Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लाईफलोंग ब्याचलर

न
निशांत_खाडे
Sun, 05/01/2016 - 12:44
🗣 255 प्रतिसाद
आज नेहमी प्रमाणे कोरा (Quora) वर फिरत असताना एक इंटरेस्टिंग प्रश्न सापडला. तोच इथे चोप्यपस्ते करतोय. "लग्न,कुटुंब यांच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय? अविवाहित आयुष्य जास्त आनंदी आहे काय?" काही दुवे:

प्रतिक्रिया द्या
31726 वाचन

💬 प्रतिसाद (255)
व
विवेक ठाकूर Tue, 05/03/2016 - 15:22 नवीन
करमणूक झाली म्हणणं ही पळवाट आता फार जुनी झाली .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मितान Tue, 05/03/2016 - 15:26 नवीन
खरंय ! तुम्हीच रुळवली आहे ती पायवाट ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
स
सूड Tue, 05/03/2016 - 15:29 नवीन
ह्या सगळ्यावर संक्षींच्या एखाद्या धाग्याचा संदर्भ दिला असतात तर आणि बहार आली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
म
मितान Tue, 05/03/2016 - 15:34 नवीन
इतके धागे आहेत की भर्जरी दैदिप्यमान वस्त्र तयार होईल. पण वस्त्र विणने इज जस्ट नॉट माय कप ऑफ टी यु नो :( याच धाग्यात सरांना दोन तीन प्रतिसादात 'ज्योक' सापडलेत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Tue, 05/03/2016 - 15:43 नवीन
सरांनाच सांगतोय संदर्भ द्यायला. संक्षिप्त सांगण्यात संक्षींचे धागे त्यांना फार उपयोगी होतात म्हणे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
म
मितान Tue, 05/03/2016 - 15:57 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
म
मराठी कथालेखक Wed, 05/04/2016 - 07:32 नवीन
आता प्रश्न हास्यास्पद असल्यावर करमणूक होणारच. असो. पुन्हा एकदा धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
अ
अप्पा जोगळेकर Tue, 05/03/2016 - 08:45 नवीन
साहेब, प्रजनन ही सजीवांची नैसर्गिक प्रेरणा आहे असे म्हणायचे आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
म
मराठी कथालेखक Tue, 05/03/2016 - 13:02 नवीन
मला तरी नाही वाटत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
म
मराठी कथालेखक Tue, 05/03/2016 - 10:34 नवीन
अशी कैक जोडपी बघितली आहेत ज्यांनी मूल नं होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. एक जोडपं तर २० एक वर्ष सुखाने नांदत आहे.
या जोडप्यांबद्दल अधिक काही शेअर करु शकाल का ? खास करुन २० वर्षे नांदणार्‍या जोडप्याबद्दल - त्यांनी हा निर्णय कसा घेतल ? सुरवातीपासूनच एकमत होते की एकाने दुसर्‍याचे मतपरिवर्तन घडवले ? काय अडचणी आल्यात ? घरच्यांना , समाजाला , विचारल्या जाणार्‍या प्रश्नांना कसे तोंड दिले ? काही ठिकाणी निपुत्रिक स्त्रियांना सन्मानाने वागवले जात नाहि , या स्त्रीला अशा काही प्रसंगांना सामोरे जावे लागले का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
ल
लंबूटांग Tue, 05/03/2016 - 14:29 नवीन
म्हणजे असे बोलताना तरी त्यांनी "We don't want kids" असे सांगितले. सर्व काही जवळचे मित्र मैत्रिणी नाहीयेत पण ज्यांना बर्‍यापैकी ओळखतो त्यांच्याबद्दल सांगतो. खाली कोणीतरी करिअरचे उदाहरण दिले आहे तर तो मुद्दा यापैकी कोणाचाच नव्हता. एकीने सांगितले की माझ्यात ते मदरली इन्स्टिंक्ट्सच नाहीयेत. तर कशाला मुलं होऊ देऊन वाढवू? मी तर सुखी होणारच नाही पण उगाच एक नवीन जीव जन्माला घालून त्याचे आयुष्यही मुलं नं आवडणार्‍या आईबरोबर जाईल. दुसरीचेही साधारण तसेच काहीसे. मुलं आवडतात पण काहीतास खेळायला वगैरे ठीक आहे. वाढवणे वगैरे शक्य नाही. माझ्या माहितीतली सर्व उदाहरणे अमेरिकेतली आहेत. इथे फारच कमी प्रमाणात इतरांच्या आयुष्यात लुडबुड केली जाते. त्यामुळे निपुत्रिक स्त्रियांना सन्मानाने वागवले जात नाही वगैरे प्रश्न आले नसावेत. एकीने सांगितले होते की घरचे अधून मधून विचारतात आणि अजून तरी त्यांना सांगितलेले नाहीये की आम्ही मूल होऊ देणारच नाहीये. माझ्या भावंडांना मुले आहेत त्यामुळे माझ्या आई वडलांना नातवंडांचे सुख मिळाले आहे, मिळते आहे. २० वर्षे नांदणारे जोडपे तसे वयाने फार मोठे नाहीये. लवकर लग्न केल्याने आत्ता चाळीशीत प्रवेश करतायत. त्यांना दोघांनाही जबाबदारी नको होती. आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे ते करता यायला हवे आणि मुलांची आवडही इतकी नाही की स्वतःचे हवे. बाकी एक दोन अविवाहीत मैत्रिणींनी लहानपणी child abuse वगैरे पाहिल्यामुळे त्यांना मूल नको आहे वगैरे सांगितले होते पण तो अजूनच वेगळा विषय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Tue, 05/03/2016 - 14:53 नवीन
धन्यवाद.
एकीने सांगितले की माझ्यात ते मदरली इन्स्टिंक्ट्सच नाहीयेत. तर कशाला मुलं होऊ देऊन वाढवू? मी तर सुखी होणारच नाही पण उगाच एक नवीन जीव जन्माला घालून त्याचे आयुष्यही मुलं नं आवडणार्‍या आईबरोबर जाईल. दुसरीचेही साधारण तसेच काहीसे. मुलं आवडतात पण काहीतास खेळायला वगैरे ठीक आहे. वाढवणे वगैरे शक्य नाही.
त्यांना दोघांनाही जबाबदारी नको होती. आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे ते करता यायला हवे आणि मुलांची आवडही इतकी नाही की स्वतःचे हवे.
म्हणजे अपुर्णत्व वगैरे काही नाही तर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
प
पिलीयन रायडर Tue, 05/03/2016 - 14:56 नवीन
ओ नाही हो.. तुम्हाला जेन्युईनली ह्या मुद्द्यात रस आहे म्हणुन सांगते.. अशा अनेक बायका असतात ज्यांना खरंच आई होण्यात रस नसतो. आणि त्यांना अजिबात अपुर्ण वाटत नाही. मज्जेत असतात त्या. बादवे, कुणी मला खरंच सांगेल का की पुरूषांना अशी वडील होण्याची ओढ असते का? पुरूष हा टिपीकली जबाबदारी झटकणारा रंगवला जातो. पण आजकाल बाप म्हणुन पोरांमध्ये अगदी रंगुन गेलेले पुरूष खुप दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
क
कपिलमुनी Tue, 05/03/2016 - 15:03 नवीन
नक्कीच असते ! आजकल कितीतरी पुरुष आनंदाने मुलाचे लाड करतात. शी शू काढण्यापासून ते डायपर बदलण्यापर्यंत , रात्रीची जागरण अँजॉय करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
मराठी कथालेखक Tue, 05/03/2016 - 15:06 नवीन
धन्यवाद पिरा... मला नाहीये, पण अनेक पुरुषांना वडील होण्याची ओढ असते. माझे अनेक मित्र पोरांमध्ये बराच वेळ व्यस्त असतात. पण तरी करिअर वा इतर काही कारणांमुळे मुलांपासून काही महिने वगैरे दूर रहावे लागले तर राहतातही. त्यामुळे आईची आणि वडिलांची मुलांशी असलेली बांधिलकी यात अजूनही फरक आहे असेच वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
मराठी कथालेखक Tue, 05/03/2016 - 07:31 नवीन
विचारामागचा हेतू कळणं अवघड नाही. अर्थात, तुम्हीच म्हटलंय : फार कटकट होत असेल तर (मुलबाळ नसलेले) थोडे अधिक सहजपणे विभक्तही होवू शकतात
मी जे म्हंटलं (फार कटकट होत असेल तर (मुलबाळ नसलेले) थोडे अधिक सहजपणे विभक्तही होवू शकतात) हा चाईल्डफ्रीचा हेतू आहे असा तुम्ही गैरसमज करुन घेतला आहे. तो चाईल्डफ्री वैवाहिक जीवनाचा हेतू नसून एक अतिरिक्त परिणाम /काही अंशी फायदा आहे. बाकी ज्यांना सहजी विभक्त होण्याचा प्रयाय खूला हवा आहे म्हणून मूल नकोय (जसा अर्थ तुम्ही काढताय त्याप्रमाणे) ते लग्न न करता लिव-इन रिलेशन, ओपन रिलेशन हे पर्याय सहज अवलंबू शकतात. लग्नाची त्यांना गरजच नाही. शिवाय
अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे , तस्मात, अपत्य जन्माविना स्त्रीला अपूर्णत्व जाणवत राहातं
हे ९९.९९ % खरंही असेल पण १००% नाही. तुम्ही अमोल पालेकर यांनी रघुनाथ धोंडो कर्वे यांच्यावर बनविलेला ध्यासपर्व हा चरित्रपट पाहिला अहे का ? (पालेकरांवर तुमचा विश्वास असेल असे गृहीत धरतो, तसेहि कर्वेंच्या कुणा नातेवाईकाने चित्रपटाचा प्रतिवाद केल्याचे ऐकिवात नाही). यात असे अगदी स्पष्ट दाखवले आहे की रधोंच्या पत्नी मालती यांनाही अपत्य जन्माला घालण्याची मुळातूनच इच्छा नव्हती (म्हणजे रधोंनी भरीस घातलेय असे वगैरे नक्कीच नाही) बाकी चित्रपट उत्कृष्ट आहेच. युट्युबवर पाहू शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Tue, 05/03/2016 - 09:07 नवीन
दोनच कारणं आहेत : एक, मुलांची कटकट वाटणं किंवा दोन, विभक्त व्हायला सोपं जाणं. स्त्रीला अपूर्णत्व वाटणं नैसर्गिक आहे कारण निसर्गाचा हेतू स्वतःचं निरंतरत्व टिकवणं आहे, मग एखाद्याचा व्यक्तिगत हेतू भले यूएस प्रेसिडेंट व्हायचा असो. अर्थात, मुलं ही कटकट वाटावी का सहजीवनाचा आनंददायी भाग वाटावीत हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन आहे. शिवाय मुलं शाळेत जायला लागल्यावर पालकांना बरीच मोकळीक मिळते. विभक्त व्हायला सोपं जाणं हा चाईल्ड-फ्री चा अनुशंगिक फायदा दिसला तरी मुलाशिवाय एकमेकात कमीटमंट निर्माण होत नाही हे नक्की. रघुनाथ धोंडो कर्वे टाईप तुमचा काही उदात्त प्लान असला तर एखादे वेळी संसारच कटकट होऊ शकेल. पण इट प्री सपोझेस अ ग्रेट प्लान. मग इतक्या उदात्त गोष्टीपुढे मुलांची कटकट किंवा विभक्तीची सोय असली तकलादू कारणं पुढे करावी लागत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Tue, 05/03/2016 - 10:11 नवीन
वर एका प्रतिसादात तुम्ही म्हणता
माझ्या पाहाण्यात असं एकही जोडपं नाही.
आणि मग असंही म्हणता
मुलाशिवाय एकमेकात कमीटमंट निर्माण होत नाही हे नक्की.
अनुभव नसताना तुम्ही ठामपणे कसं म्हणू शकता ?
दोनच कारणं आहेत : एक, मुलांची कटकट वाटणं किंवा दोन, विभक्त व्हायला सोपं जाणं.
यापैकी "विभक्त व्हायला सोपं जाणं" हा चाईल्डफ्रीचा हेतू असत नाही (कुणी अपवाद असेलही) हे वर मी म्हंटलेही आहे तरी तो मुद्द तुम्ही रेटत आहात मुळात विभक्त होण्याबद्दलचा मुद्दा अप्पांना प्रतिसाद होता तो 'चाईल्डफ्री'चा विषय ज्या प्रतिसादातून चालू झाला त्यात तो मुद्दा अजिबात नव्हता, तरी तुम्ही त्या विभक्त होण्यालाच अजून धरुन बसला आहात. असो.
रघुनाथ धोंडो कर्वे टाईप तुमचा काही उदात्त प्लान असला तर एखादे वेळी संसारच कटकट होऊ शकेल.
मी रधोंचे उदाहरण याकरिता दिले की अशा प्रकारे मुल असण्याची आस नसलेल्या मुली/स्त्रिया होत्या आणि आहेत. मी फेसबुकवर 'childfree indians' या ग्रुपमध्ये आहे. हा ग्रुप एका स्त्रीने बनविलेला आहे, या ग्रुपवर अनेक मुली /स्त्रियाही आहेत. मालती कर्वेंचा स्वतःचा उदात्त प्लॅन नव्हता, तसेच ज्यावेळी रधोंशी त्यांचे याबाबत बोलणे झाले त्यावेळी रधोंचाही काही प्लॅन बनला नव्हता. माझा असा काही उदात्त वगैरे प्लॅन नाही. मी सर्वसामान्य नोकरदार आहे, कमवावे, खावे, प्यावे , आवडिच्या गोष्टींत (चित्रपट बघणे, संगीत ऐकणे , फिरणे, मित्रमंडळींच्या भेटी घेणे ई ) वेळ घालवणे , माझ्या आणि पत्नीच्या आवडीच्या गोष्टी विकत घेवू शकू इतकी संपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे इतकाच माझा प्लॅन आहे. बाकी "मुलांची कटकट वाटणं" ...हे मी "मुलांची फार जास्त आवड नसणं" असं म्हणेन किंवा मुल मोठं करतानाच्या जबाबदार्‍यांची नीट जाण असल्याने व तितक्या जबाबदार्‍या पार पाडण्याची इच्छा नसल्याने मी असा निर्णय घेतला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Tue, 05/03/2016 - 10:39 नवीन
माझा असा काही उदात्त वगैरे प्लॅन नाही. मी सर्वसामान्य नोकरदार आहे, कमवावे, खावे, प्यावे , आवडिच्या गोष्टींत (चित्रपट बघणे, संगीत ऐकणे , फिरणे, मित्रमंडळींच्या भेटी घेणे ई ) वेळ घालवणे , माझ्या आणि पत्नीच्या आवडीच्या गोष्टी विकत घेवू शकू इतकी संपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे इतकाच माझा प्लॅन आहे. हे मुलं असतांना सुद्धा होत नाही का ? सर्वसामान्य लोक हेच तर करतांना दिसतात. तुम्ही उगीच कर्व्यांना मधे आणलत त्यामुळे ध्येयाचा प्रश्न उपस्थित झाला. बाकी "मुलांची कटकट वाटणं" ...हे मी "मुलांची फार जास्त आवड नसणं" असं म्हणेन किंवा मुल मोठं करतानाच्या जबाबदार्‍यांची नीट जाण असल्याने व तितक्या जबाबदार्‍या पार पाडण्याची इच्छा नसल्याने मी असा निर्णय घेतला आहे. मला त्याबद्दल इतकंच म्हणायचंय की एकदा वेळ निघून गेल्यावर अपत्यहीनतेवर दत्तक घेण्यापलिकडे पर्याय राहात नाही. एकतर ते काँप्लीकेटेड आहे आणि त्यातनं पुन्हा नव्या भानगडी निर्माण होण्याची शक्यता जास्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
अ
अप्पा जोगळेकर Mon, 05/02/2016 - 20:44 नवीन
मुलेबाळे स्वनिर्मित असतात. बायको स्वनिर्मित नसते. जीवावरचा प्रसंग आलाच तर अपत्य वाचवण्यालाच आई-वडील प्राधान्य देतात, जोडीदाराला नव्हे. याचा अर्थ जोडीदार तुच्छ असा नव्हे. मुलांची कटकट वाटणारे फारच विरळ असतील. त्या तुलनेत जोडीदार कटकट आहे असे म्हणणारे ढीगाने सापडतील. कित्येकदा मुलांच्यामुळे लग्ने टिकून राहतात. आणि कित्येकदा घटस्फोट होताना अपत्य ताबा मिळवण्यासाठी भांडणे, कोर्ट कचेर्या होतात. लग्नसंस्थेची निर्मिती ही अपत्य संगोपनासाठी आहे. कारण अन्य कोणत्याही प्राण्याचे बालपण हे इतके लांबलेले नाही (elongated childhood). आणि हे माणसाच्या आश्चर्यकारक प्रगतीचे एक महत्वाचे कारण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
श
शिव कन्या Sat, 05/14/2016 - 08:56 नवीन
Childfree Family म्हणजे आमच्याच कुटुंबावर वर काढेन धागा लवकरच! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
प
पिलीयन रायडर Mon, 05/02/2016 - 11:46 नवीन
आयुष्य घालवायला लग्न हा एक छान टाईमपास आहे. पण प्रेमापेक्षा मोठं किंवा उदात्त दुसरं काही काम सापडलं असेल वेळ घालवायला तर लग्नाची काही आवश्यकत नसावी. मला व्यक्तिशः लग्न न करणारे लोक आयुष्यात कंटाळत नाहीत का असं वाटतं. म्हणजे त्यांचे मैलाचे दगड कोणते असतात? आम्ही कसं घर घेणे, गाडी घेणे, पोरांच्या शाळा, मग लिस्ट मधुन एक एक ठिकाणी फिरायला जाऊन येणे, अधुन मधुन जंगी भांडणं काढणे इ इ कामात बिझी असतो. दिवस कसा जातो कळत नाही. बॅचलर लोक काय करतात?
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 05/02/2016 - 12:07 नवीन
आयुष्य घालवायला लग्न हा एक छान टाईमपास आहे.
दणकून सहमत ! लग्न या गोष्टीचा इतका महान उपयोग असताना लोक्स लग्न करायचे का टाळतात आश्चर्य आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
मराठी कथालेखक Mon, 05/02/2016 - 12:14 नवीन
घर घेणे,, गाडी घेणे ई बॅचलर्सच्या आयुष्यात पण असू शकते. मी तिशी ओलांडल्यावर लग्न केलं ; तोपर्यंत घर, गाडी यांसोबत पार्टटाईम 'डिग्री घेणं' हाही टाईमपास चालायचा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Mon, 05/02/2016 - 13:20 नवीन
होय हो.. मी ज्यांना कधी ना कधी लग्न करायचेच आहे अश्यांबद्द्दल बोलत नाहीये. ज्यांना लग्नच करायचं नाही त्यांना विचारतेय. घर नि गाडी वगैरे होऊन जातं तीशी पस्तीशी पर्यंत.. मग पुढे काय? रोजच्या रोज काय नवा टाईमपास करतात हे लोक्स?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
स
स्पा Mon, 05/02/2016 - 11:50 नवीन
बॅचलर लोक काय करतात?
=))
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 05/02/2016 - 13:19 नवीन
उगाच विषयाला वेगळेच वळण देऊ नकात स्पा काका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
भ
भीमाईचा पिपळ्या. Mon, 05/02/2016 - 13:26 नवीन
बॅचलर सर्व करतात. आपला हात , जगन्नाथ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
सुबोध खरे Mon, 05/02/2016 - 15:25 नवीन
मी विक्रांतवर असतानाचा एक अनुभव सांगत आहे.( काही लोकांना लगेच याबद्दल बोटीवर असताना, मी, मी, याचा भास होईल पण त्याला नाईलाज आहे. त्यांनी पुढे नाही वाचले तरी चालेल ) माझे वय तेंव्हा २५ होते. आम्ही सारे (बॅचलर आणि लग्न झालेले) एक महिना समुद्रावर फिरून आलो कि कंटाळलेले असायचो बॅचलर लोकांना केंव्हा एकदा बोटीवरून बाहेर पडून माणसात( मुलींमध्ये) जाऊ असे होत असे. लग्न झालेल्याना केंव्हा एकदा घरी बायको/ मुलांना भेटू असे होत असे. आमच्या मध्ये दोन अधिकारी लग्न न झालेले जुने बॅचलर होते (३७ आणि ३८ वयाचे). त्यांचे वर्गमित्र जरी जहाजावर होते तरी त्यांना एक महिना यांच्या बरोबर वेळ काढल्यावर या बॅचलरना घरी नेण्याची इच्छा नसे. आम्हा तरुण अधिकार्यांना(२२-२६ वयोगटातील) त्यांना बरोबर नेण्याची इच्छा नसे कारण शिंगे मोडून वासरात जमा करण्याचा फायदा नसे. म्हणून मग हे दोघे संध्याकाळी मेस च्या बार मध्ये बसून दारू पीत बसत. म्हणजे समुद्रावर असतानाही संध्याकाळी दारूच पिणे आणि परत आल्यावरही तोच कार्यक्रम. त्यांचे आयुष्य फार नीरस आणि कंटाळवाणे भासत असे आणि त्यांच्याच एका वर्ग मित्राच्या भाषेत एक महिना यांच्या बरोबर काढल्यावर परत या "बैला" ना घरी नेउन कुठे खायला घालायचे? एक महिन्यानंतर नवरा आणि बाप घरी येतो आहे तर बायको आणि मुलांना कोणीही तिसरा माणूस नको असे. शेवटी एका विशिष्ट वयानंतर बॅचलर लोक एकटे पडत जातात आणि ज्यांना छंद नाही किंवा नोकरी धन्द्याव्यातिरिक्त दुसरे काही करण्याची आवड नसेल तर आयुष्य फार एकसुरी होते. सुरुवातीचा "स्वातंत्र्य" म्हणून मिळणारा मोकळेपणा नंतर पोकळी बनून खायला उठतो असे मी बर्याच बाबतीत पाहीले आहे.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Mon, 05/02/2016 - 15:48 नवीन
चांगला धागा व सुरस प्रतिसाद... आम्हा ब्याचलर लोकांचे मस्त प्रबोधन चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मराठी कथालेखक Mon, 05/02/2016 - 15:55 नवीन
मी तुमच्या मित्रांना पाहिलं नाही तरी साधारणपणे म्हणू शकतो की ह्या बॅचलर्सनी लग्न करुन संसार करण्याचा प्रयत्न केला असता तरी फार काही चांगला आनंददायी संसार झाला असता असं नाही. काही लोकांची स्वभावप्रकृती एकूणातच संसारास योग्य नसते. त्यांचा कल एकटेपणाकडे जास्त असतो. अशावेळी मारुन मुटकून संसार रेटण्यापेक्षा एकटे राहणे आणि शारिरिकगरजेप्रमाणे अधूनमधून (विकतच्या वा क्षणिक प्रेमातून मिळालेल्या) सुखाचा आनंद घेणे हे त्यांच्याकरिता ठीक असू शकते. सगळेच लोक एकाच प्रकृतीचे नसतात हे समजून घेणे महत्वाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मराठी कथालेखक Mon, 05/02/2016 - 15:57 नवीन
व्यक्तिगतः मी लग्न केले आहे, पण "चाईल्डफ्री"ची वेगळी वाट चोखाळली आहे, काहींना हे चुकीचे वाटेल माझे चाळिशी नंतरचे आयुष्य भकास, नीरस असेल असे भविष्य कुणी वर्तवेल. पण माझ्यासाठी तेच ठीक असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
स
सुबोध खरे Mon, 05/02/2016 - 15:59 नवीन
प्रत्यक्षात तशी परिस्थिती नव्हती. दोन्ही अधिकार्यांना मी चांगला ओळखत होतो. एकाचा प्रेमभंग झाल्याने त्याने लग्न केले नव्हते आणी दुसर्याच्या घरच्या परिस्थिती मुळे त्याला करता आले नव्हते. अन्यथा दोघेही कुटुंब वत्सल म्हणत येतील असे सज्जन आणी सालस होते. त्यातील एकाचे( [पहिल्याचे) नंतर लग्न झाले आणी आता तो सुखात आहे. दुसर्याशी संपर्क तुटल्यामुळे काय झाले ते माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Mon, 05/02/2016 - 16:11 नवीन
प्रेमभंग झाल्याने लग्न केलेल्यांचा विषय पुर्ण वेगळाच म्हणावा लागेल. त्यांनी त्या प्रेमभंगाच्या भावनेतून आणि निराशेतून बाहेर पडल्याशिवाय (आणि शक्यतो पुन्हा उत्कटतेने प्रेमात पडल्याशिवाय) लग्न करु नये असं मला वाटतं बाकी परिस्थितीपेक्षा 'by choice' म्हणजे बॅचलर लाईफ आवडतं किंवा लग्न आणि त्यातून येणार्‍या जबाबदार्‍या नकोशा वाटतात म्हणून लग्न न केलेल्यांच आयुष्य भकास असेल असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मितान Tue, 05/03/2016 - 07:27 नवीन
परिस्थितीपेक्षा 'by choice' म्हणजे बॅचलर लाईफ आवडतं किंवा लग्न आणि त्यातून येणार्‍या जबाबदार्‍या नकोशा वाटतात म्हणून लग्न न केलेल्यांच आयुष्य भकास असेल असं वाटत नाही. >>> सहमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
अ
अप्पा जोगळेकर Mon, 05/02/2016 - 20:53 नवीन
मी एक अपवादात्मक केस पाहिलेली आहे. माझ्या वडिलांचा एक मित्र जो ६७ वर्षांचा आहे आणि माझाही मित्र आहे. हा माणूस आयुष्यभर ब्रम्हचारी आहे. केवळ अविवाहित नव्हे, ब्रम्हचारी. हा माणूस काहीसा विक्षिप्त आहे, पण लग्न न झालेल्या माणसांमधे उतारवयात जो कडवटपणा येतो तो याच्यात लेशभरही नाही. सतत हसतमुख . त्याला ब्रम्हचारी राहण्याचा जराही पश्चात्ताप नाही. and this is by choice.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 05/02/2016 - 16:14 नवीन
लग्न करावे कि नाही किंवा आपल्याला मुले असावीत का आणी असल्यास एक असावे कि दोन असावीत किंवा भरपूर असावीत हा "पूर्णपणे वैयक्तिक" प्रश्न आहे. त्यामुळे एकाच साच्यात प्रत्येकाला बसविणे शक्य नाही. माझा एक जवळचा मित्र १० पासून मी अविवाहित राहणार या विचारावर ठाम होता. "मी आत्मकेंद्रित आणी अतिशय स्वतंत्र माणूस आहे आहे आणी एका स्त्रीशी जुळवून घेणे मला जमणार नाही" असे तो तेंव्हापासून म्हणत असे. आजही पन्नाशी नंतरहि त्याच्या कडे पाहिले तर त्याचा निर्णय बरोबर होता असेच वाटते.पण त्याची विचारांची बैठक ठाम होती. सर्वांची विचारांची बैठक ठाम असतेच असे नाही. वर म्हटल्याप्रमाणे काही जणांना परिस्थितीमुळे लग्न करणे जमत नाही तर काही जण प्रेमभंगामुळे अशा नकारात्मक परिस्थितीत जातात. आजकाल जोडीदाराबद्दल "अवास्तव" अपेक्षा असल्याने रखडलेले कितीतरी बॅचलर तरुण आणी तरुणी दिसून येतात. आणी मग ते आम्हाला "लग्न"च करायचे नाही असे सांगत फिरताना दिसतात. हा निर्णय DENIAL ( नकारात्मक/ नाकबूल करणे) या मनोवृत्ती तून आलेला असतो. https://en.wikipedia.org/wiki/Denial उदा. मला पैसे मिळत नसले कि सर्व श्रीमंत लोक गैरमार्गानेच पैसे मिळवतात असे मी म्हणू लागलो तर ते "डीनायल" होईल. कारण जेंव्हा मला पैसे मिळू लागतात तेंव्हा सर्वच श्रीमंत काही गैरमार्गाने पैसे मिळवत नाहीत असे मखलाशी करावे लागते. असे असू नये एवढेच म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 05/02/2016 - 20:19 नवीन
स्वतःची वैचारिक बैठक, मानसिक जडणघडण लक्षात घेवून योग्य तो निर्णय घेण महत्वाचे. योग्य दिशा सापडत नसेल, मनाचा गोंधळ होत असेल तर काही काळ वाट बघणे योग्य. उगाच घाईगडबडित लग्नाचा निर्णय घेवू नये तसेच अविवाहित राहण्याची भीष्मप्रतिज्ञाही करु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कानडाऊ योगेशु Mon, 05/02/2016 - 17:04 नवीन
लग्न योग्य व्यक्तीशी झाले तर ते सुखी सहजीवन होते नाहीतर फरपट. मॅचिंग जोडीदार मिळणे फार महत्वाचे आहे. बाकी तद्दन बॉलिवुडी मूवी मध्ये पाहील्याप्रमाणे अशा अविवाहीत्/विधुर तत्सम कॅरेक्टर्सच्या तोंडी एक वाक्य नेहेमी असते. दिन तो ऐसे वैसे गुजर जाता है पर रात खाने को उठती है! मुळात जर छंद/ध्येये उच्चप्रतीचे असतील व त्यात खरोखरच आनंद मिळत असेल तर अश्या लोकांना लग्न केल्याने काही फारसा फायदा तोटा होत नसावा. पण उगाच अश्या लोकांचा आदर्श घेऊन जर असा काही निर्णय घेतला आणि नंतर त्यातली स्वतःची गती/फोलपणा समजला तर मग वैफल्य येऊ शकते.ना घर का ना घाट का अशी अवस्था होऊ शकते.
  • Log in or register to post comments
म
मितान Tue, 05/03/2016 - 07:28 नवीन
मुळात जर छंद/ध्येये उच्चप्रतीचे असतील व त्यात खरोखरच आनंद मिळत असेल तर अश्या लोकांना लग्न केल्याने काही फारसा फायदा तोटा होत नसावा. >>>> अगदी बरोबर. असे अनेक लोक पाहण्यात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
क
कंजूस Mon, 05/02/2016 - 17:39 नवीन
अहो ते प्राण्यांचे basic instinct नैसर्गिक इच्छाशक्ती आहे आणि ती मारण्याचा खटाटोप काहीप्राणी करतात.उदा० कुणा एकाची भ्रमणगाथात दिले आहे.पेन्गविन पक्षी जोडीदारच मिळाला नाही तर पिले पळवतात, मावशांना पिन्हे फुटतात,काकालोक भाच्यापुतण्यांचे कौतुक करण्यात रमतात सर्कसला नेतात. संसारींना सन्याशांची गरज नसते तर सन्याशांना संसाय्रांची गरज असते.रानात बसून मिळवलेले ज्ञान वाटणार कुणाला घंटा? # बाकी *** भाव विचारत गिह्राइक येतंय तोपर्यंतच भाव करून विकून टाकावेत अन्यथा ***** ( ग्राम्य म्हण )
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Mon, 05/02/2016 - 17:46 नवीन
रानात बसून मिळवलेले ज्ञान वाटणार कुणाला घंटा?
घंटा हा शब्द एका मान्यवर आयडीचा ट्रेडमार्क आहे. तुमच्यावर कारवाई होऊ शकते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
व
विवेक ठाकूर Mon, 05/02/2016 - 18:04 नवीन
संसारींना सन्याशांची गरज नसते तर सन्याशांना संसाय्रांची गरज असते.रानात बसून मिळवलेले ज्ञान वाटणार कुणाला घंटा? बरोबर! पण संसारात राहूनही काही घंटा फरक पडत नाही हे कळायला झाडाखालीच बसायला लागतं. भाव विचारत गिह्राइक येतंय तोपर्यंतच भाव करून विकून टाकावेत अन्यथा... संपूर्ण सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
M
mugdhagode Mon, 05/02/2016 - 19:08 नवीन
अगदी सहमत ! एक तर घरात सुखात रहावे किंवा बाहेर उंडारत फिरावे. उंबर्‍यावर बसुन नरसोबा मात्र होऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
त
तर्राट जोकर Mon, 05/02/2016 - 22:57 नवीन
काय दंगा घालतेत बे लोक? प्रॉफिट फुल्ल आणि इन्वेस्टमेंट झिरो असल्या स्किम्स शेवटी गोत्यात आणतात हे लक्षात असू द्यावे.
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 05/03/2016 - 02:42 नवीन
हा हा, काय चर्चा झाली! हा धागा पाहिला नव्हता. बिपाशा बासूनं एवढ्यात लग्न केलं म्हणे! मला वाटलं की त्या जॉनशी जमलं नाही म्हणून ही काही आता संसारात पडायची नाही पण पडलीच! विठा, एरवी मुलेबाळे असणे वगैरे ठीक आहे पण हवीत की नकोत हा चॉईस असतो. म्हणजे असायलाच हवा. कित्येकजण नवरा, बायको म्हणून राहतात व लाईफ पार्टनर म्हणून त्या व्यक्तिकडे पाहतात. आपापल्या व्यावसायिक आयुष्यात बिझी असलेले लोक्स जेम्व्हा मूल नको असण्याचा निर्णय घेतात तेंव्हा मूल असणे ही जबाबदारी आहे हे त्यांना कळले असण्याची शक्यता जास्त आहे. अगदी साठी पासष्ठीपर्यंत यथेच्छ व्यवसाय करतात. आणि संसार मुलाबाळांनी भरलेला असो की फक्त लाईफ पार्टनरसचा, कितीही आवडीचा व्य्वसाय असो किंवा नावडीचा, एका मर्यादेनंतर कंटाळा येणे कोणाला चुकलेय? हां, खूपच आवडीचा व्यवसाय असेल तर मनुष्य जास्त वर्षे आनंदाने करेल एवढेच. तसेही साठी जवळ आली की मुलेबाळे आपापल्या संसारात रमल्यावर म्हातारा म्हातारीला एकटेपणा असतोच. एकाच घरात सगळे रहात असले तरी म्हातारपणचा एकटेपणा सगळ्यांना असतो. त्यातल्यात्यात मुला नातवंडात मन रमवणारे जास्त लोक्स असतात. याचे कारण काय? संसार करून थकले भागलेले असतानाही म्हातारपणी वेळ कसा घालवावा हा प्रश्न असतो. आता त्यावर प्रत्येक जण आपल्या शारिरिक, मानसिक, आर्थिक ऐपतीनुसार उपाय करतो. पण तुम्ही जे म्हणाताय की असे मोकळेच राहणे यात कमिटमेंट नसते ते अजिबात पटत नाही. यशस्विरित्या असे रहायला जास्त कमिटमेंट लागत असावी कारण मुले, त्याच्यामुळे संसार वाढत जाणे हा मोठ्ठा प्रकारच आयुष्यात नसतो त्या जोडप्यांपुढे आदर्श, पाऊलवाट तयार होणे हे खूप कमी प्रमाणावर असणार. बाकी प्राडाँचा प्रतिसाद वाचून मजा वाटली. पिराशी तर फारच सहमत. ;)
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 05/03/2016 - 07:16 नवीन
रेवतीजी, प्रतिसाद आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
M
mugdhagode Tue, 05/03/2016 - 03:22 नवीन
ब्याचलर म्हणजे नेमकं काय ? अविवाहीत ? की ब्रह्मचारी ? अविवाहीत / ब्रह्मचारी / अ-मूल विवाहीत .... या तीन भिन्न क्याट्यागरीज आहेत. ( शंकेस हसु नये. विंग्रजी कच्चे आहे. )
  • Log in or register to post comments
न
नमकिन Tue, 05/03/2016 - 03:47 नवीन
असे हवे. नक्की प्रश्न कळत नाहीं, प्रश्नात सुस्पष्टता नाहीं. देवर्षि /देवॠषी/भक्त/साधू-संत हे देखील "ब्रह्मचारी" असतात. अवांतर - बाळाचे बाप ब्रह्मचारी, मर्फी आठवला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode
इ
इस्पिक राजा Wed, 05/04/2016 - 10:06 नवीन
ब्याचलर म्हणजे अविवाहित सेलिबेट म्हणजे ब्रह्मचारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा