Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ४

ज
जेपी
Tue, 03/15/2016 - 05:53
🗣 206 प्रतिसाद
http://www.misalpav.com/node/32572 भाग २ http://www.misalpav.com/node/34076 भाग ३ **************************************************** मागील भागात १०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्यामुळे हा नवा धागा काढत आहे. **************************************************** प्रश्न - आपल्याकडे जलव्यवस्थापना बद्दल शिक्षण / प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम उपल्ब्ध आहेत आहेत का ? असे अभ्यासक्रम कुठल्या संस्थेत उपल्ब्ध आहेत त्याची थोडक्यात महिती मिळेल का ? (उदा.संस्थेचे नाव,ठिकाण्,अभ्यासक्रम) ======================================================================= प्रतिसादासाठी धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
40895 वाचन

💬 प्रतिसाद (206)
प
पिलीयन रायडर Wed, 03/30/2016 - 08:29 नवीन
१. वडिलोपार्जित घर आई-वडीलांच्या पश्चात वारसाच्या नावावर करायचे असेल तर कायदेशीर पद्धत काय? (आई वडील हयात नाहीत. मृत्युपत्र केलेले नाही. वारसाचे वय ५५ आहे आणि त्यांना एक बहीण आहे जिचा ह्या घरावर काहीही दावा नाही.) २. ह्यात पुन्हा एकदा स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनची फीस भरावी लागते का? ३. अजुन पुढच्या पिढीला हाच त्रास होऊ नये म्हणुन आत्ताच वारसा सोबत त्याच्या मुलांचीही नावे लागु शकतात का? ४. ह्या संदर्भात महाराष्ट्र सरकारचे जे नियम असतील ते कुठे वाचायला मिळतील का?
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 03/30/2016 - 08:32 नवीन
आणि एकंदरीतच आपली स्थावर जंगम मालमत्ता जास्त त्रास न होता आपल्या पश्चात आपल्या मुलांना मिळावी म्हणुन काय करायला हवे? (म्हणजे माझा फ्लॅट हा माझ्यानंतर आपसुकच माझ्या मुलाला मिळत असतो की त्यासाठी मला तसे काही लिहुन ठेवावे लागते?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
मराठी कथालेखक Wed, 03/30/2016 - 09:45 नवीन
सहकारी सोसायटीत फ्लॅटकरिता समभाग प्रमाणपत्र (शेअर सर्टिफिकेट) मिळते , त्या समभागासाठी नॉमिनेशन (एक वा अधिक वारसांच्या नावे) सोसायटीत द्यायचे असते, पण त्याखेरीज अजून काही करावे लागत असेल तर माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ब
बोका-ए-आझम Wed, 04/13/2016 - 07:15 नवीन
तुमच्या स्वकष्टार्जित/वडिलोपार्जित मालमत्तेचा वारस हा तुमचा जोडीदार असतो, मुलं नाहीत. मुलांना मालमत्ता मिळावी असं वाटत असेल तर मृत्यूपत्र करणे हाच उपाय आहे. जर मृत्युपत्र केलेलं नसेल आणि मृत्यू झाला तर मालमत्ता जोडीदाराकडे by default जाते. रिलायन्सच्या अंबानी बंधूंमध्ये तोच तर वाद होता. धीरूभाई अंबानी मृत्यूपत्र न करता गेल्यामुळे सगळी मालमत्ता कोकिलाबेन अंबानींना मिळाली, जी त्यांनी आपल्या चार मुलांमध्ये वाटली, आणि तीही त्यांना हवी तशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
त
तर्राट जोकर Wed, 03/30/2016 - 09:54 नवीन
ही मालमत्ता कोणत्या स्वराज्यसंस्थेत येते? म्हणजे नगरपालिका, ग्रामपंचायत इत्यादी. त्यानुसार पुढचं सांगता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 03/30/2016 - 10:30 नवीन
महानगरपालिका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
क
कपिलमुनी गुरुवार, 03/31/2016 - 12:10 नवीन
१. बहिणीचे संमतीपत्र लागेल . १०० रु च्या स्टँम्पवर करता येते. २. घर स्वतंत्र आहे की सहकारी सो. मध्ये यावर बरेच बदल होतील ३.पुन्हा ड्यूटी / रजिस्टेशन भरावे लागत नाही ३. स्वतंत्र घर असेल तर हो . ४ माहीत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 03/31/2016 - 12:13 नवीन
घर स्वतंत्र आहे. सहकारी सोसायटी वगैरे नाही. बहीण सही देऊ शकेल. त्यांची हरकत नाही. कुणाला ह्या संदर्भातले नियम कुठे ऑनलाईन माहिती असतील तर कृपया दाखवावे. ज्या वकीलाला हे प्रश्न विचारले तो तर घराच्या सध्याच्या किंमतीनुसार स्टॅम्प ड्युटी / रजिस्ट्रेशन भरावे लागेल आणि त्याच्या % मध्ये वकीलाला फीस द्यावी लागेल असे म्हणत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/31/2016 - 12:27 नवीन
कपिल मुनि म्हणतात ते लिहायला आलो होतो. अधिक माहितीसाठी ही बातमी: http://consumerresources.in/2015/05/21/no-stamp-duty-required-for-transfer-of-property-to-relatives/ रक्ताच्या नात्यातल्या नातेवाईकांकडे मालमत्तेचे हस्तांतरण करतांना कोणती ही स्टँप ड्युटीची गरज नाही. महाराष्ट्र शासनाचा जी आर २०१५ मधे काढलेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 03/31/2016 - 13:46 नवीन
http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Maharashtra-waives-stamp-duty-on-transfer-of-flat-or-land-to-heirs/articleshow/46693819.cms ह्यात हे वाक्य पहा... Immovable property — land, house or flat — can now be transferred to one's children or blood relatives without paying stamp duty for registration....... ....... In other decisions announced in the House on Wednesday, those with 500sq ft or smaller homes do not have to pay the increased property tax and the government will allow twice the transfer of development rights to a landowner in lieu of land surrendered for a public amenity. म्हणजे ५००स्क्वे.फु पेक्षा मोठं घर असेल तर फिस लागु आहे का? की माझा काही घोळ होत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/31/2016 - 12:29 नवीन
तसेच या प्रकरणात कोणी प्रतिवादी (मालमत्तेवर हक्क सांगनारा) नसेल तर वकिलाची काही गरज आहे असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 03/31/2016 - 13:47 नवीन
पण मुळात ज्यांच्या नावावर घर आहे, ते हयात नाहीत. त्यांनी कुठे मृत्युपत्र वगैरे केलेले नाही. म्हणजे आधी हे कसे दाखवायचे की आम्हीच बाबा वारस ह्यांचे? आणि दुसर प्रश्न.. ह्यात आता पुढच्या पिढीचीही नावे लावुन टाकता येतील का म्हणजे परत पुन्हा हीच भानगड नको..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/31/2016 - 15:57 नवीन
मॄत्यूपत्र नसेल व कोणी दावा सांगणारा नसेल तर काही फरक पडत नाही. बरेच लोक मृत्युपत्र न करताच मरण पावतात. वारस सिद्ध करण्याचे कागदपत्र राशनकार्ड व इतर ओळखपत्रे, वारस सिद्ध करणारे जुने दस्तावेज, प्रमाणपत्रे, तलाठ्याची प्रमाणपत्रे, रहिवासी दाखला, वैगरे पुरतील. (माझे ज्ञान ह्याबाबतीत तोकडे आहे. ग्रामपंचायतच्या अखत्यारीत येणारी वारसा प्रकरणे बघितली आहेत. तेवढा अनुभव. पक्की कायदेशीर माहिती तज्ञ देऊ शकतील.) माझ्यामते तरी ही एकदम नॉर्मल केस आहे. तुमचा वकिल फी काढण्यासाठी गोंधळात तर टाकत नाही ना अशी शंका आली? तुम्ही सविस्तर धागा काढलात तर जास्त चांगली मदत होईल व इतरांनाही वारसाहक्क हस्तांतरनाच्या सर्व बाजूंचा उहापोह करणारा एखादा धागा संग्रही ठेवता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ब
बोका-ए-आझम Wed, 04/13/2016 - 07:19 नवीन
मृत्युपत्र नसेल आणि कुणी वारस नसेल तर फ्लॅट सोसायटी ताब्यात घेऊ शकते. आणि तुम्ही जे पुरावे सांगितलेत ते बरोबर आहेत पण त्याला कोर्टात आव्हान देता येऊ शकतं. अगदी टोकाच्या केसेसमध्ये कोर्ट डीएनए तपासणी करुन वारसाहक्क सिद्ध करायला सांगू शकतं. म्हणूनच मृत्यूपत्र करुन सर्व गोष्टी clear करणं महत्वाचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 04/13/2016 - 07:43 नवीन
ह्या प्रस्तुत केसमधे थेट वारस जीवंत आहे व त्यावर प्रतिदावा करणारं कुणी नाही. ह्या स्थितीत फ्लॅट ताब्यात घेण्याचा अधिकार सोसायटीला कसा आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Wed, 04/13/2016 - 14:37 नवीन
वारस नसेल तर असं म्हटलंय ना मी. वारसांना वारस आहोत हे सिद्ध करण्यासाठी एक अॅफिडेव्हिट करावं लागतं बहुतेक. चडकवून सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 04/13/2016 - 14:51 नवीन
ओके. धन्यवाद. प्रश्नकर्त्याने प्रस्तुत केलेली परिस्थिती बघुन माझे उत्तर होते. ते तेवढ्यापुरते मर्यादित असले व जास्त गोंधळ निर्माण करणारे नसले तर बरे असे वाटले होते. मृत्युपत्र आवश्यक आहेच ह्यावर दुमत नाही. पण बरेच लोक ध्यानीमनी नसतांना मरण पावतात. मृत्यूपत्राबद्दल काही गैरसमज व अंधश्रद्धाही जुन्या लोकांमधे आहेत. अशा परिस्थितीत वारसाचे सर्व पुरावे असतील आणि मृत्यूपत्र नसेल तर बहुतेक) हिंदू कोडबिलाप्रमाणे सर्वात जवळच्या व थेट वारसाकडे मालमत्ता हस्तांतरण होते. ह्यास प्रतिदावा करणारे उद्भवले तर मात्र केस कोडतात जाते. कोर्टाच्या पायरीपाशी माझे ज्ञान संपते. इथून पुढे त्या क्षेत्रातले अनुभवी जास्त उपयुक्त माहिती देऊ शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
स
सुबोध खरे Tue, 04/26/2016 - 17:19 नवीन
हिंदू वारसा कायद्याप्रमाणे एखादा माणूस जर मृत्युपत्र न करता गेला तर त्याची संपत्ती बायकोला ५० % आणि इतर ५०% त्याच्या मुलांना विभागून जाते. पत्नी पण हयात नसेल तर ती मालमत्ता सर्व मुलांमध्ये( मुलगा किंवा मुलगी) समान वाटणीने जाते. बहुसंख्य लोक मृत्युपत्र न करता मरतात तेंव्हा वारसांना कोर्टात जाऊन वारस खत करून घ्यावे लागते. वारसांचे कागदपत्र( शाळेचे लिव्हिंग सर्टिफिकेट, दहावी बारावीचे सर्टिफिकेट, रेशन कार्ड ई.) तपासून कोर्ट तसे वारस खत देते यानंतर ती मालमत्ता वारसांना मिळू शकते http://www.holisticinvestment.in/without-will-hindu-succession-act/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 04/26/2016 - 17:32 नवीन
धन्यवाद डॉक्टर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
M
mahayog Fri, 04/08/2016 - 15:29 नवीन
वारस लावण्याकरिता संबंधित तलाठी किंवा प्रोपर्टी कार्ड असेल तर उपाधीक्षक भूमिअभिलेख यांच्याकडे अर्ज करावा. अर्जात मयताचे सर्व वारसांची नावे असणे आवश्यक आहे. यापैकी ज्यांना त्या मिळकतीवर हक्क नको आहे अशा वारसांनी सोबत हक्कासोड पत्र करून द्यावे. वारसांची नावे लावण्याकरिता कोणत्याही स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनची फीस भरण्याची आवश्यकता नाही. आत्ताच वारासांसोबत त्यांच्या मुलांची नावे लावण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कधीही तुमच्या मुलाना मालमत्ता हस्तांतरण करू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
P
palambar Sun, 04/17/2016 - 20:32 नवीन
www.maharashtra.gov.in वर कायदे / नियम विभागात कदाचित कळू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
भ
भीमराव गुरुवार, 03/31/2016 - 12:56 नवीन
एक सरकारी नोकरीचा अर्ज भरत असताना त्यात मराठी भाषा येत असल्या बाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य होते, असे प्रमाणपत्र असते हेच मला पहील्यांदा समजले, हे प्रमाणपत्र कोठे भेटते यासंबंधी कोण मार्गदर्शन करु शकेल काय?
  • Log in or register to post comments
M
mahayog Fri, 04/08/2016 - 15:32 नवीन
दहावीची परीक्षा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक किंवा दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र हा मराठी भाषा येत असल्याचा पुरावा समजाला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव
M
mahayog Fri, 04/08/2016 - 16:44 नवीन
दहावीची परीक्षा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक किंवा दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र हा मराठी भाषा येत असल्याचा पुरावा समजाला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव
म
मराठी कथालेखक Tue, 04/05/2016 - 14:51 नवीन
binaural beats , theta waves , lucid dreaming ई बद्दल कुणी अधिक माहिती देवू शकेल वा धागा काढू शकेल काय ? (जालावरील दुवे वा उतारे देण्यापेक्षा सोप्या शब्दात धाग्यावर टंकल्यास अधिक चांगले)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 04/06/2016 - 13:52 नवीन
ओळखीत एका मुलाचे लग्न झाल्यानंतर एक वर्षात बायकोला टी. बी. झाला आणि त्याकरता तपासण्या करत असताना HIV टेस्ट पॉझिटिव्ह आली. नवऱ्याची केली असता ती निगेटिव्ह आली. वैद्यकीय सल्ल्यानुसार सध्या दोघे वेगळे रहात आहेत. बायको डायवोर्स देत नाही. त्या मुलाला डायवोर्ससाठी कायदा मदत करू शकेल का ?
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Wed, 04/06/2016 - 14:02 नवीन
नक्कीच. दुर्धर (बर्‍या न होऊ शकणार्‍या ) आजाराच्या निमित्ताने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करु शकतो. कायद्यासमोर सर्व बाबी कायदेशीर कागदपत्रांद्वारे सिद्ध होत असल्यास घटस्फोट लवकर मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ब
बोका-ए-आझम Wed, 04/13/2016 - 14:47 नवीन
हा फसवणूकीचा मामला आहे. इथे माहितीच दिलेली नाही. मुलगी HIV +ve अाहे आणि मुलगा -ve याचा एक अर्थ असाही आहे की लग्नापूर्वी असं असल्याची माहिती दिलेली नाही. ही फसवणूक आहे. समजा उलट असतं तर मुलीने घटस्फोट मागितलाच असता की नाही? Mutual Consent किंवा परस्पर सहमतीने घटस्फोट होत नसेल तर कोर्टात जाणे हाच एकमेव उपाय ठरतो आणि कोर्ट फसवणूक हा मुद्दा ग्राह्य मानेल आणि पोटगी द्यावी लागणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 04/13/2016 - 15:05 नवीन
तुमच्या मुद्द्यात तथ्य आहे. पण थोडी गुंतागुंत असु शकते बोकाभाऊ, प्रश्नकर्त्याने इथे पूर्ण केस मांडलेली नाही. इथे काही प्रश्न निर्माण होतात. १. एच आय व्ही पॉझिटीव असणे व एड्स असणे ह्या दोन वेगळ्या वैद्यकिय स्थिती आहेत. इथले डॉक्टर जास्त योग्य पद्धतीने सांगू शकतील. २. प्रस्तुत केसमधली मुलगी ही एच आय व्ही ग्रस्त कशी झाली ह्याचा खात्रीशीर पुरावा व कारणमिमांसा कळायला हवी. कदाचित संक्रमित रक्ताच्या संपर्कात आल्यानेही एच आय व्ही बाधीत झालेली असु शकते. ३. लग्नापुर्वी असुरक्षित लैंगिक संबंध किंवा मुळातच लैंगिक संबंध ठेवणे गैर वा बेकायदेशीर नाही. हा एक संपूर्ण वेगळा विषय आहे. ४. संसर्गबाधीत मुलीस ह्या अवस्थेची लग्नापुर्वी माहिती होती काय हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ५. लग्नानंतर कुणा परपुरूषाच्या संपर्कात येऊन हे झाले असेल तर केस फारच क्लिअर होइल. पण ह्या स्टेजला तुटपुंज्या माहितीवर हे बोलणे अनुचित वाटते. घटस्फोट मिळेल पण केस गुंतागुंतीची होईल जर मुलीने पोटगीसाठी अप्लाय केले तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
स
सस्नेह Mon, 04/18/2016 - 08:42 नवीन
१. सध्या दोघे स्वतंत्र रहात आहेत. त्यमुळे मुलगी एड्सग्रस्त आहे का याची तपासणी करणे अवघड आहे. २. तसेच लग्नाच्या वेळीही मुलगी आजारी होती व लग्नानंतर वर्षाच्या आताच हा प्रकार झाला. त्यामुळे आजाराची सुरुवात कशी झाली हे मुलाच्या बाजूकडील लोकांना सांगता येणे अवघड आहे. मुलीकडचे अर्थातच सांगत नाहीत. ३. मुलीचे लग्नापूर्वी काही लैंगिक संबंध होते किंवा काय हे कळायला मार्ग नाही. ४. वरीलप्रमाणेच. ५. समजायला मार्ग नाही. मुलगा रिक्षा चालवतो त्यामुळे दिवसभर घराबाहेर आणि दोघे स्वतंत्र रहात असल्याने सासू-सासऱ्यांची नजर नव्हती. एकूणच मुलाला यातून कायद्याची मदत, तीही पोटगी द्यावी न लागता होईल काय हा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 04/18/2016 - 09:08 नवीन
कायद्याची मदत होईल व पोटगी न द्यावी लागता होईल. परंतु... ह्यात 'परंतु' आहेच कारण दोन्हीकडचे वकील केस कशी लढतात त्यावर सर्व अवलंबून आहे. मी वर उपस्थित केलेले मुद्दे मुलीचा वकील उपस्थित करेल तर मुलासाठी केस किचकट होईल. अर्थात किचकट, अशक्य नव्हे. अगदी सहज सुटका सोपी नाही. मुलाच्या वकिलाला मुलीचे विवाहपुर्व/अनैतिक लैंगिक संबंध सिद्ध करावे लागतील. कोर्ट मुलीच्या तपासणीचा आदेश देऊन केव्हापासून ती बाधित आहे ह्याची खातरजमा करुन घेईल. बोका ह्यांनी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीपासून मुलाच्या वकिलाने रोख 'फसवणूकीच्या उद्देशाने लग्नापुर्वीचे सत्य लपवून ठेवले' ह्या मुद्द्यावर ठेवला तर फायदा आहे. तरी माझ्या मते दोन वर्षे तरी केसला मरण नाही. अर्थात हे अनेक परमुटेशन कॉम्बीनेशनवर अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह Mon, 04/18/2016 - 11:04 नवीन
धन्यवाद, तजोभाऊ. वकिलांचा सल्ला लवकरच घेत आहे. तथापि, अलीकडे वकिलांचासुद्धा भरोसा नाही. कायदा नक्की काय सांगतो हे वकील नक्की सांगतील का याची ग्यारंटी काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 04/18/2016 - 10:43 नवीन
स्नेहांकिताताई, कायदा हे फक्त शस्त्र आहे ज्याला स्वतःची शक्ती नसते ती वापरणार्‍यावर अवलंबून आहे. वकील कसा आहे ह्यावर बरेच अवलंबून आहे. दोन्ही वकील व न्यायाधिश असलेल्या पुराव्यांचा उपलब्ध कायद्याच्या आधारे काय निर्णयापर्यंत पोचतात एवढे बघणे हातात असते. कायदा स्वयंभू नाही तसेच प्रत्यक्ष केसमधे कोणकोणते कायदेशीर संदर्भ केससाठी उपयुक्त ठरतील हे शोधणे वकिलाच्या बुद्धीमत्तेवर अवलंबून आहे. त्यामुळे चांगल्या वकिलाशिवाय पर्याय नाही. हा प्रश्न इथे मांडण्यामागची तुमची भूमिका कळली होती, जसे की कोणते कलम किंवा तत्सम कायदा सहाय्यक ठरेल असे काही विचारणे. तसे सकृतदर्शनी आपली केस कायदेशीररित्या सोपी व सुटसुटीत वाटते. पण शेवटी अनेक गोष्टींवर निर्णय अवलंबून आहे इतकेच. जमले तर केसचा निर्णय कळवाल. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह Mon, 04/18/2016 - 11:10 नवीन
न्यायप्रक्रिया ही कायद्याची निर्णायक अवस्था आहे. केसचा निर्णय =)) ..आताशी कुठे सल्ला घ्यायचा आहे. यानंतर कायदेशीर नोटीस इ. प्रक्रिया मग केस न्यायप्रविष्ट आणि मग निर्णय. बरंच मोठा पल्ला आहे. तुमच्या मते निदान दोन वर्षे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 04/18/2016 - 11:11 नवीन
आमच्याकडून शुभेच्छा. त्या मुलासोबत चांगलेच होवो अशी प्रार्थना करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
M
mugdhagode गुरुवार, 04/28/2016 - 00:35 नवीन
मुलीला एच आय व्ही आहे , मुलाला नाही तर कोर्ट घटस्फोट मंजुर करेल. एच आय व्ही मुलापासुन मुलीला झालेला नाही हे तर १०० % सत्य आहे. त्यामुळे त्याला घटस्फोट मिळायला अडचण नसावी. पोटगी बाबत सांगु शकत नाही. वरकरणी तरी मुलीकडुन फसवणुन केल्याचे वाटते. ते सिद्ध करणे अवघड आहे. पण घटस्फोटाला अडच्ण येणार नाही.. त्यासाठी वकिली य्कुक्तिवाद वगैरे काहीही लागणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह गुरुवार, 04/28/2016 - 09:55 नवीन
पोटगी हाही विषय महत्वाचा आहे. फसवणूक सिद्ध झाल्याशिवाय पोटगीतून सुटका मिळत नाही असे काही आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode
क
कपिलमुनी Tue, 05/03/2016 - 12:10 नवीन
लग्नानंतर मुलगी जर दवाखान्यात अ‍ॅडमिट झाली असेल, किंवा बाहेरुन रक्त द्यावा लागला असेल, एखादा ऑपरेशन झाले असेल तर त्या द्वारे संसर्ग होउ शकतो. फसवणूकीचा गुन्हा दाखल करायला ती लग्नापूर्वीपासूनच hiv + होती असे सिद्ध करावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सुबोध खरे Wed, 05/04/2016 - 15:49 नवीन
मुनिवर रक्त दिल्यामुळे HIV + होण्याचे प्रमाण दहा हजारात एका पेक्षा कमी आहे याचे कारण सर्वच्या सर्व रक्तपेढ्यात रक्त तपासूनच घेतले जाते. शल्यक्रिया करणारे डॉक्टर सुद्धा रुग्णाची शल्यक्रिया करण्याचे अगोदर पूर्ण रक्त तपासणी केल्याशिवाय शल्यक्रिया करीत नाहीत. अगदी लोकांच्या नाही तरी स्वतःच्या सुरक्षितते साठी. दवाखान्याच्या सुईने किंवा "थिएटर" मध्ये सुई टोचल्याने HIV + झालो हे १०० %मिथ्या आहे. हो तसे "ड्रग्स" घेताना तीच सुई बर्याच लोकांनी वापरल्यामुळे थोड्याप्रमाणात HIV + आढळतात. पण त्याला बर्याच वेळेस ड्रग्स घेतली जातात तेंव्हा असे होते. बहुसंख्य HIV + लोक हि कारणे सर्रास देतातच कारण आपला बाहेरख्यालीपणा उघडपणे काबुल करण्याची हिम्मत लाखात एखाद्याची असते. तेंव्हा या सर्व सबबी "लंगड्याच" असतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सस्नेह गुरुवार, 05/05/2016 - 09:01 नवीन
लग्नापासूनच ती आजारी होती. लग्नानंतर प्रथम तपासणी केली तेव्हा HIV डीटेक्ट झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
र
रॉजरमूर Tue, 04/19/2016 - 18:49 नवीन
समजा उलट असतं तर मुलीने घटस्फोट मागितलाच असता की नाही?
अगदी बरोबर ही बघा आजचीच या विषयावरील बातमी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
त
तर्राट जोकर Wed, 04/06/2016 - 14:04 नवीन
पण पोटगी व इतर बाबींबद्दल पूर्ण केस समजून घेतल्याशिवाय सांगने कठिण आहे. ह्यातला विशेषज्ञ वकिल आपल्याला मदत करु शकेल. अर्थात हे तुम्हाला माहित आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
प
पिलीयन रायडर Fri, 04/08/2016 - 07:42 नवीन
Gratuity नक्की कधी मिळते. ढोबळपणे ५ वर्ष म्हणतात पण ते मुळात काही तरी १७०० दिवस / क्ष्क्ष आठवडे... असं काही तरी आहे ना? म्हणजे ४ वर्ष ८/१० महिने असं काही तरी ते गणित होतं.. मागे एकदा HR च्या सेशन मध्ये हे सांगितलं होतं पण नीट लक्षात नाही. कुणाला नक्की माहिती आहे का?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/08/2016 - 11:23 नवीन
ते कंपनीच्या धोरणावर अवलंबून आहे. साधारणपणे कंपनीत किमान ५ वर्षे काम केले तर Gratuity साठी तुम्हाला पात्र धरतात. पण ही मुदत प्रत्येक कंपनीनुसार बदलू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
त
तुषार काळभोर Fri, 04/08/2016 - 11:59 नवीन
http://hrsuccesstalk.blogspot.in/2013/03/13-facts-one-should-know-about-gratuity.html इथे तिसर्‍या प्रश्नात असं सांगितलंय की मद्रास उच्चन्यायालयाच्या निर्णयानुसार चार क्यालेंडर वर्षे पूर्ण व पाचव्या वर्षातील २४० कामाचे दिवस काम केलेले असल्यास ग्रॅच्युटिस पात्र ठरावे. मात्र त्यानंतरही ग्रॅच्युटी कायद्यात बदल न झाल्याने, हा निर्णय कदाचित फक्त तमिळनाडू राज्यात लागू होत असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पिलीयन रायडर Fri, 04/08/2016 - 12:15 नवीन
हो, हा निर्णय वाचला मी. पण मला नाही वाटत तो बरोबर आहे. किंवा महाराष्ट्रात लागु आहे. हे ही बघा http://www.gratuity.org.in/gratuity-eligibility.php
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
म
मराठी कथालेखक Fri, 04/08/2016 - 13:54 नवीन
बरोबर... मला एका कंपनीने सहा महिन्याच्या (पुण्यातली एक अमेरिकन, आयटी प्रॉडक्ट कंपनी) नोकरीवर ग्रॅच्युइटी दिली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
आ
आदूबाळ Fri, 04/08/2016 - 11:43 नवीन
ग्रॅच्युईटी अ‍ॅक्ट १९७२ मध्ये "फाईव्ह ऑर मोअर दॅन फाईव्ह इयर्स ऑफ कंटिन्युअस सर्व्हिस..." असं काहीसं आहे, आणि कंटिन्युअस सर्व्हिस कशी मोजायची यावर काही नियम आहेत. कोणी सीएस किंवा वकील अधिक सांगू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Fri, 04/08/2016 - 11:48 नवीन
हो. जालावर शोधले असता बरीच वेगवेगळी माहिती मिळाली. पण एका ठिकाणी अगदी ठामपणे लिहीले आहे की ४ वर्ष ७ महिने झाले तरी ६ महिन्याच्या वर गेल्याने त्याला वर्ष धरायचे. मग ग्रॅचुइटी मिळते. शिवाय वर्ष ३६५ दिवसांचे नसते, ५ दिवसांचा आठवडा असेल तर १९० दिवसांचे असते. असे काही काही लिहीले आहे. म्हणुन जॉइनिंग डेट नंतर बरोब्बर पाचच वर्ष काम केलं पाहिजे असं काही नाहीये म्हणे. मला ४ वर्ष १० महिन्यांनाही रक्कम कॅलक्युलेट करुन दिली. तर एका ठिकाणी ४ वर्ष ११ महिने १० दिवस झाले असतानाही दिली नाही असेही सांगितले आहे. फारच परस्परविरोधी माहिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
_
_मनश्री_ Tue, 04/12/2016 - 14:38 नवीन
भारत भ्रमण करण्यासाठी हार्ले डेव्हिडसन बाईक वरून निघालेल्या 'लेडी ऑफ द हर्ली' म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूरच्या बायकर विणू पालिवाल यांचे अपघातात दु:खद निधन....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा