पुन्हा झकीर नाईक
https://www.youtube.com/watch?v=I6GY8WvRHo8
झकीर नाईक हा एक तल्लख स्मरणशक्ती असणारा, खर्या खोट्याची बेमालूम मिसळ करून सांगणारा एक वहाबी तत्त्वज्ञानाचा पाईक आहे. अरबी देशातून ह्याच्या संघटनेला भक्कम पैसा मिळतो.
बांगला देशात ढाका इथे जे जीवघेणे अतिरेकी हल्ले झाले त्यातील अतिरेकी हे झकीर नाईकचे भक्त होते. त्यामुळे ह्या इसमाला आपले विचार खुलेपणाने मांडू द्यावेत की बंदी घालावी अशा चर्चा भारतीय माध्यमात होऊ लागल्या आहेत.
खरे तर कुठल्याही विचारावर बंदी घालणे चूक. पण भारतात असे निर्भेळ विचारस्वातंत्र्य नाही. सॅटॅनिक व्हर्सेस एक मोठे उदाहरण आहे. जेम्स लेनचे शिवाजी महाराजांवरचे पुस्तक हे एक दुसरे. अशा प्रकारची बंदी घातलेल्या साहित्याची यादी प्रचंड मोठी आहे. (https://en.wikipedia.org/wiki/List_of_books_banned_in_India)
माझ्या मते ह्या माणसाचे विचार खंडन करुन टाकावेत. बंदी घालून काही साध्य होत नाही. व्यासपीठावर, झगमगाटात, हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत (ज्यातले बहुतेक त्याचे भक्तच असतात) तो अगदी दिपवून टाकणारे काहीतरी भव्यदिव्य बोलतो. पण बारकाईने तपास केला तर त्याच्या मुद्द्यातील कच्चे दुवे सहज कळतात.
सौदी अरेबियात बाकी धर्मस्थळे बनवायला परवानगी नाही ह्याचे उत्तर असे की गणिताचे शिक्षक नेमायचा असेल तर २+२=४ उत्तर देणारा नेमाल का २+२=५ असे उत्तर देणारा? इस्लाम हा २+२=४ उत्तरवाला आणि बाकी धर्म २+२=५ किंवा २+२=३ वाले आहेत म्हणून त्यांना परवानगी नाही असे खरे तर संतापजनक आणि अन्य धर्मांना तुच्छ लेखणारे ह्याचे उत्तर यू ट्युबवर उपलब्ध आहे.
https://www.youtube.com/watch?v=mzq--C6rHIY
अशा विचारांनी प्रभावित होऊन कुणी ढाक्यातील अतिरेक्यांप्रमाणे कुराणातील आयतांवर प्रश्न विचारून ते न येणार्यांचा शिरच्छेद केला तर झकीर नाईकाचा त्यात वाटा नाहीच असे कसे म्हणता येईल?
एखाद्या देशातील लोकशाही, विचारस्वातंत्र्य ह्यांचा वापर करुन असहिष्णूपणा, दहशतवादाला पूरक विचार मांडणे ही एक डोकेदुखी बनत आहे. भारताप्रमाणे इंग्लंड, अमेरिका इथेही असले प्रकार होताना दिसतात. ह्याला आळा कसा घालावा हा एक क्लिष्ट प्रश्न आहे.
असल्या प्रकारावर उतारा म्हणून हा उपाय कसा वाटतो?
https://www.youtube.com/watch?v=F630rQ2lrWU
💬 प्रतिसाद
(271)
ब
बोका-ए-आझम
Tue, 07/12/2016 - 19:17
नवीन
माॅडरेट मुस्लिम हे अमेरिका जसं good Taliban आणि bad Taliban म्हणते तसं मृगजळ आहे. आणि हिंदू धर्मात मूलतत्ववाद येणं मला तरी शक्य वाटत नाही. इस्लामप्रमाणे हिंदू धर्म हा काही पुस्तक किंवा प्रेषित यांच्यावर आधारित धर्म नाही. त्यामध्ये प्रचंड प्रमाणात विविधता आहे. ईश्वरनिंदा किंवा blasphemy ही संकल्पनाच हिंदू धर्मात नाही. पूर्णपणे नास्तिक असूनही एखादा माणूस हिंदू असू शकतो. तसा पूर्णपणे नास्तिक मुस्लिम असू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. कमी कडवा किंवा कमी कट्टर मुस्लिम असू शकतो, पण moderate किंवा liberal हा शब्द ज्या अर्थाने वापरला जातो तसा मुस्लिम असणं शक्य नाही. आणि त्याबद्दल तक्रारही नाही, किंवा त्यात नकारात्मक असं काही आहे असंही नाही. पण उगीचच moderate मुस्लिम वगैरे अस्तित्वात नसलेल्या किंवा शक्य नसलेल्या मृगजळी संकल्पनांच्या मागे लागणं व्यर्थ आहे.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 07/13/2016 - 04:35
नवीन
त्यामध्ये प्रचंड प्रमाणात विविधता आहे. ईश्वरनिंदा किंवा blasphemy ही संकल्पनाच हिंदू धर्मात नाही. पूर्णपणे नास्तिक असूनही एखादा माणूस हिंदू असू शकतो.
१. हिंदूधर्मात भौगोलिक विविधता आहे हे मान्य आहे
२. ब्लास्फेमी ही संकल्पना हिंदूधर्मात नाही हे जरा सोदोहारण स्पष्ट केलेत तर पुढे बोलता येईल
3.पूर्णपणे नास्तिक असूनही एखादा मनुष्य हिंदू असू शकतो हे मात्र मी अमान्य करतो
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 07/13/2016 - 05:26
नवीन
जवळपास सर्व इस्लामिक देशांत त्याबद्दल कमी-अधिक स्वरूपाच्या शिक्षा आहेत. पाकिस्तानमध्ये ईश्वरनिंदेचा आरोप ठेवलेल्या एका स्त्रीला माफी देण्यासंदर्भात विधान केल्याबद्दल पाकिस्तानी पंजाबचे गव्हर्नर सलमान तासीर यांची हत्याही झालेली आहे. तसं हिंदू धर्मात अजिबात नाही. कुठल्याही हिंदू सुधारकाला ईश्वराचं अस्तित्व नाकारण्याबद्दल वाळीत टाकणं वगैरे प्रकार झालेले नाहीत. गोपाळराव आगरकरांना पुण्यातल्या ब्राम्हण समाजाने वाळीत टाकलं होतं आणि त्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली होती. पण त्यामागे आगरकरांच्या नास्तिक असण्याचा आणि ते उघडपणे जाहीर करण्याचा काहीही संबंध नव्हता. चार्वाकाचं जडवादी तत्वज्ञान, ज्यात भौतिक सुख सर्वश्रेष्ठ मानून पारलौकिक सुखाचा ध्यास घेण्याची खिल्ली उडवलेली आहे, भारतीय तत्वज्ञान परंपरेचा एक महत्वाचा भाग आहे.
पूर्णपणे नास्तिक असूनही एखादा माणूस हिंदू असू शकतो कारण हिंदू असण्यासाठी माझी देवावर श्रद्धा असण्याची किंवा देव या संकल्पनेवर विश्वास असण्याची अजिबात गरज नाही. इस्लाममध्ये अल्लावर विश्वास न ठेवणारा हा सरळसरळ काफिर मानला जातो. मग भलेही तो दुस-या धर्मानुसार असलेल्या देवाच्या संकल्पनेवर विश्वास ठेवणारा असला तरीही. हिंदू धर्मात असं काहीही नाही.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 07/13/2016 - 05:57
नवीन
तुम्हाला काही वेगळे म्हणावयाचे आहे का ? एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति (ऋग्वेद १.६४.४६)– meaning wise people explain the same truth in different manners हे त्या शिवाय ज्ञान हे सर्व दिशांनी येऊ द्या म्हणणार्या धार्मिक संस्कृतीत तुम्हाला केवळ भौगोलीक विवीधताच आढळली ? इतर विवीधता आढळल्या नाहीत ?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 07/13/2016 - 06:21
नवीन
बापूंनी भौगोलिक विविधता असा उल्लेख केलाय म्हणजे त्यांना फक्त तीच आढळली असं होत नाही असं मला वाटतं. त्यांनी बाकीच्या विविधतांचा उल्लेख केला नसेल.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Wed, 07/13/2016 - 07:03
नवीन
नास्तिकांचा धर्म कल्पनेवर विश्वास असेल असे वाटत नाही. नास्तिक हिंदू हा केवळ जन्माने हिंदू असण्याची शक्यता जास्त आहे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 07/13/2016 - 08:17
नवीन
तेव्हा अनेक आचरणात्मक गोष्टी त्यात येतात. उदाहरणार्थ माणूस हिंदू म्हणून जन्मला असेल पण नंतर पूर्ण नास्तिक बनला असेल तरी त्याचे काही आचार-विचार हे हिंदू धर्मानुसार किंवा हिंदू जीवनशैलीप्रमाणे असतील. उदाहरणार्थ तो/ती लग्न हिंदूधर्मीय जोडीदाराशी करतील, मुलांची नावं हिंदू धर्मानुसार (याचा अर्थ धार्मिक विधी करुन असा घेऊ नये) ठेवली जातील वगैरे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिंदू धर्मात जी अंगभूत सहिष्णुता आहे त्यानुसार असा माणूस दुस-यावर त्याचे विचार लादणार नाही. असा माणूस नास्तिक असला तरी तो हिंदू धर्माचं पालन करतो आहे. मग त्याचा देवावर विश्वास नसला तरी हरकत नाही. दुस-या शब्दांत सांगायचं तर - हिंदू धर्मात देव आणि धर्म या वेगवेगळ्या संकल्पना आहेत पण इस्लाममध्ये महंमद हा देवाचा प्रेषित मानलेला असल्यामुळे इस्लामवर विश्वास आणि देवावर विश्वास या दोन वेगवेगळ्या गोष्टी असू शकत नाहीत.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 07/13/2016 - 07:25
नवीन
कोणत्याही धर्मीयात उदात्तता आणि संकुचितता आढळून येतात तसे हिंदूतही होत असावे तरीही संकुचितता कुठे आढळलीच तर त्याचा हिंदूधर्मीय अध्यात्मिक पाया अत्यंत ढिसाळ असेल. याच कारण मोक्ष प्राप्ती हे सर्वोच्च उद्दीष्ट षड रिपूंचा त्याग करणे अनिवार्य होते त्यात मत्सर क्रोध यांचाही त्याग निरपवाद अनुस्यूत आहे.
संत एकनाथ काय म्हणतात बघा
निंदा अवज्ञा हेळण । दुर्जनीं केलिया अपमान । हें साहे तो ईश्वर जाण । निजबोधें पूर्ण तो मद्रूप ॥५१॥
ज्यासी सर्वभूतीं निजात्मता । दृढ बाणलीसे तत्त्वतां । तो दुर्जनाचिया आघाता । साहे सर्वथा यथासुखें ॥५२॥संदर्भ
हिंदू धर्मीय तत्वज्ञानांचा आधार असलेल्या षड्दर्शनातील काही दर्शने इश्वराचे अस्तीत्वच मानत नाहीत. -जे इश्वर मानतात ते इश्वरापर्यंत अनेक मार्गाने पोहोचतात, आई वडलांना गुरुला देशाला किंवा अजून कशाला तुम्ही ईश्वर मानले तर त्यास इश्वर निंदा असे गृहीत धरले जात नाही. शिवाय असंख्य वेळा ईश्वरावर भक्तगण आणि संतगण रागावलेले ही दाखवले आहेत, तर ऋषीमुनी इश्वराला माणसाप्रमाणे रागवून शापही देऊ शकत. एवढेच नाहीतर विघ्नकर्त्यांची पूजा देखील करण्याचे स्वातंत्र्य आहे.
पारंपारीक भारतीय परस्पर विचारांवर टिकेचे आणि मतभेद निराकारणाचे मुख्य साधन शास्त्रार्थ आहे. त्यात टिकाकरतानाही दुसर्याच्या (वैचारीक) निवडी बद्दल दुष्वास न करता आदर आणि सहिष्णूतेची भावना ठेवणे अभिप्रेत असे. फार फारतर इतर मतांवर पाखंडी (heresy) असल्याची टिका केली जाई अपवादात्मक संघर्षही होत असतील पण मुख्य भर इतरांच्या निवडी बद्दल आदर आणि दुष्वास टाळणे यावर असल्यामुळे गोष्टी विकोपाला जाणे अवघड असे एवढे करुन, न्याय करणे हे राजाचे कर्तव्य असे. इश्वर अथवा पावित्र्य निंदा आढळली तर कुणीही उठा आणि घ्या बदला असा इश्वरी आदेश हिंदू धर्मात दिसत नाही उलट बदल्याच्या भावनेचा त्याग (किमान थेअरीत तरी) सांगितला जातो.
अंशतः संदर्भ:
Why Hinduism never developed a concept of blasphemy
विवीध दर्शन तत्वज्ञांनाचा दाखला वर दिलाच आहे त्या शिवाय स्वामी विवेकानंदांचे नास्तिकांची बाजू घेणारे पुरेसे लेखन मी मिपावर पुर्विच्या धागा लेखातून उधृत केले आहे.
अर्थात मी जशी उदात्त बाजू मांडली तसे संकुचित आचार-विचारांचे प्रदर्शन करणारी हिंदू धर्मीय मंडळीही आढळतात ही खेदाची बाबही बर्याचदा समोर येऊ शकते ही मानवी मर्यादा हिंदू मानवांनाही लागू होत असावी.
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 07/08/2016 - 21:52
नवीन
दाभोलकर,पानसरे,कलबुर्गी यांची हत्या म्हणजे धार्मिक दशतवादच.
आणि त्यावर इथे का काथ्याकूट होत नाही बरे?? दांभिक कुठचे
अहो "पाताळ धुंडणारे" दांभिक असतात...
हे घ्या दुवे...
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !
अराजक
डॉ. कलबुर्गी..यांची हत्या..
- Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी
Sat, 07/09/2016 - 05:52
नवीन
तुम्ही तीन लिंका दिल्या आहेत,आता दांभिकता म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो.
श्रद्धांजलीच्या धाग्यात काहींनी मुद्दाम कालनिर्णयकार साळगावकरांनासुद्धा श्रद्धांजली वाहली आहे,आता साळगावकरांची विचारधारा नेमकी दाभोलकरांच्या विरूद्ध आहे,आणि धाग्याचे औचित्य पाहता ते कितपत योग्य ठरते हे तुम्हीच ठरवा,कारण त्यांच्यासाठी वेगळा धागा काढता आला असता.
"अराजक" या धाग्यात सुद्धा काही प्रमाणात विषय सोडून
गरळ ओकलीच आहे.
"कलबुर्गींची हत्या" या धाग्यात प्रगो,तुडतुडी,काळा पहाड,यांचे प्रतिसाद तसेच इतरही सन्मानणीय आयडींचे प्रतिसाद पाहिल्यास दांभिकता काय असते ते लक्षात येईल.काहींनी यर हत्येचा निषेध पण नोंदवला नाही.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Mon, 07/11/2016 - 09:40
नवीन
श्रद्धांजलीच्या धाग्यात काहींनी मुद्दाम कालनिर्णयकार साळगावकरांनासुद्धा श्रद्धांजली वाहली आहे,आता साळगावकरांची विचारधारा नेमकी दाभोलकरांच्या विरूद्ध आहे,आणि धाग्याचे औचित्य पाहता ते कितपत योग्य ठरते हे तुम्हीच ठरवा,कारण त्यांच्यासाठी वेगळा धागा काढता आला असता.
दाभोळकरांच्या धाग्यावर साळगावकरांना देखील श्रद्धांजली वाहणे ही मला वाटते एक उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती. त्या संदर्भात म्रूगनयनी ने दिलेली खालील प्रतिक्रिया बोलकी आहे
वेगळी विचारधारा असली तरीही साळगावकर काही दाभोळकरांचे शत्रू नव्हते. किंबहुना दोघे कदाचित एकमेकांच्या विरोधात उभे देखील ठाकले नसतील. असे असताना दोघांना एकाच धाग्यावर श्रद्धांजली वाहणे हा विरोधाभास असू शकतो पण म्हणुन तो खोडकरपणा आहे असे नाही.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 07/08/2016 - 03:13
नवीन
तारेक फतेह ने भारी गेम केली ह्याची
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 07/09/2016 - 11:20
नवीन
व्हिडियो आवडला.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Fri, 07/08/2016 - 05:08
नवीन
झकीर नाईक वाटतो तितका सोपा नाही. मुस्लिमेतर तत्वज्ञान सुद्धा तो मुखोद्गत ठेवतो आणि अतिशय मुद्देसूद बोलतो.
'विचारांचा मुकाबला विचारांनी' हे त्याच्याबाबत शक्य वाटते कारण तो मुसलमान धर्मतत्वांवर घेतलेले आक्षेप शांत पाने ऐकून घेऊन त्याचे खंडन तर करतोच पण वर चार गोष्टी अजून सुनावतो. त्यामुळे त्याच्याशी जाहीर वाद शक्य आहे पण त्यासाठी लागणारा व्यासंग, हजरजबाबीपणा आणि निर्भय वृत्ती हे जरुरीचे आहे.
त्याच्याशी वाद विवाद करण्याची संधी बहुधा सहज सुलभ असावी, कारण त्याच्या बर्याच सभा होतांना दिसताहेत.
ह्या माणसाचा वादातील पराभव पाहण्याची आत्यंतिक तळमळ आहे ...
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Fri, 07/08/2016 - 08:08
नवीन
माणुस हुशार आहे.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Sun, 07/10/2016 - 20:08
नवीन
हा माणूस अजिबात हुशार नाही, धर्मवेड त्याच्या अंगी ठासुन भरले आहे.
त्याच्या यु ट्यूब वरील क्लिप पहा , नुरा कुस्ती प्रमाणे असतात त्या, इथे फक्त हाच फर्क असतो की कुस्ती शेवटी नाइकच जिंकतो,
सलमान , शाहरुख़ , आमिर सिनेमात लंबेचवड़े डायलॉग मारतात म्हणुन ते काय हुशार झाले?
- Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी
Mon, 07/11/2016 - 05:15
नवीन
काय भंकस करताय?
तुम्हाला अॅक्टिंग येते का?
शाहरूखचं स्ट्रगल तुम्हाला माहित्ये का?
अमिरच्या समाजकार्याचा अभ्यास आहे का?किंवा तुम्ही समाजासाठी काय करता?
सलमानच्या बिइंग ह्युमन संस्थेबद्दल काही माहिती आहे का?
...
..
उगाच आपलं घेतली पाचची कि सुटला तर्राट...
स्वमतांध दांभिक कुठचे
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Mon, 07/11/2016 - 18:18
नवीन
अगदीच खाली मुंडी आहात तुम्ही! तुम्ही या नटाचे pro आहात काय?
सलमानने लावलेले दिवे जगजाहिर आहेत.
आमिर खानचा दांभिकपणा सत्यमेव जयतेच्या वेळी लोकांनी अनुभवला आहे.
शाहरुखच्यां कोणत्या मेहनतीबद्दल बोलताय आपण? पेप्सी कंपनीच्या शीतपेयात किटकनाशके मिळाल्यावर ह्याची प्रतिक्रिया काय होती माहित आहे? किटकनाशके तर या देशाच्या पाण्यात आहेत, त्याला तुम्ही कंपनीचा दोष कसा मानणार्,
जौदे , ही गुणी बाळे तुम्हीच घेऊन नाचा डोक्यावर.
जकीर नाइकच्या क्लिप्स बघा, प्रश्न विचारण्यार्या माणसाच्या बाजूला ते दाढ़ीवाले कशाला उभे राहतात हो?
जसा काही तो पळून जानारा आहे, जवळजवळ 20/22 क्लिप पाहिल्या आहेत मी, एकाही वेळी त्याला अडचणीत आणनारा प्रश्न विचारण्यात आलेला नाही,
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Fri, 07/29/2016 - 18:28
नवीन
काही परदेशी विद्यापीठात लेक्चर देताना विचारले आहेत पण जेव्हा उत्तर गोत्यात आणणारे असेल तेव्हा चिडचिड करुन प्रश्न विचारणार्याच्या कुवतीबद्दलच प्रश्न्चिन्ह उभे करतो.पण ह्या माणसाचे पाठांतर थक्क करणारे आहे. मुस्लिम धर्मातला विवेकानंदांच्या जवळ्पास जाणारे व्यक्तिमत्व असल्याचा कधी कधी विचार येतो मनात.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 07/29/2016 - 18:41
नवीन
नका हो विवेकानंदांचा अपमान करु...
त्याच्या पाठांतराबद्दल दोन शब्दः हे पाठांतर अचूक आहे ह्याची मला खात्री नाही. असले तरी तो जे इन्टरप्रीटेशन करतो त्यामुळे त्याच्या पाठांतराला शुन्य कींमत आहे.
मी जवळपास सर्व धर्मग्रंथांचे वाचन केले आहे, बहुतेक सर्व धर्मोपदेशकांचे संदेश वाचलेले आहेत. प्रत्येक जण एकाच एकमेव सत्याकडे वेगवेगळ्या भाषेत निर्देश करत आहेत असे जाणवायचे. विपश्यनेचा कोर्स केल्यावर ते कोणत्या सत्याकडे निर्देश करत आहेत त्याची जाणीव झाली. तुकाराम-ज्ञानोबांपासून, गुरुगोविंद सिंगापर्यंत, इव्हन मोहम्मद पैगंबरापर्यंत सर्व 'पोचलेले' लोक एकाच सत्याचा पुकारा करत आहेत हे जाणवले. त्यामुळे भाषा, दॄष्टांत, तळमळ वेगवेगळी भासत असली तरी ह्या सर्व महात्म्यांच्या संदेशात एकवाक्यता आहे याची जाणीव झाली. म्हणजेच त्या सर्वांच्या संदेशाचे अचूक इन्टरप्रिटेशन मी करु शकलो असे मला वाटले व तेच असीम शांतता देणारे आहे. त्यामुळे कोणत्याही दोन धर्मांच्या तात्विक-अध्यात्मिक वादात पडणे योग्य नाही याचीही समज आली. अशी समज झानाकडे अजिबात नाही हे कळल्यामुळे झानाच्या पाठांतराचे कवडीचेही कवतिक नाही.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Fri, 07/29/2016 - 18:55
नवीन
म्हणुनच जवळपास जाणारे असे म्हटले आहे. अर्थात ह्यामागेही एक कहाणी आहे. झा.काचे गुरु शेख अहमद दिदात ह्याने हा -कुराण च्या कुराण व सोबत बायबल ही मुखोद्गत करुन मिशनर्यांना त्यंच्याच धर्मातली वैगुण्ये वगैरे दाखवण्याचा प्रकार- सुरु केला. ह्यामागे ही तो कधीकाळी कुणा मिशनर्यांकडुन अपमानित झाला होता म्हणुन चाळीस वर्षे कम्पॅरिटीव स्टडी करुन मग खुलेआम आव्हान द्यायला सुरवात केली. झा.काने बाकीच्या धर्मांचाही पुस्तकी का होईना अभ्यास केला व जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे त्या त्या धर्मातील आदरणीय व्यक्तिमत्वांबद्दल काहीही हीन बोलायला कमी केले नाही. ह्या गुरु शिष्य जोडीसंबंधी वाचताना मला रामकृष्ण परमहंस व विवेकानंद ह्या गुरुशिष्य जोडी आठवली. परंतु हजारोंच्या संख्येने जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांच्य तोंडावर चुकीचे/बरोबर संदर्भ आत्मविश्वासाने फेकुन त्यांना संमोहीत करणे हा प्रकार ही चकित करणारा आहे.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Fri, 07/29/2016 - 19:01
नवीन
मान्य.पण अडचण ही आहे कि त्याला समोरासमोर वादविवाद अजुन कोणी असे सिध्द अथवा म्हणुही शकले नाही. युटुय्ब वरचे जे दुवे आहेत झा.का च्या लेक्चर्सचे पोस्टमार्टेम करणारे ते सगळे त्याचे लेक्चर व्यवस्थित स्टडी करुन मग संदर्भ पडताळून केले गेलेले आहेत. कुराण मधील एक चूक दाखवा मी त्वरीत इस्लामचा त्याग करतो हे त्याचे आव्हान अजुनही कोणी घेऊ शकलेले नाही.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Sat, 07/30/2016 - 05:34
नवीन
पुष्कळाणी देण्याचा प्रयत्न केला, अगदी त्याच्या बालेकिल्ल्यात जाऊन पण आपल्याला कोंडीत पकडल्यावर झाक्या असा काही आक्रस्ताळीपणा दाखवतो की समोरचि आव्हान देणारी व्यक्ति गांगरुन जाते.
रच्याकने झाक्याला इस्लाममधेच पुष्कळसे विरोधक आहेत.त्याच्या मते मझार, दरगे हे गैर इस्लामिक आहेत.
तो मुसलमानाना तिथे जाण्यास मना करतो, आता हा मुद्दा घेऊन कोणी इस्लामिक स्कॉलर त्याच्याबरोबर वाद घालताना दिसला नाही. मला वाटते हाच मुद्दा घेऊन जर त्याला चेकाळवले तर त्याचा कलबुर्गी बनण्यास वेळ लागणार नाही, कारण इस्लाममधे ' आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास' अशी स्थिति आहे.
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Mon, 07/11/2016 - 07:59
नवीन
नुरा कुस्ती ही उपमा मला आठवत नव्ह्ती म्हणून प्रतिसाद देत नव्हतो, योग्य उपमा दिली. हा माणूस मला अजिबात हुशार वाटत नाही.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Fri, 07/08/2016 - 21:53
नवीन
https://www.youtube.com/watch?v=bk5q9TeGo14
ही क्लिप पहा. त्याच्या अथांग ज्ञानाची खोली फार नाही. थोडेसे खोलात शिरले तर ते लक्षात येते.
उदा. हिंदूंमधे मूर्तीपूजा वर्ज्य आहे हे सांगताना तो वेदांचा संदर्भ देतो. पण वेद हेच हिंदूंचे धर्मग्रंथ मानावेत असे कुठे म्हटले आहे? वेद हे कुराणाच्या पातळीवर न्यायचा प्रयत्न हास्यास्पद आहे. शिवाय वेदात इंद्र, वरूण, अग्नी असले आणखी कितीतरी देव आहेत त्यांच्या प्रार्थना आहेत त्यांचे काय? किती हिंदू लोक वेदांचे पारायण करतात? वेद हा माझ्या लेखी एक ऐतिहासिक दस्तावेज आहे. तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास, चोखामेळा, नामदेव ह्या संतांनी सांगितलेला धर्म लोकांना जास्त समजतो आणि भावतो. ह्या प्रत्येक संताने सगुण उपासना म्हणजे मूर्तीपूजेला शिरोधार्य मानले आहे. विठ्ठलाच्या मूर्तीचे वर्णन अनेक अभंगातून आढळते. हे खरे हिंदू नाहीत का? झकीर नाईकच्या उथळ अभ्यासातून तसा निष्कर्ष निघत असेल पण तो सत्याला धरून नाही.
झकीर नाईकाला वादविवाद करण्याचे अनेक लोकांनी निमंत्रण दिले आहे पण तो त्यातून पळ काढतो.
http://www.faithfreedom.org/debates/ZakirNaikp2.htm
तेव्हा हा माणूस वाटतो तितका विद्वान नाही. जर खुले व्यासपीठ असेल तर त्याचा विचारांनी पराभव करणे शक्य आहे. पण त्याच्या चॅनेलवर तसे स्वातंत्र्य नसते. त्याला वाटले तर तो त्याच्या गुंडांकरवी तुम्हाला हाकलून देऊ शकतो.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 07/08/2016 - 06:22
नवीन
दिग्विजय सिंगाने झाकीर शांतीचा प्रसार करतो असे २०१२ साली म्हंटल्याचे स्मरते.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 07/08/2016 - 07:55
नवीन
डिसक्लेमर : मी व्हिडीओ माध्यमे पाहणे आणि त्यावर भाष्य करणे खास करून लिखीत मजकूर नसताना सहसा (होताहोईतो) टाळतो त्यामुळे लेखात नमूद युट्युब्स अभ्यासल्या नाहीत.
* निसटत्या बाजू १
हा वाक्यांश केवळ अंशीक माहीतीच देत नाही का ? की लिहिण्याच्या घाईत शब्दांच्या निवडीत आणि वाक्य रचनेत तडजोड झाली आहे - आज पर्यंततरी माणसाने मनातल्या मनात काय विचार केला याचे स्वांतत्र्य सगळकडेच बर्यापैकी असावे- आपण कदाचित अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि उच्चार स्वातंत्र्याबद्दल बोलता आहात- भारतीय राज्यघटने नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य मुलभूत अधिकार असला तरी ते अमर्याद नाही पण सर्वसाधारण पणे काही अपवादात्मक स्थिती सोडल्या तर ते अधिकतम असणे अभिप्रेत आहे किंवा कसे ? अर्थात हा संपूर्ण चित्राचा अंशिक भाग झाला. ते अधिकतम आहे का हा या समस्येतील वेगळ्या सविस्तर चर्चेचा पैलू आहे.
या चित्राचा दूसरा भाग अभिव्यक्ती स्वातंत्र्याला राज्यघटना आणि कायदेविषयक संरक्षण मिळाले तरीही ते अधिकतम वापरण्यातले, समाजाकडून / समुदायाकडून / धर्मसंस्था इत्यादीकडून उपस्थित केले जाणारे व्यावहारीक अडथळे, जसे की हितसंघर्ष असलेल्यांचे उत्पातमुल्य उच्चार आणि अभिव्यक्ती स्वांतत्र्य निर्भेळपणे वापरण्यावर प्रत्यक्षात मर्यादा आणते. अर्थात असा उत्पातमुल्याचा दबाव असणे भारतीय राज्यघटनेस अभिप्रेत नसावे हे लक्षात घेणे गरजेचे आहे किंवा कसे.
इथे अमुकने तमुक केले, तिथे तडजोड केली तर इथे का नको असा पवित्रा घेतला जाताना दिसतो हि एक तार्कीक उणीव आहे एका चुकीने दुसर्या चुकीचे समर्थन होत नसते.
* माझे मत
जवळपास सहमत आहे. इथे अडचण अशी असते की अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध मांडणी करुन खंडन करु शकणार्यांची संख्या त्यांना उपलब्ध वेळ (आणि असे व्यक्त होण्यासाठी किमान स्वरुपाची सुरक्षा आणि वातावरण) कमी पडत असतात, साशंकीत तर्कांच्या मांडणीचे तर पर्वत उभे असतात मग त्यातील कोणते विचारांचे खंडन करावे याला प्राधान्य देण्याचाही प्रश्न येतो.
पण सर्वसाधारण्पणे व्यक्तीगत टिकेकडे लक्ष केंद्रीत न करता मुद्यांच्या खंडनाकडे लक्ष दिले तर वेळ अधिक वाचतो खंडन अधिक व्यवस्थीत होते. (पण प्रत्यक्षात नेमके उलट घडत असते, व्यक्तीगत टिकेस प्राधान्य देण्यात विचारातील तर्कदोषांकडे लक्ष्य वेधायचे राहून जाते - मग तर्कदुषित विचारांच्या मांडणीचा प्रभाव मागील पानावरुन पुढे चालू रहातो )
टोकाच्या विचांरांचे खंडन होऊन मिळत नाही आणि चुकीच्या विचारांनी कुणी प्रभावीत होऊन सामाजिक उपद्रव करत असेल तर तात्कालीक मर्यादीत बंधन घालण्यात काही चुकीचे नाही पण अभिव्यक्तीवरील बंधने कायमस्वरुपी न राहता खंडनावर भर दिला जावयास हवा. अभिव्यक्तीवर बंधन टाकताना अशी निर्मिती खंडनकरण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींना खंडनासाठी उपलब्ध असावयास हवी आणि अशा कृतींचे समिक्षण झाल्या नंतर त्या नंतरच्या काळात -खरेतर बहुसंख्य साहित्य-कला-कृतींच्या प्रकाशनावर विरुद्ध बाजूच्या विचारांच्या मर्यादा आणि तर्कदोष दाखवणार्या मंतासहीत चे समिक्षण सोबत जोडणे बंधनकारक करुन साहित्य-कला-वैचारीक अभिव्यक्ती समाजापूढे उपलब्ध रहावयास हवी.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Fri, 07/08/2016 - 22:04
नवीन
१. सॅटॅनिक व्हर्सेस : ह्यावर बंदी का घातली? केवळ मुस्लिम व्होटबँकेकरता. महंमदाला सैतानाने काही ओळी सांगितल्या आणि नंतर त्या ओळी कुराणातून वगळल्या अशी काही तरी गोष्ट आहे ज्यावर हे पुस्तक आधारलेले आहे. पण इराणमधे रश्दीविरुद्ध फतवा जाहीर होताच भारताने ह्यावर बंदी घातली.
२. निकाह हा सिनेमा तलाक तलाक तलाक ह्या नावाने प्रदर्शित होणार होता. पण मुस्लिम लोकांनी त्यावर बंदी घालण्याची मागणी केली. मग निर्माते बी आर चोप्रा ह्यांना त्याचे नाव बदलून निकाह ठेवावे लागले. त्रिवार तलाक म्हणून घटस्फोट देण्याला कायद्याची मान्यता आहे (अर्थात केवळ मुस्लिम पुरुषांना!) तरी सिनेमाला ते नाव द्यायला बंदी का?
३. लोकमतमधे पिगी बँकेवर आयसिसचा झेंडा छापला म्हणून दंगे झाले. कारण त्या आयसिसच्या "पवित्र इस्लामी" ध्वजावर अल्ला आणि मोहम्मदाचे नाव होते आणि ते डुकरावर (अगदी व्यंगचित्राद्वारेही) दाखवणे हे महापाप!
ह्या आणि अशा प्रसंगातून भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अत्यंत मर्यादित आहे हे लक्षात येते. विशेषतः मुस्लिमांबाबत. हिंदूंच्या देवीदेवतांबाबत भारतीय सरकार जास्त सहनशील आहे. तसे असायला नको. सर्वांना सारखेच स्वातंत्र्य मिळायला हवे. ते एखाद्या गटाच्या उपद्रवमूल्याकडे बघून दिले जाता कामा नये.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 07/08/2016 - 22:27
नवीन
याच उत्तर सरकार पेक्षा नरहर कुरुंदकरांकडे अधिक व्यवस्थीत असावे, 'स्वातंत्र्य हे संस्कृती सिद्ध असते' संस्कृती विशीष्ट स्वातंत्र्य देणारी असेल तर तीच स्वाभाविक वाटते. पण त्यापुर्वी स्वातंत्र्याच्या कक्षा सातत्याने वृद्धींगत करून ती सिद्ध करावी लागते.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Fri, 07/08/2016 - 23:03
नवीन
एखादा गट (म्हणजे मुस्लिम धर्मीय लोक) हे कायमच खुट्ट झाले की आमच्या भावना दुखावतात अशी बोंब ठोकतात. प्रत्येक वेळीस अशा वृत्तीला खतपाणी घालून हे लोक कधी व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान करायला शिकतील ही आशा भाबडी आहे. उलट बाकी कुणाला काय बोलायचे ते बोला पण आमच्या धर्माला काही उलटसुलट बोलाल तर खबरदार! अशा प्रकारची वृत्ती जास्त बोकाळत आहे. आगीत तेल ओतून ती विझण्याची अपेक्षा करण्यासारखे आहे. अशाने स्वातंत्र्याचा कक्षाबिक्षा वद्धिंगत न होता जास्त आक्रसून जात आहेत हे उघड दिसते आहे.
चार्ली हेब्दो प्रकरण असो वा डॅनिश कार्टून, चेष्टा वा टिंगल केल्यावर त्याचे प्रत्युत्तर म्हणून जगभर होणारी हिंसा हे हल्लीच्या काळात मुस्लिमांबाबतच का होत आहे? हे स्वातंत्र्याच्या कक्षा सातत्याने वृध्दिंगत होत असल्याचे लक्षण आहे का?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 07/09/2016 - 04:54
नवीन
अर्ध उत्तर संदीप डांगेच्या खालच्या प्रतिसादातून आहे -यातील व्यक्तीपूजा प्रकारांच्या मर्यादांबद्दल समाजास सजग करणे महत्वाची पायरी असावी- आणि अर्धे उत्तर एम जे अकबरांच्या ब्रेक्झिट बद्दलच्या अलिकडील एका लेखात चपखल आले असावे - एम जे अकबर मंत्रिपदावर पोहोचल्यामुळे त्यांचे लेख गुगलणे अवघड झाले आहे. पण अतिरेक्यांचा सामना पोलीस दलांनी करणे जरूरी आहे तेथिल अपयशाचे खापर इतरत्र फोडून उपयोग नाही असा त्याचा मतितार्थ आहे.
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Sat, 07/09/2016 - 05:20
नवीन
स्त्रीशिक्षण, विधवा विब्वाह , केशवपन, सतीबंदी , महिला पोटगी प्रॉपर्टी कायदे, जातीभेद निराकरण, गणपती आर्टिफिशियल ट्यांकमध्ये सोडणे... ... 'तुम्ही'देखील हे सहजपणाने स्वीकारलेले नाही. आधी प्रचंड विरोध करुन गोंगाट करुन नंतर हे स्वीकारले ना? आठवतय का , की सिलेक्टिव्ह अम्नेजिया झालाय?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 07/09/2016 - 05:29
नवीन
स्वीकारले आहेत ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण मुस्लिमांनी अजूनही धर्मसुधारणा स्वीकारलेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे. हमीद दलवाईंसारख्या सुधारकाला खुद्द त्यांच्या समाजात जी वागणूक मिळाली त्यावरून कळतंच. आजही केरळसारख्या राज्यांत अल्पवयीन किंवा नुकत्याच १८ वर्षे पूर्ण केलेल्या मुलीशी लग्न करणे आणि मग तिचा यथेच्छ उपभोग घेऊन तिला फोनवरून तलाक देऊन सोडून देणे असले प्रकार होतात. त्याला अरब निकाह म्हणतात. हे अजूनही -२१ व्या शतकात चालू आहे आणि अजूनही AIMPLB ला तलाकच्या नियमांना हात लावायची इच्छा नाही. हे कशाचं निदर्शक आहे? हिंदू निदान काळानुसार बदलले, मुस्लिम दुर्दैवाने काही अपवाद वगळता बदलायला तयार नाहीत याचंच ना?
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Sat, 07/09/2016 - 07:13
नवीन
दहा हजार वर्षांच्या हिंदू प्रथा अकबर औरंगजेब वगैरेनी केलेले कायदे , राजा राममोहन रॉय , फुले इ इ चे प्रयत्न , इंग्रजी कायदे व नंतर काँग्रेसची कारकिर्द इ प्रदीर्घ काळातील प्रयत्नानंतर हळूहळू संपल्या.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 07/09/2016 - 08:42
नवीन
तुमचं इतिहासाचं अज्ञान अफाट आहे यात शंकाच नाही. औरंगजेबाच्या कायद्यांनी हिंदू प्रथा संपल्या? असो. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्या संपल्या. मुस्लिमांच्या अजून शिल्लक आहेत. दहा हजार वर्षांपूर्वी हिंदू धर्मात सतीसारखी घाणेरडी प्रथा होती हे आज महत्त्वाचं नाही पण मुस्लिम धर्मात आजही कोणत्याही स्त्रीला तिचा पती तीन वेळा तलाक देऊन घराबाहेर काढू शकतो हा खरा प्रश्न आहे. आणि त्यातून बाहेर पडण्याची त्यांची इच्छा नाही हा त्याहून मोठा प्रश्न आहे.
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Sat, 07/09/2016 - 13:38
नवीन
सतीची प्रथा दहा हजार वर्षापुर्वी होती ? रमाबै माधवराउ बल्लाळ उर्फ पेशवे अश्मयुगात सती झाल्या की काय !
सतीविरुद्ध कायदे अकबर व औरंगजेबाने केले होते... पण त्याच्या पदरी हिंदू सरदार ढीगभर असल्याने त्याची अम्मल बजावणी करणं त्याना जमणार नव्हते.
नंतर सुरु होतो इंग्रजी काळ ... राजा राममोहन रॉय इ इ ... स्त्री शिक्षण इ इ
दहा हजार वर्षे सुरु असणार्या प्रथा संपायला तीनशे वर्षे लागली !
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 07/09/2016 - 17:12
नवीन
काय सांगता? त्यांचा व्यनि आलेला की काय? तुमच्या नक्की कुठल्या आयडीवर पाठवलेला होता त्यांनी? आणि औरंगजेबाने सतीविरुद्ध कायदा केला होता हे कशावरून? त्याला आणि अकबराला आणि त्याला कधीपासून त्याच्या पदरी असलेल्या हिंदू सरदारांची भीती वाटायला लागली? बरं, अकबराने कायदा केला होता मग औरंगजेबाने तो परत का केला म्हणे? मुघल दरबारातही फायली गहाळ व्हायच्या की काय? काहीही मनात येईल तो इतिहास सांगताय राव. अभ्यास वाढवा जरा.
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Sat, 07/09/2016 - 18:58
नवीन
Akbar, states Sheikh Muhammad Ikram, was the first Mughal emperor to issue general orders to stop sati.[46] Aurangzeb issued another order in 1663, after returning from Kashmir, "in all lands under Mughal control, never again should the officials allow a woman to be burnt".[46
https://en.m.wikipedia.org/wiki/Sati_(practice)
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Sat, 07/09/2016 - 19:01
नवीन
https://en.m.wikipedia.org/wiki/Sati_(practice)
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 07/10/2016 - 06:08
नवीन
त्यावर कोणीही जाऊन काहीही लिहू शकतो हे माहित आहे ना? विश्वासार्हता हा मुद्दा आहे. अकबराचं अस्सल फर्मान वगैरे आहे का? नाही ना? मग संपलं. मी उद्या विकीपिडियावर जाऊन सती ही प्रथाच नव्हती असं लिहू शकतो. त्याला काहीही अर्थ नाही. रच्याकने हा विकीवरचा लेख तुम्हीच लिहिला आहे का?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 07/10/2016 - 20:16
नवीन
सतीप्रथेविरुद्ध अकबराने कायदे केले होते ह्याचा अकबरनाम्यात उल्लेख आहे.
रच्याकने सतीप्रथा किमान दिड हजार वर्ष जुनी आहे. मौर्योत्तर काळानंतर जी कर्मकाण्डे हळूहळू सुरु झाली त्यातूनच कधीतरी ही प्रथा उगम पावली असावी. दक्ष राजा, सती, शंकर-वीरभद्र ही कथा किमान गुप्तकाळात जन्म पावलेली असावी. चालुक्यांनंतर ही प्रथा खूपच वेगाने पसरली.
ह. अ. भावे ह्याचं 'सतीप्रथेचा इतिहास' नामक एक पुस्तक आहे ( मी अजून वाचलं नाही ते) त्यात नक्कीच अधिक माहिती मिळेल.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 07/11/2016 - 05:42
नवीन
असे कायदे कुणीही करेल. अंमलबजावणी केली होती का? हे महत्त्वाचं आहे. आणि मुळात अकबरनामा हा अकबराच्या भाटांनी त्याचं गुणगान करण्यासाठी लिहिलेला ग्रंथ असेल तर त्यात ते काहीही लिहितील. ते खरं आहे कशावरून? हजार बखरींपेक्षा एक अस्सल कागदपत्र भारी असतं ना? मग कुठे आहे ते अस्सल कागदपत्र? राजा राममोहन राॅय यांच्या संवाद कौमुदी मध्ये जसे १८२९ मध्ये सतीप्रथा बेकायदेशीर ठरवल्याबद्दल तत्कालीन गव्हर्नर जनरल लाॅर्ड विल्यम बेंटिकचं अभिनंदन करणारी बातमी आहे आणि त्याचबरोबर सनातन्यांनी काढलेल्या चंद्रिका नावाच्या वृत्तपत्रात राॅय यांची निर्भर्त्सना करणारी आणि हा धर्मावर हल्ला असल्याची बातमी आहे आणि ही दोन्हीही वृत्तपत्रं ब्रिटिश म्युझियममध्ये उपलब्ध आहेत (मायक्रोफिल्म) - तसं काहीही इथे नाहीये.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 07/11/2016 - 10:59
नवीन
त्यात बहुधा सतीची एक केस दिलेली आहे.
अकबरनामा मजकडे संक्षिप्त स्वरूपात आहे. घरी गेल्यावर बघून सांगतो नक्की काय उल्लेख आहे ते. त्यात नाही मिळाले तर अर्काइव्हवर उपलब्ध असलेली सम्पूर्ण प्रत अभ्यासावी लागेल.
हा अर्थात फ़क्त एक ग्रंथ. मुग़ल दफ़्तरात यासंबंधी अजून कागदपत्रे नक्कीच असतील पण ती मला माहीत नाहित.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 07/11/2016 - 06:54
नवीन
ह. अ. भावे ह्याचं 'सतीप्रथेचा इतिहास' नामक एक पुस्तक बुकगंगा डॉट कॉम दुवा
- Log in or register to post comments
ध
धनावडे
Sat, 07/09/2016 - 17:56
नवीन
म्हणून तुम्ही सुधारणारच नाही का?
- Log in or register to post comments
V
viraj thale
Sat, 07/09/2016 - 09:42
नवीन
डाकू
रानी
चम्पा
बाई
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 07/08/2016 - 17:58
नवीन
विचारांचा मुकाबला विचारांनी हा प्रकार झाना सोबत शक्यच नाही. किंबहुना जे जे कोणी कोणाही धार्मिक व्यक्तीला गुरु, आदर्श इ इ मानतात त्यांच्या विचारांना बदलणे शक्य नसते. उदाहरणे अनंत आहेत.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 07/08/2016 - 18:33
नवीन
झाना म्हणजे ? विचारांचा मुकाबला विचारांनी का शक्य नाही ?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 07/08/2016 - 18:48
नवीन
झाना = झाकिर नाइक
विचारांचा मुकाबला विचारांनी शक्य आहे/अस्तो पण ते 'विचार' असतील तर....
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 07/08/2016 - 18:56
नवीन
;) सॉरी माझा ट्यूब पेटावयास वेळ लागला :)
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »