Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पॉर्नची गरज आहे का?

स
सुबोध खरे
Mon, 01/25/2016 - 09:55
🗣 292 प्रतिसाद
पॉर्नची गरज आहे का? या धाग्याचे मुळ अर्थात अदिती ताइंच्या धाग्यात आहे. पॉर्न म्हणजे अश्लील साहित्य असे मराठी शब्दकोषात भाषांतर आहे. यात साहित्य म्हणजेच पुस्तके, चित्रे , चित्रफिती आणी चित्रपट असे सर्व साहित्य अध्याहृत आहे. संस्कृती रक्षक लोकांच्या दृष्टीने "हा" अब्रम्हण्यम असा शब्द आहे. याची गरजच काय पासून यावर संपूर्ण बंदी असावी असे मानणारे लोक आहेत आणी पॉर्न हे सर्व वय, भाषा आणी धर्मियांना सदा सर्वकाळ खुले आणी फुकट असावे असे मानणारा गट हि आहे. काहींच्या मते हे अब्रम्हण्यम नसले तरीही निरर्थक आहे आणी याची गरज नाही. सत्य कदाचित या सर्वांच्या मध्ये आहे. बासनात गुंडाळून माळ्यावर ठेवण्याच्या विषयाचा वैद्यकीय दृष्टीने आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न. अश्लील साहित्याची गरज पडते(च) का? आणि पडत असल्यास का पडते? पहिली गोष्ट म्हणजे सेक्स हा विषय मध्य युगापासून गुपचूप अंधारात करण्याचा (किंवा उरकण्याचा) झाला आहे. यामुळे पौगंडावस्थेत आपल्या लैंगिकतेचा खरा शोध तरुण किंवा तरुणींना कसा आणि कुठे घ्यायचा हे समजेनासे होते. याची सुरुवात चावट विनोदातून होते. त्यातून बायकांची परिस्थिती "कडी लावा आतली आणि मी नाही त्यातली" अशी असते. करावेसे/ पाहावेसे/ ऐकावेसे तर वाटते पण चार चौघात बोलायला लाज वाटते आणि ते पाहताना पकडले गेलो तर आपल्या अब्रूचे धिंडवडे निघतील अशी भीती. थोड्या फार प्रमाणात हीच स्थिती पुरुषांची असते. अश्लील साहित्य म्हणजे काय? हे काही त्रिकालाबाधित सत्य नव्हे. म्हणजे जी गोष्ट आज बोलली जाऊ शकते तीच एके काळी अशक्य होती. म्हणजे एके काळी एखाद्या मुलीचा हात सुद्धा हातात घेणे "अब्रम्हण्यम' आणि अश्लील होते. त्यानंतर जोडप्याने मिठी मारणे किंवा चुंबन घेणे हे अब्रम्हण्यम होते. तेंव्हा कमी कपडे घालणे हे फक्त खलनायिका किंवा नायकीण करत असे. आता सिनेमात नायिका जे तोकडे कपडे घालतात ते काही काळापूर्वी सिनेमात वेश्यासुद्धा घालणे अशक्य होते. थोडक्यात काल जे अश्लील होते ते आज राजरोस/ समाजमान्य असू शकते. मग या अश्लील साहित्याची गरज आताच जास्त का वाटते किंवा आताच जास्त का दिसू शकते? (हा संदर्भ मुख्यत्वेकरून भारताबद्दल आहे.) काही दशकांपूर्वी मुलगे आणि मुलींची वयात होण्यापूर्वीच आणि स्त्रीपुरुष संबंध काय हे समजण्यापूर्वीच लग्ने होत. त्यामुळे या "विषया"विषयी नाविन्य राहत नसे. शिवाय तेवढे साहित्य सहजपणे उपलब्ध नव्हते आणि असले तरी ते समाजमान्य नव्हते. समाजात दांभिकपणा पण बराच होता.आज नाही असे म्हणवत नाही. अश्लील साहित्य सहज उपलब्ध नव्हते पण बहु भार्या अंगवस्त्र, देवदासी सारख्या प्रथा असल्याने श्रीमंत लोकांना हे सर्व उपलब्ध होते. मात्र स्त्रियांची कुचंबणाच होती. आता बदलत्या काळानुसार लग्ने उशिरा होत आहेत. मुलगे कमवायला लागेपर्यंत आणि मुली वयात येउन काही वर्षे जाईपर्यंत लग्न होत नाही. परंतु आजही विवाहपूर्व संबंध हे भारतीय समाजाला अमान्य आहेत. विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण तर जबरदस्त असते. या लैंगिकतेला वाट देण्याचे काम अश्लील साहित्य करते.पण एक तर हि गोष्ट चोरून करावी लागते किंवा समाजाच्या रोषाला बळी पडावे लागते. या साहित्याचा अविवाहित स्त्री किंवा पुरुषांना आपल्या भावना मोकळ्या करण्याच्या दृष्टीने याचा फायदा होऊ शकतो. पॉर्न आणि फँटसीज निरर्थक आहेत असे ठाकूर साहेब त्या धाग्यात म्हणतात पण त्यानी लिहिले आहे ती म्हणजे उ. झाकीर हुसेन आणि पं. शिवकुमार शर्मा यांची मैफिल आहे. दोघेही दिग्गज आणि समसमा असतात. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र अर्धवटराव आणि आवडाबाई यांची मैफिल असते. दोघांच्या तारा जुळून येण्यास फार कष्ट लागतात. लग्न झाल्यावर चार गुलाबी दिवस संपले कि व्यवहार सुरु होतो. अर्धवट रावांना आवडाबाईचे आणि आवडाबाईना रावांचे "गुण" दिसायला लागतात. मग घरातील कामातून वेळ काढून प्रणय फुलवायचा तर दोघांच्या तर एकत्र जुळल्या पाहिजेत. अभियांत्रिकी भाषेत सांगायचे झाले तर पुरुष पेट्रोल इंजिन सारखे असतात चावी दिली कि चालू. तर स्त्रिया म्हणजे टर्बो चार्जड डीझेल इंजीनासारख्या असतात. पहिल्यांदा ग्लो प्लग लावून इंजिन गरम करायला लागते आणि मग इंजिन सुरु झाले तरीही टर्बो चार्जर १८०० आर पी एम येईपर्यंत चालू होत नाही. पण एकदा टर्बो चार्जर चालू झाला कि मग इंजिन पूर्ण ताकदीने वेग घेते.म्हणजेच स्त्रियांचा आणि पुरुषांचा उद्दीपित होण्याचा कालावधी वेगवेगळा असतो. वंध्यत्व या विषयात काम करीत असल्याने बर्याच वेळेस या प्रश्नाशी संबंध येतच असतो. मुल होण्यासाठी विशिष्ट वेळेत(२४ तासात) संबंध ठेवणे आवश्यक असते. तेंव्हा रुग्ण पुरुष बर्याच वेळेस अशी तक्रार करताना आढळतात कि डॉक्टर मला तिच्याबद्दल आकर्षण वाटत नाही.( लिंग उत्थान होत नाही ERECTILE DYSFUNCTION--ED). काही लोकांनी हे पण सांगितले कि "सर बायकोच्या जवळ गेलो तर ती थंड गोळ्यासारखी पडलेली असते. तिच्या घामट गार अंगाला हात पण लावावासा वाटत नाही". हे जरी आपल्याला विचित्र वाटत असेल तरीही जर तो माणूस तुम्हाला त्याच्या भावना सांगत असेल तर ते सत्य मानायलाच लागते.अशा माणसाना मग तुम्ही पॉर्न पहा आणि लगेच संबंध ठेवा असे सुचित करावे लागते. ज्यावेळेस माणूस शुक्राणू दान करतो किंवा शुक्राणू तपासणी केली जाते अशा लैब मध्ये बंद खोलीत कुणी पाहत आहे अशा परिस्थितीत पुरुषांना लिंग उत्थान होणे कठीण जाते. अशा ठिकाणी मग अश्लील साहित्य प्रकार उपलब्ध करून द्यावे लागतात. नवरा बायको मध्ये बर्यापैकी समन्वय असेल तरीही विशाल किंवा विराट महिला असेल तर पुरुषाला आकर्षण कमी होते हि वस्तुस्थिती आहे. बर्याचशा या स्थूल महिला PCOS या आजाराच्या बळी असतात ज्यामुळे त्यांना मुल होत नसते. त्यांना वजन कमी करायला सांगूनहि बर्याच वेळेस ते कमी होत नाही. मग तो नवरा काय करणार? त्याला तर सांगितल्या दिवशी संबंध ठेवणे आवश्यक असते. आणी हे फार यांत्रिक होत जाते. ( एखाद्या कवीस सांगणे कि आत्ता तू उगवत्या सूर्यावर कविता कर). बायका सुद्धा आपल्या गैर/ विचित्र समजुती आणी पूर्वग्रह घेऊन आलेल्या असतात. बायकांनी संबंधात सुख शोधणे चूक आहे किंवा जे काय करायचे ते पुरुषांनीच करायचे असते आणी बायकांनी थंड पडून राहायचे. अशी जर स्त्री एखाद्याला बायको मिळाली( दुर्दैवाने याचे प्रमाण खूप जास्त आहे)तर त्या माणसाने कुठे जायचे? स्त्री थंड पडून असेल तर पुरुष तणावाखाली असतो आणि मग त्यातून शीघ्र पतन( premature ejaculation) होते. अशा स्त्रिया नंतर तक्रार करताना आढळतात कि यांना माझ्यात रसच नाही.किंवा अशा बायका नवर्याला टोचून बोलताना दिसतात कि तुम्ही मर्दच नाही. अशा माणसांनी काय करायचे? बायकोच्या जवळ गेले तर थंड गोळ्याशी शृंगार करणे कठीण. शिवाय मानसिक तणावामुळे शीघ्रपतन होईल हि भीती. अशा दुहेरी तणावात असलेला माणूस जेंव्हा पॉर्न पाहतो तेंव्हा त्याला आपल्याला (ERECTILE DYSFUNCTION--ED) नाही हे तर कळून येते. अर्थात याला PARTNER SPECIFIC ERECTILE DYSFUNCTION म्हणतात. बर्याच वेळेस बरेच दिवस संबंध न ठेवण्याने नवरा बायकोतील संबंध ताणले जातात. त्यात बायको संशयी असली तर तिला सारखे वाटत असते कि पुरुष असून संबंध ठेवायला नाकारतो म्हणजे दुसरीकडे कुठे तरी जाऊन "हलका" होऊन येत असेल. असे होऊ नये म्हणून मग माणसे पॉर्न बघून उत्तेजित होऊन येतात. त्यामुळे संबंध ठेवणे सोपे जाते. उलट एखाद्याची बायको जास्त सुंदर असेल किंवा वय झाले तरी आपला "फॉर्म" टिकवून असेल तर नवर्याला स्वतःला कठीण जात असेल तरी बायको "हातातून जाऊ नये "म्हणून तिला "सुखात" ठेवणे आवश्यक असते. नवरा आणी बायको यांच्या वयात फार जास्त अंतर असेल किंवा नवर्याला मधुमेह असेल तर त्यामुळेहि ERECTILE DYSFUNCTION होते अशा वेळेस पॉर्न पाहून उत्तेजित होता येते. एक उदाहरण म्हणून-- मी मुंबईत मोठ्या रुग्णालयात पुरुष वंध्यत्व वर काम करीत असताना झैरे या आफ्रिकी देशातील एका टोळीचा ६० वर्षाचा प्रमुख ERECTILE DYSFUNCTION च्या इलाजासाठी आला होता. मी त्याला विचारले कि आता ६० वयाला तुम्हाला काय हवे आहे त्यावर त्याचे म्हणणे होते कि माझी चौथी बायको १८ वर्षांची आहे मी जर तिला "सुखात" ठेवू शकलो नाही तर ती मला सोडून जाईल. हे अर्थात टोकाचे उदाहरण आहे. परंतु फार मोठ्या प्रमाणावर पुरुष लिंग उत्थान होत नाही हि तक्रार घेऊन येतात.यात हे कारण मानसिक आहे कि शारीरिक आहे हे जाणण्यासाठी त्यांना एक साधा प्रश्न विचारला जातो कि अश्लील साहित्य पाहिल्यावर लिंग उत्थान होते का? हे जर होत असेल तर तो प्रश्न बहुतांशी मानसिक असतो. ठाकूर साहेब म्हणतात "पॉर्न पाहात असाल तर त्याची मजा घ्या आणि विसरुन जा. त्यातून फँटसीज वगैरे काही निर्माण करु नका" असे नाही कारण सर्वांच्या बायका काही सनी लिओन नसतात.बायकोची फिगर ३४- २६-३६ हवी असते. पण असते मात्र ३२ -३६- ४० मग आपल्या बायको बरोबर शृंगार करताना लोक कल्पना विलासाचा आधार घेतात. आपण कोणत्याही नटीशी शृंगार करीत आहोत हि कल्पना करून त्यांना आणी त्यांची बायकोला जर आनंद मिळत असेल तर त्यात गैर काय? अर्थात याला पोर्नच पाहिजे असे नाही. दोन पेग दारू प्यायली कि लोकांचे विमान आकाशात तरंगायला लागते आणी कल्पनाविलास होऊ शकतो. प्रत्यक्षात स्त्रिया कल्पना विलासात पुरुषांपेक्षा जास्त रमतात. त्यामुळे त्यांना पॉर्नची संबंध ठेवताना "आवश्यकता" भासत नाही. कारण एक तर प्रत्यक्ष संबंधात त्यांचा सहभाग हा सक्रीय नव्हे तर निष्क्रिय असला तरी चालू शकतो. शिवाय पूर्वग्रह आणी गैर समजुतींमुळे पॉर्न हे स्त्रीने पहायचेच नाही अशा पगड्याखाली असत्तात. परंतु प्रत्यक्ष शृंगार करताना डोळे मिटून आपण ह्रितिक रोषन किंवा जॉन अब्राहम बरोबर शृंगार करीत आहोत या कल्पना विलासात रमू शकतात. पण त्यांना विचारले तर ९० % स्त्रिया GUILT ( दोषित्व)मुळे आम्ही कल्पना विलासात रमतो हे अमान्य करतील. १००% पुरुष पॉर्न बघतात आणी बहुसंख्य( कदाचित १००%)कल्पनाविलासात( FANTASY) रमतात तर बहुसंख्य( कदाचित १००% स्त्रिया कल्पनाविलासात रमतात हि वस्तुस्थिती आहे. परंतु पॉर्नचे DECRIMINALISATION करणे आवश्यक आहे असे मात्र जरूर वाटते. हा विषय फार गहन आहे आणी बरेच मुद्दे यात राहून गेले असतील. पण जशी चर्चा पुढे जाईल तेंव्हा आठवेल तसे मी त्यात भर घालेन.

प्रतिक्रिया द्या
119048 वाचन

💬 प्रतिसाद (292)
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 01/25/2016 - 19:56 नवीन
साहेब, आपण बहुतेक सर्वजण, बहुतेक सर्व त्याच गोष्टी, करतो... पण प्रत्येकाची त्या गोष्टी समजण्याची आणि अनुभवण्याची तीव्रता वेगवेगळी असते. तुमची आकलन व भावनिक तीव्रता सर्वसामान्य माणसाच्या तीव्रतेपेक्षा खूपच अत्युच्य स्तरावर आहे असे तुमच्या लेखनातून तरी स्पष्ट दिसते. त्यात वाईट काहीच नाही, किंबहुना त्यामुळे तुम्हाला सर्वसामान्य माणसांना न कळणार्‍या अनेक आनंदांची अनुभूती येते असे तुमच्या लेखनातून सतत जाणवते. (केवळ मिपाचा एक जुना सदस्यच तुमच्या तीव्रतेच्या जवळपास येत होता.) याच तीव्र वेगळेपणाने (आउटलायर क्वालिटी) तर सर्व काही फरक पडतो. तुमचे विचार व अनुभव तुमच्यासाठी १००% खात्रीचे असले तरी ते इतरांना सहजतेने पटत नाहीत याचे हेच कारण आहे. दोष तुमचा नाही, दोष मानवातील विविधतेचा व त्यातल्या तीव्र वेगळेपणाचा आहे. असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Tue, 01/26/2016 - 02:24 नवीन
तुमची आकलन व भावनिक तीव्रता सर्वसामान्य माणसाच्या तीव्रतेपेक्षा खूपच अत्युच्य स्तरावर आहे असे तुमच्या लेखनातून तरी स्पष्ट दिसते. त्यात वाईट काहीच नाही, किंबहुना त्यामुळे तुम्हाला सर्वसामान्य माणसांना न कळणार्‍या अनेक आनंदांची अनुभूती येते असे तुमच्या लेखनातून सतत जाणवते. स्वतःच्या पत्नीबरोबर दळण आणायला जाणं, भाजी निवडणं, तिच्यासाठी साडी, ड्रेस किंवा जिन्स आणि टॉप खरेदी करणं, वेळ आली तर तिच्याशी तोल सोडून भांडणं आणि मग निर्माण झालेल्या दुराव्यावर, साधंसं कारण काढून, पुन्हा जवळीक साधणं.....या गोष्टींसाठी कुठे आकलन किंवा भावनेची तीव्रता लागते? जस्ट अ‍ॅन अंडरस्टँडींग, दॅट शी इज योर्स. ती आपली आहे इतकी साधी आपुलकी असली की झालं. आणि जाणीव ही परस्पर-संवादी आहे, तुम्ही तिला आपली मानली की ती तुम्हाला प्रतिसाद देतेच. लोक दगडाला देव मानतात, सकाळी उठून, शुचिर्भूत होऊन, त्याची भक्तीभावानं पूजा करु, त्यासाठी उपास-तापास काय, कमालीची पायपीट असणार्‍या दुर्गम तिर्थयात्रा काय, निर्बुद्ध नवस बोलून त्याची फेड काय, तासंतास रांगेत उभं राहून दानाची खैरात काय....काय वाट्टेल ते करतात. आणि आपल्या स्वतःच्या पत्नीला आपली मानणं तुम्हाला असामान्य वाटतं? एक साधीशी गोष्ट जी दोघांचं संपूर्ण जीवन बदलते, तिला तुम्ही `आउटलायर क्वालिटी' म्हणता ? आपल्या पत्नीवर प्रेम करणं ही मला तरी, आकलन आणि अनुभुतीची अत्यंत प्राथमिक पातळी वाटते. आणि सुबोधजींच्या सुद्धा या वाक्यांचं आश्चर्य वाटतं : बाकी आपली बरीच वाक्ये हि आदर्शवादी आहेत. सगळ्यांची लग्ने अनुरूप व्यक्तीशीच होत नाहीत. तेंव्हा आहे त्या जोडीदाराबरोबर संसार करणे आवश्यक असते. आपले सर्व विचार जुळत नाहीत पण म्हणून कुणी काडीमोड घेत नाही. तेंव्हा दोन व्यक्तींमध्ये एकरूपता झाली तर हा "तर"च महत्त्वाचा ठरतो. कमी पगाराच्या माणसाला आणि कमी सुंदर दिसणाऱ्या मुलीला बर्याच तडजोडी कराव्या लागतात बरेच वेळेस आईबाप ठरवतील त्या जोडीदाराबरोबरच संसार करावा लागतो अशा परिस्थितीत आपण म्हणता तसे सर्वाना एकरूप होणे सोपे नाही / शक्य नाही. नि हि परिस्थिती बर्याच वेळेस असते अपवादात्मक स्थितीत नाही जी तुमच्या बरोबर आज आणि आत्ता आहे ती तुम्हाला अनुरुप वाटत नसेल तर कोणतीही स्त्री कधीही अनुरुप वाटू शकणार नाही. कारण तुम्ही आज शोधलेली अनुरुप, कालपरत्वे तुम्हाला विजोड वाटायला लागणार. अशी `अनुरुप' मिळत असती तर हृतिक रोशन, आमीर खान, सैफ अली खान....आणि कोण कोण, असल्या देखण्या आणि कमालीच्या ऐश्वर्यात जगणार्‍यांना डिवोर्स कशाला घ्यावे लागले असते? सुबोधजी, अनुरुप पत्नी कुणालाही आणि कधीही मिळत नाही. तुमच्या पाहाण्यात असं कुणी जोडपं असेल तर त्यांनी फक्त एकमेकांना अ‍ॅक्सेप्ट केलंय इतकाच त्याचा अर्थ आहे. दोन भिन्न व्यक्ती चोविस तास एकत्र राहाणार म्हटल्यावर प्रत्येक मतभेद उफाळून येणारच. तस्मात, प्रश्न अनुरुपतेचा नाही, प्रेमाचा आहे. एकदा तुम्ही परस्परांना अत्यंत प्रामाणिकपणे आपलं मानलं की अनुरुपता आपसूक येते. मग तुमची पत्नीच तुमची आई, मुलगी आणि मैत्रिण होते आणि तुम्ही तिच्यासाठी पिता, पुत्र आणि प्रियकर होता. लोक कल्पनाविलास करतात आणि त्यापुढे त्यांना वास्तविक फिकं वाटायला लागतं...पण जगायला आणि उपभोगायला नेहमी वास्तविकच उपलब्ध असतं ही एक गोष्ट लक्षात आली तर सगळे प्रश्न सुटतात. कुठल्याही फँटसीची आणि पॉर्नची गरज उरत नाही. तिचा सहवास तुमच्यासाठी उत्तेजक ठरतो आणि तुमचं प्रेम तिला संपूर्ण मोकळी व्हायला उद्युक्त करतं. आणि मग सनी लिओन काय देईल असा रिस्पॉन्स तुमची पत्नी तुम्हाला देते. फार साधी आणि एका अत्यंत सामान्य माणसानं तुम्हाला सांगितलेली एवढी एक गोष्ट करुन पाहा. कुणीही आणि कशीही असो, तुम्ही तिला पत्नी म्हणून घरी आणलीये, तिला मनापासून आपली म्हणा मग ती तुमच्याशी अनुरुप झाली नाही तर मी काहीही हारायला तयार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 01/26/2016 - 09:20 नवीन
महत्वाचे : जीवनातली उत्त्तम तत्वे मलाही खूप आवडतात व ती मी शक्य तेवढी आचरणात आणतो. पण, इथे मी किंवा तुम्ही असा विचार नाही तर सर्व समाजाचा विचार चालला आहे आणि समाजातले सर्व लोक मानसिकरित्या एकसमान नसतात हे एक नैसर्गिक सत्य आहे. तुम्ही आम्ही वैयक्तिकरित्या काय विचार व कृती करतोय यापेक्षा समाजातले बहुतेक लोक काय विचार व कृती करतात यावर समाजजीवन चालते... कोणतीही सामाजिक उपाययोजना करताना हा कळीचा मुद्दा ध्यानात घेतला नाही तर योजलेले उपाय केवळ दिवास्वप्ने ठरतात. असो. आतापर्यंत आपल्याला एकमेकाची मते कळली आहेत असे मला वाटते. शिवाय, यापेक्षा जास्त विस्तारून मला काही सांगायला येणार नाही. तेव्हा या मुद्द्यावर इथेच थांबूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
च
चिगो गुरुवार, 01/28/2016 - 14:03 नवीन
लोक कल्पनाविलास करतात आणि त्यापुढे त्यांना वास्तविक फिकं वाटायला लागतं...पण जगायला आणि उपभोगायला नेहमी वास्तविकच उपलब्ध असतं ही एक गोष्ट लक्षात आली तर सगळे प्रश्न सुटतात. कुठल्याही फँटसीची आणि पॉर्नची गरज उरत नाही. तिचा सहवास तुमच्यासाठी उत्तेजक ठरतो आणि तुमचं प्रेम तिला संपूर्ण मोकळी व्हायला उद्युक्त करतं. आणि मग सनी लिओन काय देईल असा रिस्पॉन्स तुमची पत्नी तुम्हाला देते.
लाखमोलाचं बोललात, सर.. दंडवत !! आता पॉर्नबद्दलः पॉर्नमुळे काहीच्या काही कल्पनाविलासाला लागतात लोक कधीकधी.. आता बायको सनी लिओनी सारखी उन्मादक, वळसेदार हवी असेल, तर नवर्‍यानीपण त्या पॉर्नस्टार्ससारखं अचाट आणि टिकावू असावं, असं बायकोनी म्हटलं तर किती पुरुषांना पटेल? मुख्य म्हणजे आपल्या आयुष्यातल्या धबगड्यात, नोकरी-संसार-बाळंतपण-पोरांचे संगोपण ह्यात बायकोला खरंच स्वतःला 'मेंटेन' ठेवणं शक्य आहे का, ह्याचा तरी विचार करावा माणसानी.. अगदी हाच प्रॉब्लम मला लोकांच्या 'सिक्स पॅक ऑब्सेशन'शी आहे. प्रत्येकानी सुदृढ, सुडौल आणि आरोग्यपुर्ण राहण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असलं तरी 'फुल टाईम हृतिकवानी सिक्स पॅक दिसले पाय्जेल' म्हणणं हे 'चोवीसही तास इरेक्शन तसंच पाहीजे' म्हणण्याइत्कचं मुर्खपणाचं आहे. लेखाबद्दलः अनुभवसिद्ध लेख पटला. ठाकूरसाहेबांच्या 'लव इज द बेस्ट अ‍ॅफ्रोडेसिअ‍ॅक' ह्या म्हणण्याशी सहमत असलो, तरी जगात आणि समाजात विविध कारणांमुळे पॉर्न आणि त्याची गरज राहणारच, ह्याबद्दल शंभर टक्के सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
स
संदीप डांगे Mon, 01/25/2016 - 13:11 नवीन
वैद्यकिय असली तरी पोर्नची ही एक एकांगी बाजू झाली. विशिष्ट केसस्टडीजमध्ये पोर्नचा कसा उपयोग झाला-होतो ह्याबद्दल आपण लिहिले आहे. आपल्या वैद्यकिय ज्ञान व अनुभवाबद्दल नितांत आदर आहे. पण एखाद्या क्षेत्रातल्या अधिकाराच्या आधारे समाजाच्या सर्व स्तरांना स्पर्श करणार्‍या एखाद्या विस्तृत विषयावर एकाच बाजूने मत व्यक्त होत आहे असे वाटते. स्वयंभू म्हणून पोर्न काय आहे व त्याची सामान्यस्थितीत काय गरज आहे ह्याबद्दल आपला लेख विशेष काही सांगत नाही. विवेक ठाकूरांचे प्रतिसाद आणि आपला लेख दोन्ही विरुद्ध बाजू आहेत. दोन्ही विचार आपआपल्या जागी योग्य आहेत. भूक लागत नाही तेव्हा टॉनिक घेणे वेगळे आणि गरज नसतांना टॉनिक घेणे वेगळे. विवेक ठाकूर, 'गरज नसतांना घेतल्या जाणार्‍या टॉनिकबद्दल व मग त्याच्या लागणार्‍या अनैसर्गिक सवयी' बद्दल बोलत होते असे वाटते. प्राची अश्विनि यांनी उपस्थित केलेला मुद्दाही एक मोठे क्षेत्र चर्चेसाठी खुले करत आहे. भारतीय समाजात स्त्री व पुरुष या दोघांनाही संभोगाबद्दल शास्त्रिय माहिती उपलब्ध करून देणे, त्यांच्या शंकांचे योग्य प्रकारे निरसन करणे, समुपदेशन करणे हे सरसकट पोर्न दाखवण्यापेक्षा जास्त गरजेचे आहे असे मला वाटते. 'भावना मोकळ्या करण्यासाठी पोर्न' हे रोगापेक्षा इलाज भयंकर असे असू शकते. भारतीय समाजात विवाहपूर्ण संभोग निषिद्ध आहे तर हस्तमैथुनास मान्यता आहे का? लग्न होईपर्यंत मुला-मुलीने पोर्न बघून हस्तमैथुनाद्वारे भावना मोकळ्या कराव्यात असे पालकांना पटेल काय? म्हणजे इथे बरेच पालक असतील त्यांनी याबद्दल भूमिका सांगावी. संभोगासाठी बायको सनी लियोनच असली पाहिजे वा नवरा जॉन अब्राहमच असला पाहिजे हे जे विचार आहेत हे बाह्य-प्रतिमा संस्करण आहे. तेच चित्रपट-पोर्न-सॉफ्टपोर्न-मासिकांमधून अधिकाधिक समाजात पसरत जात आहे. पडद्यावर दाखवल्या जाणार्‍या दृश्यांमधली उत्कटता ही त्या शरिरांमुळे आहे हे मनावर ठसत जाते. फिगर ३६-२४-३६ नसली तरी प्रणयाची उत्कटता साधता येते. ज्यांना बायको सनी लियोन हवी असेल त्यांना प्रणय-संभोग कळला नाही असे म्हणावे लागेल. उत्कृष्ट प्रणय-संभोगानुभवामध्ये विरुद्ध-पार्टी कोण आहे हे इमॅजिन करण्याची गरजच पडू नये. शंभर टक्के फोकस्ड, रीलॅक्स्ड शरिरसंबम्ध असावेत. त्यातून येणारा आनंद ड्युरेबल असतो. इमॅजिनेशनचा आनंद तृप्ती देत नाही. फक्त यांत्रिकतेने क्रिया पूर्ण करतो. अशा प्रकारालाच पाट्या टाकणे म्हणतात, पोर्न बघून कोणी उद्दिपित होऊन संभोग करत असेल तर ते पाट्या टाकणेच होय. त्यातून अधिक अस्वस्थता व भुकेलेपण वाढू शकते. खरा आनंद हा शरिरापलिकडचा आहे, शरिर हे माध्यम आहे, साध्य नव्हे. जे शरिरावरच थांबतात त्यांना शाश्वत आनंद मिळत नाही. आणि मग फॅन्टसीजच्या जंजाळात तळमळत राहण्याशिवाय हाती काही लागत नाही. असो. सहजसोप्या गोष्टींचे त्रांगडे करुन ठेवणे आणि मग उपाय शोधत गावभर फिरणे मनुष्यस्वभाव आहे. त्याला कुठल्याही मेडिसिनमध्ये औषध नसेल.
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Mon, 01/25/2016 - 13:57 नवीन
स्वयंभू म्हणून पोर्न काय आहे व त्याची सामान्यस्थितीत काय गरज आहे ह्याबद्दल आपला लेख विशेष काही सांगत नाही करेक्ट. विवेक ठाकूर, 'गरज नसतांना घेतल्या जाणार्‍या टॉनिकबद्दल व मग त्याच्या लागणार्‍या अनैसर्गिक सवयी' बद्दल बोलत होते असे वाटते. नाही. एकमेकात प्रेम असेल तर पॉर्नची गरज नाही असं माझं मत आहे. आणि त्याचं कारणही उघड आहे, पॉर्न हा मेंटल स्टार्ट-अप आहे आणि प्रणय ही वास्तविक शारीरिक क्रिया आहे. जर एकमेकांचा सहवास उद्दिपक असेल तर पॉर्न व्यर्थ आहे. बाय द वे, हा आणि या आधीचा धागा वाचून माझं असं मत झालंय की सहवास उद्दिपक वाटत नाही म्हणून पॉर्नची गरज आहे. भावना मोकळ्या करण्यासाठी पोर्न' हे रोगापेक्षा इलाज भयंकर असे असू शकते हे बहुदा पॉर्न अ‍ॅडिक्शन नंतर कळत असावं! ज्यांना बायको सनी लियोन हवी असेल त्यांना प्रणय-संभोग कळला नाही असे म्हणावे लागेल. एकदम सही. प्रेम हा शरीरापेक्षाही थोर पैलू आहे. खरा आनंद हा शरिरापलिकडचा आहे, शरिर हे माध्यम आहे, साध्य नव्हे. जे शरिरावरच थांबतात त्यांना शाश्वत आनंद मिळत नाही. आणि मग फॅन्टसीजच्या जंजाळात तळमळत राहण्याशिवाय हाती काही लागत नाही. क्या बात है! खरा आनंद हा एकमेकाशी एकरुप होण्याचा आहे आणि प्रणय एक बहाणा आहे. सहजसोप्या गोष्टींचे त्रांगडे करुन ठेवणे आणि मग उपाय शोधत गावभर फिरणे मनुष्यस्वभाव आहे. त्याला कुठल्याही मेडिसिनमध्ये औषध नसेल. तेही आहेच. पण एखाद्यानं सोपा उपाय सांगितला तर त्यालाच अपवादात्मक ठरवून साध्या गोष्टी क्लिष्ट करुन ठेवण्याची सवय तर पूर्वापार दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुबोध खरे Mon, 01/25/2016 - 20:06 नवीन
डांगे साहेब आणि ठाकूर साहेब मी कुठेही असे म्हटलेलं नाही कि प्रत्येकाला पॉर्न ची गरज पडतेच. किंबहुना बर्याचशा लोकांना पॉर्नची गरज पडत नाही. फक्त मी पॉर्नची गरज केंव्हा पडते याचा उहापोह केला आहे. माझे म्हणणे एवढेच आहे कि आपण म्हणता कि पॉर्नची गरजच नाही हे हि सत्य नाही.शिवाय ज्यांना पॉर्न पहायचे असेल त्यांनी ते पाहावे. त्यात काही गुन्हा आहे असेहि नाही. तसेच हस्तमैथुनातहि काहीही गैर नाही. ब्रम्हचर्य हेच जीवन आणि वीर्यनाश म्हणजे मृत्यू यात काहीही तथ्य नाही. आपण प्रेम आणि पॉर्न यात गल्लत करीत आहात. कोणत्याही माणसाचे असे म्हणणे नसेल कि पॉर्न हे प्रेमापेक्षा श्रेष्ठ आहे. तरीही आपली खालील वाक्ये नक्कीच स्तुत्य आहेत जर युगुलात अनुबंध असेल तर त्यांचा प्रणय ही कायम रंगणारी मैफिल आहे पॉर्न एका मर्यादेपलिकडे निरुपयोगी आहे. जे शरिरावरच थांबतात त्यांना शाश्वत आनंद मिळत नाही" बाकी आपली बरीच वाक्ये हि आदर्शवादी आहेत. सगळ्यांची लग्ने अनुरूप व्यक्तीशीच होत नाहीत. तेंव्हा आहे त्या जोडीदाराबरोबर संसार करणे आवश्यक असते. आपले सर्व विचार जुळत नाहीत पण म्हणून कुणी काडीमोड घेत नाही. तेंव्हा दोन व्यक्तींमध्ये एकरूपता झाली तर हा "तर"च महत्त्वाचा ठरतो. कमी पगाराच्या माणसाला आणि कमी सुंदर दिसणाऱ्या मुलीला बर्याच तडजोडी कराव्या लागतात बरेच वेळेस आईबाप ठरवतील त्या जोडीदाराबरोबरच संसार करावा लागतो अशा परिस्थितीत आपण म्हणता तसे सर्वाना एकरूप होणे सोपे नाही / शक्य नाही. नि हि परिस्थिती बर्याच वेळेस असते अपवादात्मक स्थितीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
स
संदीप डांगे Tue, 01/26/2016 - 10:24 नवीन
तुम्हीच मागे एका धाग्यावर ही मानसिकता सांगितली होती की लठ्ठ लोकांना व्यायाम, योगासने, आहारनियंत्रण वैगेरे कष्ट पडणार्‍या गोष्टी नको असतात. त्यांना एखादी गोळी, औषध, शस्त्रक्रिया हवी असते. परंतु आता ह्या लेखात आपण उलटी बाजू मांडली आहे असे वाटले. प्रस्तुत लेख आपण ठाकूरांच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने लिहिला असे वाटले म्हणून मी प्रतिसाद दिला. झाले असे की सामान्यपणे लठ्ठपणा कमी करण्यासाठी आम्ही म्हणतोय व्यायामाची आवश्यकता आहे, शस्त्रक्रिया वा औषधांची नाही. तर तुम्ही ज्या केसेस मधे व्यायाम व तत्सम गोष्टींचा उपयोग नाही, फक्त औषध, शस्त्रक्रियेचीच आवश्यकता आहे त्याच केसेस चे उदाहरण देऊन औषध, शस्त्रक्रियेचे लठठपणाच्या उच्चाटनामधली गरज अधोरेखित करत आहात. इथे फोकस कशावर असावा? साधनांवर की साध्यावर? साधारण परिस्थितीत संभोगोत्सुक वातावरण उत्पन्न करायला पॉर्न आवश्यक नाही असे माझे म्हणणे तर पॉर्नची आवश्यकता कुठे आहे हे सांगणारा तुमचा लेख तत्त्वतः दोन वेगळ्या बाबी आहेत. त्यात म्हात्रेसर सामान्य जनतेचे जेव्हा उदाहरण देतात तेव्हा जरा गोंधळायला होतं. डॉक्टरसाहेब, या विशिष्ट विषयाबाबत आपल्या दोघांच्या विचारपद्धतीत मूलभूत फरक आहे. संभोगापासून चिरंतन सुख मिळवण्याचे शास्त्रशुद्ध ज्ञान भारतीय समाजात फारच दुर्मिळ असल्याने प्रस्तुत समस्या उद्भवतात. तुम्ही सुचवताय ते उपाय वरवरचे, तात्पुरते, लगेच परिणाम देणारे आहेत. माझे वा ठाकूरांचे उपाय चिरंतन सुख देणारे आहेत. संभोगाचा आनंद लुटायलाही थोडे कष्ट आवश्यक आहेतच, पण सामान्य जनतेस इन्स्टंट रेमेडी हवी असते. त्यांना ते हवे म्हणून तेच द्यावे अशी मानसिकता वैद्यकिय क्षेत्रात आहे याबद्दल आश्चर्य वाटले. इथे आपण "अनुरुप" ह्या शब्दाचा खूपवेळ वापर केला आहे. संभोगाच्या सुखासाठी जोडीदार 'अनुरूप' असायची गरज नाही हेही वारंवार सांगितले. मला वेश्यांचा अनुभव नाही पण जेवढे ऐकले, बघितले त्यावरून असे समजते की तिथेही सनी लियोन नसतात. (संपादित) अगदी सामान्य रंगरुप असणार्‍या स्त्रिया असतात. सततच्या संभोगामुळे त्यांची लैंगिक भावना मेलेली असते. तिथले वातावरण गलिच्छ, ओंगळवाणे असते, त्या स्त्रिया चुंबन टाळतात, थोडक्यात संभोगासाठी त्यांच्या टर्म्स आणि कंडीशन असतात. अशा दिव्य स्थितीमध्येही तिथे जाणार्‍या पुरुषांना कसल्याही बाह्य उद्दिपनाची गरज का पडत नसावी आणि त्यापेक्षा कैक पटीने चांगली परिस्थिती घरात असून ते उद्दिपित का होत नसावे ह्यावर विचार करण्यासारखे आहे. सतत एकच जोडीदाराशी संग करून कंटाळा येत असेल तर ही परिस्थितीही मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यासारखी आहे. इथे कुणी पॉर्न अ‍ॅडिक्शन चे व्यक्तिगत अनुभव सांगितलेले नाहीत. मला माझे अनुभव सांगायला आवडेल पण परत त्या अनुभवांकडे 'सामान्यांपेक्षा वेगळी अशी विशिष्ट केस" म्हणून बघितले जाणार असेल तर मग उपयोग नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संदीप डांगे Tue, 01/26/2016 - 10:33 नवीन
प्रस्तुत प्रतिसाद पुरुषांच्या मानसिकतेतून लिहिला आहे. स्त्रियांचे पोर्नबाबतचे मत त्यांनीच व्यक्त केलेले बरे. भारतीय विवाहसंस्थेत वडीलधार्‍यांच्या आवडी नुसार जोडीदार मिळत असल्याने स्त्रियांची कुचंबणा होते हे सर्वश्रुत आहे. पण ज्या जोडीदारासोबत संग करायला साधारण परिस्थितीत आवडणार नाही त्याच जोडीदारासोबत पॉर्न पाहून उद्दिपित होऊन संग करायला आवडेल काय ह्या प्रश्नांचे उत्तर मिळाले तर बरे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
विवेक ठाकूर Tue, 01/26/2016 - 13:12 नवीन
साधारण परिस्थितीत संभोगोत्सुक वातावरण उत्पन्न करायला पॉर्न आवश्यक नाही असे माझे म्हणणे तर पॉर्नची आवश्यकता कुठे आहे हे सांगणारा तुमचा लेख तत्त्वतः दोन वेगळ्या बाबी आहेत. त्यात म्हात्रेसर सामान्य जनतेचे जेव्हा उदाहरण देतात तेव्हा जरा गोंधळायला होतं. सुहासजींना, सुबोधजी हाताळत असलेल्या केसेस सामान्य वाटायंत. आणि ज्यांना पॉर्नच्या प्रॉपची गरज नाही त्या `असामान्य' वाटतायंत, त्यामुळे तुम्हाला गोंधळायला झालंय! पण तुमच्या या मताशी, 'साधारण परिस्थितीत संभोगोत्सुक वातावरण उत्पन्न करायला पॉर्न आवश्यक नाही' मी संपूर्ण सहमत आहे. तुम्ही सुचवताय ते उपाय वरवरचे, तात्पुरते, लगेच परिणाम देणारे आहेत. माझे वा ठाकूरांचे उपाय चिरंतन सुख देणारे आहेत. संभोगाचा आनंद लुटायलाही थोडे कष्ट आवश्यक आहेतच, पण सामान्य जनतेस इन्स्टंट रेमेडी हवी असते. त्यांना ते हवे म्हणून तेच द्यावे अशी मानसिकता वैद्यकिय क्षेत्रात आहे याबद्दल आश्चर्य वाटले. वैद्यक काय की मानसशास्त्र काय रुग्णाशी डील करतं, नॉर्मलशी त्यांचा संबंध नाही. त्यांना रुग्णाची सोडवणूक करायची असते म्हणून ते स्टँडर्डायजेशन करुन उपाय शोधतात. त्यामुळे ज्या सामान्य व्यक्तीला, सामान्य परिस्थितीत, नैसर्गिकपणे उपलब्ध असलेलं रतीसुख मिळत असेल, तो वैद्यक किंवा मानशास्त्राकडे जातच नाही. तस्मात, यांच्या सर्व केस स्टडीज अ‍ॅबनॉर्मलवरच बेस्ड असतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीकोनाबद्दल आश्चर्य नाही. इथे आपण "अनुरुप" ह्या शब्दाचा खूपवेळ वापर केला आहे. संभोगाच्या सुखासाठी जोडीदार 'अनुरूप' असायची गरज नाही हेही वारंवार सांगितले. मला वेश्यांचा अनुभव नाही पण जेवढे ऐकले, बघितले त्यावरून असे समजते की तिथेही सनी लियोन नसतात.... अशा दिव्य स्थितीमध्येही तिथे जाणार्‍या पुरुषांना कसल्याही बाह्य उद्दिपनाची गरज का पडत नसावी आणि त्यापेक्षा कैक पटीने चांगली परिस्थिती घरात असून ते उद्दिपित का होत नसावे ह्यावर विचार करण्यासारखे आहे. हा अत्यंत भारी मुद्दा आहे आणि याचं एकच उत्तर आहे : पत्नीवर प्रेम नाही त्यामुळे तिचा सहवास उत्तेजक वाटत नाही. सतत एकच जोडीदाराशी संग करून कंटाळा येत असेल तर ही परिस्थितीही मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यासारखी आहे. हा त्याहून ही भारी मुद्दा आहे त्यामुळे खास तुमच्यासाठी लिहीतो. कदाचित, तुम्हाला आयुष्याच्या शेवटापर्यंत उपयोगी पडणारी मेख सापडेल. आपल्या फ्रस्ट्रेशनच्या बचावासाठी, पारस्पारिक अनुबंध नसलेल्यांनी, हा पद्धतशीरपणे पसरवलेला गैरसमज आहे. मला माझ्या पत्नीचा कधीही कंटाळा येत नाही. याचं कारण मी तिच्याकडे कधीही `पत्नी' म्हणून पाहात नाही. या क्षणात जगण्यासाठी, माझ्याबरोबर असलेली संगीनी म्हणून पाहातो. त्यामुळे माझ्या मनावर नात्याचं ओझं नसतं. ती मला कायम नवी असते. यामुळे मी मानसशात्राच्या कायम बाहेर असतो. माझ्या या अत्रंगी स्वभावला ती सुद्धा सरावलीये, त्यामुळे कधीही आणि कितीही कलह झाले तरी आमच्यापैकी कुणीही निर्लज्जपणे एकमेकांशी पुन्हा जवळीक साधायला हात पुढे करतो. आणि मग दुसराही, तितक्याच सहजतेनं, तो हात हातात घेतो. इथे कुणी पॉर्न अ‍ॅडिक्शन चे व्यक्तिगत अनुभव सांगितलेले नाहीत. मला माझे अनुभव सांगायला आवडेल पण परत त्या अनुभवांकडे 'सामान्यांपेक्षा वेगळी अशी विशिष्ट केस" म्हणून बघितले जाणार असेल तर मग उपयोग नाही. तुम्ही बिनधास्त लिहा. मला पत्नीचा सहवास हे एकमेव अ‍ॅडिक्शन आहे पण तुम्ही पॉर्न अ‍ॅडिक्शनमधून स्वतःची सुटका कशी केलीत हे वाचायला जरुर आवडेल. किंवा तुम्हाला सुटका हवी असेल तर तुमच्याशी चर्चा करायला आनंद होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 01/26/2016 - 14:05 नवीन
बाकी सर्व ठिक आहे. फक्त... कदाचित, तुम्हाला आयुष्याच्या शेवटापर्यंत उपयोगी पडणारी मेख सापडेल. खास तुमच्यासाठी सांगतो, आम्हाला आमची मेख सापडली आहे, ती आयुष्यभर पुरणारी आहेच हे कदाचित माझ्या प्रतिसादांमधून आपणास कळले नसावे. अन्यथा न मागता या पद्धतीने सल्ला आपण दिला नसता. मला तुमचे विचार आवडतात, पटतात, एकच खटकते ते हे की दुसर्‍याला अज्ञानी समजून, स्वत:ला सर्वज्ञानी समजून 'अंधकार दूर करण्याच्या' थाटात अहंकारी सल्ले, उपदेश देणे. तेवढे आपल्याजवळच ठेवावे अशी विनंती. जालावर आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करणे आमच्या स्वभावात नाही, म्हणजे आम्ही ज्ञानी नाही असा कुणाचा समज असेल तर त्याच्याबद्दल किव वाटेल. बाकी आपण सुज्ञ आहात. स्पष्टपणे बोललो, राग मानू नये. तुम्ही पॉर्न अ‍ॅडिक्शनमधून स्वतःची सुटका कशी केलीत हे वाचायला जरुर आवडेल. किंवा तुम्हाला सुटका हवी असेल तर तुमच्याशी चर्चा करायला आनंद होईल. आमचे अनुभवविश्व फारच विशाल असल्याने काय काय लिहावे हा प्रश्नच पडतो. आता आम्हाला फक्त मिपाचे अ‍ॅडिक्शन आहे त्यापासून सुटका कशी करावी याबद्दल सतत मिपावर शोधाशोध करत असतो. त्याबद्दल काही मदत होत असेल तर बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Tue, 01/26/2016 - 18:06 नवीन
किमान तुम्हाला तरी चर्चेच्या अनुषंगात आलेला हार्दिक सल्ला आणि अहंकारी ज्ञानप्रदर्शन यातला फरक समजत असेल अशी आशा होती. ज्याला मेख सापडली तो प्रश्न विचारत नाही. आणि ज्याला मनापासून प्रश्न विचारायचा आहे त्याला दुसर्‍यानं दिलेलं उत्तर म्हणजे त्याच्या ज्ञानाचं प्रदर्शन वाटत नाही. असा दृष्टीकोन असेल तर चर्चा होऊच शकत नाही. तुम्ही देखिल सूज्ञ आहात तस्मात, उत्तर माहिती असतांना प्रश्न करणे म्हणजे एकतर दांभिकपणा असतो किंवा मग स्वतःबद्दल खात्री नसल्यानं चाचपणी असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 01/26/2016 - 19:30 नवीन
उत्तर माहिती असतांना प्रश्न करणे म्हणजे एकतर दांभिकपणा असतो किंवा मग स्वतःबद्दल खात्री नसल्यानं चाचपणी असते. मी दिलेले प्रतिसाद नीट वाचावेत अशी विनंती करतो. त्यात कुठेही माझ्या व्यक्तिगत समस्यांबद्दल प्रश्न नाहीत. तसे असतील तर दाखवून द्यावेत. सतत एकच जोडीदाराशी संग करून कंटाळा येत असेल तर ही परिस्थितीही मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यासारखी आहे. ह्या वाक्यावर आपण मेख सांगताय तो डॉक्टरांच्या लेखाच्या व त्यांच्या अनुभवसंपन्न मताच्या आधारे पुढे आलेला मुद्दा होता. तो माझा वैयक्तिक अनुभव नाही हे माझे इतर प्रतिसाद नीट वाचले असता कळले असते. मला व्यक्तिगत बाबी त्यातही लैंगिक बाजूच्या जाहिररित्या प्रदर्शित करणे आवडत नाही. माझे आणि बायकोचे संबंध किती उत्कृष्ट आहेत हे जगाला सांगण्यात काहीच पॉईण्ट वाटत नाही. कारण त्याचा आम्हा दोघांव्यतिरिक्त कोणाला अनुभव येण्याची शक्यता शून्य आहे. माझी बायको उत्कृष्ट पुरणपोळी करते हे मी जगाला पटवून देऊ शकतो ती प्रत्यक्ष खायला घालून, प्रणयाच्या बाबतीत शक्य नाही ना..! मी ज्या मुद्द्यांवर इथे प्रतिसाद लिहितोय ते युनिवर्सल मुद्दे आहेत, फक्त व्यक्तिगत अनुभव नाहीत. गेल्या २० वर्षात याबद्दल भरपुर वाचले आहे, भरपूर लोकांचे समुपदेशन केले आहे. असंख्य मित्रांचे, ओळखीच्यांचे अनुभव (यात स्त्रियाही आल्या) त्यांनी माझ्याशी मनमोकळेपणाने शेअर केले आहेत. यातून एक थोडी समज आली आहे. प्रत्येक बाबतीत स्वतःच्या मर्यादित व्यक्तिगत अनुभवानुसार जगाला ज्ञानसंपन्न करत सुटणे माझा पिंड नाही. जेवढे आवश्यक, जनहितार्थ व चर्चेस आवश्यक तेवढेच मी चर्चेत मांडतो. म्हणून मलाच काही समस्या आहेत असे कुणी समजत असेल तर धन्य आहे. लोभ असावा, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Tue, 01/26/2016 - 19:59 नवीन
.....त्यात म्हात्रेसर सामान्य जनतेचे जेव्हा उदाहरण देतात तेव्हा जरा गोंधळायला होतं. ही तर तुमच्या प्रतिसादाची सुरुवात आहे. का हा युनिवर्सल प्रश्न आहे? थोडक्यात, तुम्ही लिहीतायं ते सर्व युनिवर्सल आणि माझं लेखन म्हणजे केवळ सिमित व्यक्तीगत अनुभव असा थोर विचार करण्यापूर्वी, सदर लेख हा सुबोधजींनी माझ्या मतांचा प्रतिवाद करण्यासाठी लिहीला आहे, इतपत दखल घेतली असती तरी पुरेसं झालं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 01/26/2016 - 20:13 नवीन
आर्र्रारा... लैच कंफुजन है जनू.... १. विवेक ठाकूर: सामान्य परिस्थितीत पॉर्नची गरज नाही. २. डॉ. खरे: पॉर्नची गरज असमान्य परिस्थितीतही आहेच. ३. डॉ. म्हात्रे: विधान १ हे असामान्य परिस्थिती आहे. विधान २ हे सामान्य परिस्थितीत सुचवले जाते. आलं काय ध्यानात गुरुजी? खरा गोंधळ आणि वाद-प्रतिवाद आपल्या तिघांच्या विधानांमधे आहे. तिन्ही विधाने एकत्र वाचली तर गोंधळ होतो. ह्याचा अर्थ माझ्या लैंगिक जीवनात गोंधळ आहे हा असामान्य अर्थ आपण काढलात हे लॉजिक तर लैच डॉक्यावरून घेलं बगा... तसेच 'आपल्या मतांचा प्रतिवाद करायला डॉ. खरेंचा प्रस्तुत लेख उपयुक्त ठरत नाही' हे मी व्यक्त केलेले मतही आपण विचारात घेतलेले दिसत नाही. अजुनही काही कन्फुजन असेल तर बिन्दास विचारा... उगा नको ती चर्चा फुफाटत चाललीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 01/26/2016 - 21:33 नवीन
माझ्या विधानांसंबंधी तुमचा खरोखरच गोंधळ झालेला आहे :) माझ्या सगळ्या प्रतिसादांचे सार असे आहे: १. वस्तुस्थिती : ठाकूर यांच्या प्रतिसादात व्यक्त केली जाणारी त्यांची स्वत:ची मनःस्थिती व कृती उच्च, आदर्श आणि स्वागतार्ह आहे, पण खर्‍या जीवनात सतत तेवढी उंची गाठणारी माणसे अत्यंत विरळ (आउटलायर्स) असतात... हे दुर्दैवी आहे पण सत्य आहे. "समाजातिल सर्वजण आदर्श आहेत/असावेत" हा दावा केव्हाही सत्यपरिस्थितीला धरून होऊ शकत नाही. "काय असावे (आदर्श)" आणि "काय आहे (वस्तुस्थिती)" यातला फरक जाणण्याचे (गॅप अ‍ॅनॅलिसिस) भान राखणे ही यशस्वी उपाय शोधण्याची पहिली पायरी आणि गुरुकिल्ली आहे. २. सामाजिक उपाययोजना : व्यवहारातल्या सत्याकडे दुर्लक्ष करून केवळ आदर्श विचारसरणीच्या आधारावर केलेली सामाजिक उपाययोजना स्वप्नरंजन होईल व अयशस्वी ठरेल. त्याऐवजी, जमिनीवरचे सत्य (मग ते कितीका कटू असेना) परखडपणे जमेस धरून स्थळ-काळानुरूप जरूर ती उपाययोजना केल्यास यश मिळण्याची जास्त शक्यता असते. ३. व्यक्तिगत उपाययोजना : समाजात "टोकाचे आदर्शवादी" ते "टोकाचे आदर्श धुडकावून देणारे" ही दोन टोके पकडणारे कमी संख्येने आणि त्यांच्यामधल्या वर्णपटात कोठेतरी बसणारे बहुतांश लोक असतात (व्यक्ती तितक्या प्रकृती !). त्यामुळे, एका व्यक्तीत, एका परिस्थितीत यशस्वी ठरलेली उपाययोजना दुसर्‍या व्यक्तीत, त्याच/दुसर्‍या परिस्थितीत यशस्वी होईलच असे नाही. अर्थातच, व्यक्तीगत उपाययोजना यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे व तिच्या सद्य परिस्थितीचे स्वतंत्र मुल्यमापन करून मग त्यानुरूप उपाययोजना करणे जरूरीचे असते. हे सगळे केवळ पोर्न/लैंगिक मुद्द्यांबाबत नाही तर सर्वच सामाजिक व वैयक्तिक आचार-विचार-समस्यांशी निगडीत मुद्द्यांबाबत खरे आहे. असे जर नसते तर, केवळ आदर्शवादी मुल्यांवर आधारलेल्या उपाययोजना करून शास्त्रज्ञ/तंत्रज्ञ/विचारवंतांनी पृथ्वीवरच्या सर्व माणसांच्या सर्व समस्या फार पूर्वीच संपवल्या असत्या व पृथ्वीवर नंदनवन (युटोपिया) अवतरले असते, नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 01/26/2016 - 21:54 नवीन
प्रतिसाद पटला. तुमची भूमिका नीट समजली. मनापासून धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 01/26/2016 - 15:12 नवीन
साधारण परिस्थितीत संभोगोत्सुक वातावरण उत्पन्न करायला पॉर्न आवश्यक नाही >> मलातरी वाटतय की खरेसर असाधारण परिस्थितीतच पॉर्न बघायला सजेस्ट करत आहेत. बाकी चर्चा आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
म
मारवा Tue, 01/26/2016 - 16:35 नवीन
मला वेश्यांचा अनुभव नाही पण जेवढे ऐकले, बघितले त्यावरून असे समजते की तिथेही सनी लियोन नसतात. (संपादित) तुमच्या वरील विधानाला काही आधार विदा आहे का ? सनी लियोनी ही कलाकार आहे पॉर्न चित्रपटात काम करते म्हणजे.....असेलच असा विचार करत असाल तर ठीकच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पैसा Tue, 01/26/2016 - 18:14 नवीन
ती लग्न झालेली मुले बाळे असलेली बाई आहे. तिच्याबद्दल असे बोलणे योग्य वाटले नाही. किंबहुना कोणाचाही उल्लेख अशा चर्चेत असा यावा हेच दुर्दैवी वाटत्ले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ट
टवाळ कार्टा Tue, 01/26/2016 - 18:35 नवीन
+१११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ख
खटपट्या Tue, 01/26/2016 - 22:10 नवीन
+१११११ सहमत. फक्त एकच अ‍ॅडीशन - तीला अजुन मुले झालेली नाहीत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
न
नाखु Wed, 01/27/2016 - 04:06 नवीन
अणि टक्याच्या पुनरागमनाला १११११ लक्ष्य असू द्या बाबाजी !!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
स
संदीप डांगे Tue, 01/26/2016 - 18:55 नवीन
मारवाजी, आपला बहुतेक गैरसमज झाला किंवा डॉक्टरांचा लेख आपण नीट वाचला नसावा. असे नाही कारण सर्वांच्या बायका काही सनी लिओन नसतात. वरील वाक्य डॉक्टरांच्या लेखात आहे, त्यांनी ते ज्या संदर्भाने-अनुषंगाने वापरले त्याच अनुषंगाने सनी लियोनचा मी इथे उल्लेख केलाय. तो मूळ लेखात चुकला असे तर कुणी म्हटले नाही पण मी इथे वापरला तर त्याचे संदर्भ कसे बदलले? इथे व्यक्तिगर सनी लियोनला मी वेश्या म्हटले आहे असा अर्थ कुठल्या आधारे काढला? डॉक्टरांनी सनी लियोन म्हणजे तिच्यासारखी मादक फिगर असणारी स्त्री असा जर अर्थ धरला आहे आणि तोच मीही माझ्या प्रतिसादात वापरला आहे. मी इथे सरळ म्हटले आहे की "तिथे सनी लियोन नसतात" व पुढे म्हटले की "सनी लियोनसाठी किंमत चुकवणे सामान्यांना शक्य नसते." म्हणजे तशी फिगर असणार्‍या, संभोगाची उत्कृष्ट दर्जाची सेवा देणार्‍या वेश्या सामान्य कुंटणखाण्यांमधे नसतात व ज्या आहेत त्या सामान्यांना परवडत नाहीत. एवढा सरळ अर्थ न समजून घेता "पॉर्न कलाकार आहे म्हणजे वेश्याही आहे असे नाही" हे दिव्य ज्ञानामृत मला पाजण्याची वृथा घाई का बरे झाली असावी असा प्रश्न पडलाय. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
सुबोध खरे Tue, 01/26/2016 - 18:35 नवीन
लठ्ठ लोकांना व्यायाम, योगासने, आहारनियंत्रण वैगेरे कष्ट पडणार्‍या गोष्टी नको असतात. त्यांना एखादी गोळी, औषध, शस्त्रक्रिया हवी असते. परंतु आता ह्या लेखात आपण उलटी बाजू मांडली आहे असे वाटले. संभोगाचा आनंद लुटायलाही थोडे कष्ट आवश्यक आहेतच, पण सामान्य जनतेस इन्स्टंट रेमेडी हवी असते. त्यांना ते हवे म्हणून तेच द्यावे अशी मानसिकता वैद्यकिय क्षेत्रात आहे याबद्दल आश्चर्य वाटले. डांगे साहेब यात आपली गल्लत झाली आहे. मुल होण्यासाठी विशिष्ट वेळेत(२४ तासात) संबंध ठेवणे आवश्यक असते …… .अशा माणसाना मग तुम्ही पॉर्न पहा आणि लगेच संबंध ठेवा असे सुचित करावे लागते. ज्यावेळेस माणूस शुक्राणू दान करतो किंवा शुक्राणू तपासणी केली जाते अशा लैब मध्ये बंद खोलीत कुणी पाहत आहे अशा परिस्थितीत पुरुषांना लिंग उत्थान होणे कठीण जाते. अशा ठिकाणी मग अश्लील साहित्य प्रकार उपलब्ध करून द्यावे लागतात. या विशिष्ट वेळेत(२४ तासात ) स्त्रीबीज आणि पुरुष बीज यात संबंध होणे आवश्यक आहे. अशा वेळेस रुग्णांना स्त्री पुरुष संबंध आणि त्यासाठी लागणारी एकरूपता किंवा अनुरूपता कशी आणायची याचे प्रवचन देऊन उपयोग नसतो . मुळात तो रुग्ण लैंगिक समस्या घेऊन आलेलाच नसतो तो वंध्यत्व हि समस्या घेऊन आलेला असतो. आपल्याला पाहिजे तसा अर्थ काढण्यात आपण पटाईत आहात हे वेगळे परंतु अर्थाचा अनर्थ करणे फारच झाले. मी फक्त काही विविक्षित परिस्थितीत पॉर्नचा आधार घ्यावा लागतो असे सांगितले तर तुम्ही इन्स्टंट रेमेडी देतो असा अर्थ काढलात ? डॉक्टरसाहेब, या विशिष्ट विषयाबाबत आपल्या दोघांच्या विचारपद्धतीत मूलभूत फरक आहे. संभोगापासून चिरंतन सुख मिळवण्याचे शास्त्रशुद्ध ज्ञान भारतीय समाजात फारच दुर्मिळ असल्याने प्रस्तुत समस्या उद्भवतात. तुम्ही सुचवताय ते उपाय वरवरचे, तात्पुरते, लगेच परिणाम देणारे आहेत. माझे वा ठाकूरांचे उपाय चिरंतन सुख देणारे आहेत. मान्य आहे.मग आपण संभोग आणि चिरंतन सुख यावर लेखमाला लिहा. मी जे लिहिले आहे ते माझ्या मर्यादित अनुभवावर आधारित लिहित आहे आणि जे काही लिहिले आहे ते स्वयंभू ज्ञान नसून पुस्तकात दिलेले आहे आणि त्याला आधुनिक वैद्यकशास्त्राचा आधार आहे. १९९१ते १९९७ या काळात मी रोज वंध्यत्वाचे सरासरी ३० रुग्ण पाहत असे वर्षात ३०० दिवस काम केले गृहीत धरले ( रविवारी पण काम होत असे )तर एका वर्षात ९००० म्हणजे ७ वर्षात ६३००० आणि त्यानंतरच्या १८ वर्षात दर वर्षी सरासरी ३००० रुग्ण ओहिले हे गृहीत धरले तर मी साधारण १,२५,००० इतके रुग्ण पहिले आहेत . माझ्या एवढ्या मर्यादित अनुभव आणि वाचनावर आधारित माझी मते आहेत. ती एकांगी हि असतील आणि चूकही असतील. परंतु ती चूक मला पुरावा किंवा दुवा दाखवा म्हणजे मी चुका सुधारून घेईन. आपण आपले पॉर्न अ‍ॅडिक्शन चे अनुभव जरूर लिहा त्यातून कुणाचा फायदा होईल तर चांगलेच. आमच्याही अनुभवात भर पडेल. बाकी आपले काथ्याकुट चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 01/26/2016 - 19:14 नवीन
डॉक्टरसाहेब, परत गैरसमज होतोय बरं का. तुम्ही रुग्णांबद्दल व विशिष्ट परिस्थितीबद्दल बोलत आहात तर मी सामान्य लोकांबद्दल बोलत आहे. तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्यच आहात, त्याबद्दल मी काही विरोधी बोललो असे वाटत नाही. माझे म्हणणे एवढेच की गल्लत तुमच्याकडून झाली आहे. 'सामान्य परिस्थितीत पोर्नची आवश्यकता नाही' ह्या विधानाचा प्रतिवाद करतांना आपण असामान्य परिस्थितीची उदाहरणे पॉर्नची वैद्यकिय बाजू धरुन दिली आहेत. दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे आपणांस मान्य आहे की नाही एवढाच प्रश्न आहे. तुम्ही 'असामान्य परिस्थितीत पॉर्नचे महत्त्व व उपयोग' ह्यावर लेख लिहिला आहे ते सर्व बिनशर्त मान्य आहे, त्यास खोडायचे नसल्याने पुरावे वा विदाचा प्रश्नच येत नाही. 'सामान्य परिस्थितीत पॉर्नचे महत्त्व' या ह्या खर्‍या विषयावर (जे ह्या लेखाचे खरे प्रयोजन होते) आपला लेख काही सांगत नाही एवढाच माझा मुद्दा होता. (ह्या विषयावर मागे एका धाग्यावर प्रगो, तुम्ही, मी यांची प्रदिर्घ चर्चा झालेली. तो संदर्भ डोक्यात आहे म्हणून मागचे सगळे परत लिहिले नाही. आशा आहे की आपणांस ते आठवत असेल.) धन्यवाद! कुठल्याही बाबतीत गैरसमज नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 01/27/2016 - 08:37 नवीन
तुम्ही 'असामान्य परिस्थितीत पॉर्नचे महत्त्व व उपयोग' ह्यावर लेख लिहिला आहे मूळ गृहीतच चुकीचे आहे. धाग्याचा विषय "पॉर्नची गरज आहे का?" हा आहे सामान्य किंवा असामान्य स्थिती हा प्रश्न मी उपस्थित केलेला नाहीच. 'सामान्य परिस्थितीत पोर्नची आवश्यकता नाही' ह्याच काय कोणत्याच विधानाचा प्रतिवाद मी करीत नाही. तो वाचकांनी आपआपल्या मनोवृत्ती प्रमाणे ठरवायचा आहे. तेंव्हा "सामान्य परिस्थितीत पॉर्नचे महत्त्व' या ह्या खर्‍या विषयावर" आपल्याला पाहिजे असेल तर आपण धागा काढावा. माझ्या मनात गैर समज/ गोंधळ नाहीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 01/27/2016 - 09:33 नवीन
ओके. गॉट इट. मला वाटले होते विवेक ठाकूरांच्या भूमिकेबद्दल आपले मत मांडण्यासाठी धागा काढला आहे. असो. जास्त गोंधळ घालण्यात काय पॉइण्ट नाही. इथेच थांबूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अनन्न्या Mon, 01/25/2016 - 13:24 नवीन
खूप माहितीपूर्ण लेख
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Mon, 01/25/2016 - 13:58 नवीन
पाेर्न विना प्रणय उत्कृट होऊ शकतो. पाेर्न मध्ये दाखविले जाणारे मुखमैथून बघून किळस वाटते. पाॅर्न जास्त पाहिल्याने तेही पाहणे नकोसे वाटते.
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Mon, 01/25/2016 - 14:07 नवीन
बघा काकांनि कंटाळा येइस्तोवर पॉर्न पाहिलेत तरि आता त्यांना पाहणे नकोसे झालेय. वरते कोण बोलत होत कि ह्याचा अ‍ॅडिक्शन लागत म्हणुन? नाहि लागत हे काकांच्या प्रतिसादातुन कळतय.
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Mon, 01/25/2016 - 14:14 नवीन
मी पाहत नाही फक्त सांगतोय. अति तिथे माती.
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Mon, 01/25/2016 - 14:17 नवीन
पाॅर्न जास्त पाहिल्याने तेही पाहणे नकोसे वाटते. माय फॉल्ट :( राँग इंटरप्रिटेसन हुइ गवा. माफि देइल बा !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 01/25/2016 - 14:21 नवीन
डॉक, या विषयावर आलेले आपले लेखन आवडले. आजच्या पिढी मधे "ताण" हा सर्वसाधारण त्रास सहन करावा लागतो... यामुळे येणार्‍या समस्यांचे प्रमाणही अर्थातच अधिक असावे. मग अशा पिढीतल्या लोकांसाठी काय मार्गदर्शन होउ शकते ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शहीद संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्र
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 01/25/2016 - 14:45 नवीन
दोघांसाठीही संभोग आणि संभोगापासून मिळणार्‍या आनंदाची सुरुवात मनांतील भावभावनांमध्ये असते. एकमेकांच्या भावना एकमेकांप्रती प्रेमाच्या, सौहार्दाच्या नसतील (किंवा दोघांमधील एकाला जरी अशी कांही संवेदनाच नसेल) तर तो संभोग फक्त शारीरिक होतो. त्यातून कदाचित मुले होऊ शकतील पण वाढत्या वयाबरोबर गहन समस्या निर्माण होऊ शकतात. पोर्न पाहून शरीरसंबंध ठेवणे हा तात्पुरता उपाय होऊ शकतो. पण आपल्या संवेदना जागवणं हा कायमस्वरूपी उपाय होऊ शकतो. रोजच्या जीवनातील रटाळपणा, रुटीन निरस दिनक्रमातून बाहेर पडून एखाद्या पर्यटनस्थळी मनमोकळे वातावरण, प्रसन्नता अनुभवत आणि तिथे कोणी 'आपले' नसल्याने आपला पती किंवा पत्नी प्रती जास्त जवळीक निर्माण होऊन संभोगाप्रती योग्य ती वातावरण निर्मिती होऊ शकते.
  • Log in or register to post comments
स
सांजसंध्या Mon, 01/25/2016 - 14:51 नवीन
माहितीपूर्ण लेख आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 01/25/2016 - 15:08 नवीन
कुठलीही लेटेस्ट व्हिडीयो / फोटोग्राफी यांचा आणि पॉर्नोग्राफीचा घनिष्ट संबंध आपल्याला लगेच लक्षात येइल... पॉर्न इंडस्ट्री ही इनोव्हेशन्सना जन्म देखील देते तसेच पॉर्न इंडस्त्रीकडुन मोठ्या प्रमाणात वापरली गेलेली टेक्नॉलॉजी / डिजीटल फॉरमॅट हे देखील लवकरच मान्यताप्राप्त आणि प्रसिद्ध होतात... अगदी गुगलच्याही हे लक्षात आले जेव्हा गुगल गॉगलने पॉर्नशूटचा {जाहिरात करणारा}व्हिडीयो रिलीज झाला. गुगलने गुगलग्लासवर पॉर्न बॅन केले आहे... व्हिएचएस टेप्स पासुन एचडी अल्ट्राएचडी असा प्रवास पॉर्न इंड्र्स्ट्रीचा प्रवास झालेला दिसेल.यात ३डी पॉर्न आणि व्हरच्युअल रिअ‍ॅलिटी पॉर्न देखील आहे. मी Demolition Man या माझ्या आवडत्या सायन्स फिक्शन्स चित्रपटात मी पहिल्यांदाच व्हरच्युअल सेक्सचा कॉन्सेप्ट पाहिला. पॉर्न इंडस्ट्री नेहमी टेक्नॉलॉजी ड्रिव्हन राहिली आहे...आणि राहील.आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे... अनेक मेसेजिंगचे अ‍ॅप्लीकेशन्स देखील आहे... असेच एक स्नॅप चॅट. हे सेक्सटेक्स्टींग आणि पाठवलेली इमेज / फोटो काही क्षणातच सेल्फ डिस्ट्रक्टीव होणे...ज्याचा आधावर या अ‍ॅपचे निर्माण झाले आहे. एकमेकांना सेक्सी फोटो पाठवण्याच्या मानसिकतेवर हा पर्याय {अ‍ॅप} निर्माण झाला. पॉर्न इंडस्ट्रीच्या या बाजुवर फार कमी लोकांचे लक्ष जाते... बहुधा या इंडस्ट्रीच्या दुसर्‍या बाजुला कटु सत्य सुद्धा असल्यामुळे.. जाता जाता :- मागच्या वेळी झालेल्या इकॉनॉमिक क्रायसिस नंतर अमेरिकेच्या पॉर्न इंडस्ट्रीने देखील बेल आउट पॅकेज मागितले होते हे तुम्हाला माहिती आहे का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शहीद संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्र
  • Log in or register to post comments
म
मारवा Mon, 01/25/2016 - 18:25 नवीन
मदन बाण चर्चेला एक चांगला पैलु दिला. माहीतीपुर्ण प्रतिसाद आवडला आय डी नाव सार्थ केलतं प्रत्यक्ष मदनाने बाण मारल्यावर मग काय विचारता ? छान प्रतिसाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ज
जव्हेरगंज Mon, 01/25/2016 - 15:27 नवीन
लेख आवडला!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 01/25/2016 - 15:42 नवीन
विषय आवडला. वाखूसा.....
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/25/2016 - 16:15 नवीन
आमचे जालमित्र संक्षिसेठ यांच्या 'पॉर्न आणि फँटसीज कसे निरर्थक आहेत' या मुद्याच्या विवेचनासाठी डॉक्टर साहेब आपण केलेले माहितीपूर्ण लेखन आवडले. चर्चेतून पट्णा-या, न पटणा-या मतातून मिपावर असेच सर्व समावेशक लेखन येत राहावे, माहितीचे आदान प्रदान होत राहावे. आपले सर्वांचे मन:पूर्वक आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Mon, 01/25/2016 - 17:13 नवीन
लेख आवडला. ह्या महत्वाच्या विषयावर चर्चा देखील साधक बाधक होत आहे हे महत्वाचे.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 01/25/2016 - 17:35 नवीन
डॉक्टर रॉक्स!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 01/25/2016 - 17:38 नवीन
'विषय' महत्त्वाचा असूनही अजूनही बर्‍याच प्रमाणावर भारतात दुर्लक्षिला जातो आणि त्याचे परिणाम बरीच जनता आयुष्यभर भोगत राहते याचे वाईट वाटते! :( प्रतिसादांमधूनही विषय न भरकटता चर्चा होत राहील अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Mon, 01/25/2016 - 19:11 नवीन
अर्थशास्त्रातला महत्वाचा - मागणी आणि पुरवठ्याचा सिद्धांत पोर्नोग्राफीलाही लागू पडतो. मुळात पोर्नची निर्मिती ही मागणी-पुरवठा तत्वाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. जर माणसाला गरज नसती तर पोर्नची निर्मिती झालीच नसती. जेव्हा तंत्रज्ञान नव्हतं तेव्हा लोक मस्तराम किंवा हैदोस सारखी पुस्तकं आणि मासिकं बघत असत, आत्ताही बघतात. माझ्या काॅलेजच्या दिवसांत ब्लू फिल्म्सच्या व्हिडिओ कॅसेट्स बघणं हा एक पर्याय होता. त्याला भक्त प्रल्हाद असा शब्दपण होता. नंतर त्याची जागा सीडीने घेतली. आता इंटरनेटमुळे अजून पर्याय आहेत. Animated Porn आणि Porn Cartoons उदाहरणार्थ सविता भाभी, वेलम्मा वगैरे पाहणारा वर्ग आहे. या सगळ्याचा एकच अर्थ आहे - मागणी आहे म्हणून पुरवठा आहे. मी स्वतः पोर्न पाहतो आणि मला त्यात काही वावगं वाटत नाही. पाहून फार मोठी मर्दुमकी केली असंही वाटत नाही आणि न पाहणारे धर्मपरायण वगैरे असंही वाटत नाही. एका धार्मिक वगैरे मित्राने वेगळाच मुद्दा मांडला होता. या चित्रपटांत काम करणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाला आपण हातभार लावतोय असं तुला वाटत नाही का? माझं उत्तर म्हणजे प्रतिप्रश्न होते - शोषण फक्त स्त्रियांचंच होतं हे कशावरून? अशा चित्रपटांत काम करणाऱ्या पुरुषांचंही शोषण होत असेलच की. अजून एक प्रश्न म्हणजे शोषण नाही कुठे? आपण आपल्या घरी मरमर काम करणाऱ्या स्त्रियांना किती पगार देतो? रजा देतो? आपण स्वतः जेवढं काम करतो तेवढा पगार आपल्याला हक्क म्हणून हवा असतो पण या अशा स्त्रियांना आपण तसा पगार देतो का? ते सोडा. घरात काम करणाऱ्या आणि खस्ता काढणाऱ्या गृहिणीला काय मिळतं? शोषण तिथेही आहेच. लैंगिक संदर्भ आले की शोषण होतं असं थोडंच आहे? आणि जर हे एवढं सगळं शोषण आपण चालवून घेतो, तर मग पोर्नोग्राफिक फिल्म्समधलं सो काॅल्ड शोषणही आपल्याला चाललं पाहिजे. अत्यंत उदात्त ' वहिनीच्या बांगड्या ' टाईप चित्रपटांत काम करणाऱ्या अभिनेत्रीचं काय शोषण होत नसेल? पण ते आपण चालवून घेतो की नाही? असा selective आणि दांभिक दृष्टीकोन हा आपल्या विचारसरणीचा स्थायीभाव आहे. पोर्नच्या बाबतीत असा दांभिकपणा खूप आहे. त्यामुळे हा सर्व्हे आणि हा धागा एकदम आवडले मला. जे काही आहे ते सरळ आहे. फक्त अदितीताईंनी भाग घेणाऱ्यांची नावं जाहीर होणार नाहीत, गुप्त ठेवली जातील असं म्हटलंय, ते मला आवडलं नाही. अर्थात त्यांच्या या निर्णयामागे कारण आहे आणि त्याचा आदरही आहे पण नाव जाहीर न केल्यामुळे मुख्य मुद्द्याचाच पराभव होतो असं मला वैयक्तिकरीत्या वाटतं. जर लोक पोर्न पाहतात तर ते इतरांना का कळू नये? त्याने काय होणार आहे? ते काही पाप वगैरे तर नाहीये. असो. डाॅक्टर खरे तर अशा मुद्द्यांच्या सगळ्या बाजू जवळून पाहणारे. त्यामुळे त्यांच्याकडून असा लेख येणं हे संयुक्तिक आहेच. ते स्वतःचं आडनाव seriously घेतात हे माझं त्यांच्याविषयीचं मत या लेखानंतर कायम झालेलं आहे.
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Tue, 01/26/2016 - 03:43 नवीन
माझ्या मते, पॉर्न हा दुर्भिक्ष्यजनित प्रकार आहे. समजा जर मानवी समाज अन्य प्राण्यांसारखा विवस्त्र रहात असता आणि संभोग ही केवळ एक नैसर्गिक गरज समजली जात असती तर पॉर्नचा जन्मच झाला नसता. लिंगभावनेवर समाजाने जी बंधने घातली आहेत (काही योग्य, काही अयोग्य) आणि ज्याप्रकारे संभोगाची नाळ शोषणाशी जोडून टाकली आहे, त्यातून एका बाजूला पॉर्न जन्मते तर दुसऱ्या बाजूला बलात्कार होतात. कुतूहल म्हणून विचारतो: कुत्रे-मांजरे यांना पॉर्न दाखवल्यास त्यांची काय प्रतिक्रिया होते, याचा अभ्यास झालेला आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
स
सुबोध खरे Tue, 01/26/2016 - 15:38 नवीन
चलत मुसाफिर साहेब मानवापेक्षा कमी उत्क्रांत अशा बहुसंख्य प्राण्यांमध्ये संभोग हा केवळ पुनरुत्पादनासाठी केला जातो. आणि त्यातील मार्जार कुळातील काही प्राण्यांमध्ये तो अतिशय वेदनादायक असतो उदा . मांजर चित्ता बिबळ्या आणि वाघ . यापैकी मांजर आणि चित्ता या मध्ये तर नर मादीला संभोगासाठी स्थानबद्ध केल्यासारखे करतात आणि जोवर मादी संभोगासाठी तयार होत नाही तोवर तिची पाठ सोडत नाहीत. या प्राण्यांचे लिंग काटेरी असते आणि त्यातून मादीला वेदना होतात पण या वेदनेतूनच स्त्रीबीज पक्व होते (ovulation) यास्तव मांजर आणि बोका आपल्याला "मोठ्या आवाजात भांडताना" दिसतात. जोवर मांजरी संभोगास तयार होत नाही तोवर बोका तिची पाठ सोडत नाही. कुत्रा लांडगा किंवा श्वान कुळातील प्राण्यांमध्ये स्त्रीच्या योनीतून होणार्या स्त्रावाच्या "वासा"ने नर मादीकडे आकर्षित होतो. यासाठी कुत्रे कायम "वास" काढत फिरत असतात. या बहुतांश प्राण्यांमध्ये नराचे काम फक्त शुक्राणू दान करणे एवढेच असते. पिल्लांच्या संगोपनात नराचा काहीही वाट नसतो. या सर्व प्राण्यात पिल्लांना उपजत बुद्धी असते ज्याने ते आईचे दुध पिणे थांबवल्यावर स्वतः चे अन्न वासाने शोधू आणि खाऊ शकतात. मानव प्राण्यात बालकाचे बालपण जवळ जवळ १६ वर्षे असते आणि या काळात बालक स्वतःचे पोषण करू शकत नाही. एवढा लांब कालावधीत मुलाची काळजी आईने घेणे हे फार कठीण आहे. यास्तव निसर्गाने संभोग हा अतिशय सुखकारक अनुभव केला आहे. मानवात जर स्त्रीसुख हे इतके सुखदायी नसते तर बहुसंख्य पुरुषांनी लग्नच केले नसते. god has linked procreation with recreation otherwise most men would not have married. मानवात संभोग हा केवळ पुनरुत्पादनासाठी च नव्हे तर बहुतांशी सुखासाठी केला जातो. समाजाने लग्न संस्था निर्माण केली आहे कारण पुरुषाला सम्भोगसुख हे सहज आणि सुलभतेने उपलब्ध होते आणि स्त्रीला आणि बालकांना एक सुरक्षित घर आणि आसरा उपलब्ध होतो. जर संततीच्या औरस पणा बद्दल शंका असेल तर पुरुष मुलाच्या वाढीत सहभागी होणार नाही. यास्तव पातिव्रत्य या सारख्या कल्पना आल्या. आपण जर एक गोष्टीचा विचार केला कि जगात एकमेकांशी 'काहीही" संबंध नसलेया मानवी गटात सर्वत्र(UNIVERSAL) लग्नसंस्था उपलब्ध आहे. असो कुत्र्याला दुसर्या कुत्र्यांचा संभोग दाखवला तर त्याला काहीच फरक पडणार नाही कारण कुत्र्याचे उद्दीपन वर म्हटल्याप्रमाणे "वासा"वर असते. दृष्टीवर नसते. म्हणूनच रस्त्यावर कुत्र्यांचा संभोग होत असताना इतर नर त्या "वासा"मुळे आशाळभूत पणे घुटमळताना दिसतात पण माद्या दिसत नाहीत. हीच परिस्थिती इतर प्राण्यांची आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर
स
संदीप डांगे Tue, 01/26/2016 - 16:47 नवीन
बाकी सर्व ठिक आहे. पण.. समाजाने लग्न संस्था निर्माण केली आहे कारण पुरुषाला सम्भोगसुख हे सहज आणि सुलभतेने उपलब्ध होते आणि स्त्रीला आणि बालकांना एक सुरक्षित घर आणि आसरा उपलब्ध होतो. जर संततीच्या औरस पणा बद्दल शंका असेल तर पुरुष मुलाच्या वाढीत सहभागी होणार नाही. यास्तव पातिव्रत्य या सारख्या कल्पना आल्या. आपण जर एक गोष्टीचा विचार केला कि जगात एकमेकांशी 'काहीही" संबंध नसलेया मानवी गटात सर्वत्र(UNIVERSAL) लग्नसंस्था उपलब्ध आहे. ह्याबद्दल आपण दिलेली कारणमिमांसा योग्य नाही. लग्नसंस्था व पातिव्रत्य ह्याचा आपण संभोगसुखाशी लावलेला संबंध पुरेसा वाटत नाही. निसर्गाने दिलेल्या देणग्या आणि समाजाने लग्नसंस्था निर्माण करून त्याची लावलेली वाट ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लग्नसंस्था आणि संभोगसुख ह्याचा संबंध नाही. तर संपत्तीचा वारस व लग्नसंस्था याचा सरळ संबंध आहे. मादी मिळवण्याच्या इतर प्राण्यांमधे व मनुष्यामधे असलेल्या पद्धतीतला फरक बघता एक गोष्ट लक्षात येते ती ही की इतर प्राण्यांमधे सक्षम नरालाच मादी मिळते, मनुष्यात 'सक्षम नर' ही संज्ञाच स्पष्ट नाही. मादी मिळवण्यासाठी इतर नरांशी युद्ध, स्वतःचे शरिर अधिक सुंदर करणे, उत्कृष्ट घर बांधणे इत्यादी प्रकार नाहीत. (मादीच्या मागे मागे फिरणे हे असले तरी ते खात्रीलायकरित्या मादी मिळण्यातच यशस्वी होईल असे नाही. एखादेवेळा मादी फसून संभोग होईलही पण लग्नास लायक असा तो नर नसेल तर कायम सुख अशक्य असते.) लायक नर नैसर्गिकरित्या निवडल्या जाणे व मादिने त्यास पसंती देऊन संग करणे हे होत नाही. हे का होत असावे बरे...? माझ्या मते मनुष्य समाज दुर्बलांनाही संधी मिळावी ह्या विचारावर चालतो. कळपात एखाद्या नराचीच चलती असते. त्याला सर्व माद्या उपलब्ध असतात. त्याची मोनोपोली तोडायची असेल तर इतर नरांस त्याच्याशी द्वंद्व करावे लागते अथवा आपला वेगळा कळप तयार करावा लागतो. मनुष्याच्या कळपातही आधी असेच असावे, पण जास्त अक्कल व कमी बळ असल्याने त्यावर त्याने सर्वांना संधीची समान उपलब्धता या नावाखाली लग्नप्रकार शोधून् काढला असावा. मादींसाठीच्या भांडणात आपल्याच कळपाची शक्ती कमी होते हेही लक्षात आले असेल. कारण इतर प्राण्यांसारखी मनुष्याची लैंगिक वासना विशिष्ट काळाशी संबंधित नाही. ती २४बाय७ तयारच असते. (ह्यालाही नैसर्गिक कारण आहेच) पुढे स्थिरस्थावर झाल्यावर स्थावर मालमत्ता जमवण्यास सुरुवात झाली. मालमत्तेत सर्वाधिक जीव गुंतलेल्या मनुष्याने आपल्याच वारसाकडे ही मालमत्ता जावी म्हणून आपल्या स्त्रियांना इतर पुरुषांशी समागमास मज्जाव केला, त्यातून पातिव्रत्य जन्मास आले. एकाच पतीशी एकनिष्ठ राहणार्‍या स्त्रीस प्रतिष्ठा मिळू लागली. अनेक स्त्रियांशी संबंध ठेवणार्‍या पुरुषास प्रतिष्ठा होती. काही आदिवासी जमातींमधे, 'गोटूल' प्रथेत लग्न हा प्रकार होण्याआधी अनेक पुरुषांशी संग करण्यास स्त्रीला मोकळीक असते. काही आदिवासींमधे स्त्रीची गर्भधारणा करण्यास जो यशस्वी होईल त्यास पती होण्याची संधी मिळते. काहींमधे लग्न तर मुलांना मुले होईपर्यंतही टाळली जातात. ज्या समाजाचा स्थावर संपत्ती जमवण्यावर भर आहे अशाच समाजात लग्नसंस्था घट्ट व पातिव्रत्य परमपवित्र मानले जाते असं निरिक्षण आहे. आदिवासींमधे अशी स्थावर स्वामित्वाची भावना नसल्याने व कबिला म्हणजेच एक कुटूंब असे मानत असल्याने त्यांच्या पद्धती आधुनिक म्हण्वल्या जाणार्‍या समाजापेक्षा वेगळ्या आहेत. तसेच लग्न झाले म्हणजे स्त्री वा पुरुष एकाच जोडीदाराशी कायम लॉयल राहिलच याची कोणतीही खात्री लग्नसंस्था देत नाही. लग्नसंस्था ही फक्त खोटी स्वप्ने दाखवून समाजातल्या मुक्त नैसर्गिकपणाला आवर घालून समाजनियंत्रणात ठेवण्यास जन्माला आली आहे. लग्नसंस्था ही समाजातल्या बहुसंख्य असलेल्या दुर्बळांनी संख्येने कमी असलेल्या बलाढ्यांना सामाजिक नियम रुढींच्या नावाखाली निष्प्रभ करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे. उत्तरोत्तर दुर्बळांची संख्या वाढत गेल्याने दुर्बळांची ही व्यवस्थाच नैसर्गिक आहे असे बलाढ्यांनाही वाटायला लागले. असो. या विषयावरही वेगळा धागा काढून लिहिणे गरजेचे आहे. म्हणून म्हटले की आपण घेतलेला विषय समाजाच्या अनेक अंगांना स्पर्श करणारा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मारवा Tue, 01/26/2016 - 08:14 नवीन
सनी लियोनी ची एक मुलाखत वाचलेली होती त्यात तिने तेथील पॉर्न इंडस्ट्री कीती व्यावसायिकतेने मॉडेल्स ना वागणुक पेमेंट इ. देते त्या संदर्भात तिने सांगितलेल होत. ते सर्व अगदी व्यावसायिक प्रोफेशनल म्हणता येईल या रीतीने होत. आता त्यातही तिथेही असेल काही शोषण माहीत नाही मात्र तुम्ही म्हणता तसा आर्थिक भाग असेल. मात्र याला त्या स्त्रीच शोषणच होत असेल अस समजुन शिक्का मारण जरा अतिरेकी विधानच वाटत. ओपन सर्व्हे च्या मताला दणकुन पाठींबा अस लपुन छपुन मी नाही त्यातला कोंडा लावा आतला प्रकार योग्य नाही. अजुन एक जाता जाता तुम्ही तुमच आयडी आडनाव खरें सारख कृपया सीरीयसली घेउ नका नाहीतर तुमची म्हस शोधता शोधता मिपाकरांना खस्ता खाव्या लागतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
माहितगार Tue, 01/26/2016 - 13:03 नवीन
बोकोबा आम्ही उपरोक्त मांडणीतील एका परिच्छेदा बाबत साशंकता शोषण नाही कोठें ? (इथे अवांतर टाळण्याच्या दृष्टीने) स्वतंत्र धागा लेखातून व्यक्त केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा