Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ४

ज
जेपी
Tue, 03/15/2016 - 05:53
🗣 206 प्रतिसाद
http://www.misalpav.com/node/32572 भाग २ http://www.misalpav.com/node/34076 भाग ३ **************************************************** मागील भागात १०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्यामुळे हा नवा धागा काढत आहे. **************************************************** प्रश्न - आपल्याकडे जलव्यवस्थापना बद्दल शिक्षण / प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम उपल्ब्ध आहेत आहेत का ? असे अभ्यासक्रम कुठल्या संस्थेत उपल्ब्ध आहेत त्याची थोडक्यात महिती मिळेल का ? (उदा.संस्थेचे नाव,ठिकाण्,अभ्यासक्रम) ======================================================================= प्रतिसादासाठी धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
40895 वाचन

💬 प्रतिसाद (206)
आ
आनन्दा Tue, 03/15/2016 - 05:55 नवीन
आयला आधी नुस्तेच भाग-४ एव्हढे वाचले. मला वाटले कन्हैयाचा भाग-४ खरेच आला की काय?
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 03/15/2016 - 07:31 नवीन
धागा क्र ३ वर विचारलेला (आणि अनुत्तरित राहिलेला) प्रश्न पुन्हा इथे विचारतो. आस्थापनांनी (दुकान, हॉटेल ई) स्थानिक भाषेत नामफलक लावणे बंधनकारक आहे (म्हणजे महाराष्ट्रात मराठीतून सोबत इतर भाषेतून लावू शकतातच पण मराठी सक्तीचे) आता या नियमाची /कायद्याची अंमलबजावणी करणे हे कोणाचे कर्तव्य आहे ? मागे मी PCMC च्या संकेतस्थळावर दोन हॉटेल्सची तक्रार छायाचित्रांसकट टाकली होती मात्र ही गोष्ट PCMC च्या अखत्यारीत येत नाही असा शेरा देत ही तक्रार बंद करण्यात आली. या संदर्भात कुणाकडे (मनसे सोडून) तक्रार करावी याचे कृपया नेमके मार्गदर्शन करावे
  • Log in or register to post comments
भ
भाते Tue, 03/15/2016 - 08:27 नवीन
राजकीय पक्ष किंवा सरकारी खात्यांकडे अधिकृत तक्रार करण्यापेक्षा मिडिया / सोशल मिडिया चा आधार घ्या. कदाचित काम होईल. महाराष्ट्र टाइम्सचे मटा रिपोर्टर वापरून तुम्ही तक्रार करू शकता. निखिल वागळेच्या महाराष्ट्र१ वाहिनीवर कायअप्पा मार्फत तक्रार करता येते. तक्रार योग्य वाटल्यास आणि त्याला प्रसिध्दी मिळाल्यास संबंधित यंत्रणा त्यावर कदाचित कारवाई करतील. बातमी प्रसिध्द झाल्यावर कदाचित लाजेखातर हॉटेल्सवाले आपणहुन नामफलक बदलतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Tue, 03/15/2016 - 14:36 नवीन
धन्यवाद
निखिल वागळेच्या महाराष्ट्र१ वाहिनीवर कायअप्पा मार्फत तक्रार करता येते.
क्रमांक मिळू शकेल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
भ
भाते Tue, 03/15/2016 - 18:32 नवीन
७५०६६८५३३२ अधिक माहितीसाठी हे पहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Tue, 03/15/2016 - 14:38 नवीन
पण कारवाई करण्याचे अधिकार (वा जबाबदारी) अधिकृतरित्या नेमके कुणाकडे आहेत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
प
प्रदीप साळुंखे Tue, 03/15/2016 - 09:49 नवीन
जलव्यवस्थापन
  • Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Tue, 03/15/2016 - 10:03 नवीन
जिज्ञासा-------- ----- ------- ---------झी मराठीला कलर्स मराठी आवरटेक करेल का???
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Tue, 03/15/2016 - 15:56 नवीन
M.Tech. Civil Engineering(Water Management) http://www.sggs.ac.in/node/47 कधीकाळी माझा विचार पण होता हा अभ्यासक्रम करायचा
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Tue, 03/15/2016 - 17:50 नवीन
स्लाऊ (Slough) मध्ये कोणी मिपाकर राहतं का? लँग्ली, मेडनहेड, विंडसर वगैरे आजूबाजूच्या भागातलंही चालेल.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/17/2016 - 18:45 नवीन
पिंक टाकणे* या वाक्प्रचाराची व्युत्पत्ती काय असावी? * प्रत्यक्षात पिंक टाकणे अभिप्रेत आहे, मताची पिंक नव्हे.
  • Log in or register to post comments
झ
झेन Fri, 03/18/2016 - 10:41 नवीन
वर्तमान पत्रात बऱ्याचदा चंदनाची झाडे सराईत चोरट्यांनी चोरल्याचे आपण वाचतो, मला हे समजत नाही की आपल्याकडे सागाप्रमाणे किंवा इतर पिकांप्रमाने चंदनाची शेती करणे का अधिकृत नाही आणि हा कुठला न्याय तूमच्या जागेत तूम्ही चंदन वाढवा पण मालकी सरकारची
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Fri, 03/18/2016 - 11:35 नवीन
हा प्रश्न मलाही कधीकाळी पडला होता. पण तुमची शंका वाचेपर्यंत पाठपुरावा केला नव्हता. मुळात चंदनाची शेती करणे का अधिकृत नाही आणि तूमच्या जागेत तूम्ही चंदन वाढवा पण मालकी सरकारचीहे गृहीतक खरं आहे का? या दुव्यानुसार नसावं. त्या संस्थळातील जाहिरातीचा भाग सोडला आणि इतर माहिती खरी आहे असं मानलं तर निदान गुजरात राज्यात तरी चंदनाच्या लागवडीची मालकी शेतमालकाकडे असते, सरकारकडे नाही. बिझिनेस स्टँडर्ड मधील या अन्य वृत्तानुसारही अशी चंदन लागवड करणं आता शक्य आहे.Till recently, there were severe restrictions on cultivation of sandalwood. If it happened to come up, the plant became the property of the state. The restrictions have been relaxed; cultivation is now allowed and one may apply for a government subsidy for doing so. बर्‍याच मोठ्या खाजगी कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत असं या लेखानुसार दिसतं. लागवडीची मालकी सरकारची नसली तरी the sector was under strict government control; the wood can still be sold only through government auctions anywhere असा उल्लेख लेखात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन
ज
जेपी Fri, 03/18/2016 - 13:20 नवीन
चंदनाची लागवड बेकायदेशीर नाही.सात बारा वर नोंद करावी लागते.मालकी शेतकर्याची असते सरकारची नाही. पण योग्य भावा(जो फक्त गाभ्याला मिळतो) बरीच वर्ष लागतात.यास्तव लागवड कमी असते. त्याचा फायदा चोर घे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
उ
उगा काहितरीच Fri, 03/18/2016 - 11:39 नवीन
एका माजी शेजारच्या घरी होतं एक चंदनाचं झाड . साधारणपणे १०-१५ फूट उंच होतं आणी एक दोन वीत असेल खोडाची जाडी. पण सुगंध वगैरे काही येत नसे. एके रात्री चोरट्यांनी अगदी जमिनीपासून कापून नेले. आता हे झाड लावणे इनलिगल असते का नाही माहीत नाही. अवांतराबद्दल क्षमस्व!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन
न
नाव आडनाव Fri, 03/18/2016 - 13:32 नवीन
पण सुगंध वगैरे काही येत नसे. झाडाचा नाही, खोड कापल्या नंतर त्याच्या गाभ्याचा येतो वास. ते पण जर झाड मोठं आणि जुनं असेल तरंच. चोरी शक्यतो रात्री होते. झाड लावणं इल्लिगल असं काही नसतं. काही लोक लावतही असतील पण बर्‍याचदा झाड उगवलेलं असतं. आमचं पण एक झाड गेलं होतं चोरीला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
क
कपिलमुनी Fri, 03/18/2016 - 17:51 नवीन
चोर खोडाला ड्रिल करुन आधी गाभा तपासतात मगच कापायचे कष्ट घेतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
म
मराठी कथालेखक Mon, 03/21/2016 - 08:25 नवीन
मी एकदा Ebay वरुन चंदनाच्या सुमारे १०-१५ (नक्की आकडा आठवत नाही) बिया मागवल्या (खर्‍या होत्या की नाही माहित नाही) , वेगवेगळ्या ठिकाणी लागवड करुन पाहिली पण एकही बीज रुजले नाही. सहज म्हणून मी हे आमच्या एका नातेवाईकांना सांगितले. हे नातेवाईक खेड्यात राहतात, त्यांची शेती आहे (चंदनाची लागवड मात्र करीत नाहित). पण त्यांनी सांगितले की चंदनाचे बी असे रुजत नाही. त्यांच्या ते बी पक्ष्याने खाल्ले आणि त्याच्या विष्ठेतून सांडून जमिनीवर पडले तर रुजते. यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. १) हा समज खरा आहे कि खोटा माहित नाही २) पण खरा असेल तर पक्ष्याच्या (यात कोणते पक्षी सामाविष्ट आहेत ते आधी बघायला हवे) विष्ठेत मिसळू पर्यंत वा मिसळल्यावर बिजावर काय परिणाम होतो , तसाच परिणाम इतर काही प्रकारे (कृत्रिमरित्या) साधता येईल का ? ३) तसा परिणाम कृत्रिमरित्या साधता येत नसल्यास पक्ष्या ऐवजी प्राण्यांच्या विष्ठेतून हा परिणाम साधता येईल का ?(पक्ष्यांपेक्षा पाळीव कुत्रा, मांजर, गुरे यांच्या विष्ठेच्या जागेबद्दल जास्त खात्री असल्याने आणि या प्राण्यांना मुद्दाम बिया खाऊ घालणे सहज शक्य असल्याने पक्ष्यांपेक्षा त्यांचा अधिक चांगला उपयोग होवू शकतो) पण अगदी किंमत पडून चोरी थांबली जाईल इतक्या मोठ्या प्रमाणावर चंदनाची झाडे लागवड होईपर्यंत चंदनाच्या शेतीत कुणी गुंतवणूक करणार नाही (चोरीच्या भितीमुळे). आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर चंदनाची शेती होईपर्यत चोरी थांबणार नाही. थोडक्यात हे दुष्टचक्र भेदणे कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन
म
मराठी कथालेखक Mon, 03/21/2016 - 08:27 नवीन
त्यांच्या मते बी पक्ष्याने खाल्ले आणि त्याच्या विष्ठेतून सांडून जमिनीवर पडले तर रुजते.
असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
उ
उगा काहितरीच Mon, 03/21/2016 - 21:42 नवीन
(पक्ष्यांपेक्षा पाळीव कुत्रा, मांजर, गुरे यांच्या विष्ठेच्या जागेबद्दल जास्त खात्री असल्याने आणि या प्राण्यांना मुद्दाम बिया खाऊ घालणे सहज शक्य असल्याने पक्ष्यांपेक्षा त्यांचा अधिक चांगला उपयोग होवू शकतो)
पक्षी बी गिळतात , प्राणी चावतात त्यामुळे प्राण्याच्या विष्ठेतुन आलेल्या बी पासून झाड निघणे अवघड आहे.पण मला वाटते की असेल दुसरी पण काही तरी पद्धत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मोदक Tue, 03/22/2016 - 05:24 नवीन
सहज आठवले म्हणून.. जगातली सर्वात महाग कॉफी. https://en.wikipedia.org/wiki/Kopi_Luwak
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
म
मराठी कथालेखक Tue, 03/22/2016 - 07:37 नवीन
मला वाटते गुरे अन्न फारशी चावत नाहित. शिवाय ते बी फारसे मोठे नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
भ
भाऊंचे भाऊ Wed, 03/23/2016 - 10:19 नवीन
भागवतात वरणन आहे की राम वनवासी असताना भरत त्याच्या जेवणासाठीचे धान्य गाइला खायला घालत असे व तिच्या विष्ठेतुन ते बाहेर आल्यावर त्यावर प्रोसेस करुन त्याचे सेवन करत असे.. धन्य तो बंधु... असो रामायणात त्याच्यावर अन्याव झालेला नसल्याने मुद्दा इतकाच चर्चेत ठेउया की शक्य आहे विष्ठेतुन बाहेर येणारे पचलेले बी रुजणे नक्किच शक्य असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
स
सुनील Wed, 03/23/2016 - 10:39 नवीन
धन्य ते भागवत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
प
प्रचेतस Wed, 03/23/2016 - 12:23 नवीन
कुठल्या स्कंधात हा संदर्भ आहे सांगा ना दादूस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
H
hmangeshrao Wed, 03/23/2016 - 17:54 नवीन
भागवतातल्या वरणात भरताचं वांगं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
म
मितभाषी Fri, 03/25/2016 - 05:07 नवीन
चक्क रामायणातले संदर्भ आहेत. मग शंका नको. बोलो प्रभू सियावर रामचंद्रकी जय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao
र
राही Mon, 04/18/2016 - 19:00 नवीन
मॉरिशस बेटावर बाहेरच्या जगापेक्षा वेगळे आणि एकमेव असे जैववैविध्य होते. दोदो पक्षी हादेखील मॉरिशसच्या जैववैविध्यातला एक प्रकार. मॉरिशसमध्ये एक प्रकारचे वृक्ष (Tambalacoque) असेच दोदो पक्ष्याच्या साहाय्याने रुजत असत. दोदो पक्षी या झाडाची फळे खात. त्यांच्या पचनसंस्थेत ह्या फळांच्या बिया रुजण्यायोग्य होत आणि दोदो पक्ष्याच्या विष्ठेतून बाहेर पडल्यावर जमिनीत रुजत. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला मानवाचा पहिला स्पर्श पोर्ट्युगीज़ांच्या रूपाने मॉरिशसला झाला. पोर्ट्युगीज़ांची जहाजे दक्षिण आशियापर्यंतच्या प्रवासात मधला थांबा म्हणून या अनाघ्रात बेटावर थांबू लागली. पन्नास किलो वजनाचा फारसा उडू न शकणारा मांसल दोदो आयता खलाशांच्या जेवणाच्या टेबलावर आला. दोदोची बेसुमार शिकार झाली. बिचारा दोदो. माणसांचा धोका त्याला समजला नाही कारण माणूस हा आपला शत्रू आहे, त्याच्यापासून सावध राहावे हा इन्स्टिंक्ट त्याच्या जीन्समध्ये नोंदलेला नव्हता. नंतर डच लोकांनी इथे गुन्हेगार वसाहत वसवली. त्यांच्याबरोबर खाद्य म्हणून डुक्कर आणि माकडें इथे अवतरली. माकडे कशी आली माहीत नाही, पण आली खरी. जहाजांच्या अन्नसाठ्यात वावरणारे उंदिरही बेटावर उतरले. डुक्कर आणि उंदिरांनी जमीन उकरून उकरून दोदो पक्ष्यांची अंडी शोधून खाल्ली. माकडांनी झाडावर किंवा जमिनीवर स्तब्ध बसणार्‍या उरल्यासुरल्या दोदोंची मारामारी करून त्यांना मारून टाकले. केवळ शंभर वर्षांत दोदो पक्ष्याचे अस्तित्व मॉरिशसमधून आणि जगातून कायमचे पुसले गेले. पण ही कहाणी इथेच संपली नाही. काही वर्षांपूर्वी एका वनस्पतिशास्त्रज्ञाला आढळले की एका विशिष्ट प्रजातीचे (Tambalacoque) वृक्ष फार कमी संख्येत मॉरिशसमध्ये आढळतात. त्यांचे जतन करण्याचे हर प्रयत्न असफल ठरले. त्या वृक्षाच्या फळांच्या बिया काही केल्या रुजेनातच. मग संशोधन करता असे आढळले की ही सर्व झाडे सुमारे तीनशे वर्षे इतकी जुनी आहेत. म्हणजे गेल्या तीनशे वर्षांत या झाडांपासून नवीन झाडे तयार झाली नव्हती. दोदोच्या अस्तकाळाशी हा काल जुळतो. मग अधिक अभ्यासावरून दोदो पक्ष्याचे आणि या वृक्षाच्या प्रजननाचे नाते स्पष्ट झाले. नंतर आता संशोधनान्ती एक दोदोसमान पक्षी प्रजाति आढळली जिच्या पचनसंस्थेत या झाडाच्या बियांवर दोदो पक्ष्यासारख्याच रासायनिक प्रक्रिया होऊ शकतात. या प्रजातीपासून या झाडाच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न यशस्वी होऊ लागले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
झ
झेन Fri, 03/18/2016 - 15:16 नवीन
धन्यवाद बहुगूणी
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 03/21/2016 - 08:37 नवीन
माझ्या फ्लॅटच्या बाल्कनीत फक्त उन्हाळ्यात आणि ते ही दुपारनंतर उन येते. आम्ही कुंडीत रातराणी, जुई , गुलाब ई फुलझाडे लावून बघितली. पैकी रातराणी अजिबात जगत नाही (सतत रोग पडत राहतो, कीटकनाशक फवारुनही फायदा होत नाही). जुई काही काळ बहरली पण त्यानंतर नाही, गुलाबाचेहि तेच. युरिया वा इतर रासायनिक खत वापरुन पाहिले मला कुणी कमी उजेडात, कुंडीत वाढू शकाणार्‍या आणि बहरणार्‍या फुलझाडांबद्दल (शक्यतो सुगंधी आणि बारमाही बहरणारी फुले) माहिती देवू शकेल काय ? केवडा /निशिगंध अशा परिस्थितीत बहरेल काय ?
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू गुरुवार, 05/05/2016 - 08:15 नवीन
अशीच परिस्थिती माझ्या बाल्कनीची आहे. उन येत नाही.. त्यामुळे कितीही फुलझाडे लावली तरी फ़ारतर सहा महिने जगातील. त्यातल्यातात भारतीय मुळ असणारी तर कठिनच. मी प्रयत्न केला, शेवटी थकुन आता फक्त शोभिवंत झाडे लावतोय.. कमी उजेडात वाढणारी उरोपियन झाडे एक वेळ येतील तरी.. उद्या ट्युलिप. ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Fri, 05/06/2016 - 14:35 नवीन
ट्युलिपला सुगंध असतो का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू
क
कंजूस Tue, 03/22/2016 - 02:58 नवीन
तुमची बाल्कनि वायव्येकडे ( north west ) आहे.सोनटक्का लावून पाहा.कितीही कोणतेही खत सूर्यप्रकाशाची वानवा कमतरता भरून काढू शकत नाही.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 03/22/2016 - 07:39 नवीन
सोनटक्का लावून पाहीन. सुगंध असतो का या फुलाला ? बारमाही फुलते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
अ
अजया Wed, 03/23/2016 - 14:54 नवीन
मधुमालतीची कुंडीत उगवणारी जात छान बहरते वसंत ऋतूत आणि वासही छान येतो. बोगनवेलीची कुंडीतली बरीच व्हरायटी मिळेल.वास नाही.पण बाग छान दिसते रंगीबेरंगी. मोगरा उगवेल कुंडीत.पण फुलांची संख्या कमी आणि उन्हाळ्यात फुलं येतील. गावठी गुलाबाला बारा महिने भरपूर फुलं येतात आणि सुगंधी असतात. रातराणीला ऊन आणि पाणी भरपूर लागते.पसरायला जागा पण हवी.नाहीतर छाटत रहावे लागते. तगरीची छोट्या फुलांची जात येते एक.दिसतेही छान आणि कायम फुलं. गुलबक्षी,काटेकोरांटी, सदाफुली ,अबोली पण कुंडीत लावता येतात.कायम फुलं मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक गुरुवार, 03/24/2016 - 19:45 नवीन
धन्यवाद अजया. मधुमालती आणि मोगरा लावून पाहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
क
कंजूस Wed, 03/23/2016 - 15:56 नवीन
होय.सुगंधी असतात फुले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक गुरुवार, 03/24/2016 - 19:46 नवीन
धन्यवाद, सोनटक्का लावून पाहीन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
उ
उगा काहितरीच Tue, 03/22/2016 - 14:13 नवीन
प्लास्टिकच्या बाटलीत मनपाने सोडलेले नळाचे पाणी कुठलीच प्रक्रिया न करता किती दिवसापर्यंत पिण्यायोग्य राहते ?
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Tue, 03/22/2016 - 16:23 नवीन
मनपाच्या पाण्याचं माहीत नाही, आणि मुळात प्लास्टिकची बाटली किती स्वच्छ आणि नवी आहे यावर पाण्याचं 'आयुष्य' ठरावं, पण साधारणत: दोन आठवड्यांत बाटली उघडून पाणी संपवावं असं या दुव्यावर दिसतं. चांगल्या खात्रीशीर कंपनीचं विकत घेतलेलं आणि न उघडलेलं प्लास्टिक बाटलीतील पाणी सहा महिन्यांपर्यंत चांगलं राहू शकतं असं या आणि या दुव्यांवरून दिसतं. (किंचित अवांतरः प्लास्टिकच्या वापराविषयी हेही वाचनीय आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
श
श्रीरंग_जोशी Tue, 03/22/2016 - 16:39 नवीन
आपण स्वतः पाणी भरलं असल्यास त्या बाटलीवर जिथे बराच वेळ ठेवणार आहोत तिथे सुर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यावी. बाटली अपारदर्शक असल्यास सूर्यप्रकाश व हवेच्या संपर्कामुळे निर्माण होऊ शकणार्‍या बुरशीची शक्यता बरीच कमी होते. टीप - मी वर लिहिलेलं शास्त्रियदृष्ट्या १००% अचुक असेल याची खात्री मी देऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
ब
बहुगुणी Tue, 03/22/2016 - 19:21 नवीन
पिण्याच्या पाण्याच्या साठवणीसाठी सूर्यप्रकाशापासून दूर आणि थंड अशा जागेचा वापरच योग्य आहे. विशेषतः पारदर्शक बाटल्या वापरल्यास. याच्या समर्थनार्थ बरेच दुवे शास्त्रीय लिखाणात मिळतील. सध्या हे दोन दुवे: 1. City of Berkeley Water Storage Guide 2. Bottled Water Storage, यात दिल्याप्रमाणे: When water (bottled water or tap water) is exposed to extended periods of direct sunlight or heat sources, algae or mold may infrequently develop. ..... plastic containers – whether used for bottled water or other beverages – are slightly permeable, which may allow ambient air gases such as vapors from household solvents, petroleum-based fuels and other chemicals, to affect the taste and odor of your beverage.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
र
रुस्तम Wed, 03/23/2016 - 10:53 नवीन
co op housing society मध्ये किती रकमे पर्यंत खर्च करताना निविदा (Quotation) मागवावी लागतात. ३०,००० (तीस हजार) रुपयाचे एक काम आहे, तर त्यासाठी निवीदा मागवाव्यात का? कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments
स
ससन्दीप Tue, 04/12/2016 - 17:34 नवीन
कामाचा अपेक्षित खर्च जर रू.10,000 च्या वर असेल तर कमीत कमी 3 निविदा मागवाव्यात. Google : MODEL BYE – LAWS OF COOPERATIVE HOUSING SOCIETY Maharashtra
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुस्तम
र
रुस्तम Wed, 04/13/2016 - 07:22 नवीन
धन्यवाद ससन्दीप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ससन्दीप
न
नाखु Wed, 03/23/2016 - 11:07 नवीन
वर उल्लेख केल्लेया चंदन झाडाबाबत इथे वाचा

चंदन शेती

नाखु मुफ्त चंदनवाला
  • Log in or register to post comments
झ
झेन Wed, 03/23/2016 - 13:07 नवीन
नाखु सलाम तूमच्या अभ्यासाला, चिकाटीला आणि सकारात्मकतेला
  • Log in or register to post comments
न
नाना स्कॉच Wed, 03/23/2016 - 13:45 नवीन
तावातावाने सगळे राजकाराणावर अन समाजावर काथ्या कूटत बसतात आज "शहीद दिवस आहे" सगळेच विसरले??? अरेरे असो!, माझ्यातर्फे तरी मी शहीद भगतसिंह , शहीद सुखदेव थापर अन शहीद शिवराम हरी राजगुरु ह्या तीन शहीदांना आदरांजली वाहतो ____/\____ Image removed.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 03/25/2016 - 05:29 नवीन
सुखदेव म्हणून भगतसिंगाचा फोटो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
उ
उगा काहितरीच Mon, 03/28/2016 - 08:36 नवीन
नेत्रदान केल्यावर तेच डोळे परत दान करता येतात का ? जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत डोळे टिकू शकतात? (समजा अबक व्यक्ती ६० वर्षे जगली. मरणोपरांत नेत्रदान केले . ते कखग या अंध व्यक्तीला बसविण्यात आले , ज्याचे वय २० वर्षे आहे. कखग व्यक्ती ६० वर्षे जगली तर कखग ला पण मरणोपरांत नेत्रदान करता येऊ शकते का ? कारण डोळ्यांचे एकूण वय १०० वर्षे झालं असेल ना. जर असे करता येत असेल तर अबक व्यक्तीचे डोळे जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत वापरता येतील?) मिपावरील डॉक्टरांकडून उत्तर अपेक्षित ...
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा