पॉर्नची गरज आहे का?
पॉर्नची गरज आहे का?
या धाग्याचे मुळ अर्थात अदिती ताइंच्या धाग्यात आहे.
पॉर्न म्हणजे अश्लील साहित्य असे मराठी शब्दकोषात भाषांतर आहे. यात साहित्य म्हणजेच पुस्तके, चित्रे , चित्रफिती आणी चित्रपट असे सर्व साहित्य अध्याहृत आहे.
संस्कृती रक्षक लोकांच्या दृष्टीने "हा" अब्रम्हण्यम असा शब्द आहे. याची गरजच काय पासून यावर संपूर्ण बंदी असावी असे मानणारे लोक आहेत आणी पॉर्न हे सर्व वय, भाषा आणी धर्मियांना सदा सर्वकाळ खुले आणी फुकट असावे असे मानणारा गट हि आहे.
काहींच्या मते हे अब्रम्हण्यम नसले तरीही निरर्थक आहे आणी याची गरज नाही.
सत्य कदाचित या सर्वांच्या मध्ये आहे.
बासनात गुंडाळून माळ्यावर ठेवण्याच्या विषयाचा वैद्यकीय दृष्टीने आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न.
अश्लील साहित्याची गरज पडते(च) का? आणि पडत असल्यास का पडते?
पहिली गोष्ट म्हणजे सेक्स हा विषय मध्य युगापासून गुपचूप अंधारात करण्याचा (किंवा उरकण्याचा) झाला आहे. यामुळे पौगंडावस्थेत आपल्या लैंगिकतेचा खरा शोध तरुण किंवा तरुणींना कसा आणि कुठे घ्यायचा हे समजेनासे होते. याची सुरुवात चावट विनोदातून होते.
त्यातून बायकांची परिस्थिती "कडी लावा आतली आणि मी नाही त्यातली" अशी असते. करावेसे/ पाहावेसे/ ऐकावेसे तर वाटते पण चार चौघात बोलायला लाज वाटते आणि ते पाहताना पकडले गेलो तर आपल्या अब्रूचे धिंडवडे निघतील अशी भीती. थोड्या फार प्रमाणात हीच स्थिती पुरुषांची असते.
अश्लील साहित्य म्हणजे काय? हे काही त्रिकालाबाधित सत्य नव्हे.
म्हणजे जी गोष्ट आज बोलली जाऊ शकते तीच एके काळी अशक्य होती. म्हणजे एके काळी एखाद्या मुलीचा हात सुद्धा हातात घेणे "अब्रम्हण्यम' आणि अश्लील होते. त्यानंतर जोडप्याने मिठी मारणे किंवा चुंबन घेणे हे अब्रम्हण्यम होते. तेंव्हा कमी कपडे घालणे हे फक्त खलनायिका किंवा नायकीण करत असे. आता सिनेमात नायिका जे तोकडे कपडे घालतात ते काही काळापूर्वी सिनेमात वेश्यासुद्धा घालणे अशक्य होते. थोडक्यात काल जे अश्लील होते ते आज राजरोस/ समाजमान्य असू शकते.
मग या अश्लील साहित्याची गरज आताच जास्त का वाटते किंवा आताच जास्त का दिसू शकते? (हा संदर्भ मुख्यत्वेकरून भारताबद्दल आहे.)
काही दशकांपूर्वी मुलगे आणि मुलींची वयात होण्यापूर्वीच आणि स्त्रीपुरुष संबंध काय हे समजण्यापूर्वीच लग्ने होत. त्यामुळे या "विषया"विषयी नाविन्य राहत नसे. शिवाय तेवढे साहित्य सहजपणे उपलब्ध नव्हते आणि असले तरी ते समाजमान्य नव्हते. समाजात दांभिकपणा पण बराच होता.आज नाही असे म्हणवत नाही. अश्लील साहित्य सहज उपलब्ध नव्हते पण बहु भार्या अंगवस्त्र, देवदासी सारख्या प्रथा असल्याने श्रीमंत लोकांना हे सर्व उपलब्ध होते. मात्र स्त्रियांची कुचंबणाच होती.
आता बदलत्या काळानुसार लग्ने उशिरा होत आहेत. मुलगे कमवायला लागेपर्यंत आणि मुली वयात येउन काही वर्षे जाईपर्यंत लग्न होत नाही. परंतु आजही विवाहपूर्व संबंध हे भारतीय समाजाला अमान्य आहेत. विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण तर जबरदस्त असते. या लैंगिकतेला वाट देण्याचे काम अश्लील साहित्य करते.पण एक तर हि गोष्ट चोरून करावी लागते किंवा समाजाच्या रोषाला बळी पडावे लागते.
या साहित्याचा अविवाहित स्त्री किंवा पुरुषांना आपल्या भावना मोकळ्या करण्याच्या दृष्टीने याचा फायदा होऊ शकतो.
पॉर्न आणि फँटसीज निरर्थक आहेत असे ठाकूर साहेब त्या धाग्यात म्हणतात
पण त्यानी लिहिले आहे ती म्हणजे उ. झाकीर हुसेन आणि पं. शिवकुमार शर्मा यांची मैफिल आहे. दोघेही दिग्गज आणि समसमा असतात.
प्रत्यक्ष व्यवहारात मात्र अर्धवटराव आणि आवडाबाई यांची मैफिल असते. दोघांच्या तारा जुळून येण्यास फार कष्ट लागतात. लग्न झाल्यावर चार गुलाबी दिवस संपले कि व्यवहार सुरु होतो. अर्धवट रावांना आवडाबाईचे आणि आवडाबाईना रावांचे "गुण" दिसायला लागतात. मग घरातील कामातून वेळ काढून प्रणय फुलवायचा तर दोघांच्या तर एकत्र जुळल्या पाहिजेत. अभियांत्रिकी भाषेत सांगायचे झाले तर पुरुष पेट्रोल इंजिन सारखे असतात चावी दिली कि चालू. तर स्त्रिया म्हणजे टर्बो चार्जड डीझेल इंजीनासारख्या असतात. पहिल्यांदा ग्लो प्लग लावून इंजिन गरम करायला लागते आणि मग इंजिन सुरु झाले तरीही टर्बो चार्जर १८०० आर पी एम येईपर्यंत चालू होत नाही. पण एकदा टर्बो चार्जर चालू झाला कि मग इंजिन पूर्ण ताकदीने वेग घेते.म्हणजेच स्त्रियांचा आणि पुरुषांचा उद्दीपित होण्याचा कालावधी वेगवेगळा असतो.
वंध्यत्व या विषयात काम करीत असल्याने बर्याच वेळेस या प्रश्नाशी संबंध येतच असतो. मुल होण्यासाठी विशिष्ट वेळेत(२४ तासात) संबंध ठेवणे आवश्यक असते. तेंव्हा रुग्ण पुरुष बर्याच वेळेस अशी तक्रार करताना आढळतात कि डॉक्टर मला तिच्याबद्दल आकर्षण वाटत नाही.( लिंग उत्थान होत नाही ERECTILE DYSFUNCTION--ED). काही लोकांनी हे पण सांगितले कि "सर बायकोच्या जवळ गेलो तर ती थंड गोळ्यासारखी पडलेली असते. तिच्या घामट गार अंगाला हात पण लावावासा वाटत नाही". हे जरी आपल्याला विचित्र वाटत असेल तरीही जर तो माणूस तुम्हाला त्याच्या भावना सांगत असेल तर ते सत्य मानायलाच लागते.अशा माणसाना मग तुम्ही पॉर्न पहा आणि लगेच संबंध ठेवा असे सुचित करावे लागते. ज्यावेळेस माणूस शुक्राणू दान करतो किंवा शुक्राणू तपासणी केली जाते अशा लैब मध्ये बंद खोलीत कुणी पाहत आहे अशा परिस्थितीत पुरुषांना लिंग उत्थान होणे कठीण जाते. अशा ठिकाणी मग अश्लील साहित्य प्रकार उपलब्ध करून द्यावे लागतात.
नवरा बायको मध्ये बर्यापैकी समन्वय असेल तरीही विशाल किंवा विराट महिला असेल तर पुरुषाला आकर्षण कमी होते हि वस्तुस्थिती आहे. बर्याचशा या स्थूल महिला PCOS या आजाराच्या बळी असतात ज्यामुळे त्यांना मुल होत नसते. त्यांना वजन कमी करायला सांगूनहि बर्याच वेळेस ते कमी होत नाही. मग तो नवरा काय करणार? त्याला तर सांगितल्या दिवशी संबंध ठेवणे आवश्यक असते. आणी हे फार यांत्रिक होत जाते. ( एखाद्या कवीस सांगणे कि आत्ता तू उगवत्या सूर्यावर कविता कर).
बायका सुद्धा आपल्या गैर/ विचित्र समजुती आणी पूर्वग्रह घेऊन आलेल्या असतात. बायकांनी संबंधात सुख शोधणे चूक आहे किंवा जे काय करायचे ते पुरुषांनीच करायचे असते आणी बायकांनी थंड पडून राहायचे.
अशी जर स्त्री एखाद्याला बायको मिळाली( दुर्दैवाने याचे प्रमाण खूप जास्त आहे)तर त्या माणसाने कुठे जायचे? स्त्री थंड पडून असेल तर पुरुष तणावाखाली असतो आणि मग त्यातून शीघ्र पतन( premature ejaculation) होते. अशा स्त्रिया नंतर तक्रार करताना आढळतात कि यांना माझ्यात रसच नाही.किंवा अशा बायका नवर्याला टोचून बोलताना दिसतात कि तुम्ही मर्दच नाही. अशा माणसांनी काय करायचे? बायकोच्या जवळ गेले तर थंड गोळ्याशी शृंगार करणे कठीण. शिवाय मानसिक तणावामुळे शीघ्रपतन होईल हि भीती. अशा दुहेरी तणावात असलेला माणूस जेंव्हा पॉर्न पाहतो तेंव्हा त्याला आपल्याला (ERECTILE DYSFUNCTION--ED) नाही हे तर कळून येते. अर्थात याला PARTNER SPECIFIC ERECTILE DYSFUNCTION म्हणतात.
बर्याच वेळेस बरेच दिवस संबंध न ठेवण्याने नवरा बायकोतील संबंध ताणले जातात. त्यात बायको संशयी असली तर तिला सारखे वाटत असते कि पुरुष असून संबंध ठेवायला नाकारतो म्हणजे दुसरीकडे कुठे तरी जाऊन "हलका" होऊन येत असेल. असे होऊ नये म्हणून मग माणसे पॉर्न बघून उत्तेजित होऊन येतात. त्यामुळे संबंध ठेवणे सोपे जाते.
उलट एखाद्याची बायको जास्त सुंदर असेल किंवा वय झाले तरी आपला "फॉर्म" टिकवून असेल तर नवर्याला स्वतःला कठीण जात असेल तरी बायको "हातातून जाऊ नये "म्हणून तिला "सुखात" ठेवणे आवश्यक असते. नवरा आणी बायको यांच्या वयात फार जास्त अंतर असेल किंवा नवर्याला मधुमेह असेल तर त्यामुळेहि ERECTILE DYSFUNCTION होते अशा वेळेस पॉर्न पाहून उत्तेजित होता येते.
एक उदाहरण म्हणून-- मी मुंबईत मोठ्या रुग्णालयात पुरुष वंध्यत्व वर काम करीत असताना झैरे या आफ्रिकी देशातील एका टोळीचा ६० वर्षाचा प्रमुख ERECTILE DYSFUNCTION च्या इलाजासाठी आला होता. मी त्याला विचारले कि आता ६० वयाला तुम्हाला काय हवे आहे त्यावर त्याचे म्हणणे होते कि माझी चौथी बायको १८ वर्षांची आहे मी जर तिला "सुखात" ठेवू शकलो नाही तर ती मला सोडून जाईल. हे अर्थात टोकाचे उदाहरण आहे.
परंतु फार मोठ्या प्रमाणावर पुरुष लिंग उत्थान होत नाही हि तक्रार घेऊन येतात.यात हे कारण मानसिक आहे कि शारीरिक आहे हे जाणण्यासाठी त्यांना एक साधा प्रश्न विचारला जातो कि अश्लील साहित्य पाहिल्यावर लिंग उत्थान होते का? हे जर होत असेल तर तो प्रश्न बहुतांशी मानसिक असतो.
ठाकूर साहेब म्हणतात "पॉर्न पाहात असाल तर त्याची मजा घ्या आणि विसरुन जा. त्यातून फँटसीज वगैरे काही निर्माण करु नका"
असे नाही कारण सर्वांच्या बायका काही सनी लिओन नसतात.बायकोची फिगर ३४- २६-३६ हवी असते. पण असते मात्र ३२ -३६- ४० मग आपल्या बायको बरोबर शृंगार करताना लोक कल्पना विलासाचा आधार घेतात. आपण कोणत्याही नटीशी शृंगार करीत आहोत हि कल्पना करून त्यांना आणी त्यांची बायकोला जर आनंद मिळत असेल तर त्यात गैर काय? अर्थात याला पोर्नच पाहिजे असे नाही. दोन पेग दारू प्यायली कि लोकांचे विमान आकाशात तरंगायला लागते आणी कल्पनाविलास होऊ शकतो.
प्रत्यक्षात स्त्रिया कल्पना विलासात पुरुषांपेक्षा जास्त रमतात. त्यामुळे त्यांना पॉर्नची संबंध ठेवताना "आवश्यकता" भासत नाही. कारण एक तर प्रत्यक्ष संबंधात त्यांचा सहभाग हा सक्रीय नव्हे तर निष्क्रिय असला तरी चालू शकतो. शिवाय पूर्वग्रह आणी गैर समजुतींमुळे पॉर्न हे स्त्रीने पहायचेच नाही अशा पगड्याखाली असत्तात. परंतु प्रत्यक्ष शृंगार करताना डोळे मिटून आपण ह्रितिक रोषन किंवा जॉन अब्राहम बरोबर शृंगार करीत आहोत या कल्पना विलासात रमू शकतात. पण त्यांना विचारले तर ९० % स्त्रिया GUILT ( दोषित्व)मुळे आम्ही कल्पना विलासात रमतो हे अमान्य करतील.
१००% पुरुष पॉर्न बघतात आणी बहुसंख्य( कदाचित १००%)कल्पनाविलासात( FANTASY) रमतात तर बहुसंख्य( कदाचित १००% स्त्रिया कल्पनाविलासात रमतात हि वस्तुस्थिती आहे.
परंतु पॉर्नचे DECRIMINALISATION करणे आवश्यक आहे असे मात्र जरूर वाटते.
हा विषय फार गहन आहे आणी बरेच मुद्दे यात राहून गेले असतील. पण जशी चर्चा पुढे जाईल तेंव्हा आठवेल तसे मी त्यात भर घालेन.
💬 प्रतिसाद
(292)
स
सतिश गावडे
गुरुवार, 01/28/2016 - 19:01
नवीन
खर्या शरीरसंबंधात असमाधानी असणार्या मात्र पोर्नोग्राफीने समाधान मिळवणार्या माणसाच्या कथेवर आधारीत डॉन जॉन नावाचा एक इंग्रजी सिनेमा आहे.
चित्रपट "प्रौढांसाठी" प्रकारातला असून आपापल्या जबाबदारीवर पहावा. :)
- Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे
गुरुवार, 01/28/2016 - 19:58
नवीन
स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह असतो हा फार मोठा गैरसमज आहे, असा गैरसमज सत्तरच्या दशकातल्या अमेरीकन स्त्रीवादी महीलांनी पसरवला आहे.जर पुरुषांना सेक्स ड्राईव्ह असतो तर आम्हाला का नाही ?या इर्षेतून हा प्रकार घडला आहे.कारण काय तर पुरुषांची बरोबरी करणे.
स्त्रीची लैंगिक इच्छा खूप कमी असते ,जवळपास नसल्यात जमा.याचे कारण कामवासनेला कारणीभूत ठरणारं हॉर्मोन टेस्टोस्टीरॉन स्त्रीयांच्या शरीरात अगदी नगण्य प्रमाणात तयार होते. याउलट तरुण पुरुषांच्या शरीरात फार मोठ्या प्रमाणात टेस्टोस्टीरॉन तयार होत असते ,त्यामुळे त्यांचा सेक्स ड्राईव्ह स्त्रीच्या तुलनेत शंभरपटीने जास्त असतो,त्यामुळे पुरुष(नर) नेहमीच् कामोत्सुक असतात, तर स्त्रीया(मादी) रिल्कटंट.
मग स्त्री कामोत्सुक होणार कशी!!!!!!! इथेच निसर्गाने चुंबनाचा मार्ग विकसीत केला आहे,पुरुष आपल्याला व आपल्या अपत्याला प्रोव्हाईड करु रु शकतो या आमिषाने स्त्री पुरुषाकडे अप्रोच होते,नको वाटणारा प्रणय ती सहन करते,प्रणयात जेव्हा पुरुष स्त्रीयांचे प्रदिर्घ चुंबन घेतात तेव्हा त्यांच्या लाळेतील टेस्टोस्टीरॉन हे स्त्रीच्या लाळेत मिसळते व तिथून ते तिच्या रक्तात उतरते व काही काळासाठी वाढलेल्या टेस्टोस्टीरॉन च्या पातळीने ती समागमापुरती तयार होते .ईतर कोणत्याह्ही वेळी स्त्री कामोत्सुक नसते.
त्यामुळे स्त्रीयांची लैंगिकता या भ्रामक समजूती पासून बाहेर् येणे गरजेचे आहे.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
गुरुवार, 01/28/2016 - 20:01
नवीन
Mala kunich sangitla nahi he!! Cheating aahe rao hi...
- Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे
गुरुवार, 01/28/2016 - 20:10
नवीन
पिराताई ,अमेरीकन स्त्रीवादातून बाहेर या!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 01/28/2016 - 20:09
नवीन
अर्रर्रर्र..... देवा! नको ना सिक्रेट बाहेर फोडू.

- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 01/29/2016 - 03:20
नवीन
ठ्ठो =)))))))))
प्रतिसाद आॅफ द मिलेनियम.
या शोधाचे पेटंट घेऊन ठेवा काका.नोबेलच्या वेळी कामाला येईल.
अाता टकाचे कसे होणार या चिंतेत =)))
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
Fri, 01/29/2016 - 04:50
नवीन
अजयातै चुकताय तुम्ही.
टकाचं होईल कसे ही पण टकीचे कसे होणार ते बघायला हवं.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 01/29/2016 - 04:37
नवीन
काका (पासून) मला वाचवा
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 01/29/2016 - 05:01
नवीन
डॉक्टरसाहेब, इतक्या वर्षांची प्रॅक्टीस वाया गेली बघा. तुम्ही लावले का असले शोध? नाही ना? बघाच आता. अब आपका बचना मुष्किलही नहीं नामुमकिन है.
मा.डॉ.श्रीश्रीश्री.१००८.ग्रेटथिंकर यांचे आम्ही फ्यान झालो बुवा. तुमचा पत्ता कट.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 01/29/2016 - 05:08
नवीन
डांगे साहेब
काकासाहेबांची या मुलभूत संशोधनासाठी टाटा मुलभूत संशोधन संस्थेचे(TIFR) मानद प्राध्यापक म्हणून नेमणूक व्हावी अशी शिफारस करण्यात येत आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 01/29/2016 - 05:14
नवीन
आमचे या प्रस्तावास दाबून अनुमोदन. मिपासारख्या टवाळ सायटींवर आपले मौल्यवान संशोधन प्रकाशित करुन वाया घालवण्यापेक्षा टाटामध्ये त्यांच्या संशोधनास योग्य मान-सन्मान मिळेल अशी आम्ही आशा करतो.
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 01/29/2016 - 07:30
नवीन
टाटा त्यांना लगेच "टाटा" करणार नाहीत.
मिपा भाजीबाजारातील
कांदा बटाटा
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 01/29/2016 - 07:13
नवीन
अगदी बरोबर, "लैंगिक"ता फक्त पुरुषांचीच असते त्यामुळे हा शब्द स्त्रियांबद्दल वापरणे गैरलागू आहे. =))
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Fri, 01/29/2016 - 07:21
नवीन
तुम्हाला कल्पना नसेल, ऑरगॅजम ही निसर्गानं, फक्त स्त्री देहाला बहाल केलेली सुपर नॅचरल देणगी आहे. सुपर नॅचरल अशासाठी की निसर्गाला केवळ स्वतःच्या पुनरावृतीत रस आहे आणि त्यासाठी त्यानं सजीवांमधे प्रणयाची योजना केली आहे. ऑरगॅजम आणि जननाचा संबंध निसर्गानं ठेवलेला नाही. तस्मात लक्षावधी स्त्री देह ऑरगॅजम विनाच जीवित कार्य संपवतात, पण निसर्गक्रम चालू राहातो.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे स्त्रीला प्रणयोत्सुक करण्यासाठी, चुंबनाचं महत्त्व अनन्य साधारण आहे. इस्ट्रोजेन या संप्रेरकाचा स्त्रीयांच्या सेक्स ड्रायवमधे मोठा रोल आहे, त्याची लेवल वयपरत्वे कमी होत असली तरी ऑरगॅजम उपभोगलेल्या स्रीयांमधे, प्रणयोत्सुकता वाढल्यानं ते संप्रेरक दीर्घ कालावधीपर्यंत तयार होत राहातं, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे अशा स्त्रीया जीवनाच्या उत्तरार्धातही प्रणयक्षम राहातात. टेस्टोस्टीरॉन हे संप्रेरक स्रीयांच्या ओवरीजमधे तयार होतं आणि ते इस्ट्रोजेन तयार व्हायला मदत करतं. प्रोजेस्टरॉन या तिसर्या संप्रेरकाचा स्त्रीयांच्या सेक्स ड्राइवमधे रोल आहे पण त्यावर संशोधन चालू आहे. सुबोधजींनी वंध्यत्वावर काम केल्यामुळे ते याबद्दल सांगू शकतील.
चुंबनामुळे पुरुष, स्त्रीला टेस्टोस्टीरॉन ट्रान्सफर करतो यात तथ्य नसावं. तरीही चुंबनामुळे स्त्री देहातील संप्रेरक निर्मितीत नक्की काय फरक पडत असावा ही अभ्यासाची गोष्ट आहे.
- Log in or register to post comments
न
नूतन सावंत
Fri, 01/29/2016 - 07:40
नवीन
तुम्ही सेक्सॉलॉजिस्ट आहात का?
- Log in or register to post comments
न
नूतन सावंत
Fri, 01/29/2016 - 07:48
नवीन
हा प्रश्न आधी काकासाहेबना होता.पण पण प्रकाशित होईपर्यंत विठा यांचा प्रतिसाद ये ऊन त्याखाली प्रकाशित झाल्याने दोघांनीही उत्तर द्यावे,अशी विनंती.
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Fri, 01/29/2016 - 09:40
नवीन
नाही. स्त्री देह, तीची मानसिकता आणि भावविश्व, तीचे प्रणय विश्व आणि ऑरगॅजम याविषयी `व्यक्तिगत आणि सीमित' पण अनुभव सिद्ध आभ्यास आहे.
- Log in or register to post comments
न
नूतन सावंत
Tue, 02/02/2016 - 05:54
नवीन
काका माझ्या प्रश्नाचे उत्तर देताहेत का ,याची वाट पाहून हा प्रतिसाद टंकायला घेतला आहे.
विठा,
आणि अशा व्याखिगत आणि सीमित अनुभवावर अवलंबून तुम्ही या विषयातले जागतिक ज्ञान तुमच्याकडे आहे असे भासवताय , याचे नवल वाटते.
तरी तुम्ही वस्तुस्थिती कबूल केली याबद्दल तुम्हाला धन्यवाद.काकाकडे तेही सौजन्य दिसत नाहीये.
मिपासम्पादाकानी याची नोंद घेणे आवश्यक आहे.मिपा इतके सवंग आहे का कि कोणीही यावे नि टपली मारून जावे.
टकासारखे सक्रिय आणि प्रश्न विचारण्यास न घाबरणारे लोक स्वत:च्या शंका विचरू तरी शकतात, पण वाचनमात्र असलेल्यांची किती दिशाभूल होत असेल,याचा विचार व्हायला हवा असे मला वाटते.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 02/03/2016 - 10:23
नवीन
इथे लिहिले असते पण ते अस्थानी होईल...त्यामुळे खवत लिहिले आहे :)
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Wed, 02/03/2016 - 16:29
नवीन
आणि अशा व्याखिगत आणि सीमित अनुभवावर अवलंबून तुम्ही या विषयातले जागतिक ज्ञान तुमच्याकडे आहे असे भासवताय , याचे नवल वाटते.
तुम्हाला आधीच्या प्रतिसादातील चर्चेची कल्पना दिसत नाही, त्यामुळे वाक्यातला उपरोध समजलेला नाही. आणि तुम्ही बहुदा `पण अनुभव सिद्ध आभ्यास आहे' हे वाचलेलं दिसत नाही.
तुम्हाला माहित नसेल, जाणीव एकसमान आहे. त्यामुळेच तर, अत्यंतिक व्यक्तिगत लेवलला, तुम्ही वैश्विक होता असं म्हटलंय (The more & more one becomes personal, one becomes universal). तस्मात, भारतीय स्त्रीचा ऑरगॅजमचा आणि अमेरिकन स्त्रीचा ऑरगॅजमचा अनुभव भिन्न असू शकत नाही. तद्वत, स्री देह बाहेरुन वेगळा दिसला तरी आतून त्याची संरचना समान असते. आणि थोड्या फार फरकानं, स्रीचं भावविश्व, मानसिकता आणि प्रणय विश्व सगळीकडे सारखंच असतं.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 01/29/2016 - 08:07
नवीन
विभावरी शिरुरकर, मास्टर्स अँड जाॅन्सन, झालंच तर सविताभाभी आणि वेलम्मा या सर्वांची एका फटक्यात वाट लावल्याबद्दल काकासाहेबांना हैदोस मासिकाची एक वर्षाची वर्गणी देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. जेपीभौ, किधर हय तुम?
- Log in or register to post comments
स
स्मिता.
Fri, 01/29/2016 - 10:09
नवीन
संपूर्ण चर्चा वाचली पण हा प्रतिसाद वचून जोरजोरात हसायला येतंय =)) =)) =))
- Log in or register to post comments
ख
खटासि खट
Fri, 01/29/2016 - 11:08
नवीन
हंगाशी! आत्ता कसं कामाचं काय तरी आलं. आता ऋषी मुनी, पुराणं, आयतं, बायब्स्ल, मोदी, नेहरू, गांधी, सत्याचे प्रयोग, गोडसे हे आलं की सगळं कसं साग्रसंगीत पार पडेल.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/29/2016 - 02:54
नवीन
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 01/29/2016 - 05:11
नवीन
संपादक मंडळास नम्र नम्र विनंती,
डॉक्टर खरेंच्या इतक्या बिनमहत्त्वाच्या व टुकार धाग्यावर, भंकस करणार्या प्रतिक्रियांमधे श्रीश्रीश्री काकासाहेब यांचे अमूल्य विचार व महान शोध असणे संयुक्तिक वाटत नाही. त्यांच्या शोधनिबंधाचा एक वेगळा धागा काढून द्यावा. जेणेकरुन अभ्यासू आणि विचारी आणि संयत प्रतिक्रिया देणार्या मिपाकरांना त्यावर आपले मत सभ्यतेने मांडता येईल, डॉ. काकासाहेबांशी नीट मौल्यवान चर्चा करता येईल. अशी तमाम अभ्यासू, शांत, संयत मिपाकरांच्या वतीने विनंती करतो.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Fri, 01/29/2016 - 07:00
नवीन
टका.. ज्ञानामृत मिळवण्यासाठी तुझी भिस्त ह्या धाग्यावर आहे होय रे?!!
देव तुझ्या न झालेल्या बायकोचं भलं करो!!!
- Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे
Fri, 01/29/2016 - 07:02
नवीन
माझा प्रतिसाद उपरोक्त चर्चेतील काही मुद्द्यांशी संबंधीत होता ,त्याची खिल्ली उडवन्याचे काहीच कारण नाही,माझा मुद्दा पुर्ण शास्त्रीय आहे.
CHICAGO — Go ahead. Kiss the girl. And you might make it
a wet one, because scientists who are starting to
understand the biochemistry of kisses say that saliva
increases sex drive.
Those in the kissing-science field of philematology are
finding links between kissing and the hormones that affect
coupling, researchers said here today at the annual meeting
of the American Association for the Advancement of
Science (AAAS). And these hormones are one of the keys
to our reproductive success, so there's a link to evolution
and passing on our genes to the next generation.
"There is evidence that saliva has testosterone in it," said
Rutgers University anthropologist Helen Fisher, and
testosterone increases sex drive. "And there is evidence that
men like sloppier kisses with more open mouth. That
suggests they are unconsciously trying to transfer
testosterone to stimulate sex drive in women."
ही घ्या लिंक
http://m.livescience.com/3328-saliva-secret-ingredient-kisses.html
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 01/29/2016 - 07:11
नवीन
अगदी अगदी, पूर्ण सहमत. हे संशोधन होमिओथेरपीच्याही तोंडात मारणारे आहे. सलाम संशोधकांना.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Fri, 01/29/2016 - 07:29
नवीन
ओ ते ठिक आहे हो.. पण मुळात जिथे स्त्रियांना लैंगिकताच नाही तिथे काय कामाची ही संशोधनं...??? फुकट गेले ना माझे वरचे सगळे प्रतिसाद.. सर्व्हे मधली उत्तरं... छ्या...!
- Log in or register to post comments
न
नूतन सावंत
Fri, 01/29/2016 - 07:49
नवीन
++++++१
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Fri, 01/29/2016 - 07:30
नवीन
तुम्ही दिलेली लिंक, फक्त चुंबनातून संप्रेरक संक्रमित होत असण्याविषयी आहे आणि त्यातून स्री प्रणयोत्सुक होते असा सर्वमान्य निष्कर्श आहे. त्या लिंकमधे स्त्रीयांना सेक्सड्राइव नसतो असं म्हटलेलं नाही.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 01/29/2016 - 07:53
नवीन
काकासाहेब
हा निष्कर्ष तुम्ही कुठून काढलात? चुम्बनातून लाळ स्त्रीच्या शरीरात( पोटात) किती जाणार? या लाळेत किती मात्रेत टेस्टोस्टीरॉन असेल आणि त्यातील किती त्या स्त्रीच्या पोटात जाईल आणि त्यातील किती टेस्टोस्टीरॉन पाचकरसातून वाचून शरीरात शोषले जाणार आणि या राहिलेल्या टेस्टोस्टीरॉन मधील यकृतात नाश पावून किती टेस्टोस्टीरॉन मेंदू पर्यंत जाणार आणि ती स्त्री उद्दीपित होणार?
हा एक अव्यापारेषु "शोध" एका मानववंश शास्त्रज्ञाने लावल्याचा दावा २००९ सालचा आहे. असा अणु पासोनी ब्रम्हांडा एवढा होत जाणारा शोध एखाद्या छद्म शास्त्र मासिकात शोभून दिसेल असाच आहे.
"वर त्याला स्त्रीची लैंगिक इच्छा खूप कमी असते ,जवळपास नसल्यात जमा."",नको वाटणारा प्रणय ती सहन करते""काही काळासाठी वाढलेल्या टेस्टोस्टीरॉन च्या पातळीने ती समागमापुरती तयार होते .ईतर कोणत्याह्ही वेळी स्त्री कामोत्सुक नसते." हे मखर लावण्याचे काम आपण केलेत आणि त्यावर माझ्या म्हणण्याला शास्त्राधार आहे हा मुकुटमणी.
बिस्मिल्ला रहिमानुर्राहीम.
pcos या आजारात( हा आजार फार कॉमन आहे) स्त्रियांच्या शरीरात टेस्टोस्टीरॉन वाढलेले असते यामुळेच स्त्रियांचा ओठावर आणि पोटावर लव जास्त आलेली दिसते. मग या सर्व स्त्रिया तर आपल्या म्हणण्यानुसार कामातुर व्हायला पाहिजेत.
असो
आपली विचार सरणी बदलणे कठीण आहे.
- Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे
Fri, 01/29/2016 - 08:54
नवीन
@ सुबोध् खरे, buccal absorption ऐकले आहे का कधी , तुम्हाला डॉक्टर असून माहीती कमी दिसत्येय, पुरुषाच्या लाळेतून ट्रान्सफर झालेले टेस्टोस्टीरॉन स्त्रीच्या buccal mucosa तून थेट रक्तात उतरते...माहीती घ्या जरा.
PURPOSE: As the oral bioavailability of testosterone is
very low because of its high first pass effect, buccal
administration might present a viable alternative. In this
study a buccal bioadhesive tablet was used in order to
sustain the delivery and bypass the liver.
METHODS: Testosterone and testosterone acetate,
propionate, enanthate and decanoate were investigated.
The influence of the concentration of testosterone
(10-50%) and testosterone esters (30%) on in vitro
bioadhesion was investigated. The absolute (i.v.) and
relative (oral) bioavailability of 60 mg testosterone or an
equivalent amount of testosterone ester was determined
in castrated male dogs.
RESULTS: Both the in vitro detachment force and the
work of adhesion decreased gradually with an increasing
amount of testosterone and for an increasing chain
length of the esters, except in the case of testosterone
enanthate. The in vivo results revealed that the
bioavailability of testosterone was significantly higher (p
< 0.05) than that of the esters, which is probably due to
the lower solubility of the esters. The mean absolute
bioavailability of testosterone from the bioadhesive tablet
was 14.1%, while the mean relative bioavailability was
1370%. The buccal administration of testosterone via the
bioadhesive tablet allowed the maintenance of the
plasma level at above 3 ng/ml for 15 to 24 h.
http://www.ncbi.nlm.nih.gov/m/pubmed/8865317/
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Fri, 01/29/2016 - 09:01
नवीन
पण मूळ मुद्दा ` स्त्रियांना सेक्सड्राइव नसतो' हा निष्कर्ष तुम्ही या सर्वातून कसा काढला हा आहे.
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Fri, 01/29/2016 - 09:08
नवीन
तुमचा हा देखिल दावा :
स्त्रीची लैंगिक इच्छा खूप कमी असते ,जवळपास नसल्यात जमा.याचे कारण कामवासनेला कारणीभूत ठरणारं हॉर्मोन टेस्टोस्टीरॉन स्त्रीयांच्या शरीरात अगदी नगण्य प्रमाणात तयार होते.
चुकीचा आहे. स्त्रीच्या कामोद्दिपनासाठी इस्ट्रोजेन संप्रेरक महत्त्वाचे आहे.
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Fri, 01/29/2016 - 09:28
नवीन
ऑरगॅजम विषयी तुम्हाला कल्पना दिसत नाही. स्त्रीच्या सेक्स-ड्राइवची ती सर्वोच्च स्थिती आहे. त्याविषयी मी वरच्या प्रतिसादात लिहीलं आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 01/29/2016 - 16:51
नवीन
@ सुबोध् खरे, buccal absorption ऐकले आहे का कधी , तुम्हाला डॉक्टर असून माहीती कमी दिसत्येय,
साहेब, सोर्बीट्रेट नावाचे औषदहाची एक गोळी छातीत दुखू लागले तर जिभेखाली ठेवायची असते हे प्रथमोपचारात शिकवले जाते त्यासाठी डॉक्टर व्हायची हि गरज नसते.
राहिली गोष्ट आपल्या दाव्याची --पुरुषाच्या लाळेतून ट्रान्सफर झालेले टेस्टोस्टीरॉन स्त्रीच्या buccal mucosa तून थेट रक्तात उतरते...माहीती घ्या जरा.
जरा सावकाशीने उत्तर देतो
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 01/29/2016 - 18:31
नवीन
नक्की कोण, कोणाला प्रतिसाद देतयं??? ;)
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 01/29/2016 - 19:06
नवीन
काकासाहेब
तरुण पुरुषाच्या शरीरात टेस्टोस्टीरॉन ची पातळी ६००-७०० मायक्रोग्राम १०० मिली पर्यंत असते( म्हणजेच ६ मिग्राम एक लिटर मध्ये .
आपल्या वरील दुव्या अनुसार ६० मिलिग्राम च्या गोळीने रक्ताची पातळी ३ नानो ग्राम होते म्हणजेच ६० मिली ग्राम टेस्टोस्टीरॉन स्त्रीच्या मुखात जाण्यासाठी तिला १० लिटर लाळ पाजायला लागेल (रक्त द्रवातील १०० % टेस्टोस्टीरॉन लाळेत उतरते असे गृहीत धरून ). १० लिटर लाळ उत्पन्न करेस्तोवर त्या पुरुषाचा जीव नक्कीच जाईल मग तो स्त्रीला ती लाळ पाजणार काय आणि कसं ?
राहिली गोष्ट तोंडाच्या त्वचेतून शोषण होण्याची -- सगळे तंबाखू खाणारे लोक गुटखा तोंडात धरून ठेवतात गिळत नाहीत कारण तोंडाच्या त्वचेतून निकोटीन रक्तात मिसळते आणि "किक" बसते. म्हणूनच लोक तंबाखू गिळत नाहीत. हे हि माहित असायला डॉक्टर व्हायची गरज नाही.
जाता जाता -- मी नौदलाच्या व्यसन मुक्ती केंद्रात ३ महिने काम केले आहे.
मी अगोदरच म्हणालो होतो कि आपली विचार सरणी बदलणे मला शक्य नाही.
असो
- Log in or register to post comments
अ
अजया
Sat, 01/30/2016 - 04:10
नवीन
=))))
लाळ पाजणार =))))))))
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Sat, 01/30/2016 - 10:15
नवीन
पुरुषाने आधीच ५ लि. कॅन (५ * २ = १० लि.) मधे आपली लाळ काढुन ठेवुन मग पाजत पाजत प्रणयाला सुरुवात केली तर.......
युरेका.....युरेका काकासाहेबांच म्हणण खरं ठरतय ;)
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 01/30/2016 - 04:35
नवीन
डॉक्टरांनी अगदी लाळच आयमिन लाजच काढली. =))
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 01/30/2016 - 04:49
नवीन
हे काकाश्रींचं अजून एक self-contradictory विधान. याचा सरळ अर्थ असा निघतो की स्त्री फक्त अपत्य आणि स्वार्थ याच गोष्टींच्या विचाराने पुरुषाच्या जवळ जाते. आणि जर ते खरं मानलं तर अपत्याची इच्छा तिच्या मनात कशी येते याबद्दल मात्र काहीही सांगत नाहीत काकाश्री. अचानक स्त्रीला साक्षात्कार होतो की काय की आपण गांडूळ किंवा जलव्याल या प्राण्यांप्रमाणे उभयलिंगी नाही आणि त्यामुळे asexual reproduction पूर्णपणे अशक्य आहे?
काहीही हं काकाश्री!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 01/30/2016 - 05:10
नवीन
पुरुष आपल्याला व आपल्या अपत्याला प्रोव्हाईड करु रु शकतो या आमिषाने स्त्री पुरुषाकडे अप्रोच होते
हे तर एक महा धमाल वाक्य आहे. मातृसत्ताक पद्धतीत नेमके काय होत असावे असा प्रश्न पडला. आज जगात करोडो अशा स्त्रिया आहेत ज्या त्यांच्या नवर्याला व अपत्यांना प्रोव्हाईड करत आहेत. कित्येक घरकाम करणार्या बायकांचे नवरे बायकोच्या कमाईवर दारू पितात व माज करतात. अशा स्त्रिया त्या पुरुषांकडे काय प्रोवाईड करतात म्हणून आकर्षिल्या गेल्या देव जाणे. कदाचित त्या स्त्रिया नसून पुरुष असाव्यात असाही काकाश्री शोध लावतील. =))
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sun, 01/31/2016 - 21:37
नवीन
स्त्रीयांना पुरुषांकडे आकर्षण वाटण्याचं हेच मूळ कारण आहे. ते स्त्री देहात हार्डवायर्ड आहे. भावनीक/वैचारीक पातळीवर ते जाणवत नाहि हा भाग वेगळा.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 01/29/2016 - 07:41
नवीन
स्त्री किंवा मादी समुच्चयास सेक्स ड्राइव नसतो!!?? :O काकांचे हे विधान म्हणजे स्वतः ब्रह्मचारी राहून धर्मकार्याला म्हणून ५ पोरे निपजली पाहिजेत असले सल्ले देणाऱ्या धर्मयोद्धयांसारखा वाटतो,
भंकस बाजुला सारता,
गर्भधारणा ही सर्वात मोठी नैसर्गिक ताकद असलेले लिंग म्हणजे स्त्रीलिंग आहे असे वाटते बुआ आम्हाला, नाकतोड्याची एक प्रजाती अशीही आहे जी संभोग झाल्यावर नरालाच खाऊन टाकते! मातृत्वाची नैसर्गिक ओढ़ ज्या लिंगाला आहे (स्त्रीला) तिच्यात काम विषयी अग्रेशन जास्त असणे तार्किक नाही काय?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 01/29/2016 - 09:30
नवीन
काकाश्रींनी एका फटक्यात फॅशन इंडस्ट्री, ग्रूमिंग इंडस्ट्री आणि संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीचीच वाट लावली ते बघा की! जगातल्या कुठल्याही स्त्रीला जर कामेच्छाच नसते तर पुरुष एवढे स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न कशासाठी करतात मग? कुठल्या उद्देशाने पार्लर्स निघाली मग? लोक त्यांचं सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न का करतात? त्याच्यामागचा एक हेतू हा भिन्नलिंगी व्यक्तीला आकर्षित करणं हा असतोच असतो आणि जर स्त्रीला लैंगिक इच्छाच नसेल ते ती पुरूषाकडे आकर्षित होणं हीसुद्धा कविकल्पनाच म्हणायला हवी.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Fri, 01/29/2016 - 09:47
नवीन
अहो भ्रम आहेत ते सगळे भ्रम...
तिकडे अमेरिकेतुन सांगितलं की सगळे येडे लागले मार्गाला...
एक किस दिला की झालं सगळं काम.. किस केलं की नसलेल्या भावना तात्पुरत्या यायला लागतात.. म्हणुन मग ते प्रणय वगैरे सगळं.. बाकी बायका नाही हो तसल्या...
आता फक्त त्या पुरुषाला किस घ्यायला तरी जवळ का येऊ देतात हाच एक प्रश्न काकांनी सोडवला की झालं!
- Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे
Fri, 01/29/2016 - 09:57
नवीन
आता फक्त त्या पुरुषाला किस घ्यायला तरी जवळ का येऊ
देतात हाच एक प्रश्न काकांनी सोडवला की झालं!>>>>>>>>>>>>>>>>
याचे उत्तर दिले आहे, स्त्रीला आणि तिच्या अपत्याला प्रोव्हाईड करु शकणार्या पुरुषाला नाईलाजास्तव स्त्री जवळ येऊ देते , उत्क्रांतीत याला evolutionary trade off म्हणतात.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Fri, 01/29/2016 - 10:20
नवीन
पण मग ते सोलह साल की उमरका प्यार.. कुणाला तरी बघुन होणारी धडधड.. वगैर वगैरेच काय?
आणि पोरं बाळं झाल्यावरही काही चावट्ट बायका गंगेसारखं निघुन जायचं सोडुन नवर्याच्या प्रेमात वगैरे असल्या सारख्या काय वागतात.. सेकंड हनिमुनला काय जातात.. त्याचं काय???
काका तुम्ही संस्कृतीला वाचावायला हवं.. अमेरिकन लोकांच्या मागे लागुन ह्या बायकांना अस्तित्वात नसलेल्या जाणवत आहेत.. घोर कलियुग!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »