पिंगा, बाजीराव मस्तानी, भन्साळी इत्यादी
पिंगा.
येऊ घातलेल्या बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटातील हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रकशित झालं. या गाण्याविरोधातल्या पोस्ट्सनी कायप्पा, चेपूवर पिंगा घातलेला असताना, मिपावर धागारुपी पिंगा कसा झाला नाही या विचाराने डोक्यात पिंगा घालायच्या आत म्हटलं विषयास वाचा फोडू.
मी गाणं बघितलं. पेशवाई, बाजीराव पेशवे, मस्तानी, काशीबाई यांबद्दल मला जे कमीअधिक ज्ञान आहे, त्या आधारे मी म्हणतो, की हे गाणं म्हणजे अचरटपणा आहे. मुळात भन्साळी ने बाजीराव-मस्तानी वर पिक्चर बनवणे, रणवीर सिंग नामक इसमाने बाजीरावाची व्यक्तिरेखा साकारणे, यातूनच समोर येणा-या गोष्टींचा टोन सेट झाला होता.
बाजीराव पेशवे हे त्यांचं कर्तृत्व, पराक्रम, साहस, निष्ठा, इत्यादी गोष्टींसाठी कमी आणि मस्तानीसाठी जास्त ओळखले जातात हे आपलं दुर्दैव आहे. त्यांचं नव्हे. बरं, मस्तानीच्या नात्याकडे ज्या हीन नजरेने बघितलं जातं ते क्लेशदायक आहे. हे नातं, किंबहुना बाजीरावांबद्दल जितकं मला माहिती आहे त्या आधारे त्यांनी जोडलेल्या प्रत्येक नात्यात निष्ठेचं, कमिटमेंटचं उदाहरण घालून दिलेलं आहे. मस्तानी, काशीबाई, समशेर, कुणालाही वा-यावर न टाकता जपण्यात स्वतःची तगमग करून घेतलेली आहे. पण तरीही; मस्तानीकडे चीप या नात्याने आणि बाजीरावाकडे लफडेबाज या नात्याने बघितलं जातं. असो. हा विषय मोठा आहे आणि मी जाणकार नाही. गाण्याकडे येतो.
गाण्यासंबंधी, पेशव्यांसंबंधी काही प्रश्न, काही विधानं. पुढे काथ्याकूट करण्यास मिपाकर समर्थ आहेच.
भन्साळीला पेशव्यांबद्दल किती माहिती आहे? ती घेण्याचा त्याने किती प्रयत्न केला?
मस्तानी आणि काशीबाई एकत्र नाचतात? वा!
तेही उद्दीपित करणा-या साड्या घालून? वा!
असं वाचलेलं आहे की काशीबाईंना पायाची व्याधी होती. त्यामुळे त्या नाचणं दुरापास्तच. (यावर कुणीतरी प्रकाश टाका)
तेही ठीक; पेशवे घरंदाज होते, त्यांच्याकडे कलेची कदर होत असे. थिल्लर नाचांची नाही.
पिंगा नेमका कधी घालतात?
या गाण्यात एक दोन ठरलेल्या लावणीच्या अदा सोडल्यास त्याला लावणी म्हणण्यासारखं त्यात काही नाही.
या गाण्याकडे बघता पिक्चर कसा असेल, काय दिवे लावले असतील, इतिहासाची विटंबना कशी केली असेल याचा अंदाज येतोच. त्यात दैवदुर्विलास असा की भन्साळीने म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या पिढीला जेवायला आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी या चित्रपटाची स्तुती केली. प्रमोशनचा भाग असेल हा कदाचित. तसं असेल तर अजूनच दुर्दैवी आहे हे. आता हा पिक्चर आला की बाजीराव पेशव्यांबद्दल किती आणि कसे गैरसमज अमराठी (कदाचित मराठीही) लोकांत पसरतील हे चिंताजनक तरीही अटळ आहे.
मिपाकरांनी अजून सुचतील तसे मुद्दे मांडावेत असं आवाहन करतो.
पिक्चरला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसलेला
वेल्ला भट
💬 प्रतिसाद
(344)
र
रेवती
Fri, 11/20/2015 - 20:29
नवीन
तुमच्या या प्रतिसादाच्या वर दोन प्रतिसाद सोडून वाचा की पिंग्यात चुकीचे काय आहे. थोडेसे वाचत वाचत खाली गेलात तर सांगोपांग चर्चा झालीये.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Wed, 12/02/2015 - 07:24
नवीन
हे बघा उद्या शिवाजी महाराजांवर चित्रपट बनला तर जिजाऊ बाईसाहेबांना त्यात लावणी सादर करताना दाखवतील हे लोक. ते चालेल का तुम्हाला? वर तोंड करुन बोलायला तयार आहेतच हे लोक की लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे. सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून इतपत दाखवले तर काय वाईट म्हणुन.
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 11/20/2015 - 20:00
नवीन
तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो, जेव्हा लोक परकी भाषा, संस्कृती शिकतात तेव्हा तुमचे शिक्षक त्या त्या भाषेतले, संस्कृती दाखवणारे सिनेमे बघायला सांगतात. आता उद्या जर कोणी हा सिनेमा बघितला आणि स्वप्नरंजन म्हणून का होईना हे दृष्य त्यात असलं, ती व्यक्ती काय समजेल? थोडा विचार करता आला तर बघा, नाहीतर तुमचं जे चाललंय ते उत्तम आहे.
- Log in or register to post comments
आ
आबा
Fri, 11/20/2015 - 20:11
नवीन
मला माहीत नसेल असे गृहीतच धरलेय त्याबद्दल धन्यवाद.
अहो भन्साळी चा पांचट सिनेमा आहे तो त्यावरून कोणी मराठी संस्कृती शिकायला जाणार नाही, चिंता नको
अब्राहम लिंकनची बायोग्राफी शिकविण्यासाठी "अब्राहम लिंकन , द वँपायर हंटर " हा चित्रपट बघायला सांगतील का?
किंवा दुसर्या महायुद्धाचा इतिहास शिकण्यासाठी कोणी "इन्ग्लोरियस बास्टर्ड्स" बघेल का?
(इथे टॅरँटीनो आणि भन्साळीची तुलना करत नाहीय)
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Fri, 11/20/2015 - 20:16
नवीन
तुम्हाला माहित नसेल असं वाटावं असेच प्रतिसाद देताय तुम्ही. एकिकडे पांचट म्हणताय त्या सिनेमाला एकिकडे त्याच सिनेमा ला डीफेंड करताना लोकांना रेसिस्ट म्हणताय, त्यांचा माज चालू आहे म्हणताय. एकदा काय ते ठरवुन घ्या.
- Log in or register to post comments
आ
आबा
Fri, 11/20/2015 - 20:31
नवीन
मी सिनेमाला नाही डीफेंड करत (कारण माझ्या डीफेन्स ने काही फरक पडणार नाही )
इतिहासा पासून फारकत घेतली आहे हे तर स्पष्टच आहे पहिल्याच कमेंट मध्ये तसं लिहिलय मी...
मला त्या गाण्यामुळे इतिहासाचं विकृतीकरण होतं असं मात्र वाटत नाही
कारण त्यात व्हल्गर काहीच वाटत नाही
चोप्रा , पदुकोण आणि रणवीरसिंग यांच्या दिसण्याबद्द्लच्या कमेंट्स मात्र रेसिस्ट्च आहेत
वरती कोणीतरी बीसीसीआयला बीसीसीआयचे ड्बे जोडलेले असतील तरच महत्व कळेल असंही लिहीलेलं आहे
(if you are a true Indian...) :)
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 11/20/2015 - 20:34
नवीन
आबासाहेब, आम्हाला माफ करा.
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Fri, 11/20/2015 - 20:35
नवीन
खिक !
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Fri, 11/20/2015 - 20:37
नवीन
अहो त्यांच्या नाही पेशव्यांच्या दिसण्याबद्दल कॉमेंट चालल्यात इथे. पात्ररुपांतर कलाकाराचं झालंच पाहिजे. उद्या तुम्ही विक्रम गायकवाड वगैरे लोकांना गाशा गुंडाळुन घरी जायला सांगाल. सुबोध भावे ने "बालगंधर्व" दिसण्यासाठी किती मेहनत घेतलीये ते बघा.. निम्मी लढाई तिथेच जिंकली जाते.
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 11/20/2015 - 20:26
नवीन
सिनेमा पाहून संस्कृती शिकायला नको हे अगदी सत्य आहे पण काळ इतका बदललाय की झटपट संस्कृती शिकण्याच्या नादात चित्रपटमाध्यम हेच शिक्षणाचे माध्यम बनू पहात आहे. त्याबद्दल जालावर असेल ते हाताशी लगेच उपलब्ध होऊ शकते ना, मग तेच सत्य असे मानण्याची विचित्र पद्धत येऊ पाहतिये म्हणून व एक जबाबदार दिग्दर्शक (जो तो नाहीच) या नात्याने काही गोष्ती करणे आवश्यक असते. ज्या माध्यमावर आपण कोट्यावधी रुपये कमावणार आहोत ते निदान योग्य गोष्टीचे तरी असावेत अशी त्या दिग्दर्शकाला निदान इच्छा तरी असावी.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Fri, 11/20/2015 - 12:18
नवीन
थोडक्यात,
१. उद्या भन्साळी ने महाराजांवर चित्रपट काढला आणि त्यात सईबाईसाहेब, सोयराबाईसाहेब यांना असं नृत्य करताना दाखवलं तर ते चालेल तुम्हाला?
२. उद्या भन्साळी ने आंबेडकरांवर चित्रपट काढला आणि त्यात त्यांच्या पत्नीला असं नृत्य करताना दाखवलं तर ते चालेल तुम्हाला?
३. उद्या भन्साळी ने महात्मा फुलेंवर चित्रपट काढला आणि त्यात सावित्रीबाईंना असं नृत्य करताना दाखवलं तर ते चालेल तुम्हाला?
की पंचरंगी माज फक्त काही जातींनीच करावा असा दंडक आहे?
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Fri, 11/20/2015 - 12:31
नवीन
का,पा. तुमचा क्रम चुकला. आणि एक नाव तर तुम्ही विसरुनच गेलात.
फुले शाहू आंबेडकर असा पाहिजे ना क्रम.
- Log in or register to post comments
आ
आबा
Fri, 11/20/2015 - 19:48
नवीन
मला या तिन्हींमुळे काही फरक पडणार नाही,
तुम्हाला मात्र पिंगा गाण्याने पडलेला दिसतोय
आणि माज सुद्धा जस्टीफाय्बल वाटतोय,
तस्मात, समस्या माझी नाही तुमची आहे
कोणी माज करावा आणि कोणी नाही याचे दंडक मी ठरवत नाही
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 11/19/2015 - 11:37
नवीन
पिच्चरमधून जर हे गाणे काढून टाकले तर पिच्चर बघ्णार कै?
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 11/19/2015 - 11:42
नवीन
हेट, असले प्रश्न विचारायचे नसतात!
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
गुरुवार, 11/19/2015 - 12:02
नवीन
चित्रपटाच्या आधीच त्याच्या प्रसिद्धीत इतके सदस्य गुंतलेले पाहून गंमत वाटली. एक शक्यता म्हणून असं समजा की प्रत्यक्ष चित्रपटात हे गाणं काशीबाई (किंवा बाजीराव) स्वप्नात बघताहेत वगैरे असे काही असेल तर इतक्या सगळ्या गोंधळाची प्रसिद्धी टेक्नीक वगळता काय किंमत राहिल?
तेव्हा चित्रपट प्रदर्शीत झाल्याशिवाय याविषयी मत देणे आततायी वाटते!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 11/19/2015 - 13:21
नवीन
असे म्हणणारे लोकच पुढे काहीही दाखवलं तरी ते ज्याचे त्याचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे वगैरे वकिली करण्यात पुढे असतात असा अनुभव आहे.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
गुरुवार, 11/19/2015 - 14:53
नवीन
आता काय ज्याचा त्याचा परीघ आणि ज्याचा त्याचा अनुभव!
कोणत्याही चित्रपटावर बंदि नसावी असे वाटते.
ज्यांना बघायचे नाही त्यांनी बघु नये, अगदी एकत्र येऊन सामुदायिक बहिष्ष्कार घालावा. वाट्टेल तितकी टिका करावी, चित्रपट पाहून त्याचे अगदी वाभाडे काढावे. तो त्यांचा हक्कच आहे! मात्र सरकारने प्रदर्शन रोखु नये इतकेच!
मला हा चित्रपट बघायचा नाहीच ए, मात्र तो इरतांनीही बघायचा नाही ही मानसिकता मला समजत नाही.
बाकी इतिहासाचा विपर्यास केलाय की नाही हे मी एका भागावरून ठरवू शकत नाही पूर्ण कलाकृती बघावी लागेल.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 11/19/2015 - 15:03
नवीन
अल्पसंख्याक धर्माबद्दल काही सेन्सिटिव्ह गोष्टी दाखवणार्या पिच्चरबद्दल हेच मत असेल का? उदा. दा विंची कोड या पिच्चरला भारतातील ख्रिश्चन संघटनांनी केलेला विरोध बाकी तुम्हांला मान्यच असेल, नै?
आता यावर लगेच "त्यांना सांगा" छाप प्रतिसाद म्हणून झटकून स्वमतांध दांभिकतेत मग्न होण्याचे स्वातंत्र्यही आहेच म्हणा.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 11/19/2015 - 15:20
नवीन
भारतातील ख्रिश्चन संघटनांनी केलेला विरोध >> अरे ते ख्रिश्चन संघटनांचे मतस्वातंत्र्य वा त्यांची अभिव्यक्ती का काय ते.
- Log in or register to post comments
च
चैतन्य ईन्या
गुरुवार, 11/19/2015 - 15:24
नवीन
फुल टू सहमत. हे हल्लीचे स्वयंघोषित लिबरल वैताग आणतात. ह्यांचा सगळा विरोध फक्त एकाच विचारसरणीला. तिची भूमिका सगळीकडे ह्यांना ठेवता येत नाही आणि मग तद्दन फालतू कारण देतात. मग ह्यांच्यात आणि हे ज्या संघिष्ट लोकांना नावे ठेवतात त्यांच्या काही फरक दिसत नाही. एक ह्या टोकाला आणि एक दुसर्या टोकाला. एकाने मारले तर तो भयंकर गुन्हा आणि दुसर्याने केले तर मग त्यांच्यावर कित्ती कित्ती अन्याय होतो. बाप रे वगैरे उसासे टाकून समर्थन. अवांतर इथे. बाकी निवडणूक संपल्यापासून एकजात सगळे असहिष्णू वगैरे वातावरण संपलेले दिसते. एकदम न्याय गोष्टींचा विजय झाल्याने कसे मोकळे आकाश मिळाले आहे आणि सगळे पुरस्कार पुन्हा पुढील निवडणुकी साठी जपणे चालू आहे असे दिसते.
शिवाय तिकडे प्यारीस मध्ये इतका हलकल्लोळ त्यावर गुळमुळीत प्रतिक्रिया (ती पण दिली कि नाही माहिती नाही बहुदा बातमीची दाखल बहुदा घेतली गेली पण तोंड उघडायची हिम्मत काही दाखवलेली दिसत नाही ) देवून मामला मितावालेला दिसतो. तसाच प्रकार आहे. डा विन्ची असो वा तस्लिमा नसरीन नाहीतर तारेक फताह असो. तिकडे एकदम कानाडोळा. वर ते काय लायकीचे वगैरे म्हणजे जसे संघाचे लोक बाकीच्यांना लेखतात तसलेच. काय फरक नाही दोघांच्यात.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
गुरुवार, 11/19/2015 - 15:39
नवीन
अज्जिबात नाही. सोयीस्कर गैरसमज नकोत.
कोणत्याही चित्रपट म्हणजे कोणत्याही चित्रपटावर बंदी नसावी. डा विंची कोडवरही नाही आणि नथुराम गोडसे बोलतोय नाटकावरही नाही की घाशीराम कोतवालही नाही.. बंदी नसावी इतकंहच!
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Fri, 11/20/2015 - 05:56
नवीन
नाही नाही असं सर्वसमावेशक विधान नको. एक एक स्पेसिफिक उदाहरण घेउन म्हणजे काय तो दा विंची, विश्वरूपम वगैरे इतर धर्मांमुळे वादात आलेल्या सगळ्या कलाकृतींविषयी बॅन नको असे डीटेलवार स्टेटमेंट द्या. एकजरी नाव राहीलं तर तर तुम्ही हिंदूविरोधी लिबटार्ड निधर्मांध वगैरे वगैरे !!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 11/20/2015 - 07:35
नवीन
चला, किमान कन्सिस्टन्सी आहे हे पाहून बरे वाटले.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 11/20/2015 - 10:56
नवीन
निळ्या चित्रफिती सुद्धा सार्वजनिकरीत्या दाखवायला आपली करकत नसावी >?
ज्याला हव्या त्याने बघाव्या बाकीच्यानी बघु नये ! बरोबर ?
- Log in or register to post comments
S
sagarpdy
Fri, 11/20/2015 - 13:07
नवीन
अणुमोदन :)
- Log in or register to post comments
प
पद्माक्षी
Fri, 11/20/2015 - 05:25
नवीन
चुकीचा इतिहास दाखवणाऱ्या प्रत्येक कलाकृतीवर बंदी घालायला हवी आणि प्रदर्शन पण रोखावे.
या गाण्यात इतिहासाचा विपर्यास केलाय हे तरी तुम्हाला मान्य?? मग हे गाणे चित्रपटातून काढण्याबद्दल आपले मत काय?
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 11/20/2015 - 07:47
नवीन
हे मी चित्रपट पाहिल्याशिवाय नाही ठरवु शकत. इतक्या ठामपणे काहीही म्हणायला विदा पुरेसा नाही.
हेच गाणे असे नाही चित्रपटातील प्रत्येक गोष्टीवर दिग्दर्शक/निर्मात्यांचा अधिकार असतो. त्यात सरकारने लुडबुड करू नये. जर सेन्सॉर बोर्डाने संमती दिली असेल तर सरकारने यात लक्ष घालु नये ते सरकारचे काम नाही. माझे तर नाहीच नाही!
- Log in or register to post comments
प
पद्माक्षी
Fri, 11/20/2015 - 11:50
नवीन
समजले नसेल तर परत एकदा विचारते. पिंगा या गाण्याचे चित्रीकरण इतिहासाला धरून आहे का? हो किंवा नाही ?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 11/20/2015 - 11:56
नवीन
अनैतिहासिक चित्रीकरण असले तरी त्याबद्दल काही बोलायचा तुम्हांला हक्क नाही हो. ते काम शेणसार बोर्डाचे. एकदा त्यांनी हो म्हटले की काहीही असले तरी तुम्हांला बघावेच लागणार.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 11/20/2015 - 12:26
नवीन
काहीही हं बॅ!
बघावेच कशाला लागेल? नसेल बघायचे तर बघु नये असे आधीच म्हटले आहे. हवं तर सामुदायिक बहिष्कार घालावा. तो प्रेक्षकांचा हक्कच आहे असे आधीच म्हटलेय!
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 11/20/2015 - 12:24
नवीन
हेच सांगायला माझ्याकडे पुरेसा विदा नाही.
हे गाणे कुठे घडते? प्रत्यक्षात घडते म्हटले आहे का बाजीराव नुसते स्वप्न बघतोय? का इतरच कारणासाठी वापरले आहे?
(जसे चित्रपटात नावे जात असतान?, किंवा चित्रपट बाह्य गाणं नुसतं प्रमोशन पुरतं!)
समजा चित्रपटात हे स्वप्न आहे तर बाजीरावाने असे स्पप्न बघणे इतिहासाला धरून नाही वगैरे म्हणणे गंमतीचे ठरेल
तेव्हा, या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय मी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच त्याबद्दल बोलता येईल. त्यावर टिका करता येईल (मला ते नाही आवडले तर मी टिका करेनही, इतरांनाही सांगेन की चित्रपट बघु नका, फार गैर काही वाटले तर जाहिर वाभाडे काढेन अगदी!) पण आधीच काय?
-===
दुसरे असे की इतिहासात काय घडले असेल याविषयी इतकी दुमते आहेत की तुमच्या मते प्रत्येक ऐसिहासिक चित्रपटावर बंदी यायला हवी म्हणाल, कारण त्यात काहीतरी तृटी असतातच! हे चित्रपट ललित कलाकृती आहेत डॉक्युमेंटरी नाहीत!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 11/20/2015 - 13:26
नवीन
असे जनरलाईझ्ड विधान ठोकून दिले की अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करून मोठा तीर मारला अशा भ्रमात राहणार्यांना एक प्रश्न आहे:
जो इतिहासाचा भाग या पिच्चरमध्ये आहे त्याबद्दल नक्की काय दुमत आहे हे पाहिले का? न पाहता अशी विधाने ठोकून देणे म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्य का?
ललित कृती वगैरे खूप ऐकतोय म्हणून प्रश्नः ते चार्ली हेब्दो बद्दल काय मत आहे? झालंच तर इस्लाम संस्थापक मुहंमद यांवरील पिक्चरमध्ये त्यांना प्रत्यक्ष दाखवले तर चालेल का?
- Log in or register to post comments
S
sagarpdy
Fri, 11/20/2015 - 14:02
नवीन
काही दिवसांनी आमचे अमराठी शेजारी-पाजारी मराठी नृत्य म्हणून याला स्टेरिओटाईप करतील. काही दिवसांनी हे पण म्हणू लागतील कि मराठी चित्रपट आणि इतर कलाकृतींनाच महाराष्ट्राची संस्कृती योग्य पद्धतीने दाखवताच नाही येत म्हणून. (तुनळी वर या चर्चा सुरु झाल्यात).
म्हातारी मेल्याचं दुखः नाही…
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 11/20/2015 - 14:05
नवीन
अगदी अगदी....
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 11/20/2015 - 15:27
नवीन
+११११११
- Log in or register to post comments
ल
लई भारी
Sat, 11/21/2015 - 04:30
नवीन
तुनळी वरच्या प्रतिक्रिया:
अवघड आहे! बरेच शोधलं तरी एकपण नकारात्मक(निगेटिव्ह) प्रतिक्रिया दिसत नाही.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Sat, 11/21/2015 - 12:09
नवीन
यातील पहिल्या प्रतिक्रियेला मी उत्तर दिलंय.
शिवाय २-३ नकारात्मक प्रतिक्रियाही आहेत.
बघा.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
गुरुवार, 11/19/2015 - 12:51
नवीन
वर दिलेले प्रतिसाद वाचले . ज्यांची इतिहासाची मजल शिवाजी महाराजांच्या पुढे गेली नाही अशानि बाजीराव मस्तानी वर आक्षेप घेतलेले पाहून मज्जा आली. ह्या निमित्ताने बाजीराव तरी पड़द्यावर आला. आत्तापर्यंत कोणाला का नाही सुचले हो बाजीरावाला पड़द्यावर आणायचे? राघोबा म्हटले की नारायणराव आठवणार पण अटकपार झेंडे विसरून जाणार.
भंसाली काहीही दाखवु देत, त्या निमित्ताने मराठ्यांचा एक उपेक्षित नायक लोकांसमोर येतो आहे. उत्तर भारतियाना कळू देत महापुरुष म्हणजे फ़क्त ओरंगजेब नव्हे ज्याच्या नावाने शहरे उभी राहिली. बाजीरावाचे कर्तुत्व ओरंग्याहुन मोठे होते. तुम्ही तेच बाहेर नाही येऊ दिले तर लोकांना कळणार कसे?
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 11/19/2015 - 13:17
नवीन
हे कधी ठरलं? शेवटी समर्थन करायचंच झालं की कशाचंही करता येतं हे असल्या कमेंट्सवरनं पटतं आपल्याला!!
तुमचा हा प्रतिसाद वाचून तुम्ही किती पाण्यात आहात याचाही अंदाज आला. या आता!! किंवा असं करतो आम्हीच येतो. तुमचं चालू द्या.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
गुरुवार, 11/19/2015 - 14:28
नवीन
९०% मराठी माणसांना पहिला हो पहिला बाजीराव माहित असण्याची शक्यता कमीच. १०%त तुम्ही येत असाल. माहित असण्याचा चुकीचा अर्थ काढु नका. बाजीरावांने मस्तानी बरोबर लग्न केले बस, ह्यापुढे इतिहास काय विचारू नका. ह्या चित्रपटाच्या निमित्ताने चर्चा होईल. जगाला कळेल बाजीराव विषयी. गुग्गलवर बाजीराव शोधले जाईल. हेही नसेल थोड़के
राहता राहिला प्रश्न काशीबाईच्या नाचन्याचा. नक्की काय म्हणायचे आहे टीकाकाराना? काशीबाई नाचू शकत नव्हती का कुलवंत स्त्रियानी नाचू नए?
मागे एका मराठी मालिकेत हो मराठी मालिकेत राघोबांची पत्नी आनंदीबाई एका वैद्याकडून मसाज करुन घ्यायची गोष्ट करते. खलनायिका असली म्हणून काय झाले ती काय कुलवंताच्या घरची सुन नव्हती? तेव्हा या संस्कृतिरक्षकाच्या शेंडीला झिनझिन्या आल्या नव्हत्या.
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 11/19/2015 - 14:40
नवीन
आधीच म्हटलं की राव तुमचं चालू द्या. आनंदीबाईने वैद्याकडून मसाज करुन घ्यायची गोष्ट करणं आणि एक पायाने अधू असलेली बाई रादर पेशव्यांची बायको, पिंग्याचं गाणं वाजवून, दिंड्याच्या एखाददोन स्टेप्स देऊन, 'पिंगा....सेन्सेशनल लावणी नंबर' अशी पब्लिसिटी करुन दणादणा नाचताना दाखवणं यात तुम्हाला फरक कळत नाही त्यातच सगळं आलं. 'पिंगा आणि लावणी दोन्हींचा संबंध काय' हा प्रश्न तुम्ही जर सिनेमॅटीक लिबर्टी मध्ये धरत असलात तर तिथेच बोलणं खुंटलेलं आहे.
कशीबशी नऊवारी नेसली, नथ घातली, खोपा घातला आणि कपाळावर चंद्रकोर काढली की झालंच मराठी, नै का?
स्वतः पेशव्यांच्या वंशजाने लिहीलेलं पत्र वाचा. त्यातूनही तुम्हाला काही वाटलं तर ठीक, नाहीतर भंसाळ्याने काशी केलीच आहे, तुम्ही भर घाला. धन्यवाद!!
- Log in or register to post comments
S
sagarpdy
गुरुवार, 11/19/2015 - 14:30
नवीन
+1
- Log in or register to post comments
य
याॅर्कर
गुरुवार, 11/19/2015 - 14:08
नवीन
एक सांगू काय?
मसाला टाकल्यावरच पदार्थ चविष्ट बनतात.
पण सिनेमात भन्साळींनी जो मसाला टाकलाय तो तुमच्यासारख्यांना रूचला नाहीये हे प्रतिक्रियांवरून दिसतयं.
.
.
.
.
नै म्हणजे बाॅलीवूडवाल्यांकडून भलत्याच अपेक्षा तुमच्या?
"बाजीराव मस्तानी" असं नाव आहे सिनेमाचं,"बाजीराव" नव्हे.
आता विकिपिडिया काय म्हणतयं बघा.
बाजीराव मस्तानी एक आने वाली भारतीय ऐतिहासिक रोमांस फ़िल्म है जिसका निर्देशन और निर्माण संजय लीला भंसालीने किया है। फ़िल्म मराठा साम्राज्य के पेशवा बाजीराव और उसकी दूसरी पत्नी मस्तानी के बारे में बताती है।
.
तर हे असं हाय सगळं,आणि तुम्ही सगळे उगाच त्रास करून घेताय.
- Log in or register to post comments
S
sagarpdy
गुरुवार, 11/19/2015 - 14:33
नवीन
राऊ वाचा. बाजीरावाची युद्ध सोडली तरी पिच्चर चालवायला असल्या मसाल्याची गरज नाही.
हा प्रकार मेगीत गोडा मसाला घातल्यागत आहे.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
गुरुवार, 11/19/2015 - 14:53
नवीन
मागे शाहरुखने माय नेम इज खान च्या वेळेला असाच गदारोळ उडवून दिला होता. त्याने अमेरिकेत आपल्यावर झालेला कथित अत्याचार मिडियामार्फत पद्धतशीरपणे लोकांसमोर आणला. वर शिवसेनेने पण रान उठवले. परिणाम काय? तर हां टुक्कार चित्रपट हिट झाला.
आत्ता तर मोजकि मराठी माणसे सोडल्यास कोणी विरोध करेल असे दिसत देखील नाही.
घ्या दगडावर डोके फोडून!
कोणी सांगितले गोडा मसाला घालून मैग्गी चांगली लागत नाही म्हणून?
राव खाऊन बघा ना एकदा मग सांगा.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
गुरुवार, 11/19/2015 - 15:00
नवीन
भंसाली शिनेमा बनवतो राव, डॉक्यूमेंट्री नाही.
करोड़ो टाकलेत तर वसूल नको व्हायला
- Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे
गुरुवार, 11/19/2015 - 14:49
नवीन
गाणं बघितलं ,काय दिसतेय प्रियंका चोप्रा नौवारीत , अगदी चिकणीचुपडी.त्यामानाने दिपिका एवढी खास दिसत नाही नौवारीत.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sun, 11/22/2015 - 07:41
नवीन
आपल्याला पण प्रियंकाच जास्त आवडली.
बाकि तिने जे काहि घातलय ते नौवारीच आहे का कसं हे आपल्याला माहित नाहि.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 11/19/2015 - 15:05
नवीन
कोकणात दही-हंडीच्या दिवशी पुरुषांचे खेळ असतात. त्यात पिंगाही असतो. पिंग्याची सुरुवात "माझा पिंगा घालतो डिंगा" अशा काहीशा गाण्याने होते. तो पिंगा भन्साळीच्या पिंग्यापेक्षा खुप वेगळा असतो.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- ›
- »