त्यामुळे मात्र डोक्याला जबरदस्त शॉट गेला.
१३ डिसेंबर २००१ रोजी आपला देश संसदभवन हल्ल्यासारख्या महाभयंकर प्रकारातून कसा काय वाचला हेच समजत नाही. खरं तर फिजीमध्ये झाले त्याप्रमाणे मंत्रीमंडळच ओलीस ठेवले जायचे त्यावेळी.आणि त्या जोरावर ते हरामखोर आपल्याला पाहिजे त्या मागण्या मान्य करून घेऊ शकले असते. भगवंताचीच कृपा म्हणायची की असले काही झाले नाही. इतके सगळे होऊनही तालिबानी शिरजोर होतील ही कपोलकल्पित भिती आणि ती पण अन्य कोणीतरी पसरवलेली असे कुणाला वाटूच कसे शकते कोणाला? हजार-बाराशे वर्षात काय झाले हे माहित असायची अपेक्षा नाहीच. पण निदान गेल्या २०-२५ वर्षात काय झाले आहे, काश्मीरातून तीन लाख लोकांना नेसत्या वस्त्रानिशी केवळ हिंदू म्हणून कसे हाकलले गेले, "कश्मीरमे पंडित नही पंडितानिया रहेंगी" (कशाकरता ते विचारू नका) अशा स्वरूपाच्या घोषणा त्या हरामखोरांनी आपल्या नाकावर टिच्चून दिल्या होत्या इत्यादी गोष्टी तरी दुर्लक्षित केल्या जाऊ नयेत ही अपेक्षा तर नक्कीच आहे आणि तशी अपेक्षा ठेवली तर त्यात काय चूक आहे?
खरं सांगायचे तर भारताला असली कसलीच भिती नाही आणि या सगळ्या कल्पनांचे बुडबुडे इतरांनी सोडले आहेत अशा प्रकारचे काहीतरी वाचले आणि डोक्याला लै शॉट गेला बघा.
असो.
याला उपाय काय ?
याला म्हणजे कॉन्स्पिरसी थेअरीला नाहि बरं.. तशा थेअर्या मिपावर अंधश्रद्धी वैज्ञानीक धागे प्रसवतात तशा येतच राहतील... मूळ समस्येला उपाय काय ?? (आमच्या मते एकच... तमसो मा ज्योतिर्गमय. पण हा बुरसटेला, अंधश्रद्धाळु आणि बावळट असा पौराणीक उपाय झाला. त्यात वैज्ञानीक सत्य अजीबात नाहि)
वाळुत डोकं खुपसून बसणं म्हणजे आत्मघात आहे. कुठल्याही प्रकारचं युद्धशास्त्र म्हणजे रोगाचा उपद्रव आटोक्यात आणण्याचा क्षीण प्रयत्न झाला. आर्थीक बाजुने केलेले उपाय म्हणजे दिवास्वप्नच. आयला मग उरलं काय ??
बोक्या भाऊ, गैरी ट्रूमन साहेब, गापै, बॅटमॅन भाऊ, डॉक्टर साहेब
तुमचे अनेक आभार , बरीच नवी माहिती मिळाली अन माझा तर्क नीट लाइन मधे आणायला बरीच मौलिक अन तार्किक एडिशन झाली ज्ञानात आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार
वाळुत डोकं खुपसून बसणं म्हणजे आत्मघात आहे. कुठल्याही प्रकारचं युद्धशास्त्र म्हणजे रोगाचा उपद्रव आटोक्यात आणण्याचा क्षीण प्रयत्न झाला. आर्थीक बाजुने केलेले उपाय म्हणजे दिवास्वप्नच. आयला मग उरलं काय ??
खरं आहे. या प्रकाराला अटकाव घालायला हातात उपाय तसे बरेच कमी आहेत. कधीना कधी डोक्यात प्रकाश पडेल अशी अपेक्षा आणि आशा करण्याव्यतिरिक्त फार काही राहिले आहे असे वाटत नाही. पण तरीही शहामृगासारखे वाळूत डोकं खुपसणारे लोक मात्र प्रचंड डोक्यात जातात.
फेसबुक आणि बाकीचा इथे काही डांगे साहेबांनी मांडला आहे तो कॉन्स्पिरसी थेरी आहे कि एकदम सत्य आहे? बाबो हे पचनी पडणे अवघड आहे. विन्ग्लंड देशात अनेक वर्ष काढल्याने हे पचनी पडणे खरोखर कठीण आहे. वेपन्स ऑफ मास डीसट्रकशन वगैरे खरोखर कॉन्स्पिरसी थेरी होती आणि अनेक लोकांनी त्यावर आवाज इथेच उठवला होता. पण हे जरा अति लॉजिक आहे डांगे ह्यांचे. पटले नाही अजिबात. बराचश्या कंपन्या ह्या खरोखर अत्यंत कल्पल बुद्धीतून तयार झाल्या आहेत. दुर्द्वाईने आपल्याला त्याची कदर नाही आणि आपल्याकडे तशी ईकोसिस्टिम नाहीये. त्यामुळे आपल्याला हे सगळे खोटे वाटणे कदाचित साहजिक असावे. आपल्याकडे जुगाड त्यालाच महत्व पण उत्तम गोष्ट करणे आपल्याला झेपत नाही.
वर्षाचा दीड ते सहा महीने १९००० फुटांवर एकही मानवी शब्द थेट न ऐकता राहिले की होते असे__/\__मिपावर कुणी मुस्लिम आयडी का नाहित व असलेले इथे का लिहित नाहीत ह्या प्रश्नाचं आज उत्तर मिळाले.मुस्लिम आयडी आहेत. थोडा शोध घ्या. लगेच मिळतील.