पिंगा, बाजीराव मस्तानी, भन्साळी इत्यादी
पिंगा.
येऊ घातलेल्या बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटातील हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रकशित झालं. या गाण्याविरोधातल्या पोस्ट्सनी कायप्पा, चेपूवर पिंगा घातलेला असताना, मिपावर धागारुपी पिंगा कसा झाला नाही या विचाराने डोक्यात पिंगा घालायच्या आत म्हटलं विषयास वाचा फोडू.
मी गाणं बघितलं. पेशवाई, बाजीराव पेशवे, मस्तानी, काशीबाई यांबद्दल मला जे कमीअधिक ज्ञान आहे, त्या आधारे मी म्हणतो, की हे गाणं म्हणजे अचरटपणा आहे. मुळात भन्साळी ने बाजीराव-मस्तानी वर पिक्चर बनवणे, रणवीर सिंग नामक इसमाने बाजीरावाची व्यक्तिरेखा साकारणे, यातूनच समोर येणा-या गोष्टींचा टोन सेट झाला होता.
बाजीराव पेशवे हे त्यांचं कर्तृत्व, पराक्रम, साहस, निष्ठा, इत्यादी गोष्टींसाठी कमी आणि मस्तानीसाठी जास्त ओळखले जातात हे आपलं दुर्दैव आहे. त्यांचं नव्हे. बरं, मस्तानीच्या नात्याकडे ज्या हीन नजरेने बघितलं जातं ते क्लेशदायक आहे. हे नातं, किंबहुना बाजीरावांबद्दल जितकं मला माहिती आहे त्या आधारे त्यांनी जोडलेल्या प्रत्येक नात्यात निष्ठेचं, कमिटमेंटचं उदाहरण घालून दिलेलं आहे. मस्तानी, काशीबाई, समशेर, कुणालाही वा-यावर न टाकता जपण्यात स्वतःची तगमग करून घेतलेली आहे. पण तरीही; मस्तानीकडे चीप या नात्याने आणि बाजीरावाकडे लफडेबाज या नात्याने बघितलं जातं. असो. हा विषय मोठा आहे आणि मी जाणकार नाही. गाण्याकडे येतो.
गाण्यासंबंधी, पेशव्यांसंबंधी काही प्रश्न, काही विधानं. पुढे काथ्याकूट करण्यास मिपाकर समर्थ आहेच.
भन्साळीला पेशव्यांबद्दल किती माहिती आहे? ती घेण्याचा त्याने किती प्रयत्न केला?
मस्तानी आणि काशीबाई एकत्र नाचतात? वा!
तेही उद्दीपित करणा-या साड्या घालून? वा!
असं वाचलेलं आहे की काशीबाईंना पायाची व्याधी होती. त्यामुळे त्या नाचणं दुरापास्तच. (यावर कुणीतरी प्रकाश टाका)
तेही ठीक; पेशवे घरंदाज होते, त्यांच्याकडे कलेची कदर होत असे. थिल्लर नाचांची नाही.
पिंगा नेमका कधी घालतात?
या गाण्यात एक दोन ठरलेल्या लावणीच्या अदा सोडल्यास त्याला लावणी म्हणण्यासारखं त्यात काही नाही.
या गाण्याकडे बघता पिक्चर कसा असेल, काय दिवे लावले असतील, इतिहासाची विटंबना कशी केली असेल याचा अंदाज येतोच. त्यात दैवदुर्विलास असा की भन्साळीने म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या पिढीला जेवायला आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी या चित्रपटाची स्तुती केली. प्रमोशनचा भाग असेल हा कदाचित. तसं असेल तर अजूनच दुर्दैवी आहे हे. आता हा पिक्चर आला की बाजीराव पेशव्यांबद्दल किती आणि कसे गैरसमज अमराठी (कदाचित मराठीही) लोकांत पसरतील हे चिंताजनक तरीही अटळ आहे.
मिपाकरांनी अजून सुचतील तसे मुद्दे मांडावेत असं आवाहन करतो.
पिक्चरला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसलेला
वेल्ला भट
💬 प्रतिसाद
(344)
भ
भृशुंडी
Sat, 11/21/2015 - 09:00
नवीन
हा जर विरोध करणार्यांचा असा प्रातिनिधिक प्रतिसाद असेल तर तो मेगा LOL आहे.
असो, प्लीज तुमचा "इतिहासाच्या विकृतीकरणाचा" आणि "पेशवे घराण्याच्या अब्रूच्या धिंडवड्यांचा" विरोध चालू ठेवा.
Sometimes things become so ludicrous that they are not even funny anymore.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 11/21/2015 - 09:06
नवीन
ओके. फाइन.
विरोध करणारे करत आहेत. त्याविरूद्ध पोटदुखी होणार्यांना काय प्रॉब्लेम आहे? विरोधक करणारांना हास्यास्पद ठरवण्याची खुमखुमी तुम्हाला का होत आहे?
विरोध करूच नये अशी तुमची भूमिका आहे का? मग तुम्ही तरी विरोध करणारांचा विरोध करायला इथे का कडमडला आहात?
- Log in or register to post comments
भ
भृशुंडी
Sat, 11/21/2015 - 10:08
नवीन
माझी भूमिका ? इतकीच आहे की हे जे विरोध वगैरे चालू आहे ते बालिश आणि १००% हास्यास्पद आहे, lolworthy if I may say so.
आणि त्याला माझा मुळीच आक्षेप नाही. त्यांनी विरोध करावा, निषेध करावा, चित्रपटावर बंदी आणायलाही हरकत नाही.
बाकी इथे कडमडणे -
सांगवीकर म्हणतो तसं जर उदया प्रत्येक ओळ लिहिण्यासाठी दहा हजार रूपये लागत असतील, तर कोण कशाला काही लिहायला जाईल? तेव्हा ते एक असोच.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 11/21/2015 - 10:58
नवीन
बरं मग हुच्च, प्रौढ आणि गंभीर विरोध कसा असतो हे पण सांगा ना गुरुवर्य.
- Log in or register to post comments
भ
भृशुंडी
Sat, 11/21/2015 - 20:35
नवीन
अहो शिष्यवर्य,
विरोध करणं हे बालिश आहे म्हटलं हो. विरोधाची पद्धत नाही.
पण तुम्ही खरंच तुमचा (प्रखर!) विरोध आणि ह्या चर्चा चालू ठेवा. अतिशय मौलिक, महत्त्वपूर्ण अशी सगळी ही चर्चा आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 11/22/2015 - 10:08
नवीन
प्लीज एलाबोरेट इफ यु कॅन. आपल्याला जी गोष्ट चुकीची वाटते त्याला विरोध करणे बालीश आहे की एखादी गोष्ट चुकीचे वाटणे बालिश आहे की अजून काही.
- विरोध करणार्यांना विरोध करून विरोध करणेच बालिश आहे असं म्ह्णणार्या श्रेष्ठ गुरुंचा नम्र शिष्य
- Log in or register to post comments
भ
भृशुंडी
Sun, 11/22/2015 - 19:38
नवीन
Sorry, I don't have to elaborate anything.
माझा विरोध बिरोधाला अजिबात विरोध नाही, उलट सॉल्लिड पाठिंबाच आहे- हे तुम्ही वटवाघूळ नसाल तर तुम्हाला कळायलाच पाहिजे होतं.
आता गुरूदक्षिणा म्हणून एक कराल का?
जरा कमी टायपत जा इथे, आणि रिलॅक्स.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 11/23/2015 - 05:14
नवीन
जरा कमी टायपत जा इथे, आणि रिलॅक्स.
you got any problem with that...? seriously?
- Log in or register to post comments
स
सायकलस्वार
Fri, 11/20/2015 - 21:41
नवीन
नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार मिपावरची चर्चा वाचून संजय लीला भन्साली यांना आपल्या हातून घडलेल्या ऐतिहासिक प्रमादाची जाणीव झाली असल्याचे कळते.
त्यामुळे आता चित्रपटात 'पिंगा' हे गाणे चालू असताना खालीलप्रमाणे पाट्या दाखवण्यात येतील.
१) पेशवाईमें बम्मन स्त्रियाए इस प्रकार की नउवारी नही पहना करती थी, बल्कि पेट पुरी तरह से कव्हर करनेवाली नउवारीयां पहनती थी
२) पेशवा स्त्रियाए डान्स नही करती थी, बल्कि (बहुत आग्रह किया तो) ज्यादासेज्यादा फुगडी खेलती थी
३) बाजीराव पेशवा ने मस्तानी के साथ शादी करने के अलावा और भी कई बडे काम किये थे
४) मंगळागौर में पिंगा नही, 'दिंडा' खेला जाता था
याखेरीज कुणाला इतर आक्षेप असल्यास कृपया धाग्यावर नोंदवावेत, म्हणजे भन्सालीसाहेबांना त्याची नोंद घेता येईल.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Sat, 11/21/2015 - 03:32
नवीन
मोर्चे काढ़ा, दगडफेक करा, इथे मिपावर प्रतिसादाचा कीस पाडा, गेलाबाजार त्या असहिष्णुवाल्यासारखे डेलिगेशन घेऊन जा, मोदी सरकार हायहाय म्हणून घोषणा दया. अरे पण ते पिक्चर तर रिलीज़ होउ दया. पहिल्या बाजीरावावरचि पुस्तके तर वाचा आणि हो आदर्श ठेऊ नका. कारण युद्धावर पराक्रम वैगेरे राहिला दूर ते दोन बायकाचेच तेवढे लक्षात ठेवतील आपली लोकं. तसेपण दुसऱ्या बाजीरावाचे पुस्तक न वाचताच त्याचा आदर्श घेऊन कृति करणारे बरेच लोकस्स आहेत आपल्याकडे!
कृपया ही वैयक्तिक टिका नाही☺
ते मस्तानीला काय विरोध वैगेरे होता तो तिला बायको करुन घेण्याबद्दल होता वो, लिव इन चाल्ल्ल अस्त लोकाइली.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Sat, 11/21/2015 - 05:35
नवीन
हा आला सिनेमाचा अधिकृत ट्रेलर
आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Sat, 11/21/2015 - 12:11
नवीन
बाकी काही असो; ट्रेलर जबर वाटतो.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 11/22/2015 - 08:14
नवीन
+११११११११
पण एकीकडे प्रेमकथा आहे असे सांगत आहेत आणि ट्रेलरमात्र युध्धपटासारखा आहे...कुछ तो गडबड हय
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sun, 11/22/2015 - 08:23
नवीन
पण त्या बाजीरावाच्या पात्राचा आवाज म्हणजे थोडा 'हे'च वाटतो ना. बाजीरावकी तलवार, प्रेम है ऐय्याशी नहि वगैरे डायलॉग 'ए चाय गरम चाय गरम' किंवा 'दसा का बीस दस का बीस" स्टाईलचे वाटले.
- Log in or register to post comments
प
पद्माक्षी
Sun, 11/22/2015 - 16:59
नवीन
ती प्रियांका अशी काय वेड्यासारखे चाळे करतीय?
- Log in or register to post comments
र
राही
Sat, 11/21/2015 - 18:50
नवीन
खूप चर्चा झाली आहे, आता जरा एक वेगळी बाजू म्हणून लिहीत आहे. चित्रपटाच्या गुणगौरवामध्ये अथवा टीकेमध्ये भाग घेण्याचा हेतू आणि इच्छा नाही.
तर, तीनशे साडेतीनशे णेवर्षांपूर्वी, कोंकणातल्या एखाद्या सर्वसाधारण ब्राह्मण स्त्रीचा पेहेराव कसा होता असेल? मला वाटते की गाठीची चोळी आणि नऊवारी आखूड ओचे खोचलेले लुगडे असा असेल. कोंकणातल्या उष्ण-दमट हवामानात शालीची जरूर नव्हती, उलट अडथळाच होता. शिवाय चार महिने बदाबदा पाऊस. आणि कोंकणातले ते सुप्रसिद्ध अठरा विश्वे दारिद्र्य. घुंघट किंवा डोक्यावरून पदराची पद्धत नव्हतीच. मोठ्या माणसांसमोर यायचे झाले तर दोन्ही खांद्यांवरून पदर मात्र असावा. बाकी दारिद्र्यास अनुसरून प्रत्येकाला काम करावे लागतच असणार. त्यावेळी सोय म्हणून पदर खांद्यांवरून न घेता कंबरेला खोचतच असतील. (पदर खोचणे हा वाक्प्रचार त्यावरूनच आला असेल काय?) पुढे पुण्यात थंडीमुळे शाल/शेला यांची भर पडली असावी. चोळीच्याऐवजी लांब पोलके (याला मराठीत झंपर म्हणत असत. मात्र, काही ठिकाणी परकरालाही झंपर म्हटलेले ऐकले आहे. पण नऊवारी काळात परकर नव्हता. इंग्रजी जंपर-पिनॅफर वेगळा) घालण्याची पद्धत महाराष्ट्रात नसावी. पोर्ट्रेट्साठी मुद्द्दाम केलेल्या पेहेरावावरून सरसकटीकरण करणे तितकेसे योग्य नाही. रोजच्या कामकाजाचा पेहेराव वेगळाच असणार. लांब पोलक्याची पद्धत एकोणिसाव्या शतकातल्या सुशिक्षित पारसी बायकांत प्रचलित होती. बंगाली बायकाही अशी दोन्ही बाजूंना अगदी छोटी स्लिट, छाट असलेली पोलकी घालीत असत. या स्लिट मुळे पदर वर खांद्यावर टाकणे सोपे होई. ही पोलकी म्हणजे राजस्तान वगैरे प्रांतातल्या कमीज किंवा कुडतीची मिनीमिनी आवृत्ती. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी कुलीन सुशिक्षित स्त्रिया नुकत्या नुकत्या सभासंमेलनांसाठी बाहेर पडू लागल्या होत्या तेव्हाच्या त्यांच्या फोटोत अशी लांब पोलकी दिसतात. मराठीतल्या अगदी जुन्या सामाजिक सिनेमातही दिसतात.
बायका एरवी (अंगकामाच्या वेळा सोडून) दोन्ही खांद्यावरच्या पदराने वावरत असल्या तरी मंगळागौरीचे खेळ खेळताना तो पदर कंबरेला घट्ट खोचावाच लागत असणार. लुगडेही व्यवस्थित घट्ट आवरून घ्यावे लागत असणार. चोळीमुळे कंबरेचा एका बाजूचा भाग उघडा राहात असणार. पण बायकां-बायकांमध्ये हे चालून जात असावे.
आता चोळीबद्दल. नऊ तुकड्यांची चोळी शिवणे हे कौशल्याचे काम असे. शिवाय ती खणाची असे. म्हणजे बाहीचे तुकडे ठरलेलेच असत. आणि खण हा ताग्यातून कापलेला नसणार. तो स्वतंत्र विणलेला (मध्ये धागे सोडून) असे.( या बद्दल कोणी अधिक खुलासा अथवा बिनचूक माहिती दिल्यास आभारी.) त्याचे आकारमान ठरलेले असणार. फार तर एक दोन आकारांचे वैविध्य होते असू शकेल. म्हणजे पन्हाही ठरीवच. यातून चोळी शिवायची. म्हणजे प्रौढ स्त्रियांना ती अंगभर होत नसेल.
अर्थात हे सगळे सामान्य ब्राह्मणस्त्रियांबाबत झाले. पेशवेपत्नीचा पेहेराव वेगळाच असणार.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 11/21/2015 - 19:33
नवीन
राजा रविवर्माच्या चित्रांवरून कल्पना यावी. पेशव्यांचा काळ जरा आधीचा.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sun, 11/22/2015 - 07:52
नवीन
.
- Log in or register to post comments
न
नाव आडनाव
Sun, 11/22/2015 - 08:15
नवीन
अख्ख्या चर्चेतल्या एखाद्या प्रतिसादासाठी वाचनखूण साठवावी असा प्रतिसाद...
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/22/2015 - 08:42
नवीन
गाणं भारी आहे, दोघीही आवडल्या. तब्येत खुश झाली काल चित्रपटात ट्रेलर पाहतान्ना. डोला रे डोला गाण्याची आठवण मात्र सारखी होत होती.
बाकी चालु द्या....!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sun, 11/22/2015 - 18:10
नवीन
डोला रे डोला पेक्षा पिंगा नक्कीच उजवं वाटतं
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Sun, 11/22/2015 - 18:47
नवीन
ट्रेलर खालील प्रतिसाद वाचले. नकारात्मक एकही नाही.
ह्या भन्साळी ला २०१६ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाच म्हणून समजा
एका गाण्यातच त्याने बाजीराव मस्तानी ह्यांना महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले तेही सिनेमा प्रदर्शित होण्याच्या आधी तेही पिंगा घालून.
प्रतिसादात प्रियांकाच्या अभिनयाची दिसण्याची चर्चा जास्त झालेली दिसली.
आता सिनेमा प्रदर्शित झाल्यावर मस्तानी पेक्ष्या काशीबाई भारतात जास्त लोकप्रिय झाल्या तर नवल ते काय
मला स्वतःला ट्रेलर आवडला त्यात महेश चा आवाज ऐकला, बरे वाटले.
वैभव तत्ववादी बहुदा चिमाजी ची भूमिका करत असावा. त्याला पहायचे आहे.
तन्वी आझमी बाजीरावाच्या आईच्या भूमिकेत आहेत, शाहू महाराजांच्या भूमिकेत महेश मांजरेकर आहेत. विकी अंकल सांगतो मिलिंद सोमण व संजय मिश्रा सुद्धा आहेत त्याची भूमिका कोणती असेल हे जाणण्यास उत्सुक आहे.
बिचार्या रुक रुक खान ला परत एखादे वादग्रस्त विधान करावे लागणार त्याच्या दिलवाले साठी
सध्या हवा बाजीराव मस्तानी ची आहे देशभर .
पिंगा वादात झालेला विरोध हा प्रामुख्याने सोशल मिडिया वरून झाला तेही संयत भाषेत
तर ह्या आधी जो वाद पुरस्कारावरून झाला. त्यावेळी वापरलेली भाषा आणि विरोधाची पध्धत कमालीची घसरली होती.
मतांच्या राजकारणासाठी राजकारणी त्यात उतरले.
ह्यावेळी राजकारणी लोकांच्या शिवाय पिंगा विरोध हा सुसंस्कृत समाज अजूनही भारतात इदान महाराष्ट्रात जिवंत आहे ह्याची खात्री पटली.
पिंगा विरोधाला विरोध करण्यासाठी काही लोकांनी जातीयता मध्ये काढली पण पिंगा विरोधकांनी त्याकडे लक्ष दिले नाही नाहीतर शिवशाही व पेशवाही असा वाद निर्माण झाला असता.
ह्या पिंगा विरोधामुळे माझ्यामते संजय भन्साळी हे पिंगा गाणे जर डोला रे डोला सारखे सिनेमाच्या मधेच टाकणार असतील तर बहुदा सेफ गेम म्हणून प्रमोशन गाणे म्हणून सिनेमाच्या शेवटी दाखवतील, व त्या बदल्यास युद्धाचे किंवा एखाद्या भडक म्हणजे सुडो सेक्युलर लोकांना भडक वाटतील अशी भीती वाटून गाळलेला एखादा कडक प्रसंग सिनेमात आणेल असे वाटते.
निदान ट्रेलर पाहून तरी असे वाटते बाकी कार्य सिद्धीस नेण्यास संस्कारी सेन्सॉर आहेतच.
आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Mon, 11/23/2015 - 06:48
नवीन
पोरा पिंगा रं..
- Log in or register to post comments
ब
बाहुली
Mon, 11/23/2015 - 10:02
नवीन
Every era has its culture, and if you are picking up and historical topic then you have to be very very careful.
I could see following mistakes,
1) The casting
2) Intrepratation of history using north indian goggles.
3) None of the MARATHI cultural aspects are not being used
4) If you do not want to make realistic cinema then do not use name of real historical heroes.
5) Less study of the history or no study
6) This wrong culture will go out to world as a Marathi culture .. as cinema is very very powerful medium.
Its better , we should not go to watch movie and ask our non marathi friends and some marathi frineds about the same.
- Log in or register to post comments
द
दशानन
Mon, 11/23/2015 - 11:04
नवीन
simple rule, स्वतः अनुभव घ्या व मग बोलावे हा माझा नियम आहे.
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Mon, 11/30/2015 - 16:31
नवीन
पिंगा बरोबर आता बाजीराव बल्लाळ पेशवे यांनी भन्साळी साठी घातलेला धिंगा णा येथे पहा -
http://erosnow.com/#!/music/watch/1038704/bajirao-mastani/6618119/exclusive---malhari?ap=1
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 11/30/2015 - 19:41
नवीन
हे गाणं पहिल्यांदा पाहिलं. अगदीच दळीद्रीपणा केलाय संजयानं. पिंग्याच्या गोंधळानंतरही शिनेमा थेट्रात पहावा यावर मी पक्की होते पण आता नाही. म्हणजे आता शिनेमा पाहणारच पण नेटावर.
- Log in or register to post comments
स
सव्यसाची
Mon, 11/30/2015 - 19:56
नवीन
मराठी संस्कृतीचा अभ्यास करून चित्रपट केला आहे असे संजय लीला भन्साळी सांगत होते लोकसत्त्तामध्ये. नेमके कोणत्या मराठी संस्कृतीचा केलाय ते तरी सांगा.
'वाट लावली' म्हणे!!! काय ते गाणे आणि काय ते शब्द!
थोरल्या बाजीरावांवर चित्रपट आहे कि बाजीराव सिंघम चा रीमेक???
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Mon, 11/30/2015 - 21:23
नवीन
आत्ताच 'मल्हारी' हे गाणं बघितलं. थक्क झालेय...संजय लीला भन्साली साहेब आता ऑफिशीयली वेडे झाले आहेत...
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 12/01/2015 - 05:16
नवीन
बाजीराव पेशवे "वाट लावली" म्हणून वाकडे तिकडे पाय उडवत नाचत आहेत???
भन्साळ्यावर पीएलआय टाका रे कॉणीतरी!
- Log in or register to post comments
स
सुज्ञ
Mon, 11/30/2015 - 23:15
नवीन
अटकेपार झ्हेंडा लावणारे मराठी साम्राज्याचे पंतप्रधान पराक्रमी प्रथम बाजीराव पेशवे तंगड्या उडवत सर्व जमावात धिंगाणा घालत आहे हे पाहून चीड ही रागाची अत्यंत सौम्य पातळी ठरावी इतके अस्वस्थ वाटले …. उपहास तरी किती करणार … वा भंजाळी वा … श्रीमंत पेशव्यांवर चित्रपट बनवताना स्वताची लायकी दाखवून दिल्याबद्दल आपले हार्दिक आभार. खूप लिहिता येईल मात्र शब्दांवरचा ताबा सुटेल । तूर्तास इतकेच पुरे . हे गाणे पाहिल्यावर आपल्याकडचे दिग्दर्शक निर्माते अजूनही किती मागासलेल्या विचारसरणीचे आहेत हे दिसून येते . चित्रपटातील हिरो ( हो मग ती भूमिका कुठलीही का असेना . हिरो तो हिरोच ) कुठल्याही गाण्यावर नाचला नाही आणि त्याने ढुंगण उडवले नाही म्हणजे लोक तोंडात शेण घालतील हि अभद्र भीती यांना अजूनही वाटते हेच आपल्या बौलीवुडी चित्रपट सृष्टीचे दुर्दैव … लोकही चवीने हा चित्रपट बघणार हे त्याहून दुर्दैव …
- Log in or register to post comments
स
सुज्ञ
Tue, 12/01/2015 - 00:25
नवीन
अटकेपार झ्हेंडा लावणारे मराठी साम्राज्याचे पंतप्रधान पराक्रमी प्रथम बाजीराव पेशवे तंगड्या उडवत सर्व जमावात धिंगाणा घालत आहे हे पाहून चीड ही रागाची अत्यंत सौम्य पातळी ठरावी इतके अस्वस्थ वाटले …. उपहास तरी किती करणार … वा भंजाळी वा … श्रीमंत पेशव्यांवर चित्रपट बनवताना स्वताची लायकी दाखवून दिल्याबद्दल आपले हार्दिक आभार. खूप लिहिता येईल मात्र शब्दांवरचा ताबा सुटेल । तूर्तास इतकेच पुरे . हे गाणे पाहिल्यावर आपल्याकडचे दिग्दर्शक निर्माते अजूनही किती मागासलेल्या विचारसरणीचे आहेत हे दिसून येते . चित्रपटातील हिरो ( हो मग ती भूमिका कुठलीही का असेना . हिरो तो हिरोच ) कुठल्याही गाण्यावर नाचला नाही आणि त्याने ढुंगण उडवले नाही म्हणजे लोक तोंडात शेण घालतील हि अभद्र भीती यांना अजूनही वाटते हेच आपल्या बौलीवुडी चित्रपट सृष्टीचे दुर्दैव … लोकही चवीने हा चित्रपट बघणार हे त्याहून दुर्दैव …
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 12/01/2015 - 06:01
नवीन
+१ सहमत
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Tue, 12/01/2015 - 07:36
नवीन
- Log in or register to post comments
र
राही
Tue, 12/01/2015 - 06:28
नवीन
'पिंगा' गाणे पाहिले. चित्रीकरण नेत्रसुखद आहे.
उत्तानपणाची व्याख्या व्यक्तीगणिक बदलू शकते. स्त्रीची बेंबी आणि कंबर दाखवल्यामुळे उत्तानपणा आला आहे असे अनेकांना वाटू शकते, तर पेशवापत्नीला तसे दाखवल्यामुळे हीन अभिरुची आणि उत्तानपणाचे प्रदर्शन झाले आहे असे काही जणांना वाटू शकते.
काशीबाई पायाच्या दुर्बलतेमुळे नाचू शकत नव्हत्या तरी त्यांना नाचताना दाखवले आहे ही ढोबळ चूक आहे. पटकथालेखकाचा अभ्यास कमी पडला. पण हे विकृतीकरण वाटत नाही. एक उदाहरण पहा. समजा एका चित्रपटात बाजीराव पेशवे किंवा पेशवेपत्नी यांच्या उपासव्रत सोडण्याप्रसंगीच्या जेवणाच्या ताटात बटाट्याची भाजी दाखवली गेली, तर त्या काळात बटाटे नव्हतेच (बटाट्यांऐवजी दुसरा कोणताही असा पदार्थ जो तेव्हा प्रचलित नव्हता, बटाट्यांऐवजी समजता येईल) म्हणून हा इतिहासाचा विपर्यास आहे हे आर्ग्युमेंट वस्तुस्थितीनिदर्शक असले तरी पूर्ण कलाकृतीच्या आस्वादात कितपत महत्त्वाचे ठरेल?
कमी प्रेक्षकसंख्येच्या भीतीने म्हणा किंवा आणखी कशामुळे, पेशवाईवर चित्रपट निघत नाहीत. भारतभर दाखवला गेलाय असा चित्रपट मला तरी आठवत नाही. एखादा चित्रपट निघालाय तर निघू दे की. जर तो लोकप्रिय झाला तर किमान थोरले बाजीराव हे नाव तरी कित्येकांना माहीत होईल. आपटायचा असेल तर आपटेल. त्याला त्याच्या नशीबाने जगू/मरू द्यावे.
कुठलीच भारतीय 'पीरियड' मूवी ही तपशिलाने परिपूर्ण वा अचूक नसते हा नियमच आहे. अगदी जोधाअकबरही नव्हती.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 12/01/2015 - 07:02
नवीन
आत्ताच "अटक मटक चवळी चटक.. धडक...तडक.. भडक.. कडक... दुष्मन की देखो वाट लावली.." ह्या सुमधुर गीतावर चित्पावन ब्राह्मण श्रीमंत बाजीराव पेशव्यांना शेंडी उडवत गणपती ड्यान्स करताना पाहिले. डोळ्याचे पारणे फिटले...!!
मी राग, लोभ, मद, मत्सराच्या पलीकडे जाऊन हे लिहीतेय... कारण आता मला सत्य लख्ख कळालेले आहे.
आपला गैरसमज झालेला होता.. बाजीराव मस्तानी हा पिक्चर बाजीराव पेशव्यांवर आधारित नसुन.. बाजीराव "सिंघम" वर आधारित आहे.. लाडाने सिंघमला काव्या "पेशवा" म्हणायला लागते. मग सिंघम २ मध्ये ती मरते आणि मस्तानी म्हणुन पुनर्जन्म घेते. पण तोवर गोट्याने कर्तव्य म्हणुन बाजीरावाचे लग्न "काशीबाई" नावाच्या सालस आणि घरंदाज बाईसोबत लावुन दिलेले असते. हे कळल्यावर मस्तानी "दिवानी मस्तानी" म्हणत तुणतुणं वाजवत, केस मोकळे सोडुन पुण्याच्या पेठांमध्ये फिरायला लागते. एकदा शनिवारवाड्याच्या टॉप फ्लॉअर वरच्या पेंटहाऊस मधुन काशीबाइ तिला बघतात आणि त्यांच्या मनात माया दाटुन येते. म्हणुन त्या तिला घरी घेऊन येतात, न्हाऊ माखु घालतात. सेम आपल्यासारखेच कपडे देतात. मस्तानी त्यांना "हाऊ ओल्ड फॅशन्ड!" म्हणुन नव्या पद्धतीची नऊवार घालायला शिकवते. काशीबाई खुष होऊन नाचायला लागतात.. अर्थातच ते ऐतिहासिक गाणं म्हणजे "पिंगा ग पोरी पिंगा".. खरं तर तेव्हा पासुनच ही पद्धत सुरु झाली... पिंगा घालायची..
तिकडे बाजीरावांनी (सिंघमांचे... पेशव्यांचे फक्त लाडाने..) मोहीम फत्ते केलेली असते म्हणुन ते ही त्यांच्या स्टाईलचा पिंगा घालत असतात.. पण त्यांच्याकडे लेटेस्ट कलेक्शन नसल्याने ते लहानपणी शिकवलेल्या "अटक मटक चवळी चटक" आणि पुर्वाश्रमीचे "आता माझी सटकली... मला राग येतोय" ह्या गाण्याचे रिमिक्स करुन "अटक मटक झटक.... वाट लावली" गे गाणे बनवले.. बाजीराव मोठे हरहुन्नरी बरं का!
आता पुढचं गाणं पाहिलं की मी तुम्हाला पुढची गोष्ट समजावुन सांगेन बरं का!
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 12/01/2015 - 07:06
नवीन
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
- Log in or register to post comments
स
स्मिता श्रीपाद
Tue, 12/01/2015 - 07:53
नवीन
पिरा.....आवर आवर तुझा राग....अजुन बरच काही पाहायचय १८ डिसें पर्यंत....
;-) ;-) ;-)
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 12/01/2015 - 14:40
नवीन
चालेल पिरातै. पुढील गाण्याची वाट पहात आहे. 'वाट लावली' हे पवित्र गाणेही आपण चांगल्या प्रकारे समजावून सांगितले आहे. धन्यवाद.
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Fri, 12/11/2015 - 20:55
नवीन
लोल...रात्री दीड वाजता! जब्राट प्रतिसाद .
हे तर सगळ्यात खतरनाक....
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Sun, 12/20/2015 - 21:31
नवीन
ओ तै, हे असं उपरोधात्मक लिहून बाजीराव पेशव्यांचा तुम्ही अपमान करता आहात असं नाही वाटत का तुम्हाला?
भन्साळीने जे दाखवलंय त्यावर राग व्यक्त करताय हे मान्य, पण तो राग व्यक्त करताना तुम्ही बाजीराव पेशवे, काशीबाई, मस्तानी या मोठ्या नावांचा अनादर करताय याची जरा तरी जाणीव ठेवा.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Mon, 12/21/2015 - 05:29
नवीन
अजिबात नाही. तुम्हाला तसं वाटत असेल तर त्याला मी काही करु शकत नाही. ( तुम्हाला मी "उपरोधिक" लिहीलय हे तर समजतय.. आणि तरी तुम्हाला तो पेशव्यांचा अपमान वाटतो.. इंटरेस्टींग!)
बादवे.. तसंही आपण बाजीराव सिंघम बद्दल बोलतोय.. ;)
- Log in or register to post comments
व
विनीत संखे
Tue, 12/01/2015 - 17:43
नवीन
नुकतंच नवं गाणं आलंय... बाजीरावाचं तत्तड तत्तड दिसतंय... बॉलिवूड डांसवर नाचे पेशवा.... बघावे आणि मोक्ष घ्यावा ....
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Tue, 12/01/2015 - 19:50
नवीन
सेनापती मावळ्यांच्या सोबत विजयोत्सव साजरा करतायेत, कुठेही अश्लीलता नाही, हिडीस पणा नाही,दारूबाजी नाही...संभाजी राजांच्या हातात दारूचा ग्लास देणाऱ्या भालजी पेंढारकर पेक्षा भन्साळी बराच म्हणायचा !
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Tue, 12/01/2015 - 19:56
नवीन
अशा ऑडियन्स साठीच भन्साळीसारखे लोकं सिनेमे बनवतात. आम्ही आपलं उगाच को लॅटरल डॅमेज आहोत.
- Log in or register to post comments
ज
जिन्क्स
Mon, 12/21/2015 - 07:42
नवीन
तुम्ही (नेहमीप्रमाणे) अल्पमतात आहात :) . मी चित्रपट पाहिला आणि आवडला. ती दोन गाणी आणि चित्रपट आणि इतिहास ह्यांचा दूर दूर पर्यंत संबंध नाही हे जर ग्रुहीत धरले तर एक कलाक्रुती म्हणुन चित्रपट सरस आहे.
- Log in or register to post comments
ज
जिन्क्स
Mon, 12/21/2015 - 07:42
नवीन
तुम्ही (नेहमीप्रमाणे) अल्पमतात आहात :) . मी चित्रपट पाहिला आणि आवडला. ती दोन गाणी आणि चित्रपट आणि इतिहास ह्यांचा दूर दूर पर्यंत संबंध नाही हे जर ग्रुहीत धरले तर एक कलाक्रुती म्हणुन चित्रपट सरस आहे.
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Sun, 12/20/2015 - 21:35
नवीन
सेनापती विजयोत्सव साजरा करतायेत हे ठीक, फक्त गाण्यातल्या नाचाच्या काही स्टेप्स चुकीच्या आहेत.
- Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू
Wed, 12/02/2015 - 02:33
नवीन
नव्या माहितीनुसार हे गाणं मस्तानीला पडलेलं स्वप्न आहे म्हणे... आता स्वप्नांत धारावीचा हिरो देखील स्विझर्लंडला जाऊन येतो मग अबला मस्तानी अपंग काशीबाई बरोबर गरबा खेळली काय अन हायब्रीड पिंगा केला काय... काय फरक पडतो.
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Wed, 12/02/2015 - 04:58
नवीन
कुणी फितुरी गाणं ऐकलं का? अजय अतुल आणि गुरु ठाकुन ने केस ठोकायला हवी भन्साळी वर कॉपी राईट चा भंग म्हणुन. सही न सही आता वाजले की बारा !!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- ›
- »