Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लाईफलोंग ब्याचलर

न
निशांत_खाडे
Sun, 05/01/2016 - 12:44
🗣 255 प्रतिसाद
आज नेहमी प्रमाणे कोरा (Quora) वर फिरत असताना एक इंटरेस्टिंग प्रश्न सापडला. तोच इथे चोप्यपस्ते करतोय. "लग्न,कुटुंब यांच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय? अविवाहित आयुष्य जास्त आनंदी आहे काय?" काही दुवे:

प्रतिक्रिया द्या
31726 वाचन

💬 प्रतिसाद (255)
न
निशांत_खाडे Sun, 05/01/2016 - 12:46 नवीन
Society says relationships are awesome. Science says being single is awesome Bachelorhood is now a lifestyle, not just a phase
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sun, 05/01/2016 - 13:01 नवीन
शादीके लड्डु खाये तो पछताये । ना खाए तो भी पछताए।
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/01/2016 - 13:16 नवीन
>>>>>>"लग्न,कुटुंब यांच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय? होय. >>>>>अविवाहित आयुष्य जास्त आनंदी आहे काय?" नाही. दुव्यापेक्षा व्यक्तिपरत्वे अनुभव महत्वाचे. लग्न झालेलं नसतं तेव्हा कधी होईल कधी होईल असं होतं आणि एकदा सर्व हौस झाली की मग पोरं, त्या शाळा, बायको प्रेम, भांडण, गैरसमज, नात्यातील ओढ़ातान, वाढतं कुटुंब, जवाबदारी यात माणूस (निष्ठुर होऊन) रमुन जातो आणि नंतर मग अधुन् मधून किंवा नियमितही जिच्याबरोबर लग्न झालं नाही ती जर असती तर आत्तापेक्षा तिने माझा अधिक सुन्दर संसार केला असता का ? असे काही बाही विचार येत असतात, त्या विचारांना धूड़कावून संसार करायचा असतो, असे म्हणतात बाकी काही नाही. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 05/01/2016 - 17:05 नवीन
हाहाहा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब
बाबा योगीराज Sun, 05/01/2016 - 17:18 नवीन
प्राडॉ. शी बाडीस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
र
रमेश आठवले Sun, 05/01/2016 - 16:42 नवीन
तो फिर क्यू न लड्डू खा के पछताये ?
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sun, 05/01/2016 - 21:02 नवीन
ही सरसकट प्रत्येकाला लावता येणार नाहीत. प्रत्येकाने आपापल्या temperament प्रमाणे जे योग्य वाटेल ते करावे अाणि शक्यतो हा निर्णय स्वतःच घ्यावा.समाजाला लुडबूड करु देऊ नये.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 05/02/2016 - 04:57 नवीन
बिरुटे +++ माझे मत १) माया आहे याचे उत्तम उदाहरण. २) लग्न न केल्यास एका तरुणपणानंतर सर्वजण टाळतात,केल्यास न पटल्यास एकजणच टाळेल. ३) करा आणि मोडा. ४) भांडायचेच आहे तर 'हक्काच्या' बायकोशी /नवय्राशी भांडा हक्काने. ५) कोणी सांगावे आपल्याबाबतीत चांगलेही होईल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 05/02/2016 - 04:59 नवीन
(Quora) वेबसाइट फक्त कंम्प्युटरवरच चालते का?मोबाइलचा अनुभव काय आहे?
  • Log in or register to post comments
न
निशांत_खाडे Mon, 05/02/2016 - 10:39 नवीन
अंड्रोइड, आयओएस आणि विंडोजवरती एप डोउन लोड करू शकता.. एप नसतानाही मस्त चालते. कोरा जिंदाबाद... www.quora.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Mon, 05/02/2016 - 13:02 नवीन
मस्त चालतेय मोबाइलवर quora dot com website.अकाउंट घेतले ,सुरुवात केली. धन्यवाद. ( फक्त इंग्रजीच आहे का?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशांत_खाडे
न
निशांत_खाडे Mon, 05/02/2016 - 20:26 नवीन
तेवढाच एक प्रोब्लेम आहे बघा.. नाहीतर सध्या कोरा सारखी दर्जेदार वेबसाईट आंतरजालावर दुसरी कुठलीच नाही. काही दिवस वापरल्यानंतर कळेलच म्हणा तुम्हाला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Wed, 05/04/2016 - 09:35 नवीन
quora अकाउंट दुसय्रा दिवशी उघडलं तर " you are blocked from posting -----use real name----"मेसिज दिसला.युजरनेम नाही चालत.मग दुसरं उघडलं वेगळा इमेल टाकून ते चालू आहे.मज्जाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशांत_खाडे
क
कंजूस Wed, 05/04/2016 - 09:38 नवीन
फोनच्या wap native browserवरच अकाउंट ओपन होते ( https ?) web browser वर नाही चालत.( ओपरा,युसि )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
अ
असंका Mon, 05/02/2016 - 05:09 नवीन
लारा लप्पा जगजितसिंग- चुल्ले आग ना घडे दे विच पाणी ओ छडेया दी जू बुरी.... काम करकरके जधों वी घर आइदा, मार मार फुंका चुल्ले विच थक जाइदा रोटी पैंदीये कच्ची गिली खाणी ओ छडीया दी जू बुरी.. छ्डा- सडा
  • Log in or register to post comments
स
स्पा Mon, 05/02/2016 - 05:10 नवीन
विवेक ठाकुरांच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Mon, 05/02/2016 - 07:40 नवीन
किंवा घेणं झेपणार नाही असं वाटतं ते बॅचलरहूडचा जोमात प्रचार करतात. सहजीवन हा जीवनातला फार आनंदाचा आणि जवळजवळ अपरिहार्य भाग आहे. मुल, त्याचं संगोपन, त्याचाबरोबर पुन्हा उपभोगायला मिळणारं बालपण, मग उत्तररंग आणि शेवटी आप्तांच्या सहवासात देह सोडणं (याचा अनुभव नाही, अनुमान आहे) या गोष्टींपासून एकटं राहाणारा वंचित राहातो. लग्न करायचं किंवा नाही हा ज्याचा त्याचा निर्णय असला तरी, एकदा करायचं म्हटलं की ते योग्य वयात केलं तरच मजा आहे. करु का नको, याचा अनुभव काय, तो काय म्हणतो असा विचार करण्यापेक्षा आपल्याला आणि तिलाही मजा येईल अशी अर्धांगिनी निवडण हे कौशल्याचं काम आहे. सहजीवनाशिवाय आयुष्य फार बेरंग आणि बोअर होईल. डिबी म्हणतात तसं ..... अधुन् मधून किंवा नियमितही जिच्याबरोबर लग्न झालं नाही ती जर असती तर आत्तापेक्षा तिने माझा अधिक सुन्दर संसार केला असता का ? असे काही बाही विचार येत असतात, त्या विचारांना धूड़कावून संसार करायचा असतो, असे म्हणतात बाकी काही नाही मला कधीही वाटलं नाही कारण आहे ते उपभोगायची आणि कायम वर्तमानात राहायची कला साधली आहे. तस्मात, इट इज अ ग्रेट थींग टू बी मॅरीड अँड हॅव अ कंपॅनियन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Mon, 05/02/2016 - 08:13 नवीन
थँक्स विठा अता बायको शोधणे आले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Mon, 05/02/2016 - 08:20 नवीन
मग त्या नात्यात रंग भरणं, त्याची मजा घेणं, आणि ते सांभाळणं आपसूक होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
अ
अप्पा जोगळेकर Mon, 05/02/2016 - 14:54 नवीन
अरे ते सहजीवन वगैरे थोरामोठ्यांसाठी रे दादा. सामान्य मर्त्य मानवांसाठी ओझ्याचा बैल होणे किंवा गोर्ह्याचा बैल (शब्दश: नव्हे) होणे हेच खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
व
विवेक ठाकूर Mon, 05/02/2016 - 17:22 नवीन
थोर किंवा मोठं आणि सामान्य असा भेद नाही. लग्न अमिताभचं असो की आपलं, मूळ फॅक्टर्स तेच राहातात. ज्याला पत्नीबरोबर जगायची मजा कळली तो घरच्याघरी सुखी होतो. खरंतर दोघंही सुखी होतात. आणि एक मस्त कुटुंब तयार होतं, जिथे मुलाचं योग्य संगोपन होऊन सर्वांना मनाजोगतं जगता येतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
क
कंजूस Mon, 05/02/2016 - 06:21 नवीन
दुसय्राच्या फुंकरीने आपल्या चुली पेटत नाहीत.
  • Log in or register to post comments
M
mugdhagode Mon, 05/02/2016 - 08:05 नवीन
लग्नच न झालेले , संसार न करताच समाधिस्त झालेले , मांडवातून पळालेले , सन्यास घेउन पुन्हा संसारात आलेले , बायको सोडुन वनवासात गेलेले , बायको घेऊन वनवासी फिरलेले , साखरपुडा झालेली बायको सोडुन स्वयंसेवक झालेले , खोटा संसार करणार्‍आ संतिणी , पोरं नवरा टाकुन उधळलेल्या अप्सरा व नदीमैय्या ....... एकंदर असल्या लोकांचे या देशातील लोकाना भयाण आकर्षण आहे. जौ दे ! ( सकाळी सकाळी मोघले आजम , जोधा अकबर , ताजमहलची मुसलमानी व्हिडिओ गाणी बघितली की असले अभद्र हिंदु विचार दिवसभर येत नाहीत. )
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Mon, 05/02/2016 - 08:16 नवीन
तो जातीवादी नसतो. त्या अँगलनं पाहिलं तर जनानखाना ही कल्पना स्त्रीचा उपमर्द आणि प्रतारणेचा कळस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode
ग
गामा पैलवान Mon, 05/02/2016 - 08:49 नवीन
असं म्हणता मुगोबाई? मग कोणते अभद्र विचार मनात येतात? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode
V
viraj thale Mon, 05/02/2016 - 08:51 नवीन
बघा पिसाळलेली घो/गोड़ी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode
इ
इस्पिक राजा Wed, 05/04/2016 - 09:45 नवीन
सकाळी सकाळी मोघले आजम , जोधा अकबर , ताजमहलची मुसलमानी व्हिडिओ गाणी बघितली की असले अभद्र हिंदु विचार दिवसभर येत नाहीत मुग्धा तैंनी जनानखान्याचे लैच आकर्षण जणू. अनेक बायकांशी संसार करुन , त्यांच्या पोटी १६ वर्षात १५ प्पोरे जन्माला घालून त्यांना मारुन मग त्यांच्या कबरी मिरवणार्‍या लोकांबद्दल जि व्हाळा असेल तुम्हाला नै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode
क
कंजूस Mon, 05/02/2016 - 08:18 नवीन
"लग्नच न झालेले , ....... एकंदर असल्या लोकांचे या देशातील लोकाना भयाण आकर्षण आहे." । । क्या बोला! प्याराबोला ( parabola )!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 05/02/2016 - 08:28 नवीन
आपले दोन्ही दुवे आणि लेख नीट वाचले यानंतर माझा अभिप्राय असा आहे. मला लग्न न करता एकटा राहायला आवडलं असतं का ?-- नाही लग्न करून मी सुखी झालो का? हो नक्कीच परत निवड करण्याचा हक्क( choice) मिळाला तर मी एकटा राहेन पसंत करेन का? -- नाही सद्य ( लग्न झालेलं आणि मुलं असताना) परिस्थितीत मी सुखात आहे का?-- होय हा माझा वैयक्तिक अभिप्राय आहे. ज्याला आयुष्यभर ब्रम्हचारी राहायचं आहे त्याने राहावे. बस संपला विषय.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 05/02/2016 - 08:30 नवीन
काही जीव असे आहेत कि खांब दिसला कि पाय वर "केलाच" पाहिजे. स्वभावदोष म्हणायचं. भद्रं ते भवतु
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 05/02/2016 - 08:52 नवीन
सुबोध खरे, माझ्या मते तो स्वभावदोष नसून ती एक स्वाभाविक क्रिया आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 05/02/2016 - 09:25 नवीन
पैलवान साहेब तो प्रतिसाद ब्रम्ह्चर्यावर नसून मोगा खान (मु गो) यांना होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
न
नाखु Mon, 05/02/2016 - 10:45 नवीन
साहेब , कचर्यातून कला म्हणजे निर्मीती (अ)कलेचाच कचरा म्हणजे...वि मी सांगायला पाहिजे का, गा.पै. कुठ नादी लागता "कुलंगी" च्या सरळसोट नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आनन्दा Mon, 05/02/2016 - 11:03 नवीन
त्यांचा प्रतिसाद पण मोगाखानांच होता. बाकी गापै<चा प्रतिसाद आवडला. या धाग्यावर खरे तर रणकंदन बघायला मिळेल या आशेने आलो होतो. थोडीशी निराशाच झाली हे खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गामा पैलवान Mon, 05/02/2016 - 22:20 नवीन
सुख, अहो मीही तेच म्हणतोय. खांब दिसला की तंगडी उभारणे हा स्वभावातला दोष नसून स्वभावाची रचनाच तशी आहे. :-D आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मराठी कथालेखक Mon, 05/02/2016 - 11:20 नवीन
संम असे आयडी का चालवून घेत आहेत हा एक प्रश्नच आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
इ
इस्पिक राजा Wed, 05/04/2016 - 09:49 नवीन
ट्यार्पी मिळतो हो. नायतर फुटकळ कारणांवरुन इतरांची हकालपट्टी होते आणि अस्सले आयडी फार जुलाब होइस्तोवर टिकतात याचे दुसरे काय स्पष्टीकरण असु शकते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
अ
अप्पा जोगळेकर Mon, 05/02/2016 - 09:03 नवीन
तुमची मर्जी. अविवाहित राहणे ठीक आहे. ब्रम्हचारी राहू नका.
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Mon, 05/02/2016 - 09:44 नवीन
पाहा : लग्न,कुटुंब यांच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
स
स्पा Mon, 05/02/2016 - 10:48 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
त
तुषार काळभोर Mon, 05/02/2016 - 11:40 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
स
सूड Mon, 05/02/2016 - 12:39 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 05/02/2016 - 11:24 नवीन
लग्न न करता रानात जाउन बसला. झोपडे बांधले,उंदरांच्या त्रासामुळे मांजर पाळली, तिच्या दुधासाठी गाय पाळली,गायीसाठी शेत,शेतासाठी विहिर खणली आणि शेवटी हे सर्व कोण सांभाळेल याची चिंता करत करत मेला. ! ! ! ! ! मग संसारानेच काय घोडे मारले होते?
  • Log in or register to post comments
ल
लालगरूड Mon, 05/02/2016 - 11:52 नवीन
क्याबाहै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
म
मराठी कथालेखक Mon, 05/02/2016 - 11:36 नवीन
थोडे विषयाच्या जवळपासचे अवांतर : लग्न करुनही कधीच मुलांना जन्म न देणे म्हणजे मुद्दाममहून तसा निर्णय घेणे , तसेच कोणत्याही प्रकारे पालक न बनणे (म्हणजे दत्तक वगैरेही नाही) ही देखील एक जीवनशैली होवू लागली आहे. या जीवनशैलीला चाईल्डफ्री कपल, डिंक कपल (DINK - Double Income No KIds बहूधा अशी जीवनशैली स्वीकरणार्‍या जोडप्यात दोघेही नौकरी/व्यवसाय करणारे असतात म्हणून) ई नावे आहेत. समविचारी व्यक्ती भेटणे हे ह्या जीवनशैलीचे मोठे आव्हान आहे आणि भेटल्यावरही आयुष्यभर त्या विचारांवर दोघांनी ठाम राहणे अत्यंत महत्वाचे. दोघांचे विचार बदलले तर फारशी अडचण नाही, पण एकाचे विचार बदलले मात्र दुसरा ठाम राहिल्यास संघर्ष होवू शकतो. बाकी सामाजिक आणि कौटुंबिक दबाव यांना तोंड द्यावे लागू शकते. टीप : या विषयावर धागा काढावा का असा विचार मी करत होतो, पण इथे किती मिपाकर या विषयाबद्दल बोलण्यास उत्सुक आहे ते माहित नाही त्यामुळे विवाहबद्दलच्या या धाग्यात उपधागा काढला आहे.
  • Log in or register to post comments
न
निशांत_खाडे Mon, 05/02/2016 - 11:43 नवीन
नवीन माहिती मिळाली.. धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
अ
अप्पा जोगळेकर Mon, 05/02/2016 - 14:48 नवीन
प्रजनन हाच लग्नाचा मूळ हेतू असतो. अन्यथा बायको नवर्याची किंवा नवर्याने बायकोची कटकट का झेलावी हा प्रश्नच आहे. बाकी ज्याला त्याला आचार स्वातंत्र्य असतेच म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Mon, 05/02/2016 - 15:02 नवीन
अन्यथा बायको नवर्याची किंवा नवर्याने बायकोची कटकट का झेलावी हा प्रश्नच आहे.
माफक कटकट झेलता येतेच...पण फार कटकट होत असेल तर (मुलबाळ नसलेले) थोडे अधिक सहजपणे विभक्तही होवू शकतात. मुलबाळ असले तर जोडीदाराची + मुलांची कटकट झेलावी लागतेच, झालेच तर मुलांची कटकट तरी का झेलावी हाही प्रश्न आहेच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
व
विवेक ठाकूर Mon, 05/02/2016 - 17:13 नवीन
पण अर्धवट उडी मारली तर धड हे पण नाही आणि ते पण नाही असं होणार. एकदा लग्न म्हटलं की संसार सर्वतोपरी आलाच. चाईल्डफ्री कपलमधे बाँडच तयार होत नाही. दोघंही केवळ खडाखडी करत राहातात. आणि त्यामागे खरं तर हाच विचार असतो : फार कटकट होत असेल तर (मुलबाळ नसलेले) थोडे अधिक सहजपणे विभक्तही होवू शकतात. लग्न करणं म्हणजे घटस्फोटाची रिस्क आलीच पण सुरुवातीपासून मॅचच्या बाहेर पडायचा मार्ग दोघांनी मोकळा ठेवला तर पारस्पारिक विश्वास निर्माण होत नाही. देअर इज नो कमीटमंट. मुल आणि प्रेम हेच तर लग्नसंबंधातले सेतू आहेत. नाही तरी लग्न ही निव्वळ पारस्पारिक मान्यताच आहे. माणसानं ती स्वतःच्या सोयी आणि जीवन सुखकर होण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे. त्या पलिकडे लग्नाला काही अर्थ नाही. पण एकदा ती व्यवस्था स्वीकारायची म्हटली की एकतर पूर्णपणे मान्य करायची किंवा मग त्यात पडायचंच नाही. तिथे तिसरा पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Mon, 05/02/2016 - 20:20 नवीन
चाईल्डफ्री कपलमधे बाँडच तयार होत नाही. दोघंही केवळ खडाखडी करत राहातात
अनुभव आहे ? तुम्ही नेहमी अनुभवावर आधारित बोलत असता म्हणून विचारलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा