क्रिडा जगत

कुणी प्रो कबड्डी फॉलो करत आहे का ?

Primary tabs

सॅफ स्पर्धेमुळे बरेच महत्वाचे खेळाडू प्रो कबड्डी मधल्या पुण्याचा मॅचेस खेळणार नाही आहेत असे वाचले मटा मधे.. कुणाला अधीक माहिती आहे का ?

कपिलमुनी

पलटणने खेळाडूना विश्रांती देउन सेमी साठी उत्तम तयारी केली आहे

गणेशा

हो मॅच मस्त झाली.

आणि कालचीच नाही तर ..पुण्याच्या बर्याच मॅच अटीतटीच्या झाल्या.
पटना .. बंगाल .. पुणे .. मुंबई यांचे सर्व सामने खुप मस्त वाटले ..

तेलगु .. बंग्लोर .. जयपुर ने खुप निराशा केली .

दिल्लीचा काशिलिंग सोडला तर तसेही कोनी आवदत नव्हते .. पण सिल्व्हामनी पण चांगला खेळतो .. मात्र कॅप्टन्शिप नाहीये चांगली

नाना स्कॉच

मित्रहो कोणी ऑफिशल टी शर्ट्स बद्दल मदत करा न मित्रहो :)

मुंबई जिंकावी वाटत होती. बॉडी ल्यांगवेज पटनाची भारी होती. खेळही भारी झाला. मुंबई चा देवाडिगा, आणि तो फातेअली अपयशी ठरले. शेवटच्या दिड मिनिटापर्यंत मुंबई जिंकेल असे वाटले होते पण दोन चुका झाल्या आणि अटीतटीचा सामना मुंबई ने स्वत:घालवला.

-दिलीप बिरुटे

साधा मुलगा

अंतिम सामानाही सुंदर झाला, मुंबईने अगदी शेवटच्या मिनिटाला सामना घालवला.