Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ?

म
माहितगार
Mon, 11/30/2015 - 12:03
🗣 322 प्रतिसाद
प्रतिसाद टंकण्यापुर्वी क्षणभर थांबा ! शीर्षकात प्रश्नचिन्हा (?) एवजी कृपया स्मायली वाचा (:)). शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे. हे सांगूनही तुम्ही या धागा लेखातील विवीध कडबोळे प्रश्न आणि कडबोळे विचारांचे अनाकलनीय काहुर वाचण्यास थांबत असल्यास, 'शनी शिंगणापूर येथील मंदीरात एका स्त्रीने जाऊन चक्क दर्शन घेतले, आणि गावातल्या लोकांनी (कदाचित त्यांच्या भावना दुखावल्यामुळे) बंदपाळल्याची बातमी', हि ह्या धागा लेखाची खरी सुरवात आहे. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न तसा दिसतो तेवढा सोपा नसावा, नाहीतर मंदिर प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर येऊन ८५व्या वर्षानंतर कदाचित या प्रश्नाची चर्चा करण्याचे प्रयोजन उरले नसते. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न चर्चेस घेतला तर पहिला आक्षेप हा येऊ शकेल की तुम्ही केवळ हिंदुधर्मीय प्रार्थनास्थळातील असमानतेचीच चर्चा का करता आणि इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्रीयांना दिल्या जाणार्‍या असमान वागणूकीची चर्चा का करत नाही ? हा प्रश्न येतो, या प्रश्नाचे काहुर येथवरच थांबत नाही, कारण: १) हा असमानतेचा प्रश्न त्यांना धार्मीक गुरु पुजारी (येथे त्या त्या धर्मातील शब्द कल्पावेत) इत्यादी संधी समानपणे का मिळत नाही हा प्रश्न एक्स्टेंड होतो; मग असे का होते कारण प्रेषित, विदुषी, तत्त्वज्ञ या जागी अपवादात्मक स्त्रीयांचे दाखले सोडल्यास त्यांचे अस्तीत्व विरळ असल्यामुळे असे होते का ? एखादा प्रेषित असो वा प्रार्थनास्थळात प्रवेश अथवा धर्मगुरुपद नाकारणारा पुरुषवर्ग शेवटी स्त्रीयांच्या पोटीच जन्माला येतो माता पत्नी कन्या बहीण या रोलचा प्रभाव इतरवेळी बर्‍याचदा दिसून येतो तर प्रार्थनास्थळातील समानतेचे तत्त्वज्ञान आपापल्या पातळीवर रेटण्यात या स्त्रीया कुठे कमी पडताहेत का ? मुलतः त्यांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ? :) आता हा प्रश्न म्हणजे जरासे व्हिक्टीम ब्लेमींग केल्यासारखे आहे जे व्यक्तीशः मलाही मान्य नाही (शिवाय मी स्वतःही खोडू शकेन असा यात तर्कदोष आहे) तरीही असा प्रश्न उपस्थीत करण्या मागे उद्देश केवळ चर्चेस तोंड फोडणे एवढाच आहे. २) शनि शिंगणापुरचा स्त्री प्रवेशाचा प्रश्न कदाचित कायद्याच्या मार्गाने सोडवता येईल पण इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्री प्रवेश आणि धर्मगुरुपदावरील समानतेचा प्रश्न विचारला तरी प्रश्न विचारणारे असहिष्णू ठरतील ? स्त्रीयांना समानता नाकारण्यासाठी आपापल्या धर्मग्रंथाची शब्दपुजा रचत उत्पातमुल्य दाखवणारे असहिष्णू ठरणार नाहीत. मग इथे राजकीय शांतता साधण्याच्या व्यावहारीक गरजांसाठी केलेली धर्मग्रंथांना पुढेकरत उत्पातमुल्य दाखवणार्‍यांशी विवीध धर्मियांची उत्पातमुल्यावर आधारीत एक तडजोड अस्तीत्वात आहे का? असे उत्पात मुल्य दर्शवणारे असोत अथवा लोकसभेत केवळ असहिष्णूतेवर चर्चा करणार पण तेही गोंधळ करून हा कायदेमंडळांमधे घातला जाणारा गोंधळ ही सुद्धा असहिष्णूता नाही का ? ३) किंवा बर्‍याचदा असा विचार समोर ठेवला जातो की समाजसुधारणा त्या त्या समाजातूनच पुढे येऊ द्याव्यात अंशतः हे खरेही आहे की शनि शिंगणापुर असो वा इतर धर्मीय प्रार्थनास्थळे समाजसुधारणेचे विचार त्या त्या समाजातून पुढे यावयास हवेत पण समाज हेच एक युनीट आहे का ? त्या गावापुरता शनि शिंगणापुरचाही एक समाज अस्तीत्वात नाही का आणि समाज सुधारणेची सुरवात त्याच गावातील व्यक्ती कडून होणे अधिक श्रेयस्कर असणार नाही का ? मग शनि शिंगणापूर गावातील समाजाची मते बदले पर्यंत उर्वरीत समाजाने थांबले पाहीजे का ? अंदमानात इतर जगातील मानवाचे संबंध नाकारणार्‍या अदिवासींचा अधिकार आपण स्विकारतोच ना मग शनि शिंगणापुर सारख्या विवीध गावातील जाती जमातीतील परंपरा आतून बदले पर्यंत थांबले पाहीजे का ? असे कुठ पर्यंत थांबणे सयुक्तीक ठरेल. रविंद्रनाथ टागोरांच्या शांती निकेतनापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर काही आदीवासी जमातीत अगदी अलिकडे पर्यंत विच हंटींगची जातपंचायतीकडून बलात्काराच्या आदेशाची उदाहरणे पुढे येतात शनि शिंगणापुर असो वा बंगाल मधील वस्ती वा इतर धर्मीय लोकशाहीत सर्वांचाच सहभाग आहे, प्रागतिक विचारांचे प्रतिनिधी अशा मागे पडलेल्या समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून प्रबोधनाचे मार्ग प्रशस्त करण्यात नेमके कुठे कमी पडतात ? ४) ज्या मिथककथांवर आधारीत अंधविश्वास अस्तीत्वात आहेत ती केवळ मिथके आहेत, आपापल्या संस्कृती जपताना काळानुरुप परिवर्तनांच्या आड ह्या मिथककथा येऊ नयेत यासाठी लागणारे प्रबोधन करण्यात आमचे विवीध महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे अभ्यासकमंडळी कमी पडत आहेत का ? आतापर्यंतच्या चर्चेचा रोख तुम्ही पाहीलात तर शीर्षक आणि लेखाचा उद्देश स्त्री विरोधी नाही आणि कोणत्याही विशीष्ट धर्म अथवा संस्कृतीस लक्ष्य करणेही या धागा लेखाचा उद्देश नाही, मी परिवर्तनांसाठी क्रांतीचा पक्षधर नाही पण परिवर्तनासाठी लागणार्‍या उत्क्रांतीसाठी प्रबोधनासाठी सदैव आग्रही असावे असे वाटते, हे वाचकांनी लक्षात घेतले असेलच. मी माझ्या या धागा लेखातील माझे सर्वच प्रश्न आणि विचारांचे काहुराचे निटसे विश्लेषण केले आहे असेही नाही. इतरांचे विचार समजून घेऊन माझ्या साशंकता कमी करण्यास साहाय्य व्हावे म्हणून हा धागा लेख लिहिला आहे. बाकी चुभूदेघे. चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी धन्यवाद
वर्गीकरण
स्त्री
तत्त्वज्ञान
धर्मसंस्था
राजकारण
समाजमन

प्रतिक्रिया द्या
74579 वाचन

💬 प्रतिसाद (322)
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/02/2015 - 11:45 नवीन
अगदी हेच म्हणायला आलो होतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
माहितगार Wed, 12/02/2015 - 11:51 नवीन
@ट.का. ह्रुदयातून उपाशी आहात ? त्यान्ले ह्रुदयात ठेवा आणि कुठे शोधीसी हे आध्यात्मिक गीत गा म्हणजे सन्नीबैंनी अध्यात्म (प्रत्यक्षात) जॉइन नै केले तरीही तसा सा़क्षात्कार तुम्हाला (तुमच्या ह्रुदयास) होऊ शकतो :), पहा प्रयत्न करून !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पगला गजोधर Wed, 12/02/2015 - 12:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 12:19 नवीन
हे अध्यात्माचे मुक्तीधाम ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Wed, 12/02/2015 - 12:55 नवीन
जेव्हा तुम्ही तुमच्या, इच्छा/आकांक्षा/भावन/वासना रुपी लंगोट-आदी वस्त्रे त्याग करून, तुमच्या मनरुपी पोपटाला स्वैरपणे, भूमीरुपी आत्मा व सागररुपी परमात्मा चे जिथे मिलन होते अश्या, बीच(समुद्रकिनारा) रुपी धामात बागडू देतात, तेव्हा आलेल्या उत्कट अनुभूतीलाच मुक्ती म्हणतात. म्हनुन ''अध्यात्माचे मुक्तीधाम''
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 15:05 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
म
माहितगार Wed, 12/02/2015 - 11:41 नवीन
राधेमा (सु.कौर पंजाब) वरच्या सामाजिक प्रश्नांच्या संदर्भाने असलेल्या आक्षेपां संदर्भात सुयोग्य भूमिका निश्चित घेतली जावयास हवी. अर्थात त्यांच्या पाश्चात्य पोषाखाला हायलाइट करण्यातला पॉईंट तार्कीक उणीवेचा नाहीना याची साशंकता वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
न
नाखु Wed, 12/02/2015 - 10:02 नवीन
तसेच देवाची भिती दाखवून केले जाणारे धार्मिक भांडवल जिथे आहे तिथे देवच नसतो हे माझे ठाम मत आहे.त्यामुळे मुळात मी अशा कोणत्याही ठिकाणी निव्वळ उत्सुकता म्हणूनही जात नाही.ज्या देवापुढे सर्व मनुष्य प्राणी समान असावेत तो असे नियम बनवणार नाही
हे वाक्य वापरण्याची परवानगी द्यावी ही विनंती..
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 12/02/2015 - 10:28 नवीन
:)
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Wed, 12/02/2015 - 10:48 नवीन
कालपासुन सगळ्या चर्चा वाचून काढल्या. मुळात शनि काय मारुती काय आणि स्त्रिया आणि त्तत्वdnyan हा विषय zeplach नाही. फ़क्त एक सांगावेसे वाटते प्रत्येक वेळी अनाहिता आणि मीपा असा वाद घातलाच पाहिजे का?आपण सर्व एकच आहोत ना. जसे घरात आपण वागतो तसे नाही का वागू शकत. घरात असताना ही आपण नेहमीच सगल्या गोष्टी घरातील प्रत्येक सदस्य बरोबर नाही शेयर करत. आई-मुलगी, सासु-सुन, नवरा-बायको असे वेगवेगळे नाती असतात आणि त्यातील शेयरिंग ही वेगळे असते. तसेच थोड्याफार प्रमाणात इथे ही झालेय म्हणून अनाहिता वेगळे आहे असे नाही. सो आपण नको असे एकमेकना बोलायला. सगळे लोक्स् मस्त राहू या ना. कोणी हे वाचून दुखावल्यास क्षमा असावी.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 11:18 नवीन
प्रत्येक वेळी अनाहिता आणि मीपा असा वाद घातलाच पाहिजे का?आपण सर्व एकच आहोत ना.
मग जर घरात अनाहितांचा गाभारा असण्याला आम्ची ना नाही तर मग पुरुषांसाठी वेगळी गच्ची असण्याला अनाहितांकडूनच विरोध का होतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी
म
माहितगार Wed, 12/02/2015 - 11:24 नवीन
ट.का. त्यांनी सामोपचार दाखवलायना, धाग्यावरचं आवांतर आणखी किती ताणणार ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 11:28 नवीन
तुम्हाला गच्ची नक्कोय का? असोच्च
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ट
टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 11:28 नवीन
तुम्हाला गच्ची नक्कोय का? असोच्च
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ब
बॅटमॅन Wed, 12/02/2015 - 11:27 नवीन
पॉइंट बरोबरच आहे. त्याला खिजवण्याच्या सुरात असे उत्तर देण्यात आले होते की तुम्हीही करा नीलकांतला रिक्वेस्ट वगैरे. सूर होता की जणू पुरुषांनी असे कै करणे म्ह. अब्रह्मण्यम् आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 11:31 नवीन
आपण प्रॅक्टिकल नस्तो रे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 12/02/2015 - 11:42 नवीन
हो ना. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा अल्टिमेट प्रॅक्टिकलपणा अन्य कुठे सापडणार? तो नै जमत ही खरीच शरमेची गोष्ट म्हणायची. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पिलीयन रायडर Wed, 12/02/2015 - 11:43 नवीन
एक मिनिट हं... कुठलाही एक प्रतिसाद दाखवा जिथे कोणत्याही स्त्री सदस्याने पुरुषांच्या विभागाबद्दल कोणतेही मतप्रदर्शन केले आहे. माझ्या आठवणी प्रमाणे "पुरुषांच्या विभागा बद्दल अनाहिताचे कोणतेही मतच नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नीलकांतशी बोला." असाच नेहमी प्रतिसाद दिसला आहे. आता हे एक नॉर्मल वाक्य आहे. ह्यात सुर तुम्हीच शोधु जाणे. पुरुषांचा विभाग असणे ही गोष्ट अब्रह्मण्यम् आहे असा जो नसलेला सुर तुम्ही पकडलाय, तो बाय द वे फार हास्यास्पद आहे. ह्यात "अब्रह्मण्यम्" नक्की काय आहे ह्याचा बराच विचार केला. काही सुचले नाही. असा बंदिस्त विभाग पुरुषांचा नसावा असं मत कुठेही अनाहितातल्या कुणी मांडले असेल तर नक्की दाखवा. माहितीत भर पडेल. बाकी मुळ धागा.. मस्त चर्चा... चालु द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 11:48 नवीन
जेपीला बोल्वा रे कुणीतरी....खफवर एकदिवसीय आंदोलन झालेले....जेपी, पम्या, माप, खटपट्या, ब्यॅट्यॅ, मी असे सगळे होतो....त्यादिवशी जवळपास प्रत्येक अनाहिता..."आंदोलन कर्ताहेत...करूदे...वेगळा विभाग मिळ्णारै थोडीच" अश्या टैपच्या खौचट्ट कमेंटी करत होत्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 12/02/2015 - 11:55 नवीन
अच्छा.. ख.फ.. सॉरी.. मी तिकडे फारशी नसते. पण तरीही कुणी काही बोललं तर प्रत्येकाचं इंटरप्रिटिशन वेगळं असु शकतंच. साधी वाक्य तुम्हाला खवचट आणि अजुन काय काय वाटतात. नीलकांत शिवाय इतर कुणीही हा विभाग असु शकतो की नाही ह्यावर निर्णय घेऊ शकत नाही. असे असताना इतर कुणीही "विभाग मिळणार नाहीच" असं कशाला म्हणेल? आता खरंच कुणी ह्याच शब्दात बोललं की तुम्ही रिडींग बिट्वीन दी लाईन्स करुन तसा अर्थ लावलात हे परमेश्वर जाणे.. पुरुषांच्या विभागाविषयी अनाहितांचे विरोधी मत असण्याचे कारण नाही असा माझा समज आहे. तुम्ही सुद्धा ह्या मुद्द्यावर गैरसमज पसरवले नाहीत तर बरं राहील. तुम्ही तशी मागणी केलीत आणि त्यावर कुणी अधिकृत आक्षेप नोंदवला तर बोलता येईल. ख.फ वरच्या चेष्टेतल्या गप्पांना कृपया एका संपुर्ण गटाचे मत समजु नये. बाकी ह्या मुद्द्यावर शेवटचा प्रतिसाद, संपादक मंडळ अस्तित्वात नसताना हमखास वाद होतील अशा विषयांवर चर्चा टाळलेल्या बर्‍या. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 11:59 नवीन
ठिकै...जे खफवर अस्तात त्यांना येउदे प्रतिवाद करायला...माझा प्रतिसादसुध्धा तुम्च्यासाठी नव्ह्ताच.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ब
बॅटमॅन Wed, 12/02/2015 - 12:06 नवीन
साधी वाक्य तुम्हाला खवचट आणि अजुन काय काय वाटतात.
हेच इतरांनी म्हटलं की लगेच कंपू घेऊन तुटून पडतात लोक्स. बाकी अधिकृत, अनधिकृत वगैरे शब्द वापरलेले पाहून हहपुवा झाली. इतकं सीरियसलि घ्यायचं असतं का त्या कोनाड्याला? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
सायकलस्वार Wed, 12/02/2015 - 17:20 नवीन
हेच इतरांनी म्हटलं की लगेच कंपू घेऊन तुटून पडतात लोक्स.>>> बायकांचं ते नैरागस्य आणि पुरुषांचा तो खवचटपणा. मी एक वाक्य गंमतीत काय लिहिलं आणि ताईसमाज माझं मर्तिक काढायला निघाला. तेव्हा कुठे गेला होता राधे तुझा सैल अंबाडा! (काहीतरी चुकलं वाटतं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रमोद देर्देकर Wed, 12/02/2015 - 11:58 नवीन
हो बरोबर आहे टक्या आणि ते सुध्दा चारोळ्यांची बरसात करुन सांगत होत्या. तिकडे कोण तो सु.खो. की तो चं.गो. त्याला उचक्या लागल्या असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 12:03 नवीन
तर तर....चिरडले गेले आंदोलन, जेपी भूमिगत झालेला नंतर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
प
पिलीयन रायडर Wed, 12/02/2015 - 11:58 नवीन
मग जर घरात अनाहितांचा गाभारा असण्याला आम्ची ना नाही तर मग पुरुषांसाठी वेगळी गच्ची असण्याला अनाहितांकडूनच विरोध का होतो?
अनाहिता हे एका संपुर्ण गटाचे नाव आहे आणि अनाहितातर्फे असा आक्षेप कधीही घेण्यात आलेला नाही. इथल्या सर्व स्त्री सदस्या आधी मिपाकर आहेत आणि मग (त्यातला काहीच) अनाहिता. त्यामुळे कुणी एकीने मत दिले तर ते संपुर्ण अनाहिताचे मत होत नाही. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 12:01 नवीन
तुम्ची गल्ली चुक्ली....पॉलिटिक्स मध्ये नाव काढाल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रसाद१९७१ Wed, 12/02/2015 - 12:03 नवीन
पुरुषांसाठी वेगळी गच्ची असण्याला
वेगळी गच्ची वगैरे नको हो. स्त्रीया नसतील तर आयुष्याला काय अर्थ आहे हो, अगदी जालावरच्या आभासी सुद्धा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 12:04 नवीन
संन्यास नै घ्यायचाय ओ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ब
बॅटमॅन Wed, 12/02/2015 - 12:10 नवीन
ते सगळं ठीके पण विनोदबुद्धी आणि खेळकरपणा व मॅच्युरिटी यांना दडपून संसदीय शब्दांआड आपला पूर्वग्रह झाकणार्‍या कंपूबाजांपासून एखादा कोनाडा असावा वाटणे यात कै चूक वाटत नाय बा मला तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Wed, 12/02/2015 - 12:36 नवीन
विनोदबुद्धी आणि खेळकरपणा व मॅच्युरिटी यांना दडपून संसदीय शब्दांआड आपला पूर्वग्रह झाकणार्‍या कंपूबाजांपासून
ठ्ठो... एकाच वाक्यात काय स्फोटक मिश्रण भरले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
त
त्रिवेणी Wed, 12/02/2015 - 11:29 नवीन
पुरुषांच्या बाबतीत असे काही झाले असेल तर मला तरी खरच कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 11:32 नवीन
फारच सालस बुआ तुम्ही :) प्यारी यु २
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी
त
त्रिवेणी Wed, 12/02/2015 - 15:12 नवीन
नाही मी सालस् नाहीय.पण उगाच एकमेकना कमी लेखणाऱ्या चर्चा नकोत आणि खरच माहित नव्हते म्हणून लिहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 15:14 नवीन
मी वैयक्तीक कधीच लिहित नाही...तस्मात हकूना मटाटा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी
त
त्रिवेणी Wed, 12/02/2015 - 11:30 नवीन
पुरुषांच्या बाबतीत असे काही झाले असेल तर मला तरी खरच कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Wed, 12/02/2015 - 11:31 नवीन
पुरुषांच्या बाबतीत असे काही झाले असेल तर मला तरी खरच कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 12/02/2015 - 11:33 नवीन
स्त्रिया आणि तत्वज्ञान या दोन विकेटमध्ये बोलिंग चालू ठेवा. आपलं गल्ली क्रिकेट एकटप्पी कॅच आउट,पलिकडच्या कंपाउंडमध्ये सिक्सर मिळणार नाही हे नियम लावून दुसरीकडे खेळूया टकाटका.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 11:35 नवीन
खिक्क....TKM क्लब असे ल्हिआयचे ह्रैले कै :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
म
माहितगार Wed, 12/02/2015 - 12:00 नवीन
प्रगोंनी एक चांगला प्रतिसाद वर दिला पण त्यांच्याच तळटिपेने अंशतः अवांतर (विषयांतर नव्हे:)) झाले म्हणून त्यांच्या प्रतिसादाचा धागालेखास उल्लेखनीय भाग पुन्हा उधृत करत आहोत.
बाकी कोणत्याही अध्यात्मिक संस्थानच्या कमीटीवर किमान ३३% स्त्रीया असाव्यात हे आमचे वैयक्तिक मत आहे , बायकांचे इन जनरल मॅनेजमेन्ट आणि सस्टेनस्न प्लॅनिंग , बीजीनेस कंटीन्युटी मॅनेजमेंट पुरुषांपेक्षा जास्त चांगले असते असा आमचा अपला एक पुर्वग्रह आहे !
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 12:03 नवीन
+१११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
न
नाखु Wed, 12/02/2015 - 12:05 नवीन
बाडीस भवसागर तरत असलेला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/02/2015 - 13:11 नवीन
कोणत्याही अध्यात्मिक संस्थानच्या कमीटीवर किमान ३३% स्त्रीया असाव्यात हे आमचे वैयक्तिक मत आहे , बायकांचे इन जनरल मॅनेजमेन्ट आणि सस्टेनस्न प्लॅनिंग , बीजीनेस कंटीन्युटी मॅनेजमेंट पुरुषांपेक्षा जास्त चांगले असते
येस . टीम ए: ३३% अ‍ॅग्रेसीव्ह मार्केटींग आणि सेल्स अर्थात अध्यात्माचा , संप्रदायाचा प्रचार करणारी फळी टीम बी: ३३% प्रॉडक्ट डिलीव्हरी अर्थात संप्रदायाचे प्रोडक्ट अर्थात अध्यात्मिक ज्ञान , साहित्यप्रकाशन करणारी फळी टीम सी: ३३% जनरल मॅनेजमेन्ट आणि सस्टेनस्न प्लॅनिंग , बीजीनेस कंटीन्युटी मॅनेजमेंट अथात संप्रदाय कसा चालु राहिल ह्याची काळजी घेणारी फळी ! स्त्रीयांनी बहुतांश करुन टीम ए आणि टीम सी मधे जागा घ्यावी . आता उदाहरणार्थ पाहु : जर शनीमंदिराच्या कमीटीवर टीम सी मध्ये सस्टेनस्न प्लॅनिंग मध्ये कोणी स्त्री असती तर तिने नक्कीच हा इश्शु इतका मोठ्ठा होवु दिला नसता , कारण ह्या विषयाने संप्रदायाच्या अस्तित्वालाच धक्का बसु शकतो . दुसरे उदाहरण म्हणजे आपल्या रामदेव बाबांचे संस्थान : तुर्त्आस फक्त बाबा आणि त्यांचा एक शिष्य हे दोघेच तिन्ही टीम सांभाळत आहेत , पण ह्यामुळे बीजीनेस कंटीन्युटी मॅनेजमेंट च्या नावाने बोंब आहे , उद्या रामदेव बाबांच्या नंतर संस्थान कसे चालु रहाणार ? महाराष्ट्रातील स्वाध्याय संप्रदाय म्हणा किंव्वा वामनराव पैंचा संप्रदाय म्हणा , किंव्वा आमच्या आवडत्या ओशोचा संप्रदाय म्हणा मुख्य नेत्याच्या निधनानंतर जवळपास नामशेषच झालेले दिसतात ( असे आमचे वैयक्तिक मत आहे ) . हेच जर स्त्रीयांना कमीटीवर स्थान दिले असते तर त्यांनी नक्कीच काहीतरी सस्टेनन्स प्लॅनिंग केले असते ! आज गेली ६००-७०० वर्ष वारकरी संप्रदाय टिकुन आहे कारण त्यात बॅकएन्ड्ला टीम सी मधे नक्कीच स्त्रीयांना मोठ्ठे स्थान आहे ! डोक्यावर तुळशीचे रोप घेवुन पंढरीला जाणारी स्त्री , किंव्वा वेळप्रसंगी वारकर्‍यांना कांदा भाकरी थापुन देणारी स्त्री ही हातात टाळ म्रूदुंग घेवुन किर्तन करणार्‍या बुवां इतकीच संप्रदायाच्या टिकुन रहाण्याला आधारभुत आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ट
टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 15:05 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रमोद देर्देकर Wed, 12/02/2015 - 12:06 नवीन
आजपर्यंतचा माहितगारांचा पहिलाच द्विशतकी / की पंचशतकी धागा.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 12/02/2015 - 12:10 नवीन
त्यातल अर्धशतकं मिपा गाभारा व्हर्सेस गच्ची चर्चेत गेलंना पण म्हणुन पंचशतकीची आवश्यकता आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
अ
अजया Wed, 12/02/2015 - 12:30 नवीन
गच्ची गच्ची वाचून बटाट्याची चाळ आठवते आहे.टका बॅट्या गच्चीसह झालीच पाहिजे म्हणून मेंढे पाटलांकडे धरणे धरायला निघाले आहेत ;)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 12/02/2015 - 12:35 नवीन
आक्रंदून, स्फुंदून मिपाचे माजघर करू पाहणार्‍यांनी इतरांच्या धरणे धरण्याच्या गोष्टी कराव्या हे बाकी रोचक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
म
माहितगार Wed, 12/02/2015 - 12:39 नवीन
ब्याटमनराव हा धागा स्त्रीसमानते बाबत आहे हो ! पुरुष समानतेसाठी वेगळा धागा लेख आता लिवाच !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सस्नेह Wed, 12/02/2015 - 12:49 नवीन
पयले तुम अपना धागा का विषय नक्की करो बाबा ! स्त्री-समानता, पुरुष-समानता का स्त्री-परुष समानता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा