पिंगा, बाजीराव मस्तानी, भन्साळी इत्यादी
पिंगा.
येऊ घातलेल्या बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटातील हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रकशित झालं. या गाण्याविरोधातल्या पोस्ट्सनी कायप्पा, चेपूवर पिंगा घातलेला असताना, मिपावर धागारुपी पिंगा कसा झाला नाही या विचाराने डोक्यात पिंगा घालायच्या आत म्हटलं विषयास वाचा फोडू.
मी गाणं बघितलं. पेशवाई, बाजीराव पेशवे, मस्तानी, काशीबाई यांबद्दल मला जे कमीअधिक ज्ञान आहे, त्या आधारे मी म्हणतो, की हे गाणं म्हणजे अचरटपणा आहे. मुळात भन्साळी ने बाजीराव-मस्तानी वर पिक्चर बनवणे, रणवीर सिंग नामक इसमाने बाजीरावाची व्यक्तिरेखा साकारणे, यातूनच समोर येणा-या गोष्टींचा टोन सेट झाला होता.
बाजीराव पेशवे हे त्यांचं कर्तृत्व, पराक्रम, साहस, निष्ठा, इत्यादी गोष्टींसाठी कमी आणि मस्तानीसाठी जास्त ओळखले जातात हे आपलं दुर्दैव आहे. त्यांचं नव्हे. बरं, मस्तानीच्या नात्याकडे ज्या हीन नजरेने बघितलं जातं ते क्लेशदायक आहे. हे नातं, किंबहुना बाजीरावांबद्दल जितकं मला माहिती आहे त्या आधारे त्यांनी जोडलेल्या प्रत्येक नात्यात निष्ठेचं, कमिटमेंटचं उदाहरण घालून दिलेलं आहे. मस्तानी, काशीबाई, समशेर, कुणालाही वा-यावर न टाकता जपण्यात स्वतःची तगमग करून घेतलेली आहे. पण तरीही; मस्तानीकडे चीप या नात्याने आणि बाजीरावाकडे लफडेबाज या नात्याने बघितलं जातं. असो. हा विषय मोठा आहे आणि मी जाणकार नाही. गाण्याकडे येतो.
गाण्यासंबंधी, पेशव्यांसंबंधी काही प्रश्न, काही विधानं. पुढे काथ्याकूट करण्यास मिपाकर समर्थ आहेच.
भन्साळीला पेशव्यांबद्दल किती माहिती आहे? ती घेण्याचा त्याने किती प्रयत्न केला?
मस्तानी आणि काशीबाई एकत्र नाचतात? वा!
तेही उद्दीपित करणा-या साड्या घालून? वा!
असं वाचलेलं आहे की काशीबाईंना पायाची व्याधी होती. त्यामुळे त्या नाचणं दुरापास्तच. (यावर कुणीतरी प्रकाश टाका)
तेही ठीक; पेशवे घरंदाज होते, त्यांच्याकडे कलेची कदर होत असे. थिल्लर नाचांची नाही.
पिंगा नेमका कधी घालतात?
या गाण्यात एक दोन ठरलेल्या लावणीच्या अदा सोडल्यास त्याला लावणी म्हणण्यासारखं त्यात काही नाही.
या गाण्याकडे बघता पिक्चर कसा असेल, काय दिवे लावले असतील, इतिहासाची विटंबना कशी केली असेल याचा अंदाज येतोच. त्यात दैवदुर्विलास असा की भन्साळीने म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या पिढीला जेवायला आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी या चित्रपटाची स्तुती केली. प्रमोशनचा भाग असेल हा कदाचित. तसं असेल तर अजूनच दुर्दैवी आहे हे. आता हा पिक्चर आला की बाजीराव पेशव्यांबद्दल किती आणि कसे गैरसमज अमराठी (कदाचित मराठीही) लोकांत पसरतील हे चिंताजनक तरीही अटळ आहे.
मिपाकरांनी अजून सुचतील तसे मुद्दे मांडावेत असं आवाहन करतो.
पिक्चरला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसलेला
वेल्ला भट
💬 प्रतिसाद
(344)
य
याॅर्कर
गुरुवार, 11/19/2015 - 15:12
नवीन
असो,
एकमेव उद्दिष्ट→→→मनोरंजन
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
गुरुवार, 11/19/2015 - 15:28
नवीन
सतराव्या शतकातील महाराष्ट्रियन स्रीया!
आड़दांड उंचीची प्रियंका कुठल्या एंगल ने महाराष्ट्रीय वाटते?
आधी या नायिका भारतीय काय तर ऐतिहासिक देखील वाटत नाही.
त्यावर कोणाचा आक्षेप नाही?
पिक्चर हिट जाणार बाबानो
१०० करोड़ कुठेच् गेले नाही
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 11/19/2015 - 15:49
नवीन
जाउदे, लै मनाला लावून घेयाचं काम नय. ते भनसाळीचं हायवेवरचं हाटील हाये, तुम्ही चना-मसाला मागा का आलुमटर, सगळ्या डीश असो, ग्रेवी तीच, मेन इन्ग्रीडियंट बदलून दीतं. सालं कंचबी डिष मागा, शेमटूशेम ट्येष्ट लागती. आता त्येनी वेज कोल्हापुरीच्या नावाखाली मिक्सभाजी दिली तर काय करायचं? खावा मुकाट किंवा उठा सुसाट.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
गुरुवार, 11/19/2015 - 15:52
नवीन
गाणं आवडलं. (संदर्भ सोडून बघितलं तर) मस्त आहे.
- Log in or register to post comments
स
सागरकदम
गुरुवार, 11/19/2015 - 16:32
नवीन
मेल्या भंन्साळ्या, नतद्रष्टा... त्या सटवी बरोबर इकडची स्वारी नाचले असतील, मी नव्हे. थांब तुला आता दिवाळीचा ऊरलेला फराळच खायला घालते, थांबच तू...
- काशीबाई
- Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे
गुरुवार, 11/19/2015 - 17:06
नवीन
http://m.firstpost.com/bollywood/why-the-outrage-around-bajirao-mastanis-pinga-is-casteist-and-hypocritical-2511398.html
By Mrunmayi Ainapure
Most of us netizens of urban India have become quite
inured to our hourly routines of awakening to the cacophony
of public outrage on social media that revolves – like
clockwork – around seemingly trivial matters. One tends to
dismiss most of these with a sigh and a bout of furious
scrolling. Yesterday, however, was an exception. As
someone who has lived in Pune all her life, the bone of
contention, this time around, hit quite literally close to
home.
Shortly after a harmless dance number titled ' Pinga' from
Sanjay Leela Bhansali's upcoming film Bajirao Mastani ,
featuring Deepika Padukone and Priyanka Chopra, was
released online, Facebook was inundated with a slew of
posts from a sizeable chunk of the Marathi Brahmin
community (mostly residents of Pune, although
Maharashtra-born NRIs aching to stay connected to their
roots joined in soon enough) with responses to the song.
These ranged from scathing to plain hysterical; the criticism
touched upon various factors that seemed to have
disappointed these viewers, such as the "ridiculousness" of
showing the two wives of warrior king Bajirao Peshwa I –
Kashibai (Chopra) and Mastani (Padukone) – dancing
together, the direct lifting of the song's tune and lyrics from
the popular Marathi lavani ' Latpat Latpat Tuzha Chalna ' and
its arbitrary fusion with the traditional Mangla Gaur hymn
' Naach Ga Ghuma' in a mish-mash of wildly different genres.
Notwithstanding the serious bafflement over why one would
expect anything beyond ostentatious sets, larger-than-life
song-and-dance sequences and a sensational re-
interpretation of a historical story from Bhansali – going by
his filmography so far or given that he has never claimed to
be a Richard Attenborough – the annoyance over the
distortion of history and anthropology is legitimate.
If you're a Punekar, who has grown up hearing stories
about a quaint era that has been etched in your city's
collective consciousness, your displeasure with its
unrealistic on-screen portrayal is understandable. History
lessons told you that Kashibai Peshwa had a limp in her leg,
and could not possibly have gyrated her hips to such a
caper, much less with a woman she is known to have
formally met just once in her life. So, this song makes no
sense to you? Fair enough.
But, despite being a 'Puneri mulgi' myself, and having
grown up around several of the aforementioned Marathi
Brahmins affronted by ' Pinga' , I found something
particularly disconcerting about the onslaught of venom
directed towards the song, which is how quickly and
smoothly it escalated to acquire a distinctly jingoistic
veneer.
Sighted online were more than a few eye-wateringly long
threads, shaming the "inappropriate" attire (read: low waist
nine-yard or nauvari sarees) donned by the leading ladies in
the song. Many of the objectors, who I couldn't help but
notice clearly had 'upper caste' surnames, have
sanctimoniously voiced objections on how "a decent
Maharashtrian lady, especially one hailing from a royal
family, would never reveal this much skin, as if she were an
item girl” – a statement that could frankly serve to
stereotype and offend both groups of women.
Some of these self-proclaimed guardians of Marathi culture
insisted, "Learn to drape the time-honored nauvari in a
respectable, khandani manner,” making one wonder whether
they were protesting the lack of authenticity perceived in the
costumes or their supposed skimpiness. One person even
went so far as to comment on how the dusky Chopra does
not possess the "fair skin and delicate features” of a
Chitpavan Brahmin woman. Others have lashed out about
how showing a Peshwa queen dancing in a "vulgar” manner
could "mar the essence of Marathi tradition”. A piece on a
reputed online publication in its critique of the song declared
that no Marathi woman "bobs her head like that”.
This frenzy not only releases a whiff of blatant patriarchal
sentiment, but also leaves you with a disturbing aftertaste
of casteism, classism and a smuggish re-assertion of
Brahminical superiority – which is (supposed to be) plain
astounding in this day and age. What's more amazing is
that few seem to be bothered about aspects of the song that
actually warrant critical analysis, such as how it doesn't
mirror the repressive attitude towards women in the Peshwa
society and instead, paints a false, happy, shiny picture of
' soutans being sahelis'. Nah, all most people seem to want
to tut-tut about is the "immodesty" of the costumes; all they
seem to be disgusted about is the objectionable
choreography, which "does not behoove the virtuous
Peshwa ladies".
As someone who likes to call herself a liberal in a city where
I have observed a substantial section of the local populace
to be fairly conservative, one of my biggest pet peeves
continues to be the casual spectacle of purebred fanaticism
we're still faced with everyday – especially when it comes
to challenging Pune's erstwhile heritage, even in an
instance as innocuous as this which involves the medium of
cinema.
For now, it appears that I'm going to simply have to wade
through this wave of righteous, jingoistic outbursts that
have taken over my social media feeds, until the furore over
this great insult to the glorious times of Maharashtra –
when demurely dressed Marathi girls didn't disgrace their
families by prancing around in public – dies down.
Mrunmayi Ainapure is a freelance writer based in Pune.
पुणेरी लोकांना झोडपले आहे.मला काय नीट कळलेनाही,ा
- Log in or register to post comments
य
याॅर्कर
गुरुवार, 11/19/2015 - 17:33
नवीन
કાય લિહલે હાય મરાઠીત સાંગા કિ
.
.
.
.
ధన్యవఆద
- Log in or register to post comments
स
स्रुजा
गुरुवार, 11/19/2015 - 17:59
नवीन
ऐनापुरे काकुंच्याच भाषेत बोलायचं तर हा लिबरल अॅटिट्युड आहे की सो कॉल्ड "अप्पर कास्ट" बद्दल पूर्वग्रह? कुणीही इथे ब्राह्मणी आणि चित्पावनी लोकांच्या संस्कृतींबद्दल बोलत नाहीये. पेशवे अख्ख्या मराठी राज्ज्याचे होते. पटवर्धन यायचे तसे होळकर शिंदे पण यायचे. साधी गोष्ट आहे, तुम्ही ओबामांवर सिनेमा काढताना ह्रितिक रोशन ला घ्याल का? घेतलं तर त्याला मेक ओव्हर करुन उभं कराल. त्याला काळे लेन्सेस द्याल, त्याचा गोरा रंग बदलाल. तो शोभला तर पाहिजे ओबामा, पब्लिक ला रीलेट तर करता आलं पाहिजे. त्या ओबामाला सुट देताना डकी टाय द्याल का? पायात स्पोर्ट शुज घालेल का ते पात्र सुट वर? मिशेल ओबामा ला आक्षेपार्ह पद्धतीने स्वतःला सादर करताना दाखवाल का?
२ गोष्टींमध्ये बक्कळ माती खाल्ली आहे या गाण्याने:
एक तर ऑथेंटिसिटी आणि दुसरं म्हणजे कल्चरल सेन्सिटिविटी !!! दुसरा प्रकार कशाशी खातात हे बहुसंख्य स्वयंघोषित लिबरल्स ना माहिती नसतं. आपले पंप्र बाहेरच्या देशात जातात तेंव्हा फर्स्ट लेडिज भारतीय पोषाखात येतात. ते लोकं इकडे येतात तेंव्हा नमस्ते करतात. अगदी क्लायंट्स ना देखील आमच्या इथुन सांगुन पाठवलं जातं की नो हग्ज, नो किसेस, भारतीय स्त्री एम्प्लॉयीज ना ते अवघडणारं वाटु शकतं. साधी गोष्ट : कल्चरल सेन्सिटीविटी. यातलं काय न समजण्याजोगं आहे? आडनावांचं डेमोग्राफिक्स काढलं की फार तीर मारला का?? तुम्हाला पेशवे दाखवायचेत. मग त्यांची संस्कृती दाखवा ना.
वर कुणीतरी रुक्मिणीच्या गाण्याची तुलना केली आहे. पेशवे निरस जीवन जगत नव्हते आणि पेशविणी पण कुणी जनानखान्यात कोंबलेल्या गायी नव्हत्या. नाच गाणी चालत ही होती पण पिंगा पिंगा करायचं आणी लावणी चा दंगा घालायचा हा बिनडोक प्रकार कशासाठी? त्या स्टेप्स बघा, ती ९ वारी बघा. स्किन शो , बॉलिवुड मसाला यातलं काहीही न करता देखील तो इतिहास सुरसच आहे, रंजकच आहे. भन्साळी ला नसलेलं डोकं चालवुन तो अजुन मसालेदार करायची काहीही गरज नाही .
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 11/19/2015 - 18:10
नवीन
तेच काल आपण बोललो ना! जातीय रंग द्यायलाही कमी करणार नाहीत.
इथे विषय चाललाय काय, लेख कोणत्या विषयावर आहे याचे भानच नाही.
ऑथेंटिसिटी! हे आणि एवढेच.....................जर वेळ असेल तर व असेल तर कॉमनसेन्स वापरावा. पण तसे होणे नाही.
उद्या दुसर्या राज्यातील राजावर शिनेमा काढला तर तिथेही हेच लागू होईल.
जाऊ दे अगं! त्या भन्साळीला डोके नाही म्हणावे तर असले छप्पन्न लेख येतील व अशा लोकांची कमतरता नसल्याचे सिद्ध करून जातील.
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 11/19/2015 - 18:10
नवीन
ओबामामामांचे उदाहरण छान आहे हे सांगायचे र्हायले होते.
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 11/19/2015 - 18:22
नवीन
ही बाई डोक्यावर पडलीये का? असल्या स्वतःला 'पुणेरी मुलगी' म्हणवणार्या छप्पन पाह्यल्यात. त्याचा अभ्यास किती गंडलाय हे तुला कळतंय का बयो?
- Log in or register to post comments
स
स्रुजा
गुरुवार, 11/19/2015 - 18:30
नवीन
शूक !! असं नाही म्हणायचं सूड भौ !! लिबरल वागायचं ! पेशवाईतल्या बायका मंगळागौरीला लावणी वर खेळ करत होत्या ! अस्सल पेश्वयांना काय कळतंय बायकांचं मन? पेशवाईतल्या बायकांचं स्वातंत्र्य , सवतीला घेऊन लावणी करण्यात सामावलेलं होतं. ती काव्यात्मक लिबर्टी घेऊन भंसाळी ने एक प्रकारे पेशवीणींना मरणोत्तर न्याय दिलाय. त्या बाजीरावाशी एकनिष्ठ राहताना मस्तानी आजुबाजुच्या वातावरणात खुप होरपळली पण तिला पण वाड्यात आणुन नाचवलंय... कसली आलीये शोकांतिका.. सिनेमामध्ये तिघेजण एकत्र शनिवारवाड्यात नांदताना पण दाखवत असतील. काव्यात्मक न्याय , यु नो !! उरलं सुरलं काम ऐनापुरे बाई करणारेत सगळ्यांना लिबरल बनवुन.
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
गुरुवार, 11/19/2015 - 17:24
नवीन
ती मस्तानी नउवारी नेसायची??? ती तर अनारकलीसारखा ड्रेस घालत असेल ना?
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
गुरुवार, 11/19/2015 - 17:37
नवीन
अनारकली हे कल्पित पात्र आहे तर मस्तानी हे खरे.
.बाय द वे , आपल्याकडे बाकी पण्डित आहेत मस्तानी काय घालत असेल ते सांगायला.
त्या फारिनच्या मडमा इथे सूना बनून येतात तवा चौपाटिवर काय ते बिकीनी का काय घालून फिरतात का वो?
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 11/19/2015 - 17:46
नवीन
अनारकली हे ड्रेसचं नाव आहे. साडी, पंजाबी, पठाणी, स्कर्ट यासारखं. अनारकली सलीमवाली नव्हे.
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
गुरुवार, 11/19/2015 - 18:03
नवीन
अहो बाबा , अनारकली ही ड्रेसची पॅटर्न आहे. आधीच्या काळातील मुस्लीम नर्तकीचा पेहेराव .
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
गुरुवार, 11/19/2015 - 19:01
नवीन
काशीबाई यांनी लावणी पद्धतीचा नाच केल्याचे संजय लीला भन्साळी यांनी दाखवल्याचे वर काही प्रतिसादात आले आहे. उद्या या भन्साळी साहेबांनी शहाजहान आणि मुमताज महल यांच्या वर चित्रपट काढायचे ठरवले तर त्याना त्या चित्रपटात, आपल्या या सेक्युलर देशात, मुमताज महल यांचा मुजरा नाच दाखवण्याची हिम्मत होणार आहे का ?
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 11/20/2015 - 06:47
नवीन
इतकं लांब कशाला जाता?
उद्या शिवाजी महाराजांवर सिनेमा झाला, आणि सईबाई किंवा अष्टराज्ञींपैकी कुणाचाही असा नाच दाखवला तर चालेल का? तशी हिंमत होईल का?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 11/20/2015 - 07:38
नवीन
अहो पेशवे म्हणजे काय, कुणीही उठावे आणि काहीही बोलावे...कोण विचारतो, नै का?
पण त्यासोबत "रणबीरसिंग बाजीराव शोभत नाही, त्याजागी कुणी पुणेकर घ्या" वगैरे कमेंटी होत्या, मी विचारले की बॉ पुणेकर सोडून बाकी कुणाला जमणार नाही का? तर म्हणे जमलं की कळवा...
म्हणजे स्वतःच्या हातानेच अशी माती करून घ्यायची, पेशव्यांना पुण्यापर्यंतच मर्यादित ठेवायचे आणि वर गळे काढायचे की त्यांना कुणी भाव देत नाही म्हणून. आहे की नै मज्जा?
- Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे
Fri, 11/20/2015 - 08:07
नवीन
यांची गाडी आली शिवाजी महाराजांवर,पेश्व्यांचं चालू आहे तर् तेवढ्याचीच चर्चा करा कि,लगेच महाराश्ट्राच्या आराध्य दैवताला मधे आणायची गरज काय?
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 11/20/2015 - 10:58
नवीन
माझा प्रश्न वैध आणि मुद्दा सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद.
- Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे
Sun, 11/22/2015 - 18:04
नवीन
वेल्लाभट'जी
म्हणजे कुणाला चालेल का?
म्हणजे पेशवे तुमचे अन् महाराज आमचे?
म्हणजे तुम्ही सोशीक अन् आम्ही डांबरट?
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Fri, 11/20/2015 - 12:23
नवीन
महाराज जितके वंदनीय आहेत तितकेच बाजीराव पेशवे सुद्धा आम्हाला प्रिय आहेत.
(संपादित)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 11/20/2015 - 15:30
नवीन
+१११११११११११
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 11/21/2015 - 04:37
नवीन
मम म्हंटो !
उगा धुराळा नको !!!!
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
Fri, 11/20/2015 - 06:48
नवीन
( आंतरजालीय लेखिका शेफाली वैद्य याकडून साभार)
असाच चित्रपट जर नेहरूंवर काढूल त्यात असेच "विचारस्वातंत्र " घेतले तर ???
--------
माझे म्हणणे
खरेच मजा येईल . काँग्रेसी लोकांची तर त्रेधा उईल .
पण त्यात बहुदा देशी आणि विदेशी आयटम्स चा ग्रुप डान्स दाखवावा लागेल ..
आणि लॉर्ड माउंट"बॉटम" बद्दाल की दाखवणार ?? विचारच करवत नाही .... हा चित्रपट बहुदा महेश भट किंवा कांती शाह लाच काढवा लागेल ...
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 11/20/2015 - 11:03
नवीन
https://www.change.org/p/the-honorable-chief-justice-of-bombay-high-court-stay-order-on-release-of-bajirao-mastani?recruiter=276045046&utm_source=share_petition&utm_medium=copylink
इथे आक्षेप नोंदवू शकता
- Log in or register to post comments
प
पद्माक्षी
Fri, 11/20/2015 - 17:08
नवीन
आक्षेप नोंदवला आहे
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 11/20/2015 - 20:44
नवीन
धन्यवाद कपिलमुनी. माझा आक्षेप नोंदविला आहे. त्याचा निर्देश : https://www.change.org/p/the-honorable-chief-justice-of-bombay-high-court-stay-order-on-release-of-bajirao-mastani/c/339393450
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Fri, 11/20/2015 - 11:12
नवीन
बौद्धिक दिवाळखोरी दुसरं काय? असलं काहीही Cinematic liberty च्या नावाखाली खपवायचं! आश्चर्य वाटतं ते अशा महत्वाच्या गोष्टींना "चालतं" या सदरात टाकणारयांचं!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 11/20/2015 - 11:20
नवीन
उद्या महाराजांवरच्या पिच्चरामध्ये असे दाखवलेले चालेल का? असा प्रश्न पाहिला , जरा खोदकाम केले आणि १९५३ सालच्याच भालजींच्या छत्रपती शिवाजी नामक सुपरहिट्ट पिच्चरात सईबाई-सोयराबाई यांचे गाणे दिसलेदेखील. =)) =))
तेव्हा सवती कशा एकत्र येतात वगैरे प्रश्न भालजींना पडले नसतील का? हां आता त्यांचा पेहराव वगैरे या गाण्यातल्यासारखा नाही तो भाग वेगळा.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 11/20/2015 - 11:25
नवीन
थँक्स फॉर द इनपुट ! :)
बट तेंव्हा वेगळ्या साहेबांचा प्रभाव (नुकताच ओसरत) होता, आणि आताचे साहेब वेगळे(वेगळे) आहेत.
सो... वेल.....यू नो....व्हॉट आय मीन.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Fri, 11/20/2015 - 11:30
नवीन
सई बाई आणि सोयराबाई एकत्र येत नसतील असे वाटत नाही. कदाचित त्या काही काळ एका किल्यावर पण राहिल्या असतील. तेंव्हा अनेक बायका ( त्या सुद्धा राजे लोकांना ) असणे ह्यात काही विषेश नव्हते. १०० वर्षापूर्वी पण असे असायचेच आणी त्या सवती एकाच घरात रहायच्या. भालजींनी गाणे एकत्र दिले होते, त्यात त्यांना नाचताना दाखवले होते का?
म्हणुन हे उदाहरण आणि तुलना गंडलेली आहे.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 11/20/2015 - 11:34
नवीन
जरा वेळाने गाण्याची लिंक टाकतो. पिंगासारखे नाचणे नाहीये इतके मात्र आठवते. कुठेतरी खांबांचा आधार घेत दुसरीकडे नजर लावणे, इ. प्रकार आहेत त्याप्रमाणे.
- Log in or register to post comments
त
तात्या
Fri, 11/20/2015 - 12:24
नवीन
https://youtu.be/Yfa89AKETYs?t=5339
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 11/20/2015 - 15:45
नवीन
हा तेच ते. मला अगोदर वाटलेले त्यात दोघी आहेत म्हणून, पण तसे नाही. स्वारी.
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Fri, 11/20/2015 - 12:44
नवीन
म्हातारी मेल्याचे दुख्ख नाही , पण काळ सोकावतो .
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Fri, 11/20/2015 - 13:17
नवीन
To be.... or not to be.... that is the question !!! जगावं की मरावं हा एकंच सवाल आहे !! कुणी मिसळ देता का मिसळ ? हो मिसळ... मामलेदाराची चालेल... फडतरेची चालेल..वैद्याची चालेल.. प्रभांची पण चालेल.? एका मिसळप्रेमीला तुफानाला कुणी मिसळ देतं का ?मिसळ... एक तुफान … कांद्या वाचून …. तर्री वाचून …. मिसळेच्या मायेवाचून …देवाच्या मिसळी वाचून … गावा गावातून हॉटेलात हिंडते आहे … मिसळ चापताना जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा धूंडतं आहे … कुणी मिसळ देता का रे ??? मिसळ ?..तर्रीवाली मिसळ..असा तवंग हवा तेलाचा तर्री वर....पावाच्या लाद्या हव्या.लिंबाच्या फोडी हव्यात...ग्लास भर ताक हव.....पहिल्या घासात ठसका हवा..मिसळ..हो मिसळ .....कुणी मिसळ देता का रे ??? मिसळ ?..
मिसळ सम्राट..
निवृत्त मामलेदार बापुसाहेब भन्साळी मिसळकर
(नाट्य लिबर्टी)....
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Fri, 11/20/2015 - 14:23
नवीन
हे पहा भन्साळिसाहेबाचे या विषयावरचे मत.
http://www.loksatta.com/manoranjan-news/ranveer-singh-deepika-padukone-can-not-take-their-eyes-off-each-other-in-new-bajirao-mastani-poster-1161934/
आणि हे
"http://www.loksatta.com/manoranjan-news/baji-rao-mastani-based-on-rau-1161826/">
वर या अभिव्यक्ति स्वात्नत्र्याच्या गप्पा.
"http://maharashtratimes.indiatimes.com/cine-news/bajirao-mastani-pinga-sanjay-leela-bhansali/articleshow/49848186.cms">
म्ह्णजे कुणी विरोध केला तर हे साहेब अभिव्यक्ति स्वात्नत्र्याची गळचेपी म्ह्णायला रिकामे. देशात असहिष्णु वातावरण आहेच, त्यात याची भर. बाय द वे पुरस्कार परतीची फ्॔॓शन सम्पली वाटत.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 11/20/2015 - 14:24
नवीन
२००
- Log in or register to post comments
म
मम्बाजी सर्वज्ञ
Fri, 11/20/2015 - 14:37
नवीन
जे खपतंय ते विकतंय. हिंदी सिनेमात निम्मा वेळ हेरोइन कमी कपड्यात दाखवावीच लागते. नाही तर १०० कोटी चा क्लब कसा मिळेल? राहता राहिला २ बायका एकदम नाचताना दाखवण्याचा विषय. अहो 'नो एन्ट्री' सारखे पिक्चर येउन १० वर्षे होऊन गेली. औफ़िशिअलि लफडी करायला प्रोत्साहन देणारे पिक्चर बरीच वर्षे येतायत. बाजीराव-मस्तानी फक्त पब्लिसिटी साठी. एकदा का 'भावना दुखावल्या' कि फुकटात प्रसिद्धी. असले पिक्चर्स अनुल्लेखाने मारायला हवेत. विरोध केल्याने यांची प्रसिद्धीच जास्त होते. तसे 'पेशवे-द्वेषी' आणि ब्रिगेडी टोळ्या खुश असतील, पण ते त्यांचे कुंपण आहे, त्यापलीकडे कधी कधी गेलेत का ते? कशाला मनावर घ्या?
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 11/20/2015 - 16:15
नवीन
सर्वज्ञजी, नो एन्ट्री आणि इतिहासामधील कथा घेऊन चित्रपट बनवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नो एन्ट्रीमध्ये सेन्सॉर बोर्डाने संमती दिली की वाट्टेल ते दाखवता येते. तसे चित्रपटही चालतात. पैसे मिळवून देतात पण ऐतिहासिक कथानक हाताळताना जबाबदारी असते. मूळ कथेला धक्का न लावता तशीही उपकथानके जोडलेली असतातच की! भावना दुखावण्याचा प्रश्नच नाही. ब्रिगेडी खूष असतील की नसतील याचा विचार डोक्यातही नाही. ते उद्या आणखी कश्यानेही खूष होतील! यात महत्व भन्साळी, ब्रिगेड, प्रसिद्धी, गल्ला याचा नाहीच. असलाच तर तो ऐतिहासिक संदर्भ बदलल्याचा आहे. जौदे म्हणणे हे तर आहेच. आता समजा त्या गाण्यावर काहीच कार्य्वाही झाली नाही तरी माझ्यासारखे अनेकजण पेशव्यांचा शिनेमा असल्याने पहायला जाणारच! ते तसेही जाणारच होते पण कोणत्या चुकीच्या गोष्टीला लोकांकडून किती जोरात विरोध होतोय यासाठी आज नाही दहा वर्षांनी भन्साळीसारखे लोक जरातरी बिचकून असतील. नैतर मोकाट सुटलेले वळू आणि म्हशी यांची कमतरता नाहीच! अनुल्लेखाने मारलेलं आजकाल कोण किती मनावर घेतं. बरेचजण निर्ढावलेले आहेत.
- Log in or register to post comments
म
मम्बाजी सर्वज्ञ
Fri, 11/20/2015 - 18:06
नवीन
समजतंय. पण जर आपण सगळे अशी चिखलफेक करायला लागलो तर फरक काय राहिला? आजकाल गटारात जास्त आणि रस्त्यावर कमी आहेत. ते आपल्या अंगावर फेकतात म्हणून जर आपण गटारात उतरायला लागलो तर काम बाजूला राहिलं केव्हा आपली इज्जत गेली ते कळणार सुधा नाही.
फार विचित्र गोष्ट आहे हि पण आता काय करणार.
हा धागा निघाला म्हणून मला या सिनेमाचे नाव समजले. खरं तर हिंदी सिनेमा थेटर मध्ये जाऊन बघणं मी १५ - २० वर्षांपूर्वी सोडून दिलंय. सध्या भारतात नसल्यामुळे तो प्रश्न पडत नाही पण इकडे ३०-४० मैल तुडवत जाऊन थेटरात 'दबंगाई' करणारी जनता आहे, मला कधीही त्यांच्यात सामील व्हावेसे वाटले नाही. हे मी कुणी 'वेगळा' आहे म्हणून सांगण्यासाठी नाही. एकूणच आपली जनता फालतू माल आधी घेऊन त्याबद्दल आरडा ओरडा करून परत पुढच्या वेळी त्यांच्याच दारात जाऊन उभी राहते, या गोष्टीचे मला वाईट वाटते. आणि माझे हे विचार कोलेजात असतानापासून आहेत. ६.५ रुपयात एकदा मंगलाला 'प्यार तो होना हि था' चे टोर्चर सहन केले त्यानंतर जे डोळे उघडले ते कायमचे.
आणि जे चित्रपटाच्या बाबतीत ते बाकीच्या गोष्टींच्या बाबतीतही. झोपतात न चितळे १ ते ३, झोपू द्या. बाकीची दुकाने आहेतच कि. दुर्वांकुर आणि लकी छान होते, त्या वेळी लाईन मध्ये उभे राहून 'बैठका' केल्या आहेत. क्वालिटी घसरली कि रेस्पोंस घसरायला हवा. तरच सेवा त्या दर्जाची मिळते. आपण आपली किंमत नाही ठेवली तर काय उपयोग?
असो. विषय फार बदलू नये म्हणून.....माझे असे वैयक्तिक मत असे आहे कि असल्या फालतू पिक्चर च्या डायरेक्टर लोकांना आणि न्यायालयांना पत्र पाठवून फार फरक पडेल असे वाटत नाही. आपण आपली वाट चालणे योग्य.
हाथि चले बजार, कुत्ते भोके हजार. आपण 'हाथी' कि 'कुत्ता' हे आपल्या हातात आहे.
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 11/20/2015 - 18:39
नवीन
हे पटलं.
- Log in or register to post comments
S
shvinayakruti
Fri, 11/20/2015 - 15:20
नवीन
500. a sanjay jaiswal film............coming soon
- Log in or register to post comments
S
sagarpdy
Fri, 11/20/2015 - 16:38
नवीन
(संदर्भ - भन्साळीचे पिंगा गाणे)
पहिला मित्र: ही मंगळागौर काशिबाईंची होती की मस्तानीची?
दुसरा मित्र: ही काशींची मंगळागौर नाही, तर मंगळागौरीची काशी होती.
(WA वरुन साभार)
- Log in or register to post comments
भ
भृशुंडी
Fri, 11/20/2015 - 19:16
नवीन
ज्या मिपाकरांचा ह्या प्रकाराला विरोध नाही, त्यांनी पुढे वाचू नये. त्यांनी खुशाल वाट्टेल ते करावं.
ज्या मिपकरांच्या भन्साळींच्या ह्या अश्लाघ्य प्रकाराला विरोध (कडाडून किंवा साधाच) असेल. त्यांना-
सॉल्लिड चर्चा. असल्या ज्वलंत आणि अतिशय महत्त्वाच्या विषयावर इतकी महत्त्वपूर्ण चर्चा झालेली बघून बरं वाटलं.
बरं, मग शेवटी काय ठरलं?
भन्साळींना निषेधाचे खलिते पाठवायचे ?
त्यांच्या चित्रपटावर बहिष्कार घालायचा?
कोर्टात याचिका दाखल करायची?
की भन्साळींना कोपच्यात घ्यायचं, आणि काळं फासायचं इन शिवसेना स्टाईल?
कारण ह्यापैकी काहीच होणार नसेल तर मग इतकी उद्बोधक चर्चा होऊनही दुर्दैवाने काहीच उपयोग होणार नाही.
मग कट्टर विरोध असणार्या मिपाकरांपैकी कुणी काही अॅक्शन घेणार आहे का? प्लीज कळवा.
भन्साळींसारख्या चित्रपट दिग्दर्शकाला कळायला हवं की मराठी लोक किती बारकाईने कुठे कुठे लक्ष ठेवून असतात आणि त्यांचं रक्तही खवळू शकतं.
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 11/20/2015 - 19:18
नवीन
ह्यांना कोणीतरी लिंक द्या प्लीज ती विरोध नोंदवायची...
- Log in or register to post comments
भ
भृशुंडी
Fri, 11/20/2015 - 19:29
नवीन
तुम्ही बहुतेक भन्साळीचे आधीचे चित्रपट पाहिले नसावेत किंवा तरीही त्याच्याकडून तुमच्या फारच अपेक्षा असाव्यात.
किमान गुझारिश तरी बघाच!
ते जाऊ दे.
चित्रपटात काहीही दाखवू शकतात- ती काही विषयाला धरून बनवलेली डॉक्युमेंटरी नाहीये, ऐतिहासिक सत्य वगैरे दाखवायला.
1942 a love storyच्या वेळीही लोकांनी असलाच शॉट दिला होता- की स्वातंत्र्यसंग्रामाच्या गौरवपूर्ण वर्षाचा संबंध इतक्या हलक्या दर्जाच्या प्रेमकथेशी कसा लावू शकतो वगैरे. common,१९४२ मधे काय लोक फक्त होलसेल देशभक्ती करून राहिले होते?
इथेही तसलंच काहीतरी चालू आहे.
एका " बॉलिवूडच्या १००% व्यावसायिक चित्रपटातल्या गाण्यातल्या नाचाचा" संबंध डायरेक्ट इतिहास वगैरे गोष्टींशी जोडला जातोय.
तेव्हा खरंच जर विरोध वगैरे करणार असाल तर एक मेजर LOL. keep it up!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 11/21/2015 - 03:37
नवीन
विरोध म्हणजे काय समजलेत...?
उद्या कुणीही उठून मराठ्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढेल ते चित्रपट-अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली गप बसून बघत राहायचं. साहेब, इथे कोणी त्याचं शीर कलम करायचा फतवा काढलेला नाहीये. 'आम्हाला हे पटलेलं नाही' असा साधा, सभ्य, सुसंस्कृत विरोध करत आहेत तर त्यालाही आपण नाक मुरडताय? वर कुणीतरी आतली खबर दिल्याप्रमाणे हा एन्डींग टायटल मामला असेल. मला चित्रपटात काय दाखवले याचे आता सोयरसुतक तर नाहीच, पण जास्त राग आता 'लोकांनी विरोधसुद्धा करू नये' म्हणणार्यांचा येत आहे.
पुढचे अजिबात व्यक्तिगत घेऊ नका:
समजा उद्या तुमच्या/माझ्या घराण्यावर कुणी चित्रपट काढला आणि माझ्या/तुमच्या आजीला वेश्या दाखवून कोठ्यावर कुल्ले हलवणार्या बाईंच्या रुपात दाखवले तर ती सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून सोडून द्याल? त्यामध्ये आजीची भूमिका सनी लिओनने केलीतर चालेल का? माझ्या/तुमच्या घराण्यावर कुणीतरी चित्रपट काढतेय ना, ह्या हर्षोल्हासात हे माफ कराल? एखाद्याला पैसे कमवायचे आहेत म्हणून त्याने तुमच्या/माझ्या अब्रूचे धिंडवडे काढावे आणि आपण गप्प बसणार का? याच न्यायाने अखिल भारतात मराठी सत्तेचा डंका वाजवणार्या पेशवे कुटूंबाला आपलेच कुटूंब, त्यांची अब्रू ती मराठी अब्रू समजून इथे कोणी विरोध नोंदवत आहेत तर ते चुकीचे कसे? कि अब्रू वैगेरे झूट असते तुमच्यामते?
भंसालीने काढलेला सिनेमा किमान अडीच हजार चित्रगृहांमधे किमान दोन आठवडे बघितला जाईल. त्यानंतर तो अगणित वेळा टीवीवर येईल. लाखो लोक हा सिनेमा बघतील. लक्षात घ्या हा काही एक रात पुरानी हवेलीमें टाइप डी ग्रेड चित्रपट नाही जो कुठे आला-गेला कळणारदेखील नाही. ९० नंतर जन्मलेली पिढी तसेही इतिहासासोबत फार सख्य ठेवून नाही आहे. त्यांना ह्या चित्रपटात दाखवले तेच सत्य वाटले तर त्याचा प्रभाव चुकीचा असणारच. भंसाली सुरुवातीस एक पाटी दाखवून मोकळा होईल की 'ये एक काल्पनिक कहानी है'. आधीच मराठी इतिहासाबद्दल इंग्रजांनी वाट लावून ठेवली आहे. त्यात भंसालीसारखे नतद्रष्ट स्वतःच्या धंद्यासाठी आणखी विकृती आणणार. अरे, चाललंय काय? तिकडे परदेशात बघा लोक कसे इतिहास जपतात म्हणून कोडकौतुक, इथे साध्या गोष्टींचा विरोध केला तरी बोंबाबोंब.
माझ्यामते संपूर्ण चित्रपटाचा विरोध करायचा असेल तर महाराष्ट्रातून कुणीच चित्रपट बघायला जाऊ नये. त्याच्या धंद्यावर परिणाम होवो न होवो, पण मराठी लोक फालतू धंदे सहन करणार नाहीत असा संदेश गेलाच पाहिजे. गेल्या आठ दिवसापासून होत असलेल्या कुप्रसिद्धिचाही फायदा त्यास मिळू नये असे झाले तरच एवढ्या सगळ्या काथ्याकूट, विरोधाचा काहीतरी परिणाम झाला असे मानावे.
मध्यंतरी सोनिया गांधीवर चित्रपट निघणार होता, इटलीची सुप्रसिद्ध (इफ यु नो वाट आय मीन) अभिनेत्री मोनिका बेलुची हिला सोनिया गांधी च्या भूमिकेत घेणार होते. पण मोनिका बेलुची हीची पुर्वकारकिर्दीनुसार असलेली इमेज सोनिया गांधींच्या आताच्या राजकिय इमेजशी म्याच झाली नसती म्हणून चित्रपट बारगळला. त्यामागे सोनियांचा बारटेंडर म्हणून असलेला पुर्वेतिहासही काँग्रेससाठी डोकेदुखी ठरला असता. कारण आपल्या कडे बार टेंडर, बारगर्ल, बार-डान्सर, कॉलगर्ल सगळे एकच समजले जाते. चित्रपट पाहून लोकांनी सोनियाला भलतेच समजले असते तर देशाच्या सर्वात मोठ्या सत्ताधारी पक्षाच्या सर्वोच्च महिला नेत्याबद्दल असा समज योग्य नसता म्हणूनही हा चित्रपट बंद करण्यात आला. आता बोला इथे सिनेमॅटिक लिबर्टीबद्दल बोंबाबोंब का झाली नाही?
मी स्वतः एक कलाकार आहे, अभिव्यक्ति स्वातंत्र्य जपतांना कलाकारास सामाजिक भान असणे सर्वात जास्त आवश्यक आहे असे माझे स्पष्ट मत आहे. कारण हे स्वातंत्र्य त्याला त्याच समाजाकडून मिळत आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. चित्रपट व्यावसायिक म्हणून भंसालीने पोर्नोग्राफीही करावी, कुणास न माहित असलेला खरा इतिहास खोदून खोदून तो मांडावा, कुणाचा विरोध नाही त्याला, पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण समाजाच्या अस्मितांना वेशीवर टांगण्याचा हक्क कोणासही नाही. एका चित्रपटाने असे काय होईल असे विचाराल तर म्हणेन, काळ सोकावतो. त्याबद्दल चिंता आहे म्हणून विरोध.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- ›
- »