Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ?

म
माहितगार
Mon, 11/30/2015 - 12:03
🗣 322 प्रतिसाद
प्रतिसाद टंकण्यापुर्वी क्षणभर थांबा ! शीर्षकात प्रश्नचिन्हा (?) एवजी कृपया स्मायली वाचा (:)). शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे. हे सांगूनही तुम्ही या धागा लेखातील विवीध कडबोळे प्रश्न आणि कडबोळे विचारांचे अनाकलनीय काहुर वाचण्यास थांबत असल्यास, 'शनी शिंगणापूर येथील मंदीरात एका स्त्रीने जाऊन चक्क दर्शन घेतले, आणि गावातल्या लोकांनी (कदाचित त्यांच्या भावना दुखावल्यामुळे) बंदपाळल्याची बातमी', हि ह्या धागा लेखाची खरी सुरवात आहे. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न तसा दिसतो तेवढा सोपा नसावा, नाहीतर मंदिर प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर येऊन ८५व्या वर्षानंतर कदाचित या प्रश्नाची चर्चा करण्याचे प्रयोजन उरले नसते. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न चर्चेस घेतला तर पहिला आक्षेप हा येऊ शकेल की तुम्ही केवळ हिंदुधर्मीय प्रार्थनास्थळातील असमानतेचीच चर्चा का करता आणि इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्रीयांना दिल्या जाणार्‍या असमान वागणूकीची चर्चा का करत नाही ? हा प्रश्न येतो, या प्रश्नाचे काहुर येथवरच थांबत नाही, कारण: १) हा असमानतेचा प्रश्न त्यांना धार्मीक गुरु पुजारी (येथे त्या त्या धर्मातील शब्द कल्पावेत) इत्यादी संधी समानपणे का मिळत नाही हा प्रश्न एक्स्टेंड होतो; मग असे का होते कारण प्रेषित, विदुषी, तत्त्वज्ञ या जागी अपवादात्मक स्त्रीयांचे दाखले सोडल्यास त्यांचे अस्तीत्व विरळ असल्यामुळे असे होते का ? एखादा प्रेषित असो वा प्रार्थनास्थळात प्रवेश अथवा धर्मगुरुपद नाकारणारा पुरुषवर्ग शेवटी स्त्रीयांच्या पोटीच जन्माला येतो माता पत्नी कन्या बहीण या रोलचा प्रभाव इतरवेळी बर्‍याचदा दिसून येतो तर प्रार्थनास्थळातील समानतेचे तत्त्वज्ञान आपापल्या पातळीवर रेटण्यात या स्त्रीया कुठे कमी पडताहेत का ? मुलतः त्यांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ? :) आता हा प्रश्न म्हणजे जरासे व्हिक्टीम ब्लेमींग केल्यासारखे आहे जे व्यक्तीशः मलाही मान्य नाही (शिवाय मी स्वतःही खोडू शकेन असा यात तर्कदोष आहे) तरीही असा प्रश्न उपस्थीत करण्या मागे उद्देश केवळ चर्चेस तोंड फोडणे एवढाच आहे. २) शनि शिंगणापुरचा स्त्री प्रवेशाचा प्रश्न कदाचित कायद्याच्या मार्गाने सोडवता येईल पण इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्री प्रवेश आणि धर्मगुरुपदावरील समानतेचा प्रश्न विचारला तरी प्रश्न विचारणारे असहिष्णू ठरतील ? स्त्रीयांना समानता नाकारण्यासाठी आपापल्या धर्मग्रंथाची शब्दपुजा रचत उत्पातमुल्य दाखवणारे असहिष्णू ठरणार नाहीत. मग इथे राजकीय शांतता साधण्याच्या व्यावहारीक गरजांसाठी केलेली धर्मग्रंथांना पुढेकरत उत्पातमुल्य दाखवणार्‍यांशी विवीध धर्मियांची उत्पातमुल्यावर आधारीत एक तडजोड अस्तीत्वात आहे का? असे उत्पात मुल्य दर्शवणारे असोत अथवा लोकसभेत केवळ असहिष्णूतेवर चर्चा करणार पण तेही गोंधळ करून हा कायदेमंडळांमधे घातला जाणारा गोंधळ ही सुद्धा असहिष्णूता नाही का ? ३) किंवा बर्‍याचदा असा विचार समोर ठेवला जातो की समाजसुधारणा त्या त्या समाजातूनच पुढे येऊ द्याव्यात अंशतः हे खरेही आहे की शनि शिंगणापुर असो वा इतर धर्मीय प्रार्थनास्थळे समाजसुधारणेचे विचार त्या त्या समाजातून पुढे यावयास हवेत पण समाज हेच एक युनीट आहे का ? त्या गावापुरता शनि शिंगणापुरचाही एक समाज अस्तीत्वात नाही का आणि समाज सुधारणेची सुरवात त्याच गावातील व्यक्ती कडून होणे अधिक श्रेयस्कर असणार नाही का ? मग शनि शिंगणापूर गावातील समाजाची मते बदले पर्यंत उर्वरीत समाजाने थांबले पाहीजे का ? अंदमानात इतर जगातील मानवाचे संबंध नाकारणार्‍या अदिवासींचा अधिकार आपण स्विकारतोच ना मग शनि शिंगणापुर सारख्या विवीध गावातील जाती जमातीतील परंपरा आतून बदले पर्यंत थांबले पाहीजे का ? असे कुठ पर्यंत थांबणे सयुक्तीक ठरेल. रविंद्रनाथ टागोरांच्या शांती निकेतनापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर काही आदीवासी जमातीत अगदी अलिकडे पर्यंत विच हंटींगची जातपंचायतीकडून बलात्काराच्या आदेशाची उदाहरणे पुढे येतात शनि शिंगणापुर असो वा बंगाल मधील वस्ती वा इतर धर्मीय लोकशाहीत सर्वांचाच सहभाग आहे, प्रागतिक विचारांचे प्रतिनिधी अशा मागे पडलेल्या समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून प्रबोधनाचे मार्ग प्रशस्त करण्यात नेमके कुठे कमी पडतात ? ४) ज्या मिथककथांवर आधारीत अंधविश्वास अस्तीत्वात आहेत ती केवळ मिथके आहेत, आपापल्या संस्कृती जपताना काळानुरुप परिवर्तनांच्या आड ह्या मिथककथा येऊ नयेत यासाठी लागणारे प्रबोधन करण्यात आमचे विवीध महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे अभ्यासकमंडळी कमी पडत आहेत का ? आतापर्यंतच्या चर्चेचा रोख तुम्ही पाहीलात तर शीर्षक आणि लेखाचा उद्देश स्त्री विरोधी नाही आणि कोणत्याही विशीष्ट धर्म अथवा संस्कृतीस लक्ष्य करणेही या धागा लेखाचा उद्देश नाही, मी परिवर्तनांसाठी क्रांतीचा पक्षधर नाही पण परिवर्तनासाठी लागणार्‍या उत्क्रांतीसाठी प्रबोधनासाठी सदैव आग्रही असावे असे वाटते, हे वाचकांनी लक्षात घेतले असेलच. मी माझ्या या धागा लेखातील माझे सर्वच प्रश्न आणि विचारांचे काहुराचे निटसे विश्लेषण केले आहे असेही नाही. इतरांचे विचार समजून घेऊन माझ्या साशंकता कमी करण्यास साहाय्य व्हावे म्हणून हा धागा लेख लिहिला आहे. बाकी चुभूदेघे. चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी धन्यवाद
वर्गीकरण
स्त्री
तत्त्वज्ञान
धर्मसंस्था
राजकारण
समाजमन

प्रतिक्रिया द्या
74579 वाचन

💬 प्रतिसाद (322)
ब
बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 08:29 नवीन
कुणाला कशाचं नि प्यारेला टंचनिकेचं. चालूद्यात. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready
P
pacificready Tue, 12/01/2015 - 08:40 नवीन
आपणास मुद्दा समजलेला नाही. डांगे साहेबांचे मेगाबाइटी प्रतिसाद हा आनंदाचा विषय नाही का बरे वाटत तुजला? त्यासाठी लागणारं विचारांचं पककं अधिष्ठान, शब्दाची अचूक निवड आणि तत्पर इंटरनेट सेवा याचा अनोखा संगम आपल्याला पाहायला मिळत आहे. मान गये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 09:26 नवीन
स्त्रिया काही बोलत नाहीत म्हणून काढलेल्या धाग्यावरही स्त्रिया काही बोलत नाहीत, असे का?
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 12/01/2015 - 09:30 नवीन
मितान बोल्लीये ना वर.. शिवाय तुम्ही सगळे मान्यवर आहातच.. चालु द्या.. मस्त चाल्लीये चर्चा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
न
नीलमोहर Tue, 12/01/2015 - 09:53 नवीन
हो ना, शिवाय विद्वान मंड्ळींना मेगाबायटी चर्चा करण्यास एनर्जी मिळावी म्हणून त्यांची पोटा-पाण्याची सोय, स्वयंपाकपाणी, घरकाम, मुलांचे संगोपन, राहिलेल्या वेळेत ऑफिस इ. फुटकळ कामे करण्यात वेळ घालवतात हो या स्त्रिया.. त्यांची बुध्दी तेवढीच शेवटी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 10:11 नवीन
आपल्या प्रतिसादातून ते अधिक स्पष्ट झालं, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Tue, 12/01/2015 - 11:11 नवीन
डिस्ट्रक्ट केलं का मी, अजून पुष्कळ महत्वाचे प्रतिसाद राहिले असतील नाही .. ? सॉरी हं, प्लीज कॅरी ऑन हं. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 11:28 नवीन
आपण आपले कर्तव्य अचूक बजावत आहात. त्यामुळे तुम्हीही कॅरी ऑनच करा... (रच्याकने, मेगाबायटी प्रतिसाद आपल्या बाजूने आहेत की विरोधात आहेत हे समजून घेऊन त्यावर टिप्पणी करावी इतकी माफक अपेक्षा जगङ्व्याळ कामात बिझ्झी असलेल्यांकडून करणे अंमळ जास्त आहे, त्यामुळे तो प्रयत्न सोडून दिला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Tue, 12/01/2015 - 12:15 नवीन
आमच्या बाजूने किंवा विरोधात मेगाबायटी प्रतिसाद देण्यासाठी व्होटींग पोल आम्ही काढला नव्हताच मुळी. आमच्या बाजूने किंवा विरोधात कितीही मेगाबायटी प्रतिसाद आले तरी त्याने काय फरक पडणार आहे .. ? मुळात स्त्रियांना कमी लेखणे बंद झाल्याशिवाय समाजात सुधारणा होणे अवघड आहे हे कोणा कोणाला सांगणार आणि सांगून समजणार का हा मोठा प्रश्न आहे. असो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मितान Tue, 12/01/2015 - 12:32 नवीन
अगं तसं नाही नीमो मुळात आपल्याला तत्त्वज्ञान कळत नाही, त्यात एवढ्या विद्वानांच्या समोर काही बोलायचं म्हणजे.... जाऊ दे बाई, मालक येतील मजुरीवरून. भाकरी थापायला घेते नाहीतर जोडे पडतील ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
प
पिलीयन रायडर Tue, 12/01/2015 - 12:37 नवीन
मालक येतील मजुरीवरून. भाकरी थापायला घेते नाहीतर जोडे पडतील ;)
बेक्कार गं तू.. बेक्कार!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
अ
अजया Tue, 12/01/2015 - 13:12 नवीन
=))=))=)))))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
न
नीलमोहर Tue, 12/01/2015 - 12:59 नवीन
मार्मिक प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
म
माहितगार Tue, 12/01/2015 - 13:05 नवीन
=)) (ह.घ्या.) भाकरीला पीठ कंच वापरता जात्यावरच ? गीरणीचं का ब्र्यांडेड ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
म
मितान Tue, 12/01/2015 - 13:26 नवीन
काहीतर्री क्काय ! सासूने ऐकलं तर खेटराने बडवेल ! रोज ताजं पीठ ! पहाटे जात्यावर दळते :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ग
गवि Tue, 12/01/2015 - 14:01 नवीन
जाते ओढताना ओव्या गाऊन संस्कृती जपता की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
अ
अभ्या.. Tue, 12/01/2015 - 14:09 नवीन
ओव्या गाऊन??? ह्या गाऊनवर ओव्या जिर्‍याचे डिझाइन असते का? बारीक बारीक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ब
बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 15:21 नवीन
दू दू दू अभ्या =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 15:25 नवीन
मागचे ऑर्डरचे टी-शर्ट झाले नैत अजून अन् गाऊन डीझाइनचं प्रॉडक्शन सुरू करताय काय...? नै लै बारिक बारिक चवकशी चालू आहे म्हणून विचारलं ब्वॉ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
P
pacificready Tue, 12/01/2015 - 14:22 नवीन
आपण पीठ दळता हे वाचून भरुन आलं, ड्वाले पाणावले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
प
पगला गजोधर Tue, 12/01/2015 - 09:31 नवीन
या शनिवारी, माहितीगार यांचा, तेलाची वाटी आणि वडाच्या पानांचा हार घालून सत्कार करण्यात येत आहे हो.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 12/01/2015 - 13:07 नवीन
:) धन्यवाद ! जो जे वांच्चील तो ते लाहो , तथास्तु !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Tue, 12/01/2015 - 14:44 नवीन
150 प्रतिसादानिम्मित्त आपला शनिमाहात्म्यची 7.5 प्रती देवून सत्कार करण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
पगला गजोधर Wed, 12/02/2015 - 09:38 नवीन
+
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Wed, 12/02/2015 - 09:38 नवीन
Image removed. २०० निम्मित धागालेखकास 'शनि महिमा ची सी डी', व शिर्डी ते शिंगणापूर जीपडी चे भाडे म्हणून रोख ५१ रु., व छायाचित्रातील शनिदेवा बरोबर सेल्फी ची संधी देवून, सत्कार या ठिकाणी कलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
म
माहितगार Wed, 12/02/2015 - 10:11 नवीन
शनिदेवास आमचा प्रणाम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर गुरुवार, 12/03/2015 - 09:51 नवीन
आपणास प्रसिद्ध देवस्थानातील बसाल्ट जातीच्या दगडाचा छोटा तुकडा (स्नानाच्या वेळी अंग घासतात तो), शेन्दुर न फासता व टोपी टॉवेल देवून सत्कार करण्यात येत आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
त
तुडतुडी Tue, 12/01/2015 - 09:39 नवीन
शनि हि उग्र देवता आहे. शनीला रजस्वला स्त्रीच काय पण स्त्रीची सावलीही चालत नाही हे कुठल्या धर्मग्रंथात लिहिलं आहे हे कोणी सांगेल का ? . स्त्री म्हणू तिचा दुस्वास करायचा ह्या गालीछ गोष्टी सामान्य माणसांकडून घडतात. देवाकडून नव्हे . असं असतं तर देवाने स्त्री निर्माणच केली नसती . शनिमहाराज हि कर्माची देवता आहे . आणि ती ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ देत असते . स्त्री आहे कि पुरुष हे बघून नव्हे . समस्त स्त्रिया शनि महाराजांना आपल्या मात्या पित्याच्या स्वरुपात बघत असतील तर लेकराला आईजवळ जाण्यापासून रोखणारे तुम्ही कोण ? केवळ ४०० वर्षांची परंपरा आहे म्हणून ती पुढे पाळलीच गेली पाहिजे असं काही नाही . ह्या परंपरा पुरुषांनी स्वताच्या स्वार्थासाठी निर्माण केल्या आहेत . त्या मुलीने तेल वाहिल्याने काही फरक पडला का ? आभाळ कोसळलं का ? तिलाही काही फरक पडला नाही कि शानिलाही नाही . बाकीच्याच लोकांची च्याव च्याव चाललीये . स्त्रियांना आणि समाजातल्या काही लोकांना दुय्यम स्थान देण्यासाठी उच्चवर्णीयांनी ह्या वांझोट्या प्रथा निर्माण केल्या आहेत .त्या बंद झाल्याच पाहिजेत . महाराष्ट्रातल्या सर्व स्त्रियांनी मिळून शनीच्या चौथर्यावर जावून अभिषेक करावा . बघू प्रलय बिलय येतोय का . महाराष्ट्राबाहेर स्त्रिया सर्रास मूर्तीला स्पर्श करून शनीची पूजा करतात . आणि मुख्य म्हणजे शनिमंदिर हि आपली personal property असल्यासारखं शनिशिन्ग्नापुरचे लोक बोलत आहेत . देवीच्या गाभार्यात पुरुष पुजारी असतात . परपुरुशांनी देवीला स्नान घातलेलं, तिचे कपडे बदललेले , तिचा साजश्रुंगार केलेला चालतो का ? खरं तर हि प्रथा बंद करून सर्व देवी मंदिरांमध्ये स्त्री पुजारी ठेवायला हव्यात . गोकर्ण महाबळेश्वरलाही ही पद्धत आहे. पण सरसकट प्रवेशबंदी नाहीये. ऑ. गोकर्ण महाबळेश्वरला गेल्या वर्षीच जावून आलो आम्ही . मी आणि माझ्या बहिणीने अगदी शिवपिंडीला स्पर्श करून दर्शन घेतलंय. तिथे अशी काही प्रथा नाहीये . रजस्वला असलेली महिला कधीही मंदिरात तर जात नाहीच पण घरात देव्हार्याजवळ सुधा जात नाहीत . तेवढी अक्कल असते स्त्रियांना . ४ दिवस नियम पाळण वेगळं आणि आजन्म केवळ स्त्री आहे म्हणून चुकीचे नियम पाळण वेगळं.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Tue, 12/01/2015 - 09:47 नवीन
शनि हि उग्र देवता आहे. शनीला रजस्वला स्त्रीच काय पण स्त्रीची सावलीही चालत नाही हे कुठल्या धर्मग्रंथात लिहिलं आहे हे कोणी सांगेल का ? .
यग्क्झाटली… दुधाने शनीचे शुद्धीकरण करणारे, मंदिर विश्वस्त आणि गावकरीच, याविषयी माहिती देवू शकतील.
४०० वर्षांची परंपरा आहे म्हणून ती पुढे पाळलीच गेली पाहिजे असं काही नाही .
करेक्ट पण
रजस्वला असलेली महिला कधीही मंदिरात तर जात नाहीच पण घरात देव्हार्याजवळ सुधा जात नाहीत .
हे कुठल्या धर्मग्रंथात लिहिलं आहे हे तुम्ही सांगाल का ? शिवाय जरी तुम्ही सांगू शकलात, तरी तुम्हीच वर म्हटल्याप्रमाणे 'xxx वर्षांची परंपरा आहे म्हणून ती पुढे पाळलीच गेली पाहिजे असं काही नाही .'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
त
तुडतुडी Tue, 12/01/2015 - 09:50 नवीन
नुकतीच दक्षिण भारताची सहल करू आलो . रामेश्वर आणि कन्याकुमारीला मंदिरात जायला , देवाचं दर्शन घ्यायला तिकीट आहे ५० रुपये . अरे हरामखोरांनो देव काय तुमच्या बापाची मालमत्ता आहे का ? देव सगळ्यांचा आहे . बाकीच्या पूजा बिज्या करायच्या असतील तर तिकीट लावणं समजू शकतं. पण नुसता देवाच्या मूर्तीकडे बघायला पैसे ? मग गरिबांनी दर्शना घ्यायचाच नाही का ?
हनुमान वीर्यतेजाने संपृक्त आहे. त्याच्या नुसत्या उच्छवासाने वा अवतीभवतीच्या वातावरणाने स्त्रिया गर्भवती राहू शकतात.
होय बरोबर आहे . पण ह्याचा अर्थ हनुमंत उठसुठ प्रत्येक स्त्रीला गर्भवती करतात असा अर्थ होतो कि काय ? साधा कॉम्मन सेन्स आहे . तसा असतं तर उच्छवासाने स्त्रीला गर्भवती करण्याची शक्ती असतानाही मैनावतीला त्यांच्यापासून पुत्रापाप्तीसाठी एवढी घोर तपस्चर्या करावी लागली नसती . अर्धवट लोकं कशातून काय अर्थ काढतील काही सांगता येत नाही .
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 09:57 नवीन
नोबडी वॉन्ट्स टू टेक अ चान्स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
प
पगला गजोधर Tue, 12/01/2015 - 10:09 नवीन
मारुतीराया शिक्षा देईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कंजूस Wed, 12/02/2015 - 11:26 नवीन
कन्याकुमारीला तिकिट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
य
यशोधरा Tue, 12/01/2015 - 09:50 नवीन
ते सर्वांभूती परमेश्वर वगैरेंच काय झालं कोणास ठाऊक!
  • Log in or register to post comments
P
pacificready Tue, 12/01/2015 - 10:20 नवीन
आधी भूत व्हा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 12/01/2015 - 10:34 नवीन
आहेत तेवढी पुरेत की! थैमान घालतातच आहेत की. बास नै का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready
P
pacificready Tue, 12/01/2015 - 11:13 नवीन
ते खरंय मात्र हडळींची लक्षणीय वाढ चिंतनीय आहे. चर्चा नेहमीप्रमाणे 'चकवा' लागून भरकटली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 12/01/2015 - 11:17 नवीन
अरेरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready
व
वेल्लाभट Tue, 12/01/2015 - 11:59 नवीन
माझं स्पष्ट मत आहे. भक्ती ही कंडिशनल असूच शकत नाही आणि तशी असेल तर ती भक्ती भक्ती नव्हे आणि तो देव देव नव्हे. दॅट्स ऑल.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Tue, 12/01/2015 - 13:12 नवीन
अरे काय हे !! 140 प्रतिसाद एकाच पानावर,,कायतरी करा !!
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Tue, 12/01/2015 - 13:18 नवीन
स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड का जातो ? कारण त्यांच्या तत्त्वात ज्ञान बसत नाही
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 12/01/2015 - 15:49 नवीन
लोजीक म्हंतेत त्येला (डब्बल काडी) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
म
माहितगार Tue, 12/01/2015 - 15:48 नवीन
१५०+ प्रतिसादांसाठी धन्यवाद. धागा लेखातील बहुतांश मुद्दे अद्याप चर्चेत येण्याचे बाकी वाटते आहे. शिवाय काही जणांनी द्वैत मताचा पुरस्कारही केलेला दिसतो आहे, अद्वैतींच बहुमत असूनही द्वैत सिद्धांताचा अद्याप फारसा प्रतिवाद दिसत नाहीए. गापैंच्या या प्रतिसादातील मुद्दा क्रमांक २ बद्द्ल मंडळींच काय म्हणण आहे, कुणाला काही वेगळी बाजू मांडावयाची आहे का ?
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर Tue, 12/01/2015 - 16:00 नवीन
गापैंच्या या प्रतिसादातील मुद्दा क्रमांक २ बद्द्ल मंडळींच काय म्हणण आहे, कुणाला काही वेगळी बाजू मांडावयाची आहे का ?
म्हणजे मुळात निसर्गानेच शारिरीक भेदभाव केला? असे म्हणावयाचे .
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 12/01/2015 - 17:31 नवीन
तुमच्यासारख्या ( =समोरच्याला ) तत्वज्ञान समजणार नाही याची खात्री असल्याने स्त्रिया बय्राचदा याविषयी बोलत नसतील आणि यांना हा विषय अवघड आहे ही समोरच्या व्यक्तीची समजूत होते. आता तत्वज्ञानची व्याख्या =बिनकामाची/नसती चर्चा करत बसणे.जे स्त्रियांना करायचे नसते.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 12/01/2015 - 17:34 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
म
माहितगार Tue, 12/01/2015 - 18:17 नवीन
:) बाकी ठिक. पण हि चर्चा स्त्रीयांसाठी बिन-उपयोगाची आहे या बद्दल खात्री नक्की आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ब
बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 20:13 नवीन
आता तत्वज्ञानची व्याख्या =बिनकामाची/नसती चर्चा करत बसणे.जे स्त्रियांना करायचे नसते.
आयला, म्हणजे ती उणीदुणी काढत बसणे हे कामाचे असते की काय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ट
टवाळ कार्टा Tue, 12/01/2015 - 20:51 नवीन
त्येला बैकांचे जन्रल णाआलेज णालेज म्हंतेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अजया Wed, 12/02/2015 - 03:49 नवीन
हो मग! पण हल्ली स्त्रीपुरूष समानतेच्या युगात पुरुषही हे काम करण्यात कुठे मागे दिसत नाहीत हे वारंवार सर्व धाग्यांवर मिपावरदेखील दिसतेच आहे ;) बाकी बायका अतिशय प्रॅक्टिकल असल्याने त्या संस्थळावर बाष्कळ बडबड करुन स्वतःच्या तत्त्वज्ञानाचे प्रदर्शन मांडत नसाव्यात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा