पॉर्नची गरज आहे का?
पॉर्नची गरज आहे का?
या धाग्याचे मुळ अर्थात अदिती ताइंच्या धाग्यात आहे.
पॉर्न म्हणजे अश्लील साहित्य असे मराठी शब्दकोषात भाषांतर आहे. यात साहित्य म्हणजेच पुस्तके, चित्रे , चित्रफिती आणी चित्रपट असे सर्व साहित्य अध्याहृत आहे.
संस्कृती रक्षक लोकांच्या दृष्टीने "हा" अब्रम्हण्यम असा शब्द आहे. याची गरजच काय पासून यावर संपूर्ण बंदी असावी असे मानणारे लोक आहेत आणी पॉर्न हे सर्व वय, भाषा आणी धर्मियांना सदा सर्वकाळ खुले आणी फुकट असावे असे मानणारा गट हि आहे.
काहींच्या मते हे अब्रम्हण्यम नसले तरीही निरर्थक आहे आणी याची गरज नाही.
सत्य कदाचित या सर्वांच्या मध्ये आहे.
बासनात गुंडाळून माळ्यावर ठेवण्याच्या विषयाचा वैद्यकीय दृष्टीने आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न.
अश्लील साहित्याची गरज पडते(च) का? आणि पडत असल्यास का पडते?
पहिली गोष्ट म्हणजे सेक्स हा विषय मध्य युगापासून गुपचूप अंधारात करण्याचा (किंवा उरकण्याचा) झाला आहे. यामुळे पौगंडावस्थेत आपल्या लैंगिकतेचा खरा शोध तरुण किंवा तरुणींना कसा आणि कुठे घ्यायचा हे समजेनासे होते. याची सुरुवात चावट विनोदातून होते.
त्यातून बायकांची परिस्थिती "कडी लावा आतली आणि मी नाही त्यातली" अशी असते. करावेसे/ पाहावेसे/ ऐकावेसे तर वाटते पण चार चौघात बोलायला लाज वाटते आणि ते पाहताना पकडले गेलो तर आपल्या अब्रूचे धिंडवडे निघतील अशी भीती. थोड्या फार प्रमाणात हीच स्थिती पुरुषांची असते.
अश्लील साहित्य म्हणजे काय? हे काही त्रिकालाबाधित सत्य नव्हे.
म्हणजे जी गोष्ट आज बोलली जाऊ शकते तीच एके काळी अशक्य होती. म्हणजे एके काळी एखाद्या मुलीचा हात सुद्धा हातात घेणे "अब्रम्हण्यम' आणि अश्लील होते. त्यानंतर जोडप्याने मिठी मारणे किंवा चुंबन घेणे हे अब्रम्हण्यम होते. तेंव्हा कमी कपडे घालणे हे फक्त खलनायिका किंवा नायकीण करत असे. आता सिनेमात नायिका जे तोकडे कपडे घालतात ते काही काळापूर्वी सिनेमात वेश्यासुद्धा घालणे अशक्य होते. थोडक्यात काल जे अश्लील होते ते आज राजरोस/ समाजमान्य असू शकते.
मग या अश्लील साहित्याची गरज आताच जास्त का वाटते किंवा आताच जास्त का दिसू शकते? (हा संदर्भ मुख्यत्वेकरून भारताबद्दल आहे.)
काही दशकांपूर्वी मुलगे आणि मुलींची वयात होण्यापूर्वीच आणि स्त्रीपुरुष संबंध काय हे समजण्यापूर्वीच लग्ने होत. त्यामुळे या "विषया"विषयी नाविन्य राहत नसे. शिवाय तेवढे साहित्य सहजपणे उपलब्ध नव्हते आणि असले तरी ते समाजमान्य नव्हते. समाजात दांभिकपणा पण बराच होता.आज नाही असे म्हणवत नाही. अश्लील साहित्य सहज उपलब्ध नव्हते पण बहु भार्या अंगवस्त्र, देवदासी सारख्या प्रथा असल्याने श्रीमंत लोकांना हे सर्व उपलब्ध होते. मात्र स्त्रियांची कुचंबणाच होती.
आता बदलत्या काळानुसार लग्ने उशिरा होत आहेत. मुलगे कमवायला लागेपर्यंत आणि मुली वयात येउन काही वर्षे जाईपर्यंत लग्न होत नाही. परंतु आजही विवाहपूर्व संबंध हे भारतीय समाजाला अमान्य आहेत. विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण तर जबरदस्त असते. या लैंगिकतेला वाट देण्याचे काम अश्लील साहित्य करते.पण एक तर हि गोष्ट चोरून करावी लागते किंवा समाजाच्या रोषाला बळी पडावे लागते.
या साहित्याचा अविवाहित स्त्री किंवा पुरुषांना आपल्या भावना मोकळ्या करण्याच्या दृष्टीने याचा फायदा होऊ शकतो.
पॉर्न आणि फँटसीज निरर्थक आहेत असे ठाकूर साहेब त्या धाग्यात म्हणतात
पण त्यानी लिहिले आहे ती म्हणजे उ. झाकीर हुसेन आणि पं. शिवकुमार शर्मा यांची मैफिल आहे. दोघेही दिग्गज आणि समसमा असतात.
प्रत्यक्ष व्यवहारात मात्र अर्धवटराव आणि आवडाबाई यांची मैफिल असते. दोघांच्या तारा जुळून येण्यास फार कष्ट लागतात. लग्न झाल्यावर चार गुलाबी दिवस संपले कि व्यवहार सुरु होतो. अर्धवट रावांना आवडाबाईचे आणि आवडाबाईना रावांचे "गुण" दिसायला लागतात. मग घरातील कामातून वेळ काढून प्रणय फुलवायचा तर दोघांच्या तर एकत्र जुळल्या पाहिजेत. अभियांत्रिकी भाषेत सांगायचे झाले तर पुरुष पेट्रोल इंजिन सारखे असतात चावी दिली कि चालू. तर स्त्रिया म्हणजे टर्बो चार्जड डीझेल इंजीनासारख्या असतात. पहिल्यांदा ग्लो प्लग लावून इंजिन गरम करायला लागते आणि मग इंजिन सुरु झाले तरीही टर्बो चार्जर १८०० आर पी एम येईपर्यंत चालू होत नाही. पण एकदा टर्बो चार्जर चालू झाला कि मग इंजिन पूर्ण ताकदीने वेग घेते.म्हणजेच स्त्रियांचा आणि पुरुषांचा उद्दीपित होण्याचा कालावधी वेगवेगळा असतो.
वंध्यत्व या विषयात काम करीत असल्याने बर्याच वेळेस या प्रश्नाशी संबंध येतच असतो. मुल होण्यासाठी विशिष्ट वेळेत(२४ तासात) संबंध ठेवणे आवश्यक असते. तेंव्हा रुग्ण पुरुष बर्याच वेळेस अशी तक्रार करताना आढळतात कि डॉक्टर मला तिच्याबद्दल आकर्षण वाटत नाही.( लिंग उत्थान होत नाही ERECTILE DYSFUNCTION--ED). काही लोकांनी हे पण सांगितले कि "सर बायकोच्या जवळ गेलो तर ती थंड गोळ्यासारखी पडलेली असते. तिच्या घामट गार अंगाला हात पण लावावासा वाटत नाही". हे जरी आपल्याला विचित्र वाटत असेल तरीही जर तो माणूस तुम्हाला त्याच्या भावना सांगत असेल तर ते सत्य मानायलाच लागते.अशा माणसाना मग तुम्ही पॉर्न पहा आणि लगेच संबंध ठेवा असे सुचित करावे लागते. ज्यावेळेस माणूस शुक्राणू दान करतो किंवा शुक्राणू तपासणी केली जाते अशा लैब मध्ये बंद खोलीत कुणी पाहत आहे अशा परिस्थितीत पुरुषांना लिंग उत्थान होणे कठीण जाते. अशा ठिकाणी मग अश्लील साहित्य प्रकार उपलब्ध करून द्यावे लागतात.
नवरा बायको मध्ये बर्यापैकी समन्वय असेल तरीही विशाल किंवा विराट महिला असेल तर पुरुषाला आकर्षण कमी होते हि वस्तुस्थिती आहे. बर्याचशा या स्थूल महिला PCOS या आजाराच्या बळी असतात ज्यामुळे त्यांना मुल होत नसते. त्यांना वजन कमी करायला सांगूनहि बर्याच वेळेस ते कमी होत नाही. मग तो नवरा काय करणार? त्याला तर सांगितल्या दिवशी संबंध ठेवणे आवश्यक असते. आणी हे फार यांत्रिक होत जाते. ( एखाद्या कवीस सांगणे कि आत्ता तू उगवत्या सूर्यावर कविता कर).
बायका सुद्धा आपल्या गैर/ विचित्र समजुती आणी पूर्वग्रह घेऊन आलेल्या असतात. बायकांनी संबंधात सुख शोधणे चूक आहे किंवा जे काय करायचे ते पुरुषांनीच करायचे असते आणी बायकांनी थंड पडून राहायचे.
अशी जर स्त्री एखाद्याला बायको मिळाली( दुर्दैवाने याचे प्रमाण खूप जास्त आहे)तर त्या माणसाने कुठे जायचे? स्त्री थंड पडून असेल तर पुरुष तणावाखाली असतो आणि मग त्यातून शीघ्र पतन( premature ejaculation) होते. अशा स्त्रिया नंतर तक्रार करताना आढळतात कि यांना माझ्यात रसच नाही.किंवा अशा बायका नवर्याला टोचून बोलताना दिसतात कि तुम्ही मर्दच नाही. अशा माणसांनी काय करायचे? बायकोच्या जवळ गेले तर थंड गोळ्याशी शृंगार करणे कठीण. शिवाय मानसिक तणावामुळे शीघ्रपतन होईल हि भीती. अशा दुहेरी तणावात असलेला माणूस जेंव्हा पॉर्न पाहतो तेंव्हा त्याला आपल्याला (ERECTILE DYSFUNCTION--ED) नाही हे तर कळून येते. अर्थात याला PARTNER SPECIFIC ERECTILE DYSFUNCTION म्हणतात.
बर्याच वेळेस बरेच दिवस संबंध न ठेवण्याने नवरा बायकोतील संबंध ताणले जातात. त्यात बायको संशयी असली तर तिला सारखे वाटत असते कि पुरुष असून संबंध ठेवायला नाकारतो म्हणजे दुसरीकडे कुठे तरी जाऊन "हलका" होऊन येत असेल. असे होऊ नये म्हणून मग माणसे पॉर्न बघून उत्तेजित होऊन येतात. त्यामुळे संबंध ठेवणे सोपे जाते.
उलट एखाद्याची बायको जास्त सुंदर असेल किंवा वय झाले तरी आपला "फॉर्म" टिकवून असेल तर नवर्याला स्वतःला कठीण जात असेल तरी बायको "हातातून जाऊ नये "म्हणून तिला "सुखात" ठेवणे आवश्यक असते. नवरा आणी बायको यांच्या वयात फार जास्त अंतर असेल किंवा नवर्याला मधुमेह असेल तर त्यामुळेहि ERECTILE DYSFUNCTION होते अशा वेळेस पॉर्न पाहून उत्तेजित होता येते.
एक उदाहरण म्हणून-- मी मुंबईत मोठ्या रुग्णालयात पुरुष वंध्यत्व वर काम करीत असताना झैरे या आफ्रिकी देशातील एका टोळीचा ६० वर्षाचा प्रमुख ERECTILE DYSFUNCTION च्या इलाजासाठी आला होता. मी त्याला विचारले कि आता ६० वयाला तुम्हाला काय हवे आहे त्यावर त्याचे म्हणणे होते कि माझी चौथी बायको १८ वर्षांची आहे मी जर तिला "सुखात" ठेवू शकलो नाही तर ती मला सोडून जाईल. हे अर्थात टोकाचे उदाहरण आहे.
परंतु फार मोठ्या प्रमाणावर पुरुष लिंग उत्थान होत नाही हि तक्रार घेऊन येतात.यात हे कारण मानसिक आहे कि शारीरिक आहे हे जाणण्यासाठी त्यांना एक साधा प्रश्न विचारला जातो कि अश्लील साहित्य पाहिल्यावर लिंग उत्थान होते का? हे जर होत असेल तर तो प्रश्न बहुतांशी मानसिक असतो.
ठाकूर साहेब म्हणतात "पॉर्न पाहात असाल तर त्याची मजा घ्या आणि विसरुन जा. त्यातून फँटसीज वगैरे काही निर्माण करु नका"
असे नाही कारण सर्वांच्या बायका काही सनी लिओन नसतात.बायकोची फिगर ३४- २६-३६ हवी असते. पण असते मात्र ३२ -३६- ४० मग आपल्या बायको बरोबर शृंगार करताना लोक कल्पना विलासाचा आधार घेतात. आपण कोणत्याही नटीशी शृंगार करीत आहोत हि कल्पना करून त्यांना आणी त्यांची बायकोला जर आनंद मिळत असेल तर त्यात गैर काय? अर्थात याला पोर्नच पाहिजे असे नाही. दोन पेग दारू प्यायली कि लोकांचे विमान आकाशात तरंगायला लागते आणी कल्पनाविलास होऊ शकतो.
प्रत्यक्षात स्त्रिया कल्पना विलासात पुरुषांपेक्षा जास्त रमतात. त्यामुळे त्यांना पॉर्नची संबंध ठेवताना "आवश्यकता" भासत नाही. कारण एक तर प्रत्यक्ष संबंधात त्यांचा सहभाग हा सक्रीय नव्हे तर निष्क्रिय असला तरी चालू शकतो. शिवाय पूर्वग्रह आणी गैर समजुतींमुळे पॉर्न हे स्त्रीने पहायचेच नाही अशा पगड्याखाली असत्तात. परंतु प्रत्यक्ष शृंगार करताना डोळे मिटून आपण ह्रितिक रोषन किंवा जॉन अब्राहम बरोबर शृंगार करीत आहोत या कल्पना विलासात रमू शकतात. पण त्यांना विचारले तर ९० % स्त्रिया GUILT ( दोषित्व)मुळे आम्ही कल्पना विलासात रमतो हे अमान्य करतील.
१००% पुरुष पॉर्न बघतात आणी बहुसंख्य( कदाचित १००%)कल्पनाविलासात( FANTASY) रमतात तर बहुसंख्य( कदाचित १००% स्त्रिया कल्पनाविलासात रमतात हि वस्तुस्थिती आहे.
परंतु पॉर्नचे DECRIMINALISATION करणे आवश्यक आहे असे मात्र जरूर वाटते.
हा विषय फार गहन आहे आणी बरेच मुद्दे यात राहून गेले असतील. पण जशी चर्चा पुढे जाईल तेंव्हा आठवेल तसे मी त्यात भर घालेन.
💬 प्रतिसाद
(292)
व
विवेक ठाकूर
Fri, 01/29/2016 - 10:32
नवीन
स्त्रीला आणि तिच्या अपत्याला प्रोव्हाईड करु शकणार्या पुरुषाला नाईलाजास्तव स्त्री जवळ येऊ देते , उत्क्रांतीत याला evolutionary trade off म्हणतात.
काका, निसर्गानं स्री देहाची निर्मितीच जननासाठी केली आहे आणि त्यासाठी पुरुषाची आवश्यकता आहे, त्यात नाईलाज कसला? तसं असतं तर वंध्यत्व असलेल्या स्रीया कमालीच्या आनंदी दिसल्या असत्या.
- Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे
Fri, 01/29/2016 - 10:39
नवीन
पिराताई ,या हो बाहेर पढवलेल्या स्त्रीवादातून ,त्या विक्षिप्त आदीती बाईंसारखे सारखे स्त्री वादाचे उसासे टाकू नका.
लैंगिकता हा फक्त पुरुषांपुरता विषय आणि अधिकार आहे, स्त्रीयांना कामवासना असते या भ्र्माचा भोपळा मी वर शास्त्रीय माहीती व लिंका देऊन फोडला आहे.मिपावरच्या कुणीही माझा मुद्दा खोडू शकलेले नाही यातच सर्व आले.
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Fri, 01/29/2016 - 10:55
नवीन
तुमच्या सर्व प्रतिसदांवर मी उपप्रतिसाद दिलेत आणि तुमचे मुद्दे खोडून काढलेत.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Fri, 01/29/2016 - 11:08
नवीन
छानच बेअरिंग घेतलय हां काका!!
जमतय जमतय!!!
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 01/29/2016 - 14:30
नवीन
याचा अर्थ तुम्हाला कोणी गंभीरपणे घेतलेलं नाही असा होतो हे तुम्हाला कळतंय का? You are not that important!
- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 01/29/2016 - 11:58
नवीन
ओके.काका म्हणतात तेच खरं :)
पण त्या लेस्बियन बायकांचं काय ? का त्या काम काम खेळत असतील? त्यांना बिचाऱ्यांना टेस्टोस्टेराॅनचा सप्लाय पण नाही.सो सॅड. विषय पण नाही. अधिकार पण नाहीत!
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Fri, 01/29/2016 - 12:01
नवीन
हाच तर त्या अमेरिकनानांचा डाव आहे ग! आता बघ ना.. तुला न मला "लैंगिकता" नसतेच ह्याचा पत्ता तरी होता का आपल्याला? बरं झालं काकांनी आपल्या तोंडावर संदर्भ फेकले..
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/29/2016 - 17:40
नवीन
हा मुद्दा ३ वेळा टायपुन खोडला. तो टाकल्याबद्दल हाबिणंदन. =))
- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 01/29/2016 - 12:04
नवीन
अगदी.निरूत्तर केलं =))उद्या सिध्द करुन दाखवा म्हणायचे.
संमं, धाग्याला बूच मारा हो त्याआधी!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 01/29/2016 - 14:55
नवीन
चांगल्या धाग्याचा कचरा करायलेत बा लोक. तरी म्हटलं होतं आधीच त्येंना वेगळा धागा द्या म्हणून. एवढ्या मोठ्या डॉक्टरांचा एवढा अपमान योग्य नाही. बघा, खोडलंय का कुणी त्यांचे म्हणणं. त्येंचे विधान आणि रामबाण. दोहोंनाही तोड नाही राव.
- Log in or register to post comments
श
शलभ
Sat, 01/30/2016 - 20:56
नवीन
+१
हे काकें चे सगळे फाल्तू प्रतिसाद काढून टाका किंवा दुसरीकडे हलवा लोकांना टिपी करायला.
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Sat, 01/30/2016 - 20:04
नवीन
अरे देवा!
पोर्न वरून वंध्यत्व आणि शेवटी लाळ?!
एक मिपाकर म्हणून शरम वाटली आज....
- Log in or register to post comments
न
नूतन सावंत
Wed, 02/03/2016 - 15:58
नवीन
अगदी अगदी. ज्या मिपाचे सदस्य असले पाहिजे असे वाटले होते, ते मिपा राहिलेच नाही.
- Log in or register to post comments
प
पुष्करिणी
Sat, 01/30/2016 - 21:49
नवीन
लाळ :):) .. गडाबडा लोळून लोल!!
- Log in or register to post comments
स
साती
Sun, 01/31/2016 - 05:38
नवीन
लाळ 'पाजणे ' वाचून अगदी ईईईई झालं!
सेक्स नको, लाळ आवर! म्हणायची वेळ.
- Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू
Wed, 02/03/2016 - 12:46
नवीन
आपल्या आवडत्या स्त्रीला प्रणयोत्सुक करण्यासाठी पुरुष तिला पार लारेने लेबाडतोय.. असे चित्र डोळ्यासमोर आले... आरारा....
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 02/03/2016 - 15:19
नवीन
:)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/03/2016 - 17:04
नवीन
आवरा राव =))
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Sun, 01/31/2016 - 08:31
नवीन
केंजळ्यांचा मूळ मुद्दा, स्रीयांना सेक्सड्राईव नसतो, चुकीचा असला तरी चुंबनाची किमया नाकारता येत नाही. इन फॅक्ट, प्रणयात चुंबनामुळे भावनिक सलगी निर्माण होते, आणि त्यामुळेच वारांगना चुंबन घेऊ देत नाहीत. तर मुद्दा असा, की सरळ टेस्टोस्टीरॉन ट्रान्सफर नसेल किंवा न्यूनतम असेल, पण स्री प्रणयक्षम करण्यासाठी आणि पुरुषाला उत्तेजना येण्यासाठी चुंबनाचा रोल निर्विवाद आहे आणि तो पॉर्नच्या कित्येक पटीनं सरस आहे. तस्मात, चुंबनामुळे देहात कोणती संप्रेरकं तयार होतात या विषयी सुबोधजी काही सांगू शकतील का?
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sun, 01/31/2016 - 10:26
नवीन
प्रणयात चुंबनामुळे भावनिक सलगी निर्माण होते, आणि त्यामुळेच वारांगना चुंबन घेऊ देत नाहीत.
जर एत्तदेशीय चलचित्रे पाहून हे मत बनवले असेल तर लैंगिकभावनोत्तेजकसंकेतस्थळावरील शोध-संकेतशब्द बदला.....
आणि जर प्रथमहस्तानुभव असेल तर पुढच्या वेळी जागा बदला.
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Sun, 01/31/2016 - 12:56
नवीन
पण प्रश्न हा आहे :
चुंबनामुळे स्री देहात नक्की कोणती संप्रेरकं तयार होतात ज्यामुळे ती प्रणयोत्सुक होते.
- Log in or register to post comments
स
साती
Sun, 01/31/2016 - 14:14
नवीन
अॅड्रिनल्स (किडनीच्या वर असलेली एक ग्रंथी) अॅड्रिनॅलिन , ब्रेनमधून डोपामिन आणि पिच्युटरीतून ऑक्सिटोसीन रिलीज होतात.
(इफ द कीस इज पॅशनेट इनफ विथ इनफ इनवॉल्वमेंट!)
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Sun, 01/31/2016 - 14:31
नवीन
.
- Log in or register to post comments
स
साती
Sun, 01/31/2016 - 14:32
नवीन
वरच्या चर्चेतले तुमचे बरेचसे प्रतिसाद पटले आणि आवडले.
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Sun, 01/31/2016 - 16:20
नवीन
इफ द कीस इज पॅशनेट इनफ विथ इनफ इनवॉल्वमेंट!
एवढा एकच मुद्दा आहे आणि माझे सारे प्रतिसाद त्या भोवतीच आहेत. पण कुणी सात्विक मेणबत्ती, कुणी फँटसी, तर कुणी रती-मदन, किंवा मग व्यक्तीगत-सीमित अनुभव, जगाला ज्ञान देणे, आउटलायर्स असे कायकाय शेरे मारुन एक चांगली भरकटवली आहे.
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Sun, 01/31/2016 - 16:21
नवीन
.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 01/31/2016 - 16:32
नवीन
इतकं मनाला लावून घेऊ नका हो ठाकूरसाहेब,
चिरंतन सुखावर आपण एक स्पेष्यल धागा काढू आणि तिथे आपले अनुभव, सल्ले, उदाहरणं देऊ. तुमची मते चुकीची आहेत असे कुठेच म्हटलेलं नाही कुणीच. पण आपल्या दोघांचे विचार मांडण्यासाठी वेगळा धागा पाहिजे. तो तुम्ही काढु शकत असाल तर काढा आत्ता, नाहीतर मी काढतो पण मला वेळ लागेल थोडा.
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Sun, 01/31/2016 - 17:10
नवीन
`गेट वेल सून' म्हणाला आहात! मी विषय वाढवला नाही इतकंच काय ते. तुम्ही वेगळा धागा काढा पण किमान प्रतिसाद देतांना विचारपूर्वक दिलात तरी खूप झालं.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 01/31/2016 - 17:24
नवीन
ते वेगळ्या कारणासाठी आहे. मला काय आवडलं नाही हे मी स्पष्ट केलेलं, मला कुठलाही वैयक्तिक सल्ला नको असतांना आपण 'हवाच आहे' ह्या अर्थाने प्रतिसाद देत होतात. तसे नाही हे स्पष्ट करुनही आपण आपला मुद्दा लादत होतात. त्या कारणासाठी तुम्हाला 'गेटवेलसून' बोललो. तो वाद आता संपुष्टात आणायला हरकत आहे का काही की अजून त्यावरच चर्चा करायची इच्छा आहे? तसे असेल तर माझी काही ना नाही. यु मे प्रोसीड.
गैरसमज कोणातही होऊ शकतात. कशामुळेही होऊ शकतात. मिसळपाव हे एक कुटूंब आहे, कुस्तीचे मैदान नाही याची जाणीव मला आहे. इथे कुणाला चितपट करावे या उद्देशाने मी चर्चेत उतरत नाही. त्यामुळे माझे काही चुकले तर मी लगेच कबूल करून मोकळा होतो. इथे विविध क्षेत्रातल्या, विविध स्तरांतल्या अनेक लोकांशी होणारा सहजसंवाद माझ्या दृष्टीने आवश्यक आहे. उगाच वाकड्यात शिरून तो फायदा हातचा घालवणे संयुक्तिक वाटत नाही. तुमचे प्रतिसाद आणि विचार आवडतात म्हणून आताही सर्व विसरून एकत्र काम करायचा मनोदय व्यक्त करायला आलो. क्षणिक वादांसाठी चिरंतन सुख का नाकारावे?
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Sun, 01/31/2016 - 18:13
नवीन
एक हार्दिक सल्ला असं स्पष्टीकरण ही दिलं होतं. आणि कुणी काही सल्ला दिला तरी प्रत्येक जण आपल्या पद्धतीनंच जगतो आणि पटेल तेच स्वीकारतो याची पूर्ण कल्पना आहे. वाकड्यात तुम्ही शिरला होता आणि तुमची चूक निदर्शनाला आणून दिल्यावर तुम्ही धन्यवाद वगैरे म्हणून पुन्हा वर `गेट वेल सून' असा.... (आता याला काय म्हणू?) शेरा मारला होता. वाद वाढवण्यात रस नाही, पण मलाही ज्याचा आहेर त्याला यथेच्छ परत करता येतो इतकंच दाखवून दिलं आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 01/31/2016 - 18:23
नवीन
असो.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 02/02/2016 - 19:14
नवीन
चित्रगुप्त साहेब
आपला हा फोटो अप्रस्तुत आहे. अजिबात पटला नाही.
काही गोष्टी शुचिता म्हणून असतात आणि त्याची सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती अप्रस्तुत असते. जसे आपल्या आई वडिलांचे लैंगिक आयुष्य. जरी ते कितीही खरे असले तरी त्याची सार्वजनिक चर्चा होणे शोभादायक नसते तसेच आपल्या फोटो बद्दल आहे. फोटो सुंदर आहे त्यातील युवती सुद्धा पण येथे धाग्यावर त्याचे प्रदर्शन पटले नाही
- Log in or register to post comments
म
मारवा
Tue, 02/02/2016 - 19:22
नवीन
एरवी जे चित्रकार म्हणुन तुम्ही दिलेल्या चित्रांमध्ये जी तुमची अभिरुची दिसते
म्हणजे जो दर्जा जे सौदंर्य वा कलात्मक मुल्य जे तुम्ही एरवी इतर लेखांत दिलेल्या चित्रांत नेहमी दिसुन येत.
त्यापैकी काहीही वरील फोटोत दिसत नाही.
कदाचित एखाद्या लहरीत आवेगात हे फोटो डकवण घडुन गेलं असाव
असो.
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Tue, 02/02/2016 - 19:42
नवीन
२ तास होऊनही फोटो उडाला नाही ? आश्चर्य आहे.!
- Log in or register to post comments
म
मारवा
Tue, 02/02/2016 - 19:10
नवीन
इथे जी चर्चा सुरु आहे त्यात किमान दोन वर्ग आहेतच.
एक ज्यांना पॉर्न अजिबात आवडत नाही वा पसंत नाही
दुसरा जे त्याच एका मर्यादेपर्यंत समर्थन करतात.
आता हा आपला केवळ चर्चा मात्र धागा आहे प्रात्यक्षिक जस शाळेतही वर्गात धडा शिकवतात मग
मुलांना प्रयोगशाळेत प्रत्यक्ष प्रयोग करण्यासाठी नेतात.
इथे लॅब अपेक्षीत नव्हती
तुम्ही सरळ प्रयोग मांडत आहात ?
याचे प्रयोजन काय भुमिका काय ?
कळले नाही.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Tue, 02/02/2016 - 19:46
नवीन
आता काढा धागा - फोटोची गरज आहे का?
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 02/02/2016 - 19:59
नवीन
नेहमी स्त्रियांचेच असे फोटो का टाकले जातात? चर्चाविषयात पुरुषांची नग्नताही असते ना..?
I am surprised to see this kind of photo here. We open misalpav.com from office, home.. Openely in front of everybody. This kind of stuff will make me rethink about doing so.
If this would have been discussion bout nudity or nude paintings etc, I could have understood such photo as illustration. I do not see any reason to put it here.
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Tue, 02/02/2016 - 20:03
नवीन
अरे अरे.. पिरा शी बाडिस.. काय हे ! खरेसाहेब तुमचं उत्तर मी वाचलं. मी काही मनाशी विचार करुन ते प्रश्न मांडले होते, त्यावर मला चर्चा करायची होती पण केंजळेंच्या दर्पोक्ती नंतर आणि आता हे, इच्छा नाही.
एवढंच म्हणते की कळत नकळत औचित्याला सोडुन आपण बायकांचं ऑब्जेक्टिफिकेशन करत राह्तो , ज्याच्याशी मला आक्षेप आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 02/02/2016 - 20:40
नवीन
सृजा ताई
शंका असेल तर किंवा जास्त वैयक्तिक असेल व्यनि करा
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Tue, 02/02/2016 - 20:42
नवीन
वैयक्तिक नाहीये काही. पण धाग्यावर फार च फाटे फुटतायेत. आपण खरडींमधुन बोलु.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 02/03/2016 - 16:38
नवीन
बेटा इतने भारी शब्द लिखने मे इस्तेमाल करो बोलने मे नहि समझने मे दिक्कत होति है :- उत्पल दत (गोलमाल)
तिथे अमोल पालेकर ने ते ऐकले कि नाहि माहित नाहि पण एका मिपाकराने मात्र ते फारच मनावर घेतलेय.. पहिला अवतार हि तसाच होता आता कलियुगातल्या अवतारात सुद्धा काय तो शब्दसंग्रह (कि शब्दच्छल) काय ति लिखाणाला खोलि...वाह
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/27/2016 - 10:13
नवीन
पॉर्नबद्दल हा सर्वोच्च न्यायालयाचे हे ताजे मत -
सार्वजनिक ठिकाणी पॉर्न बघणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे मानणार्यांसाठी -
http://www.thehindu.com/news/national/freedom-of-speech-does-not-extend-to-watching-porn-in-public-sc/article8285146.ece?utm_source=MostCommented&utm_medium=Homepage&utm_campaign=WidgetPromo
The Supreme Court on Friday said the right to free speech, thought and expression is not “absolute” and does not extend to viewing or compelling to watch porn in a public place.
मूळ विषयाशी थोडेसे विषयांतर -
या वाक्यात ठळक केलेले शब्द महत्त्वाचे आहेत. पॉर्न बघण्याच्या व्यक्तीस्वातंत्र्याप्रमाणेच विशेषत: जेएनयू मधील देशद्रोही घोषणांचे 'विद्यार्थ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य', 'भाषणस्वातंत्र्य', 'बंडखोरीचे स्वातंत्र्य' असे शब्द वापरून समर्थन करणार्यांसाठी हे स्वातंत्र्य absolute नाही हे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6