आज नेहमी प्रमाणे कोरा (Quora) वर फिरत असताना एक इंटरेस्टिंग प्रश्न सापडला. तोच इथे चोप्यपस्ते करतोय.
"लग्न,कुटुंब यांच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय? अविवाहित आयुष्य जास्त आनंदी आहे काय?"
काही दुवे:
विचारामागचा हेतू कळणं अवघड नाही. अर्थात, तुम्हीच म्हटलंय :
फार कटकट होत असेल तर (मुलबाळ नसलेले) थोडे अधिक सहजपणे विभक्तही होवू शकतात
यावरनंही ते स्पष्ट होतं. शिवाय अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे. कारण स्त्री देहाची घडणच निसर्गानं अपत्य जन्मासाठी केली आहे. तस्मात, अपत्य जन्माविना स्त्रीला अपूर्णत्व जाणवत राहातं हा वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करणार्यांचा अनुभव आहे. थोडक्यात, चाईल्डफ्री कपल हा फार काळ टिकणारा पर्याय असू शकत नाही.
शिवाय अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे. कारण स्त्री देहाची घडणच निसर्गानं अपत्य जन्मासाठी केली आहे. तस्मात, अपत्य जन्माविना स्त्रीला अपूर्णत्व जाणवत राहातं हा वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करणार्यांचा अनुभव आहे. थोडक्यात, चाईल्डफ्री कपल हा फार काळ टिकणारा पर्याय असू शकत नाही.
वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करणार्यांचा अनुभव आणि जाणून बुजून मूल नं होऊ देणार्यांचा अनुभव सारखाच कसा असेल.
अशी कैक जोडपी बघितली आहेत ज्यांनी मूल नं होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. एक जोडपं तर २० एक वर्ष सुखाने नांदत आहे. दीर्घकाळ टिकणारा पर्याय कसा नाही?
बाकी एरवी इतरांनी वाचलेले काही सांगितले की अनुभव घेतल्यामुळे आपल्याला वाट्टेल ते बोलण्याचा अधिकार आहे अशा तोर्यात बोलणार्याने स्वतःच्या सोयीप्रमाणे पुस्तके वाचून केलेला अभ्यास अनुभवापेक्षा सरस असल्याचे वाचून मौज वाटली.
वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करणार्यांचा अनुभव आणि जाणून बुजून मूल नं होऊ देणार्यांचा अनुभव सारखाच कसा असेल.
अपत्यजन्म ही स्त्रीची नैसर्गिक इच्छा आहे कारण स्त्री देहाच्या निर्मितीमागे निसर्गाचा तो मूळ उद्देश आहे. तुम्ही ठरवा किंवा न ठरवा त्यानं काही फरक पडत नाही. स्रीची नैसर्गिक इच्छा कायम एकच राहाते. वंध्यत्वाचा सामना करणारं दांपत्य हे एक उदाहरण आहे.
अशी कैक जोडपी बघितली आहेत ज्यांनी मूल नं होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. एक जोडपं तर २० एक वर्ष सुखाने नांदत आहे. दीर्घकाळ टिकणारा पर्याय कसा नाही?
माझ्या पाहाण्यात असं एकही जोडपं नाही. शिवाय अपत्य नसेल तर दोघात बाँड तयार होत नाही या उघड वस्तुस्थितीची तुम्हाला कल्पनाच दिसत नाही. अपत्यामुळे संसार टिकतात आणि घटस्फोटही सहजी होत नाहीत. असा निर्णय घेणार्या सदस्याचाही प्रतिसाद तेच सांगतो.
बाकी एरवी इतरांनी वाचलेले काही सांगितले ..... वगैरे
प्रतिसाद नीट वाचत जा म्हणजे असे शोचनीय प्रसंग वारंवार येणार नाहीत.
मी ठरवणारा कोण? आता मग मी इतकी जोडपी बघितली त्यातल्या स्त्रीयांच्या इच्छा काय अनैसर्गिक म्हणायच्या का?
तुमच्या पाहण्यात जोडपं नाही म्हणून मग तुम्ही म्हणताय तसा बाँड तयार होत नाही म्हणायचे? बरं मला प्रतिसाद नीट न वाचता वगैरे लिहीणार्या तुम्ही माझ्या वरील प्रतिसादात लिहीलेले २० वर्ष सुखाने संसार करणार्या दांपत्याचे उदाहरण दिलेले वाचलेले दिसत नाही. तुम्ही म्हणताय तशी वस्तुस्थितीच आहे. अपत्यामुळे संसार टिकतात असे काही नाहीये. घटस्फोटही सहजी होत नाहीत हे अंशतः बरोबर. कारण मग न्यायालयात मुलांचा ताबा आणि पोटगी वगैरे जास्ती गुंतागुंतीचे होते.
प्रतिसाद नीट काय वाचायचा. तुम्हीच सांगितले ना मानसशास्त्राचा अभ्यास वगैरे? तो पुस्तकं नं वाचता कसा केला?
अपत्यजन्म ही स्त्रीची नैसर्गिक इच्छा आहे पण एखाद्या स्त्रीने 'चायील्ड फ्री' राहण्याचा निश्चय केला असेल तर या नैसर्गिक इच्छेतून ओवरकम होता येत(च) नाही का?
अवांतर: समलिंगी स्त्रियांना अशी इच्छा होत नसेल काय?
एखाद्या स्त्रीने 'चायील्ड फ्री' राहण्याचा निश्चय केला असेल तर या नैसर्गिक इच्छेतून ओवरकम होता येत(च) नाही का?
निसर्गाचं सर्कल पूर्ण होत नाही त्यामुळे अशा स्त्रीला अपूर्णत्वाचं फिलींग राहातं. सामान्यतः असा निर्णय कुणी घेत नाही, तस्मात अपत्य असणार्या स्त्रीयांना अपत्यजन्म म्हणजे काही ग्रेट वाटत नाही. म्हणून वंध्यत्व असलेल्या स्त्रीचं उदाहरण दिलंय. शिवाय मूल हा दांपत्याला जवळ आणणारा फार मोठा घटक असतो.
उदा. भूक नैसर्गिक आहे, उपासाचा निश्चय करावा लागतो. असा निश्चय निसर्गापुढे किती काळ टिकाव धरतो ? अपत्य जन्म ही तर फार गुंतागुंतीची आणि सटल घटना आहे. वरकरणी मुलांची कटकट नको म्हणून असा निर्णय घेतला आणि स्त्रीचं वय उलटून गेलं तर मग फेरविचार अशक्य होतो. तस्मात एकदाच काय ते ठरवावं, आयदर फुल पॅकेज विथ ऑल प्रोज अँड कॉर्न्स ऑर नो पॅकेज अॅट ऑल.
लेस्बियन्स अपवादात्मक उदाहरण आहेत. त्यांना पुरुषाबद्दल अनाकर्षण असल्यानं देहरचना आणि मानसिकताच भिन्न असते. अपत्याबद्दल त्यांच्या मनात विचारही येत नसावा. पण शेवटी एक्सेप्शन प्रूव्ज द रुल.
अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे. कारण स्त्री देहाची घडणच निसर्गानं अपत्य जन्मासाठी केली आहे. तस्मात, अपत्य जन्माविना स्त्रीला अपूर्णत्व जाणवत राहातं >>>>>
हे एक थोर मिथ आहे.
माझ्याबरोबर एम डी झालेली आमची मैत्रीण हिला मुल नकोच होते. हा तिचा निर्णय पक्का होता. यामुळे अर्थात तिचा घटस्फोट झाला पण आजही आपल्याला मुल असायला हवे होते असे तिला वाटत नाही. ती एका प्रथितयश अशा केंद्र सरकारच्या रुग्णालयात रेडियोलॉजिची प्राध्यापक आहे आणि आजही मानसिक दृष्ट्या कुठेही असमतोल नाही.
आमच्या शेजारची मुलगी केवळ आईवडिलांच्या इच्छेला मान देऊन स्थळे पाहत असे पण तिला लग्नच करायचे नव्हते. ती स्वतः सुंदर असल्याने बर्याच स्थळांकडून होकारही आला होता. शेवटी आईवडिलांनी कंटाळून तिला स्पष्टपणे विचारले तेंव्हा तिने धीर करून लग्नच करायचे नाही असे सांगितले. आजही ती एका केंद्र सरकारी आस्थापनात अतिशय उच्च हुद्द्यावर काम करीत आहे आणि अतिशय शांत आणि उल्हासपूर्ण व्यक्तिमत्व असलेली हसतमुख स्त्री म्हणून आम्ही तिला कित्येक वर्षे पाहत आलो आहे.
अशी अनेक उदाहरणे आहेत. तेंव्हा "अपत्य जन्माविना स्त्रीला अपूर्णत्व जाणवत राहातं" हे १०० टक्के सत्य नाही असे वाटते.
अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे. कारण स्त्री देहाची घडणच निसर्गानं अपत्य जन्मासाठी केली आहे. तस्मात, अपत्य जन्माविना स्त्रीला अपूर्णत्व जाणवत राहातं >>>>>हे एक थोर मिथ आहे.
मग वंध्य स्त्रीचं दु:खं काय असतं? आणि निसर्गाच्या स्त्री देहनिर्मितीचं तुमच्या मते प्रयोजन काय ?
वंध्य स्त्री म्हणजे समस्त स्त्री प्रजात असते का?
मुलं नसलेल्या बायका वंध्यच असतात का?
वंध्य बायका फक्त दु:खीच असतात का?
मुल असलेल्या बायका फक्त सुखीच असतात का?
वंध्य स्त्रीयांची दु:खं तुम्ही कशी अभ्यासली?
मूल नको वाटत असतानाही पिअर प्रेशर मुळे मुले होऊ दिलेल्या स्त्रीया कृतकृत्य जीवन जगत असतात असे असते का ?
मातृत्व आणि वात्सल्य वगेरेंना विनाकारण इतका फालतू थोरपणा दिला गेलेला आहे की या भावना नसणे किंवा कमी असणे = थोर महापातक किंवा वि़कृतीच !!!!
अर्थात उपरोक्त महोदयांचा मानसशास्त्राचा (सुद्धा) प्रगाढ (नेहमीप्रमाणेच) अभ्यास (यांचा तो अभ्यास आपलं ते..... जौ दे) असल्यामुळे वरील सर्व प्रश्नांची (इतरांना मूर्खात काढणारी) उत्तरे निश्चितच मिळतील हं पिरा ;)
१) निसर्गाच्या स्त्री देहनिर्मितीचा उद्देश काय ?
२) वंध्यत्व इतकं नॉर्मल असतं तर त्यावर संशोधनाची गरज काय ? (खरं तर हा प्रश्न सुबोधजींना विचारा म्हणजे तुम्हाला योग्य उत्तर मिळेल.)
त्यातच बरंच लचांड आहे..
- व्यंधत्व असल्याने व मुल होण्याची इच्छा असल्याने आणि सामाजिक दबावाने कुढणारी स्त्री..
- व्यंधत्व असूनही ;नो बीग डील' मानणारी स्त्री..
- स्वतःला मुल नकोय, पण घरच्यांच्या दबावामुळे मुल होण्याचा त्रास सहन करणारी स्त्री..
- स्वतःला मुल नकोय, म्हणून नवर्याच्या आणि घरच्यांच्या दबावाला पुरुन उरणारी स्त्री..
- बाय चॉईस 'मुल नकोय' हे पटवून देणारी व त्याप्रमाणे वैवाहिक सहजीवन आनंदात जगणारी स्त्री..
- लग्न न करता, मुल हवंय, म्हणून आवडत्या पुरुषाकडून पुत्र/पुत्रीप्राप्ती करुन घेणारी स्त्री..
- लग्नाच्या लफड्यात न पडता आवडत्या पुरुष/पुरुषांचा सहभोग उपभोगणारी स्त्री..
- - लग्नाच्या लफड्यात न पडता आवडत्या स्त्री/पुरुषांचा सहभोग उपभोगणारी स्त्री..
लय कॅटॅगर्या आहेत.. पण 'सर्वां शहाणे करुन सोडावे' म्हणतांना आपल्या ज्ञाना/समजुतीबाहेरही लोक असतात आणि ते आनंदात जगतात, हेच मान्य नसेल तर..
@ वि ठा
निसर्गाच्या स्त्री देहनिर्मितीचं तुमच्या मते प्रयोजन काय ?>>>>
निसर्गात अनेक वृक्षवेली असतात. काहींना सुंदर फळे येतात, फुले येतात काहींना येत नाहीत. या फळं फुलं न येणार्या झाडांच्या निर्मितीमागेही निसर्गाचे निश्चितच काही प्रयोजन असणार. ती काही अपघाताने झालेली निर्मिती नाही.
स्त्री देह वंश वाढवण्यासाठी असतो हे कबूल. पण ती प्रेरणा नैसर्गिक आदिम वगेरे असते हे चूक आहे. फळे व फुले न येणार्या झाडाला जितका आणि जेवढा आनंदी जगण्याचा अधिकार आहे तितकाच वंध्य किंवा अपत्यविहीन किंवा बाय चॉइस मूल होऊ न देणार्या स्त्रीयांना ( आणि पुरुषांनाही) आहे. सर्व स्त्रीयांमध्ये ती प्रेरणा असतेच वगेरे ठामपणे सांगून तुम्ही नकळत अशा गटाला दोष आणि गिल्ट देताय.
वंध्य स्त्रीचे दु:ख काय असते ?
कोणत्याही व्यक्तीचे कोणत्याही बाबतीत वंचित असण्यामुळे असणार्या दु:खासारखेच हे ही दु:ख असते. त्या दु:खाची तीव्रता वा वेदनेची धार व्यक्तिपरत्वे बदलते एवढंच. एखाद्या व्यक्तीच्या जवळची व्यक्ती गेल्याने झालेल्या दु:खाची धार व मूल हवे असून होत नसलेल्या व्यक्तीच्या ( स्त्री आणि पुरूष ) दु:खाची धार, विश्वासू पार्टनरने विश्वासघात केल्याने झालेल्या दु:खाची धार, मौल्यवान वस्तू हरवल्याने झालेल्या दु:खाची धार सारखीच तीव्र किंवा कमी तीव्र असू शकते. कारणे वेगवेगळी आहेत.
मुद्दा बहुतांश स्त्रीयांना माता व्हावे वाटते याला विरोध करण्याचा नाही. ते मान्यच आहे. पण सरसकटीकरण ( जे तुम्ही मुलामुळेच कमिटमेंट वगेरे मुद्द्यतही केले आहे ) ते मत मान्य नाही.
अजून एक विरोधाभास - लग्न अमिथाभ बच्चनचे असो की सामान्याचे, बेसिक गोष्टी समान असे तुम्हीच म्हणताय आणि खाली पि रा आणि कथालेखकाला महान व्यक्तींच्या तुलनेत स्वतःला मोजायला सांगताय. गंमत आहे.
>सर्व स्त्रीयांमध्ये ती प्रेरणा असतेच वगेरे ठामपणे सांगून तुम्ही नकळत अशा गटाला दोष आणि गिल्ट देताय.
गिल्ट देत नाही, ती वास्तविकता आहे. शिवाय वंध्यत्वाचं प्रमाण जननाक्षमतेपेक्षा कमी आहे याचा अर्थ निसर्गाचं प्रयोजन उघड आहे. वंध्यत्व असणार्यांनी आनंदात जगू नये असा त्याचा अर्थ नाही.
>कोणत्याही व्यक्तीचे कोणत्याही बाबतीत वंचित असण्यामुळे असणार्या दु:खासारखेच हे ही दु:ख असते.
चर्चेचा विषय निपुत्रिकता इतकाच आहे.
>मुद्दा बहुतांश स्त्रीयांना माता व्हावे वाटते याला विरोध करण्याचा नाही. ते मान्यच आहे. पण सरसकटीकरण ( जे तुम्ही मुलामुळेच कमिटमेंट वगेरे मुद्द्यतही केले आहे ) ते मत मान्य नाही.
म्हणजे मूळ मुद्दा तुम्हाला मान्य आहे. राहीला विषय कमिटमंटचा. तो मुद्दा `विभक्त व्हायला सोपं जातं' या अनुशंगानं आलायं.
गिल्ट देत नाही, ती वास्तविकता आहे. >>> म्हणजे मूल होऊ न देणे हा गुन्हा आहे ?
चर्चेचा विषय निपुत्रिकता इतकाच आहे. >>>> मी ही निपुत्रिकांच्या दु:खाबाबत ते विधान केलंय. 'निपुत्रिकांचे दु:ख' स्पेशल क्याटेगिरीतले नसते हे सांगितलंय.
म्हणजे मूळ मुद्दा तुम्हाला मान्य आहे.>>> हो. पण त्या मूळ मुद्द्याच्या आधारे तुम्ही उपस्थित केलेले उपमुद्दे मान्य नाहीत.
निसर्गाने येवून कानात सांगितले का उद्देश काय आहे ते ? की निसर्गाचे कुठले proposal document हाती लागले तुमच्या ?
बाकी माणूस निसर्गाच्या उद्देशाचा विचार करत बसणार की स्वतःच्या उद्देशांचा विचार करणार ?
काय बालिश प्रश्न आहे...
मी असं म्हंटलेलच नाही की जगातील प्रत्येक स्त्रीला आई होण्याची इच्छा नसते.
माझ्या आईला आणि माझ्या वडीलांनाही अपत्यप्राप्तीची इच्छा होती म्हणून मी जन्माला आलो हे उघडंच आहे. पण म्हणून मलाही तशी इच्छा असावी किंवा जगातल्या प्रत्येक स्त्रीला वा पुरुषाला अशी इच्छा असायलाच हवी असा हट्ट धरण्यात काय अर्थ आहे.
निसर्गाच्या स्त्री देहनिर्मितीचा उद्देश काय ?निसर्गाने येवून कानात सांगितले का उद्देश काय आहे ते ? की निसर्गाचे कुठले proposal document हाती लागले तुमच्या ?
याला मी उत्तर दिलंय.
पुढे तुम्ही म्हटलंय
बाकी माणूस निसर्गाच्या उद्देशाचा विचार करत बसणार की स्वतःच्या उद्देशांचा विचार करणार ?
तुमचा उद्देश काय ते तुम्ही ठरवा. मी निसर्गाच्या स्त्रीदेह निर्मितीचा उद्देश सांगितला.
निसर्ग पण तुम्हाला आधी विचारात घेतो बहुतेक. बरंय.स्त्री पण फक्त तुम्हाला कळली,स्त्रीच्या सर्व ऊर्मी तुम्हालाच कळतात.निसर्ग तुमच्या आज्ञेबाहेर नाही.
आप महापुरूष हो _/\_
पुन्हा तेच विठा? तुमच्या पहाण्यात नाही म्हणुन अस्तित्वात नाही?
मला १००% खात्री आहे की इथल्या कुणीही काहीही सांगितलं तरी तुम्ही तुमची मतं तपासुन सुद्धा बघण्याची तयारी दाखवणार नाहीत. पण तरीही एक स्त्री म्हणुन तुमच्या विधानांना किमान विरोध तरी नोंदवणं आवश्यक वाटतं.
बहुसंख्य स्त्रियांना मुल असावे असे वाटते हे खरेच आहे. पण त्यात त्यांच्या शाररिक जडणघडणीसोबतच त्यांच्या मानसिक जडणघडणीचाही पुष्कळ वाटा असतो. ज्या स्त्रिया ह्या एखाद्या ध्येयाने प्रेरित असतात, ज्यांना लग्न/नवरा/मुलं हीच आयुष्याची इतिकर्तव्यता वाटत नाही त्यांना अपुर्ण वगैरेही काही वाटत नाही.
मागे एकदा तुम्ही हाच मुद्दा मांडत होतात की स्त्रीला आपल्या देहाविषयी अभिमान वाटायला ऑगॅझम आवश्यक असतो. आता म्हणताय की पुर्णत्व वाटायला मुल आवश्यक असते. लग्न टिकायला सुद्धा मुल आवश्यक असते. एकंदरित स्त्री देहाचे सार्थक व्हायला लग्न, उत्तम शरीरसंबंध, मग त्यातुन मुल हे सर्व आवश्यक असतेच, अन्यथा तिला एकंदरित स्त्री म्हणुन अपुर्णच वाटेल. असं असतं तर जगात अनेक स्त्रिया वरील पैकी एकही गोष्ट नसताना यशस्वी झाल्या नसत्या. उदा:- किशोरी आमोणकर, लता मंगेशकर (बॉलीवुड मध्ये तर कितीतरी नावं असतील..) हय बायकांना स्वतः विषयी अभिमान नाही असं तुम्हाला वाटतं का? कुण्या पुरुषाने येऊन ह्यांचे जीवन धन्य करणे आवश्यक आहे असं वाटतं का? ह्या व्यक्ति ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत असं वाटत नाही का?
एरवी बरेच पुढारलेले विचार असणारा तुमच्यासारखा शिकलेला, व्यासंग असलेला, विचारी माणुस, स्त्री देहाच्या बाबतीत अशी विधाने कशी करतो ह्याचे मला राहुन राहुन आश्चर्य वाटते.
लग्ना बाबतीतही तुम्ही अशीच होलसेल मध्ये विधाने केली आहेत. माझ्या ओळखीत एक शिक्षक जोडपे आहे. आता त्यांना रिटायर होऊनही १०-१५ वर्ष झाली असतील. त्यांना मुलबाळ झाले नाही. ह्याची खंत असेलही त्यांना. पण म्हणुन दोघांच्या वागण्या-बोलण्यात कधीही काही जाणवत नाही. इतकं परिपुर्ण आयुष्य जगते हे जोडपे. अगदी समरसुन.. तयंच्या मुल नसल्याने कोणताही दुरावा आला नाही, उलट एकमेकांविषयी जास्तच हळवेपणा आला. एकमेकांना खुपच जपण्याची वृत्ती आली. माझ्याही एका बहिणीला मुल नव्हते. तिला मुलाची ओढ होती. लग्नाची १० वर्ष अशीच गेली. पण आमच्या ताइ भावोजींनी एकमेकांना लावलेला जीव पहायला हवा तुम्ही. पुढे त्यांनी मुल दत्तक घेतले. पण १० वर्षात ते एकमेकांच्या अतिशय जवळ आले. मला वाटतं की एकमेकांवर निस्सीम प्रेम असेल तर उलट मुल नसल्याच्या दु:खात जोडपी फार जवळ येतात. कोणत्याही आनंदापेक्षा कोणतेही दु:ख, संघर्ष आपल्याला जास्त जवळ आणतो.
संसार टिकतात ते नवरा बायको मधल्या प्रेमाने. अतुट नात्याने. मुल हा बोनस आहे. घटस्फोट होतो तो हे नातंच नसतं म्हणुन. मुल असेल तर फक्त ते नातं ओढण्याचा खेळ चालु रहातो. त्याला संसार म्हणत नाहीत. मुअलंची फरफट नको म्हणुन घटस्फोट टाळला जातो अनेकदा.. खरंय हे.. पण म्हणुन नाते टिकवले जात नाही. ज्यांना त्यातही राम वाटत नाही ते वेगळे होतातच ना? एका घरात राहुनही, मुल बाळ असुनही आणि घटस्फोटापर्यंत गोष्टी गेलेल्या नसुनही लोक प्रचंड असमाधानी असु शकतात. तेव्हा लग्न, मुल ही काही आनंदाची गुरुकिल्ली नाही. त्याला नवरा बायकोत प्रेमच असावं लागतं. आणि प्रेम असेल तर मुल असो वा नसो, फरक पडत नाही.
प्रेम नसेल पण बारा पोरं आहेत म्हणुन जोडपे सुखात आहे असे म्हणायचे का?
ज्यांनी चाईल्ड फ्री मॅरेजचा निर्णय घेतला आहे त्यांच्यात प्रेम नसतेच का?
चाईल्ड फ्री मॅरेजचा निर्णय हा फक्त "विभक्त होण्याची सोय" असतो का? एकमेकांवर प्रचंड प्रेम असले तरी मुल नकोच असणे हे कारण असण्याची शक्यताच नसते का?
ज्यांना मुलं असतात ते कधी विभक्तच होत नाहीत का?
ज्यांना मुलं आहेत त्यांच्यात प्रेमही आहे असे ठामपणे म्हणता येते का?
प्रेम नसेल पण बारा पोरं आहेत म्हणुन जोडपे सुखात आहे असे म्हणायचे का?
प्रेम असेल तर मुल नसेल तरी चालेल हे आधीच लिहीलंय ते वाचलं नाही का ?
ज्यांनी चाईल्ड फ्री मॅरेजचा निर्णय घेतला आहे त्यांच्यात प्रेम नसतेच का?
मुल नसल्यास काय अडचणी येऊ शकतात असा विषय आहे. तुम्ही सारखं प्रेम-प्रेम काय लावून धरलंय ?
चाईल्ड फ्री मॅरेजचा निर्णय हा फक्त "विभक्त होण्याची सोय" असतो का? एकमेकांवर प्रचंड प्रेम असले तरी मुल नकोच असणे हे कारण असण्याची शक्यताच नसते का?
प्रेम असेल तर मुल का नको असा प्रश्न स्वतःलाच विचारून पाहा.
ज्यांना मुलं असतात ते कधी विभक्तच होत नाहीत का?
तुम्ही विनोदी आहात का ? मुलामुळे जिव्हाळा वाढतो आणि किरकोळ पारस्पारिक मतभेदांपेक्षा मुलाचं भवितव्य महत्त्वाचं आहे हे कळू शकतं.
ज्यांना मुलं आहेत त्यांच्यात प्रेमही आहे असे ठामपणे म्हणता येते का?
उलट आहे. ज्यांच्यात प्रेम आहे त्यांना मुल ही कटकट वाटत नाही.
हा आपला मुळ प्रतिसाद.
यावरनंही ते स्पष्ट होतं. शिवाय अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे. कारण स्त्री देहाची घडणच निसर्गानं अपत्य जन्मासाठी केली आहे. तस्मात, अपत्य जन्माविना स्त्रीला अपूर्णत्व जाणवत राहातं हा वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करणार्यांचा अनुभव आहे. थोडक्यात, चाईल्डफ्री कपल हा फार काळ टिकणारा पर्याय असू शकत नाही.
मी दोन मुद्द्यांवर तुमच्याशी बोलत आहे.
१. स्त्री ला पुर्णत्व जाणवण्यासाठी अपत्याची गरज आहे की नाही (तुम्ही म्हणताय आहे.. मी म्हणतेय नाही)
२. मुल असल्यानेच जोडपी एकमेकांसोबत आनंदी असतात. जे जोडपी मुल न होऊ देण्याचा निर्णय घेतात ते लग्न टिकण्याची शक्यता कमी असते (हे तुम्ही म्हणताय, जे अर्थातच मला मान्य नाही.)
आता हा वरचा प्रतिसादः-
१. प्रेम नसेल पण बारा पोरं आहेत म्हणुन जोडपे सुखात आहे असे म्हणायचे का?
प्रेम असेल तर मुल नसेल तरी चालेल हे आधीच लिहीलंय ते वाचलं नाही का ?
कुठे लिहीलेय नक्की? कारण वर तर म्हणताय की "चाईल्डफ्री कपल हा फार काळ टिकणारा पर्याय असू शकत नाही". ह्या केस मध्ये मुल नसेल पण प्रेम असु शकतेच की? मग का नाही टिकणार हे लग्न?
२. ज्यांनी चाईल्ड फ्री मॅरेजचा निर्णय घेतला आहे त्यांच्यात प्रेम नसतेच का?
मुल नसल्यास काय अडचणी येऊ शकतात असा विषय आहे. तुम्ही सारखं प्रेम-प्रेम काय लावून धरलंय ?
मुल नसतानाच्या अडचणी? असा विषय आहे? नक्की? की "मुल हीच एक अडचण" असा विषय आहे? तुम्ही गणित मांडतात ते "मुल आवश्यक" ह्या मुद्द्यावर. मी म्हणतेय "प्रेम आवश्यक". मग मी तेच लावुन धरणार ना?
३.चाईल्ड फ्री मॅरेजचा निर्णय हा फक्त "विभक्त होण्याची सोय" असतो का? एकमेकांवर प्रचंड प्रेम असले तरी मुल नकोच असणे हे कारण असण्याची शक्यताच नसते का?
प्रेम असेल तर मुल का नको असा प्रश्न स्वतःलाच विचारून पाहा.
प्रेम आहे म्हणुन मुलही हवेच ही कोणती नवीन अट? मुल नको असण्याची अनेक कारणे असु शकतात.
४. ज्यांना मुलं असतात ते कधी विभक्तच होत नाहीत का?
तुम्ही विनोदी आहात का ? मुलामुळे जिव्हाळा वाढतो आणि किरकोळ पारस्पारिक मतभेदांपेक्षा मुलाचं भवितव्य महत्त्वाचं आहे हे कळू शकतं.
माझा प्रश्न तुम्ही नीट वाचलेला दिसत नाही. प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही मध्ये अपेक्षित होते. जे लोक विभक्त होतात त्यांना मुलं नसतातच का? अर्थातच असतात. म्हणजेच मुल असणे विभक्त होण्यास थोडासा अडथळा निर्माण करु शकत असले तरी थांबवु शकेलच असे नाही.
आणि हो मी विनोदी आहे. तुम्ही आहात का?
५.ज्यांना मुलं आहेत त्यांच्यात प्रेमही आहे असे ठामपणे म्हणता येते का?
उलट आहे. ज्यांच्यात प्रेम आहे त्यांना मुल ही कटकट वाटत नाही.
पुन्हा एकदा.. नीट वाचा. ज्यांच्यात प्रेम नाही पण मुलं आहेत अशांविषयी प्रश्न आहे तो. मुद्दा एकच मांडायचा आहे की मुल असुनही प्रेम निर्माणच झाले नाही अशा अनेक केसेस असतात. इथेही हेच अधोरेखित होते की "प्रेम आवश्यक". मुल नाही. म्हणजेच "चाईल्ड फ्री मॅरेज कॅन वर्क व्हेरी वेल".
१. स्त्री ला पुर्णत्व जाणवण्यासाठी अपत्याची गरज आहे की नाही
हो आहे. कारण ते स्त्री देहनिर्मिती मागचं निसर्गाचं मूळ प्रयोजन आहे. आणि प्रत्येक सजीव हा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. तस्मात, निसर्गाविपरित जाऊन पूर्णत्व मिळणं असंभव. वरुन कुणी काहीही म्हणो.
२. मुल असल्यानेच जोडपी एकमेकांसोबत आनंदी असतात. जे जोडपी मुल न होऊ देण्याचा निर्णय घेतात ते लग्न टिकण्याची शक्यता कमी असते
विधानातला पहिला भाग तुम्ही जोडलायं. माझं म्हणणं इतकंच आहे की मुलामुळे जोडप्यात कमिटमंट येते.
दुसर्या भागाविषयी माझं म्हणणं असं की मूल हा दांपत्यातला सेतू आहे. त्याच्याकडे कुणी कटकट म्हणून पाहात असेल तर तो त्याचा प्रश्न. पण एकदा मूल झालं की आपापसातले मतभेद दूर सारुन सुजाण दांपत्य विभक्तीच्या निर्णयापासून दूर राहाण्याची, आणि तदुनाशंगानं लग्न टिकून राहाण्याची शक्यता जास्त आहे. मूलच नसेल तर किरकोळ मुद्दे सुद्धा उग्ररुप धारण करतात आणि विभक्ती आपसूक होते.
आपले विचार समजले.
माझ्याकडुन समरी :-
१. स्त्री देह किंवा पुरुष देह ह्यांच्या निर्मितीचे कारण वगैरे ठामपणे मी सांगु शकत नाही. पण स्त्रीया अपत्याशिवायही पुर्णत्व अनभवु शकतात. एकंदरित आपल्या देहाचा अभिमान वाटायला किंवा पुर्णत्व वगैरे वाटायला कोणत्याही बाह्य गोष्टीची गरज नसते.
(आठवा... पुर्णमदः पुर्णमिदं.... हो की नाही?
सगळं काही ज्या अवस्थेत आहे.. पुर्णच आहे. तेव्हा मुल असो वा नसो.. स्त्रीला तसे वाटो वा न वाटो.. ती स्त्री पुर्णच आहे... हे ज्यांना उमगतं त्या स्त्रिया मुल न होऊ देण्याचा निर्णय घेऊनही आनंदात राहु शकतात. त्यांना कोणतेही वैष्यम्य अथवा अपुर्णत्व जाणवत नाही. हरि ओम!)
२. मुल असणे हा सुद्धा केवळ एक मुद्दा आहे. लग्न / नाते टिकणे ह्याला केवळ त्या नात्यात प्रेम आवश्यक आहे. ते असेल तर किरकोळ मुद्दे किरकोळच रहातात. ते नसेल तर मुल असुनही किरकोळ मुद्द्यांमधुन दुरावा निर्माण होऊ शकतोच. मुलांसाठी सोबत रहाणे ही निव्वळ तडजोड असते. तस्मात एकत्र रहाणे हे "प्रेमावर" अवलंबुन आहे, मुल असण्यावर नाही.
तस्मात समरी अशी की मला आपले विचार मान्य नाहीत.
धन्यवाद!
अवांतर :- पुरुष देहाविषयीचे आपले विचार ऐकायला आवडतील.
सगळं काही ज्या अवस्थेत आहे.. पुर्णच आहे. तेव्हा मुल असो वा नसो
हे कळलेल्यांना `विचारणेचा धागा' काढायची आवश्यकताच नसते. पण धागा काढलायं म्हणजे पूर्णत्व समजलेलं नाही. इतपत तरी समजायला हरकत नाही.
तस्मात एकत्र रहाणे हे "प्रेमावर" अवलंबुन आहे, मुल असण्यावर नाही.
प्रेम असेल तर मुल असण्याची अडचण तर वाटत नाहीच. उलट अपत्यप्राप्तीचा आनंद होतो. हे बहुदा स्वानुभवानं कुणाच्याही लक्षात येईल. पण वादासाठी वाद घालून विषय भरकटवण्यात आपला हात कोण धरणार ?
तस्मात समरी अशी की मला आपले विचार मान्य नाहीत.
हे असं पाहिजे : तस्मात, भाषा कॉपी मारुन आकलन झालं असं समजणं फक्त अज्ञान दर्शवतं.
जे निर्णयावर ठाम आहेत त्यांना ; शिवाय ज्यांना पूर्णवाद समजला आहे त्यांना धागा काढायची गरज नसते हे मान्य. पण मग आपले मुद्दे सर्वांनी मान्य करेपर्यंत सांगत रहायची तळमळ का असते ब्रे ???
जर मुद्दे क्लिअर असतील आणि 'स्वत:ला' पटलेले असतील तर लोक किती का धागे काढेनात ! आपण आपलं त्यांना मंदस्मित देऊन आपल्याला समजलेला सत् चिद् आनंद लुटावा. हा व्यर्थ शब्दांचा गल्बला का ???
अगं पण मितान,
धाग्यात फक्त लग्न करावे की करु नये एवढाच मुद्दा आहे. मुल जन्माला घालण्याचा आणि पुर्णत्वाचा मुद्दा विठांनी इथे आणला आहे. असे असताना पुन्हा अजुन विठा धागाकर्त्यावर का घसरत आहेत. दुसर्या धाग्यात "सगळं काही पुर्ण आहे" असं म्हणायचं आणि इथे येऊन "मुल जन्माला घातल्याशिवाय स्त्रीला पुर्णत्व नाही" असंही म्हणायचं. म्हणजे वंध्यत्व असणार्या स्त्रिया, ज्यांना नवरा नसल्याने मुल होऊ शकत नाही अशा स्त्रिया, ज्यांना मुल नकोच आहे अशा स्त्रिया.. सर्व जणी अपुर्ण??
पुरे हं विठा...
मी सभ्यपणे बोलतेय तर तुम्ही सुद्धा तसंच बोलावं अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी नाही का?
मी तुम्हाला खालील एका प्रतिसादात व्यवस्थित विचारलं होतं की एकमेकांची अक्कल न काढता चर्चा करायची का म्हणुन. शिवाय मी एकदाही वैयक्तिक प्रतिसाद दिलेला नाही. असे असताना आपण "चर्चा भरकटवते" किंवा "अज्ञानी आहे" "भाषेची कॉपी मारते" इ. वैयक्तिक प्रतिसाद का देत आहात ते कळत नाही. तुम्हाला नाही समजलं तर ठिके.. तसं सांगा.. पण म्हणुन दुसर्यावर आरोप करणे चुक आहे.
बाकी तुम्ही "तस्मात" म्हणता का सारखं? कारण मी हा शब्द पु.लंच्या "असा मी असामी" मध्ये बेमट्याचे वडील वापरतात तशा अर्थाने इथे वापरते. तुमचा त्यावर कुठे कॉपीराईट रजिस्टर्ड असल्यास कळवावे. आणि एका शब्दाने भाषा कशी कॉपी होते हे ही सांगावे. अन्यथा हा आरोप मागे घ्यावा.
जाता जाता..
सगळं काही ज्या अवस्थेत आहे.. पुर्णच आहे. तेव्हा मुल असो वा नसो
हे कळलेल्यांना `विचारणेचा धागा' काढायची आवश्यकताच नसते. पण धागा काढलायं म्हणजे पूर्णत्व समजलेलं नाही. इतपत तरी समजायला हरकत नाही.
हे तुम्ही मला दिलेल्या आजवरच्या सर्व प्रतिसादांमधला सर्वात हुकलेला प्रतिवाद आहे. =)) मुद्दा काय.. तुम्ही बोलताय काय.. माय गॉड सो फन्नी!!!
प्रेम असेल तर मुल असण्याची अडचण तर वाटत नाहीच. उलट अपत्यप्राप्तीचा आनंद होतो.
म्हणजे ज्यांना मुल अडचण वाटते त्यांचे एकमेकांवर प्रेम नसते असे म्हणायचे आहे का आपल्याला ?
कृपया माझ्या सारख्या अति सामान्य व्यक्तीला समजेल असे आणि एका शब्दात उत्तर दिले तर फार बरे होईल. धन्यवाद.
प्रेम असेल तर मुल असण्याची अडचण तर वाटत नाहीच. उलट अपत्यप्राप्तीचा आनंद होतो.
इथे अनेक अपत्यप्राप्त विवाहित आहेत. सगळ्यांचा अनुभव काय आहे ? अपत्यप्राप्तीचं दु:ख झालेलं कुणी आहे का?
म्हणजे ज्यांना मुल अडचण वाटते त्यांचे एकमेकांवर प्रेम नसते असे म्हणायचे आहे का आपल्याला ?
मुल ही वैवाहिक जीवनाची आणि पारस्पारिक प्रेमाची सहज फलनिष्पत्ती आहे. मुल ही कटकट वाटणारं दांपत्य माझ्या तरी पाहाण्यात नाही.
दुसर्यांना वाटत नसेल, आणि तरीही त्यांच्यामते ते सुखी असतील तर त्या सुखाला तुमची काही हरकत आहे का? असल्यास त्या हरकतीचा त्यांना फरक पडत नसेल, तर त्यालाही तुमची हरकत आहे का?
असो. माझा एक मित्र आहे. त्यानी व त्याच्या बायकोनी 'मुल नकोय' असं ठरवलंय.. ते त्यांचं आयुष्य सुखात जगताहेत. आम्हाला मुलगी आहे. बायकोची इच्छा आणि सहमती असल्यास पुढेपण बघू. आम्हीही सुखी आहोत (असं मला वाटतं.) मग ह्या दोन परीवारांत कमी-जास्त करायचं का? आणि कशाला?
प्रेम असेल तर मुल असण्याची अडचण तर वाटत नाहीच. उलट अपत्यप्राप्तीचा आनंद होतो.म्हणजे ज्यांना मुल अडचण वाटते त्यांचे एकमेकांवर प्रेम नसते असे म्हणायचे आहे का आपल्याला ? कृपया माझ्या सारख्या अति सामान्य व्यक्तीला समजेल असे आणि एका शब्दात उत्तर दिले तर फार बरे होईल. धन्यवाद.