Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुन्हा झकीर नाईक

ह
हुप्प्या
गुरुवार, 07/07/2016 - 21:23
🗣 271 प्रतिसाद
https://www.youtube.com/watch?v=I6GY8WvRHo8 झकीर नाईक हा एक तल्लख स्मरणशक्ती असणारा, खर्‍या खोट्याची बेमालूम मिसळ करून सांगणारा एक वहाबी तत्त्वज्ञानाचा पाईक आहे. अरबी देशातून ह्याच्या संघटनेला भक्कम पैसा मिळतो. बांगला देशात ढाका इथे जे जीवघेणे अतिरेकी हल्ले झाले त्यातील अतिरेकी हे झकीर नाईकचे भक्त होते. त्यामुळे ह्या इसमाला आपले विचार खुलेपणाने मांडू द्यावेत की बंदी घालावी अशा चर्चा भारतीय माध्यमात होऊ लागल्या आहेत. खरे तर कुठल्याही विचारावर बंदी घालणे चूक. पण भारतात असे निर्भेळ विचारस्वातंत्र्य नाही. सॅटॅनिक व्हर्सेस एक मोठे उदाहरण आहे. जेम्स लेनचे शिवाजी महाराजांवरचे पुस्तक हे एक दुसरे. अशा प्रकारची बंदी घातलेल्या साहित्याची यादी प्रचंड मोठी आहे. (https://en.wikipedia.org/wiki/List_of_books_banned_in_India) माझ्या मते ह्या माणसाचे विचार खंडन करुन टाकावेत. बंदी घालून काही साध्य होत नाही. व्यासपीठावर, झगमगाटात, हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत (ज्यातले बहुतेक त्याचे भक्तच असतात) तो अगदी दिपवून टाकणारे काहीतरी भव्यदिव्य बोलतो. पण बारकाईने तपास केला तर त्याच्या मुद्द्यातील कच्चे दुवे सहज कळतात. सौदी अरेबियात बाकी धर्मस्थळे बनवायला परवानगी नाही ह्याचे उत्तर असे की गणिताचे शिक्षक नेमायचा असेल तर २+२=४ उत्तर देणारा नेमाल का २+२=५ असे उत्तर देणारा? इस्लाम हा २+२=४ उत्तरवाला आणि बाकी धर्म २+२=५ किंवा २+२=३ वाले आहेत म्हणून त्यांना परवानगी नाही असे खरे तर संतापजनक आणि अन्य धर्मांना तुच्छ लेखणारे ह्याचे उत्तर यू ट्युबवर उपलब्ध आहे. https://www.youtube.com/watch?v=mzq--C6rHIY अशा विचारांनी प्रभावित होऊन कुणी ढाक्यातील अतिरेक्यांप्रमाणे कुराणातील आयतांवर प्रश्न विचारून ते न येणार्‍यांचा शिरच्छेद केला तर झकीर नाईकाचा त्यात वाटा नाहीच असे कसे म्हणता येईल? एखाद्या देशातील लोकशाही, विचारस्वातंत्र्य ह्यांचा वापर करुन असहिष्णूपणा, दहशतवादाला पूरक विचार मांडणे ही एक डोकेदुखी बनत आहे. भारताप्रमाणे इंग्लंड, अमेरिका इथेही असले प्रकार होताना दिसतात. ह्याला आळा कसा घालावा हा एक क्लिष्ट प्रश्न आहे. असल्या प्रकारावर उतारा म्हणून हा उपाय कसा वाटतो? https://www.youtube.com/watch?v=F630rQ2lrWU
वर्गीकरण
समाजकारण बातमी

प्रतिक्रिया द्या
58860 वाचन

💬 प्रतिसाद (271)
स
सचु कुळकर्णी गुरुवार, 07/07/2016 - 21:31 नवीन
आपले विचार खुलेपणाने मांडू द्यावेत की बंदी घालावी अशा चर्चा भारतीय माध्यमात होऊ लागल्या आहेत. खरे तर कुठल्याही विचारावर बंदी घालणे चूक. पण भारतात असे निर्भेळ विचारस्वातंत्र्य नाही. हुप्प्या भौ पुढे नाय वाचले. एक ठरवा काय ते मग बोलु.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या गुरुवार, 07/07/2016 - 22:58 नवीन
एक ठरवले आहे की शुद्ध व्यक्तीस्वातंत्र्य राबवण्याची भारत देशाची परंपराच नाही. आता बोला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
च
चंपाबाई गुरुवार, 07/07/2016 - 21:42 नवीन
बापूजींची हत्या करणार्‍यानेही मी अमके तमके यांना गुरु मानतो असे सांगितले होते ना ?
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 07/07/2016 - 21:48 नवीन
और ये हो गयी बोनी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
ह
हुप्प्या गुरुवार, 07/07/2016 - 22:57 नवीन
१. सावरकरांवर रीतसर खटलाही भरला होता. कडव्या गांधीवाद्यांकडून त्यांच्या नातेवाईकांना मारहाणही झाली होती. झकीर नाईकांना तसे करावे असे सुचवताय का? २ गांधींना मारणे हा दहशतवाद होता का? माझ्या मते नाही. ती एक ठरवून केलेली राजकीय हत्या होती. हातात पिस्तुल होते, अनेक नि:शस्त्र लोक जे गांधीचे भक्त म्हणजे नथुरामचे विरोधी होते. पण अन्य कुणालाही मारले नाही. ढाक्यात जे झाले तो शुद्ध दहशतवाद होता. त्या बेकरीत उपस्थित लोकांना केवळ मुस्लिम नाहीत, कुराण येत नाही म्हणून ठार केले गेले. गांधींना मारणे आणि हा प्रकार ह्यात आपणास फरक दिसत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Fri, 07/08/2016 - 04:43 नवीन
केवळ गुरु आहेत असे म्हटल्याने खटला झाला नव्हता. कटात सामील असण्याचा संशय होता म्हणुन खटला झाला होता. .... गुरु मानणे व कटात सामीलही असणे / तसा संशय असणे यात फरक आहे न ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ह
हुप्प्या Fri, 07/08/2016 - 07:34 नवीन
१. गांधींना मारणे हा दहशतवाद नव्हता. गांधींना मारणे इतकाच मर्यादित हेतू ठेवून सगळी आखणी झाली होती. जगभरच्या अमुक एका विचाराला न मानणार्‍या मिळेल त्या व्यक्तीला कसेही करून ठार मारण्याचा हा जगत्व्यापी कट नव्हता. इथे म्हणजे ढाका, मदिना, अन्कारा, बगदाद ह्या विविध ठिकाणी तो तसा आहे असे दिसते आहे. २. झकीर नाईकच्या जहाल विचारांचा प्रचार प्रचंड प्रमाणात होत आहे. प्रेक्षकांपैकी अगदी १ टक्का लोक माथे फिरून हिंसक कारवाया करु लागले तरी मोठे उत्पात होऊ शकतात. देशांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. अशा विचारांचा प्रसार करु देण्याकरता भूमी, व्यासपीठ उपलब्ध करुन द्यायला बहुसंख्य बिगरमुस्लिम असणारा देश बांधील आहे का? ३. वर्तमानकाळातील प्रत्येक घटनेला गांधीहत्येशी संबंध जोडून तिथे तसे घडले मग आता का नाही असे विचारणे हे आवश्यक आहे का? असे केल्याने वर्तमानकाळातील समस्या सोडवणे सोपे जाते का? ४. गांधीहत्येनंतर महाराष्ट्रातील विशिष्ट गटाने तमाम ब्राह्मण घरात मारहाण, जाळपोळ, लुटालूट केली. कित्येक ब्राह्मण कुटुंबे बेघर होऊन देशोधडीला लागली. पोलिस व कायद्याने ब्राह्मण लोकांना वार्‍यावर सोडले होते. निदान ह्या गोष्टीचे वर्तमानकाळात वा भविष्यात कधीही अनुकरण होऊ नये अशी माझी तरी इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
स
सुबोध खरे Fri, 07/08/2016 - 08:04 नवीन
हुप्प्या शेट तुम्ही त्या मोगाच्या नादाला कुठे लागता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ब
बोका-ए-आझम Fri, 07/08/2016 - 13:00 नवीन
हुप्प्याभौ, काही आयडींशी चर्चा करुन काहीही निष्पन्न होत नाही. मनस्ताप मात्र होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Fri, 07/08/2016 - 07:09 नवीन
दाभोलकर,पानसरे,कलबुर्गी यांची हत्या म्हणजे धार्मिक दशतवादच. आणि त्यावर इथे का काथ्याकूट होत नाही बरे?? दांभिक कुठचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
म
माहितगार Fri, 07/08/2016 - 08:48 नवीन
कोणत्याही एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थन होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
ब
बोका-ए-आझम Fri, 07/08/2016 - 12:57 नवीन
संजय पाटील यांनी काढलेला धागा होता. आणि इतरांना दांभिक म्हणण्याऐवजी स्वतः धागा काढा की. लोक करतील चर्चा. बरं; दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी या तिन्हीही हत्यांमध्ये अजून खटला होऊन निकाल लागणं वगैरे प्रकार व्हायचे आहेत. त्यांची हत्या धार्मिक कारणावरून झाली हे अजून सिद्ध झालेलं नाही. मग तुम्हाला काही का वाटेना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Fri, 07/08/2016 - 14:00 नवीन
कलबुर्गींच्या हत्येवर काथ्याकूट झालेला आहे.
हो झाला ना! तोंडदेखला निषेध नोंदवून आपला अजेंडा चालवणार-या बर्याच प्रतिक्रिया पाहिल्या.
तिन्हीही हत्यांमध्ये अजून खटला होऊन निकाल लागणं वगैरे प्रकार व्हायचे आहेत. त्यांची हत्या धार्मिक कारणावरून झाली हे अजून सिद्ध झालेलं नाही.
डाॅ तावडे आणि अकोलकर हे काय आयसिसचे मेंबर आहेत काय?? एबीपी माझावर या प्रकरणातील कोल्हापूरच्या साक्षीदाराची मुलाखत ऐकली आहे का? कि सोयीचं तेवढचं घेता?
आणि इतरांना दांभिक म्हणण्याऐवजी स्वतः धागा काढा की.
आमचे धागे उडवतात इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Fri, 07/08/2016 - 14:02 नवीन
दांभिकांच्या प्रतिक्रिया यामध्ये लगेच ओळखतात http://www.misalpav.com/node/32592
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
ब
बोका-ए-आझम Sun, 07/10/2016 - 06:04 नवीन
त्याचं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
भ
भोळा भाबडा Fri, 07/08/2016 - 14:12 नवीन
इस्लामी कट्टरता आणि दहशतवाद याबाबत इथे चर्चा करून काही उपयोग नाही कारण इथे कोणी मुसलमान नाहित कि जेणेकरून त्यांना समुपदेशन मिळेल,पण दभोलकर-पानसरे यांबद्दल चर्चा केली तर कायतरी उपयोग होईल,कारण इथे बरेच सनातनी आणि देवभोळे लोक आहेत त्यामुळे निदान चर्चा वाचून इथल्या पूर्णसंख्यांक हिंदूना समुपदेशन तरी मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
म
माहितगार Fri, 07/08/2016 - 14:56 नवीन
...याबाबत इथे चर्चा करून काही उपयोग नाही कारण..
१) मंगळ अथवा शनी ग्रहावरील इथे कोणी नसले तरीही आम्ही मिपावर चर्चा करतो :), सभ्यतेच्या संकेतात आणि मिपाच्या धोरणात बसते तो पर्यंत मिपा एक चर्चामंच आहे सर्व विषयांवर साधक बाधक चर्चा झाल्याच पाहीजेत. २) मिपा हे आजच्या घडीला सर्वाधीक वाचले जाणारे मराठी चर्चामंच संस्थळ आहे, ज्या विषयाबद्दल हा धागा आहे ती व्यक्ती महाराष्ट्रात राहते संस्था चालवते महाराष्ट्रातून प्रचार चालवते त्याच्या यथायोग्यते बद्दल मिपावर चर्चा होऊ नये ? कमाल आहे ? चर्चा न झाल्यामुळे अविश्वास पूर्वग्रह वाढले तर ते कुठल्या मंचावर हाताळले जाणार ? ३) आज सगळ्याच समुदायांची नवी पिढी इंग्रजी माध्यमातून शिकते आहे समुपदेशनही इंग्रजी भाषेतून अधिक श्रेयस्कर पण इंग्रजी भाषेत लिहिणारे समुपदेशनात यशस्वी झाले असते तर हा प्रश्नही उपस्थीत झाला नसता म्हणजे इंग्रजीतून चर्चा करणारे कुठेतरी कमी पडताहे म्हणून स्थानीय भाषेत चर्चा झाली तर त्यांना न जमलेल्या काही रचनात्मक बाजू मराठीतून पुढे येऊ शकतील असा विचार का करु नये ? ४) अमुकतमूक समुदाय महाराष्ट्रात कैक शतके राहतो आणि मराठी चर्चामंचावर नसतो याचा कार्यकारणभाव वेगळ्या चर्चेचा विषय आहे तुर्तास विषय काढलात तर लक्ष वेधतो ५) इतर गोष्टींबद्दल चर्चा वेगवेगळ्या धाग्यातून होतच असतात दुसर्‍या मुद्द्यांकडे लक्ष वेधून एखाद्या विषयावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न तार्कीक उणीवेचा तर आहेच पण त्या पेक्षा आपण चर्चा दाबतो तेव्हा रचनात्मकताही दाबत असू शकतो त्यामुळे अशापद्धतीने चर्चा दाबण्याची मनिषा कितपत सकारात्मक ठरते या बद्दल साशंक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोळा भाबडा
भ
भोळा भाबडा Fri, 07/08/2016 - 15:26 नवीन
५) इतर गोष्टींबद्दल चर्चा वेगवेगळ्या धाग्यातून होतच असतात दुसर्‍या मुद्द्यांकडे लक्ष वेधून एखाद्या विषयावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न तार्कीक उणीवेचा तर आहेच पण त्या पेक्षा आपण चर्चा दाबतो तेव्हा रचनात्मकताही दाबत असू शकतो त्यामुळे अशापद्धतीने चर्चा दाबण्याची मनिषा कितपत सकारात्मक ठरते या बद्दल साशंक आहे.
किंचित असहमत, मुद्दा दाबण्याचा काहीच हेतू नाही. माय पाँईंट इज,आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे न पाहता निरर्थक अत्मरंजन चालू असते. सनातन वृत्ती,देवभोळेपणा,कर्मकांड इत्यादी गोष्टींवर चर्चा करणार-यांना इथे काय प्रतिष्ठा आहे ते आपणास माहित आहेच,सगळे कसे अंगावर धावून जातात?(उदा-यनावाला) बाकि चर्चा दाबण्याची मनिषा नाही ओ साहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 07/08/2016 - 16:12 नवीन
माय पाँईंट इज,आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे न पाहता निरर्थक अत्मरंजन चालू असते.
मी आस्तीक नास्तीक ह्या धर्माची बाजू ते त्या धर्माची बाजू उजवी डावी बर्‍याच विषयांवर मी लेखन केले आहे, मी तटस्थपणे लेखन आणि सगळ्यांच्या योग्य बाजूला उचलतो आणि टिकाही करतो एकांगी लिहीत नाही याची माहिती झाली आहे ते सहसा माझ्या अंगावर धावून येत नाहीत. व्यक्तिगत टिकेसंबंधी आणि तार्कीक उणीव यूक्त लेखन होते -तार्कीक उणिवा दाखवून दिल्या की भागते- पण जगातली ९९ % लोक तर्कशुद्ध बुद्धी प्रामाण्यावर नाही भावनांवरच जगतात हे ही वास्तव नाही का ? बाकी बुडा खाली अंधार हे वास्तव असले तरी बुड सोडून इतरत्र प्रकाश देण्याची क्षमताही असू शकते, सकारात्मकतेने पाहीले की सकारात्मक दिसते. दुसर्‍या धाग्यांवरचा राग या धाग्यावर येऊन काढण्यात इथल्या चर्चेत विषयांतर करणे हा सुद्धा तार्कीक उणीवेचा प्रकार आहे आणि आपण इतरांकडून तर्कपूर्णतेची अपेक्षा करतो तेव्हा तर नक्कीच टाळला पाहीजे किंवा कसे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोळा भाबडा
भ
भोळा भाबडा Fri, 07/08/2016 - 16:50 नवीन
हम आपके मुरीद हुए। संयत प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ब
बोका-ए-आझम Fri, 07/08/2016 - 15:52 नवीन
डाॅ तावडे आणि अकोलकर हे काय आयसिसचे मेंबर आहेत काय?? एबीपी माझावर या प्रकरणातील कोल्हापूरच्या साक्षीदाराची मुलाखत ऐकली आहे का? कि सोयीचं तेवढचं घेता?
तुम्ही न्यायाधीश आहात का? नाही ना? मग तुमचं मत काहीही असो, जोपर्यंत कोर्टात गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत माणूस गुन्हेगार नाही. एवढी साधी गोष्ट आहे. डाॅ.तावडे पोलिसांच्या अटकेत आहेत. सारंग अकोलकर फरार आहेत. त्यावरून त्यांना दोषी मानायचं असेल तर तुम्ही खुशाल मानू शकता. इतरांनाही तसंच वाटावं अशी सक्ती करु शकत नाही.
आमचे धागे उडवतात इथे.
संपादकांना जे उडवण्याच्या लायकीचं वाटतं ते सगळं उडवलं जातं. तुम्हाला तुमचे धागे ज्ञानपीठ पारितोषिकाच्या तोडीचे वाटत असतील. संपादकांना वाटत नाहीत. साधी गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
च
चंपाबाई Fri, 07/08/2016 - 16:08 नवीन
तुम्ही न्यायाधीश आहात का? नाही ना? मग तुमचं मत काहीही असो, जोपर्यंत कोर्टात गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत माणूस गुन्हेगार नाही. एवढी साधी गोष्ट आहे.. ...... जनाब नाईकसाहेब यानाही हे लागू होइलच ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Fri, 07/08/2016 - 17:21 नवीन
जनाब नाईकसाहेब यानाही हे लागू होइलच ना ?
अर्थातच. म्हणजेच त्यांना कोर्टात उभं करायला पाहिजे हे तुम्हाला मान्य आहे. चला. या आयडीत सुधारणा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
ब
बोका-ए-आझम Fri, 07/08/2016 - 17:21 नवीन
जनाब नाईकसाहेब यानाही हे लागू होइलच ना ?
अर्थातच. म्हणजेच त्यांना कोर्टात उभं करायला पाहिजे हे तुम्हाला मान्य आहे. चला. या आयडीत सुधारणा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Fri, 07/08/2016 - 16:14 नवीन
तीन-तीन माणसे मारली राव!! तुम्हाला काय हा योगायोग वाटतो काय? बाकि तुम्ही याबाबतीत झापड ओढली आहे त्यामुळे अधिक काय सांगणे. सूज्ञांना माहित आहेच कोणती वृत्ती यास कारणीभूत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
च
चंपाबाई Fri, 07/08/2016 - 17:17 नवीन
माणसे नाईकसाहेबानी मारली ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Fri, 07/08/2016 - 17:20 नवीन
आवं मी सनातन्यांबद्दल बोलत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Fri, 07/08/2016 - 17:24 नवीन
चंपाबाई,
माणसे नाईकसाहेबानी मारली ?
त्याला साहेब म्हणायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Fri, 07/08/2016 - 19:36 नवीन
उसे श्री मत कहो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
ब
बोका-ए-आझम Fri, 07/08/2016 - 17:32 नवीन
त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. तरीही कोर्टात खटला चालवून, सर्व साक्षी-पुरावे तपासून त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यावर अपील करण्याचा आणि भारताच्या राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याचा हक्कही देण्यात आला. या आरोपींनाही तो हक्क आहे आणि तुम्ही कितीही म्हणालात तरी जोपर्यंत कोर्टात या हत्या सनातन्यांनी केल्या आहेत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही सनातन्यांच्या नावाने काहीही आरोप केलेत तरी त्याला काहीही अर्थ नाही. तुमच्याकडे जर त्याबद्दल माहिती असेल तर पोलिसांना का नेऊन देत नाही? सगळंच स्पष्ट होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
अ
अनुप ढेरे Fri, 07/08/2016 - 16:37 नवीन
झाकीर नाईकचे विचार/भाषणं गुन्हा आहे हे देखील अजून कोर्टात सिद्ध झालेलं नाही. म्हणून काय त्यावर मत प्रदर्शन करायचं नाही काय? बांग्लादेश्मधले अतिरेकी आणि दाभोळकर आदींना मारणारे सनातनप्रभात वाले यांच्यात फरक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
भ
भोळा भाबडा Fri, 07/08/2016 - 16:47 नवीन
बांग्लादेश्मधले अतिरेकी आणि दाभोळकर आदींना मारणारे सनातनप्रभात वाले यांच्यात फरक नाही. सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ब
बोका-ए-आझम Fri, 07/08/2016 - 17:41 नवीन
असं अजून सिद्ध झालेलं नाही. मुळात त्यांना का मारण्यात आलं हेच अजूनही सिद्ध झालेलं नाही. वीरेंद्र तावड्यांकडे सापडलेल्या कागदपत्रांत दाभोळकरांचा उल्लेख दानव का राक्षस असा केलेला होता. त्यावरून त्यांची हत्या सनातनच्या लोकांनी केलेली आहे हे सिद्ध होत नाही. शिवाय एखाद्या माणसाने हत्या केली म्हणजे तो ज्या संघटनांचा सदस्य आहे त्या सर्व गुन्हेगार किंवा दहशतवादी संघटना होत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Fri, 07/08/2016 - 17:48 नवीन
मी काही लगेच त्यांना शिक्षा द्या असं म्हणत नाहिये. कोर्टाची भांडणं वर्षानुवर्ष चालतील. पण सामान्य माणसाला मत बनवता येतं आणि ते खूप चुकीचं असतं असं नाही. तसं बघायला गेलं तर राजा/ कनिमोझी यांच्यावर देखील कोणतेही टू-जीमधले आरोप कोर्टात सिद्ध झालेले नाहीत. पण तरीही सामान्य माणूस त्यांना भ्रष्टाचारी मानतोच. तसंच सनातन प्रभात बद्दल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Fri, 07/08/2016 - 18:11 नवीन
आपल्या देशातल्या न्यायव्यवस्थेत निकाल लागायला वेळ लागतो आणि खटल्याला राजकीय रंग मिळाला की कुठलाही राजकीय पक्ष विधिनिषेध न बाळगता त्याचं भांडवल करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्याला हवा असलेला कुणी जर दोषी नसेल तर त्याला कोर्टाचा निर्णय पटत नाही. यातूनच कोर्टाबाहेर जाऊन न्याय मिळवायचे प्रयत्न सुरु होतात. नक्षलवादी असोत किंवा बजरंग दल - दोन्हीही लोकांना तारणहार वाटायला लागतात.हे दुष्टचक्र चालू राहतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Fri, 07/08/2016 - 18:40 नवीन
दाभोळकर आदींचे तीन खून हाही धार्मिक दहशतवाद आहे हा मूळ मुद्दा होता. केवळ ते अजून कोर्टात सिद्ध झालेलं नाही म्हणून लोकांनी त्यावर मत बनवू नये असं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Sat, 07/09/2016 - 05:42 नवीन
दाभोळकर आदींचे तीन खून हाही धार्मिक दहशतवाद आहे हा मूळ मुद्दा होता.
कशावरून धार्मिक दहशतवाद? तेच तर सिद्ध व्हायचंय. खून का झाला हेच अजून सिद्ध झालेलं नाहीये. सर्वजण त्यांच्या कार्यामुळे त्यांचा खून झाला असं म्हणताहेत. दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी हे गेली अनेक वर्षे कार्यरत होते. आत्ताच त्यांचं कार्य लोकांना समजलं आणि त्यातून त्यांची हत्या झाली? काहीही असलं तरी ते न्यायालयापुढे आलेलं नाही. लोकांनी काहीही मत बनवू दे. तो त्यांचा हक्क आहे. पण न्यायालयात ते जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Sat, 07/09/2016 - 10:36 नवीन
मी गुन्हा सिद्ध झालेला आहे असं म्हणालेलो नाहिच्चे. मत काय बनलं आहे तेच सांगतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Fri, 07/08/2016 - 18:11 नवीन
न्यायालय स्वतः पुरावे गोळा करत नाही,ते पुरवणारे जे लोक असतात तेच न्याय करत असतात,बाकि न्यायालयात औपचारिक सुनावणी होते इतकेच.आता सलमानचचं उदाहरण घ्या ना. न्यायालयामध्ये देव आहे हे सुद्धा सिद्ध होऊ शकत नाही,पण देव मानणारे किती प्रचंड संख्येने आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Fri, 07/08/2016 - 18:36 नवीन
न्यायालय स्वतः पुरावे गोळा करत नाही,ते पुरवणारे जे लोक असतात तेच न्याय करत असतात,बाकि न्यायालयात औपचारिक सुनावणी होते इतकेच.
एका सलमानच्या उदाहरणावरुन न्यायव्यवस्थेवर टीका करणं हे नकारात्मक वृत्तीचं निदर्शक आहे, असं माझं मत आहे. एका मुस्लिम अतिरेक्यावरुन संपूर्ण मुस्लिम समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारे लोक आणि एका सलमानच्या उदाहरणावरुन न्यायव्यवस्थेच्या नावाने बोटं मोडणारे यांच्यात काहीही फरक नाही. आणि मुळात लोकशाही आहे तर न्यायव्यवस्था अशी होण्यात आपलाही सहभाग आहेच. फक्त घटनेने दिलेलं उच्चारस्वातंत्र्य पाहिजे आणि जबाबदारी घ्यायची नाही हा दुटप्पीपणा आहे. (व्यक्तिगत घेऊ नये.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
ह
हुप्प्या Fri, 07/08/2016 - 21:22 नवीन
बांग्लादेश्मधले अतिरेकी आणि दाभोळकर आदींना मारणारे सनातनप्रभात वाले यांच्यात फरक नाही मोठ्ठ्ठा फरक आहे. झापडबंद असाल तर तो फरक लक्षात येणार नाही. पण नाहीतर ते लक्षात येणे सहज शक्य आहे. दाभोळकर वा अन्य व्यक्तींना मारणारे मारेकरी हे फक्त त्या व्यक्तीला मारण्याचा कट करत होते आणि त्यांची सर्व योजना ही त्या दृष्टीने होती. ढाक्यात काय घडले? कुठल्याशा बेकरीत जायचे जिथे परदेशी व्यक्तींची गर्दी असते तिथे शस्त्रसज्ज होऊन जायचे. मग तिथे जो कुणी असेल त्यातील लोकांना ओलिस ठेवायचे. त्यातल्या कुराणातील आयते म्हणू शकणार्‍या लोकांना सोडून द्यायचे आणि बाकीच्यांना ठार करायचे. हा अत्यंत धर्माधिष्ठित, पिसाट, विध्वंसक, असहिष्णू बेत होता. त्यात एखाद्या व्यक्तीला मारणे हा उद्देश नसून मिळतील तितक्या लोकांना मारण्याचा एक घाऊक द्वेष होता. कट करुन एका व्यक्तीला मारणे हे बेकायदा, मृत्युदंडाला पात्र असणारे कृत्य आहे. पण दहशतवाद हे त्याहूनही भयंकर आणि क्रूर कृत्य आहे. एखाद्या व्यक्तीला मारण्यामागे त्या व्यक्तीबद्दल रोष असतो. पण निव्वळ अमुक जागी उपस्थित आहे आणि इस्लामचा अनुयायी नाही म्हणून एखाद्याला मारणे ह्यात जी निर्घॄणता लागते ती एका व्यक्तीला कट करुन मारताना दिसत नाही. हा मोठा फरक लक्षात आणून दिलाच पाहिजे. जेवढे हाताला लागतील ते लोक मारायचे. मग त्यात वय, लिंग, स्वभाव काहीही न बघता ते पुरेसे इस्लामी आहेत की नाहीत ते जुजबी तपासून मग मारायचे हे कृत्य जास्त भीतीदायक आणि विध्वंसक आहे. कलबुर्गी आणि दाभोळकर प्रकरणी फक्त त्या व्यक्तींनाच नुकसान झाले पण ढाक्यातील दहशतवादी प्रकारात कोण बळी जाईल किती बळी जातील ह्याचा काहीही भरवसा नाही. त्या दोन्ही प्रकारांना एका पारड्यात तोलणे उथळपणाचे आहे असे माझे मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ग
गॅरी ट्रुमन Sat, 07/09/2016 - 13:44 नवीन
त्या दोन्ही प्रकारांना एका पारड्यात तोलणे उथळपणाचे आहे असे माझे मत.
प्रचंड सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
अ
अनिरुद्ध.वैद्य Sat, 07/09/2016 - 20:03 नवीन
नीट समजावलेत :) धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
म
मृत्युन्जय Mon, 07/11/2016 - 09:34 नवीन
अतिशय तीव्र सहमती. अगदी योग्य शब्दात मांडले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
अ
अनुप ढेरे Mon, 07/11/2016 - 18:20 नवीन
दोन्ही गोष्टींमध्ये धार्मिक प्रेरणेने हत्या केलेया आहेत. धार्मिक भावनांचा/धर्माचा आधार घेऊन दहशत पसरवणं हे दोन्हीकडे कॉमन आहे. (बाबरी पाडणं हा देखील दहशतवादच होता!) सनातन प्रभात आदींना गंभीरपणे घेत नाहीत हे दुर्दैवी आहे. मॉडरेट मुसलमानांकडून जसं आपण झाकीर नाईक, आयसिस आदींची निंद करण्याची अपेक्षा ठेवतो तशीच अपेक्षा हिंदूंकडून ठेवणं अवाजवी नाही. नाहीतर आत्ता छोटं पिल्लू असलेली मूलतत्ववादी मंडळी मोठ्या प्रमाणात हिंदूंमध्येही बनतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
म
मिहिर Mon, 07/11/2016 - 21:41 नवीन
मॉडरेट मुसलमानांकडून जसं आपण झाकीर नाईक, आयसिस आदींची निंद करण्याची अपेक्षा ठेवतो तशीच अपेक्षा हिंदूंकडून ठेवणं अवाजवी नाही. नाहीतर आत्ता छोटं पिल्लू असलेली मूलतत्ववादी मंडळी मोठ्या प्रमाणात हिंदूंमध्येही बनतील.
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ब
बॅटमॅन Mon, 07/11/2016 - 21:42 नवीन
सहमत. उगा नको तिथे डिफेन्सिव्ह होऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 07/12/2016 - 00:28 नवीन
+++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रसाद गोडबोले Tue, 07/12/2016 - 15:30 नवीन
(बाबरी पाडणं हा देखील दहशतवादच होता!)
तथाकथित बाबरी मशीदीच्या जागी ११ व्या शतकातील मंदीर होते हे पुराव्याने शाबित झालेले आहे , तेही 'सेक्युलर' सरकारच्या काळात ! त्यामुळे बाबरी पाडणे हा दहशतवाद ठरत नाही, तो उशीराने झालेल्या न्याय ठरतो. जर बाबरी पडणे हा दहशतवाद असेल तर शिवाजीमहाराजांनी दख्खन्मोहिमेत २-३ मशीदी ( की ज्या पुर्वाश्रमीमंदीरे असल्याचे खणखणीत पुरावे होते) पाडुन पुन्हा मंदिरे उभारली आहेत ह्याला काय म्हणाल ? आणि हिंदुंनी कोणत्याही दुसर्‍या "धर्माच्या" विरुध्द "प्रो-अ‍ॅक्टीव्हली" हिंसा केल्याचे एकही उदाहरण इतिहासात सापडत नाही , तुम्हाला सापडले तर जरुर कळवा आम्हालाही , इथेच मिपावर वादावादीत वापरता येईल !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ह
हुप्प्या Tue, 07/12/2016 - 18:13 नवीन
पुन्हा सांगतो: एका व्यक्तीची हत्या ही केवळ त्या व्यक्तीचे नुकसान करते. दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे ह्यांनी कुठल्यातरी विचारांनी धार्मिक लोकांशी संघर्ष सुरू केला होता. त्यातील माथेफिरु लोकांनी त्यांना संपवले. हे अर्थातच पूर्ण चुकीचे, फाशी द्यायच्या योग्यतेचे कृत्य होते. पण निदान ह्या बळी पडलेल्यांनी काही वादग्रस्त विचार मांडून त्या संघर्षाची पायाभरणी केली होती. ढाक्याचे काय? तिथली ती बेकरी, तिथे उपस्थित असणारे तरिशी जैन सारखे लोक, कुणाच्या अध्यात ना मध्यात. कधी इस्लाम विरोधी विचार मांडलेले नाहीत काही नाहीत. केवळ अतिरेक्यांनी ती जागा निवडली म्हणून त्यांना बळी जावे लागले. त्यातील स्वैर, ताळतंत्र नसणारा हिंसाचार, कुणाचाही बळी घेऊ शकणारा हिंसाचार हा जास्त घातक आहे. दोन मोठे फरक म्हणजे आकड्यातला फरक, एक व्यक्ती विरुद्ध अनेक व्यक्ती बळी जाणे. पहिल्या बाबतीत निदान थोडी कुणकुण लागली असणे आणि कुठलाही मागमूस लागू न देता घडवून आणलेला हिंसाचार हे दुसरे टोक. जर सरकार सजग असते आणि दाभोळकरांसारख्या लोकांना २४ तास संरक्षण देत असते तर त्या घटना टळू शकल्या असत्या. भविष्यात टळू शकतील. पण ढाक्यातील अतिरेकी घटनांसारख्या घटना टाळणे अशक्य आहे. एक तर ते अतिरेकी त्या घटनेपर्यंत अतिरेकी आहेत हेच माहित नव्हते. आणि जिथे ती घटना घडली तिथे अशी काही पार्श्वभूमी नाही. त्यामुळे एक समाज म्हणून इस्लामी दहशतवाद मला जास्त धोकादायक वाटतो. मी कुठल्याही धर्माच्या अध्यात वा मध्यात नसलो तरी इस्लामी अतिरेकाचा बळी मी ठरणारच नाही अशी खात्री नाही. उलट सनातनकडून मला धोका नाही असे वाटते. बहुतांश समाज हा मध्यममार्गी असतो आणि त्याच्या दृष्टीने ढाक्यात घडले ते जास्त नुकसान करणारे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा