Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ?

म
माहितगार
Mon, 11/30/2015 - 12:03
🗣 322 प्रतिसाद
प्रतिसाद टंकण्यापुर्वी क्षणभर थांबा ! शीर्षकात प्रश्नचिन्हा (?) एवजी कृपया स्मायली वाचा (:)). शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे. हे सांगूनही तुम्ही या धागा लेखातील विवीध कडबोळे प्रश्न आणि कडबोळे विचारांचे अनाकलनीय काहुर वाचण्यास थांबत असल्यास, 'शनी शिंगणापूर येथील मंदीरात एका स्त्रीने जाऊन चक्क दर्शन घेतले, आणि गावातल्या लोकांनी (कदाचित त्यांच्या भावना दुखावल्यामुळे) बंदपाळल्याची बातमी', हि ह्या धागा लेखाची खरी सुरवात आहे. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न तसा दिसतो तेवढा सोपा नसावा, नाहीतर मंदिर प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर येऊन ८५व्या वर्षानंतर कदाचित या प्रश्नाची चर्चा करण्याचे प्रयोजन उरले नसते. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न चर्चेस घेतला तर पहिला आक्षेप हा येऊ शकेल की तुम्ही केवळ हिंदुधर्मीय प्रार्थनास्थळातील असमानतेचीच चर्चा का करता आणि इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्रीयांना दिल्या जाणार्‍या असमान वागणूकीची चर्चा का करत नाही ? हा प्रश्न येतो, या प्रश्नाचे काहुर येथवरच थांबत नाही, कारण: १) हा असमानतेचा प्रश्न त्यांना धार्मीक गुरु पुजारी (येथे त्या त्या धर्मातील शब्द कल्पावेत) इत्यादी संधी समानपणे का मिळत नाही हा प्रश्न एक्स्टेंड होतो; मग असे का होते कारण प्रेषित, विदुषी, तत्त्वज्ञ या जागी अपवादात्मक स्त्रीयांचे दाखले सोडल्यास त्यांचे अस्तीत्व विरळ असल्यामुळे असे होते का ? एखादा प्रेषित असो वा प्रार्थनास्थळात प्रवेश अथवा धर्मगुरुपद नाकारणारा पुरुषवर्ग शेवटी स्त्रीयांच्या पोटीच जन्माला येतो माता पत्नी कन्या बहीण या रोलचा प्रभाव इतरवेळी बर्‍याचदा दिसून येतो तर प्रार्थनास्थळातील समानतेचे तत्त्वज्ञान आपापल्या पातळीवर रेटण्यात या स्त्रीया कुठे कमी पडताहेत का ? मुलतः त्यांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ? :) आता हा प्रश्न म्हणजे जरासे व्हिक्टीम ब्लेमींग केल्यासारखे आहे जे व्यक्तीशः मलाही मान्य नाही (शिवाय मी स्वतःही खोडू शकेन असा यात तर्कदोष आहे) तरीही असा प्रश्न उपस्थीत करण्या मागे उद्देश केवळ चर्चेस तोंड फोडणे एवढाच आहे. २) शनि शिंगणापुरचा स्त्री प्रवेशाचा प्रश्न कदाचित कायद्याच्या मार्गाने सोडवता येईल पण इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्री प्रवेश आणि धर्मगुरुपदावरील समानतेचा प्रश्न विचारला तरी प्रश्न विचारणारे असहिष्णू ठरतील ? स्त्रीयांना समानता नाकारण्यासाठी आपापल्या धर्मग्रंथाची शब्दपुजा रचत उत्पातमुल्य दाखवणारे असहिष्णू ठरणार नाहीत. मग इथे राजकीय शांतता साधण्याच्या व्यावहारीक गरजांसाठी केलेली धर्मग्रंथांना पुढेकरत उत्पातमुल्य दाखवणार्‍यांशी विवीध धर्मियांची उत्पातमुल्यावर आधारीत एक तडजोड अस्तीत्वात आहे का? असे उत्पात मुल्य दर्शवणारे असोत अथवा लोकसभेत केवळ असहिष्णूतेवर चर्चा करणार पण तेही गोंधळ करून हा कायदेमंडळांमधे घातला जाणारा गोंधळ ही सुद्धा असहिष्णूता नाही का ? ३) किंवा बर्‍याचदा असा विचार समोर ठेवला जातो की समाजसुधारणा त्या त्या समाजातूनच पुढे येऊ द्याव्यात अंशतः हे खरेही आहे की शनि शिंगणापुर असो वा इतर धर्मीय प्रार्थनास्थळे समाजसुधारणेचे विचार त्या त्या समाजातून पुढे यावयास हवेत पण समाज हेच एक युनीट आहे का ? त्या गावापुरता शनि शिंगणापुरचाही एक समाज अस्तीत्वात नाही का आणि समाज सुधारणेची सुरवात त्याच गावातील व्यक्ती कडून होणे अधिक श्रेयस्कर असणार नाही का ? मग शनि शिंगणापूर गावातील समाजाची मते बदले पर्यंत उर्वरीत समाजाने थांबले पाहीजे का ? अंदमानात इतर जगातील मानवाचे संबंध नाकारणार्‍या अदिवासींचा अधिकार आपण स्विकारतोच ना मग शनि शिंगणापुर सारख्या विवीध गावातील जाती जमातीतील परंपरा आतून बदले पर्यंत थांबले पाहीजे का ? असे कुठ पर्यंत थांबणे सयुक्तीक ठरेल. रविंद्रनाथ टागोरांच्या शांती निकेतनापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर काही आदीवासी जमातीत अगदी अलिकडे पर्यंत विच हंटींगची जातपंचायतीकडून बलात्काराच्या आदेशाची उदाहरणे पुढे येतात शनि शिंगणापुर असो वा बंगाल मधील वस्ती वा इतर धर्मीय लोकशाहीत सर्वांचाच सहभाग आहे, प्रागतिक विचारांचे प्रतिनिधी अशा मागे पडलेल्या समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून प्रबोधनाचे मार्ग प्रशस्त करण्यात नेमके कुठे कमी पडतात ? ४) ज्या मिथककथांवर आधारीत अंधविश्वास अस्तीत्वात आहेत ती केवळ मिथके आहेत, आपापल्या संस्कृती जपताना काळानुरुप परिवर्तनांच्या आड ह्या मिथककथा येऊ नयेत यासाठी लागणारे प्रबोधन करण्यात आमचे विवीध महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे अभ्यासकमंडळी कमी पडत आहेत का ? आतापर्यंतच्या चर्चेचा रोख तुम्ही पाहीलात तर शीर्षक आणि लेखाचा उद्देश स्त्री विरोधी नाही आणि कोणत्याही विशीष्ट धर्म अथवा संस्कृतीस लक्ष्य करणेही या धागा लेखाचा उद्देश नाही, मी परिवर्तनांसाठी क्रांतीचा पक्षधर नाही पण परिवर्तनासाठी लागणार्‍या उत्क्रांतीसाठी प्रबोधनासाठी सदैव आग्रही असावे असे वाटते, हे वाचकांनी लक्षात घेतले असेलच. मी माझ्या या धागा लेखातील माझे सर्वच प्रश्न आणि विचारांचे काहुराचे निटसे विश्लेषण केले आहे असेही नाही. इतरांचे विचार समजून घेऊन माझ्या साशंकता कमी करण्यास साहाय्य व्हावे म्हणून हा धागा लेख लिहिला आहे. बाकी चुभूदेघे. चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी धन्यवाद
वर्गीकरण
स्त्री
तत्त्वज्ञान
धर्मसंस्था
राजकारण
समाजमन

प्रतिक्रिया द्या
74579 वाचन

💬 प्रतिसाद (322)
प
पगला गजोधर गुरुवार, 12/03/2015 - 09:19 नवीन
अमेरिका/ गोव्यातल्या/केप टाउन चर्चमधे (डोक्यावर टोपी न ठेवणे की संपले) व सिंगापूर /थायलंड मधील बौद्ध मंदिरात (पादत्राणे न घालणे की संपले), मला प्रवेश मिळाला, फोटो सुद्धा काढता आले. (कोणीही जात धर्म विचारला नाही). गुरुद्वाराच्या लंगर मधे जेवलोय (कोणीही जात धर्म विचारला नाही).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 09:37 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
न
नाखु गुरुवार, 12/03/2015 - 10:17 नवीन
हेच मी स्वतः शिवथर घळला अनुभवले आहे. सुमारे २०-२२ वर्षांपूर्वी (जेव्हा थेट नेट सेल्फी) इफे़क्ट नव्हता तेव्हा.. माझ्याबरोबर आम्च्या कंपनी समूहात दोन मुस्लीम २ केरळीयन ख्रिषचन यांनाही विना अटकाव प्रवेश दिला होता. शिवथर घळ हे संपूर्णतः खाजगी आहे असे मला वाटते तिथेही तुम्ही कुठल्या धर्माचे आहात हे विचारत नाहीत (किमान आम्हाला तरी विचारले नाही) फक्त पोषाख सभ्य असावा असा संकेत असावा.(किंवा मधल्या काळात काही वावगे घडले असावे म्हणून पेहरावाबद्दल काही नियम बन्विले असावेत). भेदभाव करणे कुठेही वाईच धाग्यावर आणि मंदीरातही...... लाईनीत (थांबण्याची सक्ती न करता लांबूनही नमस्कार)नमस्कारी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 08:36 नवीन
कडक नियम असतील तर असोत, मात्र सर्वांना सारखेच असोत काही बाबतीत. गुरुद्वार्‍यात पहा, तुमचे जातधर्मलिंग कोणी विचारत नाही. अंग झाकणारे कपडे घातले आणि डोके झाकले की संपले. असेच इथेही असावयास हरकत नसावी असे आपले मला वाटते. असो. बाकी नियम कसाही असो मात्र पुजार्‍यांनी शिव्या देणे म्हणजे हाईट आहे. असे अनुभव वाईटच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अजया गुरुवार, 12/03/2015 - 09:20 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ग
गवि गुरुवार, 12/03/2015 - 09:38 नवीन
कडक नियम असतील तर असोत, मात्र सर्वांना सारखेच असोत काही बाबतीत. गुरुद्वार्‍यात पहा, तुमचे जातधर्मलिंग कोणी विचारत नाही. अंग झाकणारे कपडे घातले आणि डोके झाकले की संपले. असेच इथेही असावयास हरकत नसावी असे आपले मला वाटते. असो.
अ. कडक अथवा सौम्य, जे काही नियम असतील त्यांची कमाल व्याप्ती नागरिकाला एखाद्या खाजगी, प्री-डिफाईन्ड सीमारेषा असलेल्या जागेत प्रवेश नाकारणे इतकीच असेल आणि ब. या जागी न जाण्याने त्या व्यक्तीच्या अन्न वस्त्र निवारा यांपैकी एक अथवा अनेक गरजा बाधित होत नसतील किंवा या गरजांना मिळवण्याचा एकमेव मार्ग खंडित होत नसेल. आणि क. स्वतःच्या आवारात तसे किंवा कोणतेही नियम करण्याची पूर्ण कायदेशीर मान्यता नियम बनवणार्‍या बॉडीला त्या देशाच्या मुख्य कायदेशीर संस्थेने दिलेली असेल. तर कोणतेही नियम चूक ठरणार नाहीत / ठरु नयेत. आणि तसं नसेल तर सर्व नियम चूक ठरतील / ठरावेत. मग ते वस्त्र, लिंग, वर्ण, धर्म, भाषा, उंची, वजन, केसांची लांबी, आहारपद्धती, लैंगिक ओरिएन्टेशन किंवा अन्य कोणत्याही व्हेरिफायेबल पॅरामीटरवर आधारित असोत. बाकी कितीही काही बोललं तरी निरुपयोगी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 09:48 नवीन
म्हणजे या न्यायाने दलितांच्या मंदिरप्रवेशाबद्दलची सर्व आंदोलने आणि महिलांच्या गाभाराप्रवेशाबद्दलची आंदोलने निरुपयोगीच ठरावीत, नै का? मध्यंतरी कर्नाटकातील एका मंदिरातल्या गलिच्छ प्रथेबद्दल बरेच काही छापून आले होते. ब्रह्मवृंदाचे जेवण झाल्यावर त्या उष्ट्या खरकट्या पत्रावळ्यांवर लोटांगण घालत प्रदक्षिणा घालण्याचा प्रकार तिथे अगोदरपासून आहे. हाही कायदेशीर प्रकार आहे, कुणाच्या कसल्या हक्कावर गदा वगैरे येत नाही. पण यावर बंदी घालण्यात आली. आणि ते मलाही समर्थनीय वाटते. बर्‍याच जणांनी विरोधही केला, कैकांनी समर्थनही केले. नेमके देवळाचे नाव आठवत नै नैतर लिंक दिली असती. बाकी हा मुद्दा अंमळ भावनिकही आहेच. काही प्रमाणात अ‍ॅक्सेस ओपन केल्यास अजून बरे होईल असे बर्‍याच जणांना वाटते, तदनुरूप अनेक लोकांनी चळवळी केलेल्या आहेत आणि त्यांना कमीअधिक प्रमाणात यशही मिळालेले आहे. त्यामुळे यात निरुपयोगी असे काही वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 10:13 नवीन
मंदिरनामक जागा केंद्रस्थानी ठेवून समाज त्याविषयी काय निर्णय घेतो हे समाजावर बंधनकारक असते. संपूर्ण समाजाने (यात स्त्रिया-पुरुष, दलित-उच्चवर्णिय, श्रीमंत-गरीब सगळे आले) स्त्रियांच्या गाभाराप्रवेशावर बंदी घातली तर तेही बरोबर, उठवली तरी बरोबर. पण समाजातले काही विशिष्ट घटक आपले स्वार्थ साधण्यासाठी, असमतोल मानसिकतांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उर्वरीत समाजाला फसवत असतील आणि त्यायोगे काही भेदभाव घडत असेल तरच तो चुकीचा ठरेल. बाकी तुम्ही म्हणताय त्या अनिष्ट प्रथा ह्या सहज भावनेतून सुरु झालेल्या, पुढे विकृत रुप घेतलेल्या असतात. त्यांच्यावर प्रबोधनासह बंदी घालणे आवश्यकच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 10:35 नवीन
फसवणे म्हणजे काय? आर्थिक फायदा करून घेणे वगैरे? तसे असेल तर मग दलितांना मंदिरप्रवेशापासून रोखण्यात पुरोहितांचा तरी आर्थिक फायदा काय होता? उलट त्यांना अलाउ केले असते तर त्यांनीही दाने दिलीच असती की. तस्मात निव्वळ फसवणूक असेल तरच चूक ही व्याख्या अपुरी आहे असे वाटते. पण हा मुद्दा बर्‍याच अंशी सब्जेक्टिव्ह आहे हेही तितकेच खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 10:56 नवीन
फसवणे म्हणजे आर्थिक फायदाच असे नाही. खरे न सांगणे, सत्य दडवून ठेवणे, मिळालेल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन दमदाटी करणे. 'एखादा अधिकार तुम्हालाही उपलब्ध आहे' हे जातीपातीच्या पूर्वग्रहातून निम्नजातींना न सांगणे ही फसवणूकच आहे. एक उदाहरण देतो. मी आणि माझ्या मित्राने अमेरिकेतल्या कुठल्या युनिवर्सिटीला अप्लाय केले. पण प्रवेश मिळेल की नाही हे तिथे गेल्यावरच समजते अशी अट आहे. माझा मित्र तिथे आधीच गेलेला आहे. काय निकाल आहे हे त्याने मलाही कळवणे अपेक्षित आहे. पण इर्ष्येतून, सामाजिक सन्मानाच्या हेतूने त्याने मला 'तुझा नंबर लागला नाही' असे चुकीचे सांगितले. मला त्याच्यावर प्रचंड विश्वास असल्याने मी तोच निकाल खरा मानला. यात माझे नुकसान झाले. म्हणजे मला फसवले असेच म्हणेन ना मी? माझ्यामते मंदिरांमधे विशिष्टांना प्रवेशबंदी ही खाजगीकरणातून आलेली आहे. मंदिरव्यवस्थापनाच्या इतिहासाबद्दल मला तेवढे इत्थंभूत ज्ञान नाही. याविषयी जास्त माहिती मिळाली तर ह्या बंदीप्रथा कुठून उपजल्या हे शोधता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 11:02 नवीन
सहमत, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/03/2015 - 13:54 नवीन
@माझ्यामते मंदिरांमधे विशिष्टांना प्रवेशबंदी ही खाजगीकरणातून आलेली आहे.>> आहो कुठचं काय आलय खाजगीकरण.? ही अस्पृश्यता पाळली जाते सरळ सरळ! ह्याला पोथ्यांचाही आधार असतो.. देवाची पॉवर कमी होइल्,अमके तमके शिवल्यानी..असली मूर्ख टनाटनी गणित असतात...ह्या देवाला शिवू न देण्याच्या प्रथांमागे.. आतल्या गोटातून ,माहिती घ्या ..मग कळेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 14:31 नवीन
अहो, अस्पृश्यता म्हणजेच खाजगीकरण. तेच म्हणायचे आहे. हे देवाची पावर कमी होईल वैगेरे बालीश कारणं देण्यामागे जी काय मानसिकता आहे ते म्हणजे खाजगीकरण. खरेतर अस्पृश्यता, देवाची पॉवर इतकी वरवरची कारणं बघण्यापेक्षा माणसाच्या अंतर्मनात ह्या गोष्टी निर्माण होण्यामागे आणि चराचरात देव आहे ह्या भावनेच्या विरूद्ध वागण्यामागे काय इतिहास असावा, कुठून सुरू झालं, नेमकं काय कारण असावं यावर विचार करतोय. काहीतरी आहे जे इतरांपासून लपवून, सुरक्षित ठेवायचं आहे. कुणाला तरी काही तरी फायदा असल्याशिवाय ह्या मान्यता व भेदभाव निर्माण होणार नाहीत. नुसतं 'आम्ही श्रेष्ठ तुम्ही कनिष्ठ' एवढ्याशा भांडवलावर ही व्यवस्था इतकी शतके चालू शकत नाही. गूढत्वाच्या भांडवलावर असेल तरी सुरुवातीस काहीतरी अनुभव आल्याशिवाय लोक मानणार नाहीत. म्हणजे दहा समान दर्जा असलेल्या व्यक्ती प्रवासाला निघाल्या पण रस्ता माहीत नाही, त्यातल्या प्रत्येकाने प्रयत्न करून पाहिला पण एकाचेच रस्त्याबद्दलचे अंदाज दोन-तीन वेळा सलग बरोबर निघाले की तोच त्या गटाचा म्होरक्या होतो. मग भलेही पुढचे सगळे अंदाज चुकत गेले तरीही पुर्वसंचितानुसार त्यालाच तो मान मिळतो. पुढे इतरांची मते लक्षात घेऊन तो अंदाज वर्तवेल पण शेवटपर्यंत इतर लोक त्यानेच आपल्याला कसे योग्य मार्गदर्शन केले ह्यावर विश्वास ठेवतील. चातुर्वर्ण्य व्यवस्था होऊन ब्राह्मण सर्वश्रेष्ठ ठरवण्यामागे ब्राहमणांचे असेच काहीसे योगदान कारणीभूत असेल काय? ज्याचा गैरफायदा घेऊन जन्मनिहाय व्यवस्था निर्माण झाली आणि पुढे श्रेष्ठ कनिष्ठ चे मत मानवी मनाच्या विकृत बाजूचे दर्शन करत प्रभावी झाले. मूळावरच घाव घातला तर फांद्या आपोआप तुटून पडतात. बाजीरावपेशव्यांनीच सांगितलंय. म्हणून मूळ शोधावे. ते मनुस्मृतीच्याही पलिकडे असावे. जाणकारांच्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ग
गवि गुरुवार, 12/03/2015 - 10:16 नवीन
म्हणजे या न्यायाने दलितांच्या मंदिरप्रवेशाबद्दलची सर्व आंदोलने आणि महिलांच्या गाभाराप्रवेशाबद्दलची आंदोलने निरुपयोगीच ठरावीत, नै का?
माझा प्रतिसाद परत वाच. आजरोजीविषयी बोलायचं आहे. अ. जागा खाजगी आहे की सार्वजनिक मालकीची? ब. प्रवेश रोखणारा नियम अलिखित आणि लोकल पुजार्‍याने / बडव्यांच्या गटाने आपसात ठरवून केला आहे की मंदिराच्या ट्रस्टने अधिकृत ऑथॉरिटीसह केलेला आहे? यावर ते वैध की अवैध ते ठरेल. कधी भावना, कधी कायदा अशाने बरेच घोळ होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 10:31 नवीन
गाभाराप्रवेशाची आंदोलने गेल्या पाचेक वर्षांत झालेली आहेत. कर्नाटकातले उदाहरणही अलीकडचेच आहे. बाकी अधिकृत अ‍ॅथॉरिटीने घेतलेला निर्णय तांत्रिकदृष्ट्या वैध असला तरी योग्य असेलच का? ते अय्यप्पा मंदिरात पाळीवाल्या स्त्रिया ओळखण्यासाठी स्कॅनर बसवायचा निर्णय समजा उद्या अगदी अधिकृतपणे घेतला तर तुम्ही त्याला योग्यच म्हणाल का? वैध आणि योग्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दरवेळेस एकाच एक चौकटीत अशा गोष्टी पकडता येत नसल्या म्हणून नुस्ता घोळ आहे असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
अ
अभ्या.. गुरुवार, 12/03/2015 - 09:39 नवीन
पुजारी हे माणसांचे प्रतिनिधी म्हणून देवापुढे गार्‍हाणे मांडतात, सेवा करतात तोपर्यंत ठिकच असते. जेंव्हा ते स्वतःला देवाचे प्रतिनिधी समजू लागतात तेंव्हाच अवघड होते. अशावेळी व्यवस्था त्यांना बदलते किंवा ते व्यवस्था बदलतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 09:51 नवीन
अगदी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
पद्मावति गुरुवार, 12/03/2015 - 09:55 नवीन
सहमत. अशाने आपणच आपल्या धर्माला वाईटपणा देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
माहितगार गुरुवार, 12/03/2015 - 09:27 नवीन
@ डांगेजी
म्हणून जिथे अपात्र ठरू तिथे न जाता जिथे पात्रतेचे निकष उपलब्ध नसल्याने खुला प्रवेश आहे तिथे जाणे इष्ट असे माझे मत.
काय होतय १) अनेक ऑदरवाईज सार्वजनिक असलेली मंदिरे/प्रार्थनास्थळे केवळ भेदभावाच्या सोईसाठी म्हणून खासगीपणा पुढे केला जाताना दिसतो यात कुणाच्या व्यक्तीगत घरात जाण्याचा तसा प्रश्न नाही आणि 'अतिथी देवोभव' म्हणणार्‍या संस्कृतीत अगदी घरातल्या मंदिरा बाबत सुद्धा भेदभावयूक्त व्यवहार आदर्श कसा म्हणता येईल ? २) मी समोरच्या परधर्मीय व्यक्तिशी माझ्या संस्कृतीतील उदात्तते बद्दल बोलणार आणि नंतर हजारो लोक जात असलेल मंदिर खासगी आहे आणि तुमच्या बॅकग्राऊंडमुळे प्रवेश नाही असे सांगणार यात माझ्या संस्कृतीच्या उदात्ततेच प्रदर्शन होत की कोत्या मनोवृत्तीच प्रदर्शन होते आहे?
म्हणून जिथे अपात्र ठरू तिथे न जाता जिथे पात्रतेचे निकष उपलब्ध नसल्याने खुला प्रवेश आहे तिथे जाणे इष्ट असे माझे मत.
मी माझ्या धर्माचा संस्कृतीचा अभिमान ठेवतानाच, सहिष्णूता बाळगाणारा समधर्म समभाव बाळगणारा व्यक्ती आहे, मला माझ्या प्रमाणेच माझ्या मुलांमध्ये सहिष्णूता वृद्धींगत व्हावी आणि इतर धर्म आणि विचार पद्धतीचा परिचय व्हावा म्हणून माझ्या मुलांना विवीध धर्मांच्या धर्म स्थळांना भेटीस न्यावयाचे आहे त्यावेळी मुलांनो अमुक अमुक मंदिरे/प्रार्थनास्थळांमध्ये तुम्ही तुमच्या बॅकग्राउंडमुळे प्रवेशासाठी अपात्र आहात हे सांगणे नेमकी कोणती गोष्ट बाल मनांवर बिंबवते ज्यांना धर्मंच्या दुकानांवरच्या प्रवेश नाकारणार्‍र्‍या असहिष्णु पाट्या पाहून त्या मुलांकडून मोठे झाल्या नंतर सहिष्णूतेची अपेक्षा करणे कितपत रास्त ठरते या बद्दल मी साशंक आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सायकलस्वार Mon, 11/30/2015 - 19:01 नवीन
पुरुषांना बंदी असलेला एक गाभारा इथे मिपावरच आहे म्हणे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
प
प्रसाद गोडबोले Mon, 11/30/2015 - 19:04 नवीन
हा हा हा बास बास ... धाग्याचे सार्थक झाले =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायकलस्वार
ब
बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 07:36 नवीन
अगदी अगदी. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ट
टवाळ कार्टा Tue, 12/01/2015 - 15:38 नवीन
खिक्क...पण तो खास चाव्यांनी उघडता येतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कपिलमुनी Wed, 12/02/2015 - 05:14 नवीन
संपादित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 12/01/2015 - 03:27 नवीन
व्वा ! वाक्य आवडल. क्लास. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायकलस्वार
अ
अजया Tue, 12/01/2015 - 03:32 नवीन
अरे वा हे सोपे तत्त्वज्ञान दिसते!कळायला अवघड गेला असेल विषय बाकीचा! चालु द्या निरर्थक अत्मरंजन! etc etc!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायकलस्वार
म
मितान Tue, 12/01/2015 - 04:19 नवीन
@ सायकलस्वार, इथला तुमच्या मते गाभारा किती महत्वाचा आहे हे अधोरेखित केल्याबद्दल आभार. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
प
पैसा Tue, 12/01/2015 - 05:07 नवीन
सदस्यकाळ ४ महिने फक्त. मिपाचा कमालीचा अभ्यास केलेला दिसतोय! का आताचा आयडी बॅन झाल्यावरची तरतूद करून ठेवली आहे! अभ्यास जोरात चालू ठेवा बरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायकलस्वार
ब
बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 07:38 नवीन
सदस्यकाळ ४ महिने फक्त. मिपाचा कमालीचा अभ्यास केलेला दिसतोय!
एका महिन्यात जर कुणी सालसपणे प्रतिसाद देऊ शकत असेल तर चार महिने लै झाले, नै का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 12/01/2015 - 07:43 नवीन
अगदी खरं आहे. लोक काड्या करण्यासाठी स्पेशल अवतार घेऊन येतात त्यामुळे तयार असतातच. आमच्यासारखे बसतात बोंबलत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 07:54 नवीन
आमच्यासारखे बसतात बोंबलत.
चांगलंच आहे. बोंबलण्याचे फायदे काय असतात ते इथे पहावयास मिळेल. आरोग्यास हितकारकच असते. http://www.sanatan.org/mr/a/574.html त्या निमित्ताने सालसपणामागील अमंगळ निघून जाईल अशी भाबडी आशा करावयास हरकत नाही. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 12/01/2015 - 08:19 नवीन
हितकारक असेल त्यांनी विधी म्हणून करा. मला काही त्याची विधी म्हणून गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ग
गणपा Tue, 12/01/2015 - 05:39 नवीन
तायांनो थोडं विनोदानं घ्या की सायकलस्वाराचं वाक्य. :D का उगा वाढदिवसाच्या शुभेच्छा देउन राहीलात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायकलस्वार
म
मितान Tue, 12/01/2015 - 06:33 नवीन
ब्वॉर्र !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
क
कपिलमुनी गुरुवार, 12/03/2015 - 10:44 नवीन
स्त्रीयांना विनोद हा विषय अवघड जातो का ? किंवा स्त्रीयांना विनोद हा विषय अवघड का जातो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/03/2015 - 10:48 नवीन
पॉपकॉर्न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
मितान गुरुवार, 12/03/2015 - 13:32 नवीन
जौ दे रे ! कंटाळा आला !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मृत्युन्जय Tue, 12/01/2015 - 06:39 नवीन
पुरुषांना बंदी असलेला एक गाभारा इथे मिपावरच आहे म्हणे... हाहाहाहा. पण आत मध्ये देव आहे याची खात्री आहे का तुम्हाला? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायकलस्वार
प
प्रसाद गोडबोले Tue, 12/01/2015 - 08:51 नवीन
पण आत मध्ये देव आहे याची खात्री आहे का तुम्हाला?
देव नाही ह्याची १००% खात्री आहे ... देवी असु शकेल कदाचित =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ब
बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 10:15 नवीन
नक्की देवीच की त्या नावाआडचा एखादा किळसवाणा कोळी वगैरे? =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Tue, 12/01/2015 - 10:29 नवीन
आपणास Teotihuacan https://en.wikipedia.org/wiki/Great_Goddess_of_Teotihuacan म्हणायचे आहे की Arachne https://en.wikipedia.org/wiki/Arachne ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 10:33 नवीन
कंचीबी असंन ओ, मुद्दा समजल्याशी कारण. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
मितान Tue, 12/01/2015 - 10:41 नवीन
हीन प्रतिसाद ! डोक्यातल्या किड्यांची पूजा करत बसलं की असं होतं म्हणे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 10:49 नवीन
डोक्यातल्या किड्यांची पूजा करत बसलं की असं होतं
त्या स्वमतांध दांभिक क्रायबेबी कंपूबाजांना आपली पूर्ण सिंपथी आहे. :) #छाणप्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
म
मितान Tue, 12/01/2015 - 10:55 नवीन
माझी तर अशा लोकांना नुसती सिंपथीच नाही तर किंड्यांविषयीच्या फोबियावर फुकट उपचार करणार्या संस्थांची यादीही तयार ठेवली आहे मी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मितान Tue, 12/01/2015 - 10:55 नवीन
माझी तर अशा लोकांना नुसती सिंपथीच नाही तर किंड्यांविषयीच्या फोबियावर फुकट उपचार करणार्या संस्थांची यादीही तयार ठेवली आहे मी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 10:58 नवीन
एकूण प्रतिसाद पाहून "कोण तो **चा म्हणतोय मी शिव्या देतोय म्हणून?" या अजरामर वाक्याची अठवण झाली. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
म
मितान Tue, 12/01/2015 - 12:35 नवीन
अय्यो =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अजया Tue, 12/01/2015 - 13:08 नवीन
=))=))=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
न
नीलमोहर Tue, 12/01/2015 - 10:53 नवीन
असं नाही असं नाही, यावेळेस सचित्र व्याख्या का नाही बरं.. अशाने फाऊल धरला जाईल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा